Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दुकाने बंद केल्यास निवडणुकीवर बहिष्कार

$
0
0

दुकाने बंद केल्यास

निवडणुकीवर बहिष्कार

मनमाड : लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेचे कारण दाखवित पोलिस सक्तीने रात्री १० वाजता हॉटेल व दुकाने बंद करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप करत ही दंडेलशाही थांबली नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा शहरातील हॉटेल व्यावसायिक व व्यापारी वर्गाने पोलिस प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. 'लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकू' असा इशारा देणारे पत्र व्यापाऱ्यांनी मुख्य निवडणूक आयोग, विशेष पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना पाठवले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शासनाचे नोंदणी दाखला व तहसीलदार कार्यालयाने दिलेल्या परवान्यात हॉटेल व इतर काही प्रतिष्ठान पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे; मात्र पोलिस अधिकारी व कर्मचारी सध्या आचारसंहिता सुरू असल्याचे सांगत रात्री १० वाजताच सक्तीने हॉटेल बंद करीत असल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शहरातील अनेक हॉटेल्स ही रेल्वे स्थानकाजवळ आहेत. १० नंतर हॉटेल बंद केल्याने प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत आहे. अगोदरच मनमाड परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे त्यातच पोलिसांच्या अशा नियमांमुळे नुकसान होत आहे, असेही हॉटेल व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंबड वेअर हाऊसची आज पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंबड येथील वेअर हाऊसमध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून, जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील गुरुवारी दुपारी एकत्रितरीत्या येथे पाहणी करणार आहेत.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मत मोजणी अंबड येथील वेअर हाऊसमध्ये केली जाणार आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांनी गत आठवड्यात वेअर हाऊसची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्तांसमवेत गुरुवारी (दि.२१) दुपारी चार वाजता ही पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

$
0
0

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात दोन मादी व एका नर बिबट्याचा समावेश आहे. एकमेकांवरील हल्ल्यातून त्यांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात वेगवेगळ्या भागात बिबट्यांचा संचार वाढत असताना गेल्या आठवड्यात परमोरी शिवारात बालिकेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे वन विभागाने परमोरी शिवारात व ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे, त्या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते.

परमोरी येथील शेतकरी रमेश माधवराव पडोळ सकाळी त्यांच्या शेतजमिनीजवळ व मॅकडॉल कंपनीलगतच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता, त्यांना बिबट्याचे तीन बछडे मृतावस्थेत आढळले. एकमेकांवर केलेल्या हल्ल्यातून बछड्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. तिन्ही बछड्यांच्या मानेला चावा घेतलेला दिसून आला आहे. याबाबत पशुधन विकास अधिकारी डॉ. नितीन कनोज यांनी बछड्यांचे शवविच्छेदन केले. या बछड्यांचे वन विभागाच्या वतीने दहन करण्यात आले. जेथे बिबट्याच्या हल्ल्यात बालिका मृत झाली होती, त्या ठिकाणापासून जवळच बछड्यांचा मृत्यू झाला. या बछड्यांची मादी अद्याप जिवंत असून, परिसरातच तिचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते व शिक्षणतज्ञ अरुण ठाकूर यांचे निधन

$
0
0

म.टा. प्रतिनिधी , नाशिक: ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ व लेखक अरुण ठाकूर यांचे आज रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे नाशिकमधील समाजवादी चळवळीचं प्रचंड नुकसान झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

ठाकूर यांचे 'नरक सफाईची गोष्ट', 'टीचर' हे अनुवादित पुस्तक प्रकाशित झालेले आहे. शैक्षणिक क्षेत्रात मराठी शाळांसाठी नवीन उमेद जागावणारी आनंद निकेतन सारखी प्रयोगशील शाळा सुरू करून त्यांनी शैक्षणिक क्षेत्राला कलाटणी देण्याचा प्रयत्न सुरू केला. सहज आणि आनंददाई शिक्षण हा त्यांचा अभ्यासविषय होता. मराठवाडा विद्यापिठाच्या नामांतर लढ्यामध्ये अग्रेसर होते. शासकीय आणि निमशासकीय मराठी माध्यमाच्या शाळांच्या लढ्यात सहभागी, नाशिकमध्ये सफाई कामगारांचा लढा, नाशिक महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठीची मोठी चळवळ अरुण ठाकूर यांनी उभी केली. नाशिकमध्ये समाजवादी विचारांची फळी तयार करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. समता आंदोलनाच्या पायभारणीमध्ये त्यांनी तत्कालीन तरुणांचे प्रशिक्षण वर्ग आणि तयारी करून घेतली. त्यांनी देहदान केले असल्याने उद्या (दि.२२) सकाळी ९.०० वाजता पी अँड टी कॉलनी येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी आणले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोड्याआडून व्हॉट्सअपवर प्रचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीसाठी अनोखे फंडे वापरले जात असून, व्हॉट्सअपवर विविध प्रकारची कोडी टाकली जात आहेत. या कोड्याचे उत्तर कोणताही आकडा निवडला तरी ठराविक एका पक्षालाच कौल मिळत आहे. या उत्तरामुळे व्हॉट्सअप युजर्स संभ्रमात पडले आहे.

