Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

समारंभाच्या वाटेवर काळाचा घाला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, संगमनेर

पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरजवळ शुक्रवारी झालेल्या अपघात नाशिक येथील दोन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी आहेत.

नाशिक येथील जयंत सांत्रस यांच्या भाचीचे शनिवारी पुण्यात लग्न होते. त्यासाठी पत्नी, मुलगा, सासू यांच्यासह पिंपळगाव बसवंत येथील विवाहित मुलगी व जावयाच्या कारमधून सांत्रस पुण्याकडे निघाले होते. जावई भूषण वाळेकर कार चालवित होते. संगमनेरजवळ अकोले बाह्यवळण रस्त्याजवळील पुलाच्या उतारावर समोर चाललेल्या मालट्रकच्या चालकाने अचानक यू टर्न घेतला. त्यामुळे पाठीमागून वेगाने येणाऱ्या कारची ट्रकला धडक बसली. अपघातग्रस्त कारचे पत्रे व दरवाजे तोडून आतील व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. या अपघातात भूषण दिलीप वाळेकर (वय ३४) व आर्यन जयंत सांत्रस (वय १४) यांचा मृत्यू झाला. तर जयंत श्यामसुंदर सांत्रस (वय ४८), मोहिनी जयंत सांत्रस (वय ४२), उषा शरद लोहारकर (वय ६०) व देवयानी भूषण वाळेकर (वय २३) हे गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती समजताच मृतांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी संगमनेरला धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकला घेऊन गेले. दरम्यान, दुपारी मृतांच्या नातेवाईकांनी ट्रकच्या काचा फोडल्याने पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात ट्रकचालक महंमद बिलाल मेहबूब मलिक (रा. ढोईसर, गुजरात) याच्या विरोधात अपघाता गुन्हा नोंदवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन अपघातांत पाच ठार

$
0
0

मनमाड रस्त्यावर तीन, तर संगमनेरजवळ दोघांचा मृत्यू

....

टीम मटा

मनमाड रस्त्यावर व अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मनमाड रस्त्यावरील अपघातात शेतकरी पती-पत्नीसह पाच वर्षांचा मुलगा असे तिघे जण ठार झाले, तर संगमनेरजवळील अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.

मनमाड रोडवर कंटेनर व मोपेड मोटारसायकल अपघातात शेतकरी पती-पत्नीसह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर हरिभाऊ सोनवणे (वय ४२, रा. दुगाव, ता. चांदवड) हे पत्नी आशाबाई सोनवणे (वय ३८) व मुलगा गौरव (खंडू) सोनवणे (वय ५) असे तिघे जण मृत्युमुखी पडले.

दुसरा अपघात नाशिक-पुणे रस्त्यावर झाला. संगमनेरजवळ यू टर्न घेणाऱ्या ट्रकला पाठीमागील बाजूने कारची जोरदार धडक बसली. या अपघातात भूषण दिलीप वाळेकर (वय ३४) व आर्यन जयंत सांत्रस (वय १४) यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त कारचे पत्रे व दरवाजे तोडून आतील व्यक्तींना बाहेर काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनीषा गांगुर्डे यांचे नेट परीक्षेत यश

$
0
0

मनीषा गांगुर्डे यांचे

नेट परीक्षेत यश

नाशिक : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय, गंगापूर रोड, नाशिक येथील उपशिक्षिका मनीषा गांगुर्डे-पवार उत्तीर्ण झाल्या. मराठी या विषयात पहिल्याच प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या. या यशाबद्दल संस्थेचे जनरल सेक्रेटरी व माजी मंत्री डॉ. प्रशांत हिरे, समन्वयक आमदार डॉ. अपूर्व हिरे, मुख्याध्यापक डामरे, पर्यवेक्षक बोढारे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मनीषा या केंद्र सरकारच्या शासकीय मुद्रणालयातील संगणक प्रमुख प्रवीण पवार यांच्या पत्नी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निळवंडी पॅटर्न आदर्शवत

$
0
0

जिल्हाधिकाऱ्यांचे सुतोवाच; लोकसहभागातून उभारला रस्ता

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

'गाव करील ते राव काय करील' ही म्हण दिंडोरीजवळील निळवंडीकरांनी खरी करून दाखविली आहे. निळवंडीच्या ग्रामस्थांनी तब्बल १५ किलोमीटर अंतर्गत रस्ते कुठल्याही शासकीय मदतीशिवाय उभारले आहेत. रस्तेबांधणीचा निळवंडी पॅटर्न नाशिक जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरवा, असे सुतोवाच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी केले.

तालुक्यातील निळवंडे येथील ग्रामस्थांनी १५ किलोमीटरचे रस्ते लोकसहभाग आणि सह्याद्री फार्मच्या माध्यमातून उभारले. शुक्रवारी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन विलास शिंदे यांनी पाहणी केली. ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी यांनी रस्तेबांधणीचा निळवंडी पॅटर्न जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरवा असे आवाहन केले.

