Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नेत्र तपासणी शिबिर रविवारी

0
0

महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स आणि श्रीधारीयम आयुर्वेदा यांच्यातर्फे रविवारी (दि. ६) नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई नाका येथील हॉटेल रामा हेरिटेज येथे हे शिबिर होणार आहे. यावेळी उपस्थित रुग्णांवर केरळच्या प्राचीन पद्धतीनुसार आयुर्वेदाच्या सहाय्याने उपचार केले जाणार आहेत.

आजच्या धकााधकीच्या जीवनशैलीत अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. हे आजार झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते. हे आजार होऊ नये यासाठी महाराष्ट्र टाइम्स आणि श्रीधारियाम आयुर्वेदा यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरातील उपचार आयुर्वेदाच्या शल्क्य तंत्रावर आधारीत आहे. तसेच या शिबिरात उपचार करणारे डॉक्टर्स अधुनिक तंत्राच्या सहायाने उपचार करणार आहे. त्यात मधुमेह झाल्यानंतर अनेकांना रेटिना व ग्लुकामाचे आजार संभवतात. असे आजार उद्भवू नये, यासाठी त्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आजाराच्या मुळाशी जाऊन त्यावर उपचार केले जाणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ८७९२४७३७४६ या मोबाइल नंबरवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंग्यू अळ्या सापडल्यास दंड

0
0

महापालिकेने काढली अधिसूचना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने डेंग्यूबाबत कठोर धोरण स्वीकारले असून, सातत्याने वाढणाऱ्या डेंग्यूच्या उपद्रवावर आता दंडाची मात्रा शोधून काढली आहे. गेल्या तीन वर्षांपासून डेंग्यूचा सततचा त्रास लक्षात घेत त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांच्या घरात डेंग्यू अळीची उत्पत्ती आढळल्यास दोनशे रुपयांचा दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दंड प्रति उत्पत्तिस्थळ आकारण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचनाही महापालिकेने काढली आहे. त्यामुळे पुढील वर्षी डेंग्यू नियंत्रणात राहील, असा दावा करण्यात आला आहे.

शहरात गेल्या तीन वर्षांत शहरात सातत्याने डेंग्यू व स्वाइन फ्लूच्या आजाराने कहर केला आहे. स्वाइन फ्लू आणि डेंग्यूमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दोन्ही आजार हे नागरिकांच्या दुर्लक्षामुळे होत आहेत. विशेषत: डेंग्यूच्या अळ्या नागरिकांच्याच घरात आढळून येत असल्याचे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. वैद्यकीय विभागाने दिलेल्या घरभेटीत ही बाब समोर आली आहे. नागरिकांच्या घरात, गच्ची, गॅलरी, फ्रीज आदी भागांत डेंग्यूच्या अळ्या सातत्याने आढळून येत असल्याने महापालिकेच्या वतीने वांरवार सूचना दिल्या जातात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. गेल्या दोन वर्षांत डेंग्यूचा कहर इतका वाढला, की नाशिककर त्रस्त झाले आहेत. सलग तीन वर्षांत एक हजारावर रुग्ण आढळले. त्यामुळे महापालिकेच्या वतीने एकीकडे जनजागरण मोहीम व तपासणी मोहीम राबविली जात आहे. मात्र, जबाबदारीचे भान आणण्यासाठी आता दोनशे रुपये प्रति उत्पत्तिस्थळ दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्यास थेट २०० रुपये दंड करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिक रन’ १२ जानेवारीला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शनिवारी, १२ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता महात्मानगर क्रीडांगणापासून नाशिक रन होणार आहे. यंदा रनचे १७ वे वर्ष असून, या रनमध्ये २० हजारांहून अधिक नाशिककर धावतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.

नाशिक रनच्या आयोजनाबाबत ट्रस्टतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी, उपाध्यक्ष एच. बी. थोंटेश, सचिव अनिल दैठणकर, खजिनदार राजाराम कासार आदी उपस्थित होते. बॅनर्जी म्हणाले, की नाशिक रन २०१९ चे उद्घाटन सकाळी ८ वाजता होईल. या वेळी नाशिक रन ज्योत प्रज्वलित केली जाईल. सुरुवातीला सकाळी साडेआठ वाजता विशेष मुलांसाठी रन होईल. विद्यार्थ्यांसाठी सकाळी पावणेनऊला रनची सुरुवात होईल. अखेरीस सकाळी ९.१० वाजता प्रौढांसाठीच्या रनला सुरुवात करण्यात येईल. रनचे आयोजन बॉश आणि ते इप्कॉस कंपनीने केले असून, रनमधून संकलित होणारा निधी समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्यात येणार आहे. महात्मानगर बस स्टॉपजवळ रनसाठी नावनोंदणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी रनच्या माध्यमातून ८० लाखांचा निधी संकलित करण्यात आला होता. यंदा १ कोटीपर्यंत निधी संकलन होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

\Bअसा असेल मार्ग

\Bमहात्मानगर ग्राउंडपासून पारिजातनगर, मधू इंडस्ट्रीज, समर्थनगर, पारिजातनगर, सिक्स सिग्मा हॉस्पिटल व महात्मानगर ग्राउंड असा मार्ग विद्यार्थ्यांसाठी असेल, तर प्रौढांसाठी महात्मानगर ग्राउंड, पारिजातनगर, जेहान सर्कल, स्वामी समर्थ चौक, आयसीआयसीआय एटीएम, समर्थनगर, पारिजातनगर, सिक्स सिग्मा हॉस्पिटल, महात्मानगर, बंजारा हॉटेल व महात्मानगर ग्राउंड असा रनचा मार्ग असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटशेतीवर भर देत दुष्काळावर मात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळाची दाहकता, कवडीमोल किंमतीने विक्री होणारा शेतमाल यामुळे यंदा शेतकरी संकटात सापडला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांची ससेहोलपट कमी करण्यासाठी नववर्षात राज्य सरकारच्या गटशेती उपक्रमाबाबत अधिकाधिक शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने करणार आहे.

