Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सद्भावना रॅलीतून ‘इंधन वाचवा’चा संदेश

$
0
0

म. टा. वृतसेवा, मालेगाव

भारत सरकार व हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्यातर्फे रविवारी शहरात सद्भावना सायकल रॅली काढण्यात आली. इंधन वाचवा देश वाचवा, स्वच्छ भारत स्वस्थ भारत असा संदेश देण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले.

पोलिस कवायत मैदान येथून सकाळी सात वाजता रॅलीस प्रारंभ झाला. तत्पूर्वी, सहभागी नागरिक विद्यार्थ्यांनी संरक्षण सक्षम महोत्सव ही सामूहिक प्रतिज्ञा घेतली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पोलिस अधीक्षक निलोत्पल, प्रांत अजय मोरे, नितीन खैरनार, भूषण भोसले आदींच्या उपस्थितीत रॅलीस हिरवा झेंडा दाखवित सायकल रॅलीची सुरुवात झाली.

एकात्मता चौक, मोची कॉर्नर, सोमवार बाजार, रावळगाव नाका, कॉलेजरोड, साठ फुटी रोड मार्गे बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुल येथे या सद्भावना सायकल रॅलीची सांगता झाली. याठिकाणी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या रॅलीत शहरातील र. वी. शाह, केबीएच, आरबीएच, काबरा हायस्कूल, या. ना. जाधव, टी. आर. हायस्कूल, ए. टी. टी., जे. ए. टी. आदी शाळांचे विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह मालेगाव सायकललिस्ट मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसकडून जोशींविरुध्द लढण्याची ऑफर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'काँग्रेसने मनोहर जोशी यांच्या विरोधात लढण्याची ऑफर दिली होती. पण, काँग्रेसने आपल्याच नेत्यांचा काटा काढण्यासाठी मला उमेदवारी दिली नाही,' असे गुपीत भाजपचे जेष्ठ नेते व निवृत्त आयपीएस अधिकारी वाय. सी. पवार यांनी पत्रकारांना सांगितले. संत रोहिदास चर्मकार कल्याण आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांना नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आता निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. पण, पक्षाने सांगितले तर निवडणूक लढवेल, असेही सांगितले.

गोल्फ क्लबच्या शासकीय विश्रामगृहात त्यांनी चर्मकार बांधवांशी चर्चा केल्यानंतर पवार यांनी पत्रकारांना आयोगाच्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमोर शिष्यवृत्ती, शासकीय कर्ज योजना, अनुदान लाभासाठी येणाऱ्या अडचणी मांडण्यात आल्या. यावेळी पवार यांनी सामुहिक निवेदन देण्याची सुचना केली. या बैठकीला चर्मकार परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अशोक आहिरे, केदारनाथ बडोदे, राजाभाऊ आहिरे, दिलीप जाधव, रमेश पाधरे, हिरामण नांदगावकर, मनोज आसन, कृष्णा शिलावट, अनिल पवार यासह चर्मकार समाजाचे बांधव उपस्थित होते.

समाजमागे राहण्याची कारणे शोधणार

सरकारने ८ ऑक्टोंबर रोजी चर्मकार कल्याण आयोग जाहीर करुन मला अध्यक्षपद दिले. आता फेब्रुवारी महिन्यात मंत्रालय परिसरात मेकर चेंबरमध्ये कार्यालय मिळणार आहे. त्यासाठी १२ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या आयोगाकडून अनुसूचित प्रवर्गातील इतर जातींच्या तुलनेत चर्मकार समाजाची काय स्थिती आहे? समाजमागे राहण्याची कारणे शोधून त्यावर उपाय सुचविण्याचे माझे काम आहे. त्यानंतर त्याची अमंलबजावणी सरकार करणार आहे. त्यासाठी राज्यभर दौरा करुन मी चर्मकार बांधवांच्या बैठकी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहे. त्यानंतर त्याचा कल्याणकारी अहवाल सादर केला जाणार आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याचा हल्ला; गोऱ्ह्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील ठाणगाव येथील आडवाडी रोडलगत असलेल्या बेलटेकडी परिसरात शनिवारी (दि. १९) पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून तीन वर्षाच्या गोऱ्ह्याला ठार केले.

वसंत तुकाराम आव्हाड यांचा गट नंबर १६२९ मध्ये बंगल्यालगतच जनावरांसाठी पडवी आहे. बिबट्याने वासरावर हल्ला केल्याने गोठ्यात बांधलेली गाय व बैल पहाटेच्या सुमारास मोठमोठ्याने हंबरू लागले. तो आवाज ऐकू आल्याने आव्हाड यांनी बाहेर येऊन पाहिले. बिबट्याने गोठ्यातून तीन वर्षाच्या गोऱ्ह्याच्या मानेला पकडून जवळील शेतात ओढत नेत होता. बिबट्याला बघून आव्हाड यांनी आरडाओरड करीत आजूबाजूच्या लोकांना उठवले. जमावाच्या आवाजाने बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे गोऱ्ह्याचा मृत्यू झाला होता.

