Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रविवार लेख

$
0
0

दिनांक दहा मार्च!

बाबा पवार

माझ्या आयुष्यात एक तारीख खूप महत्त्वाची आहे. दहा मार्च! दहा मार्च, मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिवस. जवळपास पंचवीस वर्षे मी पाडगावकरांना दहा मार्चला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचो. त्याचा त्यांना खूप आनंद व्हायचा व त्यांच्या नेहमीच्या मिश्किल भाषेत उत्तर देऊन हसवायचे.

----

एक जानेवारीला भिंतीवर नवीन कॅलेंडर अवतरले की प्रत्येकाच्या मनात एक हुरहूर दाटून येते. फेब्रुवारीच्या मर्जीनुसार त्यातील दिवस कधी ३६५ असतात तर कधी ३६४. परंतु, त्यातील प्रत्येक तारखेशी ज्याचे त्याचे एक विशिष्ट नाते असते. त्यात कुटुंबातील वाढदिवस, स्मरणदिवस असे विविध कंगोरे असतात.

माझ्याही दवाखान्यात एक जानेवारीला नवीन कॅलेंडर येते. माझ्याही मनात घरातल्यांचे वाढदिवस समोर येतात पण त्याचबरोबर काही विशिष्ट तारखा पण प्रकर्षाने मनःचक्षुसमोर सरकायला लागतात. १८ जानेवारी उजाडला की के. एल. सैगलच्या मधाळ आवाजात विरघळून जातो, ९ मे चे तसेच. माझा तो दिवस कंप पावत तलत महमूदच्या कापऱ्या स्वरातील गाणे ऐकत सरतो. दोन जूनला जाग आली की प्रथम आठवतात राजसाब, म्हणजे राज कपूर. ३१ जुलैस रफीसाब अन् २७ ऑगस्टला मुकेश. उपरोक्त सगळ्या तारखा या कलावंतांच्या 'स्मरण तारखा' आहेत व त्यामुळे त्या माझ्यासाठी 'ब्लू मूड' आहेत.

पण माझ्यासाठी, माझ्या आयुष्यात एक तारीख खूप महत्त्वाची आहे. दहा मार्च! दहा मार्च, मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिवस. जवळपास २५ वर्षे मी पाडगावकरांना दहा मार्चला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचो. त्याचा त्यांना खूप आनंद व्हायचा व त्यांच्या नेहमीच्या मिश्किल भाषेत उत्तर देऊन हसवायचे पण १९८५ ला पिंपळगाव, निफाड येथील महाविद्यालयांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून पाडगावकर आले होते व माझ्याकडे तीन दिवस वास्तव्यास होते, तेव्हापासून माझ्या कुटुंबाचे त्यांच्याशी स्नेहबंध जुळले होते. मुंबईस परत जाण्यासाठी त्यांना मी नाशिकला सोडायला आलो तर रस्त्यात त्यांनी कुसुमाग्रजांशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. शिरवाडे हायस्कूलच्या कार्यक्रमासाठी मी तात्यासाहेबांना दोन वेळा नाशिकहून घेऊन गेलो होतो. त्यामुळे त्यांच्याशी माझा परिचय होता. मी गाडी थेट शालिमारच्या पटेल कॉलनीत घेतली. दोन दिग्गज भेटले. दीड तासांच्या त्या भेटीत दोघजण एक तास फक्त शांता शेळकेंवर बोलले. शांताबाई नुकत्याच तात्यासाहेबांना भेटून गेल्याचा संदर्भ होता. तात्यासाहेबांशी झालेल्या अनौपचारिक भेटीमुळे बाबा खूप आनंदले.

अन् अशाच एका 'दहा मार्च'ला सकाळी 'प्रेम कुणावरही करावे' लिहिणारे तात्यासाहेब निवर्तले. सालाबादप्रमाणे बाबांना शुभेच्छा देण्यासाठी मी सायनला फोन करणारच होतो. पण कुसुमाग्रजांची बातमी देण्यासाठी मी सकाळी सात वाजताच फोन केला. यशोदा मावशींनी घेतला व म्हणाल्या,

'बाबा अजून उठले नाहीत' मी विनंती केली, 'बाबांना फक्त दहा सेकंदांसाठी उठवा'

'बाबा, आज दहा मार्च कुसुमाग्रज गेले!' पाडगावकर उतरले, 'सांगताय काय! येथून माझ्या पुढच्या सगळ्या वाढदिवसांची रयाच गेली.

कालांतराने 'तीस डिसेंबर' या तारखेला मराठी काव्यसृष्टीतला 'या जगण्यावर शतदा प्रेम करावे' लिहिणारा हा शुक्रतारा निखळला.

आणि समोर टांगलेल्या कॅलेंडरवरील दहा मार्च या तारखेबरोबरच 'तीस डिसेंबर' या तारखेशी पण माझं कटू आठवणींचा भावविश्व जोडलं गेलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेचे ‘मनोमिलन’ फोल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेच्या नाशिक लोकसभा उमेदवारीबाबतचा पेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलन बैठकीतही सुटला नसल्याचे चित्र आहे.

खासदार हेमंत गोडसे पाठेपाठ जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनाही आपला दावा कायम ठेवल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केल्यानंतर उमेदवारीबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे मतभेद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तुर्तास धनुष्यबाण उमेदवार असल्याचे सांगत, आठ दिवसानंतर उमेदवाराबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे खासदार गोडसेंच्या शिष्टाईने बोलविलेली मनोमिलन बैठकही फोल ठरली आहे.

गेल्या आठवड्यातील बैठकीत निष्कर्ष न निघाल्याने उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा नाशिकमधील पदाधिकाऱ्यांना पाचारण केले. यावेळी करंजकर, खासदार गोडसे यांच्यासह आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे यांच्यासह १४ पदाधिकारी बैठकीला हजर होते. गोडसेंच्या नावावर एकमत होत नसल्याने ठाकरे यांनी यावेळी प्रत्येकाशी वन टू वन चर्चा केली. यावेळी बहुसंख्य उमेदवारांनी गोडसेंसंदर्भात तक्रारी केल्याचे समजते.

तर भुजबळ जिंकतील

करंजकरसह संघटनेतील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. तसेच गोडसेंना उमेदवारी दिल्यास भुजबळ जिंकतील असा दावा केल्याचे समजते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमधील टोकाला गेलेला असमन्वय आणि एका नावावर एकमत होत नसल्याने अखेरीस ठाकरे यांनी उमेदवारीबाबतचा निर्णय राखून ठेवला. सध्या धनुष्यबाण हाच उमेदवार समजून सर्वांनी कामाला लागा, असे सांगत आठ दिवसत पुन्हा बैठक घेऊन निर्णय दिला जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाइक रॅली’चे आकर्षण सई लोकूर

$
0
0

(सई लोकूरचा फोटो जोडला आहे. तो वापरावा, चौकटी वापराव्यात)

\B

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककर महिलांमध्ये ज्या रॅलीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, त्या 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'ऑल वूमेन बाइक रॅली'चा थरार आज, रविवारी (१० मार्च) सकाळी साडेसात वाजता होणार आहे. या रॅलीचे खास आकर्षण प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे 'ऑल वूमेन बाइक रॅली'चे आयोजन केले असून, ईदगाह मैदानापासून सकाळी ७.३० वाजता रॅलीला प्रारंभ होईल. त्यासाठी बाइकर्णींना सकाळी पावणेसातपर्यंत मैदानावर उपस्थित राहायचे आहे. रॅलीत बिग बॉस फेम प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर हिचे खास आकर्षण असेल. नाशिककर महिलांसोबत बाइक रॅलीत वेगावर स्वार होण्यासाठी सई येणार असून, नाशिकच्या पोलिस अधीक्षक आरती सिंह, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, फ्रवशी अॅकॅडमीच्या संचालिका शर्वरी लथ यांचादेखील रॅलीत सहभाग असेल.