एकाच परिसरातील बहुतांश शेतकरी साधारणत: एकाच पद्धतीचे पीक घेतात. ते बाजारपेठेत येते तेव्हा मागणीपेक्षा पुरवठा अधिक होण्याची शक्यता बळावते. अशा परिस्थितीत पिकाला अपेक्षित भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांचेही नुकसान होते. अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकत्रितरित्या पिक नियोजन करता यावे यासाठी राज्य सरकारने २०१७ मध्ये गटशेती उपक्रमाची घोषणा केली. अधिकाधिक शेतकऱ्यांनी गटशेती करावी, यासाठी त्यांना काही लाभही देऊ केले. गटशेतीमुळे पिक नियोजनाबरोबरच शेतकऱ्यांना उचलावी लागणारी जोखीमही विभागली जाणार आहे.

गटशेतीमध्ये शेतकऱ्यांचा समूह वेगवेगळ्या प्रकारच्या पीक लागवडीचे नियोजन करू शकतो. बाजारात वेगवेगळ्यावेळी येणाऱ्या या पिकामुळे उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देण्याचा उद्देश असला तरी जिल्ह्यात अद्याप गटशेतीला जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. शेतकऱ्यांनी एकत्रित येण्यापासून अनेक अडचणींचा अडसर त्यासाठी येत असल्याचे निरीक्षण जिल्हा प्रशासनाने नोंदविले आहे. या अडचणींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यापासून आणखी काय उपाययोजना करता येतील याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे. गटशेती अंमलबजावणीवर नववर्षात भर देण्याचा मनोदय जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफी दुकानासह एक घर फोडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंबड पोलिस स्टेशन हद्दीतील पवननगर आणि सिंहस्थनगर येथे दोन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. यात, एका सराफी पेढीचाही समावेश आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सिडकोतील पवननगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोकडीसह दागिने पळवून नेले. सुमारे एक लाख एक हजार ५०० रुपयांचा हा मुद्देमाल होता. या प्रकरणी दिनेश विलास साळुंखे (रा. सूर्यनारायण चौक, पवननगर) यांनी तक्रार दिली. २३ डिसेंबर रोजी साळुंखे कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी ही घरफोडी केली. अज्ञात चोरट्यांनी साळुंखे यांच्या घराचा मागचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून कपाटातील २० हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने असा एक लाख एक हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत. सराफी दुकान फोडून चोरट्यांनी पुतळ्याच्या अंगावर ठेवलेल्या दोन सोन्याच्या ठुश्या चोरून नेल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस चोरट्यांचा माग काढीत आहेत. या प्रकरणी निखील आबासाहेब दाभाडे (रा. बिनोरिया रेसिडेन्सी, पांडुरंग चौक, पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दिली. दाभाडे यांचे सिंहस्थनगर भागातील राका चौकात गायत्री ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून ही चोरी केली. दाभाडे यांनी दुकान बंद करण्यापूर्वी सर्व दागिने आपल्या सोबत नेले होते. मात्र, शोभेसाठी ठेवलेल्या पुतळ्याच्या गळ्यातील सोन्याच्या ठुशी अनावधानाने राहून गेल्या. दुकान फोडून आत आलेल्या चोरट्यांसाठी हीच पर्वणी ठरली. पुतळ्याच्या गळ्यातील सुमारे २५ हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या दोन ठुश्या चोरट्यांनी पळवल्या. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खडके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूकमार्गात बदल

0
0

नाशिक : मविप्र मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त ६ जानेवारी रोजी गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौक ते आयुक्तालयाच्या हद्दीपर्यंत एकेरी वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती नाशिक शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. या मार्गावर ६ जानेवारी रोजी सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. त्यामुळे या मार्गावरची धोंडेगावकडून अशोकस्तंभाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. हा मार्ग पहाटे ५ ते दुपारी १२ पर्यंत एका बाजूने बंद राहील. रस्त्याची दुसरी बाजू अशोकस्तंभाकडून धोंडेगावकडे जाणारी वाहतूक मात्र सुरू राहणार आहे, असे पत्रकात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार अड्ड्यावर छापा,वीस जण ताब्यात

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेल रोडवरील चरणदास मार्केटजवळील गाळ्यात सुरू असलेल्या कल्याण बाजार नावाच्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिस पथकाने छापा २० जुगारींसह ३० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त ईश्वर वसावे यांच्या आदेशाने नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान ही कारवाई केली.

