Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सैनिकाची व्यथा मांडणारे ‘आधारशिला’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सैनिकाचे जगणे मोठे अवघड असते, त्याला राष्ट्रासाठी लढावे लागते. मनात बायको पोरांचा कितीही विचार असला, घराची कितीही आठवण येत असली तरी लढणे हेच त्याचे भागध्येय असते. परंतु आपल्याच राष्ट्राचे लोक युध्दाच्या वेळी आपल्याच सैनिकांच्या घरातील लोकांवर अत्याचार करीत असतील, तर अशावेळी ज्याचे ते घर आहे, त्या सैनिकाने काय करावे? तो सैन्यातूनच पळ काढतो अशा आशयाचे कथानक असलेले 'आधारशिला' नाटक रविवारी सादर करण्यात आले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६ व्या नाट्यमहोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत 'आधारशीला' हे नाटक कामगार कल्याण भवन, सातपूर यांच्या वतीने रविवारी सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. मुकंद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन बाळ मुजुमदार यांनी केले होते.

जगातील एका छोट्याशा खेड्यात ही घटना घडते. हे गाव जगाच्या नकाशावर शोधायचे झाले, तर भिंग लावून शोधावे लागेल, अशी त्याची अवस्था परंतु तेथे सुख-शांतता नांदत असते. वर्षभरातून एखादाजण मरण पावत असे त्यामुळे तितकेच काय ते दु:ख असे. परंतु, या गावाकडे शेजारील देशाच्या सैनिकांची वक्रदृष्टी पडते आणि गावातील बायका, पोरे, म्हातारी माणसे यांना नाडले जाते. बायकांवर अत्याचार केले जातात. सगळीकडे प्रेतांचा खच पडतो. अशावेळी गावात विध्वंस झालेला असताना, त्याच शत्रुराष्ट्राचा एक सैनिक या गावात येतो. आपल्याच सैनिकांकडून तो पोळलेला आहे. जीव वाचविण्यासाठी तो गावात येतो आणि गावचाच होऊन जातो. त्यांचाही त्याच्यावर विश्वास बसतो तो गावाचा आधार बनतो. परंतु, एक दिवस त्याचे सैनिक त्याला शोधत येतात आणि कोर्ट मार्शलसाठी त्याला घेऊन जातात. गाव पुन्हा एकदा निराधार बनते, अशी या नाटकाची कथा होती.

नाटकाचे नेपथ्य आदित्य समेळ यांचे होते, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, संगीत अमोल काबरा, वेशभूषा अपूर्वा देशपांडे, रंगभूषा समीक्षा कानडे यांची होती. नाटकात चैतन्य गोखले, अनिल कडवे, कौमुदी गदगे, विजय सहाणे, किरण समेळ, कविता आहेर, स्नेहा ओक यांनी भूमिका केल्या.

...

आजचे नाटक

एक होता बांबू काका

कामगार कल्याण केंद्र, बुधवार पेठ

स्थळ: प. सा. नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तंबाखू सोडल्याने ब्रँड अॅम्बेसेडरचा बहुमान!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

२७ वर्षांपासून असलेले तंबाखूचे व्यसन सोडल्यामुळे, पोलिस कॉन्स्टेबल संदीप गांगुर्डेंना ब्रॅँड अॅम्बेसेडर करण्यात आले आहे. त्यांच्या तंबाखू सोडण्याच्या भूमिकेचा आदर करीत, त्यांचा फोटो खाकीच्या कर्तृत्वाच्या भिंतीवर लावण्यात आला आहे. पोलिस आयुक्तालयाने हाती घेतलेल्या 'जॉइन द चेंज' या तंबाखूमुक्त नाशिक उपक्रमाचे ते ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहेत.

काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत 'जॉइन द चेंज' या तंबाखूमुक्त नाशिक उपक्रमाची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यावेळी आयुक्त डॉ. सिंगल यांनी 'आपल्यापैकी कोण-कोण तंबाखू खातात?', असा प्रश्न कर्मचाऱ्यांना केला. उपस्थित कर्मचाऱ्यांमधून संदीप गांगुर्डे यांनी तंबाखू खात असल्याचे मान्य केले. तंबाखूचे दुष्परिणाम आणि त्यातून मृत्यू ओढावल्यास कुटुंबीयांना होणारा त्रास, याची जाणीव पोलिस आयुक्तांनी गांगुर्डे यांना करून दिली. त्यावेळी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांसमोर गांगुर्डे यांनी तंबाखू सोडत असल्याचे सांगितले. गांगुर्डे २००५ मध्ये मुंबई शहर पोलिस विभागात दाखल झाले होते, २०१५ मध्ये नाशिक पोलिस आयुक्तालयात त्यांची बदली करण्यात आली. गेल्या २७ वर्षांपासून त्यांना तंबाखूचे व्यसन होते. तंबाखू खात असल्याचे त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांसमोर मान्य करीत, व्यसन सोडल्याचा संकल्प केला. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी त्यांचा सन्मान केला. तसेच त्यांना तंबाखूमुक्त मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर केले. रविवारी रात्री शहरात घेण्यात आलेल्या 'जॉइन द चेंज' नाइट रनमध्ये गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला.

तंबाखू मुक्त मोहिमेचा ब्रँड अॅम्बेसेडर झाल्यामुळे जबाबदारी वाढली आहे. तंबाखूचे व्यसन सोडल्यामुळे कोणताही त्रास होत नाही, तर शरीर व्यायामाला साथ देऊ लागले आहे. जे पोलिस कर्मचारी व अधिकारी तंबाखू खातात, त्यांना या व्यसनापासून दूर करण्यासाठी प्रबोधन करणार आहे.

