Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

फास्ट

0
0

\Bस्कूल बॅगचे वाटप\B

नाशिक : नाशिक हिंदी सभा या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालोयपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. श्रमिकनगर परिसरातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. या वेळी शाळेतील सभेचे अध्यक्ष आर्किटेक्ट सुरेश गुप्ता यांच्यासह सभेचे पदाधिकारी उपस्थित होते.

\Bवधू-वर मेळावा\B

नाशिक : प्यारा परिवार नाशिक संस्थेतर्फे अखिल भारतीय सिंधी वधू-वर मेळावा होणार आहे. पाथर्डी फाटा येथील हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये सहा जानेवारी रोजी वधू-वर मेळावा होणार आहे.

\B

आज बैठक\B

नाशिक : नाशिक जिल्हा केबल ऑपरेटर असोसिएशनच्या वतीने मंगळवारी, १ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता बैठक होणार आहे. मुंबई नाका येथील कालिकादेवी मंदिर सभागृहात ही बैठक होईल. बैठकीत ट्रायने ठरवलेले एमआरपी धोरण, एमएसओेकडून येणाऱ्या अडचणी या विषयांवर चर्चा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डुबेरे, देवपूर येथेविकासकामांचा प्रारंभ

0
0

म. टा. वृत्तसेवा सिन्नर

डुबेरे व देवपूर येथे विविध विकासकामांचा प्रारंभ सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. त्यांच्या हस्ते सटुआई मंदिर भक्तनिवास, गावातील रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण, एक लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि स्मशानभूमी शेड बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. डॉ. सावंत यांनी सांगितले, की लोकांच्या गरजा ओळखून कामे करणारा आमदार म्हणून राजाभाऊ वाजे यांचा लौकिक झाला आहे. डुबेरेच्या सटूआईने त्यांच्या कपाळावर आमदारकीच्या पाच टर्म पूर्ण करतील, असे भविष्य लिहिलेले असल्याचा उल्लेख मंत्री डॉ. सावंत यांनी केला. याच विधानाचा त्यांनी देवपूर येथे पुनरुच्चार केला.

देवपूर येथे जिल्हा नियोजन मंडळ व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुसज्ज व अद्ययावत इमारतीचे लोकार्पण डॉ. सावंत यांच्या हस्ते झाले. आमदार वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, आरोग्य संचालक संजीव कांबळे, उदय सांगळे, निमाचे संचालक राजेश गडाख, पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन भाबड, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, गटनेते हेमंत वाजे, बाजार समितीचे माजी सभापती नामदेव शिंदे, संजय सानप, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन वसंत आव्हाड, व्हा. चेअरमन छबू थोरात आदी उपस्थित होते.

आमदार वाजे यांनी आपल्या खास शैलीतून विरोधकांचा समाचार घेतला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सांगळे यांनी आरोग्य केंद्राच्या सुशोभीकरणासाठी निधी देण्याचे आश्‍वासन दिले, तसेच आमदार वाजे यांनी जिल्ह्यात अन्य आमदारांच्या तुलनेत सर्वाधिक चांगली विकासकामे उभी केली असल्याचेही त्या म्हणाल्या.

देवपूरला शवविच्छेदन सुविधा देणार

नाशिक : देवपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निश्चितपणे विचार करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य कुटुंब व कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. सिन्नर तालुक्यात देवपूर येथील आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. सावंत म्हणाले, की प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सर्व सुविधांनी युक्त आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल. तत्पूर्वी डॉ. सावंत यांच्या हस्ते सामाजिक सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वागत अन् जल्लोष!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हॉटेल्समध्ये केलेली आकर्षक रोषणाई, रेस्टॉरंटसह कॅफेबाहेर सेल्फी काढण्यात दंग असलेली तरुणाई, नववर्षाच्या स्वागतासाठी कापण्यात आलेले केक अन् रात्री ठिक १२ वाजता आकाशात सोडलेले स्काय लॅम्प, अशा उत्साहवर्धक वातावरणात 'हॅपी न्यू इयर' म्हणत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सरत्या वर्षाला निरोप देत, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईमध्ये सायंकाळपासून उत्साह दिसला. कॉलेज रोड, गंगापूर रोडसह उपनगरांत नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची गर्दी झाली. अनेक हॉटेल आणि कॅफेमध्ये न्यू इयर पार्टी आणि इतर कार्यक्रम आयोजित केले होते. न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी रात्री १० नंतर कॉलेज रोडवर तरुणाईसह मोठ्यांनीही ग्रुपने हजेरी लावली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सकाळपासूनच पोलिसांकडून पेट्रोलिंग करण्यात येत होते.