या कारवाईत पोलिसांनी धनराज गायकवाड (वय ५६ रा. श्रमिकनगर), शेख सलीम (५० रा. चरणदास मार्केट), विजय बेलेकर (४३, रा. सुवर्णनगर, दसक), सुरेश ताकतोडे (३४, रा. मते मळा, रासबिहारी रोड), बळीराम शेलार (३३, रा. पंचक), बाबूराव दांडेकर (४३, रा. नांदूरनाका), चंद्रभान पवार (५०, रा. नांदूरनाका), चिमाजी पवार (६५, रा. नांदूरनाका), रामानंद पुजारी (६२, रा. सुवर्ण सोसायटी, आर्टिलरी सेंटर रोड), नामदेव आठबैले (५०, रा. मोरे मळा, बालाजीनगर), भास्कर जाधव (४८, रा. मोरे मळा, बालाजीनगर), बाळू जगताप (५५, रा. चरणदास मार्केट), प्रदीप ढगे (५२, रा. आविष्कार सोसायटी, मॉडेल कॉलनी), सुखराम ठाकूर (३०, रा. श्रीकृष्णनगर, दसक), गोकुळ आहिरे (४०, रा. नांदूरनाका), भटू माळी (६५, काकरदा, जि. नंदुरबार), राजू गायकवाड (३८, अयोध्यानगर, जेलरोड), राजू घाटे (५०, पवारवाडी, सचिन बर्वे (४२, रा. शिवाजीनगर) आणि प्रशांत आंबेकर (४१, रा. मॉडेल कॉलनी) या २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोतवालांना महसूलमंत्र्यांचा शब्द!

0
0

मागण्यांबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गतिमान प्रशासनात राज्यातील कोतवालांची भूमिका व योगदान मोलाचे आहे. गेल्या तीन ते चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय जाहीर करून कोतवालांना न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी राज्य कोतवाल संघटनेच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला मुंबई येथे मंत्रालयातील बैठकीत दिली. महसूलमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील कोतवालांच्या मागण्या मार्गी लागण्याची शक्यता आहे.

चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा आणि सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावे या प्रमुख दोन मागण्यांसाठी गेल्या ४७ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश इंगोले, उपाध्यक्ष सुनीत गमरे, सरचिटणीस भारत पवार, बापू आहिरे, जयवंत जाधव, नितीन चंदन, बाळू झोरे, विवेक देशमुख आदींच्या नेतृत्वाखाली येथील विभागीय आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. कोतवालांच्या राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत महसूलमंत्र्यांची मंत्रालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील कोतवालांच्या समस्या आणि मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यावेळी गतिमान प्रशासनासाठी राज्यातील कोतवालांची भुमिका कशी व किती महत्वाची आहे ही बाब कोतवालांच्या प्रतिनिधींनी महसुलमंत्र्यांपुढे मांडली. मुख्यमंत्र्यांपुढे कोतवालांच्या मागण्यांचा प्रश्न मांडुन येत्या दोन तीन दिवसांत निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी कोतवालांच्या प्रतिनिधींना दिले. या बैठकीस वित्त, महसूल, सामान्य प्रशासन या विभागांचे अप्पर मुख्य सचिव यांच्यासह कोतवालांच्या राज्य संघटनेचे अध्यक्ष गणेश इंगोले, उपाध्यक्ष सुनित गमरे, सरचिटणीस भारत पवार, संजय जाधव, राजेंद्र पुजारी, गोपाळ ठवरे आदी उपस्थित होते.

... तर आंदोलन संपुष्टात

महसूलमंत्र्यांसोबत कोतवालांच्या मागण्यांसदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याने कोतवालांच्या मागण्या मान्य होण्याची शक्यता असल्याने कोतवालांच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोतवालांच्या मागण्या मान्य केल्याचे शासनाने जाहीर केल्यास कोतवालांचे दीर्घ काळापासून सुरू असलेले आंदोलनही संपुष्टात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘हॅप्पी स्ट्रीट’वर आज धमाल, मस्ती अन् कल्ला

0
0

सुयोजित व्हॅरेडियन व्हॅली ते बापू पूल या रस्त्यावर आयोजन

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्या रस्त्यावर सायंकाळी हमखास बाइक्स वेगात चालविल्या जातात, त्या रस्त्यावर मनसोक्त बागडण्याची संधी आज नाशिककरांना मिळणार आहे. धम्माल, मस्ती अन् कल्ला करण्याची संधी व्हॅरेडियन व्हॅली ते बापू पूल या रस्त्यावर 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'हॅप्पी स्ट्रीट'च्या निमित्ताने आज (५ जानेवारी) ही संधी सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत नाशिककरांना मिळणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'चा 'हॅप्पी स्ट्रीट' हा उपक्रम नाशिककरांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या आनंदोत्सवाची पर्वणी आज सायंकाळी पुन्हा अनुभवता येणार आहे. हॅप्पी स्ट्रीटवर हिंदी, मराठी गाण्यांवर झुम्बा डान्स करता येणार आहे. रस्त्यावर रांगोळी काढण्याची, गेम खेळण्याची, गाणे ऐकण्याची, जादूचे प्रयोग पाहण्याची अन् तुमचा छंद जोपासण्याची संधी मिळणार आहे. तसेच नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, आकाश निरीक्षण, क्विलिंग आर्ट, कॅलिग्राफी, पोट्रेट, दोरीच्या उड्या, आर्ट अँड क्राफ्ट, व्हॉलिबॉल अन् सायकल राइडची गंमत अनुभण्याची संधी मिळणार आहे. पर्यावरणविषयक खेळ आणि भरतनाट्यमचा बहारदार कलाविष्कार असणार आहे. अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग, म्युझिकल आणि इन्स्ट्रूमेंटल सादरीकरण, डान्स परफॉर्मन्सेस यासह पोलिस बॅण्डचा ताल या उपक्रमांनी धम्माल वाढणार आहे.

