Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

येशूभक्तीत ख्रिस्ती बांधव लीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'जिंगल बेल... जिंगल बेल... जिंगल ऑल द वे..' गात ख्रिश्चन बांधवांनी नाताळ उत्साहात साजरा केला. आप्तेष्ट आणि नातेवाइकांना शुभेच्छा आणि भेटवस्तू देत हा सण बांधवांनी साजरा केला. मंगळवारी सकाळपासून नाताळचा उत्साह सर्व चर्चमध्ये दिसून आला. सर्वधर्मियांसह ख्रिस्ती बांधवांनी प्रभू येशूच्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गर्दी केल्याचे दिसले.

नाताळ निमित्त सोमवारी रात्री ९ वाजेपासून कॅरल सिंगिंग करण्यात आले. यावेळी एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना, प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती गायली गेली. शहरातील सर्व चर्चमध्ये सोमवारी रात्री सुरू झालेला नाताळाचा सोहळा मंगळवारी रात्री उशिरापर्यंत होता. मंगळवारी सकाळी ८ वाजता शहरातील सर्व चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जन्मानिमित्त मिस्सा करण्यात आली. दुपारी २ वाजेपर्यंत चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या. सकाळपासूनच ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये कँडल लावून प्रार्थना करीत होते. त्र्यंबक नाका परिसरातील होली क्रॉस चर्च, शरणपूर रोडवरील संत आंद्रिया चर्चसह शहरातील इतर भागातील चर्चमध्ये आकर्षक सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. फुगे, बेल्स, कँडल्स आणि दिव्यांनी चर्चचा परिसर उजळून निघाला. शहरातील सर्व चर्च आणि ख्रिस्ती बांधवांच्या घरी साकारण्यात आलेले प्रभू येशूजन्माचे देखावे लक्षवेधक ठरले. मंगळवारी संध्याकाळी सर्व चर्चमध्ये केकवाटप करत, नाताळनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी ख्रिस्ती बांधवांनी गर्दी केली. ख्रिसमसचा हा उत्साह नववर्षाच्या स्वागतापर्यंत राहणार असून, १ जानेवारीपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल चर्चमध्ये असणार आहे.

\Bकेकला मागणी \B

नाताळच्या दिवशी केकला अधिक मागणी होती. खास नाताळसाठी शहरातील केकशॉप्समध्ये प्लम केक तयार करण्यात आले. चॉकलेटने बनविलेल्या या प्लम केकसह चॉकलेट ट्रफल, चॉकलेट अल्मंड, ब्लॅक फॉरेस्टला ख्रिस्ती बांधवांनी पसंती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यापाऱ्याच्या घरी अडीच लाखांची चोरी

$
0
0

व्यापाऱ्याच्या घरी अडीच लाखांची चोरी

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड येथील एका व्यापाऱ्याच्या घरी चोरट्यांनी अडीच लाखांचा डल्ला मारला आहे. उपनगर पोलिस चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

विजय उत्तमचंद चोरडिया (६४, रा. दत्त मंदिररोड, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली. चोरडिया हे रविवारी (दि. २३) गुजरातमधील वापी येथे आपल्या बहिण्याच्या घरी कार्यक्रमानिमित्त परिवारासह गेले होते. तिकडून सोमवारी (दि. २४) रात्री आठ वाजता परतल्यावर घराच्या खिडकीचे गज वाकवलेले त्यांना दिसले. बेडरुममधील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याचे आढळले. वडिलोपार्जित दोन लाखांचे दागिने चोरट्यांनी लांबविले. त्यामध्ये पाच तोळ्यांच्या एक लाखांच्या सोन्याच्या बांगड्या व पाटल्या, दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, ३० हजारांचे १५ ग्रॅमचे झुमके, ३० हजाराच्या १५ ग्रॅमच्या सोन्याच्या तीन अंगठ्या तसेच पन्नास हजार रुपये रोख असा ऐवज चोरीस गेला आहे. उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेमाचे व्याकरण वेगळे; ते रुजवायला हवे!

$
0
0

दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिनेमा बघायला गेल्यावर आपला आयक्यू २५ टक्क्यांनी वाढलेला असतो, तोच आपण टीव्ही बघत असताना २५ टक्क्यांनी कमी झालेला असतो. आपण सिनेमातून सोशल मॅसेज द्या किंवा नका देऊ प्रेक्षकांना जो मॅसेज घ्यायचा तो ते घेतातच. त्यासाठी ते आपली वाट बघत नाही. सिनेमाचे व्याकरणच वेगळे आहे, ते रुजवायला हवे, असे प्रतिपादन ख्यातनाम पटकथा लेखक व '...आणि काशिनाथ घाणेकर' चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी केले.

