Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ला धुळे दौऱ्यावर?

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या दि. १६ फेब्रुवारी रोजी धुळ्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, या वेळी त्यांच्या हस्ते मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश संघटन सरचिटणीस विजयराव पुराणिक यांनी जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली आहे.
मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग धुळेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या मार्गाचे काम सुरू व्हावे, यासाठी धुळेकर जनता अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करीत आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रस्तावित प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याचा सपाटा आता सुरू झाला आहे. यामुळे धुळे-मनमाड रेल्वेमार्गाचे भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्ह्यात येणार आहेत, असशी चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
दि. १६ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. नरडाणा अथवा धुळे येथे या रेल्वेमार्गाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन सुरू आहे. त्याचप्रमाणे डॉ. सुभाष भामरे यांचे पुत्र डॉ. राहूल भामरे यांच्या खान्देश कॅन्सर सेंटरचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मध्य रेल्वेचा आज कल्याणला मेगा ब्लॉक

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मध्य रेल्वेने विकासकामांसाठी कल्याण येथे दि. १० फेब्रुवारी रोजी घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे कल्याण व मुंबईकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हे आहेत.

या मेगाब्लॉकमध्ये मध्ये रेल्वेच्या मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस, जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस, मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस आणि भुसावळ-मुंबई पॅसेंजर या रेल्वे दि. १० फेब्रुवारी रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहितीही मनमाड रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

रिझर्वेशनला फटका
या रेल्वे रद्द असल्याने आता रविवारी सुटीच्या दिवशी रेल्वे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. अनेकांनी कल्याण, पुणे, मुंबई,
येथे जाण्यासाठी पंधरा ते वीस दिवस आधी रिझर्वेशन करून ठेवले होते. त्यांना आता या ब्लॉकचा फटका बसणार आहे. तसेच मनमाड, लासलगाव, निफाड येथून नाशिक, कल्याण येथे जाणाऱ्या प्रवाशांनादेखील रेल्वे रद्दमुळे ऐनवेळी नियोजित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही रेल्वे ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी छोट्या-छोट्या गावांना पोहचण्यासाठी महत्वाची व उपयुक्त असताना रविवारी ही गाडी धावणार नसल्याने प्रवाशांचे हाल होणार आहे. रविवारी महत्त्वाच्या रेल्वे बंद असल्याने याचा राज्य परिवहन मंडळाला नक्की लाभ होईल, असे चित्र आहे.


रेल्वेचा मेगा ब्लॉक हा विकासकामांसाठी असून, ब्लॉक घेतल्याशिवाय कामे करणे शक्य नसल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य करावे.
- विवेक भालेराव, वाणिज्य निरीक्षक, मनमाड

मेगा ब्लॉक हे सारखे घेतले जात असून, प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. आता पॅसेंजर रद्द झाल्याने जिथे एक्स्प्रेस गाड्यांना थांबा नाही, अशा ठिकाणच्या ग्रामीण भागातील प्रवाशांनी काय करावे. किमान ब्लॉक घेताना पॅसेंजरला वगळले तर ग्रामीण प्रवाशांना दिलासा मिळेल.
- एकनाथ मोरे, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्काच्या पाण्यासाठी आता पाणी परिषद

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

कसमादेसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या वांजुळपाणी प्रकल्पासाठी कसमादे भागातील वांजुळ पाणी समितीद्वारे काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा, आंदोलन सुरू आहेत. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वांजुळ पाणीप्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. कसमादेसह उत्तर महाराष्ट्राला हक्काचे पाणी मिळावे यासाठी वांजुळपाणी संघर्ष समितीच्या वतीने तालुक्यातील दाभाडी येथे १७ फेब्रुवारी रोजी पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात उगम पावणाच्या नारपार, अंबिका-औरंगा, ताण-माण या नद्या पश्चिम वाहिनी असून यांवे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या राज्य शासनाने स्वीकारलेल्या अहवालानुसार ५० टीएमसी पेक्षा जास्त पाणी गुजरातमार्गे समुद्राला वाहून जाते. हे पाणी प्रवाही वळण पद्धतीने पूर्ववहिनी करून तापी खोऱ्यातील गिरणा नदीत टाकल्यास कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवडसह जळगाव जिल्ह्याचा शेतीसिंचनासह पिण्याचा उद्योगाचा पाणी कायमस्वरूपी मिटू शकतो.

महाराष्ट्र शासनाने पश्चिम वाहिनी नद्यांच्या पाण्याचा गुजरात सरकार व केंद्र सरकार यांच्याशी पाणी वाटप करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पार-तापी-नर्मदा व नार-पार-गिरणा लिंकिंग योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. नार-पार-गिरणा लिंक योजनेत वांजुळ पाणीप्रवाही वळण योजना समाविष्ट करून रबविल्यास नैसर्गिक उतराणे पाणी गिरणा नदीत टाकता येईल त्यामुळे पाणी लिफ्ट करण्याचा खर्च वाचणार आहे. तसेच वन जमीन हद्दीतून हे पाणी वळविण्याचे असल्याने स्थानिक आदिवासी बांधवाणाच्या जमिनी भूसंपादन करण्याची गरज भासणार नाही. यामुळे हा प्रकल्प राबविल्यास कमी खर्चात कमीत कमी जमीन भूसंपादन करून कोणत्याही विरोधाला सामोरे जाता प्रकल्प पूर्ण करता येईल.