हॅप्पी स्ट्रीटवर सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मोफत रक्तदाब आणि शुगरचेकअप करून घेता येणार आहे. या उपक्रमात सरप्राइज गिफ्ट जिंकण्याची संधीदेखील असणार आहे. नववर्षाच्या पहिल्या विकेंडला यादगार बनवविण्यासाठी ही पर्वणी खास ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षभरात कोटीचा दंड वसूल!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतूक शाखेने २०१८ या वर्षात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांकडून प्रतिदिन सरासरी २८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. वर्षभरात २१ हजार १६८ वाहनचालकांवर कारवाई करीत पोलिसांनी एक कोटी सहा लाख ७१ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

वाहतूक नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षांमुळे जीवघेण्या अपघातांची संख्या वाढली आहे. यातील बहुतांश घटनांमध्ये वाहनचालकाचा जीव वाचणे शक्य होते. मात्र, हेल्मेट, सीटबेल्ट या प्राथमिक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात येते. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने वेळोवेळी जनजागृती मोहिमादेखील राबवल्या. वाहनचालकांकडून निबंधलेखन, गणपती आरती करून घेण्यात आली. मात्र, वाहतूक नियमांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यामुळे शहर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनचालकांवर ठोस कारवाई करण्याची मोहीम गतवर्षी हाती घेतली. वाहतूक शाखेच्या चार युनिटच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी ही कारवाई राबवून तब्बल २१ हजार वाहनचालकांकडून दंड वसूल केली.

गेल्या वर्षीपेक्षा कारवाई कमी

हेल्मेटवापराबाबत २०१७ मध्ये वाहतूक पोलिसांनी खऱ्या अर्थाने कारवाईस सुरुवात केली होती. या वर्षी पोलिसांनी २२ हजार १६८ वाहनचालकांकडून एक कोटी १० लाख ८४ हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल केले होते. यंदा हा आकडा काहीसा कमी झालेला दिसतो. याबाबत पोलिसांनी सांगितले, की शहरात २०१८ मध्ये हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पोलिसांची कारवाई होणार असेल तर हा आकडा ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचतो. हळूहळू दुचाकीस्वार हेल्मेट वापरण्यास प्राधान्य देत असल्याने हा फरक पडला असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

चार वेळा मोठी कारवाई

हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी २०१८ मध्ये चार वेळा मोठी कारवाई करण्यात आली. एकाच वेळी वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिस स्टेशनमार्फत कारवाई झाल्याने यात काही तासांतच लाखोंचा दंड झाला. नोव्हेंबर महिन्यात पोलिसांनी अवघ्या तीन तासांत १८ लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. २०१७ मध्ये अशा प्रकारे पाच वेळा कारवाई झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघ शिक्षण संस्थेचा ७ पासून सुवर्ण महोत्सव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क. का. वाघ शिक्षण संस्था सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून येत्या सोमवारपासून (दि. ७) यानिमित्त विविध कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात आले आहे.

हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम येथे संस्थेच्या प्रांगणात सोमवारी सकाळी १० वाजता सत्यनारायण पूजेने महोत्सवास सुरुवात होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त अशोक मर्चंट असणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ भूषविणार आहेत. यावेळी समीर वाघ, अजिंक्य वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी, मुख्य-समन्वयक तथा प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, समन्वयक सुवर्ण महोत्सव समिती प्रा. एम. बी. झाडे, सर्व संस्थांचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित असणार आहे. यावेळी सुवर्ण महोत्सवी वर्षाचे 'बोधचिन्ह' आणि 'संस्थेचे गीत' यांचे अनावरणही करण्यात येणार आहे. तसेच पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या जीवनावर आधारीत लघुचित्रपट प्रदर्शित करून दाखवला जाणार आहे. वाघ शिक्षण संस्थेच्या वाटचालीत मर्चंट कुटुंबीयांचे मोठे योगदान असल्याने अशोक मर्चंट यांना परिवारासह येथे गौरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्याविष्कारातून जिंकली मने

0
0

सुकदेव विद्यालयाचा बहारदार कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सामाजिक, देशभक्तीपर व चित्रपटांतील गीतांवर नृत्याविष्कार सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. निमित्त होते, सुखदेव विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजच्या 'आविष्कार कलागुणांचा' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.

विद्यार्थ्यांचे विविध कलागुण जोपासण्याच्या उद्देशाने सुखदेव एज्युकेशन संस्था संचलित सुखदेव विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजच्या वतीने दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल होते. दीपप्रज्ज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. देवाक काळजी रे, आई मला खेळायला जायचंय, आरा रा रा खतरनाक, टुकूर टुकूर, नमो नमो शंकरा, पहिले नमन, यांसारख्या अनेक मराठी हिंदी चित्रपट गीतांवर, देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्य सादर करण्यात आले.

