Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

संस्कारभारतीतर्फे आजपासून ‘गोदास्पंदन’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संस्कारभारती व इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आज, शुक्रवार २८ ते रविवार ३० डिसेंबर या कालावधीत 'गोदास्पंदन' कार्यक्रम होणार आहे.

२८ रोजी सकाळी १० ते १२ त्र्यंबकेश्वर येथे गोदा पूजन आणि स्वच्छता, दुपारी ४ वाजता महात्मा फुले कलादालन, शालीमार येथे चित्र, शिल्प, छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन. २९ रोजी कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल येथे सकाळी १० ते ४ चर्चासत्र होणार आहे. चर्चासत्रात डी. एम. मोरे, सेवानिवृत्त संचालक, मेरी नाशिक हे 'महाराष्ट्राच्या विकासात गोदावरीचे स्थान' या विषयावर बोलणार आहेत. डॉ. प्रा. प्राजक्ता बस्ते : गोदावरी नदी पूर्नजीवन, राजेश पंडीत : गोदावरी पूर्वी, आता आणि पुढे, विजय निपाणेकर : गोदावरीचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व, देवांग जानी : गोदावरी उपनद्या व कुंडांचे पुरातत्वदृष्ट्या महत्त्व आणि यावेळी गोदावरी पूर्नवैभवासाठी अपेक्षित उपाय योजना या विषयावर व्याख्यान होणार आहे.

कार्यक्रमात गोदा स्पंदन या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. तर सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत मान्यवरांच्या उपस्थितीत कवी संमेलन होईल. ३० रोजी सकाळी ६ ते १० बालाजी मंदिर, सोमेश्वर, नवश्या गणपती, आसाराम बापू आश्रम जवळील पूल, संपूर्ण पंचवटी घाट परिसर, टाकळी व दसक परिसर येथे निर्मल गोदा स्वच्छता अभियान, दुपारी २.३० ते ४.३० गोदापूजन, दुपारी ३.५० ते ५ या वेळेत श्री गुरुजी रुग्णालय, सेवासंकल्प समितीतर्फे लोककलेच्या माध्यमातून रामकुंड परिसरात ३० पाड्यांवरील कलाकारांचे लोकनृत्य तसेच गोदा स्पंदन या विषयाला अनुसरुन महारांगोळी. सायंकाळी ६ ते ९.३० नृत्याविष्कार व संगीत कार्यक्रम होईल. गोदावरी मातेची महाआरती होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वफ्त बोर्डात २५ शिपाईअन् फक्त १० अधिकारी!

0
0

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक \B

अल्पसंख्यांकासाठी कार्यरत असणाऱ्या वफ्फ बोर्डातील अधिकारीच कामात कुचराई करतात अन् त्यामुळे बदनाम मात्र सरकारला व्हावे लागते, अशी खंत व्यक्त करताना अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी वफ्फ बोर्डाच्या कामकाजातील वास्तवावर प्रकाशझोत टाकला. या मंडळावर ३५ कर्मचारी काम करतात. यातील जेमतेम दहा अधिकारी सोडले तर तब्बल २५ कर्मचारी हे शिपाई पदावर आहेत. शिपाई पदावरील कर्मचारी शासनाची धोरणे तळागाळापर्यंत राबविणार तरी कशी, त्यांच्या हाती अधिकार आहेत का? हे नेमके कायच चालले आहे, असा सवाल उपस्थित करत शेख यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले.

राज्यातील २० जिल्ह्यांपाठोपाठ नाशिकमधील दौऱ्याचा वृत्तांत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान मांडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर उपस्थित होते. शेख म्हणाले, अल्पसंख्यांक समुदाय म्हटला की, प्राधान्याने मुस्लीम समाज डोळ्यांसमोर येतो. अल्पसंख्यांक समुदायांमध्ये मुस्लीम समाज हा बहुसंख्य असला तरीही यासोबतच जैन, पारशी, शीख, ख्रिश्चन, बौद्ध यासारखे समुदायही आहेत. ज्या-त्या अल्पसंख्यांक समुदायाच्या मोठ्या समस्या आहेत. या समस्या नेमक्या कुठल्या स्वरूपाच्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी आयोगातर्फे राज्यभरात दौरा सुरू केला असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये आयोग पाहणी करत असून, या पाहणीचा अंतिम अहवाल आणि डॉक्युमेंट्री मुख्यमंत्र्यांकडे सादर केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

\Bजैन साधूंना संरक्षण पुरवा \B

जैन या अल्पसंख्यांक समुदायातील साधूंवरही काही ठिकाणी हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेकदा रस्ते अपघातांमध्ये हे साधू सापडले जातात. या साधूंना पोलिसांनी पुरेसे संरक्षण पुरवावे, अशा सूचनाही आयोगाने पोलिस यंत्रणेस केल्या आहेत.

\Bमुलींचे वसतिगृह कधी उभारणार ? \B

प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उभारण्याची तरतूद आहे. नाशिकमध्ये याबाबत काहीच हालचाल दिसत नसल्याचे नोंदवत या वसतिगृहासाठी त्वरीत प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना शेख यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या. या वसतिगृहासाठीचे प्रशासनाकडूनही प्रयत्न सुरू असल्याचे निवासी जिल्हाधिकारी खेडकर यांनी यावेळी सांगितले.

\B...मग तुम्ही इथे काय करता

\Bजिल्हाधिकारी कार्यालयात शेख यांनी अल्पसंख्यांक समुदायातील प्रतिनिधींशी खुला संवाद साधताना विविध समस्या जाणून घेतल्या. या समुदायासाठी आरोग्यासारख्या प्राथमिक गरजेच्या सुविधांमध्ये रुग्णालय आहे पण, डॉक्टर नाहीत, कर्मचारी नाहीत, मशिनरी नाहीत इतके सगळे दाहक वास्तव अनुभवूनही या समुदायातील प्रतिनिधी हातावर हात धरून का बसतात, असा सवालही शेख यांनी समुदायांच्या प्रतिनिधींपुढे उपस्थित केला. संबंधित यंत्रणांकडे याचा पाठपुरावा करा. दाद मिळत नसेल तर आयोगाशी संपर्क साधा, असे आवाहन त्यांनी केले.

