Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वाढदिवस

0
0

१७ मार्च

जयदत्त होळकर

संचालक, लासलगाव कृउबा

सावळीराम तिदमे

लेखक

समीर बोंदार्डे

ज्येष्ठ छायाचित्रकार

अविनाश गायकवाड

उद्योजक

वैजयंती डांगे

लेखिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्राहकांना ‘नो आयडिया’!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक\B

\B'आयडिया'ची सेवा शनिवारी चांगलीच फसली. यामुळे मोबाइलच्या भरवशावर असलेल्या ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. केवळ तांत्रिक अडचणींमुळे सकाळी दहाच्या सुमारास फेल झालेले नेटवर्क तीन ते साडेतीन तासांनंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुरू झाले. त्यानंतर आयडिया ग्राहकांचा एकमेकांसोबत संपर्क सुरू झाला.

रोजच्या जगण्याचा भाग बनलेल्या मोबाइलची विश्वासार्हता एवढी वाढलीय की, प्रत्येक गोष्ट अलीकडे मोबाइलच्या भरवश्यावर पुढे ढकलण्याची सवय अंगवळणी पडलीय. प्रत्येक क्षणाला सोबत असणारे नेटवर्क नेमक्या महत्त्वाच्या वेळेला डाऊन झाले की तारांबळ उडते. याचा अनुभव शनिवारी (१६ मार्च) सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत नाशिकच्या आयडिया ग्राहकांनी घेतला. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. फोन कॉल्सची सेवा पूर्णत: ठप्प झाल्याने 'नो आयडिया सर जी' म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली. लँडलाइन अथवा अन्य नेटवर्कवरून आयडियाच्या क्रमांकावर फोन केल्यावर 'तुम्ही डायल केलेल्या नेटवर्कमध्ये कंजेशन असल्यामुळे आपला कॉल जोडला जाऊ शकत नाही', असे सांगण्यात येत होते. तर, आयडिच्या क्रमांकावरून इतर कंपन्यांच्या क्रमांकावर संपर्क होत नव्हता. त्याचे पडसाद व्हॉट्सअॅप व फेसबुकवरही पहायला मिळाले. कॉल्सची सुविधा ठप्प झाल्याने ग्राहकांनी त्या संबंधित पोस्ट शेअर केल्या. दुपारी दीड वाजेच्या दरम्यान कॉल्स जोडले जाऊ लागले. त्यानंतर काही तरी चुकल्याच्या मानसिकतेत असलेले ग्राहकही 'रेंज'मध्ये आले.

...

\Bम्हणे, रिचार्ज संपला...

\B आयडिया कंपनीच्या ग्राहकांचे कॉल्स जोडले जात नसल्याने ग्राहकांनी कस्टमर केअरशी संपर्क साधला. त्यावेळी 'तुमचा रिचार्ज संपला असेल किंवा तुम्ही बिल उशिराने भरले असेल. नेमका काय तांत्रिक गोंधळ आहे तो बघून तुमची सेवा पूर्ववत करतो', असे उत्तर ग्राहकांना देण्यात आले. काही ग्राहकांनी संपूर्ण नाशिकमध्येच सेवा ठप्प असल्याचे सांगितल्यावर 'तांत्रिक अडचण आहे. काही तासांत सेवा सुरळीत होईल', असे आयडियातर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मशिदीत चोरी करणाऱ्यास अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील कॅम्प परिसरातील फलटण मशिदीत शनिवारी दुपारी एक तरुण चोरीच्या इराद्याने शिरला. मात्र, मशिदीत साफसफाई करणाऱ्या इक्बाल अहमद अब्दुल हमीद (वय ५०, रा. मालेगाव) यांनी प्रसंगावधान दाखवत त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अश्पाक अहमद निहाल अहमद अन्सारी (रा. कुसुंबा रोड, मालेगाव) असे संशयित चोरट्याचे नाव आहे.