निवडणुका आल्या की, उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कोणत्याही फंडे वापरण्यास मागे पुढे पाहत नाहीत. एका पक्षाच्या कार्यकत्यांनीही नामी शक्कल लढवली असून, व्हॉट्सअपवर विविध प्रकारची कोडी तयार करुन टाकण्याचे काम त्याच्याकडे देण्यात आले आहे. आपण केलेली आकडेमोड आपण कुणाला मत द्यावे हे योग्य तऱ्हेने सांगेल, असे या कोड्यात सांगण्यात आले आहे. यात १ ते ९ अंक देण्यात आले आहेत. या ९ अंकामधून कोणताही एक अंक मनात धारायचा आहे. मनात धरलेल्या अंकाला ३ ने गुणायचे आलेल्या उत्तरात ३ मिळवायचे असून, आलेल्या संख्येला पुन्हा ३ ने गुणायचे आहे. यात दोन अंकी संख्या उत्तर येते. या दोन अंकी संख्येची बेरीज करायची म्हणजेच १२ उत्तर आले असेल तर १ अधिक २ अशी बेरीज करायची. त्यातून आलेले उत्तर हे तुम्ही कुणाला मत द्यावे हे त्याचे नाव सांगण्यात आले आहे. यात काहीही केले तरी उत्तर ९ हेच येते त्यामुळे ९ या संख्येवर विविध पक्षांनी आपापली मतदानाची चिन्हे टाकली आहेत. हे कोडे एकाच पक्षाने टाकले आहे, असेही नाही तर अनेक पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या आवडीच्या पक्षाचे नाव ९ या संख्येवर टाकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावर निवडणुकीची भिस्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमांतून पक्षाची राजकीय भूमिका सांगण्याचा यातून प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे मतदार संघातील प्रश्नांचाही यात ऊहापोह केला जाणार आहे. फेसबुक, व्हॉटअॅप या माध्यमाला अद्यापपर्यंत पसंती आहे. पण, यापेक्षा वेगवेगळ्या सोशल मीडियांच्या आयुधांचा वापरही या निवडणुकीत केला जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत हा 'सोशल वॉर' मीडियाच्या माध्यमातून दिसू शकतो.

गेल्या काही वर्षात निवडणुकीच्या प्रचाराची पारंपरिक पद्धत बदलली असली तरी प्रचार सभा, रॅली, वैयक्तीक गाठीभेटी यासारखे प्रकार आजही सुरू आहेत. पण, आता त्यात नवीन तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्यामुळे या निवडणुकीत थोडे वेगळे चित्र दिसायला मिळणार आहे. काही राजकीय पक्षांचे अजून उमेदवार निश्चित झाले नसले तरी पक्षपातळीवर मात्र वेगवेगळ्या कल्पना समोर येत आहेत. त्यातून कोणती कल्पना आपल्याला योग्य राहील यावर विचार केला जात आहे.

विद्यमान उमेदवारांनी आपण केलेली कामे लोकापर्यंत पोहचविण्याठी पुस्तकांचा आधार घेतला. त्यात आपला अहवालही देण्यात आला. पण, या पारंपरिक पद्धतीत सर्वच मतदारांपर्यंत ते पोहचू शकत नसल्यामुळे त्यांनी काय करावे? यावर विचार सुरू केले आहे. पण, या निवडणुकीत उमेदवारी मिळेल का ही साशंकता त्यांना असल्यामुळे त्यांनी थोडं सबुरीने घेतले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपले काम लोकापर्यंत पोहचविण्यासाठी नव्या तंत्राचा वापर केला जाणार आहे.

चित्ररथ हादेखील या निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहचण्याचा चांगला मार्ग आहे. पण, हे डिजिटल चित्ररथ असावे व त्यातून सर्व कामे लोकापर्यंत पोहाचावी यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील खाकुर्डी येथील एका सार्वजनिक विहिरीत पाय घसरून पडल्याने दोघा तरुणांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. दीपक केशव कासार (वय, ४६ रा. खाकुर्डी) व समाधान हिरामण जाधव ( वय, ५० रा. खाकुर्डी ) अशी दोघे मृतांची नावे आहेत.

गावालगत असलेल्या एका सार्वजनिक विहिरीभोवती मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी ते काम पहाण्यासाठी हे दोघेही गेले असता काठावर असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांवरून दोघांचा पाय घसरल्याने ते विहिरीत कोसळले. त्याचेवेळी त्याच्या अंगावर मातीचा मोठा भाराव कोसळल्याने ते दोघे ढिगाऱ्याखाली दाबले गेले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेतली. वडनेर खाकुर्डीचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे तसेच मालेगाव अग्निशमन दलाचे अधिक्षक संजय पवार आदींसह पथक घटनास्थळी दाखल झाले.

