Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘डिपॉजिट वाचले तर एक कोटी घ्या!’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बारामती जिंकण्याचे वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागले आहे. महाजन यांनी बारामतीमधून उमेदवारी करावी, ते निवडणुकीत डिपॉजिट वाचवू शकले तर एक कोटी माझ्याकडून घेऊन जा, असे आव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी दिले आहे.

महाजन यांच्या वक्तव्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिवर्तन यात्रेतून नुकतेच प्रत्युत्तर दिले होते. यावेळी त्यांनी 'बारामती काय आहे ते ठाऊक नाही आणि निघाले बारामती जिंकायला? एकदा बारामतीत या, मग बघतोच!' असे सांगितले. त्यानंतर 'बारमती नगरपालिकेची निवडणूक होईल त्यावेळेस नक्कीच तेथे नेतृत्व करून निवडणूक जिंकू, असा पलटवार महाजन यांनी केला होता. त्यानंतर आता कार्यकर्ते व पदाधिकारी सुद्धा पालकमंत्र्यांना आव्हान देऊ लागले आहेत.

'स्वत:चा जिल्हा सुधारता येत नाही आणि बारामती जिंकायचे सांगतात' असे हल्लाबोल करीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनीही महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. नाशिक महापालिका, त्र्यंबक, इगतपुरी नगरपालिका, धुळे महापालिका इथे महाजन यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवारांना आमिष दाखवून, धमकावून विजय मिळविल्याचा आरोप कडलग यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘उत्सव कलेचा..’ पुन्हा नव्याने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरामधील उभरत्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, रसिकांची त्यांच्याशी ओळख व्हावी तसेच त्यांना भर मैफलीत सादरीकरणाचा हुरूप वाढावा, म्हणून विचारात आलेल्या या संकल्पनेला पुन्हा नव्याने सुरुवात करण्यात येणार आहे. हे पुष्प विश्वास ग्रुपच्यावतीने गुंफण्यात येणार आहे.

उत्सव कलेचा-उगवत्या ताऱ्यांचा, विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून साजरा झालेला अभिनव उपक्रम होता. 'उत्सव'चे मिलिंद कुलकर्णी, मनोज कुलकर्णी आणि मारुती कुलकर्णी यांच्या सहयोगाने झालेल्या या कार्यक्रमात शनिवार-रविवार या जोडून येणाऱ्या सुटीची सुरुवात सुरेल संगीताने व्हावी असा विचार करून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एकूण बारा कलाकारांनी आपली कला सादर केली. या संकल्पनेला रसिक नाशिककरांनीही उपस्थित राहून भरभरून दाद दिली.

'ज्योत से ज्योत जगाते चलो' हा विश्वास नाशिकच्या कलाक्षेत्रात आहे आणि त्याच विश्वासाने या उगवत्या ताऱ्यांच्या पाठीशी आता 'विश्वास ग्रुप' उभा रहाणार आहे. या संकल्पनेतले पुढचे पुष्प विश्वास ग्रूपच्या सहकार्याने सादर केले जाणार आहे. गंगापूर रोडवरील उत्सव रेस्टॉरंटमध्ये १२ महिन्यांपासून सुरु झालेल्या उत्सव उगवत्या ताऱ्यांच्या मैफिलीची सांगता रसिका नातू हिच्या गायनाने पार पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आप्पासाहेब पवार यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नामांकित स्त्री रोगतज्ज्ञ, रोटरीचे प्रांतपाल आणि विविध सामाजिक-शैक्षणिक उपक्रमांचे आधारवड डॉ. अमृतराव तथा आप्पासाहेब कृष्णाजी पवार (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

वैद्यकीय क्षेत्रात तत्त्वनिष्ठ व तत्पर रुग्णसेवा देऊन समाजसेवेचा आदर्श त्यांनी उभा केला होता. पन्नास हजारांवर शस्त्रक्रिया यशस्वी करून त्यांनी या क्षेत्रात नवीन मापदंड निर्माण केला. सन १९६० च्या दशकात नाशिक जिल्ह्यात रुग्णसेवेस प्रारंभ करून नामवंत स्त्रीरोग तज्ज्ञ घडविण्यात डॉ. आप्पासाहेब यांचा सिंहाचा वाटा होता. ज्ञान, कौशल्य, प्रामाणिकपणा, सचोटी आदी गुणसंपदेच्या बळावर त्यांनी मोठा मित्रपरिवार निर्माण केला होता. कुटुंबातूनही त्यांनी मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स घडविले. आपल्या जन्मगावी मानूर (ता. कळवण) येथे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची इमारत उभारली होती. त्यांच्या पश्चात पत्नी निष्णात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजीवनी पवार, पुत्र डॉ. समीर पवार, कन्या श्रीलेखा पाटील, डॉ. प्रतीक्षा सिदिड, डॉ. प्रविणा पवार, प्रणोती कवडे, बंधू डॉ. अभिमन्यू पवार, पुतणे डॉ. प्रदीप पवार असा मोठा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गर्भपात’चे पुन्हा मालेगाव कनेक्श्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मनमाड चौफुली परिसरात चार महिन्याचे अर्भक पुरताना तरुण-तरुणी आढळून आल्याने मालेगाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तरुण-तरुणी पुण्याहून गर्भपात करण्यासाठी मालेगाव आल्याने अवैध गर्भपात टोळीचे कनेक्शन मालेगाव कनेक्शन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. तसेच एखाद्या शेतातील बंद घराचा यासाठी उपयोग, तेथे पडलेले साहित्य, व्हिजिटिंग कार्ड, रक्ताचे डाग यावरून या घरात याआधीही अनेक गर्भपात झाले असल्याचा अंदाज आहे.

शहर परिसरात या आधीदेखील सटाणा नाका परिसरात ऑगस्ट २०१८ मध्ये चिंतामणी रुग्णालयात अवैध गर्भपात झाला होता. चिंतामणी हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा गर्भपात केंद्राचा पोलिसांनी पर्दाफाश करुन काही जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी मध्यरात्री दोन वाजता हॉस्पिटलवर छापा टाकून एक स्त्री जातीचे मृत भ्रूण जप्त केले होते. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील बेकायदा गर्भपात प्रकरण राज्यभर चांगलेच गाजले. तोच फॉर्म्युला वापरून मालेगाव शहरातही बेकायदा गर्भपात होत असल्याच्या तक्रारी पेालिस प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या.