सरचिटणीस संजय काळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी १९८१ च्या कलाकारांनी हजेरी लावली. तसेच कन्नू ठक्कर उर्फ ज्युनियर अमिताभ यांनी 'कौन बनेगा स्मार्ट विद्यार्थी' हा खेळ घेत वातावरण उत्साहवर्धक केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुखदेव एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा रत्ना काळे, उपाध्यक्ष रंजय काळे, चिटणीस विजय काळे, कोषाध्यक्षा ललिता काळे, संचालक महेश गाढे, वैभव काळे, अर्चना काळे, वैशाली काळे, राहुल निरभवणे, विद्या निकम, सरला गाढे, मेहुल वाडिया, शशिकांत निकम, रणधीर सोनवणे, फिरोज शहा, मुख्याध्यापक नितीन पाटील, प्राचार्य बाबासाहेब खरोटे, मुख्याध्यापक हिरामण बारावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

\Bयांचा झाला गौरव \B

संस्थेतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकास ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. तसेच दोन गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान केला जातो. यंदाचा फुले शिक्षक गौरव पुरस्कार इंदिरानगर येथील सुखदेव प्राथमिक मराठी विद्यामंदिरच्या उपशिक्षिका मनीषा बोरसे व सुखदेव ज्युनियर कॉलेजचे उपशिक्षक नीलेश गांगुर्डे यांना प्रदान करण्यात आला. तसेच इयत्ता बारावीचा मिथुन कांबळे यास 'जिनीयस ऑॅफ द इयर' व रजा पटेल यास आदर्श खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमधील १२ रिक्षा भंगारात

0
0

आरटीओ, पोलिसांची धडक कारवाई

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहरात अनाधिकृत रिक्षांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून धडक मोहीम राबविण्यात आली. मोटार वाहन निरीक्षक एच. जी. हेंबाडे आणि त्र्यंबक पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविकांत सोणवने यांनी शहरातील १२ रिक्षा ताब्यात घेतल्या. या रिक्षांचह मुदत संपलेली असल्यामुळे त्या स्क्रॅप करण्यासाठी पाठविण्यात येणार आहेत. या कारवाईमुळे शहरातील रिक्षा चालकांमध्ये धडकी भरली आहे.

काही वर्षांपासून त्र्यंबक शहरात भाविकांचा ओघ वाढल्याने रिक्षा व्यवसायास चांगले दिवस आले आहेत. शहराच्या प्रवेशद्वारी असलेले संत गजानन महाराज मंदिर, श्रीस्वामी समर्थ गुरूपिठ, नीलपर्वत, गंगाद्वार अशा ठिकाणी जाण्यासाठी रिक्षांची गरज भासते. तथापि काही रिक्षाचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्याच्या व कागदपत्रांची पूर्तता नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. शुक्रवारी प्रादेशिक परिवहन विभागाची टीम शहरात दाखल झाली. त्यांच्या सोबतीला त्र्यंबक पोलिसांची कुमक मिळाली आणि रिक्षांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मुदत संपलेल्या १२ रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या. विशेष म्हणजे पोलिस आणि आरटीओ विभागाची कारवाई सुरू असताना शहरातील अनेक रिक्षा गायब झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉटल रॉकेटने वेधले लक्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रिकामी पाण्याची बाटली, सायकल ट्यूबचा वॉल, चिकटपट्टी अशा साहित्याचा वापर करून दोरीच्या साहाय्याने आकाशाच्या दिशेने झेपावणाऱ्या बॉटल रॉकेटने विज्ञानप्रेमींचे लक्ष वेधले. आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थीदेखील संधी मिळाली की स्वत:च्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवत कसे लक्षवेधी विज्ञानाविष्कार साकारू शकतात, याची प्रचीती आली. निमित्त होते, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नाशिक आणि स्प्रिन्स स्टार आयटी सोल्यूशन्स यांच्यातर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे. आदिवासी विकास भवनात शुक्रवारी या एकदिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांना स्वत:ची सृजनशीलता शहरी भागात सादर करण्याची संधी मिळणे मोठे कठीण. अशा विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी आदिवासी विकास भवन येथे एकदिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध संकल्पनांवर प्रशिक्षण देऊन या संकल्पनांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात साकारले होते. दिंडोरी तालुक्‍यातील निगडोळ, टिटवे, थेपनपाडा, गांडोळे व नाळेगाव या पाच आदिवासी पाड्यांवरील शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी २५ प्रकल्पांचे सादरीकरण यात केले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन सेवा निवृत्त आरोग्य महासंचालक तथा साळुंखे समिती अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. कृतीयुक्त शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळत असल्याचे कौतुक त्यांनी केले. शुक्रवारी दुपारी पारितोषिक वितरणाने या प्रदर्शनाचा समारोप झाला. आदिवासी विकास विभागाचे माजी आयुक्‍त आर. जी. कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकाने गौरविण्यात आले. या प्रदर्शनाचे आयोजन स्प्रिन्सस्टार आयटी सोल्युशन्सचे प्रमुख अभिषाल वाघ, आकाश नानोटे, रूपल गुजराथी, प्रकाश गुजराथी, राहुल हरक यांनी केले होते. आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त गिरीश सरोदे, प्रकल्प अधिकारी कुमार आशीर्वाद, सहआयुक्त पानमंद, तांत्रिक समिती सदस्य हेमलता बीडकर, उपायुक्त प्रदीप पोळ, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नीलेश अहिरे, आर. आर. पाटील उपस्थित होते. आयटीआयमधील विद्यार्थिनींनीही प्रदर्शनाला भेट दिली.

\Bयांनी मिळवले यश..