या वेळी रॅलीद्वारे सीमेवर तैनात असलेल्या जवानांची खरी ताकद असलेल्या सैनिकांच्या पत्नींना सलाम केला जाणार आहे. त्यासह महिलांच्या सामर्थ्याचे दर्शन घडवत महिलादिनाचे हटके सेलिब्रेशन रॅलीत होणार आहे. त्यासाठी महिलांनी पारंपरिक ते वेस्टर्न आऊटफिटपर्यंतचा ट्रेंड फॉलो केला आहे. मोपेड, बुलेटसह स्पोर्ट्स बाइकची धूम या रॅलीत पाहायला मिळेल. धम्मालमस्तीच्या या पर्वणीत माहिलांच्या सामर्थ्याला, कर्तृत्वाला आणि धैर्याला 'हॅट्सऑफ' करण्यासाठी तुम्हीदेखील बाइक रॅलीत सहभागी व्हा.

\Bहे लक्षात घ्या\B

- रॅलीत सहभागासाठी सकाळी ६.४५ वाजता ईदगाह मैदान येथे नावनोंदणी होईल. प्रत्येक सभासदाला एक माहिती अर्ज भरणे अनिवार्य आहे.

- रॅलीमध्ये सहभागी होताना हेल्मेट वापरा आणि लायसन्स, पीयूसी आणि बाइकची सर्व कागदपत्रे जवळ ठेवा.

- बाइक चालविताना वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करा.

- वळणावर बाइक काळजीपूर्वक चालवा.

- रॅलीमध्ये निश्चित केलेल्या मार्गावरूनच सहभागी व्हा.

\Bअसा आहे रॅलीचा मार्ग\B

ईदगाह मैदान (गोल्फ क्लब)पासून रॅलीला प्रारंभ होईल. ईदगाह मैदानापासून चांडक सर्कल- मायको सर्कल- एबीबी सर्कल- महात्मानगर- जेहान सिग्नल- गंगापूर रोड- डोंगरे वसतिगृह- कॅनडा कॉर्नर- शरणपूर पोलिस चौकी- मायको सर्कल- चांडक सर्कलमार्गे ईदगाह मैदान असा वूमेन बाइक रॅलीचा मार्ग असेल.

\Bबक्षिसांची लयलूट करण्याची संधी\B

'बेस्ट कॉस्च्युम, बेस्ट डेकोरेटेड बाइक, बेस्ट सोशल मेसेज, बेस्ट डेकोरेटेड हेल्मेट आणि बेस्ट ग्रुप' अशी बक्षिसे रॅलीदरम्यान देण्यात येणार आहे. त्यासह बाइक अन् हेल्मेट सजवण्यासाठीही तुम्ही चांगली संकल्पना निवडू शकता. समाजप्रबोधनासह नारीशक्तीचा अभिमान, कर्तृत्व, शौर्य अन् धैर्याला सलाम, स्वातंत्र्याचा गौरव तुम्ही त्या माध्यमातून व्यक्त करू शकतात.

--

\B'ऑल वूमेन बाइक रॅली'

\Bकधी : रविवार १० मार्च, २०१९

वेळ : सकाळी ७.३० ते १०

कुठे : ईदगाह मैदान, त्र्यंबकरोड, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तारवाला नगरात घरफोडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दिंडोरी रोडवरील तारवाला नगर येथील एक कुटुंब लग्नासाठी गेले असता, चोरट्यांनी बंद घरातून दोन तोळे सोन्याचे दागिने, ५० हजार रुपये रोख रकमेसह ८३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. ९) सकाळी उघडकीस आली. भरवस्तीच्या या घरात झालेल्या चोरीमुळे पंचवटी पोलिसांचा वचक कमी झाल्याची चर्चा होत आहे. या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी जोर धरीत आहे.

तारवाला नगर येथील लामखडे मळा येथे राहणारे अशोककुमार सुभाषचंद्र गुप्ता (वय ३८) हे त्यांच्या पुतणीच्या लग्नासाठी शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी सहा वाजता घराला कुलूप लावून औरंगाबाद रोड येथील धनलक्ष्मी लॉन्स येथे गेले. रात्री उशीर झाल्यामुळे गुप्ता कुटुंबीय लॉन्सवरच मुक्कामी थांबले. ते शनिवारी (दि. ९) परत आल्यानंतर त्यांना दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. कपाटातील पोत, सोन्याची अंगठी, सोन्याची चेन व ५० हजार रुपये रोख असा एकूण ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलाकडून ४१ लाखांची फसवणूक

$
0
0

- हायकोर्टातील 'सेटिंग' करून देण्याचे आमिष

- वकिलासह त्याच्या पालकांविरुद्ध गुन्हा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई हायकोर्टात सुरू असलेल्या खटल्यात बाजूने निकाल लावून देण्याचे आमिष दाखवत एका वकिलाने तब्बल ४१ लाख १५ हजार रुपये घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात वकिलासह त्याच्या आईवडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. अॅड. यशोदीप मनोहर वाघ, त्याचे वडील मनोहर महिपती वाघ आणि आई दुर्गा वाघ अशी संशयितांची नावे आहेत.

या प्रकरणी अंबादास मुरलीधर भालेराव (रा. जुना जकात नाका, पंचवटी) यांनी तक्रार दिली. अंबादास भालेराव महापालिकेत लिपिक म्हणून कार्यरत असताना त्यांना अँटिकरप्शन ब्युरोने लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. गाळ्याची अनामत रक्कम परत करण्यासाठी दोन हजारांची लाच मागणारे भालेराव यांना २१ फेब्रुवारी २०१३ रोजी एसीबीने अटक केली. या प्रकरणी जिल्हा कोर्टात सुनावणी झाली. त्यात भालेराव यांना दोषी ठरवत कोर्टाने शिक्षा ठोठावली. या निकालाविरुद्ध भालेराव यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. याच दरम्यान, त्यांची ओळख संशयित वकील यशोदीप वाघ याच्याशी झाली. ८ मार्च २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यान संशयित वाघने वेळोवेळी ४१ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारली. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती, महाप्रबंधक आणि सरकारी वकील यांच्याशी चांगले संबध असून, या संबंधातून या खटल्याचा निकाल तुमच्यातर्फे लावून देऊ, असे आमिष वेळोवेळी दाखवून संशयितांनी हा गंडा घातला आहे. वेळोवेळी पैसे देऊनही निकालाचे काम होत नसल्यामुळे अंबादास भालेराव यांनी पैसे परत मागितले. या वेळी तुमचे पैसे विसरून जा, तुम्हाला काय करायचे ते करा, आम्हाला त्रास दिला तर सर्व जण आत्महत्या करू, तसेच तुम्हाला खोट्या केसमध्ये अडकवू, अशी धमकी संशयितांनी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. उपनिरीक्षक योगिता नारखेडे तपास करीत आहेत. दरम्यान, या गुन्ह्यातील फसवणुकीचा आकडा २५ लाखांपेक्षा अधिक असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आता ‘ह्यूमन मिल्क बँक’

$
0
0

ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणार प्रकल्प

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बाळाच्या नैसर्गिक संगोपनासाठी आणि आईच्या दुधाचे महत्त्व लक्षात घेऊन लवकरच नाशिक शहरात पहिली 'ह्यूमन मिल्क बँक' स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील बालरोग तज्ज्ञांच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटना 'इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक' (आयएपी) च्या नाशिक शाखेने पुढाकार घेतला आहे. या सुविधेमुळे गरजू बालकांना अमृततुल्यरूपी सकस दुधाची संजीवनी मिळण्यास मदत होणार आहे.