तसेच बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान प्रकरणी २० जुलै २०१३ रोजी मालेगाव येथील देवरे बंधूंचे कारस्थान उघडकीस आले होते. शिव-मंगल सोनोग्राफी केंद्राचा संचालक डॉ. सुमीत देवरे व त्याचा भाऊ डॉ. अभिजित देवरे हे येथील सीताबाई हॉस्पिटलच्या माध्यमातून गर्भलिंगनिदान करीत होते. याबाबत ऑनलाइन तक्रार दाखल झाली होती. या तक्रारींची दखल घेत 'लेक लाडकी' अभियानाच्या पथकाने स्टिंग ऑपरेशन करत देवरे बंधूंचे कारस्थान उघडकीस आणले होते. मालेगाव आणि अवैध गर्भपात हे कनेक्शन वारंवार उघडकीस येत आहे. त्यामुळे पोलिस आणि आरोग्य विभागापुढे या प्रक्रियामुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कौळाणे शिवारातील या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण घटनेचा तपास सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक शाखेच्या देवीकर यांची उचलबांगडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक शाखेच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक एम. एस. देवीकर यांची आज, सोमवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. देवीकर यांचा पदभार वाहतूक शाखेच्या प्रशासन विभागातील पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला.

युनिट दोन अंतर्गत शहरातील महत्त्वाचा भाग येतो. येथील वाहतुकीचे प्रश्न मोठे आहेत. त्यात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले की, या ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक महेश देवीकर यांच्याबाबत मागील काही काळापासून सातत्याने तक्रारी येत होत्या. याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी चौकशी केली. या चौकशीनुसार देवीकर यांच्या बदलीचा सोमवारी निर्णय घेण्यात आला. देवीकर यांना वाहतूक शाखेच्या प्रशासन विभागात घेण्यात आले असून, त्यांच्या जागी प्रशासन विभागात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक सोनवणे यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, वाहतूक शाखेकडून वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याचा समन्वय करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय बडेवाल यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृतिपत्रिकेसाठी पाठ्यपुस्तकांचा अभ्यास गरजेचा

$
0
0

हिंदी, संस्कृत विषयक मार्गदर्शनात तज्ज्ञांचा सूर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्याला आकलन झालेल्या ज्ञानाचे व्यवस्थितरित्या उपयोजन करता यावे, हा कृतिपत्रिका मूल्यमापन पद्धतीमागील प्राधान्याचा हेतू आहे. ज्ञान, आकलन, स्मरण आणि उपयोजन या पायऱ्यांद्वारे विद्यार्थी पुढे जातो. या पायऱ्या चढण्यासाठी पाठ्यपुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास हिंदी किंवा संस्कृत भाषेसारख्या विषयात गरजेचा आहे, असा सूर रेषा एज्युकेशन सेंटर आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या वतीने आयोजित उपक्रमात व्यक्त झाला. सेंटरच्या गंगापूर रोड येथील केंद्रात रविवारी 'हिंदी' आणि 'संस्कृत' या दोन्ही विषयांवर स्वतंत्र मार्गदर्शन सत्र पार पडले.

पहिल्या सत्रात कुमूदिनी फेगडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की पूर्वीच्या परीक्षा पद्धतीत पाठांतरावर भर होता. पण कृतिपात्रिका पद्धतीत आकलन व उपयोजनावर भर आहे. विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त असेल, धडा-कविता नीट समजली तर कृतिपात्रिका सोडवणे सोपे जाईल. उतारा दिलेला असल्याने उत्तरे उताऱ्यातच असतात. ती पाहून लिहिता येतात. त्यामुळे शुद्धलेखनाच्या चुका कमी होऊन विद्यार्थ्यांचे गुण वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दोन्ही सत्रांसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शुद्धलेखनाकडे लक्ष द्या

परीक्षेला अद्याप १ महिना १० दिवस शिल्लक आहेत. पाठांतराचे श्लोक रोज एकदा पुस्तकात पाहून म्हटले तरी आपोआप पाठ होतील. पाठांतरचे गुण सहज मिळतील. रोज एक धडा वाचत राहा. धडे त्यामुळे परिचयाचे होतील. परीक्षेत उताऱ्यात उत्तरे पटकन सापडतील. व्याकरणाचे प्रश्न लिहिताना शुद्धलेखनाकडे विशेष लक्ष द्या, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

घोकंपट्टीला गुडबाय

हिंदी विषयाच्या कृतिपत्रिकेसाठी मार्गदर्शन करताना सुरेखा बोंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की कृतिपत्रिकेमुळे घोकंपट्टी करण्याच्या पद्धतीला गुडबाय करता येणार आहे. त्या ऐवजी नवीन पद्धती ही ज्ञान, आकलन, उपयोजनेची कसोटी बघणारी आहे. गद्य, पद्य, अपठीत, व्याकरण व रचना विभाग अशा विभागांमध्ये कृतिपत्रिकेची विभागणी आहे. सर्वच विभागांना समान महत्त्व द्यायला हवे. या बदलत्या अभ्यासक्रमाचे हे पहिलेच वर्ष असल्याने अधिकाधिक प्रश्न हे धड्याखालील येण्याची शक्यता जास्त आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकातील धडे नीट अभ्यासायला हवे. उतारा दिलेला असणार पण हा उतारा वाचून उत्तरे शोधण्यासाठी वाचन चांगले हवे. परीक्षेपर्यंत रोज एक धडा वाचला तरी दोन-तीनदा वाचन होईल. त्यामुळे धडे सुपरिचत होतील व उताऱ्यात उत्तरे पटापट शोधता येतील.

