Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘मानव हा सर्वात संहारक प्राणी’

0
0

जेलरोड :

बोधनात्मक क्रांतीमध्ये महावानरापासून निर्माण झालेल्या ऑस्ट्रेलोपेथिस, निएंडरथल, इरेक्टस आणि सेपिअन्स (आजचा मानव) या भावंडांमध्ये तीव्र संघर्ष होऊन सेपिअन्स विजयी होऊन शिल्लक राहिले. मात्र, त्याने पृथ्वीवरील ६० ते ७० टक्के जीवसृष्टी नष्ट केली. तो आता स्वतःला नष्ट करण्याचा मार्गावर आहे. जीव विज्ञानाच्या इतिवृत्तानुसार मानव हा सर्वात संहारक प्राणी आहे, असे प्रतिपादन राहुल बनसोडे यांनी केले.

नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात युवा सप्ताह व्याख्यानमालेत बनसोडे बोलत होते. त्यांनी 'सेपिअन्स - मानवी उत्क्रांतीच्या पाऊल खुणा' या विषयावर मार्गदर्शन केले. जगात सध्या गाजत असलेल्या 'सेपिअन्स' या युवा नोह हरारी यांच्या पुस्तकातील दाखले देऊन मानवाची उत्क्रांतीचा इतिहास उलगडला. सेपिअन्स यांनी धर्म, राष्ट्र, भांडवलवाद, समाजवाद,मानवाधिकार निर्माण केले. तो सेपिअन्स आफ्रिकेतून निघून जगात सर्वत्र पोहचला. तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे मानव जातीच्या अस्तित्वाला कशाप्रकारे धोका निर्माण करत आहे यावर बनसोडे यांनी प्रकाश टाकला.

डॉ संजय तुपे यांनी प्रास्तविक केले. प्रा. विजय सुकटे, डॉ. विजया धनेश्वर, डॉ. संतोष बोडके, प्रा. शशिकांत खेमनर, डॉ. कृष्णा शहाणे उपस्थित होते. साक्षी गोरवाडकर हिने सूत्रसंचालन केले. राहुल गायकवाड याने आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नौदलाच्या पंखांना एचएएलचे बळ

0
0

नाशिक :

नौदलाच्या हवाई विभागाला हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) बळ लाभणार आहे. नौदलाकडील मिग २९ या लढाऊ विमानांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी नौदल आणि एचएएल यांच्यात शुक्रवारी (१८ जानेवारी) सामंजस्य करार होणार आहे. तशी अधिकृत माहिती नौदलाचे रिअर अॅडमिरल व्ही. मोहनदास यांनी 'मटा'ला दिली. यामुळे मिग २९ विमानांचे आयुष्य वाढण्यास मदत होणार आहे.

नौदलाच्या हवाई विभागाकडे सध्या मिग २९ श्रेणीची लढाऊ विमाने आहेत. या विमानांची देखभाल आणि दुरुस्ती सध्या गोवा येथील कमांडमध्ये केली जाते. मात्र, नौदलाकडे अनुभवी आणि तंत्रज्ञ यांची कमतरता आहे. त्यामुळेच मिग २९ विमानांची देखभाल, दुरुस्ती करताना अनेक अडचणींना सध्या नौदलाला तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात काही प्रमाणात नाशिक एचएएलची मदत नौदलाकडून घेतली जाते. पण, तो पर्यायही अधिक सक्षम नाही. गेल्या तीन वर्षांपासून एचएएल आणि नौदल यांच्यात बोलणी सुरू होती. आता नौदल आणि एचएएल यांच्यात विशेष सामंजस्य करार करण्याचे निश्चित झाले आहे. डिफेन्स सेमिनारसाठी नाशकात आलेले नौदलाचे रिअर अॅडमिरल व्ही मोहन दास हे गुरुवारी नाशिक मुक्कामी आहेत. शुक्रवारी (१८ जानेवारी)सकाळी ओझर एचएएलच्या मुख्यालयात या करारावर स्वाक्षरी केली जाणार आहे.

असा होणार फायदा

रशियन बनावटीच्या मिग २९ विमानांचे उत्पादन ओझर एचएएलमध्येच करण्यात आले आहे. तसेच, त्याच्या देखभाल, दुरुस्तीमध्ये एचएएलचा हातखंडा आहे. नौदलाकडे ही विमाने आल्यापासून काही दशके लोटली आहे. त्यामुळे या विमानांची देखभाल, दुरुस्ती करण्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणूनच हा करार करण्यात येणार आहे. या करारामुळे एचएएलचे कुशल मनुष्यबळ नौदलाच्या गोवा येथील कमांडमध्ये थेट उपलब्ध असेल. सद्य:स्थितीत एचएएलची २५ जणांची टीम तेथे जाईल. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाला वेग दिला जाईल. एचएएलच्या कर्मचाऱ्यांची संख्या नजिकच्या काळात शंभरापर्यंत जाणार आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेत मिग २९ विमानांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाणार आहे. या करारानुसार नौदलाकडून थेट एचएएलला आर्थिक रक्कमही दिली जाणार आहे. त्यामुळे एचएएल आणि नौदल दोघांनाही फायदा होणार आहे.

एचएएलकडे अत्याधुनिक आणि कुशल मनुष्यबळ आहे. त्यांच्यासोबत करार करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या करारामुळे मिग २९ विमानांची कार्यक्षमता वाढविता येईल. परिणामी देशाच्या सागरी सुरक्षेला अधिक फायदा होणार आहे.
-व्ही मोहन दास, रिअर अॅडमिरल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरला आजपासून गुरपूरब महोत्सव

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

गुरू गोविंद सिंग यांच्या ३५२ व्या जयंतीनिमित्त गुरू गोविंद सिंग फाउंडेशनतर्फे खालसा एज्युकेशनल कॉम्प्लेक्समध्ये गुरपूरब या तीनदिवसीय सोहळ्याचे आज, शुक्रवार (दि. १८)पासून आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष गुरदेवसिंह बिर्दी यांनी दिली.