या प्रकल्पाबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी वांजुळपाणी संघर्ष समितीच्या वतीने दाभाडी ता मालेगाव येथे १७ फेब्रुवारी रोजी पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात कळवण-सुरगण्याचे आमदार जे. पी. गावित, शेतकरी कामगार नेते आमदार जयंत पाटील, याचिकाकर्ते नितीन भोसले यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुनद’ पूर्णत्वास नेऊच

0
0

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही; पुनद पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेली ५१ कोटी रुपये खर्चाची पिण्याच्या पाण्याची पुनद योजना कोणत्याही परिस्थिती पूर्णत्वास नेण्यात येईल. राज्य व केंद्र सरकारने गत साडेचार वर्षांत आणलेल्या सर्वच योजना पूर्णत्त्वास नेल्या आहेत. यामुळे पुनद पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास येईल, अशी ग्वाही राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

सटाणा येथील पाठक मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. बागलाण तालुक्यासह सटाणा शहरातील पुनद पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, माजी आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष महेश देवरे, डॉ. शेषराव पाटील, भाजप तालुकाध्यक्ष संजय भामरे, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, रमेश देवरे, साहेबराव सोनवणे, डॉ. प्रशांत पाटील, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आदी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बागलाणमधील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा जाहीर सभेतूनच संगणकावरील कळ दाबून डिजिटल पद्धतीपे करण्यात आला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पाठविले आहे. आपल्याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागाच्या विकासासाठी कोरा चेक दिला आहे. आपण ज्या काही योजना देणार त्यासाठी कितीही निधी लागेल तरी देण्याचा शब्द आपणास त्यांनी दिला आहे. बागलाण मधील तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी दिला असल्याचे स्पष्ट करीत नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी मागणी केलेल्या देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या स्मारकासाठी येत्या ७ दिवसात मंजुरी देण्यात येईल अशी घोषणा यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केली.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे म्हणाले, बागलाण मधील शेतीसिंचनाचे पाचही प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित होते. सदर प्रकल्पांसाठी आपण पाठपुरावा करून निधी मंजूर केला आहे. काहींचे भूमिपूजनही झाले आहे. आगामी काळात अप्पर पुनद प्रकल्पाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी बैठक घेतली आहे. सुळे डाव्या कालव्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध केला आहे. पाइपलाइन देखील मंजूर केली असल्याची घोषणा त्यांनी केली. नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी शहरातील विविध विकासकामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रणगाड्याचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.

कांद्याविषयी बोला हो...

केंद्रींय संरक्षण राज्यमंत्री डॅ. सुभाष भामरे यांच्या भाषणावेळी किकवारी येथील कांदा उत्पादक शेतकरी दिलीप तुळशीराम काकुळते यांनी कांद्याविषयी बोला हो, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे सभेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. काकुळते हे सभास्थानी अंगावर पेट्रोल टाकून आले असल्याने पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतले.

मनसेचे आंदोलन

शेतमालाला हमी द्या, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, आदी मागण्यांसाठी बागलाण तालुका मनसेच्या वतीने मंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याला अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल यांचा ताफा सटाणा शहराकडे येत असताना कंधाणे फाट्यावर मनसेचे तालुकाध्यक्ष सतीश विसपुते, सटाणा शहर प्रमुख पंकज सोनवणे, मनसे पदाधिकारी मंगेश भामरे, विश्‍वास खैरनार, दादा इंगळे, ललीत नंदाळे, मनोज सोनवणे, दादू बैताडे, दिनेश जाधव, अरूण पवार यांनी निर्देशने केली.

बुलेटस्

कांदाप्रश्न, पुनद विरोधामुळे प्रवेशद्वारावर कसून तपासणी

मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करूनच प्रवेश

पाणी बाटली, खिशातील चैनीच्या बाबींना देखील मज्जाव

प्रमुख अतिथी व मान्यवर कक्षांत अन्यांना प्रवेश निषेध

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला महाविद्यालयात विद्यापीठ स्थापना दिवस

0
0

देशमुख कॉलेजात

विद्यापीठ स्थापना दिवस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. बिंदू रामराव देशमुख आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, नाशिकरोड येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे चा ६९वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यापीठ ध्वजारोहण करण्यात आले तसेच राष्ट्रगीत व विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लीना पांढरे यांनी उपस्थित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनींना विद्यापीठ स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

इ. स. १९४९ साली विद्यापीठाची स्थापना झाली आणि आजपर्यंत विद्यापीठाने उतरोत्तर प्रगती कशी केली, विद्यापीठात राबविण्यात येणारे प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांसाठी अनेक कोर्सेस व उपक्रम राबविले जातात, संशोधनासाठी प्रोत्साहन दिले जाते, विद्यार्थ्यांसाठी देखील अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते या संदर्भात विवेचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. योगेंद्र पाटील यांनी केले. याप्रसंगी प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात विद्यापीठ स्थापना दिन साजरा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच हजार नागरिकांचा अवयवदानाचा संकल्प

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वराज फाउंडेशनच्या वतीने रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या 'वॉक फॉर लाइफ' या उपक्रमात अडीच हजार नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प सोडला.

नाशिकमधील विविध संस्था, महाविद्यालये, शाळा आणि शहरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 'वंडर बुक ऑफ रेकॉर्ड'च्या मुख्य समन्वयक अमी छेडा यांच्या हस्ते स्वराज फाउंडेशनला विश्वविक्रम केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. भविष्यातही हा विश्वविक्रम मोडून याच्यापुढे जाऊ अशी आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

'वॉक फॉर लाइफ' रॅलीत ब्लाइंड असोसिएशनचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सकाळी ७ वाजता कॉलेजरोड येथील डॉन बॉस्को शाळेपासून सुरुवात झाली. कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, पुन्हा कॉलेज रोड, भोसला मिलिटरी स्कूल असा या रॅलीचा मार्ग होता. यात एक हजारावर नागरिक सहभागी झाले होते. या वॉकमध्ये डीआयडीटी कॉलेज, जी. डी. सावंत कॉलेज, नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय, सॅव्ही कॉलेज, ब्लाइंड ऑर्गनायझेशन, बीव्हीजी इंडिया लिमिटेड, रोटरी क्लब ऑफ नाशिक ईस्ट, नामको चॅरिटेबल हॉस्पिटल, आकार फाउंडेशन, समिज्ञा फाउंडेशन, दिव्य फाउंडेशन, शिवताल वाद्य पथक आदि संस्थांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध संस्थांनी अवयवदानाबाबत फलकांद्वारे जनजागृती करीत देखावे सादर केले. यापुढे जाऊन स्वराज फाउंडेशन अवयवदान जनजागृती मध्ये गिनीज रिकॉर्ड करेल अशी आशा संस्थापक आकाश छाजेड यांनी व्यक्त केली. आमदार देवयानी फरांदे, डॉ. संजय चावला, नगरसेविका समिना मेमन, नगरसेविका आशा तडवी, नगरसेवक योगेश हिरे, बीवायके कॉलेजचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्रीतीश छाजेड, डॉ. मनीष पाठक, आयएमएचे अध्यक्ष अवेश पलोड, अभिनेता अरमान ताहील उपस्थित होते. प्रास्ताविक आकाश छाजेड यांनी, सूत्रसंचालन तन्मय जोगळेकर यांनी तर आभार प्रदर्शन स्वराज फाउंडेशनच्या संदेशदूत रंजीता शर्मा यांनी केले. नूपुर डान्स ॲकॅडमी, सह्याद्री हॉस्पिटलच्या परिचारकांनी अवयवदानाबाबत नाटिका सादर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रवींद्रनाथ विद्यालयाने राखला चषक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रवींद्रनाथ टागोर क्रिकेट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रवींद्रनाथ विद्यालयाने रासबिहारी इंग्लिश मीडियम स्कूलवर विजय मिळवत रवींद्रनाथ टागोर चषक स्वत:कडेच राखला.

