Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पाण्यासाठी कलेक्टरांच्या वाहनाला वेढा

$
0
0

सटाण्यातील महिला रडकुंडीस; पालिका प्रशासनावर नाराजी

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

पुनद योजनेला कळवणकरांकडून होणारा विरोध, गेल्या महिनाभरापासून पाणी नसल्यामुळे शहरवासियांची होणारी होरपळ यामुळे सटाणा शहरात पाणीसंकट कोसळले आहे. त्यातच मंगळवारी निवडणूक कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे आले असताना शहरातील महिलांनी त्यांच्या वाहनालाच घेराव घातला. पाणीटंचाईबाबत आढावा घेवून तातडीने तोडगो काढण्याचे आश्वासन मांढरे यांनी दिल्यानंतर महिलांची त्यांची वाट सोडली.

सटाणा शहरातील नळांना गेल्या ३० दिवसांपासून थेंबभरही पाणी नाही. परिणामी नागरिकांसह महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. शहराचा पाणीप्रश्न युद्ध पातळीवर सोडविण्यासाठी उपाययोजना कयम पुनद धरणाचीच पाइपलाइन करून द्यावी व शहरवासियांना पाणी टंचाईपासून मुक्त करावे यासाठी शहरातील महिलांनी सुरज मांढरे यांचे वाहन अडवून त्यांना निवेदन दिले.

सटाणा शहरात पिण्याच्या पाण्यासह वापराचे पाणीच मिळत नसल्याने महिलांना भटकंती करावी लागत आहे. पालिका प्रशासनाने दोन दिवसांपासून सुरू केलेले दहा टँकर केवळ २०० लिटर पाणी एका घराला देतात. त्याद्वारेही १२ दिवसात एकदाच पाणी मिळणार आहे. अशा परिस्थितीत दिवस कसे काढावेत, असा प्रश्न महिलांना पडला आहे. त्यामुळे शहरातील महिलांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे वाहन तहसील कार्यालयात अडवून त्यांच्याशी भेट घेवून चर्चा केली.

महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. पालिका प्रशासनाकडून समर्पक उत्तरे देणारी पदाधिकारी हजर नसतात. परिणामी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. उन्हाळ्याचे अद्याप चार बाकी आहेत. त्यामुळे लवकर पाणीपुरवठा न झाल्यास नागरिकांचे विलक्षण हाल होणार आहेत. विकत घेतलेले पाणी प्रचंड महाग आहे. पाण्याअभावी साथीचे रोग हात आहेत. लांबून पाणी आणल्यामुळे महिलांना कंबर, पाठ व मानदुखीचे त्रास होत आहेत.

तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी मांढरे यांनी प्रातांधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार जितेंद्र इंगळे, सनपा मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रातांधिकारी महाजन यांनी शहरातील विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. येत्या आठ दिवसांत पाणी प्रश्‍न मार्गी लावू असे अभिवचन दिले. यावेळी अ‍ॅड. सरोज चंद्रात्रे, अ‍ॅड. स्मीता चिंधडे, अ‍ॅड. सुजाता पाठक, भारती अंधारे, रूपाली पंडीत, शितल जाधव, माजी नगरसेविका सिंधूबाई सोनवणे, अपेक्षा चव्हाण, कल्पना भामरे, अलका पिसोळकर, बेबीताई गुंजाळ, अनिता भमारे, संगिता सोनी, माधुरी जोशी, नंदीनी जोशी, वत्सला जाधव, आशा पंडीत आदींसह महिलाचा समावेश होता.

पालिका प्रशासनाला पाणीपुरवठा करण्यात पूर्ण: अपयशी आले आहे. जुलै महिन्यापर्यंत पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असून जिल्हाधिकारी गावात येवूनही नगराध्यक्ष, नगरसेवकांनी त्यांची साधी भेट घेवून चर्चा करू नये यापेक्षा अधिक दुर्देव काय असू शकते.

-अ‍ॅड. सरोज चंद्रात्रे, सटाणा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करवाढीचा वाढला पेच

$
0
0

आर्थिक वर्ष संपण्याआधी निर्णय न झाल्याने गोंधळ

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अवाजवी घरपट्टी वाढीसंदर्भातील याचिकेवर मार्चच्या आत निर्णय होण्याची शक्यता मावळली आहे. उच्च न्यायालयात करवाढीबाबतच्या याचिकेवर आता ११ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या आत निर्णय न झाल्याने ५९ हजार मिळकतींवरील करवाढीबाबतची टांगती तलवार कायम आहे. यामुळे महापालिकेला या आर्थिक वर्षात करवसुलीवर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे याचा थेट फटका घरपट्टीच्या उद्दिष्टाला बसला असून, मार्चच्या आत करवाढीचा सोक्षमोक्ष न लागल्याने पेच कायम आहे.

