Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शेफाली भुजबळांनी घेतल्या सराफ व्यावसायिकांच्या भेटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पत्नी शेफाली भुजबळ यांनी सराफ व्यावसायिकांच्या नुकत्याच भेटी घेतल्या. या वेळी समीर भुजबळ यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांनी व्यावसायिकांना केले.

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर आपल्या संपर्कात कुठलीही कमतरता राहायला नको, याची खबरदारी संभाव्य उमेदवारांकडून घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार समीर भुजबळ यांचे कुटुंबदेखील संपर्कासाठी बाहेर पडले असून, शहरातील व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनीअर यांच्या भेटी घेणे सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार समीर भुजबळ यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. त्यासाठी त्यांनी विविध घटकांच्या भेठीगाठी घेणे सुरू केले आहे. समीर भुजबळ यांच्या पत्नी शेफाली भुजबळ यांनी नुकताच सराफ बाजाराचा दौरा केला. या वेळी त्यांनी या भागात प्रसिद्ध असलेल्या सोन्या मारुतीचे दर्शन घेऊन व्यावसायिकांच्या घरी जात बुजुर्गांचे आशीर्वाद घेतले. त्याचप्रमाणे या भागातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णा नागरे यांच्या घरी त्यांनी भेट दिली. या वेळी प्रमोद कुलथे, सुनील महालकर, गिरीश नवसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. समीर भुजबळ निवडून आल्यास १०११ नारळ वाहीन, असा त्यांनी मारुतीला नवस केला. त्यानंतर त्यांनी भोसले कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी जया भोसले यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर रविवार कारंजावरील जैन स्थानकाला भेट दिली. या वेळी महिलांचे उपवास सुरू असल्याने त्यांच्याशी संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमान सेवा वेळापत्रक

$
0
0

विमानसेवा वेळापत्रक --

शनिवार

नाशिक - अहमदाबाद

सकाळी ८.५५ - सकाळी १०.१०

अहमदाबाद - नाशिक

सकाळी १०.४० - सकाळी ११.५५

नाशिक… - हैदराबाद

दुपारी १.००… - दुपारी २.५०

हैदराबाद… - नाशिक

सकाळी ६.४५… - सकाळी ८.३०

नाशिक - अहमदाबाद

सायंकाळी ४.३५ - सायंकाळी ६.००

अहमदाबाद - नाशिक

दुपारी २.५० - दुपारी ४.०५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जल आटले, संकट दाटले!

$
0
0

मार्चअखेरपर्यंतची पाणी स्थिती

...

जिल्ह्यातील जलसाठा (दशलक्ष घनफूट)

वर्ष २०१८.....२९ हजार ५३५

वर्ष २०१९... १६ हजार ९६२

...

गंगापूर धरण समूहातील साठा

वर्ष २०१८.....६३ टक्के

वर्ष २०१९... ४० टक्के

...

गंगापूर धरणातील साठा

वर्ष २०१८.....६८ टक्के

वर्ष २०१९... २७ टक्के

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'जल है तो कल है' हे ब्रीद खरे असले तरी शहरासह अनेक भागात पाण्याची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी सुरूच आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये तब्बल २० टक्के पाणीसाठा कमी असून, त्यामुळे काही दिवसांतच पाणीटंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता बळावली आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करून जलकपातीचे संकट टाळावे, असे आवाहन जलदिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने केले आहे.

धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये यंदा पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ग्रामीण भागात धरणं उशाला असूनही घशाला कोरड पडू लागली आहे. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची एकूण २४ धरणे असून, त्यांची पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट आहे. गतवर्षी मार्चच्या अखेरच्या आठवड्यात या धरणांमधील एकूण पाणीसाठा २९ हजार ५३५ दशलक्ष घनफूट म्हणजेच एकूण पाणी साठवण क्षमतेच्या ४५ टक्के होता. परंतु, चालू वर्षी सद्यस्थितीत हाच पाणीसाठा केवळ २६ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच आजमितीस जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ १६ हजार ९६२ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ३१ जुलै २०१९ पर्यंत याच पाण्यावर जिल्हावासीयांची तहान भागवायची असल्याने उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर होणे गरजेचे आहे.

...

शहराची परिस्थितीही बिकट

शहरातील रहिवाशांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहामध्ये गतवर्षी म्हणजे मार्च २०१८ मध्ये ६३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा मात्र केवळ ४० टक्के उपयुक्त पाण्याचा साठा शिल्लक असून, त्यावर लाखो नाशिककरांची ३१ जुलैपर्यंत तहान भागवावी लागणार आहे. केवळ गंगापूर धरणात गतवर्षी आजमितीस ६८ टक्के पाणी होते. सद्यस्थितीत केवळ २७ टक्के म्हणजे १ हजार ४९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणातील पाणीसाठ्याची परिस्थिती बिकट असून, नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

....

ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवत आहेत. शहरी भागातील नागरिकांना दुष्काळाची दाहकता लक्षात येत नाही. त्यामुळे पाण्याची उधळपट्टी होते. परंतु, यंदा गंगापूर धरण समूहातही खूपच कमी पाणीसाठा असल्याने नागरिकांनी जाणीवपूर्वक काटकसरीने पाण्याचा वापर करावा.

- रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी

.......

शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा दिवसागणिक कमी होत आहे. गतवर्षी आजमितीस ६८ टक्के पाणी होते. सद्यस्थितीत केवळ २७ टक्के पाणी उपलब्ध आहे. यावरून पाण्याच्या दुर्भिक्ष्याची सहज कल्पना येते. धरणांमधील पाणीसाठ्याची परिस्थिती बिकट असून, नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाकडे दुर्लक्ष नको

$
0
0

निवडणूक, दुष्काळ पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांचा सूचना

टीम मटा

सध्या लोकसभा निवडणूक आणि दुष्काळनिवारण असे दोन कामे प्राशासकिय अधिकाऱ्यांना प्राधान्याने करायची आहेत. प्रत्येक शासकीय विभाग प्रमुखांसह सर्वच कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करावी. मात्र आचारसंहिता, निवडणूक कामांचा बागुलबुवा न करता दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाई, चाराटंचाईकडे गांभीर्याने लक्ष द्या, त्यावर तातडीने उपाययोजना करा, अशा शब्दात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी शुक्रवारी निफाड, नांदगाव, येवला आणि सिन्नर येथे शासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

