Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

निफाडमध्ये ‘बुलेट’राज!

$
0
0
जिल्ह्यात सर्वात सधन समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात ‘बुलेट’राज असल्याची बाब निदर्शनास येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वाधिक म्हणजे २३४ परवाने निफाड तालुक्यात दिले असल्यामुळे हा तालुका जिल्ह्यात सर्वाधिक असुरक्षित आहे की काय, अशी शंकाही उपस्थित होत आहे.

ATVM मशिन नाशिककरांना नापसंत

$
0
0
मध्य रेल्वेने नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सोयीसाठी एटीव्हीएम (अॅटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशिन) लावण्यात आले आहे, मात्र त्यावरून तिकीट घेणाऱ्यांची संख्या कमी आहे.

जिल्ह्यात बेकायदा उत्खनन जोरात

$
0
0
जिल्ह्यात यंदा वाळू लिलाव झाले नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाळूचे अवैधरित्या उत्खनन होण्याचे प्रमाण वाढले असले तरी महसूल प्रशासन ढिम्म असल्याने माती आणि मुरुम उत्खननानेही डोकेवर काढण्याचे दिसून येत आहे.

मनसेचा 'राडा' थांबला

$
0
0
राज्यातील टोलवसुलीवर संतप्त झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'टोल भरू नका, कुणी आडवे आले तर तुडवून काढा' या सल्ल्याचे शब्दशः पालन करत मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी राज्यभरातील विविध टोलनाके तुडवले. यात नाशिकमधील ढकांबे व भाबडबारी टोलनाक्याची तोडफोड करत जिल्ह्यातील इतर टोलनाके बंद पाडण्यात मनसेला यश आले.

टँकरमुक्तीसाठी १२३ कोटी!

$
0
0
उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सिमेंट बंधाऱ्यांचा उपाय अंमलात आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सिमेंट बंधाऱ्याद्वारे पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी सरकारने १२३ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

दस्ताऐवज फेरफार : दुय्यम निंबधक अडचणीत

$
0
0
सटाणा शहरातील बोगस लेआऊट तयार करून प्लॉट खरेदी-विक्री प्रकरण दडपण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातच खरेदी खताच्या दस्तऐवजामध्ये फेरफार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून दुय्यम निबंधक अडचणीत सापडले आहेत.

रेल्वे महाव्यवस्थापकांना खा. चव्हाणांचे साकडे

$
0
0
चोऱ्या व रेल्वेवर पडणारे दरोडे याचा गांभीर्याने विचार करुन आरपीएफ व जीआरपी पोलिसांची संख्या वाढवावी यासह विविध प्रवाशांच्यां हितांच्यां मागण्यांचे निवेदन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. सूद यांना देवून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

हरणबारी डाव्या कालव्यासाठी रास्तारोको

$
0
0
बागलाण तालुक्यातील प्रलंबित हरणबारी डाव्या कालव्यासाठी नेहमीच दुष्काळाची चटके सोसणाऱ्या काटवनच्या शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा बुधवारी अखेर बांध फुटला. सकाळी दहा वाजेपासून सुमारे अडीच हजार महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मांगीतुंगी फाट्याजवळ ठिय्या देऊन दोन तास विंचुर-प्रकाशा राज्यमार्गावर चक्काजाम केला.

नाशिकरोडला महापौरांचा अतिक्रमण पाहणी दौरा

$
0
0
नाशिक शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला सुरुवात केल्यानंतर महापौर अॅड. यतीन वाघ यांनी नाशिकरोडची पाहणी केली. बुधवारी सकाळी महापौरानी विभागातील अतिक्रम‌ित भागाचा दौरा करीत अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले.

घरचा रस्ता

$
0
0
नाशिक शहरात सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरु करण्यात आली असून त्याच्या पहाणीसाठी महापौरांकडून विविध विभागाचा दौरा आयोजीत केला आहे. शहराच्या अनेक भागातून महापौर अधिकाऱ्यांसमावेत जात असून अतिक्रमण झालेल्या विभागाची पहाणी करीत आहे. अशीच पहाणी बुधवारी नाशिकरोड विभागात करण्यात आली.

