Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मोजमाप पुस्तिकाही संगणकीकृत

0
0

जि. प. सीईओ डॉ. गिते यांनी दिली माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात बांधकाम विभाग, लघु पाटबंधरे विभाग तसेच पाणीपुरवठा विभाग प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिम (पीएमएस) प्रणालीमध्ये तांत्रिक दुरुस्ती करून यापुढे मोजमाप पुस्तिकाही संगणकीकृत पद्धतीनेच करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषदेस ग्रामविकास विभागाचे याबाबतचे पत्र शुक्रवारी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्याची प्रायोगिक तत्वावर निवड झाली असून अंगणवाडींच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी सरकारने 'सीडॅक'ची निवड केली असून या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास पेपरलेस कारभार होण्यास मदत होणार असून विविध फाईलींचा प्रवास यामुळे थांबणार असून विनाविलंब देयक अदा करता येणार आहे. या प्रकल्पात काही सुधारण करण्याबाबत जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभागास प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार सरकारने ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभाग व लघु पाटबंधारे विभाग या प्रकल्पांसाठी कामाची मोजमाप पुस्तिका प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिममधील संगणकीकृत पद्धतीने राबविण्यास मान्यता दिली आहे.

प्रत्येक पानावर स्वाक्षरी

या सिस्टीममध्ये कोणत्या अभियंत्याने कोणती माहिती भरली ते समाविष्ट करणे, संबंधित अभियंत्याने माहिती भरल्यावर त्याची प्रिंट काढून मोजमाप पुस्तिकेत चिटकविणे, त्यानंतर शाईने प्रिंट आऊटवर चारही बाजुने तिरप्या रेषा मारून साक्षांकित करणे, प्रत्येक पानावर अभियंत्याने स्वाक्षरी करणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

आधी बदल सिस्टिममध्ये

कोणताही बदल करावयाचा झाल्यास तो सर्वप्रथम सिस्टिमवरच करावा, शाईने करू नये, अशाही सूचना राज्य सरकारने दिल्या आहे. त्यामुळे या कामात पारदर्शकता राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माजी विद्यार्थ्यांमुळे शाळा झाली डिजिटल

0
0

बेलगंगा विद्यालयाचे आठ वर्ग झाले स्मार्ट; मंगळवारी उद्घाटन

म. टा. प्रतिनिधी, चाळीगसाव

'माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा गजबजली शाळा', '५० वर्षांनंतर भरला वर्ग', अशा आशयाच्या बातम्या नेहमी दैनिकांतून वाचत असतो. जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट घेण्यासाठी आणि शिक्षकांचा आशीर्वाद घेण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन करून एक दिवस भूतकाळात रमायचे एवढेच या मेळाव्याचे फलित अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा साखर कारखाना येथील बेलगंगा टेक्निकल माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यापलीकडे जाऊन शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श उभा केला आहे. व्हॉटस् अॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून आवाहन करीत, एकमेकांशी संवाद साधत या माजी विद्यार्थ्यांनी एक दोन वर्ग नव्हे तर संपूर्ण शाळाच डिजिटल करण्यासाठी निधी उभारला आहे. येत्या मंगळवारी, २ एप्रिल रोजी या आदर्शवत उपक्रमाचे मोठ्या दिमाखात लोकार्पण होणार आहे. हे कार्य पूर्णत्वाकडे नेण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जी. एन. ढगे सर यांचा सिंहाचा वाटा आहे.

बेलगंगा साखर कारखाना वसाहतीवर बेलगंगा टेक्निकल माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना घडविले. आज ते विद्यार्थी विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत. मात्र तरीही आयुष्यातील पहिली शाळा, पहिले शिक्षक, जुने मित्र यांच्याविषयीची ओढ कायम राहतेच. दहावीनंतर उच्च शिक्षण, पदवी, नोकरी, लग्न, संसार आणि मुलांच्या संगोपणात अडकल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जर एकमेव ठिकाण असेल तर ते म्हणजे माध्यमिक शाळा. आयुष्याची खरी जडणघडण याच शाळेत झालेली असल्यामुळे शाळेविषयी, तिथल्या परिसराविषयी, शिक्षकांविषयी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांच्या मनात एक आठवणींचा आणि आदराचा असा कोपरा असतो. त्याच आठवणींना साद घालत शाळेचे मुख्याध्यापक जी. एन. ढगे सरांनी काही माजी विद्यार्थ्यांजवळ आपला मानस बोलून दाखवला आणि शाळेचे डिजिटलायजेशनाचे रोप रोवले गेले. पाहता पाहता माजी विद्यार्थ्यांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. फेसबुक, व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून सगळे माजी विद्यार्थी ढगे सरांशी जोडले गेले. काहींनी थेट शाळेत येवून मदत केली तर काहींनी आपल्या मित्रांच्या हातोहात मदत पोहच केली.

संपूर्ण शाळा झाली डिजिटल

माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीतून आठ वर्गांसाठी प्रत्येकी ५० इंची स्मार्ट अॅण्डड्रॉइड टीव्ही संच आणि वर्गाचा संपूर्ण अभ्यासक्रम असलेला पेन ड्राईव्ह खरेदी करण्यात आला आहे. या भरघोस निधीसाठी सन १९९० ते २००५ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांनी मदत केली.

