Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आयुक्तांचा मुक्काम मुख्यालयीच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षणात राज्यातील शहरांची कामगिरी अधिक सुधारून राज्यातील शहरे पहिल्या शंभरात येण्यासाठी राज्य शासनानेही प्रयत्न सुरू केले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत ४ जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून, या पथकाकडून अचानक भेटी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे या सर्वेक्षणाची पूर्वतयारी व संनियंत्रण योग्य रितीने होण्यासाठी केंद्राच्या पथकामार्फत प्रत्यक्ष पाहणी आणि नागरिकांचे अभिप्राय याबाबतची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत महापालिका आयुक्तांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश नगरविकास विभागाने जारी केले आहेत.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ४ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान स्वच्छता सर्वेक्षण सुरू झाले आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्यांमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी मिशन मोड पध्दतीने सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नागरी स्थानिक संस्थांचे मूल्यमापन हे प्रत्यक्ष स्थळभेटीच्या आधारावर अपेक्षित आहे. त्यामुळे सर्व नागरी स्थानिक संस्थांनी सर्वेक्षणाच्या संपूर्ण कालावधीत मूल्यमापनाच्या दृष्टीने प्रत्येक दिवशी परिपूर्ण तयारी करणे आवश्यक आहे. महापालिका आयुक्तांनी सर्वेक्षणाची पूर्व तयारी व संनियंत्रण योग्य रितीने होण्यासाठी या कालावधीत मुख्यालयी राहणे अनिवार्य असल्याचे आदेश नगरविकास विभागाचे सहसचिव सं. श. गोखले यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जवाटपाचे खुलासासत्र

$
0
0

जिल्हा बँकेतील संचालकांच्या अडचणी वाढल्या

...

- कर्जवाटप संचालकांच्या आदेशानेच

- अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुनावणी

-

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी आजी-माजी ३८ संचालकांसह ८० अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही नोटिसा बजावल्यानंतर संचालक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आता खुलासासत्र सुरू केले आहे. या कर्मचाऱ्यांना बजाविलेल्या नोटिंसावर सोमवारी जिल्हा उपनिंबधक गौतम बलसाणे यांच्याकडे प्राथमिक सुनावणी सुरू झाली. यात कर्जवाटपात सहभागी असलेल्या आणि १० ते १५ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हजेरी लावत बाजू मांडली. आम्ही फक्त आदेशाचे पालन करतो, कर्जवाटपाचा आमचा अधिकार नाही असे सांगत, आमचा दोष नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे संचालकांच्याच अडचणी अधिक वाढल्या आहेत.

जिल्हा सहकारी बँकेने सन २००२ ते २०१२ मध्ये केलेल्या कर्जवाटपात ३४७ कोटींची थकबाकी असून, लेखापरीक्षक जयेश आहेर यांनी या कर्जवाटपाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला होता. यात मोठी अनियमितता आढळून आल्याने गेल्या आठवड्यात बँकेच्या माजी-माजी ३८ संचालकांना नोटिसा बजाविल्या. तसेच, तत्कालीन कार्यकारी संचालक वाय. आर. शिरसाठ, सुभाष देसले, बी. आर. पाटील यांच्यासह ८० अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठविल्या. सोमवारी यात अनेक संचालकांनी बाजू मांडली, तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या कर्जवाटपाचे खापर संचालक मंडळावर फोडले. कर्मचाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक बलसाणे यांच्यासमोर हजेरी लावत आपली बाजू मांडली.

..

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले हात वर

अनेक कर्मचाऱ्यांनी आमचा दोष नसल्याचे स्पष्टीकरण देत, संचालकांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम केल्याचा दावा केल्याचे सांगण्यात येत आहे. आम्ही फक्त आदेशाची अंमलबजावणी करतो, आमचा दोष नाही असे सांगत सर्व खापर संचालक मंडळावर फोडले आहे. त्यामुळे या संचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

..

संचालकांच्या मालमत्तांवर बोजा चढविणार

संक्रांतीनंतर कर्जाच्या वसुलीसाठी तत्कालीन संचालकांच्या स्थावर मालमत्ता शोधून त्यावर बँकेचा बोजा नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. सध्या पीककर्ज वसुलीस स्थगिती असल्याने बिगर शेतीकर्ज वसुलीवर भर दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमातर्फे प्रशिक्षणवर्ग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर येथे निमा हाऊसमध्ये 'बेसिक एमएस-एक्सेल' या विषयावर प्रशिक्षणवर्ग झाले. या प्रशिक्षणवर्गात सीए अविनाश शुक्ल यांनी प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणवर्गास ४५ प्रशिक्षणार्थींचा सहभाग होता. या प्रशिक्षणवर्गात बहुमूल्य प्रात्यक्षिक ज्ञान मिळाल्याचे समाधान व्यक्त करीत भविष्यातदेखील अशा तऱ्हेच्या व्यवहारोपयोगी प्रशिक्षणवर्गांचे आयोजन व्हावे, अशी भावना व्यक्त केली.