टँकरच्या प्रस्तावांना देणार प्राधान्य

मनमाड : दुष्काळ व टंचाईग्रस्त नांदगाव तालुक्यात पाण्याच्या टँकरबाबत प्रस्ताव आल्यास ते तातडीने जिल्हा प्रशासनाकडे पाठवावेत. त्यांना तातडीने मंजुरी दिली जाईल. तालुक्यातील चाराटंचाई निवारणासाठी तहसील, पंचायत समिती प्रशासनाने सजग राहावे. पाणी व चाराप्रश्नी कोणतीही हयगय किंवा चालढकल करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नांदगाव येथे अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी मांढरे शुक्रवारी सकाळी नांदगाव दौऱ्यात तहसील कार्यालय येथे बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. नांदगाव तालुक्यात पाणी व चाराटंचाईचा प्रश्न तीव्र आहे. याबाबत तालुका प्रशासनाने जागरूक राहून टंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे मांढरे यांनी सांगितले. तालुकास्तरीय दुष्काळ आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील दुष्काळ स्थिती जाणून घेत उपाय योजनांबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी नांदगाव तालुक्यात २२ गावे, १७१ वाड्या तहानलेल्या आहेत. या ठिकाणी ३१ टँकरने

पाणीपुरवठा होत असल्याची माहिती तहसीलदार मनोज देशमुख यांनी दिली. तालुक्यातील जनावरांची संख्येचा विचार करता एप्रिलमध्ये चारा टंचाईची समस्या आजच्या पेक्षा मोठ्या प्रमाणात जाणवेल, असे चित्र असल्याने त्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तालुक्यात १६ विंधन विहिरींचे काम पूर्ण झाले असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. यावेळी मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपजिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी पल्लवी निर्मल, तहसीलदार मनोज देशमुख, गटविकास अधिकारी सूर्यवंशी उपस्थित होते.

निवडणूक कामांची तपासणी

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दुष्काळ स्थितीबरोबरच आगामी निवडणूक कामांचाही आढावा घेतला. निवडणुकीतील नवे बदल सर्वांनी समजावून घ्यावे व निवडणूक कायद्याची पुस्तके वाचून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी पल्लवी निर्मल, सहाय्यक अधिकारी तहसीलदार मनोज देशमुख यांनी लोकसभा निवडणूक प्रशिक्षण वर्ग, नांदगाव विधानसभा मतदार संघात करण्यात आलेली तयारी, एकूण मतदान केंद्रे, निवडणूक कर्मचारी संख्या याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली.

000

आचारसंहितेचा अभ्यास करा

येवला : लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक शासकीय विभाग प्रमुखांसह यंत्रणेतील सर्वच कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेची अभ्यासपूर्ण व काटेकोर अंमलबजावणी करावी. मात्र आचारसंहिता, निवडणूक कामांचा बागुलबुवा करत बसू नका. दुष्काळी परिस्थितीमधील पाणीटंचाई, चाराटंचाई यासारख्या टंचाई परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष द्या, त्यावर तातडीने उपाययोजना करा, अशा शब्दात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी येवल्यातील विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना केल्या.

येवला तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनात दीड तास तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांची विशेष बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने येथील यंत्रणेकडून आढावा घेतला. तसेच दुष्काळी परिस्थितीच्या दृष्टीने तालुका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनेची माहिती घेतली. काही ठिकाणी ही आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमके काय हेच माहीत नसते याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने प्रथम आचारसंहितेचा अभ्यास करावा, असे त्यांनी सांगितले. निवडणूक असली तरी दुष्काळी परिस्थितीतील टंचाईसह इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आचारसंहितेच्या कारणाखाली उपाययोजनांना अडथळा आणू नये. परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून उपाययोजनांसाठी पाठपुरावा सुरू ठेवा, जेणेकरून जिल्हास्तरावरून तातडीने उपाययोजना करता येतील, असे मांढरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सुचित केले. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, येवला तहसीलदार रोहीदास वारुळे, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र राऊत, नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगळे, नगरपालिका मुख्याधिकारी संगीता नांदुरकर आदी उपस्थित होते.

नागरिकांशी केली चर्चा

तहसील कार्यालयातील आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी मांढरे यांनी येवला तहसीलच्या प्रशासकीय इमारतीतील रेकॉर्ड रूम, पुरवठा विभागाचा कक्ष, निवडणूक शाखा कक्ष, मतपेट्या ठेवण्यासाठीचा स्ट्राँग रूम यासह नागरिकांना सेवा देणारा तहसीलच्या सेतू कक्ष याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर शासकीय कागदपत्रांसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.

00

मालेगावी घेतला आढावा

मालेगाव : लोकसभा निवडणुका व तालुक्यातील दुष्काळ पार्श्वभूमीवर नवनियुक्त जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मंगळवारी प्रथमच मालेगावी भेट दिली. त्यांनी दुष्काळी उपायोजनांचा आढावा घेतांना पाणीपुरवठा टँकरची मागणी असलेले प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. यासह लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालेगाव बाह्य व मालेगाव मध्य या दोघी मतदार संघातील तयारीचा देखील आढावा यावेळी बैठकीत घेण्यात आला.

000

निफाडमध्ये मतदार यादीची पाहणी

निफाड : येथील उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी भेट दिली. छोटेखानी आढावा बैठक घेऊन सूचना व मार्गदर्शन केले. तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेत मतदार यादी, प्रशिक्षण वर्ग आदी महत्त्वाची माहिती घेतली. यानंतर प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी माधव पडिले, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकामाचे जुने प्रस्ताव ऑफलाइन स्वीकारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑटो डीसीआरमुळे अडचणीत आलेले बांधकामाचे जुने प्रस्ताव अखेरीस दुरुस्तीसह ऑफलाइन स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. ऑटो डीसीआर प्रणाली सुरू झाल्यानंतर त्या अगोदरचे प्रस्ताव कसे स्वीकारणार याबाबत विकासकांमध्ये संभ्रम होता. याबाबत निर्णय झाल्यामुळे विकासकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे तरी विकासक आणि वास्तुविशारदांना थोडासा दिलासा मिळाला आहे. महापालिकेत ऑटो डीसीआर प्रणाली सुरू झाल्यापासून अनेक अडचणी येत असून, त्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित होती. ऑटो डीसीआरमध्ये दाखल होऊ न शकलेली किमान जुनी प्रकरणे तरी ऑफलाइन घ्यावी, अशी विकासकांची मागणी होती. गेल्या वर्षभरापासून मागणी करूनदेखील प्रशासन दखल घेत नव्हते. मात्र, आता महापालिकेने त्याची दखल घेऊन कार्यवाही करण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून अशा प्रकारची प्रकरणे दाखल करून मंजुरी देण्यास प्रारंभ झाला असून, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑटो डीसीआरमधील प्लॅन मंजूर झाल्यानंतर त्याची छायांकित प्रत मिळण्यास होणार विलंब, तपासणी फी वारंवार भरावी लागणे, छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना मंजूर होणारी प्रकरणे, त्याच प्रकरणासाठी पुन्हा फी भरणे, तसेच कलम २१० बाबत सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली. ऑटो डीसीआर प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटी व विलंब यामुळे नाशिक शहाराचा विकास कसा थांबला आहे, हे बांधकाम व्यावसायिकांनी निदर्शनास आणून दिले. यामुळे आयुक्तांनी बैठक घेऊन जुने प्रस्ताव ऑफलाइन घ्यावीत, अशा सूचना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे-राष्ट्रवादीत खलबते