अधिकाऱ्यांना बजाविणार नोटीस

राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या आढावा बैठकीस नाशिकच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्यात अनास्था दाखविल्याच्या कारणाने आयोगाचे अध्यक्ष शेख यांनी या अधिकाऱ्यांना नोटिस बजाविण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. जागोजागी आयोगाला अधिकाऱ्यांकडून अहवालाचे मोठे सादरीकरण उपलब्ध होत असताना नाशिकच्या अधिकाऱ्यांनी अवघा चार पानी अहवाल कसाबसा रेखाटला यामागे प्रत्यक्ष योजनांची अंमलबजावणीच नाही तर अहवालात काय मांडणार असा संतापही शेख यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…जेव्हा माणसाला पडतो ‘षडरूपी’ सापाचा विळखा...!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माणसाचे जीवन हे नेहमीच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपुंनी लिप्त असते. त्याचाच परिणाम म्हणजे त्याच्या आयुष्यात दु:ख, वैफल्य आणि निराशा येते. त्यातून बाहेर पडण्यासाठी तो कधी सुखाची स्वप्ने पाहतो; परंतु या स्वप्नांचा अर्थ न लागल्याने त्याच्या पदरी निराशाच येते. अशा आशयाचे हे नाटक होते.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६ व्या नाट्यमहोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत गुरुवारी कामगार कल्याण केंद्र दीपनगर भुसावळच्या वतीने भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र प्रस्तुत, नितीन गगे लिखित 'षडरूपी' हे नाटक सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात या स्पर्धा सुरू आहेत.

माणूस आपल्याला पडणाऱ्या स्वप्नाचा आपल्या कुवतीनुसार अर्थ लावतो. त्याचा अर्थ लागत नाही तोपर्यंत तो धडपडत राहतो. त्यातून सुटण्यासाठी परिस्थितीशी तडजोड करण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही तो उत्तरोत्तर फसतच जातो. वासू या तरुणाचे तेच झाले आहे. स्वप्ने, योगायोग, नशीब यातून नियतीशी जुळवून घेणारा वासू आईवरच्या प्रेमापोटी तडजोडीचा मार्ग स्वीकारतो. पण ती तडजोड करताना त्या तडजोडीचा फायदा घेणारा ज्योतिषी, दैवाघाताने अगतिक झालेली वासूची पत्नी यांच्या आयुष्याभोवती हे नाटक फिरते. वासूला पडलेल्या स्वप्नांपासून नाटकाला सुरुवात होते व अनेक घटनांमधून प्रवास करीत अखेरीस त्या स्वप्नांचा अर्थ लागतो. असा आशय या नाटकातून व्यक्त झाला.

दिग्दर्शन व नेपथ्य चंद्रकांत जाडकर यांचे, संगीत संतोष वारूंगसे, रोशन भगत, प्रकाशयोजना अतुल बऱ्हाटे, वेशभूषा/रंगभूषा श्रद्धा कदम यांची होती. नृत्य शीतल जुमळे, स्वप्नाली महिंद्र, सविता शर्मा, प्रियंका बुरड, लक्ष्मी पाटील, नेपथ्य सहाय्य चंद्रकांत सपकाळे, प्रकाशयोजना सहाय्य तोहित शेख, रंगमंच व्यवस्था रोशन वाघ, लक्ष्मीकांत तेलंग, राकेश तवर, शंकर जाधव, ज्योती कवठे, विशेष सहकार्य अमोल काबरा, दिनेश बोरीकर, विकास चौधरी आदी. नाटकात समीक्षा गुरव, नितीन देवरे, पंकज सनेर, हर्षवर्धन बिलगये, पंकज गायकवाड, ऐश्वर्या खोसे, सचिन शिंदे, शामल जाधव यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक

भय इथले संपत नाही

कामगार कल्याण केंद्र, ओझर

स्थळ : प. सा. नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाच्या धडकेतदोन तरुण ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले. हा अपघात दिंडोरी रोडवरील आरोग्य विद्यान विद्यापीठासमोर गुरुवारी दुपारी झाला. दुचाकीस्वारांच्या खिशात निघालेल्या कागदपत्रांवरून ओळख पटविण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. विजयकुमार परिडा (वय ३०) आणि कार्तिक परिडा (वय २५, दोघे रा. म्हसरूळ, मूळ ओडिशा) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. छोटी- मोठी कामे करणारे हे दोघे परप्रांतीय कारागीर दुचाकीने म्हसरूळकडून दिंडोरीकडे प्रवास करीत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नग्न फोटो काढून खंडणीची मागणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील हुडको कॉलनीत राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेशी लग्न करून तिचे नग्न फोटो काढून २० लाखाची खंडी मागणाऱ्या परप्रांतीय नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०१८ ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी पीडितेने न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीवरून येथील पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीत म्हटल्यानुसार संशयित आरोपी मुमताज अहमद मोहम्मद हुसेन (वय ३७, रा. भटिंडा, जम्मू) याची सौदी अरेबिया येथे नोकरी करीत असताना पीडित महिलेच्या आईसोबत त्याची ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत त्याने पीडितेच्या आईस 'मी तुमच्या मुलीस मदिना येथे घेऊन जाईल' अशा भूलथाप देवून त्याने पीडित महिलेशी मालेगावी लग्न केले. त्यानंतर तो त्या महिलेस हिमाचल प्रदेश येथे घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार करत तिचे नग्न फोटो त्याच्या मोबाइलवर काढले. तसेच पीडित महिलेच्या भावास फोन करून २० लाखाची खंडणी मागितले; पैसे द्या अन्यथा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी दिली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संयम, अनुभव, नियोजन व संपर्काचा फायदा

0
0

गौतम संचेती, नाशिक

नामको बँकेच्या साडेचार वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीनंतर झालेल्या निवडणुकीत प्रगती पॅनलला संयम, अनुभव, नियोजन आणि संपर्काचा फायदा झाला. बँक बरखास्त करण्यापासून उमेदवारी अर्ज बाद करण्यापर्यंत झालेल्या आरोपांना संयमाने व कृतीतून उत्तर दिल्यामुळे विरोधी गटाचे मुद्देच हरवले. या निवडणुकीत २१ उमेदवारांपैकी १४ उमेदवार माजी संचालक असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा व संपर्काचा फायदाही पॅनलला झाला. बँकेच्या निवडणुकीपूर्वी दोन ते तीन महिने तयारीसाठी मिळाल्यामुळे या पॅनलने सुरुवातीपासून शिस्तबद्ध नियोजन करीत विजयश्री खेचून आणली.