आकलनाचे उपयोजन नीट करा

व्याकरणाचा प्रश्न सोडवताना शुद्धलेखनाकडे कटाक्षाने लक्ष द्या. लेखन कौशल्यात पत्रलेखन, आकलन, वार्तालेखन, विज्ञापन, कहानी, निबंध हे प्रकार आहेत. पत्रलेखनाचा बदललेला पॅटर्न नीट लक्षात घ्या. शीर्षकावरून कथा, शब्दावरून कथा लिहिताना शीर्षकाचा अर्थ नीट लक्षात घ्या. तुम्हाला आकलन झालेल्या ज्ञानाचे उपयोजन नीट करता यावे, हाच या कृतिपत्रिका परीक्षा पद्धतीचा हेतू आहे, असे मार्गदर्शन बोंडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळ काढा, जल वाढवा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा जिल्हाच नव्हे, तर राज्याचा बहुतांश भाग दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. भविष्यात दुष्काळाची धग कमी व्हावी याकरिता गाळमुक्त धरण उपक्रमांतर्गत जलाशयांमधून एक कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट गतवर्षीच्या तिप्पट असून, ते पूर्ण करण्यासाठी कंपन्या, संस्थांनी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी केले.

दुष्काळाचे कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवारसारखी योजना राबविण्यास सुरुवात केली. याखेरीज गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हा उपक्रमही राबविला जातो आहे. या योजनेंतर्गत गतवर्षी ३६ लाख क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला. हा गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतांपर्यंत वाहून नेला. यंदाही दुष्काळ निवारणार्थ केल्या जाणाऱ्या उपाययोजनांना अधिकाधिक यश यावे, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पान्सिबिलिटी) निधीबाबत बैठक बोलावली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या बैठकीला भारतीय जैन संघटना, टाटा ट्रस्ट यांसह विविध कंपन्या आणि संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जलाशयांना गाळमुक्त करून जलसाठा वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यंदाही हा उपक्रम राबविण्यात येणार असून, एक कोटी क्यूबिक मीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, गाळाच्या नावाखाली वाळू उत्खननाचा उद्योग ठेकेदारांसह कुणीही केला तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

..

'सीएसआर'अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचे मदतीचे आवाहन

जलाशय गाळमुक्त करण्यासाठी कंपन्यांनी सीएसआर निधी द्यावा किंवा मशिनरी उपलब्ध करून दिल्यास इंधन व्यवस्था केली जाईल, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी कंपन्या व संस्थांना केले.

...

३६ कंपन्या आणि संस्थांची मदतीची तयारी

भारतीय जैन संघटना तसेच टाटा ट्रस्टने प्रत्येकी ५० जेसीबी व तत्सम मशिन पुरविण्याची तयारी दर्शविली. एकून ३६ कंपन्या आणि संस्थांनी प्रशासनाला सीएसआर अंतर्गत मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामध्ये अशोका, सिएट, व्हीआयपी, मायलॉन, रामबंधू यासारख्या कंपन्यांचा तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग, डॉक्टर्स असोसिएशन, सीए असोसिएशन यांसारख्या संस्थांनी मदतीची तयारी दर्शविली आहे.

...

अशी होणार कामे

- पाऊस कमी झालेल्या गावांत प्राधान्याने कामे हाती घेणार

- कामांचे जिओ टॅगिंग करण्याचेही विचाराधीन

- जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला खोलीकरण, रुंदीकरण आणि गाळ काढणार

- शेतकरी, ग्रामस्थांना गाळ उचलण्याची परवानगी

- गाळ इतरांना विकण्यास परवानगी नसणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकेदायक इमारतीमुळे विद्यार्थ्याचा अपघात

$
0
0

दळवट आश्रमशाळाप्रकरणी अहवाल सादर

म. टा. वृत्तसेवा, कळवण

दळवट येथील आश्रमशाळेतील विद्यार्थी मृत्युप्रकरणी प्रकल्पाधिकारी, तहसीलदार व वैद्यकीय अधिकारी यांच्या त्रिस्तरीय आपत्कालीन आढावा पथकाने अहवालात तयार केला आहे. त्यानुसार त्या विद्यार्थ्याचा घातपात नसून अपघात असल्याचे म्हंटले आहे. प्रकल्पाधिकारी डॉ. पंकज आशिया, तहसीलदार कैलास चावडे तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी दळवट येथील आश्रमशाळेत भेट देत प्राथमिक अहवाल सादर केला.

आश्रम शाळेच्याच वर्गखोल्यांची बंद व धोकेदायक ठरलेल्या इमारत मात्र या विद्यार्थ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे.

रविवारी चेतन संजय पवार हा मित्रांसमावेत क्रिकेट खेळत होता. त्यांचा चेंडू आश्रमशाळेच्याच धोकेदायक इमारतीच्या टेरेसवर अडकला. या इमारतीला जिना नसतानाही चेतन वर चढला. मात्र उतरत असताना तो खाली पडला. तेव्हा त्याच्या डोक्याला मार लागला. तो डोक्यावरच पडल्याने त्याला उलटी झाली. हे लक्षात येताच त्याला प्राथमिक उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथून नाशिकला हलविण्यात तब्बल दोन ते अडीच तासांचा कालावधी गेला. या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी जाहीर केले. घटना घडल्यानंतर त्याला थेट नाशिकला हलविले असते तर कदाचित त्याला वाचवण्यात यश आले असते.

कुटुंबावर आघात

चेतनचे वडीलही वारले आहेत. त्याच्या विधवा आईवर या घटनेमुळे मोठा आघात झाला. त्याच्या आईला कळवण प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून तत्काळ दोन लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना व अन्य कुठल्याही शासकीय निकषानुसार मदत देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी प्रतिक्रिया तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली. पतीचे व आता मुलाचेही निधन झाल्यामुळे पवार कुटुंबातील त्या विधवा महिलेस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.

इमारत धोकेदायकच

दळवट आश्रयशाळेतील ज्या इमारतीवर चेंडू काढण्यासाठी चेतन गेला ती इमारत धोकेदायक व बंदवस्थेत आहे. तिला चढणे-उतरण्यासाठी जिना नाही. असे असतानाही आश्रमशाळा प्रशासनाकडून या धोकादायक इमारतीबाबत गंभीरपणे घेतले गेले नाही. तशा सूचना विद्यार्थ्यांना केलेल्या नाहीत. ही बाबही या घटनेच्या निमित्ताने पुढे आली आहे. याच आश्रमशाळेत डिसेंबर २०१४ च्या कालावधीत शिवभांडणे येथील विद्यार्थी योगेश बागुल याने गळफास घेवून आत्महत्या केनर होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गोवर-रुबेला’स २५ पर्यंत मुदतवाढ

$
0
0

शहरात ८४ टक्के लसीकरण उद्दिष्ट पूर्ण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोवर रुबेलाचा नायनाट व्हावा यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम राबविली असताना नाशिक महापालिकेने राबविलेल्या विशेष मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात ४ लाख ९० हजार पैकी ४ लाख ५ हजार २१४ बालकांना गोवर-रुबेलाची लस देण्यात आली असून ८३.६६ टक्के उदिष्ट्य पूर्ण केल्याची माहिती आरोग्यधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी दिली.