गुरपूरब हा सोहळा शुक्रवार ते रविवार (दि. २०)दरम्यान सुरू राहणार आहे. या तीन दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच लंगरचेही आयोजन करण्यात आले आहे. या फाउंडेशनद्वारे शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालय आदी शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. गुरपूरब सोहळ्याला ग्यानी गुरदीप सिंग आणि भाई मुख्तार सिंग यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये श्री अखंड पाठ साहिब यांच्या हस्ते सुरू होणार आहे. शनिवारी अखंड नामस्मरण, गुरू गोविंद सिंग यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान, करिअरविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. रविवारी समारोपाच्या दिवशी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरपूरब पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुरू गोविंद सिंह फाउंडेशनच्या अध्यक्षांसह उपाध्यक्ष हरजित सिंह आनंद, सचिव बलबीर सिंह छाब्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी परमिंदर सिंह, तसेच सर्व व्यवस्थापकीय सदस्यांद्वारे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. लहवितकर महाराजांचे कुंभमेळ्यात शाही स्नान

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर आयोजित कुंभमेळ्यात साधू-संतांच्या शाही मिरवणुकीत सहभागी होत जगद्गुरू द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदासजी देवाचार्य महाराज लहवितकर यांनी शाही स्नान केले. यावेळी त्यांच्यासमेवत वारकरी संप्रदायाचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

आखाडा-साधू परंपरेमध्ये ५२ द्वारा असून, त्यातील जगद्गुरू विठ्ठलनाथजी, जगद्गुरू नामदेवजी, जगद्गुरू तुकारामजी आदी द्वारा वारकरी संप्रदायाच्या आहेत. या द्वारांच्या माध्यमातून आचार्य धर्मप्रसार व भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार करीत असतात. श्री पंच निर्मोही अनी आखाड्यांतर्गत हे शाही स्नान झाले. अखिल भारतीय वारकरी संप्रदायाच्या खालसाच्या विठ्ठलनाथ द्वाराचे जगद्गुरू असलेले विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदासजी देवाचार्य महाराज लहवितकर यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवरांसह वारकरी संप्रदाय महाराष्ट्र खालसा यांचे प्रथम शाही स्नान विविध साधू-महंत, कीर्तनकार यांच्यासह भाविकांच्या उपस्थितीत पार पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोराच्या पिलांची कोंबडी झाली माय!

0
0

नांदगाव:

आज माणुसकी हरवल्याचे चित्र असताना सर्व घटकांना प्रेरणा देणारी घटना नांदगावमधील साकोरे येथे घडली आहे. येथील एक कोंबडी मोरांच्या दोन पिलांची माय झाली आणि या मोरांचा तब्बल तीन महिने जिवापाड सांभाळ करून रवींद्र पगार या पक्षीमित्राने माणुसकीचे आगळे दर्शन घडविले आहे. बुधवारी या दोन मोरांना वन खात्याच्या ताब्यात देताना पगार यांचे कुटुंब गहिवरले होते.

वाचलेली, पाहिलेली, पुस्तकातील ती माणसे गेली कुठे, असा प्रश्न आज विचारला जातो. मात्र रवींद्र पगार यांच्यासारख्या माणुसकीच्या देवदूताच्या रुपात ती अजूनही भेटू शकतात, याची साक्षच या अनोख्या घटनेने पटवून दिली. नांदगाव तालुक्यातील साकोरे येथील वेहेळगाव रस्त्यावर सरताळे वस्तीवर राहणारे पक्षीमित्र रवींद्र पगार याना बांधावर फिरताना दोन अंडी सापडली, ही अंडी तशीच वाऱ्यावर न सोडता माणुसकीच्या भावनेने त्यांनी ती घरी आणली आणि आपल्या घरच्या कोंबडीखाली ती उबवली. या अंड्यांतून दोन पिलांचा जन्मही झाला. सुरुवातीला ही पिले कोंबडीच्या पिलांपेक्षा काहीशी वेगळी भासली, ती कोंबडीची पिल्ले नसतानादेखील कोंबडीला त्या पिलांचा लळा लागला. कोंबडीची पिलेदेखील या नव्या पिलांसोबत आनंदाने बागडू लागली. काही महिन्यांनी या नव्या पिलांना पिसे येऊ लागली, तुरेदेखील आले आणि मग ही मोराची पिले असल्यावर शिक्कामोर्तब झाले.

जडले अनोखे नाते

कोंबडीदेखील आपल्या पिलांसह या मोरांच्या पिलांना जीव लावत असल्याने त्यांच्यात ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे अनोखे नाते जडले. कोंबडीची ऊब, माया मोराच्या पिलांना हवीहवीशी वाटू लागली. तब्बल तीन महिने पगार कुटुंबीयांनी मोराच्या या पिलांना जिवापाड जपले. मोराची पिलेदेखील या मायेच्या छायेत छान वाढली. पक्षीमित्र रवींद्र पगार यांना राष्ट्रीय पक्षी मोर ही राष्ट्राची संपत्ती आहे, हे माहिती असल्याने सामाजिक भावनेतून त्यांनी या मोरांच्या पिलांबद्दल वन खात्याला माहिती दिली. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सरताळे वस्ती येथे येऊन पाहणी केली. पगार यांनी मोरांची पिले त्यांच्या हवाली केली. त्यावेळी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना गहिवरून आले होते.