- संदीप गांगुर्डे, पोलिस कॉन्स्टेबल, मुख्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेलांची सज्जता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

२०१८ च्या अखेरच्या दिवसाला निरोप देत, २०१९ या नववर्षाचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यासाठी नाशिक सज्ज झाले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था चोख ठेवली असून, हटके सेलिब्रेशन करण्यासाठी अनेकांची तयारी सुरू आहे.

२०१९ चे स्वागत उत्साहात करण्यासाठी शहरातील हॉटेल्स, कॅफे, रेस्टॉरंटसह रिसॉर्टमध्येही झगमगती रोषणाई करण्यात आली आहे. हॉटेल्स आणि कॅफेमध्ये न्यू इयर पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हॉटेल्समध्ये खवय्यांची होणारी गर्दी लक्षात घेता, अनेक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. हॉटेल्समध्ये कॅम्प फायरसह गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ३१ डिसेंबर सोमवारी असल्याने, रविवारीच नवीन वर्षाच्या स्वागताचा जोर दिसून आला. रविवारी संध्याकाळनंतर कॉलेजरोड, गंगापूररोड, नाशिकरोड, पंचवटी परिसरातील अनेक हॉटेलांमध्ये नाशिककरांची गर्दी झाली. रात्री उशिरापर्यंत नाशिककरांमध्ये सेलिब्रेशनचा उत्साह होता. तरुणाईकडून आज नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी रविवारी संध्याकाळपासूनच सर्वत्र पेट्रोलिंग करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील तळीरामांवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे. २०१९ चे स्वागत करण्यासाठी अनेकांकडून केक आणि स्काय लँटर्नची खरेदी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभासद नोंदणीवरून गोंधळ

$
0
0

नाईक शिक्षण संस्थेत धक्काबुक्की; गोंधळातच विषय मंजूर

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन सभासद नोंदणीच्या प्रश्नांवर चर्चा होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या परंतु, इतरच विषय हाताळले जात असल्याने संतप्त सभासद, इच्छुक तरुणांमुळे व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ निर्माण झाला. सन १९९९ सालापासून सभासद नोंदणी बंद असल्याने त्याच त्या व्यक्ती संस्थेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. ही संस्था खासगी मालमत्ता नसून समाजाची आहे. त्यामुळे नवीन सभासदांची नोंदणी करण्यात यावी, ही मागणी सभासद इच्छुक तरुणांनी लावून धरली होती. यामुळे झालेल्या गोंधळातच सर्व विषयांना मंजुरी देऊन सभा आटोपती घेण्यात आली.

क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (३० डिसेंबर) संस्थेच्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच संस्थेचे ज्येष्ठ सभासद पंढरीनाथ थोरे यांनी दापूर, राजापूर येथील नवीन कॉलेजांच्या प्रस्तावांचे काय झाले, त्याला मान्यता मिळाली आहे का, याविषयी सभासदांना माहिती का मिळाली नाही, असे प्रश्न उपस्थित केले. मानोरी येथील उर्वरित तीन एकर जागेसाठी धर्मदाय आयुक्तांची परवानगी मिळाली का, वर्षानुवर्षे हे प्रश्न सुटत नसतील तर संचालक मंडळाचा पाठपुरावा कमी पडत आहे, अशी टीका त्यांनी केली. याबरोबरच, अॅड. पी. आर. गिते, मनोज बुरकुले, अ‍ॅड. अशोक अव्हाड यांनीही डोंगरे मैदानावरील दोन मीटर जागेचा प्रश्न, वक्फ बोर्डाचा निकाल, वसंत मार्केट टेरेसच्या जागेवर वसतिगृहाचा प्रश्न, सिन्नर येथील शाळांचे प्रलंबित असलेले काम असे अनेक प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांवर विद्यमान संचालक मंडळाकडून समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. परंतु, सभासद नोंदणीच्या प्रश्नांवर चर्चा होण्याच्या अपेक्षेने आलेल्या तरुणांच्या प्रश्न सभा सुरू होऊन बराच कालावधी लोटला तरी घेतला जात नसल्याने तरुणवर्गामध्ये नाराजी निर्माण झाली होती. परिणामी, संतापलेल्या तरुणांनी व्यासपीठाकडे धाव घेतली व यातूनच गोंधळ, धक्काबुक्की झाली.

दरम्यान, २०१७-१८ चा अहवाल वाचून मंजूर, संस्थेचे सन २०१७-१८च्या आर्थिक पत्रकांना मंजुरी, सन २०१८-१९ साठी तयार केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. तसेच संस्थेसाठी अंतर्गत लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे, नवीन शैक्षणिक उपक्रम सुरू करणे, संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची तारीख ठरवून विचारविनिमय करणे हे विषय गोंधळातच मंजूर करण्यात आले. राष्ट्रगीताने सभेचा समारोप करण्यात आला.

सभेचे प्रास्ताविक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी केले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, माजी अध्यक्ष तुकाराम दिघोळे, उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, दामोदर मानकर, ॲड. व्ही. एन. हाडपे, सहचिटणीस अॅड. तानाजी जायभावे, किशोर दराडे यांच्यासह संचालक मंडळ व विश्वस्त उपस्थित होते.

...

सभासद नोंदणीसाठी मर्यादा असून, ही नोंदणी पूर्वीच बंद करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्था या राजकारण्यांचा अड्डा होऊ नये, म्हणून ही मर्यादा घालून दिली आहे.

\B- \Bकोंडाजी आव्हाड, अध्यक्ष, व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्था\B

\B...