बँकेवर एकहाती सत्ता असलेले स्व. हुकुमचंद बागमार यांच्या पश्चात ही निवडणूक असल्यामुळे नेतृत्वाचा प्रश्नही होता. पण सोहनलाल भंडारी व वसंत गिते यांनी सामूहिक नेतृत्व करून बागमारांचे काम पुढे नेण्याचा उद्देश ठेऊन प्रचार केल्यामुळे त्याचा फायदा झाला. बँक बरखास्त का केली, याचे उत्तर नाही. त्यासाठी एकही कारवाई नाही, असे सांगतच माजी सदस्य प्रचारात उतरले. विरोधकांना त्यांचे मुद्दे खोडता आले नाहीत. या निवडणुकीत प्रगतीच्या माजी संचालकांना रोखण्यासाठी अर्ज छाननीच्या वेळी घेतलेल्या आक्षेपातील हवाही निघाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कायद्याचा आधार घेऊन दिलेल्या उत्तरामुळे त्यांना क्लीन चिट मिळाली. त्यातच उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे प्रगतीचे बळ वाढले. या निवडणुकीत सहकार व नम्रता हे दोन पॅनल रिंगणात उभे होते. त्यात सहकार पॅनलमध्ये चार नेते सोडले तर मातब्बर उमेदवार नव्हते. पण, ज्यांना प्रगतीकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी येथे उमेदवारी मिळवली. अजित बागमार यांनी नम्रता पॅनल उभे करुन प्रगतीची कोंडी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. बागमारांचा फोटो वापरापासून, तर गुन्हा दाखल करण्यापर्यंत सर्वच गोष्टी झाल्या. पण, त्यातूनही फारसे काही साधले नाही. त्यामुळे प्रगतीचे अडथळे दूर होत गेले.

निवडणुकीत प्रगतीला यश मिळाले असले तरी त्यांच्यासमोर आव्हानही आहे. बँकेचा वाढलेला एनपीए कमी करणे, त्यातून बँकेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी ग्राहकांमध्ये विश्वास तयार करण्याची जबाबदारी आहे. पाच वर्षांपूर्वी या बँकेला खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांशी स्पर्धा नव्हती. पण, आता त्याबरोबरच तंत्रज्ञानाचाही कमाल वापर करावा लागणार आहे. सर्वांचे सहकार्य घेऊन बँकेची वाटचाल केल्यास बँकेच्या विकासाला खरी गती मिळू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा गुण

0
0

क्रीडा गुणांची योजना फसवी

नाशिकरोड : दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांपैकी खेळांत प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंसाठी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जाहीर केलेली बोनस गुणांची योजना फसवी आणि खेळाडूंवर अन्याय करणारी असल्याची भावना क्रीडा शिक्षकांनी व्यक्त केली आहे. या सुधारित योजनेमुळे संधीसाधुंचे आयते फावणार असल्याने गुणांची पद्धत बंद करुन केवळ स्पोर्ट्स मेरीटनुसारच प्रवेश देण्याची मागणी क्रीडा शिक्षकांतुन पुढे आली आहे.

राज्य शासनाचा बोनस गुणांचा शासननिर्णय नुकताच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जाहीर केला आहे. या शासननिर्णयानुसार पूर्वीच्या बोनस गुणांच्या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. पूर्वी जिल्हा आणि विभागीय स्तरावरील प्राविण्य अथवा सहभागासाठी बोनस गुण देण्याची पद्धत नव्हती. मात्र सुधारीत योजनेनुसार जिल्हा स्तरासाठी ३ आणि विभागीय स्तरासाठी ५ गुणांची सवलत देण्यात आली आहे. मात्र पूर्वी राज्यस्तरावरील प्राविण्यासाठी २० गुण दिले जात असत. आता केवळ ७ गुण मिळतील. पूर्वी राज्यस्तरावरील सहभागासाठीही १५ गुण मिळत आता सहभागासाठी सवलतीचे गुण मिळणार नाहीत. पूर्वी राष्ट्रीय स्तरावरील प्राविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या २५ गुणांऐवजी आता १० तर सहभागासाठी २० ऐवजी अवघे ७ गुण मिळणार आहेत. पूर्वी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना मिळणारे सवलतीचे गुण आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांत प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना मिळणार असून, त्यांना स्पोर्ट्स कोट्यातुन इयत्ता अकरावीलाही प्रवेश मिळणार आहे. या सुधारित योजनेमुळे खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होणार असल्याचे भीती क्रीडा शिक्षक आणि संघटकांतुन व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेतील अधिकाऱ्यांनाअतिरिक्त आयुक्तपदी संधी?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) हे पद रमेश पवार यांच्या बदलीमुळे रिक्त असतांनाच, शासनाने अतिरिक्त आयुक्त (२) या पदावरील किशोर बोर्डे यांचीही अचानकपणे मालेगाव महापालिकेत बदली केल्याने पालिकेतील दोनही अतिरिक्त आयुक्तापदे रिक्त झाली आहे. तुर्तास या पदावरून शासनाकडून अधिकारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने पालिकेत कार्यरत असलेल्या उपायुक्तांमधूनच अतिरिक्त आयुक्तपद भरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्यस्थितीत पालिकेत कार्यरत असलेल्या महेश बच्छाव, रोहीदास बहिरम, हरिभाऊ फडोळ आणि डॉ. महेश डोईफोडे यांच्यापैकी एकाची अतिरिक्त आयुक्तपदी बढती वर्णी लागण्याची शक्यता बढावली आहे.