आयाम नाशिक यांच्यावतीने देशपांडे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. 'महाराष्ट्र टाइम्स' या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर होते. शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात हा कार्यक्रम झाला. 'सिनेमे सोशल मॅसेजेस देतात का', या प्रश्नाचे उत्तर देताना देशपांडे म्हणाले, की तुम्ही त्या विषयाबरोबर जितके रहाल तितके तुम्ही त्याच्याशी समरस होत जातात. त्यामुळे मॅसेज जातोच. 'काशिनाथ घाणेकरांवर सिनेमा करावासा का वाटला', या प्रश्नाचे उत्तर देताना देशपांडे म्हणाले, की या विषयावर चित्रपट का काढू नये असे खरे तर वाटायला हवे. हा विषय चित्रपटाचाच आहे, त्यामुळे तो हेरला. ज्यांना काशिनाथ घाणेकर माहीत आहे, त्यांच्यासाठी व ज्यांना ते माहीत नाही त्यांच्यासाठीही हा सिनेमा आहे. कोण होता हा माणूस, दारू पिऊन परफॉर्मन्स करणारा, स्टेजवर जाऊन बायकांना चिमटे काढणारा, अवलियासारखे आयुष्य जगणारा हा माणूस लोकांसमोर आणण्यात मला रस होता. तो माणूस कलाकार म्हणून काय होता हे दाखवण्याबरोबरच त्याच्या कॅरेक्टरची लक्तरेदेखील मी काढली आहे. कॉलेजात असताना आई नेहमी म्हणायची, काशिनाथ घाणेकरसारखे वाया जाऊ नको. एका नाटकात जाऊन दुसऱ्या नाटकाचे डायलॉग म्हणत होता इतके तो व्यसन करायचा. तेव्हापासून हा माणूस माझ्या लक्षात होता. मला त्यावर काम करायचे होते, असे त्यांनी सांगितले.

'या सिनेमाविषयी रिसर्च काय होता', या प्रश्नाचे उत्तर देताना देशपांडे म्हणाले, की तो काळ उभा करणे खूप कठीण होते. कपडे, आर्किटेक्चर आणि भाषा हे उभे करताना अक्षरश: ताण आला होता; परंतु ते यशस्वी झाले.

संहितालेखिका कल्याणी पंडित यांनी मुलाखत घेतली. कार्यक्रमासाठी विनायक रानडे, मिलिंद कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.

आपल्याकडे लेखक उपेक्षित

'लेखकांविषयी काय मत आहे', या प्रश्नावर उत्तर देताना देशपांड म्हणाले, की आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कलाकार, साहित्य आहे पण आपल्याकडे लेखकाला योग्य मान मिळत नाही. हल्ली अनेक लेखक दिग्दर्शक होतात आणि हा धोकादायक ट्रेंड आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतून चांगले लेखक नाहीसे होत आहेत.

..

लोगो : मीडिया पार्टनर

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात १७ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीसमोर (एमपीए) झाला. डेन डेव्हिस (१७) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

अकरावीचे शिक्षण घेत असलेल्या डेनचा नाताळ सणाच्या दिवशीच अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. डेन हा नाशिककडून सातपूरच्या दिशेने मंगळवारी (दि.२५) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मोपेडवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. 'एमपीए'समोर अज्ञात भरधाव वाहनाने त्याच्या मोपेडला हुलकावणी दिली. यामुळे दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात डेन गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरीकांनी त्यास तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

दिंडोरी रोडवरील ग्लोबल पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज येथे डेन अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे समजते. नाताळनिमित्त कुटुंबीयांची धावपळ सुरू असतांना काही मित्रही त्याच्या सोबत होते. मित्रांना घरी बसवून तो दोन मिनिटात आलो, असे सांगून घराबाहेर पडला होता. यावेळी त्याने मित्राची दुचाकी नेल्याचे सांगण्यात येते. त्र्यंबकरोडवर मोठा अपघात झाल्याची माहिती मित्रांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता डेन जखमी अवस्थेत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हा सिद्धतेत तीन पटींनी वाढ

$
0
0

नाशिक : शहर पोलिस तसेच सरकारी पक्षाकडून होणाऱ्या प्रयत्नांमुळे सेशन तसेच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) यांच्या कोर्टात चालणाऱ्या खटल्यांमध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. गंभीर प्रकारच्या सेशन खटल्यांमध्ये मागील तीन वर्षांत जवळपास तीन पटींनी वाढ झाली असून, जेएमएफसी कोर्टातदेखील गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण गतवर्षाइतके ठेवण्यात यश मिळाले आहे.

सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वशांतीसाठी येशूकडे प्रार्थना

$
0
0

नाताळाचा उत्साह शिगेला; कार्यक्रमांनी गजबजले चर्च

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

ख्रिसमसनिमित्त शहरातील सर्व चर्चमध्ये मंगळवारी (दि. २५) जगात शांतता नांदावी, तसेच परस्परातील प्रेमभाव वृद्धिंगत व्हावा यासाठी ख्रिस्ती बांधवांतर्फे प्रार्थना करण्यात आली. नाताळासह नववर्षाच्या शुभेच्छांच्या वर्षावात प्रभू येशूचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

नाताळनिमित्त सोमवारी (दि. २४) रात्री ११.४५ मिनिटांनीच उत्सवाला प्रारंभ झाला. मध्यरात्री १२ वाजेनंतर येशूचा जन्मदिवस ख्रिस्ती बांधवांतर्फे साजरा करण्यात आला. सर्वच चर्चमध्ये शांती आणि प्रेम भावना एकमेकांमध्ये नांदण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे सांगत शुभेच्छा संदेश देण्यात आला. शहरात मेहरूण तलावाजवळ सेंट थॉमस चर्च, रामानंदनगर रस्त्यावर सेंट फ्रान्सिस डी. सेल्स चर्च तर पांडे डेअरी चौकात सेंट अलायन्स चर्च असे तीन चर्च आहेत. तिन्ही चर्चमध्ये नाताळ सणानिमित्त गेल्या दहा दिवसांपासून उत्साहाचे वातावरण आहे. चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई तसेच सजावट करण्यात आली आहे. प्रभू येशूच्या जन्मत्सोवाचे देखावे साकारण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळपासून ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. प्रत्येक जण एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देत होता. बच्चे कंपनीदेखील एकमेकांना शुभेच्छा देण्यासह भेटवस्तूंचे आदानप्रदान करीत होते.