ही संस्था विशिष्ट घरांना पिढ्यानपिढ्या चालविण्यासाठी नसून, ती सर्व समाजाची आहे. नवीन सभासदांची नोंदणी करून त्यांनाही संस्थेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी, ही आमची मागणी आहे. परंतु, नवीन सभासद झाले तर सत्ताधाऱ्यांना ही संस्था आपल्या हातातून जाईल, अशी भीती वाटत असल्याने सभासद नोंदणीसाठी सकारात्मकता दिसत नाही.

\B- \Bजगदिश बोडके, इच्छुक सभासद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हिडिओ व्हायरल केल्याने खंडेराव नगरात दगडफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

भावना दुखावणारा व्हिडिओ व्हायरल केल्यावरून खंडेराव नगरातील दोन गट भिडल्याने तणाव निर्माण झाला. यात एका गटाने तुफान दगडफेक केल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली.

खंडेराव नगरात राहणाऱ्या एका तरुणाने स्वत:च्या मोबाइलवरुन एक व्हिडीओ व्हायरल केला. या व्हिडीओमुळे एका गटाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. यातून खंडेराव नगरातील दोन गटांत वाद झाला. याचा राग आल्यामुळे तरुणांमध्ये बाचाबाचीदेखील झाली. यानंतर काही वेळातच एका गटाकडून दगडफेक झाली. भारतनगर, खंडेरावनगरात दगडफेक झाल्यामुळे नागरीकांची पळापळ झाली. रामानंदनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले होते. प्रमुख रस्त्यावर दगड, वीटा व काचेच्या बाटल्यांचा खच पडला होता. पोलिसांनी घटनेची माहिती घेतल्यानंतर सर्वात आधी गोकुळ पाटील याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले होते. यांनतर दगडफेक करणाऱ्या काही तरुणांना रात्री उशिरापर्यंत ताब्यात घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेलांवर ‘एफडीए’चा वॉच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी हॉटेल व खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर होणाऱ्या गर्दीत दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महिनाभरापासून हॉटेलांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. त्यानंतर ८० हॉटेलांना सुधारणा नोटीस देऊन दोन हॉटेलांचा एक दिवसाचा परवानासुद्धा रद्द केला. ३१ डिसेंबरलाही हॉटेलांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष राहणार असून, त्यासाठी नऊ पथके सर्वत्र फिरणार आहेत. त्यामुळे हॉटेलवाल्यांचे धाबे दणाणले आहे.

हॉटेलमध्ये दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन वेळोवेळी कारवाई करत असली तरी ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या गर्दीमुळे त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. ३१ डिसेंबर हॉटेल, ढाबे व बारमध्ये मोठी गर्दी असते. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी विशेष पार्ट्याही केल्या जातात. पण, येथे अन्न पदार्थांची गुणवत्ता राहत नाही. त्यामुळे अनेकांची लूटही होते. जास्त पैसे घेऊनही दर्जेदार अन्न मिळत नाही. त्यामुळे एफडीएची टीम अन्न सुरक्षित आहे का, अन्न वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली आहे का, यांसारख्या तपासण्या करणार आहे. शहरातील हजारो हॉटेलांमधून शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.

ऑनलाइन अन्न खरेदीवरही लक्ष

वेगवेगळ्या कंपन्यांच्या अॅपवरुन ऑनलाइन अन्न पदार्थांची ऑर्डर देण्याचे फॅड सर्वत्र सुरू झाले आहे. पण, हे अन्नपदार्थ अधिकृत हॉटेलांतून घेतले जातात का, याची तपासणीसुद्धा एफडीए करणार आहे. त्यात चुकीचे काही आढळल्यास कंपनीबरोबरच हॉटेलवरही कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहकांना खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेविषयी तक्रार असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सातपूरच्या उद्योग भवन येथील कार्यालयात तक्रार करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ललिता बाबर मुख्य आकर्षण

$
0
0

१७ गटांमध्ये होणार स्पर्धा

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने होणारी सहावी राष्ट्रीय व अकरावी राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॅान स्पर्धा ६ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर असणार आहे.

ही स्पर्धा एकूण १७ गटांमध्ये घेतली जाणार असून, सर्वात कमी अंतराची स्पर्धा ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थिनींसाठी ३ कि.मी. अंतराची, तर सर्वाधिक ४२.१९५ कि. मी. अंतराची फुल मॅरेथॅान होणार आहे. धावपटूंसाठी ही स्पर्धा खुली आहे. फुल मॅरेथॅान स्पर्धेला सकाळी ठीक ५.४५ वाजता प्रमुख अतिथींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात होईल.

या स्पर्धेत एकूण १७ गटांचा समावेश आहे. खुल्या राष्ट्रीय पुरुष गटासाठी ४२.१९५ व २१.०९७ कि.मी अंतराची स्पर्धा घेण्यात येणार आहे. खुल्या गटातील महिलांसाठी १० कि. मी. अंतराची स्पर्धा घेण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील पुरुष गटासाठी १० कि. मी. व ३५ वर्षांवरील महिला गटासाठी ५ कि. मी. अंतराची स्पर्धा असेल, तसेच ज्येष्ठ नागरिक पुरुषांसाठी ६० वर्षांवरील ०४ कि. मी. अंतराचा स्वतंत्र गट तयार करण्यात आला आहे. ७५ वर्षांवरील पुरुषांसाठी ३ कि. मी. अंतराची स्पर्धा तसेच १८ वर्षांआतील मुले व मुली यांच्यासाठी ६ कि. मी. अंतराची खुल्या गटाची स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेसाठी एकूण ७ लाख २३ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी भारतीय अॅथलेटिक्स संघटना तसेच, महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटना व नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स संघटना यांची मान्यता मिळालेली आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समिती अध्यक्षा नीलिमा पवार यांनी केले आहे. स्पर्धेसाठी अखिल भारतीय अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने राष्ट्रीय निरीक्षक जी. कृष्णन व महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे आर. जोशी हे निरीक्षक म्हणून काम पाहतील.