कॉलेज रोडवरील मॉडेल कॉलनी चौक, गंगापूर रोड परिसरातील बापू पूल, सिटी सेंटर मॉल, गंगापूर शिवारातील वायनरी, शहराबाहेरील रिसॉर्टसह खवय्यांच्या पसंतीस पुरेपूर उतरलेली हॉटेल्स, अशा स्पॉटवर न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी गर्दी झाली होती. शहरातील लहान-मोठ्या सोसायटींनी सोसायटीत राहणाऱ्यांसाठी न्यू इयर पार्ट्यांचे आयोजन केले होते. फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर नवीन वर्षाचे संकल्प तरुणाईकडून अपलोड करण्यात आले. या ट्रेंडमध्ये 'न्यू इयर अवॉर्ड्स'सारखे ट्रेंड यंदाही हिट असल्याचे दिसून आले.

- सविस्तर वृत्त...प्लस १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मौलाना घेणार पुढाकार!

0
0

म. टा. वृतसेवा, मालेगाव

सरकारने सुरू केलेल्या गोवर, रुबेला लसीकरणास शहरातील मुस्लिमबहुल भागात कमी प्रतिसाद मिळत असल्याने राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी याचे गांभीर्य लक्षात घेत सोमवारी स्वतः मालेगावचा दौरा केला. या वेळी मौलानांसह मुस्लिम बांधवांशी केलेल्या चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, स्थानिक उर्दू भाषेतून पत्रक, जाहिरात याद्वारे जनजागृती केली जाणार आहे. मशिदीतदेखील नागरिकांना माहिती देणार असल्याची ग्वाही मौलानांनी दिल्याचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांना माहिती दिली.

आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा शहरातील प्रमुख मौलाना, मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी मालेगाव शहर लसीकरणात मागे राहू नये, यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असून, शहरातील मुस्लिम बांधवांनीही याबाबतचे गैरसमज बाजूला सारून बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले. जिल्ह्यात ८० टक्क्यांहून अधिक लसीकरण झालेले असताना शहरातील मुस्लिमबहुल भागात लसीकरणाबाबत सोशल मीडियाद्वारे गैरसमज पसरवले जात आहेत. यामुळे मालेगावात केवळ ४७ टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरणाचा टक्का वाढावा, यासाठी आरोग्यमंत्री सावंत यांनी सोमवारी सायंकाळी शहरातील सुलेमानी चौकातील जमिएत- ए- उल्मा संघटनेच्या कार्यालयात मौलानांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत संघटनेचे अध्यक्ष मौलाना हमीद जमाली, काझी एकलाख झामाली, मौलाना मुफ्ती इस्माईल, आरोग्याधिकारी डॉ. किशोर डांगे, डब्ल्यूएचओचे डॉ. अजहर आदी उपस्थित होते.

उर्दूतून जनजागृती करणार

या वेळी मौलानांशी झालेल्या चर्चेनंतर डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील मुस्लिमबहुल भागात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे मान्य करीत मालेगाव लसीकरणात मागे राहू नये, यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. गोवर, रुबेला लसीकरण पूर्णतः सुरक्षित आहे. शहरातील मुस्लिम समुदायात याबाबत पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी येथील मौलानांना आवाहन केले आहे. स्थानिक उर्दू भाषेतून पत्रक, जाहिरात याद्वारे जनजागृती केली जाणार आहे. मशिदीतदेखील नागरिकांना माहिती देणार असल्याची ग्वाही मौलानांनी दिल्याचे मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. अनेक मुस्लिम देशांत गोवर, रुबेलाचे लसीकरण पूर्ण झाले असून, यापासून बालकांना कोणताही धोका नाही. मुस्लिम बांधवांनी या लसीकरण मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी जमिएत- ए- उल्मा संघटनेच्या अध्यक्षांनी लसीकरण करण्यासाठी केलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

मालेगावला प्राधान्य देणार

शहरातील आरोग्य यंत्रणेविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता, शहरातील आरोग्यसेवा सुधाराव्यात यासाठी सामान्य रुग्णालयासह लवकरच महिला व बालकांसाठी रुग्णालय कार्यान्वित करण्यात येईल. आगामी काळात आरोग्य विभागातील भरतीत मालेगावातील पदे भरण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. शहर व परिसरातील स्थानिक डॉक्टरांनी सेवा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री सावंत यांनी केले. स्थानिक डॉक्टरांनी सेवा दिल्यास त्यांना मानधन देण्याचादेखील विचार आरोग्य विभागाकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशनने याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहनही डॉ. सावंत यांनी केले.

रिक्त पदे लवकरच भरणार

नाशिक : उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षकांसह स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञांची पदे लवकरच भरण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटुंब व कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी दिली. उमराणे येथील ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. सावंत म्हणाले, की ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी डॉक्टर तयार होत नाहीत. ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. एनएचएमच्या माध्यमातून दोन लाखांपर्यंत पगार देण्याची, तसेच कामगिरीवर आधारित मानधन देण्याचीदेखील तयारी आहे. त्यामुळे डॉक्टरांनी ग्रामीण भागात सेवा द्यावी. येत्या काही दिवसांत १०८ रुग्णवाहिकेचा मार्ग बदलण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी आमदार डॉ. राहुल आहेर, सरपंच लताबाई देवरे, जिल्हा परिषदेचे सदस्य यशवंतराव शिरसाठ, पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे, प्रशांत देवरे आदी उपस्थित होते.

