Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मनपाच्या कारभाराबाबत याचिका

$
0
0

मिळकत वापराविरोधात

रतन लथ यांची याचिका

महापालिका आस्थापनांचा व्यावसायिक उपयोग

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या वास्तूंचा वापर अनधिकृतपणे होत असल्याचे महापालिकेच्याच मिळकत सर्वेक्षणातून समोर आले आहे. शहरातील अशा असंख्य मिळकतींचा वापर खासगी व्यक्तींकडून पैसे कमावण्यासाठी केला आहे. याविरोधात फ्रवशी अकॅडमीचे अध्यक्ष रतन लथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी गरजेनुसार ठिकठिकाणी सामाजिक सभागृहांची उभारणी केली आहे. परंतु, या वास्तूंचा वापर योग्य कारणांसाठी होत नाही. काही नगरसेवक, त्यांचे सहकारी किंवा कार्यकर्त्यांनी या मिळकतींवर कब्जा मिळविला आहे. काही सभागृहांचा सर्रासपणे व्यावसायिक कारणांसाठी वापर केला जात आहे, तर काही धूळखात अशा इमारती, भूखंड धूळ खात पडून आहेत. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पालिकेच्या या मिळकतींचे सर्वेक्षण केले होते. त्यात शहरात महापालिकेच्या मालकीच्या ९०३ मिळकती आढळून आल्या होत्या. अनेक मिळकतींचे करार संपले होते, तर अनेक मिळकती अनधिकृतपणे वापरल्या जात असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या मिळकती जप्त करण्याची मोहीमही सुरू केली होती. परंतु, त्यांची बदली झाल्यानंतर ही मोहीम थंडावली आहे. त्यामळे लथ यांनी उच्च न्यायालयात या मिळकतींच्या अवैध वापराविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकार, महापालिका आयुक्त, नगररचनाचे सहसंचालक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायालय काय दखल घेते आणि निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेडीरेकनरचा वाद

$
0
0

रेडीरेकनरचा वाद

रतन लथ यांनी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी या मिळकतींबाबत यापूर्वीही मुंबई उच्च न्यायालयासह औरंगाबाद खंडपीठात याचिका प्रलंबित आहेत. औरंगाबाद खंडपिठाने यासंदर्भात नियमावली तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महासभेने या मिळकतींबाबत नियमावली तयार करीत शासनाकडे पाठवली होती. परंतु, त्यास अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. दुसरीकडे या मिळकती रेडीरेकनर दराने द्याव्यात, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. परंतु, रेडीरेकनरने या मिळकती घेण्यास कुणीही तयार नाहीत. त्यामुळे या मिळकतींचा वाद प्रलंबित आहे. महापालिकेच्या मिळकती या नफा कमविण्यासाठी नसल्याचा युक्तीवाद लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायालयात सॅनिटरी नॅपकीन मशीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा न्यायालयामध्ये येणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग व डिस्पोजल मशीन बसविण्यात आले आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत सोमवारी या मशीनचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा न्यायालयात तीन, तर मालेगाव आणि निफाड न्यायालयात प्रत्येकी एक मशीन बसविण्यात आले आहे.

महिलांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग व डिस्पोजल मशिन आवश्यक होते. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना देताच त्यांनी त्यास मंजुरी देत निधी वर्ग केल्याचे शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी नगरसेवक आणि नाशिक बार असोसिएशनच्या पदाधिकारी अॅड. शामला दीक्षित, अॅड. जालिंदर ताडगे, अॅड. सोनल कदम, अॅड. वैष्णवी कोकणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांना दिलेतणावमुक्तीचे धडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

भारताचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस निमित्ताने मंगळवारी २५ डिसेंबर रोजी येथील महापालिका सभागृहात सुशासन दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त उपायुक्त नितीन कापडणीस यांनी कर्मचाऱ्यांसाठी तणावमुक्ती व्यवस्थापन संदर्भात कार्यशाळेचे आयोजन केले होते.