सारेच झाले सैरभैर

तीन महिने जिवापाड सांभाळलेली आणि सर्वांनाच लळा लागलेली मोरांची पिले अंगणातून बाहेर पडली आणि पगार कुटुंबीयांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या. दुसरीकडे काही काळ या पिलांची माय झालेली, त्यांना मायेची ऊब देणारी कोंबडी आणि तिची पिलेदेखील ही ताटातूट मूक मनाने पाहताना सैरभैर झाल्याचे दिसून आले. माणुसकी हरवलेल्या जगात ही मोरांच्या पिलांची कहाणी माणूसपणाचा जयघोष आणि पुरस्कार करणारी ठरली

मोराची पिले कोंबडीलाच आई समजत होती आणि कोंबडीनेही त्यांना आपल्या पंखाखाली घेतले, मायेची ऊब दिली. मोराची पिले वन खात्याकडे सोपविल्यावर आमच्या कुटुंबातील दोन सदस्यच जणू घरापासून दूर गेल्याचे दुःख झाले. - रवींद्र पगार, पक्षीमित्र

कोंबडीने मोराची अंडी उबविणे, पिलांचे जतन करणे अनेकदा घडते. मुळात कोंबडी हा पक्षी आपल्या पंखाखालील अंड्यांबाबत दक्ष असतो. मात्र, मोराची अंडी आणि कोंबडीची अंडी यात काहीसे साम्य असल्यामुळे असे होणे नैसर्गिक आहे. - दिगंबर गाडगीड, पक्षीमित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जबाजारीपणाला कंटाळून कांदा राशीवरच शेतकरी आत्महत्या

0
0

मालेगाव:

नापिकी, शेतमालाला भाव नसणे, कर्जबाजारीपणा या कारणांनी शुक्रवारी मालेगाव तालुक्यात एकाच दिवशी घडलेल्या तीन तरुण शेतकरी आत्महत्येच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. कंधाणे, सायने खु. व नांदगाव बु. येथे या घटना घडल्या. दर नसल्याने कंधाणेच्या शेतकऱ्याने तर कांद्याच्या राशीवरच विष प्राशन करून आत्महत्या केली. नववर्षाच्या सुरुवातीलाच या तीन दुर्दैवी घटना घडल्या असून, एकूणच शेती आणि शेतकरी प्रश्न जटील बनत चालला आहे.

मालेगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. कंधाणे येथील शेतकरी ज्ञानेश्वर शेवणकर (वय ३५) यांनी शुक्रवारी याच कारणामुळे आपली जीवनयात्रा संपवली. शेवणकर हे एकत्र कुटुंबात राहत होते. सहा एकर कोरडवाहू शेतीक्षेत्र असलेल्या शेवणकर यांच्यावर सोसायटीचे दीड लाख, तर हातउसनवारीचे दीड लाख असे तीन लाख कर्ज होते. दर वाढल्यावर कांदा विक्री करू या आशेने शेवणकर यांनी शेतात कांद्याची ढिग केला होता. शुक्रवारी सकाळी याच कांद्याजवळ त्यांनी विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार ज्योती देवरे, बाजार समिती उपसभापती सुनील देवरे, तालुका पोलिस निरीक्षक कांतिलाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. शेवणकर यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, आईवडील असा परिवार आहे.

सायने येथील शेतकरी वसंत बंकट पाटील (वय ४५) यांनीदेखील गुरुवारी आपल्या शेतातील घरात सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. पाटील यांच्या नावे ०.८५ आर शेती असून, सोसायटीचे दीड लाखाचे कर्ज होते. शेतीमालास भाव नसल्याने व कर्जबाजारीपणामुळे नैराश्येतून त्यांनी विष प्राशन केल्याचे बोलले जाते आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

नांदगाव बु. येथील चेतन केदा बच्छाव (वय २३) या तरुण शेतकऱ्याने देखील कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावे ०.०४ आर शेती असून, त्यांच्यावर सोसायटीचे ६५ हजार, तर एका खासगी कंपनीचे पाच लाख कर्ज होते. चेतन हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई वडील व दोन अविवाहित बहिणी असा परिवार आहे.

वर्ष शेतकरी आत्महत्या

२०१४ ४६

२०१५ ८५

२०१६ ८७

२०१७ १०४

२०१८ १०८

२०१९ ०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृत अन् हिंदीच्या कृतिपत्रिकेवर मार्गदर्शन

0
0

रेषा एज्युकेशन सेंटरसोबत 'मटा'चा रविवारी उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बदललेली पाठ्यपुस्तके आणि मूल्यमापन पद्धतींचा सोबत घेऊन दहावीचे विद्यार्थी यंदा कृतिपत्रिकेवर आधारित परीक्षेस सामोरे जाणार आहेत. दहावीची पारंपरिक परीक्षा पद्धती आणि कृतिपत्रिका यामध्ये नेमका फरक काय हे इतर विषयांच्या बाबतीत समजावून घेतल्यानंतर आता अंतिम टप्प्यात हिंदी आणि संस्कृत या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. येत्या रविवारी (दि. २०) या दोन्ही विषयांच्या कृतिपत्रिकेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

पारंपरिक परीक्षा पद्धती आणि कृतिपत्रिका यातील फरक, कृतिपत्रिका सोडविताना घ्यायची काळजी आदी मुद्द्यांवर यावेळी संस्कृत विषयासाठी मार्गदर्शक कुमुदीनी फेगडे आणि हिंदी विषयासाठी मार्गदर्शक सुरेखा बोंडे या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववी आणि दहावीचे विद्यार्थी व पालक सहभागी होऊ शकतात. विद्यार्थ्यांना रविवारी सकाळी १० ते ११.३० या वेळेत संस्कृत या विषयाचे तर दुपारी १२ ते १.३० या वेळेत हिंदी या विषयाचे मार्गदर्शन मिळेल.

येथे साधा संपर्क

कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असला तरीही यासाठी नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी रेषा एज्युकेशन सेंटर, ३ ब, कौस्तुभ, एसटी कॉलनी, गंगापूर रोड या पत्त्यावर किंवा ९८५००१९६०६ किंवा ९८२२०११९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नौदल-एचएएलमध्ये करार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि नौदल यांच्यात शुक्रवारी (दि. १८) सामंजस्य करार झाला. मिग २९ विमानांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठीचा हा करार आहे.