महापालिकेत सध्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वानवा असतांनाच, शासनाने आता महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांच्याही बदलीचा धडाका लावला आहे. तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर आलेल्या नुतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पालिकेच्या कामकाजाचा अभ्यास सुरू केला असतांनाच, शासनाने पालिकेत कार्यरत असलेले एकमेव अतिरिक्त आयुक्तपदही आता किशोर बोर्डेंच्या रुपाने रिक्त झाले आहे. एकीकडे पालिकेचा समावेश 'ब' वर्गात झाला असताना अधिकाऱ्यांची संख्या वाढण्याऐवजी कमी होत आहे. पालिकेत सध्या अतिरिक्त आयुक्तपदाची एक आणि दोन अशी दोन पदे आहेत. अतिरिक्त आयुक्त क्र.२ (सेवा) यांची चार महिन्यापूर्वीच बदली झाली आहे. तर क्र.१( शहर)चे किशोर बोर्डे यांची मालेगावात बदली झाली आहे. या दोन मोठ्या पदांसोबत उपायुक्त, विधी अधिकारी, मुख्य अग्नीशामक अधिकारी, आरोग्यधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, नगरसचिव अशी महत्त्वाची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नवीन आयुक्तांसमोर पालिकेचा गाडा चालवण्याचे मोठे आव्हान आहे. तुर्तास शासनाकडून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता कमी असल्याने प्रशासनाने आता सध्यस्थितीत कार्यरत असलेल्या उपायुक्तांमधूनच अतिरिक्त आयुक्तपदाचे पद भरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी सेवाज्येष्ठतेतून दोन अधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. शासन सेवेतून आलेल्या महेश बच्छाव आणि डॉ. महेश डोईफोडे यांच्यापैकी एकाची तर, पालिका सेवेतील रोहिदास बहीरम आणि हरिभाऊ फडोळ यांच्यापैकी एकाची या पदावर निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांकडील खात्यांची माहिती घेण्यासह सेवाजेष्ठता तपासण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नामकरण वादात भाजपची सरशी!

0
0

जलशुद्धीकरण केंद्राला अखेर वाजपेयी यांचे नाव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक ३१ मध्ये उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या नामकरणावरून सत्तारूढ भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेत सुरू झालेल्या वादात अखेर भाजपची सरशी झाली आहे. या केंद्राला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव दप्तरी दाखल करून घेत, माजी पंतप्रधान 'भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जलशुद्धीकरण केंद्र' असे नाव देण्याचा ठराव संमत केला आहे.

मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजने अंतर्गत प्रभाग क्र. ३१ मधील पाथर्डी फाटा परिसरातील जुन्या जकात नाक्याच्या जागेत जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी केली आहे. या प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक सुदाम डेमसे यांनी या केंद्राला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव १९ डिसेंबर रोजीच्या महासभेच्या पटलावर सादर केला होता. शिवसेनेपाठोपाठ भाजपचे सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यासह प्रभाग क्र. ९ च्या नगरसेविका हेमलता कांडेकर, वर्षा भालेराव व रवींद्र धिवरे यांनीही महासभेवर प्रस्ताव दाखल करीत या केंद्राला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी केली होती. परंतु, आता शिवसेनेचा प्रस्ताव बाजूला ठेवत दिनकर पाटील यांच्या प्रस्तावाचे ठरावात रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे या केंद्राला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचेच नाव देण्यात आले आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीतर्फे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

0
0

विस्तार अधिकाऱ्यांचाही सन्मान

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेतर्फे आदर्श ग्रामसेवक व विस्तार अधिकारी पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत कालिदास कलामंदिर येथे करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, आरोग्य व सभापती यतींद्र पगार, बांधकाम सभापती मनीषा पवार, भाजपा गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे हे उपस्थित होते.

या सोहळ्यात २०१५-२०१६ मधील १५ ग्रामसेवक व १ विस्तार अधिकारी तर २०१६-१७ मधील १५ ग्रामसेवक व १ विस्तार अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा कणा असल्याचे सांगत समाजाला काही देण लागतो या भावनेतून काम करुन गावांचा विकास साधण्यासाठी ग्रामसेवकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी केले.

२०१५-१६ चे पुरस्कारार्थी

पांडुरंग ठोके(नाशिक), निर्मला खांडवी (दिंडोरी), जितेंद्र नांदे (त्र्यंबक), कैलास बेदके (निफाड), सचिन नेहते (पेठ), वसंत भोई (सुरगाणा), जिजाबाई चौधरी (कळवण), नंदू सोनवणे (देवळा), रवींद्र देवरे (बागलाण), दीपक भोसले (सिन्नर), संगीता बच्छाव (चांदवड), देवानंद शिंदे (येवला), बिरुनाथ गेंद (नांदगाव), जगदीश कदम (इगतपुरी), बापू कदम (मालेगाव)

उत्कृष्ट विस्तार अधिकारी : वसंत जाधव (बागलाण)

२०१६-१७ चे पुरस्कारार्थी

श्यामकांत बोरसे (त्र्यंबक), सुनील शिंदे (निफाड), वैभव गांगुर्डे(कळवण), विनोद अहिरे (दिंडोरी), अतुल सोनवणे (नांदगाव), रोशन सूर्यवंशी (चांदवड), प्रीती बुरुकुल (इगतपुरी), योगिता मत्सागर (येवला), दुर्गादास बोसारे (पेठ), विकास अहिरराव (सुरगाणा), माधुरी सानप (सिन्नर), देवेंद्र हिरे (मालेगाव), माधवी मोरे (नाशिक), पंकज पवार (बागलाण), जयश्री आहेर (देवळा)

उत्कृष्ट विस्तार अधिकारी : संजय महाले (कळवण)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किसान सभेचे चांदवडला धरणे

0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने वनजमिनींबाबत विविध मागण्यांसाठी चांदवड पोलिस ठाण्यात वनधिकारी व किसान सभेच्या पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने किसान सभेच्या वतीने वन क्षेत्रपाल कार्यालयाच्या पटांगणावर गुरुवारी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

वनजमिनी कसणाऱ्यांच्या नावे जमिनी करून त्यांचा ७/१२ उतारा देण्याबाबत शासन निर्णय झाला असून त्याबद्दल स्थानिक पातळीवर वारंवार मोर्चे व आंदोलने काढून देखील प्रश्न सुटत नाही. पिण्याचे पाणी व वीजेसाठी ना हरकत दाखला ताबडतोब मिळत नाही. वनजमिनींची जीपीएस मोजणी पंधरा दिवसाच्या आत करण्यात यावी आदी मागण्यांबाबत लेखी स्वरूपाचे आश्वासन दिले जात नाहीत तोपर्यंत चांदवड वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारातच बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे किसान सभेच्या वतीने सांगण्यात आले.

