Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मृतदेहाबाबत आवाहन

0
0

मृतदेहाबाबत आवाहन

नाशिक : पेगलवाडी (ता. त्र्यंबकेश्वर) येथील प्रयागतीर्थच्या पाण्यात सुमारे ४८ वर्षांची एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. रंग गोरा, उंची ५ फूट ८ इंच, सडपातळ बांधा, उजव्या हातात तांब्याचे कडे, दाढी वाढलेली व पाठीवर उजवे बाजूस लसणचे व्रण असे या मृतदेहाचे वर्णन आहे. त्याच्याबाबात माहिती मिळाल्यास त्र्यंबकेश्वर पोलिसांशी (०२५९४-२३३१३३) किंवा (९८२३७२२३१७) संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेसेवा तीन दिवस विस्कळीत

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

मध्य रेल्‍वेच्या इगतपुरी स्‍थानकावर फूट ओव्हर ब्रिजचा गर्डर बसविण्‍यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ११ ते १३ जानेवारीदरम्यान काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काहींच्या वेळापत्रकात तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. पहाटे पावणेचार ते सकाळी साडेदहा अशी ब्लॉकची वेळ आहे.

११ जानेवारीची मुंबई-भुसावळ, १२ रोजीची भुसावळ-मुंबई तर १३ रोजीची पुन्हा मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. १२ जानेवारीला गाडी क्रमांक १५६४५ एलटीटी-गुवाहाटी एक्सप्रेस सकाळी आठऐवजी ९.१० वाजता तर गाडी क्रमांक १७६१७ सीएसएसटी मुंबई-हुजूरसाहेब नांदेड तपोवन एक्सप्रेस सव्वासहाऐवजी नऊ वाजता सुटेल.

१२ जानेवारी रोजी एलटीटी-फैजाबाद/रायबरेली एक्‍स्प्रेस दिवा-वसई रोड-जळगावमार्गे, सीएसटी-हावडा गीतांजली एक्‍सप्रेस कल्‍याण-दौंड-मनमाड तर एलटीटी-गोरखपूर काशी एक्‍स्प्रेस दिवा-वसईरोड-जळगावमार्गे जाईल. १३ रोजी गाडी क्रमांक १२५१९ एलटीटी-कामाख्‍या एक्स्प्रेस पावणेआठऐवजी ९.१० वाजता सुटेल. गाडी क्रमांक १२३३६ एलटीटी-भागलपूर एक्स्प्रेस आठएवजी ९.३० वाजता सुटेल. गाडी क्रमांक १७६१७ सीएसटी-हुजूरसाहेब नांदेड एक्स्प्रेस सव्वासहाऐवजी ९.०५ वाजता सुटेल. १३ जानेवारीला एलटीटी-अलाहाबाद एक्‍स्प्रेस दिवा-वसईरोड-जळगावमार्गे तर सीएसटी-हावडा गीतांजली एक्‍स्प्रेस कल्‍याण-दौंड-मनमाडमार्गे जाईल. एलटीटी-गोरखपूर काशी एक्‍स्प्रेस दिवा-वसईरोड-जळगावमार्गे धावेल. प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे. महिनाभरापूर्वी इगतपुरीत नवीन रेल्वे लाइन टाकण्यासाठी सुमारे महिनाभर ब्लॉक घेण्यात आला होता. तेव्हाही रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारठ्यापासून अल्पदिलासा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाच्या थंडीने नाशिककरांना चांगलीच हुडहुडी भरली असली, तरी चढत्या-उतरत्या तापमानाने काहीसा दिलासाही सध्या शहरवासियांना मिळत आहे. बुधवारी ६.९ अंश सेल्सिअस असलेल्या किमान तापमानात गुरुवारी ३ अंशांनी वाढ झाली. किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत असल्याने कमी-अधिक प्रमाणात असलेल्या थंडीचा अनुभव नाशिककर घेत आहेत.