निळवंडे गावाची लोकसंख्या दोन हजार इतकी आहे. द्राक्ष हे गावातील मुख्य पीक. इथली द्राक्ष प्रामुख्याने निर्यात केली जातात. त्यासाठी गावातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. पीक काढणीसाठी आले की नेहमी खराब रस्त्यामुळे अडचण निर्माण होत असे. ग्रामस्थांनी मोहाडी क्लस्टरच्या माध्यमातून एकत्र येत रस्ते बांधणीचा निर्णय झाला. द्राक्ष उत्पदनातील किलोमागे ५० पैसे असा निधी जमा करण्याचे ठरले. बघता बघता गावातून तब्बल पाच लाख रुपयांची निधी जमा झाला. गावातील पाणी वापर संस्थेने ९८ हजारांचा निधी दिला. इतर शेतकऱ्यांनी ६० हजार आणि फार्मर्स प्रोड्युसर कंपनी कंपनीच्या सी. एस. आर निधीतून चार लाख देण्यात आले. मागील महिनाभर गावकऱ्यांनी जातीने लक्ष घालून कुठलाही वाद निर्माण न करता १५ किलोमीटरपर्यंतचे रस्ते उभारणी केली.

शुक्रवारी या रस्त्यांचे लोकार्पण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. शेती क्षेत्रातील कुठलीही समस्या दूर करायची असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी संघटित होऊन केलेले काम हे नक्कीच कुठल्याही शासकीय कामापेक्षा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असते. निळवंडी ग्रामस्थांनी लोकसभागातून केलेले रस्तेबांधणीचे काम जिल्ह्यातील गावासाठी एक रोल मॉडेल ठरावेत असे आहे, अशा शब्दात जिल्ह्याधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. सह्याद्रीच्या माध्यमातून जास्तीत जास्त गावांमध्ये असे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. विना निविदा आणि विना ठेकेदार रस्ते बांधणीचा हा नवीन उपक्रम खर्च कमी करेल आणि रस्ते दर्जेदार होतील असेही त्यांनी सांगितले.

मोहाडी क्लस्टरची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती विलास शिंदे यांनी दिली. यावेळी प्राचार्य विलास देशमुख, प्रवीण जाधव, विनोद देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. दिंडोरीचे तहसीलदार बाबासाहेब गाढवे, बीडीओ भूपेंद्र बेडसे, प्रांताधिकारी उदय किसबे, तलाठी शीतल अहिरे, सरपंच, मोहाडी क्लस्टर मधील सर्व सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घराचा कोपरा तोडून रस्त्याला जागा

गावातील शेतकरी रमेश पाटील यांनी आपल्या घराचा कोपरा रस्त्याला अडचण ठरत असल्यामुळे तो तोडून जागा मोकळी करून दिली. यासाठी त्यांनी कुठलाही मोबदला घेतला नाही. तसेच रस्ते निर्माण करताना ग्रामीण भागात होणारे वाद इथे झाले नाहीत याचे विशेष कौतुक जिल्हाधिकारी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचा अनुदानासाठी टाहो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुनी पेन्शन योजना लागू करणे, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांची यादी घोषित करुन त्यांना अनुदान देणे, माहिती तंत्रज्ञान विषय अनिवार्य करुन अनुदानित करावा आदी मागण्यांसाठी नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेकडून शुक्रवारी गोल्फ क्लब मैदानाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.

वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या मागण्यांसाठी नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात, ११ जानेवारी रोजी राज्यातील तालुका तहसीलदार, आमदारांना निवेदन देण्यात आले. दुसरा टप्पा १८ जानेवारी रोजी धरणे आंदोलनाच्या निमित्ताने पार पडला. या आंदोलनाची दखल न घेतल्यास तिसऱ्या टप्प्यात ३० जानेवारी रोजी मूकमोर्चे काढण्यात येणार आहेत. तरीदेखील सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास चौथ्या टप्प्यात बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या काळात असहकार आंदोलन करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ नाशिकचे अध्यक्ष प्रा. संजय शिदे, सचिव प्रा. अनिल महाजन यांनी सांगितले.

\Bया आहेत मागण्या...\B

- संचमान्यतेतील त्रुटी दूर करुन व विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी. प्रचलित पद्धतीने संचमान्यता करून त्यातील चुका सुधाराव्यात

- यापूर्वी नियुक्त अर्धवेळ शिक्षक व विनाअनुदानीतमधील शिक्षकांना अभियोग्यता चाचणीतून सूट द्यावी

- कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे

- सेवा नियुक्तीचे वय ६० वर्ष करण्यात यावे

- शिक्षकांच्या पाल्यांना सर्व स्तरांवरील शिक्षण मोफत द्यावे

- स्वयंअर्थसहाय्य तत्वावर कनिष्ठ महाविद्यालयांना बृहद आराखडा तयार करुन आवश्यकता असेल तरच परवानगी द्यावी व त्यासाठी कायद्यात सुधारणा करावी

- नीट, जेईईसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र असावे

- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबतचा २१ डिसेंबर २०१८चा शासन आदेश रद्द करावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरार ‘झगड्या’ थेट जामीन घेऊनच पोलिसांत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

तेरा दिवसांपूर्वी पंचवटीत चौघा युवकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातील फरार असलेला मुख्य संशयित झगड्या याने शुक्रवारी (दि. १८) पोलिस स्टेशनमध्ये हजर होत थेट अंतरिम जामिनाची ऑर्डरच पोलिसांच्या हाती दिली. सिनेस्टाइल जामीन देत गुन्हे शोध पथकाला आव्हान देत तो पोलिस स्टेशनमधून निघून गेल्याची चर्चा चांगलीच रंगली.