महासभेने जुन्या मिळकतींना १८ टक्के, तर सर्वेक्षणात आढळलेल्या नवीन मिळकतींना ४० टक्के असा ठराव करीत करवाढीला मंजुरी दिली होती. असे असतानाही तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंनी महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी महासभेला डावलत परस्पर आपल्या अधिकारात १ एप्रिल २०१८ रोजी आदेश क्र. ५२२ काढत नाशिककरांवर भरमसाट करसंकट लादले होते. या करवाढीविरोथात गेल्या अकरा महिन्यांपासून वाद सुरू आहे. नूतन आयुक्त राधाकृषण गमे यांनाही दिलासा न दिल्याने अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच माजी महापौर अशोक मुर्तडक, काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, अपक्ष नगरसेवक गुरुमीत बग्गा यांनीही एकत्रितपणे अॅड संदीप शिंदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. आदेश क्र. ५२२ रद्द करा, महासभेचा आदेश क्र. ५० वैध ठरविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. न्या. रंजित मोरे यांच्या पीठाने ही याचिका दाखल करून घेत त्यावर आता तारीख पे तारीख सुरू आहे. करवाढीच्या वादाचा फैसला मार्च महिन्याच्या आत होणे पालिकेसह याचिकाकर्त्यांना अपेक्षित होते. परंतु, उच्च न्यायालयाने आता करवाढीबाबतच्या याचिकेवर सुनावणीसाठी ११ एप्रिलची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे करवाढीचा घोळ आणखी चिघळला असून, आर्थिक वर्ष संपण्याच्या आत निर्णय न झाल्याने पालिकेसमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे.

...

करवसुली रोडावणार

महापालिकेने मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या ५९ हजार मिळकतींना करयोग्य मूल्यदरवाढीचा मोठा फटका बसला होता. या आदेशाच्या आधारेच या मिळकतींना पालिकेने वसुलीच्या नोटिसा पाठवत घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट २५३ कोटींवर नेले होते. परंतु, मुंढेंनी ५० टक्के करवाढ मागे घेण्याची केलेली घोषणा आणि पाठोपाठ मार्चच्या आत न्यायालयातही त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने करवाढीचे उद्दिष्टही रोडावणार आहे. नूतन आयुक्तांनी १४३ कोटींचे करवाढीचे उद्दिष्ट ठेवले असले तरी न्यायालयीन लढाईत आता या उद्दिष्टापर्यंत पोहचणेही अशक्य झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उपमुखम्’ची निवड

$
0
0

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभाग

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या हरहुन्नरी कलाकारांचा आविष्कार असलेल्या 'उपमुखम्' या शॉर्टफिल्मची सुप्रसिद्ध अशा 'ग्लोबल इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'साठी निवड झाली आहे. 'उपमुखम'ला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवडीचा तिसऱ्यांदा मान मिळत आहे. मनुष्य स्वभावाचे अंतर्गत कंगोरे मुखवटे आणि व्यवस्था या अंगाने मांडणाऱ्या या शॉर्टफिल्मची संकल्पना, कथा, पटकथा आणि दिग्दर्शन जयेश आपटे यांचे आहे.

नाशिक जिल्ह्यातील बोहाडे आणि त्यातील मुखवटे ही कलाकारांच्या प्रांतातील अप्रूप असलेली गोष्ट या शॉर्टफिल्मद्वारे सार्थपणे मांडलेली आहे. याचे गीतकार गोविंद नाईक, पार्श्वसंगीत अमित पाध्ये, ध्वनी सदानंद जोशी, कलासंयोजन नीलेश गायधनी आणि पूजा गायधनी, प्रकाशचित्रण श्रुती आणि प्रणव कवी, कलादिग्दर्शन सार्थक कुर्डुकर, निर्मिती मृणाल आपटे, निर्मिती प्रमुख आदित्य राहाणे, ध्वनी संयोजन शुभम जोशी, ध्वनिमुद्रण विपुल पाठक आणि सुमंत वैद्य यांनी केले आहे. फिल्ममध्ये कलाकार तेजस राहाणे यांनी प्रकाशचित्रकाराची भूमिका केली आहे.

...

सांस्कृतिक वर्तुळातून कौतुक

या शॉर्टफिल्मसाठी अभिव्यक्ती, राजा पाटेकर, विजय धारणे आणि विनय काशीकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या फिल्मचा चमू हा नाशिकमधील 'अक्षरबाग वाचन कट्टा', 'आयाम'सारख्या सांस्कृतिक चळवळींशी संलग्न आहे. नाशिककरांचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळे हा टप्पा गाठता आला, असे जयेश आपटे यांनी सांगितले. या निवडीबद्दल सांस्कृतिक वर्तुळातून उपमुखमचे कौतुक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी सदस्य नियुक्तीच्या हालचाली

$
0
0

\Bविशेष सभेसाठी \Bनगरसचिवांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्थायी समितीवरील सदस्य संख्या निश्चितीकरणाचा अधिकार महासभेचा असल्याबाबतचा निर्णय विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिल्यानंतर महापालिकेच्या नगरसचिव विभागाने स्थायी समिती सदस्य निवडीसाठी सभा बोलविण्याची तयारी सुरू केली आहे.

नगरसचिव विभागाने तातडीने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून एक सदस्य नियुक्‍तीसाठी सभा घेण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. सोबत महिला व बालकल्याण समिती, विधी, शहर सुधार व वैद्यकीय समितीची मुदत मार्चला संपत असल्याने या चार समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी देखील परवानगी मागितली आहे.

महापालिकेत भाजप नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे भाजपचे महापालिकेतील संख्याबळ हे एकने कमी झाले आहे.त्यामुळे स्थायी समितीवर सदस्यत्वाचे भाजपचे गुणोत्तर प्रमाणही घटले असल्याचे सांगत शिवसेनेने आपले संख्याबळ वाढविण्यासाठी विभागीय आयुक्तांसह उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेनेने आपले संख्याबळ चार वरून पाच करावे आणि भाजपचे नऊ वरून आठ करावे, अशी मागणी केली होती. न्यायालयाने विभागिय आयुक्तांकडे या निर्णयाचा चेंढू टोलवला होता. विभागीय आयुक्तांनी महासभेच्या बाजूने कौल देत, संख्याबळ ठरवण्याचा अधिकार महासभेलाच असल्याचा निर्वाळा देत, शिवसेनेची कोंडी केली होती. या निर्णयाने आता भाजपला फायदा होणार असल्याने त्याची संधी घेण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.