\Bशासकीय माध्यमिक आश्रमशाळा, ठेपणपाडा येथील कावेरी जयराम ठेपणे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. गृहसंरक्षक गजर प्रणाली हा प्रकल्प या विद्यार्थिनीने साकारला होता. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, नाळेगांव येथील मनीषा जगन पालवे या विद्यार्थिनीने द्वितीय पारितोषिक पटकावले. तिने जलशुद्धीकरण प्रकल्प साकारला होता. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, निगडोळ येथील दुर्गा रमेश वाघेरे, उज्ज्वला प्रकाश धोडी, हर्षदा पोपट वाघेरे या विद्यार्थिनीने तृतीय पारितोषिक पटकावले. रुग्णांचे किंवा आपद्ग्रस्तांचे वहन कसे करावे, हा प्रकल्प त्यांनी साकारला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसचिवांच्या वाढल्या अडचणी

0
0

नामकरण बदल तक्रारीची आयुक्तांकडून दखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रभाग क्र. ३१ मधील पाथर्डी फाट्यावरील जलशुद्धिकरण केंद्राच्या नामकरण वादात महिपालिकेचे नगररसचिव गोरखनाख आव्हाळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेच्या तक्रारीनंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या प्रकरणी तपशीलवार माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नगरसचिवांवर कारवाई अटळ मानली जात आहे.

अठरा किलोमीटर लांबीच्या मुकणे थेट जलवाहिनी योजनेंतर्गत विल्होळी येथे जलशुद्धिकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत सदस्यांच्या विषय यादीमध्ये या केंद्रासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नामकरणाचा प्रस्ताव सादर झाला होता. त्यानंतर भाजपचे सभागृहनेते दिनकर पाटील यांनी मागच्या दाराने १३३ (अ) अंतर्गत याच केंद्रासाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नामकरणााच प्रस्ताव दाखल करून घेतला. महापौरांनी नियमानुसार ठराव मंजूर केल्यानंतर पाटील यांनी वाजपेयींच्या नावाचा ठराव करत, शिवसेनेचा ठराव दप्तरी दाखल करून घेतला होता. त्यावरून वाद निर्माण झाला. पाटील यांनी प्रस्तावांमध्ये घुसखोरी केली. प्रस्तावाला आवक क्रमांक नसल्याचे पुरावे सादर करताना नगरसचिव आव्हाळे यांनी चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव ठेवल्याचा आरोप करत शिवसेनेने आयुक्तांकडे तक्रार केली. त्याची दखल घेत नगरसचिवांची चौकशी सुरू झाली असून विरोधी पक्षांकडे सबळ पुराव्याच्या आधारे आव्हाळे यांच्याकडून खुलासा मागविला आहे. निवृत्तीला अवघे तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना महापालिकेच्या नगरसचिव कारवाईच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदारराजाच्या साक्षरतेसाठी!

0
0

लाखभर लोकांनी घेतले 'व्हीव्हीपॅट'चे धडे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणूक आयोगाचा पारदर्शक कारभार सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशिनची प्रात्यक्षिके दाखविली जात असून आतापर्यंत सुमारे ९० हजार नागरिकांनी ही प्रात्यक्षिके पाहून अभिप्राय दिला आहे. परंतु, ही प्रात्यक्षिके पाहूनही अभिप्राय न देणाऱ्या नागरिकांची संख्या त्याहून कितीतरी अधिक असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने केला आहे.

ईव्हीएम मशिनद्वारे मतदान केले तर आपले मत मनपसंत उमेदवाराला न जाता भलत्याच उमेदवारालाच जाते, असा आरोप गेल्या काही निवडणुकांपासून मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करता येत असल्याचा आरोपही अनेकदा झाले आहेत. हे वर्ष निवडणुकांचे असल्याने निवडणूक आयोगाने कामकाजातील पारदर्शकता नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर केला जाणार असून मतदानानंतर अवघ्या सातच सेकंदात आपण दिलेले मत योग्य व्यक्तीला मिळाले का हे संबंधित मतदाराला समजू शकणार आहे. यासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे कामकाज नेमके कसे चालते, याचे प्रात्यक्षिक थेट खेडोपाडी जाऊन नागरिकांना दाखविले जात आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये याबाबतचे जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८३ हजार ६९० नागरिकांनी प्रात्यक्षिक पाहिल्याची नोंद केली आहे. प्रात्यक्षिक पाहणाऱ्यांना त्यांच्या नावाची नोंद विशिष्ट रजिस्टरमध्ये करण्याचे आवाहन जनजागृती पथकांकडून केले जाते. परंतु, अशी नोंद न करणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने केला आहे.

अंतिम मतदारयादी १४ रोजी

दरवर्षी अंतिम मतदारयादी ५ जानेवारीला प्रसिद्ध केली जाते. यंदाही ती ५ जानेवारीलाच प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून सांगितले जात होते. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे ही यादी यंदा १४ जानेवारीला प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मतदारसंघ............प्रात्यक्षिके

देवळा............९०६७

बागलाण............७११८

दिंडोरी............७०९८

नाशिक मध्य............६५२५

निफाड............५८१५

सिन्नर............५५४६

चांदवड............४९५६

मालेगाव मध्य............१४६८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलपटूंच्या क्षमतेची लागणार कसोटी!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनतर्फे आयोजित नाशिक पेलेटॉन २०१९ या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील १५ किलोमीटर आणि ५० किलोमीटरच्या सर्व वयोगटांतील स्पर्धांना आज (ता. ५) सकाळी ६ वाजता सिटी सेंटर मॉल येथून हिरवा झेंडा दाखवून सुरुवात होणार आहे, तर रविवारी जॉय राइडसह इतर गटांतील स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या उपस्थितीत होईल.

