Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कीर्ती कलामंदिरातर्फे रविवारी ‘रसयात्रा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कीर्ती कलामंदिर आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातर्फे रविवारी (दि. १०) सायंकाळी साडेसहा वाजता एकाच वेळी महाकवी कालिदास कलामंदिर, परशुराम सायखेडकर नाट्यगृह आणि कुसुमाग्रज स्मारक आा तीन ठिकाणी रसयात्रा या कुसुमाग्रजांच्या कवितांचा नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कीर्ति कला मंदिर, नाशिकमधील एक नामवंत कथ्थक नृत्य संस्था असून १९७६ मध्ये ज्येष्ठ नृत्यांगना गुरू रेखा नाडगौडा यांनी संस्थेची स्थापना केली आणि नाशिकच्या रसिकजनांसाठी नृत्यकलानुभवाचे वेगळे दालन उघडे झाले. तेव्हापासून विविध विषयांना केंद्रस्थानी ठेवून नृत्यसंरचना सादर करण्याची परंपरा संस्थेने आजतागायत जपली आहे. अशाच नृत्यसंरचनांमधील एक 'रसयात्रा' हा कार्यक्रम आहे. नाशिकचे नामवंत कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पद्मविभूषित स्व. वि. वा. शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज, ह्यांच्या कवितांवर आधारित कलाकृती आहे.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच दिवशी तीन ग्रुप्स तीन वेगळया ठिकाणी रसयात्रा सादर करणार आहेत. एकच संकल्पना असली तरी तीन ठिकाणी 'आदिरेखा' द्वयींनी सादरीकरणात विविधता ठेवली आहे. यामध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र सेवा संघ, फ्रावशी अॅकॅडमी यांच्यासह शहरातील अनेक शाळांचा महत्त्वाचा सहभाग असेल. तसेच १९८८ मध्ये केलेल्या पहिल्या प्रयोगातील 'आगगाडी-जमीन' प्रेक्षकांच्या पुनर्भेटीला येणार आहे.

नृत्यसंरचनाकार 'आदिरेखा' (रेखा नाडगौडा आणि अदिती पानसे) सह-दिग्दर्शन 'श्रीमधुर्वा' (श्रिया पांडे, मधुश्री वैद्य आणि दुर्वाक्षी पाटील),

संगीत कुमुदताई अभ्यंकर आणि बाळ भाटे तसेच निवेदन सदानंद जोशी, रेणुका येवलेकर, आनंद प्रभू हे करणार आहेत.

जुन्या आठवणींना उजाळा

तात्यासाहेबांच्या पंच्याहत्तरीनिमित्त १९८८ मध्ये रसयात्रेचा पहिला प्रयोग सादर केला. त्यांनी भरभरून कौतुक केलेल्या या कलाकृतीचे ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान सोहोळ्यात थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरही झाले. सगळ्या नाशिककरांसाठी हा अविस्मरणीय अनुभव होता. तात्यासाहेबांचे साहित्यातील अमूल्य योगदान पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करण्यासाठी पुन्हा 'रसयात्रा' करण्याचा विचार रेखा नाडगौडा यांच्या मनात आला. ज्यामध्ये काही नवीन कवितांचाही समावेश करण्यात आला आहे.

लोगो : कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावी विरोधकांचा सभात्याग

$
0
0

महासभेत गठबंधनच्या नगरसेवकांच्या तोंडाला पट्ट्या

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेत पाणीपट्टीवरून विरोधी महागठबंधन आघाडीच्या नगरसेवकांनी निदर्शने करीत काँग्रेसकडून सभागृहात विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला. मंगळवारी पालिकेच्या सभागृहात आयोजित विशेष महासभेत देखील याच विषयावरून महागठबंधन आघाडीचे गटनेते बुलंद इक्बालयांच्यासह सर्व नगरसेवकांनी तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध करीत सभात्याग केला.

येथील साथी निहाल अहमद सभागृहात महापौर शेख रशीद, उपमहापौर सखाराम घोडके, नगरसचिव राजेश धसे आदींच्या उपस्थितीत विशेष महासभा झाली. शनिवारी अंदाजपत्रकीय महासभेतील रणकंदनानंतर महापौर शेख यांनी तडकाफडकी गोंधळी नगरसेवकांना निलंबित केले होते. त्यामुळे मंगळवारी आयोजित महासभेत महागठबंधन आघाडीचे नगरसेवक सहभागी होणार का? याचीच चर्चा महापालिका वर्तुळात होती. महासभा सुरू झाली त्यावेळी महागठबंधन आघाडीचे गटनेते बुलंद इक्बाल, शान-ए-हिंद आदींसह सर्व नगरसेवक हजर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. महासभेस प्रारंभ होताच नगरसेवक बुलंद इक्बाल यांनी महापौर शेख रशीद यांना आम्हाला बोलायचे आहे अशी विनंती केली. महापौर शेख यांनी विषयपत्रिकेवरील विषयांवर आधी चर्चा होऊ द्यावी अशी सूचना केली. यावेळी आघाडीचे नगरसेवक आक्रमक झाले. तसेच त्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्याबांधून सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप करीत निषेध व्यक्त केला. तसेच घोषणाबाजी करीत सभात्याग केला.