मंगळवारी उद्घाटन

२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता बेलगंगा शाळेत शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्या हस्ते आणि चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव विनोद कोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या आदर्शवत उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री एम. के. पाटील असतील. कार्यक्रमाला सचिन परदेशी (गट शिक्षण अधिकारी), विलास भोई (शिक्षण विस्तार अधिकारी) उपस्थित राहणार आहेत. सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्याध्यापक ढगे सर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'अस्तिव'तर्फे महिलांचा सन्मान

राज्य बॅडमिंटन स्पर्धेत दर्शनाला विजेतेपद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई येथील परळीमध्ये मनोरा बॅडमिंटन अकॅडमीतर्फे झालेल्या १०२ व्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत दहा वर्षांखाली मुलींच्या गटात नाशिकच्या दर्शना राजगुरूने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत २९२ खेळाडू सहभागी झाले होते. दर्शनाने अंतिम फेरीत मुंबईच्या अन्वेषा शर्माचे आव्हान ३०-८ असे सहज मोडीत काढले. दर्शनाने १३ वर्षांखालील गटातही आपले कौशल्य सिद्ध करीत उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली.

स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, वाशी, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिक जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले. खेळाडूंची संख्या अधिक असल्याने उपउपांत्य फेरीनंतर प्रत्येक गटात ३० गुणांचा एकच सेट खेळविण्यात आला. दहा वर्षांखालील मुलींच्या गटात खेळताना दर्शनाने मुंबईच्या अन्वेषा शर्माला निष्प्रभ ठरवले. अन्वेषाला केवळ आठ गुण घेता आले. मात्र, तिला अखेरपर्यंत दर्शनाच्या गुणांच्या जवळही जाता आले नाही. एकतर्फी झालेल्या या लढतीत दर्शनाने ड्रॉप्स शॉट आणि स्मॅशेसचा उत्तम वापर केला. अखेरीस ३०-८ असा पराभव करीत दर्शनाने विजेतेपदावर नाव कोरले. दर्शना सिम्बॉयसिस शाळेत चौथीमध्ये शिकत असून, तिला माणिकनगरमधील शिवसत्य क्रीडासंकुलाचे प्रशिक्षक मकरंद देव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. दर्शनाबरोबरच शिवसत्य क्रीडासंकुलाचे प्रज्वल सोनवणे, श्रावणी वाळेकर, पार्थ देवरे यांनीही चमकदार कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समर स्पेशल’चा ठेंगा

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी मुंबई ते लखनौ आणि एलटीटी ते गोरखपूरदरम्यान दोन समर स्पेशल ट्रेन धावणार आहेत. मात्र, त्यापैकी पहिल्या गाडीच्या थांब्यांच्या यादीतून नाशिकरोडचा, तसेच दोन्हीही गाड्यांच्या थांब्यांच्या यादीतून मनमाडचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे सुटीतही नाशिक-मनमाडच्या प्रवाशांना नेहमीच्या गाड्यांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

उन्हाळ्याच्या कालावधीत रेल्वेगाड्यांना प्रवाशांची तुडुंब गर्दी असते. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी भारतीय रेल्वेने मध्य रेल्वे मार्गावरून दोन समर स्पेशल ट्रेनच्या ५० फेऱ्यांचे नियोजन जाहीर केले आहे. त्यापैकी पहिली साप्ताहिक समर स्पेशल ट्रेन (०१०१९) सीएसएमटी मुंबई ते लखनौदरम्यान ११ एप्रिल ते ४ जुलैदरम्यान धावणार आहे. ही गाडी प्रत्येक गुरुवारी सीएसएमटीहून सकाळी ११ वाजुन ५ मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी ही गाडी लखनौ येथे दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचणार आहे. ही गाडी (०२१०८) लखनौ रेल्वे स्थानकातुन १२ एप्रिल ते ५ जुलैदरम्यान प्रत्येक शुक्रवारी दुपारी ३ वाजुन १० मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सीएसएमटी येथे सायंकाळी ४.४५ वाजता पोहोचणार आहे. या गाडीच्या २६ फेऱ्या होणार असून, दादर, कल्याण, इगतपुरी, भुसावळ, इटारसी, भोपाळ, वोरई, झाशी, कानपूर या स्थानकांवर ती थांबणार आहे.या गाडीला १२ स्लीपर क्लास आणि ५ जनरल सेकंड क्लास कोच राहणार आहेत.

--

एलटीटी-गोरखपूरला थांबा

दुसरी साप्ताहिक स्पेशल समर ट्रेन (०१०२३) एलटीटी ते गोरखपूरदरम्यान धावणार असून, या गाडीच्या २४ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी १३ एप्रिल ते २९ जून या कालावधीत एलटीटीहून दर शनिवारी मध्यरात्री १२.४५ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता गोरखपूर येथे पोहोचणार आहे. गोरखपूर येथून ही गाडी (०१०२४) १४ एप्रिल ते ३० जूनदरम्यान दर रविवारी दुपारी २ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी ही गाडी रात्री ११.५५ वाजता एलटीटीला पोहोचणार आहे. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, कटनी, अलाहाबाद, वाराणसी, मऊ, बेलथरारोड, औनरीहर, भटनी, देवरिया आदी स्थानकांवर थांबे देण्यात आलेले असून, या गाडीला १३ एसी थ्री टीअर कोचेस राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठात पीएच. डी. अॅडमिशन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास नियमित पूर्णवेळ व अर्धवेळ नियमित पद्धतीने एम. फिल. आणि पीएच. डी. संशोधन शिक्षणक्रम सुरू करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मान्यता दिली असल्याने पीएच. डीचे प्रवेश सुरू करण्यात आले आहे. या प्रवेशांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना संशोधनपर उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, एम. फिल. आणि पीएच. डी. संशोधन शिक्षणक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असणार आहे. 'यूजीसी'ने निर्देशित केल्यानुसार एम. फिल. आणि पीएच. डी. शिक्षणक्रमांची संरचना आणि कार्यपद्धती विद्यापीठास बंधनकारक असणार आहे. 'यूजीसी'च्या २०१६ च्या निर्देशानुसार विद्यापीठास हे दोन्ही संशोधन शिक्षणक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