जेसीबीच्या सहाय्याने मातीचा ढिगारा बाजूला करण्यात आला. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोघांना बाहेर काढण्यात यश आले मात्र दोघांचा ढिगाऱ्या खाली दाबल्याने जागीच मृत्यू झाला होता. मृतांमधील दीपक कासार हे मालेगाव तहसील येथील सेतू कार्यालयात कर्मचारी होते. दोघांचे मृतदेह सायंकाळी शवविच्छेदनासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. या दुर्दैवी घटनेने खाकुर्डी परिसरात शोककळा पसरली आहे. मृत समाधान जाधव हे विवाहित होते. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई व मोठा भाऊ असा परिवार आहे. तर दीपक कासार हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात एक लहान भाऊ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक्टर खरेदीच्या बहाण्याने शेतकऱ्यांची फसवणूक

$
0
0

एजन्सीने कर्ज मंजूर करून परस्पर ३४ लाख लाटले

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांच्या नावे फायनान्स कंपनीकडून तब्बल ३३ लाख ८२ हजार ८७९ उकळून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर न देता ही रक्कम एजन्सीमालकाने परस्पर हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित एजन्सी मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव मधुकर भालेराव (वय ४०) असे या संशयित मालकाचे नाव आहे. भालेरावची व्ही अॅण्ड एम नावाची ट्रॅक्टर एजन्सी आहे. या प्रकरणी एल अॅण्ड टी फायनान्स कंपनीचे कर्मचारी सचिन दादाजी पवार (३६, रा. कोर्णाकनगर, हॉटेल जत्रामागे) यांनी फिर्याद दिली आहे. इच्छुक कर्जदारांना कर्जपुरवठा करण्याचे काम त्यांच्या संस्थेमार्फत होते. ३१ जानेवारी २०१७ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला.

शेतकरी सागर धोंडगे, आकाश शिंदे, हरी गांगुर्डे, रामचंद्र चौधरी, कचरू कराड, राजेंद्र गायकवाड आणि नारायण जगताप यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी भालेरावच्या व्ही अॅण्ड एम एजन्सीमध्ये ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी संपर्क साधला होता. त्यावेळी संशयित भालेरावने या शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेतले. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रेही पदरात पाडून घेतली. त्यानंतर भालेरावने ही कागदपत्रे अर्थपुरवठा करणाऱ्या कॉलेजरोडवरील एल अॅण्ड टी फायनान्स कंपनीकडे सादर केली. सर्व कागदपत्रांची पडताळणी करून संस्थेने संबंधितांना ३३ लाख ८२ हजार ८७९ रुपयांचे कर्ज मंजूर केले होते.

--

रक्कम थकल्याने शेतकऱ्यांचा शोध

फायनान्स कंपनीने कर्ज मंजूर केल्यावरही संशयित भालेरावने वरील शेतकऱ्यांना कर्ज मंजूर होणार नसल्याचे सांगितले. दुसरीकडे भालेरावने बनावट चेसीज आणि इंजिन क्रमांकांची नोंदणी करून नवीन ट्रॅक्टर शेतकऱ्यांना स्वाधीन केल्याचे कागदोपत्री फायनान्स कंपनीला दाखविले. गतवर्षात कर्जाची रक्कम थकल्याने कंपनीने या शेतकऱ्यांचा शोध घेतला असता त्यांच्याकडे ट्रॅक्टरच नसल्याचे समोर आले. त्यानुसार फायनान्स कंपनीच्या सचिन पवार यांनी कंपनीची आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार सरकारवाडा पोलिसांकडे केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक शेळके तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयडिया कॉलेजतर्फे 'एक्सक्लेम २०१९'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक बांबूची पर्यावरणपूरकता आणि त्याच्या इतर गुणधर्मांमुळे त्याला 'ग्रीन स्टील' म्हणून ओळख जाते. बांबूची हीच उपयोगिता लक्षात घेऊन 'बांबू' याच विषयावर यंदा आयडिया कॉलेजने 'एक्सक्लेम २०१९' या वार्षिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन २२ ते २४ मार्च २०१९ या कालावधीत कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड, नाशिक येथे होणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत या प्रदर्शनास नागरिकांना भेट देता येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आज (२२ मार्च) सकाळी ११ वाजता प्रसिद्ध आर्किटेक्ट, आर्टिस्ट व शिक्षणअभ्यासक फ्रवशी अॅकॅडमीच्या शर्वरी लथ यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी आर्किटेक्ट प्रदीप काळे, फोटोग्राफर राजा पाटेकर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. प्रदर्शनाच्या समारोपाच्या दिवशी आर्किटेक्ट संजय पाटील उपस्थित राहणार आहेत. समारोप आणि वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संध्याकाळी ६ वाजता अशोका बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पारेख आणि कुसुमाग्रज स्मारकाचे अध्यक्ष अॅड. विलास लोणारी यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक बंधनकारक

$
0
0

चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक बंधनकारक

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जिल्ह्यासह नाशिक विभागातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या खासगी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या दर्शनी भागातील भिंतीवर चाइल्ड हेल्पलाइनचा १०९८ हा क्रमांक प्रसारित करण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत.