‘ग्लोरिया नाईट’ रंगली
नाताळनिमित्त प्रत्येक चर्चमध्ये ख्रिसमस गितांची रंगत होती. ‘ग्लोरिया नाईट’ हा रंगतदार कार्यक्रमही सोमवारी मध्यरात्रीनंतर रंगला. यात प्रभू येशूंच्या जीवनावरील गीते सादर करण्यात आली. सर्व चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जन्माचा देखावा उभारण्यात आला आहे. हा देखावा पाहण्यासाठी ख्रिस्ती बांधवांसह इतर समाजबांधवदेखील चर्चमध्ये हजेरी लावत आहेत.

धुळ्यात प्रभू येशूंचा जन्मोत्सव उत्साहात
धुळे : शहरात मंगळवारी (दि. २५) नाताळच्या सणाच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती बांधवांकडून प्रभू येशूंचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर सर्वधर्म संघाच्यावतीने कॅथोलिक चर्चच्या परिसरात केक कापून परस्परांना भरवून नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. तसेच शहरातील देवपूर चर्च, मथोडिस्ट चर्च मध्ये विविध कार्यक्रम झालेत.

शहरातील राजवाडे संशोधन मंडळासमोर असलेल्या सेंट कॅथोलिक चर्च विश्वशांतीचा संदेश व शहरात शांतता राहावी यासाठी प्रभू येशूला प्रार्थना करून फादर विल्सन रॉड्रिक्स यांच्यासह मान्यवरांनी केक कापून नाताळ सण साजरा केला. या वेळी ख्रिस्ती बांधवांनासह सर्वधर्म संघाचे शेख गुरूजी, प्रा. डॉ नरेंद्र जाधव, श्रीपाद नांदेडकर, जोसेफ मलबारी, गोविंद साखला पस्थित होते. सर्वांनी माता मेरीच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती तेवत ठेवून प्रार्थना केली. यावेळी सांताक्लॉजने लहान मुलांना चॉकलेट देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांच्या व्यवहारात लाखोंचा गैरव्यवहार

$
0
0

धुळ्यात तत्कालीन आरटीओंसह आठ जणांविरुद्ध गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारच्या विविध आरोग्य योजनांची जनजागृती, प्रचार व प्रसार करण्यासाठी भाडेतत्त्वावर घ्याव्या लागणाऱ्या वाहनांच्या व्यवहारात संगनमताने लाखो रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला. या प्रकरणी तत्कालीन आरटीओ, जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा रुग्णालयाला वाहन पुरविणाऱ्या वाहन मालकांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा सोमवारी (दि. २४) रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.

शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांची जनजागृती व्हावी. त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून जिल्हा रुग्णालय भाडेतत्त्वावर वाहन घेते. याबाबत २००३ ते २०१५ या कालावधीत जिल्हा रुग्णालयाने भाडेतत्त्वावर वाहन घेतले होते. त्यासाठी देवराज ट्रॅव्हल्स, ओमशांती टूर्स अँड ट्रॅव्हल्स या दोघा एजन्सीने वाहन पुरविले होते. या वेळी जाहिरातीतील अटी-शर्तींचा भंग करून बेकायदेशीर व बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यासाठी तत्कालीन अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न करता याकडे दुर्लक्ष केले. तसेच संबंधिताना पेमेंट करून लाखोंचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. या सर्वांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते संजय रामेश्‍वर शर्मा यांच्या तक्रारीची दखल घेत करण्यात आलेल्या शहानिशेत ही तक्रार रास्त असल्याचे आढळून आले. परिणामी, मोहाडी पोलिसात त्यांची तक्रार नोंदवून घेत देवराज ट्रॅव्हल्सचे मालक भाऊसाहेब धनराज पाटील, ओम शांती टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक यांच्यासह तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी विकास पांडकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक एस. टी. माने, लेखापरीक्षक बी. आर. चौधरी, तत्कालीन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. गोवर्धन गायकवाड, जिल्हा रुग्णालयाचे अकाऊंट मॅनेजर उदय देशपांडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास मोहाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अभिषेक पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारंगखेड्यात घोडेविक्रीने कोट्यवधींची उलाढाल

$
0
0

चेतक फेस्टिव्हलला ५२९ घोड्यांची विक्री

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सारंगखेडा येथील अश्व बाजाराला चांगलीच गती आली असून, गेल्या तीन-चार दिवसांत जोरदार घोड्यांची विक्री झाली आहे. यात २२०० घोड्यांच्या आवकमधून सोमवारअखेर १०४ घोड्यांची व्रिकी झाली आहे. यामध्ये जवळपास ५० लाख ४ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली. तर मंगळवार (दि. २५) अखेर ५२९ घोड्यांची विक्री झाली असून, यातून १ कोटी ५५ लाख ९८ हजार ८०० रुपयांची उलाढाल झाली आहे. दरम्यान, आज (दि. २६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारंगखेड्यात भेट देणार असून, दोंडाईचा नगरपरिषदेच्या नवीन वास्तूचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील घोडेबाजाराला गेल्या दोन दिवसांपासून गती आली आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक किमतीचा पाच लाख ७१ हजार रुपयांचा ‘काळा कुमैद’ हा मारवाड जातीचा घोडा विकला गेला. या वर्षीचा सर्वाधिक किमतीचा हा घोडा येथील बाजारात दुसाणे (ता. साक्री) येथील रोहित दादाभाई भदाणे यांनी विक्रीसाठी आणला होता. तो बारामती येथील पृथ्वीराज श्रीनिवास घोलप यांनी खरेदी केला. अश्व बाजारासह सारंगखेडा यात्रेत विविध व्यावसायिकांनी दुकानी थाटल्या असून, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याने त्यांच्यात उत्साह दिसून येत आहे. सारंगखेडा यात्रेमुळे हजारो हातांना रोजगार उपलब्ध होत आहे. लहान मोठ्या व्यावसायिकांचा वार्षिक बजेट सारंगखेडा यात्रेवरच चालतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही सारंगखेडा यात्रेची उलाढाल कोट्यवधीमध्ये होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