नौदलाचे असिस्टंट चिफ ऑफ नाव्हल स्टाफ रिअर अॅडमिरल व्ही. मोहनदास आणि एचएएलच्या लढाऊ विमान निर्मिती विभागाचे ए. बी. गरड यांनी या करारावर स्वाक्षरी केली. ओझर येथील एचएएलच्या मुख्यालयात झालेल्या छोटेखानी समारंभात हा करार करण्यात आला. या कराराद्वारे गोवा येथील नौदलाच्या कमांडमध्ये मिग २९ विमाानांच्या देखभाल आणि दुरुस्तीला वेग दिला जाणार आहे. हा करार करताना आम्हाला अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया दास आणि गरड यांनी दिली आहे. यापुढेही अशा प्रकारचे सामंजस्य करार होणार असून त्याद्वारे सहकार्य, तंत्रज्ञानाची मदत आणि कुशल मनुष्यबळाचा पुरवठा हे साधले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नौदलाला नाशिकमधून रसद

0
0

उद्योजकांना मिळाली ऑर्डर; सुट्या भागांचा पुरवठा सुरू

Bhavesh.Brahmankar@timesgroup.com

Twitter - @BhaveshBMT

नाशिक : नाशिकमध्ये डिफेन्स इनोव्हेशन हब घोषित झाले असतानाच येथील उद्योजकांना दिलासा देणारे वृत्त आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेच्या पातळीवर असलेल्या आठ उद्योजकांची नौदलाने निवड केली आहे. या उद्योगांना ऑर्डरही मिळाली असून उत्पादनांचा पुरवठाही सुरू झाला आहे. आणखी १० ते १२ उद्योगांचीही निवड होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे एचएएल पाठोपाठ आता नौदलालाही सुट्या भागांचा पुरवठा नाशिकमधून होणार आहे.

ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या लढाऊ विमानांची निर्निती करणाऱ्या कारखान्याला नाशिकमधील २५० उद्योगांकडून विविध सुट्या भागांचा पुरवठा केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून नौदल आणि नाशिकचे उद्योजक यांच्यामध्ये विविध प्रकारच्या गाठी-भेटी सुरू होत्या. यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी निमा हाऊसमध्ये बैठकही झाली. नाशकातील २०हून अधिक उद्योजकांनी नौदलाला सुटे भाग पुरविण्याची इच्छा दर्शविली. त्यानंतर विविध प्रकारच्या प्रक्रिया पार पडल्या. या उत्पादनांची चाचणीही घेण्यात आली. यातील आठ उद्योगांची निवड नौदलाने केली आहे. त्यामध्ये शमन इंजिनीअरिंग, आरपीएम इंजिनीअरिंग, सारंग ऑटो अँड एरोनॉटिक्स लिमिटेड, प्रिसिझन टूल इंजिनीअरिंग वर्कस, सोनिक मल्टिटेक, रक्षा पॉलिकॉट आणि अॅडटेक लिमिटेड या आठ कंपन्यांचा समावेश आहे.

गोवा आणि कोची येथील नौदलाच्या कमांडमध्ये विविध प्रकारच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा या उद्योगांकडून केला जाणार आहे. यातील शमन इंजिनीअरींगला नुकतीच पहिली ऑर्डर देण्यात आली आहे. अन्य सात कंपन्यांनी त्यांची पहिली ऑर्डर पूर्ण केली आहे, अशी माहिती कमांडर राजेश बाबू यांनी 'मटा'शी बोलताना दिली. नाशकातील आणखी १० ते १२ कंपन्यांशी बोलणी अंतिम टप्प्यात आहे. ही बोलणी यशस्वी झाल्यास संरक्षण क्षेत्राशी निगडीत विविध उद्योगांना नाशिकमध्ये चालना मिळू शकेल.

नौदलाने भारतीयकरणासाठी धोरण निश्चित केले आहे. त्याअंतर्गत आम्ही परदेशातून उत्पादने आयात करण्याऐवजी देशांतर्गत उद्योगांना प्राधान्य देत आहोत. त्याअंतर्गतच नाशिकच्या आठ उद्योगांची आम्ही निवड केली. ज्यांना हा व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांनी आमच्या वेबसाईटला भेट देऊन नोंदणी करावी. आम्ही त्यांना संपर्क करू. नाशिकमध्ये कमांडर बाबू यांच्याशीही संपर्क साधता येईल.

- व्ही. मोहनदास, रिअर अॅडमिरल

मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोविंदनगरला उद्या हॅपी स्ट्रीट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोविंदनगर परिसरदेखील वाहतुकीने गजबजलेला असतो, या रस्त्यावर आपल्याला खेळता येईल, मौज मजा करता येईल ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट 'मटा'च्या माध्यमातून साध्य होणार आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने रविवार (२० जानेवारी ) सकाळी ७ ते ९ या वेळेत गोविंदनगर येथे हॅप्पी स्ट्रीटचे आयोजन केले आहे. यावेळी झुंबा, जादुगाराचे खेळ, सायकलिंग, स्केटिंग, जुन्या गाड्यांचा नजराणा, अशा अनेक गोष्टी नाशिककरांना पुन्हा अनुभवता येणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून हॅप्पी स्ट्रीटने नाशिककरांना अक्षरश: वेड लावले आहे. लहान मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटातील व्यक्ती हॅप्पी स्ट्रीटची वाट पाहून असतात. मागील आठवड्यात नाशिकरोड व त्या अगोदर व्हिरिडीयन व्हॅली व कॉलेजरोड येथे झालेल्या हॅप्पी स्ट्रीटला नाशिककरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदनगर येथे हॅप्पी स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सह्याद्री सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटलतर्फे हॅप्पी स्ट्रीटमध्ये सहभागी होणाऱ्यांची मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सेविकांचे धरणे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कमी पटसंख्येचे कारण दाखवत १३६ अंगणवाड्या बंद करून सात महिन्यांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे मानधन थांबविल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी भवनासमोर धरणे आंदोलन केले.