$
0
0

मतदारांना राष्ट्रवादीकडे वळविण्याचे मनसेसमोर आव्हान

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली. भारतीय जनता पक्ष नको, असे सांगत त्यांनी मनसैनिकांना विरोधी पक्षाकडे वळण्याचा सल्ला दिला. मनसेचे अस्तित्व नाशिकसह मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरात असून, येथील मतदारांना राष्ट्रवादीकडे वळविण्याचे आव्हान मनसैनिकांना पेलावे लागणार आहे.

नाशिक महापालिकेत आपले अस्तित्व कायम ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या मनसेने यापूर्वी लोकसभा निवडणूक लढविली आहे. मात्र, त्यात त्यांना यश मिळाले नाही. गत लोकसभा निवडणुकीवेळी मनसेने माघार घेत भाजपाला पाठिंबा दर्शवला होता. या वेळी मनसेने राष्ट्रवादीला जवळ केले आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीतर्फे समीर भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, वंचित आघाडीतर्फे पवन पवार, माणिकराव कोकाटे आदींच्या उमेदवारीमध्ये ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. मनसेचा अधिकृत उमेदवार नसला तरी मनसैनिकांना आपल्या मतदारांना राष्ट्रवादीकडे वळविण्याची कसरत करावी लागणार आहे. याचबाबत खलबत करण्यासाठी नुकतीच माजी मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ यांनी मनसेचे सरचिटणीस डॉ. प्रदीप पवार यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. या वेळी माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, अनिल मटाले, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, मनसेचे महापालिका गटनेते सलीम शेख आदी उपस्थित होते. बैठकीपूर्वी शेफाली भुजबळ यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या घरी वैयक्तिक भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणप्रकरणी दोघांना चार वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आडगाव नाका येथील एका बारमधील मॅनेरजरला मारहाण करीत गंभीर दुखापत करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघा आरोपींना अतिरिक्त मुख्य न्यायाधीश पांडुरंग घुले यांनी चार वर्षे सक्तमजुरी व हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सागर गरड, विकी शिंदे (रा. नाग चौक, पंचवटी) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना २३ जानेवारी २०१३ रोजी आडगाव नाका येथे दुपारी घडली होती. या प्रकरणी पल्लवी बारचे मॅनेजर मनोज साळुंके यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. २३ जानेवारी २०१३ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गरड व शिंदे हे दोघे आरोपी हॉटेलमध्ये आले होते. मॅनेजर साळुंके यांच्याकडे त्यांनी बीअरच्या बॉटल्स मागितल्या. साळुंके यांनी आरोपीकडे पैशाची मागणी केली असता त्याचा राग येऊन आरोपींनी लोखंडी गज व काठीने साळुंके यांना बेमद मारहाण केली. आमच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास मारून टाकण्याची धमकी आरोपींनी दिली. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक योगेश देवरे यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विद्या देवरे-निकम यांनी काम पाहिले. कोर्टासमोर आलेल्या साक्षी-पुराव्यांच्या आधारे गंभीर दुखापत केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एक वर्ष सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा कोर्टाने दोघांना ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोडसे-भुजबळ सामना रंगणार!

$
0
0

नाशिक लोकसभा मतदारसंघात होणार बहुरंगी लढत

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने अपेक्षेप्रमाणेच विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. परिणामी शिवसेनेकडून उमेदवारीची अपेक्षा बाळगून असलेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी बंडाचे निशान फडकवत अपक्ष म्हणून रिंगण्यात उतरण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात हेमंत गोडसे, राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, माणिकराव कोकाटे, वंचित आघाडीचे पवन पवार व छावा क्रांती सेनेचे करण गायकर असा बहुरंगी सामना रंगण्याची चिन्हे आहेत. दिंडोरी मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना डावलून राष्ट्रवादीतून डॉ. भारती पवार यांना आयात केले आहे. त्यामुळे तेथेही शिवसेनेतून राष्ट्रवादीचे उमेदवार बनलेले धनराज महाले व राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या भारती पवार अशा आयात केलेल्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची समीर भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झालेली असल्याने शिवसेनेकडून कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. जिल्हाप्रमुख विजय करंजकर व माजी आमदार माणिकराव कोकाटे, नगरसेवक शिवाजी चुंभळे यांनाही उमेदवारीची आस होती. परंतु, गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे हेविवेट नेते छगन भुजबळ यांना तब्बल पावणेदोन लाख मतांनी धूळ चारणाऱ्या खासदार हेमंत गोडसेंवरच विश्वास दाखविण्यात आला आहे. प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्याने नाशिकमध्ये २००९ ची पुनरावृत्ती झाली आहे. तेव्हाही समीर भुजबळ व हेमंत गोडसे हेच आमने-सामने होते. फक्त तेव्हा गोडसे हे मनसेचे, तर दत्ता गायकवाड हे शिवसेनेचे उमेदवार होते. या मतदारसंघात खासदार दुसऱ्यांदा निवडून येत नाही असा इतिहास असला तरी त्याला यंदा धक्का बसणार हे दोन्ही उमेदवारांवरुन दिसते आहे. सन २००९ मध्ये समीर भुजबळ, तर २०१४ मध्ये हेमंत गोडसे निवडून आलेले असल्याने दोघांपैकी कोणीही निवडून आले तरी या समजाला छेद जाणार आहे. कोकाटे यांनी बंडाची भाषा केली असली तरी त्यांचा निर्धार कितपत टिकतो यावर बरेच काही अवलंबून आहे. गोडसेंची उमेदवारी जाहीर होताच काही पदाधिकाऱ्यांनी नाराजीचे प्रदर्शन केले असले तरी ही प्रारंभिक प्रतिक्रिया पुढे टिकणार नाही, कारण शिवसेनेने यापूर्वी अशा नाराजीतून दोनदा विजय गमावलेला आहे. यावेळेस पदाधिकाऱ्यांची नाराजी असतानाही गोडसे यांच्याच नावावर पक्षप्रमुखांनी शिक्कामोर्तब केल्याने नाराजांचे लाड पुरविले जाणार नाहीत असे दिसते. गोडसे यांनी गेल्या सहा महिन्यापासूनच निवडणुकीची तयारी केली होती. संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली असली तरी, त्यांनी शांतपणे प्रचार कायम ठेवला होता. गोडसे यांचा मुकाबला पुन्हा एकदा समीर भुजबळ यांच्याशी होणार आहे. त्यामुळे निवडणूक पुन्हा लक्षवेधी होणार आहे.

