Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शालार्थ आयडीच्या फाइल्स निघणार निकाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शालार्थ आयडीच्या गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित फाइल्स निकाली काढण्याचे अधिकार शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले असून, येत्या १ एप्रिलपासून त्याची अंमलबाजवणी करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी दिले आहे. पुणे येथे शिक्षण संचालक व नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकारी बैठकीत याविषयी माहिती देण्यात आली.

शालार्थ आयडीचे सर्व अधिकार शिक्षण उपसंचालक व विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना देण्यात आले आहेत. परंतु, प्रत्यक्षात हे कामकाज सुरू झालेले नाही. १ एप्रिलपासून याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण संचलाकांनी मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत दिले. नाशिक विभागाच्या ३४७ फाइल गेल्या तीन वर्षांपासून शिक्षण संचालक कार्यालयात पडून होत्या. या सर्व फाइल तपासून दहा दिवसांच्या आत शालार्थ आयडी देण्याचे आश्वासन शिक्षण संचालाकांनी मुख्याध्यापक संघाला दिले. याबाबत राज्यातील सर्व विभागीय मंडळाच्या अध्यक्षांना व उपसंचालकांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शालार्थ आयडी देण्याबाबत कागदपत्रांची पडताळणी कशी करावी व पडताळणी करून दहा दिवसाच्या आत त्या फाइलवरती निर्णय द्यावा लागणार असून, याबाबत प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शालार्थ आयडीसाठी शिक्षकांची मोठी फरफट यामुळे थांबणार असल्याने मुख्याध्यापक संघाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या बैठकीसाठी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, संजय देसले, प्रकाश पानपाटील, भरत गांगुर्डे, ए. बी. काटे, संगिता बाफना, सुरेश शेलार उपस्थित होते.

\Bबैठकीत अनेक विषयांवर चर्चा\B

बैठकीत १८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार शाळांच्या मुल्यांकनाबाबत फेर मूल्यांकन करून घ्यावे, वरिष्ठ वेतन श्रेणीबाबत पूर्वीप्रमाणे हमीपत्रवर मान्यता घ्यावी, शाळा सिद्धीमधील ए ग्रेड ही अट त्वरीत रद्द करावी, १४ नोव्हेंबरच्या शासन आदेशाने राज्यातील मुख्याध्यापकांच्या मान्यता प्रलंबित आहे. याबाबत त्वरीत निर्णय घेऊन मान्यता देण्याचे काम सुरू करावे, राज्यभरातील आकृतीबंधाबाबत एप्रिल मे महिन्यात संच मान्यता कम्प लावून भरतीला परवानगी द्यावी, अशा मागण्यांबाबत संचालकांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अनुकंपा तत्त्वाखाली सर्वांना १० एप्रिलपर्यंत मान्यता देणे, अर्धवेळ शिक्षकांच्या बाबतीत त्यांना शालार्थ आयडी देऊन जूनपर्यंत त्यांचे पगार ऑनलाइन करणे, अर्धवेळ ग्रंथपाल पूर्ण वेळ करण्याच्या प्रक्रियेत सेवाज्येष्ठता यादी एप्रिलमध्ये प्रसिद्ध केले जाईल, असे संचालकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मोक्का’ लावणार

$
0
0

पोलिस आयुक्तांचे निर्देश

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सराफी दुकान फोडण्याच्या तयारीत शहरात दाखल झालेल्या संशयित दरोडेखोरांनी पोलिस पथकावर गोळीबार केला. चोवीस तासांच्या आत दोन ठिकाणी वाहनचोरी, दोन ठिकाणी दरोड्याचा असफल प्रयत्न, पोलिसांवर हल्ला असे क्रमाने गुन्हे केले. या सराईतांवर यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल असून, या टोळीचे कृत्य मोक्कासाठी फिट असल्याने त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

हरदीपसिंग बबलू टाक हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून, त्याच्याविरूद्ध दरोडा, दरोड्याची तयारी, लूटमार यांसह गंभीर स्वरूपाचे किमान ३९ गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील उर्वरित संशयितांविरुद्ध किमान १० ते १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील एक सदस्य असलेला राजेश गोलासिंग टाक या संशयिताचे गंजमाळ येथे सासूरवाडी आहे. त्यामुळे त्याने मागील १५ दिवसांपासून विविध भागात रेकी करून त्याची माहिती इतर आरोपींना दिली. या टोळीने इंदिरानगर भागातून एमएच १५ बीडी ९०६६ ही इंडिका कार चोरी केली. यानंतर टोळीने थेट सायखेडा गाठले. तिथे एका ठिकाणी सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश मिळाले नाही. मध्यरात्रीच्या सुमारास ही टोळी पुन्हा शहरात दाखल झाली. आडगाव परिसरातील वृदांवननगर येथे त्यांनी पुन्हा सराफी दुकानास लक्ष्य केले. मात्र, दुकानमालकास याची माहिती मिळाली. वायफाय कनेक्ट असलेल्या सीसीटीव्हींमुळे दुकानमालकास हा प्रकार पाहता आला. त्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली आणि टोळीचा हा प्रयत्न फसला. पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेल्या चौघांपैकी सुनीलसिंग जुनी आणि हरदीपसिंग टाक यांनी पंचवटीतून एक दुचाकी चोरी केली. यानंतर त्यांनी मनमाड गाठले. मात्र तेथे शहर पोलिसांची आधीच सूचना पोहचलेली असल्याने रेल्वे पोलिसांनी त्यांना अटक केली. या टोळीने गुन्हे करण्याचा कळस केला असून, याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार टोळीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, आर. आर. पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरस्कारमूर्तींचे कार्य समाजाला दीपस्तंभासारखे