शहरातील पालिकेच्या करारनामा संपलेल्या गाळ्यांचा विषय नगरसेवक अस्लम अन्सारी यांनी चर्चेस घेतला. शहरात सुमारे ३०० हून अधिक पालिकेच्या मालकीचे गाळे असून वर्षानुवर्ष त्यांचे करारनामे झाले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच केवळ स्थायी समितीद्वारे त्यांना दरवर्षी मुदतवाढ देऊन पाच टक्के भाडेवाढ केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर आयुक्त किशोर बोर्ड यांनी कायद्यानुसार भाडेकरार संपुष्टात आलेल्या गाळ्यांचे नव्याने करारनामे करणे, अतिक्रमित गाळे खाली करून त्यांचे लिलाव करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अखेर करारनामे संपलेल्या गाळ्यांचे नव्याने करारनामे करून ज्यांनी गाळ्यांमध्ये अतिक्रमण केले आहे त्यांचे गाळे ताब्यात घेऊन लिलाव करण्यात येतील अशी माहिती महापौर रशीद शेख यांनी दिली.

निलंबन केवळ एका सभेसाठी

महागठबंधन आघाडीच्या नगरसेवकांना निलंबित केले असताना आजच्या सभेत त्यांची उपस्थिती कशी? याविषयी पत्रकारांनी महापौर शेख यांना विचारले असता आपण त्यांना तीन सभांसाठी निलंबित केले होते. मात्र नियमानुसार एका सभेसाठी निलंबित करण्यात येत असल्याने तीन नव्हे तर अंदाजपत्रकीय एका सभेपुरते निलंबन होते असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेस्ट ऑफ’ची मात्रा

$
0
0

'लॉ'ची फरेपरीक्षा घेऊ नये यासाठी विद्यार्थ्यांचे तीन तास ठिय्या आंदोलन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधी शाखेच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यावर पुणे विद्यापीठ ठाम असून, परीक्षेत 'बेस्ट ऑफ' पॅटर्न वापरण्यात येईल, असे आश्वासन विद्यार्थ्यांना मिळाले आहे. फेरपरीक्षा होऊ नये, त्यासाठी विद्यापीठाच्या उपक्रेंदात विद्यार्थ्यांनी तीन तास ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण झाल्यानंतर फेरपरीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना आश्वासित करण्यात आले. परीक्षेनंतर विद्यापीठाने आमच्या तोंडाला पाने पुसू नयेत, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

एलएलबीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. एलएलबीच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील काही प्रश्नपत्रिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षेच्या अगोदरच वेबसाइटवर प्रसिध्द केल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार घडला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट कुलगुरूंकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर विद्यापीठाने एक समिती स्थापन केली. त्या समितीचा अहवाल मिळाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांची त्या विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन करीत या निर्णयाचा निषेध नोंदवला.

'लॉ ऑफ क्राइम' आणि पर्यायी विषय 'आयपीआर' या विषयाची पुनर्परीक्षा ७ व ८ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका अपलोड होणे ही विद्यापीठाची चूक असली, तरी विद्यार्थ्यांना समितीच्या निर्णयानुसार ही परीक्षा देणे अनिवार्य आहे, असे विद्यापीठाने स्पष्ट सांगितले. या परीक्षेत विद्यार्थ्यांना सूट म्हणून 'बेस्ट ऑफ' पर्याय वापरण्यात येईल. फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेली परीक्षा आणि मार्चमध्ये होत असलेली परीक्षा, या दोघांपैकी ज्या परीक्षेत विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील, ते ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी परीक्षेनंतर गुणांकनात गोंधळ होता कामा नये अन्यथा पुन्हा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करू, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यावेळी विद्यार्थी नेता अजिंक्य गिते, जीएस महेश गायकवाड, तुषार जाधव, अभिजित गोसावी यांसह २०० विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

...

\Bराजीनामा द्या

\B विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्या चुकीच्या कार्यपध्दतीचा फटका विद्यार्थ्यांना वारंवार सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी तात्काळ‌ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. त्यावेळी 'शिक्षण आमच्या हक्काचं', 'परीक्षेचा गोंधळ खपवून घेणार नाही', अशी घोषणाबाजी करण्यात आली.

...

\Bपोलिसांची मध्यस्थी

\B पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे समन्वयक डॉ. प्रशांत टोपे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य विजय सोनवणे आणि सिनेट सदस्य डॉ. मोतीराम देशमुख हे विद्यार्थी नेत्यांची समजूत काढत होते. परीक्षा देणे अनिवार्य असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात येत होते. मात्र, विद्यार्थी परीक्षा पुन्हा घेऊ नये, या भूमिकेवर ठाम होते. त्यावेळी सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सांगळे यांनी मध्यस्थी केली. पोलिसांचे पथक उपकेंद्रात दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तांत्रिक बाबींची पटवून सांगण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी 'बेस्ट ऑफ'चा पर्याय मान्य करीत आंदोलन मागे घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्लीत यूपीएससीचे मोफत धडे!

$
0
0

अर्ज नोंदणीस गुरुवारपासून संधी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी (यूपीएससी) 'सारथी'तर्फे नवी दिल्लीतील नामवंत कोचिंग इन्स्टिट्यूटमधून मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जनोंदणीस गुरुवारपासून (दि. ७) सुरुवात होणार आहे. या प्रशिक्षणात मराठा, कुणबी, कुणबी-मराठा उमेदवारांना सहभागाची संधी मिळणार आहे. उमेदवारांनी योग्य कागदपत्रांच्या आधारे अर्ज नोंदवावेत, असे 'सारथी'तर्फे सांगण्यात आले आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) यांच्यातर्फे यूपीएससी अंतर्गत होणाऱ्या विविध जागांच्या परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी ७ ते १७ मार्च या काळात उमेदवारांना अर्जनोंदणी करता येईल. उमेदवारांना २० मार्च रोजी हॉल तिकीट ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध करून दिले जाईल. त्यानंतर उमेदवारांची ३१ मार्च रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येईल. प्रवेश परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार ठराविक उमेदवारांना मार्गदर्शन शिबिरासाठी निवडण्यात येईल. उमेदवारांना हे शिबिर दिल्लीतील संस्थांमध्ये दिले जाणार असून, त्यासाठीचा संपूर्ण खर्च 'सारथी'तर्फे केला जाणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मुदतीच्या आत www.sarthi-maharashtragov.in\B \Bया वेबसाइटवर अर्ज नोंदवावेत, असे आवाहन 'सारथी'ने केले आहे. \B