नाशिक महापालिकेच्या वतीने विविध शाळामध्ये ही मोहीम राबविण्यात आली. मात्र, शहरातील अल्पसंख्यांक समाजाच्या रहिवासी भागातील शाळांमध्ये या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. उर्दू शाळांमध्ये गोवर रुबेलाच्या लसीकरणाचे प्रमाण कमी होते. यासाठी शहरातील मान्यवर नागरिक, नगरसेवक, उर्दू शाळेतील मुख्याध्यापक, शहर-ए-खतिब, डॉक्टर्स यांची गेल्या आठवड्यातच विशेष बैठक घेण्यात आली. यात या लसीकरणाचे महत्त्व पटवून नागरिकांना प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे.

पालकांचे मतपरिवर्तन

दारुल मदरसामध्ये एकूण १७२ विद्यार्थी होते त्यापैकी ५२ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात यश आले आहे. अजून १२० विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी असून त्यांच्या पालकांचे उद्बोधन करण्यात येत आहे. लीली व्हाईट या शाळेने लसीकरणास नकार दिला होता. या शाळेतील पालकांचे मतपरिवर्तन झाले असून ७६६ पैकी ४०६ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ३६० विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे.

... तर ९० टक्के यशप्राप्ती

अजूमन उर्दू हायस्कूलमध्ये २३० पैकी २१० विद्यार्थ्यांचे, एकरा प्रायमरी स्कूलमध्ये २४४ पैकी २३५ विद्यार्थ्यांचे, नॅशनल प्रायमरी स्कूलमध्ये ६४४ पैकी ६४४ विद्यर्थ्यांचे म्हणजेच १०० टक्के लसीकरण झाले आहे. सेंट सादिक स्कूलमध्ये ४३६ पैकी ३०९ विद्यार्थ्यांचे, रहेनुमा उर्दू स्कूलमध्ये ७९९ पैकी ६७२ विद्यार्थ्यांचे, सुलेमान स्कूलमध्ये २५९ पैकी २३२ विद्यार्थ्यांचे, रवींद्र मंडळ शाळेत ३३९ पैकी २७४ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या लसीकरणासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण होईल, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

..

शहरात उर्दू शाळा : ३५

एकूण विद्यार्थी : १६,०८४

डिसेंबर अखेर लसीकरण : ६,२९५

बैठकीपूर्वीचे बाकी लसीकरण : ९,७८९

बैठकीनंतर लसीकरण : ४,१०५

अद्याप बाकी लसीकरण : ५,६८४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रियकराने धोका दिल्याने महिलेची आत्महत्या

$
0
0

प्रियकराने धोका दिल्याने महिलेची आत्महत्या

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पतीपासून दूर झालेल्या महिलेला प्रियकराने धोका दिला. प्रियकारासाठी घर, संसार सोडणाऱ्या महिलेला आत्महत्या करावी लागली. ही घटना मखमलाबाद शिवारातील स्वामी विवेकानंद नगर भागात घडली. या प्रकरणी बलात्काराच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या प्रियकरासह त्याच्या बहीण-मेहुण्याविरोधात म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितास अटक करण्यात आली असून, दाम्पत्य फरार झाले आहे.

मुकेश दादाभाऊ बकुरे (रा. फुलेनगर, पंचवटी) आणि राजू तसेच भारती थोरात (रा. दोघे म्हसरूळ) अशी विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मला नीलेश शार्दुल (२६ रा. मुंबई हल्ली. स्वामी विवेकानंद नगर) या महिलेने शनिवारी (दि.१९) विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. निर्मलाशी अनेक वर्षांपासून संशयित मुकेशचे प्रेमसंबध होते. विवाहानंतरही हे प्रेमसंबध कायम राहिल्याने निर्मलाने चार वर्षाचे अपत्य असतांनाही प्रियकरावर विश्वास ठेवला आणि पतीस सोडचिठ्ठी देत नाशिक गाठले. या काळात मुकेश बकुरे व त्याच्या बहिण मेहुण्याने धीर देत लग्नाचे आमिष दाखविले. त्यामुळे दोघांमध्ये शारीरिक संबध प्रस्थापित झाले. दीड वर्षाच्या कालावधीनंतर अचानक बकुरे आणि त्याच्या कुटुंबियांने लग्नास नकार दिला. यामुळे धक्का बसलेल्या निर्मलाने थेट म्हसरूळ पोलिस ठाणे गाठून संशयित मुकेशविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र, अटक झालेल्या मुकेशची लागलीच जामिनावर सुटका झाली. यामुळे निर्मला अस्वस्थ होती. संशयितांनी छळ करण्यास सुरूवात केल्याने अखेर शनिवारी निर्मलाने आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. या प्रकरणी लिलाबाई जाधव यांच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुकेशला अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक एस. आर. पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेट वापरा, कारवाई टाळा

$
0
0

ग्रामीण भागात १ फेब्रुवारीपासून पोलिसांची विशेष मोहीम

...

- राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, इतर सर्व रस्ते, तालुक्यांच्या व त्यापेक्षा छोट्या गावांमध्येही मोहीम राबविणार

- १५ दिवस राबविणार मोहीम

- कारवाईबरोबर पोलिस जनजागृतीही करणार

- 'स्वत:चे संरक्षण कुटुंबाचे संरक्षण' ही टॅगलाइन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागात रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असून, हेल्मेटचा वापरच होत नसल्याने हा आकडा दरवर्षी वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिस दलाने जिल्ह्याच्या सर्वच भागात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रवारीपासून ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात दळणवळणाची सुविधा चांगली असून, सर्वच भागात रस्त्यांचे जाळे पसरले आहे. दुसरीकडे दरवर्षी वाहनांची संख्याही वाढते आहे. नाशिक जिल्ह्यात दरवर्षी ६०० ते ८०० जणांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू होतो. सन २०१८ मध्ये रस्ते अपघातांमध्ये जवळपास ३७७ दुचाकीस्वारांचे बळी गेले. हेल्मेटचा वापर होत नसल्याने हा आकडा वाढलेला दिसतो. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिस दलाने हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांना रडारवर घेण्याचे नियोजन आखले आहे. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली १ फेब्रुवारीपासून जिल्ह्याभरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. साधारणत: १५ दिवस या मोहिमेत सातत्य ठेवण्यात येणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

या मोहिमेबाबत सोमवारी पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीस सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, इतर सर्व रस्ते, तसेच तालुक्यांच्या व त्यापेक्षा छोट्या गावांमध्ये सुद्धा ही मोहीम राबविण्यात येणार आहे. गावागावांतील चौकांमध्ये ठिकाणे बदलून ही कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांना कारवाईबरोबर जनजागृतीदेखील करण्याच्या सूचना कररण्यात आल्या आहेत. 'स्वत:चे संरक्षण कुटुंबाचे संरक्षण' अशी टॅगलाइन त्यासाठी ठरविण्यात आली आहे.

--

दहा दिवसांत तरतूद करावी

हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू होण्यास अद्याप १० दिवस आहेत. या कालावधीत वाहनचालकांनी हेल्मेट खरेदीची तजवीज करावी. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, असे अधीक्षक संजय दराडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेचं चांगभलं!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाला नाशिक शहरातील नागरिकांनी अत्यल्प प्रतिसाद दिला असून, अवघ्या ६६० नागरिकांनी आपले मत नोंदवले आहे. नाशिकपेक्षा भौगोलिकदृष्ट्या लहान असलेल्या मालेगाव शहरात ९९१ नागरिकांनी आपले मत नोंदवले आहे.

केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपल्या शहरात स्वच्छता कशी होते, हे जाणून घेण्यासाठी १९६९ या नंबरवर नागरिकांचे मत मागवले आहे. या नंबरला मिस्ड कॉल दिल्यानंतर तिकडून 'रिटर्न कॉल' येतो. त्यावरून आपल्या शहरात स्वच्छता कशी आहे, याची माहिती घेतली जाते. या माहितीवरून शहराचा स्वच्छतेतील क्रमांक ठरविला जाणार आहे. केवळ समितीच्या एका भेटीच्या आधारे शहराला नंबर न देता नागरिकांच्या सहभागातून हे मानांकन दिले जाते. मात्र, नाशिक शहरातील केवळ ६६० नागरिकांनीच या नंबरवर कॉल करून आपले मत नोदवले आहे. त्याच प्रमाणे https://swachhsurvekshan2019.org/CitizenFeedback या ठिकाणीही आपली प्रतिक्रिया नोंदविता येते. येथेही नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद आहे. नाशिक शहराच्या तुलनेत लहान असलेल्या मालेगाव शहरातून चांगला प्रतिसाद आहे. मालेगाव शहरातून आतापर्यंत ९९१ नागरिकांनी प्रतिसाद नोंदवला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत दरवर्षी स्वच्छ शहरांचे सर्वेक्षण करून त्यांना पुरस्कार दिला जातो. त्यासाठी देशभरात दरवर्षी जानेवारीत सर्वेक्षण करण्यात येते. या सर्वेक्षणाचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. पहिले सर्वेक्षण जानेवारी २०१६ मध्ये झाले. यात देशभरातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ७४ शहरांचा समावेश करण्यात आला होता. त्या वेळी नाशिकचा ३१ वा क्रमांक होता. जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सर्वेक्षणात देशातील ४७३ शहरे सहभागी झाली होती. त्यात नाशिकची क्रमवारी १५१ व्या स्थानावर घसरली. त्यामुळे दत्तक घेतलेल्या नाशिकची ही घसरण मुख्यमंत्र्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये बैठक घेऊन पहिल्या दहा शहरांत नाशिकचा समावेश व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. प्रत्यक्षात २०१८ च्या सर्वेक्षणांतर्गत पुरस्कारप्राप्त शहरांची यादी १६ मे २०१८ रोजी केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या 'स्वच्छ सर्वेक्षण २०१८' या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. यादीत पुरस्कारप्राप्त शहरांमध्ये नाशिकचे नाव नसल्यामुळे दत्तक नाशिककरांचा पुन्हा अपेक्षाभंग झाला होता. देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मध्यप्रदेशातील इंदूर शहराला मिळाला होता. भोपाळ व चंडिगड हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर होते. देशात चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला होता. महाराष्ट्रातील नऊ शहरांना विशेष पुरस्कार जाहीर झाले होते. त्यामध्येही नाशिकला स्थान मिळाले नाही. परभणी, भुसावळ यांसारख्या शहरांची स्वच्छता सुधारली असताना नाशिक मात्र उपेक्षित राहिले होते. आता अस्वच्छ शहरांमध्ये कितवा क्रमांक लागतो, हेच पाहणे नाशिककरांच्या नशिबी आले आहे.

अशी नोंदवा प्रतिक्रिया

१९६९ या नंबरवर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपल्याला भाषा निवडीचा पर्याय दिला जातो. मराठीसाठी ५ नंबर डायल केल्यानंतर आपण राहात असलेल्या परिसराचा पिनकोड नंबर विचारला जातो. त्यानंतर आपले वय, स्त्री आहात की पुरुष हे विचारले जाते. त्यानंतर आपल्या शहरातील स्वच्छतागृहांबाबत आपण समाधानी आहात का? आपल्याकडे येणाऱ्या गाडीत ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केला जातो का? आपण राहात असलेल्या परिसरात स्वच्छतागृहांची संख्या योग्य आहे का? शहरातील कचऱ्याची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावली जाते का, याची माहिती विचारली जाते. १९६९ या नंबरवर मत नोंदविता येते.

https://swachhsurvekshan2019.org/CitizenFeedback या ठिकाणीही प्रतिक्रिया देता येते.