आव्हाड यांनी माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या वतीने वनपाल डी. व्ही. तुपलोंढे, रोहिदास रेवगडे, वनमंजूर पाटीलबा मधे, काशिनाथ, कातोरे व भरत गांगड आदींनी घडनास्थळी भेट देत पंचनामा केला. परिसरात दिवसाढवळ्याही बिबट्याचे दर्शन होत असून वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीचालकाचे २२ हजार लुटले

$
0
0

येवला : तालुक्यातील बोकटे-अंदरसूल रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या भारत वाघ (वय २२, मूळ रा. औराळा, ता. कन्नड) या दुचाकीस्वारास तिघा अज्ञात लुटारूंनी लुटण्याची घटना गुरुवारी (दि. १७) घडली. वाघ हे बचत गटाचे पैसे घेण्यासाठी येत होते. बोकटे-अंदरसूल रोडवर बोकटे शिवारात पाठीमागून दुचाकीवर येत असलेल्या २५ ते ३० वयोगटातील तिघा अज्ञात तरुणांनी वाघ यांच्या दुचाकी अडविली. यावेळी वाघ आपल्या गाडीवरून खाली पडले. तिघा तरुणांनी त्यत्नी पाठीवर लावलेली काळ्या रंगाची बॅग बळजबरीने हिसकावून घेत पळ काढला. बॅगेत २२ हजार ७८० रुपये होते. वाघ यांच्या फिर्यादीवरून तिघा चोरट्यांविरोधात येवला तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलजागरता ठरतेय लक्षवेधी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दुष्काळी तालुका असलेल्या नांदगावमध्ये पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला असून 'नार-पार'चे पाणी नांदगावला मिळावे, यासाठी येत्या एक फेब्रुवारी रोजी नांदगावमधून धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

'नार-पार'विषयी तालुक्यातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांनी या लढ्यात सामील व्हावे यासाठी गावोगावी गाव सभा होत आहेत. तालुका सर्वपक्षीय नार-पार जलहक्क समितीतर्फे गावोगावी सुरू असलेला हा जलजागर लक्षवेधी ठरत आहे, वर्षानुवर्षे नांदगाव तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट आहे.

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नार-पार जल आराखड्यात नांदगावचा समावेश करावा, ही मागणी दीड ते दोन वर्षांपासून केली जात आहे. यात आश्वासनापलीकडे काही मिळत नसल्याने तालुका नार-पार जलहक्क समितीने एक फेब्रुवारी रोजी नांदगावमध्ये धडक मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. मोर्चात गावोगावचे शेतकरी, ग्रामस्थ सामील व्हावे, लढ्याला व्यापक स्वरूप यावे यासाठी समितीतर्फे नांदगाव तालुक्यात गावोगावी गाव सभा घेतल्या जात आहेत. गावसभांद्वारे होणारा जलजागर, पाण्यासाठी होणारे प्रबोधन ग्रामस्थांना संघटित करण्यात यशस्वी ठरले असून पाण्यासाठी नांदगाव कर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील, असा आशावाद जलहक्क समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदनपुरीमध्ये यात्रोत्सव प्रारंभ

$
0
0

मशाल ज्योतीचे जेजरी येथून आगमन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरानजीकच्या श्री क्षेत्र चंदनपुरी येथे सोमवारपासून (दि. २१) श्री खंडेराय महाराज यात्रोत्सव प्रारंभ होतो आहे. या यात्रोत्सव निमित्ताने जेजुरी येथून मशाल ज्योत प्रज्ज्वलित करून आणण्याची परंपरा आहे. जेजुरी येथून निघालेल्या मशाल ज्योतीचे रविवारी चंदनपुरी येथे आगमन झाले. मोठ्या उत्साहात या मशाल ज्योत व समवेत असलेल्या मल्हार भक्तांचे स्वागत करण्यात आले.

सोमवारी सुरू होणाऱ्या यात्रोत्सवासाठी चंदनपुरी सज्ज झाली आहे. मंदिर परिसरात रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. तसेच विविध धार्मिक विधी करण्यासाठी मंदिर परिसरात वाघ्या मुरळीही दाखल झाले आहे. जेजुरी इतकेच चंदनपुरीचे महत्त्व असल्याने जेजुरी येथून १५ जानेवारी रोजी माजी सरपंच राजेंद्र पाटील, पुजारी तुकाराम सूर्यवंशी, रामभाऊ सूर्यवंशी, साहेबराव सूर्यवंशी हे पायी मशाल ज्योत घेऊन चंदनपुरीच्या दिशेने रवाना झाले होते.

मशाल ज्योतीचे रविवारी आगमन झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील, सरपंच योगिता अहिरे आदींसह जय मल्हार ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आदींसह मल्हार भक्तांनी सवाद्य मिरवणूक काढून ज्योतीचे स्वागत केले. मशाल ज्योतीने मंदिर परिसरातील ज्योत, दीपमाळ, दिवट्या प्रज्ज्वलित करण्यात आल्या. यावेळी मल्हारभक्तांनी 'यळकोट यळकोट जय मल्हार'च्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला. मशाल ज्योत यात्रेस राजेंद्र बेलन, छोटू बच्छाव, मंगलदास वाघ, पप्पू देवरे, साहेबराव बोरसे, शिरीष पाटील, शिवाजी सोनवणे, समाधान बोरसे आदींसह अनेक मल्हारभक्त सहभागी झाले. श्री

मिरवणूक, महाआरती आज

श्री खंडेराय महाराज व बानुबाई यांच्या मुखवट्यांची सोमवारी (दि. २१) सकाळी सवाद्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत मानाच्या काठ्या देखील असतील. मिरवणूक झाल्यावर मंदिरात महापूजा, आरती व तळी भरण्याचे धार्मिक विधी मान्यवरांच्या हस्ते होऊन यात्रोत्सावास प्रारंभ होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसच्या धडकेने महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव खासगी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेली महिला ठार झाल्याची घटना शनिवारी (दि. १९) सायंकाळी मायको सर्कल येथे घडली.