'यूजीसी'चे निकष लागू करीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे २०१२ च्या शैक्षणिक वर्षापासून बंद पडलेली पीएच. डी. काही काळाने सुरू करण्यात आली होती. मुक्त विद्यापीठाने १९९३ ते २०१० या काळात अडीचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डॉक्टरेट दिली. मात्र, गुणवत्ता नसल्याचे कारण पुढे करीत दूरशिक्षण परिषदेतर्फे मुक्त विद्यापीठाकडून पीएच. डी. चे अधिकार काढून घेण्यात आले होते. त्यामुळे २०१० ते २०१२ या काळात पीएच. डी. साठी प्रवेश बंद होते. तब्बल पाच वर्षांनंतर २०१७ मध्ये ही पीएच. डी. पुन्हा एकदा सुरू करण्यात आली.

मुक्त विद्यापीठात जे विद्यार्थी या पदवीला प्रवेश घेतात, त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, हा मलिदा मिळविण्यासाठी संशोधनाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आल्यानेही ही पीएच. डी. बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र प्रवेश होणार असल्याने पुन्हा एकदा पीएच. डी. साठीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकाला तरुणांनी लुबाडले

0
0

नाशिकरोड : उपनगर येथील ज्येष्ठ नागरिकाला दोन तरुणांनी फसवून त्याच्या 'एटीएम'मधून ३३ हजार रुपयांची रोकड लंपास केली. उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात युवकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अशोक बाबुराव शिराळे (वय ५९, मनपा वसाहत, महाराष्ट्र हायस्कूलजवळ, उपनगर) यांनी फिर्याद दिली. शिरोळे हे बुधवारी (दि. २७) सकाळी अकराच्या सुमारास स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. तेथे दोन तरुण उभे होते. त्यांनी शिराळे यांना तुम्ही बाजूला व्हा, आम्ही तुमचे पैसे काढून देतो असे सांगून त्यांच्याकडून एटीएम कार्ड काढून घेतले. नंतर बाहेर आल्यावर दुसरेच कार्ड परत करत सांगितले, की तुमच्या खात्यात पैसे शिल्लक नाहीत. शिराळे हे स्टेट बँकेच्या शिवाजीनगर शाखेत गेल्यावर गेल्यावर पासबुक भरून घेतले. बँक कर्मचाऱ्याने खात्यावर कमी रक्कम शिल्लक असल्याचे सांगितल्यावर शिराळे यांना धक्का बसला.

अधिक माहिती घेतली असता त्यांच्या खात्यातून ३३ हजार रुपये काढण्यात आल्याचे समजतले. नांदूर नाका एटीएममधून बुधवारी रात्री वीस हजार रुपये तर गुरुवारी (दि. २८) सकाळी १३ हजार रुपये काढण्यात आले. शिराळे यांनी आपल्या मुलाला हा प्रकार सांगितला. नंतर उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखेडचे पाणी कुठे जिरले?

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वाहेगावातील नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पालखेडच्या आवर्तनातून वाहेगाव गावासाठी गोई नदीवरील बंधारा भरून देण्याचे नियोजित असताना कालव्यातून या नदीत पाणी दिले गेले. पण बंधारा अर्धाही न भरल्यामुळे नागरिक संतापले आहेत.