कापडणीस यांनी वाजपेयींच्या पंतप्रधानाच्या काळातील महत्त्वाच्या कामांबाबत व जीवनासंबधी माहिती दिली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजीत तणावमुक्ती व्यवस्थापन कार्यशाळेत डॉ. भिमराव त्रिभुवन यांनी मार्गदर्शन केले. सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, व्यसनांपासून दूर राहवे, असे त्यांनी सांगितले. उपायुक्त कापडणीस यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन कराताना विविध विषयाचे विस्तृत उदाहरणासह विवेचन केले. स्पर्धेच्या युगात विविध कारणांनी जवळपास प्रत्येकाला तणाव जाणवतो परंतु त्यांचे योग्य व्यवस्थापन केल्यास तुम्ही त्यावर मात करू शकता. अनिस अहमद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यशाळा प्रसंगी मुख्यलेखापरिक्षक विलास गोसावी, लेखाधिकारी कमरुद्दिन शेख, नगररचनाकार संजय जाधव, शहरअभियंता कैलास बच्छाव, उपअभियंता सचिन माळवाळ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर सटाण्यात बलात्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरातील चावडी चौकाजवळील राम मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या भूखंडावर एका नरधामाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने शहरात खळबळ उडाली. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने सटाणा पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी ऋषीकेश शरद सूर्यवंशी (वय २१) या युवकाय अटक केली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, पीडित मुलगी सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास किराणा घेण्यासाठी दुकानात गेली असता ऋषीकेशने अंधाराचा फायदा घेत तिला चाकूचा धाक दाखवला. चापटीने मारहाण करीत आरडाओरड केल्यास मारून टाकेल, असा दम देत मंदिराच्या मागे नेले. त्याच ठिकाणी तिचे तोंड दाबून अंगावरील कपडे फाडून बलात्कार केला. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी पोस्को कायदासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, दुपारी अपर पोलिस अधीक्षक निलोत्पाल, सटाणा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोनाली कदम यांनी घटनास्थळी पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडून मजुराचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,चांदवड

चांदवड तालुक्यातील पाटे येथील शांताराम काशिनाथ ठोके या शेतकऱ्यांच्या गट नंबर ५२ मधील शेतात विहिरीचे खोदकाम सुरू असताना विजेश सुरेश लांजेवार (वय ३२, गोंदिया) या मजुराचा तोल गेल्याने तो विहिरीत दगडावर पडला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी (दि. २५) रोजी सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. मच्छिंद्र रामचंद्र कासव यांनी चांदवड पोलिसात माहिती दिली. पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटोळेत श्रमसंस्कार शिबिर

$
0
0

पाटोळेत श्रमसंस्कार शिबिर

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

पाटोळे येथे सिन्नर महाविद्यालयाने 'रासेयो' अंतर्गत श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष माणिकराव बोरस्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी. शिंदे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर मविप्रचे संचालक हेमंत वाजे, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, सरपंच मेघराज आव्हाड, ज्ञानेश्वर खताळे उपस्थित होते. अहवाल वाचन मुख्य कार्यक्रम अधिकारी सुनील कर्डक यांनी केले. ग्रामस्थांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. प्रा. आर. व्ही. पवार, शिवाजी सदगीर, रामहरी खताळे, शिवाजी खताळे, सुनील सांगळे, राजेंद्र खताळे उपस्थित होते.

शिबिरात आरोग्य तपासणीही करण्यात आली. डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र आडगाव येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकातर्फे १०५ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयव दाते कमी, घेणारे मात्र जास्त!

$
0
0

मटा विशेष

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : अवयवदानाबाबत आजही मोठी उदासीनता असून, देण्यापेक्षा घेण्याला प्राधान्य दिले जात आहे. या वर्षात नाशिकमधून दोन वेळा अवयदानाची प्रक्रिया पार पडली. गतवर्षी हे प्रमाण तीन आणि २०१६ मध्ये पाच इतके होते. याउलट या वर्षी १५ पेशंटना मात्र इतर ठिकाणांहून आलेल्या अवयवांचा वापर करण्यात आला. गतवर्षी हे प्रमाण सात, तर २०१६ मध्ये ते २२ इतके होते.