$
0
0

अॅड. अविनाश भिडे यांचे प्रतिपादन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नि:स्वार्थ भावनेने समाजासाठी कार्य करणाऱ्या गुणवंतांचा पूर्णवाद परिवारातर्फे झालेला गौरव हा त्यांच्या कार्याची पावती असून, त्यांच्या नि:स्वार्थ कार्याने समाजातील सर्वांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध विधिज्ञ अविनाश भिडे यांनी केले. नाशिकमध्ये आयोजित पूर्णवाद विद्या कला नीती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

या समारंभात वेदांचा प्रचार व प्रसार करणारे औरंगाबादचे वे. मु. श्रीराम धानोरकर गुरुजी यांना पूर्णवाद विद्या पुरस्कार, अहमदनगरच्या प्रख्यात चित्रकार अनुराधा ठाकूर यांना पूर्णवाद कला उपासक पुरस्कार व परभणीचे सुभाकरराव जोशी (हिंगणीकर) यांना पूर्णवाद समाजभूषण नीती पुरस्काराने गौरविण्यात आले.

समाजात सध्या असलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी या पुरस्कारार्थींचे कार्य दीपस्तंभासारखे असून, उद्याचे भविष्य असलेल्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रसाद मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात वेदमंत्र पठण व श्री सरस्वती स्तवनाने करण्यात आली. पुरस्कारामागची भूमिका विषद करताना राहुल भावे म्हणाले, की हे पुरस्काराचे बारावे वर्षे असून, जीवनाशी निगडीत विविध रंगांचे प्रतिनिधित्व या पुरस्कार्थींच्या कार्यात आढळते. डॉ. विष्णू महाराज सातारकर यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या पुरस्काराने जीवनातील महत्त्वाच्या अशा कला, विद्या व नीतीचे महत्त्व अधोरेखित होते.

याप्रसंगी विशेष उपस्थित पूर्णवाद भूषण गुणेशदादा पारनेरकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की विद्या व कलेला नीतीच्या माध्यमातून जोडणे म्हणजे पूर्णवाद. आधुनिकतेशी जवळीक करताना शास्त्र व परंपरा समजून घ्या, असे पूर्णवाद सांगतो. वेद व कला यांनी देशाला बांधून ठेवले असून, जो आचरणाने बांधील पण विचाराने मोकळा तो भारतीय असल्याचेही त्यांनी नमूद केले. नरेंद्र जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मखमलाबाद रोडवर तीन लाखांचा दरोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मखमलाबाद रोडवरील मंडलिक मळ्याजवळ एका बंद सदनिकेचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व अंदाजे सव्वा लाख रुपयांची रोकड असा सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि. २८) रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत पंचवटी पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मखमलाबाद रोडवरील शिवनेरी प्राईड इमारतीत राहणाऱ्या सुजित प्रभाकर खांदवे यांनी पंचवटी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. खांदवे हे मंगळवारपासून दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे येथे शेतावर गेले होते. त्याच कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले सुमारे ६ तोळे सोन्या-चांदीचे दागिने आणि सव्वा लाख रुपयांची रोकड असा सुमारे पावणे तीन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. इमारतीत राहणाऱ्या सदस्याला गुरुवारी सकाळी खांदवे यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. याबाबत त्यांनी खांदवे यांना माहिती दिली. खांदवे तातडीने घरी आले. त्यांना घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच सव्वा लाख रुपयांची रोकड चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी घरफोडी तक्रार दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्रे बाळगल्याने भगूरला दोघांना अटक

$
0
0

शस्रे बाळगल्याने

भगूरला दोघांना अटक

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर बस स्थानक परिसरात अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने दोन तरुणांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