या स्पर्धा द्वारका येथील रवींद्रनाथ विद्यालयाच्या मैदानावर गेल्या १० दिवसांपासून सुरू होत्या. टागोर क्रिकेट आंतरशालेय क्रिकेट ट्रॉफीमध्ये नाशिक जिल्हातील १३ शाळांनी सहभाग नोंदविला होता. रविवारी या क्रिकेट ट्रॉफीचा अंतिम सामना रवींद्रनाथ विद्यालय विरुद्ध रासबिहारी यांच्यात अत्यंत रोमांचक झाला. सामन्याच्या सुरुवातीला नगरसेवक शाहू खैरे यांनी नाणेफेक केली. रवींद्र विद्या प्रसारक मंडळाने नाणेफेक जिंकणाऱ्या रासबिहारी संघास चांदीचे नाणे भेट दिले. रासबिहारी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. परंतु, रवींद्रनाथ संघाच्या ललित आल्हाट व भूषण खैरनार या गोलंदाजांनी एकामागून एक बळी घेत रासबिहारीचा संघ सर्व बाद ६७ धावांत गुंडाळला. रासबिहारी संघाच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारा सामना फिरेल, अशी स्थिती निर्माण झाली. परंतु, रवींद्रनाथ विद्यालयाच्या गौरव बैसनी याने ३६ चेंडूत २४ धावा करुन संघाची बाजू बळकट केली. रवींद्रनाथ विद्यालयाने ७ गडी राखून हा सामना जिंकला. सामन्याच्या वेळी नगरसेवक शाहू खैरे‚ नाशिक क्रिकेट असोसिएशन संघाचे अध्यक्ष विनोद शहा,‚ भाजपचे नेते सुदाम कोंबडे उपस्थित होते. सामनावीराचा किताब तीन बळी घेणाऱ्या भूषण खैरनार यास देण्यात आला.

हे ठरले उत्कृष्ट

साखळीतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून २१३ धावा करणाऱ्या रवींद्रनाथ विद्यालयाच्या संजय ठाकूर यास गौरविण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ९ बळी घेणाऱ्या रासबिहारी संघाच्या आर्यन सोलंकी यास गौरविण्यात आले. उत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूलचा आयुष ढवळे यास गौरविण्यात आले. 'मॅन ऑफ द सीरिज' १६९ धावा व १३ बळी घेणाऱ्या भूषण खैरनार ठरला. विजेत्या व उपविजेत्या संघाला रवींद्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज पिंगळे व उपाध्यक्ष वसंत राऊत यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृतीय पंथीयांनाही बजावता येणार मतहक्क!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी निवडणूकांमध्ये तृतीय पंथीयांनाही मतदानाचा हक्क बजावता येणार असून, निवडणूक शाखेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात ७६ तृतीय पंथियांनी मतदार नोंदणी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी नुकतीच प्रसिद्ध झालेली अंतीम मतदार यादीमध्ये या मतदारांची स्वतंत्र नोंद घेण्यात आली आहे. हे तृतीयपंथी आता मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.

वर्षानुवर्ष समाजाच्या तिरस्कारपूर्ण नजरांचा सामना तृतीयपंथीय करीत आहेत. त्यामुळेच हा घटक समाजात फारसा मिसळताना दिसत नाही. मतदान हा लोकशाही व्यवस्थेने बहाल केलेला अधिकार असला तरी विविध कारणांमुळे हा अधिकारही बहुतांश तृतिय पंथियांकडून बजावता आलेला नव्हता. या सर्व पार्श्वभुमीवर राष्ट्रीय मतदार यादीमध्ये तृतीयपंथींयांचीही स्वतंत्र नोंद असावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मतदार यादीचे विश्लेषण करताना जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने न्यायालयाच्या आदेशाची कटाक्षाने अंमलबजावणी केली असून, पुरूष आणि महिला मतदारांप्रमाणेच यंदा तृतीयपंथी मतदार अशी स्वतंत्र नोंद घेतली आहे. ही नोंद घेताना त्यांना थर्ड जेंडर असे संबोधण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र रकानाही देण्यात आला आहे.

जिल्ह्यात १५ मतदार संघांपैकी इगतपुरी, देवळाली, नाशिक पूर्व, दिंडोरी, निफाड, सिन्नर आणि चांदवड या मतदार संघामध्ये एकाही तृतीयपंथी मतदाराची नोंद नाही. सिडको आणि सातपूर या परिसराचा अंतर्भाव असलेल्या नाशिक पश्चिम मतदार संघामध्ये मात्र सर्वाधिक ६६ तृतियपंथी मतदारांची नोंद असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने दिली आहे. हा मतदारसंघ दाट लोकवस्तीचा आहे. चुंचाळे आणि आसपासच्या परिसरात मोठ्या संख्येने हे लोक स्थायिक झाल्याचे या घटकांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून सांगितले जात आहे. येवल्यात तीन, मालेगाव मध्य मतदारसंघात दोन तर नांदगाव, मालेगाव बाह्य, बागलाण, कळवण आणि नाशिक मध्य या मतदार संघांमध्ये प्रत्येकी एका तृतीय पंथीय मतदाराची मतदार यादीमध्ये नोंद आहे. अजूनही काही तृतीयपंथियांनी मतदार नोंदणी केलेली नसावी, असा अंदाज निवडणूक शाखेने वर्तविला असून, नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

