Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रब्बी हंगाम धोक्यात

$
0
0
तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून बेमोसमी पाऊसाचा शिडकावा होत आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार बेमोसमी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असून, रब्बी हंगाम धोक्यात सापडला आहे. या आठवड्यात ऊन-सावलीचा खेळ सुरूच आहे.

पेयजल योजनांची रखडली कामे

$
0
0
कळवण तालुक्यात आदिवासी उपाययोजनेंतर्गत सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांची असंख्य कामे रखडली आहेत. जिल्हा परिषदेच्या कुचकामी धोरणामुळे ठेकेदारांना जि. प. पदाधिकारी व अधिकारी पाठिशी घालत असल्याचा आरोप करीत ठेकेदारांसह पदाधिकारी व अधिका-यांची कसून चौकशी करण्याची मागणी नगारिकांनी केली आहे.

वारक-यांना त्र्यंबकची वाट बिकट

$
0
0
संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या दिंड्या अन् वारकऱ्यांची वाट यंदा खऱ्या अर्थाने खडतर बनली आहे. येत्या सोमवारी (ता. २७) होणाऱ्या यात्रोत्सवासाठी चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या त्र्यंबक रस्त्यावरील वाहतुकीचे अद्याप योग्य ते नियमन करण्यात आले नसल्याने वारकऱ्यांना जीव मुठीत धरूनच चालावे लागणार आहे.

बँकेची २.२५ कोटींची फसवणूक

$
0
0
बँकेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून खोट्या कागदपत्रांच्या आधारे सव्वा दोन कोटींचे कर्ज मिळविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरकारवाडा पोलिसांनी याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यासह २० जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

खोदलेले रस्ते कधी पूर्ण होणार?

$
0
0
नाशिक महापालिकेने अशोकनगर तसेच जाधव संकुलमधील अंतर्गत रस्ते गेल्या दोन महिन्यांपासून खोदून ठेवले आहेत. मात्र, पुढचे काम होत असल्याने रस्ते कधी पूर्ण करणार, असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिकांनी केला आहे.

उत्तर महाराष्ट्रासाठी ९६५ कोटी

$
0
0
उत्तर महाराष्ट्राचा समावेश असलेल्या नाशिक महसूल विभागासाठी ९६५ कोटी रुपयांच्या वार्षिक विकास आराखड्यास शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ही मंजुरी देण्यात आली.

शांतीपार्क चकाचक!

$
0
0
उपनगरमधील शांतीपार्क परिसरात घंटागाडी येत नसल्याने नागरिक रोजच उघड्यावर कचरा टाकत होते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. याबाबत नागरिकांनी तक्रार करूनही दुर्लक्ष करणाऱ्या घंटागाडी ठेकेदाराला पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

पदवीधर ग्रंथपालांना मिळणार उच्चश्रेणी

$
0
0
पदवीधर ग्रंथपालांच्या विरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याच‌िका कोर्टाने फेटाळली असल्याची माह‌िती नाश‌िक ज‌िल्हा माध्यम‌िक शाळा श‌िक्षकेतर संघटनेने द‌िली आहे.

अखेर ‘स‌िल्व्हर ओक’वर गुन्हा दाखल

$
0
0
स‌िल्व्हर ओक शाळेव‌िरोधातील आंदोलन शन‌िवारी तीव्र झाल्यानंतर सरकारवाडा पोल‌िस स्टेशनमध्ये शाळेव‌िरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रेल्वेस्टेशनवर रिक्षाचे दरपत्रक लावावे

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर असलेल्या प्रिपेड रिक्षा कॅबीनजवळ दरपत्रक लावले नसल्याने येणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. याचा फायदा घेत रिक्षाचालक मनमानी भाडे आकारणी करत आहेत.

कैद्यांची संख्या वाढणार

$
0
0
डिसेंबरपासून नाशिकरोड कारागृहाच्या आवारात खुले कारागृह सुरू केले आहे. कैद्यांच्या संख्येत दुपटीने वाढ करावी, असा प्रस्ताव नाशिकरोड कारागृहाने प्रशासनास दिला आहे.