याशिवाय ज्या शाळा विद्यार्थी वाहतुकीसाठी स्कूल बसेस वापरतात त्या सर्व स्कूल बसेस व व्हॅनवरदेखील हा क्रमांक प्रसारित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी या विषयावर झालेल्या सहविचार सभेत जिल्हाधिकाऱ्यांनी चाइल्ड हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक आणि इतर माहिती शाळांच्या दर्शनी भिंतीसह स्कूल बसेसवर प्रसारित करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही शिक्षण विभागाने दिला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीची खातरजमा करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून शाळांना भेटी दिल्या जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शालार्थ’बाबत शिक्षकांना दिलासा

$
0
0

आयडी मंजुरीचे अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शालार्थ प्रणालीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेले विशेष कृती दल संपुष्टात आणून शालार्थ आयडीचे प्रस्ताव मंजुरीचे अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावर देण्यास राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने बुधवारी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नाशिक विभागासह राज्यातील हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून शालार्थ आयडीची पुणे वारीतून मुक्तता झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील हजारो शिक्षकांचा शालार्थ आयडी मिळविण्यासाठी संघर्ष सुरू होता. नाशिक विभागातील सुमारे ७५० माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडीचे प्रस्ताव पुणे येथे शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालकांच्या कार्यालयात धूळ खात पडलेले होते. गेल्या दीड वर्षांपासून नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचा शालार्थ आयडी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू होता. शिक्षण आयुक्तांच्या मंजूरीनंतर हा प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे क्रमांक मिळण्यासाठी पाठवला जात होता. या वेळखाऊ प्रक्रियेमुळे विभागातील शेकडो शिक्षकांची नावे शालार्थ आयडी अभावी शालार्थ प्रणालीत समाविष्ट होऊ शकलेली नव्हती.

नवीन शासन निर्णयानुसार आता शालार्थ आयडी प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावर मंजूर केला जाणार असून त्यानंतर हा प्रस्ताव त्या त्या विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडे शालार्थ आयडी क्रमांक प्राप्त करणे व शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षकांचे नाव समाविष्ट करण्यासाठी पाठविला जाणार आहे. या निर्णयामुळे ज्या शिक्षकांचे शालार्थ आयडीचे प्रस्ताव गेल्या काही वर्षापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत होते अशा शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

---

घोळ वाढण्याची शक्यता

शालार्थ आयडी प्रस्ताव मंजुरीचे अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालकांना राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नुकतेच दिले असले तरी शालार्थ प्रणालीत शिक्षकांचे नाव समाविष्ट करण्याचे अधिकार मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष यांना दिलेले आहे. त्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी प्रस्ताव मंजूर केला तरी संबंधित शिक्षकाचे नाव शालार्थ प्रणालीत समाविष्ट होईलच याची खात्री देता येणार नाही. यासाठी शिक्षकांना पुन्हा विभागीय शिक्षण मंडळांच्या अध्यक्षांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ येणार आहे.

---

शालार्थ आयडी प्रस्ताव मंजुरीचे अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालकांना देण्याचा राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नुकताच निर्णय घेतला आहे. नाशिक विभागातील सुमारे दीडशे शिक्षकांचे शालार्थ आयडी प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयात दाखल आहेत. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन सोमवारपासून या शासन निर्णयानुसार शालार्थ आयडी प्रस्ताव मंजुरीबाबतची कार्यवाही सुरू केली जाईल.

- नितीन बच्छाव, विभागीय शिक्षण उपसंचालक, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चव्हाणांचा पत्ता कट?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार शुक्रवारी भाजपमध्ये मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये १२.३० वाजता प्रवेश करणार आहेत. स्वर्गीय माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा असल्यामुळे त्यांच्या प्रवेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट करुन डॉ. पवार यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन भाजपने दिल्याचे बोलले जात आहे.

विखे-पाटील, मोहिते-पाटील या मोठ्या राजकीय घराण्यांनी भाजपचे कमळ हातात घेतल्यानंतर नाशिकमध्ये आदिवासी भागातील पवार घराण्यातील स्नुषाचा प्रवेश त्यामुळे चर्चेत आला आहे. स्वर्गीय ए. टी. पवार यांनी आठ वेळा आमदार तर चार वेळा मंत्रीपद भूषविले आहे. त्यामुळे त्यांच्या स्नुषाचा प्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. २०१४ मध्ये त्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. यावेळेस त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, असे बोलले जात होते. पण, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेतून आलेले माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी दिल्यामुळे भारती पवार नाराज होत्या. त्यांनी गेल्या आठ दिवसात भाजप बरोबर दोन ते तीन वेळा चर्चा केली. पण, उमेदवारी देत असाल तर प्रवेश करेल, असे त्यांनी सांगितल्यामुळे त्यांचा प्रवेशही लांबणीवर पडला. आता भाजपने शब्द दिल्याचे ते सांगत असले तरी भाजपने मात्र आपले पत्ते अद्यापही उघड केले नाही.