पुणे येथे असलेल्या झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटीमध्ये (झेडटीसीसी) नाशिकचा समावेश होतो. या कमिटीच्या समन्वयक म्हणून आरती गोखले काम पाहतात. गोखले यांनी दिलेल्या माहितीनुसार अवयवदानाबाबत नाशिक जिल्ह्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. कमिटीअंतर्गत येणाऱ्या नाशिकचे प्रमाण कमी असताना पुणे झेडटीसीसी अवयवदानाबाबत राज्यात सर्वात पुढे आहे. अवयवदान ही संकल्पना सर्वसामान्यांत रुजावी यासाठी प्रयत्न केले जातात. हॉस्पिटल्समार्फतही जनजागृती केली जाते. मात्र, यात सर्वसामान्यांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे गोखले यांनी स्पष्ट केले.

एखाद्या व्यक्तीस ब्रेनडेड घोषीत केल्यानंतर त्या व्यक्तीचे अवयव मरणाच्या दारात पोहचलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या उपयोगी पडतात. अगदीच गरजेच्या वेळी पोलिसांची मदत घेऊन एका ठिकाणावरील अवयव दुसऱ्या ठिकाणी पोहच केले जातात. यासाठी बऱ्याचदा अॅम्ब्युलन्सची मदत घेतली जाते, तर क्वचित हवाई मार्गाचा वापर केला जातो. २०१८ मध्ये शहर पोलिसांनी अशा प्रकारे आठवेळा ग्रीन कॉरिडॉर करून कमीत कमी वेळेत अवयव घेऊन जाण्यास मदत केली.

जागृती सुरू, कृती अद्याप कमी

याच वर्षी मार्च महिन्यात शहरामध्ये एक आगळावेगळा विवाह पार पडला होता. विवाहासाठी आलेल्या ७०० वऱ्हाडींनी अवयवदानासाठी नोंदणी केली. आरोग्य विज्ञान विद्यापीठानेसुद्धा सप्टेंबर महिन्यात याबाबत जनजागृती मोहीम राबविली होती. अवयवदानाच्या जनजागृतीसाठी गत महिन्यात सुनील देशपांडे यांनी तब्बल नाशिक ते आनंदवन असा अकराशे किलोमीटरचा पायी प्रवास केला. जनजागृतीबाबत वेगवेगळे घटक काम करीत असले तरी अवयवदानाबाबत पुढे येणाऱ्यांची संख्या तुलनेत खूप कमी असल्याची खंत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. याबाबत ऋषिकेश हॉस्पिटलचे डॉ. भाऊसाहेब मोरे म्हणाले की, अवयवदानासाठी नागरिक पुढे येत आहेत. काही काळानंतर नाशिकमध्ये अवयवदानाचे प्रमाण राज्यात सर्वाधिक असेल. अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी मृत्यूंजय ऑर्गन फाउंडेशन सुरू करण्यात आली असून, याद्वारे नागरिकांना जोडण्याचे काम केले जाते, असे मोरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांना आवाहन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

राज्य सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेले २०० रुपयांचे अनुदान मिळविण्यासाठी बाजार समित्यांकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अर्ज मागायची कार्यवाही सुरू झाली आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या काळात कांदा लिलावात आणलेल्या शेतकऱ्यांनी तीन जानेवारी २०१९ पर्यंत अर्ज करावे, असे या आवाहन करण्यात आले आहे. ज्या नावाने ७-१२ आहे त्याच नावाने कांदाविक्री केल्याची हिशेब पावती, ७-१२ उताऱ्यावर कांदा पीक लागवडीची नोंद, बँक पासबूक, झेरॉक्स, आधारकार्ड अशी कागदपत्रे छायांकित केलेल्या प्रति बाजार समितीकडे जमा करायच्या आहेत. यासाठी लागणारे अर्ज लासलगाव सह उपबाजार विंचूर, निफाड येथे उपलब्ध करून दिले आहे. या शिवाय http:/bit.ly/2Rh0Gng या लिंकवरून डाऊनलोड करून ते भरून ज्या बाजार समिती आवारात कांदा लिलाव केले त्याच बाजार समिती, उपबाजार येथे जमा करायचे आहेत. तीन जानेवारीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लाभ कसा मिळणार?