या वर्गात फॉरमॅटिंग, कंडिशनल फॉरमॅटिंग, फॉर्म्युलास, टेक्स्ट फॉर्म्युलास या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी निमा दिंडोरीचे अतिरिक्त उपाध्यक्ष संजय सोनवणे, निमा सिन्नरचे अतिरिक्त उपाध्यक्ष संदीप भदाणे, निमा आयटी व सेमिनार समितीचे अध्यक्ष गौरव धारकर तसेच, सौमिक बॅनर्जी, आयटी व सेमिनार समितीचे अध्यक्ष गौरव धारकर यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडी परतली; पारा सात अंशावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडी परतली असून निफाडमध्ये सोमवारी पुन्हा किमान तापमान ४ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले. नाशिकमध्येही ७.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मंगळवारपर्यंत थंडीचा कडाका कायम राहील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर महाराष्ट्रात रविवारपासून थंडीची लाट येण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तविली होती. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. रविवारी कमाल तापमान २८.७ तर किमान तापमान ९.७ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. हेच तापमान सोमवारी अधिक घसरले. कमाल तापमान २६.६ तर किमान तापमान ७.६ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले. निफाडमध्ये तर किमान तापमान चार अंश सेल्सियस नोंदविले गेले असून थंडीचा कडाका वाढू लागल्याने द्राक्ष उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी झाल्याने मध्य भारताच्या मैदानी प्रदेशातून उत्तरी वारे वाहू लागल्याने थंडी वाढली असून मंगळवारी देखील नाशिककरांना थंडीच्या कडाक्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिंत कोसळून मायलेक ठार

$
0
0

ट्रॅक्टरचालकाचा ताबा सुटल्याने अपघात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उंटवाडी रोडवर ट्रॅक्टरच्या धडकेतून घरावर कोसळलेल्या भिंतीमुळे मायलेक ठार झाल्याची गंभीर घटना सोमवारी दुपारी घडली. गुदमरल्याने १८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर उपचार सुरू असताना आईचीही प्राणज्योत मालवली. प्रकाश सरकटे (वय १८) आणि सत्यभामा सरकटे (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

उंटवाडी रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात रस्त्याचे काम सुरू आहे. मुरुमाने भरलेला ट्रॅक्टर मागे घेत असताना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चालकाचा अचानक ताबा सुटला. त्यामुळे हा ट्रॅक्टर कार्यालयाच्या दगडी भिंतीवर जोरदार धडकला. यामुळे भिंत लगतच्या पत्र्याच्या घरातील कोसळली. यात मायलेक ढिगाऱ्याखाली दाबले गेले. श्वास गुदमरल्याने प्रकाशचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सत्यभामा सरकटे यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री त्यांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेत सरकटे कुटूंबाचा संसार उद्‌ध्वस्त झाला. अग्निशमन दलाच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. घडलेल्या घटनेबाबत परिसरातील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भिंत कोसळल्यानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

\Bगंभीर गुन्हाची व्हावी नोंद!

\Bअपघातासाठी ट्रॅक्टर चालकासोबतच बांधकाम विभाग व महापालिकेचे अधिकारीही दोषी आहेत. अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने काम होते की नाही याकडे लक्ष दिले नाही. तसेच कामात हलगर्जीपणा केला. त्यामुळे भिंत कोसळून दोन जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे या घटनेसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकावर गंभीर गुन्ह्याची नोंद व्हावी, अशी मागणी नगरसेविका रोशनी घाटे आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर घाटे यांनी केली आहे. घटनास्थळी भेट देऊन त्यांनी पाहणी केली. तसेच, याप्रकरणी पाठपुरावा करणार असल्याचेही सांगितले.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा सडला, उकिरड्यावर फेकला

$
0
0

बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गेल्या दहा महिन्यांपासून चाळीत साठविलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. रोजच कोसळणाऱ्या बाजारभावामुळे चाळीतील कांदा पाहून शेतकरी पश्चाताप करीत आहेत. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून दहा महिन्यांपासून चाळीत साठविलेल्या उन्हाळ कांद्या कोंब फुटू लागल्यामुळे सडलेला कांदा फेकण्याची शेतकऱ्यांवर आली आहे. बागलाण तालुक्यातील बहुसंख्य कांदा चाळीतील कांदा सडण्याचा मार्गावर असून, काह कांद्याला कोंब फुटले आहेत.

बागलाण तालुक्यातील नवेनिरपूर येथील शेतकरी शांताराम दादाजी गुंजाळ यांनी आपल्या ३०० क्किटंल कांद्याची लागवड केली होती. उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल, कर्ज फेडून दोन पैसे काही उरतील या अपेक्षेने त्यांनी सुमारे सगळा उन्हाळ कांदा (३०० क्विंटल) दहा महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवला होता. कांद्याला भाव येतील आणि आपण साठविलेला कांदा विक्रीसाठी चाळीबाहेर काढू या अपेक्षेन दिवसामागे दिवस गेले मात्र बाजारभाव वाढण्याऐवजी कमीच होत गेले.

त्यामुळे चाळीतील कांद्याला कोंब फुटले आहेत. अशा परिस्थितीत जर कांदा मार्केटमध्ये नेऊन विकला तर त्याला निश्‍चित मातीमोल भाव मिळेल याची जाणीव झाली गुंजाळ यांना झाल्यामुळे त्यांनी हा सगळा कांदा चाळीतून बाहेर काढून उकिरड्यावर फेकण्याची तयारी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीतील कामकाज ‘ऑनलाइन’

$
0
0

नववर्षापासून 'ऑफलाइन' कामकाज बंद

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयात १ जानेवारीपासून ऑफलाइन कामकाज बंद करून सर्व कामे आता ऑनलाइन केली आहेत. या ऑनलाइन कामासाठी महामंडळाने सिटीजन चार्टरनुसार सेवा देण्याचा कालवधी निश्चित केला आहे. त्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळणार आहे. सरकारी कार्यालयात सर्वत्र ऑनलाइन सेवा सुरू झाल्यानंतर आता एमआयडीसीचा कारभारही डिजिटल झाला आहे.