...

खासदार चव्हाणांना धक्का

दिंडोरीमध्ये चव्हाण यांना डावलल्याने सर्वत्र असंतोष असला तरी अद्याप उमेदवार जाहीर न झाल्याने चव्हाण यांनी थांबा व वाट पहा हे धोरण स्वीकारले आहे. कार्यकर्त्यांशी बोलून पुढील दिशा ठरविण्याचे त्यांनीही ठरविले असल्याने येत्या काही दिवसांत दोन्ही मतदारसंघातील पक्षीय चित्र स्पष्ट होईल.

...

गेल्या पाच वर्षांत मिळालेल्या संधीचे सोने केले. केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने नाशिकचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. नदीजोड, विमानसेवा, क्रीडा, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, शिक्षण आरोग्य, पुरातत्व, पर्यटन अशा सर्वच क्षेत्रात विकासकामे केली. जनतेशी नाळ कायम ठेवली. त्यामुळे दुसऱ्यांदा उमेदवारीची संधी मिळाली.

- हेमंत गोडसे, शिवसेना उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिग्गजांच्या सभेला सुरक्षेचे कवच

$
0
0

शहर पोलिसांना मिळणार 'सीआयएसएफ'कडून विशेष प्रशिक्षण

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणूक प्रचारासाठी नाशिक शहरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील व्हीव्हीआयपी नेते नाशिकमध्ये येण्याची शक्यता अधिक असल्याने केंद्र आणि राज्य पातळीवरील सुरक्षा यंत्रणा अर्लट झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेबाबत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) सक्रिय झाले असून, पोलिसांना ते याबाबत प्रशिक्षण देणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी शहर आणि ग्रामीण पोलिस दलाची जोरदार तयारी सुरू आहे. प्रतिबंधात्मक कारवाई, मतदान केंद्रांची सुरक्षा, राजकीय गुन्हेगारी मोडून काढणे, नाकाबंदी आदी कामे सुरू आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याबाबत तक्रारी आल्यास त्याचा निपटारा करणे याकडे पोलिसांचे विशेष लक्ष आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी उत्तर महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले असून, दिग्गज नेत्यांच्या सभांचे आयोजन होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर व्हीव्हीआयी सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा ठरला असून, याबाबत केंद्रीय स्तरावरून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. २६ मार्च रोजी सीआयएसएफ पोलिसांना विशेष प्रशिक्षण देणार आहे. व्हीव्हीआयपी सुरक्षेसाठी नवीन नियमावलीनुसार काय असावे आणि काय असू नये, हे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे.

...

बंदोबस्ताचे नियोजन

लोकसभा निवडणुकीसाठी शहर पोलिस दलातील तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत बाहेर ६१७ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय ६८३ होमगार्ड्स असून, पोलिस आयुक्तालयातील ८० टक्के कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात येणार आहेत. दररोज रात्री १२ ते पहाटे पाच वाजेपर्यंत नाकाबंदी असून, मिशन ऑलआउट मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे.

..

शहर पोलिसांची तयारी

- शहरात १२५९ शस्त्र परवानाधारक. त्यापैकी २२५ जणांचे २४० शस्त्रे जमा करण्याचा निर्णय

- ११०६ मतदान केंद्रापैकी ४३ केंद्र संवेदनशील. त्यासाठी विशेष उपाययोजना

- १ जानेवारीपासून ३० जण तडीपार. २०१७ पासून १०५ जणांवर ही कारवाई

- आचारसंहिता लागू झाल्यापासून दारुबंदीच्या ३४ केसेस

- आचारसंहिता लागू झाल्यापासून आर्म अॅक्टनुसार ६ गुन्हे. दोन गावठी कट्टे, पाच काडसुते आणि चार तलवारी हस्तगत

- जुगाराच्या सहा, तर कोटपाच्या ११७ केसेस

- मुंबई पोलिस अॅक्टनुसार १४०० जणांवर प्रतिबंधक कारवाई

...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांचे ठोस काम सुरू आहे. सराईत, राजकीय गुन्हेगारांच्या याद्या तयार असून, प्रत्येकावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

- विश्वास नांगरे पाटील, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगाव शाळेत मतदार जनजागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या आडगाव येथील शाळा क्र. सहामध्ये मतदान विषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. मतदान करण्याबाबतची घोषवाक्य असलेले फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांनी परिसरातून प्रभात फेरी काढली. त्यानंतर गावात पथनाट्य सादर करून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. शाळेत निवडणूक या विषयावर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध लेखन, घोषवाक्य लेखन यांसारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. इतकेच पालकांचे मतदान करण्याबाबतचे संकल्प पत्रही विद्यार्थ्यांनी भरून घेतले. मतदान प्रक्रियेचे महत्व आणि स्वरूपाबाबत समिना तांबोळी यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवड संघाचा खतविक्री परवाना रद्द

$
0
0

खतांची ऑफलाइन विक्री भोवली

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

ई-पॉस मशिनद्वारे विक्री करावयाच्या यूरिया रासायनिक खताची ऑफलाइन विक्री केल्याने जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ यांनी चांदवड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे घाऊक व किरकोळ खत विक्रीचा परवाना ९० दिवसांसाठी निलंबित केला आहे.

रासायनिक खत विक्रीत होणारा गैरप्रकार टाळता यावा व शेतकऱ्यांना लागणारी रासायनिक खते माफक दरात त्वरित उपलब्ध व्हावीत यासाठी शासनाने ई-पॉस मशिनद्वारे ऑनलाइन खत विक्री करण्याचे आदेश विक्रेत्यांना दिले आहेत. मात्र चांदवड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत होत असलेल्या खतांच्या विक्रीत व कामकाजात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते राजेंद्र खांगळ यांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ यांनी चांदवड तालुका खरेदी विक्री संघास खते (नियंत्रण) आदेश १९८५ च्या कलम ९ अन्वये अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याने बाजू मांडण्याची संधी देऊन सक्त ताकीद दिली होती. मात्र, त्यानंतरही संघामार्फत ई-पॉस मशिनद्वारे विक्री करावयाच्या यूरिया या रासायनिक खताची ऑफलाइन विक्री केल्याची बाब माहिती खांगळ यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे चांदवड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे घाऊक व किरकोळ खत विक्रीचे परवाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी ९० दिवसांच्या कालावधीसाठी निलंबित करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंखे यांना दिले. आदेशात निलंबन कालावधीत पुढील सुनावणीपर्यंत खतांची विक्री करण्यात येऊ नये असे आदेशित केले आहे.