मतदारसंघ निहाय तृतीयपंथी मतदार

मतदारसंघ तृतीयपंथी मतदार

नाशिक पश्चिम ६६

येवला ०३

मालेगाव मध्य ०२

नांदगाव ०१

मालेगाव बाह्य ०१

बागलाण ०१

कळवण ०१

नाशिक मध्य ०१

एकूण ७६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकः आता भरत पन्नू जाणार रॅम स्पर्धेला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील आर्मी एव्हीएशनच्या मेन्टेनन्स विभागात कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू हे ११ जून २०१९ रोजी होणाऱ्या रेस अॅक्रॉस अमेरिका या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पर्यावरण बचाव हा त्यांच्या रेसचा मोटो असणार आहे. यापूर्वी आर्मीचे श्रीनिवास गोकुळनाथ यांनी ही स्पर्धा टीम ऑफ टू या प्रकारात पूर्ण केली होती. त्यामुळे आता पन्नू हे रॅममध्ये सहभागी होणारे आर्मीचे दुसरे अधिकारी ठरणार आहेत. तर, सोलो गटात स्पर्धा पूर्ण केल्यास पन्नू हे पहिले भारतीय नाशिककर ठरणार आहेत.

ले. कर्नल भरत पन्नू हे मुळचे हरियाणा येथील असून आजवर त्यांनी भारतातल्या अनेक नामवंत सायकल स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांचा जन्म व शालेय शिक्षण हरियाणा येथे झाले. घर आणि शाळा यात अंतर असल्याने त्यांना ये-जा करण्यासाठी सायकल हेच माध्यम होते. शालेय शिक्षण संपल्यानंतर पन्नू यांनी पुणे येथील आर्मी इंजिनीअरींग कॉलेजमधून इजिनीअरींगची पदवी मिळवली. या काळात त्यांचा सायकलचा छंद जोपासता आला नाही. मात्र नाशिक येथे बदली होताच नाशिकच्या सायकलमय वातावरणाने त्यांना भूरळ घातली. २०१६ पासून त्यांनी छोट्या छोट्या अंतराच्या मोहीम फत्ते केल्या. महाजन बंधुंनी रेस अॅक्रोस अमेरिका ही स्पर्धा पूर्ण केल्यानंतर आपणही काहीतरी वेगळे करावे या ध्येयाने त्यांनी विविध स्पर्धांची चाचपणी करण्यास सुरुवात केली.

दरम्यान त्यांनी २०१७ मध्ये त्यांनी रेस अराऊंड ऑस्ट्रीया ही स्पर्धा २ हजार २०० किलोमीटरची स्पर्धा दर्शन दुबे यांच्या सोबत पूर्ण केली होती. त्यानंतर गोवा-उटी-गोवा अल्ट्रा स्पाईस ही १ हजार किलोमीटरची स्पर्धा पूर्ण केली. त्यानंतर हीच स्पर्धा कर्नल पन्नू यांनी १ जाने २०१८ मध्ये ११३ तास आणि १३ मिनिटात पूर्ण केली होती. यावेळी त्यांचा तिसरा क्रमांक आला होता. त्यांनतर यंदा पुन्हा या स्पर्धेत सहभाग घेऊन २६ जानेवारी २०१९ रोजी गोव्यातून सुरू झालेली १ हजार ७५० किमीची स्पर्धा पन्नू यांनी ९५ तासांत पूर्ण करत नाशिकच्या कर्नल श्रीनिवास गोकुळनाथ यांचा विक्रम मोडला. या अगोदर ही स्पर्धा टीम टु प्रकारात महाजन बंधूंनी, गोकुळनाथ, टीम ४ प्रकारात राजेंद्र नेहते यांनी पूर्ण केली आहे. सोलो प्रकारात ही स्पर्धा पूर्ण करणारे भरत पन्नू हे पहिले सायकलिस्ट ठरणार आहे. या स्पर्धेत ५ हजार किलोमीटर अंतर हे २८८ तासात पूर्ण करावे लागणार आहे. त्यांच्या स्पर्धेसाठी अमेरिकेतील टेसी मके हे प्रशिक्षक मार्गदर्शन करीत आहे.

आर्म फोर्सेस कप मिळवण्याचे ध्येय

या स्पर्धेत जगातील अनेक राष्ट्रांचे स्पर्धक सहभागी होत असतात. यामध्ये जे स्पर्धक त्या राष्ट्राच्या सैन्यदलात काम करतात त्यांच्यासाठी आर्म फोर्सेस कप देण्यात येतो. या स्पर्धेत भरत पन्नू यांनी हा कप मिळवण्याचे ध्येय समोर ठेवले असून हा कप मिळाल्यास देशासाठी मोठी अॅचिव्हमेंट ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवजयंती १९ लाच साजरी करण्याचा निर्धार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मावळ्यांसाठी दिवाळीच आहे. तारीख आणि तिथीचा वाद उपस्थित करून काही लोक शिवभक्तांमध्ये संभ्रम निर्माण करीत असून, हा लोकोत्सव १९ फेब्रुवारी रोजीच मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय काही संघटनांनी घेतला आहे.

काही लोक तसेच समूह शिवाजी महाराजांच्या जयंतीविषयी तारीख व तिथीचा वाद उपस्थित करीत आहेत. यामुळे शिवप्रेमींमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे. या पार्श्वभुमीवर काही शिवभक्तांनी रविवारी सरकारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद बोलावली होती. शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. या वर्षी सर्व जाती धर्माच्या बांधवांनी या सोहळ्यात सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

यावर्षीची व पुढील सर्व शिवजयंती उत्सव तारखेनुसार म्हणजेच १९ फेब्रुवारी या दिवशीच उत्साहात साजरे करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यावेळी सुरेश मारू, अस्लम लालू, विद्या आहेर, विलास पलंगे, संविधान गायकवाड, आनंद काळे आदी शिवप्रेमी उपस्थित होते. यंदा छत्रपती सेनेतर्फे १४ फुटी जिरेटोप बनवून त्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिव व्याख्याते नवनीत राव यांचे व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले आहे. मावळा संघटनेतर्फे व्यसनमुक्त चालक व कर्तव्य दक्ष सरकारी अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक सायकलीस्टतर्फे सुपर रॅन्डोनियरचा सन्मान

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनच्या नाशिक रॅन्डोनियर मायलर्सच्या टीमच्या वतीने शुक्रवारी लायन्स क्लब हॉल, पंडित कॉलनी येथे २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षांत सुपर रॅन्डोनियर किताब मिळवणाऱ्या १६ सायकलपटूंचा सन्मान शुक्रवारी करण्यात आला.