तर पुढील आठवड्यात नियुक्ती?

महासभेवर निर्णय घ्यायचा असल्याने नगरसचिव विभागाने तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करत स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांवर सदस्य नियुक्तीची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने मान्यता दिल्यास पुढील आठवड्यात सदस्य नियुक्ती होऊन आचारसंहितेनंतर सभापती, उपसभापती पदाची निवडणूक जाहीर होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होप फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी जहीर शेख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हेल्पिंग ऑपरेस्ड पीपल फॉर एज्युकेशन फाउंडेशन (होप फाउंडेशन) च्या नवीन कार्यकारणीची रियाज शेख यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. यात फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी जहीर शेख यांना संधी देण्यात आली आहे.

कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी जेष्ठ छायाचित्रकार मोबीन पठाण, सचिवपदी युथ नॅशनल कालेजचे उप प्राचार्य डॉ. प्रा. नूर-ए-ईलाही शाह, सह सचिवपदी पत्रकार मोहम्मद ईस्हाक कुरेशी, खजिनदारपदी सामाजिक कार्यकर्ते रियाज शेख तर सदस्यपदी अॅड. मजहर शेख, व्यावसायिक खुर्रम बेग यांची एकमताने निवड करण्यात आली.

होप फाऊंडेशनचे मावळते अध्यक्ष रियाज शेख यांच्याकडून नूतन अध्यक्ष जहीर शेख यांनी तर ईस्हाक कुरेशी यांच्याकडून नूतन सचिव डॉ. प्रा. नूर-ए-ईलाही शाह यांनी पदभार स्वीकारला़ यावेळी होप फाऊंडेशनच्या विशेष सदस्य म्हणून मोहसीन खान, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दिलशाद बेग, प्रॉपर्टी एक्स्पोचे संचालक लबिब मुल्ला, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जस्मिन बेग, मुख्याध्यापिका शिरीन सय्यद, पॅथॉलॉजिस्ट शाहिस्ता काझी, अॅड. आसिम शेख यांची निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरे गल्लीतील ‘रेड लाइट’वर फुली

$
0
0

ठाकरे गल्लीतील 'रेड लाइट'वर फुली

जागा भाडेकरारावर देताना कोर्टाची मंजुरी आवश्यक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भद्रकाली परिसरातील पिंपळचौक, ठाकरे रोड या वर्दळीच्या भागातील अनैतिक देह व्यापार बंद करण्याबाबत जिल्हा कोर्टाने आदेश दिले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. याच याचिकेचा आधार घेत मुख्य न्याय दंडाधिकारी एस. के. दुगावकर यांनी हे आदेश दिले. यासाठी २० मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली असून, भद्रकालीवासीयांचे लक्ष आता पोलिसांच्या कारवाईकडे लागले आहे.

स्थानिक नागरिकांच्यावतीने कमलेश परदेशी यांनी गत वर्षी हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. संदर्भ रुग्णालयाच्या पाठीमागील भागात घर क्रमांक ११३ येथे अनेक वर्षापासून अनैतिक देहव्यापार सुरू आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करण्यात येतात. पोलिस अधूनमधून कारवाई करतात. मात्र, या व्यवसायाचे समूळ उच्चाटन झालेले नाही. या प्रकारामुळे परिसरातील दुकानदार आणि रहिवाशांना येथे येणाऱ्या ग्राहकांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागते. मद्यधुंद अवस्थेतील पुरूषांमध्ये हाणामाऱ्या होतात. बऱ्याचदा सराईत गुन्हेगारांचाही येथे वावर असतो. अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १८ नुसार पोलिसांनी भरवस्तीतील आणि मुख्य बाजारपेठेतील हा व्यवसाय त्वरित बंद करावा, अशी विनंती याचिकाकर्त्याने कोर्टाकडे केली होती. गत डिसेंबर महिन्यात कोर्टाकडे करण्यात आलेल्या या याचिकेबाबत नुकतीच सुनावणी झाली. न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्यासमोर याचिकाकर्त्यांच्यावतीने अॅड. हर्षद पालवे आणि रामनारायण कंलत्री यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षातर्फे अॅड. दीपक ठाकरे, अॅड. एस. डी. शिंदे यांनी काम पाहिले. याचिकाकर्त्याने वेश्या व्यवसायासह गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला असून, त्यादृष्टीने पुरेसे पुरावे देण्यात आलेले नाही. पोलिसांनी मात्र वेळोवेळी या प्रकरणी समोर आलेल्या तक्रारींची दखल घेतल्याचे दिसते, असे खंडपीठाने स्पष्ट केले होते. या प्रकरणी संबंधितांनी योग्य ती कारवाई करावी आणि याचिकाकर्त्याने तीन आठवड्यात आणखी योग्य ते पुरावे सादर करावेत, असे आदेश खंडपीठाने दिले होते. यानंतर हे प्रकरण जिल्हा कोर्टात आले. हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार आणि भद्रकाली पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार, याचिकाकर्त्याच्या दाव्यात तथ्य असल्याचे स्पष्ट करीत ज्या जागेत हा व्यवसाय सुरू आहे, तो त्वरित बंद करण्याबाबतचे आदेश न्यायाधीश दुगावकर यांनी दिले. तसेच, ज्या जागेत अनैतिक व्यवसाय सुरू आहे, ती जागा पुढील एक वर्षासाठी भाडेकरारावर देताना जागा मालकाने जिल्हा कोर्टाची संमती घ्यावी, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. सदर जागा खाली करणे आणि त्यास सील लावणे यासाठी कोर्टाने २० मार्चपर्यंतची मुदत दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा मतदान करणार नाही!