चांदवड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत होत असलेल्या खते विक्रीच्या गैरप्रकाराबाबत कृषी विभागाकडे सात महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अन्यथा पुन्हा उपोषण व आंदोलन केले जाईल.

- राजेंद्र खांगळ, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आइस्क्रीम मेकिंग वर्कशॉप आज

$
0
0

'मटा कल्चर क्लब'तर्फे आयोजन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'तर्फे उन्हाळ्यानिमित्त आइस्क्रीम मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. आज (२३ मार्च) दुपारी २ वाजता समाजमंदिर, कृषीनगर हौसिंग सोसायटी, कॉलेज रोड या ठिकाणी हे वर्कशॉप होईल.

उन्हाळ्यात थंडावा मिळावा म्हणून प्रत्येकाची आइस्क्रीमला पसंती असते. विविध चवींचे आइस्क्रीम खाणे प्रत्येकाचीच आवड. हीच आवड घरच्या घरी आइस्क्रीम तयार करून भागवता आली तर, तुम्हालाही आवडेल. त्यासाठी 'मटा कल्चर क्लब'तर्फे 'आइस्क्रीम मेकिंग' वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्कशॉपमध्ये बेसिक आइस्क्रीम, पान, गुलकंद, स्ट्रॉबेरी, कुकी अॅण्ड क्रीम आइस्क्रीम रेसिपी शिकविल्या जाणार आहेत. आइस्क्रीम मेकिंग एक्सपर्ट विवेक सोवनी प्रात्यक्षिकांसह आइस्क्रीम बनविण्यास शिकविणार आहेत. वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये, तर इतरांसाठी ४०० रुपये फी आकारण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी ९४२२५१३५६९ या क्रमांकावर किंवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्केअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड या पत्त्यावर दुपारी २ च्या आत संपर्क साधावा.

...

\Bव्हा 'मटा कल्चर क्लब'चे सदस्य\B

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. कल्चर क्लबचे सदस्यत्व इच्छुकांना २९९ रुपयांत मिळू शकते. याशिवाय, www.mtcultureclub.com

या वेबसाइटवरून ऑनलाइन सदस्यत्वही मिळू शकते.

- -

\Bआइस्क्रीम मेकिंग वर्कशॉप \B

\Bकधी :\B २३ मार्च २०१९ रोजी

\Bकुठे : \B समाजमंदिर, कृषीनगर हौसिंग सोसायटी, कृषीनगर, कॉलेज रोड

\Bवेळ : \Bदुपारी २ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहात्तरपैकी वीस सराईत बनलेत रिक्षाचालक!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगार, शिक्षा भोगून आलेल्या गुन्हेगारांची तपासणी सुरू केली आहे. त्यातील ७२ जणांकडून पोलिसांनी नुकतीच माहिती घेतली. विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या या सराईतांपैकी तब्बल २० जणांनी स्वत:चे पुनर्वसन रिक्षाचालक म्हणून करवून घेतले आहे. प्रवाशांची लूटमार, अरेरावी आणि वाहतूक नियमांचे सर्रास होणारे उल्लंघन यामुळे पोलिसांसाठी हा एक नवा चिंतेचा विषय ठरू पाहतो आहे.

शहरात रिक्षा व्यवसाय मोठा असून, सार्वजनिक परिवहन व्यवस्थेतील तो एक मोठा भाग ठरला आहे. रोजगारनिर्मिती होत असल्याने शेकडो व्यक्ती दर वर्षी या व्यवसायाकडे आकर्षित होतात. यात गुन्हेगारांचीही संख्या लक्षणीय असते. यापूर्वी तसे बोलले जात होते. मात्र, ते स्पष्ट होत नव्हते. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्यात सराईत गुन्हेगार रडारवर घेतले आहेत. विविध गुन्ह्यांत शिक्षा झालेल्या सराईत गुन्हेगारांची माहितीसुद्धा पोलिस घेत आहेत. सराईत गुन्हेगारांच्या माहितीचे आदानप्रदान सुरू आहे. शहर पोलिसांनी नुकतीच ७२ गुन्हेगारांची माहिती घेतली. त्यापैकी तब्बल २० जणांनी आपले पुनर्वसन रिक्षाचालक म्हणून करवून घेतले आहे. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.

प्रवासी सुरक्षेबाबत चिंता

गुन्हेगारांना सुधारण्यासाठीच सर्व यंत्रणा असते. त्यांचे पुनर्वसन होणे आवश्यक असले, तरी २७ टक्क्यांहून अधिक सराईत गुन्हेगार रिक्षाचालक होण्यास प्राधन्य देत असल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. सर्वच रिक्षाचालक अथवा व्यावसायिक नियम मोडतात असे नाही. प्रामाणिक रिक्षाचालकांची संख्यासुद्धा मोठी आहे. मात्र, या व्यवसायात गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या प्रवृत्तींचा मोठ्या संख्येने शिरकाव होत गेल्यास त्याचा परिणाम प्रवाशांच्या सुरक्षेवर होऊ शकतो, असे मत पोलिसांकडून व्यक्त होत आहे. याबाबत नक्की काय उपाययोजना राबवायच्या याबाबत खलबते सुरू आहेत.

गुन्हेगारांचे पुनर्वसन व्हावे यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न होत असतात. शहरात बहुतांश सराईत रिक्षाचालक होण्यास प्राधन्य देत असून, त्यातून गुन्हेगारी घटना घडतात किंवा घडू शकतात. त्यामुळे प्रामाणिक काम करणारा रिक्षा व्यावसायिकसुद्धा अडचणीत सापडतो.

-विश्वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्यिक डॉ. यशवंत पाठक यांचे निधन

$
0
0

नाशिक

संत साहित्याचे अभ्यासक, साहित्यिक प्रा. डॉ. यशवंत पाठक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी ज्योत्स्ना, विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. पाठक हे कवी किशोर पाठक यांचे ज्येष्ठ बंधू होत.