...

नव्या विक्रमाकडे लक्ष

स्व. डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या नाशिक मविप्र मॅरेथॅान स्पर्धेचा विक्रम हरियाणाचा सेनादलाचा खेळाडू करणसिंग याचे नावे असून, त्याने २०१८ मध्ये ४२.१९५ कि.मी. अंतर ०२ तास २२ मिनिटे व ३९ सेकंदात पूर्ण करीत विक्रम प्रस्तापित केला होता. महिलांच्या १० कि. मी. अंतराच्या स्पर्धेचा विक्रम आरती पाटील हिने गतवर्षी ३९ मिनिटे १० सेकंद वेळ नोंदवून प्रस्थापित केला आहे. हा विक्रम यावेळी मोडला जाईल का, याकडे लक्ष लागले आहे.

..

नावनोंदणी गरजेची

या स्पर्धेसाठी ऑनलाइन नावनोंदणी करता येईल. www.nashikmvpmarathon.org या वेबसाइटवर खेळाडूंनी नावनोदणी करावी. नोंदणीसाठी अंतिम तारीख १ जानेवारी २०१९ पर्यंत राहिल. २ ते ५ जानेवारी २०१९ या कालावधीत नोंदणीकृत धावपटूंनी आपले बीब क्रमांक व टी शर्ट इ. बाबी आय. एम.आर.टी महाविद्यालय गंगापूर रोड येथून घ्याव्यात. अधिक माहितीसाठी एन. के. निकम (९६५७५५८२१५) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा, द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न सोडविण्यास प्रयत्नशील

$
0
0

कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे आश्वासन

..

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कांदा आणि द्राक्ष या नगदी पीक घेणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून निसर्ग, व्यापार, भावातील चढ-उतार यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी आपण केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे जिल्ह्यातील कांदा व द्राक्ष उत्पादकांच्या समस्या मांडून ठोस उपायांसाठी प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले.

पाशा पटेल हे औरंगाबादकडे जात असताना निफाड येथे भाजप नेते आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे संचालक सुरेशबाबा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला थांबले होते. त्यावेळी त्यांनी परिसरातील द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेऊन आश्वासन दिले. येत्या लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा भाजपवरील रोष कमी करण्यासाठी ग्रामीण भागात जाऊन शेतकरी समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय सुचवण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून दिल्याने पाशा पटेल हे शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.

कांद्याचे उतरलेले भाव सावरण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात अनुदान ५ टक्क्यांवरून १० टक्के करण्याचा निर्णय घेत दिलासा दिला आहे. आता कांदा निर्यातीसाठी बाजारपेठ आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या रेल्वे रॅक उपलब्ध्द करून देण्यासाठी केंद्रस्तरावर चर्चा करण्यात येइल, असे ते म्हणाले.

नाशिक येथे कांदा उत्पादक सोहनलाल भंडारी यांनी कांदा व्यापाऱ्यांसह पाशा पटेल यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली आणि कांदा वाहतुकीसाठी रेल्वे वॅगन मिळत नसल्याची अडचण आणि इतर समस्या मांडल्या होत्या. पटेल यांनी भंडारी यांच्याशी चर्चा करीत कांद्याची परिस्थिती समजून घेतली.

...

शंभर कोटी मिळण्याची आशा

सन २०१० मध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यात केले होते. यावेळी अपेडा केंद्रीय प्राधिकरणाच्या चुकीमुळे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. यावर पाशा पटेल म्हणाले की, या नुकसान भरपाईसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करणार आहे. यावेळी द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगणदादा खापरे, द्राक्ष बागायतदार संघाचे अशोक भोसले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डोंगरार्त’चे विविध प्रयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रुदाली विषयावर प्रकाश टाकणारे आणि शोषित महिलांच्या आयुष्यावर बेतलेले नाटक डोंगरार्त नाटकाचे नुकतेच काही प्रयोग शहरात झाले. राजस्थानी भाषेचा लेहजा मराठीतून सांभाळत पुढे सरकणारे नाटक म्हणजे मराठी नाट्य रसिकांसाठी एक वेगळा अनुभव ठरत आहे.

स्त्री जीवनाच्या अंधाऱ्या वाटा अतिशय वास्तववादी पद्धतीने या नाटकातून मांडल्या आहे. त्यामुळेच रसिकांची चांगलीच दाद या नाटकाला मिळत आहे. या नाटकाचे काही प्रयोग झाले पलुस्कर सभागृह, लोकहितवादी मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संगमनेर शाखा आयोजित 'नाट्यमहोत्सव २०१८' निमित्त रविवारीदेखील स्त्री जीवनाचे एक भेदक वास्तव दर्शविणारी दोन अंकी कलाकृती 'डोंगरार्त'चे साईबाबा सभागृह, संगमनेर महाविद्यालय येथे यशस्वी प्रयोग झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र संघात यश जोशीची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय शालेय खेळ महासंघ व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, दिल्ली यांच्यातर्फे ३ ते ९ जानेवारी दरम्यान १९ वर्षांआतील राष्ट्रीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नाशिकच्या यश जोशी याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

परभणी येथे २२ ते २५ नोव्हेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेतून त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे १२ खेळाडू सहभागी झाले होते. राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी मुंबई, पुणे, अमरावती, लातूर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, कोल्हापूरसह इतर जिल्ह्यांतील खेळाडूंमधून यशची महाराष्ट्र संघात निवड झाली. थ्रो बॉल स्पर्धेचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर हे जिल्हा क्रीडा संकुल अलिबाग (रायगड) या ठिकाणी सुरू आहे. महाराष्ट्राचा संघ २ जानेवारी रोजी दिल्लीकडे रवाना होणार आहे. यश आरवायके कॉलेजमध्ये शिकत आहे.