नवीन आडगाव नाका परिसरातील एका वाइन शॉपजवळ अजय इंगळे, आकाश चाफेकर, हर्षल गुंजाळ, अजय डोगरा हे उभे असताना सराईत गुन्हेगार झगड्या व त्याचे साथीदार यांच्यात वाद झाला. या वादात इंगळे व त्याच्या मित्रांवर लाकडी दांड्याने व धारदार चॉपरने वार केले होते. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हल्ला करणारे संतोष भाऊसाहेब राठोड व दत्तू काळू घोटे या दोघांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, या हल्ल्यातील मुख्य संशयित विनायक उर्फ झगड्या लाटे हा आणि त्याचे दुसरे साथीदार पंचवटी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला सापडले नाहीत.

शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास झगड्या वकिलाला घेऊन थेट पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये अंतरिम जामिनाची ऑर्डर घेऊन दाखल झाला. त्याने जामिनाची ऑर्डर पोलिस अधिकाऱ्याला दिली. या प्रकारावरून शहरात राहून जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या झगड्याला ताब्यात घेण्यास गुन्हे शोध पथकाला अपयश आले की, पोलिसांनीच त्याला यासाठी वेळ दिला, याची चर्चा होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हाताची चव

$
0
0

कुरडईची भाजी

प्रतीभा दणाणे

आज काय भाजी करू, हा प्रश्न प्रत्येक घरात दिवसातून दोनवेळा विचारला जातो. कधीकधी तर भाजीला काही नसतेच. तेव्हा घरातल्या डाळींचा पर्याय समोर येतो. तोही कधीकधी नकोसा झाल्यावर वाळवणाच्या पदार्थांकडे लक्ष जाते आणि त्यातून एक मस्त भाजी गृहीणींच्या हाती लागते, ती म्हणजे कुरडईची भाजी. आज आपण कुरडईची भाजी कशी करतात ते पाहणार आहोत.

साहित्य : वाळवणाच्या साहित्यातील ४ ते ५ कुरडई, एक कांदा, ४-५ लसणाच्या पाकळ्या, गरजेपुरता मीठ-हळद, चिमूटभर जिरे, मोहरी, कढीपत्त्या आणि लालतिखट.

कृती : आधी ४ ते ५ कुरडया पाण्यात भिजत घाला. भिजतील एवढ्या पाण्यात शिजत घाला १५-२० मिनिटे भिजल्या नंतर त्या बाहेर काढून घ्या. कढईत तेल टाकून फोडणीची तयारी करा. तेल तापल्यावर त्यात जीरे, मोहरी, कढीपत्ता, लसणाच्या पाकळ्या, हळद, मीठ टाकून थोडावेळ हलवा. त्यानंतर कापलेला कांदा टाका टाका. हा कांदा लालसर झाल्यावर भिजलेला कुरडई कढईत टाका. साधारण १ कप पाणी टाकून मंद आचेवर शिजू द्या. रस्सा ठेवण्याची आवश्यकता नाही. ही भाजी कोरडीच चांगली लागते. आवडत असल्यास थोडीफार गरम मसाला पावडर टाकावी. भाजी शिजल्यावर त्यावर थोडी कोथिंबीर टाका. भाकरी, चपाती, रोटी, बाजरी, मका कोणत्याही धान्याच्या भाकरी बरोबर खावू ही कुरडईची भाजी छान लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीईटी’ परीक्षांच्या तारखा जाहीर

$
0
0

नाशिक:

राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ९ व १० मार्च, तर एमसीए प्रवेशासाठी २३ मार्च रोजी परीक्षा होईल. या परीक्षेसाठी अर्ज नोंदणीस सुरुवात झाली असून, एमबीएसाठी १५, तर एमसीएसाठी २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या तारखांनुसार मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) तसेच मास्टर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. एमबीएचे हॉल तिकिट १ मार्च, तर एमसीएचे ८ मार्च रोजी विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. अर्ज नोंदणीसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १ हजार रुपये, तर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ८०० रुपये शुल्क भरावे लागेल. https://cetcell.mahacet.org या वेबसाइटवर विद्यार्थी अर्ज नोंदणी करु शकतात. तसेच परीक्षेच्या अधिक माहितीसाठी ०२२-२२०१६१५७ या हेल्पलाइन क्रमांकावरही संपर्क साधू शकतात. तसेच एमबीए व एमसीए व्यतिरिक्त इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संभाव्य परीक्षांच्या तारखा विद्यार्थ्यांनी पाहाव्यात. त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करावे, असे आवाहन सेलच्यावतीने करण्यात आले आहे.