मनमाड येथील महात्मा फुले महाविद्यालयातून विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर सुमारे ९ वर्षे डॉ. पाठक यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे काम पूर्ण केले. डॉ. पाठक यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. मेहतांना किताब

$
0
0

डॉ. मेहतांना किताब

नाशिक : इकॉनॉमिक टाइम्सच्या हेल्थवर्ड डिव्हिजन या संस्थेकडून, शहरातील स्रीरोग तज्ज्ञ डॉ. रणजीत मेहता यांना पश्चिम भारतातील प्रेरणादायी स्त्रीरोग तज्ज्ञ या किताबाने गौरविण्यात आले. मुंबई येथील हॉटेल आर्किड येथे नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात डॉ. मेहता यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. मेहता व त्यांच्याप्रमाणे इतर ९९ स्त्री रोग तज्ज्ञांच्या संक्षिप्त जीवन गाथेचा उल्लेख लवकरच प्रकाशित होणाऱ्या कॉफी टेबल बुकमध्ये होणार आहे. या प्रकारे पुरस्कार मिळालेले नाशिकमधील मेहता हे एकमेव स्त्रीरोग तज्ज्ञ असून, या यशाबाबत त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हाती दिवस अकरा, हरकती नोंदवा

$
0
0

धार्मिक स्थळ बचाव समितीचे विश्वस्तांना आवाहन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधूममध्ये शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे संकटात आली आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेने जारी केलेल्या धार्मिक स्थळांसंदर्भातील अधिसूचनेवर हरकत नोंदविण्यासाठी आता जेमतेम ११ दिवस उरले आहेत. त्यामुळे धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी महापालिकेकडे पुराव्यासह तातडीने हरकत व आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन धार्मिक स्थळ बचाव समितीचे समन्वयक तथा सभागृहनेते दिनकर पाटील यांनी केले आहे.

शहरातील धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण नियमाप्रमाणे झाले नसल्याचे सांगत उच्च न्यायालयाने महापालिकेला फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने फेरसर्वेक्षण करीत ८९९ पैकी ६४७ धार्मिक स्थळे अनधिकृत ठरवली आहेत. त्यामुळे शहरातील धार्मिक स्थळांचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यातच विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीचा आधार घेत महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळे नियमित करण्याचा ठराव महासभेने संमत केला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता; परंतु सत्तारूढ भाजप-सेनेच्या आमदारांनी या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी शासनाकडे कुठलाही पाठपुरावा न केल्यामुळे दोन वर्षापासून हा प्रस्ताव शासनाकडे धूळ खात पडून आहे. त्यामुळे शासनाच्या या दुर्लक्षामुळे धार्मिक स्थळांवर कारवाईचे अरिष्ट आल्याचा आरोप धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांकडून करण्यात आला होता. यासंदर्भात गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची बैठक झाल्यानंतर भाजप शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या पंचवटीतील कार्यालयासमोर धार्मिक स्थळ बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. मात्र त्यानंतरही धार्मिक स्थळ बचावासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासन पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे महापालिकेकडे रितसर हरकत नोंदविण्यापलिकेडे धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांच्या हाती आता काहीही उरलेले नाही. त्यामुळे विहित कालावधीत पालिकेकडे हरकत नोंदविण्याचे आवाहन सभागृह नेते दिनकर पाटील यांच्यासह धार्मिक स्थळ बचाव समितीचे विनोद थोरात, कैलास देशमुख, नंदू कहार, चंदन भास्करे, प्रवीण जाधव यांनी केले आहे.

...

निवडणुकीमुळे भाजपची कोंडी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून, पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे महापालिकेला दोन महिन्यात ही कारवाई पूर्ण करावी लागणार आहे. या धार्मिक स्थळाकडे पुरावे नसल्यास किंवा राज्य सरकारके १५ टक्के मोकळ्या भूखंडावर बांधकाम अनुज्ञेय करण्याचा ठराव शासनाने मंजूर केला नाही, तर या धार्मिक स्थळांवर हातोडा पडणार आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या धामधूममध्ये भाजपची कोंडी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसाळ वाणीचे मालक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपल्या अमोघ वाणीने अवघ्या जनसमुदायाला डोलायला लावणारे डॉ. यशवंत पाठक यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने संत साहित्याचा एक संशोधक गेल्याची भावना साहित्यिकांमध्ये असून, त्यांना वाहिलेली ही शब्दसुमनांजली.

---

ज्ञानदेव अध्यासनातील कार्य मोलाचे

संत साहित्यातील ज्येष्ठ संशोधक म्हणून डॉ. यशवंत पाठक यांनी आयुष्यभर महत्त्वाचे काम केले. पुणे विद्यापीठाच्या ज्ञानदेव अध्यासनात त्यांनी केलेले कार्यही मोलाचे आहे. त्यांच्या जाण्याने मला अतीव दु:ख झाले आहे.

-डॉ. यु. म. पठाण, संत साहित्याचे अभ्यासक

ज्ञानवंत लेखक गेले

पाठक सर संत साहित्याचे अभ्यासक, रसाळ वक्ते, प्रवचनकार होते. त्यांना प्रख्यात कीर्तनकारांची पार्श्वभूमी लाभलेली होती. त्यांनी मनमाडला अनेक वर्षे अध्यापनाचे कार्य केले. संत ज्ञानदेव अध्यासनाचे ते प्रमुख होते. त्यांनी अनेक व्याख्याने दिली, ते वृत्तपत्रात नियमित लेख लिहीत होते. अत्यंत प्रासादीक लेखन करणारे एक ज्ञानवंत लेखक आपल्यातून गेले. श्रद्धांजली.

-डॉ. दिलीप धोंडगे, संत साहित्याचे अभ्यासक

सहकारी म्हणूनही ते उत्तम

डॉ. यशवंत पाठक यांचे आकस्मात निधन ही दुर्दैवी, दु:खद घटना आहे. पाठकांच्या घरात कीर्तन परंपरा होती. त्यांचा संतसाहित्याचा दांडगा अभ्यास होता. त्यांच्या ललितलेखनाने साहित्याचा परिसर समृद्ध झाला. अत्यंत शैलीदार वक्तृत्त्वामुळे ते साहित्य संस्कृती विश्वात ख्यातकीर्त झाले. यासंदर्भातील त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील. प्रा. डॉ. म. सु. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनमाड महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. मी त्यांचा काही वर्ष सहकारी होतो, ते सहकारी म्हणूनदेखील उत्तम होते. प्राचार्य म. सु. पाटील, डॉ. अशोक महाजन अन्य साहित्य संस्कृती जनांसोबत त्यांनी केलेले कार्य मनमाडकरांच्या नेहमी स्मरणात राहील.