या आंदोलनात धर्मराज शिंदे, अध्यक्ष हनुमंत गुंजाळ, सचिव तुकाराम गायकवाड, उपाध्यक्ष सुकदेव केदारे, राजाराम ठाकरे यांच्यासह किसान सभेचे गाव कमिटी पाचवड वस्ती, इंद्राईवाडी, राजदेरवाडी सदस्य पदाधिकारी, कार्यकर्ते शेतमजूर सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वऱ्हाडी सावचित्त...सावधान!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विवाह सोहळ्यांचा सीझन सुरू झाला असून, शहरात सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे. याचा फायदा चोरटेही घेत असून, मागील काही दिवसांत चोरट्यांनी वऱ्हाडी मंडळींच्या दागदागिन्यांवर हात साफ केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, विवाहाच्या धूमधडाक्यात वऱ्हाडी मंडळींनी 'सावचित्त' राहून काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विवाह सोहळ्यासाठी लॉन्समध्ये आलेल्या कल्याण येथील महिलेची पर्स चोरट्यांनी लांबवल्याची घटना औरंगाबाद मार्गावरील नांदूरनाका भागात घडली. पर्समध्ये रोकडीसह सोन्याचांदीचे दागिने आणि मोबाइल असा ऐवज होता. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नलिनी प्रकाश मोराणकर (रा. कोळसेवाडी, कल्याण) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. बुधवारी (दि. २६) विवाह सोहळ्यासाठी त्या नांदूरनाका भागातील श्वेता लॉन्स येथे आल्या होत्या. विवाहाची गडबड सुरू असताना त्या अन्य महिलांसमवेत बसलेल्या असतांना अज्ञात चोरट्यांनी त्याची पर्स चोरून नेली. पर्स मध्ये रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे आणि मोबाईल असा सुमारे ७८ हजारांचा मुद्देमाल होता. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मुळे करीत आहेत. दरम्यान, विवाह सोहळ्यासाठी शहरात आलेल्या कल्याण येथील कुटुंबीयांची कारची काच फोडून चोरट्यांनी सुमारे ३८ हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह दागिने आणि कपड्यांचा समावेश आहे. ही घटना औरंगाबादरोडवरील मधुरम लॉन्स भागात घडली. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत संभाजी पाटील (रा. खडकपाडा, कल्याण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी (दि. २६) हा प्रकार घडला. दुपारी बारा वाजेच्या सुमारास मधुरम लॉन्स येथील पार्किंगमध्ये स्विफ्ट कार (एमएच ०५, एएस ५४०६) पार्क करून कुटुंबीय विवाह सोहळ्यात सहभागी झाले. चोरट्यांनी दरवाजाची काच फोडून कारमधील दोन बॅगा चोरून नेल्या. या बॅगांमध्ये रोकडीसह सोन्याचे दागिने आणि कपडे होते. अधिक तपास हवालदार माळी करीत आहेत. यापूर्वी गंगापूररोड परिसरातील लॉन्समध्येही चोरीचा प्रकार घडला होता. चोरट्याने परगावाहून आलेल्या महिलेकडील लाखो रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. अद्याप या गुन्ह्याचा तपास लागलेला नाही. या चोऱ्यांच्या घटनांचा तपास सुरू असून, वऱ्हाडी मंडळी तसेच वधू आणि वर पक्षासह लॉन्स मालकांनीदेखील याबाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगावच्या उपसरपंचपदी मोरे

0
0

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रुक्मिणी विश्वासराव मोरे यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपसरपंच संजय मोरे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्यानंतर नूतन उपसरपंच निवडीसाठी गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत सदस्य मंडळाची विशेष सभा बोलविण्यात आली होती. यावेळी उपसरपंच पदासाठी रुक्मिणी मोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड होत असल्याचे घोषित करण्यात आले. बैठकीस सरपंच अलका बनकर, मावळते उपसरपंच संजय मोरे आदींसह सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारवर्षीय उमाचे चित्र नासाच्या कॅलेंडरवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जगभरातील मुलामुलींमध्ये अंतराळ, विज्ञानाविषयी कुतूहल, जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी जागतिक अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) अंतराळ विषयावर आधारित चित्रे नासाच्या कमर्शियल कॅलेंडरसाठी मागावली होती. या कॅलेंडरमध्ये नाशिकचे रहिवासी अरुण खत्री यांची नात मूळ नाशिकची परंतु, सध्या अमेरिकेत राहणाऱ्या उमा भावे या चार वर्षीय मुलीचे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे. कॅलेंडरमध्ये जगभरातील ज्या मुलांची चित्रे प्रकाशित झाली आहेत, त्यामध्ये उमा सर्वात लहान आहे.

अंतराळात वास्तव्यास असणाऱ्या अंतराळवीरांचे आयुष्य, त्यांचे काम मुलांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने कॅलेंडरची निर्मिती करण्यात येते. नासाचे यंदाचे कॅलेंडर अवकाशातील जीवन या विषयावर आधारित आहे. यंदाही जगातील सर्व मुलामुलींकडून अंतराळ विषयावर नासाने चित्रे मागविली होती. भावी शास्त्रज्ञांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी आणि मुलांमध्ये सायन्स, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणितात रुची निर्माण व्हावी हादेखील त्यामागे उद्देश आहे. हजारो चित्रांतून निवडक चित्रे या कॅलेंडरमध्ये प्रकाशित करण्यात आली आहेत. बारा महिन्यांच्या बारा पानांवर अंतराळ विषयाची चित्रे असून, या सर्वांमध्ये उमा सर्वात लहान आहे. नासाने हे कॅलेंडर १८ डिसेंबरला प्रसिद्ध केले असून, मे २०१९ च्या पानावर उमाचे चित्र प्रकाशित केले आहे. 'ब्लास्ट ऑफ टू स्पेस' यावर हे चित्र आधारित असून, नासाच्या सर्व अंतराळ मोहिमांवर असलेल्या शोध मोहीम क्रूला ते पाठविले जाणार आहे. उमाची आई जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबईची पदवीधर असून अमेरिकेत डिझायनर आहे, तर वडील प्राध्यापक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदाधिकाऱ्यांची वाहनेही परतली!

0
0

मुंढेंचा नियम महापौरांना धुडकावला

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयांसह घालून दिलेले नियम मोडण्याचा सत्ताधाऱ्यांनी सपाटा सुरू केला आहे. महापालिकेत अधिकाऱ्यांकडून देवदेवतांची वापसी सुरू केल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी मुंढेंनी मुख्य प्रवेशद्वाराबाहेर वाहनांना लावलेला प्रतिबंध मोडला आहे. महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी आता मुख्य प्रवेशद्वाराबाहेर वाहने उभी करण्यास गुरुवारपासून सुरुवात केली.

तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावण्यासह पालिकेतील पार्किंगलाही शिस्त लावली होती. मुंढे येण्यापू्र्वी राजीव गांधी भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेता आणि विरोधी पक्षनेत्यासह अन् पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांची वाहने उभी केली जात होती. परंतु, मुंढेंनी शिस्तीचे कारण देत, तेथे महापौरासह सरसकट सर्वांच्या वाहनांचे पार्किंग बंद केले होते. या कोणाचेही वाहन थांबवू नका अशा सूचनाच त्यांनी सुरक्षा रक्षकांना दिल्या होत्या. पदाधिकाऱ्यांना हा अवमान सहन न झाल्याने महापौरांसह सर्वांनीच येथे वाहने लावणे बंद केले होते. त्यामुळे हा सगळा परिसर मोकळा झाला होता. मात्र, आता मुंढेंच्या बदलीनंतर महापालिकेतील त्यांनी घेतलेले सर्व नियम बदलण्यास सुरुवात झाली आहे. अधिकाऱ्यांनी मुंढेंच्या काळात देवदेवतांवर लादलेली बंदी झुगारल्यानंतर आता पदाधिकाऱ्यांनीही मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहने न लावण्याचा नियम धुडकावून लावला आहे. महापौर रंजना भानसी यांनी गुरूवारी प्रवेशद्वारावर वाहन पार्किंग करून मुंढेंनी लावलेला नियम तोडला. महापौरांचे वाहन बघून अन्य पदाधिकाऱ्यांनीही हळू हळू या ठिकाणी वाहने लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावर आता आयुक्तांसह पदाधिकाऱ्यांचीही वाहने उभी केली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पसंख्यांकांचा विसर

0
0

\B \B

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

\B'अल्पसंख्यांकांसाठी नाशिकमध्ये प्रशासनाच्या इच्छाशक्तीने चांगली कामे होत असावीत असा समज होता. पण राज्यभरातील २० जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर आता नाशिकमधील अल्पसंख्यांकांची स्थिती डोळ्याने बघितल्यावर हा भ्रम मोडीत निघाला आहे. नाशिकच्या अधिकारी वर्गाच्या अजेंड्यावर अल्पसंख्यांकच नसल्याचे धक्कादायक चित्र जिल्हा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे निर्माण झाले आहे. या गंभीर स्थितीचा तंतोतंत अहवाल मुख्यमंत्र्यांना अल्पसंख्यांक आयोग देईल', असे सांगत अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी प्रशासनाच्या अल्पसंख्यांकांच्या कामाबाबत खंत व्यक्त केली.

आयोगाच्या दौऱ्यांतर्गत अध्यक्ष शेख यांनी नाशिकला गुरुवारी भेट देऊन अल्पसंख्यांक समुदायांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत काही ठिकाणांना भेटी देऊन वस्तुस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या समुदायांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी यावेळी पत्रकारांशीही संवाद साधताना अल्पसंख्यांकांच्या कामांकडे आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीकडे अधिकारी वर्गानेच पाठ फिरविल्याचा आरोप केला.

शेख म्हणाले, 'अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी शासनातर्फे १५ कलमी कार्यक्रम राबविला जातो. या अंतर्गत या समुदायांच्या विकासाकरीता विविध योजना आहेत. पण या योजना कोणत्या, त्यांचे स्वरूप काय, लाभार्थी निकष कोणते, प्रक्रिया कशी किंवा संबंधित अधिकारी कोण याबाबत हे समुदाय पूर्णत: अनभिज्ञच असल्याचे ते म्हणाले. या चित्रासाठी प्रशासनाची उदासिनता कारणीभूत असल्याने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणाऱ्या अहवालात याचा आवर्जून उल्लेख करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाबाबत चुकीचा संदेश

धोरणांमध्ये अल्पसंख्यांक समुदायांसाठी योजना आखणे, निधी उपलब्ध करून देणे हे काम सरकारचे असले तरीही प्रत्यक्ष योजनेची अंमलबजावणी ही पूर्णपणे अधिकारी वर्गावर अवलंबून असते. येथे अंमलबजावणीमध्ये अधिकारी कमी पडतात. पण, अंतिमत: याचे खापर सरकारवर फुटते. अधिकाऱ्यांच्या या उदासिनतेमुळे शासनाबाबत समाजात चुकीचा संदेश जात असल्याचेही शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अधिकारीच काम करत नसतील तर स्थानिक अल्पसंख्यांकांना मूग गिळून गप्प बसू नये. त्यांनी समस्यांना वाचा फोडावी, अधिकाऱ्यांना धारेवर धरावे प्रसंगी अल्पसंख्यांक आयोग त्यांच्यावरील अन्याय निवारणासाठी सज्ज आहे. आयोगातर्फे रास्त कामांसाठी योग्य ते पाठबळ दिले जाईल, असे आश्वासन शेख यांनी यावेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपींच्या लायसन्सवर संक्रांत

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नव वर्ष स्वागतासाठी ओल्या पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्यांवर यंदा वाहतूक पोलिसांचे विशेष लक्ष राहणार असून, तपासणी दरम्यान वाहतूक पोलिसांच्या हाती लागणाऱ्या मद्यपी वाहनचालकांचे थेट वाहन परवाने निलंबित करण्यात येणार आहेत.

जीवघेण्या अपघातांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या पाच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यास वाहनचालकाचा परवाना जप्त करण्याची कारवाई काही दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. त्यात ड्रंक अॅण्ड ड्राइव्हचादेखील समावेश आहे. वाहतूक पोलिसांच्या मते शहरात सर्वाधिक अपघात रात्री ८ ते १२ यादरम्यान घडतात. यातील बहुतांश प्रकरणांमध्ये ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह सापडतात. त्यामुळे यंदा मद्यपी वाहनचालकांकडे विशेष लक्ष पुरविण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, मोबाइलवर बोलणे, सिग्नलचे उल्लंघन, चुकीच्या बाजूने, तसेच माल वाहतूक वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे अशा पाच नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनचालकाचा वाहन परवाना निलंबित करण्यात येतो. वाहन परवाना परत मिळविण्यासाठी वाहनचालकास एक प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. वाहन परवाना निलंबित करण्याचे काम प्रादेशिक परिवहन विभागामार्फत होते. वाहतूक पोलिस त्याबाबत प्रस्ताव सादर करतात.

