Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वाटपावरून झाला प्राचीन नाण्यांचा उलगडा

0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

भगुर परिसरातील रेल्वे लाइनलगत एका जुन्या वाड्याचे खोदकाम करणाऱ्या मजुरांना अठराव्या शतकातील चांदीची ४६ नाणी सापडली. विशेष म्हणजे खोदकाम करणाऱ्या मजुरांत या नाण्यांचे वाटप करण्यावरुन वाद झाल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली आहे.

रंजना अमित पवार (वय २४ रा. बागुलनगर कमानीजवळ, विहितगाव) या महिलेने मारहाण झाल्याची तक्रार शुक्रवारी रात्री नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली होती. ही महिला दुकानात जात असतांना देवबाई गायकवाड, पुजा पवार, कविता गायकवाड आणि अंबादास गायकवाड या चार जणांनी तिला मारहाण केली. पवार यांनी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल केला. मारहाण करणाऱ्यांना नाशिकरोड पोलिस ठाण्यात हजर केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पवार आणि त्यांना मारहाण करणारे सर्वजण खोदकाम करणारे मजूर आहेत. भगुरजवळील रेल्वे लाईनजवळ जुन्या वाड्याचे खोदकाम या मजुरांना देण्यात आलेले होते. गुरुवारी (दि.२७) नेहमीप्रमाणे खोदकाम करीत असतांना मजुरांना चांदीची ४६ नाणी सापडली. मजुरांनी ही नाणी आपापसात वाटून घेतली होती. परंतु नाणे वाटपातील नाराजीमुळे त्यांच्यात दुसऱ्या दिवशी वाद झाला. पोलिसांनी ही नाणी ताब्यात घेतली आहेत.

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अडगळीच्या जागीच तात्या टोपेंचे स्मारक

0
0

जनभावनेला येवला पालिकेकडून केराची टोपली

संजय लोणारी, येवला

सन १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्ये सेनानी तथा येवल्याचे भूमिपुत्र सेनापती तात्या टोपे यांचे जन्मभूमीत यथोचित स्मारक येवला नगरपरिषदेने शहरापासून दूरवर अगदी अडगळीच्या जागेवरच उभारण्याचा हट्ट कायम ठेवला आहे. शहरातील नागरिकांसह पर्यटकांना सोयीच्या ठरणाऱ्या जागेवर हे स्मारक उभारले जावे, या जनभावनेला केराची टोपली दाखवल्याने शहरात नाराजीचा सूर उमटत आहे.

सेनापती तात्या टोपे यांच्या जन्मभूमीत स्मारक उभारण्यासाठी केंद्र शासनाने साडेदहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करताना, भाजपच्याच येवला नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्मारकासाठी अडगळीची जागा निवडल्याने स्मारकाच्या मूळ हेतूलाच बगल दिली गेली आहे. नगरपालिकेने स्मारकाच्या बांधकामासाठी शहरवासियांना नको असलेली व शहरापासून अगदी दूरवरची निवडलेली जागाच कायम ठेवल्याने या जागेस अगोदरपासून विरोध असणाऱ्या शहरातील सेनापती तात्या टोपे स्मारक कृती समिती, सर्वपक्षिय ते शहरवासियांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. पालिकेने निश्चित केलेल्या जागेला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने शहरात व्हीडीओ चित्ररथ फिरवित अडगळीच्या जागेकडे लक्ष वेधले आहे.

कोण जाणार स्मारक पहायला?

स्मारक बांधकामासाठी पालिकेने निश्चित केलेली बाभूळगाव शिवारातील दुर्लक्षित व कोनाड्यातील आहे. पालिकेने योग्य जागेचा विचार केलेला नाही. निवडण्यात आलेली जागा बाभूळगाव शिवारातील पालिकेच्या टप्पा क्रमांक-२च्या पूर्वेला आहे. येवला शहरापासून सुमारे साडेचार किलोमीटर व येवला मनमाड रोडपासून अगदी आतमध्ये जवळपास सात किलोमीटर अंतरावर अडगळीत आहे. त्या ठिकाणी स्मारक पाहण्यासाठी कोण जाणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. भविष्यातील शहराची वाढती लोकसंख्या बघता, पालिकेस नवीन टप्पा क्रमांक तीनसाठी जागेची गरज भासणार आहे, असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

असे असेल स्मारक

स्मारक आराखड्यात माहिती केंद्र, शिल्पकृती गॅलरी, प्रदर्शन गॅलरीच्या माध्यमातून टोपे यांच्या कार्याचे महत्त्वपूर्ण फोटो, संबंधित माहितीपत्रके, पेंटिंग, महत्त्वाचा पत्रव्यवहार पर्यटकांना दाखविण्यात येणार आहे. गोलाकार रचनारुपी वास्तूत पर्यावरणपूरक कौलारू छते व सोलर पॅनलचा वापर अधोरेखित आहे. शिवाय वाचनालय, ऑडियो व्हिज्युअल हॉल निर्मिती आणि तात्या टोपेंच्या कार्याचा माहितीपट पर्यटकांना दाखविणे, स्वातंत्र्य लढ्याविषयक माहिती संकलन वाचनालय रुपाने उपलब्ध देणे याचे वास्तूत प्रयोजन आहे. प्रतिकात्मक शिल्प गाडर्न, प्रतिकात्मक बगीचा टोपेंची कर्तुत्वात्मक गाथा विविध प्रकारे अधोरेखित केली जाणार आहे. असे असताना पालिकने निवडलेली जागा पर्यटकांसह शहरवासियांसाठी अगदी गैरसोयीची ठरणार आहे.

येथेच व्हावे स्मारक

सेनापती तात्या टोपेंचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान सर्वांना प्रेरणादायी ठरावे, आजच्या तरुण पिढीला प्रेरित करणे, त्यांच्या कार्याच्या माहितीसह स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचा सर्वदूर प्रसार होण्यासाठीच केंद्र व राज्य सरकारची या स्मारकाची संकल्पना मांडली आहे. त्यामुळे स्मारकासाठी नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गालगत असलेल्या शहरातील जलसंपदा विभागाच्या पालखेड वसाहतीच्या सर्वांना सोयीच्या ठरणाऱ्या जागेवर स्मारक उभारणी व्हावी अशी शहरवासीयांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेवारस बॅगने वाढवली धाकधूक

0
0

स्टेट बँकेच्या आवारात आढळली सुटकेस

....

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

भारतीय स्टेट बँकेच्या नाशिकरोड शाखेच्या आवारात शनिवारी बेवारस सुटकेस आढळली. त्यामध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने खळबळ उडाली. उपनगर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहचून बॅगेची तपासणी केली, तेव्हा बॅगेत कपडे व दस्तावेज आढळला. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला, तर बॅगमालकाला पोलिसांनी चांगलेच फैलावर घेतले.

