Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘त्या’ १३० ठिकाणी कनेक्टिविटी द्या!

$
0
0

निवडणूक आयोगाचे जिल्हा यंत्रणेला निर्देश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोबाइल टॉवर, इंटरनेट यासारख्या सुविधा नसलेल्या १३० मतदान केंद्रांच्या ठिकाणी लवकर कनेक्टिविटी सेवा उभारा, असे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेला दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुका सुरळीतपणे पार पाडाव्यात, यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असून आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी निवडणूकपूर्व कामांचा आणि निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रांची पाहणी करून ती सज्ज ठेवण्याबाबतची खातरजमा करा, असे निर्दश यावेळी देण्यात आले.

बागलाण तालुक्यातील साल्हेर-मुल्हेरसह पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यातील काही गावांमध्ये मतदान केंद्र असली तरी तेथे मोबाइल आणि इंटरनेट कनेक्टिविटीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याबाबतची माहिती बैठकीत देण्यात आली. अशी १३० मतदान केंद्र असून या गावांमध्ये मोबाइल टॉवर, वायरलेस सुविधा उभारण्याचे काम लवकर हाती घ्या, असे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

पुन्हा व्हीव्हीपॅट जनजागृती

यंदा निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनची मदत घेण्यात येणार आहे. आपण दिलेले मत संबंधित व्यक्तीलाच मिळणार असल्याबाबतची खातरजमा त्यामुळे होणार आहे. व्हीव्हीपॅट नेमके कसे काम करते याची प्रात्यक्षिके गेल्या महिन्यात जिल्हाभर दाखविण्यात आली. जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा लोकांपर्यंत पोहोचून ही प्रात्यक्षिके दाखवा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेन्शनर्सचा उद्या थाळीनाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारने पेन्शनधारकांची फसवणूक केली असून त्याबाबत खासदारांना जाब विचारण्यासाठी गरुवारी (दि. ७) सकाळी ११ वाजता जनरल पोस्ट ऑफिस खडकाळी सिग्नल येथील खासदार हेमंत गोडसे यांच्या संपर्क कार्यालयावर थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पात इपीएस ९५ पेन्शनधारकाना पेन्शन वाढ केली नाही, पाच वर्षांपूर्वी भाजप सरकार सत्तेत आल्यावर महागाई भत्तासह पेन्शन लागू करण्याचे आश्वासन दिले होते. ते पाळले नाही. याबाबतचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी (दि. ७) नवी दिल्लीत लोकसभेमध्ये या विषयावर चर्चा होणार आहे. तरी खासदारांनी आमच्या समस्या मांडाव्यात यासाठी नाशिक जिल्हा इपीएस ९५ पेन्शनधारक फेडरेशनवतीने आंदोलन करण्यात येणार आहे. तरी पेन्शनरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी गुन्ह्यातील संशयितास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. पूर्वीच्या गुन्ह्यात जामिनावर सुटताच साथीदारासह पुन्हा घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याच्याकडून घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई नाका आणि ओझर येथील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

शंकर नागेश पुजारी (रा. शनी मंदिरामागे, पेठरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. युनिट एकचे कर्मचारी विशाल काठे यांना याबाबत माहिती मिळाली होती. पेठफाटा परिसरात रिक्षातून (एमएच १५ ईएच ००६३) आलेल्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. ओझर येथे गणेश बाजीराव केदार या साथीदाराच्या मदतीने घरफोडी केल्याची माहिती त्याने दिली. गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, मोबाइल तसेच चोरलेले सोन्या-चांदीचे नाणे असा सुमारे २ लाख १९ हजार १०० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

पुजारी व केदारी हे दोघेही सराईत आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच ते जामिनावर सुटले. त्यांनी पुन्हा दोन घरफोड्या केल्याची माहिती पुढे आली आहे. युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर, पोपट कारवाळ, बाळासाहेब दोंदे, हवालदार रवींद्र बागूल, वसंत पांडव, येवाजी महाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षय चव्हाणचा खून पैशांच्या वादातूनच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वणी-दिंडोरी रस्त्यावर कृष्णगाव शिवारात आढळून आलेला मृतदेह नाशिकमधील तरुणाला डोक्यावर दगड टाकून ठार मारण्यात आले होते. नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पैशांच्या वादातूनच त्याचा खून झाल्याचे तपासात आढळून आले आहे.

कृष्णगाव येथील जलवाहिनीजवळ आढळलेला मृतदेह अक्षय उर्फ आशुतोष रामा चव्हाण (वय २१, रा. पंचकृष्ण लॉन्सजवळ, कोणार्कनगर) याचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रामदास उर्फ पिन्या दौलत पवार (वय २६, रा. निशांत गार्डन, धात्रकफाटा) आणि किशोर बाळासाहेब पवार (वय २६, रा. भऊर, ता. देवळा, जि. नाशिक) या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अक्षयचा मृतदेह सोमवारी (दि. ४) आढळून आला. अक्षयने संशयित रामदास यास १५ हजार रुपये उसनवारीने दिले होते. पैसे परत मिळावेत यासाठी त्याने तगादा लावला होता. उसनवार पैशांवर व्याज घेऊन वारंवार अधिक पैशांची मागणी करीत होता. पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी देत होता, अशी माहिती तपासादरम्यान रामदासने पोलिसांना दिली आहे.

दोघे संशयित अक्षयसमवेत जत्रा हॉटेल परिसरातून कारमध्ये रविवारी (दि. ३) बसून गेले. १० वा मैल परिसरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केले. तेथून ते तिघे दिंडोरी रोडवरील कृष्णगाव शिवारात गेले. तेथे अक्षय व संशयितांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी डोक्यात दगड टाकून अक्षयचा खून करण्यात आला. त्याची ओळख पटू नये यासाठी चेहराही विद्रूप करण्यात आला.