प्रत्येक मूल संरक्षित व्हावे

मालेगाव शहरातील प्रत्येक मूल गोवर, रुबेलापासून संरक्षित होणे गरजेचे असून, त्या दृष्टीने जनप्रबोधन करण्यासाठी सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य कुटुंब व कल्याणमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले.

मालेगाव येथे मौलवी यांच्यासोबत जतेतुर उल्माच्या कार्यालयात आयोजित गोवर, रुबेला लसीकरणाबाबत चर्चेदरम्यान ते बोलत होते. डॉ. सावंत म्हणाले, की पोलिओप्रमाणे गोवर, रुबेलाचे उच्चाटन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुस्लिम समाजातील नागरिकांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करून मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी जनजागृतीवर विशेष भर देण्यात येईल. गोवर, रुबेला लसीकरण मुस्लिम देशांसह जगातील १४९ देशात झाले असून ते पुर्णत: सुरक्षित आहे. लसीकरणाबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. शंका असल्यास आरोग्य विभागाकडून माहिती घेऊन आपल्या ९ महिने ते १५ वर्षाच्या मुलांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मालेगाव शहरातील वैद्यकीय सुविधांची गरज लक्षात घेता आणखी एक रुग्णालय देण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही डॉ.सावंत म्हणाले. त्यांनी मुस्लीम समाजाच्या प्रतिनिधींशी आणि मौलवी यांचेशी लसीसकरणाबाबत चर्चा केली. यावेळी आरोग्य संचालक डॉ.संजीव कांबळे, उपसंचालक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, आरोग्य अधिकारी डॉ.किशोर डांगे, अब्दुल हमीद जमाली, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर पल की कहाणीं...

0
0

फोटो - पंकज चांडोले

--\B

सूरमय मैफलीने रंगत

\Bनाशिक : मनातील भावनांचा ठाव घेणारे शब्द अन् त्या शब्दांतून जीवनाचे विविध पैलू उलगडणारी गाणी. ही गाणी सुरांचा मागोवा घेत होती अन् शब्दसुरांचा अनोखा मिलाफ घडत होता. शब्द आणि सुरांनी रसिकांना मोहून टाकणारी सोमवारची ही रात्र नाशिककरांसाठी सूरमय ठरली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला संकल्पांना अन् स्वागताला उत्साहात साथ मिळाली, ती साहीर लुधियानवी यांनी गायलेल्या सूरमधूर गीतांच्या मैफलीची. विश्वास को-ऑप बँकेच्या वतीने 'साहिर - हर पल का शायर....' या सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले. गंगापूर रोड येथील विश्वास गार्डनमध्ये सोमवारी संध्याकाळी ६ वाजता ही मैफल रंगली. प्रसिद्ध गायक मिलिंद धटिंगण, विवेक केळकर आणि गायिका रागिणी कामतीकर यांनी विविध गीते सादर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाय्यक पोलिस आयुक्तांना धक्काबुक्की

0
0

चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : धावण्याची स्पर्धा सुरू असताना स्पर्धकांमध्ये कार घेऊन जाण्याचा आग्रह धरत सहायक पोलिस आयुक्तांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करणाऱ्या चौघांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. संशयितांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे या प्रकरणी अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. यामुळे संशयितांची सेंट्रल जेलला रवानगी करण्यात आली. विशाल वाणी (वय ३०), प्रांजल कोठावदे (२७), पंकज कोठावदे (३५, तिघे रा. जळगाव) आणि राजू लांडे (३० रा. नाशिक) अशी या संशयितांची नावे आहेत. 'जॉइन द चेंज' या तंबाखूमुक्त नाशिक उपक्रमातंर्गत शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या नाइट रनदरम्यान हा प्रकार घडला. रविवारी (दि. ३०) रात्री स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा कॅनडा कॉर्नर येथून जात असताना पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक थांबविली होती. यात वाणी आणि कोठावदे दाम्पत्य कारमध्ये होते. संशयित आरोपी आणि चालक असलेला वाणी सातत्याने हॉर्न वाजवत होता. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, वाणीने त्याकडे दुर्लक्ष केले. या वेळी तिथे फक्त दोन पोलिस कर्मचारी होते. सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते तिथे आले. त्या वेळी वाणीने हॉर्न वाजविण्याचा प्रकार आणखी वाढविला. त्यावर नखाते यांनी संशयितास बोलावून ही स्पर्धा पाच मिनिटांत संपेल आणि त्यानंतर तुम्ही जा, असे सांगितले. मात्र, चालक वाणी थेट धावून आला. त्याला बाजूला करीत असताना प्रांजल कोठावदे या महिलेने कारमधून खाली उतरत शिवीगाळ करून नखातेंसह इतर पोलिसांवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लागलीच अतिरिक्त कुमक मागविली. याच दरम्यान तिथे बघ्याची गर्दी जमली होती. त्यातील लांडे यानेदेखील पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सरकारवाडा पोलिस स्टेशनची अतिरिक्त कुमक आल्यानंतर या चौघांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले. कोठावदे यांच्या कारमध्ये आणखी एक महिला व दोन मुले होती. पोलिसांनी शहरातील काही नातेवाइकांचा शोध घेऊन मुलांना त्यांच्या ताब्यात दिले.