नवजात अर्भक आणि बालकांच्या दृष्टीने आईचे दूध मधुर, कषाय रसात्मक, स्निग्ध, बलवर्धक, शीत गुणात्मक आणि डोळ्यांना हितकर आहे. किंबहुना त्यांच्यासाठी ते अमृताचे रूप असते. बाळाच्या पोषणासाठी मातृस्तन्य अत्यंत हितकारी असते. अतिशय स्वच्छ, जंतुरहित हे स्तन्य असते. आईचे दूध पचण्यास हलके आणि बहुहितकारी असते. त्याचे महत्त्व 'नार्यास्तु मधुरं स्तन्यं कषायनुरसं हिमम्, स्निग्धं स्थैर्यकरं शीत चक्षुष्य बलवर्धनम्' या संस्कृत वचनातून लक्षात येते. सध्या फक्त मुंबईतील तीन तर, पुण्यात एका ठिकाणी आईचे दूध साठवून ठेवणारी बँक आहे. मात्र, नाशिकमध्ये ही सुविधा नाही.

शहरातही अनेकदा गंभीर स्वरुपाच्या प्रसूती शस्त्रक्रिया होतात. तेव्हा नवजात बाळाला काचेच्या पेटीत ठेवले जाते. आईची प्रकृतीदेखील तेव्हा अस्वस्थ असते. त्यावेळी ह्यूमन मिल्क बँकेच्या स्वरुपात मातेचे दूध बाळाला उपलब्ध करून देणे शक्य आहे. शहरात ही सोय नसल्याने पावडरचे दूध बाळाला द्यावे लागते. हीच गरज ओळखून 'आयएपी'च्या नाशिक शाखेने ह्यूमन बँक स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ मातेचे दूध सुरक्षितरित्या साठवून ठेवणे शक्य होणार आहे. हे दूध स्टोअरेजशिवाय आठ ते दहा तास सुरक्षित राहू शकते. त्याचा लाभ शहरातील हॉस्पिटलमधील गरजू बालकांना निश्चितपणे होऊ शकतो. या बँकेत मिल्क साठवण्याच्या मशिनची किंमत १५ लाखांपेक्षा अधिक असून, त्यासाठी स्टाफ नेमण्यात येणार आहे. या बँकेतून बाळाला दूध उपलब्ध झाल्यास बाळाच्या आतड्यांची, शरीराची व मेंदूची योग्य वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच बाळ व मातेच्या प्रकृतीसाठी ही बँक वरदान ठरणार असल्याचे मत आयपीएच्या सदस्यांनी वर्तविले आहे.

...

मुंबई-पुण्यापाठोपाठ आता नाशिकमध्येही ह्यूमन मिल्क बँक स्थापन झाल्यास नवजात अर्भक आणि बालकांना मातेचे अंगावरील दूध मिळण्यास मदत होईल. त्यामुळे नैसर्गिक संगोपनास मदत होणार आहे. या बँकेतून मोफत दूध उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

\B- डॉ. संजय आहेर, अध्यक्ष, आयएपी नाशिक शाखा\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोसायटी नव्हे टुमदार गाव

$
0
0

सोसायटीत रहिवाशी जेवढे तितका गोंधळ अधिक हा समज पार्कसाईड दूर करते. जेवढे रहिवाशी अधिक तेवढा आनंद अधिक याची प्रचीती ही सोसायटी देते. पार्कसाईडच्या आवारात दोन हजार लोकसंख्येचे टुमदार छोटे गावच वसले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कला, संस्कृती, क्रीडा व आरोग्य अशा सर्वच क्षेत्राशी संबंधित उपक्रम या सोसायटीमध्ये राबविले जातात.

....

वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच एकत्रित राहण्याचा आनंद पार्कसाईड इमारतीतील नागरिक गेली अनेक वर्षे घेत आहेत. वडाळा पाथर्डीरोडवर तब्बल साडेचारशे कुटुंब एकत्र राहत आहेत. अकरा इमारतींची मिळून ही सोसायटी असली तरी या सोसायटीत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कारभार केला जातो. रहिवाशांनी निवडलेले २२ पदाधिकारी सोसायटीचा कारभार सांभाळत असले तरी त्यांना अन्य सर्वच रहिवाशांची भक्कम साथ लाभते.

वडाळा-पाथर्डी रोडवर इंदिरानगरपासून जवळच पार्कसाईड प्रकल्प आहे. या प्रकल्पात एकूण ११ इमारती आहेत. त्यांना ए, बी, सी, डी याप्रमाणे नावे देण्यात आली आहेत. या प्रकल्पाचा परिसर नयनरम्य असून, रहिवाशांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. इमारतीचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी काही लोकांची कार्यकारिणी तयार करून त्यांच्यावर या परिसराची धुरा सोपविणे आवश्यक होते. त्यानुसार सर्व सहमतीने २२ जणांची समिती स्थापन करण्यात आली. अकरा इमारती असल्याने प्रत्येक इमारतीमधील दोन सदस्यांना पदाधिकारी म्हणून या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. या सोसायटीत प्रत्येक महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचे नियोजन नियोजन वर्षाच्या सुरुवातीलाच करण्यात येते. जानेवारीत मकरसंक्रांतीपासून या कार्यक्रमांची सुरुवात होते. मकरसंक्रांतीला रहिवाशी एकत्र येऊन पतंग उडविण्याचा आनंद लुटतात. विशेष म्हणजे पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्यात येते. नायलॉन मांजाचा वापर कटाक्षाने टाळला जातो. बच्चेमंडळींमध्ये त्याबाबत प्रबोधन केले जाते. सायंकाळी सोसायटीत तीळगूळ वाटपाचा सामूहिक कार्यक्रम होतो. प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीला सोसायटीच्या आवारात ध्वजारोहन केले जाते. त्याकरिता सैन्य दलातील निवृत्त अधिकाऱ्यांना निमंत्रित केले जाते. ज्येष्ठ नागरिकांनाही ध्वजारोहन करण्याचा मान दिला जातो. सोसायटीत आयोजित कार्यक्रमांत महिलांचा सहभाग असतो. येथे महिलांचे स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात आले असून, हे मंडळ विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, महाशिवरात्री, विविध महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीदिनी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

या सोसायटीत सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. दरवर्षी १५ ते ३० डिसेंबर या कालावधीत येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यांतर्गत टेबल टेनिस, लॉन टेनिस, स्लो सायकलिंग, कॅरम, बुद्धिळ याबरोबरच मॅरेथॉन स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते. येथील महिलांची क्रिकेट टीम असून, क्रिकेटचे सामनेही घेतले जातात.