गेल्या रविवारी, ६ जानेवारी रोजी ९.७ अंश सेल्सिअसवर असलेले तापमान बुधवारी ६.९ अंश सेल्सिअस, तर गुरुवारी १० जानेवारी रोजी पुन्हा ९ अंश सेल्सिअसवर स्थिरावले होते. हवामानातील या फरकाचा अनुभव नाशिककरांना येत आहे. घसरलेले किमान तापमान व हवेतील गारवा यामुळे नाशिककरांना अधिक प्रमाणात थंडी जाणवली. पहाटे व रात्री तर थंडीमुळे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही अत्यंत कमी झाली होती. मात्र, थंडी कमी झाली आहे असे जाणवताच पुन्हा रस्ते गजबजल्याचे दिसून येत आहे. आरोग्यदायी वातावरणाचा लाभ घेण्यासाठी भल्या सकाळीच 'मॉर्निंग वॉक', जिम यांना नागरिक प्राधान्य देत आहेत. ५ ते ९ जानेवारी या कालावधीत तीन अंश सेल्सिअसनी तापमानात घट झाली होती. गुरुवारी पुन्हा तीन अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली. येत्या काळातही असेच हवामान राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टीधारकांचे घरासाठी आंदोलन

0
0

खासगी जागेवरील अतिक्रमण पालिकेने तोडल्याचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याच्या नावावर आमची घरे उध्वस्त केली असल्याचा आरोप सामान्य रुग्णालयनजीक सर्वे नं. ५२ व ५३ मधील झोपडपट्टीवासियांनी केला आहे. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी या आंदोलकांची भेट घेऊन पालिका प्रशासनास सूचना केल्या.

शहरातील प्रमुख रस्ते, पालिकेचे भूखंड यावर अतिक्रमित असलेली झोपडपट्टी हटवण्याची मोहीम पालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे. या झोपडपट्टीधारकांना म्हाळदे शिवारातील घरकुल योजनेत स्थलांतरित केले जाते आहे. या मोहिमेतंर्गत सामान्य रुग्णालय परिसरातील सर्वे नं. ५२ व ५३ मधील दहा झोपडपट्टी हटवून संबंधित कुटुंबांना घरकुल योजनेत पालिकेकडून स्थलांतरित करण्यात आले होते. दरम्यान या कुटुंबीयांनी गुरुवारी आंदोलन करीत पालिकेने आमच्या खासगी मालकीच्या जागेवरील घरे तोडल्याचा दावा केला आहे. खासगी जागेवरील अतिक्रमण हटवण्याचा अधिकार पालिकेला कोणी दिला? असा प्रश्न उपस्थित केला. संबधित कुटुंबीयांनी याप्रश्नी भूसेंकडे तक्रार केली. गुरुवारी आंदोलनस्थळी भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त किशोर बोर्डे, शहर अभियंता कैलास बच्छाव, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी उपयोजनेसाठी ३९ कोटी

0
0

जिल्ह्यातील पेसातंर्गत १०४५ गावांचा समावेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनुसूचित क्षेत्रातील जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेसाठी ३९ कोटी १० लाख ३४ हजार इतका निधी राज्य सरकारने वितरित केला आहे. हा निधी नाशिक जिल्हा परिषदेतंर्गत असणाऱ्या कळवण, पेठ, दिंडोरी, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, बागलाण, देवळा, पंचायत समितीमधील ५७४ ग्रामपंचायतीमधील १०४५ गावांना मिळणार आहे.

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायींना दरवर्षी आदिवासी उपयोजनेसाठी ५ टक्के निधी उपलब्ध करून दिला जातो. २०१८-१९ या वर्षासाठी १८७ कोटी ५२ लाख इतका राज्यासाठी उपलब्ध झाला. त्यातील ३९ कोटी १० लाख रुपये नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मिळाले आहे. या निधीतील गावात येणारे अंतर्गत गावातील आदिवासी उपयोजनेसाठी वापरला जाणार आहे.