चोवीस तासांत आरोपपत्र

स्पर्धेबाबत, तसेच बदललेल्या मार्गाबाबत प्रसिद्धिमाध्यमांमधून जनजागृती करण्यात आली होती, तरीही संशयितांनी पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. या घटनेची गंभीर दखल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली. संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालाच, पण अवघ्या चोवीस तासांत त्यांच्याविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामुळे चौघाही संशयितांची नाशिक सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सरपूर्व तपासणीशिबिराला प्रतिसाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत शहरातील नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गिरणारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅन्सरपूर्व आरोग्य तपासणी शिबिर झाले. नामको रुग्णालयाचे डॉ. पंकज दाभाडे यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिरात कॅन्सरची लक्षणे, निदान व उपचार या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले. नामको चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सेक्रेटरी शशिकांत पारख यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर झाले. गिरणारे गावासह परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य केंद्राचे डॉ. एस. डी. पाटील, स्वाती पवार व डॉ. मनोज रायते यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारली चित्रांनी सजली कार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त आयोजित 'चित्रांजली' उपक्रमात अनेक कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रांगोळी, कॅनव्हास, पॉट, हँडमेड पेपर, झाडांची पाने यासह चक्क कारवरही वारली चित्रे रंगविण्यात आली. मविप्र संचलित आर्किटेक्चर कॉलेजच्या प्रांगणात दोन दिवस चित्रमय वातावरण निर्माण झाले. आदिवासी वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांनी या आगळ्यावेगळ्या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले.

साहित्य, विषय, आकार, रंगसंगती याबाबत कोणतेही बंधन नसलेला मुक्ताविष्कार ही संकल्पना होती. सर्वांच्या सहभागाने ती यशस्वी झाली. प्रेमदा दांडेकर यांनी प्रवेशद्वाराजवळ भव्य वारली रांगोळी काढून सर्वांचे स्वागत केले. विलास देवळे या आदिवासी वारली युवकाने मोराचे सुंदर चित्र रेखाटले. व्यवसायाने अभियंता असणाऱ्या हर्षद थविल याने वारली संस्कृती चित्रबद्ध केली. महेंद्र भोये याने जिव्या मशे यांचे व्यक्तिचित्र रेखाटले. श्वेता गरे हिने वारली चित्रशैलीत दशावतार चित्रित केले. स्वाती मोरे हिने कापडी पिशवीवर वारली चित्रे रंगवली. अॅड. अपूर्वा भांडारे हिने सर्वधर्मसमभाव चित्रातून व्यक्त केला. याशिवाय उत्कर्षा जोशी, मीनाक्षी राऊत, सोमनाथ चव्हाण, ऋतुजा कदम, कविता चिपळूणकर, नेहा बर्वे, जान्हवी पाठक, हर्षा रामोळे यांनीही विविध वारली चित्रे साकारली.

'चित्रांजली'चा गौरव!

आदिती पळसुले हिने चक्क चारचाकी कार आणून त्यावरच वारली चित्रे रंगवली. विद्यार्थी, कलारसिकांना निसर्ग, आदिवासी जीवनशैली यांचे सुरेख दर्शन घडविले. या उपक्रमात सहभागी होऊन 'चित्रांजली' अर्पण करणाऱ्या कलाकारांना प्राचार्या प्राजक्ता बस्ते यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दोन दिवस या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. नाशिककर चित्ररसिकांनी त्याचा आस्वाद घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फास्ट न्यूज-सीसीआर

0
0

मराठी संवर्धनासाठी

'भोंसला'त पंधरवडा

नाशिक : भोंसला सैनिकी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १ ते १५ जानेवारीदरम्यान होणार असून, या निमित्त महाविद्यालयांतर्गत वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शुद्धलेखन, स्वरचित काव्यवाचन, मराठी गाणे, अंताक्षरी, कविता, भजन, निबंधलेखन, वक्तृत्व, वादविवाद, घोषवाक्य, भित्तिचित्र प्रदर्शन, ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, संवाद लेखकांशी आदी स्पर्धा व उपक्रम होणार आहेत. महाविद्यालयातील सॉफ्ट स्कील रूममध्ये हे कार्यक्रम होतील. स्पर्धांचे पारितोषिक वितरण १५ जानेवारी रोजी होईल. मराठी विभागप्रमुख हिरा वाघ, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सी. व्ही. पवार, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. भारत गुगाणे यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्समधील पैशांची चोरी