प्रेम उर्फ सनी बाजीराव कदम आणि जुबेर महम्मद हनीफ हनीफ जुबेर अशी शस्रे बाळगणाऱ्या दोघांची नावे आहेत. तलवार व पिस्तूल घेऊन ते अन्य साथीदारांसह भगूर बस स्थानक आवारात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर, सहायक निरीक्षक अभिजित सोनवणे, उपनिरीक्षक विजय लोंढे, शामराव भोसले, विजय पगारे व पोलिस नाईक गुलाब सोनार आदींच्या पथकाने या दोघा तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून शालीत गुंडाळलेली तलवार आणि एअर पिस्तूल हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्थायी’ लोकसभेनंतरच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्थायी सदस्य नियुक्तीसाठी विशेष महासभा बोलविण्याची परवानगी मागणाऱ्या महापालिका प्रशासनाला जिल्हा निवडणूक शाखेच्या आचारसंहिता कक्षाने सदस्य नियुक्तीबाबत स्पष्ट उत्तर न दिल्याने महापालिकेने आता तुर्तास लोकसभा निवडणूक होईपर्यंत सदस्य निवडीचा विषय थांबवला आहे. स्थायी समिती सदस्य पद हे लाभाचे पद असल्याने आणि शिवसेनेकडून सदरचा विषय उच्च न्यायालयात नेला जाण्याची शक्यता असल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तुर्तास स्थायीच्या सदस्य निवडीवर पडदा टाकला आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्य निवडीसह सभापती निवडीची प्रक्रिया आता लोकसभा निवडणुकीनंतरच होणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीवर सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महापालिकेत भाजप नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे भाजपची सदस्य संख्या एकने कमी झाली आहे. त्यामुळे स्थायी समितीवर सदस्यत्वाचे गुणोत्तर प्रमाण देखील बदल्याचा दावा करत, शिवसेनेने भाजपचा एक सदस्य कमी करून शिवसेनेचा सदस्य नियुक्ती मागणी केली आहे. शिवसेनेच्या पाच सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी विभागीय आयुक्त व उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने विभागीय आयुक्तांकडे तर विभागीय आयुक्तांनी महासभेचा अधिकार असल्याचा निकाल देत, महासभेच्या कोर्टात चेंडू टाकला होता. सदस्य नियुक्तीचा निर्णय आता महासभेवर निर्णय घ्यायचा असल्याने आणि सध्या आचारसंहिता सुरू असल्याने नगरसचिव विभागाने जिल्हा निवडणूक शाखेतील आचारसंहिता कक्षाशी पत्रव्यवहार करत विशेष महासभा बोलविण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता काळात स्थायी सदस्य नियुक्तीसाठी विशेष महासभा घ्यावी की नाही, याबाबत या पत्रात थेट मार्गदर्शन न करता आचारसंहितेबाबत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देर्शित केलेल्या सूचनांमधील प्रश्न क्रमांक २७ मधील उत्तरानुसार आवश्यक कार्यवाही करावी, अस्पष्ट उत्तर दिले होते. त्यामुळे आयुक्तांच्या उपस्थितीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार होता. त्यामुळे आयुक्त गमे सुटीवरून परतल्यानंतर गुरुवारी नगरसचिवांनी सदरचे प्रकरण त्यांच्यापुढे ठेवले. आयुक्तांना महसुली कामाचा अनुभव असल्याने त्यांनी पुन्हा स्वयंस्पष्ट अहवाल मागवण्याऐवजी सदरची नियुक्ती लोकसभा निवडणुकीनंतरच करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायीचे सदस्यपद आणि सभापतीपद हे लाभाचे असल्याने लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतरच निवडणूक घ्यावी या निर्णयापर्यंत आयुक्त आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाशी आता संपर्क न करण्याचे आदेश त्यांनी नगरसचिवांना दिले आहेत. त्यामुळे स्थायीचे सदस्य निवडीसह सभापती निवड ही आता लोकसभा निवडणुकीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे क्लोजिंग शनिवारीच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रिझर्व्ह बँकेने रविवारी (३१ मार्च) देखील बँकांना आर्थिक व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश दिले असले तरी महापालिकेच्या वित्त विभागाने त्याला बगल देत, पालिकेचे आर्थिक व्यवहार ३० मार्चपर्यंतच पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० तारखेनंतर कामांची देयके स्विकारले जाणार नसल्याचे स्पष्टीकरण वित्त विभागाने दिले आहेत. मार्च महिना पूर्ण झाल्यानंतर देयके स्विकारणार नसल्याचा निर्णय घेतल्याने देयके सादर करण्यासाठी ठेकेदारांची धावपळ सुरू झाली आहे. आर्थिक वर्ष संपत आल्याने मार्चमध्ये जवळपास ५०० कोटींची देयके अदा करण्यात आली आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस महापालिकेच्या वित्त विभागाला सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच देयके काढून घेण्यासाठी ठेकेदारांची धावपळ सुरू आहे. महापालिकेने ठेकेदारांना देयके सादर करण्यासाठी २५ मार्चपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. परंतु, तरीही ठेकेदारांकडून हळूहळू देयके सादर करण्यात येत आहेत. आतापर्यंत बांधकाम विभागाकडून सर्वाधिक देयके सादर करण्यात आली आहेत. त्या देयकांपोटी वित्त विभागाने पाचशे कोटी रुपये अदा केले आहेत. २५ मार्चपर्यंत देयके सादर करण्याचे आदेश देवूनही अद्यापही काही विभाग प्रमुखांकडून देयके सादर केली जात असल्याने वित्त विभागाचे गणित बिघडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आयुक्तांच्या स्वाक्षरीने काढलेले आदेशच अंतिम मानून आता देयके स्विकारणे बंद केले जाणार आहेत. ३१ मार्च अखेरचा दिवस असला तरी, त्या दिवशी रविवार असल्याने महापालिकेला सुटी असल्याने महापालिकेने लेखा विभागाचे दप्तरे ३० मार्च रोजी क्लोज करण्याचे आदेश दिले आहेत.

थेट आरटीजीएस

वित्त विभागाकडे देयके मिळविण्यासाठी ठेकेदारांची रिघ लागते. त्यातून टक्केवारीला चालना मिळत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ठेकेदारांचे देयकांची रक्कम थेट बँकेत जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 'आरटीजीएस'च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात देयके ठेकेदारांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने यंदा वित्त विभागात कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त गर्दी दिसून येत नव्हती. थेट आरटीजीएस होत असल्याने दलालांची संख्याही रोडावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डोंगरार्त’चा झेंडा फडकला

$
0
0

राज्य नाट्य स्पर्धेत सात पारितोषिके

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित ६६ व्या राज्यस्तरीय कामगार नाट्य महोत्सव व ११ वा औद्योगिक व व्यावसायिक कामगार राज्यस्तरीय नाट्य महोत्सव, चंद्रपूर येथे झालेल्या कामगार कल्याण राज्य नाट्य स्पर्धेत नाशिकच्या 'डोंगरार्त' नाटकाने सात पारितोषिके पटकावली.