सारंगखेड्यामध्ये आज मुख्यमंत्री येणार
चेतक फेस्टिव्हलला सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. आज (दि. २६) दुपारी ३ वाजता कळंबू रस्त्यावरील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचे आगमन होईल. यात बचतगट पाहणी, शस्त्र प्रदर्शन पाहणी, चित्र प्रदर्शन पाहणी, वेबिंग गॅलरी येथे आगमन होऊन तेथून ते अश्व खेळांचे निरीक्षण करतील. यानंतर खुल्या जीपने अश्व पाहणी व टेन्ट सिटीची पाहणी करतील. या वेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल, मंत्री म. न. येरावार, दोंडाईचा नगराध्यक्षा नयनकुवर रावल, नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नाईक, खासदार डॉ. हीना गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार अमरिश पटेल, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार के. सी. पाडवी, आमदार उदेसिंग पाडवी, चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, सरपंच सुशिलाबाई मोरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, विभागीय आयुक्त राजाराम माने, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी आदींसह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, पर्यटन विभागाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अडीच वर्षाच्या 'पद्मा'वर दीड कोटीची बोली

$
0
0

सारंगखेडा, नंदुरबार

सारंगखेड्यातील चेतक फेस्टिव्हलला सुरूवात झाली आहे. येथील घोडे बाजारात विक्रीसाठी तीन हजारांहून अधिक घोडे दाखल झाले आहेत. घोड्यांच्या खरेदीसाठी अश्वप्रेमींनीही मोठी गर्दी केली आहे. एका एका घोड्याची विक्री लाखो रूपयांना होतेय. या बाजारात 'पद्मा' घोडी ही सर्वांचं आकर्षण ठरली आहे. या घोडीवर आतापर्यंत दीड कोटींची बोली लागली आहे.

महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्यांची वंशज असलेल्या पद्माच्या सुरक्षिततेसाठी चार जण खडा पहारा देत आहेत. तिला थंडी वाजू नये यासाठी हिवाळ्यात हिटर तर उन्हाळ्यात एसी लावला जातो. ती रोज दहा लिटर दूध पिते आणि चना खातेय. ती दुसऱ्यांता या चेतक फेस्टिव्हलमध्ये दाखल झालीय. तीने आतापर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाबमधील स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. 'पद्मा'वर दीड कोटींची बोली लागली आहे. पण १० कोटी दिले तरी तिची विक्री करणार नाही, असं इंदूर येथील 'पद्मा'चे मालक लाडकाभाई यांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवक काँग्रेसची आज उत्तर महाराष्ट्र बैठक

$
0
0

युवक काँग्रेसची आज

उत्तर महाराष्ट्र बैठक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी आणि युवक काँग्रेसद्वारा आयोजित उपक्रमांच्या नियोजनार्थ प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत नाशिक येथील काँग्रेस-भवन येथे युवक काँग्रेसची गुरुवारी (२७) बैठक होणार असल्याची माहिती नाशिक जिल्ह्याचे प्रभारी प्रशांत ओगले व जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी दिली.

बैठकीला नाशिक, जळगाव, धुळे येथील युवक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य आणि विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष तांबे यांच्यासह महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रभारी प्रतिभा रघुवंशी, सहप्रभारी मनीष चौधरी स्वतः उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

वाढती बेरोजगारी, युवकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, रोजगार निर्मितीचे खोटे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकार विरोधात राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीने कन्याकुमारी ते काश्मीर अशी युवा क्रांती यात्रा आयोजित केली आहे. ही यात्रा ८ ते ११ जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातून जाणार आहे. यात्रेच्या नियोजनाचा आढावा सदर बैठकीत घेतला जाणार आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सुमारे २५ हजार गावांमध्ये चलो पंचायत अभियान राबविले जाणार आहे. या अंतर्गत राज्यभरातील पाच कोटी नागरिकांना भेटण्याचे उद्दिष्ट युवक काँग्रेसने ठेवले आहे.

अभियान अधिकाधिक नियोजन पूर्वक पार पाडले जावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे आग्रही आहेत. त्यासाठी विभागीय बैठका घेऊन नियोजन केले जात आहे. २०१९ च्या निवडणुकीत युवकांची भूमिका महत्त्वाची असेल. मोदी सरकारने निराश केलेल्या युवाशक्तीला धीर देऊन भक्कम बनविण्याची भूमिका युवक काँग्रेस निभावत आहे. विभागीय बैठकांच्या निमित्ताने युवक काँग्रेस २०१९ च्या निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या या बैठकीला महत्त्व असल्याचे प्रशांत ओगले व स्वप्नील पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडू फोटो

पोरांना नाचवत ठेवा, आम्ही पोहचतोच!

$
0
0

उशिराने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांनी वऱ्हाडी मंडळींची कोंडी

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

भुसावळहून नाशिककडे जाणाऱ्या गाड्या बुधवारी उशिरा धावत असल्याने दाट तिथी असलेल्या वऱ्हाडी मंडळींची बुधवारी पंचाईत झाली. सायंकाळच्या लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी लवकर तयारी करूनही वेळेत पोचणे शक्य नसल्याने 'पोरांना नाचवत ठेवा, अजून लग्न लावू नका, आम्ही पोहचतोच' असे सांगण्याची वेळ रेल्वे प्रवासात असलेल्या वऱ्हाडी मंडळींवर आली.