या आहेत संभाव्य तारखा

एलएलबी - २१ एप्रिल

बीई, बी. टेक्नॉलिजी, बी.फार्मसी, बी.अॅग्रीकल्चर, मत्स्यशास्त्र, डेअरी टेक्नॉलॉजी - २ ते १३ मे

बॅचलर ऑफ फाइन आर्ट - २० मे, १९ मे (प्रात्यक्षिक)

मास्टर ऑफ अॅग्रीकल्चर - १८ मे

मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी - १८ मे

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी - २० मे

बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन - २१ मे, २२ व २३ मे (प्रात्यक्षिक)

मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन - २४ मे, २५ व २६ मे (प्रात्यक्षिक)

बी.ईडी, एम.ईडी - २२ मे

तारखांत होऊ शकतात बदल

सीईटी सेलद्वारे जाहीर करण्यात आलेले परीक्षांचे वेळापत्रक तसेच तारखा प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर झाल्यात आहे. परंतु, या वेळापत्रकात तसेच तारखांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखांनुसार बदल होऊ शकतो. त्या संदर्भातील सूचना www.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर जाहीर होईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक: मालवाहू ट्रक पुलावरून नदीत कोसळला

$
0
0

निफाड (नाशिक)

नाशिककडून निफाडला जाणारा मालवाहू ट्रक काल (शुक्रवारी) रात्री १० वाजण्याच्या सुमारास कादवा नदीच्या पुलावरून जात असतांना पुलाचे लोखंडी कठडे तोडून कादवा नदीपात्रात कोसळला. पुलापासून नदीपात्र ५० फूट खोल आहे. या अपघातात ट्रकचालकाचा ( ट्रक क्र. एमएच १५ बीजे १५३२) मृत्यू झाला.

एमएच १५ बीजे १५३२ असा या अपघातग्रस्त ट्रकचा नंबर आहे. आज सकाळी ट्रकचालकाचा मृतदेह ट्रकच्या केबिनच्या बाहेर काढण्यात आला. या ट्रकमध्ये भंगाराचं सामान भरलेलं होतं. या अपघातामुळे कादवा नदीवरील २० ते २२ लोखंडी सुरक्षा कठडे पूर्णतः तूटले आहे. या अपघातामुळे या पुलावरून वाहतूक करणं धोकादायक असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. या पुलाचं पुलाचं कठडं तुटलेलं असतानाही इथं जीवाची पर्वा न करता बघ्यांनी गर्दी केली आहे. या मुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. निफाड पोलीस स्टेशनने कठड्याजवळ बॅरिकेड्स लावत परिस्थिती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

67599936

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींच्या सभेसाठी धावली ‘एसटी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दादरा आणि नगर हवेली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शनिवारी होणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन, सभेसाठी महाराष्ट्रातून परिवहन महामंडळाने ४५० बसची रसद पुरविली आहे. त्यात नाशिकच्या १५० बसेसचा समावेश आहे. त्यामुळे विभागाला ४५ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. मात्र, या बस दिल्यामुळे ग्रामीण भागातील एसटी वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

पंतप्रधनांच्या उपस्थितीतील कार्यक्रमांसाठी नाशिक विभागातून १५०, धुळे येथून ५० बस, तसेच पालघर, ठाणे व मुंबई येथूनही शेकडो शुक्रवारी रवाना झाल्या. या बस सिल्व्हासा येथे एकत्रित केल्या. त्यानंतर तेथून आजूबाजूच्या पाड्यांवरून आदिवासी बांधवांना या बसेसमधून कार्यक्रमांसाठी आणले जात आहे. या कार्यक्रमांसाठी गर्दी व्हावी यासाठी भाजपने प्रशासनाच्या मदतीने हे नियोजन केले असले, तरी त्यावर विरोधी पक्षांनी टीकाही सुरू केली आहे. मोदींची जादू संपल्यामुळे आता लोकांना गोळा करण्यासाठी एसटी पाठवावी लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नाशिक येथून पाठविण्यात आलेल्या बस जिल्ह्यातील विविध डेपोतून गेल्या आहेत. प्रत्येक डेपोतून दहाच्या आसपास बस यासाठी मागविण्यात आल्या होत्या. त्यामुळे या डेपोतून इतर मार्गांवर जाणाऱ्या बसच्या नियोजनावर परिणाम झाला आहे. यापूर्वी एप्रिल २०१७ मध्ये अशा पद्धतीने पंतप्रधानाच्या सभेसाठी राज्यातून ४५० बस पाठविण्यात आल्या होत्या.

एसटीला ४५ लाखांचे उत्पन्न

बसच्या प्रासंगिक करारानुसार असून, त्यासाठी एसटी ५० रुपये किलोमीटरच्या आसपास भाडे आकारणार आहे. नाशिक ते सिल्व्हासा हे अंतर अंदाजे १५० किलोमीटर आहे. त्यामुळे त्यासाठी एका बसपोटी ३० हजारांच्या आसपास उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे नाशिक विभागाला यातून ४५ लाखांच्या आसपास उत्पन्न अपेक्षित आहे.