0
0

पर्समधील पैशांची चोरी

नाशिकरोड : सिन्नरला जाण्यासाठी कोपरगाव बसमध्ये बसलेल्या महिला प्रवाशाकडील पर्समधून १४ हजार ५०० रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान नाशिकरोड बसस्थानकावर उघडकीस आली. सीमा सुरेश गायकवाड (वय ४३, रा. सेंट्रल रेल्वे कॉलनी, परळ-पूर्व, मुंबई) यांनी या घटनेनंतर नाशिकरोड पोलिसात फिर्याद दाखल केली. सीमा या मुंबईहून गितांजली एक्स्प्रेसने नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता उतरल्या. सिन्नरला जाण्यासाठी त्या नाशिकरोड बसस्थानकावरून कोपरगाव बसमध्ये बसल्या. तिकीट काढण्यासाठी पर्स उघडताच आतमधील १४ हजार ५०० रुपये नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हॉटेल मॅनेजरवर चाकूहल्ला

नाशिकरोड : दारूसाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल मॅनेजरला निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर चाकूने हल्ला करीत ६ हजार ८०० रुपयांची रोकड घेऊन हल्लेखोरांनी पोबारा केल्याची घटना नाशिकरोडमधील महापालिकेच्या बिटको हॉस्पिटल परिसरात शनिवारी (दि. २९) सायंकाळी घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या जयंत शश्याप्पा पूजारी (वय ५२, रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी) यांनी नाशिकरोड पोलिसात फिर्याद दिली. ते मद्रास कॅफे या हॉटेलात मॅनेजर म्हणून काम करतात. दीपक फाजगे आणि गुड्डु उर्फ अर्जुन पवार अशी हल्लेखोर संशयितांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ‘बिटको’ला मिळणार सीटी स्कॅन मशीन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी नाशिकरोड येथील नूतन बिटको रुग्णालयासाठी सीटी स्कॅन व एमआरआय यंत्र खरेदीसाठी मिळालेले २३ कोटी रुपये खर्च करण्याची मुदत सोमवारी (ता. ३१) संपत असल्याने सोमवारी घाईने स्थायी समितीची बैठक बोलवण्यात आली. बैठकीत दोन्ही मशिनच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली.

या यंत्र खरेदीसाठी सरकारने ३१ डिसेंबर ही 'डेडलाइन' दिली असल्याने सोमवारी स्थायी समितीची तातडीची बैठक बोलावण्यात आली. महापालिकेचे नाशिकरोडस्थित प्रमुख रुग्णालय असलेल्या बिटको रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना सीटी स्कॅन व एमआरआयची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी २८ ऑगस्ट २०१२ रोजी महासभेने मंजुरी दिली होती. मात्र, निधीअभावी ही खरेदी रखडली होती. योगायोगाने २०१५-१६ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारने दिलेल्या अनुदानांतर्गत सीटी स्कॅन व एमआरआय यंत्र खरेदीसाठी तब्बल २३ कोटींचा निधी महापालिकेला उपलब्ध झाला. त्यामुळे सिंहस्थ निधीतून ही खरेदी करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले होते. मात्र, या यंत्रांच्या खरेदीसाठी महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या निविदाप्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याने ही यंत्रखरेदी रखडली होती. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळाही आटोपल्याने या यंत्र खरेदीसाठीचा शिल्लक २३ कोटींचा सिंहस्थ निधी सरकारने परत मागविला होता. मात्र, यंत्र खरेदीसाठी महापालिकेची निविदाप्रक्रिया सुरू असल्याचे कारण देत महापालिकेने हा निधी खर्च करण्यात येत असल्याचे कारण दिले होते. सरकारने दिलेल्या मुदतीला दोन दिवस शिल्लक असतानाच वैद्यकीय विभागाला या निधीची आठवण झाली. त्यामुळे सोमवारी सभा घेण्यात आली.

वैद्यकीय विभागाने सीटी स्कॅन यंत्रासाठी ८ कोटी २३ लाख, तर एमआरआय यंत्र खरेदीसाठी १४ कोटी ६० लाखांच्या निविदा काढल्या होत्या. सहाव्यांदा राबविण्यात आलेल्या निविदाप्रक्रियेत अखेर महापालिकेला या यंत्रणांच्या खरेदीसाठी निविदा प्राप्त झाल्या. त्यामुळे घाईने सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनुष्यबळ विवरणपत्र सादर करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र व राज्य सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, व्यवसाय, उद्योग, खासगी आस्थापनांनी त्रैमासिक ई-आर १ विवरणपत्र ३० जानेवारीपर्यंत www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती) कायदा १९५९ अंतर्गत नियम १९६० अन्वये तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत हे विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाकडील सर्व नियुक्त्यांचा डाटा संकेतस्थळावर देण्यात आला असून, तिमाही विवरणपत्र सादर करण्याची सुविधा १ जुलै २०१७ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती व तांत्रिक सहाय्यासाठी 'रोजगार चॅट हेल्पलाइन' सुविधेचा वापर करावा अथवा कार्यालयाच्या ०२५३-२९७२१२१ या दूरध्वनी क्रमांकावर सुटीचे दिवस वगळून सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक संचालक संपत चाटे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रायपोर्टचा मार्ग अखेर मोकळा

0
0

विक्रीकर विभागाचा अडथळा दूर

...