संशयित रामदास हा ओला ट्रॅव्हल्स सर्व्हिसवर चालक म्हणून कामास होता. त्याच्याकडील ओला कॅब गुन्ह्यात वापरण्यात आली. खुनानंतर त्याला मुंबई येथे जाण्यासाठी प्रवाशांची बुकिंग आली होती. त्यामुळे तो सुला वाइन्स येथे आला. तेथून प्रवासी घेऊन मुंबई येथे गेल्याची माहिती तपासात पुढे आली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. सहायक उपनिरीक्षक संजय पाटील, दीपक आहिरे, दत्तात्रय साबळे, पुंडलिक राऊत, नामदेव खैरनार, कैलास देशमुख यांनी संशयितांना ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डकोटा’ची फिनिक्स भरारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुसरे महायुद्ध आणि भारत-पाकिस्तान युद्धात अमूल्य कामगिरी बजावलेले डकोटा हे लढाऊ विमान तब्बल ७५ वर्षांनंतर फिनिक्स भरारी घेणार आहे. हवाई दलाने या विमानाचे आधुनिकीकरण केले असून, बेंगळूरूतील एअरो इंडिया शोमध्ये हे विमान कवायती सादर करणार आहे. व्हिंटेज ठेवा म्हणून हवाई दल या विमानाची जपणूक करणार आहे.

युनायटेड किंग्डम अर्थात, इंग्लंडमध्ये निर्मिती झालेल्या डकोटा विमानाने दुसऱ्या महायुद्धासह १९४७-४८ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धातही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तत्कालीन रॉयल इंडियन एअर फोर्समध्ये डकोटाचे खास महत्त्व होते. इंग्रजांनी भारत सोडल्यानंतर भारतीय हवाई दलाकडेच यातील काही विमाने होती. मात्र, काळाच्या ओघात त्यांचा वापर बंद झाला. या विमानांची देखभाल-दुरुस्ती करतानाच त्यात अपग्रेडेशन करण्याच्या हालचाली गेल्या तीन-चार दशकांपूर्वी सुरू झाल्या. अखेर यात यश आले असून, एक डकोटा विमान फिनिक्स भरारीसाठी सज्ज झाले आहे. हे विमान येत्या २० ते २४ फेब्रुवारीदरम्यान बेंगळूरू येथे होणाऱ्या एअरो इंडिया-२०१९ शोमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे हे विमान यंदाच्या शोमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू राहणार असल्याचे विंग कमांडर अनुपम बॅनर्जी यांनी सांगितले.

नाशिकहून होणार रवाना

अपग्रेडेशन केलेले डकोटा लढाऊ विमान हे हिंदन (गाझीयाबाद) येथील विमानतळावरून ओझर विमानतळावर येणार आहे. येथे छोटेखानी कार्यक्रम होणार असून, त्यानंतर हे विमान ओझरहून बेंगळूरूकडे रवाना होणार आहे.

--

यामुळे लांबले आगमन

गेल्या शुक्रवारी (दि. १) बेंगळूरू येथे मिराज-२००० हे लढाऊ विमान कोसळून दोन वैमानिक ठार झाले. 'एचएएल'च्या विमानतळावरच ही दुर्घटना घडली होती. त्याच विमानतळावर डकोटा विमान उतरणार होते. मात्र, मिराजच्या दुर्घटनेमुळे रन वे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळेच मंगळवारी (दि. ५) या विमानाचे ओझर येथे होणारे आगमन लांबणीवर टाकण्यात आले. हे विमान आता येत्या ७ किंवा ८ तारखेला ओझरला येणार असल्याचे हवाई दलाचे स्वॉड्रन लीडर विवेक द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

--

असे आहे डकोटा

डकोटा हे लढाऊ विमान आहे. ५८० हजार यूरो एवढी या विमानाची त्यावेळी किंमत होती. या विमानासाठी तत्कालीन इंग्रज सरकारने काही भारतीय वैमानिकांना विशेष प्रशिक्षण दिले होते. १९३० मध्ये तत्कालीन रॉयल इंडियन एअर फोर्समध्ये ते दाखल करण्यात आले होते. लडाख आणि उत्तर पूर्व भागातील संरक्षणासाठी हे विमान उपयुक्त ठरले. दुसऱ्या महायुद्धात जवान किंवा शस्त्रास्त्रांची वाहतूक करण्यात हे विमान अपयशी ठरले होते. पण, १९४७ मध्ये पहिल्या भारत-पाक युद्धात शीख रेमिजेंमटच्या काही जवानांना या विमानाद्वारे श्रीनगर येथे नेण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक सुरक्षेचे प्रबोधन

$
0
0

\Bवाहतूक सुरक्षेचे प्रबोधन

\Bनाशिक : ३० व्या रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत रेडक्रॉस सिग्नल येथे वाहतूक पोलिस आणि महाराष्ट्र कॉलेज ऑफ फायर अॅण्ड सेफ्टीतर्फे मंगळवारी 'वाहतूक सुरक्षा प्रबोधन' करण्यात आले. सिग्नलवर विद्यार्थ्यांनी उभे राहत, वाहतुकीचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन वाहनचालकांना केले. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते, पोलिस निरीक्षक फुलदास भोये, प्राचार्य डॉ. राहुल देवरे यांसह विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेतही सातवा आयोग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी ही राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक असतानाच, आता पुन्हा सातवा वेतन आयोग देण्यासाठी प्रशासनावरचा दबाव वाढला आहे. सातव्या वेतन आयोगामुळे पालिकेच्या तिजोरीवर ८० कोटींचा भार येणार असल्याने प्रशासनाने यातून मार्ग काढण्यासाठी पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या समकक्ष वेतनश्रेणी देण्याची देण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे.