वाहेगाव येथील गोई नदीवरील बंधारा पालखेड डाव्या कालव्यावर आरक्षित आहे. बंधारा शासनाच्या नियमानुसार ५० टक्के भरायला हवा होता परंतु बंधाऱ्यात फक्त १० ते १५ टक्केच पाणी सोडले असून पालखेडचे पाणी बंद केल्याने बंधारा न भरल्याने निफाड तालुक्यातील वाहेगाव गावावर पिण्याच्या पाण्याचं संकट आहे. हा गोई नदीवरील बंधारा शासनाने जर आरक्षित केला होता तर बंधारा पूर्ण भरण्याआधी पालखेड पाटबंधारे विभागाने पाणी का बंद केले, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. बंधाऱ्यासाठी आरक्षित असलेले पाणी कुठे जिरले, की पाटबंधारे विभागाने जिरविले असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला आहे. निफाड तालुक्यातील पूर्व भागातील वाहेगाव, दहेगाव, गोळेगाव, भरवस, मानोरी, वाकद, शिरवाडे या गावांना कायमच पाण्याचा दुष्काळ असतो. त्यात गेल्या तीन वर्षांपासून पूर्व भागात निसर्गाच्या लहरीपणामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उघड्यावरची मांसविक्री थांबणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मांसविक्रीचा वार्षिक परवाना घेण्यासाठी महापालिकेच्या सहा विभागांत सुमारे २५० अर्ज दाखल झाले आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून या अर्जांची छाननी केली जाणार असून, प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली जाणार आहे. स्वच्छतेच्या पुरेशा हमीनंतरच संबंधिताला सशुल्क परवाना दिला जाणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. महापालिका क्षेत्रात आता उघड्यावर मांसविक्री बंद होणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रात उघड्यावर होणाऱ्या मांसविक्रीला प्रतिबंध घालण्यासह मांसविक्रीसाठी स्वतंत्र परवाना धोरणाला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. मांसविक्रीसाठी परवाना घेण्याचे आवाहन विभागीय कार्यालयांकडून करण्यात आल्यानंतर त्याला आता विक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळू लागला आहे. महापालिका कार्यक्षेत्रात मटण, चिकन, मासळी अशी मांसविक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणावर असून, त्यांच्याकडून उघड्यावर मांसविक्री होत असल्याने मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्याही धोक्यात येते. उघड्यावरील मांसविक्रीमुळे मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे महापालिकेने उघड्यावर मांसविक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्रपणे धोरण तयार केले आहे. स्थायी समितीतच सदरचे धोरण आल्यानंतर त्यात सविस्तर चर्चा झाली. उघड्यावर मांसविक्रीचा परवाना देण्याऐवजी बंदिस्त ठिकाणी मांसविक्रीला परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शहरात बंदिस्त ठिकाणीच मांसविक्री करण्यासाठी धोरण ठरविण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली होती. स्थायीच्या मंजुरीनंतर आता महापालिका क्षेत्रात उघड्यावर मांसविक्री बंद होणार असून, मांसविक्रीसाठी महापालिकेचा परवाना शुल्क भरून घेणे बंधनकारक झाले असून, त्याची अंमलबजावणी पशुंसवर्धन विभागामार्फत सुरू झाली आहे. विभागीय कार्यालयांमार्फत मांसविक्रेत्यांना परवाना घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सहा विभागांत मांसविक्रेत्यांना अर्ज करण्याचे आवाहन केल्यानंतर सहा विभागांत आतापर्यत २५० अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जांची महापालिकेकडून छाननी केली जाणार आहे. प्रत्यक्ष भेटी देऊन जागा बंदिस्त आहे का, स्वच्छतेची काळजी घेतली आहे आदी बाबींची तपासणी झाल्यानंतरच शुल्क भरून परवाने दिले जाणार आहेत.

--

परवाना प्रकार अन् शुल्क

--

प्रकार शुल्क (रुपयांत)

--

मटण व चिकन एकत्रित विक्री परवाना- ५०००

मासळी विक्री व्यवसाय परवाना- २५००

मांसविक्रीसाठी व्यक्तिगत परवाना- ५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघा दरोडेखोरांना सात दिवसांची कोठडी

0
0

दोघांच्या शोधासाठी पथके रवाना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या तिघा संशयित दरोडेखोरांना कोर्टाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उर्वरित दोघा आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली असून, लवकरच त्यांनाही अटक होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राजेश गोलासिंग टाक (२५, रा. संजयनगर, नगर, हल्ली भीमवाडी, गंजमाळ), सुनीलसिंग जुनी आणि हरदिपसिंग बबलू टाक (दोघे रा. संजयनगर, काटून खंडोबा, नगर) अशी कोर्टाने कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांचे दोन साथिदार अमनसिंग टाक आणि सुनीलसिंगचा मित्र लखन हे दोघे फरार आहेत. या संशयित दरोडेखोरांनी बुधवारी इंदिरानगर येथून एक कार चोरून आडगाव शिवारातील वृदांवननगर येथील शिवकृपा स्वीटदुकानासमोरील साकार व्ह्यु येथील आर. के. ज्वेलर्स हे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला होता.

यावेळी त्यांनी संदेश रक्ताटे या तरुणास कोयत्याचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. सुदैवाने हा प्रकार पोलिसांना समजला. यानंतर पोलिस पथक आणि पळून जाणाऱ्या सराईत गुन्हेगारांमध्ये गोळीबार सुद्धा झाला. यातील राजेशसिंग यास पोलिसांनी पकडले तर उर्वरीत दोघांना मनमाड येथून अटक करण्यात आली. त्यांना पोलिसांनी कोर्टात हजर केले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने संशयितांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या घटनेतील दोघे संशयित फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे दोन ते तीन पथके रवाना झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे संशयित पुणे येथे असल्याची शक्यता असून, त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारनियमनाचे विघ्न टळले

0
0

एकलहरेतील दुसरा वीज संच कार्यान्वित; तिसरा संचही उपलब्ध

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

एकलहरे औष्णिक वीज केंद्रातील विजेचा २१० मेगावॅटचा संच क्रमांक पाच पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. त्यामुळे भारनियमन किंवा वीज टंचाईचे संकट टळले आहे. तिसरा संचही पूर्णपणे तयार आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात विजेची मागणी प्रचंड वाढते. तेव्हा तिसरा संचही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

एकलहरेतील २१० मेगावॅटचा संच क्रमांक पाच बुधवारी (दत. २८) सकाळी संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला. एकलहरेत वीज केंद्रात स्थायी साडेआठशे तर कंत्राटी पंधराशे कर्मचारी आहेत. येथे २१० मेगावॅटचे तीन संच आहेत. त्यातील फक्त संच क्रमांक चार सुरू होता. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने पाचवा संचही कार्यान्वित करण्यात आला. एकलहरेतून तयार होणारी वीज ही नागपूरचे अंबाझरी आणि ठाण्यातील कळवा येथील पॉवर ग्रीडमध्ये सोडली जाते. तेथून तिचे राज्यभर वितरण होते. ज्या लाईनला जास्त मागणी असेल तेथे ती पुरवली जाते. राज्याची विजेची मागणी २२ हजार मेगावॅट असते. औष्णिक, जलविद्युत, सौर आदी सर्व स्त्रोतांतून सुमारे १४ हजार मेगावॅट वीजनिर्मिती होते. जो तुटवटा राहतो, तो केंद्र सरकारचे नॅशनल पॉवर ग्रीड आणि अन्य माध्यमातून मधून भरून काढला जातो.