-गो. तु. पाटील, ज्येष्ठ साहित्यिक

अंगणातील आभाळ पोरके झाले

डॉ. यशवंत पाठक हे कीर्तनपरंपरेची पार्श्वभूमी लाभलेले एक ज्येष्ठ अभ्यासक होते. मराठीमध्ये अनोख्या पद्धतीने ललित लेखन करण्याचा पायंडा त्यांना पाडला. एरवी जे ललित लेखन करण्यात येते, त्यापेक्षा हे निराळे होते. त्यांच्या जाण्याने साहित्याच्या अंगणातील आभाळ पोरके झाले.

-डॉ. एकनाथ पगार, ज्येष्ठ समीक्षक

रसाळ वाणीचा मालक गेला

यशवंता माझा बालपणीचा मित्र. आमची मैत्री ५० वर्षांपासूनची. कॉलेजला एकत्रच शिक्षण घेतले. अत्यंत अभ्यासू, कष्टाळू, व्यासंगी, संत साहित्याचा अभ्यासक, प्रचंड वक्तृत्त्व, रसाळ वाणी, श्रोत्यांना आपलेसे करणारे व्याख्यान द्यायचा. उत्कृष्ट तबलावादक. प्रख्यात कीर्तनकार गौतमबुवा पाठक त्याचे वडील. कीर्तनावरच पीएचडी केली. तीन वेळा शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला. भावपूर्ण श्रद्धांजली.

-डॉ. उल्हास रत्नपारखी, संत साहित्याचे अभ्यासक

संत साहित्याचा नंदादीप मावळला

डॉ. यशवंत पाठक यांच्या निधनाने संत साहित्याच्या प्रांतातील कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्रभर त्यांच्या ओजस्वी व प्रासादिक वाणीचा चाहता वर्ग होता. कवी किशोर पाठक यांचे ते मोठे बंधू होते. संत ज्ञानेश्वर अध्यासनाच्या प्रमुखपदीही ते होते. तुकोबांची गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत संप्रदाय, सुफी संत परंपरा, गुरुपरंपरा व एकूणच मध्ययुगीन वाङ्मयावर ते सखोल निरूपण करत. भागवत संप्रदायावर त्यांची निष्ठा होती. जेव्हा जेव्हा ते संतांवर बोलत असत तेव्हा देहभान हरपून श्रोते त्यांना ऐकत असत. विवेचन करण्याची सोपी सुलभ शैली, निवेदनातली आवाहकता हे त्यांच्या निरुपणाचे खास असे वैशिष्ट्य म्हणता येईल.

प्रा. अमर ठोंबरे, प्रसिद्धीप्रमुख, वारकरी महामंडळ

---

सावानातर्फे बुधवारी शोकसभा

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. यशवंत पाठक यांना आदरांजली वाहण्यासाठी सार्वजनिक वाचनालयातर्फे बुधवारी दि. २७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवामान शास्त्राचे उलगडले पैलू

$
0
0

'मटा'च्या उपक्रमास वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हवामान विभागाची यंत्रणा जाणून घेण्यासाठीची विद्यार्थ्यांपासून तर आजोबांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रचंड उत्सुकता, अनेकांनी अभ्यासपूर्वक प्रश्नांची केलेली मांडणी, काहींनी यंत्रणा समजून घेत विचारलेल्या अनेक शंका, करिअर करण्यासाठी यंत्रणा जाणून घेतानाच कित्येकांनी हवामान नेमके बदलते तरी कसे, हा प्रश्न विचारत हवामान शास्त्राची पूर्ण माहिती घेतली. फक्त पुस्तकात चित्ररुपात पाहिलेली सर्व यंत्रणा प्रत्यक्षात पाहताना 'मटा'चे वाचक हरवून गेले होते. निमित्त होते, 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'हवामान केंद्राची सफर' या उपक्रमाचे.

जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून 'मटा'च्या वाचकांसाठी 'हवामान केंद्राची सफर' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (२३ मार्च) दुपारी १२ वाजता वाचक हवामान विभागाची यंत्रणा जाणून घेण्यासाठी पेठरोडवरील हवामान केंद्रात जमले. हवामानात थोडा जरी बदल झाला तरी त्याचा परिणाम जीवनशैलीवर जाणवतो. त्यामुळे हवामानाच्या बदलाचे अंदाज फक्त ऐकण्यापेक्षा तेथील यंत्रणा जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण आतूर असल्याचे उपक्रमात दिसून आले.

प्रारंभी नाशिक केंद्राचे हवामान शास्त्रज्ञ सुनील काळभोर यांनी हवामान खात्याची माहिती वाचकांना सांगितली. देशात प्रत्येक अडीच तासांनी हवामानाचे मोजमाप केले जाते. त्याची पध्दत व यंत्रणा नेमकी कशी असते, याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर सहाय्यक वैज्ञानिक वैशाली वडनेरकर, प्रकाश ब्रह्मपुरीकर, नितेश बारघरे, विश्वजित सोनवणे आणि सहाय्यक सुदाम रसाळ यांनी वाचकांना केंद्राची सफर घडवली. त्यात वाचकांना वाऱ्याच्या वेग मोजण्याचे एकक, वाऱ्याची दिशा दर्शविणारे उपकरण, हवामानातील बदल दर्शविणारे उपकरण, कमाल व किमान तापमानाची नोंद करण्याची यंत्रणा यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यामुळे वाचकांच्या सर्व शंकांचे निरसन झाले. दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी वाचकांशी व्हॉट्सअॅप कॉलिंगद्वारे मुंबईतून संवाद साधला. वाचकांनी केंद्रात पाहिलेल्या यंत्रणेची अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली. या उपक्रमातून हवामान केंद्राच्या कार्यपध्दतीसह वाचकांसमोर हवामान शास्त्राचे अनेक पैलू उलगडले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाचे आव्हान

$
0
0

आजाराबाबतचे अज्ञान प्रशासनासाठी ठरतेय डोकेदुखी

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संसर्गजन्य आणि जीवघेणा क्षयरोग (टीबी) अजूनही नियंत्रणात आणण्यात यश मिळत नसल्याचे चित्र आहे. लाखो रुपये खर्च करूनही प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाने यंत्रणेपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. मागील काही वर्षांत या आजाराचे ५७ पेशंट आढळले. सन २०१८ मध्ये सरकारी यंत्रणांकडे पोहचलेल्या ९५ टक्के पेशंटला पूर्णतः बरे करण्यात आले, तर २८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दररोजच्या उपचार पद्धतीचा (डेली रेजीम) चांगला परिणाम अलीकडे हळूहळू दिसून येऊ लागला आहे.