पालिकेकडून जोरदार प्रयत्न

नाशिक शहराचा स्वच्छता सर्वेक्षणात चांगला नंबर यावा यासाठी प्रशासन कामाला लागले असून, शहरातील सर्व स्वच्छतागृहांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शहरातील रस्ते स्वच्छ करून दुभाजकांना रंग दिला जात आहे. सुलभ शौचालयांमध्ये आरसे व हात पुसण्यासाठी रुमाल ठेवण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भद्रकालीतील हत्या प्रकरणी दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रिणीशी ठेवलेल्या प्रेमसंबंधांमुळे उद्भवलेल्या वादातून अरबाज शेरू पठाण या युवकाची हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितास अटक केली. यामुळे अटक केलेल्या संशयितांची संख्या नऊच्या घरात पोहचली आहे. दरम्यान, संशयित आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या एका युवकालाही पोलिसांनी आरोपी केले आहे.

अजिंक्य उर्फ सोनू प्रकाश धुळे आणि चेतन यशवंत इंगळे अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हत्या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या सोनू धुळे यास तपोवन परिसरातून तर, इंगळेला पंचवटी मार्केट यार्ड परिसरात पोलिसांनी अटक केली. हत्येचा प्रकार घडल्यानंतर संशयित आरोपी विराज उर्फ विक्की किरण काळे याने इतर संशयितांना पळून जाण्यास मदत केली. पोलिस तपासात ही बाब स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्यालाही आरोपींच्या यादीत घेतले आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत नऊ संशयित आरोपींना अटक केली असून, चार विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले आहे. हत्येची घटना भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भीमवाडी झोपडपट्टी परिसरात संक्रांतीच्या दिवशी रात्री आठच्या सुमारास घडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदारांनी केली शिक्षण विभागाची गोची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांमधील संशोधनात्मक वृत्तीला बळ देण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने शिक्षण विभागामार्फत आयोजित केलेले इन्स्पायर अॅवॉर्ड स्पर्धा व प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. प्रदर्शन मांडणीसाठी आवश्यक साहित्य, विद्यार्थ्यांच्या चहा, नाश्त्यासाठी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये केवळ एकाच निविदेत निकषांची पूर्तता होत असल्याच्या अडचणीमुळे हे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र, येत्या ३१ जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शन आयोजित करण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

आडगाव येथील मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे आजपासून (दि. २२) इन्स्पायर अॅवॉर्ड स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील ९९२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली असून, त्यांचे प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात येणार होते. नोंदणी केलेल्या ९९२ विद्यार्थ्यांपैकी उपस्थित दहा टक्के विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरासाठी, तर पुढे साडेसात टक्के विद्यार्थ्यांची केंद्र स्तरावर निवड करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय प्रदर्शनातील निवडलेले विद्यार्थी ३ फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. त्यामुळे ३ फेब्रुवारीच्या आत जिल्हा स्तरावरुन विद्यार्थ्यांची निवड होणे आवश्यक आहे. परंतु, निविदांच्या अडचणीमुळे नियोजित इन्स्पायर प्रदर्शन तूर्तास रद्द करण्यात आले आहे. प्रदर्शनात आलेल्या या तांत्रिक अडचणींमुळे शिक्षण ‌विभागाची मात्र, धावपळ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालधक्का प्रश्नी बैठक निर्णयाविनाच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

परराज्यातील ट्रान्सपोर्ट कंपनीला मिळालेले काम करण्यास नकार दिल्याने नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावर निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी सर्व कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी (दि. २१) कामागार उपयुक्त जी. जे. दाभाडे यांच्या उपस्थितीत कामगार उपयुक्त कार्यालयात बैठक झाली. मात्र, या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

दरम्यान, स्थानिक कार्टिंग एजंटकडून परराज्यातील कंपनीचे काम केल्याबद्दल मारहाण करून धमकावल्याची माहिती समजते. या प्रकारानंतर संबंधित कामगारांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात पोलिसांकडे आपली कैफियत मांडली. या प्रकाराची पोलिसांकडूनही शाहनिशा सुरू आहे.

नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावरील शासकीय धान्याचा ठेका न्यू हैद्राबाद मेडक ट्रान्सपोर्ट या कंपनीला मिळाला आहे. मात्र, या कंपनीचे काम करण्यास स्थानिक कामगारांनी विरोध दर्शविल्याने या कंपनीने पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. स्थानिक कार्टिंग एजंट कंपनी आणि कामगारांत दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका करारावरुन हा वाद उद्भवला होता. त्यानंतर पोलिस आणि कामगार यूनियन, कामगार उपायुक्त, रेल्वे पोलिस यांच्यात बैठकही झाली होती. या विषयावर कामगार उपायुक्त दाभाडे यांच्या उपस्थितीत सोमवारी पुन्हा बैठक झाली.

या बैठकीत उपस्थित सर्व कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी कराराची मुदत संपेपर्यंत हैद्राबादच्या कंपनीचे काम करण्यास आपला नकार लेखी स्वरुपात कळविला आहे. त्यामुळे हैदराबादच्या कंपनीचा नवीन रेक आल्यावर पुन्हा कामगारांचा प्रश्न उपस्थित होणार आहे. स्थानिक नोंदनीकृत कामगार आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने हैदराबादच्या कंपनीपुढे आता कामगारांचा प्रश्न उभा ठाकला आहे. या कंपनीने बाहेरून कामगार आणल्यास कदाचित त्यास देखील स्थानिक पातळीवर विरोध होण्याची दाट शक्यता आहे.