चव्हाण यांचे समर्थक संतप्त

भाजपचे विद्यमान खासदार चव्हाण यांनी या मतदार संघातून सलग तीन वेळा लोकसभेची निवडणूक जिंकत हॅट्रिक केली आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारणे भाजपसाठी घातक ठरणार असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहे. पवारांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

तीन वेळा हत्या होईल!

डॉ. पवार यांना भाजपने उमेदवारी दिल्यास दिंडोरी मतदार संघात तीन हत्या होतील, असे देवळाचे उदयकुमार आहेर यांनी सोशल मीडियातून प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, स्वर्गीय ए. टी. पवार यांनी १९९५ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर १९९९ मध्ये ते परत शरद पवारांसोबत गेले. आता भाजपने त्यांच्या स्नुषा डॉ. पवार यांना उमेदवारी दिल्यास तीन हत्या होतील. त्यात एक भाजपच्या जागेची, दुसरी भारती पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची आणि पक्षनिष्ठ असलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांच्या निष्ठेची.

चव्हाणांना राज्यात संधी?

कळवण : डॉ. भारती पवार यांना भाजपने उमेदवारी दिल्यास विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची अडचण होणार आहे. चव्हाण यांची उमेदवारी कापली गेली तर त्यांना आगामी काळात राज्यात सक्रिय करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. राज्यात आदिवासी समाजात भाजपाकडे सक्षम नेतृत्व नसल्याने तसेच मंत्री म्हणून विष्णू सावरा यांची अपेक्षित कामगिरी नसल्याने हरिश्चंद्र चव्हाण यांना विधानसभेवर पाठवून आदिवासी विकास मंत्री बनविले जाईल, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आप’चे अजूनही तळ्यातमळ्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपआपली भूमिका स्पष्ट करीत त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या गर्दीत आम आदमी पक्षाची भूमिका अजूनही तळ्यातमळ्यात आहे. आपच्या युवा आघाडीने नुकत्याच घेतलेल्या बैठकीत युवाअध्यक्ष योगेश कापसे यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला असला तरी राज्य पातळीवर निवडणुकीबाबत हालचाली होताना दिसत नाही.

देशात लोकसभेचा बिगुल वाजलेला असून, नाशिकमध्ये विविध पक्ष निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. २०११ मध्ये आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आलेल्या आम आदमी पक्षाने २०१४ प्रमाणे याहीवेळी नाशिक लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याचे दिसते. २०१४ मध्ये पक्षाच्या हाती मोठी निराशा लागली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी उमेदवाराचा शोध चालू आहे. पक्षाच्या युवा आघाडीने युवाध्यक्ष योगेश कापसे यांच्या नावाचा प्रस्ताव नुकताच मंजूर केला. त्यांना संधी द्यावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केली. यावेळी युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील घिया, प्रवक्ता अभिजीत गोसावी, महेंद्र मगर, अल्बाशी शेख, कुंतल कापडणीस, अॅड. भूषण टाटीया, अभिजीत चव्हाण, एकनाथ सावळे, सुमीत शर्मा, तेजस सोनार, फैजान शेख आदी उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना पक्षाचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे म्हणाले,'उमेदवारी निश्चिती, निवडणूक लढणे याबाबत वरिष्ठ पातळीवरून आदेश येतील, त्याप्रमाणे कार्यवाही होईल. सध्या सर्वच बाबी तळ्यातमळ्यात असून, हळूहळू सर्व स्पष्ट होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभेसाठी ‘माकप’चीशेतातच ठरणार व्यूहरचना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी लोकसभा मतदार संघात मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे उमेदवार आमदार जीवा पांडू गावित यांनी २४ मार्च रोजी मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक वणी येथे बोलावली आहे. श्रीराम पवार यांच्या मळ्यात होणाऱ्या या बैठकीत निवडणुकीची व्यूहरचना आखली जाणार आहे. आतापर्यंत राजकीय पक्षांच्या बैठका हा कार्यालयात किंवा सभागृहात घेतल्या जात असतांना माकपने मातीची नाळ पकडत आपली बैठक शेतात ठेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

दिंडोरी लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने धनराज महाले यांची उमेदवारी अगोदरच जाहीर केली आहे. त्यानंतर माकपने आमदार गावित यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे भाजप विरोधी मतातच या दोन्ही उमेदवारीमुळे विभागणी होणार आहे. भाजपने या निवडणुकीसाठी अद्यापही उमेदवार घोषीत केला नाही. वंचित बहुजन विकास आघाडीनेही या मतदार संघात उमेदवार उभे केले आहे. त्यामुळे ही निवडणूक चौरंगी होणार आहे.