- अंदाजे ११० एकरवर होणार ड्रायपोर्ट

- निसाकाचीही चाके फिरणार

- नाशिकच्या विकासाला मिळणार गती

....

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नववर्ष निफाडसह नाशिकसाठी आंनददायी वार्ता घेऊन आले आहे. विक्रीकर विभागाच्या थकबाकीमुळे अडचणीत सापडलेल्या निफाड कारखाना कार्यस्थळावरील प्रस्तावित ड्रायपोर्टचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विक्रीकर विभागाच्या थकबाकीचा बोजा निफाड कारखान्याच्या इतर मालमत्तेवर लावण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे ड्रायपोर्टसह निफाड सहकारी साखर कारखाना सुरू होण्याचे आशादायी चित्र दिसू लागले आहे.

निफाड सहकारी साखर कारखान्यावरील नाशिक जिल्हा बँकेचे कर्ज, विक्रीकर विभागाची थकबाकी, कामगार देणी व इतर आर्थिक देणी असल्याने कारखाना कार्यस्थळावरील हा प्रकल्प होतो की नाही, अशी शंका घेतली जात होती. त्यातच विक्रीकर विभागाने कर माफ करण्यास नकार दिल्याने हा प्रकल्प धुळ्याला जाणार अशीही चर्चा होती. मात्र या प्रकल्पातील विक्रीकर विभागाचा अडथळा अखेर दूर झाला आहे. विक्रीकर विभागाच्या थकबाकीचा बोजा हा निसाकाने ड्रायपोर्टला दिलेल्या जमीनसोडून इतर जमिनीवर राहील, या मध्यममार्गी पर्यायाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजुरी दिली. यामुळे ड्रायपोर्टचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती ड्रायपोर्ट प्रकल्पाचे सूत्रधार सुरेशबाबा पाटील यांनी दिली. विक्रीकर विभागाची निसाकावर २१ कोटी ८७ लाख रुपये मूळ थकबाकी आहे. मात्र या विभागाने केलेल्या दाव्यानुसार ३५ कोटी ५० लाख रुपये थकबाकी आहे.

- सविस्तर वृत्त...२

...

ड्रायपोर्टसाठी विक्री केलेल्या जमिनीव्यतिरिक्त उरलेल्या जागेवर विक्रीकर विभागाच्या थकबाकीचा बोजा लावला जाईल, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दूरध्वनीवरून दिली. त्यामुळे आता ड्रायपोर्ट प्रकल्प मार्गी लागण्याबरोबरच निसाकाही सुरू होऊ शकेल.

- सुरेशबाबा पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टॅम्प पेपर चोरीच्या गुन्ह्याची नोंदच नाही

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरात गाजलेल्या स्टॅम्पपेपर चोरी प्रकरणात सोमवारी सातही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. स्टॅम्प चोरीबाबत कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नसल्याचे तसेच याबाबत पंचनामा झाला नसल्याचे आरोपींचे वकील अ‍ॅड. घुमरे, अॅड. ढिकले व अॅड. काळे यांचा हा युक्तिवाद महत्त्वाचा ठरला.

रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी रामभाऊ पुंजाजी पवार (रेल्वे सुरक्षा बलाचे भुसावळ विभागीय अधिकारी), ब्रिजकिशोर तिवारी (निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), विलासचंद्र राजाराम जोशी (निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), प्रमोद श्रीराम डहाके (उपनिरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), मोहम्मद सरवर (शिपाई, रेल्वे सुरक्षा बल), विलास जनार्दन मोरे (शिपाई, रेल्वे सुरक्षा बल), ज्ञानदेव रामू वारके (हवालदार, रेल्वे सुरक्षा बल) आणि अब्दुल करीम लाडसाब तेलगी अशी या प्रकरणात कोर्टाने निर्दोष सोडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. यातील तेलगीचा २३ ऑक्टोबर २०१७ रोजी तुरुंगातच मृत्यू झालेला आहे़ सरकार पक्षाची बाजू सीबीआयचे वकील ए. के. मिश्रा यांनी तर आरोपींतर्फे अ‍ॅड. एस. बी. घुमरे, अॅड. ढिकले व एम. वाय. काळे यांनी काम पाहिले.