भुसावळ, जळगाव, चाळीसगाव येथून बुधवारी नाशिक शहरात सायंकाळच्या लग्नासाठी अनेकांना यायचे होते. काशी एक्स्प्रेस, साकेत एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस व कामयानी एक्स्प्रेस या नाशिकला सायंकाळपर्यंत पोहचण्यासाठी सोयीच्या गाड्या होत्या. सायंकाळच्या लग्नाला वेळेत पोहचू असा विवाहास उत्साहाने जाणाऱ्या मंडळींचा कयास होता; मात्र बुधवारी सर्वच रेल्वे एक्स्प्रेस तब्बल तीन ते पाच तास उशिरा धावत होत्या. रेल्वेने लग्नाचे गाव गाठण्याची धावपळ करणाऱ्या खान्देशातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मनमाडला दुपारी एक वाजता येणारी गोरखपूर मुंबई काशी एक्स्प्रेस मनमाड स्टेशनवर सायंकाळी पाचनंतर आली. दुपारी अडीच वाजेची पुष्पक पावणे पाच वाजता अवतरली. तर साकेत, कामयानी या सायंकाळपर्यंत नाशिक गाठणाऱ्या रेल्वे नाशिकला पोहचेपर्यंत रात्रीचे नऊ ते दहा उजाडणार, अशी बुधवारची स्थिती होती.

खासगी वाहन किंवा बसने जळगाव, भुसावळकडून नाशिकला येण्यास जास्त वेळ लागत असल्याने रेल्वे उशिराने धावत असली तरी प्रवाशांना दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे सोयीच्या असलेल्या काशी एक्स्प्रेसने लग्नासाठी निघालेल्या प्रवाशांनी लग्न मंडपी असलेल्या पाहुण्याला व निमंत्रकाला फोन करून आम्ही पोहचतो तोवर पोरांना नाचवत ठेवा, असा निरोप धाडून आपण लग्नाला पोहचत असल्याची वर्दी दिली. तर काहींनी आम्हाला घ्यायला नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळ या, अशी प्रेमळ गळ घातली. लग्नाचे मुहूर्त ठरवताना रेल्वेचे कोलंमडणारे वेळापत्रकही लक्षात घेऊन उशिराचे मुहूर्त ठेवायला हवे, अशी चर्चा काशी एक्स्प्रेसमध्ये रंगली.

गोरज मुहूर्ताचे लग्न, आग्रहाचे आमंत्रण म्हणून आम्ही रेल्वेने निघालो. काशी एक्स्प्रेस दुपारी दोन वाजेपर्यंत पोहचते. म्हणून तिकीट काढले तर जळगावला ही गाडी चार तास उशिराने आली. गोरज मुहूर्त झाला तरी आम्ही रेल्वेतच होतो, मग 'पोरांना नाचवा' असा लाडिक दम निमंत्रकाना दिला.

- मच्छिंद्र सहस्त्रबुद्धे, प्रवासी वऱ्हाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू ट्रॅक्टरखाली दबून मजुराचा मृत्यू

$
0
0

वाळू ट्रॅक्टरखाली दबून मजुराचा मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यात मूळडोंगरी येथे नदी किनाऱ्यावरील वाळूची अवैधरित्या वाहतूक करण्यासाठी जाणारा ट्रॅक्टर उलटून एक मजूर ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

मूळडोंगरी नदी किनाऱ्यावरील वाळू अवैधरित्या उपसा करण्याचे प्रकार सुरू आहे. वाळूउपसा करणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बुधवारी ट्रॅक्टर उलटला. या ट्रॅक्टरमधील चारपैकी तीन मजुरांसह चालकाने उडी मारली. त्यामुळे ते वाचले. मात्र, विष्णू दिवाण सोनवणे (वय १८) या मजुराचा ट्रॉलीखाली सापडल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान एकसाठी कांदा

$
0
0

आणखी दोनशे रुपयांचे

कांद्याला मिळणार अनुदान?

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

कांद्याच्या ढासळत्या किमतीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच प्रति क्विंटल दोनशे रुपयांचे अनुदान जाहीर केलेले आहे. आता केंद्र सरकारनेही कांदा उत्पादकांना दोनशे रुपये अनुदान देण्याची तयारी चालवली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी याबाबतचे आश्वासन

प्रहार संघटनेचे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांना दिले आहे. या आश्वासनानंतर कडू यांनी 'मुक्काम' आंदोलन मागे घेतले.

सरकारने कांद्याला ५०० रुपये अनुदान द्यावे तसेच पुणेगाव कालव्या संदर्भातील प्रलंबित मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी येथील प्रशासकीय इमारतीच्या पटांगणावर प्रहार संघटनेतर्फे मुक्काम आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या १४ पैकी १० मागण्या शासनाने मान्य केल्या असून, कांद्याला राज्य सरकार २०० व केंद्र सरकार २०० रुपये अनुदान देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री महाजन तसेच सहकार मंत्री देशमुख यांनी दूरध्वनीवरून दिल्याचा दावा कडू यांनी केला आहे. तसेच, पुणेगाव डावा कालव्यासंदर्भात प्रलंबित प्रापण सूचि १० जानेवारीपर्यंत प्रशासकीय मान्यतेची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता अलका आहेरराव यांनी दिले आहे, तर सन २०१६ साली शासनाने जाहीर केलेले प्रतिक्किंटल १०० रुपये अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, असे आश्वासन सहकार पणन विभागाच्या अवर सचिव सुनंदा घड्याळे यांनी दिल्याची माहितीही कडू यांनी दिली.