यंदा २३३ परवाने निलंबित

यंदा, आरटीओने विविध कारणांमुळे २३३ वाहनचालकांचे परवाने निलंबित केले आहेत. यात ओव्हरलोड तसेच मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांची संख्या लक्षणीय होती. शहर पोलिसांनी या वर्षी जवळपास दीड हजार वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव दिले असून, जवळपास दीडशे वाहनचालकांचे परवाने निलंबित झाले आहेत. तीन महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित करण्यात येतो. आगामी नववर्षाचे स्वागत आणि गत वर्षाला निरोप देताना तरुणाईने उत्साह ठेवावा, मात्र, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यास थेट वाहन परवाने निलंबित करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या सायंकाळी कॉलेजरोड होणार ‘हॅप्पी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनांनी गजबजलेल्या रस्त्यावर मुक्त संचार करणे शहरवासियांना दुर्मिळच. परंतु, 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हॅप्पी स्ट्रीटच्या रुपाने रस्त्यावर मज्जा, धम्माल करण्याची संधी मिळाली आहे. ही संधी पुन्हा नाशिककरांसाठी उपलब्ध झाली असून उद्या, शनिवारी (२९ डिसेंबर) कॉलेजरोड 'हॅप्पी' होणार आहे. यानिमित्ताने, सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत कॉलेजरोडवर नाशिककर धमाल, मस्ती करणार करू शकणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्सचा 'हॅप्पी स्ट्रीट' हा उपक्रम नाशिककरांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. ज्या रस्त्यांवरून नेहमी जीव मुठीत धरून जावे लागते, त्याच रस्त्यांवर मनसोक्त बागडण्याची मजा वेगळीच असते. त्यामुळेच हॅप्पी स्ट्रीट या उपक्रमाला नाशिककरांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. आपल्या कलागुणांचे सादरीकरण या व्यासपीठावर केले आहे. हा आनंद पुन्हा एकदा उद्याच्या हॅप्पी स्ट्रीटद्वारे लुटता येणार आहे. २०१८ हे वर्ष संपत आले असून, सर्वांना नवीन वर्षाच्या स्वागताचे वेध लागले आहे. वर्षाचा शेवट हॅप्पी स्ट्रीट आनंददायी करणार आहे. रस्त्यावर रांगोळी काढण्याची, स्पोर्ट्स गेम खेळण्याची, गाणे ऐकण्याची, म्हणण्याची किंवा तुमचा छंद जोपासण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. याशिवाय, नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग, विविध स्पोर्ट गेम्स, म्युझिकल आणि इन्स्ट्रूमेंटल सादरीकरण, डान्स परफॉर्मन्स आदी उपक्रमांचाही आनंद लुटता येणार आहे. यंदा प्रथमच हा उपक्रम सायंकाळी होणार असून, वीकेंड व इयर एंड यामुळे स्पेशल होणार आहे. चला तर मग, हॅप्पी स्ट्रीटची ही धम्माल अनुभवण्यासाठी तुम्हीही सज्ज व्हा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वसंतस्मृती’मध्ये महाभारत!

0
0

दीड तास सभापती-सभागृहनेत्यांमध्ये रंगले आरोप-प्रत्यारोप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोडवरील सर्व्हे क्र. ७०५ च्या भूसंपादनापोटी दिलेल्या २१ कोटींच्या आर्थिक मोबदल्यावरून स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके आणि सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यातील वादाचा अंक भाजप कार्यालयात गुरुवारी पार पडला. दोघांमधील वादाने आणि एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांनी 'वसंतस्मृती' कार्यालय तब्बल तासभर दणाणून सुटले. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी आणि शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी मध्यस्ती करत वाद मिटवण्याचा प्रयोग केला. परंतु, सावजींच्या आरोपांने व्यथीत झालेल्या पाटील यांना या बैठकीत रडू कोसळल्याची चर्चा आहे. या प्रकरणाची चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त करून दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनाही समज दिल्याचे आ. सानप यांनी सांगितले.

स्थायी समितीच्या बुधवारच्या (दि. २६) बैठकीत २१ कोटींच्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्याच्या मागणीसाठी सभागृहनेता पाटील यांच्यासह भाजपच्या आठ सदस्यांनी स्थायीतच आंदोलन केले होते. सभापती विरुद्ध भाजप सदस्यांमध्ये सुरू असलेल्या वादाने पक्षाची बदनामी होत असल्याची उशिरा जाग आलेल्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सभापती, सभागृहनेते आणि सदस्यांना भाजप कार्यालयात पाचारण केले होते. लक्ष्मण सावजी, आ. सानप याच्यासह महापौर रंजना भानसी, गटनेता संभाजी मोरुस्कर यांच्यासह स्थायीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही बाजुंकडील युक्तीवाद सुरू असताना पाटील व आडके यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली.

'मला स्थायीत बोलू दिले जात नाही, मला बाहेरून आल्यावरून हिणवले जाते, वरिष्ठ असून खाली बसवले जाते' असे आरोप पाटील यांनी केले. तर सभापतींनी हे आरोप फेटाळत 'मी चुकीचे काय कामे केले', असा सवाल पदाधिकाऱ्यांना केला. 'मी आतापर्यंत कोणते चुकीचे काम केले, पक्षाची बदनामी कधी केली का', असा सवाल त्यांनी यावेळी केला. यावेळी सावजींनी दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, सावजी यांनी तुमच्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचे बोलताच पाटील यांना राग अनावर झाला. त्यामुळे या प्रकरणात सावजी विरूद्ध पाटील असाही संघर्ष रंगल्याची चर्चा आहे. महापौर आणि आ. सानप यांनीही पाटील यांची बाजू न घेता शांत बसण्याचे धोरण स्वीकाल्याने पाटील यांच्या प्रकोपाचा सामना दोघांना करावा लागला. 'दोघांना सर्व माहित असतांनाही, बोलत का नाही', असा सवाल त्यांनी भानसी आणि सानप यांना केल्याचे समजते.

चौकशीसाठी समिती

एकमेकांवरील आरोप आणि आदळआपट ही जवळपास दीड तास सुरू होती. बंद दाराआड सुरू असलेल्या या वादाने 'वसंतस्मृती' कार्यालयही प्रथमच दणाणून गेले. अखेरीस कसा बसा वाद मिटल्यानंतर यावर तोडगा काढण्यात आला. सभापती, सभागृह नेत्यासह सदस्यांना समज देत, २१ कोटींच्या चौकशीसाठी समिती गठीत करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच धनादेश थांबवण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांनी दिला.