विभागीय आयुक्तपदी महेश झगडे

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या नाशिक विभागीय महसूल आयुक्तपदी अन्न व औषध प्रशासन(एफडीए) विभागाचे आयुक्त महेश झगडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे समजते.

बसमधून मंगळसुत्राची चोरी

$
0
0
त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ यात्रेहून परतणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र बसप्रवासात चोरट्याने लांबविले. मंगळवारी दुपारी एक ते दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. चेतनानगरमध्ये राहणाऱ्या मंदा बहु जांत्रे (५४) यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

कोट्यवधी तरुणांना उपलब्ध होणार रोजगार

$
0
0
राष्ट्रीय कौशल्य व‌िकास कार्यक्रमांतर्गत (एनएसडीएफ) आगामी दहा वर्षांमध्ये सुमारे पाच कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असा आशावाद एनएसडीएफचे राष्ट्रीय अध्यक्ष व पंतप्रधानांचे सल्लागार एस.रामदोराई यांनी व्यक्त केला.

महापालिकेची ‘पत’ कायम!

$
0
0
महापालिकेला ११० कोटी रूपयांचे कर्ज देण्यासाठी आजवर किमान २२ राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँकांनी रस दाखविला आहे. २२ पैकी ४ बँकांनी कमीत कमी व्याजदारासह प्रस्ताव सादर केले असून महापालिका कर्जाच्या रक्कमेतून विविध विकासकामे हाती घेणार आहे.

गौण खनिज वसुलीत महसूल चितपट

$
0
0
जिल्ह्यातील बेकायदा गौण खनिज उत्खनन रोखण्यात असमर्थ ठरलेले महसूल प्रशासन गौणखनिज कराची वसुली करण्यातही चितपट झाले आहे. जिल्ह्याला यंदा ६६ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी जिल्ह्यात केवळ १२ कोटी रुपयांचीच अद्याप वसुली झाली आहे.

‘सुंदरनारायणा’साठी हवे ५ कोटींचे अर्घ्य!

$
0
0
ऐतिहासिक ठेवा असलेल्या नाशकातील सुंदरनारायण मंदिराचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने या मंदिराच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याकडे राज्य सरकारचेही दुर्लक्ष झाले असून, मंदिराचा हा ठेवा जपला जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

विकास आराखडा : फौजदारी दाखल करा

$
0
0
चुकीचा शहर विकास आराखडा तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने आज राज्य सरकारकडे करण्यात आली.

नवीन सिडकोत ड्रेनेजलाइन थेट नाल्यात

$
0
0
नवीन नाशिकमधील सिडको भागात नैंर्सगिक नाल्यात ड्रेनेज लाइनमधील सांडपाणी सोडण्यात आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच शहराच्या वाढत्या विकासाचा विचार करुन टाकण्यात आलेल्या पावसाळी गटारींचा वापर सर्रासपणे सांडपाणी वाहून नेण्यासाठी होत आहे.

हिंदुस्थान ग्लास : ऐतिहासिक करार

$
0
0
सिन्नर औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान नॅशनल ग्लास अॅण्ड इंडिया लिमिटेड कंपनीत गेल्या सतरा वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या ८० कामगारांना कायमस्वरुपी करण्यात आले. उर्वरित इतर कंत्राटी कामगारांनाही कायमस्वरुपी कामगारांच्या सर्व सुविधा देण्याचेही करारात ठरविण्यात आले आहे.

वाहनांमधील दोष लक्षात येणार अॅटोमॅटिक

$
0
0
आरटीओ कार्यालयातील ५ एकर जागेत साकारला जाणारा अॅटोमॅटिक व्हेईकल इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन सेंटर (एव्हीइएस) या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. एप्रिलच्या पंधरवड्यात हा प्रकल्प कार्यान्वित होईल, असा विश्वास आरटीओ कार्यालयातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images