...

३६०० जवानांना पाठविल्या कलाकृती

सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोसायटीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. चित्र, काव्य, कविता, पत्र सैन्य दलातील जवानांना पाठविण्यात येतात. अलीकडेच सुमारे ३ हजार ६०० जवानांना अशा कलाकृती पाठविण्यात आल्या. अनेक सैनिकांनी सोसायटीकडे पत्राद्वारे त्याबाबतची कृतज्ञताही व्यक्त केली.

-

पणती पौर्णिमेला तब्बल १२०० पणत्या पेटवून त्यातून महाराष्ट्राचा नकाशा साकारण्यात आला होता. याचबरोबर या सोसायटीत कोजागिरी पौर्णिमेला अंताक्षरी स्पर्धा घेण्यात येते. विजेत्या स्पर्धकाला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येते. याबरोबरच मतदार नोंदणी अभियान, रक्‍तदान शिबिर, मोफत वाचनालय, पाडवा पहाट यासारखे उपक्रम सोसायटीमध्ये दरवर्षी राबविले जातात.

-

सांडपाण्याने फुलवली झाडे

या सोसायटीतील सांडपाण्याचा वापरही योग्य प्रकारे करवून घेतला जातो. सोसायटीतील रहिवाशी अरुण पाटील सोसायटीतील उद्यानाच्या देखभालीकडे विशेष लक्ष पुरवितात. सोसायटीच्या बाहेर मुख्य रस्त्यावरील दुभाजकाच्या मधोमध असलेल्या झाडांना सांडपाणी दिले जाते.

-

सोसायटीची कार्यकारिणी

दिगंबर मोरे (अध्यक्ष), प्रवीण वारुंगसे (उपाध्यक्ष), डॉ. दीपक कोतकर (सचिव), प्रदीप देव, सविता लोणारे, निशा भारबट, नीता आचारी यांसह आणखी काही पदाधिकारी सोसायटीचा कारभार पाहण्यात सर्वतोपरी योगदान देतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाख मतदारांना स्मार्ट ओळखपत्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील दोन लाख मतदारांचे स्मार्ट निवडणूक ओळखपत्र निवडणूक शाखेकडे आले आहे. हे ओळखपत्र वाटपासाठी निवडणूक शाखेतर्फे विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नव्याने नोंदणी केलेल्या नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) नवीन स्मार्ट निवडणूक ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी केले आहे

जिल्ह्यातील एकूण २ लाख ६ हजार १५६ स्मार्ट ओळखपत्र विधानसभा मतदारसंघनिहाय वितरीत करण्यात येणारे आहेत. यात नांदगाव १२ हजार ३७१, मालेगाव मध्य २३ हजार ६१५, मालेगाव बाह्य १२ हजार ७७८, बागलाण १२ हजार ८४१, कळवण-सुरगाणा ९ हजार ९२५, चांदवड-देवळा ९ हजार २९३, येवला ११ हजार १४७, सिन्नर ११ हजार ९१७, निफाड ११ हजार ३२५, दिंडोरी-पेठ १४ हजार ४५२, नाशिक पूर्व २० हाजर ४७, नाशिक मध्य १८ हजार २७८, नाशिक पश्चिम १५ हजार ५, देवळाली १२ हजार १६७ आणि इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात १० हजार ९९५ ओळखपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय पातळीवर जोरदार तयारी करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यावर सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण झालेल्या क्षेत्राचे आणि ठिकाणांचे सर्वेक्षण होणार असून, निवडणूक जाहीर झाल्यावर त्याबाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आदेशही देण्यात आले आहे. निवडणुकीदरम्यान असे आढळल्यास गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. न्यायालयाने फरार घोषित केलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी आवश्यक माहिती पोलिस विभागाकडून मागविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गरोदर महिला पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

$
0
0

पती, सासू, सासऱ्यावर गुन्हा दाखल

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

प्रसूतीसाठी सासरी आलेल्या महिला पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. प्रेयसीच्या कारणावरून पती, सासू, सासऱ्याने अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार विवाहीत महिला पोलिसाने दिली आहे. उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

दीपाली आशिष बेलदार (वय २६, रा. एकविराआई दर्शन सोसायटी, कल्याण वेस्ट, ठाणे, हल्ली रा. इंद्रधनु अपार्टमेंट, उत्तरानगर, बोधलेनगर, नाशिकरोड) यांनी सासरच्यांविरोधात तक्रार दिली आहे. मुंबई मुख्यालय येथे सशस्त्र पोलिस दलात कार्यरत असून, बाळंतपणासाठी सासरी आली होती. दि. ७ मार्चला घरी असताना रात्री अकराच्या सुमारास पतीच्या मोबाइलवर राखी नावाच्या महिलेचा फोन आला व तुमचे पती आशिष यांच्यासोबत माझे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. तुम्ही परत आमच्या दोघांमध्ये येऊ नका, असे सांगून फोन बंद केला. दीपाली यांनी दुसऱ्या दिवशी (दि. ८) सायंकाळी पती आशिष, सासू पुष्पा वसंत बेलदार, सासरे वसंत बेलदार यांना हा प्रकार सांगितला असता, त्यांना याचा राग आला. त्यांनी दीपाली यांना बेडरूममध्ये कोंडून मारहाण केली. अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. हे सर्वजण घर बंद करून निघून गेले. जीव वाचविण्यासाठी दीपाली यांनी आरडाओरड केली असता, काही नागरिकांनी घराचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले. या तक्रारीनुसार पोलिसांनी दीपाली यांच्या सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास उपनगर पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंपळकर राजीनामा देणार?

$
0
0

धुळे मनपाच्या उपमहापौर नाराज

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेत उपमहापौरपदाला कोणतेही घटनात्मक अधिकार नाहीत, त्यामुळे अधिकारच नसतील तर पदावर राहून काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित करून उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी शुक्रवारी (दि. ८) आपली नाराजी व्यक्त केली. नेमक्या महिला दिनाच्या सायंकाळीच उपमहापौर कल्याणी अंपळकर राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

धुळे महापालिकेच्या उपमहापौर कल्याणी अंपळकर या आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतानाचे चित्र आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारच्या सुमारास महापालिकेतील आरोग्य विभागाच्या भरती संदर्भात निवेदन देण्यासाठी त्या महापालिकेत आल्या. प्रशासनातील अधिकाऱ्यांसह माध्यमांतील प्रतिनिधींना म्हणाल्या की, महापालिकेत भाजपची सत्ता असून, उपमहापौरपदाची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. परंतु अधिकारांचे काय, आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेलो असता त्यांना उपमहापौरांच्या अधिकारांबाबत विचारणा केली. त्यांनी उपमहापौरपदाला कोणत्याही प्रकारचे घटनात्मक अधिकार नसल्याचे सांगितले. पद असूनही कामाचा पाठपुरावा करताना प्रशासकीय स्तरावर अनेक अडथळे येत आहेत. उपमहापौरपदाला अधिकारच नसतील तर हे पद काय मिरवायचे आहे का, यांसारखे अनेक प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केले.