नाशिकरोडच्या दुर्गा उद्यानासमोर स्टेट बँकेची शाखा आहे. शनिवार असल्याने सकाळी अकरापासून नेहमीप्रमाणे बँकेत गर्दी होती. त्याच वेळी बँकेच्या आवारात एक बेवारस सुटकेस एका ग्राहकाला दिसली. त्याने याबाबत सुरक्षारक्षक ललित बर्वे यांना माहिती दिली. बर्वे यांनी बँकेत ही बॅग कोणाची आहे, अशी विचारण केली. मात्र, कोणीच प्रतिसाद देत नसल्याने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. उपनगर पोलिसांना तातडीने कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेवारस बॅग सापडल्याची खबर वाऱ्यासारखी पसरल्याने बँकेच्या आवारात आणि बाहेर मोठी गर्दी जमा झाली. बॅगेत काय आहे, याची धाकधूक वाढली होती.

दरम्यान, बॅगमालक पांडुरंग बाळा शिंदे हे आले व बॅग आपली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी त्यांचे ओळखपत्र तपासून बॅग उघडण्यास सांगितले. शिंदे यांनी बॅग उघडली असता, त्यामध्ये त्यांचे कपडे व काही कागदपत्रे आढळली. तेव्हा पोलिसांसह उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. येथून पुढे बॅग बेवारस न सोडण्याची तंबी देऊन काळजी घेण्याचा सल्ला पोलिसांनी शिंदे यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंत्रज्ञानातील अशिक्षितपणा त्रासदायक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'डिजिटल इंडियात आज सर्वकाही ऑनलाइन झाले आहे. यामुळे मानवी जीवन सुकर झाले असले तरी गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे. चारही बाजूंनी घेरलेल्या तंत्रज्ञानात आपण पुरते अडकलो असून, यामध्ये सुरक्षित राहण्यासाठी आपण स्वत:च खबरदारी घेणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानातील आपला अशिक्षितपणा त्रासदायक ठरतो आहे', असे प्रतिपादन सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट रक्षित टंडन यांनी केले.

श्री समर्थ सहकारी बँक लिमिटेड नाशिक यांच्यातर्फे बँकेचे संस्थापक मधुकर दामोदर कुलकर्णी यांच्या ८व्या स्मृतीदिनानिमित्त सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट रक्षित टंडन 'बँक व सायबर सुरक्षितता' या विषयावर प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भोसला कॉलेज कॅम्पसमधील डॉ. मुंजे इन्स्टिट्युट ऑडिटोरियममध्ये शनिवारी हे व्याख्यान पार पडले. सायबर गुन्हे, अकाउंट हॅकिंग, खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, नेट बँकिंग, सोशल नेटवर्किंगद्वारे येणाऱ्या धमक्या, आर्थिक गुन्हेगारी आणि ई-मेलद्वारे होणारी फसवणूक याबाबत त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले.

टंडन म्हणाले,'झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाची योग्य माहिती होण्यासाठी शिक्षणात सायबर सुरक्षा विषय आणणे गरजेचे आहे. हल्ली नवनवीन वेबसाइट, अॅप मोबाइलमध्ये आपण सहज वापरत असून, ते वापरताना त्यातील प्रायव्हसीची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही अॅप वापरताना सर्वाधिक काळजी घेण्याची गरज आहे.'

यावेळी समर्थ बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पुरंदरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ऋषिकेश अयाचित यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष अलका कुलकर्णी आणि मानद कार्यकारी संचालक डॉ. रविकिरण निकम, अॅड. लक्ष्मण उगांवकर आदी उपस्थित होते.

\Bवेबसाइटवर करा रिपोर्ट\B

चाइल्ड पोर्नोग्राफी, मुलींचे अश्लील फोटो, बलात्काराचे व्हीडिओ हे सरकारी व्यवस्थेकडे रिपोर्ट करण्यासाठी भारत सरकारने cybercrime.gov.in ही वेबसाइट विकसित केली आहे. सजग नागरिक या नात्याने यावर आक्षेपार्ह मजकूर रिपोर्ट करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा आणखी घसरला!

0
0

थंडीची लाट कायम; येत्या दोन दिवसांत कडाका वाढणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील थंडीचा पारा १ अंश सेल्सियसने घरसला असून, शनिवारी किमान ५.१, तर कमाल २५.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात दिवसभर गारठा जाणवत आहे. शनिवारी जिल्ह्यात आर्द्रताचे प्रमाण पहाटे ३२ तर सायंकाळी फक्त २७ टक्के इतके होते. मंगळवारपासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरत असून, शुक्रवारी किमान ६.९ अंश सेल्सियस इतके होते. हे तापमान शनिवारी १ अंशाने घसरले. येत्या काही दिवसांत थंडीचा पारा आणखीन घसरणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

येवल्यात हुडहुडी

येवला : दोन दिवसांपासून तापमानाचा पारा खालवल्याने येवला शहर अन् तालुक्यातील जनजीवनावर कमालीचा विपरीत परिणाम झाला आहे. शुक्रवारी सायंकाळपासून पुढे मध्यरात्री ते पहाटपर्यंत कडाक्याच्या थंडीने कहर केला होता. शुक्रवारी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान येवल्यात तापमानाचा पारा किमान ९ ते ७ अंशावर होता. शनिवारी सकाळी आठच्या दरम्यान येवल्यात हे तापमान ११ डिग्री सेल्सीयस होते. शनिवारी (दि.२९) दिवसभरात देखील तालुक्यात सर्वत्र गारठा होता.

सिन्नरमध्येही गारठा

सिन्नर : जिल्ह्यातील सर्व भागात थंडीची लाट उसळली आहे. थंडीच्या बचावासाठी ग्रामीण भागात व शहरातील अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. सिन्नर तालुक्यातील थंडीची लाट आहे. शुक्रवारी ६ अंश तापमानाची नोंद झाली होती तर शनिवारी सकाळी सहा ते सात अंश निचांकी तापमानाची नोंद पहावयास मिळाली. सुमारे दहा ते बारा दिवसांनंतर थंडीने जोर धरला असून याचा फटका शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यातच हवामान खात्याने थंडी आणखी चार ते पाच दिवस राहणार असलयाचा अंदाज दिल्याने बाजारात ऊबदार कपड्यांची मागणी वाढली आहे.

निफाड गोठलेलेच

निफाड : सलग चौथ्या दिवशीही निफाड तालुक्यात गारठा कायम आहे. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा थंड हवा वाहत होती. शनिवार निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड तालुक्यातच कसबे सुकेणे परिसरात शेतकऱ्यांनी बागांमध्ये लावलेल्या तापमापावर १ ते २ अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी दिवसभर वातावरण थंड होते.