स्पर्धेत सांघिक गटामध्ये द्वितीय : डोंगरार्त, दिग्दर्शनसाठी द्वितीय : पल्लवी पटवर्धन, अभिनयासाठी द्वितीय : अपर्णा क्षेमकल्याणी, अभिनयासाठी द्वितीय : योगेश वाघ, संगीतासाठी द्वितीय : आनंद ओक, गौरव खैरनार, नेपथ्यासाठी तृतीय : श्याम लोंढे, प्रकाश योजनेसाठी द्वितीय : प्रफुल्ल दीक्षित यांना पारितोषिके जाहीर झाली आहेत.

रुदाली विषयावर प्रकाश टाकणारं आणि शोषित महिलांच्या आयुष्यावर बेतलेलं नाटक डोंगरार्त. राजस्थानी भाषेचा लेहजा मराठीतून सांभाळत पुढे सरकणारे नाटक म्हणजे मराठी नाट्य रसिकांसाठी एक वेगळा अनुभव ठरत आहे. स्त्री जीवनाच्या अंधाऱ्या वाटा अतिशय वास्तववादी पद्धतीने या नाटकातून मांडल्या आहे. त्यामुळेच रसिकांची चांगलीच दाद या नाटकाला मिळत आहे.

असे आहे कथानक

रुदालीचे आयुष्य जगणाऱ्या चार बायकांची ही कथा आहे. मा, जलपा, सावित्री, मोरणी या चौघी एकाच घरात राहून स्वतंत्र आयुष्य जगत आहेत. एकमेकींशी केवळ बाईपणाच्या धाग्यात बांधल्या गेलेल्या या बायका आहेत. या घरातील तरुण मोरणीला या तिघींपैकी तिची आई कोण हे माहीत नसते. लग्नाचे फेरे संपण्याच्या आत विधवा झालेल्या मोरणीला घेऊन सावित्री घरी येते आणि या बायकांच्या नात्यात सुरुंगाचे स्फोट व्हायला सुरुवात होते. घरातील कर्त्या स्त्रीचे स्थान असलेल्या जलपाच्या अस्तित्त्वालाच आव्हान देऊ बघणाऱ्या मोरणीला सांभाळत असताना पूर्ण घराला बाईपणाची उब देणाऱ्या सावित्रीची दमछाक होत आहे. परिस्थितीच्या तडाख्यामुळे मौन झालेली मा, मोरणीची शिक्षणाची आस, जलपाच्या राठ वागण्यात दडलेली स्त्री या सगळ्यांना सांभाळत भूतकाळातील घटनांना उरात दाबत जगणारी सावित्री या कुटुंबातील खऱ्या अर्थाने वर्तमानात जगणारी स्त्री आहे. या सगळ्यांनाच ज्याच्या त्याचा डोंगर पार करून सुखाचा शोध घ्यायचा आहे. पण प्रत्येकीचा रस्ता वेगळा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तापमानाचा पारा चाळिशी पार

$
0
0

\Bगुरुवारी नाशिकचे तापमान ४०.४ अंशांवर

...

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात उष्णतेची लाट दिवसागणिक तीव्र होत असून, कमाल तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. उन्हाच्या चटक्यांनी नाशिककरांना मार्च महिन्यातच हैराण केले आहे. गुरुवारी ४०.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवातीपासून राज्यात तापमानाचा पारा सर्वत्र वाढत आहे. यामुळे नाशिककरांनाही कडक उन्हाचा अनुभव येत आहे. गुरुवारी तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे गेला. दिवसभर अंगाची लाहीलाही करणारे ऊन होते. दिवसभर तीव्र झळा बसत होत्या. रात्रीसुध्दा नाशिककरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. २६ मार्चपर्यंत तापमान ३८ अंश सेल्सिअसवर स्थिरावले होते. २७ मार्च रोजी त्यात वाढ होऊन ३८.५ अंश सेल्सिअस इतके झाले. गुरुवारी दोन अंशांनी वाढ होत कमाल तापमान ४०.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. यामुळे नाशिककर मार्च महिन्यातच हैराण झाले आहेत.

..

\Bथंड पदार्थांकडे वळली पावले\B

उन्हापासून संरक्षण करण्याबरोबरच गारवा मिळविण्यासाठी शहरवासीयांची थंड पदार्थांकडे पावले वळली आहेत. ऊस, लिंबाचा रस, वेगवेगळ्या फळांचे ज्यूस घेत शरीराला गारवा देण्यास प्राधान्य दिले जात आहे. शहरात ठिकठिकाणी रसाची गुऱ्हाळे, ज्युसची दुकाने थाटलेली असून, येथे गर्दी होताना दिसत आहे.

...