महापालिकेचा आस्थापना खर्च कमी होत नसताना आता अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी होत आहे. कमी मनुष्यबळ असतानाही पालिकेच्या तिजोरीवर वेतन आणि वेतनेतर अनुदानासह पेन्शनसाठी जवळपास तीनशे कोटींचा बोजा येत आहे. त्यात आता सातवा वेतन आयोग पाच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू केला, तर तिजोरीवर जवळपास ८० कोटींचा ताण येणार आहे. त्यामुळे प्रशासनही गोंधळात पडले आहे. पालिकेत विकासकामांसाठी पैसाच उपलब्ध होत नसताना तसेच नगरसेवकांसह नागरिकांच्या तक्रारी वाढत असताना दुसरीकडे आस्थापना खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून तोडगा काढला जात आहे. त्यासाठी राज्य सरकारी अधिकारी व कर्मचारी आणि पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील वेतनाची तफावत दूर करण्याबाबत विचार सुरू आहे. महापालिकेच्या शिपायालाही सध्या राज्य सरकारच्या लिपिकाची वेतनश्रेणी देण्यात आली आहे. शाखा अभियंत्याला सहाय्यक अभियंत्याची वेतनश्रेणी आहे. शासन उपायुक्त व पालिका उपायुक्तांच्या ग्रेड पेमध्ये हजार रुपयांपेक्षा अधिक फरक आहे. त्यामुळे सरकारकडून आलेल्या अधिकाऱ्यापेक्षा पालिकेतील अधिकाऱ्यांना वेतन अधिक आहे. त्यामुळे एकीकडे सातवा वेतन आयोगही लागू करायचा आणि दुसरीकडे वेतनश्रेणी समकक्ष केल्यास थेट २२ ते २५ कोटींची बचत होणार आहे. यातून मधला मार्ग काढण्याासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहे.

बजेटमध्ये ८० कोटींची तरतूद

मुंबईपाठोपाठ नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. चालू बजेटमध्येच सातव्या वेतन आयोगासाठी आर्थिक तरतूद केली जाणार असून, साधारण ८० कोटी रुपये राखीव ठेवण्यात येणार आहेत. दोन वर्षांपूर्वी वेतन आयोगाची घोषणा झाली असताना निवडणुकांच्या तोंडावर वेतन आयोग लागू केला जाणार असल्याचा सूर कर्मचारी वर्गातून व्यक्त केला जात आहे. पालिकेच्या आस्थापनेवर असलेले अनेक कर्मचारी वेतन आयोग लागू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी निधी कमी उपलब्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहविचार सभा आज

$
0
0

\Bसहविचार सभा आज

\Bनाशिक : शिक्षण समितीची स्थापना झाल्यानंतर बुधवारी (दि. ६) शिक्षण सभापती, उपसभापती, प्रशासनाधिकारी मनपा शाळा शिक्षकांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात येथे सकाळी ११ वाजता ही सभा होणार आहे. नाशिक महापालिका शिक्षण विभागातील सर्व मनपा केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिक्षण समितीकडून केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्याशी परिचय करून घेतली जाणार असून त्यानंतर प्रश्न समजून घेतले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातपूरसह गंगापूररोड, कॉलेजरोडला उद्या निर्जळी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर विभागातील १२०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची गळती थांबविण्यासाठी पाइपलाइन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या, गुरुवार (दि. ७) दुपार व संध्याकाळचा सातपूर परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

प्रभाग क्र.७,८,९,१०,११ आणि १२ या प्रभागांचा पाणीपुरवठा यामुळे विस्कळीत होणार आहे. या कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

या प्रभागात येणार नाही पाणी

प्रभाग क्र. ७ : सहदेव नगर, आकाशवाणी परिसर, दादोजी कोंडदेव नगर, अरिहंत नर्सिंग होम परिसर

प्रभाग क्र.८ : बळवंतनगर, गंगापूर रोड, सावरकरनगर, मते नर्सरी रोड, आनंदवली, शारदानगर, सिरीन मिडोज्, शंकर नगर, गंगासागर, काळेनगर, सोमेश्वर कॉलनी, संत कबीर नगर, गंगापूर गाव, एचएएल कॉलनी

प्रभाग क्र. ९:- शिवाजीनगर, धर्माजी कॉलनी, ध्रुव नगर, श्रमिक नगर, सातमाऊली, आयटीआय कॉलनी

प्रभाग क्र. १०:- अशोकनगर परिसर, राज्य कर्मचारी वसाहत, जाधव संकुल, विश्वासनगर, पवार संकुल, संभाजीनगर, कृष्णनगर, राधाकृष्ण नगर

प्रभाग क्र. ११:- स्वारबाबानगर, महादेववाडी, सातपूर गाव, विकास कॉलनी, सातपूर कॉलनी, कामगार नगर, विनायक संकुल, प्रबुद्ध नगर

प्रभाग क्र. १२ :- पारिजातनगर, समर्थ नगर, ‍डिसुझा कॉलनी, महात्मानगर, वनविहार कॉलनी, संत कबीर नगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समको’ बरखास्तीची सुनावणी घाईने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सटाणा मर्चंट को-ऑप बँकेच्या बरखास्तीबाबत विभागीय सहायक निबंधक कार्यालयाने मनमानी करून कोणत्याही बाबींची शहनिशा न करता अपिलाची सुनवणी करून या प्रकरणाची फाईल बंद केली आहे. हा अन्याय असून याची पुन्हा चौकशी करावी अशी मागणी संचालक डॉ. विठ्ठल येवलकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने ५ नोव्हे २०१८ रोजी २ संचालकांना आयआयबीआय प्रकरणात व चार संचालकांना एचडीएफसी बॅँकेत ठेवी ठेवल्या म्हणून दोषी धरले. त्यानंतर तीन संचालकांनी राजीनामे दिले. १७ पैकी ९ संचालक अपात्र ठरल्याने कोरम अभावी बॅँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली. यावर निबंधक कार्यालयाने दीड महिन्यात १४ वेळा सुनवणी घेतली मात्र त्या अगोदर पेंडिंग असलेल्या केसेसला हात लावला नाही. यावर डॉ. विठ्ठल काशीनाथ येवलेकर यांनी एकंदरीतच या प्रकरणावर आक्षेप घेतला आहे. अपिलातील सह्या खोट्या असल्याने अपिल चालवू नये व संबंधित संचालकांवर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी उच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे. या प्रकरणी १३ फेब्रुवारी रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालयात घंटानाद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅडमिंटन स्पर्धेत स्मित तोष्णीवाल विजयी