निफाड येथे गुरुवारी सर्वात नीचांकी म्हणजे १.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. या थंडीने द्राक्षबागेत व शेतात पसरलेल्या चिपाड, गहू, पुदिना व इतर झाडे व पिके यावर दवबिंदू गोठून बर्फाची झालर तयार झाली होती. शुक्रवारी पारा ४ अंशावर गेला होता. पण दुसऱ्याच दिवशी शनिवारी पुन्हा तापमानात घसरगुंडी होत पारा ३ अंशावर आला. शिरवाडे वाकद परिसरात उसाच्या मळ्यांमध्ये बारिक बर्फ पडल्याचे चित्र शनिवारी सकाळी पाहायला मिळाले

000

मालेगावही गारठले

मालेगाव : जिल्ह्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला असून, पुन्हा एकदा थंडीची लाट झाली आहे. यामुळे तापमानाचा पारा कमालीचा खाली आला आहे. शहरात देखील शुक्रवारी ७.८ अंशापर्यंत पारा खाली आला. या मोसमातील आत्तापर्यंतचे हे निच्चांकी तापमान ठरले आहे. गेल्या आठवड्यात तब्बल ६ अंशाने पारा वर गेल्याने थंडी गायब झाली होती. मात्र पुन्हा एकदा थंडीमुळे हुडहुडी भरली आहे. यापूर्वी २०१४ साली २८ डिसेंबर रोजी पारा इतका खाली आला होता. थंडीचा हा तडका दिवसभर कायम असून सायंकाळी अधिकच वाढ होते. त्यामुळे चौकाचौकात शेकोट्या पेटल्या असून थंडीपासून बचावासाठी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत आराखडा १४ हजार कोटींचा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. गतवर्षीच्या ११ हजार १२५ कोटींच्या पत आराखड्यात यंदा २ हजार ८७५ कोटींनी वाढ करण्यात आली आहे.

पत आराखड्याच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी बैठक बोलावली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, संजय बुरहाडे, विभागीय व्यवस्थापक बी. एस. तवरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक भारत बर्वे यांच्यासह बँकांचे अधिकारी उपस्थित होते. हा आराखडा बँक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हा अग्रणी बँक आणि अन्य बँकांच्या पुढाकारातून तयार करण्यात आला आहे.

२०१९-२० या वर्षाकरीता पतधोरण ठरविताना बँकांनी शेती, शेतीपुरक उद्योग आणि अन्य प्राथमिकता विचारात घेऊन १४ हजार कोटींच्या पतधोरणाचे नियोजन केले आहे. यामध्ये शेती क्षेत्राकरीता सात हजार कोटी तर बिगर शेतीकरीता चार हजार कोटींचे कर्जपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. अन्य प्राथमिकतांकरीता तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये आधार सेवा केंद्रांची संख्या कमी आहे. त्यामुळे अशा तालुक्यांमध्ये राष्ट्रीयीकृत बँकांसह खासगी बँकांमध्ये आधार केंद्र सुरू करून नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या सूचना या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. ५९ मिनिटांमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या योजनेच्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी आता दर सोमवारी घेणार आहेत. नाशिक आणि मालेगाव महापालिकांना आवास योजनेसाठीच्या लाभार्थींची यादी बनविण्याचे अधिकार आहेत. महापालिकांकडून अशा हजारो लाभार्थींच्या नावांची यादी बँकांकडे सोपविली जाते. परंतु या यादीतील नावांची पडताळणी करून पुढील कार्यवाही करण्यात बँकांना अडचणी येतात. ही कार्यवाही वेळखाऊ ठरत असल्याने त्याचे खापरही बँकांवरच फोडण्यात येते. त्यामुळे लाभार्थ्यांना बँकांपर्यंत पाठवावे, अशी विनंती लीड बँकेने महापालिकांना केली. यामुळे ही प्रक्रिया अधिक वेगाने होऊ शकेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - चित्राची जागा

म.गांधी विचारमालेत जोशी यांचे व्याख्यान

0
0

महात्मा गांधी विचारमालेत

जोशी यांचे व्याख्यान

नाशिक : १७८ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्यावतीने आयोजित महात्मा गांधी विचारमालेचे चौथे पुष्प शिक्षण अभयासक तथा इस्पॅलियर एक्सपिरिमेन्टल स्कुलचे संचालक सचिन जोशी गुंफणार आहेत. बुधवारी (२ जानेवारी) सायंकाळी सहा वाजता सावाना आवारातील मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. महात्मा गांधी यांची शिक्षण प्रणाली हा जोशी यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित या व्याख्यानाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रचना ट्रस्ट विद्यार्थिनींना लैंगिक विषयांवर मार्गदर्शन

0
0

लैंगिक विषयांवर विद्यार्थ्यांनींना मार्गदर्शन

स्पंदन सामाजिक संस्थेतर्फे कार्यशाळा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पंदन सामजिक संस्थेतर्फे रचना ट्रस्टच्या आश्रमशाळेत दोन दिवसीय लैंगिकता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अनुपमा मराठे, मंजुषा व्यवहारे, नीलिमा निकम, मेघा मनोहर, रवींद्र वरखेडे, विशाल लोणारी, रुपाली शिंदे, वैशाली डुंबरे यांनी विद्यार्थिनींना लैंगिकतेशी संबंधित विषयावर मार्गदर्शन केले. गंगापूररोड येथील रचना ट्रस्टच्या सभागृहात ही दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाच्या सत्रात इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींना योग्य आणि सकस आहाराबद्दल प्रा. नीलिमा निकम यांनी सांगितले. तर, कोवळ्या वयात फुलणाऱ्या प्रेम, मैत्री, आकर्षण यांची माहिती डॉ. अनुपमा मराठे यांनी दिली. सामाजिक कार्यकर्ते विशाल लोणारी यांनी लहान मुलांनी प्रलोभनांपासून दूर राहून आपले जीवन शालेय अभ्यासावर कसे केंद्रित करावे याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी मुलींशी गट्टी जमवत विविध खेळही घेण्यात आले. तर, आठवी ते दहावीच्या सत्रात संस्थेच्या मेघा मनोहर यांनी वयाच्या कुमारवस्थेत शारीरिक, मानसिक बदलांबद्दल माहिती दिली. डॉ. मंजुषा व्यवहारे यांनी मुलींना स्त्री-पुरुष प्रजननसंस्था, मासिक पाळीच्या काळात करण्याच्या स्वच्छतेविषयी शास्त्रीय मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवसाच्या सत्रात इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलींना विविध रोल प्ले करून दाखवण्यात आले. त्यातून समाजात वावरताना सुरक्षा कशी करावी यावर भाष्य केले गेले. तसेच यावेळी डॉ. अनुपमा मराठे यांनी मासिक पाळीच्या काळातील मानसिक व शारीरिक समस्यांवरील प्रश्नांचे निरसन केले. तसेच आठवी ते दहावीच्या मुलींनीही चांगल्या वाईट स्पर्शज्ञान मेघा मनोहर आणि रवींद्र वरखेडे यांच्यातर्फे देण्यात आले. दोनही दिवसांच्या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी त्यांच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडली. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रचना ट्रस्टच्या पुष्पा जोशी, स्पंदन संस्थेचे श्रीरंग जाधव, गणेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वस्त्रहरणाचा भाजपप्रयोग!