कांदा अनुदानासाठी अर्ज करायला अवघ्या आठ दिवसांची मुदत आहे. शिवाय काही उत्पादकांचा कांदा हा भाडे तत्वाने ठरविलेला ट्रॅक्टर अथवा पिकअप व्हॅन यांनी लिलाव केल्याने हिशेब पावती त्यांच्या नावावर झाली आहे. अनुदानासाठी सात बारा उतारा आणि हिशेब पावती ही एकच व्यक्तीचे नावे असेल तरच अनुदानास पात्र असणार आहे. त्यामुळे या अटीमुळे अनेकांना या अनुदानाचा लाभ मिळू शकणार नाही; शिवाय हे अनुदान फक्त उन्हाळ कांद्याला की या दरम्यान लिलाव झालेल्या लाल कांद्यालाही हादेखील संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुस्तीपटूंचा सत्कार

$
0
0

नाशिक : जालना येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिक ग्रामीण पोलिस दलातील पहिलवान विजय सुरुडे यांनी ७४ किलो वजनगटात, तर सागर बोराडे यांनी ६१ किलो वजनगटात कांस्यपदके पटकावून ग्रामीण पोलिस दलाची मान उंचावली. या दोघांच्या यशाबद्दल अधीक्षक संजय दराडे, अप्पर अधीक्षक नीलोत्पल, उपअधीक्षक सुरेश जाधव, राखीव निरीक्षक अशोक रत्नपारखी, उपनिरीक्षक साहेबराव जाधव, क्रीडा पोलिस प्रशिक्षक समाधान गवळी आदींनी गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा ५ पासून

$
0
0

नाशिकमध्ये ३६ केंद्रांवर आसन व्यवस्था

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

\Bशासकीय कॉम्युटर टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा येत्या ५ ते २३ जानेवारीदरम्यान राज्यातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे या परीक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे. राज्यातील ३१२ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या नियोजनासाठी यंत्रणेस परिषदेच्या वतीने सूचना देण्यात आल्या आहेत.

परीक्षा परिषदेकडून टायपिंग परीक्षा दरवर्षी घेण्यात येते. राज्यातील शासनमान्यताप्राप्त संगणक टायपिंग संस्थांमधील नियमित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून १ लाख ९३ हजार विद्यार्थी ही ऑनलाइन परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येईल. यामध्ये नाशिक विभागात ३६ केंद्रांवर परीक्षा पार पडेल. तर पुणे विभागात ४२, मुंबई विभागात ४०, कोल्हापूरमध्ये ५४ याप्रमाणे केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान, ५ ते ११ जानेवारी दरम्यान इंग्रजी विषयाच्या टायपिंगसाठी ३० व ४० शब्द प्रतिमिनिटाची परीक्षा होणार आहे. तसेच १८ ते २३ जानेवारी दरम्यान मराठी व हिंदी विषयाच्या टायपिंगसाठी ३० व ४० शब्द प्रति मिनिटाची परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रत्येक विषयाच्या परीक्षेसाठी दीड तासाचा कालावधी देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या बॅचनिहाय परीक्षा होणार आहेत. सकाळच्या सत्रात सकाळी ९ ते १०.३०, सकाळी ११ ते १२.३०, दुपारी १ ते २.३०, दुपारी ३ ते ४.३०, ५ ते ६.३० या वेळेत बॅचनिहाय परीक्षा पार पडणार आहे.

वेळापत्रक वेबसाइटवर

परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. परिषदेच्या वेबसाइटवर त्यांच्या लॉगिनमध्ये वेळापत्रकाचा तपशील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संस्थांनी त्यांच्या प्रिंट काढून सही व शिक्‍क्‍यांसह विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र वितरित करावीत, अशा सूचना परीक्षा परिषदेकडून संस्थांना देण्यात आल्या आहेत.