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यासाठी सातपूर येथे या विभागाचे विभागीय कार्यालय आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील उद्योजकांचा या ऑनलाइनमुळे कामकाजामुळे फायदा होणार आहे. एमआयडीसीने याअगोदर फाइल ट्रॅकिंग सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे लावून कामकाजात सुधारणा केली आहे. त्यात आता ऑनलाइन कामकाजाची भर पडणार आहे. त्याचप्रमाणे फाइल स्कॅनिंगचे कामही या विभागात सुरू असून, ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात सातपूर औद्योगिक क्षेत्रात ११२२, अंबड येथे १६१६ भूखंड आहेत. त्याचप्रमाणे सिन्नर येथे १००२, विंचूर, दिंडोरी, मालेगाव, पेठ, या ठिकाणी भूखंड आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर येथे १४६८, सुपा ५२५, श्रीरामपूर ६४१, नेवासा ३५९, राहुरी ५६, जामखेड येथे २ असे भूखंड आहेत. यातील बहुतांश ठिकाणी उद्योग सुरू झाले आहेत.

...

असा होता कारभार

एमआयडीसीमध्ये ऑफलाइन काम चालत असल्यामुळे अनेक गैरप्रकार होत होते. त्यातील फाइल गहाळ प्रकरण तर जिल्हाभर गाजले. त्यानंतर एमआयडीसीने आपल्या कामात सुधारणा केली. पण, त्यानंतरही त्यात सुसूत्रता नव्हती. त्यामुळे आता ऑनलाइन काम केल्यामुळे त्यातून दिलासा व गैरप्रकारालाही आळा बसणार आहे.

...

अशी असेल सेवा

भूखंड, गाळे शेड वाटप करणे (२१ दिवस), भूखंड वाटप समितीची बैठक (१५ ते ३० दिवस), देकारपत्र देणे (२ दिवस), देकारपत्राची रक्कम आले नंतर वाटपपत्र देणे (७ दिवस), संपूर्ण रक्कम भरल्यानंतर भूखंडाचा ताबा देणे (७ दिवस), प्राथमिक करारनामा (७ दिवस), उद्योग विस्तारासाठी भूखंड वाटप करणे (२१ दिवस), बांधकाम करण्यास मुदतवाढ देणे (१५ दिवस), भूखंड परत करून परतावा रक्कम देणे ( ३० दिवस), भूखंड एकत्रीकरण (७ दिवस), भूखंड पोटभाड्याने देणे (७ दिवस), भूखंड हस्तांतरण करणे (१५ दिवस), भूखंडाचे विभाजन व हस्तांतरण करणे (२१ दिवस), भूखंड वित्तीय संस्थेस तारण देणे (१५ दिवस), भूखंडाच्या वापरात बदल करणे (२१ दिवस), उत्पादनात बदल करणे (१५ दिवस), प्रॉपर्टी कार्ड (तात्काळ)

...

एक जानेवारीपासून ऑफलाइन कामकाज बंद करून सर्व कामकाज ऑनलाइन सुरू केले आहे. त्यामुळे उद्योजकांचा वेळ वाचणार आहे. ऑनलाइन कामामुळे त्यांना मेसेजसुध्दा जाणार आहेत. त्यातून त्यांना आपल्या कामाची माहितीही मिळणार आहे.

- हेमांगी पाटील-भामरे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कार्यालये ओसवीज कर्मचारी संपास नव्वद टक्के प्रतिसाद,कार्यालयांत शुकशु

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राज्यातील वीज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आणि सार्वजनिक ऊर्जा-उद्योग धोरणाबाबत कंपनी व्यवस्थापनाकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा करुनही यश मिळाले नाही. त्यामुळे वीज कर्मचारी-अभियंते संघटना संयुक्त कृती समितीने सोमवारी (दि. ७) पुकारलेल्या लाक्षणिक संपास नव्वद टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा कृती समितीकडून करण्यात आला. संपाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथील वीज भवनासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले.

कृती समितीच्या निवेदनानुसार चारही वीज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आणि ऊर्जा-उद्योग धोरणाबाबत कृती समिती व्यवस्थापनाकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यासाठी वेळोवेळी बैठका होऊन मंत्री व व्यवस्थापन पातळीवर वाटाघाटीही झाल्या. मात्र, अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कृती समितीने संप पुकारला. सोमवारच्या संपात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक फेडरेशन, वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सबॉर्डिनेट इंजिनीअर असोसिएशन, म. रा. वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस आदी संघटनांचे अरुण म्हस्के, पंडित कुमावत, मधुकर जाधव, विशाल निंबाळकर, लक्ष्मण बेलदार, हर्षद काठे, सुनील पाटील, सुधीर गोरे, किरण मिठे, किसन बगड, मिलिंद दंडगव्हाळ, दीपक कास आदी उपस्थित होते.

सार्वजनिक वीज उद्योगांबाबत सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी वीज अभियंते आणि कर्मचारी कृती समितीने पुकारलेल्या एक दिवसीय संपास नव्वद टक्के प्रतिसाद मिळाला. काही संघटना आज आणि उद्याच्या देशव्यापी संपातही सहभागी होणार आहेत.