आमदार जीवा पांडू गावित हे कळवण विधानसभा मतदार संघाचे आमदार आहे. त्यांनी मतदार संघात विविध विकास कामे करण्याबरोबरच राज्यभर किसान सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्नासाठी आंदोलन केले. त्यांचा लाँग मार्च देशभर गाजला. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी निफाड व येवला तालुक्यांच्या दौरा केला होता. पण, २४ मार्चला बैठक झाल्यानंतर संपूर्ण मतदार संघाचा ते दौरा करणार आहे.

दरम्यान, निवडणुकीसाठी लागणारे प्रचार साहित्य तयार करण्याची माकपच्या कार्यालयात जमवाजमव सुरू झाली आहे. लाल बावटा, फ्लेक्स बोर्डे याबरोबरच पत्रक छापण्याचे कामही येत्या काही दिवसात सुरू केले जाणार आहे.

दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी २४ मार्चला वणी येथे बैठक होणार आहे. त्यात मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये निवडणुकीची व्यूहरचना आखून प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे.

- सुनील मालसुरे, माकप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडांगळीकर घेताय जावयाचा शोध!

$
0
0

गाढवावरून धिंड काढण्यासाठी ग्रामस्थ सज्ज

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील वडांगळी गावची शिमगा (होळी) पारंपरिक अनोख्या पद्धतीने साजरी करण्याची पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आजही टिकवून ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी तयारी दर्शवित आहे. जावयाची गाढवावरून धिंड काढण्यासाठी तरुण वर्ग जावयाच्या शोधासाठी कामाला लागला आहेत. कोण जावई मिळणार? याकडे गावासह परिसराचे लक्ष लागून आहे. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीत याची चर्चा सुरू झाली आहे. आजूबाजूच्या गावात असलेले वडांगळीचे जावई मात्र आपली निवड टाळण्यासाठी पसार झाले आहेत. शेकडो वर्षांपासून चालत आलेली जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची अनोखी परंपरा आजही वडांगळीकर जोपासत आहेत.

जावयाची धिंड ही अनोखी परंपरा अनेक वर्षांपासून चालत आल्याचे ज्येष्ठ सांगतात. कुठलाही जावई सहजासहजी या गोष्टीला तयार होत नाही. परंतु 'गाव करील ते राव करील काय' या म्हणीप्रमाणे चांगल्या चांगल्यांची हौस आजपर्यंत झाली आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्याचीदेखील यासाठी स्वत:हून आपला सहभाग घेतला आहे.

धुलीवंदन ते रंगपंचमी या पाच दिवसाच्या कालावधीत जो जावई सापडेल त्यास पकडून गाढवावर बसविले जाते. त्यामुळे स्थानिक रहिवासी व आसपासच्या खेड्यात असलेले जावई होळी सण झाला की लगेच पसार होतात. यासाठी माजी ग्रा. पं. सदस्य दीपक खुळे, वाळू खुळे, ज्ञानेश्‍वर खुळे, मुन्ना शेख, रामनाथ कांदळकर, सचिन खुळे, पोपट सैद, रमेश खुळे, शरद खुळे, सतीमाता देवस्थानचे विश्‍वस्त अशोक खुळे, शरद खुळे आदींसह ग्रामस्थांनी उत्साहात तयारीला लागले आहे.

अशी निघते धिंड

तुटक्या सुपाचे बाशिंग, कांदा लसूण यांच्या मंडवळ्या, तुटक्या चपलांचा गळ्यात हार, फाटलेले कपडे अशा वेशभूषेमध्ये अंगावर विविध प्रकारची रंगाची उधळण करीत गाढवावर बसून जावईबापूंची ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते. सासऱ्याच्या दारापुढे पाटावर गरम पाण्याने सुगंधी उटणे व साबण लावून पाच सुवासिनी लग्नाचे गाणे म्हणत जावयाला अंघोळ घालतात. नवीन कपडे देऊन सन्मान केला जातो.

गाढव भाडेतत्वावर

गावातील कै. शिवाजी गोरे (कुंभार) यांची हरणी नावाची गाढव मयत झाल्यापासून गेल्या सात वर्षांपासून गाढव उपलब्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पिंपळगाव बसवंत, सायखेडा, लासलगाव या ठिकाणाहून सुमारे दोन ते तीन हजार रुपये देऊन भाडेतत्त्वावर गाढव आणावे लागते. जावई परवडला पण गाढव नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. सध्या जावयासाठी तरुण ग्रामस्थांनी छुप्या पद्धतीने शोध सुरू केला आहे. त्यामुळे कोणाला या धिंडीचा मान मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरी हितासाठी बनविला ‘किसान जिंदा प्लॅन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना विविध समस्यांच्या दृष्टचक्रातून बाहेर काढणारा आणि त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारा 'किसान जिंदा प्लॅन' चांदवड तालुक्यातील देवरगाव येथील तरुण शेतकऱ्याने बनविला आहे. राज्यातील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह केंद्रीय कृषीमंत्र्यांपर्यंत हा प्लॅन पोहोचविण्यात आला असून, त्याच्या अंमलबजावणीबाबत सकारात्मकताही दर्शविण्यात आल्याची माहिती या तरुणाने पत्रकार परिषदेत दिली. सरकारने या प्लॅनची अंमलबजावणी करावी याकरीता शेतकऱ्यांचा संघटीत पाठपुरावा हवा असल्याची अपेक्षा या तरूणाने व्यक्त केली आहे.