अनेक फेऱ्या रद्द

अचानक बस देण्यात आल्याने त्याचा फटका ग्रामीण भागातील सेवेवर झाला. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अनेक फेऱ्या रद्द करण्याची कुठलीही पूर्वसूचना न दिल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, प्रवाशांची गैरसोय झाली नसल्याचा दावा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

सिल्व्हासा येथे नाशिक विभागातून १५० बस पाठविण्यात आल्या आहेत. या सर्व बस तेथून नियोजित स्थळी वाहतूक करणार असून, शनिवारच्या कार्यक्रमानंतर त्या पुन्हा रात्री विभागात परतणार आहेत.

-नितीन मैंद, विभागीय नियंत्रक, एसटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सोवत नींदिया जगाये हो रामा’

$
0
0

नाशिक : 'सोवत निंदिया जगाये हो रामा' या चैती रागातील बंदिशीने नाशिककर श्रोते मंत्रमुग्ध झाले. सुरमणी शिवानी दसककर यांच्या शास्त्रीय गायनाने देवगांधार महोत्सवाचे प्रथम पुष्प गुंफले गेले.

निनादिनी प्रस्तुत, श्रेष्ठ गायक व गुरुवर्य पंडित राजाभाऊ देव यांच्या ११ व्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त दोन दिवसीय 'देवगांधार संगीत महोत्सवा'चे आयोजन रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले असून, 'विरासत' अशी यंदाची थीम आहे.

राग ललिता गौरीमध्ये 'प्रीतम सैय्या' या विलंबित बंदीशीत त्यांनी आलाप, बोल आलाप, लयकारी, ताना, बोल ताना, जोड बंदिश या सर्व रागविस्ताराच्या अंगांनी रंग भरले. त्यामुळे समस्त श्रोतृवर्गाला एका अतिशय परिपक्व अशा गायकीचे दर्शन घडले. त्यानंतर गायलेल्या राग मारुबिहागमधील 'मोहन गिरीधारी' या रूपकमधील बंदीशीचा रागविस्तार करीत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर चैती हा ललित प्रकार मैफिलीत जाणकारांकडून दाद मिळवून गेला. छोट्याशा मध्यंतरानंतर बागेश्री पंचम हा राग अतिशय प्रभावीपणे सादर करीत कार्यक्रमाच्या शेवटी गायलेल्या भैरवीतील ठुमरीने रसिक-श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेतला. त्यांना तबल्यावर संजय देशपांडे यांनी, तर संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी साथसंगत केली.

आज दुसरे पुष्प ५.३० वाजता सुविख्यात गायक भुवनेश कोमकली यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेईई मेन्सचा निकाल जाहीर

$
0
0

नाशिक :\B \Bनॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या वतीने घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल नियोजित वेळेअगोदरच लावून विद्यार्थ्यांना एनटीएने सुखद धक्का दिला आहे. यंदापासून जेईईचा निकाल पर्सेंटाईलमध्ये देण्यात येत असल्याने या परीक्षेतील टॉपर्सची संख्याही वाढणार आहे.

देशभरातील ८ लाख ७४ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील १५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत नेत्रदीपक यश मिळवले. एनटीएच्या nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. जेईई मेन पेपर एकचे निकाल जाहीर झाले असून, यात नाशिकमधील अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांमध्ये श्रवण नावंदर (९९.९४ टक्के), जय सोनवणे (९९.८९ टक्के), इशान गुजराती (९९.७० टक्के), सिद्धी बागूल (९९.६३ टक्के), राज गोरे (९९.५७ टक्के), व्यंकटेश कुलकर्णी (९९.४५ टक्के), राहुल दळकरी (९९.३४ टक्के), यश पाटील (९९.१७ टक्के), श्रृती निसाळ (९९.१० टक्के), धुव्र धिंग्रा (९९.९६ टक्के), ऋषिकेश मेटकर (९९.८९ टक्के), दिव्याश्री तांबडे (९९.८० टक्के), अनमोल रेदासानी (९९.७९ टक्के), उत्कर्ष ठाकरे (९९.६२ टक्के), तेजस पगारे (९९.५१ टक्के), हिमांशू वाकोडे (९९.४० टक्के), सुबोध पाटील (९९.३५ टक्के), तन्मय नंदन (९९.३४ टक्के) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकतेतून मिळेल स्वत:ची ओळख

$
0
0

फोटो - पंकज चांडोले

- -

उद्योजकतेतून मिळेल स्वत:ची ओळख

उद्योजक सोमनाथ राठी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार करिअरची दिशाही बदलणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी नोकरी मिळविण्यात वेळ घालविण्यापेक्षा उद्योजकतेकडे वळायला हवे. उद्योजकतेत नावीन्यपूर्ण कल्पना आणि आविष्कारांच्या बळावर स्वत:ला सिध्द करावे. जेणेकरुन स्वत:ची ओळख प्राप्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन उद्योजक सोमनाथ राठी यांनी केले.

गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित बीवायके कॉलेजमध्ये ६१वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेजच्या प्रांगणात शुक्रवारी हा सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उद्योजक राठी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी होते. देशाच्या विकासासाठी तरुणांनी उद्योजक होणे गरजेचे आहे. बीवायके कॉलेजने अनेक नामवंत उद्योजक राज्यासह देशाला दिले आहेत. हा वारसा असाच चालू ठेवणे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. यावेळी बीवायके कॉलेजचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, डॉ. बी. बी. गाडेकर, डॉ. आर. पी. देशपांडे, विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.