- अरुण म्हस्के, उपसरचिटणीस, महाराष्ट्र वीज वर्कर्स फेडरेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अविष्कार निवड चाचणीत ३८१ विद्यार्थ्यांचा सहभाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वरिष्ठ महाविद्यालयीन स्तरापासून संशोधनास चालना मिळावी यासाठी आयोजित अविष्कार संशोधन महोत्सव आता आंतरविद्यापीठ स्तरावर आयोजित करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात अविष्कार प्राथमिक निवड चाचणी झाली. यात इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी, मेडिकल आणि फार्मसी, वाङमय, भाषा व ललीतकला, वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा, विज्ञान, शेती आणि पशुसंवर्धन या विषयांवर विविध महाविद्यालयांमधून आलेल्या ३८१ विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

स्पर्धेत पदवीपूर्वचे २६३, पदव्युत्तरचे ९२ विद्यार्थी, निष्णात (पदव्युत्तर एम. फिल, पीएच. डी)चे ५ आणि शिक्षक गटातून २१ स्पर्धक सहभागी आहेत. अशा संवर्गातून सहभागी स्पर्धकांनी आपले संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले. स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यार्थी कल्याण विभागचे संचालक डॉ. संदीप गुंडरे, डॉ. विनय सोनांबेकर, डॉ. पुरुषोत्तम गिरी, डॉ. शिशिर पांडे, डॉ. नीता गांगुर्डे, डॉ. संजय खेडकर डॉ. महेश मित्र, डॉ. ज्ञानदेव चोपडे, डॉ. सुनील थिमदे, डॉ. अशोक वानकुद्रे, डॉ. हुसेन आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक गरजा लक्षात घेऊन नाविण्यपूर्ण संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढीस लागावी, त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या संशोधनास व्यासपीठ मिळावे तसेच केलेल्या संशोधनला लोकमान्यता मिळावी, असे विविध हेतू साध्य व्हावे यासाठी अविष्कार संशोधन प्रकल्प आंतरविद्यापीठस्तरीय महोत्सव सुरू करण्यात आल्याचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले. आविष्कार प्राथमिक निवड चाचणीसाठी विद्यापीठातील किशोर पाटील, राजेश इस्ते, सीमा नाटेकर, स्मिता करवल, आबाजी शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. डॉ. रत्नपारखी यांचे शनिवारी व्याख्यान

$
0
0

नाशिक : परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रदूत स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवकदिनी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. १२ व १३ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे सभागृह, जलशुद्धीकरण केंद्रालगत हॉटेल सिबलजवळ, त्र्यंबकरोड येथे 'अखेर स्वामीजी इष्टस्थळी पोहचले!' या विषयावर प्रा. डॉ. उल्हास रत्नपारखी यांचे व्याख्यान होणार आहे.

...

उद्या आरोग्यावर व्याख्यान

नाशिक : ओझर येथील योगाकार फिटनेस पार्इंटच्या वतीने महिलांच्या आरोग्याबाबत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. एम. एन. नागमणी यांचे व्याख्यान होणार आहे. बुधवारी (दि. ९) सायंकाळी ६ वाजता योगाकार फिटनेस, सिंधू निवास, यमुनानगर, पंचवडनगर येथे हा कार्यक्रम होईल. ओझर व परिसरातील महिलांनी या व्याख्यानाचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याविषयीच्या शंकाचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन योगाकार फिटनेस पार्इंट संचालिका नूतन गायकवाड यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचा महावितरणला ‘झटका’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कधी वीज दरवाढ, कधी लोडशेडिंगचा शॉक देणाऱ्या महावितरणला महापालिकेनेच शॉक दिला आहे. पाथर्डी फाटा येथील कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी सुरू झालेल्या 'वेस्ट टू एनर्जी' या प्रकल्पातून दररोज तयार होणारी एक हजार युनिट वीज फुकट वापरणाऱ्या महावितरणला आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दणका दिला आहे. महावितरण वापरत असलेली वीज वापरात वजावट करण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेच्या वतीने जर्मनस्थित जीआयझेड कंपनीच्या वतीने पाथर्डी येथील खत प्रकल्पालगत 'वेस्ट टू एनर्जी' हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जात आहे. शहरातून जमा होणाऱ्या ३० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून ३३०० युनिट वीज निर्मितीची क्षमता या केंद्रात विकसित करण्यात आली आहे. प्रामुख्याने हॉटेल वेस्ट, मलबा, गाळ, गटारयुक्त पाणी, मैला या प्रकल्पासाठी अपेक्षित आहे. अशा प्रकारच्या कचऱ्यातून वीज निर्मिती करणारी राज्यातील नाशिक मनपा पहिलीच आहे. सध्या या प्रकल्पातून दररोज ८०० ते १००० हजार युनिट विजेची निर्मिती करण्यात येते. प्रकल्पात तयार झालेली वीज महावितरणच्या ग्रीडमध्ये टाकली जात जाते. परंतु, महावितरणकडून त्याचा परतावा मिळत नव्हता. त्यामुळे महापालिकेला परतफेड होत नसल्याने पालिकेचेच आर्थिक नुकसान होत होते. गेल्या शनिवारी आयुक्तांनी केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली. त्यांनी महावितरणला पुरवल्या जाणाऱ्या विजेची वजावट अन्य वापरातील बिलातून का होत नाही, असा सवाल केला. त्यावर यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता माळी म्हणाले की, 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाजवळ किती विजेचा पुरवठा होतो हे दर्शविणारे स्पेशल मीटर आहे. परंतु, महावितरणने आता नवीन अट टाकत जेथे विजेची वजावट अपेक्षित आहे, तेथे स्पेशल मीटर बसवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आयुक्तांनी तातडीने वजावटीचे ठिकाण निश्चित करत, मीटर बसविण्याचे आदेश दिले. महावितरणकडून यापूर्वीचीही वजावट वसूल करण्याचे आदेश त्यांनी दिले.