मुक्काम मागे... ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर अभियंता घुगे संकटात

$
0
0

उद्धव निमसेंकडून चौकशीची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे शहर अभियंता संजय घुगे यांना स्थायी समितीतील सदस्यांनी रडारवर घेतले असून स्वागत हाईट्स प्रकरणात घुगे यांच्यासह दोन अभियंत्यांना सहआरोपी करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. दुसरीकडे, स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य उद्धव निमसे यांनी घुगे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या सखोल चौकशीची मागणी केली. घुगेंवरील आरोप सिद्ध झाले नाही तर स्थायी समितीत येणार नाही, असे आव्हान त्यांनी प्रशासनाला यावेळी दिले.

शहरात तीन महिन्यांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या कामगारनगरमधील वादग्रस्त स्वागत हाईट्स इमारत प्रकरणात सातपूर पोलिसात फिर्याद दाखल झाली असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या इमारतीत संबंधित बिल्डरने मंजूर नकाशा व्यतिरिक्त बांधकाम केले असताना त्याकडे डोळेझाक करणे तसेच वाढीव बांधकाम काढण्यासाठी चालढकल केल्याप्रकरणी शहर अभियंता तथा तत्कालीन नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय घुगे यांच्यासह आर. व्ही. आहेर आणि एस. आर. खाडे या तिघांना सहआरोपी करण्याची परवानगी सहायक पोलिस आयुक्त शांताराम पाटील यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे. पोलिसांच्या चौकशीत मोठे घबाड हाती लागले असून या तिघांविरोधात गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी स्वागत हाईट्स प्रकरणाला वाचा फोडली होती तर, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, संतोष गायकवाड यांनी महासभेत यापूर्वी हा विषय उपस्थित करत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती.

विजय जाधव यांच्या फिर्यादीनुसार बिल्डर विनो पटेल, प्रेमजी पटेल व संजय पटेल यांच्याविरोधात गुन्हे दाखल असून या प्रकरणात सहआरोपी म्हणून घुगे यांच्यासह आर. व्ही. आहेर व एस. आर खाडे यांनाही सहभागी करण्यात आले आहे. चौकशीनंतर न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी पोलिसांनी आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे आयुक्त या पत्राला काय उत्तर देतात याकडे लक्ष लागलेले आहे. शहर अभियंत्यासारख्या पदावरील अधिकारी चौकशीत अडकल्याने आयुक्तांची कसोटी लागणार आहे.

घुगेंनी नाले गिळले

संजय घुगे यांनी शहरातील सर्व नाले गिळल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत उद्धव निमसे यांनी केला. नगररचना विभागात कार्यरत असतांना घुगे यांनी मंजुरी दिलेल्या सर्व फाईल्सची चौकशी करावी. ज्या ठिकाणी भूमिगत गटार योजना राबवली त्या ठिकाणचे सर्व नाले बिल्डरांसाठी बुजविल्याचा आरोप करत त्यात घुगेंसह, माजी अधिकारी सुनील खुने यांचाही सहभागी असल्याचा आरोप सभागृहात केला. आपल्याला निवडणुकीत पाडण्यासाठी घुगे यांनी प्रयत्न केला. घुगेंवरील आरोप सिद्ध झाले नाहीत तर स्थायी समितीच्या बैठकांना येणार नाही, असे आव्हान निमसे यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टॅबचे पैसे परत करणार

$
0
0

मटा इम्पॅक्ट

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीपूर्वी एका उमेदवाराने स्वतःच्या सेवाभावी संस्थेमार्फेत शिक्षक मतदारांसाठी ठरावीक रक्कम घेऊन टॅब बुकिंग योजना राबविली होती. मात्र, यात सहभागी काही शिक्षकांना अद्याप टॅब मिळाले नव्हते. याविषयी पीडित शिक्षकांच्या तक्रारींवरून 'मटा'त वृत्त प्रसिद्ध होताच ज्या शिक्षकांना टॅब मिळाले नसतील, त्यांचे पैसे परत करण्यास या उमेदवाराने सहमती दर्शवली आहे.

जून महिन्यात विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. यात महादेव साहेबराव चव्हाण हेदेखील उमेदवार होते. त्यांनी मुक्ताई बहुउद्देशिय संस्था या नाशिकमधील म्हसरुळस्थित त्यांच्या सेवाभावी संस्थेमार्फत विभागातील जिल्ह्यांत शिक्षकांसाठी अल्प किमतीची टॅब बुकिंग योजना राबविली होती. या योजनेला विभागातील शिक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. परंतु, या योजनेत पैसे भरलेल्या बहुतांश शिक्षकांना टॅब मिळाले नव्हते. या शिक्षकांनी उमेदवाराशी संपर्क साधला असता टॅब देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा अनुभव काही शिक्षकांना आला होता. याविषयीचे वृत्त 'मटा'तून बुधवारी प्रसिद्ध होताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती.