इक्बाल यांच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर परदेशी यांनी दिली. इक्बाल हे दुपारी मशिदीची वरच्या मजल्याची साफसफाई करीत होते. मशिदीच्या गेटमध्ये आतल्या बाजूला भिंतीला लावलेली दान पेटी अज्ञात व्यक्ती तोडून पैसे काढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच तेथे जाऊन संशयित चोरट्यास पकडून धरले आणि आरडाओरडा केला. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्याची झडती घेण्यात आल. त्याने अश्पाक अहमद निहाल अहमद अन्सारी (रा. कुसुंबा रोड मालेगाव) असे स्वत:चे नाव सांगितले. त्याच्याकडून दानपेटीतील २९० रुपये जप्त करण्यात आले. कॅम्प पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिक’वर अन्याय

0
0

विकास नियमावलीवरून बांधकाम व्यावसायिक संतप्त; घरे महागण्याची भीती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने नुकत्याच प्रकाशित केलेल्या शहर नियंत्रण विकास नियमावलीमध्ये इतर शहरांच्या तुलनेत नाशिकवर कठोर नियम लादण्यात आल्याने बांधकाम व्यावसायिक संतप्त झाले. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरसाठी नियमावली अनेक ठिकाणी शिथिल केली तर दत्तक नाशिकला मात्र अधिक जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. या नियमावलीत अनेक ठिकाणी 'नाशिक वगळून' हा शब्द वापरल्याचेही बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. या नव्या नियमावलीमुळे नाशिकमध्ये घरखरेदी महाग होणार होणार आहे. तर व्यावसायिक बांधकाम करण्यासाठी कोणीच पुढे येणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

संतप्त झालेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलमेंट कॉउन्सीच्या नरेडकोच्या शाखेने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या विषयाबद्दल पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, की अगोदर या नियमावलीवर ५ एप्रिलपर्यंत हरकत घेऊ; नंतर न्यायालयात आम्ही दाद मागणार आहे. यावेळी त्यांनी नाशिक महाराष्ट्रत आहे ना? असा उद्विग्न प्रश्न विचारत सावत्र वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. अगोदरच कपाटाचा प्रश्न चार वर्षात सुटलेला नसतांना या नव्या नियमावलीमुळे नाशिकवर पुन्हा अन्याय केल्याचे त्यांनी सांगितले.

प्रस्तावित नियमावलीमध्ये नाशिक शहरासाठी चटई क्षेत्र निर्देशांकाबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत राज्यात फक्त नाशिक शहर वगळून इतर सर्व शहरांना अॅडिशनल प्रिमियम एफएसआय देण्यात आलेला आहे. 'एफएसआय'करीता फक्त नाशिकसाठी स्वतंत्र अटी दर्शविलेल्या आहे. इतर शहरांच्या तुलनेत फक्त नाशिकला कमी एफएसआय देण्यात आलेला आहे. पत्रकार परिषदेत 'नरेडको'चे जयेश ठक्कर, सुनील गवादे, शंतनू देशपांडे, विजय सानप, संजय माळ, पंकज जाधव यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

एफएसआयवर कुऱ्हाड

नव्या नियमावलीमध्ये इतर शहरांना २४ ते ३० मीटरसाठी २.७५ अधिक ०.५० जादा म्हणजे ३.५० एफएसआय दिलेला आहे. तर शहराला फक्त २.५० एफएसआय दिलेला आहे. संपूर्ण राज्याची नियमावली असे म्हणायचे आणि नियमावली तयार करतांना फक्त नाशिक शहरासाठी वेगळे चटई क्षेत्र देणे संयुक्तिक नाही. गावठाण बांधकाम क्षेत्रावर शहराला २.५ एफएसआय आणि इतर शहरांना ३ एफआयएस असे धोरण आहे.

पार्किंगमध्ये अन्याय

पार्किंगबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत व्यावसायिक बांधकाम करतांना नाशिककरीता नियमावली तयार करतांना पार्किंगचे क्षेत्र १००० स्वेअर मीटर बांधकाम क्षेत्रासाठी १११२ स्वेअर मीटरपार्किंग सोडणे अनुज्ञेय करण्यात आले आहे. या निर्णयाने व्यावसायिक बांधकामे होणे शक्य नाही.