मालेगाव @ ४२ अंश

मालेगाव शहरात सलग चौथ्या दिवशी तापमानाचा पारा चाळिशी पार गेला. गुरुवारी शहरात कमाल ४२ अंश सेल्सिअस, तर किमान १९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मार्च एंडलाच तापमान चाळीशी पार गेल्याने मालेगावकर उकाड्याने हैराण झाले आहेत. दुपारी सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळत आहे. मार्चच्या अखेरीलाच तापमान चाळिशी पार गेल्याने एप्रिल, मे मध्ये उन्हाळा अधिकच तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्यूस कारणीभूत तिघांविरूद्ध गुन्हा

$
0
0

मृत्यूस कारणीभूत तिघांविरूद्ध गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आजारी असतांनाही निष्काळजीपणा केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याच्या संशयावरून उपनगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवराम अप्पाजी केदारे (वय ५५, रा. समतानगर, आगरटाकळी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. केदारे यांचा मुलगा दीपक (वय ३१) हा १६ मार्च रोजी सकाळी घरातून गेला. तो रात्री उशिरापर्यंत परतलाच नाही. त्याचे मित्र संशयित प्रदीप मोरे, शशिकांत उर्फ टिंकू जाधव व नितीन दिवे यांनी घरी येऊन सांगितले, की दीपकला बिटको रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात जाऊन पाहिले असता डॉक्टरांनी दीपकला तपासून मृत घोषित केले. दीपकला कोणतेही व्यसन नव्हते. त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. हे माहिती असतांना संशयितांनी त्यास जबरदस्तीने दारू पाजली. त्यामुळेच त्रास होऊन त्याचा मृत्यू झाला. संशयितांचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयकर विभागाची पालिकेला नोटीस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नियमित वेतन घेणाऱ्यांसह सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून प्राप्तीकराची कपात करण्याचा विसर महापालिकेला पडला आहे. महापालिकेच्या माध्यमातून हा कर अदा न झाल्याने आयकर विभागाने अखेर पालिकेला नोटीस बजावली आहे. आयकर विभागाच्या नोटिसीनंतर जागे झालेल्या प्रशासनाने नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वर्षभराची कर कपात करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांच्या हातात कमी वेतन पडणार आहे. तर सेवा निवृत्तांच्या बाबतीत अडचण निर्माण झाल्याने त्यांना महापालिकेने संबंधितांना प्राप्तीकराची रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिकेतर्फे गेल्या वर्षभरात कोणत्याही कराची वजावट करण्यात आलेली नव्हती. ही बाब आयकर विभागानेच पालिकेच्या लक्षात आणून देत नोटीस बजावली आहे. त्यानंतर नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वर्षभराचा कर अदा करणे शक्‍य असले तरी, सेवानिवृत्तांचा वेतन अदा करण्याशिवाय पालिकेशी संबंध येत नसल्याने प्रशासनाची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सेवानिवृत्तांना नोटीस पाठवून बँकेत कराची ठराविक रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मखमलाबाद महाविद्यालय नामकरणाला मिळेना मुर्हूत

$
0
0

कै. पोपटराव पिंगळे यांचे नाव अद्याप प्रस्तावितच

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मखमलाबादचे सुपूत्र व सहकारमहर्षी कै. पोपटराव पिंगळे यांच्या निधनानंतर मखमलाबादच्या कला व वाणिज्य महाविद्यालयास त्यांचे नाव देण्याच्या घोषणेला दशक उलटले आहे. मात्र अजूनही महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. येत्या ७ एप्रिल रोजी कै. पिंगळे यांचा स्मृतिदिन आहे. यावेळी तरी मविप्र समाज संस्थेने त्यांचे नाव महाविद्यालयास देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा, अशी अपेक्षा मविप्र समाज वर्तुळातून व्यक्त होते आहे. यासंदर्भात मविप्र समाजाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी संस्थेस निवेदन देऊन पिंगळे यांचे नाव महाविद्यालयास देण्याची मागणी केली आहे.

कै. पिंगळे यांनी शिक्षणासोबतच कृषी, सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रात दबदबा निर्माण केला होता. राष्ट्रसेवा दल आणि काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी समाजात रचनात्मक कामास प्राधान्य दिले होते. मखमलाबाद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची स्थापना करून सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रवेश केला होता. यानंतर मखमलाबाद हायस्कूलची स्थापना, नाशिक तालुका पंचायत समिती, नाशिक जिल्हा भू विकास बँक, नाशिक जिल्हा कांदा बटाटा संघ, नाशिक सहकारी कारखान्याची उभारणी, पहिल्या गळीत हंगामाचे यशस्वी नेतृत्व, आळंदी धरणासाठी आंदोलने आदी संस्था-वर्तुळाच्या माध्यमातील त्यांच्या ठळक कार्याचा संदर्भ सरचिटणीसांना पाठविलेल्या पत्रात देण्यात आला आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते त्यावेळी पिंगळे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता.

निवेदनावर संस्थेचे माजी अध्यक्ष प्रतापराव पवार, माजी सभापती अॅड. नितीन ठाकरे, माजी खासदार माधवराव पाटील, माजीमंत्री विनायकदादा पाटील, माजी अध्यक्ष अरविंद कारे, माजी महापौर प्रकाश मते, ज्येष्ठ विधीज्ञ दौलतराव घुमरे आदींच्या सह्या आहेत.

...