..

महाराष्ट्राचा मुलाचा संघ

सय्यद अली, अभिषेक अडोडे, मानव माने, गौरव पाटील, तुषार घुगे, शुभम जाधव, राज जगदाळे, प्रतिक पुनटकर, यश जोशी, संदीप जाधव, प्रथमेश राजपुत, हर्षल धामडे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाद्य पदार्थांच्या गाड्यांवरील वादांवर नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नववर्षाच्या पूर्वसंध्येला खाद्य पदार्थांच्या गाड्यांवर वादविवादाचे प्रसंग उद्भवू नयेत, यासाठी पोलिसांचे कडक लक्ष राहणार आहे. या गाड्या रात्री १० वाजेच्या आत बंद करणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिली.

बार, परमीट रूम या ठिकाणी मिळणारे मद्य, दुकानाच्या तुलनेत महाग असल्याने अनेकजण ३१ डिसेंबर रोजी दुकानातून मद्य विकत घेत खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर 'बसतात'. अशावेळी गाड्यांवर अनेकदा ग्राहक आणि विक्रेते यांच्यात हमरीतुमरी होऊन वादाचे प्रसंग येतात. अनेकदा ग्राहक मद्यधुंद अवस्थेत असल्याने विक्रेत्यांना पैसे देण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे वादावादी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. शहरातील मुख्य भागात असलेल्या गाड्या रात्री १० वाजेच्या आत बंद करण्यात येणार आहेत. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना याबाबत पूर्वकल्पना देण्यात आली असून, संध्याकाळी ५ वाजेनंतर अशा ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. द्वारका, नेहरू गार्डन, तिबेटियन मार्केट, पंचवटी, नाशिकरोड, सिडको चौपाटी, सातपूर या ठिकाणी विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे.

विक्रेत्यांनी घेतला बंदचा निर्णय

वर्षभर खाद्यपदार्थांच्या गाड्या व्यवस्थित सुरू असतात. मात्र गटारी आमावस्या आणि ३१ डिसेंबरच्या रात्री तुरळक प्रकार जरी घडला तरी हे विक्रेते पोलिसांच्या रडारवर येतात. त्यामुळे काही विक्रेते दरवर्षी दुकाने बंद ठेवतात. यंदा नेहरू गार्डन येथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ३१ डिसेंबर रोजी व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आमच्याकडे कुटूंबासह ग्राहक येत असतात. ३१ डिसेंबर रोजी टवाळखोर मुलांमुळे व्यवसाय बदनाम होतो. ग्राहकांना त्रास नको म्हणून आम्ही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

- ताराचंद पाथरे, विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिस्तबध्द नेतृत्व विकसित करा

$
0
0

स्काऊट गाईड उपाध्यक्षा अॅन शुई यांचा सल्ला

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्काऊट गाईड हे माध्यम उद्याचे सक्षम नागरिक घडविण्यासाठी महत्त्वाचे अजून, या व्यासपीठाचा वापर विद्यार्थ्यांनी शिस्तबध्द नेतृत्व विकसित करण्यासाठी करायला हवा, असा सल्ला आंतरराष्ट्रीय स्काऊट अँड गाईडच्या उपाध्यक्षा अॅन शुई यांनी दिला. 'बॉस्कोरी २०१८' या महासंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

तेराव्या अखिल भारतीय स्काऊट गाईड महासंमेलनाचा (बॉस्कोरी २०१८) रविवारी उद्घाटन सोहळा झाला. नाशिकमध्ये प्रथमच होणाऱ्या या महासंमेलनाचे कॉलेजरोडवरील डॉन बॉस्को संस्थेच्या आवारात दुपारी ३ वाजता उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी २२ राज्यांतून आलेल्या स्काऊड अँड गाईडच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादरी केले. महासंमेलनात सहभागी शाळांच्या संघांनी परेड करीत मान्यवरांना मानवंदना दिला. यावेळी आंतरराष्ट्रीय स्काऊट अँड गाईडच्या उपाध्यक्षा अॅन शुई, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, महासंमेलनाचे प्रमुख फादर इअन डोल्टन यांसह सिस्टर डोरा थॉमस, फादर ऑल्बर्ट जॉनसन, फादर सॅव्हिओ सिल्वेरा, बिशप लुईस डॅनियल, फादर के. एम. जॉस व्यासपीठावर होते.

पोलिस आयुक्त डॉ. सिंगल म्हणाले, की बॉस्कोरीसारख्या महासंमेलनातून शिस्तीचा संदेश जगभरात पोहोचवला जात आहे. जगात शांतता राखली जावी. त्याचबरोबरीने धार्मिक एकता असावी, यासाठी स्काऊड गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रतिनिधीत्व करायचे आहे. या उद्घाटन सोहळ्यात स्काऊट अँड गाईडच्या शिबिरांवर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सोहळ्यातून एकता, बंधुता आणि शांततेचा संदेश देण्यात आला.

...