क्षयरोगच्या उपचार पध्दतीत सरकारने अलीकडे आमूलाग्र बदल केले आहेत. दररोजच्या औषधोपचार पध्दतीचा (डेली रेजीम) परिणाम आता दिसून येत आहे. सरकार एका पेशंटवर अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करते. मात्र, तरीही शेकडो नागरिक आजाराचे बळी ठरतात. या आजाराबाबत असलेले अज्ञान हेच प्रशासनासमोर सर्वात मोठे आव्हान ठरले असून, २०१८ मध्ये २८ जणांचा क्षयरोगामुळे बळी गेला.

जागतिक क्षयरोग दिन २४ मार्च रोजी असतो. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने २२ ते ३० मार्च दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यापूर्वी पेशंटला दिवसाआड उपचार पध्दती कार्यान्वित होती. मात्र, क्षयरोगाची व्याप्ती लक्षात घेता सरकारने २० फेब्रुवारी २०१७ पासून दररोजची उपचार पध्दती सुरू केली. सन २०१८ मध्ये सरकारी यंत्रणांकडे पोहचलेल्या ९५ टक्के पेशंटला पूर्णतः बरे करण्यात आले. तर २८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाने यंत्रणेपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. मागील काही वर्षांत या आजाराचे ५७ पेशंट आढळले. क्षयरोगाचे वेळेवर निदान झाल्यास पुढील सर्व समस्या औषधोपचाराने कमी करता येतात, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. दिलीप रणवीर यांनी स्पष्ट केले.

...

खासगी हॉस्पिटलची चालढकल

क्षयरोग हा काही प्रमाणात खर्चिक आणि दीर्घकालीन आजार मानला जातो. नियमाप्रमाणे टीबीचा पेशंट आढळून आल्यानंतर ही माहिती लागलीच सरकारी यंत्रणांना दिली जाणे अपेक्षित असते. मात्र, अनेकदा याकडे दुर्लक्ष होते. सन २०१८ मध्ये अवघ्या २४९ पेशंटची माहिती खासगी हॉस्पिटल्सनी कळवली. क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असल्याने पेशंटसह त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घ्यावी लागते. खासगी हॉस्पिटल्स हे काम त्या क्षमतेने करू शकत नाहीत.

...

क्षयरोग आणि जिल्हा

४५ लाख लोकसंख्या

१६ क्षयरोग पथके

७० मान्यताप्राप्त सूक्ष्मदर्शक केंद्र

१३८ अशासकीय आरोग्य संस्था

२०१८ मध्ये २९४८ पेशंट उपचाराखाली

२९४८ पैकी १५११ थुंकी दूषित क्षयरुग्ण

५७१ थुंकी अदूषित क्षयरुग्ण

३५८ पुनर्उपचार व ५०८ इतर अवयवांचे क्षयरुग्ण

५७ प्रतिजैविकांना दाद न देणारे क्षयरुग्ण

२०१८ मध्ये ९३ टक्के पेशंट पूर्णतः बरे

२८ जणांचा मृत्यू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. पाठक यांची विपुल साहित्यसंपदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांनी विपुल साहित्यलेखन केले असून, त्यांची दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांनी अनेक नामवंत व्याख्यानमालांमध्ये रसाळ भाषणे केली. १९७० पासून संतवाङ्मय, संस्कृती, तत्त्वज्ञान याविषयी त्यांनी गावोगाव व्याख्याने दिली. नैनीताल येथील पूर्णयोगी श्री अरविंद आश्रमात चार वर्षे श्री अरविंदांच्या तत्त्वज्ञानावर त्यांनी निरूपण केले, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेवरील त्यांची निरूपणे आकाशवाणीवरून प्रसारित झाली. दूरचित्रवाणीवरही त्यांनी अनेक समयोचित भाषणे केली.

डॉ. पाठक यांचे वडील गौतमबुवा मूळचे पिंपळनेर येथील प्रख्यात कीर्तनकार, स्वातंत्र्यसैनिक होते. ते पुढे नाशिकला स्थायिक झाले. डॉ. यशवंत हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र. त्यांचा जन्म नाशिकमध्ये २६ नोव्हेंबर १९४६ रोजी झाला. देवमामलेदार यशवंत महाराज यांच्या कार्याच्या प्रभावळीतून त्यांचे नाव 'यशवंत' असे ठेवण्यात आले. नाशिकमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मनमाड महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन केले.

डॉ. पाठक यांची सुमारे २१ पुस्तके प्रकाशित असून, पैकी 'नाचू कीर्तनाचे रंगी', 'अंगणातले आभाळ', 'येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ', 'निरंजनाचे माहेर' या चार पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला होता. याशिवाय डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार, संत ज्ञानदेव, संत विष्णुदास, चतुरंग, निर्भय, संतसाहित्य, महात्मा फुले आदी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. संतसाहित्यातील योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. शं. दा. पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याशिवाय अनेक सभा, संमेलने, परिषदांचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले.

डॉ. यशवंत पाठक यांची साहित्यसंपदा

१. ब्रह्मगिरीची सावली (ललित)

२. नक्षत्रांची नाती (व्यक्तिचित्रे)

३. मैत्रीचा मोहर (ललितबंध)

४. तुकारामांचे निवडक अभंग (संपादन व प्रस्तावना)

५. समर्थांची स्पंदने (समीक्षा)

६. अमृताची वसती (चिंतनलेख)

७. आभाळाचे अनुष्ठान (कथासंग्रह)

८. चंदनाची पाखरं (ललित लेख)

९. पसायदान (पसायदानावर भाष्य)

१०. तू माझा सांगाती (दीर्घ प्रस्तावना)

११. कीर्तन : प्रयोगविचार

१२. कीर्तनपद्धती : चिकित्सा

१३. श्री समर्थ रामदासांच्या मनाच्या श्‍लोकांचे मर्म

१४. तुकारामांच्या अभंगांतील उद्बोधन (अंतरीचे धावे)

१५. श्री संत रामदासांच्या स्फूट पदरचना (अप्रकाशित)

१६. मातीचं देणं (ललित लेख)

१७. संचिताची कोजागरी (कादंबरी)

१८. म. म. बाळशास्त्री हरदास (चरित्र)

१९. पहाटसरी (ज्ञानेश्वरीतील निवडक ओव्यांचे विश्‍लेषण)

२०. कैवल्याची यात्रा (ज्ञानदेवांचा ज्ञानयोग व स्वामी विवेकानंदांचा ज्ञानयोग : तौलनिक विवेचन) (प्रकाशनाच्या वाटेवर)

२१. संशोधन निबंधांचे संकलन (संतसाहित्य व संस्कृतीसंदर्भात) (प्रकाशनाच्या वाटेवर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images