कामगारांची गोची कायम

नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावर चार कामगार युनियन आहेत. या कामगारांनी केवळ कथित कराराच्या भीतीपोटी परराज्यातील कंपनीच्या कामाला विरोध दर्शविला आहे. प्रत्यक्षात स्थानिक कामगारांना एका विशिष्ट कार्टिंग एजंट शिवाय इतर कार्टिंग एजंट कंपनीचे काम करण्यास बंधन असणारा अशा स्वरुपाचा कोणताही करार झाला नसल्याचा दावा कामगार उपयुक्तांनी केला आहे. त्यामुळे स्थानिक कामगारांचीच मोठी कोंडी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेर ते कॉल्स झाले बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाढत्या सोशल साइट्स आणि त्याचा वेगाने वाढणारा वापर, आपला संबंध नसतानाही कशाप्रकारे आपल्याला अडचणीत आणू शकतात, याचे उदाहरण शहरातील आधाराश्रम संस्थेत नुकतेच घडले आहे. अनाथ बालकांचा सांभाळ करणारी ही संस्था लग्नासाठी मुली पुरवते, अशा आशयाचा व्हिडिओ यू ट्युबवर टाकून संस्थेची बदनामी करण्यात आली.

केवळ तीन दिवसांत संस्थेला दोन हजारांवर फोन कॉल्सचा सामना करावा लागला. यासंदर्भात संस्थेने पोलिसांकडे तक्रार देताच तो व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आला. यानंतर फोन कॉल्सही बंद झाले.

सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, यामुळे अनेकांची नाहक बदनामी होत आहे. या बदनामीचा सामना अनाथांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनाही करावा लागत आहे. घारपुरे घाटावरील आधाराश्रम संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवरुन संस्थेविषयी दिलेल्या माहितीचा गैरवापर करण्यात आल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. वेबसाइटवरील माहितीचा आधार घेत 'या संस्थेत लग्नासाठी मोफत मुली मिळतील', अशा आशयाचा व्हिडिओ तयार करुन तो यू-ट्युब चॅनलवर टाकण्यात आला होता. हे चॅनल सायबर क्राइम विभागाकडून ब्लॉक करण्यात आले आहे. हे प्रकरण आता कमी झाले असले; तरी अद्याप ते बंद झालेले नाही. अजूनही, दर दिवशी दोन ते तीन फोन कॉल्स लग्नासाठी मुली हव्या आहेत, हे विचारण्यासाठी येत असल्याचे संस्थेकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणी, सरकारवाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यू-ट्यूबवरील व्हिडिओ पाहून सातत्याने येणाऱ्या फोन कॉल्सला उत्तर देताना संस्थेतील पदाधिकाऱ्यांची दमछाक झाली. संस्थेकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची भावना निर्माण झाल्याने अनेकांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेचा वापरही केला. घटनेचा अधिक तपास सरकारवाडा पोलिसांसह सायबर पोलिस करत आहेत.

आधाराश्रमाची माहिती घेऊन खोट्या जाहिराती करण्यात आल्या आहेत. संस्थेशी संबंधित अशा कोणत्याही जाहिरातींना, अफवांना कोणीही बळी पडू नये, अशी आमची विनंती आहे. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तो व्हिडिओ काढून टाकण्यात आला आहे.

\B- राहुल जाधव, समन्वयक, आधाराश्रम\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी टँकर्सवर पथकाची नजर

$
0
0

\B- पाच जिल्ह्यांसाठी आठ पथके स्थापन

- \Bप्रत्येक पथकामध्ये चार अधिकारी

- नाशिकची जबाबदारी नगरच्या पथकावर

- विभागीय आयुक्त, सरकारला अहवाल होणार सादर

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी परिस्थितीत तहान भागविण्यासाठी गाव, वस्त्यांना टँकर मंजूर करण्यात आले असले तरी त्याद्वारे खरोखरच किती पाणीपुरवठा केला जातो यावर नजर ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके दुष्काळी तालुक्यांमध्ये सरप्राइज व्हिजिट करणार असून, टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची पडताळणी करणार आहेत. नाशिक जिल्ह्यात पडताळणीसाठी अहमदनगरमधील अधिकाऱ्यांची दोन पथके नेमण्यात आली असून, ती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सरप्राईज भेटी देऊन त्याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करणार आहेत.

राज्याच्या बहुतांश भागात यंदा दुष्काळी परिस्थिती असून, उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. दुष्काळी परिस्थितीत ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने टँकरची मागणी नोंदविण्यात येते. टँकरला मंजुरी देण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून केले जात असून, आजमितीस जिल्ह्यात १११ टँकरद्वारे १०९ गावे आणि ३३० वाड्या अशा ४३९ ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २ लाख ३७ हजार २१६ ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

दुष्काळी परिस्थितीत यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात टँकर घोटाळा उघडकीस आला होता. दुष्काळी परिस्थितीत स्वत:चे उखळ पांढरे करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्यात असा घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच अशा गैरप्रकारांना पायबंद घालण्यासाठी यंदा विशेष पथके नेमण्याचा निर्णय महसूलच्या विभागीय आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार नाशिकसह जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काही विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पाच जिल्ह्यांसाठी अशी एकूण आठ पथके स्थापण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये दोन उपजिल्हाधिकारी, महसूलचे एक लेखाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचा समावेश आहे. महसूल उपायुक्त दिलीप स्वामी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या गावांची महिन्यातून किमान एकदा प्रत्यक्ष तपासणी करावी तसेच याबाबतचा अहवाल दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत विभागीय आयुक्त आणि सरकारला सादर करावा, असे आदेश स्वामी यांनी दिले आहेत. ज्या तालुक्यांमध्ये सध्या टँकर सुरू नाहीत तेथे भविष्यात टँकर सुरू झाल्यास तेथील पाहणीदेखील या पथकांनी करावी, असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे टँकरआड होणारा काळाबाजार रोखण्यास मदत होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

..

जिल्हानिहाय पथक

नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये पाहणीची जबाबदारी अहमदनगरमधील दोन पथकांवर सोपविण्यात आली आहे. नाशिकमधील अधिकाऱ्यांच्या पथकांवर अहमदनगर जिल्ह्यांमधील दुष्काळी तालुक्यांना सरप्राइज भेटी देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. धुळ्याच्या पथकावर जळगावची, नंदुरबारच्या पथकावर धुळ्याची तर जळगावच्या पथकावर नंदुरबार जिल्ह्यात तपासणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एअरफोर्स सेवकसाठी ८५ टक्के मतदान

$
0
0

देवळाली कॅम्प : येथील साऊथ परिसरात असलेल्या २५ ईडी एअरफोर्स सेवक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत २४१ पैकी २०६ सेवकांनी मतदानाचा हक्क बजावित ८५ टक्के मतदान केले.