आगरटाकळीत वजावट

महावितरण वापरत असलेली विजेची वजावट आता आगटाकळी येथील मलजलशुद्धीकरण केंद्रात केली जाणार आहे. या ठिकाणी तातडीने स्पेशल मिटर बसवून वीज वजावट सुरू करा, असे निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे विभागाने तातडीने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या वीज वजावट मीटरमुळे पालिकेचा मोठा आर्थिक फायदाही होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वरानंदवनात श्रोते मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अपंग असूनदेखील व्हीलचेअरद्वारे केलेले चित्तथरारक नृत्य, गतिमंद गायकाचा सुमधूर आवाज, मंददृष्टीकडे पाठ करून गिटार ढोलकीसह वाजविलेली वाद्ये आणि मराठी, हिंदी चित्रपटातील गीते, भावगीत सुमारे शंभराहून अधिक कलाकारांनी सादर केले. अंध, अपंग, कर्णबधिर, मूकबधिर, आदिवासी, विकलांग कलावतींना बहारदार कला सादर करून नाशिककरांना मंत्रमुग्ध केले.

इन्फंट इंडियाच्या वतीने आनंदवन निर्मित स्वरानंदवन संगीत रजनीचा कार्यक्रम दादासाहेब गायकवाड सभागृहात झाला. गीतांतून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक प्रबोधनही करण्यात आले. आनंदवनातील ११० अपंग, मूकबधिर, कुष्ठरोगी, अनाथ कलावंतांनी गायन, वादन व नृत्य कलेच्या सादरीकरणाद्वारे उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'मुक्तांगणात यारे, आनंद सागरात या यारे' हे ग. दी. माडगूळकर लिखित गाणे अंध युवतींनी सादर केले. आनंदवनातील कुष्ठरोगी दाम्पत्यांच्या मुलींनी गणेशवंदना नृत्य सादर केले. दृष्टीहीन आणि गतिमंद कलाकारांनी 'दिल चीज क्या हैं', 'ही वाट दूर जाते..' ही गीते सादर केली. आनंदवन कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. 'डोला रे डोला' गीतावरील व्हीलचेअरवरील तरुणींनी सादर केलेल्या नृत्य पाहताना उपस्थितांचे भान हरपले होते. काही कलाकारांनी प्राणी, पक्षी तसेच सिनेकलावंतांचे हुबेहूब आवाज काढले. कार्यक्रमात व्हीलचेअरवर असलेले आनंदवन येथील सुधीर कदम यांनी आपल्या बहारदार सूत्रसंचालनातून कार्यक्रमात रंग भरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानशूर काकूशेठ यांचे स्वप्न साकार

$
0
0

अशोक मर्चंट यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणात नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे योगदान मोलाचे आहे. दानशूर काकूशेठ उदेशी यांनी १९८७ मध्ये या संस्थेला २३ एकर जमीन ही शैक्षणिक उद्दिष्टासाठी दिली. त्याचे पुढील काळात सोने करीत असंख्य विद्यार्थ्यांना या संस्थेने ज्ञानदान करून काकूशेठ उदेशी यांचे स्वप्न साकार केले, असे गौरवोद्गार संस्थेचे विश्वस्त काकूशेठ उदेशी यांनी काढले.

वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, शकुंतला वाघ, संस्थापक अध्यक्ष विजय मोरे, सुषमा मर्चंट, विश्वस्त चांगदेव होळकर, चंद्रकांत मथुरिया, समीर वाघ, अजिंक्य वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी, मुख्य-समन्वयक तथा प्राचार्य डॉ. के. एन.नांदूरकर, समन्वयक सुवर्ण महोत्सव समिती प्रा. एम. बी. झाडे, डॉ. व्ही. एम. सेवलिकर, डॉ. बी. जी. वाघ, डॉ. के. एस. जैन आदी उपस्थित होते.

अमृतधाम, पंचवटी येथील हिराबाई हरिदास विद्यानगरीच्या प्रांगणात सोमवारी सत्यनारायण पूजन होऊन सुवर्ण महोत्सवाचा दुपारी प्रारंभ झाला. यानंतर वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर यांच्या हस्ते माजी मंत्री तुकाराम दिघोळे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. दिनेश बच्छाव, अॅड. दिलीप वनारेसे, माजी प्राचार्य आर. टी. मोरे, अॅड. रमेश जाधव आणि हेमंत वाघ आदींचा सत्कार करण्यात आला. पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या जीवनावर आधारित लघुचित्रपट आणि सुवर्ण महोत्सवी बोधचिन्हाचे अनावरण मर्चंट आणि संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या वाटचालीत योगदान असल्याने मर्चंट कुटुंबीयांना यावेळी गौरविण्यात आले.

प्राचार्य डॉ. के. एन.नांदूरकर यांनी संस्थेच्या विस्तार व उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या वाटचालीबाबत डॉ. बी. व्ही. कर्डिले यांनी माहिती दिली. प्राचार्य डॉ. नांदूरकर यांनी प्रास्ताविक तर स्वाती पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पी. टी. कडवे यांनी आभार मानले.

१९७० रोजी लावलेल्या के. के. वाघ शिक्षण संस्थारुपी रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. गेल्या ५० वर्षांत कै. रतनशी हरिदास उदेशी अर्थात काकूशेठ आणि त्यांचे सुपूत्र अशोक मर्चंट, चंद्रकांत मर्चंट यांच्यासारख्या अनेक धुरंधर सहकाऱ्यांची साथ लाभली.

- बाळासाहेब वाघ, अध्यक्ष

ग्रामीण भागातून चटाईच्या भिंतीपासून सुरू झालेल्या या संस्थेने ५० वर्षात यशाचे उच्च शिखर गाठल्याने अत्यांनद होत आहे. या संस्थेने अशीच गुणवत्ता राखत परदेशातही शिक्षण संस्थेची शाखा सुरू करावी.