शहरात प्रथमच घेण्यात आलेल्या १ हजार २०० किमीची बीआरएम स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सायकलस्वारांचे देखील मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. या सर्व १६ जणांनी ऑडेक्सच्या नियमात बसून सलगपणे २००, ३००, ४००, ६०० तसेच १२०० किमीची बीआरएम प्रत्येक टप्प्यावर निर्धारित वेळेत पूर्ण केली आहे.

अल्ट्रा स्पाईस रेस गोवा-उटी- गोवा ही १ हजार ७५० किमीची स्पर्धा फक्त ९५ तासात पहिल्या क्रमांकाने पूर्ण करून एक नवीन विक्रम स्थापित करणाऱ्या लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सायकलिंग हा ऑलिम्पिक खेळ आहे. या खेळला शासकीय स्तरावर मान्यता आहे. नाशिक सायकलीस्टच्या एनआरएम उपक्रमास शासकीय मानंकानाखाली आण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नाईक म्हणाले. लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू यांनी आपले अल्ट्रा स्पाईस रेसमधील आलेले अनुभव उपस्थितांना सांगितले. डॉ. महाजन यांनी आपल्या आगामी सी टू स्काय या मोहिमेची माहिती दिली. आगामी रॅम २०१९ स्पर्धेसाठी पन्नू यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. ते या स्पर्धेत वैयक्तिक गटातून सहभागी होणार असून त्यांनी ती यशस्वीपणे पूर्ण केल्यास कर्नल श्रीनिवास गोकुलनाथ यांच्या नंतर दुसऱ्यांदा हा बहुमान नाशिकला प्राप्त होणार आहे.

यावेळी नाशिक सायक्लिस्टस् फाऊंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, नाशिकचा पहिला आयर्नमॅन अमर मियाजी, एनआरएम प्रमुख चंद्रकांत नाईक, डॉ. आबा पाटील, देवींदर भेला, मोहन देसाई, रवींद्र दुसाने, नितीन कोतकर, डॉ.मनीषा रौंदळ, यांच्यासह अनेक सायक्लिस्टस् मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान :

ले. क. भारत पन्नू, डॉ. महाजन बंधू, तसेच १६ सुपर रॅन्डोनियर चंद्रकांत नाईक, मोहिंदर सिंग भराज, नीता नारंग, अनिकेत झंवर, सचिन शेटे, समीर मराठे, गणेश माळी, रतन अंकुलेकर, डॉ. राहुल सोनवणी, किरण शिंदे, रामदास सोनवणे, राजेश देशमाने, आशिष भट्टड डॉ. हिमांशू ठुसे, बाळासाहेब वाकचौरे, दिनकर पाटील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्सपोर्ट द्राक्ष्यांची पडझड

0
0

युरोपात दक्षिण अफ्रिकेचे द्राक्ष दाखल

म. टा. वृत्तसेवा, निफाड

उत्तरेत थंडीची आलेली लाट आणि युरोपमध्ये दक्षिण आफ्रिकेचे दाखल झालेले द्राक्ष यामुळे देशांतर्गत आणि एक्स्पोर्ट द्राक्ष भावावर परिणाम झाल्याने द्राक्ष उत्पादकांवर आर्थिक संकटाचा सामना करायची वेळ आली आहे. मात्र २५ ते ३० रुपयांनी घसरलेले द्राक्षाचे बाजारभाव येत्या ५ ते ६ दिवसांत पुन्हा उभारी घेतील अशी खात्री शेतकरी आणि व्यापारी यांनी बोलून दाखवली.

द्राक्ष हंगाम सुरू झाला तेव्हा एक्स्पोर्ट द्राक्षाला ९० ते १०० रुपये सरासरी दर भेटत होते. मात्र युरोपमध्ये साऊथ आफ्रिकेचे द्राक्ष दाखल झाल्याने भारतीय द्राक्षाला मागणी कमी झाल्याने एक्स्पोर्ट द्राक्षांना मागणी कमी झाली आहे. त्यातच उत्तर भारतात थंडीची पुन्हा एकदा लाट आल्याने द्राक्ष मालाची मागणी कमी झाली आहे. देशांतर्गत बाजारभावातही घसरण झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीला ८० रुपये किलोपर्यंत बाजारभाव असलेले द्राक्ष आता अक्षरश: ३० ते ४० रुपये किलोपर्यंत आले आहेत. येत्या ५ ते ६ दिवसात द्राक्षाचे दर पुन्हा उभारी घेतील असेही द्राक्ष व्यापाऱ्यांनी सांगितले. निफाड तालुक्यात २१ हजार हेक्टरवर उभ्या असलेल्या द्राक्ष बागांमध्ये हंगामाची लगबग सुरू आहे. मात्र तापमान कमी झाल्याने द्राक्ष हंगाम संकटात सापडला आहे.

द्राक्ष एक्स्पोर्ट करणाऱ्या कंपन्या सध्या कोणतेही दर न ठरवता द्राक्ष बागांमध्ये द्राक्ष हार्वेस्टिंग करीत आहेत. द्राक्ष देण्यासाठी आल्याने उत्पादकाला एक्स्पोर्ट कंपन्यांचे ऐकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे एक्स्पोर्ट द्राक्षाला अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नाही. शिवाय साऊथ आफ्रिकेचा माल युरोपमध्ये दाखल झाल्याने भारतीय द्राक्षाला उठाव नाही. ब्लॅक पर्पल द्राक्ष सुरुवातीला तर एक्स्पोर्टला घेतलेही नाही ते आता घेतले जात आहे.