अध्यापनासाठी वापर नाहीच

टॅब बुकिंग योजनेत ज्या शिक्षकांनी सहभाग घेतला, त्यातील बहुतांश शिक्षकांना टॅबचे वितरण करण्यात आल्याचा दावा महादेव चव्हाण यांनी केला आहे. विविध कंपन्यांचा सीएसआर फंड मिळवून त्यातून ही योजना राबविली होती. मात्र, ज्या शिक्षकांना टॅब देण्यात आले होते, त्यापैकी कोणीही या टॅबचा वापर अध्यापनासाठी केला नसल्याचे या कंपन्यांनी केलेल्या पाहणीत उघड झाले होते. त्यामुळे उर्वरित टॅबसाठी या कंपन्यांकडून फंड मिळविण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा दावाही महादेव चव्हाण यांनी केला आहे. मुक्ताई बहुउद्देशिय संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी अल्प किमतीत स्वेटर्स, बॅग, बूट, सॉक्स अशा प्रकारचे साहित्यही पुरविले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मुक्ताई बहुउद्देशिय संस्थेतर्फे विविध सामाजिक कामे केली जातात. शिक्षकांसाठी टॅब देण्याचीही योजना राबविली होती. परंतु, शिक्षकांनी टॅबचा वापर अध्यापनासाठी केलाच नसल्याचे निधी दिलेल्या कंपन्यांना आढळून आले होते. या योजनेत कोणत्याही शिक्षकाची फसवणूक करण्याचा उद्देश नव्हता. ज्यांना टॅब मिळाले नसतील त्यांना पैसे परत केले जातील.

- महादेव चव्हाण, पराभूत उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाशा पटेल रविवारी नाशकात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कांद्याला भाव मिळत नसल्याने अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल रविवारी (दि. ३०) नाशिकमध्ये येणार आहेत. नाशिक बाजार समितीमध्ये ते कांदा उत्पादकांशी चर्चा करणार आहेत.

मातीमोल भावाने कांदा विकावा लागत असल्याने शेतकरी चिंतातूर आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे प्रकारही घडले आहेत. उत्पादन खर्चाएवढेही पैसे मिळत नसल्याने निफाडमधील एका शेतकऱ्याने पंतप्रधान कार्यालयास मनी ऑर्डर पाठवून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला. तर अलीकडेच एका शेतकऱ्याने कांदा बाजारपेठेत घेऊन जाण्याऐवजी जनावरांना खाऊ घातला. चांदवड येथील शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.२७) प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

गत आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंत्र्यांना कांदे फेकून मारण्याचा सल्ला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिला होता.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत नाशिकचा कांदा चर्चेत असल्याने पाशा पटेल हे देखील शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी नाशिकमध्ये येणार आहेत. ते नाशिकमध्ये २९ डिसेंबर रोजी सायंकाळी मुक्कामी येतील. रविवारी (दि. ३०) सकाळी १० वाजता ते नाशिक बाजार समितीला भेट देणार असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. पटेल यांनी कांद्याच्या दराबाबत यापूर्वीही केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतानाच कांद्याला भाव मिळावा, अनुदान वाढवून मिळावे यासाठी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून पटेल यांचा अभिप्राय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे पटेल यांच्या दौऱ्यामुळे शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव मनपा आयुक्तपदी बोर्डे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिका आयुक्तपदी किशोर बोर्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन आयुक्त संगीता धायगुडे ४ डिसेंबर रोजी बदली झाल्यानंतर तब्बल २१ दिवसांपासून हे पद रिक्त होते. अखेर पालिका नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या किशोर बोर्डे यांच्या नियुक्तीचे आदेश बुधवारी येथील प्रशासनास प्राप्त झाले आहेत. दरम्यान, नवनियुक्त आयुक्त बोर्डे यांच्याकडून देखील कर्तव्यकठोर कामाची अपेक्षा मालेगावकरांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली आहे.

पान ४

काही दिवसांपासून आयुक्तपद रिक्त असल्याने मालेगावच्या आयुक्तपदी कोण? याबाबत दोन ते तीन नावे चर्चेत होती. तत्कालीन आयुक्त धायगुडे यांच्या कर्तव्यकठोर भूमिकेमुळे अनेकवेळा लोकप्रतिनिधी व आयुक्त यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याने नव्याने नियुक्त होणारे आयुक्त मर्जीतील असावेत यासाठी देखील लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी शासनाने किशोर बोर्डे यांच्या नियुक्तीचे आदेश दिलेत. २६ नोव्हेंबर रोजी त्यांना नाशिक महापालिका अतिरिक्त आयुक्तपदावरून कार्यमुक्त करण्यात आले असून, मालेगाव येथे तत्काळ रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. बोर्डे हे याआधी सप्टेबर २०१५ ते एप्रिल २०१६ कालावधीत येथील महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत होते. आयुक्तपदी असताना संगीता धायगुडे यांनी पालिका प्रशासनाला लावलेली आर्थिक शिस्त, स्वच्छता, हागणदारीमुक्त शहर आदी विषयांवर घेतलेली आग्रही भूमिका यामुळे शहराचे नावलौकिक वाढले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामको निवडणुकीत ‘प्रगती’ची घोडदौड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीत दोन फेऱ्यांमध्ये प्रगती पॅनलने आघाडी घेतली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. त्यात दोन फेऱ्यांत बहुतांश जागांवर प्रगती पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते. दोन फेऱ्यांनंतर रात्री आठ वाजता मतमोजणी थांबविण्यात आली. आज, गुरुवारी सकाळी पुन्हा आठ वाजता तिसरी फेरी होणार आहे. दोन फेऱ्यांमध्ये ३६ हजार ५०० मतांची मोजणी झाली असून, तिसऱ्या फेरीत २६ हजार ५०० मतांजी मोजणी करण्यात येणार आहे. सिडकोतील संभाजी स्टेडियम येथे सुरू असलेल्या या मतमोजणीत कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सविस्तर प्लस...१

त्यामुळे सकाळपासून अतिशय शांततेने व संथ गतीने सुरू झालेल्या या मतमोजणीत दुपारपर्यंत अंदाज बांधणे अवघड झाले. त्यानंतर हळूहळू आकडे येऊ लागल्यानंतर आघाडीचा कलही पुढे आला. या निवडणुकीत प्रगतीच्या महिला राखीव व अनुसूचित जाती-जमातीच्या राखीव गटात प्रगतीच्या तिन्ही उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. या निवडणुकीची पद्धत अतिशय क्लिष्ट असल्यामुळे मतमोजणी संथ गतीने सुरू होती. पण, सहकारातील अधिकाऱ्यांनी अतिशय चोख नियोजन केल्यामुळे कोणताही गोंधळ येथे दिसत नव्हता.