डॉ. पवारांनी केली होती घोषणा

एप्रिल २००८ मध्ये पिंगळे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेत मविप्रचे तत्कालीन सरचिटणीस डॉ. वसंतराव पवार यांनी मखमलाबादच्या नियोजित कला व वाणिज्य महाविद्यालयास स्व. पिंगळे यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. या घोषणेस आता दशकभराचा कालावधी उलटत असल्याने संस्थेने आता याबाबत कार्यवाही करीत असे नामकरण केल्यास त्यांच्या येत्या स्मृतिदिनास खरी श्रध्दांजली ठरेल, अशी अपेक्षा या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रज्ञा शोध १६ जूनला

$
0
0

नाशिक : राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा १६ जून रोजी ही परीक्षा होणार आहे. राज्यस्तर परीक्षेत निवड झालेल्या इयत्ता दहावीच्या पात्र विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी या परीक्षेची १२ मे ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणूक कामकाजामुळे १६ जून रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत ४ नोव्हेंबर २०१८ रोजी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) घेण्यात आली होती. राज्यातून ८६ हजार २८१ विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट होते. या परीक्षेत एनसीईआरटी नवी दिल्लीकडून राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातून ३८७ विद्यार्थी कोटा ठरविण्यात आला असून, या विद्यार्थ्यांची यादी १ मार्च रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. यामध्ये निवड झालेले विद्यार्थी १६ जून रोजी होणाऱ्या परीक्षेस पात्र ठरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचालकाविरोधात गुन्हा

$
0
0

लाच मागितल्याचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

बेकायदा मुरूम वाहतूक करण्याच्या मोबदल्यात कारवाई न करण्यासाठी दरमहा हप्ता म्हणून लाच मागितल्याप्रकरणी नाशिकच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी नांदगाव तहसील कार्यालयात काही महिन्यांपूर्वी कार्यरत असलेल्या वाहनचालक ज्ञानेश्वर कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तात्कालिक तहसीलदार भारती सागरे यांच्यासाठी दहा हजार व स्वतःसाठी दोन हजार असे १२ हजार रुपये चालक कदम याने लाच म्हणून मागितल्याची तक्रार मनमाड येथील तक्रारदाराने नाशिक 'एसीबी'कडे डिसेंबर २०१८ मध्ये दाखल केली होती. याप्रकरणी ३१ डिसेंबर २०१८ रोजी पंचासमक्ष लाचेची मागणी करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने व नंतरच्या काळात 'एसीबी'ने केलेल्या तपासात तक्रारदाराकडे लाचेची मागणी होत असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून 'एसीबी'ने गुरुवारी कदम याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम, वैभव देशमुख, नितीन कराड आदींनी ही कारवाई केली. या प्रकरणी नांदगाव तहसीलमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या हा वाहनचालक नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्रात भाजपचे स्त्रीदाक्षिण्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील अन्य पक्षांतील उमेदवार आयात करून त्यांना उमेदवारी देण्याचा सपाटा लावला असतानाच उत्तर महाराष्ट्रात उमेदवारी देताना महिलांना प्राधान्य दिले आहे. येथील सहापैकी चार जागांवर भाजपने महिलांना उमेदवारी बहाल केली असून, विशेष म्हणजे या चारही महिलांचा सामना पुरुष उमेदवारांसोबत होणार आहे.

या भागात भाजपच्या दोन महिला महापौर असून, एक जिल्हा परिषद अध्यक्षा असल्याने भाजपने उमेदवारीसाठी महिलांवरच अधिक विश्वास दाखविला आहे. आता महिला मतदार त्यांना कितपत साथ देतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले असले, तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या आरक्षणाची मागणी धूळ खात पडून आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांसाठी आरक्षण नसल्याने महिला या दोन संस्थांमध्ये तशा दुर्लक्षित आहेत. काही ठिकाणी महिलांनी स्वबळावरच आपली ताकदही सिद्ध केली आहे. लोकसभा निवडणुकीत ओडिशात बिजू जनता दलाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी महिलांना विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के जागांवर उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे, तर पश्चिम बंगालमध्येही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उमेदवारी देताना महिलांना झुकते माप दिले आहे.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपनेही महिलांना उमेदवारी देताना हात आखडता घेतला आहे. भाजपनेही राज्यात महिलांबाबत हात आखडता ठेवला असला, तरी उत्तर महाराष्ट्रात मात्र त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा असून, त्यातील दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि रावेर या पाच जागा भाजपकडे आहेत, तर नाशिकची एकमेव जागा शिवसेनेकडे आहे. भाजपने पाचपैकी चार लोकसभा मतदारसंघांत महिलांना उमेदवारी बहाल केली आहे. दिंडोरीतून राष्ट्रवादीकडून आयात केलेल्या डॉ. भारती पवार, नंदुरबारमधून डॉ. हीना गावित यांना उमेदवारी दिली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विधान परिषद सदस्या स्मिता वाघ यांना रिंगणात उतरविले आहे, तर रावेरमध्ये विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविला आहे. या चार जागांवर महिलांचा विजय झाला, तर उत्तर महाराष्ट्रात भाजपचे महिलाराज अवतरणार आहे. नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या रंजना भानसी असून, जळगावच्याही भाजपच्या महापौर सीमा भोळे आहेत. जळगाव जिल्हा परिषदेत भाजपच्याच उज्ज्वला पाटील या अध्यक्षा आहेत, तर नाशिकमध्ये सीमा हिरे आणि प्रा. देवयानी फरांदे यांच्या रुपाने दोन महिला आमदार आहेत. भाजपच्या कोट्यातील धुळे या एकमेव जागेवर केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे हे उमेदवार आहेत.

--

पुरुषांशीच सामना!