अन् पाटलांना रडू कोसळले ?

वादावादी सुरू असतांना, सावजींनी पाटील यांच्यावर पक्षाची बदनामी केल्याचा ठपका ठेवला. सावजी देखील सभापतींची बाजू घेत आल्याने संतप्त पाटील यांनी सावजींनाही खडे बोल सुनावले. मला पक्षात एकटा पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझा वेळोवेळी अवमान केला जात असल्याचा आरोप केला. मला पक्षातून बाहेरून आल्यावरून हिणवले जात असल्याचे सांगत त्यांच्या भावना यावेळी अनावर होवून त्यांना अश्रूंचा बांध फुटल्याची चर्चा आहे. आपबीती सांगताना त्याना रडू कोसळल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापौरांनी यावेळी मध्यस्ती करत पाटील यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. 'मी नको असेल तर राजीनामा देतो' अशा इशारा पाटील यांनी यावेळी केल्याचे कळते. दरम्यान, यासंदर्भात पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची प्रतिक्रिया मात्र प्राप्त झाली नाही.

यापुढे सह्या नको!

महापालिकेत वादाच्या विषयांसोबत विकासाच्या विषयांना थेट विरोध केला जात असल्याचा मुद्दा बैठकीत चर्चिला गेला. स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत वादाच्या विषयांसह विकासकामांना थेट भाजपच्याच सदस्यांनी लेखी विरोध केला. यावरून या बैठकीत सावजी सदस्यांवर भडकले. पक्षाला न विचारताच परस्पर सह्या केल्याच कशा जातात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यापुढे कोणताही विषय असो शहराध्यक्षांनी सांगितले तरी, सह्या करू नका, असा दमच त्यांनी सदस्यांना भरल्याचे कळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेच्या आउटसोर्सिंगचा यू-टर्न

0
0

सफाई कर्मचारी घेण्याचा पुन्हा ठराव; भरतीच्या आशा पल्लवीत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रस्ते स्वच्छतेसाठी सातशे सफाई कर्मचाऱ्यांची रोजंदारी अथवा मानधनावर भरती करण्याचा ठराव महासभेने संमत केला असताना तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आउटसोर्सिंगने सफाई कर्मचारी भरतीची काढलेली निविदा आता सत्ताधाऱ्यांनीच रद्द ठरवली आहे.

विरोक्षी पक्षाच्या आक्रमकतेपुढे नमते घेत, सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाने ठरावाचा विपर्यास केल्याचे सांगत आउटसोर्सिंगने भरती करण्याचा कोणताही अधिकार दिला नव्हता, असा दावा केला आहे. आउटसोर्सिंगने सफाई कर्मचारी भरण्याचा प्रक्रिया रद्द करण्याचा तसेच मानधन किंवा रोजंदारीवर सफाई कर्मचारी भरती करण्याचा ठराव सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे महापालिकेत ७०० मानधनावर सफाई कर्मचाऱ्यांची भरती होण्याची शक्यता आहे.

शहराच्या वाढत्या विस्ताराच्या तुलनेत महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे. शहरासाठी पाच हजार सफाई कर्मचाऱ्यांची गरज असताना महापालिकेत जेमतेम १९९३ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. यातील अडीचशे सफाई कर्मचारी बिगारी म्हणून अन्य विभागात काम करीत असल्याने प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कामासाठी सुमारे १७५० कर्मचारी उपलब्ध आहेत. शहराचा वाढता विस्तार पाहता अधिकच्या सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधास अद्याप शासनाची मंजुरी मिळाली नसल्याने सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यात अडचणी आहेत. त्यामुळे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून ७०० सफाई कर्मचाऱ्यांची भरती करून रस्त्यांची स्वच्छता करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या महासभेत सादर केला होता. यावेळी आउटसोर्सिंगला सफाई कर्मचाऱ्यांचा विरोध असल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही आउटसोर्सिंगला विरोध दर्शवित सफाई कर्मचाऱ्यांची रोजंदारी अथवा मानधनावर भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या ठरावात सफाई कर्मचाऱ्यांची मानधनावर अथवा रोजंदारीवर भरती करण्याचे तसेच स्वच्छतेच्या कामाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना प्रदान केले होते. यातील शेवटच्या वाक्याचा आधार घेत मुंढे यांनी रस्ते स्वच्छतेसाठी ७०० सफाई कर्मचाऱ्यांच्या आउटसोर्सिंगच्या ठेक्याची निविदा २३ ऑक्टोबर २०१८ रोजी काढली. त्यामुळे महासभेने आउटसोर्सिंगने भरती करण्याचा निर्णय घेतला नसतांनाही, प्रशासनाने ही प्रक्रिया सुरू केल्याने विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते अजय बोरस्ते यांनी यावर आक्षेप घेत ही प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबली होती.

बदली होताच निविदा रद्द

मुंढे यांची बदली होताच गेल्या महासभेत यासंदर्भात बोरस्ते यांनी ठराव मांडत निविदा प्रक्रिया रद्द करत १४९१ या ठरावाच्या अंमलबजावणीची मागणी केली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीही त्यास संमती देत, प्रशासनाने ठरावाचा विपर्यास केल्याचे सांगत निविदा प्रक्रियाच रद्द केली आहे. तसेच रोजंदारीवर किंवा मानधनावर ७०० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्तीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा आदेश प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे सातशे सफाई कर्मचाऱ्यांची रोजंदारीवर किंवा मानधनावर भरती होण्याची शक्यता बळावली आहे.

प्रशासनाच्या कोर्टात चेंडू

आस्थापना खर्च वाढल्याचे सांगत मुंढे यांनी मानधनावर भरती करण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुंढेंनी मानधनाऐवजी आउटसोर्सिंगने भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. महापौरांच्या ठरावत स्वच्छतेच्या कामाबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याने त्यांनी ही प्रक्रिया राबवली. परंतु, विरोधकांमुळे हा प्रयत्नही फसला होता. आता पुन्हा ठराव क्र. १४९१ ची अंमलबजावणी करण्याचा ठराव सत्ताधाऱ्यांनी केला असून तो अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे पाठवला आहे. त्यामुळे याबाबतचा अभिप्राय नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांना देण्याचाही ठरावात उल्लेख केला आहे. त्यामुळे आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images