न्यायिक सेवा परीक्षेचेही मार्गदर्शन

\Bमहाराष्ट्र न्यायिक सेवा परीक्षेच्या तयारीसाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्यातर्फे मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी https://barcouncilmahagoa.org या वेबसाइटवर अर्जनोंदणी करायची आहे. अर्जासोबत विद्यार्थ्यांना जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत आणि पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य आहे, असे 'सारथी'तर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीबाबत आता १५ ला सुनावणी

$
0
0

नाशिक : पालिकेने लादलेल्या करवाढीच्या वादासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर आता १५ मार्चला सुनावणी होणार आहे. न्या. रणजीत मोरे यांच्या पीठासमोर मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी सुरू असल्याने मंगळ‌वारी याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही.

महासभेने जुन्या मिळकतींना १८ टक्के, तर सर्वेक्षणात आढळलेल्या नवीन मिळकतींना ४० टक्के करवाढीचा ठराव मंजूर केला होता. मात्र, तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी महासभेला डावलत परस्पर आपल्या अधिकारात १ एप्रिल २०१८ रोजी आदेश क्र. ५२२ काढून नाशिककरांवर भरमसाट करसंकट लादले होते. या करवाढीविरोधात गेल्या दहा महिन्यांपासून वाद सुरू आहे. नूतन आयुक्त राधाकृषण गमे यांनीही दिलासा न दिल्याने अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पाठोपाठ माजी महापौर अशोक मुर्तडक, काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, अपक्ष नगरसेवक गुरूमित बग्गा यांनीही एकत्रितपणे अॅड. संदीप शिंदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवामान बदलाने तापाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुपारी कडाक्याचे ऊन आणि संध्याकाळी गारवा यामुळे शहरातील रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, अनेकजण थंडी-तापाने बेजार झाले आहेत. या आजारामुळे महापालिकेच्या दवाखान्यांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची गर्दी वाढली आहे.

मागील महिन्यात शहरात थंडीने उच्चांक गाठला होता. शहरातील तापमान ३ अंश सेल्सिअसपर्यंत तर जिल्ह्याच्या काही भागात तापमान १ अंश सेल्सिअसवर पोहचले होते. याच काळात स्वाइन फ्लूसारख्या आजाराने डोके वर काढले होते. थंडीचा जोर कमी होताच लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला, मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. त्यानंतर पुन्हा थंडी सुरू झाली आणि रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. अनेक दवाखान्यांमध्ये तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल आहेत. त्याचप्रमाणे दम्याच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. अनेक रुग्ण घसादुखीने त्रस्त आहेत. काहींना खोकला झाला आहे. नागरिकांनी थंडी संपून उन्हाळ्याला सुरुवात होत असताना नागरिकांनी गरम पाणी प्यावे, जास्त थंड पदार्थ खाऊ नयेत त्याचप्रमाणे तापाची लक्षणे दिसू लागताच तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

…..

या दिवसात लहान मुलांना थंड पदार्थ देणे टाळावे, कोमट पाणी प्यावे. सकाळी आणि संध्याकाळी जेवणाच्या वेळा पाळाव्यात. फ्रिजमधील अन्न खाऊ नये. यामुळे पोटाचे विकार होण्याचा जास्त संभव असतो.

- डॉ. प्रफुल्ल सोमठाणकर

…...

पोटदुखी, सर्दी, खोकला, ताप, या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ढगांमुळे श्वासाचे त्रास वाढत आहेत. यासाठी आलं टाकून पाणी पिणे हा रामबाण उपाय आहे. त्याचप्रमाणे आल्याचा रस आणि मध एकत्र करून घ्यावे. दालिचीनीचा तुकडा आणि लवंग तोंडात ठेवल्याने फायदा होणार आहे. कवठाची चटणी, आमसुलाचा सार याचा वापर करावा.

- वैद्य विक्रांत जाधव

....

गेल्या काही दिवसांतील तपमान

दिनांक.....कमाल....किमान (अंश सेल्सिअस)

१ मार्च.....३०.९....११.६

२ मार्च.....३६.०....१३.६

३ मार्च.....३१.२.....१५.५

४ मार्च...२९.४....१६.६

५ मार्च......२९.८......१५.०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रम नागरे आता ‘धर्मवीर’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

पिंपळगाव बहुलाचे रहिवाशी विक्रम नागरे यांना धर्मवीर पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. श्री क्षेत्र चाकोरे (बेजे) येथे शिवरात्रीनिमित्ताने झालेल्या धार्मिक सोहळ्यात नागरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नागरे हे भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश चिटणीस तसेच महाराष्ट्र राज्य शासन किमान वेतन सल्लागार मंडळावर सदस्य आहेत. अध्यात्म, एकता व धार्मिक उत्सव साजरा नागरे करत असतात. धार्मिक सोहळ्यात श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या हस्ते नागरे यांना धर्मवीर पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे, किमान वेतन सल्लागार मंडळाचे सदस्य अॅड. श्रीधर व्यवहारे, रामहरी संभेराव यांसह संत, महंत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’साठी श्रीगणेशा