- - -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात

$
0
0

\Bआज मार्गदर्शन\B

नाशिक : मा. रा. सारडा कन्या विद्यालयातर्फे पाचवीतील मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आज, २० जानेवारी रोजी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळा होणार आहे. सारडा विद्यालयात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ही कार्यशाळा होईल. कार्यशाळेनंतर चाचणीही होणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका मृदुला शुक्ल, उपमुख्याध्यापिका मुक्ता सप्रे यांनी दिली.

\Bपुरस्कार वितरण आज\B

नाशिक : देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे आधारस्तंभ मधुकर (दादा) कावळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा आज, २० जानेवारी रोजी होणार आहे. ऋग्वेद सभागृह, बाजीरावनगर, तिडके कॉलनी येथे सायंकाळी ५ वाजता हा सोहळा होईल. समर्थ सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पुरंदरे प्रमुख पाहुणे, शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी अध्यक्षस्थानी असतील. स्नेहसंमेलन, तिळगूळ समारंभ, विद्यार्थी पारितोषिक वितरण, देणगीदारांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी व कार्याध्यक्ष सुहास पाटील यांनी ही माहिती दिली.

\B(फोटो आहे)

'शिशुसंगम' उत्साहात \B

नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुविहार मराठी माध्यमात शिशुविहार मराठी व विद्याभारतीतर्फे 'शिशुसंगम' कार्यक्रम झाला. शिशुवाटिकेत ३ ते ६ वयोगटासाठी कशा प्रकारची शैक्षणिक व्यवस्था असावी, याची मांडणी येथे करण्यात आली होती. या वेळी मधुश्री सावजी यांनी पालकांना मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी संस्थेचे हेमंत देशपांडे, दिलीप बेलगावकर, विद्याभारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष अनिल महाजन, मोहन कुलकर्णी आदी उपस्थित होते. वैशाली भट यांनी सूत्रसंचालन केले. विभागप्रमुख वैशाली कुलकर्णी व विद्याभारती प्रांतप्रमुख सुनीता बल्लाळ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहार

$
0
0

मनोज लोहार, येवलेंना

खंडणीप्रकरणी जन्मठेप

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

चाळीसगाव येथील तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य तसेच संस्थाचालक डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांना खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक तथा मुंबई होमगाडचे पोलिस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार (वय ४५) व त्यांचे सहकारी सहकारी धीरज यशवंत येवले (वय ४७) यांना शनिवारी (दि. १९) जळगाव जिल्हा सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा ठोठावल्यानंतर दोघे आरोपींची जळगावच्या उपकारागृहात रवानगी करण्यात आली.

या प्रकरणात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक विश्वासराव रावसाहेब निंबाळकर (वय ५९) यांना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. चाळीसगाव येथील डॉ. उत्तमराव महाजन (वय ६२) यांच्याकडून २५ लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी त्यांचे अपहरण करून १८ जास डांबून ठेवल्याच्या कलमांखाली तिघांवर चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान, शनिवारी शिक्षेवर युक्तिवाद करण्यात आला.

कमी शिक्षा मिळावी

या वेळी लोहार यांनी कमीत-कमी शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयापुढे विनंती केली. आपणास कॅन्सर सारखा दुर्धर आजार असून, उपचार सुरू आहेत. आपल्याला कार्डियाकचा अटॅक येण्याची शक्यता असून, मुलांचे शिक्षण सुरू आहे. वृद्ध आई-वडील आहेत असा युक्तिवाद त्यांनी केला. येवले यांनी पत्नी आजारी असते, वृद्ध आई-वडील व मुलांच्या संगोपनाची जबाबदारी असल्याचे सांगितले. या प्रकरणात आपला काहीच फायदा होणार नव्हता. त्यामुळे कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती केली. दोघांच्या विनंतीनंतर न्यायालयाने त्यांना कसे दोषी धरले व काय शिक्षा ठोठावली याची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलाकार पोटातून बोलतो...

$
0
0

अभिनेत्री गार्गी फुले यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, येवला