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विजयवाडा येथे झालेल्या 'ऑल इंडिया रंकिंग बॅडमिंटन' स्पर्धेत ज्युनिअर गटात कुमारी स्मित तोष्णीवाल हिने विजेतेपद पटकावले.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या डच आणि जर्मन येथील ज्यूनियर ग्रँड प्रिक्स स्पर्धेत जाण्याकरिता भारतामध्ये तीन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यापैकी विजयवाडा येथे झालेल्या स्पर्धेत स्मितने हे यश मिळविले. पहिल्या फेरीत स्मितने तेलंगाणाच्या कुमारी भार्गवीवर २१-१८, २१-१५ ने मात केली. दुसऱ्या फेरीत कर्नाटकची राज्य विजेती कुमारी त्रिशा हेगडे हिला ५५ मिनिटांत २१-११, ११-२१, २१-१८ गुणांनी पराभूत केले. स्मितने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कुमारी अमोलिका सिंह हिच्याविरुद्ध उप-उपांत्य फेरीत सामना जिंकला. अमोलिका सोबत आधी दोनदा सामने खेळल्यानंतरचा हा पहिला सामना स्मितने जिंकला आहे.

उपांत्य फेरीत कुमारी तस्मिन मीरसोबत १ तास १३ मिनिटे लढत देत स्मितने २१-१७, १३-२१, २२-२० ने सामना जिंकला. तर अंतिम सामना दिल्लीच्या दिपशिखा सिंह हिच्या बरोबर खेळत २१-१८, २१-१५ ने जिंकून ज्यूनियर बॅडमिंटन स्पर्धेवर कब्जा मिळविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताईच्या लग्नासाठी ती धावली उर फुटोस्तर!

$
0
0

पूनम सोनुनेच्या जिद्दीची अनोखी कहाणी

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet : @FanindraMT

नाशिक : कुटुंबातील मोठा भाऊ-बहीण हे प्रत्येकासाठी आधारवड असतात. पण कधी-कधी त्यांच्या सावलीत वाढणारी लहानी भावंडेच त्यांचा आधार बनतात. बुलढाण्याची पूनम सोनुने ही मोठ्या ताईच्या लग्नासाठी उर फुटोस्तर धावली अन् हाफ मॅरेथॉनवर विजय पताका फडकावली. पण लाडक्या ताईच्या डोक्यावर अक्षता टाकण्याचा मुहूर्त मात्र तिच्या हातून निसटला. मॅरेथॉन जिंकून मिळालेले पैसेच बहिणीच्या लग्नासाठी पूनमला देता आले.

पूनम दिनकर सोनुने ही बुलढाणा जिल्ह्यातील सागवान गावची धावपटू. ती सध्या नाशिक येथील विजेंद्रसिंह यांच्याकडे सराव करते. पूनमचे वडील शेतमजुरी करून पत्नी, तीन मुली आणि मुलाच्या संसाराचा गाडा हाकतात. दुष्काळी असल्याने वडिलांना रोज काम मिळतेच असे नाही. मिळालेल्या तुटपुंजा मजुरीवर त्यांचा कसाबसा उदरनिर्वाह चालतो. त्यांना हातभार म्हणून पूनमची आई शहरात जाऊन भाजी विक्रीचा व्यवसाय करते. पूनममधील s]क्रीडागुण हेरून शाळेतील शिक्षकांनी तिला विजेंद्रसिंह यांच्याकडे प्रशिक्षणास पाठवले. सुरुवातीला वडिलांनी कर्ज काढून तिला नाशिकला ठेवले. मात्र, काही दिवसांनी पैसे पाठवणे अशक्य झाले. अचानक पैसे येणे बंद झाल्याने विजेंद्रसिंह यांनी तिला खासगी कंपनीच्या सीएसआर फंडातून मदत मिळवून दिली. यामुळे वडिलांचा आर्थिक भार कमी झाला.

बहिणींच्या लग्नासाठी निश्चय

एक भार कमी झाला, तरी दुसऱ्या मुलीच्या लग्नाचा भार डोक्यावर होता. अकरावीला असलेल्या मोठी मुलगी रुपालीचे लग्न झाले. ती जालन्याला असते. पूनमची दुसरी मोठी बहीण साधना हिचे बीएपर्यंत शिक्षण झालेले आहे. तिच्या लग्नासाठी तयारी सुरू झाली. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने लग्न कसे करावे, हा प्रश्न होता. साधनाच्या लग्नाचा खर्च आपण उचलायचा, असा निश्चय पूनमने केला. याच दरम्यान पुणे येथे पुनावाला क्लिन सिटी मॅरेथॉन होती. २१ किलोमीटरचे अंतर धावण्याचा पूनमला सराव नव्हता. विजेंद्रसिंह नाही म्हणत असताना, तिने स्पर्धेत सहभाग घेतला. यातून पैसे मिळाले तर साधनाताईचे लग्न करता येईल असा तिचा यामागील उद्देश होता. अखेर तिने हाफ मॅरेथॉन जिकली. बक्षीस म्हणून मिळालेल्या सव्वा लाख रुपयांपैकी एक लाख रुपये तिने आपल्या साधनाच्या लग्नासाठी दिले. समाजकल्याण खात्यात अधिकारी असलेल्या मुलाबरोबर साधनाचा विवाह झाला. याच दरम्यान साऊथ एशियन ज्युनिअर चॅम्पीयनशिपसाठी पूनमची निवड झाली. लग्न आणि स्पर्धा एकाच वेळी असल्याने पूनमला आपल्या बहिणीच्या लग्नाला जाता आले नाही.