$
0
0

\Bअर्ज भरण्यासाठी पालकांची संपली प्रतीक्षा

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन महिन्यांपासून पालकांकडून प्रतीक्षा केली जात असलेली शिक्षणाचा हक्क अर्थात 'आरटीई' प्रक्रिया अखेरीस मंगळवारपासून सुरू झाली. आर्थिकदृष्ट्या मागास व गरजू विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असल्याने जानेवारीपासून प्रक्रिया सुरू होण्याच्या प्रतिक्षेत पालक होते. शाळांची नोंदणी बाकी असल्याने दोनवेळा तारखांमध्ये बदल करण्यात आला होता. मात्र अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाल्याने पालकही निर्धास्त झाले आहेत.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांनाही इतरांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने 'आरटीई' म्हणजेच शिक्षणहक्क प्रक्रिया राबविण्यात येते. 'आरटीई'चे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांमध्ये याअंतर्गत २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या पालकांनाही आपल्या पाल्याला चांगल्या शाळांमध्ये शिक्षण देणे शक्य होते आहे. यंदा, शाळा नोंदणीमुळे प्रक्रियेला विलंब झाला आहे. ५ मार्च, मंगळवारीदेखील ही प्रक्रिया सुरू होते की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, प्रक्रिया सुरू करण्याविषयी 'आरटीई'च्या वेबसाइटवरच सूचना आल्याने पालकांना अर्ज करणे शक्य झाले. पहिल्या दिवशी किती अर्ज भरले याचे तपशील मात्र, वेबसाइटवर दर्शविण्यात आले नाही. राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती अर्ज भरण्यात आले याचा तपशील बुधवारी (दि. ६) उपलब्ध होईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

\Bहे लक्षात ठेवा

\B- पालकांना अर्ज ऑनलाइनच करता येणार आहे.

- प्रवेशासाठी फक्त एकदाच अर्ज भरता येईल.

- इंटरनेट सुविधा असलेल्या कॉम्प्युटरवरुन किंवा मोबाइलवर आरटीईचे अॅप डाउनलोड करून त्यामार्फत अर्ज भरता येईल.

- अर्ज भरताना कोणतीही कागदपत्रे अपलोड करावी लागणार नाही.

- लॉटरी लागल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे.

- कागदपत्रे पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे.

- प्रवेश अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.

- rte25admission.maharashtra.gov.in किंवा http://student.maharashtra.gov.in या वेबसाइटवर पालक अर्ज करू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांना नोटिसा

$
0
0

मनपाच्या करवसुली मोहिमेला वेग

...

- विभागनिहाय वसुली पथकांची निर्मिती

- नळजोडणीधारकांना १५ दिवसांची मुदत

- पंचवटील १२ थकबाकीदारांच्या नळजोडण्यात खंडित

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने घरपट्टीपाठोपाठ आता पाणीपट्टी थकबाकीदारांकडेही वसुलीसाठी मोर्चा वळवला आहे. शहरातील बड्या ३२ हजार थकबाकीदारांना वसुलीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. थकबाकीदारांनी पाणीपट्टीचे बिल जमा न केल्यास थेट नळजोडणी खंडित करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

पाणीपट्टी वसुलीसाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता ४५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र आर्थिक वर्ष संपण्यासाठी जेमतेम २५ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना निर्धारित उद्दिष्टाच्या जेमतेम ३३ टक्के वसुली झाली आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली जाणार आहे. थकबाकीदारांविरोधात महापालिकेने मोहीम आखली असून, विभागनिहाय वसुली पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत महापालिका क्षेत्रातील सहाही विभागातील ३२ हजार थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत. थकीत करासह चालू वर्षातील पाणीपट्टी भरण्यासाठी संबंधित नळजोडणीधारकांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीतही थकीत करांचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडण्यात येत आहेत. आतापर्यंत पंचवटी विभागातील १२ थकबाकीदारांच्या नळजोडण्यात तोडण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतण्यासाठी काकांची भावनिक साद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

“समीर होता म्हणून मी तुरुंगातून जीवंत बाहेर आलो”, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिककरांना भावनिक साद घातल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे. कधीकाळी राष्ट्रवादीची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेल्या भुजबळांनी भावनिक मुद्द्याचा आधार घेत पुतण्या समीर यांच्याबाबत आपल्या मनात काहीही नसून, आपण आणि समीर एकच असल्याचाच संदेश पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिला. समीर यांच्यामुळेच भुजबळांना तुरुंगवारी करावी लागल्याची ही समर्थकांची झालेली दृढभावना दूर करण्याच्या उद्देशानेच भुजबळ यांनी जाहीर भावनिक विधाने केल्याचे मानले जात आहे.

फार पूर्वीपासून मला टार्गेट करण्याच्या उद्देशाने विरोधक आपल्याऐवजी समीर यांना ‘सॉफ्ट टार्गेट’ करतात, असा आरोप करून भुजबळांनी त्यांचे समर्थक, समस्त ओबीसी समाज आणि नाशिककरांमध्ये समीर यांच्याबाबत असलेली काहीशी नाराजीची किनार दूर करण्याचा प्रयत्न केल्याचाही अर्थ काढला जात आहे. “उपमुख्यमंत्रीपदी असताना आपण गृहखातेही सांभाळले. या काळात दाऊद टोळीला खालसा करण्याचे काम केले. तेव्हापासूनच माझ्या कुटुंबातला सॉफ्ट टार्गेट समीर होता, असा खुलासेवजा दावा करून भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीसाठी समीर यांची खुंटी अधिक बळकट केली आहे. शरद पवार आणि समीर यांच्यातील जवळीकता दर्शविण्याचेही पुरेपूर प्रयत्न कार्यकर्ता मेळावा आणि इतर कार्यक्रमांत करण्यात आले. विमानतळापासून पवारांच्या वाहनाचे सारथ्यही समीर यांनीच केले हेही महत्त्वाचे.