तिसरा संच तयार

नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातील एकच संच १० जानेवारीपासून कार्यान्वित होता. तो सुद्धा कमी विजेच्या मागणीमुळे संपूर्ण क्षमतेने चालवता येत नव्हता. शिवाय इतर संच उपलब्ध असून सुद्धा सुरू करता येत नव्हते. नाशिककरांनी या वर्षी थंडीचा कडाका अनुभवला. आता मार्चमध्येच सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. शेती, उद्योग तसेच सामान्य ग्राहकांकडूनही वीजेची मागणी वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा २१० मेगावॅट क्षमतेचा दुसरा संच क्रमांक पाच सुरू करण्यात आला. अनेक दिवसांपासून मेरिट ऑर्डर डिस्पॅचमुळे (एमओडी) नाशिक औष्णिक विद्युत केंद्रावर सातत्याने दोन संच बंद ठेवण्याचे सावट होते. परंतु, आता संच क्रमांक चार व पाच हे दोन्हीही सुरू आहेत. तिसरा संचदेखील उपलब्ध आहे. ज्या क्षणी गरज असेल त्या क्षणी तिसरा संच कार्यान्वित करण्यात येणार आहे. दोन संच सुरू झाल्याने सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार आणि कंत्राटी कामगार यांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन प्रकल्प केव्हा?

एकलहरेतील टप्पा क्रमांक एकमधील १४० मेगावॅटचे दोन संच जून २०११ मध्ये बंद करण्यात आले. त्या बदल्यात ६६० मेगावॅटचा बदली संच सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली होती. भुसावळ येथे ६६० मेगावॅट प्रकल्पाचे काम गेल्या महिन्यात सुरू झाले. परंतु, नाशिकला गरज असतानाही अजून त्याचे काम सुरू झालेले नाही. खासगी वीज उद्योगाचे वारे वाहू लागल्याने एकलहरेतील ६६० मेगावॅटचा प्रकल्प रखडलेला आहे. एकलहरेत जागा, पाणी, लेबर, रेल्वेमार्ग, राख साठवणुकीचा बंधार आदी पायाभूत सुविधा उपलब्ध असतानाही ६६० मेगावॅटचा संच सुरू झालेला नाही. तो सुरू झाल्यास विजेची टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊन नाशिकच्या औद्योगीक विकासाला चालना मिळेल. रोजगार निर्मितीही होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगाव-भूमिका ठरविण्यासाठी सोमवारी शिवसेनेची बैठक

0
0

भूमिका ठरविण्यासाठी

सोमवारी शिवसेनेची बैठक

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी शिवसेनेची जिल्हा बैठक सोमवारी (दि .१) दुपारी २ वाजता सरदार वल्लभभाई पटेल आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शिवसेनेची भूमिका ठरविली जाणार आहे.

बैठकीस शिवसेना उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, विलास पारकर मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख अतिथि म्हणुन आमदार किशोर पाटील, चंन्द्रकांत सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, ज्ञानेश्वर जळकेकर महाराज उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीला शिवसेना, युवासेना, महिला आघाड़ी, एस. टी. कामगार सेना, शिक्षक सेना, ग्राहक स्वसंरक्षण कक्ष यांचे जिल्हाप्रमुख, उप जिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, त्या-त्या गावचे बूथप्रमुख, ग्रामपंचायत सरपंच यांनी उपस्थित राहवे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व चंद्रकांत पाटील, महानंदा पाटील, शरद तायडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

च ट क म ट क

0
0

हाताची चव

स्नेहा शिंपी, नाशिक

मसाला स्टफड बाटी

डाळ बाटी हल्ली सगळ्यांचीच आवडती डीश आहे. घरोघरी ही डीश अगदी सहज बनवता येते. विशेष म्हणजे त्यासाठी लागणारे सर्व साहित्य देखील घराच्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध होतात. आता सुट्याही लागणार आहेत. तेव्हा या सुटील मसाला स्टफड् बाटी बनवायला हरकत नाही.

साहित्य : दोन कप कणीक, १ कप शिजवलेली चणाडाळ, पाव कप कोथिंबीर, १ लहान चमचा आमचूर पावडर, पाव लहान चमचा धणेपूड, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ बारीक चिरलेला कांदा, १ टोमॅटो, ३ मोठे चमचे तेल तळण्यासाठी, चवीनुसार मीठ, २ मोठे चमचे तेल.