- विजय मोरे, संस्थापक अध्यक्ष

लोगो : शाळा-कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालत्या बसचे टायर पेटले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पंचवटीकडुन नाशिकरोडकडे जाणाऱ्या शहर बससेवेच्या एका बसच्या मागील चाकाच्या टायरने पेट घेतल्याची घटना सोमवारी सकाळी साडे आठ वाजता बिटको चौकातील पवन हॉटेलसमोर घडली. हा प्रकार लक्षात आल्यावर पालिकेच्या मलेरिया विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील १४ प्रवासी सुखरुप वाचले.

शहर बससेवेची बस क्रमांक एमएच १५, एके ८०८९ ही सोमवारी सकाळी नाशिककडून नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असताना बिटको चौकातील सिग्नल ओलांडून पुढे जात असताना या बसच्या वाहकाच्या बाजूकडील मागील चाकाजवळून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. पवन हॉटेलजवळील चहाच्या दुकानापुढे चहासाठी थांबलेल्या पालिकेच्या मलेरिया विभागातील कर्मचारी सुरज सगर, महेंद्र अरिंगळे, जनार्दन घंटे यांच्या हा प्रकार लक्षात आला. सूरज सगर या युवकाने तत्काळ या बसच्या पुढे जाऊन चालकाला बस थांबविण्याचा इशारा केला व आग लागल्याची माहिती दिली. बसचालक कदम यांनी तत्काळ बस थांबवली. या बसमधून प्रवास करणाऱ्या सर्व १४ प्रवाशांना प्रथम बसमधून खाली उतरवून घेतले. सगर, अरिंगळे, घंटे यांनी जवळच्याच हॉटेलमधून बादलीने पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. धुराचे प्रमाण वाढल्याने पालिकेच्या नाशिकरोड अग्निशमन दलाला फोनद्वारे माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान एम. एन. मधे, आर. व्ही. आहेर, एम. के. साळवे, आर. एम. दाते, एस. के. आडके आणि ए. वाय. मिलिमणी आदींनी घटनास्थळी बंब दाखल करून आग विझवली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंकराचार्य भारती बुधवारपासून शहरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सनातन धर्माच्या उत्थान व प्रसारासाठी होत असलेल्या विजययात्रेसाठी जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधूशेखर भारती यांचे नाशिकला आगमन होत असून ९ ते १५ जानेवारी यादरम्यान पंचवटीतील शृंगेरी मठात त्यांचे वास्तव्य राहणार आहे. या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात प्रवचन, भजन याचा समावेश आहे.

काळाराम मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळ असलेल्या या शृंगेरी मठात २८ व २९ व्या शंकराचार्यांच्या समाधी असून त्याची रोज पूजा होते. दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठ, शृंगेरी चे ३६ वे आचार्य जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री भारतीतीर्थ महास्वामीजी यांच्या कृपाशिर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी विधूशेखर भारती यांनी कर्नाटकमधून विजययात्रेचा प्रारंभ केला आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात येत असून नाशिकक्षेत्री तिचे वास्तव्य राहणार आहे. जगद्गुरू बुधवारी (दि. ९) सायंकाळी भाविकांना अनुग्रह प्रवचन देणार आहेत. तसेच रात्री श्री शारदा चंद्रमौलेश्वराची पूजा करणार आहेत. तसेच सोमवारी (दि. १४) शंकराचार्य संकुल येथे सायंकाळी ५ वाजता प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन रामगोपाल अय्यर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठी विकिपीडिया समृद्ध करण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विकिपीडिया हे ज्ञानाचे आधुनिक माध्यम आहे. विद्यार्थी व प्राध्यापकांना मराठी विकिपीडिया समृद्ध करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. विद्यार्थांनी आपल्या लिखाणात परिसरातील परंपरा, प्रथा, सांस्कृतिक ठेवा या माध्यमातून व्यक्त व्हायला हवे, असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेचे तज्ज्ञ विजय सरदेशपांडे यांनी केले.

नाशिकरोड येथील बिटको कॉलेजमध्ये आयोजित मराठी विकिपीडिया कार्यशाळेत ते बोलत होते. राज्य सरकारच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य संजय तुपे होते. सरदेशपांडे म्हणाले, की मराठी विकिपीडिया हे मुक्त व्यासपीठ आहे. यामधील लेख, माहिती संदर्भासाठी कोणीही व्यक्ती संदर्भ देऊन वापरू शकतो. त्यासाठी पैसे लागत नाहीत. त्यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य विकिपीडिया संस्थेची माहिती सांगितली.

उपप्राचार्य तुपे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. मराठी विभागप्रमुख प्रा. आर. टी. आहेर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सहभागी ६५ विद्यार्थ्यांनी संगणकाद्वारे विकिपीडियात माहिती समाविष्ट करण्याचे प्रत्यक्षिक घेतले. मराठी विभागप्रमुख प्रा. आर. टी. आहेर यांनी प्रास्ताविक केले. मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. रमाकांत कराड, डॉ. विजया धनेश्वर, डॉ. संभाजी शिंदे, प्रा. आर. बी. बागूल, डॉ. उत्तम करमाळकर यांनी संयोजन केले. यावेळी तन्वी अमित, भूषणभारती यांनी मराठी ब्लॉग लिहिण्यात विद्यार्थी व प्राध्यापक यांना प्रात्यक्षिक दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांजा विक्रेत्यास जेलरोडला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या जेलरोडवरील चरणदास मार्केट मधील विक्रेत्यास क्राईम ब्रँचच्या युनिट एकने सोमवारी अटक केली. संशयित विक्रेत्याकडून २४ हजार सहाशे रुपयांच्या नायलॉन मांजाचे ४१ गट्टु हस्तगत करण्यात आले.