अधिकार नसतील तर उपयोग काय?
केवळ महापौरांच्या बाजूला बसणे आणि कार्यक्रमांना उपस्थित राहणे एवढेच उपमहापौरांचे काम आहे का? कोणत्याही प्रकारचे अधिकार नसतील तर त्या पदावर राहून काय उपयोग? त्यापेक्षा पद सोडलेले बरे, असे सांगत अंपळकर यांनी आपली नाराजीला वाट मोकळी करून दिली. या पदाला अधिकार मिळावेत, यासाठी आपला संघर्ष असून, यासंदर्भात मंत्री डॉ. सुभाष भामरे, महापौर, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे भूमिका मांडली आहे. शिवाय अन्य महिला नगरसेविकांनाही मनपा प्रशासनाकडून डावलले जात असल्याचे सांगून अंपळकर यांनी आपल्या भूमिकेला काही महिला नगरसेविकेचा पाठिंबा असल्याचे नमूद केले. परंतु, आपण राजीनामा देणार असल्याची चर्चा असली तरी तीन महिने अजून वाट पाहू त्यानंतर निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी मनपामधील कामकाजाविषयीच्या तक्रारीसह इतर बाबतीत कोणतेही लेखी माझ्याकडे दिलेले नाही. मी पक्षात असून, मनपा चालवित नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागते. माझ्याकडे आलेल्या तक्रारीचे तत्काळ निवारण करण्यात येईल.
-अनुप अग्रवाल, महानगरध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइक रॅली - चौकटी

$
0
0

क्षणचित्रे

'रॅली'चे रंगले सेलिब्रेशन

- सकाळी ६.४५ वाजेपासून बाइक रॅलीत सहभागी होण्यासाठी महिलांची ईदगाह मैदानावर गर्दी होऊ लागली.

- सकाळी ७ वाजता सजवलेल्या बाइकसह रॅलीत जल्लोष करण्यासाठी महिला सज्ज झाल्या.

- सकाळी ७.१५ वाजता शहरातील मान्यवरांची रॅलीत उपस्थिती.

- सकाळी ७.२० वाजता प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर रॅलीसाठी येताच महिलांचा जल्लोष.

- सकाळी ७.४५ वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ.

- रॅलीस प्रारंभ झाल्यानंतर नारीशक्तीच्या शौर्याला सलाम करत महिलांचा जल्लोष.

- जवानांच्या पत्नींना सलाम करण्यासाठी 'भारत माता की जय'चा जयघोष.

- अतिशय शिस्तबद्धरित्या रॅलीतून सामाजिक विषयांवर भाष्य करणारे फलक उंचावले गेले.

- सकाळी ८.३० वाजता रॅलीच्या मार्गावरुन आलेल्या बाइकर्णी पुन्हा ईदगाह मैदान येथे पोहोचल्या.

- सकाळी ८.४५ वाजता हिंदी मराठी गाण्यांच्या तालावर झुम्बा करत महिला थिरकल्या.

- सकाळी ९ वाजता 'बेस्ट' पारितोषिकांचे वितरण.

- सकाळी ९.१५ ला पुन्हा झुम्बा नृत्य करत बाइक रॅलीचा धमाकेदार समारोप करण्यात आला.

--

शहिदांना मानवंदना

सीमेवर तैनात जवान आणि सैन्याधिकाऱ्यांची खरी ताकद असलेल्या त्यांच्या पत्नींना सलाम करण्यासाठी बाइकर्णींनी रॅलीत शहिदांना मानवंदना दिली. त्यासाठी बाइकर्णी जवानांच्या वेशात सहभागी झाल्या. काही बाइकर्णींनी बाइक्सवर 'मेरा भारत महान', 'भारतीय जवानांचा विजय असो', 'भारतीय सैन्याचा विजय असो', 'शहीद जवान अमर रहे', असे फलक लावले होते. त्यावेळी बाइकर्णींनी महिलांच्या शौर्याला सलाम करताना शहिदांना मानवंदना वाहिली.

--

साकारल्या व्यक्तिरेखा

यंदा बाइक रॅलीत फक्त वेशभूषेवर भर देण्यात आला नव्हता, तर बाइकर्णी विविध व्यक्तिरेखा साकारत सहभागी झाल्या. पूनम दंडगव्हाळ यांनी वायूदलाचे जवान 'अभिनंदन' यांची वेशभूषा साकारत इतर बाइकर्णींचे लक्ष वेधले. तर, प्रतिभा पवार आणि दीपाली देवकर यांनी आनंदी आणि गोपाळ जोशी यांची व्यक्तिरेखा साकारली. त्यांच्यासह इतर बाइकर्णी ऐतिहासिक वेशभूषा करत रॅलीत सहभागी झाल्या.

--

'सई'चे 'इन्स्टा' अपडेट

सई लोकूर रॅलीत उपस्थित होताच, तिने इन्स्टाग्रामवर बाइक रॅलीच्या पोस्ट अपलोड करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला 'फ्लॅग ऑफ ऑल वूमेन पॉवर बाइक रॅली' असे लिहित सईने फोटो अपलोड केला. रॅलीला प्रारंभ होण्यापूर्वी बाइकवर होत सईने पोस्ट अपलोड केली. त्यानंतर पुन्हा मैदानात आल्यानंतर सईने बाइकर्णींसोबत घेतलेले अनेक सेल्फी इन्स्टावर अपलोड केले. बाइकर्णी झुम्बा करत असतानाचा व्हिडिओदेखील सईने अपलोड केला. त्यामुळे नाशिकच्या बाइकर्णींच्या उत्साहाला उधाण आले होते.

--

वेशभुषेत वैविध्य

बाइक रॅलीत सहभागी झालेल्या बाइकर्णींनी पारंपरिक वेशभूषेपासून तर वेस्टर्न आऊटफिटपर्यंतची फॅशन फॉलो केली. मराठमोठ्या फेट्यांसह राजवाडी फेटे, गांधी टोपी, ट्रॅव्हल कॅप, रेट्रो कॅप परिधान करत बाइकर्णी रॅलीत सहभागी झाल्या. नववारी साडीसह प्रोफेशन लूक अन् रायडर्सच्या वेशात आलेल्या बाइकर्णींनी लक्ष वेधून घेतले. विविध प्रकारच्या फॅशन फॉलो करत, एकमेकींना टशन देण्यात आली.

--

बाइक्सची व्हरायटी

महिलांची बाइक राइड फक्त मोपेड पुरतीच मर्यादित राहिली नसल्याचे बाइक रॅलीत प्रकर्षाने जाणवले. मोपेडसह बुलेट, रॉयल इन्फिल्ड, यामाहा आर एक्स १०० या विंटेज बाइक घेऊन बाइकर्णी वेगावर स्वार झाल्या. करिझ्मा, केटीएम ड्यूक, एफझी या स्पोर्ट बाइकलाही बाइकर्णींनी पसंती दिली. स्पोर्टस् बाइक्स असूनही रॅलीत बाइकर्णींचे वेगावर नियंत्रण कायम होते. त्यामुळे उत्साहाच्या जोडीला रॅलीत बाइक्सची व्हरायटी दिसून आली.