कृती : प्रथम कणीक आणि मीठ चाळून घ्या. कणीक मळून त्याचे रोल करा. एका भांड्यात पाणी गरम करून हे रोल टाका व २० ते २५ मिनिटे उकडून घ्या. यानंतर हे रोल्स पाण्यातून बाहेर काढून पुन्हा कुस्करून हे कणकेसारखे मळून घ्या व त्याचे लहान लहान गोळे बनवा. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा परता. मग त्यामध्ये टोमॅटो, मीठ, आमचूर पावडर, धणेपुड, हिरवी मिरची टाकून परता. नंतर यात भिजवलेली चणाडाळ घालून परतून घ्या. हे मिश्रण कोरडे झाल्यावर गॅसवरून खाली उतरून थंड करा. आता हे मिश्रण कणकेच्या गोळीची खोलगट पारी वळून त्यामध्ये भरा व पारी वरून बंद करा. अशा प्रकारे सर्व गोळ्यांच्या पारी वळून मिश्रण भरा. तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. मसाला स्टफ बाटी तयार आहे. हे सॉस किंवा चटणीसह सर्व्ह करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस अधीक्षकांनीघेतला केंद्रांचा आढावा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक आरती सिंग यांनी शुक्रवारी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालेगावी भेट दिली. यावेळी हिम्मत नगर पोलिस वसाहत येथील दक्षता वाचनालयाचे उदघाटन सिंग यांच्या हस्ते संपन्न झाले.

या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल, पोलिस उपअधीक्षक अजित हगवणे, रत्नाकर नवले, कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर परदेशी, कुलदीप माने आदी उपस्थित होते. यावेळी आरती सिंग यांनी दक्षता वाचनालयाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. वाचन संस्कृती टिकावी यासाठी हे वाचनालय सुरू करण्याचा निर्णय स्तुत्य असून परिसरातील वाचकांसाठी हे वाचनालय उपयुक्त ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर हा दौरा होता. उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना सिंग यांनी मालेगाव बाह्य, मध्य मतदार संघातील संवेदनशील मतदार संघांना भेटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणेचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षातील चमच्यांमुळे मला डावलले!

0
0

खासदार चव्हाण यांची मनातली खदखद अखेर व्यक्त

चव्हाण म्हणाले...

- लोकांची खरी नाराजी पालकमंत्र्यांवर

- आता उमेदवारी मिळाली तरी घेणार नाही

- दोन-तीन दिवसांत घेणार निर्णय

म. टा. वृत्तसेवा, कळवण

पक्षातील काही चमच्यांच्या टोळक्याने वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली आहे. लोकांची खरी नाराजी पालकमंत्र्यांवर असून, आता उमेदवारी मिळाली तरी घेणार नाही, असा उद्वेग व्यक्त करीत भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अखेर संतापाला वाट करून दिली. कळवण येथील मोतीबागमध्ये शुक्रवारी झालेल्या समर्थकांच्या मेळाव्यात खासदार चव्हाण यांनी मनातली खदखद प्रथमच बोलून दाखवली. आता नक्की काय भूमिका घ्यायची, याबाबत आपण येत्या दोन- तीन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचे खासदार चव्हाण यांनी या वेळी स्पष्ट केले.

खासदार चव्हाण यांची उमेदवारी डावलून ती राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवार यांना बहाल केली. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तब्बल तीन वेळा निवडून आलेले भाजपचे खासदार चव्हाण दुखावले होते. समर्थकांमध्येही प्रचंड नाराजी होती. त्या पार्श्वभूमीवर मोतीबागमध्ये शुक्रवारी समर्थकांचा मेळावा घेण्यात आला. त्या वेळी चव्हाण बोलत होते.

चव्हाण म्हणाले, की गेल्या निवडणुकीत डॉ. पवार मोदींना शिव्या देत होत्या आणि त्यांनाच उमेदवारी दिली. महापौर भानसी यांना किंवा पक्षातीलच अन्य कुणालाही उमेदवारी दिली असती तरी मी काहीही म्हंटले नसते. पक्षात काही जणांचे टोळके आहे. तेच चुकीची माहिती देतात. विरोधात मतदान करावे, यासाठी करोडो रुपये मिळत होते. मात्र, मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. त्या वेळी वाजपेयी म्हणाले होते, की पार्टी तुमची आठवण ठेवेल. मात्र, पार्टीने आठवण ठेवली नाही. माझे चरित्र खराब आहे काय? आदिवासींच्या बाजूने उभा राहिलो. जे योग्य नाही त्याला विरोध केला. तीन वेळा निवडूनदेखील मंत्रिपद मिळाले नाही. तरीही मी कधीच नाराज नव्हतो. पक्षाशी निष्ठाच ठेवली. तुम्ही आग्रह करतात; पण मी कोरड्या विहिरीत उडी मारायची का? लोकसभा ही लहान नाही; मोठी निवडणूक आहे. १९९५ मध्ये सायकलवर प्रचार करून लोकांच्या आशीर्वादाने निवडून आलो होतो. राजकारणात काहीही अशक्य नाही. चाळीस वर्षांपासून दोन खोल्यांतच राहत आहे.

दोन-तीन दिवस थांबा; काही जणांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे चव्हाण यांनी मेळाव्यात स्पष्ट केले. त्यामुळे चव्हाण अपक्ष राहतात, कुणाला पाठिंबा देणार की तटस्थ राहतात, याची उत्सुकता कायम आहे.

एकत्र आलो तर एजंटही उरणार नाही : इंद्रजित गावित

माकपचे उपसभापती इंद्रजित गावित यांनी सांगितले, की मी येथे पक्षाच्या वतीने नव्हे, तर एक आदिवासी म्हणून आलो आहे. तुम्ही आम्हाला किंवा आम्ही तुम्हाला मदत करू, असे म्हणणार नाही. मात्र, खासदार चव्हाण व आमदार गावित हे यावर चर्चा करू शकतात. यावर चव्हाण यांनी दोघे एकत्र आलो तर एकही एजंट राहणार नाही, असे मिश्कीलपणे सांगितले. यावर एकच हशा पिकला. पोपटराव अहिरे, योगेश बरडे, पोपटराव गवळी, नाना ठाकरे, नरेंद्र जाधव, रघुनाथआप्पा, जगदीश होळकर यांच्यासह इंद्रजित गावित, मोहन पिंगळे, कलावती चव्हाण, रमेश थोरात, विजय कानडे, सचिन महाले आदी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी मनोगतातून पालकमंत्री गिरीश महाजनांवर टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुन्हेगारांना रिक्षा द्याल तर गोत्यात याल!