0
0

लोगो

नाशिकनामा

शिस्तबद्धता, सचोटी, पक्षनिष्ठा आणि साधनशूचितेच्या गप्पा मारून काँग्रेस संस्कृतीला दळभद्री ठरवत 'पार्टी विथ डिफरन्स'चा नारा देणाऱ्या भाजपनेच आता दळभद्रीपणाचा कळस गाठला आहे. नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात भाजपचेच नेते आपल्या मंत्र्यांसह वरिष्ठ नेते कसे भ्रष्ट आहेत, याचा पाढाच जनतेसमोर वाचत आहेत. सत्तेच्या नादात भाजपमधील वस्त्रहरणाचा हा प्रकार डोळ्यांदेखत सुरू असताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह त्यांच्या मातृसंस्थेने धृतराष्ट्राची स्वीकारलेली भूमिका सचोटी आणि साधनशूचितेच्या नाऱ्याला लाजवणारी आहे. त्यामुळे भाजपच्या साधनशूचितेचा नारा आता गळून पडला असून, 'दाल में कुछ काला है' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

विनोद पाटील

vinod.patil@timesgroup.com

काँग्रेसच्या दळभद्री कारभाराला कंटाळलेल्या जनतेला नरेंद्र मोदींच्या रूपाने विकासाची आस लागली होती. त्यामुळे जनतेने दिल्ली ते गल्ली भाजपच्याच हाती सत्ता देण्याचा मूड बनवला. लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता देऊन जनतेने विकासाची स्वप्नेही पाहण्यास सुरुवात केली. केंद्राप्रमाणेच राज्यातही भाजपचे कमळ फुलले. काँग्रेसमुक्त देशाचा नारा देऊन भाजपच्या नेत्यांनी दिल्ली ते गल्ली कमळमय करण्यासाठीचा विडाच उचलला. राज्यात भाजपच्या नेत्यांनी महापालिका ते ग्रामपंचायतमध्ये कमळ फुलवण्यासाठी ज्या पद्धतीने कारभार सुरू केला, तो पाहून मतदारांवर आता पश्चात्तापाचीच वेळ आली आहे. ज्या लोकांमुळे काँग्रेसला बुरे दिन आले, त्याच नेत्यांना हाताशी धरून भाजपने आपले अच्छे दिन सुरू केले. सगळा प्रदेश कमळमय करण्याच्या नादात भाजपचा 'विकास' जनतेला दिसेनासा झाला. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात तर भाजपने आपल्या मित्रपक्षाचे पानिपत करत एकापाठोपाठ एक संस्था गिळंकृत करण्याचा जो सपाटा लावला आहे, तोच आता भाजपच्या अंगलट आला आहे. सगळ्या संस्था भाजपच्या ताब्यात आणण्याच्या नादात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नकोसे झालेले नेते भाजपने पावन करून घेतले; परंतु आता हेच नेते भाजपच्या नाकात दम आणत असून, अवघ्या चार वर्षांत भाजपला चिकटवलेली बिरुदे स्वत:च्या हाताने काढून घेत आहेत. नाशिकमध्ये दिनकर पाटील, मालेगावात सुनील गायकवाड, धुळ्यात अनिल गोटे आणि जळगावमध्ये एकनाथ खडसेंनी आपल्या पक्षाच्या कारभारावर बोट ठेवून आपल्याच नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना वाचा फोडत भाजपला आरसाच दाखवला आहे.

नाशिकमध्ये तर भाजपमध्ये सुरू असलेला 'तमाशा' बघून खऱ्या भाजपेयींवरच आता पश्चात्तापाची वेळ आली आहे. महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने केलेल्या तडजोडीचा फटका आता पक्षाला सहन करावा लागत असून, अन्य पक्षातून भाजपमध्ये येऊन पावन झालेल्या नेत्यांनीच भाजप कलंकित करून सोडला आहे. महापालिकेतल्या सत्तेसाठी भाजपने मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची आयात केली. त्यामुळे प्रथमच रामनगरीत मोदीलाटेमुळे कमळ फुलले. महापालिकेत निवडून आलेले ६६ पैकी ४८ नगरसेवक हे दुसऱ्या पक्षांचे आहेत. त्यामुळे साहजिकच मूळ भाजप बाजूला पडत पक्षाबाहेरून आलेल्यांना सत्तेची पदे देणे भाजपला भाग पडले; परंतु या नगरसेवकांना पक्षनिष्ठा, शिस्तबद्धता आणि सचोटी शिकवण्याचा विसरच पडला. याउलट या आयारामांमुळे भाजपच्या नावासमोर असलेले हे गोंडस शब्द कधीच गळून पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महापालिकेच्या कारभारात तर विरोधकांना आरोप करण्यासाठी भाजप नेत्यांनी जागाच ठेवलेली नाही. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनाही पदाधिकारी जुमानत नसल्याचे चित्र आहे. पदाधिकाऱ्यांमधील भांडणे मिटवण्यासाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनाच पालिकेत यावे लागले होते. कोणी किती पैसे खाल्ले याचा पाढा भाजपचेच पदाधिकारी जगजाहीर सांगू लागले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढेंच्या रूपाने हक्काचा एक्का वापरला. मात्र, स्थानिक भाजप नेत्यांनी हा एक्काच खोटा ठरवला. मुंढेंचा अडेलतट्टूपणा आणि पदाधिकाऱ्यांना कमी लेखण्याच्या त्यांच्या कारभारामुळे त्यांनाही अल्पावधीतच नाशिकमधून काढता पाय घ्यावा लागला. त्यानंतर राधाकृष्ण गमेंच्या रूपाने समन्वय साधणारा आयुक्त पालिकेत आला; परंतु त्यांच्या सलामीलाच २१ कोटींचे टीडीआर प्रकरण भाजपच्या नेत्यांनी उकरून काढत आपल्याच नेत्यांवर बेछूट आरोप सुरू केले आहेत. सभागृह नेता दिनकर पाटील आणि स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्यातील भ्रष्टाचाराच्या आरोप- प्रत्यारोपांची भांडणे पाहून पक्षही हतबल झाला आहे. दिनकर पाटील यांनी थेट सभापतींवरच भ्रष्टाचाराचा आरोप करीत, चौकशीची मागणी केली. विशेष म्हणजे आपल्याच पक्षाच्या सभापतींविरोधात स्थायीतल्या भाजपच्या आठ जणांसह पंधरा सदस्यांना आंदोलन करावे लागले. त्यामुळे भाजपची इभ्रतच चव्हाट्यावर आली. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप तर महापालिकेत नेमके कोणाच्या सोबत असतात, हेच कळत नाही. आमदार सीमा हिरे आणि देवयानी फरांदे यांनी कारभारात लक्ष घालायला सुरुवात केली तर त्यांचीच प्रकरणे बाहेर काढून त्रास देण्याचा उपक्रम सुरू केला जातो. त्यामुळे कोणाचेच कोणावर नियंत्रण नसल्याने पदाधिकारी आणि नगरसेवकच सैरभैर झाले आहेत. आपणच निवडून दिलेल्या भाजपमधील नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या ऐकण्याशिवाय आता नाशिककरांसमोर पर्यायच शिल्लक राहिलेला नाही. स्वत:ची झोळी भरण्यासाठी भाजपमध्ये सुरू असलेल्या लक्ष्मीदर्शनाच्या स्पर्धेत भाजप नेत्यांनी पक्षाच्या सर्व तत्त्वांना तिलांजली दिली आहे. नाशिकमध्ये पक्षातच 'रामायण', 'महाभारत' घडत असताना वरिष्ठ नेत्यांनी तोंडावर बोट ठेवल्याने नागरिकांचाही संभ्रम आणि संशय वाढला आहे.