--

महिला पोलिसांची शान

मोठ्या ऐटीत रॅलीत शहर पोलिस आयुक्तालयातील महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक सहभागी झाले. महिला पोलिसांची शान दाखवत त्यावेळी हेल्मेट वापरा, सीट बेल्ट लावा, वाहन चालविताना मोबाइलचा वापर टाळा यासह वाहतुकीचे सर्व नियम पाळा, असे प्रबोधन करण्यात आले. बाइक रॅलीचे नेतृत्व महिला पोलिस अधिकाऱ्यांनी केले तर, रॅलीच्या अखेरीसही महिला कर्मचारी बाइकवर स्वार होऊन महिलांच्या शौर्याला सलाम करीत होत्या. महिला पोलिसांच्या या सहभागामुळे बाइकर्णींचा जल्लोष अधिक वाढला होता.

--

आनंदाला आले भरते

बाइक रॅली पुन्हा मैदानात आल्यानंतर बाइकर्णींच्या आनंदाला भरती आली. हिंदी मराठी गाण्यांवर तरुणींसह सर्व महिलांनी झुम्बा केला. नवीन डान्स अॅकॅडमीच्या झुम्बा प्रशिक्षकांनी महिलांना थिरकायला लावले. त्यावेळी सईनेदेखील महिलांसोबत काही स्टेप्स फॉलो केल्या. रॅलीत प्रबोधन केल्यानंतर झुम्बा नृत्याने बाइकर्णींनी रॅलीची उत्साहात सांगता केली.

--

या ठरल्या 'बेस्ट'

बेस्ट ग्रुप : देशप्रेमी ग्रुप

बेस्ट कॉस्च्युम : प्रतिभा पवार, दीपाली देवकर

बेस्ट मेसेज : हॅप्पी टू ब्लीड ग्रुप

बेस्ट डेकोरेटेड बाइक : अल्पना झवेरी, साक्षी टर्ले आणि मनीषा पाटील

बेस्ट डेकोरेटेड हेल्मेट : वृषाली लिटे

विशेष गौरव : आरोग्यधाम योगा ग्रुप, नाशिकरोड

विशेष सत्कार : नलिनी कड (४२ किलोमीटर मॅरेथॉन रनर)

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपशी मनोमिलनाचा शिवसेनेचा मुहूर्त निघेना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदार संघात ऐनवेळी शिवसेनेमधील अंतर्गत वाद उफाळून येऊ नये, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत आणाभाका घेत पदाधिकाऱ्यांनी मनोमिलन झाल्याचे सांगत एकीचे दर्शन दाखवले. 'पक्ष जो उमेदार देईल, त्याच्या पाठीशी उभे राहू,' असा शब्दही पक्ष प्रमुखांना दिला असला तरी शिवसेनेतील अंतर्गत वाद सुप्तपणे आजही सुरूच आहे. त्यात भाजपशी असलेले राजकीय हाडवैरही या निवडणुकीत परिणामकारक ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे मनोमिलन आवश्यक असताना शिवसेना आपल्याच पक्षातील लोकांना गोंजारण्यातच व्यस्त आहेत.

शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यावर असलेली पदाधिकाऱ्यांची नाराजी उघड असल्यामुळे या मनोमिलन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले जिल्हाध्यक्ष विजय करंजकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे आमदार योगेश घोलप, शिवसेनेचे महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवेसह तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यात सर्वांनी शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षप्रमुखांनीही नाशिकमध्ये काय चालू आहे, याची मला माहिती असल्याची कल्पनाही यावेळी पदाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे तिकीट आपल्यालाच मिळेल, अशा आशेवर सर्वांनी एकीचे दर्शन घडवले.

गरज भाजपच्या मनोमिलनाची

नाशिक लोकसभा मतदार संघात नाशिक पूर्व, पश्मिच व मध्य असे तीन विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. तर सिन्नर, देवळाली येथे शिवेसना तर इगतपुरी येथे काँग्रेसच्या आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला भाजपच्या आमदारांना बरोबर घेऊन काम करणे अवघड आहे. त्यात महानगरपालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात आहे. येथे तर शिवसेनाच मुख्य विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे शिवसेनेला भाजपबरोबर मनोमिलन करण्यासाठी प्रयत्न करण्याची अगोदर गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धूम..धमाल...धमाका...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरजरी पैठणी, बांधणीची साडी, दागदागिने आणि डोक्यावर मराठमोळा फेटा परिधान केलेल्या बाइकर्णी भल्या सकाळी साडेसहा वाजेपासून ईदगाह मैदानावर एकत्र येऊ लागल्या. पावणेसात वाजता हजारो बाइकर्णी आणि त्यांच्या सजविलेल्या बाइक्सनी ईदगाह मैदान फुलून गेले. पारंपरिक वेशात आलेल्या महिलांनी सर्वप्रथम सैन्यातील जवानांच्या पत्नींना सलाम केला. कुणी बाइक सजवत, कुणी हेल्मेटच्या माध्यमातून तर, काहींनी सैनिकांचा वेश परिधान करत जवानांना मानवंदना दिली. 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'ऑल वूमेन पॉवर रॅली'तून बाइकर्णींच्या उत्साहाला उधाण आले होते.

रविवारी सकाळी ७.४५ वाजता ईदगाह मैदानावरून बाइक रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत तरुणींसह विविध वयोगटातील शेकडो महिला सहभागी झाल्या. कुणी नऊवारी साडी, फेटा, नथ, हातात पाटल्या, बाजूबंद, कमरेला छल्ला असा पारंपरिक मराठमोळा पेहराव केला, तर काहींनी रायडिंग ग्लोज, हेल्मेट, जॅकेट परिधान करीत प्रोफेशनल बाइक रायडर्सचे दर्शन घडविले. बाइक रायडर्सचा वेश केला. काही महिला टी-शर्ट परिधान करीत रॅलीत सहभागी झाल्या. रॅलीसाठी सर्व एकत्र जमल्यानंतर एकमेकींच्या बाइकची अन् पेहरावाची स्तुती केली जात होती. बाइकर्णींच्या काही समूहांनी जवानांच्या पत्नींना सलाम करण्यासाठी सैनिकांचा वेश परिधान केला होता. 'भारतीय सैन्याचा विजय असो', 'वीरपत्नींना सलाम', अशा घोषणा देण्यात आल्या. रॅलीच्या वातावरणात उत्साहाबरोबरच देशभक्ती, भावनिकतेचेही दर्शन घडले.

सामाजिक संदेश

रॅलीला सुरुवात झाल्यानंतर सामाजिक संदेश देणारे फलक बाइकर्णींनी उंचावले. 'वाहन चालवताना मोबाइलचा वापर टाळा', 'पर्यावरण वाचवा', 'पाण्याची गरज ओळखा' यासह 'हॅपी टू ब्लीड', 'सॅनिटरी नॅपकिनची योग्य विल्हेवाट लावा', 'महिलांचा सन्मान करा', 'भारतीय सैन्याला सलाम', 'शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य सांभाळा', 'डिजिटल डाएट करा', असे संदेश देत महिला बाइकवर स्वार झाल्या. रॅलीच्या सुरुवातीला महिला पोलिस नेतृत्व करीत होत्या. त्यांच्या मागे बाइकर्णी अतिशय शिस्तबद्ध रीत्या बाइक चालवत होत्या. रॅलीदरम्यान हॉर्न वाजवण्यात आले नाहीत.