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासकीय काटकसरीच्या नावाखाली १३६ अंगणवाड्या बंद केल्या आहेत. यात कार्यरत १३६ सेविका आणि तेवढ्याच मदतनीस अशा २७२ जणांना कमी करण्यात आले आहे. परंतु, महासभेने आयुक्तांचा निर्णय फिरवत, या सर्वांना कामावर घेऊन अंगणवाड्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मुंढेंनी मात्र हा प्रस्ताव केवळ दप्तरी दाखल करून घेत आपला निर्णय कायम ठेवला होता. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलन केले आहे. मुंढेंच्या बदलीनंतर गमे यांनीही यासंदर्भात काही पावले उचलली नाहीत. त्यामुळे पुन्हा शुक्रवारी या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर प्रशासनाच्या निषेधार्थ एकदिवसीय धरणे आदोलन केले.

प्रमुख मागण्या

अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या निर्धारणाचे अधिकार महासभेलाच असावेत, तसेच ही मर्यादा किमान १५ व कमाल २० पर्यंत केली जावी. शहराच्या लोकसंख्येनुसार अंगणवाड्यांची पुनर्रचना केली जावी. अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात. अंगणवाड्या १९९४ पासून सुरू झाल्या असताना भविष्य निर्वाह निधी मात्र गत दोन वर्षांपासून सुरू झाल्याने ज्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी वयाची ६५ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना सेवानिवृत्तीनंतर जगणे सुसह्य व्हावे यासाठी आर्थिक मदतीची योजना सुरू केली जावी. अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी वर्ग, कर्मचारी, मुख्य अंगणवाडी सेविका, सेविका आणि मदतनीस यांना तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण दिले जावे. अंगणवाड्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर नियोजनातील अडथळे दूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित सीएम चषक जिल्हास्तरीय स्पर्धेत नियोजनाचा अभाव असल्याची बातमी गुरुवारी 'मटा'त प्रसिद्ध होताच आयोजक खडबडून जागे झाले. आयोजनात ज्या काही त्रुटी होत्या त्या तातडीने दूर करण्यात आल्या असून, खेळाडूंनी समाधान व्यक्त केले आहे.

२०१९ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभानिहाय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. १५ विधानसभेच्या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना जिल्हा पातळीवर खेळण्याची संधी देण्यात आली. नाशिकमध्ये झालेल्या स्पर्धेच्या आयोजनात मोठ्या प्रमाणात त्रुटी होत्या. याबाबत 'मटा'त वृत्त प्रकाशित होताच आयोजकांची चांगलीच धांदल उडाली. शुक्रवारी सकाळी तातडीने या त्रुटी दूर करण्यात आल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील १ हजार ७९० खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाडूंना क्रीडांगणावर जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली नव्हती. शुक्रवारी खेळाडूंना ये-जा करण्यासाठी वाहन उपलब्ध करुन देण्यात आले. गुरुवारी देण्यात आलेल्या जेवणात मसाला भात, बुंदी, पातळ भाजी आणि पुऱ्या इतकाच मेनू ठेवण्यात आला होता. शुक्रवारी त्यात अमूलाग्र बदल झाले. जेवणासाठी बुफे आणि डायनिंग पद्धत ठेवण्यात आली. वरण-भात, पुलाव, पोळी, भेंडीची भाजी, पातळ भाजी, जिलेबी असा मेनू खेळाडूंना शुक्रवारच्या जेवणात देण्यात आला. ग्राऊंडवर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता, तो काढण्यात आला असून पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच व्हॉलिबॉल, कबड्डी, खो-खोचे ग्राऊंड पाणी मारून तयार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालेंच्या प्रवेशाने ‘झेडपी’चे बदलणार गणित

0
0

सप्टेंबरनंतर घडामोडींना येणार वेग

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे गटनेते व माजी आमदार धनराज महाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने जिल्हा परिषदेचे गणितही बदलणार आहे. पण, तूर्तास त्याचा कोणताही परिणाम जिल्हा परिषदेवर आता होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र घडामोडींना वेग येणार आहे. लोकसभेत कोणता पक्ष कोणाबरोबर युती व आघाडी करतो, यावरही अनेक गोष्टी अवलंबून असणार आहे.

शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांना सप्टेंबरमध्ये अडीच वर्षे पूर्ण होणार आहे. त्यानंतर या घडामोडीला वेग येण्याची शक्यता आहे. लोकसभेमध्ये शिवसेना व भाजप एकत्र आल्यास मात्र या हालचालींना पूर्णविराम मिळेल. जिल्हा परिषदेमध्ये एकूण ७३ सदस्य असून त्यात शिवसेनेचे २६ व भाजपचे १६ सदस्य आहे. त्यांची एकूण बेरीज ही ४२ होत असल्याने त्यांना इतर मतांची गरज भासणार नाही. पण, ही आघाडी न झाल्यास पुन्हा शिवसेना व काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर भाजप राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील गणित बिघडू शकते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अवघ्या दोन मतांनी 'राष्ट्रवादी'च्या मंदाकिनी बनकर यांचा पराभव झाला होता.

अनुभवी नेत्याचा शोध

जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. त्यात गटनेता दुसऱ्या पक्षात गेल्याने सभागृहातही त्याचे परिणाम दिसणार आहे. शिवसेनेची बाजू मांडतांना माजी आमदार असलेले धनराज महाले हे अनुभवी होते. पण, आता त्यांच्यासारख्यात अनुभवी नेत्यांवर शिवसेनेला गटनेते पदाची जबाबदारी सोपवावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोनशे सफाई कर्मचाऱ्यांची दांडी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू असतांनाच महापालिकेच्या आरोग्य विभागातील १९४ सफाई कर्मचारी गायब असल्याचे समोर आले आहे. आयुक्तांच्या अचानक तपासणी मोहिमेत ९६ कर्मचारी रजेवर गेल्याचे तर ९८ कर्मचारी गैरहजर आढळून आले. त्यामुळे विनापरवाना गैरहजर राहिलेल्या सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकचा पहिल्या दहा शहरांमध्ये समावेशासाठी प्रशासनाकडून सुरू आहेत. स्वच्छ सर्वेक्षण ४ जानेवारीपासून सुरू असून त्यासाठी महापालिका आयुक्तांसह अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत असतांना, दुसरीकडे मात्र सफाई कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत अनास्था दिसून आली आहे. यंदा हा क्रमांक अधिक वधारण्यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

यंदा देशभरातील ४२०३ शहरांसोबत स्पर्धा होणार असल्याने महापालिकेपुढे मोठे आव्हान आहे. या स्पर्धेसाठी पाच हजार गुण ठेवण्यात आले आहेत. गेल्या वेळेस महापालिका जनजागृती करण्यात आणि नागरिकांच्या प्रतिसादात कमी पडली होती. त्यामुळे यंदा जनप्रबोधनावर भर दिला जात आहे.