आता घरकुलाचे स्वप्न

पूनमचे स्वप्न ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे आहे. खेळाच्या माध्यामातून नोकरी लागल्यास तिला आपल्या शेतमजूर असलेल्या वडिलांना कर्जाच्या गर्तेतून बाहेर काढायचे आहे. पावसाळ्यात पत्र्याचे घर गळते, पाणी उपसून आईला त्रास होतो या करीता पत्र्याच्या घरातून चांगल्या ठिकाणी रहाण्याची व्यवस्था करायची आहे.

अॅथलेटिक्सचे खेळाडू पैशासाठी मॅरेथॉनमध्ये धावतात, अशी ओरड केली जाते. मात्र यामागचे दुख: कुणाला माहित नाही. वडिलांनी माझ्यासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड मला करायची आहे.

- पूनम सोनुने, धावपटू

..

मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीचे गौडबंगाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १० ड मधील जागेसाठी पोटनिवडणूक घेण्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाला स्मरणपत्र पाठवणे पालिकेच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी आयोगाने पालिकेची कानउघडणी केली असून, 'आम्हाला स्मरणपत्र पाठवणारे तुम्ही कोण' असा उलटसवाल केला आहे.

प्रभाग क्र. १० ड मधील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुदाम नागरे यांचे गेल्या वर्षी २९ जुलैला आजारपणामुळे निधन झाले होते. त्यामुळे नगरसेवकपदाची एक जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर नियमानुसार पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तसा प्रस्ताव राज्य सरकारसह राज्य निवडणूक आयोगाकडे अगोदरच पाठविला आहे. एखाद्या सदस्याचे निधन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्या जागेवर पोटनिवडणूक घ्यावी, असा संकेत आहे. या पोटनिवडणुकीच्या तयारीचा संपूर्ण अहवाल पालिकेच्या वतीने निवडणूक आयोगाला ऑक्टोबरमध्येच पाठविण्यात आला आहे. प्रभाग क्र. दहाची मतदारयादी, मतदान केंद्रांची संख्या, मतदार यांचाही तपशील पाठविला असूनही निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची घोषणा झाली नाही. एकच महिन्याची मुदत शिल्लक असल्याचे कारण देत, पालिकेच्या निवडणूक शाखेने नोव्हेंबरमध्ये निवडणूक आयोगाला पुन्हा स्मरणपत्र पाठवले होते. परंतु, यामुळे निवडणूक आयोगाचा स्वाभिमान दुखावला आहे. मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगत, 'तुम्ही आम्हाला स्मरणपत्र पाठवणारे कोण? पालिकेपेक्षा निवडणूक आयोग लहान की मोठा?' असा उलट सवालच आयोगाने महापालिकेच्या निवडणूक शाखेला केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 'निवडणूक केव्हा आणि कशी घ्यायची, ते आम्ही बघू. तुम्ही तयारीत राहा' एवढाच संदेश आयोगाने पालिकेला पाठवला आहे. त्यामुळे पालिकेत चौकशीसाठी येणाऱ्या इच्छुकांसह राजकीय पक्षांना थेट निवडणूक आयोगाकडे जाण्याचा सल्ला दिला जात आहे.

मुख्यमंत्र्यांसाठी थांबली निवडणूक?

प्रभाग दहाची जागा रिक्त होऊन आता साडेसहा महिने लोटले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहरातील विविध प्रकल्पांच्या उद्घाटनांचा बार उडवायचा आहे. त्यासाठी या निवडणुकीची आचारसंहिता आडवी येऊ नये, यासाठी थेट मंत्रालयातूनच दक्षता घेण्यात आल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाकडून प्रारुप मतदार यादीचे कारण दिले जात असले तरी, यामागे भाजपला उद्घाटनांना अडचण येऊ नये, यासाठीच निवडणुकीकडे आयोगाने दुर्लक्ष केल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे. त्यामुळे आता लोकसभेबरोबरच या पोटनिवडणुकीची घोषणा होईल, अशी चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन हजार मतदारांची वयाची ‘सेंच्युरी’

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

\Bनाशिक :\B ज्येष्ठांच्या शरीरावरील सुरकुत्या त्यांच्या अनुभव सिद्धतेची प्रचीती देतात असे म्हणतात. जिल्ह्यात वयाची ८० वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ मतदारांची संख्या सव्वा लाखांहून अधिक आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात ३००८ मतदार असे आहेत ज्यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. आयुष्यातील अनेक ऊन पावसाळे पाहणारे हे मतदार स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक निवडणुका आणि सरकार यांच्या कारकिर्दीचे साक्षीदार ठरले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेच्या वतीने सप्टेंबरपासून मतदार पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यामध्ये नवीन मतदारांची नावनोंदणी व मृत्यू झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. लोकसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, जिल्ह्यात आजमितीस ४४ लाख ३८ हजार ७८ मतदार आहेत. मतदारांची वयोगटानुसार वर्गवारी करण्यात आली असून, प्रत्येक मतदारसंघामध्ये वयाची शंभरी पूर्ण करणाऱ्या मतदारांची संख्या किमान १०० हून अधिक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

...