झुम्बाचा जल्लोष अन् सेल्फीची क्रेझ

ईदगाह मैदानात रॅली पुन्हा आल्यानंतर बाइकर्णींनी एकच जल्लोष केला. येथे जमल्यानंतर झुम्बाच्या तालावर विविध गीतांवर सर्व बाइकर्णी थिरकल्या. लहान मुलींसह वृद्ध् महिलांनीही नृत्याचा आनंद लुटला. या रॅलीतून महिलांनी आत्मविश्वास आणि एकता यांचे दर्शन घडवले. अभिनेत्री सई लोकूर हिच्यासोबत सेल्फी घेत बाइकर्णींनी सोशल मीडियावर हा अविस्मरणीय क्षण शेअर केला. सईनेदेखील बाइकर्णींसोबत इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला. त्यामुळे बाइकर्णींच्या उत्साहाला उधाण आले. पहाटेपासून बाइकर्णींमध्ये असलेला उत्साह वाढताच होता. बक्षीसवितरणानंतर अल्पोपहाराचा आस्वाद घेत या उपक्रमाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

$
0
0

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

विद्यमान खासदार - हरिश्चंद्र चव्हाण (भाजप)

मतदार संख्या २०१९ - १७,१,०४०

असा आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

विधानसभा मतदारसंघ - विद्यमान आमदार - पक्ष - मतदार संख्या

नांदगाव - पंकज भुजबळ - राष्ट्रवादी काँग्रेस - ३,१२,४३७

येवला - छगन भुजबळ - राष्ट्रवादी काँग्रेस - २,८८,३४८

दिंडोरी - नरहरी झिरवाळ - राष्ट्रवादी काँग्रेस - २,९९,०९६

कळवण - जीवा पांडू गावीत - माकप - २,६४,७५९

चांदवड - डॉ. राहुल आहेर - भाजप - २,७५,८४४

निफाड - अनिल कदम - शिवसेना - २,६०,५५६

२०१४ लोकसभेचा निकाल

उमेदवार- मिळालेली मते

हरिश्चंद्र चव्हाण (भाजप) - ५,४२,७८४

डॉ. भारती पवार (राष्ट्रवादी) - २,९५,१६५

ज्ञानेश्वर दामू माळी (आप) - ४,०६७

आतापर्यंतचे खासदार - पूर्वीचा मालेगाव आणि आताचा दिंडोरी मतदारसंघ

१९५७-६२ - यादव नारायण जाधव (प्रजा सामाजिक पक्ष)

१९६२-६७ - एल. एल. जाधव (काँग्रेस)

१९६७-७१- झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)

१९७१-७७ - झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)

१९७७-८० - हरिभाऊ महाले (जनता पक्ष)

१९८०-८४ - झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)

१९८४- ८९- सीताराम सयाजी भोये (काँग्रेस)

१९८९-९१ - हरिभाऊ महाले (जनता दल)

१९९१-९६ - झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)

१९९६-९८- कचरुभाऊ राऊत (भाजप)

१९९८-९९ - झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)

१९९९-२००४ - हरिभाऊ महाले (जनता दल)

२००४-२००९ - हरिश्चंद्र चव्हाण (भाजप)

२००९- २०१४- हरिश्चंद्र चव्हाण (भाजप)

२०१४-१९ - हरिश्चंद्र चव्हाण (भाजप)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे लोकसभा मतदारसंघ

$
0
0

धुळे लोकसभा मतदारसंघ

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य, मध्य व बागलाण अशा तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. २००९ मध्ये मालेगाव लोकसभा मतदारसंघात बदल करून धुळे लोकसभा मतदार संघ करण्यात आला.

विद्यमान खासदार - डॉ. सुभाष भामरे (भाजप)

विधानसभा - विद्यमान आमदार - पक्ष - मतदार संख्या

मालेगाव मध्य - असिफ शेख - काँग्रेस - २,८१,४५८

मालेगाव बाह्य- दादा भुसे - शिवसेना - ३,३२,०१८

बागलाण - दीपिका चव्हाण - राष्ट्रवादी - २,७२,६१६

आतापर्यंतचे खासदार

२००९-१४ - प्रतापराव सोनवणे (भाजप)

२०१४- १९ - डॉ. सुभाष भामरे (भाजप)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावाना वाङ्मयीनपुरस्कारांचे १५ला वितरण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्या १७९ व्या वार्षिक समारंभानिमित्त देण्यात येणारे विविध वाङ्मयीन

पुरस्कार घोषित झाले आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. कौतीकराव ढाले-पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी १५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

ललितेतर ग्रंथासाठी देण्यात येणारा डॉ. वि. म. गोगटे स्मृती पुरस्कार सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमाचे निर्माते रविराज गंधे यांच्या 'माध्यमरंग' या पुस्तकास देण्यात येणार आहे. पु. ना. पंडित पुरस्कार अंबरनाथ येथील डॉ. किरण येले यांनी लिहिलेल्या 'मोराची बायको' या लघुकथा संग्रहास देण्यात येणार आहे. उमेदीने लेखन करणाऱ्यांना डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार दिनकर कुटे यांना देण्यात येणार आहे. अशोक देवदत्त टिळक स्मृती पुरस्कार येवला येथील प्रा. गो. तु. पाटील यांनी लिहिलेल्या 'ओल अंतरीचे' या आत्मचरित्राबद्दल देण्यात येणार आहे. मु. ब. यंदे स्मृती पुरस्कार नाशिक येथील संत साहित्याचे अभ्यास प्रा. डॉ. यशवंतराव पाटील यांनी लिहिलेल्या 'संस्कारांचा अमृतकलश' या सामाजिक ग्रंथाबद्दल देण्यात येणार आहे. कै. धनंजय कुलकर्णी स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अभिजित कुलकर्णी यांनी लिहिलेल्या 'रेडटेप' कादंबरीस दिला जाणार आहे. ग. वि. अकोलकर स्मृती पुरस्कार अकोले येथील शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांना 'माझी शिक्षण परिक्रमा' या पुस्तकाबद्दल देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप ५००० रुपये, धनादेश स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे आहे. वाङ्मयीन पुरस्कार निवड समितीमध्ये प्रा. अनंत येवलेकर, प्रा. डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. सुनील कुटे, प्रकाश वैद्य, प्रा. डॉ. भास्कर ढोके, विवेक उगलमुगले यांनी काम पाहिले. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सावानाचे सांस्कृतिक कार्य सचिव प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि. प. शाळा आजपासून सकाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात उन्हाळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. यंदा दुष्काळाचे सावट असल्याने पाणी टंचाईची समस्याही निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात आला होता. आजपासून (दि. ११ मार्च) नवीन वेळेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सकाळी ७.५० ते दुपारी १.०५ या वेळेत या शाळा भरणार आहेत. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ सकाळी ११ ते दुपारी ५ होती.