- बाळासाहेब सानप, द्राक्ष उत्पादक

बेदाणा उद्योगालाही फटाका

निफाड तालुक्याच्या ग्रामीण भागात उत्पादकांनी बेदाणा निर्मितीला सुरूवात केली आहे. अशातच द्राक्ष मालावर प्रक्रिया करून त्यापासून तयार झालेला बेदाणा सुकविण्यासाठी कडक उन्हाची आवश्यकता आहे. मात्र थंडी व गार हवामुळे भिजविलेला माल सुकण्यास दोन तीन दिवस विलंब होत आहे.

२२९८९.६२३ मेट्रिक टन निर्यात

मागील आठ दिवसाच्या तुलनेत द्राक्षाला सध्या मागणी वाढली आहे. रशियाकडून भारतीय द्राक्षाला मागणी कमी झाली आहे. मात्र युरोपकडून मागणी होत आहे. २१ दिवस माल पोहचायला लागत असल्याने द्राक्ष दराच्या बाबतीत तिकडचे त्यावेळी असणारे दरच मिळत आहेत. चालू द्राक्ष हंगामात आतापर्यंत १ हजार ७२३ कंटेनर मधून २२९८९.६२३ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली असल्याचे द्राक्ष निर्यातदार कंपनीकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानवेलींच्या विळख्यात अडकली गाय

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

रविवारी दुपारी बाराच्या दरम्यान गोदावरीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली गाय पानवेलींच्या विळख्यात अडकली होती. या गायीला चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढून तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

गोदावरी नदीला पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने मोकाट गाय पाण्याच्या प्रवाहात सापडली, असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सायखेडा येथील गोदावरी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या कार्यकर्त्यांनी वाहत्या पाण्यात जीव धोक्यात घालून या गायीला पाण्यातून काढून तिच्यावर एका ठिकाणी खड्डा खोदून अंत्यविधी केला. सायखेड्याचे माजी सरपंच शाम जोंधळे यांनी जे. सी. बी. उपलब्ध करून दिला. सागर गडाख, किसन जाधव, कृष्णा धोंगडे, शुभम गारे, सौरभ भोज, शुभम पठाडे, राजेंद्र टर्ले, शरद वायकांडे आदी कार्यकर्ते सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संदर्भ’मध्ये ‘तारेवर’ची कसरत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विभागीय संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे रुग्ण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागल्याने हॉस्पिटल प्रशासनही चिंतातूर झाले आहे. आजारपणामुळे व्यथित रुग्ण वॉर्डच्या खिडक्यांमधून स्वत:ला झोकून देत असल्याने अशा खिडक्यांनाच तारा बांधून प्रतिबंध करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय, रुग्णांच्या नातलगांकडून याबाबत शपथपत्रही भरून घेण्यात येणार आहे.

शालिमार परिसरातील संदर्भ सेवा या सरकारी हॉस्पिटलमध्ये हृदयविकार, कॅन्सर, किडनीचे विकार यांसारख्या गंभीर स्वरुपाच्या आजारांवर उपचार होतात. डायलिसीस व तत्सम उपचारांना शरीर साथ देत नसल्याने व्यथित झालेले रुग्ण वॉर्डमधील खिडक्यांमधून उडी मारून आत्महत्या करीत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. शनिवारी जवाहरलाल रामकिसन गुप्ता (वय ४८, रा. घोटी, ता. इगतपुरी) या रुग्णाने अशाच पद्धतीने आत्महत्या केली. किडनीचा आजार असल्याने त्यांच्यावर चारवेळा डायलिसीस करण्यात आले. यापूर्वी १२ जानेवारीला रहिमखान नबीखान पठाण (वय ५२, रा. मालेगाव) या रुग्णानेसुद्धा तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनांची दखल घेऊन संदर्भसेवा हॉस्पिटल प्रशासनाने दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील खिडक्यांना बाहेरील बाजूस खिळे ठोकून त्यास तारा बांधण्यास सुरुवात केली आहे. याखेरीज या खिडक्या उघडताच येणार नाहीत याकरीता उपाययोजना करण्यावरही भर देत आहोत अशी माहिती हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. बी. नामपल्ली यांनी रविवारी दिली. दुसऱ्या मजल्यावरील यूरो वॉर्डमध्ये खिडक्यांना तारा बसविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, हॉस्पिटलमधील ११७ खिडक्यांना अशा प्रकारच्या तारा बसवून तात्पुरत्या प्रतिबंधाची व्यवस्था करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.

इमारत बांधतानाच त्रुटी

या खिडक्यांना गज बसवून रुग्णांची सुरक्षिततता वाढविण्यात यावी, यासाठी संदर्भसेवा हॉस्पिटल प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. परंतु, याकामी १६ लाख ५५ हजार रुपयांच्या निधीचा प्रस्ताव बांधकाम विभागाने दिला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसांचाच कालावधी शिल्लक राहिल्याने या कामाला प्रशासकीय मान्यता मिळून निधी मंजूर होईल का, याची चिंता प्रशासनाला सतावते आहे. हॉस्पिटलचे बांधकाम करतेवेळीच खिडक्या ग्रीलविना मोकळ्या का ठेवण्यात आल्या असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.

रुग्णांवर अधिकाधिक चांगले उपचार करणे ही आमची जबाबदारी असून, ती पार पाडण्याचा प्रयत्न असतो. प्रत्येक रुग्णाच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवणे डॉक्टर्स आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना शक्य नाही. ती रुग्णाच्या नातलगांची जबाबदारी आहे.

- डॉ. व्ही. बी. नामपल्ली, वैद्यकीय अधीक्षक, संदर्भ सेवा हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्कॉन मंदिरात पुष्पसजावट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वसंत पंचमीचे औचित्य साधून नाशिक-पुणे रोडवरील 'इस्कॉन'च्या राधा-मदनगोपाल मंदिरात रविवारी फुलांनी मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली.