भाजपने पाचपैकी चार जागांवर महिलांना उमेदवारी दिली असली, तरी त्यांचा सामना या पाचही ठिकाणी विरोक्षी पक्षांतील पुरुषांशी होणार आहे. दिंडोरीत डॉ. पवार यांच्यासमोर राष्ट्रवादीचे धनराज महाले यांचे आव्हान राहणार आहे, तर नंदुरबारमध्ये हीना गावित यांच्यासमोर आमदार अॅड. के. सी. पाडवी यांचे आव्हान आहे. जळगावमध्ये स्मिता वाघ यांचा सामना राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्याशी होणार आहे. रावेरमध्येही रक्षा खडसे यांची लढत चंद्रकांत पाटील किंवा डॉ. उल्हास पाटील यांच्याशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चारही लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकमध्ये बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक तालुक्यातील चाकोरे शिवारात उसाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला. शेतकऱ्याच्या पाठीला, हाताला बिबट्यान पंजा मारल्याने ते जखमी झाले आहेत. जखमी शेतकऱ्यावर त्र्यंबकच्या उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चाकोरे शिवारात सुका महादू खाडे यांची उसाची शेती आहे. सुका खाडे आपल्या कुत्र्यासह शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता अचानक जंगलातून आलेल्या बिबट्याने कुत्र्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पण ती सुका याच्यावरच पडली. पाठीला पायाचा पंजा लागल्याने सुका जखम झाले. त्यांच्या हातालाही लखम झाली आहे. त्यांनी हातातील कुऱ्हाडीने प्रतिकार केल्यामुळे बिबट्या जंगलात पळून गेला. जखमी सुका खोडे यांच्यावर त्र्यंबकच्या उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघांचा अर्ज दाखल न झाल्याने संभ्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या गुरुवारी पहिल्या दिवशी रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. मात्र, बुधवारी घोषणा करूनदेखील गुरुवारी दुपारपर्यंत जळगावच्या जागेसाठी युतीच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांनी अर्ज दाखल न केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आता आमदार वाघ या केव्हा अर्ज दाखल करतात, मुहूर्त का हुकला याबाबतही वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे.

रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अनुक्रमे खासदार रक्षा खडसे व आमदार स्मिता वाघ गुरुवारी आपले नामनिर्देशन दाखल करतील, असे नियोजन पक्षाकडून करण्यात आले होते. याबाबत अधिकृत घोषणादेखील करण्यात आली होती. या वेळी शक्तिप्रदर्शनही केले जाणार होते. प्रत्यक्षात मात्र, खासदार खडसे यांनीच आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. आमदार स्मिता वाघ या जिल्हाधिकारी कार्यालयात रक्षा खडसे यांच्यासोबत आल्या होत्या. मात्र, त्यांनी अर्ज दाखल केला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांनी उमेदवारी नाकारल्याने नाराजी व्यक्त केली होती. खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापून आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आल्याने ए. टी. पाटील व पक्षातील काहींनी विरोधही केला होता. पारोळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात ए. टी. पाटील यांनी वाघ दाम्पत्यावर टीका केली होती. तसेच काँग्रेस उमेदवार बदलू शकते, तर भाजपही तसा निर्णय घेऊ शकते, अशीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर आमदार स्मिता वाघ यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने संभ्रमात वाढच झाली. दरम्यान, आमदार स्मिता वाघ या आजचा मुहूर्त साधत आपले नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहेत, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शक्तिप्रदर्शनाद्वारे भरले अर्ज

$
0
0

महाआघाडीची रॅली तर युतीने घेतला मेळावा; स्मिता वाघांचा अर्ज उद्या

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी (दि. २८) प्रसिद्ध झाली. नामनिर्देशन भरण्याच्या पहिल्याच दिवशी रावेर मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीकडून रक्षा खडसे यांचा तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून जळगाव मतदारसंघातून गुलाबराव देवकर यांचे अर्ज सादर करण्यात आले. आघाडीने जाहीर सभा व रॅली काढून तर भाजप-शिवसेना युतीने सागर पार्कवर मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केल्याने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरासह मध्यवर्ती जळगाव शहर घोषणांनी दणाणले होते.

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात दि. २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी जळगावसाठी आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी तर रावेरसाठी युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केले. या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्ष आघाडीकडून अर्ज सादर करण्यापूर्वी शिवतीर्थ मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या व्यासपीठावर जिल्ह्याचे प्रभारी आमदार दिलीप वळसेपाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील, उमेदवार गुलाबराव देवकर, गफ्फार मलिक, माजी खासदार वसंतराव मोरे, दिलीप वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, आमदार सुधीर तांबे, डी. जी. पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला जाहीर सभेत शिवसेनेचे माजी आमदार स्व. आर. ओ. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

नेत्यांकडून भाजपवर टीका
दिलीप वळसे पाटील यांनी बोलताना केंद्र सरकावर टीका केली. या वेळी त्यांनी भाजपकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला. तसेच आता जनता जागृत झाली असून, भूलथापांना बळी पडणार नाही असे सांगितले. जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी महाआघाडीतील सर्व मित्रपक्षांनी एकत्र येऊन दोन्ही उमदेवार विजयी करण्याचे आवाहन केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, अरुण गुजराथी यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका केली.