मालेगावमध्ये तर एका आयुक्ताच्या बदलीवरून भाजप महानगरप्रमुखाने आपल्याच पक्षाचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री असलेले डॉ. सुभाष भामरे यांच्यावर ठेकेदाराशी हातमिळवणी करीत, अधिकारी नियुक्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपचे महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत, खासदार आणि मंत्री असलेल्या ज्येष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप करून राळ उठवून दिली. त्यांच्या या आरोपाने भाजपला शहरात तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही. पक्षाचा स्थानिक प्रमुखच आपल्या नेत्यावर पुरावे नसतानाही बेछूट आरोप करीत असताना पक्षश्रेष्ठींना त्यांच्या आरोपाची दखलही घ्यावीशी वाटली नाही. पक्षाचा प्रमुख थेट केंद्रीय मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याची हिंमत करीत असतानाही वरिष्ठ नेते धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याने जनतेचा संभ्रम वाढला आहे. मालेगावप्रमाणेच धुळ्यातील भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी तर मुख्यमंत्र्यांपासून, प्रदेशाध्यक्ष आणि भाजप मंत्र्यांवर आरोप करण्याची फॅक्टरीच उघडली आहे. महापालिका निवडणुकीत भाजप नेत्यांच्या कृष्णलीलांवर प्रकाश टाकतानाच भाजपची लक्तरे वेशीवर टांगली. पक्षाचे दोन मंत्री व आमदारांमधील आरोप- प्रत्यारोप बघून जनताच कंटाळली आहे. धुळ्यात पोलिसांची बैठक घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांवरच त्यांनी निवडणुकीसाठी पैसे जमवण्यासाठी मुख्यमंत्री पोलिसांना टिप्स देत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. जळगावमध्ये एकनाथ खडसे यांनी पक्षाला जेरीस आणून सोडले आहे. जळगावमध्ये स्थानिक भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या क्लिप व्हायरल होऊनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. नंदुरबारमध्ये आमदार विजयकुमार गावित यांनीच पक्षाला घाम फोडला आहे.

भाजपच्या नेत्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आरोप केले असते तर जनतेने त्याकडे दुर्लक्ष केले असते; परंतु भाजपमधीलच नेते आपल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत असल्याने संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. आरोपकर्त्यांवर पक्षाकडूनही कारवाई होत नसल्याने जनताही संभ्रमित झाली आहे. खडसेवगळता उर्वरित नेते पक्षाने आयात केले आहेत; परंतु या आयात नेत्यांमुळे पक्षाची वाढ तर सोडा, पक्षाच्या नेत्यांना गल्लीत फिरणेही मुश्कील झाले आहे. नाशिकमधील तापामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वादापासून लांब राहणेच पसंत केले आहे, तर धुळ्यात मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची, असा प्रश्न पक्षासकट मुख्यमंत्र्यांसमोर आहे. केवळ सत्ता टिकविण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी डोळ्यांवर बांधलेली पट्टी पाच राज्यांतील निकालानंतर तरी उघडायला हवी होती. मात्र, भाजपमधील अंतर्कलह दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र असून, आहे ती परिस्थिती पाहण्याशिवाय भाजप कार्यकर्त्यांसह जनतेपुढे कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपअंतर्गत सुरू झालेली भ्रष्टाचाराच्या आरोपांची स्पर्धा भाजपला घरघर लावणारी आहे. त्यामुळे संघाच्या धुरिणांना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना धृतराष्ट्राची भूमिका सोडून निदान शिस्तबद्धता, सचोटी, पक्षनिष्ठा आणि साधनशूचिता या गोंडस चार शब्दांच्या रखवालीसाठी तरी भूमिका घ्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: शिक्षण समितीवर भाजपचा झेंडा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तब्बल पावणे दोन वर्षानी मुहूर्त लागलेल्या महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती-उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे बहुमताच्या जोरावर सत्तारूढ भाजपने आपला झेंडा रोवला आहे. शिक्षण समितीच्या सभापतीपदी प्रा. सरिता सोनवणे तर उपसभापतीपदी प्रतिभा पवार विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे सभापतीपदाचे उमेदवार सुदाम डेमसे व उपसभापतीपदाचे उमेदवार संतोष गायकवाड यांना संख्याबळाअभावी पराभव पत्करावा लागला. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न फसले असून, शिवसेनेने नगरचा बदला नाशिकमध्ये घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्णन् बी. यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील महिला बालकल्याण समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. समितीत भाजपकडे ५, शिवसेनेकडे ३ तर काँग्रेसकडे एक सदस्य होते. त्यामुळे भाजप उमेदवारांची निवड होईल हे निश्चित होते. सर्वप्रथम सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी भाजपकडून प्रा. सोनवणे तर शिवसेनेकडून सुदाम डेमसे निवडणूक रिंगणात होते. उमेदवारी अर्ज माघारीसाठी देण्यात आलेल्या १५ मिनिटांच्या मुदतीत दोन्हीपैकी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने हात उंचावून मतदान प्रक्रिया राबविली गेली. सर्वप्रथम शिवसेनेचे डेमसे यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. डेमसे यांना स्वत:सह समितीतील शिवसेनेचे संतोष गायकवाड व चंद्रकांत खाडे यांनी मतदान केले. तर कॉँग्रेसचे राहुल दिवे मात्र मतदान प्रसंगी अनुपस्थित राहिले. यानंतर प्रा. सोनवणे यांच्यासाठी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत स्वत: सोनवणे यांच्यासह दिनकर आढाव, वर्षा भालेराव, प्रतिभा पवार व स्वाती भामरे यांनी हात उंचावून मतदान केले. प्रा. सोनवणे यांना पाच तर डेमसे यांनी अवघी तीन मत मिळाल्याने दोन मतांच्या फरकाने भाजपच्या प्रा. सोनवणे यांना विजयी घोषित करण्यात आले. यानंतर झालेल्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत मात्र कॉँग्रेसचे दिवे उपस्थित झाले. यावेळेस शिवसेनेचे संख्याबळ मात्र वाढले. यावेळीही गायकवाड यांनी माघार न घेतल्याने हात उचांवून मतदान घेण्यात आले. भाजपच्या प्रतिभा पवार यांनी पाच तर शिवसेनेच्या संतोष गायकवाड यांना चार मते मिळाली. त्यामुळे पिठासन अधिकाऱ्यांनी पवार यांच्या विजयाची घोषणा केली. या समितीती भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूकही भाजपने जिंकली. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, भाजप गटनेते संभाजी मोरूस्कर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती प्रा. सोनवणे व उपसभापती पवार यांचा सत्कार करण्यात आला.

नगरचा इशारा नाशिकमध्ये

या समितीत भाजपचे स्पष्ट बहुमत असले तरी, शिवसेनेने सभापती व उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते. परंतु, भाजपने शिवसेनेची मनधरणी करत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अहमदनगर पालिकेत भाजपने केलेल्या दगाफटक्याचा बदला म्हणून शिवसेनेने ही निवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न हाणून पाडले. शिवसेनेने यासाठी काँग्रेसचीही मदत घेतली होती. शिवसेनेने सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक घेवून नगरचा इशारा दिल्याची चर्चा आहे.