$
0
0

बिबट्या हल्ल्यात त्रस्त परमोरी ग्रामस्थांची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील परमोरी गावात सात-आठ महिन्यांत बिबट्यांचे हल्ले वाढले असून, त्यात दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. असे असूनही वन विभाग सुन्न आहे. त्यामुळे बिबट्याच्या दहशतीखाली जीवन जगावे लागत असून, बिबटे जेरबंद न झाल्यास मतदान करणार नाही, अशी भूमिका परमोरी ग्रामस्थांनी घेतली आहे.

दिंडोरीतील परमोरी गावात १४ मार्च रोजी गायत्री गांगुर्डे या ४ वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला. त्यावेळी ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले होते. १४ मार्च रोजी बालिकेवर हल्ला होऊनही वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले नाहीत. संतप्त ग्रामस्थांची पोलिसांनी समजूत काढत वातावरण शांत केले. त्यानंतर १५ मार्च रोजी सकाळी ११ नंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना ग्रामस्थांच्या आक्रमकतेला सामोरे जावे लागले. सात महिन्यांपूर्वी गोकुळाष्टमीच्या दरम्यान बिबट्याने लहान मुलावर हल्ला केला होता. त्यात त्या बालकाचा मृत्यू झाला. परमोरीत बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालकांचा मृत्यू झाला असून, प्राण्यांवर होणारे हल्ले कायमच आहेत. तरी देखील वन विभाग ठोस भूमिका घेत नसल्याच्या संतप्त भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहेत. सध्या परमोरी गावात तीन ते चार बिबटे पिलांसह असण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तविण्यात आली असून, ऊसाच्या मळ्यात ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन होत आहे. सायंकाळी पाच वाजेनंतर गावात बिबटे फिरू लागतात, असे ग्रामस्थांनी सांगितले आहे. त्या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने सध्या ८ पिंजरे लावले आहेत. मात्र, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे बिबट्यांना पकडण्यासाठी योग्य संसाधने नाहीत. काही महिन्यांपूर्वी देखील पिंजरे लावले. मात्र, बिबट्या कैद झाला नाही. त्यामुळे मतदानापर्यंत वन विभागाला बिबट्या कैद करण्यात यश आले नाही तर, ग्रामस्थ मतदानाला जाणार नाही, अशी गंभीर भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

बिबट्याने हल्ला केल्यावर पोलिस व वन विभागाला कळविले होते. त्यावेळी पोलिस वेळेवर पोहोचले. पण, वन विभाग नेहमीप्रमाणे दिरंगाई करत होता. बिबट्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत परसली आहे. तसेच या हल्ल्यात बालकांचे जीव जात असल्याने, मतदानापर्यंत बिबट्या जेरबंद न झाल्यास, आम्ही मतदान करणार नाही.

- अनिल दिघे, ग्रामस्थ

बिबट्याच्या हल्लांमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती आहे. त्या तुलनेत वन विभागाचे प्रयत्न कमी पडतात. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप असून, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आहे. वन विभागानेही शर्तीचे प्रयत्न करुन बिबट्यांना जेरंबद करावे. जेणेकरुन ग्रामस्थांचा राग कमी होऊन, मतदान सुरळीत होईल.

- कचरू काळोगे, तंटामुक्ती अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी ग्रामीण दौऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर आता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ग्रामीण भागाचा दौरा सुरू केला आहे. चांदवड, बागलाण, देवळ्यासह मालेगाव तालुक्याला भेट देऊन त्यांनी दुष्काळी स्थितीची पाहणी मंगळवारी केली. यावेळी निवडणूक तयारीचा आढावाही घेण्यात आला.

मावळते जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडून मांढरे यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल, गृह, नियोजन यांसह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यानंतर आता मांढरे यांनी आपला मोर्चा जिल्ह्यातील ग्रामीण भागाकडे वळविला आहे. या दौऱ्याला त्यांनी मंगळवारी सुरुवात केली. लोकसभा निवडणूक आणि दुष्काळ हे दोन प्रमुख मुद्दे असल्याने निवडणूक तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात येतो आहे. तसेच यंत्रणेकडून दुष्काळी भागातील परिस्थितीची माहिती घेण्याचे कामही मांढरे यांनी सुरू केले आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची सद्यस्थिती आणि उपायोजनांचा आढावा घेताना टँकरचे प्रस्ताव अभ्यासून तातडीने मंजूर करा, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालेगाव बाह्य व मालेगाव मध्य या दोन्ही मतदारसंघांमधील तयारीचा आढावा मांढरे यांनी घेतला. निवडणुका निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी सराईतांच्या तडीपारीसह प्रतिबंधात्मक कारवायांवर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरट्यांमधून जपा चिमणीला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाढत्या शहरीकरणाचा परिणाम चिमणी या पक्ष्याच्या छोट्याशा जीवावर झाल्याचे तिच्या घटत्या संख्येवरून समोर येत असते. या पक्ष्याला जपण्यासाठी मनुष्यानेच पुढाकार घेण्याची गरज ओळखत चातक निसर्ग संवर्धन संस्थेने पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी प्रकल्प हाती घेतला आहे. टाकाऊ वस्तू, पाईप, खोके यांपासून चिमणीसाठी घरटी तयार करून तिच्या संवर्धनासाठी एक पाऊल उचलले आहे.