स्वच्छ शहराच्या उभारणीत महत्त्वाचा घटक असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मात्र या मोहिमेविषयी काही देणघेण नसल्याचे गैरहजर असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या संख्येवरून दिसत आहे. आयुक्त गमे यांनी तिसऱ्यांदा केलेल्या तपासणीत तब्बल ९८ सफाई कर्मचारी गैरहजर तर ९६ रजेवर असल्याचे आढळून आले. त्यामुळे विनापरवाना गैरहजर असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकारी चौकशी रद्दचा ठराव अंगलट?

0
0

न्यायप्रविष्ट प्रकरणांवर परस्पर क्लिनचीट भोवणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ग्रीनफिल्ड प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांची लावलेली विभागीय चौकशी सुरू असतांनाच, सत्ताधारी भाजपने या अधिकाऱ्यांना दिलेली क्लिनचीट अंगलट येण्याची शक्यता आहे. ग्रीनफिल्ड प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना, तसेच यात कोण दोषी हे ठरलेले नसतांनाच, त्या अगोदर क्लिनचीट देण्याची घाई प्रशासनाच्याही जिव्हारी लागली आहे.

प्रशासनाकडून केवळ माहितीस्तव अधिकाऱ्यांच्या चौकशीचा प्रस्ताव महासभेवर ठेवला असतांना, थेट ठराव करून पाठवल्याने अंमलबजावणीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्या ठरावाची अंमलबजावणी विशेष म्हणजे यातील काही अधिकाऱ्यांच्या चौकशांसाठी तर, भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासमोर तक्रारींचा ढिग मांडला असतांनाही क्लिनचीट कशी द्यायची, अशा पेचात प्रशासन आहे.

मुंढेंच्या कार्यकाळात चौकशांचा ससेमिरा लागलेल्या ग्रीनफिल्डसह अन्य प्रकरणातील अधिकाऱ्यांना क्लिनचीट देण्याचा ठराव सत्ताधाऱ्यांनी केला आहे. या ठरावात मुंढे आणि उपायुक्त रोहीदास बहिरम वगळता अन्य अधिकाऱ्यांच्या चौकशाच रद्द करण्याचा ठराव करत तो प्रशासनाकडे पाठवला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपचा हा ठराव पाहून महापालिकेतील अधिकारीही अवाक झाले आहे. मुंढे यांनी आपल्या अधिकारात ग्रीन फिल्ड प्रकरणात किशोर बोर्डे, उपायुक्त रोहिदास बहिरम, पी. बी. चव्हाण, रवींद्र पाटील यांची विभागीय चौकशी सुरू केली होती.

तर २५७ कोटीच्या रस्ते योजनेत तत्कालीन शहर अभियंता यू. बी. पवार यांच्यावर तरतूद नसतांना प्रस्ताव ठेवल्याचा ठपका ठेवत चौकशी सुरू केली होती. तर अग्निशामक हरकत दाखल्याचे परिपत्रक दडवण्यासह एका बिल्डराला सेवानिवृत्तीच्या आदल्या दिवशी फायर एनओसी दिल्याप्रकरणी ठपका ठेवत, सेवानिवृत्त अग्निशमन दल अधिकारी अनिल महाजन यांचीही विभागीय चौकशी सुरू आहे. ९० लाखांच्या औषध खरेदी प्रकरणात डॉ.राजेंद्र भंडारी आणि लेखा विभागातील घोळाप्रकरणी उपमुख्य लेखाधिकारी सुरेखा घोलप यांची चौकशी सुरू आहे. या अधिकाऱ्यांच्या चौकशी सध्या चौकशी अधिकारी बाबूराव हांगे यांच्याकडून सुरू आहे. यातील काहींनी आपली बाजूही मांडली आहे. परंतु, मुंढेंची बदली होताच, या अधिकाऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. या अधिकाऱ्यांच्या चौकशीचा प्रस्ताव माहितीस्तव ठेवला असतांना सत्ताधाऱ्यांनी सर्व चौकशीच रद्दबातल ठरवल्या आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. प्रशासकीय पातळीवर चौकशा सुरू असतांनाच, त्याच अचानक थांबवायच्या कशा अशा पेचात आता प्रशासन पडले आहेत. ग्रीन फिल्ड प्रकरण तर न्यायालयात प्रलंबित असतांनाही,यातील अधिकाऱ्यांना क्लिनचीट देण्याची घाई अंगलट येईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

प्रशासनाच्या कोर्टात चेंडू

सदरचा ठराव हा नगरसचिवांकडून सध्या प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. या ठरावावर प्रशासनाप्रमुख म्हणून आयुक्तांच अंमलबजावणी करावी लागणार असल्याने आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. यात अनेक तांत्रिक चुका असून त्याची अंमलबजावणी केल्यास प्रशासनाच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे याबाबत काय करायचे याविषयी कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली जात आहे. विशेष म्हणजे महासभेचा अधिकार नसतांनाही, त्यांनी आयुक्तांच्या माहितीस्तव प्रस्तावावर परस्पर ठराव करून पाठविल्याने प्रशासनाचाच अवमान मानला जात आहे. त्यामुळे या ठरावाबाबतचा कायदेशीर पेच अधिकच वाढला आहे.

हांगेचाही नकार?