शनिवारी होणाऱ्या मिनी पेलेटॉन स्पर्धेत १५ आणि ५० किमीच्या स्पर्धेचा समावेश असून, एकूण सहा गटांत या स्पर्धा होतील. स्पर्धेत ५० किलोमीटर मिनी पेलेटॉन स्पर्धा (१८ ते ३० वयोगट) पुरुष व महिला, तसेच (३० वर्षांपुढील वयोगट) पुरुष व महिला अशा चार गटांत होणार आहे. स्पर्धेचा मार्ग नाशिक- त्र्यंबकेश्वर- नाशिक असा असून, सिटी सेंटर मॉलपासून स्पर्धेला सुरुवात होऊन एबीबी सर्कलवरून त्र्यंबक रस्तामार्गे अंजनेरीजवळ यू टर्न घेऊन हॉटेल क्लाउड नाइन येथे स्पर्धेचा समारोप होईल. तेथून सर्व स्पर्धकांना स्पर्धा सुरू झालेल्या ठिकाणी आणण्याचे पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. १५ किमीची स्पर्धा १२ ते १४ वयोगट मुले आणि मुली आणि १५ ते १८ वयोगट मुले आणि मुली अशा दोन गटांत होणार आहे. त्याचप्रमाणे रविवारी (दि. ६) रोजी होणाऱ्या १५० किमीच्या पेलेटॉन स्पर्धेची सुरुवात सकाळी ६ वाजता होणार असून, स्पर्धेचे दोन टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. सिटी सेंटर मॉल, पाथर्डी फाटा तेथून महामार्गावरून कसारा घाटातील यू टर्नवर पहिला थांबा देण्यात आला आहे. तेथे आहार घेतल्यानंतर पुढचा टप्पा १२ वाजता सुरू होईल. हौशी सायकलपटूंसाठी रविवारी सायंकाळी पाच वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ते गंगापूर नाका ही ५ किमी अंतराची जॉय राइड स्पर्धा होणार आहे.

दरम्यान, १५ आणि ५० किमीच्या मिनी पेलेटॉन स्पर्धेसाठीच्या स्पॉट नोंदणीसाठी प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, नोंदणीचा आकडा आठशेवर गेला आहे. शनिवारीसुद्धा नाशिक सायकलिस्टतर्फे १५० किमीच्या पेलेटॉन सर्धेसाठी सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्पॉट नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सायकलिंग संघटनेची मान्यता मिळाल्यामुळे अनेक राष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या सायकलपटूंनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे स्पर्धेची चुरस वाढली आहे. १५० किमीच्या स्पर्धेचे कीट घेण्यासाठी स्पर्धकांनी नाशिक सायकलिस्टसच्या ७४४७७७८८४४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेची वैशिष्ट्ये

प्रत्येक गटाच्या पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूला ७० हजार रुपयांची सायकल आणि ३१ हजार रोख देण्यात येणार आहेत. बक्षिसाची एकूण रक्कम २० लाख

असून, घाटातील अंतर कमीत कमी वेळेत पार करणाऱ्या स्पर्धकाला 'घाटाचा राजा' किताब बहाल करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कहानी घर घर की!

0
0

मुंढेंचा निवासस्थान सोडण्यास मार्चपर्यंत नकार; गमेंच्या पदरी प्रतीक्षा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्तांच्या गडकरी चौकातील शासकीय निवासस्थानातील ताब्यावरून आजी-माजी आयुक्तांमध्ये शासकीय नियमांची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे महापालिकेत सध्या ही घरघर की कहानी चर्चेचा विषय बनली आहे.

शासकीय निवासस्थानासंदर्भातील एका आदेशाचा आधार घेत आणि मुलांच्या शिक्षणाचे कारण देत, तुकाराम मुंढे यांनी बदलीनंतरही आयुक्त निवास सोडणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मात्र, मुंढेंनी ज्या शासन निर्णयाचा आधार घेतला, तो केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिळकतींसाठी लागू आहे, असे कारण देत मुंढेंना निवासस्थानात राहण्याचा अधिकार नसल्याचा दावा विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केला आहे. त्यासंदर्भातील पत्र त्यांनी थेट नगरविकासाकडे पाठवले तसेच मुंढे यांना बांधकाम विभागाच्या मिळकतीमधून निवासस्थान द्यावे, अशी मागणी केलल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

महापालिकेतून बदली होऊन दीड महिने झाले तरी तुकाराम मुंढे विविध कारणांनी चर्चेत आहेत. आता ते आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानातील मुक्कामावरून चर्चेत आले आहेत. मुंढेंची २२ नोव्हेंबर २०१८ रोजी महापालिका आयुक्तपदावरून बदली झाली. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी राधाकृष्ण गमे यांच्या रुपाने नवीन आयुक्त मिळाले. मुंढेंची नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली होऊनही ते रुजू झाले नाहीत. त्यानंतर त्यांची एडस् नियंत्रण सोसायटीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नुकतीच नियुक्ती झाली. महापालिकेच्या आयुक्तपदी असताना मुंढे यांचा गडकरी चौकातील महापालिकेच्या निवासस्थानी मुक्काम होता. मात्र, आता बदलीनंतर त्यांनी महापालिकेचे निवासस्थानही सोडणे अपेक्षित आहे. परंतु, त्यांनी निवासस्थानावर ताबा कायम ठेवला आहे.