अॅमेनिटी स्पेस वेगळे

अॅमेनिटी स्पेसबाबत नागपूर शहरासाठी अॅमेनिटी स्पेस दहा हजार मीटर क्षेत्र असल्यास १० टक्के इतके आहे. नाशिक शहरासाठी अॅमेनिटी स्पेस चार हजार मीटर क्षेत्र असल्यास १५ टक्के आहे. तसेच साईड मार्जिन व पार्किंग निकषांमध्ये फक्त नाशिकवरच अन्याय करण्यात आलेला आहे, असे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाई

0
0

मालेगावमध्ये

दुचाकींवर कारवाई

जिल्हा पोलिस अधीक्षक आरतीसिंग यांच्या आदेशानुसार मालेगावमध्ये छावणी व शहर पोलिस ठाणे हद्दीत शनिवारी नाकाबंदी करून दुचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. यात विनापरवाना वाहन चालवणे, नंबर प्लेट नसणे, ट्रिपल सीट असे नियमबाह्य वाहन चालवणाऱ्या सुमारे ५० दुचाकीधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोतील दुचाकीस्वार ठार

0
0

नाशिक : भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सिडकोतील दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी जकात नाका भागात घडली असून, या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

गणेश महादेव शिंदे (वय ३८, रा. विजयनगर, मोरवाडी) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. गणेश शिंदे शुक्रवारी (दि. १५) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास विल्होळीकडून सिडकोकडे येण्यासाठी दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. गरवारे पॉईंट नजीकच्या विल्होळी जकात नाका भागात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने शिंदे गंभीर जखमी झाला होते. १०८ अ‍ॅम्ब्युलन्स चालकाने त्यास तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्हाय सो गंभीर’चा आज प्रयोग

0
0

'मटा कल्चर क्लब' तर्फे आयोजन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'कल्चर क्लब'तर्फे 'व्हाय सो गंभीर' या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. आज, रविवारी (दि. १७) सायंकाळी ५.३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे हा प्रयोग रंगणार आहे.

अथर्व थिएटर्सनिर्मित 'व्हाय सो गंभीर' हे नाटक पाहण्याची संधी 'मटा कल्चर क्लब' रसिकांसाठी घेऊन आले आहे. नाटकात आरोह वेलणकर आणि पल्लवी पाटील हे प्रमुख भूमिकेत आहेत. अन्वित फलटणकर, शुभा गोखले, प्रदीप जोशी, रसिका वाखरकार, आशिष दातीर यांची सहभूमिका आहे. नाटकाचे लेखन गिरीश दातार यांनी केले आहे. दिग्दर्शन अमोल भोर आणि गिरीश दातार यांनी केले आहे. या नाटकाचा हा प्रयोग कल्चर क्लब सदस्यांना खास सवलतीच्या दरात बघायला मिळणार असून, नव्याने सदस्य होणाऱ्यांना नाटकाची दोन तिकिटे मोफत मिळणार आहेत. तिकीट खरेदीसाठी ९४२२५१३५६९ या क्रमांकावर किंवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड या पत्त्यावर दुपारी १ ते ४ या वेळेत संपर्क साधावा.

..

\B'व्हा कल्चर क्लब सदस्य'\B

'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'कल्चर क्लब' सदस्यांसाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच, अनेक नामांकित कार्यक्रमांच्या तिकीट दरात सवलतही दिली जाते. या संधीचा लाभ घेण्यासाठी २९९ रुपयांत 'मटा कल्चर क्लब'चे सदयत्व मिळवा. www.mtcultureclub.com या वेबसाइटद्वारेही सदस्य होता येणार आहे.

--

\B'व्हाय सो गंभीर'\B

\Bकधी : \B१७ मार्च २०१९

\Bवेळ : \Bसायंकाळी ५.३० वाजता

\Bकुठे : \Bमहाकवी कालिदास कलामंदिर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक विषमता अद्याप कायम

0
0

प्रा. डॉ. राम बाहेती यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'देशातील आर्थिक व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी संविधानात तरतुदी आहेत; पण राज्यकर्ते त्याकडे सोयीस्कररीत्या कानाडोळा करीत असल्याचे दिसते. त्यामुळेच देशातील आर्थिक व सामाजिक विषमता अद्याप कायम आहे,' असे प्रतिपादन राजकीय अभ्यासक प्रा. डॉ. राम बाहेती यांनी केले.

शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती व्याख्यानमाला द्वारका येथील खरबंदा पार्कमधील कॉम्रेड दत्ता देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती. 'भारतीय संविधान आणि लोकशाही पुढील आव्हाने' या विषयावर शनिवारी व्याख्यान झाले. व्याख्यानात राजकीय अभ्यासक प्रा. डॉ. बाहेती यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, की देशात आर्थिक व सामाजिक विषमता ही अतिशय गंभीर बाब आहे. भारतीय संविधानात आर्थिक विषमता दूर करण्यासाठी योजनांची तरतूद आहे. सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी योजना कार्यान्वित आहेत; पण त्यातून विद्यार्थी घडलेले दिसत नाहीत. विद्यार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत नाहीत. योजना फक्त सरकारी कार्यालयातील कागदांपुरतीच मर्यादित राहते. त्यामुळे आर्थिक सक्षमता अद्याप आलेली नाही. व्याख्यानाच्या प्रारंभी राजू देसले यांनी प्रास्ताविक केले. अॅड. मनीष बस्ते, करुणासागर पगारे, नितीन डांगे, महादेव खुडणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेकायदा होर्डिंगप्रश्नी पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

0
0

महापालिका आयुक्तांनी कान पिळल्यानंतर कारवाई

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सार्वजनिक जागेवर विनापरवाना लावण्यात आलेल्या राजकीय होर्डिंगप्रश्नी खुद्द महापालिका आयुक्तांनी खडसावल्यानंतर जाग्या झालेल्या अतिक्रमण निर्मूलन पथक कारवाईसाठी गेले. मात्र, होर्डिंग गायब करण्यात आल्याने पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत उन्हवणे आणि गणेश उन्हवणे या दोघांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे हे शुक्रवारी (दि. १५) दुपारी नाशिकरोड विभागाची पाहणी करण्यासाठी आले होते. जेलरोडला भिमनगर चौकातील सार्वजनिक जागेवर पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे ८ बाय १५ फूट लांबी रुंदीचे होर्डिंग आढळून आले. या प्रश्नी आयुक्तांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम आणि नाशिकरोडचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांची जागेवरच कानउघडणी केली होती. यानंतर झोपेतून जागे झालेले अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुखराज डांबरे जेलरोडला या होर्डिंगचे अतिक्रमण काढण्यासाठी आपल्या पथकासह गेले. दुपारी एक वाजता त्यांना भिमनगर येथील चौकात के. एन. केला शाळेच्या बाजुकडील भिंतीलगत मुख्य रस्त्याच्या फुटपाथवर गणेश उन्हवणे आणि शशिकांत उन्हवणे यांनी लावलेले होहोर्डिंग आढळून आले. त्यांनी होर्डिंगचा फोटो काढला व त्यांच्या पथकाकडील वाहनात अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले आगोदर असलेले साहित्य खाली करण्यासाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयात गेले. ते साहित्य खाली करून अर्ध्या तासात पुन्हा भिमनगर चौकात अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक कारवाईसाठी आले. मात्र, त्यांना जागेवर होर्डिंग आढळून आले नाही. त्यामुळे अतिक्रमण विभाग प्रमुख सुखराज डांबरे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गणेश उन्हवणे व शशिकांत उन्हवणे या दोघांविरोधात सार्वजनिक जागेवर पालिकेची परवानगी न घेता होर्डिंग लावणे आणि पुरावा नष्ट करणे या कारणाखाली फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिक्रमण पथकाचीच मेहरबानी

भिमनगर चौकात शशिकांत उन्हवणे यांच्याकडून वर्षभर होर्डिंग लावलेले असते. परंतु, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून या होर्डिंगवर आजवर कधीही कारवाई करण्याचे धाडस दाखविण्यात आलेले नव्हते. उन्हवणे यांच्या होर्डिंगवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कायमच मेहरबानी दाखवली जात असल्याची बाब महापालिका आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यात उघड झाली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर नियमानुसार शहरातील सर्व राजकीय पक्षांशी संबंधित सर्व फलक व झेंडे हटविण्याची जबाबदारी अतिक्रमण निर्मूलन पथकाची होती. त्यांनी अशा प्रकारची कारवाई केलीही होती. मात्र, उन्हवणेंच्या होर्डिंगकडे कानाडोळा केल्याचे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाज परिवर्तनाच्या उंबरठ्यावर

0
0

विश्वास ठाकूर यांचे प्रतिपादन

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिला आत्मबळ व सोशिकता घेऊन रोजच्या जगण्याशी संघर्ष करून असतात. कष्ट करणे आणि त्यातून कुटुंबाला रोज नव्याने उभारी देण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. म्हणूनच महिला सबलीकरणाची चळवळ तिच्या नव्या जाणिवांची आणि आधुनिक विचारांना संजीवनी देणारी आहे. स्वयंसिद्ध होण्याचा तिचा प्रवास प्रत्यक्षात आला आहे, असे प्रतिपादन विश्वास ठाकूर यांनी केले.

विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ, यशस्विनी सामाजिक अभियान, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक आणि सारस्वत बँक यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास आर्थिक साक्षरता अभियानाअंतर्गत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. रोटरी हॉल, गंजमाळ, नाशिक येथे हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास मुक्तांगण संस्थेचे माधुरी ढोली, मनीषा धाडगे, अविनाश ढोली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ठाकूर पुढे म्हणाले, की महिलांची सर्वच क्षेत्रात यशस्वी घोडदौड सुरू आहे. तिने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. समाज खऱ्या अर्थाने परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आला आहे. मेळाव्याच्या निमित्ताने महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित निवडक महिलांनी मनोगत व्यक्त केले व विश्वास आर्थिक साक्षरता अभियानामुळे कौटुंबिक व सामाजिक पातळीवर झालेल्या बदलांचे अनुभव कथन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनीषा पगारे, ममता जाधव, अलका शेळके, छाया साबडे, धनश्री मोडे, सुवर्णा अडबले, प्रमिला बच्छाव, नीलम तेली, आरती महाले, अनिता बेंडकुळे, वैशाली बिरारे, धनंजय जाधव, सरला मोरे, मनीषा काळे, विनोद कुंभार, सागर नागरे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशाहीची कारला धडक

0
0

अर्धा किलोमीटरपर्यंत नेले फरफटत

म. टा. वृत्तसेवा, निफाड

औरंगाबाद-नाशिक महामार्गावर नाशिककडे जात असणाऱ्या शिवशाही बसने पुढील कारला धडक देत सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटनेस शुक्रवारी (दि. १५) रात्री ११ वाजेच्या दरम्यान घडली.

या प्रकरणी शिवशाहीचालक दत्तात्रय मच्छिंद्र उगले (रा. दहेगाव‌, ता. वैजापूर, जि औरंगाबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भगवान वामन घुगे (रा. गिरणारे) आणि संजय भगवंत पोरजे अशी अपघातात बचावलेल्या दोघांची नावे आहेत. ते कारमध्ये बसलेले होते. नाशिकच्या दिशेने धावणाऱ्या शिवशाहीने (एमएच १८ बीजी १६४३) निफाडजवळील रिलायन्स पेट्रोल पंपजवळ पुढे जात असलेल्या स्विफ्ट डिझायर कारला (एमएच १५ जीएफ ८५०२) पाठीमागून जोरात धडक दिली. शिवशाहीचा वेग इतका अधिक होता की कार बसच्या पुढच्या बाजूस अडकून गेली होती. शिवशाही चालकाने सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत कार रस्त्यावरून फरफटत नेली . यावेळी घर्षणाने ठिणग्या बाहेर पडतांना प्रत्यक्षदर्शींना दिसल्या. निफाड शहराजवळील शांतीनगर त्रिफुलीवर दुभाजकावर अडकल्याने कार बाजुला फेकली गेली. कारचालक भगवान वामन घुगे व त्यांच्यासोबत असलेले संजय भगवंत पोरजे असे दोघेजण थोडक्यात बचावले. अपघातानंतर शिवशाही चालकाने पिंपळगांव बसवंतच्या दिशेने भरधाव वेगात नेली. स्थानिक नागरिकांनी पाठलाग करत रौळस गावालगत शिवशाही अडविली आणि बसचालक दत्तात्रय उगले याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. कारचालक पोरजे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार उगले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडर स्फोटात चार झोपड्या खाक

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

दात्याने (ता. निफाड) येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन यात चार झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.

दात्याने गावातील महादेवनगर परिसरात मजुरी काम करणाऱ्या कामगारांच्या झोपड्या आहेत. यातील सुरेश निवृत्ती हिलम यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे झोपडीला आग लागली. ही आग शेजारी असणाऱ्या संदीप निवृत्ती हिलम, विठ्ठल निवृत्ती हिलम, भगवान खंडू पवार यांच्या झोपड्यापर्यंत पोहचली. या आगीमध्ये चारही कुटुंबाच्या झोपड्या जळून खाक झाल्या. यातील हिलम हे तिघा सख्ख्या भावांचे कुटुंब आहे. ते सगळे मजुरी करतात. द्राक्ष बागेत कामासाठी गेल्याने झोपडीत कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी धावाधाव केली. यावेळी पिंपळगाव वग्रामपालिका व एचएएल ओझर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या आल्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली. तलाठी पवार यांनी पंचनामा केला आहे. दरम्यान या परिस्थितीवर तत्काळ मदत म्हणून ओणे येथील शरद हाळदे यांनी चारही कुटुंबांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडलेल्या मोराला जीवदान