महासभेच्या ठरावानंतर या प्रकरणातील चौकशी अधिकारी बाबूराव हांगे यांनी या प्रकरणांच्या चौकशीपासून मुक्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हांगे यांच्याबाबत यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. तर आता महासभेने हांगे यांच्या चौकशीवरच आक्षेप घेत, महासभेच्या अधीन चौकशी नसल्याचे सांगत, त्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे हांगे व्यथित झाले असून त्यांनी प्रशासनाला साकडे घालत, चौकशीपासून दूर करा, अशी विनंती केल्याचे कळते. त्यामुळे महापालिकेला चौकशीसाठी आता दुसरा अधिकारी शोधावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महासभा ठरणार वादळी

0
0

महासभा ठरणार वादळी

गाळ्यांसह शंभर कोटींच्या कामांना मान्यता मिळणार

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाला दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतील कामांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी उद्या शनिवारी विशेष महासभा होत आहे. ही सभा कामांवरुन व तसेच आयत्यावेळी येऊ शकणाऱ्या गाळ्यांच्या विषयांवरुन गाजरण्याची शक्यता आहे.

महापालिकेची विशेष महासभा उद्या शनिवारी सकाळी ११ वाजता महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. सत्ताधारी भाजपाकडून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी १०० कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांना मंजुरी देवून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कामांना सुरुवात करण्यावर भर दिला जात आहे. याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी सर्व नगरसेवकांकडून आपआपल्या प्रभागातील कामांचे प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार एकूण १७५ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मनपाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी काही कामांना कात्री लावल्यानंतर नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. १०० कोटी रुपयांच्या निधीव्यतिरीक्त प्रभाग समिती सभापतींच्या निवड देखील या महासभेत होणार आहे.

कामांची लपवाछपवी

शंभर कोटीतील कामावरुंन भाजप नगरसेवकांमध्ये देखिल वाद आहेत.प्रत्येकाला आपल्या प्रभागात जास्त कामे हवी आहेत. त्यामुळे या कामांचे प्रस्ताव सभेच्या विषयपत्रिकेसोबत देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सभेत येणाऱ्या या कामांवरुन सत्ताधाऱ्यांमधीलच नगरसेवक व विररोधकांमध्ये देखिल खडजंगी होवू शकते.

या सभेत मुदत संपलेल्या गाळ्यांच्या थकीत भाड्यावर लावण्यात आलेचा पाचपट दंड रद्द करण्याचा ठराव आयत्यावेळी येण्याची शक्यता आहे. हा विषय आल्यास त्यावरुन देखिल गरमागरमी होण्याची शक्यता आहे. सभेत विविध समित्यांचे गठण करण्याचा विषय आहे. तसेच शहरातील विविध भागात असलेल्या दुधाच्या बुथांना मुदतवाढ देण्याचा विषय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डान्सबार बंद ठेवण्याची ‘राष्ट्रवादी’कडून मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तरुण पिढी भरकटू नये व अनेकांच्या संसाराची धुळधाण होऊ नये, याकरीता नाशिकमध्ये डान्सबारला परवानगी देऊ नका, असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना शुक्रवारी दिले.

डान्सबारमुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात आल्याने तसेच अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याने दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आघाडी सरकारच्या काळात १३ वर्षांपूर्वी डान्सबारवर बंदी आणली होती. युती सरकारने सर्वोच्च न्यायालयात डान्सबारवरील विरोध प्रखरपणे न मांडल्याने सरकारची बाजू कमकुवत राहिली. महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबार सुरू करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डान्सबार सुरू झाल्यास तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता बळावली आहे. नाशिकमधील तरुणाईचेही नुकसान होऊ नये, यासाठी डान्सबारला परवानगी देऊ नये, अशी मागणी शहराध्यक्ष अंबादास खैरे, अॅड. चिन्मय गाढे, नीलेश सानप, डॉ. संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, सागर बेदरकर, सुनील घुगे, भूषण गायकवाड, नदीम शेख, मितेश राठोड, जयभाऊ कोतवाल, रोहित जाधव, राज रंधावा, संतोष पुंड आदींनी केली आहे.

सोशल मीडियावरूनही निर्णयाची चर्चा

डान्स बार सुरू करण्याच्या निर्णयावर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. डान्स बार सुरू करण्याच्या निर्णयावर स्व. आर आर पाटील यांना राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धीरज बच्छाव यांनी लिहिलेले संवेदनशील पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते सगळीकडे चर्चेचा विषय बनले आहे. डान्सबार सुरू करण्याच्या निर्णयामुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळू शकते, अशी भीती बच्छाव यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील तरुणाई बारच्या पायथ्याशी लोळण घालत पहुडलेली असायची तेव्हा अनेक संसार उद्धस्व होत होते. स्व. आर. आर. पाटील यांच्या संवदेनशील नजरेने ही परिस्थिती हेरली. त्यामुळेच डान्सबारवर बंदी घालून त्यांनी पीडित कुटुंबीयांना पुन्हा एकदा जगण्याची नवी दिशा दिली. या बंदीला विरोध दर्शवून तुमचं अस्तित्व तर नाकारलं जाणार नाही ना? असा प्रश्न सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्यांनी उपस्थित केला आहे. डान्सबार बंदी न्यायालयात तग धरू शकली नाही यास जबाबदार नेमके कोणास धरायचे? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशवंत गौरव पुरस्काराचे उद्या वितरण

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शासकीय सेवेत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या राज्यातील सावित्रीच्या लेकींना अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या शुभहस्ते देवमामलेदार यशवंत गौरव पुरस्काराने रविवारी (दि.२०) सन्मानित करण्यात येणार आहे. शहरातील राधाई मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक स्थानिक वृत्तवाहिनी 'आय न्यूज'चे संपादक देवेंद्र वाघ यांनी केले आहे.

संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या जीवनधारणेनुसार प्रशासकीय सेवेत सेवाभावाने समाजोपयोगी कार्य करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. अकोला येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प सहाय्यक आयुक्त विनिता सोनवणे, रायगड जिल्ह्यातील माणगावच्या उपजिल्हाधिकारी प्रशाली जाधव, सा. बां. विभाग नाशिक सहाय्यक कार्यकारी अभियंता स्नेहल पगार यांची पुरस्कारार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत कलीम नाका सापडला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव येथील सराईत गुन्हेगारासह त्याच्या दोन साथीदारांना पिंपळगाव बसवंत येथे गावठी कट्टा तसेच घातक हत्यारांसह ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. संशयिताकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, एक धारदार कोयता व गाडी असा सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कलीम अहमद मन्सुर अहमद उर्फ कलीम नाना (३६, रा. मोहंमदाबाद, मालेगाव), नीलेश संजय मोरे, (१९, रा. हिम्मतनगर, मालेगाव), सईद अली शेरअली, (३४, रा. अख्तराबाद, मालेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. मालेगावातील काही सराईत गुन्हेगार घातक शास्त्र बाळगुन मुंबईकडून मालेगाव शहराकडे येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना मिळाली होती. त्यानुसार करपे, सहायक निरीक्षक आशा आडसुळ, स्वप्निल नाईक यांच्या पथकाने पिंपळगाव टोल नाका परिसरात सापळा रचला. टोलनाक्याच्या दिशेने येत असलेली एक सफेद रंगाची पिकअप वाहन पोलिसांनी अडविले. या गाडीतील चालक व दोन संशयितांना जागेवरच ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मनमाड शाहरातील एक गोडावुन फोडून घरफोडी केली असल्याचीही कबुली दिली.

--

२० गंभीर गुन्हे

सराईत गुन्हेगार कलीम अहमद मन्सुर अहमद उर्फ कलीम नाना याचेविरूध्द मालेगावसह जळगाव व औरंगाबाद येथे दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी वसुली, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजाची ‘स्मार्ट’ फसवणूक!

0
0

प्रशासनाकडून फसवणूक; हरित क्षेत्र सर्वेक्षण पाडले बंद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास योजनेतून मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात राबविल्या जाणाऱ्या स्मार्ट नगररचना परियोजनेच्या सर्वेक्षणास शेतकऱ्यांनी परवानगी दिली असताना, महासभेवर प्रस्ताव ठेवण्याची घाई कंपनीला अंगलट आली आहे. जागेचे सर्वेक्षण करून मोबदल्या संदर्भातील माहिती शेतकऱ्यांना देऊनच निर्णय घेण्याचे आश्वासन स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओनी दिले होते. महासभेवर थेट उद्देश जाहीर करण्याचा प्रस्ताव ठेवल्याने शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी सर्वेक्षणाचे काम बंद पाडले आहे. तसेच सदरचा प्रस्ताव महासभेने मंजूर करू नये, अशी लेखी मागणी आयुक्त, महापौरांकडे केली आहे.

स्मार्ट सिटी अतंर्गत मखलमलाबाद व हनुमावाडी येथील ७५४ एकर क्षेत्रात हरित क्षेत्र विकास योजने अंतर्गत नगररचना परियोजना (टीपी स्कीम) राबविण्याचा विषय जेमतेम मार्गी लावत आहे. कंपनीच्या वतीने महासभेवर ठेवलेल्या उद्देश जाहीर करण्याच्या प्रस्तावावरून पुन्हा वादंग निर्माण झाले आहे. या प्रस्तावास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्यानंतर मुख्यमंत्र्याच्या वतीने शेतकऱ्यांचा अहमदाबाद दौरा आयोजित केला होता. अहमदाबादमध्ये शेतकऱ्यांना मोबदला देतांना ६०-४० चा फॉर्म्यूला वापरला असल्याने शेतकऱ्यांनी नाशिकमध्येही हाच फॉर्म्यूला लागू करण्याची मागणी केली. याबाबत महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या सादरीकरणामध्ये सर्वेक्षणानंतरच मोबदला निश्चित करता येईल, असे सीईओ प्रकाश थवील यांनी सांगितले होते. त्यासंदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करून पुढे कार्यवाही करू, असे आश्वासनही दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागेच्या सर्वेक्षणासाठी तोंडी संमती दिली होती. या सर्वेक्षणाचे काम १५ दिवसांपासून सुरू आहे.

सर्वेक्षणाचे काम सुरू असताना दुसरीकडे मात्र स्मार्ट परियोजनेचा उद्देश जाहीर करण्याचा प्रस्ताव शनिवारच्या (दि. १९) महासभेत ठेवला आहे. त्यात ५०-५० टक्क्याच्या फॉर्म्यूल्याचा उल्लेख केल्याने शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी शुक्रवारी सर्वेक्षणाचे काम बंद पाडले. संबंधित पथकाला माघारी पाठवत, हा प्रस्ताव मंजूर करू नये, असे लेखी पत्र आयुक्त, महापौर तसेच कंपनीचे सीईओ दिला आहे. त्यामुळे हरितयोजनेच्या सर्वेक्षणाला पुन्हा ब्रेक लागला असून आता महासभा काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागून आहे.

मोबदल्याचा वाद

अहमदाबादच्या धर्तीवर नगर परियोजना राबवतांना १.८ एफएसआय व शेतकऱ्यांची जमीन विकसित करताना ६०-४० असा फॉर्म्यूला निश्चित केला आहे. परंतु, महाराष्ट्रात मात्र एफएसआय कमी असून जमीन वाटपाचा फॉर्म्यूला ५०-५० असा आहे. त्यास आक्षेप घेत अहमदाबादच्या पॅटर्ननुसार कार्यवाही करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. असा बदल करण्यासाठी सरकारला नियम 3३७ नुसार बदल करून राजपत्रात नोंद करावी लागेल. परंतु, त्यापूर्वीच महासभेवर प्रस्ताव ठेवल्याने ६४ शेतकऱ्यांनी थेट लेखी विरोध केला आहे. तर भाजपच्या नगरसेविका भिकुबाई बागूल, पुंडलिक खोडे व सुनिता पिंगळे यांनी विरोधाचे पत्र महासभेला सादर केले आहे. यासंदर्भात स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील व संजय बागूल यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images