आपल्यामुळेच समीरला विरोधकांच्या षडयंत्राला सामोरे जावे लागल्याचेही भुजबळ यांनी प्रथमच जाहीरपणे मांडले. त्याचबरोबर आम्ही दोघे या कारस्थानाला पुरून उरू, असेही त्यांनी निक्षून सांगितले. नाशिककरांना भावनिक साद घालतानाच समीर यांच्या खासदारकीच्या कार्यकाळातील विकासकामांची यादी सादर करीत भुजबळ यांनी पवारांच्या उपस्थितीत त्यांची भक्कम पाठराखण केली.

काय म्हणाले भुजबळ…
- सरकाराने तुरुंगात मला स्वतंत्र कोठडी दिली होती. मी आजारी होतो तेव्हा समीर माझी सगळी देखभाल करायचा. तो सोबत होता म्हणून मला वेळेवर उपचार मिळाले अन्यथा या सरकारने भुजबळांना संपवायचे कारस्थानच केले होते.
- भुजबळांना कमजोर करायचे असेल तर आधी समीरला कमजोर करा हे विरोधकांचे षडयंत्र. यात आम्हाला गुंतविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४ तासात १ हजार ५४ अर्ज

$
0
0

\B'आरटीई' प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरटीई (शिक्षणहक्क) प्रक्रियेत अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यापासून २४ तासातच नाशिक जिल्ह्यातून १ हजार ५४ अर्ज भरण्यात आले. यातील १ हजार ५१ अर्ज वेबसाइटवरुन तर ३ अर्ज मोबाइलवरून करण्यात आले आहे.

अनेक दिवसांपासून पालक ही प्रक्रिया सुरू होण्याची वाट बघत होते. मंगळवारपासून ती सुरू झाल्याने पालकांनी त्वरीत अर्ज भरण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवसातील अर्जांची संख्या पाहता, यंदा प्रक्रियेबाबत अधिक जागरुकता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा वगळता इतर शाळांमध्ये इच्छा असूनही प्रवेश घेता येत नाही. या विद्यार्थ्यांनाही चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे, यासाठी दरवर्षी आरटीई प्रक्रिया राबविली जाते. आरटीईचे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांसाठी राखीव ठेवण्यात येतात. यंदा जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २२ मार्चपर्यंत अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

\Bराज्यातील परिस्थिती

\Bराज्यातील शाळा संख्या - ८ हजार २३०

आरटीईसाठी जागा - १ लाख १ हजार ६५७

२४ तासात वेबसाइटद्वारे जमा अर्ज - ६ हजार १०२

मोबाइल अॅपद्वारे जमा अर्ज - ४७

एकूण जमा अर्ज - ६ अर्ज १४९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गमतीशीर स्पर्धांनी रंगला ‘अभिनव’चा महिलादिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांच्या आनंदासाठी त्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे, यासाठी अभिनव लेडिज ग्रुपतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पापड लाटणे, लांब केसांची स्पर्धा, अडथळा स्पर्धा व फुलांचे हार बनविण्याची स्पर्धांचा यात समावेश होता. सार्वजनिक वाचनालयाच्या लिमये सभागृहात बुधवारी हा कार्यक्रम पार पडला.

महिला दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रम होत असून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला यामार्फत केला जात आहे. अभिनव लेडिज ग्रुपतर्फेही दरवर्षी महिलांसाठी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम आयोजित केले जाते. यंदा मजेशीर स्पर्धांचा त्यात समावेश होता. कोणाचा पापड गोल होतो, कोणाचे केस लांब, कागदापासून कोण जास्त होड्या बनवेल, अशी शर्यतच या कार्यक्रमात लागली होती. अडथळ्यांची शर्यत या कार्यक्रमात विशेष आकर्षणाची ठरली. एबीसीडी उलटी लिहिणे, मणी ओवणे, दागिण्यांची नावे सांगणे, ग्लासभर लिंबू पाणी पिणे हे जो झटपट करेल तो जिंकला, अशी ही स्पर्धा होती. सुप्रिया तांबट व राजेंद्र क्षीरसागर यांनी स्पर्धांचे परीक्षण केले. विजेत्या महिलांना एक हजार रुपयांची साडी, विविध वस्तूंचे किट भेट स्वरुपात देण्यात आले. तसेच स्पर्धेच्या शेवटी लकी ड्रॉही काढण्यात आला.