PSI ची पकडली कॉलर

$
0
0
जीपचालकाकडे परवाना तसेच गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने वाहतूक विभागाच्या पोलिस उपनिरीक्षकाची कॉलर पकडली. तपोवन रोडवरील जयशंकर गार्डन जवळ शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला.

सय्यदना मुफद्दल हेच आमचे धर्मगुरु

$
0
0
आजवर वादविवादात न दिसणाऱ्या दाऊदी बोहरी समाजाला अखेर वादाची ठिंणगी पडली आहे. समाजाचे ५२ वे धर्मगुरु डॉ. सय्यदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन यांचे निधन झाल्यानंतर धर्मगुरुपदावर त्यांचे सावत्रभाऊ खुजेमा कुतुबुद्दिन यांनी दावा केला आहे.

रज्जाक सय्यद यांना राष्ट्रपती पदक

$
0
0
नाशिक पोलिस दलात तब्बल ३६ वर्ष कर्तव्य बजावणाऱ्या एएसआय रज्जाक सय्यद यांना राष्ट्रपतीपदक जाहीर झाले आहे. ते सध्या नाशिक शहर पोलिस दलात पोलिस उपायुक्त परिमंडळ एक कार्यालयात कार्यरत आहेत.

ओझर : लँडिंग, पार्किंग चार्जेस माफ!

$
0
0
ओझर विमानतळाच्या ठिकाणी अल्प तिकीटदराच्या विमानांकडून लँडिंग आणि पार्किंग चार्जेस न आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने येथून विमानसेवा सुरू होण्यास हातभार लागणार आहे.

रिक्षा परवाने ऑनलाइन

$
0
0
रिक्षाचा परवाना (परमीट) मिळावे ही अनेक वर्षांपासूनची प्रत‌ीक्षा आता संपुष्टात येणार आहे. नाशिकमध्ये १६६७ परवान्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

खेळाडूंची उपेक्षा थांबणार का?

$
0
0
...अखेर महाराष्ट्र सरकारने गेले तीन वर्षे भिजत पडलेले शिवछत्रपती पुरस्काराचे घोंगडे एकदाचे जाहीर केल्याने पुरस्काराची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला असेल. खरे तर कोणतेही पुरस्कार ' ग्रेसफुली' आणि वेळेवर दिले पाहिजेत, त्यामुळे पुरस्काराचा, तो देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा मान राखला जातो.

केटीएचएम रॉक्स

$
0
0
कॉलेजियन्सच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेला 'नाशिक टाइम्स कार्निवल'चा पहिला दिवस गंगापूर रोडवरील केटीएचएम कॉलेजमध्ये संपला. दुपारच्या रटाळ वातावरणात कार्निवलचा फ्लोट केटीएचएमच्या कॅम्पसमध्ये दाखल झाला आणि कॅम्पसचा मुडच बदलला.

'एचपीटी'त कल्ला

$
0
0
डान्स, सिंगिंग, अक्टिंगसह आपल्यातील कलागूण दाखविण्याचं दणकेबाज व्यासपीठ असलेल्या 'नाशिक टाइम्स कार्निवल'चा दिमाखदार 'फ्लोट' सोमवारी सकाळी कॉलेजरोडच्या एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स कॉलेजमध्ये दाखल झाला. कार्निवलचा फ्लोट सकाळी साडेदहा वाजता येणार असला तरी कॉलेजियन्स साडेनऊपासून तयार होते. फ्लोट कॅम्पसमध्ये आल्याचे समजताच सर्वांनी एकच जल्लोष केला.

भोसलाचा हौसला

$
0
0
'नाश‌िक टाइम्स कार्न‌िवल'ला भोसला म‌िल‌िटरी कॉलेजच्या कॅम्पसमधूनही उत्स्फूर्त प्रत‌िसाद लाभला. या कॅम्पसमध्ये कार्न‌िवल फ्लोटचे स्टेज विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आले. म‌िम‌िक्री, डान्स, फ‌िटनेस अॅक्टीव्हीटी, अॅक्टींग, स‌िंगींग अशा व‌िव‌िध कॉम्पीटीशनमध्ये सहभागी होत भोसला म‌िलीटरी कॉलेजचा कॅम्पस बहरला होता.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images