वितरित करण्यात आलेल्या निधीत कळवण पंचायत समिती क्षेत्रातील ८६ ग्रामसभांमधील १५१ गावे, पेठ पंचायत समिती क्षेत्रातील ७३ ग्रामसभांसमधील २१३ गावे, दिंडोरी पंचायत समिती क्षेत्रातील १०३ ग्रामसभांमधील १३८ गावे, इगतपुरी पंचायत समिती क्षेत्रातील ६३ ग्रामसभांमधील ६६ गावे, नाशिक पंचायत समिती क्षेत्रातील ३२ ग्रामसभांमधील ४७ गावे, त्र्यंबकेश्वर पंचायत समिती क्षेत्रातील ८४ ग्रामसभांमधील १२४ गावे, सुरगाणा पंचायत समिती क्षेत्रातील ६१ ग्रामसभांधील १९० गावे, बागलाण पंचायत समिती क्षेत्रातील ५० ग्रामसभांमधील ७५ गावे, देवळा पंचायत समिती क्षेत्रातील २२ ग्रामसभांमधील ४१ गावांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील पेसा क्षेत्रातील ग्रामपंचयातमधील ९ लाख २१ हजार ७९२ इतक्या आदिवासी लोकसंख्येसाठी दरदोई ४२४ रुपये २१ पैसे या प्रमाणे दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखर्चित निधीबाबत जबाबदारी ठरणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नियोजन विकास आराखड्याच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अखर्चित निधीवर चर्चा झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व विभागात आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. बांधकाम, लघु पाटबंधारे विभाग तसेच ग्रामीण पाणीपुरवठा या विभागांकडून प्रत्येक कामाची तारखेनिहाय माहिती ते घेत आहेत. काम कालमर्यादेत पूर्ण न झाल्यास व निधी खर्च न झाल्यास पाचही विभागातील सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाईचा इशारा दिला आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत अखर्चित निधीवरही चर्चा झाली होती. तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम व लघु पाटबंधारे विभागाच्या कामांच्या दिरंगाईस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या होत्या. त्यानुसार डॉ. नरेश गिते यांनी या पाचही विभागांच्या कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. कामांच्या मंजूर तारखेपासून ते ई-टेंडर, कार्यारंभ आदेशपर्यंतच्या प्रवासाची तारखेनिहाय माहिती घेण्यात येत आहे. कामास दिरंगाई कोठे झाली, कोणामुळे झाली याबाबत माहिती घेऊन संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप विद्यार्थी आघाडीचा पदवीधारकांसाठी मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या स्थापत्य अभियांत्रिकी नोकरभरतीत पदवीधारकांना संधी मिळावी, यासाठी भाजप विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष ऋषिकेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले.

१९७० च्या सेवानियमानुसार ज्युनिअर इंजिनीअर पदासाठी डिप्लोमाधारकांच्या ७५ टक्के जागा आणि सिनिअर इंजिनीअर्ससाठी पदवीधारकांच्या २५ टक्के जागा भरल्या जात होत्या. त्यानंतर १९८४ च्या अध्यादेशानुसार महाराष्ट्रात ६ इंजिनीअरिंग कॉलेजेस आणि अनेक डिप्लोमा कॉलेजेस होते. म्हणून तुलनेने पदवीधारक इंजिनीअर्स उपलब्ध नसल्याने डिप्लोमाधारकांना प्राधान्य दिले जात होते. त्यानंतर १९९८ च्या अध्यादेशानुसार १०० टक्के जागा डिप्लोमाधारकांसाठी ठेवण्यात आल्या. सुप्रिम कोर्टापर्यंत अनेक विद्यार्थी आणि संघटनांनीही निर्णय रद्द व्हावा, यासाठी लढा दिला. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार राज्य सरकारनेच हा निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर २००६ मध्ये स्थापन झालेल्या के. पी. बक्षी समितीने आपल्या शिफारसी सरकारकडे सुपूर्द केल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची शिफारस म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंधारण विभागाची पुनर्रचना करणे आणि डिग्री व डिप्लोमासाठी ५० टक्के जागा द्याव्यात अशी आहे. या मागणीमुळे डिग्री व डिप्लोमा या दोन्हीचे हित साधले जाणार आहे. या दोन्ही पात्रताधारकांसाठी समान न्यायानुसार जागा देण्यात याव्यात, अशी आघाडीची मागणी आहे.

मेगा भरतीतील २ हजार जागाही डिप्लोमाधारकांसाठीच आहेत. त्यामुळे स्वाभाविकच डिग्री होल्डर्सवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या बाबीचा विचार होऊन पदवी अभियंत्यांना संधी मिळावी, यासाठी निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कपाटा’ची अडीचशे प्रकरणे निकाली

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या तीन ते चार वर्षांपासून बांधकाम क्षेत्राभोवती निर्माण झालेली कोंडी फुटण्यास उशिरा का होईना सुरुवात झाली आहे. कम्पाउंडिंग पॉलिसीअंतर्गत ६ व ७. ५ मीटर रस्तासन्मुख जागा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याच्या २५० प्रस्तावांना नगरररचना विभागाने मंजुरी दिली आहे. संबंधित जागामालकांनी जागा वजावट करण्यास परवानगी दिल्यानंतर या जागांच्या सातबारा उताऱ्यावर पालिकेचे नाव लागणार आहे.