वृक्षतोड, वाढते शहरीकरण, काँक्रिटीकरण यांमुळे पक्ष्यांची घरटी करण्याच्या जागा नष्ट होत आहेत. निसर्ग, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक जीवाचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. या पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी त्यांना त्यांचे घरटी निर्माण करण्याचा हक्क दिलाच पाहिजे. अन्यथा, आपण घरटी तयार करून त्यांच्या निवासाची व्यवस्था करायला पाहिजे, या उद्देशाने चातक निसर्ग संवर्धन संस्थेने पुढाकार घेतला. उन्हाळ्यात सूर्याची तीव्रता अधिक असल्याने पक्ष्यांना पाण्याची तीव्र कमतरता भासते.

उष्माघाताने अनेक पक्षीही दगावतात. घरटी लावून या समस्या दूर करता येणे शक्य असल्याने संस्थेकडून टाकाऊ वस्तूंपासून सुबक घरटी बनविले जातात. फर्निचरच्या कामातून वाया गेलेल्या फळ्या, पाईपच्या मदतीने ही घरटी बनविले जातात. राज्यातील विविध शहरांमध्ये संस्था चिमणीच्या अस्तित्वासाठी विविध माध्यमातून जनजागृती करत असून शालेय विद्यार्थ्यांना जंगलाची सफर घडवत त्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वही संस्थेकडून शिकवले जात आहे. चिमणीच्या बचावासाठी प्रत्येकाने लहानमोठे पाऊल उचलले तरी चिमणी बचाव शक्य असल्याचे मत संस्था व्यक्त करते.

गेल्या दहा वर्षांपासून चिमणी दिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम राबवतो. पाईपांचे तुकडे, खोके यापासून घरट्यांची निर्मिती करतो. चिमण्यांच्या बचावासाठी जनजागृतीची गरज ओळखून हा उपक्रम हाती घेतला असून चिमणीचे, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, हा उद्देश आहे.

- \Bअनिल महाजन, संस्थापक अध्यक्ष, चातक निसर्ग संवर्धन संस्था.

\B

जागतिक चिमणी दिन विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेच्या उमेदवारीनंतर राष्ट्रवादीचे ठरणार?

$
0
0

उस्मानाबादमध्ये उत्सुकता शिगेला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या यादीतही उस्मानाबाद मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या उस्मानाबादला आपल्या ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने व्यूहरचना आखली असून सेनेच्या उमेदवारीनंतरच राष्ट्रवादी आपले पत्ते उघडण्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. गेल्या काही निवडणुकांत शिवसेनेने आपले वर्चस्व निर्माण केले. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्याऐवजी दुसऱ्याला उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींनी उमेदवार बदलला, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही उमेदवारीबाबत अदलाबदल होण्याची शक्यता आहे. अगदी अंतिम क्षणी डॉ. पद्मसिंह पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. गायकवाड रिंगणात असतील, तर अर्चना पाटील किंवा डॉ. पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील. मात्र, ओम राजेनिंबाळकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली, तर आमदार राणा जगजितसिंह पाटील रिंगणात उतरतील, अशी शक्यता आहे. एकूणच दोन्ही पक्षांनी सध्या 'वेट अँड वॉच'चे धोरण स्वीकारले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ गुन्हा जमावबंदीचा!

$
0
0

येवला तहसील आवारात उपाषणाचा प्रकार

म. टा. वृत्तसेवा, येवला

लोकसभेच्या सार्वजनिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना येवला तहसील कार्यालयाच्या आवारात परवानगी न घेता मंडप टाकून उपोषण सुरू केल्याने तालुक्यातील मुरमी येथील नऊ जणांवर जमावबंदीचा नियमाचा भंग केल्याचा गुन्हा येवला शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. मात्र याप्रकरणी काही स्थानिक राजकारण्यांकडून आचारसंहिता भंगचा गुन्हा केला, नागरिकांवर अन्याय केला, अशा प्रकारचे अपप्रचार सुरू आहे. प्रशासनाने सदरचा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी माजी सभापती संभाजी पवार यांनी केली आहे.

मुरमी ग्रामस्थांनी ६ मार्चला तहसीलदारांना निवेदन दिले असून मुरमी ग्रामपंचायत कामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, यासाठी निवेदन दिले होते. अन्यथा १८ मार्च पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण करू, अस इशाराही दिला होता. सोमवारी नऊ ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयाबाहेर उपोषण सुरु केले होते. अधिकाऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याने रात्री उशिरा माजी सभापती संभाजी पवार यांनी मध्यस्थी करून हे उपोषण मिटवले होते. त्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्याने प्रशासनाला अगोदर कळवूनही पूर्व परवानगी न घेता उपोषण केले अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आनंदा पानसरे, गणेश बगाटे, रावसाहेब शिंदे,बाळू जोंधळे,आनंदा सोनवणे,सुनीता जोंधळे, बाबासाहेब शिंदे, राजाराम पानसरे, बबन शेळके (सर्व मुरमी) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असताना येवला तहसील कार्यालयाच्या आवारात जमाव गोळा झाला. त्यामुळे घडलेला प्रकार हा जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आहे. याबाबतचा गुन्हा येवला पोलिसांनी दाखल केला आहे. जमावबंदी आदेशाच्या उल्लंघनाला जाणीवपूर्वक आचारसंहिता भंगचा रंग देण्याचा प्रयत्न या प्रकरणात होत आहे.