खाडे अन् खोडेचा वाद

शिक्षण समितीच्या या निवडणुकीत शिवसेनेचे सदस्य चंद्रकांत खाडे यांच्या नावावरून बराच वाद रंगला. या निवडणूक उमेदवारांच्या नावापुढे नामफलक लावण्यात आला होता. परंतु, नगरसचिव विभागाच्या चुकीमुळे शिवसेनेचे खाडे यांच्या ऐवजी नामफलकावर भाजप नगरसेवक चंद्रकांत खाडे यांचे नाव टाकण्यात आले होते. त्यामुळे नगरसचिवांना निवडणूक होवून पावणे दोन वर्ष उलटले तरी, खाडे की, खोडे यात फरक समजला नसल्याबद्दल खाडे यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत थेट आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर नगरसचिवांना यासंदर्भात दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.

दिवेंना पडला विसर!

या निवडणूकीत शिवसेना आणि काँग्रेस भाजप विरोधात एकत्र आले होते.त्यामुळे काँग्रेसच्या राहूल दिवेंना शिवसेना मतदान करावे लागणार होते.पक्षाच्या वतीने त्यांसदर्भात त्यांना सांगण्यातही आले होते.परंतु,सभापतीपदाच्या निवडणुकीत दिवेंनी दांडी मारली.मात्र सभापती वेळी अनुपस्थित असलेले दिवे उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी मात्र उशिराने हजर झाले. यावेळी शिक्षण सभापती-उपसभापतीपदाची आज निवडणूक असल्याचे आपल्याला माहितीच नव्हते, असा आश्चर्यकारक दावा त्यांनी केला. निवडणूकप्रक्रिया सुरू असल्याचे आपल्याला आताच कळली असा दावा त्यांनी केला.

शहरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याबरोबरच खासगी शाळांच्या धर्तीवर सेमी इंग्रजी शाळा सुरू करणार आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासह त्यांना चांगले शिक्षण देण्याचा मानस आहे.

- प्रा. सरिता सोनवणे, सभापती

महापालिकेच्या शाळांमध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्याचा तसेच हसत खेळत शिक्षणाचा उपक्रम राबविण्यास प्राथमिकता राहणार आहे. मनपा शाळांचा दर्जा उचांवण्यासाठी प्रयत्न करणार असून, इंग्रजी शाळांचे विद्यार्थी पालिका शाळांमध्ये येतील यासाठी प्रयत्न करणार.

- प्रतिभा पवार, उपसभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उप वनसंरक्षकांच्या बदल्या!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वनविभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांना बढती मिळाली असून, त्यांच्याकडे आता नाशिक वन्यजीव विभागाच्या मुख्य वनसंरक्षक पदाची जबाबदारी असणार आहे.

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात मुख्य वनसंरक्षक आणि उप वनसंरक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे. नाशिक पूर्व वन विभागाचे उप वनसंरक्षक डॉ. शिवबाला यांची मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे बदली केली आहे. त्यांच्या जागी गडचिरोली येथील उप वनसंरक्षक एस. बी. फुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नाशिक पश्चिम वन विभागाच्या उप वनसंरक्षक टी. बेऊला यांची अकोट येथे वन्यजीव विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सिरोंचा येथील उप वनसंरक्षक तुषार चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वन मंत्रालयाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या बदल्यांनुसार नववर्षापासून नियुक्तीचा पदभार अधिकारी स्वीकारणार आहेत.

\Bवनविकासाचा वाढणार वेग!

\Bनाशिक पश्चिम वन विभागाच्या उप वनसंरक्षक टी. बेऊला यांनी जिल्ह्यातील वन संरक्षणासाठी विविध योजना राबविल्या होत्या. त्याचप्रमाणे पूर्व वन विभागाचे उप वनसंरक्षक डॉ. शिवबाला यांनी वन संवर्धनासाठी अनेक प्रकल्प कार्यान्वित केले. त्यानुसार त्यांची बदली मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि टी. बेऊला यांची बदली अकोट येथे करण्यात आल्याचे बोलले जात आहे. नवनियुक्त अधिकाऱ्यांकडून राज्यातील वन विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार असून, त्या संदर्भात योजनांची आखणी लवकरच होणार असल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रेसचे स्नेहसंमेलन

0
0

\B

\Bनाशिक : न्यू ग्रेस अॅकॅडेमी इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी 'रेट्रो टू मेट्रो' ही संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांनी जुन्या व नवीन मराठी, हिंदी चित्रपटामधील गीतांवर नृत्य सादर केले. या प्रसंगी टीव्ही व चित्रपट नायिका पूजा गोरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती वंदना या शास्त्रीय गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेच्या संस्थापिका रोहिणी नायडू, नागराजन नायडू, राजश्री सुरावकर, राजेंद्र वानखेडे, संदीप सुरावकर, मुख्याध्यापिका हिना शेख उपस्थित होते. यावेळी ग्रेस प्रिन्स हा पुरस्कार लक्ष पगारे याला, तर ग्रेस प्रिन्सेस हा पुरस्कार प्रतीक्षा गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावेरी पवार, निकेता जोगळेकर व शालेय विद्यार्थी कुणाल गवळी व अभिजित गायकवाड यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवंतांच्या पंखात बळ!

0
0

स्पर्धा परीक्षा इच्छुकांसाठी मोफत अभ्यासिका

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे अभ्यास साहित्य उपलब्ध व्हावे, त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभावे, या हेतूने येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात प्रातांधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या संकल्पनेतून मोफत अभ्यासिका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार भादेकर यांनी दिली.

प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात अनेक विद्यार्थी कूच करतात; मात्र महागडे अभ्यास साहित्य, क्लासेस यामुळे अगोदरच दुष्काळी परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या तालुक्यातील पालकांचा आर्थिक कणा पुरता मोडून जातो आणि परिस्थिती अभावी उमेदीच्या काळात तरुणांना माघरी फिरावे लागू शकते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी वाढलेल्या स्पर्धेत अगदी थोड्या गुणांवरून यशाला हुलकावणी मिळू शकते. आर्थिक परिस्थती नसल्याने अनेकांना ही लढाई अर्ध्यावर सोडून माघारी यावे लागते. नेमकी हीच गोष्ट हेरून प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी प्रशासकीय कार्यालयात अभ्यासिका सुरू केली आहे.

अशी झाली निवड

अभ्यासिकेत प्रवेशासाठी १०० गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची पात्रता परीक्षा शहरातील होळकर विद्यालयात घेण्यात आली. इच्छूक उमेदवार चांदवड तालुक्याचा रहिवाशी आणि तो किमान बारावी उत्तीर्ण असावा अशी एकमेव अट ठेवण्यात आली. परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल प्रांताधिकारी कार्यलयात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आले. यातील पात्र ठरलेल्या ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. तसेच यातील ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूकांसाठी एका नियमांचा प्रस्ताव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये सुसूत्रता असावी, त्यात एकवाक्यता असावी यासाठी एकच कायदा व नियम असावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सरकारकडे राज्य निवडणूक आयोगाने प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एच. सहारिया यांनी दिली.

नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या सहारिया यांनी निवडणुकीसंबंधी धावता आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुका या राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात. पण, यात सर्व निवडणुकीसाठी कायदे व नियम वेगळे आहेत. त्यामुळे ते एक असावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे मॉडेल कोड ऑफ कंडक्टची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र अधिकारी काम करतात. त्यासारखी यंत्रणा या निवडणुकीत असावी असे वाटत नाही का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्याबाबतही विचार सुरू असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे व्हीव्हीपॅट ईव्हीएम प्रणाली राज्याच्या निवडणुकीत वापरली जाणार का? या प्रश्नावर त्यांनी आता तसा काही विचार नाही. नुकत्याच जवळपास सर्व निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे भविष्यात यावर विचार केला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत त्याचा वापर होणार आहे. त्यामुळे त्याबाबत अनुभवही कसा आहे. या सर्व गोष्टीचा विचार केला जाऊ शकतो.

राज्यात १९९४ साली राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली. पण, त्यांची स्वतंत्र यंत्रणा नाही. महसूल अधिकाऱ्यांमार्फतच या आयोगाच्या निवडणुका घेतल्या जातात. पण, त्यासाठी कायम स्वरुपी स्वतंत्र अधिकारी जिल्ह्यात नसतो. या आयोगातर्फे मतदार यादी तयार करणे, निवडणुकीचे नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी असते. त्यामुळे त्याचे स्वतंत्र अस्तित्व असणे असणेही गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फास्ट

0
0

विनामूल्य संस्कृत

संभाषण शिबिर

नाशिक : 'संस्कृतभारती'तर्फे १ ते १० जानेवारी दरम्यान मोहिनीदेवी रुंगठा विद्यालय, अशोकस्तंभ, नाशिक येथे सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत विनामूल्य संस्कृत संभाषण शिबिराचे आयोजन केले आहे. या वर्गात सोप्या भाषेत संस्कृत संभाषण शिकविले जाणार आहे. शिबिरासाठी वय, शिक्षण याची कोणतीही अट नाही. अधिक माहितीसाठी संगीता आंभोरे ९४२३२२३७५० यांच्याशी संपर्क करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी-शेतमजुरांचा इगतपुरीमध्ये मेळावा

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजूर यांचा तालुका मेळावा शुक्लतीर्थ येथे झाला. अध्यक्षस्थानी शाहीर एकनाथ गोरे होते. यात भाकप राज्य सचिव मंडळचे राजू देसले, किसान सभा जिल्हाध्यक्ष भास्कर शिंदे, भाकप नाशिक शहर सेक्रेटरी महादेव खुडे, भारतीय महिला फेडरेशन विमल पोरजे यांनी मार्गदर्शन केले.

तालुक्यातील भाताला योग्य भाव मिळावा, वनजमिनी कसत असलेल्याच्या नावावर झाल्या पाहिजे, शेतमजूर, शेतकऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे आदी प्रश्नावर संघटन करून तीव्र आंदोलन उभारू, यासाठी शेतकरी, शेतमजूर यांचे संघटन बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राजू देसले यांनी याप्रसंगी केले. शिवाजी पगारे यांनी प्रास्ताविक केले. तसेच ८, ९ जानेवारी रोजी कामगार कर्मचारी संघटनांनी देशभर संप पुकारला आहे. देशात कामगार व शेतकरी विरोधी धोरणाविरोधात पुकारलेल्या संपाला किसान सभा रस्त्यावर उतरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

किसान सभा अध्यक्षपदी बैरागी

मेळाव्यात किसान सभेची कार्यकरिणी निवडण्यात आली. यात संजय बैरागी (अध्यक्ष) लक्ष्मण शेणे, बाळू वाघ (उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर वाघ (सचिव), हिरामण खतेले (सहसचिव) धनराज बऱ्हे (कोषाध्यक्ष) गोपीनाथ वाघ (उपकोषाध्यक्ष), नामदेव राक्षे, शिवाजी पगारे (संघटक) यांचा समावेश आहे. तसेच महिला फेडरेशनच्या अध्यक्षपदी अनुसया बऱ्हे, उपाध्यक्षपदी कमळ रण, संगीता वाघ, सचिवपदी अश्विनी पगारे, सहसचिवपदी अलका रण, कोषाध्यक्षपदी पार्वती आघाण आणि शेतमजूर संघटनेचे अध्यक्षपदी विष्णू रण, उपाध्यक्षपदी सखाराम रण, रतन कोरडे, सचिवपदी शिवाजी पगारे कोषाध्यक्षपदी धनराज बऱ्हे, संघटकपदी नामदेव राक्षे यांची एकमताने निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामकोला ५० हजारांचा दणका

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेच्या अभोणा येथील खातेदाराच्या खात्यातून एटीएमद्वारे परस्पर पैसे काढल्याच्या तक्रारीनंतर बँकेने कोणतीही कारवाई न केल्यामुळे ग्राहक न्यायमंचाने बँकेला दणका देत आठ हजारांचा दंड ठोठावला. त्याचप्रमाणे ५० हजार रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत.

बेलापूर, ठाणे, पनवेल येथील एटीएममधून टप्प्याटप्प्याने ही रक्कम काढण्यात आली होती. कळवण तालुक्यातील अभोणा येथील खातेदार दिलीप वसंत मुसळे यांनी नाशिक मर्चंट बँकेविरुद्ध तक्रार केली. पण, बँकेने कोणतीच कारवाई न केल्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. या तक्रारीनंतर न्यायमंचाने हा निकाल दिला. या निकालात आठ हजारांच्या दंडाच्या रकमेत पाच हजार रुपये मानसिक त्रासापोटी, तर तीन हजार रुपये अर्जाचा खर्च आहे. तक्रारीत मुसळे यांनी म्हटले आहे की, आपण २०१४ पासून बँकेचे खातेदार व सभासद आहोत. बचत खात्यावर एटीएम कार्ड देण्यात आले होते. त्यात आपण वेळोवेळी ७१ हजारांची रक्कम भरली. पण, पासबूक भरायला गेलो असता २१ हजार रुपयेच रक्कम शिल्लक असल्याचे दाखवण्यात आले. त्याबाबत बँकेत चौकशी केल्यानंतर त्यांनी बँक खात्यातून सलग दोन दिवसांत २५ हजारांची दोनदा रक्कम काढल्याचे सांगितले. त्यामुळे आपले खाते कोणीतरी हॅक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर सदर रकमा टप्प्याटप्प्याने बेलापूर, ठाणे येथून युनियन बँकेच्या एटीएममधून, तर पनवेल येथून कर्नाटक बँकेच्या एटीएममधून काढल्याचे लक्षात आले. याबाबत बँकेला कळवूनही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज दिला. बँकेचे सॉफ्टवेअर चांगले नसल्यामुळे अज्ञात व्यक्तीने अकाउंट हॅक केल्याचेही त्यांनी सांगितले.

या तक्रारीवर बँकेने आपली बाजू मांडताना विरोध केला. तक्रारदाराच्या खात्यावरुन पैसे काढल्याची बँकेने माहिती दिली आहे. ज्या बँकांमधून पैसे गेलेले आहेत, त्या बँकांकडून सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे. तांत्रिकदृष्ट्या एटीएमच्या पिनबाबत माहितीची वाच्यता अथवा देवाण-घेवाण केल्याशिवाय खात्यातून पैसे जाऊ शकत नाही. तक्रारदाराच्या खात्यातून ज्या दिवशी पैसे गेले, त्याबाबत एसएमएसद्वारे कळविले असून, त्यांनी दोन ते तीन दिवसांनी बँकेस कळविले. या घटनेस तक्रारदार जबाबदार आहे. बँकेचे सॉफ्टवेअर हे उत्तम दर्जाचे आहे.