स्टॅम्प पेपर प्रकरण देशभरात खूप गाजले. यात अनेक राजकीय व्यक्तींची नावे समोर आली. राजकीय दृष्टिकोनातून हे प्रकरण संवेदनशील ठरले होते. यातील मास्टर माईंड असलेल्या तेलगीवर देशभरात गुन्हे दाखल झाले. त्यातील काही गुन्ह्यांमध्ये त्यास जन्मठेपेची शिक्षा झाली. नाशिकमधील प्रकरणात तेलगी समक्ष हजर होणे गरजेचे असून, तो हजर होत नाही तोपर्यंत खटल्याचे काम पुढे सरकणार नसल्याने सीबीआयचे विशेष वकील विश्वास पारख यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तेलगीला एड्स झाल्यामुळे त्याला न्यायालयीन सुनावणीत गैरहजर राहण्याची अनुमती मिळावी, यासाठी खुप प्रयत्न करण्यात आले. परंतु, पारख यांनी हैदराबाद बेंगळुरु न्यायालयासह इतरत्र पाठपुरावा केला. अखेर २०१३ मध्ये अब्दुल करीम तेलगी हा पोलिस बंदोबस्तात नाशिक कोर्टात हजर झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय महाविद्यालयआवारात तरुणाची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

पत्नीची रविवारीच रुग्णालयातच प्रसूती होऊन नवजात शिशूचा गर्भातच मृत्यू झाल्याच्या धक्का बसल्याने तरुणाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात झाडाला रुमालाच्या साह्याने गळफास घेत आत्महत्त्या केली. सुमारे ३ तास त्याचा मृतदेह लटकलेल होता. देवला बारका बारेला (वय २७, रा.रामजीपाडा, अडावद, ता.चोपडा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

देवला याची पत्नी उदीयाबाई प्रसूतीसाठी तीन दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अॅडमिट झाली होती. रविवारी दुपारी सीझेरीयनने तिची प्रसूती झाली. मात्र नवजात अर्भकाचा गर्भातच मृत्यू झाला होता. त्यामुळे देवळाला मोठा धक्का बसला. त्यात्यानतंर देवला रुग्णालयात झोपला. रात्री १ वाजता उठून तो प्रसूती कक्षाकडेही गेला होता. सकाळी ७ वाजता वॉर्ड क्रमांक ९ जवळ एका झाडावर रुमालाच्या साह्याने देवला याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन वर्षामध्ये वेतनवाढीची भेट

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१८ पासून पदोन्नती आणि वेतनवाढ करण्याचा निर्णय सभापती शिवाजी चुंभळे व संचालकांनी सोमवारी (दि. ३१) घेतला. या निर्णयाने २००३ नंतर पहिल्यांदाच अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली आहे.

नाशिक बाजार समितीत ११९ कर्मचारी असून त्यातील नियमित असलेल्या ६१ जणांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. तर ३२ कर्मचारी कालबद्ध म्हणजे १२ वर्षे सेवा पूर्ण केलेले आहेत. तसेच ९३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा फायदा होणार आहे. यात कमीत कमी १ हजार ८२२ ते जास्तीत जास्त १४ हजार ९६० रुपयांपर्यंतची वेतनवाढ झालेली आहे. या पदोन्नती आणि वेतनवाढीमुळे बाजार समितीवर दरमहा सुमारे ५ लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. नवीन भरती झालेले तसेच शिपाई पदावर काम करणारे ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही अशा २६ कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचा फायदा मिळणार नाही.

पदोन्नती आणि वेतनवाढ मिळाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. बाजार समितीच्या कामकाजात सुसूत्रता आणून बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी व विकासासाठी भर टाकण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. याप्रसंगी उपसभापती युवराज कोठुळे, संचालक चंद्रकांत निकम, रवींद्र भोये, भाऊसाहेब खांडबहाले, जगदीश अपसुंदे, विमल जुंद्रे, संपत सकाळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटारीत पडून बालकाचा मृत्यू

0
0

मालेगाव : शहरातील देवीच्या मळा परिसरातील वस्तीत दीड वर्षीय मुलाचा गटारीच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. सोमवारी सकाळीच्या सुमारास ही घटना घडली. अफताब खान बैतुल्ला खान असे या मृत बालकाचे नाव आहे. पालिकेकडून या परिसरात पक्क्या गटारी करण्यात न आल्याने या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. सकाळच्या वेळेत हा दीड वर्षीय बालक अंगणात खेळत असताना अचानक या गटारीच्या खोल खड्ड्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमराणे आरोग्यमंत्री फोटो

तेलगीसह सात आरपीएफ कर्मचारी निर्दोष

0
0

स्टॅम्प चोरी प्रकरणात सीबीआय कोर्टाचा निकाल

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरात गाजलेल्या २००३ मधील रेल्वेतील २३ कोटी रुपयांच्या स्टॅम्प चोरी प्रकरणातील रेल्वे सुरक्षा बलातील सात अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मयत अब्दुल करीम तेलगीची विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी सोमवारी सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.