लोगो : शाळा/ कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपयश जबाबदारी सर्वांची

$
0
0

सर्वाधिक शेअर झालेली बातमी:

अपयशाची जबाबदारी पक्षाध्यक्षांचीच: गडकरी

'आमदार आणि खासदारांच्या सुमार कामगिरीची जबाबदारी ही पक्षाध्यक्षांचीच असते', असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवा 'बॉम्बगोळा' टाकला आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉडेलरोड दृष्टिपथात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबक रोडवरील पिनॅकल मॉलपासून स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावापर्यंतचा रस्ता 'मॉडेल रोड' म्हणून विकसित करण्यात येणार आहे. सुमारे पाच कोटी रुपये खर्च असलेल्या या रस्त्यावर अडथळाविरहीत पादचारी मार्गांसह सायकल ट्रॅकचीही सुविधा असणार आहे. यासह विविध विकासकामांची निविदा प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

महापालिकेने शहरातील काही प्रभागांमध्ये रस्त्यांसह, क्रीडांगण विकास आणि अभ्यासिकेसारखी विकासकामे मार्गी लावण्याकरीता कार्यवाही सुरू केली आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे २७ कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून अनुभवी कंत्राटदारांकडून ऑनलाइन पद्धतीने निविदा मागविण्यात आल्या आहेत. आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. फेब्रुवारी-मार्चनंतर केव्हाही लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून त्यामुळे विकासकामे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकण्याची चिंता व्यक्त होऊ लागली आहे. यामुळेच विकासकामे तातडीने सुरू करून ती मार्गी लागावीत, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींचा आटापीटा सुरू आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा काही विकासकामांची निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ११ मधील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात सुमारे १५ कोटी २० लाख रुपयांची रस्ते अस्तरीकरणाची कामे केली जाणार आहेत. अवजड वाहतुकीमुळे दुरवस्था झालेल्या या रस्त्यांचे रुपडे पालटण्यास त्यामुळे मदत होणार आहे. त्र्यंबकनाक्यावरील पिनॅकल मॉलपासून स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावापर्यंत मॉडेल रोड विकसित करण्यात येणार आहे. चार कोटी ९१ लाख ९५ हजार रुये खर्च असलेल्या या रोडवर अडथळाविरहीत पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅक हे विशेष आकर्षण ठरणार आहे. नवीन नाशिक परिसरातील प्रभाग क्र. २७ मध्ये महापालिकेच्या खुल्या जागेत फर्निचरसह अभ्यासिका बांधण्यात येणार आहे. या कामावर सुमारे ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. २६ कोटी ९६ लाख ७८ हजार रूपयांच्या या कामांसाठी ३१ डिसेंबर ते २३ जानेवारी २०१९ या कालावधीत निविदा मागविण्यात आल्या आहेत. २४ जानेवारीला दुपारी तीन नंतर या निविदा कार्यकारी अभियंत्यांसमोर उघडण्यात येणार आहेत.

नाशिकरोडला साडेसहा कोटींची कामे

नाशिकरोड विभागात विहीतगाव प्रभाग क्र. १२ तसेच चेहडी प्रभाग क्र. १९ मध्ये क्रीडांगण विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी अनुक्रमे तीन कोटी चार लाख रुपये व एक कोटी सात लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. विभागातील विविध कच्च्या रस्त्यांच्या खडीकरणावर सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हा सिद्धतेमध्ये तीन पटीने वाढ

$
0
0

सेशन कोर्टातील प्रमाण नऊवरून २९ टक्क्यांपर्यंत वाढले

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस तसेच सरकारी पक्षाकडून होणाऱ्या प्रयत्नांमुळे सेशन तसेच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) यांच्या कोर्टात चालणाऱ्या खटल्यांमध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. गंभीर प्रकारच्या सेशन खटल्यांमध्ये मागील तीन वर्षात जवळपास तीन पटीने वाढ झाली असून, जेएमएफसी कोर्टात देखील गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण गत वर्षाइतके ठेवण्यात यश मिळाले आहे.