\Bचार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग\B

या महासंमेलनात महाराष्ट्र, आसाम, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळ, झारखंड यासह २२ राज्य, दोन संघराज्य आणि आशियायी देशांतून ४ हजार ५५५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी २०० तंबू उभारण्यात आले असून, डॉन बॉस्को शाळेच्या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवली आहे. ३ जानेवारी २०१९ पर्यंत हे महासंमेलन सुरू राहणार असून, यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टॅम्प घोटाळा: तेलगी प्रकरणाचा आज निकाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोट्यवधी रुपयांच्या स्टॅम्प घोटाळ्यातील तेलगी प्रकरणाचा निकाल सोमवारी जिल्हा न्यायालय देणार आहे. जिल्हा न्यायधीश पी. आर. देशमुख, वर्ग १ यांच्याकडे या प्रकरणाची गेले काही महिने नियमित सुनावणी सुरू होती. देशभर गाजलेल्या या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा मृत्यू झाला आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी या प्रकरणात आरोपी आहेत. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २५ ऑगस्ट २००४ मध्ये या प्रकरणात तेलगीसह सहा आरोपींविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०१५ मध्ये या संशयितांवर आरोपपत्र निश्चित करण्यात आले होते. या प्रकरणात नाशिकरोड येथील इंडियन सिक्युरिटी प्रेसमधून स्टॅम्प छापल्यानंतर ते देशभर रेल्वेने पाठवले जात होते. तेलगीने रेल्वे सुरक्षा बलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून हे स्टॅम्प चोरीचा प्रकार सुरू केला. स्टॅम्प घोटाळ्याची सुरुवात येथूनच झाली. या चोरीतून नंतर तेलगीने पुढे ३२ हजार कोटींचा घोटाळा केला.

तेलगीने मुद्रांकाचे महत्त्व ओळखून त्याने नाशिकरोड येथील छापखान्यापासून देशभरातील मुद्रांक वितरण प्रणालीचा अभ्यास केला. त्यानंतर त्याने रेल्वे पोलिसांशी संधान बांधून हे स्टॅम्पपेपर चोरी केले. पोलिसांशी संगनमत झाल्यामुळे सुरुवातील त्याने खरे स्टॅम्पपेपर विकले. यावेळी ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्याला मदत केली त्यांच्याविरुध्द नंतर गुन्हे दाखल झाले. त्यात साक्षीदारांची तपासणी होऊन साक्ष घेण्यात आली.

...

अशी माहिती मिळू लागली

चोरलेल्या मुद्रांकांच्या पैश्यातून नंतर तेलगीने रेल्वे कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्याबरोबर संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे नंतर त्याला या स्टॅम्पपेपरची घरबसल्या माहिती मिळू लागली. त्यानंतर त्याने बंदोबस्त व सुरक्षा यंत्रणेतल्या उणिवाही शोधून काढल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुंगटामध्ये वार्षिक क्रीडामहोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जु. स. रुंगटा हायस्कूलचा वार्षिक क्रीडामहोत्सव २७ ते २८ डिसेंबर दरमान्य संस्थेच्या आवारात पार पडला. यावेळी विविध मैदानी व बैठ्या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.

२७ डिसेंबर रोजी सांघीक क्रीडा स्पर्धा तर २८ डिसेंबर रोजी वैयक्तिक स्पर्धा झाल्या. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेत १६८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावेळी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

१४ वर्षाखालील मुले

प्रथम- यश अहिरे

द्वितीय - लोकेश पवार

तृतीय-कृष्णा देशमुख

१७ वर्षाखालील मुले

प्रथम-अनिकेत तुरे

द्वितीय-चेतन क्षीरसागर

तृतीय-वैभव सिरसाट

५० मीटर धावणे

११ वर्षखालील मुले

प्रथम--वेदांत चांदवडकर

द्वितीय- शुभम बुरकुल

१२ वर्षाखालील मुले

प्रथम-योगेश चव्हाण

द्वितीय-ओम व्यवहारे

१३ वर्षाखालील

प्रथम --रोहन सोपे

द्वितीय -दिपक भोई

१४ वर्षाखालील मुले

प्रथम--भरत जाधव

द्वितीय -ओम देशमुख

१५ वर्षाखालील

प्रथम--जुएल राजा मन्सूरअली

द्वितीय -सत्यम आखाडे

१६ वर्षाखालील मुले

प्रथम--गौतम विश्वकर्मा

द्वितीय- अभिषेक धाडगे

गोळफेक

१४ वर्षाखालील मुले

प्रथम-रोहित भोये (७.०२ मीटर)

द्वितीय- अक्षय पांचाळ (५.४८ मीटर)

तृतीय -रुद्र जावरे (५.१४ मीटर)

१७ वर्षाखालील मुले

प्रथम-- आकाश भोई (८.६३ मीटर)

द्वितीय-रोशन भांगरे (८ ३२ मीटर)