शहरातील बांधकाम व्यवसायाच्या मागे सन २०१४ पासून शुक्लकाष्ट लागले आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून बांधकाम क्षेत्राची कोंडी झाली असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सन २०१४ मध्ये बांधकाम क्षेत्रातील कपाट प्रकरण बाहेर काढत, अनियमित कामांना प्रथम ब्रेक लावला. बिल्डरांकडून 'फ्री एफएसआय'मध्ये मोडणाऱ्या क्षेत्राची ग्राहकांना विक्री होत असल्याचे समोर आले होते. बिल्डरांनी कपाटांसाठी दिलेल्या एफएसआयमध्ये थेट स्लॅब काढण्याच्या प्रकाराला गेडाम यांनी चाप लावला. त्यामुळे शहरातील ज‌वळपास सहा हजारांहून अधिक इमारतींची पूर्णत्व प्रमाणपत्रे अडकली होती. त्यामुळे ग्राहकांची कोंडी झाली होती. त्यात भरीस भर म्हणून सरकारने शहर विकास नियंत्रण नियमावलीत ६ व ७.५ मीटर रस्त्यावर टीडीआर अनुज्ञेय करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणीत भरच पडली. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये नऊ व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यावर अधिक एफएसआय व टीडीआर लागू केल्याने त्या रस्त्यावर उभ्या राहिलेल्या; परंतु, कपाटांच्या उल्लंघनामुळे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न मिळालेल्या इमारतींना पूर्णत्वाचा मार्ग मोकळा झाला. तथापि, ६ व ७.५ मीटर रस्त्यावरील इमारतींचा प्रश्न कायम राहिला. त्यामुळे सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी कलम २१० ची कम्पाउंडिग पॉलिसी आणली. त्यात ६ व ७.५ मीटर रस्ता ९ मीटरपर्यंत रुंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन विकसकांना करण्यात आले. ६ मीटर रस्त्यावर दोन्ही बाजूंकडून १.५ मीटर तर ७.५ मीटर रस्त्यावर ०.७५ मीटर रस्ता सोडल्यास रस्ता ९ मीटर रुंद होईल. रस्ता ९ मीटरचा झाल्यानंतर एफएसआय देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थायी समितीनेही हा नियम २१० चा ठराव मंजूर केला. संबंधित इमारतधारकाने आपला रस्ता महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यानुसार तब्बल ७०० प्रस्ताव महापालिकेच्या नगररचना विभागाकडे दाखल झाले आहेत. परंतु, नगररचना विभागाने जागामालकांनी सात-बारा उताऱ्यावर वजावट करून ती जागा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याची जबाबदारी संबंधितांवर निश्‍चित केली होती. यावरून वाद निर्माण झाला होता. तरीही २५० प्रस्ताव पालिकेने मंजूर करीत, संबंधितांच्या सातबारा उताऱ्यावरून जागेची वजावट करून घेतली आहे. त्यामुळे या इमारतींना पूर्णत्वाचा दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पर्यायाने ६ व ७.५ मीटर रस्त्यावरील कपाटांचा प्रश्न कायदेशीर मार्गाने सुटण्यास सुरुवात झाल्याने बांधकाम व्यवसायाला मोठा दिलासा मिळणार आहे.

साडेचारशे प्रकरणे प्रलंबित

अडीचशे इमारतींमधील कपाट प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी, साडेचारशे प्रकरणे पालिकेकडे प्रलंबित आहेत. निकाली निघालेली बहुंताश प्रकरणे ही नवीन इमारतींशी संबंधित असल्याचा दावा काही बिल्डरांकडून केला जात आहे. त्या ठिकाणी वाढीव एफएसआय मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. अनेक ठिकाणी या रस्त्यांवर बंगले असल्यामुळे त्यांच्याकडून रस्ता रुंदीकरणासाठी हिरवा कंदील मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे बहुतांश प्रकरणे सुटण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे.

ऑटो डीसीआरही मार्गी

नगररचना विभागात बांधकाम परवानग्याबाबत ऑनलाइन सुरू करण्यात आलेल्या ऑटो-डीसीआर प्रणालीतील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत कंपनी अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात १६ जानेवारीपर्यंत मंजूर प्रस्तावांना पीडीएफ प्रत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवडाभरात या विभाागात दाखल असलेले प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. प्रस्ताव दाखल करताना त्रुटी आढळल्यास त्यासाठीची पूर्तता करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रणालीत एक विंडो शॉर्टफॉल तयार करण्यात आला आहे. कंपनीने आपल्या वतीने नगररचना विभागात दोन अधिकारी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ऑटो डीसीआर प्रणालीही सुरळीत होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Article 10

क्रीडांगणांचे ‘मेक इन’

0
0

महापालिकेकडून १२ कोटींच्या निविदा; मार्चअखेर कार्यपूर्ती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने २०१४ मध्ये तयार करण्यात आलेल्या क्रीडा धोरणाची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. शहराच्या सहा विभागात असलेल्या क्रीडांगणाचा विकास करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नाशिककरांना नवीन क्रीडांगणाचा लाभ घेता येणार आहे.