बाळासाहेब खंडेराव राहिंज (३९, रा. सैलानी बाबा स्टॉपजवळ, जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित मांजा विक्रेत्याचे नाव आहे. युनिटचे हवालदार संजय मुळक, पोलिस शिपाई स्वप्नील जुंद्रे, दीपक जठार गुन्हे प्रतिबंधक गस्तीवर असताना त्यांना चरणदास मार्केटजवळ एक व्यक्ती नायलॉन मांजा विक्री करीत असल्याची माहिती समजली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चरणदास मार्केटसमोर सापळला लावला. नायलॉन मांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या संशयितास पोलिसांनी लागलीच अटक केली. त्याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये पर्यावरण संरक्षण कायद्यातील कलम ५ आणि भारतीय दंडविधान कलम २९०, २९१ व १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पीएसआय पालक, सहायक पोलिस उपनिरीक्षक पोपट कारवाळ, बाळू दोंदे, हवालदार प्रवीण कोकाटे, वसंत पांडव, विजय गवांदे, येवाजी महाले, अनिल दिघोळे, पोलिस नाईक संतोष कोरडे, मोहन देशमुख, शांताराम महाले, पोलिस शिपाई निलेश भोईर, गणेश वडजे, विशाल देवरे, प्रतिभा पोखरकर, दीपक जठार आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृतिपत्रिका नवीन

$
0
0

विज्ञानाच्या कृतिपत्रिकेसाठी सरावावर भर द्यावा

अंजली ठोके यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बदलत्या परीक्षा पध्दतीत समाविष्ट करण्यात आलेल्या कृतिपत्रिकेमुळे विज्ञान विषयक कृतीला वाव मिळतो. परिणामी, कृतीपूर्ण शिक्षणामुळे मताच्या अभिव्यक्तीस पूरक संधी मिळून विषय सोपा आणि रंजक वाटतो. पण विज्ञान या विषयाच्या कृतिपत्रिकेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी सरावावर भर द्यावा, असे मार्गदर्शन अध्यापनाचा दीर्घानुभव असलेल्या अध्यापिका अंजली ठोके यांनी केले.

'रेषा एज्युकेशन सेंटर' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' यांच्या वतीने आयोजित 'समजावून घेऊ या कृतिपत्रिका' या विद्यार्थी मार्गदर्शनपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांनी विज्ञान विषयाच्या भाग १ आणि भाग २ संदर्भात दहावीच्या विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

विज्ञान विषयक कृतीपत्रिकेबाबत बोलताना ठोके यांनी सांगितले, कृतिपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता, आकलन क्षमता, निरीक्षणावरून निष्कर्ष काढता येणे, कृतिवरून प्रयोग ओळखणे, निरीक्षणावरून निष्कर्ष काढता येणे, उपाययोजना सुचविणे, संकल्पना समजल्यास स्वत:च्या भाषेत उत्तर लिहीणे यासारख्या उद्दीष्टांसाठी नवी पध्दती उपयुक्त आहे. विद्यार्थी प्रयोगशीलतेकडे वळावा व त्याची तार्किक विचारशक्ती वाढावी, अभ्यासक्रमाची व्यावहारिक जीवनातील घटकांशी सांगड घालावी, विद्यार्थ्याने अवांतर वाचन करावे , विद्यार्थ्याला डोळस व शोधक बनविने, विद्यार्थ्यांना सृजनशीलतेकडे वळविणे हा कृतिपत्रिकेचा उद्देश ही संकल्पना समजावून घेतल्यास नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. विज्ञानातील मुलभूत संकल्पना समजावून घेण्यासह सराव कृतिपत्रिका सोडविण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कृतिपत्रिका सोडविण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. कृतिपत्रिकेतील ४५ प्रश्नप्रकारांवर यावेळी प्रकाशझोत टाकण्यात आला. रेषा एज्युकेशन सेंटरचे संचालक मिलींद कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले. अर्चना कुलकर्णी यांनी अंजली ठोके यांचे स्वागत केले. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला.

- - -

स्वमत अभिव्यक्ती गरजेची

रेषा एज्युकेशन सेंटर आणि मटाच्या 'समजावून घेऊ या कृतिपत्रिका' या उपक्रमांतर्गत रविवारीच नाशिकरोड परिसरातील हॉटेल सेलिब्रेटा येथेही 'मराठी' विषयाचे मार्गदर्शन सत्र पार पडले. या उपक्रमात मराठी विषयाच्या अध्यापनाचा दीर्घानुभव असणाऱ्या अध्यापिका निर्मल अष्टपुत्रे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना कृतिपत्रिका सोडविण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, कृतिपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तिला पूर्ण वाव देण्यात आला आहे. त्यामुळे पत्रिकेतील कृती शांतपणे वाचून पूरक अभिव्यक्ती केल्यास या विषयात चांगले गुण मिळविणे कठीण नाही. घोकंपट्टी किंवा कॉपी या गैरप्रकारांना पूर्णत: हद्दपार करणारी कृतिपत्रिकेची संकल्पना आहे. मराठीच्या कृतिपत्रिकेत आकलन आणि स्वमत अभिव्यक्ती असे महत्वाचे दोन भाग आहेत. १०० पैकी ५६ गुण हे स्वमत अभिव्यक्तीसाठी देण्यात आले आहेत. या विषयाचा अभ्यास करताना गद्य, पद्य, स्थूल वाचना, उपयोजित व्याकरण असे वर्गीकरण करून सू्क्ष्म नियोजनानुसार अभ्यास करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांचे अंगभूत कौशल्य, आकलन, अनुभव प्रकटीकरण या गोष्टींना मराठीच्या कृतिपत्रिकेत चांगला वाव असल्याचे त्यांनी सांगितले. कृतिपत्रिकेची तयारी करताना प्रसंगी गाईड केवळ आधार म्हणून वापरावे पण मुख्य प्राधान्य हे पुस्तकालाच द्यावे , असेही अष्टपुत्रे यांनी सांगितले. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला.