स्पर्धेतील विजेते

\Bलांब केस\B : १) नीलाक्षी लोही, २) शीतल लोही

\Bहार बनवणे : १) \Bराजश्री मालपाणी, २) विमल मालपाणी

\Bअडथळ्यांची शर्यत : १) \Bसुखदा कन्सारा, २) सुनिता भुतडा, ३) चारू तांबट

\Bपापड बनवणे : १) \Bअनिता कोठावदे, २) छाया नवले, ३) कविता साबळे

फोटो : सतीश काळे

लोगो : तिचे विश्व

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ जणांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरी तालुक्यातील सांझेगाव येथे २०१६ मध्ये उसळलेल्या दंगलीत मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आठ जणांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी शिक्षा सुनावली. त्यांना १० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम पीडितांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव अंजनेरी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर काही भागात दंगल उसळली. इगतपुरी तालुक्यातील सांझेगाव येथेही ११ ऑक्टोबर २०१६ रोजी या घटनेचे पडसाद उमटले. घोषणाबाजी करीत आलेल्या जमावाने गावातील राजवाड्यातील घरांवर दगडफेक, तसेच रहिवाशांना मारहाण सुरू केली. जमावातील काही जणांकडून जातिवाचक शिवीगाळही केली जात होती. दगडांसह लाथा-बुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण करण्यात आली. यामध्ये शिवाजी बन्सी शिंदे, विजय बन्सी शिंदे, नकुसाबाई नामदेव सोनवणे, अलकाबाई सुरेश पवार, चिंतामण बाळू बुकाणे गंभीर जखमी झाले. वाडिवऱ्हे पोलिसांनी २१ संशयितांवर ठार मारण्याच्या प्रयत्नासह जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला. निफाड तालुक्याचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे यांनी या प्रकरणाचा तपास केला. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्यासमोर सुरू होती. पीडित आणि डॉक्टरांसह १० जणांची साक्ष या गुन्ह्यात नोंदविण्यात आली. प्रत्यक्षदर्शी आणि परिस्थितीजन्य पुरावे याआधारे न्यायालयाने २१ पैकी ८ जणांना या प्रकरणात दोषी ठरविले.

यांना झाली शिक्षा

मोहन विठोबा गोवर्धने, अंकुश निवृत्ती गोवर्धने, सागर भास्कर गोवर्धने, राहुल रावसाहेब गोवर्धने, भाऊसाहेब काशीराम गोवर्धने, प्रकाश गेणू गोवर्धने, शिवाजी कारभारी गोवर्धने, नाना बाळू गोवर्धने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या अधीक्षक अभिंयतापदी भालकर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील परसेवेतील अधिकाऱ्यांचे आगमन सुरूच असून, आता शासनाने महापालिकेच्या अधीक्षक अभियंता पदी अशोक भालकर यांची नियुक्ती केली आहे. शासनाने तसे आदेश निर्गमित केले आहेत. भालकर हे महाराष्ट्र मत्सोद्योग विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. महापालिकेत अधीक्षक अभियंता पद रिक्त होते. त्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे महापालिकेनेच शासनाकडून अधिकाऱ्यांची मागणी केली होती. त्यानुसार भालकर यांना पालिकेत नियुक्ती देण्यात आली आहे. भालकर यांच्या नियुक्तीमुळे शहर अभियंता या पदावर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर झाले हक्काचे

$
0
0

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्यातील ग्रामीण भागात विविध सरकारी जमिनींवर असलेल्या अतिक्रमित घरांना कायम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या जागांवरील अतिक्रमित कुटुंबियांना मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात 'अतिक्रमण नियमानुकुल प्रमाणपत्र' देण्यात आले. मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थित होते. यासंदर्भात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून घर हक्काचे मिळाल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.

मालेगाव तालुक्यातील अजंग, वडेल, दाभाडी, टेहरे व झोडगे गावातील मुमताजबी बाबू शेख, योगेश शेलार, सोमनाथ अमृतकर, मनिषा अहिरे, मधुकर गायकवाड यांना ही प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारने सन २०२२ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घर देण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण भागातील सरकारी जमिनींवर निवासासाठी केलेले अतिक्रमण नियमानुकुल करण्याबाबत ग्रामविकास विभागाने १६ फेब्रुवारी २०१८ शासन निर्णय घेतला होता. मंगळवारी यातील प्रातिनिधिक लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

राज्यातील ९९ हजार कुटुंबे लाभार्थी

राज्यातील ग्रामीण भागातील ३४ जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एकूण ४ लाख ७३ हजार २४८ अतिक्रमणाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २ लाख ९९ हजार ४४४ एवढी अतिक्रमणे १ जानेवारी २०११ पूर्वीची आहेत. व ९९ हजार ६१५ अतिक्रमणे नियमानुकुल करण्याची कार्यवाही ग्रामसभेत करून गट विकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रमाणित केल्यानंतर ही अतिक्रमणे कायम करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औद्योगिक धोरण विकासाला चालना देणारे

$
0
0

उद्योजक संघटनांचा स्वागतार्ह्य प्रतिसाद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांनी जाहीर केलेले महाराष्ट्र औद्योगिक धोरण २०१९ हा उद्योगांच्या विकासासाठी चांगले आहे. यामुळे उद्योगांना त्याचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. बहुतांश औद्योगिक संघटनांनी या धोरणाचे स्वागत केले आहे.

औद्योगिक धोरण जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे अध्यक्ष संतोष मंडलेचा म्हणाले, की जागतिक गुंतवणुकीचे महाराष्ट्र हे सर्वोच्च केंद्र व्हावे आणि राज्यामध्ये उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र व आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्र या माध्यमातून शाश्वत विकासाचे धोरण यात आहे. जेथे उद्योग विकासाच्या सर्व पायाभूत सोयी व सवलती उपलब्ध असतील आणि कर्मचाऱ्यांनाही कमाल पाच किलोमीटरच्या परिघातून राहण्याची सोय असेल हे निर्णय महत्त्वाचे आहेत. समृद्धी मार्गाच्या आजूबाजूने २० औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्याचे निश्चित केले असून त्याचा लाभ राज्यातील बहुतेक सर्व जिल्ह्यांना मिळणार आहे. एमआयडीसी क्षेत्रातून जागा उपलब्ध होत नसल्याने खासगी जमिनीवर अनेक ठिकाणी लघुत्तम व लघु उद्योग सुरू झाले असले तरी निश्चित स्वरूपाच्या पायाभूत सवलती त्यांना मिळत नाहीत. त्या या धोरणातून मिळणार आहे, असे मत उद्योग क्षेत्रातून मांडण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील अनेक औद्योगिक वसाहतीमधील जे उद्योग बंद पडलेले आहे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनी अडकून पडल्या आहेत. या जमिनी मोकळ्या करून घेणे व नव्याने येऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांना देण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे.

- संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर्स

राज्याचे नवीन औद्योगिक धोरण उद्योगाला चालना देणारे आहे. इतर तीन चार राज्याला सुसंगत ठरावे असे हे धोरण आहे. या धोरणात घेतलेले निर्णय चांगले आहे. त्यामुळे औद्योगिक विकास होण्यास त्यातून मदतच मिळणार आहे.

- धनजंय बेळे, माजी अध्यक्ष आयमा

नव्या औद्योगिक धोरणात पाच वर्षात २ लाख नवीन उद्योजक करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. रोजगार निर्मिती व छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण यात आहे. राज्याच्या समतोल औद्योगिक विकास व्हावा यावरही भर देण्यात आला आहे. यातून सकारात्मक बदल बघायला मिळेल.

- तुषार चव्हाण, अध्यक्ष, निमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील पहिले कॉप शॉपचे उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतीमालाच्या थेट विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी अटल महापणन विकास अभियानाअंतर्गत नाशिक जिल्हातील गणेशा व्हॅली सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये कॉप शॉपचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला उपनिबंधक डॉ. प्रिया दळणार, सहकार अधिकारी रवींद्र गजरे आदी उपस्थित होते. यावेळी बलसाने म्हणाले, की कॉप शॉप गणराज ग्रेप्स अँड व्हेजिटेबल्स यांच्याकडून सुरू करण्यात आले आहे. शहरी भागांमध्ये शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि ग्राहकांना रास्त दरात ताजा आणि स्वच्छ शेतीमाल प्रक्रिया उत्पादने उपलब्ध व्हावीत, यासाठी कॉप शॉप उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ग्राहक या पूर्वी फेरीवाले, छोटे व्यापारी किंवा व्यापारी यांच्याकडून भाजीपाला खरेदी करत होते. पण आता त्यांना थेट शेतकऱ्यांचा शेतमाल शेतकऱ्यांकडून उपलब्ध होणार आहे. याचा फायदा ग्राहकांना त्यांच्या घराजवळ उत्कृष्ट प्रतीचा भाजीपाला कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने थेट ग्राहकांना या कॉप शॉप द्वारे उपलब्ध करता येणार असल्याचेही बलसाने म्हणाले.

नाशिक जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांशी जोडल्या जाणार असून पहिल्या टप्यात नाशिक शहरातील वेगवेगळ्या सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये १० कॉप शॉप सुरू करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइक रॅलीचा रंगणार थरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केवळ बाइक घेऊन वेगावर स्वार होणे नव्हे, तर नारीशक्तीच्या आत्मसन्मानाला 'हॅट्स ऑफ' करण्यासाठी महिलावर्ग सज्ज झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही टशनमध्ये बाइक रॅलीत एन्ट्री घेण्यासाठी नावनोंदणीला वेग आला असून, 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'ऑल वूमन बाइक रॅली'चा थरार शहरात रविवारी रंगणार आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे 'ऑल वूमन पॉवर रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (१० मार्च) सकाळी ७.३० वाजता या बाइक रॅलीला प्रारंभ होणार असून, बाइकर्णींना सकाळी ६.४५ पर्यंत ईदगाह मैदानावर उपस्थित राहायचे आहे. बाइक रॅलीसाठी तरुणींपासून तर महिला मंडळ, ऑफिस महिला ग्रुपसह किटी पार्टी ग्रुपची मोठ्या संख्येने नावनोंदणी केली जात आहे. रॅलीतून महिलांच्या सामर्थ्याचे दर्शन घडविण्यासाठी नारीशक्तीचे नवे प्लॅन्स आता तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या बाइक रॅलीत आपल्या ग्रुपचे हटके सेलिब्रेशन व्हावे, त्यासाठी पारंपरिकपासून वेस्टर्न आऊटफिटपर्यंतचा ट्रेंड फॉलो केला जाणार आहे. जुन्या मैत्रिणींना सोबत घेऊन रॅलीत सहभागी होत नव्या मैत्रिणींचा ग्रुप तयार करण्यासाठी महिलांचा उत्साह वाढला आहे. धम्माल मस्तीच्या या पर्वणीत वेगावर स्वार होतानाच समाजप्रबोधनासह वेगळी टशन देण्याची संधी महिलांना मिळणार आहे. तुम्हीदेखील या संधीचा फायदा घेत आजच बाइक रॅलीत नाव नोंदवा.

...

महिला दिन महिलांच्या आत्मसन्मानाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 'मटा'च्या बाइक रॅलीतून महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान होतोच, शिवाय महिलांच्या सेलिब्रेशनला नवी झळाळी मिळते. वाऱ्याच्या वेगावर बाइकच्या साक्षीने स्वार होण्यासाठी तुम्हीदेखील बाइक रॅलीत सहभागी व्हा.

- सीमा हिरे, आमदार

...

महिलांच्या कार्याचा गौरव, समाजिक विषयांवर भाष्य त्यासह मोपेडसह स्पोर्ट बाइकवर स्वार होणाऱ्या महिला हे वातावरण स्फूर्तीदायक असते. 'मटा'च्या बाइक रॅलीतून महिलांची जगू बिनधास्त ही शैली स्पष्ट जाणवते. नारीशक्तीला सलाम करण्यासाठी जल्लोषाच्या या रॅलीत नक्की सहभाग घ्या.