---अरुण आनंदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाराजीनाट्यावर पडदा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरीतील नाराजीनाट्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जिल्ह्यात तयार केलेली समन्वय समिती अखेर विसर्जित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नाशिकमधील मनोमिलन मेळाव्यापुरतीच ही समन्वय समिती असल्याचे ग्रामीण विकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या समितीवरून नाराजीनाट्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट करीत यापुढे लोकसभा मतदारसंघनिहाय समन्वय समिती गठित केली जाणार असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभानिहाय मेळावे घेतले जाणार असून, त्यातून प्रचाराला प्रारंभ केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना आणि भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्याची घोषणा केल्यानंतर गेली साडेचार वर्षे एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारे दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्याचे नियोजन युतीकडून करण्यात आले होते. त्यासाठी विभागनिहाय नेत्यांवर जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या होत्या. त्यानुसार नाशिक विभागातील समन्वयाची जबाबदारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि ग्रामविकासमंत्री दादा भुसे यांच्यावर टाकण्यात आली होती. त्यानुसार गेल्या रविवारी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत होणाऱ्या मनोमिलन मेळाव्यापूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मेळाव्याचे नियोजन व समन्वयासाठी दोन्ही पक्षांतर्फे १५ जणांची समिती जाहीर केली होती. त्यात भाजपचे आठ, तर शिवसेनेचे सात पदाधिकारी होते. पालकमंत्री गिरीश महाजन, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, राज्यमंत्री दादा भुसे, आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, वसंत गिते, सुनील बागुल, दत्ता गायकवाड, विजय करंजकर, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, दादा जाधव, सचिन ठाकरे, प्रशांत जाधव यांचा त्यात समावेश होता. परंतु, या समितीवरून दिंडोरीत नाराजीनाट्य झाले होते. जिल्ह्यासाठी असलेल्या या समितीत दिंडोरी मतदारसंघातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. या समितीत दिंडोरीतील दोन्ही जिल्हाप्रमुख, तसेच एका आमदारालाही डावलण्यात आले, अशी चर्चा शिवसेनेतही सुरू झाली होती.

--

आता लोकसभानिहाय समिती

या नाराजीनाट्यावर मंत्री भुसे यांनी पडदा टाकला आहे. सदरची समन्वय समिती केवळ मुख्यमंत्री व उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यासाठीच होती, असे सांगत सध्या ही समिती अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले. आता लोकसभानिहाय मेळावे होणार असल्याने लोकसभानिहाय समन्वय समिती गठित करून मेळावे घेतले जाणार असल्याचे भुसेंनी स्पष्ट केले. त्यामुळे या समितीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

---

पक्षीय समतोल साधणार

नाशिक जिल्ह्यात तयार केलेल्या समन्वय समितीत नाशिकमधील सदस्यांचा भरणा असल्याने, तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना डावलल्याने नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे आता लोकसभानिहाय समित्या तयार करताना पक्षीय समतोल साधला जाणार आहे. शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना समान स्थान दिले जाणार असून, त्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह आमदारांनाही स्थान दिले जाणार आहे. लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचे नियोजन करण्यासह उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारीदेखील टाकण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामचुकारांची ‘हजेरी’

$
0
0

बायोमेट्रिक हजेरीनुसार निघणार महापालिकेत वेतन; आयुक्तांचा दणका

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापौर निवासस्थानावर कार्यरत नसतानाही वेतन काढल्याप्रकरणी रवींद्र सोनवणे या कर्मचाऱ्याची चौकशी सुरू झाल्यानंतर महापालिकेत काम न करता वेतन लाटणाऱ्या कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी रडारवर घेतले आहे. पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन आता बायोमेट्रिक हजेरीच्या आधारे करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. मार्च महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असून, पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे एप्रिलमध्ये होणारे वेतन आता बायोमेट्रिक हजेरीच्या आधारावर निघणार आहे. यामुळे कामचुकार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धडकी भरली आहे.

सभागृहनेते दिनकर पाटील यांनी 'रामायण'वर कार्यरत असलेल्या लघुलेखक रवींद्र सोनवणेंबाबत आयुक्तांकडे तक्रार केली होती. सोनवणे रामायणवर कार्यरत नसतानाही त्यांनी दहा वर्षांपासूनचे वेतन काढल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. त्यानुसार आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, पालिकासेवेत कार्यरत असलेले अनेक कर्मचारी हे राजकीय पदाधिकाऱ्यांकडे काम करीत असल्याचे दाखवून पालिकेचे वेतन काढत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंनी जवळपास तीनशे कर्मचाऱ्यांना राजकीय पदाधिकाऱ्यांकडून काढून घेत सफाईच्या कामाला लावले होते. महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गातील एकूण ७०९० पदे मंजूर आहेत. यापैकी सुमारे २२०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच महापालिकेच्या कामकाजाचा ताण वाढत चालला आहे. प्रशासनाचा गाडा ओढण्यासाठी एकीकडे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना अहोरात्र मेहनत घ्यावी लागत असताना काही कर्मचारी मात्र कामावर न येताच अनेक वर्षे पालिकेचे वेतन लाटत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली असून, त्या आधारेच वेतन अदा करण्याचे निर्देश आयुक्त गमे यांनी माहिती व तंत्रज्ञान विभाग तसेच, वित्त व लेखा विभागाला दिले आहेत. आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक प्रणाली होत आहे किंवा नाही याविषयी खात्री करून अहवाल सादर करण्याचे आदेशही आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. अहवाल सादर न करणाऱ्या विभागप्रमुखांवर कारवाई करण्याचा इशारा गमे यांनी दिला आहे. त्यामुळे गमेंच्या या आदेशाने आता अधिकारी व कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे.

