Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नवीन पूलाचा विचार

0
0
सुरक्षा, संरक्षा व प्रवासी सुविधा आदिबाबींमध्ये भुसावळ विभागाचे कार्य समाधानकारक सुरू असल्याचे प्रमाणपत्र मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस के सुद यांनी दिल्याने या ‘महा’ पाहणी दौऱ्यात भुसावळ विभाग ‘पास’ झाल्याचा अर्विभावात येथील अधिकारी होते.

जमीन मोजणीसाठी आता नवी पद्धती

0
0
राज्य सरकारने जमीन मोजणी पध्दतीत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पूर्वीची साधी, तातडीची आणि अतितातडीची मोजणी कायमस्वरुपी बंद करून यापुढे एकाच प्रकारची मोजणी होणार आहे. तसे आदेश महसूल खात्याने निर्गमित केले आहेत.

ड्रेनेज साफसफाईची बिले खासगी ठेकेदाराच्या नावाने?

0
0
नाशिक महापालिकेकडे ड्रेनेजच्या साफसफाईसाठी जुन्या दोन व नवीन चार अशा सहा जेट मशिन आहेत. या मशिनच्या सहाय्याने ड्रेनेजची साफसफाई केली जात असली तरी प्रत्यक्षात महापालिकेकडून खासगी ठेकेदाराला बिले दिली जात असल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

‘साई पॅलेस’वर कारवाईला टाळाटाळ

0
0
मुंबई- आग्रा महामार्गावरील हॉटेल साई पॅलेसने महापालिकेच्या पिण्याच्या पाईपलाईनमधून दोन इंची पाईपलाइन टाकून पिण्याचे पाणी चोरी केल्याचे उघड झाले होते. महापालिकेचे विभागीय अधिकीरी व पाणी पुरवठा अधिकारीऱ्यांनी साई पॅलेस हॉटेल व्यवस्थापनाला याबद्दल नोटीसही बजावली होती.

झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे महिनाभरात पुसट

0
0
नाशिक महापालिकेकडून नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यात आले आहेत. परंतु, ते महिनाभराच्या आतच पुसट झाले आहेत. झेब्रापट्यांची गुणवत्ता तपासणार तरी कोण, असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करत आहेत.

महापालिकेला जड झाले ‘साधुग्राम’

0
0
सिंहस्थ पर्वण्यांच्या तारखांचा अंदाज घेता सिंहस्थाच्या कामांसाठी महापालिकेच्या हाती जेमतेम दीड वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. यानिमित्ताने नाशिक शहरात येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा पुरविणे जितके गरजेचे आहे, तितकेच साधूसंतांची निवास व्यवस्था व कथा-कीर्तनासाठी साधुग्रामच्या उभारणीसाठी जागा अधिग्रहीत करणे महत्त्वाचे आहे.

तीन व‌िद्याशाखांचे मार्कशीट रखडले

0
0
पुणे व‌िद्यापीठांतर्गत तीन व‌िद्याशाखांचे न‌िकाल काही द‌िवसांपूर्वी उशिराने ऑनलाइन पध्दतीने लागले. मात्र, या न‌िकालांच्या हार्डकॉपीज पंधरा द‌िवसांनंतरही व‌िद्यार्थ्यांच्या हातात आलेल्या नाहीत.

जुन्या शहराध्यक्षांचा बोर्डही गायब!

0
0
गेल्या दोन वर्षापासून वादात असलेल्या काँग्रेस शहराध्यक्षपदाच्या वादावर पडदा टाकण्यासाठी प्रदेश काँग्रेसने अॅड. आकाश छाजेड यांना हटवत नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांना शहराध्यक्षपदाची नियुक्ती केली.

रोहयो समिती आली आणि गेलीही

0
0
नाशिक जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आलेली विधीमंडळ रोहयो समिती आली आणि गेली असेच काहीसे चित्र आहे. रोहयोसाठी वादग्रस्त असलेल्या सिन्नर तालुक्यात ही समिती जाणे अपेक्षित असताना समितीने केवळ कसमादेचा दौरा केला आहे.