विठाबाई शांताराम ठाकरे (रा. त्रिमूर्ती चौक, नवीन नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. चेतन शांताराम ठाकरे (३१) हे त्यांच्या आई विठाबाई यांच्यासह आपल्या दुचाकीवरून (एमएच १५ जीपी ९१२६) मायको सर्कल परिसरातून जात होते. त्यावेळी (एमएच १५ ईएफ ०३६०) या खासगी बसने चेतन यांच्या दुचाकीस धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने विठाबाई यांचा मृत्यू झाला. तर चेतन ठाकरे जखमी झाले. अपघातानंतर बसचालक फरार झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात तरुण ठार

दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १८) रात्री गंगापूर रोडवरील आनंदवल्ली परिसरात घडली.

तरुणप्रताप रवींद्रसिंग श्रीखचेडूसिंग (३८, रा. उत्तप्रदेश) असे या अपघातत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरूण आपल्या दुचाकीवरून (एमएच १५ सीई ८८५०) शुक्रवारी (दि. १८) रात्री साडेनऊवाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरून जात होते. यावेळी दुचाकीवरून (एमएच १५ इजे ३३९३) कुणाल दिनेश गवारे (रा. आनंदवल्ली) हा संत कबीरनगरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. कुणालचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो तरुणप्रताप यांच्या दुचाकीवर जाऊन आदळला. त्यात तरुणप्रताप आणि कुणाल हे दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र, डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तरुणप्रताप यांचा मृत्यू झाला. तर कुणालवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात कुणालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शाहूनगरमध्ये

भरदिवसा घरफोडी

बंद घराचे कुलूप तोडून भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी ५० हजार रुपयांचे दागिने, मोबाइल लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. १७) अंबड येथील शाहूनगर परिसरात घडली.

या प्रकरणी सपना संतोष शर्मा (रा. शाहूनगर) यांनी तक्रार दिली. शर्मा यांच्या घरात दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान कोणी नसल्याची चोरट्यांनी संधी साधली. दोन तोळे सोन्याचे दागिने आणि मोबाइल असा मुद्देमाल घेऊन चोरटा पसार झाला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

..

शहरात तिघांची आत्महत्या

वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघा तरुणांसह विवाहितेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पंचवटी, अंबड, म्हसरुळ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आहे.

राहत्या घरात विषारी औषध सेवन करून ३२ वर्षांच्या तरुणाने आत्महत्या करण्याची घटना शनिवारी (दि. १९) रात्री पंचवटीतील आडगाव नाका परिसरात घडली. अमनदीप बळवंतसिग संधू (३२) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. अमनदीपने शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास सुमारास घरात विषसेवन केले. हे निदर्शनास येताच त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने त्यास खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सिडकोच्या महाकाली चौक परिसरात राहणाऱ्या गौरव यशवंत बडगुजर (२७) याने राहत्या घरात शनिवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याच्या मित्राने त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट समोर आले नाही. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मखमलाबाद येथील स्वामी विवेकानंदनगर परिसरात राहणाऱ्या निर्मला निलेश शार्दुल (२६) या विवाहितेने शनिवारी (दि. १९) सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून राहत्या घरात विषसेवन केले होते. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणुकीने वेधले लक्ष

$
0
0

फोटो : सतिश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ढोल-ताशांचा गजर, वाऱ्यावर डौलाने फडकणाऱ्या भगव्या पताका, ठिकठिकाणी होणारी गुलाब पाकळ्यांची उधळण, मलखांबासह लक्ष वेधणाऱ्या चित्तथरारक कसरती अन् हर हर महादेवच्या जयघोषाने नाशिकचे वातावरण रविवारी दुमदुमून गेले. निमित्त होते नरवीर तानाजी मालुसरेंचे सुपुत्र रायबा यांच्या गळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी टाकलेल्या कवड्यांच्या माळेच्या मिरवणुकीचे.

संस्कृती नाशिकच्या वतीने आयोजित शंभुपर्वाच्या सांगतेच्या दिवशी शहरातून या कवड्यांच्या माळेची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मालुसरेंच्या बाराव्या वंशातील स्नुषा डॉ. शीतल मालुसरे ही माळ नाशिक येथे घेऊन आल्या होत्या. रविवारी गोदाघाटावरील रोकडोबा हनुमान मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. शिवरायांच्या प्रसिद्ध कवड्यांच्या माळेचे पालखीतून दर्शन या उत्सवाचे खास आकर्षण ठरले. रामशेज किल्ल्यावरून मोटारसायकल रॅलीद्वारे शहरात आलेल्या क्रांतिज्योतीचे स्वागत गोदाघाटावरील ऐतिहासिक रोकडोबा हनुमान मंदिरात करण्यात आले. त्यानंतर रोकडोबा पटांगणातून शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेत विविध खेळ, कसरती, मैदानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे दर्शन घडले. दहीपूल, धुमाळ पॉइंट, जुनी महापालिका, गाडगे महाराज पुतळा, शालिमार चौकमार्गे ही मिरवणूक कालिदास कलामंदिरात पोहोचली. मिरवणूक मार्ग परिसरात दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. उंटवाडी माध्यमिक विद्यालयाचे ढोलपथक, यशवंत महाराज व्यायामशाळेचे पथक, तुतारीचे वादनाने सर्वांचेच लक्ष वेधले. कवड्यांची माळ नेत्रात साठविण्यासाठी धडपड पाहायलास मिळत होती. लेझीम पथके, मल्लखांब, रोप मलखांब यांसारख्या चित्तथरारक अन मर्दानी खेळांनी अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. कालिदास कलामंदिरातही ही ज्योत आणि कवड्यांच्या माळेचे हर हर महादेव, धर्मवीर संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषात स्वागत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उलगडला रणपांडित्याचा प्रवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन आनंदात साजरा होणार, असे वृत्त पूर्वदिनी झळकण्याऐवजी दहशतवादी हल्ल्यांचे देशावर सावट, असे वृत्त वाचावे लागतात हे दुर्दैव आहे. स्वराज्य रक्षणार्थ समर्थ रामदास स्वामींनी 'आधी गाजवावे तडाखे अवघे भूमंडळ झाके' असा सल्ला धर्मवीर संभाजी महाराजांना दिला होता. याच ओळी आज दिल्लीच्या तख्तासमोर ठसठशीत अक्षरांत वठवायला हव्यात, असे प्रतिपादन व्याख्याते क्रांतिवीर प्रा. सचिन कानिटकर यांनी रविवारी नाशिकमध्ये केले. या वेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे पांडित्य ते रणपांडित्याचा प्रवास उलगडला.