साडेचार वर्षाच्या प्रशासकीय कारकीर्दीनंतर २३ डिसेंबर रोजी झालेल्या या निवडणुकीत १ लाख ७६ हजार २६२ मतदारांपैकी ६३ हजार ८३९ सभासदांनी मतदान केले. त्यामुळे या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी अवघी ३६.२१ राहिली आहे. त्यामुळे अनेकांचे अंदाज चुकवत निकाल पुढे आले आहेत. या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासनाने ५०० कर्मचारी नियुक्त केले आहेत.

अशी सुरू आहे मतमोजणी

नामकोच्या निवडणुकीसाठी १०४ टेबलांवर मतदान केंद्रनिहाय मोजणी सुरू आहे. या टेबलावर चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका मतदान केंद्रावर असलेल्या दोन मतपेट्यांतून मतमोजणी करण्यात येत आहे. पहिले सर्वसाधारण गटातील जम्बो मतपेटी फोडून त्याची जुळवाजुळव केल्यानंतर त्यातून पंचवीस मतपत्रिकांचे गठ्ठे बनवले जात आहेत. त्यानंतर राखीव गटाची मतमोजणी केली जात आहे.

मोजणीत क्लिष्टता

सर्वसाधारण गटाच्या १८ जागांसाठी ७० उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतपत्रिकेवर १८ पेक्षा जास्त मते दिली आहेत का, हे तपासून ती वैध ठरवली जात आहे. त्यानंतर कोणत्या उमेदवाराला मते दिली, हे एका चार्ट पेपरवर लिहून त्यानंतर त्याची एकूण मते काढली जात आहेत. राखीव गटालाही हीच पद्धत असली तरी यात महिला राखीव गटाच्या दोन जागांसाठी ७ उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती-जमातीच्या एका जागेसाठी ५उमेदवार असल्यामुळे येथील मतमोजणी सोपी होत आहे.

नाशिकची मतमोजणी पूर्ण

मतमोजणीत नाशिक शहरातील पहिल्या फेरीत १५९ मतदान केंद्रांपैकी १०४ मतदान केंद्रांची मतमोजणी झाली. त्यानंतर उर्वरीत ५५ मतकेंद्राची मोजणी दुसऱ्या फेरीत करण्यात आली. यामध्ये जवळपास २४ हजार मतांची मोजणी करण्यात आली. त्यात बहुतांश ठिकाणी प्रगती पॅनलनेच आघाडी घेतली.

मतमोजीत दिसला 'सहकार'

सहकार पॅनलला या निवडणुकीत आघाडी घेता आली नसली तरी मतमोजणीत मात्र दोन्ही पॅनलच्या उमेदवारांमध्ये सहकार दिसत होता. एकमेकांशी गप्पा मारत निवडणुकीचे अनुभव व आकडेमोड हे पॅनलचे उमेदवार शेअर करीत होते. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या उमेदवारांचा आपसातील सहकार येथे दिसत होता. निवडणुकीत सर्व पॅनलचे उमेदवार तर काहींच्या घरचे प्रतिनिधीही मतमोजणीसाठी उपस्थित होते. प्रगती पॅनलचे नेते सोहनलाल भंडारी, वसंत गिते, हेमंत धात्रक यांच्यासह सर्व उमेदवार सकाळपासून ठाण मांडून होते. सहकार पॅनलचे गजानान शेलार, भास्करराव कोठावदे, ललित मोदी, अजय ब्रह्मेचा यांनीसुद्धा हजेरी लावत आकडेमोड केली. नम्रता पॅनलचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

लॅपटॉपवर आकडेमोड

निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद मते, राखीव मते व सर्वसाधारण मते याची आकडेमोड करण्यासाठी स्वतंत्र तीन कॉम्प्युटर ठेवले होते. टेबलावर मतमोजणी झाल्यानंतर येथे हे आकडे भरले जात होते. पॅनलच्या उमेदवारांनी स्वतंत्र यंत्रणा तयार केली होती, ज्यात लॅपटॉपवर मतमोजणीचे मतदान एकत्र केले जात होते. पण, या दोन्ही यंत्रणांचे पहिल्या फेरीचे आकडे सायंकाळी ७ पर्यंत समोर आले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसील कार्यालयात ग्राहकांना मार्गदर्शन

$
0
0

तहसील कार्यालयात

ग्राहकांना मार्गदर्शन

मालेगाव : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने येथील तहसील कार्यालयात कार्यक्रम झाला. मालेगाव शहर ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष हरीष मारू यांनी ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार डॉ. धर्मेद मुल्हेकर तसेच नायब तहसीलदार जगदिश निकम यांच्यासह अन्न व औषध प्रशासन, कृषी, वजन मापे भूमी अभिलेख, एस. टी. महामंडळ, ग्राहक पंचायतीचे सदस्य, विविध विभागाचे खातेप्रमुख प्रतिनिधी नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images