...

विभागप्रमुखांना दणका

महापालिकेच्या एनएमसी ई-कनेक्ट अॅपवरील तक्रारींसह प्रत्येक आठवड्यात घेण्यात येणाऱ्या विभागप्रमुखांच्या बैठकीत आयुक्तांकडून प्रलंबित टपालबाबत आढावा घेतला जातो. परंतु, विभागप्रमुखांकडून वेळेत या टपालासह तक्रारींचे निराकरण केले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी टपाल प्रलंबित असलेल्या सर्व विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे विभागप्रमुखांनाही धडकी भरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगाने भरलेल्या फुग्यांवर बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात धुलिवंदन व रंगपंचमी सणाला रंग खेळण्यासाठी रबरी फुग्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नाशिक शहर पोलिस उपायुक्तांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. रंगाने भरलेल्या रबरी फुग्यांचा मारा केल्याने समोरच्या इसमास गंभीर स्वरुपाच्या शारीरिक इजा होऊ शकतात. कायमस्वरुपी अपंगत्व देखील येऊ शकते. मोटारसायकल, कार व अन्य प्रवासी वाहने मार्गस्थ होताना लक्ष विचलित होऊन गंभीर स्वरुपाच्या अपघाताची शक्यता असल्याने शहरात खबरदारीचा उपाय म्हणून रंगाने भरलेल्या रबरी फुग्यांच्या वापर करण्यावर २६ मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम १६३ नुसार शिक्षेस पात्र राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

तालुक्यातील धामणगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेतील शरद भाऊ उघडे (१६) या दहावीच्या विद्यार्थ्याने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. शरद हा मूळ खडकेद येथील रहिवाशी आहे. या आश्रमशाळेत गेल्या तीन वर्षांपासून तो शिक्षण घेत होता. सध्या त्याचे दहावीचे पेपर सुरू होते. दोन पेपर शिल्लक होते. सोमवारी रात्री शाळेच्या प्रांगणातील पिंपळाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. सदर बाब शाळेतील मुली सकाळी व्यायाम करण्यासाठी आल्या तेव्हा लक्षात आली. त्यांनी मुख्याध्यापक खैरनार यांना ही माहिती दिली. त्यांनी नाशिक येथील आदिवासी विकास भवन कार्यालय व घोटी पोलिस स्टेशनला कळविले. शरदच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहनांवरील 'दादा', भाऊ अन् आप्पा होणार हद्दपार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवीन वाहनांसाठी उच्च सुरक्षायुक्त नोंदणी पाट्या (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट- एचएसआरपी) बंधनकारक करण्यात आल्या आहेत. दि. १ एप्रिलपासून या नियमाची अंमलबजावणी होणार असून, त्यामुळे वाहनचोरीच्या प्रकारांना ब्रेक बसू शकणार असून, आप्पा, दादा, भाऊ, नाना असे नंबर प्लेटवरील शब्दही हद्दपार होणार आहेत.

नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने शहरातील प्रमुख २० विक्रेत्यांची बैठक घेऊन याबाबत सूचना केल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तब्बल १३ वर्षांनी राज्य परिवहन विभागाने 'एचएसआरपी' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमानुसार वाहनांच्या नंबर प्लेट वाहन कंपन्याच बनवून देतील आणि विक्रेते क्रमांक कोरून देतील. मोठ्या विरोधानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. १ एप्रिलपासून शहरासह जिल्ह्यात विक्री होणाऱ्या प्रत्येक नवीन वाहनावर याच नंबर प्लेट लावण्यात येणार आहेत. या नंबर प्लेट बदलणे, क्रमांकात बदल करणे किंवा त्यावर दुसरा क्रमांक नोंदणे असे प्रकार शक्य होणार नाहीत. याचा थेट फायदा पोलिसांनासुद्धा होणार आहे. विशेषत: वाहनचोरीच्या प्रकारात नंबर प्लेट बदलणे, एवढेच काम चोरट्यांकडून केले जाते. नवीन नंबर प्लेटबाबत ही शक्यता धूसर असल्याने त्याचा फायदा होऊ शकतो, असे मत एका वाहन विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने व्यक्त केले. दरम्यान, वाहनांच्या नंबर प्लेटवर विशिष्ट प्रकारे आकडे लिहून 'दादा', 'भाऊ' असे शब्द तयार केले जातात. या प्रकारांनासुद्धा यामुळे आळा बसणार आहे. सध्या नवीन वाहनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, भविष्यात जुन्या वाहनांसाठीसुद्धा हा नियम लागू होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

'एचएसआरपी'ची वैशिष्ट्ये

-हॉट स्टॅम्पिंग व स्नॅप लॉक

-'इंडिया' लिहिलेले बारकोड आणि थ्रीडी होलोग्राम

-आरटीओ, वाहतूक पोलिसांनी बारकोड स्कॅन केल्यास मिळणार वाहनाची पूर्ण माहिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा महिन्याच्या बाळाने विक्सची डबी गिळली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खेळता खेळता सहा महिन्याच्या बाळाने विक्सची डबी गिळली. यानंतर श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने पालकांनी त्यास तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करीत त्याच्या घशात अडकलेली डबी काढली आणि चिमुकल्याचे प्राण वाचले.