मालेगाव 'मध्य'त सर्वाधिक वयोवृद्ध मतदार

मालेगाव मध्य मतदारसंघात वयाची शंभर वर्षे ओलांडणारे सर्वाधिक २९६ मतदार आहेत. त्या खालोखाल नाशिक मध्य मतदारसंघात अशा मतदारांची संख्या २७९ असल्याचे आढळून आले आहे. नाशिक पूर्वमध्ये २६६, तर मालेगाव बाह्य मतदारसंघात २५८ मतदार आढळून आले आहेत. इगतपुरी विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी १०८ मतदार आहेत.

..

जिल्ह्यातील मतदारांची वयोगटानुसार संख्या

-

वयोगट मतदार संख्या

२० ते २९ ७ लाख ९० हजार ३

३० ते ३९ १० लाख ७४ हजार ९२५

४० ते ४९ ९ लाख ६९ हजार ६९८

५० ते ५९ ६ लाख ७२ हजार ४९८

६० ते ६९ ४ लाख १२ हजार ६०८

७० ते ७९ २ लाख २७ हजार ९४५

८० ते ८९ १ लाख ९ हजार ३०८

९० ते ९९ २० हजार ५५३

१०० हून अधिक ३ हजार ८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ कुठे, ओझर की गांधीनगर?

$
0
0

ट्रॅव्हल पोर्टलसह कंपन्यांचाही गोंधळ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होऊन सहा महिने उलटले तरी नक्की विमानतळ कोणते याचा गोंधळ कायम आहे. ट्रॅव्हल पोर्टलवरील तिकिटावर गांधीनगर विमानतळाचा उल्लेख असल्याने प्रवाशांची दिशाभूल होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

शहरातील गांधीनगर हे संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील विमानतळ आहे. अतिशय संवेदनशील क्षेत्रात ते मोडत असल्याने या ठिकाणाहून प्रवासी विमानसेवेला नकार देण्यात आला. त्यामुळे ओझर येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) मालकीच्या विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात आली. दशकभराच्या अथक प्रयत्नानंतर आणि केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत नाशिकहून प्रवासी विमानसेवेचा जून महिन्यात श्रीगणेशा झाला. आता या सेवेस सहा महिने लोटले आहेत तर हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन शहरांसाठीची सेवाही सुरू झाली आहे. असे असताना नाशिकचे विमानतळ नक्की कोणते? गांधीनगर की ओझर याविषयी गोंधळ निर्माण झाला आहे. ऑनलाइन पोर्टलवर तिकीट बुकिंग करतानाच ही समस्या अधिक असल्याचेही सांगितले जात आहे.

ओझरहूनच सेवा

ओझर विमानतळावरूनच प्रवासी विमानसेवा दिली जात आहे. त्यामुळे प्रवाशांनी गोंधळून जाण्याचे कारण नाही. दिल्लीसाठी जेट एअरवेज किंवा हैदराबाद आणि अहमदाबादसाठी अलायन्स एअरच्या वेबसाईटवरून तिकीट बूक केले असता तिकिटावर ओझर विमानतळाचाच उल्लेख येत आहे. प्रवाशांनी ओझरलाच यावे, तेथूनच सेवा मिळेल, असे आवाहन विमान कंपन्यांनी केले आहे.

बाहेर गावच्यांची फसगत

बाहेर गावाहून नाशिकला येणारे काही प्रवासी त्यांच्यासाठी गांधीनगर विमानतळावर वाहने मागवित आहेत. तर, बाहेरगावचे पर्यटक किंवा प्रवासी नाशिकहून विमानतळावर जागाता गांधीनगर विमानतळाची चौकशी करीत असल्याचे सांगितले जात आहे. बहुतांश नाशिककरांना ओझर येथूनच सेवा सुरू असल्याचे स्पष्ट असले तरी बाहेरच्यांची मात्र फसगत होत आहे.

तिकिटावर गांधीनगर नाव पाहून मी गोंधळलो. एअर इंडियाच्या हेल्पलाइनला फोन केला. पण तिकिटावर जे नाव आहे तेथेच जा असे सांगितले. या सर्व गोंधळात माझी फ्लाईट मिस झाली तर काय करायचे?

- संजय जाखडी, प्रवासी

बुकिंग केलेल्या तिकिटावर गांधीनगर असले तरी आम्ही प्रवाशांना माहिती देतो, की तुम्हाला ओझरलाच जायचे आहे. तेथूनच विमानसेवा आहे. गांधीनगर नाही.

- दत्ता भालेराव, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंटस असो.

प्रत्येक विमानतळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव देण्यात येते. ओझर विमानतळाचा कोड आयएसके असा आहे. त्यामुळे प्रवाशांनी गोंधळून जाण्याची गरज नाही.

- मंदार भारदे, तज्ज्ञ, हवाई वाहतूक क्षेत्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसला ‘चार चाँद’!

$
0
0

खांदेपालटाच्या सोहळ्याला आजी माजी नेत्यांची उपस्थिती,

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पानीपतनानंतर वाताहत झालेल्या नाशिक जिल्हा काँग्रेसला मंगळवारी खांदेपालटानंतर अच्छे दिन आल्याचे चित्र पहायला मिळाले. तब्बल १८ वर्षानंतर काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षपदात खांदेपालट झाला असून राजाराम पानगव्हाणे यांच्याकडून डॉ. तुषार शेवाळे यांनी मंगळवारी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे या पदग्रहण सोहळ्याला पक्षाचे उत्तर महाराष्ट्र निरिक्षक वामसी चांद रेड्डी याच्या उपस्थितीत धुळ्यासह नाशिक जिल्ह्यातील सर्व आजी-माजी काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावून काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा विडा उचलला.