- - -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपाची हाक, कामाची लागणार वाट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाजप सरकारच्या कामगारविरोधी धोरणाबाबत असंतोष पसरला असून, याबाबत जाब विचारण्यासाठी विविध संघटना एकवटल्या आहेत. या संघटनांनी दोन दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली असून, त्यास आजपासून सुरुवात होत आहे. राष्ट्रीयीकृत बँका, टपाल कार्यालये, औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या, आरोग्य विभागासह विविध विभागांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी असे विविध घटक संपामध्ये सहभागी होत असून, जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.

संपाला आता पर्याय नाही ही जगण्यासाठीची लढाई आहे. ती शेवटपर्यंत लढावीच लागेल या त्वेषाने देशव्यापी संपाची साद घालण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातही कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती स्थापन केली असून, या संपात हजारो कामगार सहभागी होणार असल्याचा दावा या समितीने केला आहे. महागाईवर नियंत्रण आणणारी प्रभावी पावले उचलावीत, बेरोजगारीवर नियंत्रण आणावे, कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, खासगीकरण व कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करावे, कष्टकऱ्यांना किमान १८ हजार रुपये वेतन लागू करावे, शेतमजुरांसह असंघटित कामगारांना सहा हजार रुपये पेन्शन लागू करावे, बँकांचे विलीनीकरण थांबवावे यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील २०० औद्योगिक कारखान्यांमधील २५ हजार कामगार, इन्शुरन्स कंपन्यांचे प्रतिनिधी, टपाल कर्मचारी, आरोग्य विभागातील आशा वर्कर्स व अन्य कंत्राटी कर्मचारी, राष्ट्रीयीकृत बँकांमधील अधिकारी व कर्मचारी, वीज कामगार संघटना, इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स विभागातील कर्मचारी यासारखे विविध घटक या संपात सहभागी होणार आहेत.

...

आज तालुक्यांमध्ये निदर्शने

संयुक्त कृती समितीने केलेल्या नियोजनानुसार आज (दि. ८) जिल्ह्यातील १५ तालुक्यांत मोर्चे काढण्यात येणार आहेत. हा मोर्चा त्या त्या तालुक्यांमधील तहसील कार्यालयांवर नेण्यात येणार असून, तेथे सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. बुधवारी (दि.९) सकाळी साडेदहा वाजता गोल्फ क्लब मैदान येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. मायको, क्रॉम्पटन ग्रिव्हज यासारख्या अनेक कंपन्यादेखील या संपामध्ये सहभागी होत आहेत.

...

सर्वसामान्यांची होणार गैरसोय

या संपामध्ये आशा, आशा गटप्रवर्तक, आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, मनरेगा कंत्राटी कर्मचारी, अंगणवाडी, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, विमा कर्मचारीदेखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे या घटकांशी संबंधित कामकाज ठप्प होणार असून, नागरिकांना त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

...

कंत्राटी कर्मचारी कृती समितीचाही धडक मोर्चा

मेगा भरतीपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत कायम करावे यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी ९ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता गोल्फ क्लब मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. समान कामास समान वेतन लागू करा, ठेकेदारी पद्धत तात्काळ बंद करा यासारख्या मागण्या त्यामध्ये करण्यात येणार आहेत. मनरेगा कर्मचारी संघटना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मंडळ, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, स्वच्छ भारत मिशन, कंत्राटी मलेरिया संघटना, आत्मा कर्मचारी संघटना, पेसा संघटना, वनविभाग कंत्राटी कर्मचारी संघटना, वाहनचालक १०२ कंत्राटी संघटना, संपूर्ण शिक्षा अभियान, भूजल सर्वेक्षण, हातपंप कंत्राटी कर्मचारी संघटना, सुरक्षा रक्षक कामगार विभाग आदी संघटना यामध्ये सहभागी होणार आहे. ईपीएफ पेन्शनर्स देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत.

-

संपात सहभाग

औद्योगिक कर्मचारी : २५०००

टपाल कर्मचारी : ७००

कंत्राटी कर्मचारी : १० हजार

विविध क्षेत्रातील एकूण : ७५ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणता संप?

$
0
0

\Bजिल्हाधिकाऱ्यांचा अजब सवाल

..\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशव्यापी संपाद्वारे सरकारला घेरण्यासाठी डावे पक्ष आणि विविध कामगार संघटना एकवटल्या असताना नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र कोणता संप अशी विचारणा करीत या संपाबाबत अनभिज्ञता दर्शविली. संपाबाबत मला कुणीही माहिती दिलेली नाही. असा काही संप होणार असेल, तर अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेऊ, असे सांगत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी या विषयाला बगल दिली.

सरकारच्या कामगार आणि शेतकरीविरोधी धोरणाविरोधात देशात विविध संघटना एकवटल्या असून, त्यांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. नाशिकमध्येही कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती स्थापण्यात आली असून, यामध्ये विविध विभागांतील ७५ हजार कामगार सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे. दोन दिवस बँका बंद राहणार असल्याने आर्थिक व्यवहार त्यामुळे ठप्प होणार आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही खबरदारी घेतली आहे का, अशी विचारणा जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. त्यावर असा काही संप होत असल्याबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सांगत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images