देवरगाव येथील शेतकरी विनायक शिंदे यांनी गेली पाच वर्ष राज्यभरातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा अभ्यास केला. दुष्काळ, अतिवृष्टी, पिकावरील रोगराई, कर्जबाजारीपणा अशा विविध कारणांमुळे आत्महत्येचा निर्णय घेतो. अशा समस्यांच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शिंदे यांनी 'किसान जिंदा प्लॅन' तयार केला आहे. पत्रकार परिषदेला राजू देसले, निरंजन चतुर, के. बी. शिंदे, उत्तम ठोंबरे, समाधान जमदाडे आदी उपस्थित होते.

असा आहे प्लॅन

हा प्लॅन एटीएम कार्डसारखा आहे

शेती भांडवल शेतकऱ्यांना मिळतील

कर्ज वितरणाची पद्धती बदलता येणार

पिकांची नोंद व अपडेट्स असतील

बियाणे, खते, औषधे पुरविता येतील

कर्जाची वसुली माल विकताच होईल

तसेच काही रक्कम राखीव राहील

-

लाख रुपयांचे क्रेडीट द्यावे

शेतकऱ्यांच्या हातात कर्जाच्या किंवा उत्पादन विक्रीच्या माध्यमातून पैसा आला की तो अनावश्यक गोष्टींवर खर्च होतो. सरकारने किसान जिंदा प्लॅन नावाचे एटीएम कार्ड सुरू करून त्यामध्ये किमान एक लाख रुपयांपर्यंतचे क्रेडीट द्यावे. शेतकऱ्याने शेतीशी व कुटुंबाशी संबंधित दैनंदिन गरजा हे कार्ड स्वॅप करून भागवाव्यात. कार्डामध्ये प्रत्येक वस्तुच्या खरेदीसाठी विशिष्ट रक्कम निश्चित करून द्यावी व झालेला खर्च नंतर शेतमाल विक्रीतून मिळालेल्या पैशातून जमा करून घ्यावा अशी ही योजना असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट चलनाची नाशिकला तपासणी

$
0
0

देशभरात फक्त आयएसपी प्रेसमध्येच सुविधा

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

देशभरात कुठेही बनावट चलनी नोटा आढळून आल्यास त्याची खात्री करण्यासाठी नाशिकरोड येथील आयएसपी प्रेसमधील प्रयोगशाळेतच आणले जात असल्याने या प्रयोगशाळेमुळे नाशिकची देशभरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. संशयास्पद बनावट चलनाची तपासणी करण्याची सुविधा फक्त नाशिकच्या आयएसपी प्रेसमध्येच उपलब्ध आहे.

मुंबईत जोगेश्वरी येथे एका टीव्ही मालिकेच्या स्क्रिप्ट रायटरकडे बनावट भारतीय चलन आढळून आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या चलनाची खात्री करण्यासाठी नाशिकच्या आयएसपी प्रेसमध्ये तपासणीसाठी आणण्यात आले. देशभरात कुठेही बनावट भारतीय चलन सापडल्यास त्याची पडताळणी करण्याची प्रयोगशाळा देशात फक्त नाशिकरोड येथील आयएसपी प्रेस येथेच आहे. या प्रेसमधील प्रयोगशाळेत या संशयास्पद चलनाची तपासणी होऊन ते बनावट आहे की नाही याची खात्री केली जाते व तसा अहवाल संबंधित यंत्रणांना पाठविला जातो. त्यानंतर संशयित आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होतो.

...

सिक्युरिटी फिचर्सची होते पडताळणी

बनावट भारतीय चलनाचा साठा जप्त केल्यानंतर हे चलन आयएसपी प्रेसमध्ये तपासणीसाठी आल्यावर खऱ्या चलनात वापरले जाणाऱ्या सर्व सिक्युरिटी फिचर्सची पडताळणी केली जाते. त्यातील केवळ एखाद दुसरे सिक्युरिटी फिचर्स बनावट चलनात आढळून येते. अशी सुमारे दहा सिक्युरिटी फिचर्स असतात. ही सर्व सिक्युरिटी फिचर्स बनावट चलनात कॉपी करणे अशक्य असते. त्यामुळे बनावट चलनाचा ताबडतोब उलगडा होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात दिवसभरात चार ठिकाणी आग

$
0
0

म. टा. वृतसेवा, मालेगाव

गुरुवारी शहरातील वेगवेगळ्या भागात आगीच्या चार घटना घडल्या. यात चंदनपुरी गेट परिसरातील घरास लागलल्या आगीने भीषण रुप धारण केले असते. मात्र अग्निशमन दलाच्या पथकाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टाळला. अन्य घटनांमध्ये गुरुवारवार्ड भागात एका घरास आग लागली होती. तर म्हाळदे शिवारातील कचरा डेपो व संगमेश्वरात मोकळ्या जागी असलेल्या कचऱ्यास आग लागली होती.