गेल्या तीन दिवसांपासून संस्कृती नाशिकतर्फे आयोजित छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा कथन करणाऱ्या 'धगधगते शंभुपर्व' या व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी कानिटकर बोलत होते. छत्रपती संभाजीराजांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास कानांत आणि मनात उतरविण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रोत्यांची संख्या प्रचंड असल्याने कालिदास कलामंदिर तोकडे ठरले. त्यामुळे कालिदास कलामंदिरातच नव्हे, तर आवारातही पाहावे तेथे श्रोत्यांचे दर्शन घडत होते. व्याख्यानमालेचा समारोपाचा दिवस असल्याने प्रा. कानिटकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे पांडित्य ते रणपांडित्याचा प्रवास उलगडला. संभाजी महाराजांच्या शूरतेचे, उदारतेचे अनेक दाखले त्यांनी या वेळी दिले. अल्पायुष्यात संभाजी महाराजांनी तीन संस्कृत ग्रंथ लिहिले, हे अनेकांना माहीतही नाही. महाराजांच्या दरबारातील एकेक शिलेदार गावंढळ वाटत असला तरी तो हुशार, चाणाक्ष आणि पंडित होता. संभाजी महाराजांऐवजी राजाराम महाराजांचे मंचकारोहण करण्याचा घाट काहींनी घातला. मात्र, चतुरस्त्र संभाजी महाराजांनी हा घाट उधळून लावत पन्हाळगडावर सेवेकऱ्यांना रुजू होण्याचे फर्मान सोडले. त्यांच्या विरोधात द्रोह करणाऱ्यांना त्यांनी निखालस माफी दिली. इंग्रजांनीदेखील एका पत्रात त्यांचा उल्लेख दयाळू आणि उदारमतवादी राजा असा केल्याचे प्रा. कानिटकर म्हणाले. घातपाताचा कट रचला जात असल्याचे समजताच संभाजी महाराज संतापले. या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून बाळाजी आवजी चिटणीस यांनाही मृत्युदंड देण्यात आला. महाराजांच्या या कृत्याबद्दल समर्थ रामदास स्वामींनीदेखील नाराजी व्यक्त केली. 'आधी गाजवावे तडाखे अवघे भूमंडळ झाके ऐसे न होता धक्के राज्यासी बसती' अशा परखड शब्दांत महाराजांना कारभार कसा असावा, याबाबतची अपेक्षा व्यक्त केली. हल्ली पाकिस्तान, श्रीलंका यांसारखी काही राष्ट्रे भारतविरोधी कारवाया करीत असल्याने रामदास स्वामींचा हा सल्ला देशाच्या राजधानीत लक्ष वेधेल, अशा ठिकाणी लिहायला हवा, अशी अपेक्षा प्रा. कानिटकर यांनी व्यक्त केली. त्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

डॉ. शीतल मालुसरे गहिवरल्या

आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे असे म्हणत झुंजार लढा देणारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र रायबा यांच्या गळ्यात शिवाजी महाराजांनी कवड्यांची माळ घातली. नरवीरांच्या बाराव्या वंशातील स्नुषा डॉ. शीतल मालुसरे यांनी ही माळ नाशिककरांना दर्शन घेता यावे यासाठी सोबत आणली होती. पालखीतून ही माळ कालिदास कलामंदिराच्या व्यासपीठावर आणण्यात आली. तेथे मंत्रोच्चारात माळेचे पूजन करण्यात आले. डॉ. मालुसरे यांचाही मानपत्र, फेटा व पोशाख देऊन शाहू खैरे परिवार व संस्कृतीतर्फे सन्मान करण्यात आला. या सन्मानाला उत्तर देताना डॉ. मालुसरे भावूक झाल्या. पूर्वपुण्य म्हणून मी मालुसरे घराण्याची सून झाले. नाशिककरांनी केलेले आदरातिथ्य पाहून मी भारावले आहे. मला आईवडील नाहीत. भावंडेही लहान आहेत. त्यामुळे शाहू खैरे यांनी केलेला हा सन्मान मला माहेरचा सन्मान वाटतो, अशी भावना व्यक्त करताना त्यांना गहिवरून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देवगांधार’मध्ये रंगले कोमकलींचे गायन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'निनादिनी' प्रस्तुत, श्रेष्ठ गायक व गुरुवर्य पंडित राजाभाऊ देव यांच्या ११ व्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त आयोजित देवगांधार महोत्सवात दुसऱ्या दिवशी पं. कुमार गंधर्व यांच्या गायकीची 'विरासत' असलेल्या त्यांच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिभावंत युवा कलाकार भुवनेश कोमकली यांचे गायन रंगले.