0
0

मालकांना इशारा; स्क्रॅप गाड्याही पोलिसांच्या रडारवर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या रिक्षा व्यवसायात सराईत गुन्हेगार पुनर्वसन करीत आहे. शहरातील एकूण सराईत गुन्हेगारांपैकी तब्बल ३५ टक्के सराईत गुन्हेगार रिक्षाचालक म्हणून कार्यरत आहेत. यामुळे कष्ट करणारे रिक्षाचालक अडचणीत आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मालकांनी ऑटो रिक्षा चालविण्यासाठी दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतला आहे. शहरातील स्क्रॅप रिक्षाही वाहतूक पोलिसांनी रडारवर घेतल्या असून, त्याचेही नियोजन सुरू आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. गुन्हेगारांच्या आदान प्रदान योजनेत गुन्हेगारांची कुंडलीच पोलिसांनी तयार केली. त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले बहुतांश गुन्हेगार अ‍ॅटोरिक्षा भाडेतत्त्वावर घेऊन उदरनिर्वाहाचा बनाव करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. पोलिस आयुक्तांनी यापूर्वी त्याबाबत एक इशाराही दिला होता. मूळ रिक्षा मालक दुय्यम व्यवसाय निवडून रिक्षा भाडेतत्वावर देतात. त्या बदल्यात मालकास रोजानुसार पैसा मिळतो. त्यामुळे एक रिक्षा दिवस आणि रात्र सुरूच असते. मात्र, आपल्या मालकीचे वाहन दुसऱ्याच्या ताब्यात देतांना मालक चालकाची शहानिशा करीत नाही. त्यामुळे गुन्हेगार अशा वाहनांचा वापर गंभीर गुह्यांसाठी करतात. प्रवाशांची लूटमार, छेडछाड असे गुन्हे घडतात. अन्य जिह्यातील गुन्हेगारही रोजगारीच्या नावाखाली त्याचा फायदा उचलतात, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.

पोलिस ठाणेनिहाय शोध

सराईत गुन्हेगारांची संख्या अधिक असल्याने रिक्षा व्यवसायात बेशिस्ती वाढत आहे. वाहतूक कारवाईत वारंवार याचा प्रत्यय पोलिस घेतात. रिक्षाचालकांची आरेरावी, अवाजवी भाडे या गोष्टींना प्रवाशांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता मूळ रिक्षामालकांना रडारवर घेतले आहे. पोलिस ठाणे निहाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चालकांचा शोध घेतला जाणार असून, त्यानंतर मूळ मालकांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच खासगी ट्रॅव्हल्सचालकांचाही शोध सुरू होणार आहे.

आरटीओचीही मदत

चालकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास ट्रॅव्हल्स मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी शहरातील स्क्रॅप रिक्षांकडे आपले लक्ष वळविले आहे. शहरात स्क्रॅप रिक्षांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभाग (आयटीओ) आणि वाहतूक शाखा एकत्रितपणे ही मोहीम लवकरच सुरू करणार आहे. शहरातून स्क्रॅप रिक्षा हद्दपार करण्यासाठी ही मोहीम असून, त्याचे नियोजन चोख असणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगाराचा मृत्यू

0
0

नाशिक : रंगकाम करीत असताना इमारतीवरून पडल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना सिडकोतील उपेंद्रनगर भागात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रशीद आलम अली कमर (वय ३०, रा. विजयनगर, सिडको, मूळ उत्तर प्रदेश) असे या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे. रशीद शुक्रवारी (ता. २९) दुपारी अंबड लिंक रोडवरील उपेंद्रनगरमधील मोरे मळा भागातील इमारतीवर रंगकाम करीत असताना ही घटना घडली. पहिल्या मजल्यावर अन्य सहकाऱ्यासमवेत झुल्यावर बसून तो इमारतीस रंग देत असताना अचानक झुला तुटला. उंचावरून पडल्याने रशीद गंभीर जखमी झाला. ठेकेदार ओमप्रकाश जयस्वाल यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्च एण्डला सूर्य तापला

0
0

मालेगाव पोहोचले ४२.८ अंशावर

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात रोजच्या रोज उन्हाचा पारा वाढतो आहे. शुक्रवारीदेखील कमाल तापमान ४२.८ अंश से इतके नोंदवले गेले. कमाल तापमान बरोबर किमान तापमान देखील वाढले असून २२.६ अंशापर्यंत पारा वर गेला आहे. रविवारपासून तापमानात तब्बल ३ अंशांची वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे मालेगावकर चांगलेच घामाघूम झाले असून, वाढलेल्या तापमानामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे.

मार्चच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत शहरात पारा जेमतेम ३५ ते ३९ अंश से दरम्यान होता. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली असली तरी उन्हाची दाहकता कमी होती. मार्चचा शेवटचा आठवडा सुरू झाला आणि तापमान चाळीशीपार गेल्याने उन्हाची दाहकता वाढली आहे. शुक्रवारी तर तापमान थेट ४२ अंशापार गेल्याने उन्हाच्या काहिलीने शहरवासीय हैराण झाले होते. उन वाढू लागल्याने त्याचा परिणाम रस्त्यावर जाणवू लागला आहे. नागरिक सकाळी ११ पर्यंत आपली कामे आटोपून दुपारनंतर बाहेर पडण्याचे टाळत आहेत.