गमे यांना आता महापालिकेचे शासकीय निवासस्थान हवे आहे. परंतु, मुंढेंनी एका शासकीय आदेशाचा आधार घेत आणि मुलांच्या शिक्षणाचे कारण देत, मार्चपर्यंत घर सोडण्यास नकार दिला आहे. मुंढे यांची विनंती सरकारनेही मान्य केली आहे. परंतु, मुंढेंनी ज्या शासन निर्णयाचा आधार घेतला तो महापालिकेला लागू होत नाही. तो शासन निर्णय केवळ शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागासाठीच लागू असल्याचा दावा गमे यांनी केला आहे. त्यामुळे मुंढेंनी या घरावरील ताबा सोडावा, अशी तक्रार सरकारकडे केली आहे. मुढेंना शासकीय निवासस्थान द्यायचे असेल तर सरकारच्या वाटप समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिळकतींमधून ते द्यावे. महापालिकेचे निवासस्थान रिक्त करण्यात यावे, अशी विनंती गमे यांनी या पत्राद्वारे प्रधानसचिवांकडे केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

शेरास सव्वाशेर

शासकीय नियमाप्रमाणे बदली झाल्यानंतर तीन महिन्यांपर्यत शासकीय निवासस्थान वापरता येते. परंतु, मुंढेंनी हे निवासस्थान जास्त दिवस वापरण्यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार न करता थेट सरकारकडेच पत्रव्यवहार केला. त्यासाठी शासकीय नियमही शासनाला कळवले. मात्र, महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून शासनाचे सर्व नियम लागू होत नसल्याचे भान त्यांना राहिले नाही. त्यामुळेच अनुभवातून आयुक्त झालेल्या गमेंनीही शासन आदेश कशासाठी आहे, याचा खुलासा शासनाला करून दिला. त्यामुळे 'घर घर की कहानी'वरून शेरास सव्वाशेर भेटल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुष्पोत्सवाचा पुन्हा दरवळ

0
0

- दहा वर्षांच्या खंडानंतर आयोजन

- २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान उपक्रम

- स्टॉल्स बुकिंगचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेचे मुख्यालय हे पुष्पोत्सव महोत्सवाने दरवळून निघणार आहे. वृक्षप्राधिकरण समितीच्या प्रस्तावाला आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे वृक्षप्राधिकरण समितीच्या वतीने येत्या २२ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत मुख्यालयाच्या प्रांगणात पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुष्पमहोत्सवाच्या प्रांगणात नर्सरीचालक तसेच बाग-बगीचा साहित्याशी संबंधित व्यावसायिकांसाठी नाममात्र दराने स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

महापालिकेच्या वतीने प्रथम महापौर स्व. शांताराम बापू वावरे यांनी १९९३ पासून पुष्पोत्सव सुरू केला होता. परंतु, २००८ मध्ये महापालिकेच्या नगररचना विभागात उघडकीस आलेला कोटेशन घोटाळा आणि त्यात तत्कालिन उद्यान अधीक्षक जी. बी. पाटील यांचा सहभाग यामुळे पुष्पोत्सवाची परंपरा खंड पावली. २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान तीन दिवसीय पुष्पोत्सवात विविध प्रकारची फुले, फळे, भाजीपाला आदींचे स्पर्धात्मक प्रदर्शन ठेवण्यात आलेले आहे. विविध गटांत ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली असून, महत्त्वाची बक्षिसे नामांकित कंपन्या, उद्योजक, सहकारी बँका, हॉटेल्स, व्यापारी समूह यांच्याकडुन पुरस्कृत करण्यात आली आहेत. शुक्रवार दि. २२ फेब्रुवारी पुष्पोत्सवाचे उद्घाटन तसेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर शनिवार व रविवार दि २२ व २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यत हे पुष्पप्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले राहील. कार्यकमाच्या प्रांगणात संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या पुष्पोत्सवात विविध गटातील स्पर्धेत नागरिकांनी व वृक्षप्रेमी, सामाजिक संस्था यांनी सहभाग घ्यावा. तसेच, वृक्ष प्रेमी व पक्षी मित्र, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यांचे सक्रिय कामकाज करणारे पदाधिकारी यांनी कार्यक्रमात विविध परीक्षक व माहिती पट या क्षेत्रात काम करणा­ऱ्या सामाजिक व्यक्तींनी याबाबत सहभाग नोंदवण्यासाठी लेखी अर्ज करावे, असे आवाहन उद्यान विभागातर्फे करण्यात आले आहे.

आयुक्तांची सकारात्मक भूमिका

गतवर्षी तत्कालिन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याची तयारी केली होती. परंतु, त्याआधीच त्यांच्या बदलीचे आदेश धडकल्यानंतर आयुक्तपदी विराजमान झालेल्या तुकाराम मुंढे यांनी आर्थिक तरतूद अल्प असल्याचे कारण देत पुष्पोत्सवाच्या आयोजनाला ब्रेक लावला होता. मुंढे यांच्या बदलीनंतर आयुक्तपदी विराजमान झालेल्या गमे यांनी सकारात्मक भूमिका घेत पुन्हा एकदा पुष्पोत्सवाच्या परंपरेला चालना देण्याचे ठरवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्धव ठाकरेंच्या हस्तेदिनदर्शिकेचे प्रकाशन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांच्या संकल्पनेतून बनवलेल्या शिवसेना दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील शिवसेना भवनात करण्यात आले. या वेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नगरसेवकांसोबत चर्चा करीत, महापालिकेच्या कामकाजाचा आढावाही घेतला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले. उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, आमदार योगेश घोलप, आमदार नरेंद्र दराडे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, गटनेते विलास शिंदे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, सुदाम ठेमसे, प्रशांत दिवे, संतोष गायकवाड, नगरसेविका सुवर्णा मटाले, सीमा निगळ, नयन गांगुर्डे, हर्षदा गायकर, श्याम खोले, कुलदीप आढाव, बाळा दराडे, विलास आहेर, कैलास जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images