अत्यंत कठीण समजली जाणारी आणि तेवढीच लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली कुमार गंधर्व यांची गायकी भुवनेश यांच्या गायनातून क्षणोक्षणी रसिकांनी अनुभवली. त्यांनी मैफलीच्या सुरुवातीला राग मुलतानीमध्ये 'गोकुल गाम' या बंदिशीत रागविस्तार आपल्या खास शैलीत सादर केला. अतिशय भारदस्त आवाज, आलापीतील वेगवेगळे लगाव, तालाशी खेळत, संवाद साधत चाललेले लयकारीचे काम, प्रचंड ताकदीच्या ताना या सगळ्या गोष्टींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर त्यांनी गायलेले 'म्हारा रसिया' या बंदिशीला रसिकांनी भरभरून दाद दिली. 'बासुरी बजाऊ' ही अप्रतिम बंदीश अनेक सौंदर्यमूल्यांसह त्यांनी पेश केली. उत्तरोत्तर रंगलेला हा कार्यक्रम मध्यंतरानंतही रसिकांच्या हृदयाला भिडला. दोन्ही दिवस कलाकारांना संजय देशपांडे यांनी तबल्यावर, तर सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीवर साथसंगत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस

$
0
0

माधवराव पाटील, अध्यक्ष, जनलक्ष्मी बँक

सचिन शहा, बांधकाम व्यावसायिक

रतन चावला, अध्यक्ष, सिंधी पंचायत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियम मोडणार, त्याला कॅमेरा टिपणार

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक: आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) या तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात सीसीटीव्ही यंत्रणा इंदिरानगर येथील अंडरपासमध्ये बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेचा वापर २६ जानेवारीपासून करण्यात येणार आहे. शहरात प्रथमच या तंत्रज्ञानाचा उपयोग होत असून, 'वन वे'चा नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना यामुळे घरपोच दंडाची पावती पाठविणे शहर वाहतूक पोलिसांना शक्य होणार आहे.

छोटे आकारमान असलेला इंदिरानगर अंडरपास सुरुवातीपासूनच पोलिसांसह वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी येथे एकेरी वाहतुकीचा पर्याय निवडला. मात्र, पोलिस असेपर्यंतच येथे सर्व सुरळीत असते. पोलिस नसले की पुन्हा दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू होते आणि वाहतूक व्यवस्था कोलमडून पडते. या ठिकाणी २४ तास पोलिसांची नियुक्ती करणे शक्य नसल्याने पोलिसांसाठी ही नवी यंत्रणा मोठी फायद्याची ठरणार आहे. नियम तोडणाऱ्या वाहनचालकांची माहिती या यंत्रणेमार्फत वाहतूक शाखेला मिळणार आहे. तसेच एकाच वाहनाने सलग किती वेळा नियम मोडला तर तेही वाहतूक पोलिसांना समजू शकणार आहे.

अॅम्ब्युलन्स अडकली अन्..

ही यंत्रणा अॅपक्राफ्टझ या सॉफ्टवेअर कंपनीच्या महेंद्र एकबोटे यांनी विकसित केली आहे. याबाबत एकबोटे म्हणाले की, एक दिवस या ठिकाणाहून जाताना एक अॅम्ब्युलन्स येथील वाहतूक कोंडीत सापडल्याचे दिसले. वाहनांच्या रांगा इतक्या विचित्र होत्या की, अॅम्ब्युलन्सची सहजतेने येथून सुटका होणे अवघड होते. या पार्श्वभूमीवर पदरमोड करून आम्ही ही यंत्रणा विकसित करण्याचे ठरविले. यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह सर्वच पोलिस अधिकाऱ्यांनी खूप सहकार्य केले. एआय संशोधन, कलर, ब्युटिफिकेशन असा चार लाख रुपयांपर्यंत खर्च गेला. पैशांचा प्रश्न होता, पण एक सामाजिक जबाबदारी म्हणून ही योजना हाती घेतल्याचे एकबोटे यांनी स्पष्ट केले.

अशी असेल यंत्रणा

एआय तंत्रज्ञानावर अनेक अॅप यापूर्वी विकसित झाले आहेत. मात्र, वाहतूक नियोजन आणि त्यातून कायदेशीर दंड वसूल करण्याचा प्रयत्न झालेला नव्हता. त्यामुळे ही नाशिकच नव्हे तर राज्यात एकमेव अशी यंत्रणा ठरणार आहे. अंडरपासमध्ये तीन कॅमेरे बसविण्यात येणार आहे. गोविंदनगरकडून इंदिरानगरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांवर या कॅमेऱ्यांची नजर राहील. याशिवाय इतर भागांवरही कॅमेरे लक्ष ठेवून असतील. गोविंदनगरकडून एखादे वाहन अंडरपासच्या दिशेने आले तर एक 'वुटर' जोरात आवाज करून वाहनचालकास पुढे न येण्याचा इशारा देईल. यानंतरही वाहन पुढे आले, तर सीसीटीव्ही कॅमेरे नंबर प्लेटसह संपूर्ण वाहनाचा फोटो काढेल.