नाशिकच्या काँग्रेस भवनला काही काळापासून उतरती कळा लागली होती. मोदी लाटेनंतर जिल्ह्यात तर पक्षाची वाताहतच झाली. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात केवळ दोनच आमदार निवडून आले आहेत तर, शिवसेनेच्या मदतीने जिल्हा परिषदेची सत्ता कशी-बशी वाचवावी लागली आहे. पक्षात मोठ्या प्रमाणावर गटबाजी आहे. गेल्या साडेचार वर्षापासून पक्ष कार्यालयाचा नूरच हरपला होता. बैठकीसाठीही पक्षाला कार्यकर्ते मिळत नसल्याचे चित्र होते. शहर आणि ग्रामीणमधील ही गटबाजी लोकसभा आणि पाठोपाठ येणाऱ्या विधानसभेसाठी परवडणारी नसल्याने अखेर काँग्रेस नेतृत्वाने सर्वप्रथम ग्रामीण काँग्रेसमध्ये खांदेपालट केले. तब्बल १८ वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदावर असलेल्या राजाराम पानगव्हाणे यांच्याऐवजी मालेगावच्या डॉ. तुषार शेवाळे या सर्जनकडे पक्षाची सूत्रे देण्यात आली. डॉ. शेवाळे यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. पक्षाचे उत्तर महाराष्ट्र निरिक्षक वामसी चांद रेड्डी यांच्या उपस्थितीतीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेस कार्यालयात मोठी गर्दी जमा होऊन कार्यालयाला प्रथमच सुगीचे दिवस आले.

माजी मंत्री विनायकदादा पाटील, आमदार निर्मला गावित, माजी आमदार अनिल आहेर, शिरीष कोतवाल, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, मोठाभाऊ भामरे, माजी मंत्री विजय नवल पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे, काँग्रेस प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद आहेर, सहप्रभारी डी. जी. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, आजी-माजी आमदार खासदार, मंत्री, प्रदेश व जिल्ह्याचे पदाधिकारी, महिला काँग्रेस, सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व पदाधिकारी तसेच युवक काँग्रेस, एनएसयूआय, अल्पसंख्यांक सेल, अनुसूचित जाती-जमाती सेल, ओबीसी सेल, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संखेने उपस्थित होते.

जिल्हा काँग्रेसमय करू

एकेकाळी काँग्रेसचा असलेला हा बालेकिल्ला, मध्यंतरीच्या काळात भुजबळ यांनी राष्ट्रवादीकडे खेचला. शिवसेना,मनसे यांनीही आपलं अस्तित्व जिवंत ठेवलं होते. मात्र, भाजपने जोरदार मुसंडी मारत सगळ्यांना धोबीपछाड दिला. या घडामोडीत काँग्रेस नेस्तनाबूत झाली. आता राहुल गांधी यांना मिळणारा प्रतिसाद, प्रियांका गांधी यांची एन्ट्रीमुळे बरेच बदल होत आहेत. यामुळे येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाशिक जिल्हा पुन्हा काँग्रेसमय करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. काँग्रेस ही सर्वसामान्यांची गरज आहे. हा पक्षाचा संघर्षाचा काळ आहे, काँग्रेस ही आपली आई आहे. काँग्रेसला चांगले दिवस येतील, असा आशावाद यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजरोडवरील सिग्नल कार्यान्वित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॉलेज रोडवरील प्रि. टी. ए. कुलकर्णी चौकातील ट्रॅफिक सिग्नल नुकताच कार्यान्वित करण्यात आला. त्यामुळे कॉलेज रोडवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. या चौकात वाहनांची प्रचंड गर्दी व्हायची. त्यामुळे येथे नेहमीचीच कोंडी होती. मात्र, सिग्नल बसविल्यामुळे वाहनचालक सिग्नल पाळण्यास प्राधान्य देताना दिसून आले. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते हा सिग्नल कार्यान्वित करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नगरसेवक समीर कांबळे, योगेश हिरे, डॉ. हेमलता पाटील यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सामूहिक जबाबदारी घेऊन पक्ष वाढवा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पक्षात चांगले काम केले तर त्याचे श्रेय घ्यायला सगळेच तयार असतात. मात्र, अपयश आले तर ते स्वीकारण्यास कोणी तयार नसतो. कार्यकर्त्यांच्या कामावरच नेतृत्व करणाऱ्यांचे यश अवलंबून असते. कार्यकर्त्यांनी सामूहिक जबाबदारी घेऊन पक्षवाढीसाठी काम करावे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व उत्तर महाराष्ट्राचे निरिक्षक वासिम चांद रेड्डी यांनी केले आहे.

डॉ. तुषार शेवाळे यांना पक्षाने दिलेली जबाबदारी ही त्यांच्या कामाची पावती आहे. चांगले काम करणाऱ्यांना पक्ष नक्कीच उभारी देईल, त्यामुळे सर्वांनी डॉ. शेवाळे यांच्या पाठीमागे उभे खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.

काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचा पदग्रहण समारंभ काँग्रेस भवन येथे रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळते जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (पाटील) हे होते. नेतृत्वाने आपल्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, केवळ मीच अध्यक्ष झालो नसून काँग्रेसचा प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्ता आज अध्यक्ष झालेला आहे. काँग्रेस संक्रमणावस्थेतून जात आहे. कोणतीही अपेक्षा न बाळगता केवळ पक्षहितासाठी काम करणे हेच आपले धेय्य असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे यांनी यावेळी सांगितले.

वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या गराड्यात ग्रामीण व शहरी असा भेदभाव न करता आपल्याला काम करायाचे आहे. माजी अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी पक्षाचे सक्षमपणे नेतृत्व केले. त्यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यात येईल. आगामी काळात सक्षम व क्रियाशील कार्यकर्त्यांना न्याय व पदाची जबाबदारी देण्यात येईल. सर्वांना सोबत घेऊन कार्यकर्ता नव्हे तर मित्र म्हणून मोठ्या ताकतीने काम करण्याची वेळ आली आहे. पक्ष श्रेष्ठींच्या विश्वासाला तडा न जाऊ देता गटबाजीला थारा न देता सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे आश्वासन डॉ. शेवाळे यांनी यावेळी दिले.

पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद व कार्यकर्त्यांची मेहनत या बळावर आपण जिल्हा काँग्रेसची धुरा १८ वर्षे सांभाळली. कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले. कधी यश तर कधी अपयश मिळाले; मात्र काम करणे थांबविले नाही. जिल्हा अध्यक्षपद हे काटेरी मुकूट असून सर्वांना सोबत घेऊन काम केले तर वाटचाल सुकर होते. डॉ. शेवाळे यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर पक्षाने नेतृत्वाची धुरा सोपवली असून त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करू.

- राजाराम पानगव्हाणे (पाटील), माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेटसक्तीचा पोलिसांवरच बडगा

$
0
0

धुळ्यात अधीक्षकांकडून धडक कारवाई

म. टा. वृत्तसेवा, धुळे


प्रादेशिक परिवहन विभागातर्फे सोमवार (दि. ४) पासून वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरू करण्यात आला आहे. यामध्ये मंगळवारी (दि. ५) वाहतूक शाखा व आरटीओकडून विना हेल्मेटच्या ४४ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना काहींनी पोलिसच हेल्मेट वापरत नाहीत, त्यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल उपस्थित केला. यावर पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात विना हेल्मेट येणाऱ्या पंधरा पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

शहरात दोन दिवसांपासून विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू करण्यात येत आहे. मंगळवारी (दि. ५) वाहतूक पोलिसांकडून विना हेल्मेटच्या ४४ नागरिकांना दंड करण्यात आला. या वेळी दंड न भरणाऱ्यांची वाहने शहर वाहतूक शाखेच्या आवारात आणण्यात आली. मात्र, वाहतूक सुरक्षा सप्ताहसाठी आलेल्या वाहतूक पोलिसांकडेदेखील हेल्मेट नसल्याने नागरिकांनी संतप्त होत पोलिस विभागावर रोष व्यक्त केला आणि पोलिसांना हेल्मेटचा नियम नाही का? असा सवाल उपस्थित केला. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांनी सकाळी अधीक्षक कार्यालयात विना हेल्मेट प्रवेश करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. या वेळी पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावरील कारवाईने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून शहर वाहतूक पोलिस शाखेतील अधिकारी व कर्मचारी दररोजपेक्षा आता गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या जिकिरीने शहरात शिस्त लावण्याचे काम करीत आहेत. मात्र, शहरातील वाहनांवर ट्रिपल सीट तसेच महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांच्याकडे कोणताही वाहन परवाना नाही तरीदेखील शेकडो विद्यार्थी सुसाटपणे सकाळ संध्याकाळ वाहन फिरवत असतात. याकडे शाखेने दुर्लक्ष केल्याचे दिसून आल्याचे सांगत पोलिस प्रशासनास वाहनधारकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे.

शिवसेना पुकारणार आंदोलन
वाहतूक सुरक्षा सप्ताहनिमित्त धुळे शहरात पोलिस विभागाकडून वाहनधारकांना हेल्मेट सक्ती केली जात आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील रस्ते, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा तसेच शहरात निरनिराळ्या भागात सुरू असलेला अवैध व्यवसाय या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता पोलिस विभागाने अचानकच हेल्मेटसक्तीची जनजागृती न करता अंमलबजावणी केली. ही एकप्रकारे हुकूमशाही असून, हेल्मेट सक्तीचा निर्णय रद्द करावा. अन्यथा शिवसेनेकडून तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल, अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली आहे. या वेळी महानगरप्रमुख संजय गुजराती, अतुल सोनवणे, धीरज पाटील, गुलाब माळी, नरेंद्र परदेशी आदींनी या मागणीचे निवेदन अधीक्षक विश्वास पांढरे यांच्याकडे दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य मंत्रिमंडळाने महिन्यात घेतलेल्या निर्णयानुसार राज्यभरातील एकूण १४४६ नगरपरिषद रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठीचा अध्यादेश राज्याच्या नगरविकास विभागाने मंगळवारी काढल्याने येवला नगरपरिषदेतील २१ रोजंदारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी येवला पालिका कार्यालयासमोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

२० ते २५ वर्ष अत्यल्प मानधनावर काम करताना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी गेल्या १८ ते २० वर्षांत सातत्याने दिलेल्या लढ्यास यश आल्याचे समाधान कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. हे कर्मचारी तब्बल २० ते २५ वर्षे तुटपुंज्या पगारावर काम करीत होते. राज्यातील विविध ठिकाणच्या नगरपरिषदांमध्ये ११ मार्च १९९३ ते २७ मार्च २००० या कालावधीत नियुक्ती होवून सध्या कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय गेल्या महिन्यातील ८ तारखेस राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार मंगळवारी (५ फेब्रुवारी) राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने शासन अध्यादेश काढल्याने राज्यभरातील एकूण १४४६ नगरपरिषद,नगरपंचायती यांच्यातील पात्र रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी समावेशन करण्यासह त्यासाठी आवश्यक असलेल्या पदनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

येवला पालिकेतील २१ पात्र रोजंदारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी येवला फटाके फोडत आपला आनंद साजरा केला. यावेळी किरण आहेर, संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ घुगे, किशोर भावसार उपस्थित होते. दरम्यान मनमाड नगरपालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांनीही या निर्णय स्वागत करीत पालिकेत कर्मचाऱ्यांनी बुधवारी पेढे वाटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images