टेंडर प्रक्रिया देखील सुरू

0
0
जर्मन सरकारच्या आर्थिक मदतीने साकारण्यात येणाऱ्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी पाऊणेदोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. गेल्या महिन्यातच हा निधी मिळाला असून प्रत्यक्ष कामास सुरूवात करण्यासाठी महापालिकेने टेंडर प्रक्रीया सुरू केली आहे.

एलबीटी अडकणार ६०० कोटींवर

0
0
एलबीटी अर्थात स्थानिक संस्था कराने जानेवारी अखेरीस ५०१ कोटी रूपयांचा पल्ला गाठला आहे. एप्रिल २०१३ ते २२ मे २०१३ या कालावधीत वसूल करण्यात आलेल्या जकात महसूलाचा देखील यात समावेश असून उद्दीष्टापेक्षा वसूलीचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट होत आहे.

निवडणुकीचा आज समारोप

0
0
युवक काँग्रेसअंतर्गत घेण्यात येणाऱ्या विधानसभा व लोकसभा पदाधिकारी निवडणुकीतील पहिला टप्पा गुरूवारी पार पडला. यात नाशिक लोकसभा मतदारसंघासह सिन्नर, देवळाली व इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी निवडीसाठी मतदान झाले.

एकाच रात्रीत चार दरोडे

0
0
वडनेर खाकुर्डी येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडेखोरांनी बाजारपेठेतील दोन सराफी दुकानांसह चार ठिकाणी दरोडे टाकून लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक सराफ जखमी झाला आहे. पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून चार दरोडेखोरांना शिताफीने अटक केली.

निर्माण होणार 'असुरक्षा'

0
0
निवडणुकीच्या तोंडावर केंद्र आणि राज्य सरकारने येत्या १ फेब्रुवारीपासून अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले असले तरी ही योजना प्रत्यक्षात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारीच ठरणार आहे.

नाशिक जिल्हा अव्वल

0
0
भारतातील सर्व खेड्यांमध्ये शौचालयाचा वापर वाढावा यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने निर्मल भारत अभियानाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानात नाशिक जिल्ह्याने विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. जिल्ह्याने ९१ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

एअरफोर्सच्या ‘रडार’वर सिन्नर

0
0
मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या सिन्नर येथे रडार उभारण्यासाठी भारतीय हवाई दलाने वनविभागाकडे जागेची मागणी केली आहे. त्यानुसार वनविभागाने या जागेवरील वृक्षांचे मूल्यांकन आणि सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.

बीएसएनएलकडून अन्याय

0
0
बीएसएनएलमार्फत शेतकरी वर्गासाठी देण्यात आलेल्या कृषी प्लॅन मोबाईलधारकांना सेवा देताना कंपनीकडून अन्याय होत असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेद्र सोनवणे यांनी राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

सिन्नर पंसच्या कारभाराची चौकशी करा

0
0
सिन्नर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी मोहन बागुल व शाखा अभियंता चंद्रकांत घुगे यांना एक लाख ७० हजारांची लाच घेताना पकडल्यानंतर पंचायत समितीच्या एकूणच कारभारावर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

सिन्नरला केबलचे दर ५० ने वाढले

0
0
सिन्नर तालुक्यातील टीव्ही केबल कनेक्शनमध्ये केलेली ५० रुपये दरवाढ ही अन्यायकारक आहे. ती तातडीने रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी जनशक्ती संघटनेतर्फे तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लासलगावला एकाचा रेल्वेतून पडून मृत्यू

0
0
लासलगाव रेल्वे स्थानकात गुरुवारी दुपारी वेफकोच्या एका कर्मचाऱ्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला. या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील मनोहर कुलकर्णी (४९) असे असून ते लासलगाव येथील रहिवासी होते.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images