दंडाची पावती घरपोच

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपलेले फोटो लागलीच वाहतूक शाखेच्या सर्व्हरवर पाठविण्यात येतील. यानंतर वाहतूक शाखा वाहन क्रमांकाच्या आधारे वाहनचालकाच्या पत्त्यावर दंडाची नोटीस पाठवून देईल. दंडाची रक्कम भरली नाही तर अशा वाहनचालकांना थेट कोर्टात पाठवण्यात येते. एखाद्या वाहनाने किती वेळा नियम मोडला, याचीही नोंद होणार असून, अशा वाहनचालकांचा परवाना निलंबित करणे किंवा यापेक्षा कडक कारवाई करणे यामुळे सोपे होणार आहे.

--

२६ जानेवारीपासून कार्यान्वित

ही यंत्रणा २६ जानेवारीपासून कार्यन्वित होणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सर्व लोकप्रतिनिधी, प्रादेशिक परिवहन विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

शहर सुव्यवस्थित असणे हे त्या शहरातील प्रत्येक नागरिकांची गरज बनली आहे. वाहतूक बेशिस्त असेल तर त्याचे परिणाम सर्वच क्षेत्रात जाणवतात. या पार्श्वभूमीवर ही योजना हाती घेतली होती. आता ती पूर्णत्वास चालली आहे, याचे समाधान मोठे आहे. एआय तंत्रज्ञानावर आधारित अशा प्रकारे प्रथमच काम होत आहे.

- महेंद्र एकबोटे, संचालक, अॅपक्राफ्टझ कंपनी

--

एआय तंत्रज्ञानामुळे मोठा डेटाबेस तयार होतो. परदेशात याचा वापर व्यापक पद्धतीने होतो. वाहतूकच नव्हे तर गुन्हेगारी नियंत्रण, प्रतिबंधात्मक कारवाई यासाठी याचा वापर होणार आहे. उद्याचे भविष्य हे तंत्रज्ञान असून, त्यामुळेच त्याचा स्वीकार आपण केला. शहरातील इतर भागातसुद्धा याच पद्धतीने काम हाती घेण्यात येईल.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी सधन झाला तर तो देश महान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशातला प्रत्येक शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे. मूठभर लोकांची संपत्ती वाढली तर तो देश सधन होत नाही. शेतकरी समृद्ध झाला तर देश महासत्ता होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंके यांनी केले. नाशिककरांच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त रविवारी बळीराजा सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. गंगापूर रोडवरील होरायझन अॅकॅडमी येथे हा कार्यक्रम झाला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना साळुंके बोलत होते. या वेळी साळुंके यांना स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमा पवार अध्यक्षस्थानी होत्या. साळुंके म्हणाले, की मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहे. शेती करणारा समाज एक कुटुंब आहे. २००० मध्ये शंभर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. आज तो आकडा देशात लाखाच्या वर गेला आहे. हे काळजी करण्याचे कारण आहे.

सिंधू संस्कृतीपासून शेतीत प्रयोग केले जात होते. वैदिक वाङ्मयात बळीराजाचे वर्णन आहे. यात अत्यंत समृद्ध शेतीचे वर्णन केले आहे. त्या बळीराजाची परंपरा आज आपण जपत आहोत. आज त्या बळीराजाच्या वारसदारांचे हाल होत आहेत. त्याच्या कष्टाची फळे त्याला मिळत नाहीत. आत्मपरीक्षण करण्याची आज गरज आहे. वस्तू वापरावी आणि फेकून द्यावी, तशी शेतकऱ्याची अवस्था झाली आहे.

नीलिमा पवार म्हणाल्या, की एकीकडे शेतकरी विकसित होतो आहे आणि एकीकडे आत्महत्या होत आहेत. आत्महत्येचे प्रमाण कमी करायचे असेल तर चळवळ उभारण्याची गरज आहे. गोपाळ पाटील यांनी प्रास्ताविक केले. का. का. वाघ शिक्षण संस्थेचे बाळासाहेब वाघ, नगरसेविका स्वाती भामरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांजा तस्करांना कोठडी

$
0
0

गांजा तस्करांना

पोलिस कोठडी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गांजा तस्करी करताना देवळाली कँम्प परिसरात अटक करण्यात आलेल्या मंगेश भगत आणि राहुल भुजबळ या दोघा संशयित आरोपींना कोर्टाने आज, रविवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. रेस्ट कॅम्प रोडवर शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने संशयितांना ६४ किलो गांजासह अटक केली होती.

दरम्यान, आज, रविवारी दोघा संशयित आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. संशयित आरोपींनी गांजा कोठून आणला, याची तस्करी कोठे होणार होती तसेच या गुन्ह्यात आणखी किती साथीदार सहभागी आहेत, याचा तपास करणे बाकी असल्याने संशयित आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने दोघा संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कासार समाजासाठी प्रयत्नशील

$
0
0

राष्ट्रीय अधिवेशन समारोपप्रसंगी भुसे यांचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

कासार समाजाने संघटित होऊन राबविलेला राष्ट्रीय अधिवेशनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या अधिवेशनात झालेल्या तसेच राज्य सरकारशी संबंधित ठरावांबाबत शासन दरबारी निश्चित प्रयत्न करीन, अशी ग्वाही ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