तृतीय- जुएल राजा मन्सूरअली (७.८०मीटर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाराजांचा भाजपमध्ये बंड!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर काँग्रेस राष्ट्रवादीतून उमेदवारांची आयात करत, पालिकेत त्यांच्या बळावर सत्ता स्थापन केली आहे. परंतु, आता भाजपच्या काही नेत्यांकडून या नगरसेवकांवर पक्षशिस्तीच्या नावाखाली काँग्रेसचा शिक्का लावला जात असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीमधून आलेले नगरसेवक त्रासाने अस्वस्थ झाले आहेत. भाजप नेत्यांकडून वारंवार 'काँग्रेसी'चा शिक्का मारून त्यांचा उद्धार केला जात असल्याने भाजपलाच धडा शिकवण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. भाजप नेत्यांच्या उद्धाराने नाराजांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बंड पुकारत भाजपला झटका देण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिका निवडणूका जिंकण्यासाठी भाजपने तडजोड करत, पक्षातील निष्ठांवताना डावलून इतर पक्षातून उमेदवार आयात केले. त्यात विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेतील नगरसेवकांचा समावेश होता. इतर पक्षातून आयात केलेल्या उमेदवारांच्या बळावरच महापालिकेत भाजपचे कमळ फुलले. प्रथमच ६६ नगरसेवक निवडून आल्याने भाजपची महापालिकेवर एकहाती सत्ता आली. भाजपकडून निवडून आलेल्या ६६ पैकी ४८ नगरसेवक हे अन्य पक्षातून आयात झालेले आहेत. त्यामुळे या नगरसेवकांचाच आता पक्षावर दबदबा निर्माण झाला आहे. भाजपकडून एकाच वेळी निष्ठावतांना सांभाळण्यासह नव्याने पक्षात आलेल्यांना सांभाळण्याची तारेवरची कसरत करावी लागत आहे. अन्य पक्षातून आलेल्या नगरसेवकांची कामाची स्टाईल वेगळी असल्याने ती आता भाजपच्या संस्कृतीत बसेनासी झाली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांशी आता बाहेरून आलेल्या नेत्यांबरोबर खटके उडायला लागले आहेत. नेत्यांना जाब विचारला तर, थेट त्यांच्यावर काँग्रेस संस्कृतीचा आरोप लावला जात आहे. त्यामुळे या नेत्यांची गोची झाली आहे. तर अन्य पक्षातून आलेल्या काही नगरसेवकांना आता भाजपच्या कारभाराशी जुळवून घेणे अवघड झाले आहे. त्यातच महापालिकेत भाजपचा कारभार भरकटल्याने या नेत्यांचीच कोंडी झाली आहे. त्यातच पदे वाटप करताना विशिष्ट नेत्यांच्या मर्जीतील नगरसेवकांनाच झुकते माप दिले जात आहे. पालिकेत सत्ता स्थापन होवून पावणे दोन वर्ष झाले तरी, विकासकामांच्या नावाने बोंबा आहेत. नगरसेवकांना दमडीचाही निधी मिळत नसल्याने त्यांच्यातील अस्वस्थता वाढीस लागली असतानाच, त्यांना आता बाहेरून आल्यावरून हिनवले जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये असलेला एक मोठा गट पक्षाच्या नेत्यांवर नाराज झाले असून, त्यांनी भाजपमध्ये राहूनच वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपकडून हिनवले जात असेल तर, स्वतंत्र गटच करा, अशी मोर्चेबांधणी काही वरिष्ठ नेत्यांकडून सुरू आहे.

निवडणूक जिंकण्यासाठीच भाजपला आपण हवे होतो का, असा सवाल हे नेते करत असून, भाजपकडून सतत होणारा अपमान आता सहन करण्यापलीकडे गेला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आमची मते भाजपला चालतील काय असा सवालच हे नगरसेवक भाजप नेत्यांना करत आहेत. त्यामुळे भाजपची कोंडी अधिकच वाढली असून, या नेत्यांची मनधरणीही सुरू करण्यात आली आहे.

पदे वाटपातही अन्याय

महापालिकेत पदे वाटप करताना विशिष्ट नेत्यांच्या जवळच्यांनाच उमेदवाऱ्या दिल्या जात आहेत. विशेषता पंचवटीतील नगरसेवकांना झुकते माप दिले जात असल्याने नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. पालिकेतील विविध समित्यांमध्येही पंचवटीचेच वर्चस्व आहे. त्यामुळे एकाच विभागात पदे जात असल्याने अन्य विभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे या नाराज गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असून, ठराविक नेत्यांना स्थायीवर पाठवणे आणि समित्यांमध्येच मर्जीतल्या नगरसेवकांनाच स्थान मिळत असल्याने पदे वाटपातील ही नाराजी भाजपला लोकसभा निवडणुकीत अडचणीची ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हाभरात खाकीचा ‘वॉच’

$
0
0

चाळीस पोलिस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक\B

\Bवर्षअखेरच्या दिवशी नागरिकांच्या सेलिब्रेशन मूडचा फायदा घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तींनी डोके वर काढू नये, यासाठी जिल्हाभरातील ४० पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खाकीचा कडक 'वॉच' राहणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील ४० पोलिस ठाणे, चेक पोस्ट आणि संवेदनशील ठिकाणांवर बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करण्यात येणार आहे. याशिवाय 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह'वर लगाम लावण्यासाठी 'ब्रेथ अॅनालायझर'चाही वापर केला जाणार आहे.

जिल्हाभरातील ४० पोलिस ठाण्यांच्या हद्दीत वर्षअखेरच्या निमित्ताने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी यंत्रणेस सूचना दिल्या आहेत. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मालेगाव विभागासाठी प्रभारी म्हणून अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

\B..

\Bहॉटेल्स, ढाबे रडारवर\B

\Bया बंदोबस्तादरम्यान गाव आणि शहरांमधील चेकनाक्यांसोबतच जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, रिसॉर्ट, हॉटेल्स, ढाबे, मॉल्स आदी परिसरावरही कडक वॉच ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील महामार्ग आणि वर्दळीच्या ठिकाणांवर करण्यात येणाऱ्या नाकाबंदीदरम्यान प्रत्येक वाहनचालकाची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या पथकांकडून ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई सुरू राहणार आहे. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर परराज्यातून अवैधरित्या होणारी मद्यविक्री आणि वाहतुकीस प्रतिबंध होण्यासाठी चेकपोस्टवर नाकाबंदी लावून कारवाई करण्यात येणार आहे. मद्य प्राशन करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवरही दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.

...