निवडणुकीत २०१९ ते २०२३ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण दहा उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. सकाळी ८ ते सायंकाळी ४ दरम्यान मतदान झाले. मतमोजणी सायंकाळी साडेपाच वाजता प्रक्रिया पार पडली. यामध्ये झालेल्या २०६ मतदानात १९९ वैध तर ७ मते बाद करण्यात आली. सर्वसाधारण गटातून खंडू त्र्यंबक मेढे (१३७ मिळालेली मते), कैलास सहादू राजभोज (१३०), कुणाल रामदास सहाणे (१२८), विशाल मोहन काळे (१२५), अशोक उमाजी रहाणे (११४), संजय काशिनाथ पवार (११२) अशी मते मिळाली तर अनुसूचित जाती-जमाती गटामध्ये राम सदाशिव काते यांना विजयी घोषित करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश मुसळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खबरदार, कॉलेजची बदनामी कराल तर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इन्स्टाग्रामवर ट्रोल होणाऱ्या मिम्स प्रकरणाची एचपीटी कॉलेजने गंभीर दखल घेतली आहे. सोशल मीडियावर विना परवानगी कॉलेजची माहिती पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशारा कॉलेजने विद्यार्थ्यांना दिला आहे. कॉलेजच्या अंतर्गत बाबी मांडण्यासाठी मिम्स हा पर्याय नाही, असे कॉलेज प्रशासनाचे मत आहे. विद्यार्थ्यांकडून होणारे ट्रोलिंग बंद करण्यासाठी कॉलेज सरसावले आहे.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्टस अँड आरवायके सायन्स कॉलेजच्या नावे इन्स्टाग्रामवर पेज तयार करण्यात आले आहे. या पेजवर कॉलेज कॅम्पसमधील घडामोडींवर भाष्य करण्यासह कॅम्पसमधील असुरक्षिता आदी मुद्द्यांकडे मिम्स अपलोड करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले होते. ही बाब कॉलेज प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली. या पेजवर कॉलेजचे नुकतेच झालेले नॅक मूल्यांकन, विज्ञान प्रदर्शन, विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक, वार्षिक स्नेहसंमेलन, बाउन्सर्सचे वर्तन यांसह प्राध्यापकांची लेक्चरमधील भूमिका यांवर आधारित पोस्ट अपलोड करण्यात आल्या होत्या. कॉलेज प्रशासनाच्या भूमिकेच्या विरोधात अपलोड केलेल्या मिम्समुळे एचपीटी कॉलेज सोशल मीडियावर ट्रोल होत होते. त्यामुळे कॉलेजने या प्रकरणी विद्यार्थ्यांना इशारा दिला आहे. 'कॉलेज कॅम्पसमधील फोटो, कॉलेजचा लोगो, माहिती किंवा कॉलेजबद्दल बदनामीकारक पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केल्यास सायबर गुन्हांतर्गत तक्रार केली जाईल. त्यानुसार विद्यार्थी किंवा पोस्ट अपलोड करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाल्यास कॉलेज प्रशासन जबाबदार नसेल', असा लेखी इशारा कॉलेजने विद्यार्थ्यांना दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या प्रकरणाची चर्चा आहे. आता घुमसट व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी नवीन कुठला पर्याय शोधून काढतील याची धास्ती कॉलेज प्रशासनास आहे.

\B'त्या' पोस्टच डिलिट !\B

एचपीटी आरवायकेतील वातावरण व प्रशासनाच्या भूमिका यांवर आधारित मिम्स इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आले होते. याची दखल कॉलेज प्रशासनाने घेतल्यानंतर पेज ऑपरेटरकडून त्या पोस्ट डिलिट करण्यात आल्या आहेत. आता त्या पेजवर फक्त विद्यार्थ्यांच्या संदर्भात असलेल्या विनोदी पोस्ट दिसत आहेत. त्यामुळे कॉलेजचे सोशल मीडियावरील ट्रोलिंग सध्यातरी थांबले असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नॅशनल फार्मसी वीकतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या नाशिक शाखा व जिल्ह्यातील ३३ फार्मसी महाविद्यालयांच्या वतीने ५७ वा नॅशनल फार्मसी वीक उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने फार्मासिस्ट फॉर हेल्दी इंडिया या संकल्पनेवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. याचा पारितोषिक वितरण सोहळा दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडला.

एमजीव्ही संचलित पंचवटीतील फार्मसी कॉलेज व कळवण येथील जे. डी. पवार कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेज, तर डिप्लोमा फार्मसी कॉलेज गटातून एशियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने विजेतेपद पटकावले. एशियन इन्स्टिट्यूटची हे विजेतेपद मिळविण्याची सहावी वेळ आहे. डिग्री गटात भुजबळ नॉलेज सिटी संचलित फार्मसी कॉलेज व डिप्लोमा विभागात मविप्रच्या आडगाव येथील डी. फार्मसी कॉलेजने उपविजेतेपद पटकाविले. सप्ताहानिमित्त झालेल्या विविध २८ स्पर्धांमध्ये १० हजारांहून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यातील विजेत्या विद्यार्थ्यांना विविध गटांतून पारितोषिके देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पारितोषिक वितरण सोहळ्यास आमदार देवयानी फरांदे, मुंबई येथील अँक्वाटिक रेमेडिजचे व्यवस्थापकीय संचालक भारत मेहता, आयपीएचे नाशिकचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर, उपाध्यक्ष डॉ. दिलीप डेर्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

'आयपीए'चे सचिव डॉ. मिलिंद वाघ, डॉ. यू. व्ही. उशीर, एस. व्ही. अमृतकर, पी. जी. मोराणकर, डी. के. पाटील, ए. डी. मारू, डॉ. जी. एन. चौधरी, डॉ. ए. एस. ढाके, डॉ. सी. डी. उपासनी, डॉ. सुष्मा मिसाळ, व्ही. ए. बैरागी, प्राचार्य डॉ. संतोष तांबे, वंदना पाटील, आर. बी. सौदागर, डॉ.अनिल जाधव यांच्यासह सर्व फार्मसी कॉलेजेच प्राचार्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images