ए. टी. पाटलांचे तिकीट का कापले?
आमदार डॉ. सतीश पाटील यांनी भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना त्यांनी विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट का कापले, असा सवाल केला. मंत्री गिरीश महाजन व भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पैसे घेतल्याचा आरोप करीत तोडपाणी करणाऱ्यांना तिकीट देणार का, असा प्रश्नही डॉ. पाटील यांनी विचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुबारमध्ये भरत गावितांची बंडखोरी?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मुलगा भरत गावित यांना उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसचे माजीमंत्री माणिकराव गावित हे दिल्लीत तळ ठोकूनही काँग्रेसने नवापूरचे विद्यमान आमदार ॲड के. सी. पाडवी यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे गावित कुटुंबांमध्ये पक्षाबाबत नाराजी पसरली आहे. आता भरत गावित नंदुरबार लोकसभा मतदारसंघात बंडखोरी करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. उद्या (दि.३०) नवापूर येथे गावित यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असून, त्यानंतर नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. पक्षाशी एकनिष्ठ, प्रामाणिक राहूनदेखील उमेदवारी न मिळाल्याने गावित कुटूंब नाराज झाले आहे. भरत गावित प्रसंगी अपक्ष उमेदवारी करण्याचा विचारात असल्याचीही चर्चा आहे.

शिवसेनेचा डॉ. गावितांना विरोध
धुळे : धुळे लोकसभेचे युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना मित्रपक्ष शिवसेनेनेच विरोध दर्शविला आहे. काही दिवसांपूर्वी धुळे महानगर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच भाजपाचे लोकसभा उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना कोणतीही मदत निवडणुकीसाठी करणार नसल्याचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते. त्यानंतर आता साक्री तालुका शिवसेनेने युतीला घरचा आहेर देत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या साक्री तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते डॉ. हीना गावित यांना कोणतीही मदत करणार नाहीत, अशी भूमिका घेण्यात आली आहे. खासदार डॉ. हीना गावित यांनी शिवसेनेला सोबत घेऊन काम केलेले नाही. गावित यांच्या कोणत्याही कार्यक्रमांच्या फलकावर शिवसेना पदाधिकारी अथवा कार्यकर्ते यांचे नाव व फोटो कधीही घेण्यात आलेला नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.

‘भाजपच्या काळात महिला असुरक्षित’
धुळे : भाजपच्या हाती केंद्रात व राज्यात सत्ता आल्यानंतर साडेचार वर्षांत कधी नव्हे एवढे महिलांवर अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे महिला असुरक्षित झाल्या असून, महिलांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होताना दिसत असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांनी केला आहे. निवडणूक प्रचारार्थ शहरातील विविध भागामधील महिलांच्या भेटी घेत असताना त्या बोलत होत्या. महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढले असून, महिला असुरक्षित झाल्या आहेत, असेही पाटील यांनी महिलांना माहिती देताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-शिवसेना युती माझ्यामुळेच झाली

$
0
0

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा युतीच्या मेळाव्यात पुनरुच्चार

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

भाजप व शिवसेनेची युती ही माझ्यामुळेच झाली आहे, असा पुनरुच्चार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मेळाव्यात केला. तसेच कोल्हापूर येथे झालेल्या युतीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील आपल्या भाषणात गिरीश महाजन यांच्यासाठी आपण युती केली असल्याचा खुलासा केला असल्याचेही महाजन यांनी सांगितले. भाजप-शिवसेना युतीकडूनदेखील गुरुवारी (दि. २८) रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला. या वेळी अर्ज भरल्यानंतर सागर पार्कवर युतीचा मेळावा झाला त्यावेळी महाजन बोलत होते.

हल्ली मला ‘संकटमोचक’, ‘सुपरमॅन’ अशा शब्दांच्या बिरुदावल्या लावल्या जात आहेत. मात्र, या अविर्भावात राहू नका कारण मी एकटा काहीही करू शकत नाही. आपण सर्वांनी काम करण्याची गरज असल्याचे महाजन यांनी सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ जण भाजपमध्ये येण्यास उत्सुक असून, त्यांचा मार्गदेखील जळगावमधून जाणार असल्याचे महाजनांनी सांगितले. मंत्री गिरीश महाजन यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावरही टीका करत त्यांच्या जिभेला हाडच नसून, ते काहीही बडबड करत असल्याचा आरोप या वेळी बोलताना केला.

नेमक्या वेळीच युती का तुटते?
भाजपशी युती ही हिंदुत्वाच्या मुद्यावर झाली असून, ती कायम रहावी अशी आमची इच्छा आहे. मात्र, भाजप केवळ लोकसभेच्या वेळेस शिवसेनेची मदत घेते तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेला दूर ठेवून सत्ता मिळवली जाते, अशी टीका सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. आता जशी आमची मदत घेतात, तशी मदत इतर निवडणुकीत आमचीही करा, असा टोलाही पाटील यांनी लगावला. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांचा असतात. हा तोच कार्यकर्ता असतो की जो भाजपला लोकसभेच्या वेळेस मदत करतो. मात्र, त्यांच्या निवडणुकांचे लग्न जवळ आले की भाजपकडून लगेच फारकत घेतली जाते, असा चिमटाही शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी काढला. भाजपशी ‘लव्ह मॅरेज’ झाले असून, हे लव्ह मॅरेज कायमस्वरुपी टिकवा, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसला जवळ केले आहे. काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांचा मुलगा पक्षात घेतला तसेच शिवसेनेलाही जवळ घ्या, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images