जबाबदारी बँकेचीही

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने एटीएम कार्डचा पासवर्ड सुरक्षित ठेवण्याबाबत जेवढी जबाबदारी तक्रारदाराची आहे, तेवढीच बँकेची असल्याचे म्हटले. बँकेचे सॉफ्टवेअर योग्य दर्जाचे नसल्यामुळे तक्रारदाराचे खाते हॅक होऊन खात्यातून पैसे काढले गेले. बँकिंग कोड अँड स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडिया यांच्या नियमावलीनुसार बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या ऑनलाइन अपहारासंबधी बँक जबाबदार असते. त्यामुळे रक्कम देण्यास बँकेने नकार देऊन सेवा देण्यास कमतरता केली आहे, असे सांगत न्यायमंचाने निकाल दिला. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, सचिन शिंपी यांनी दिला. तक्रारदाराच्या बाजूने अॅड. के. एस. शेळके यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बससेवेला नववर्षाचा मुहूर्त

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या माध्यमातून सिटी बस चालविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या इच्छेला अखेर नववर्षाचा मुहूर्त लाभला आहे. महासभेचा सिटी बसचा ठराव प्रशासनाला प्राप्त झाला असून, बससाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बससेवेसाठी निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे.

महामंडळाला डोईजड झालेली सिटी बससेवा पालिकेच्या माथी मारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने सिटी बससेवेसाठी प्रक्रिया सुरू करीत, सप्टेंबरमध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेवर 'ग्रॉस कॉस्ट कटिंग' तत्त्वावर सिटी बससेवा चालविण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला होता. महापालिकेच्या कायद्यात परिवहन समितीची तरतूद असली तरी सिटी बस संचालनासाठी कंपनी स्थापन करण्याचा निर्धार मुंढे यांनी केला होता. त्यामुळे हा वाद पुन्हा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचला होता. त्यानुसार ठरावही मंजूर केला होता. परंतु, मुंढे यांनी पुन्हा सूत्रे फिरवत कंपनीसाठी मुख्यमंत्र्यांमार्फत दबाव टाकला. त्यामुळे संतप्त भाजपने हा ठरावच लटकवत ठेवला. तब्बल तीन महिन्यांनी म्हणजे मुंढे यांची बदली झाल्यानंतर या ठरावाला आता मुहूर्त मिळाला आहे. मुंढे यांच्या बदलीनंतर आलेल्या राधाकृष्ण गमे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी कंपनीचाच ठराव प्रशासनाला सादर केला आहे. प्रशासनाने या ठरावाची अंमलबजावणी आता सुरू केली आहे. बससेवा चालवण्यासाठी सर्वप्रथम कंपनी स्थापन केली जाणार आहे. महासभेच्या ठरावानुसार कंपनीच्या संचालक मंडळाची माहिती आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव महापालिकेच्या वाहतूक कक्षामार्फत केली जात असून, कंपनी गठणाची प्रक्रिया सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कचाट्यात सिटीबसची अंमलबजावणी अडकू नये यासाठी कंपनी स्थापन करून मक्तेदारासाठी निविदा प्रक्रिया काढली जाणार आहे. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सिटी बससाठी निविदा प्रसिद्ध केली जाणार असून, मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

चारशे सीएनजी बस धावणार

प्रशासनाने महासभेत ठेवलेल्या मूळ प्रस्तावात २०० इलेक्ट्रीक बस तर २०० डिझेल बस शहरात चालविण्याचे नमूद केले होते. परंतु, सत्ताधाऱ्यांनी यात बदल केला असून, आता सर्व ४०० बस सीएनजी असाव्यात, असे नमूद केले आहे. त्यामुळे ठेकेदाराला आता सीएनजी बसची खरेदी करावी लागणार असून, त्या दृष्टीने माहिती घेऊन निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी सर्वच्या सर्व बस सीएनजीवर धावणाऱ्या असणार आहेत.

शहरात ६०० शेल्टर्स

शहर बससेवा चालविण्यासाठी बस खरेदी मक्तेदारामार्फत केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक बस डेपो, टर्मिनल व शेल्टर्स अर्थात बस थांब्यांची जागा महापालिकेला उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. चार ठिकाणी बसडेपो उभारताना तब्बल दहा ठिकाणी बस टर्मिनल उभारले जाणार आहेत. त्याचप्रमाणे ६०० ठिकाणी शेल्टर्स उभारले जाणार आहेत. पीपीपी तत्त्वावर शेल्टर उभारणीसाठी स्वतंत्र निविदा काढली जाणार आहे. यासाठीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. अत्यावश्यक खर्चासाठी पालिकेने बजेटमध्ये आर्थिक तरतूदही केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांगलादेशात मतदानादरम्यान हिंसाचार; १३ जण ठार

0
0

ढाका : बांगलादेशामध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले असून, विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात १३ जण ठार झाले. या प्रकरणी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीग आणि विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी (बीएनपी) यांनी परस्परांचे उमेदवार आणि समर्थकांवर हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप केला आहे.

बांगलादेशमध्ये स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान झाले. पुढील २४ तासांत मतमोजणी होऊन, त्यानंतर निकाल घोषित करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेश संसदेच्या ३०० जागांपैकी २९९ जागांसाठी ४० हजार १८३ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेसाठी मतदान घेण्यात आले नाही. देशभरातून १८४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर ढाका येथील मतदान केंद्रांत सर्वांत आधी पंतप्रधान शेख हसीना यांनी मतदान केले. त्यांचे नातेवाइक आणि पक्षाचे सदस्य फजले नूर तपोश हे ढाक्यातून निवडणूक लढवित आहेत. या वेळी 'उज्ज्वल भविष्यासाठी नागरिक आम्हालाच विजयी करतील,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हसीना चौथ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या इच्छेने निवडणूक लढवित आहे, तर त्यांचे विरोधक आणि बीएनपीच्या प्रमुख खलिदा झिया ढाका कारागृहात असून, त्यांना पक्षाघात झाला असल्याचे सूत्रांकडून समजते.

मतदानादरम्यान आठ जिल्ह्यांत विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात तेरा जण ठार झाले. मृतांमध्ये आवामी लीगच्या पाच कार्यकर्त्यांचा समावेश असून, उर्वरितांमध्ये बीएनपी आणि अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सुमारे बारा जण जखमी झाले आहेत. देशभरातून हिंसाचार आणि मारहाणीसंदर्भात सुमारे १०० हून अधिक तक्रारी उमेदवारांनी दाखल केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

-----

निवडणुकीत आमचा विजय होईल, या बद्दल मला विश्वास वाटतो. उज्ज्वल भविष्यासाठी नागरिक आम्हालाच निवडून देतील.

- शेख हसीना, पंतप्रधान, बांगलादेश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images