कोणताही अभिनय करताना कलाकार हा त्याच्या भूमिकेशी अगदी एकरूप होतो. आपण करीत असलेले पात्र म्हणजे प्रत्यक्ष जगणे आहे अशी त्यास ठाम भूमिका घ्यावी लागते. कलाकार ओठातून नव्हे तर पोटातून बोलत असतो. त्यास इतरांची नक्कल करून कलाकारास स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येत नाही. एक सिद्धहस्त कलाकार म्हणून आपली ओळख करुन दयायची असेल तर कलाकारास प्रचंड मेहनत घ्यावी लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या कन्या तथा प्रसिद्ध अभिनेत्री गार्गी फुले यांनी येवल्यात केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद येवला शाखा आणि महात्मा फुले अकादमी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी काव्य करंडक, नटश्रेष्ठ निळू फुले अभिनय करंडक, रंगकर्मी सतीश कानडे, डॉ. भरतकुमार सिन्हा अभिनय, कवीवर्य कुसुमाग्रज व कवीवर्य बाबुराव बागुल काव्य वाचन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा येवला शहरातील महात्मा फुले नाट्यगृहात झाला. या शानदार सोहळयात प्रमुख पाहुण्या म्हणून गार्गी फुले बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकादमीचे अध्यक्ष तथा साहित्यिक विक्रम गायकवाड हे होते. येथील फुले नाट्यगृहातील पुरस्कार वितरण सोहळयापूर्वी स्पर्धेची अंतिम फेरी घेण्यात आली. त्यात परिक्षक म्हणून कवी कमलाकर देसले व प्रा. किशोर गोसावी यांनी काम पहिले. पुरस्कार सोहळयाप्रसंगी येवला तालुक्यातील जवळपास तब्बल ९० शाळांमधील एकूण ५०० विदयार्थ्यांनी पहिल्या फेरीतील काव्य काचन व अभिनय स्पर्धेसाठी सहभाग नोंदवत आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडविले.

पुरस्कारार्थींना गार्गी फुले यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेतील विजेते असे...

काव्य वाचन लहान गट : विद्या शेळके (ठाणगाव), गायत्री आव्हाड व तनुजा भालेराव (सायगाव), मोठा गट : ऋतुजा पुंड (अंदरसूल), प्रमोद वारुळे (डि. पॉल येवला), स्वप्नील खालकर (राजापूर), खुला गट : विशाखा बारहाते (येवला).सर्वोत्कृष्ट काव्य करंडक : सोनवणे ज्युनिअर कॉलेज, अंदरसूल.

अभिनय स्पर्धा लहान गट : साक्षी कदम, राकेश घोडेराव, प्रणाली वाघ, मोठा गट : प्रद्युम्न जाधव, रसिका चव्हाण, अनिकेत बाविस्कर, खुला गट : जगदिश पाटील. सर्वोत्कृष्ट अभिनय करंडक : सरस्वती विदयालय, सायगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचाळेत युवकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील पंचाळे येथील संदीप साहेबराव सैंद्रे (वय २०) या युवकाने शुक्रवारी (दि.१८) मध्यरात्री झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मध्यरात्री दोन वाजता त्याने स्वत:च्या व्हाट्सअॅप स्टेटसमध्ये 'अखेर घेतला ना भो निरोप' असा मेसेज सेव्हे केल्याचे आढळून आले.

पंचाळे गावापासून एक किलोमीटर अंतरावर भोकणी रस्त्यालगत सैंद्रे यांचे घर आहे. संदीपने एसवायबीएपर्यंत शिक्षण घेतले आहे. वर्षभरापासून तो मुसळगावच्या कारखान्यात काम करत होता. शुक्रवारी दुपारी चार वाजता ड्युटी संपवून घरी आला. रात्री जेवण करून तो झोपी गेला होता. शनिवारी सकाळी सैंद्रे कुटुंबियांना संदीप घरात दिसला नाही. त्यामुळे शोधाशोध सुरू केली. घरापासून जवळच असलेल्या बाभळीच्या वाळलेल्या झाडाला दोरी बांधून त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत त्याचा भाऊ गणेश याने ताबडतोब कुटुंबीयांना माहिती दिली. रवींद्र जगताप यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची खबर दिली. सिन्नर नगरपालिका दवाखान्यात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या मृतदेह देण्यात आला. संदीपच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येपूर्वी मध्यरात्री दोन वाजता त्याने स्वत:च्या व्हाट्सअॅप स्टेटसमध्ये 'अखेर घेतला ना भो निरोप' असा मेसेज मित्रांना पाठविला असल्याचे आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैलेश ढगे यांचाराष्ट्रवादीत प्रवेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जेलरोड येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि दुर्गा मंदिराचे संस्थापक अध्यक्ष शैलेश ढगे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेतील गटबाजी, तसेच पक्षाकडून होत असलेल्या उपेक्षेमुळे आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सिडकोत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पक्षप्रवेश केला. आपल्यासमवेत पाचशे समर्थकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगून ढगे म्हणाले, की आपल्या पुढाकाराने जेलरोड येथे भव्य क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. मात्र, आपल्याला विचारात न घेताच उद्घाटनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला, तसेच उदघाटन कार्यक्रमपत्रिकेतही नावाचा उल्लेख करण्यात आला नाही. गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत कोंडी करण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून केला जात होता. पक्षाचे काम निष्ठेने करूनही उपेक्षा होत असल्याने गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे ढगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका शाळांचा एक तास कमी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शाळांची वेळ इतर बहुतांश शाळांच्या तुलनेत एक तासाने अधिक असल्याने हा एक तास कमी करावा, अशी मागणी महापालिका शिक्षक संघटनेकडून करण्यात येत आहे. सद्यस्थितीत या शाळांची वेळ सकाळी ८ ते २ आहे. ही वेळ बदलून सकाळी ८ ते १ किंवा ९ ते २ अशी करावी, अशी भूमिका संघटनेकडून घेण्यात आली आहे.