शहरात अधिकाधिक खेळाडू तयार व्हावेत यासाठी महापालिकेने राज्याच्या क्रीडा धोरणाच्या पार्श्वभूमीवर धोरण तयार केले आहे. यात स्वतंत्र विभाग तयार करून खेळाडूंसाठी विविध योजना आखण्यात आल्या. मात्र, त्या कागदावरच होत्या. हे क्रीडा धोरण मनसेच्या काळात तयार झाल्याने सत्तापरिवर्तन होताच भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यास केराची टोपली दाखवली. परंतु, राज्य सरकारकडून सातत्याने विचारणा होत असल्याने शहरात आरक्षित जागांवर क्रीडांगणे विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील सहाही विभागातील क्रीडांगणासाठी सुमारे १२ कोटींपेक्षा अधिक निधी खर्च केला जाणार आहे. या कामांमुळे महापालिका हद्दीत खेळाडूंना मोठ्या प्रमाणात मैदाने उपलब्ध होणार आहे. महापालिकेने यासाठी भरीव तरतूद केली असून मार्चअखेर ही क्रीडांगणे नागरिकांना वापरायला मिळतील.

अशी साकारली जाणार क्रीडांगणे

विभाग.....प्रभाग...ठिकाण...निधी (रुपयांमध्ये)

सातपूर.....प्रभाग क्र. ९.....गंगापूर शिवार.....३ कोटी १५ लाख ५ हजार ९५९

सातपूर.....प्रभाग क्र. २६.....चुंचाळे शिवार.....२ कोटी ६२ लाख १२ हजार ४५०

पंचवटी.....प्रभाग क्र. ४.....शिवनगर चौफुली.....२ कोटी ९९ लाख ७४ हजार ४९१

सिडको.....प्रभाग क्र. २५.....जुने एसटीपी मैदान.....२ कोटी ४८ लाख ९२ हजार ९८८

सिडको.....प्रभाग क्र. २४.....बॉक्स क्रिकेट मैदान.....५९ लाख ७६ हजार ९९१

महापालिका शहराच्या काही भागात नव्याने क्रीडांगणे विकसित करते आहे, ही चांगली बाब आहे; मात्र या क्रीडांगणाचा वापर खेळासाठीच व्हावा. तेथे लग्नकार्य झाल्यास मैदान खराब होण्यास वेळ लागणार नाही. उशिरा का होईना महापालिकेला जाग आली.

- राजीव जोशी, राष्ट्रीय प्रशिक्षक

खेळाडू सराव करीत असलेल्या ठिकाणी अनेकदा लोक जॉगिंगसाठी येतात. जॉगिंग ट्रॅक आणि खेळाचे मैदान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नवीन मैदानांचा वापर खेळासाठीच व्हावा.

- संदीप फुगट, खेळाडू

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवर-रुबेलाचे ९४ टक्के लसीकरण

0
0

नाशिक : गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण भागाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून लसीकरणात नाशिक विभागात जिल्हा पहिल्या तर राज्यात पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० लक्ष ७४ हजार ३९८ मुलामुलींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शहरी भागात जिल्हा रुगणालयाचे ९८ टक्के नाशिक महापालिकेचे ७४ टक्के तर मालेगाव महापालिकेचे ४८ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्हा ग्रामीण विभागाचे एकूण अपेक्षित शाळेतील ११ लाख ३९ हजार ५४९ पैकी आत्तापर्यंत १० लाख ७४ हजार ३९८ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. गैरहजर विद्यार्थ्यांचे लसीकरण शेवटच्या टप्प्यात केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढेंच्या बंगल्यावरील कर्मचारी हटवले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आयुक्तांचे निवासस्थान मार्चपर्यंत सोडण्यास नकार दिल्यानंतर पालिकेने आता या निवासस्थानावर कार्यरत असलेले सहा कर्मचारीही माघारी बोलवले आहेत. आयुक्त बंगल्याचे वीज देयक भरण्याची सूचना केल्यानंतर आता पालिकेने कर्मचारीही माघारी बोलावल्याने मुंढे यांची कोंडी झाली आहे.