वृंदावनात वसंत पंचमीपासून ४० दिवसांच्या होळीच्या उत्सवाला सुरुवात होते. हेच औचित्य साधून इस्कॉनच्या राधा-मदनगोपाल मंदिरात विग्रहांची विशेष सजावट करण्यात आली. विविध प्रकारची पिवळी फुले आणण्यात आली. यामध्ये शेवंती, झेंडू, अस्टर, जरबेरा, ऑर्किड, डच, गुलाब यांसह वेगवेगळ्या पानांचा उपयोग सजावटीसाठी करण्यात आला. राधा-कृष्ण यांचे वस्त्रही फुलांनी बनविण्यात आले होते. हे वस्त्र मंदिरातील महिला भक्तांनी बनविले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ५ वाजता आरतीने झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्रजप आणि श्रीमद्भागवतावर प्रवचन झाले. ९ वाजता श्री विग्रहांची विशेष शृंगार आरती करण्यात आली. दर्शनासाठी नागरिकांनी दिवसभर गर्दी केली होती. संध्याकाळी भजन संध्या झाली. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभू, सहस्त्रशीर्ष प्रभू, गोपालानंद दास, माधवकृष्ण प्रभू, मुकुंदरस प्रभू, सार्वभौम कृष्णप्रभू आदींनी मेहनत घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बालनाट्यातून उलगडले हळवे क्षण!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'मला मोठे व्हायचे', 'आम्हाला पण शाळा पाहिजे','देवाचे दान','वनराई' अशा संवेदनशील विषयांवर मांडणी करीत परिवर्तनासाठी झटणारे तर कोत्या मनाची मानसिकताही दाखविणारे हळवे क्षण चिमुकल्यांनी नाटकांमधून उलगडले. निमित्त होते परशुराम सायखेडकर नाट्यगृहात रविवारी आयोजित सार्वजनिक वाचनालय व नाशिक बालभवन साने गुरुजी कथामालेंतर्गत (कै.) रत्नाकर गुजराथी स्मृती बालनाट्य स्पर्धेचे.

'मला मोठे व्हायचे' नाटकात आठ पात्र होती. प्रत्येक जण आपल्याला कशासाठी मोठे व्हायचंय याची मांडणी करीत असतो. कुणाला क्रिकेटर व्हायचे असते, कुणाला आईचा भार हलका करायचा, कुणाला आजीला वृद्धाश्रमातून घरी आणायचे, अशा वेगवेगळ्या कारणासाठी प्रत्येकाला मोठे व्हायचे असते, अशा आशयाचे हे नाटक होते. 'आम्हाला पण शाळा पाहिजे' यात छोट्याशा गावातील शाळा दाखवली. शिक्षक गावकऱ्यांबरोबर बैठकीला जातात. शिक्षक परत आल्यानंतर विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी शाळेची तपासणी करण्यासाठी येणार म्हणून शाळेची साफसफाई करण्यास सांगतात. जिल्हाधिकारी पाहणी करतात. जाताना ते विद्यार्थ्यांना पत्र देतात. आपल्या पत्रावर कार्यवाही करून शाळा देण्याऐवजी पत्रच दिल्याने विद्यार्थी नाराज होतात.

'देवाचे दान' नाटकात आईवडील नसताना अनाथ म्हणून जगण्याचे शल्य असणारी आणि बहिणीला बरे करण्यासाठी झटणारी मीना, मुले लक्ष देत नाहीत, म्हणून एकटे राहण्याची आलेली वेळ व त्याचे दुःख करत बसणारी म्हातारी आजी, मैत्रीणीला मदत करण्यासाठी पुढे आलेली सर्व अनाथ मुलांचा जगण्याचा संघर्ष दाखवला आहे. सध्याची समाजाची बदलणारी काही लोकांची कोत्या मनाची मानसिकताही दाखवली आहे.

'वनराई' नाटकातून शाळेतील मुले एका गावात सहलीला जातात. त्या ठिकाणी पाण्याचे प्रदूषण होऊ नये, म्हणून ते गावकऱ्यांचे प्रबोधन करतात. वृक्षाचे संगोपनाचे महत्त्व पटवून देतात, असा आशय होता.

सावानाचे कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके, बालभवनप्रमुख संजय करंजकर, परीक्षक प्रशांत हिरे, गीतांजली घोरपडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. दिवसभरात सहा बालनाटके सादर झाली. आज, ११ फेब्रुवारी सोमवार रोजी या स्पर्धेचा समारोप होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर लोकप्रतिनिधींना गावबंधी

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुळे उजवा कालव्याचे अपूर्ण काम तत्काळ सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडून आगामी निवडणुकात आमदार-खासदारांना गावबंदी करण्याचा इशारा पंचायत समितीच्या सदस्य मीनाक्षी चौरे, सरपंच उत्तम जगतापमाजी सरपंच श्रावण पालवी व पाटविहीर ग्रामस्थांनी दिला आहे.

कळवण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळाच्या तालुक्यातील पाटविहीर शिवाराला जास्त जाणवत आहेत. तालुक्यातील पुनद धरणाच्या सुळे उजव्या कालव्याचा शेवट पाटविहीर गावापासून कळवण शिवारातील गिरणा नदीच्या नकट्या बंधाऱ्यापर्यंत होतो. १२ वर्षांपासून पाटविहीर गावापर्यंत पाट व पाणी दोन्ही न पोहचल्याने येथील शेती कोरडवाहूच राहिली आहे. येथील ग्रामस्थांवर मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे.

कळवण तालुक्यातील पुनद प्रकल्पाच्या सुळे उजव्या कालव्याचे २१ किमीचे कामासाठी २००५-०६ मध्ये २० कोटी ३६ लाख ८६ हजार रुपये खर्च झाले आहेत. मात्र या कालव्याच्या मातीकाम, काँक्रिटीकरण काम निकृष्ठ दर्जाचे आहे. तसेच या कालव्याच्या कामात वाढीव निविदा काढून मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कालव्याला पाणी वाहण्यासाठी योग्य चढ उतार नसल्याने पाणी आतापर्यंत ० ते १६ किमी पर्यंत अत्यंत कमी दाबाने येत आहे. हा कालवा ० ते २१ किमीचा असून १६ ते २१ कि.मी. तील शेतकरी या कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत. कालव्याचे काम पूर्ण करून याच वर्षी उन्हाळ्यात आवर्तन सोडावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा पाटविहीर ग्रामस्थांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान-३ फास्ट

0
0

महिलांचा मेळावा

जेलरोड : अखिल गुरव समाज महिला आघाडीचा मेळावा जेलरोडच्या ज्ञानेश्वर मंदिरात झाला. यावेळी हळदी-कुंकु व तिळगुळ वाटप समारंभही झाला. सिडकोच्या सभापती तथा नगरसेविका कल्पना पांडे, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख स्मिताताई गुरव, कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब पवार, सुधीर चांदसरकर, प्रकाश दुधाळे, सुभाष शिंदे, भास्कर गुरव, प्रकाश जाधव, काशीनाथ भदे, रमेश पवार, अशोक भालेकर, मनिषा पांडे, रेखा सोनवणे, अश्विनी शिंदे, मनीषा आचार्य आदींची प्रमुख उपस्थिती होती. कल्पना पांडे यांनी महिला सक्षमीकरण व बचतगट याबाबत मार्गदर्शन केले. स्मीताताई गुरव यांनी समाजाचे काम समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावे व सर्व शाखा-पोटशाखांनी एकत्र करून अखिल गुरव समाज संघटना भक्कम करावी, असे प्रतिपादन केले.