- देवयानी फरांदे, आमदार

...

\Bऑनलाइन करा नोंदणी

\B'ऑल वूमन बाइक रॅली'त सहभागी होण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी करण्यासाठी 'PowerrallyNSK' हा एसएमएस कोड 58888 या क्रमांकावर पाठवावा अथवा www.allwomenbikerally.com या वेबसाइटवरही नोंदणी करता येईल. तसेच ९४२२५१३५६९ या क्रमांकावर संपर्क साधूनही नोंदणी करता येणार आहे.

--

\B'ऑल वूमन बाइक रॅली'\B

\Bकधी - \Bरविवार १० मार्च, २०१९

\Bवेळ - \Bसकाळी ७.३० ते १०

\Bकुठे - \Bईदगाह मैदान, त्र्यंबकरोड, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी शुद्धीकरणाकडे लक्ष द्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचा पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, आरोग्य व पाणी पुरवठा विभागाची असल्याचे सांगत नियमित पाणी शुद्धीकरणाकडे लक्ष द्यावे व पाणी गुणवत्ता कार्यक्रमाची सर्व संबंधित यंत्रणांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेच्या पाणी स्वच्छता विभागातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात पाणी गुणवत्ता विषयक जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी डॉ. गिते यांनी सुचना दिल्या. यावेळी त्यांनी पाणी व स्वच्छता विभागा अंतर्गत शासनाने तयार केलेल्या संकेतस्थळावरील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, योजना व योजनांची माहिती अद्यावत करावी, असेही सांगितले. ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या लाल व पिवळे कार्डबाबत आढावा त्यांनी घेतला. या त्रुटी दूर करून त्वरित त्याचे रुपांतर हिरवे कार्डमध्ये करण्यासाठी उपापयोजना करण्याचे आदेश सर्व संबंधित विभागांना दिले आहे.

यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे यांनी मार्गदर्शन करताना मोबाइल अॅपचा वापर करून पाण्याची रासायनिक तपासणी करणेबाबत सुचना दिल्या. या कार्यशाळेत वरिष्ठ भू-वैज्ञानिक जीवन बेडवाल यांनी पाण्याची रासायनिक तपासणी करणेसाठीच्या नियोजित वेळापत्रकानुसार पाणी नमुने देणेबाबत संबंधिताना सूचना दिल्या. कार्यशाळेस तालुक्यातील सर्व गट विकास अधिकारी, सहायक भू-वैज्ञानिक, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), विस्तार अधिकारी (आरोग्य), पाणी व स्वच्छता विभागातील तज्ज्ञ, गटसमन्वयक, पाणी गुणवत्ता सल्लागार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेतृत्व केवळ राजकारणात नसते

$
0
0

प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांचे प्रतिपादन

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक \B

नेतृत्व या शब्दाचा अर्थ केवळ राजकारणाशी आहे, असा समज कधीही करून घेऊ नका. नेतृत्व प्रत्येक क्षेत्रासाठी गरजेचे असते. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही योग्य क्षमतेच्या नेतृत्वाची गरज असते. आपल्या शैक्षणिक आणि उमेदीच्या कालावधीत कौशल्यांचा पुरेसा विकास करण्यावर भर द्या, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी केले.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात मविप्र संस्थेचा चौथा पदवीदान सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. डॉ. उमराणी म्हणाले, शैक्षणिक आयुष्यात तुम्हाला जे ज्ञान प्राप्त होते त्याआधारे तुमचे योगदान देश व समाजाच्या दृष्टीने आवश्यक राहणार आहे. विद्यार्थ्यामधूनच भविष्यात चांगले शिक्षक, जकारणी व उद्योजक तयार होऊन लोकशाही टिकविण्यासही निश्चित हातभार लागेल आणि लोकशाही अधिक समृद्ध होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. मंचावर संचालक नाना महाले, भाऊसाहेब खातळे, शिक्षणाधिकारी, डॉ. दिलीप शिंदे, डॉ. व्ही. जे. मेधने, डॉ. जे. डी. सोनखासकर, डॉ. ए. पी. पाटील, डॉ. एस. एस. काळे, डॉ. पी. व्ही. रसाळ, डॉ. डी. जी. उशीर आदी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी स्वागत, प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी विद्यापीठामध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त मविप्र संस्थेच्या नऊ महाविद्यालयांच्या स्नातकांना डॉ. एन. एस. उमराणी यांचे हस्ते पदवीग्रहण करण्यात आले. मिरवणुकीने सोहळ्यास प्रारंभ झाला. त्याचे संचलन परीक्षा नियंत्रक डॉ. एम. पी. शिंदे यांनी केले. विद्यापीठगीताने पद्वीग्रहण सोहळ्याची सुरुवात झाली. प्रा. तुषार पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी आभार मानले. राष्ट्रीय छात्र सेना आणि नौदलच्या विद्यार्थ्यांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला.

पदवीसह कौशल्याचाही विकास करा

'मविप्र संस्था ही विद्यार्थी केंद्रीत असून संस्थेने विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच शिस्तप्रियदेखील बनवले आहे. पदवी सोबतच तुम्ही तुमच्यातील कौशल्याचाही विकास करा. त्या कौशल्याच्या आधारावरच तुम्हाला जीवनात यशस्वी होता येईल. आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच राहा. आपल्यातील मदतीची भावना सदैव जोपासा तसेच सुधा मूर्तींसारखा आदर्शही जीवनात बाळगा, असे नीलिमा पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images