मुंढे यांची नोव्हेंबर महिन्यात मंत्रालयात नियोजन विभागात बदली करण्यात आली. परंतु, ते या विभागात रुजू होण्यापूर्वीच त्याची नव्याने एड्स नियंत्रण सोसायटीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली. बदलीनंतर मुंढे यांनी मुलांच्या शिक्षणाचे कारण देत महापालिका आयुक्तांसाठी राखीव असलेले निवासस्थान मार्च महिन्यापर्यंत कायम ठेवण्याची विनंती सरकारकडे केली होती. सरकारने ही विनंती मान्य केली असली तरी, मुंढे यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या निवास्थानामध्ये जागा द्यावी, अशी विनंती पालिका आयुक्तांनी पुन्हा सरकारकडे केली आहे. अद्याप त्याला प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, आता मुंढे महापालिकेशी संबंधित नसल्याने त्यांना आयुक्त निवासस्थानात राहण्याची परवानगी असली तरी वीज वापराचे देयक अदा करण्याची सूचना पालिकेने केली आहे. त्याचबरोबर आता मुंढे यांच्या दिमतीला आयुक्त बंगल्यावर हजर असलेले सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी अशा सहा जणांना माघारी बोलाविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार आदिवासी तरुणअपघातात जागीच ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा-ताहाराबाद रस्त्यावरील औंदाणे गावाजवळ गुरुवारी दुपारी भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला समोरासमोर दिलेल्या धडकेत दुचाकीवरील चार आदिवासी तरुण जागीच ठार झाले. नववर्षातील पहिलाच मोठा अपघात असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. समाधान दादाजी पटाईत (वय १८), अरुण देवरे (१९), अनिल दगडू माळी (१८), शरद तानाजी सोनवणे (२२, सर्व रा. तळवाडे) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. हे सर्व तरुण एकाच दुचाकीवर होते. अंतापूर येथील कंदोरीच्या कार्यक्रमावरून परतताना हा अपघात झाला.

अंतापूर येथे दावल मलिकबाबा मंदिरातील कंदोरीचा कार्यक्रम आटोपून चारही तरुण गुरुवारी दुपारी एकाच मोटारसायकलवरून सटाणा- मालेगावमार्गे तळवाडे गावाकडे परतत होते. मात्र, दुपारी तीनच्या सुमारास औंदाणे येथील शेताजवळ समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची (एमएच १८/डीबी २९०३) मोटारसायकलला समोरासमोर धडक झाली. त्यात चारही तरुण जागीच ठार झाले. हे तरुण मोलमजुरी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. धडकेनंतर पिकअप वाहनाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, औंदाणे येथील ग्रामस्थांनी पाठलाग करून पिकअप वाहन पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडासंकुलाचे आज लोकार्पण

0
0

जेलरोड : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ११) सकाळी साडेदहाला प्रभाग १७, आढावनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे लोकार्पण केले जाणार आहे. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, बाळासाहेब सानप, अनिल कदम, बापू वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आदींची प्रमुख उपस्थिती राहील. महापौर रंजना भानसी अध्यक्षस्थानी असतील. क्रीडांगणासाठी २४ हजार चौरस मीटर जागा आरक्षित आहे. महापालिका, केंद्र सरकार आणि नाशिक क्रीडा विभाग यांच्या माध्यमातून हे इनडोअर स्टेडियम उभारण्यात आले आहे. २०१६ मध्ये भूमीपूजन झालेल्या या स्टेडियमच्या निधीसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्लीत पाठपुरावा केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्गाला सुवर्ण

0
0

पुणे : खेलो इंडियात महाराष्ट्राच्या दुर्गा देवरेने २१ वर्षांखालील १५०० मीटर शर्यतीत सुवर्ण जिंकले. नाशिकच्याच ताई बामणेला १७ वर्षांखालील गटात ब्राँझवर समाधान मानावे लागले.

सविस्तर वृत्त...११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘विद्युत सुरक्षा’चे गुरुवारी उद्घाटन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुख्य विद्युत निरीक्षक यांच्या वतीने आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन गुरुवारी (दि. १७) करण्यात येणार आहे. सप्ताहाच्या अनुषंगाने विद्युत सुरक्षा जनजागृती करीता विद्युत निरीक्षक, महावितरण, महापारेषण, महाजनको, मनपा, विद्युत ठेकेदार संघटना नाशिक व तसेच जिल्ह्यातील विविध कंपन्याचे सहभागाने कार्यक्रम होणार आहेत. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्युत सुरक्षेवर प्रबोधन, विद्युत सुरक्षेवर चित्रकला, निबंध व कविता स्पर्धा होतील.

अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन, आयटीआय इत्यादी ठिकाणी विद्युत सुरक्षा, विजेचा वापरासंबंधी विविध औद्योगिक व व्यापारी संस्थामध्ये तसेच सोशल मीडियाद्वारे विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती केली जाणार आहे. विद्युत सुरक्षाविषयक पोस्टर्स लावण्यासह जनजागृती रॅली काढली जाणार आहे. महापालिका विद्युत कर्मचारी, महावितरण कर्मचारी, अग्निशमन विभाग मनपा नाशिक यांच्यासाठी विद्युत कार्यशाळाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विद्युत निरीक्षक एच. एन. गांगुर्डे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा रुग्णालयांत सोनोग्राफीची सुविधा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिडकोतील घटनेची गंभीर दखल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतली असून, आता महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये चार सोनोग्राफी यंत्रांच्या खरेदीसाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने ७७ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला आहे.

महापालिकेच्या माध्यममातून नाशिकरोड येथे बिटको रुग्णालय, पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालय, जुन्या नाशकात डॉ. झाकीर हुसेन (कथडा) रुग्णालय, जिजामाता प्रसूतीगृह, सातपूर येथे मायको रुग्णालय, तसेच नवीन नाशिक विभागात स्वामी समर्थ रुग्णालय चालविले जाते. यात प्रामुख्याने गरोदर महिलांच्या नियमित तपासण्यांसाठी सोनोग्राफी करण्यास सांगितले जाते. खासगी रुग्णालयांमधील सोनोग्राफीचा खर्च गोरगरिबांना न परवडणारा असल्यामुळे ते महापालिकेच्या रुग्णालयांचाच आधार घेतात. सद्य:स्थितीत नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय आणि पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयातच सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, सातपूर, नवीन नाशिक, जुने नाशिक या भागातील रुग्णांना, तसेच गरोदर महिलांना सोनोग्राफीसाइी नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात, तसेच पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे रुग्णांचे तसेच गरोदर महिलांचे हाल होतात. बिटको व इंदिरा गांधी रुग्णालयापाठोपाठ आता जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, जिजामाता प्रसूतीगृह, मायको रुग्णालय व स्वामी समर्थ रुग्णालयासाठी चार सोनोग्राफी यंत्रे खरेदी केली जाणार आहेत. त्यासाठी ७७ लाखांचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर या सर्व रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या महिलांचा त्रास वाचणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोतवाल फोटो