नीलेश संदीप केवारे (रा. अवरखेड, ता. इगतपुरी) असे या सहा महिन्यांच्या बालकाचे नाव आहे. घरामध्ये खेळत असताना, मंगळवारी (दि. १९) दुपारी एक वाजेच्या सुमारास नीलेशच्या हाती विक्सची डबी लागली. कोणाचेही लक्ष नसताना त्याने ती डबी तोंडात टाकली. डबी चघळत असताना अचानक ती त्याच्या घशात गेली आणि तिथे अडकली. त्यामुळे त्यास श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यास तातडीने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्याला सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. संजय गांगुर्डे यांना ही माहिती देण्यात आली. ऑपरेशन थिएटरमध्ये सज्जता ठेवण्यात आली. नीलेशनला तत्काळ ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याची प्रकृती खालावली होती. त्यामुळे लागलीच लॅन्गोस्टिक दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून अडकलेली डबी बाहेर काढण्यात आली. डॉ. संजय गांगुर्डे यांच्यासह डॉ. दीपाली चौधरी, डॉ. श्रीमती तडवी, बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रेयस पटेल, परिचारिका एस. ए. मोरे यांच्या पथकाने चिमुकल्यावर उपचार केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परमोरी’चा बिबट्या व्हिआयपी!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात प्रथमच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी १७ पिंजरे, ९ ट्रॅप कॅमेरे आणि वनधिकाऱ्यांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. दिंडोरी तालुक्यातील परमोरी गावात बिबट्याला कैद करण्यासाठी ही संपूर्ण यंत्रणा राबत असल्याने गावातील बिबट्या 'व्हीआयपी' ठरल्याची चर्चा रंगते आहे.

दिंडोरीतील परमोरी गावात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचे वारंवार हल्ले होत आहेत. त्यामध्ये बालकांनाही जीव गमवावा लागला असल्याने तेथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात यापूर्वी फक्त लखमापूरमध्ये १० ते १२ पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला गेला होता. जिल्ह्यात सध्या सर्वत्र बिबट्याचा धुमाकूळ असून, नागरिकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे. त्यामुळे बिबट्या जेरबंद करण्यासाठी वन विभागही कठोर पाऊले उचलत आहेत. परमोरी येथे ग्रामस्थांमध्ये भीती अधिक वाढू लागल्याने १७ पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्याच्या हालचालींवर तब्बल ९ ट्रॅप कॅमेरे लक्ष ठेवून असून, बिबट्याचा अचूक माग शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासोबतच परमोरीत ७ ते ८ वनरक्षकांचे पथक तैनात केले असून, वनधिकाऱ्यांच्या पथकांचीही गस्त त्या ठिकाणी सुरु आहे.

परमोरी गावात घडलेली दुर्घटना दुर्दैवी आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशत मोठ्या प्रमाणावर आहे. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी १७ पिंजरे, ट्रॅप कॅमेरे व वन अधिकाऱ्यांचे पथक, अशी यंत्रणा त्या ठिकाणी तैनात केली आहे. अधिकारी देखील त्या ठिकाणी वारंवार गस्त घालत आहेत.

- सुनील वाडकर, उपवनसंरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णवाहिकेने घेतला पेट, जीवितहानी नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावकडून नाशिकच्या दिशेने रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका चांदवड शिवारात अचानक पेटली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेत रुग्णवाहिका जळून खाक झाली.

नामपूर रुग्णालयाची १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिके चांदवड शिवारात अचानक पेट घेतला. या घटनेत ऑक्सिजन सीलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटाने परिसर हादरला. त्याचे हादरे आजूबाजूच्या परिसरात जाणवले. या घटनेनंतर चांदवडच्या उमराणे येथील १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने तत्काळ तेथे धाव घेतली आणि रुग्णाला व डॉक्टरांना सुखरूप नाशिककडे रवाना केले. या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदतकार्य सुरू होतं. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला आग कशामुळे लागली, याची माहिती कळू शकली नाही. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवस अन् रात्र आज समान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खगोलशास्त्राशी निगडित घडणाऱ्या विविध बाबी खगोलप्रेमींबरोबरच सामान्य माणसांनाही आपल्याकडे आकर्षित करीत असतात. दिवस मोठा, रात्र लहान किंवा रात्र मोठी दिवस लहान, दक्षिणायन, उत्तरायण, सुपरमून यांचे दर्शन, अशा काही ठराविक दिवशी घडणाऱ्या दिवसांचे, घटनांचे विशेष अप्रूप सामान्यांना असते. आजचा (२१ मार्च) दिवसही विशेष असून, हा दिवस आणि रात्र आज समान असणार आहे. बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र आज अनुभवण्यास मिळणार आहे. गुगलनेही डुडलद्वारे या दिनाची माहिती नेटीझन्सला बुधवारी दिली.

सूर्य २१ मार्च व २२ किंवा २३ सप्टेंबर या दिवशी खगोलीय विषुववृत्तावर असतो. त्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते. म्हणून या दिवसांना विषुव दिन असे म्हणले जाते. या दिवशी सर्वत्र सूर्योदय व सूर्यास्त अनुक्रमे सकाळी व संध्याकाळी सहा वाजता होतो, असे सामान्यत: मानले जाते. हे दिवस वगळता दिवस व रात्र नेहमी लहान मोठे असतात. दिवस रात्रीची ही असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलन्यामुळे निर्माण होते. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस बारा तासापेक्षा मोठा रात्र बारा तासांपेक्षा लहान असते. ज्यावेळी कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो तेव्हा पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते. म्हणजे बरोबर १२-१२ तासांचे असतात, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images