नांदगाव येथे जागतिक कासार फाउंडेशनच्या वतीने आयोजित कासार समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप रविवारी झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर फाउंडेशनचे पदाधिकारी अशोक दगडे, अॅड संतोष भुजबळ, संजीव रासने, अॅड. सुधीर अक्कर, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुहास कांदे आदी उपस्थित होते. यावेळी दादा भुसे यांनी कासार समाजाच्या एकत्रित येऊन काम करण्याच्या भूमिकेबाबत गौरवोद्गार काढले. समाजाचे संघटन आवश्यक असून त्या दृष्टीने अधिवेशनाच्या माध्यमातून पावले उचलले जात आहेत. समाजातील शैक्षणिक व वैवाहिक समस्यांबाबत चर्चा होऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न होतो आहे. राज्य सरकारमधील मंत्री म्हणून कासार समाजाच्या सरकारकडून असलेल्या मागण्या मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करीन, अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली. कासार समाजाबाबत माहिती सांगून अधिवेशनमागचा उद्देश व समाजाच्या राज्य सरकारकडून असलेल्या अपेक्षा याबाबत पदाधिकारी अॅड. संतोष भुजबळ यांनी प्रास्ताविकात विचार मांडले. अध्यक्ष अशोक दगडे यांनी स्वागत केले.

विविध ठरावांना मंजुरी

कासार समाज राष्ट्रीय अधिवेशनाला राज्यभरातून मोठ्या संख्येने समाज बांधवानी हजेरी लावली. चर्चा, परिसंवाद, मेळावे आदी उपक्रम झाले. कासार समाजाचा एन. टी. बी. मध्ये समावेश करावा यासह कासार समाजात या पुढील काळात सामूहिक विवाहावर भर द्यावा, शिक्षणाच्या प्रवाहात यावे, समाज संघटित करण्याचे प्रयत्न व्हावेत, आदी ठराव मंजूर करण्यात आले.

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात रंगला ‘हास्यदरबार’

$
0
0

फोटो - पंकज चांडोले

लोगो - सोशल कनेक्ट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'बाल हास्य, ओपन हार्ट लाफ्टर, टेन्शन भगाव' हास्ययोगाचे विविध प्रकार अन् कलाविष्कारांचे बहारदार सादरीकरण. हास्ययोगाची मिळणारी माहिती अन् हिंदी, मराठी गाणी ऐकण्यास जमलेले ज्येष्ठ नागरिक, अशा उत्साहाच्या वातावरणात 'हास्यदरबार' रंगला. हास्ययोग समन्वय समितीतर्फे 'हास्यदरबार'चे आयोजन करण्यात आले होते. मुंबई नाका येथील तुपसाखरे लॉन्समध्ये रविवारी दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम झाला.

हास्ययोगाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचावे, तसेच विविध कलांच्या सादरीकरणाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा कार्यक्रम झाला. माधुरी शिधये यांनी एकपात्री अभिनय सादर केला. राजेंद्र भंडारी यांनी हास्ययोगाची प्रात्यक्षिके सादर केली. गायिका गीता माळी यांनी हिंदी, मराठी गीतांचे बहारदार सादरीकरण केले. या वेळी शहरातील बारापेक्षा अधिक हास्य क्लबचे सदस्य उपस्थित होते. समितीचे सचिव अॅड. वसंत पेखळे यांनी सूत्रसंचालन केले. अदिती आघारकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईचा पहिला बळी; तरुणीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा पावसाने अवकृपा केल्याने पाणीटंचाईची झळ असह्य होऊ लागली आहे. टँकरच्या फेऱ्या दिवसागणिक वाढत असून, अनेक गावे व वाड्यांचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल होऊ लागले आहेत. सारदे (ता. बागलाण) येथे पाणीटंचाईमुळे शनिवारी जिल्ह्यातील पहिला बळी गेला. पाणी भरण्यास गेलेली तरुणी विहिरीत पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला.

बागलाण तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सुमारे २२ गावे व दोन वाड्यांची टँकर तहान भागवत असून, १३ गावांचे टँकर प्रस्ताव तयार आहेत. सारदे गावात पाणीटंचाईमुळे नकुशी विठ्ठल आहिरे (वय २२) या तरुणीचा पाणी काढताना पाय घसरल्याने विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. सारदे गावात एक दिवसाआड, तर अधून-मधून दररोज टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. घरात पाणी नसल्यानेच नकुशीला विहिरीवर जावे लागले. किमान प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन टंचाईग्रस्त गावांची तहान भागवावी, अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, जनावरांच्या चाराप्रश्नही तीव्र होऊ लागला आहे. पाण्याअभावी अनेक शेतकरी उभ्या पिकांत जनावरे सोडत आहेत.

टँकर प्रस्तावात होतेय वाढ

जिल्ह्यात यंदा पावसाने पाणलोट क्षेत्रात हजेरी लावल्याने धरणे भरली, मात्र इतर पाणीस्रोत कोरडेच राहिले. आजमितीस जिल्ह्यात १११ टँकरद्वारे सुमारे अडीच लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील १०९ गावे व ३३० वाड्या तहानलेल्या आहेत. यामध्ये दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. अनेक गावांचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल होऊ लागले आहेत.

जिल्ह्यातील पाणीटंचाई

- टँकर संख्या : १११

- गावे : १०९, वाड्या : ३३० वाड्या

- लाभार्थी : २.३४ लाख लोकसंख्या



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षकारांनी स्वीकारावा मध्यस्थाचा पर्याय

$
0
0

मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आपल्या हक्कांसाठी न्यायालयात जाणे वाईट नाही. मात्र, न्यायालयात जाण्यापूर्वी ‘मध्यस्थ’, लोकअदालत यांसारख्या माध्यमांचा पर्याय पक्षकारांनी स्वीकारावा. त्यातूनही चांगले सकारात्मक परिणाम पुढे येतील, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी येथे केले.

धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचा उदघाटन सोहळ्यात रविवारी (दि. २०) ते बोलत होते. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती पुखराज बोरा हे प्रमुख अतिथी होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप पाटील उपस्थित होते.

मुख्य न्यायमूर्ती पाटील म्हणाले, सरकारने सुद्धा ‘मध्यस्थता’ हा पर्याय स्वीकारला आहे. औरंगाबाद, नागपूर येथे ‘मध्यस्थता’ केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. तेथे चांगले वकील, न्यायाधीश उपलब्ध असल्याने खटले निकाली काढण्यास मदत होत आहे. याबाबत पक्षकारांमध्ये प्रबोधन व जनजागृतीची आवश्यकता असून त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. आता नागरिक भूसंपादन, मोटार वाहन अपघात, नुकसान भरपाई आदी खटल्यांमध्ये मार्ग काढण्यासाठी या पर्यायाचा वापर करीत आहेत. या व्यवस्थेनंतरही नागरिकांचा वकिलांवर विश्वास कायम आहे. हा विश्वास सार्थ ठेवण्याची जबाबदारी आता वकिलांवर आहे, असेही ते म्हणाले. धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाची नूतन इमारत चांगली असून, तेथे विविध कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. या इमारतीच्या बांधकामासाठी सर्वच घटकांनी चांगले परिश्रम घेतल्याचाही त्यांनी उल्लेख केला. या वेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, न्या. बी. डी. कापडणीस, सुरेंद्र तावडे, न्या. आर. एम. जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. जे. ए. शेख, न्या. सय्यद, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, कार्यकारी अभियंता विनोद भदाणे आदींसह बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांच्या गर्दीने गोदाघाट खुलला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

विविध भागातून येणाऱ्या साईबाबांच्या पालख्या रविवारी गोदाघाट परिसरात आल्याने हा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. रामकुंडापासून गौरी पटांगणापर्यंतच्या परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. तपोवनातील कपिला संगमावरही भाविक आणि पर्यटक येत होते. रामकुंडात स्नान करून पंचवटी परिसरातील मंदिरांत दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्याचेही दिसून आले. देशभरातील विविध भागातून येणाऱ्या साईबाबांच्या पालख्या शिर्डीला जात आहेत. या पालख्या रविवारी पंचवटी परिसरात दाखल झाल्या. शिर्डीला पायी जाणाऱ्या भाविकांचा त्यात मोठा सहभाग होता. सकाळपासूनच भाविकांचा रामकुंड परिसरात ओघ सुरू झाला होता. दिवसभर हा ओघ सुरूच होता. भाविक मोठ्या श्रद्धेने रामकुंडात स्नान करीत होते. गोदावरीची पूजा आणि दीपदान करण्यात येते होते.

पार्किंगही झाले हाऊसफुल्ल

रामकुंडात स्नान केल्यानंतर भाविक कपालेश्वर मंदिर, काळाराम मंदिर, सांडव्यावरची देवी, कार्तिक स्वामी मंदिर, सीतागुंफा आदी ठिकाणी दर्शनाला जात असल्याने या मंदिरांचे आवार भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. अनेक मंदिरांबाहेर दर्शनासाठी रांगा लागल्याचे दिसून आले. परगावच्या भाविकांच्या वाहनांमुळे येथील पार्किंगदेखील हाऊसफुल्ल झाले होते. तपोवन परिसरात ‘इन्कॉन’तर्फे भाविकांनी दिंडी काढण्यात आली. रामसृष्टी उद्यानात भाविकांना मार्गदर्शन करण्यात येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदे हत्या प्रकरणात आणखी एकास अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर येथील सुपर मार्केटचे संचालक अविनाश महादेव शिंदे यांच्या हत्या प्रकरणातील चौथ्या संशयित आरोपीस पंचवटी पोलिसांनी शिताफिने अटक केली. एसटी बसमधून देवदर्शनासाठी निघालेल्या या संशयितास पोलिसांनी पाठलाग करून रस्त्यातच अटक केली. या संशयितास इंदिरानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

किरण उर्फ गोट्या रामदास म्हस्के (रा. नवनाथनगर, पंचवटी) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. यापूर्वी त्याच्या तीन साथीदारांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. लूट करण्याकरिता संशयित आरोपींनी ८ जानेवारी रोजी शिंदे यांची हत्या केली होती. अगदी नियोजनबद्ध पद्धतीने हत्या आणि लूट करून संशयित परागंदा झाले होते. मात्र, शहर पोलिसांनी एक एक करीत तिघा संशयितांना जेरबंद केले. त्यांचा चौथा साथिदार म्हस्के मात्र फरारच होता. पोलिस त्याचा शोध घेत असताना पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना मिळालेल्या माहितीवरून म्हस्के पोलिसांच्या हाती लागला. सातारा येथील काळूबाई देवीच्या दर्शनाला तो गेल्याची माहिती मिळल्याने पंचवटी पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथक कामाला लागले. या पथकाने पुणे बस आगार व्यवस्थापनाशी संपर्क साधत या आगारातून बाहेर पडलेल्या बसची माहिती घेतली. तसेच बसचालकांचे मोबाइल क्रमांकही मिळविले. एका बसमध्ये संशयित असल्याची पक्की माहिती समोर येताच पोलिसांनी त्या दिशेने धाव घेतली. चणकापूर टोल नाका भागात धावती बस थांबवून म्हस्केला बेड्या ठोकण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images