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील दाभाडी-पिंपळगाव शिवारातील विहिरीत पडलेल्या मोराला शेतकरी, वनरक्षक व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समयसूचकतेने जीवनदान मिळाले आहे. स्थानिक शेतकरी, वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्यावर दोन दिवस उपचार करून त्यास वनक्षेत्रातील सुरक्षित ठिकाणी शनिवारी सोडल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटिक यांनी दिली.

पिंपळगाव शिवारातील ज्ञानेश्वर पवार यांच्या विहिरीत गुरुवारी (दि. १४) मोर पडला होता. पवार कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने विहिरीत खाट टाकून मोराला पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान, या घटनेची माहिती पवार यांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे यांनी वनरक्षक एस. जी. सय्यद, वनपाल व्ही. आर. शिंदे यांना घटनास्थळी तत्काळ पाठविले. जखमी मोराला मालेगाव येथील वनविभाग कार्यालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटिक यांनी त्याच्यावर उपचार करीत त्यास निरीक्षणात ठेवले. मोराची शनिवारी तपासणी केली असता तो ठणठणीत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याला गाळणे वनपरिक्षेत्रात सोडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते कामाचे भूमिपूजन

0
0

रस्ते कामाचे भूमिपूजन

मनमाड : येथील नगरसेवक कैलास पाटील यांच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. आमदार पंकज भुजबळ यांच्या स्थानिक विकास निधीतुन होणाऱ्या सिमेंट काँक्रेट रस्त्यांचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला. यावेळी नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र पगारे, नगरसेवक गणेश धात्रक, अमजद पठाण, सुरेश वाघ आदी उपस्थित होते. या रस्ते कामामुळे नागरिकांची गैरसोय दूर होऊन त्यांना चांगल्या सुविधा मिळतील, असे नगरसेवक कैलास पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल दुकानात ५३ हजारांची चोरी

0
0

मोबाइल दुकानात

५३ हजारांची चोरी

चांदवड : दुगाव (ता. चांदवड) येथील बस स्थानकाशेजारील अक्षय मोबाइल दुकानाचे शटर वाकवून ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शुक्रवार (दि. १५) घडली. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या चालक सागर महाजन यांना सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मोबाइल शॉपीचे शटर अर्धवट उघडे दिसले. त्यांनी शॉपीचे मालक अंकुश खैरे यांना याबाबत माहिती दिली. खैरे यांनी घटनास्थळी धाव घेतली व चोरीची चांदवड पोलिसांना तत्काळ माहिती दिली. चोरट्यांनी दुकानातून रोख ७ हजार रुपये तसेच मोबाइल, बॅटरी, हेडफोन, पॉवर बँक, स्पीकर साहित्य असा एकूण ५३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिळकतधारकांना जप्ती वॉरंट

0
0

घरपट्टीची थकीत रक्कम न भरल्यास जप्तीचा इशारा

...

- पहिल्या टप्प्यात ११५२ मिळकतींना जप्ती वॉरंट

- दुसऱ्या टप्प्यात ५०८ मिळकतींना जप्ती वारंट

- २५ हजारांपेक्षा अधिक घरपट्टी थकबाकीदार रडारवर

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक वर्ष संपत आल्याने नाशिक महापालिकेने थकबाकीदार मिळकधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पंचवीस हजारांपेक्षा अधिक घरपट्टी थकीत असलेल्या ११५२ थकबाकीदारांना पहिल्या टप्प्यात जप्ती वॉरंट बजावल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तब्बल ५०२ मिळकतधारकांना महापालिकेने जप्ती वॉरंट बजावले आहे. या मिळकतधारकांकडे नाशिकरोड येथील तब्बल २२० थकबाकीदारांचा समावेश आहे. आतापर्यंत पालिकेने १६५४ थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावले आहेत.

सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपट्टी वसुलीसाठी २२५ कोटींचे उद्दिष्टे निश्चित केले होते. महापालिकेने केलेल्या मिळकत सर्वेक्षणात नाशिक शहरात करलागू नसलेल्या तब्बल ५९ हजार नवीन मिळकतींचा समावेश आहे. परंतु, करवाढीचा घोळ मिटत नसल्याने अखेर त्यात बदल करण्यात आला आहे. डिसेंबरअखेर विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतलेल्या करवसुलीच्या आढाव्यानंतर सुधारित घरपट्टी वसुलीसाठी १४९ कोटींचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आले आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत पालिकेला शंभर कोटींचा घरपट्टी वसुलीला टप्पा पार करण्यात यश आले आहे. मात्र अनेक मिळकतधारकांकडे वर्षानुवर्षे घरपट्टी थकीत आहे. वारंवार तगादा करूनही संबंधित मिळकतधारक थकबाकी भरत नसल्यामुळे महापालिकेने अशा थकबाकीदार मिळकतधारकांविरोधात पुन्हा एकदा जप्तीची मोहीम उघडली असून, त्यासाठी बड्या थकबाकीदारांना टार्गेट केले आहे. पंचवीस हजारांपेक्षा अधिक घरपट्टी थकीत असलेल्या मिळकतधारकांना जप्ती वॉरंट बजावण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ११५२ मिळकतधारकांना वॉरंट बजावण्यात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५०८ थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात सर्वाधिक मिळकती नाशिकरोड येथील २१० असून, त्यापाठोपाठ नाशिक पूर्वमध्ये १२०, पंचवटी १५ , सिडकोत ४३, सातपूर १४, नाशिक पश्चिममधील २६ मिळकतींचा समावेश आहे. या मिळकतधारकांनी २१ दिवसांत थकबाकी जमा न केल्यास त्यांच्या मिळकती थेट जप्त करून लिलाव करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मिळकतधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

...

थकबाकीदार मिळकतींची संख्या

नाशिकरोड - २१०

नाशिक पूर्व - १२०

पंचवटी - १५

सिडको - ४३

सातपूर - १४

नाशिक पश्चिम - २६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचालक तरुणाची मनमाडमध्ये आत्महत्या

0
0

वाहनचालक तरुणाची

मनमाडमध्ये आत्महत्या

मनमाड : हनुमाननगर येथील ३५ वर्षीय वाहनचालकाने त्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. केशव निंबा पवार असे वाहनचालकाचे नाव आहे. तो खासगी गाडीवर चालक म्हणून काम करीत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. या प्रकरणी मनमाड पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गलांडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाणी’ पेटणार

0
0

लोकसभा निवडणूक काळात राजकीय पक्षांना भरली धडकी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणूक काळात पाण्याचा प्रश्न तीव्र होण्याची चिन्ह असल्याने राजकीय पक्षांनाही धडकी भरली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पाणी टंचाईच्या झळा आताच बसू लागल्याने पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता आहे. तसेच जायकवाडी धरणात पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याची अतिरिक्त मागणी केल्यास त्याला विरोध होऊ शकतो. त्यामुळे निवडणूक काळात उमेदवारांनाही पाण्याच्या प्रश्नावर सावध भूमिका घ्यावी लागणार आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धरण असले तरी यावेळेस अनेक तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. त्यात फेब्रुवारीपासून काही ठिकाणी पाण्याची टंचाई जाणू लागल्यामुळे येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मार्च व एप्रिलमध्ये ही टंचाई अधिक तीव्र झाल्यास त्याचा मतदानावरही परिणाम होणार आहे. जिल्हात मोठे ७ धरण असून मध्यम १७ धरण आहे. त्यात सध्या २९ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यात काही धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली असतांना उमेदवारांनाही धडकी भरली आहे.

लोकसभा निवडणुकीत नाशिक व दिंडोरी दोन्ही मतदार संघात बहुतांश भाग दुष्काळी जाहीर झाला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघात पाण्याचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. गोदावरी खोऱ्यामध्ये गंगापूर धरण समूह व पालखेड धरण समूह आहे. या धरण समुहांवर जिल्ह्यातील मोठा भाग अवलंबून आहे. तसेच गिरणा खोऱ्यावर खान्देशचा भाग आहे. पाटबंधारे विभागाने निवडणुकीपूर्वी ज्या ठिकाणी आवर्तन सोडणे शक्य आहे त्यातून पाणी देणे आतापासून सुरू केले आहे.