सज्जतेसाठी गोळीबाराची प्रात्यक्षिके \B

\Bजिल्हाभरात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा पोहचू नये, याकरिता सज्जतेसाठी ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने ४० पोलिस ठाण्यांअंतर्गत मॉकड्रील सुरू आहे. यात दंगल नियंत्रक पथक, शीघ्र कृती दल व पोलिस अधिकाऱ्यांकडून गोळीबारांची प्रात्यक्षिके सुरू आहेत. सोबतच गोळीबार मैदानावर गोळीबाराचाही सराव सुरू आहे.

...

दामिनी पथकेही तैनात\B

\Bमहिला व मुलींची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथकेही पोलिसांनी तैनात केली आहेत. साध्या वेशातील महिला पोलिस कर्मचारी सार्वजनिक ठिकाणी वॉच ठेवून असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायालयातील मारुतीची सोमवारी पुर्नप्रतिष्ठापना

$
0
0

नाशिक : नाशिक जिल्हा न्यायालय आवारात असलेल्या प्राचीन मारुती मंदिरातील मूर्तीवर साचलेला शेंदूर काढल्यानंतर या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, मंदिरावरील कलशारोहण व ध्वजारोहण समारंभ प. पु. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य प. पु. संतोषगिरी महाराज यांच्या शुभहस्ते सोमवार, ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात येणार आहे. न्यायालय आवारातील श्री मारुतीचे मंदिर १९७१ पासून अस्तित्वात असून, त्याआधी १९३८ साली प. पु. शिवशिवबाबा यांनी न्यायालय आवारातील झाडाखाली या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असे सांगितले जाते. त्यानंतर १९८५ साली जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यासाची नेमणूक करण्यात आली. या मंदिरात शनिवार २९ डिसेंबरपासून प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असून, आज मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर मूर्तीचे दर्शन सर्व भाविकांसाठी खुले करण्यात येईल. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यासाचे अध्यक्ष व प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वस्त ॲड. अमित जुन्नरे, प्रशांत जोशी, विक्रांत माने, मनिषा मेहता, राघवेंद्र अंकलगी, जगदीश देवरे, श्रीपाद देशपांडे गुरुजी आणि न्यासाचे सचिव आर. जी. सोनवणे प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड रेल्वे स्थानकात रुळाला तडा, मोठा अपघात टळला

$
0
0

नाशिकः

मनमाड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर रुळाला तडा गेल्याचं लक्षात आल्याने मोठा अपघात टळला आहे. काचीगुडा- शिर्डी - काकी नाडा एक्सप्रेस येण्यापूर्वी काही मिनिटे आधी रेल्वे रुळाला मोठा तडा गेल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानं काकीनाडा एक्सप्रेस रोखण्यात आली.

सकाळी सातच्या सुमारास काकी नाडा एक्सप्रेस मनमाड स्थानकात येण्यापूर्वी रेल्वेरुळांची पाहणी करणाऱ्या गँगमनना रुळाला तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधितांना माहिती दिली. काकी नाडा एक्सप्रेस मनमाड रेल्वे स्थानकात येण्यापूर्वीच रोखण्यात आली, रेल्वे रूळ जोडण्याचे काम तातडीने करण्यात आले व नंतर रेल्वे मार्गस्थ करण्यात आली. थंडीमुळं रुळाला तडा गेल्याचं रेल्वे प्रशासनानं प्राथमिक पाहणीनंतर स्पष्ट केलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्याच्या महापौरपदी चंद्रकांत सोनार

$
0
0

धुळेः

धुळे महानगरपालिका मध्ये आपली सत्ता यावी यासाठी गेल्या दोन महिण्यापासून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय सवरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, भाजपा महानगर जिल्हाद्यक्ष अनुप अग्रवाल यांनी कंबर कसली होती आणि वर्ष समाप्ती च्या शेवटच्या दिवशी महानगरपालिका वर भाजपचा झेंडा अखेर फडकला. आणि नगरसेवक चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी तर नगरसेविका कल्याणी अंपळकर यांची उपमहापौर पदी आज बिनविरोध निवड झाली.

महापालिकेच्या सातव्या निवडणुकीत ७४ पैकी ५० जागा जिंकत भाजपने महापालिकेवर सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर सोमवारी सकाळी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार पीठासीन अधिकारी होते तर मनपा आयुक्त सुधाकर देशमुख उपस्थित होते. महापौर पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेण्याची घोषणा करत अधिकृतरित्या उमेदवारी मागे घेतली. आणि शहर विकासासाठी जनतेने भाजपला कौल दिला असल्याचे म्हणत उमेदवारी माघार घेत असल्याचे व भाजपला पाठिंबा देत असल्याचे गटनेते कमलेश देवरे यांनी सांगितले. आणि भाजपचे चंद्रकांत सोनार यांची महापौर पदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपमहापौर पदासाठीही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतल्याने भाजपच्या कल्याणी अंपळकर यांची उपमहापौर पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Telgi stamp papers scam: सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

$
0
0

नाशिक

देशभर गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्वच्या सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने आज हा निकाल दिला. तेलगी स्टॅप घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा आधीच मृत्यू झाला आहे.

३२ हजार कोटींहून अधिक असलेल्या या तेलगी स्टॅम्प घोटाळ्याप्रकरणी ४९ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. या घोटाळ्याची २००३ पासून सुनावणी सुरू होती. तब्बल १५ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रकरणाचा सीबीआयकडे तपास देण्यात आला होता. आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी हा निकाल सुनावला. भक्कम पुराव्याअभावी सर्वच्या सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी हा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर स्टेशन रोड येथील रहिवासी होता. अब्दुल करीम आणि त्याच्या भावांनी नाशिक येथील प्रिटिंग प्रेसमधील जुनी मशिनरी आणून बनावट मुद्रांक व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायाला पाकिस्तान आणि बांगलादेश या ठिकाणाहून छुपे पाठबळ होते. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images