एटीएम ‘मास्टर्स’ जेरबंद!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यासह देशभरात फक्त एटीएम फोडून त्यातील लाखो रुपये चोरी करणाऱ्या करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीस क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने गुजरातमध्ये शिताफीने अटक केली. अगदीच सराईत असलेल्या टोळीतील सदस्यांवर हरियाणा पोलिसांनी बक्षीससुद्धा जाहीर केलेले आहे. या टोळीच्या अटकेमुळे उपनगर येथील एटीएम फोडल्याचा गुन्हा उघडकीस आला.
साहून अली मोहम्मद खान (रा. हरियाणा), जुबेर जुम्मा खान (गुजरात) आणि शौकिन जानु खान (हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तिघांसह त्यांच्या आणखी पाच साथीदारांनी मिळून ११ ऑक्टोबर २०१८ रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास फेम सिनेमा परिसरातील शिवाजीनगर येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडले होते. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून २८ लाख २२ हजार ५०० रुपयांची रक्कम घेऊन संशयित पसार झाले होते. या गुन्ह्याचा तपास युनिट एकच्या पथकाकडे होता. या गुन्ह्यात हरियाणा राज्यातील टोळीचा समावेश असल्याची माहिती तपासादरम्यान युनिटला मिळाली होती. या टोळीतील काही सदस्यांच्या हालचालींवर पोलिसानी लक्ष केंद्रित केले होते. टोळीतील वरील संशयित अहमदाबाद येथे येत असल्याचे पोलिसांना समजताच सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार रवींद्र बागुल, येवाजी महाले, कॉन्टेबल विशाल देवरे, स्वप्निल जुंद्रे, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण यांचे पथक अहमदाबादकडे रवाना झाले. अहमदाबादमध्ये संशयितांचा माग काढून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पालकर, सहायक उपनिरीक्षक पोपट कारवाळ, बाळू दोंदे, हवालदार रवींद्र बागुल, वसंत पांडव, विजय गवांदे, संजय मुळक, अनिल दिघोळे, पोलिस नाईक आसिफ तांबोळी, संतोष कोरडे, मोहन देशमुख, शांताराम महाले, पोलिस शिपाई नीलेश भोईर, गणेश वडजे, विशाल देवरे, प्रतिभा पोखरकर आदींनी केली.
--
राज्यात चार ठिकाणी डल्ला
या टोळीतील आणखी पाच सदस्य फरारी असून, पोलिस त्यांचा माग काढीत आहेत. पोलिसांनी अटक केलेल्यांकडे चौकशी केली असता त्यांनी उपनगरसह देवगाव रंगारी (जि. औरंगाबाद), कराड, सातारा, इस्लामपूर, सांगली आदी ठिकाणी एटीएम फोडल्याची कबुली दिली. युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांनी सांगितले, की या टोळीला कोर्टात हजर करून पोलिस कोठडी घेतल्यानंतर आणखी चौकशी करण्यात येईल. यापूर्वी दिल्ली येथील एका टोळीस याच पद्धतीने अटक करण्यात आली होती. ही टोळी दिवसा घरफोडी करून परत दिल्लीला पोहोचायची. त्याच धर्तीवर हरियाणा येथील टोळीचे काम असून, ही टोळी फक्त एटीएमलाच लक्ष्य करीत असल्याचे वाघ यांनी स्पष्ट केले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुष्पोत्सव नव्हे खुली तिजोरीच जणू!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तब्बल दहा वर्षांनंतर महापालिकेत होत असलेल्या पुष्पोत्सवाला आता उद्यान विभागाने मेगा इव्हेन्टचे स्वरूप देण्याची तयारी चालवली आहे. महापालिकेकडे सुरक्षा रक्षक आणि खासगी गनधारी सुरक्षारक्षकांची फळी उपलब्ध असताना फुलांच्या संरक्षणासाठी आता चक्क बाउन्सर नियुक्तीचा हट्ट ठेकेदाराकडे धरला जात आहे. त्यामुळे आता सुरक्षारक्षक, गनधारी खासगी सुरक्षा रक्षकांपाठोपाठ पुष्पोत्सवाला बाउन्सरच्या रुपाने तिहेरी संरक्षण प्राप्त होणार असले तरी, या कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे पाना-फुलांसह पुष्पप्रेमी कोमेजणार तर नाहीत, ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

महापालिकेच्या वतीने तब्बल दहा वर्षांनंतर प्रथमच येत्या २२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सन १९९३ पासूनची परंपरा २००८ मध्ये खंडित झाली होती. परंतु, नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या पुष्पोत्सवाला चालना दिली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीच्या प्रस्तावाला आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर उद्यान विभागाने उत्सवासाठी लगीनघाई सुरू केली आहे. यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली होती. परंतु, आयुक्तांनी हा खर्च जास्त असल्याचे सांगत, त्याला २० लाखांची कात्री लावली. त्यामुळे ३० लाखांत हा पुष्पोत्सव साजरा केला जाणार असून, त्याला नामांकित कंपन्या, उद्योजक, सहकारी बँका, हॉटेल्स, व्यापारी समूह यांच्याकडूनही फंडिंग होणार आहे. या सोहळ्याची जबाबदारी उद्यान विभागाने खासगी ठेकेदारावर सोपवण्याची तयारी केली आहे. त्यासाठी इच्छुकांची नुकतीच प्री-बिड बैठक पार पडली. या बैठकीत सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. जरबेरा, शेवंती, गुलाब, कमळ, मोगरा, जास्वंदी यांचे पुष्पप्रदर्शन, तसेच गीतगायनाचेही कार्यक्रम होणार आहेत. त्यात व्हीआयपींचाही समावेश असणार आहे.

पाना-फुलांचे संरक्षण?

गर्दीला हाताळण्याासठी बाउन्सर असावेत, असा हट्ट उद्यान विभागाने चालवला आहे. अगोदरच पालिकेकडे दुहेरी सुरक्षा व्यवस्था असताना खासगी बाउन्सर्सचा आग्रह का, याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. आतापर्यंत गर्दीचे नियंत्रण करणारे बाउन्सर पाना-फुलांचे संरक्षण कसे करणार, हा मोठा प्रश्न ठेकेदारांनाही पडला आहे. उद्यान विभागाच्या या अटीमुळे आता ठेकेदारांसमोर यक्षप्रश्न पडला असून, पाना-फुलांच्या संरक्षणासाठी कोणते बाउन्सर द्यायचे, याचा विचार सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images