यंदा पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याची टंचाईची समस्या जाणवणार असल्याची मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. गावा-गावांमध्ये तर दुष्काळाची झळ जाणवण्यास सुरुवातही झाली आहे. दुपारच्या वेळी उष्णता वाढलेली असते. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी शाळा सकाळ सत्रात करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार नियोजित अभ्यासक्रमाच्या तासिकांमध्ये कोणताही बदल होणार नसून, पूर्वीप्रमाणेच त्या सुरू राहणार आहेत. अभ्यासक्रमांचे वेळापत्रक गटशिक्षणाधिकारी यांनी निश्चित करायचे असून, त्याप्रमाणे शालेय कामकाज होते की नाही याची क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी सांगितले.

\Bशिक्षकांना शाळेतच थांबावे लागणार

\Bप्राथमिक शिक्षकांनी शाळेबाहेरील चिंतन व अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी शाळा सुटल्यावर विद्यार्थी गेल्यानंतर दररोज पुढील अडीच तास शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. २९ एप्रिल २०११च्या शासननिर्णयानुसार शिक्षकांनी हा वेळ पुढील तासिकांच्या तयारीसाठी देणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थी जरी १.०५ वाजता शाळेतून बाहेर पडले असले तरी शिक्षक सोमवार ते गुरुवारपर्यंत ३.४५ वाजेपर्यंत शाळेतच असणार आहेत. तसेच शुक्रवारी ३.३५ वाजेपर्यंत व शनिवारी २.३५ वाजेपर्यंत शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ ४१ लाखांत २२ जणांना टोपी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लाचखोरीच्या गुन्ह्यात जिल्हा कोर्टात शिक्षा लागलेल्या २२ जणांनी ४१ लाख १५ हजार रुपयांची रक्कम हायकोर्टात सेटिंग करून देण्याचा दावा करणाऱ्या वकिलाला दिल्याचे समोर आले आहे. यात ९५ टक्के व्यक्ती या पोलिस खात्यातील असून, उर्वरितांमध्ये महसूल, महापालिका आणि इतर विभागांचा समावेश आहे.

या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मनोहर वाघ, त्याचे वडील महिपती वाघ आणि आई दुर्गा वाघ (सर्व रा. इंदिरानगर) अशा तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अंबादास मुरलीधर भालेराव (रा. जुना जकात नाका, पंचवटी) यांनी तक्रार याबाबत तक्रार दिली. मात्र, या घटनेत अंबादास भालेराव यांचा एकट्याचा संबंध नसून, लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आणि जिल्हा कोर्टाच्या निकालाविरुद्ध हायकोर्टात अपिलात गेलेल्या २२ जणांचा समावेश आहे. आपले मुंबई हायकोर्टातील विविध व्यक्तींशी संपर्क असून, या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता करण्यासाठी वकील मनोहर वाघ याने या २२ जणांकडून वेळोवेळी ४१ लाख १५ हजार रुपये उकळले. पैसे घेऊनही काम होत नसल्याचे लक्षात आल्याने या सर्वांनी पैशांसाठी तगादा सुरू केला. मात्र, पैसे मागू नका, अन्यथा आम्ही आत्महत्या करून तुमच्याविरूद्ध तक्रारी दाखल करू, अशी धमकी दिल्याचे भालेराव यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत भालेराव यांनी सांगितले की, मी तीन लाख रुपये दिले. सध्या मी आडगाव परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. भालेराव हे महापालिकेत लिपिक म्हणून कार्यरत असताना त्यांना गाळा अनामत रक्कम करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना अटक झाली होती. लाचखोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आलेल्या २२ जणांकडून संशयित वाघने पैसे उकळले असून, त्यामुळेच ही एकत्रित फिर्याद दिल्याचे भालेराव यांनी स्पष्ट केले.

एसीबीच्या भूमिकेकडे लक्ष

नाशिकमध्येच नव्हे तर राज्यात असा प्रसंग प्रथमच समोर आला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. सेटिंगबाबत सर्वच स्तरावर चर्चा होत असते. मात्र, तसे तांत्रिक पुरावे कधीही समोर येत नाहीत. त्यामुळे त्याकडे कानाडोळा केला जातो. या प्रकरणात एका वकिलाने थेट हायकोर्टाचा हवाला देत थेट संशयित लाचखोर पोलिस आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ४१ लाख रुपये उकळल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले. काही महिन्यांपूर्वी जिल्हा कोर्टातून एका गाजलेल्या खटल्यातील मूळ फिर्यादच चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेचा तपास सरकारवाडा पोलिस सध्या करीत आहेत. एसीबीच्या लाचखोरीच्या गुन्ह्यात मूळात शिक्षा होण्याचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांच्या आत असते. १०० पैकी ८० ते ८५ संशयित कोर्टात निर्दोष सुटतात. या पार्श्वभूमीवर एसीबीने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, असे मत व्यक्त केले जाते आहे.

हा लाचखोरीचाच प्रकार!

लाचखोरीचे प्रकरण सतत समोर येतात. अगदी वर्ग तीनपासून वर्ग एकपर्यंत, खासगी व्यक्ती, लोकप्रतिनिधी अशांना अटक होते. मात्र, यामुळे लाचखोरीच्या प्रकरणांना आळा बसतो असे नाही. जिल्हा कोर्टाने दोषी ठरविलेले संशयित एकत्र येतात आणि एका वकिलामार्फत हायकोर्टाला मॅनेज करण्याचा प्रयत्न करतात, हासुद्धा लाचखोरीचा प्रकार असल्याचे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौक्यांतही सीसीटीव्ही!

$
0
0

नाशिक : शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांसह पोलिस चौक्यांमध्ये लवकरच सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन कमिटीमार्फत २५ लाखांच्या निधींची तरतूदसुद्धा करण्यात आली असून, यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

सविस्तर वृत्त... नाशिक प्लस १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीव्ही, वाहिन्यांचे आयुष्य फार कमी

$
0
0

आयटी उद्योजक दीपक घैसास यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तंत्रज्ञानातील बदलांनुसार व्यवसायाच्या संधीदेखील बदलत आहेत. एकेकाळी टीव्हीला तर सध्या विविध वाहिन्यांना चांगलीच पसंती आहे. परंतु नव्या पिढीला त्यांच्या सोयीनुसार सर्वकाही मोबाइलवर उपलब्ध होऊ लागल्याने टीव्ही व वाहिन्यांचे आयुष्य फार कमी राहिले आहे. टेलीकॉम क्षेत्रात सध्या होत असलेल्या क्रांती प्रत्येकाचे जीवनमान बदलणारी ठरेल, असे प्रतिपादन आयटी उद्योजक व सल्लागार दीपक घैसास यांनी केले.

गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन महाविद्यालयातर्फे व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्प्यूटर सोसायटी ऑफ इंडियाचे श्रीकांत करोडे होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, प्रा.डॉ.साने उपस्थित होते.

घैसास म्हणाले, नवीन कंपन्या बाजारपेठेतील तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा फायदा घेत विकास साधतात. सध्या टीव्ही हे माध्यम लोकप्रिय ठरत असले तर मोबाइलवर कंटेंट उपलब्ध होत असल्याने काही वर्षांनी व्यवसायाचे स्वरूप बदललेले असेल. प्रेक्षकांच्या गरजेवर खरा उतरणाऱ्या कंटेंटची निर्मिती करतांना उद्योग व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमुद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images