चंदनपुरी गेट परिसरात रसूलपुरा मशीदशेजारी असलेल्या वस्तीत एका दांडा पटाईच्या दुमजली घरास दुपारी दोन वाजता आग लागली. उन्हाचा तडाखा वाढलेला असल्याने आणि लाकूड पत्र्याची घरे असल्याने लगेचच या आगीच्या कचाट्यात शेजारची दोन घरे देखील सापडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन अधीक्षक संजय पवार, रवींद्र शेजवळ, मधुकर बच्छाव, विकास बोरगे, चालक शेख वासिफ आदींसह तीन बंब घेवून घटनास्थळी दाखल झाले. यावेळी स्थानिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

मोठा अनर्थ टळला

अग्निशामक दलाने घरांमध्ये असलेले गस सिलिंडर लवकर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टाळला. तासाभरात आग विझवण्यात यश आले. या आगीत शहीद हुसेन, जमील अहमद व तारेख अन्वर या तिघांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू, धान्य आदी जळून खाक झाले. आगीचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कचरा डेपोस आग

ह शहरात अन्य तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. यात गुरुवारवार्ड परिसरातील खादीम ताहेर यांच्या घराला सकाळी आग लागली होती. यात जीवितहानी झालेली नसली तरी घरातील फर्निचर, वायर्स जाळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली. दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरालगत असलेल्या कचरा डेपोस देखील आग लागली. तर संगमेश्वर भागात सावतानगर येथे मोकळ्या जागेत असलेल्या कचऱ्यासही आग लागली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता शिवसेनेत ‘इनकमिंग’

$
0
0

म. टा.खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने गळाला लावल्यानंतर तेथे शिवसेनेत तयार झालेली पोकळी आता राष्ट्रवादीचेच माजी आमदार आणि सध्याचे काँग्रेसचे बंडखोर रामदास चारोस्कर यांच्या रुपाने भरून निघणार आहे. चारोस्कर यांनी आपल्या समर्थकांसह गुरुवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे समजते. पुढील आठवड्यात ते अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तसे घडल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी हा झटकाच असेल.

धनराज महाले यांचा प्रवेश घडवून राष्ट्रवादीने त्यांना दिंडोरीतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेसाठी हा झटकाच होता. धनराज महाले हे जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेतेही होते. त्यामुळे स्थानिक पात‌ळीवर शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली होती. दिंडोरी लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार असला तरी शिवसेनेने मात्र विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून रामदास चारोस्कर यांना या पक्षाने गळाला लावले आहे. चारोस्कर यांची दिंडोरीत चांगली ताकद असून, त्यांच्या पत्नी संगीता चारोस्कर या जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या कोट्यातून समाजकल्याण सभापती आहेत. चारोस्कर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु, जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमध्येही बंडखोरी केली. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी मध्यतंरी भाजपशीही घरोबा केला होता. परंतु, युतीच्या जागावाटपानुसार दिंडोरी विधानसभेची जागा शिवसेनेकडे असल्याने आणि धनराज महाले यांनी पक्ष सोडल्याने त्यांनी शिवसेनेत जाण्याची तयारी चालवली आहे. गुरुवारी चारोस्कर यांनी त्यांच्या निवडक समर्थकांसह 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत, शिवसेनेचे संपर्कप्रमुख उपस्थित होते. चारोस्कर यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले असून, ते पुढील आठवड्यात अधिकृतरित्या शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चारोस्कर यांना दिंडोरीतून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेने दर्शवली आहे. त्यामुळे महाले यांच्या रुपाने शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी आता चारोस्करांच्या रुपाने भरून निघणार आहे.

दिंडोरी विधानसभा निवडणूक लढवावी, असा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. उमेदवारीसाठी शिवसेना माझ्या संपर्कात आहे. परंतु, अद्याप प्रवेशाबाबत अंतिम चर्चा झालेली नाही.

- रामदास चारोस्कर, माजी आमदार, दिंडोरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चकोर गांधींचे शनिवारी व्याख्यान

$
0
0

नाशिक : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या नाशिक शाखेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार, २३ मार्च रोजी रामवाडी येथील धनदाई लॉन्स येथे सायंकाळी ६ वाजता आंतरराष्ट्रीय व्यावसायिक मार्गदर्शक चकोर गांधी यांचे 'सावधान धंदा बदलतो आहे' या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व प्रमुख पाहुणे म्हणून दिवाण हौसिंग फायनान्सचे संचालक राजेंद्र मेहता हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास मोठ्या संख्येने व्यापारी-उद्योजक व नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, कार्यक्रमाच्या समन्वयिका सुनीता फाल्गुने, सचिव चंद्रकांत दीक्षित, सचिव विनी दत्ता व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images