उन्हाचा ज्वर वाढल्याने टोपी, रुमाल याच्या विक्रीत देखील वाढ झाली आहे. नागरिक घराबाहेर पडताना उन्हाच्या काहिलीपासून स्वतःचे संरक्षण व्हावे यासाठी काळजी घेत आहेत. शहरात ठिकठिकाणी रसवंती, शीतपेय, आईस्क्रीम यांची दुकाने सुरू झाली असून, कडाक्याच्या ऊन्हातपासून काहीसा दिलासा मिळावा म्हणून नागरिक या दुकानात गर्दी करीत आहेत. येत्या काही दिवसात पारा अजून वाढण्याची शक्यता आहे.

येवला @४१

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दिवसागणिक तापमानाचा पारा वर सरकत आहे. शुक्रवारी तालुक्यात ४१ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तालुक्‍यात ३८ डिग्री सेल्सिअस तापमान होते. पुढे दिवसभरात तासागणिक तापमानाचा पारा उंचावत गेला. तालुक्यात दुपारी दोन वाजेच्या सुमारास ३९ डिग्री सेल्सियस, त्यानंतर दुपारी तीन ते चार वाजेदरम्यान ४०, तर चारनंतर ४१ डिग्री सेल्सियस इतके तापमान होते. दिवसभरच्या कडक उन्हामुळे सर्वांच्याच अंगाची लाहीलाही होताना आपादमस्तकी घामाच्या धारा वाहत होत्या. तालुक्यात शुक्रवारी किमान २४, तर कमाल ४१ डिग्री सेल्सियस तापमान नोंदविले गेले. पुढील येत्या काही दिवसात हे तापमान अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतींना भेटून आढावा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता लागू झाल्यानंतर काही अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतलेले आहेत. तर काही अधिकाऱ्यांनी प्रलंबित कामे मार्गी लावणे सुरू आहे. पण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी या काळात ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या कामाचा आढावा घेण्याची मोहीम सुरू केली आहे.

डॉ. गिते यांनी शुक्रवारी बागलाण तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन कामांचा आढावा घेतला. दप्तरांची तपासणी करून ग्रामसेवकांची झाडाझडती घेतली. बागलाण तालुक्यातील लोहोणेर, ठेंगोडा, ताहाराबाद, औंदोणे आदी ग्रामपंचायतींमध्ये त्यांनी या भेटी दिल्या. पंचायत समिती कार्यालयात जाऊन विविध कामांचा आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामांची पाहणी केली तसेच स्वच्छतेविषयक सूचना केल्या. सरकार ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात थेट निधी देते. त्यामुळे येथील कामांची वारंवार तपासणी करणे व आढावा घेणे इतर दिवसात अवघड असते. डॉ. गिते यांनी आचारसंहितेच्या काळात पहाणी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ जोडप्याला तीन दिवसांची कोठडी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मद्यधुंद अवस्थेत इंदिरानगर अंडरपास येथे वाहतूक पोलिसास दमबाजी करणाऱ्या 'त्या' जोडप्याला कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी अटक केलेले जोडपे थेट कुख्यात टिप्पर गँगशी संबंधित असून, महिलेवर दरोडा तर तिच्या साथिदारावर सुद्धा काही गंभीर गुन्हे दाखल आहेत.

स्वप्नील संजय पाटोळे (२४, रा. अभियंतानगर, कामटवाडे) आणि भावना तुकाराम बोरसे (३०, रा. साईसमृद्धी रो हाऊस, वावरेनगर, कामटवाडे) अशी या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल झनकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरानगर अंडरपास येथे गुरुवारी (दि. २८) सायंकाळी पाऊणेपाच वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. पोलिस कर्मचारी झनकर आपले कर्तव्य बजावत असताना एक कार विनाकारण हॉर्न वाजवत होती. झनकर यांनी तसे न करण्याची सूचना चालकास केली. मात्र, दोन्ही संशयित हातात मद्याची बॉटल घेऊनच कारमधून बाहेर पडले. यानंतर त्यांनी झनकर यांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. आम्ही टिप्पर गँगचे असून, तुला बघून घेईन, असा दम स्वप्नील पाटोळेने दिला. तर, तुला छेडछाडीच्या खोट्या गुन्ह्यात अडकाविल, अशी धमकी भावना बोरसेने दिली. झनकर यांनी या घटनेची माहिती मुंबई नाका पोलिसांना लागलीच दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाणे गाठले. मात्र, तोपर्यंत येथील वाहतूक जवळपास एक तास विस्कळीत झाली. पोलिस ठाण्यातही संशयितांची बडबड कमी झाली नव्हती.

झनकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयिताविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ, मारहाण तसेच मोटार वाहन अधिनियमातील विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांना जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले. युक्तिवादानंतर कोर्टाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यातील भावना बोरसे ही टिप्पर गँगचा सदस्य प्रणव बोरसे याची बहीण आहे. विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक केलेला बोरसे सध्या नागपूर सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. भावनाविरुद्ध सुद्धा दरोड्याचा गुन्हा यापूर्वी दाखल असून, या सर्व घडामोडीकडे पोलिसांनी गांर्भीयाने बघितले असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images