नाशिकरोडच्या भारत प्रतिभूती मुद्रणालयात स्टॅम्प छापले जातात. येथून रेल्वेच्या मदतीने हे स्टॅम्प देशभरात पाठविले जातात. सन २००३ मध्ये समोर आलेल्या या प्रकरणात देशभरात जाणाऱ्या स्टॅम्प पेपरची रेल्वे प्रवासातच चोरी होत असल्याची बाब दिल्लीच्या सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने समोर आणली होती. हे काम रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने आणि तेलगीसाठी होत असल्याने सात जणांविरुद्ध १६ डिसेंबर २००३ रोजी गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक झाली होती. हा खटला जिल्हा कोर्टात विशेष सीबीआय न्यायालयात सुरू झाला होता. संशयितांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा तसेच कट रचण्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती़

..

खटल्याचा इतिहास

सीबीआयने २००५ मध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. फेब्रुवारी २०१६ पासून या खटल्यात पुरावे नोंदविण्यास सुरुवात झाली. सीबीआय व आरोपीच्या वकिलांनी ४९ साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाने सादर केलेल्या साक्षीदारांनी कोणाचेही नाव घेतले नाही, तर अनेक साक्षीदारांनी सीबीआयने काहीही माहिती न देता जबाब घेतल्याचे स्पष्ट केले. सीबीआयने दाखल केलेली कागदपत्रे, साक्षीदारांची साक्ष हे आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ नसल्याने न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. स्टॅम्प चोरीबाबत कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नसल्याचे तसेच याबाबत पंचनामा झाला नसल्याचे आरोपींचे वकील अ‍ॅड. घुमरे, अॅड. ढिकले व अॅड. काळे यांचा हा युक्तिवाद महत्त्वाचा ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसाकाचीही फिरणार चाके!

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ड्रायपोर्टसाठी निसाकाची ११० एकर पडीत जागा जिल्हा बँकेकडून जेएनपीटी विकत घेणार आहे. निसाकावर २८० कोटी कर्जाचा बोजा आहे. निसाकाची जागा विकत घेतल्यास त्यातून आलेल्या पैशातून जिल्हा बँकेची थकबाकी वसुलीपोटी जमा होईल. यामुळे निसाकाचे बरेचशे कर्ज कमी होईल. पर्यायाने निफाड सहकारी साखर कारखाना सुरू होण्यासाठी मार्ग मोकळा होऊ शकेल. तसे झाल्यास निसाकाला संजीवनी मिळून त्याचा शेतकरी, कामगार यांना फयदा होईल.

चार वर्षांपासून बंद असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या पडीत जमिनीवरील ड्रायपोर्टसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत मंजुरी देतानाच ५०० कोटी रुपयांची तरतूदही जाहीर केली होती. याला अनुसरून गेल्या चार महिन्यांत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अधिकारी यांनी येऊन नियोजित पोर्टसाठी असणाऱ्या जागेची पाहणी करून प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर या विषयाला गती आली होती. निफाड कारखान्यावर ड्रायपोर्ट उभारतानाच बंद असलेला निफाड साखर कारखानाही सुरू होणार, अशी योजना असल्याचे सुरेशबाबा पाटील यांनी स्पष्ट केले.

निफाड सहकारी साखर कारखान्याची २६३ एकर जागा आहे. यामध्ये ३० एकरांत निसाका उभा आहे. या ठिकाणी वसाहत, शैक्षणिक संकुल, इतर उपक्रम असे सर्व मिळून ९० ते १०० एकर जागा अडकली असून, उर्वरित जागेपैकी १०८ ते ११० एकर जागेवर प्रस्तावित ड्रायपोर्ट नियोजित आहे. निसाकावर नाशिक जिल्हा बँकेचे १०५ कोटींचे कर्ज आहे. या कर्जावरील व्याजासहित होणारी रक्कम थकीत असल्याने जिल्हा बँकेने कारखान्याची मालमत्ता सील केली आहे. ड्रायपोर्ट उभारण्यासाठी निसाकाकडून जेएनपीटी जागा खरेदी करणार आहे. मात्र जिल्हा बँकेकडे कारखान्याची जप्ती असल्याने या जमीन खरेदी प्रक्रियेसाठी येणारी तांत्रिक अडचण लक्षात घेऊन भाजपचे सुरेशबाबा पाटील, डॉ. प्रशांत पाटील यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला आणि जिल्हा बँकेची व्याज वजा जाता मुद्दल कर्जाची रक्कम भरण्यासाठी परवानगी मिळवली आहे. यामुळे निसाकावरील कर्ज एका झटक्यात फिटून दुसऱ्या बाजूला जिल्हा बँकेलाही एकरकमी १०५ कोटी रुपये मिळून बँकेची मोठी वसुली होऊन शेतकऱ्यांच्या श्वास असलेला निफाड कारखाना सुरू व्हायलाही मदत होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images