टँकरवाऱ्या वाढणार

उन्हाळा जसजा पुढे जाईल तसतसा पुढील काळात टँकरची संख्या वाढवण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. त्यामुळे पाण्याची झळ कोणाला बसू नये याची काळजी प्रशासन घेत असले तरी निवडणुकीत एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी पाणीसुद्धा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायदा रक्षणासाठी नैतिक अधिष्ठान हवेच

0
0

अॅड. उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वकिली व्यवसायाबद्दल समाजात आज फारसे अनुकूल मत नाही. पण अशा वास्तवातही कायद्याला नैतिक अधिष्ठानाची जोड देत सामाजिक दायित्व जपणारे विधीज्ञ हेच नैतिक समाजाची खरी प्रेरणा आहेत. नैतिक अधिष्ठानाशिवाय कायद्याचे रक्षण करणे शक्यच नाही. ज्येष्ठ विधिज्ञ का. का. घुगे यांच्यासारख्या कायदेतज्ज्ञांनी ही नैतिकता हयातभर योगदान देऊन जपली आहे, असे गौरवोद्गार विख्यात विधीज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी काढले.

ज्येष्ठ विधीज्ञ का. का. घुगे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हॉटेल पामशेल्स, का. का. घुगे इस्टेट येथे हा सोहळा पार पडला. यावेळी अॅड. निकम म्हणाले, की दोन दशकांपूर्वी गाजलेल्या एका खून खटल्याच्या निमित्ताने सरकारी वकील म्हणून मी पहिल्यांदा नाशिकमध्ये आलो. त्यावेळी पहिल्यांदा अॅड. घुगे यांच्यासमवेत माझा परिचय झाला. त्यावेळी त्यांच्यातील कायदा अभ्यासकाला इतके मोठे नैतिक अधिष्ठान असेल याची माहिती मला नव्हती. पण कायदा विषयक जागृती करणारी त्यांची पुस्तके हाती पडली, त्यावेळी वकिली व्यवसायात असताना व्यवसायापलिकडील सामाजिक दायित्व जपण्याचा घुगे यांचा प्रयत्न त्यांच्याप्रतीचा आदर वाढवून गेला. मंचावर वनाधिपती विनायकदादा पाटील, एमआयटीचे संस्थापक विश्वनाथ कऱ्हाड, उत्तर प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले, अॅड. राजेंद्र रघुवंशी, अॅड. सुधाकर आव्हाड, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

'यांची' श्रीमंती मनाची

न्यायव्यवस्थेतील त्रुटींवरही बोट ठेवताना घुगे मागे सरकले नाहीत, ही आदर वाढविणारी बाब आहे. पैशाची श्रीमंती ही अळवावरचे पाणी आहे. मनाची श्रीमंती ही खरी श्रीमंती आहे, असे अॅड. निकम म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडा टाकण्याची तयारी; पंचवटीत दरोडेखोर जेरबंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी खोडदेनगर येथे दुकानांची लूट करून आडगाव पोलिस ठाणे हद्दीत दरोडा ठाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चार संशयितांना जेरबंद करण्यास गुन्हे शोध पथकाला यश आले. त्यांच्याकडून बोलेरो कारसह सुमारे सहा लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आडगाव गुन्हे शोध पथक गस्त घालीत असताना सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांना काही संशयित खोडदेनगर परिसरात लूट करून आडगाव पोलिस ठाणे हद्दीत दरोडा टाकण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याअनुषंगाने वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक पाटील, हवालदार काजी, सूर्यवंशी, लाखन, पाटील, बोराडे, गायकवाड यांनी पहाटे तपोवनकडून बळी मंदिरकडे सव्वा चारच्या सुमारास बोलेरो (क्रमांक एमएच १५एफव्ही १७४१) मध्ये चार ते पाच जण संशयितरित्या फिरताना दिसले. यावेळी आनंद विजय भंडारे (वय २२ रा. पिंपळगाव बसवंत) व भाल्या कृष्णा हरजन (रा. जानोरी) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी फरार चार साथीदाराचे

नावे सांगितली. त्यानुसार फरारपैकी जानोरी येथून विजय वाल्मीक गायकवाड (वय २५), जावेद रसूल पिंजारी (वय ३९, पिंपळगाव बसवंत) यांना जेरबंद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images