मागील वर्षी तत्कालिन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या शाळांचे एकत्रीकरण करून १२७ शाळांपैकी ३७ शाळांचे विलिनीकरण केले होते. या निर्णयानुसार, महापालिकेच्या ९० शाळा सध्या आहेत. यावेळी महापालिकेच्या शाळांची वेळदेखील सकाळीच करण्यात आली. मात्र, सकाळची वेळ ही सर्वच शाळा आणि पालकांसाठी सोयीची नसल्याचे अनेक मुख्याध्यापकांचे म्हणणे होते. त्यामुळे शिक्षण सभापती प्रा. सरिता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शाळांची वेळ ११ ते ४ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, सकाळच्या वेळेतीलच एक तास कमी व्हावा, ही मागणी शिक्षक संघटनेकडून करण्यात येत आहे.

तुकाराम मुंढे आयुक्तपदी आल्यानंतर त्यांनी शाळांच्या वेळा बदलल्या होत्या. त्यानुसार ८ ते २ ही वेळ शाळांची आहे. परंतु, ही वेळ जास्त असून, त्यातून एक तास कमी व्हावा, अशी आमची मागणी आहे.

\B- चंद्रकांत गायकवाड,

सरचिटणीस महापालिका शिक्षक संघटना समन्वय समिती\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणात्मक वृद्धीसाठी मूल्यमापन गरजेचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'नर्सिंगचे शिक्षण देणाऱ्या कॉलेजांची गुणात्मक वृद्धी होण्यासाठी मूल्यमापन होणे गरजेचे आहे,' असे प्रतिपादन वैद्य श्रीराम सावरीकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात परिचर्या महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व महाविद्यालय प्रमुखांकरीता आयोजित इम्पॅक्ट असेसमेंट कार्यशाळेत ते बोलत होते.

व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर, प्रमुख अतिथी व गुजरात आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी कुलगुरु वैद्य श्रीराम सावरीकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, डॉ. राजेंद्र बंगाळ, डॉ. सुधा रेड्डी, डॉ. सिध्दार्थ दुभाषी आदी उपस्थित होते.

वैद्य सावरीकर म्हणाले, 'आरोग्य क्षेत्रात सातत्याने बदल घडत आहेत. नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे महाविद्यालयांच्या गुणात्मक वृद्धीसाठी मूल्यमापनाची प्रक्रिया राबविली जात आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन परिचर्या महाविद्यालयांनी गुणात्मक वृद्धीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे मूल्यमापनाद्वारे शिक्षकांना, महाविद्यालयांना, संस्थांना आणि विद्यार्थ्यांनाही याचा लाभ होऊ शकतो.'

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर म्हणाले, 'परिचर्या महाविद्यालयांच्या संलग्निकरणाचे नुतनीकरण करताना येणाऱ्या समस्यांचे निवारण करणेसाठी पायाभूत सुविधा असणे गरजचे आहे. यासाठी विद्यापीठातर्फे महाविद्यालयांच्या गुणवत्ता वृद्धीसाठीचे उपक्रम राबविले जात आहेत.'

कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले,'विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयातील परिचर्या अभ्यासक्रमात सुसूत्रता असावी यासाठी संलग्निकरणाचे नुतणीकरण हे इम्पॅक्ट असेसमेटवर अवलंबून असल्याने कार्यशाळा महत्त्वपूर्ण आहे.' महाविद्यालयाचे मूल्यमापन करताना पायाभूत सुविधा, विद्यापीठाचे मान्यताप्राप्त शिक्षक आदी बाबी गरजेच्या आहेत. महाविद्यालयातील समस्या दूर होण्यासाठी नियोजनबद्धरित्या या प्रक्रियेत कशा प्रकारे सहभागी व्हावे, याचे मार्गदर्शन होणार असल्याचे सांगितले.

या कार्यशाळेत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी ऑब्जेक्टीव्ह ऑफ इम्पॅक्ट असेसमेंट, पुण्याचे काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाचे एफएमटी विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी टिचींग लर्निंग ॲण्ड इव्हॅल्युएशन, स्टुडन्ट सपोर्ट ॲण्ड प्रोग्रेशन या विषयावर, बेळगांवचे केएलई अॅकॅडमी

ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायंसेसच्या प्रा. सुधा रेड्डी यांनी इन्स्टिट्यूट्युशन

ॲण्ड बेस्ट प्रॅक्टीस, रिसर्च, इनोव्हेशन ॲण्ड एक्स्टेन्शन या विषयावर, मुंबईचे एम. जी. एम. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सिध्दार्थ दुभाषी यांनी इंफ्रास्ट्रक्चर ॲण्ड लर्निंग रिसोर्स आणि गव्हर्नन्स, लिडरशिप ॲण्ड मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, उपकुलसचिव नितीन कावेडे, डॉ. सुचिता सावंत, डॉ. अनुपमा ओक, डॉ. मिनल राणे, डॉ. हुसैन, बाळासाहेब घुले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी अशोक जाधव, हेमंत कर्डक, शिल्पा पवार, बाळासाहेब पेंढारकर यांचा विशेष सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images