मराठा महासंघ कार्यकारिणी

पंचवटी : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकारिणीची घोषणा शहराध्यक्ष चंद्रकांत बनकर यांच्या उपस्थितीत सरचिटणीस अजय मराठे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. त्यात कार्याध्यक्षपदी दिलीप मोरे, कायेदशीर सल्लागार अॅड. प्रशांत घुले पाटील व आनंद बोंबलेपाटील, प्रवक्ता अविनाश वाळुंजे व राजेश साळवेपाटील, उपाध्यक्ष विष्णू आहिरे (पूर्व), चेतन पाटील (पश्चिम), संजय फडोळ (मध्य), महेश जाधव (नाशिकरोड-देवळाली), संपर्क प्रमुख गणेश सोमवंशी, भूषण भोसले, कारभारी म्हस्के व अनिल साळुंके, प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र शिरसाठ, रामेश्वर निर्वळ, समाधान अनवट व मयूर तिदमे, शहरसंघटक रवींद्र जाधव, ज्ञानेश्वर आढाव, विजय हिरे व दत्तु सोनवणे, समन्वयकपदी समाधान पाटील, मनोज पाटील, गणेश मोरे व नितीन जाधव, विभागप्रमुख सचिन हांडे (सिडको), संजय जगताप (सातपूर), राम भांगरे (इंदिरानगर) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलश यात्रेत भारावले भाविक

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

शहरात श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील जैन भवन येथे हा सोहळा सुरू आहे. वृंदावन धाम येथील भागवत कथाकार श्री आनंद कृष्ण ठाकूरजी महाराज हे आजपासून आठ दिवस रोज दुपारी २ ते ६ या वेळेत कथा सांगणार आहेत.

त्यानिमित्ताने रविवारी मारोती मंदिर ते जैन भवन दरम्यान शोभा तथा कलश यात्रा काढण्यात आली.

ढोल ताशांच्या गजर आणि टाळ मृदुंगाच्या निनादाने परिसर भक्तिमय झाला होता. 'कृष्ण कन्हैया लाल की जय बोलो गोपाल की' असा जयजयकार करीत भाविक या कलश यात्रेत सहभागी झाले होते. कथाकार श्री आनंद कृष्ण ठाकूरजी महाराज उपस्थित होते.

याप्रसंगी वारकरी संप्रदायाचे बाल गोपाल टाळ मृदंगाच्या गजरात थिरकताना दिसत होते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्रातील पदाधिकारी शोभायात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होते. कथाकार आनंद कृष्ण ठाकूरजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीने भागवत कथेचे महत्व विस्तृत केले. सोमवारी उद्या भागवत कथेस सुरवात होणार असून जास्तीत जास्त भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने मदनलाल बबेरवाल यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अहिल्या’ कोरडेठाक, ‘गौतमी बेझे’वर आस

0
0

त्र्यंबककरांचा घशाला कोरड

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील अहिल्या धरण कोरडेठाक पडण्याच्या अवस्थेत पोहोचले आहे. त्र्यंबकेश्वर शहराच्या पाचआळी भागात या धरणातून पाणीपुरवठा होत असतो. या धरणाचे पाणी आटल्याने आता गौतमी बेझे धरणातील पाणी पाचआळी विभागाला द्यावे लागणार आहे.

त्र्यंबक शहराला अहिल्या, अंबोली आणि गौतमी बेझे या तीन धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. पावसाळ्यात आहिल्या धरण ओव्हरफ्लो होत असते. या पाण्याचा वापर पाचआळी भागासाठी करावा याकरिता गढई भागात जलकुंभ आणि जलशुद्धिकरण केंद्र उभारण्यात आले आहे. वास्तवीक पाहता वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर संपूर्ण त्र्यंबक शहरासाठी केला तर अंबोली आणि अहिल्या धरणातून पाणी उचलण्याचा खर्च वाचवता येणे शक्य आहे. सिंहस्थ २०१५ पूर्व नियोजनात संपूर्ण शहरातील नळ योजना नव्याने करण्यात आली तेव्हा अंबोली आणि गौतमी बेझे तसेच अहिल्या धरण या तीनही धरणांच्या पाण्याचा एकत्रित वापर करता येईल, असे नियोजन केले नाही. अंबोली धरणातील पाणी देखील कमी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुढील काळात विस्कळीत होण्याचे चिन्ह आहेत.

'गौतमी बेझे'चे पाणी नको

गौतमी बेझे धरण हे गादावरी नदी पात्रावर बांधले आहे. त्र्यंबकेश्वर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने काम करीत नाही. तशात येथे बायोसॅनीटायझेशनसारखे प्रयोग राबविले जातात. या सांडपाणी केंद्रातून मलजल थेट नदी पात्रात सोडले जाते. शहारातील काही भागांचे गटारीचे पाणी नवीन बस स्थानकाच्या बाजूस असलेल्या नदीपात्रात सोडले आहे. तसेच निवृत्तिनाथ यात्रोत्सवाच्या दरम्यान निर्मलवारी संकलीत मलजल सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून नदीपात्रात सोडण्यात आले आहे. शहराच्या बाहेर असलेल्या नदीपात्रात काळेशार पाणी दिसून येते. अर्थात हेच पाणी गौतमी बेझे धरणात पोहचत असल्याने या धरणाचे पाणी पिण्यास शहरातील नागरिक धजावत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images