'जेएमएफसी' कोर्टात २०१६ मध्ये तब्बल एक हजार १२८ खटले निकाली निघालेत. चोरी, दुखापत, किरकोळ हाणामारी अशा साधारणतः तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असलेल्या खटल्यांचा यात समावेश असतो. या कोर्टांत २०१६ मध्ये एक हजार १२८ पैकी ४५३ खटल्यांमध्ये गुन्हे सिद्ध झाले होते. तर, ६७५ खटले निर्दोष सुटले होते. गुन्हा सिद्ध होण्याचे सरासरी प्रमाण ४०.१६ इतके राहिले. २०१५ मध्ये हेच प्रमाण २५.३१ इतके होते. २०१७ मध्ये सप्टेंबरपर्यंत गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण थेट ५१.५२ टक्क्यांवर पोहचले आहे. २०१४ च्या ३१. १ टक्क्यांचा विचार करता तीन वर्षात गुन्हा सिद्ध होण्याच्या प्रमाणात समाधानकारक वाढ झालेली दिसते. २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यांपर्यंत हे प्रमाण ५१.६६ टक्के इतके आहे. दरम्यान, खून, आत्महत्येस प्रवृत्त करणे, अपहरण अशा ७ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होऊ शकतात, अशा गुन्ह्यांची सुनावणी सेशन कोर्टात होते. २०१६ मध्ये अशा प्रकाराच्या १५३ खटल्यांची सुनावणी पूर्ण झाली. त्यातील ३३ खटल्यांमधील आरोपींना शिक्षा ठोठवण्यात आली तर १२० गुन्ह्यात पुराव्या अभावी निर्दोष सुटका झाली. तरीही गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण प्रथमच २१.५७ इतके झाले. २०१५ मध्ये १५.५८ टक्के आणि २०१४ मध्ये गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण अवघे ९.४० टक्के इतके होते. नोव्हेंबर २०१८ पर्यंत या खटल्यातील २९.६८ टक्के गुन्हे सिद्ध करण्यात पोलिसांना यश मिळाले.

प्रशिक्षणाने दिसला फरक

याबाबत पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले, की गुन्हा शोधून काढणे, त्यादृष्टीने पुरावे सकंलित करणे आणि कोर्टात आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी पुराव्यांची मांडणी करणे ही मोठी प्रक्रिया असून, तसे प्रशिक्षण वेळोवेळी पोलिस अधिकाऱ्यांना वा कर्मचाऱ्यांना देण्यात येत असते. पैरवी अधिकारी तसेच कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे असून, फॉरेन्सिक लॅब, फॉरेन्सिक व्हॅन यांचा प्रत्येक घटनेत खुबीने वापर केला जातो आहे. सरकारी पक्षाच्या वकिलांसोबत सतत संवाद सुरू असतो. त्याचा हा परिणाम आहे.

गुन्ह्यांची सिद्धता (टक्केवारीमध्ये)

वर्ष...सत्र न्यायालय...जेएमएफसी

२०१४...९.४...३२.१

२०१५...१५.५८...२५.३१

२०१६...२१.५७...३३.२६

२०१७...२५.९३...५१.५२

२०१८...२९.६८...…५१.६६

..

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांनी साधला गणेश दर्शनाचा योग

$
0
0

\Bअंगारकी चतुर्थीनिमित्त विविध उपक्रम \B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरत्या वर्षातील अखेरच्या अंगारकी चतुर्थीच्या औचित्यावर भावकांनी शहरातील गणेश मंदिरांमध्ये श्रींच्या दर्शनाचा योग साधला. अंगारक चतुर्थीनिमित्त विविध गणेश मंडळे आणि मंदिर व्यवस्थापनांच्या वतीने धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले. अंगारक योगावर चतुर्थीचे व्रत नव्याने धारण करू इच्छिणाऱ्यांनी व्रताचा संकल्प सोडला. शहर आणि उपनगरांमधील गणेश मंदिरे भाविकांच्या गर्दीने मंगळवारी गजबजून गेली.

नाताळनिमित्त मंगळवारी शासकीय सुट्टी आल्याने सायंकाळनंतर शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. परिणामी गणेश मंदिरातही सुटीमुळे गर्दी वाढल्याचे दिसून आले. पंचवटीतील तीळा गणेश, अशोक स्तंभावरील ढोल्या गणपती, रविवार कारंजावरील चांदीचा गणपती, गोदेकाठचे मदन गणेश मंदिर, गंगापूर रोडवरील नवश्या गणपती मंदिर या मंदिरांसह उपनगरांमधील गणेश मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सरत्या वर्षातील तिसरा योग

सरत्या वर्षात तीनवेळा अंगारक चतुर्थीचा योग आला. वर्षाच्या सुरुवातीस ३ एप्रिल रोजी त्यानंतर थेट ३१ जुलै रोजी आणि जुलैनंतर पाच महिन्यांनी म्हणजे मंगळवारी (दि. २५) अंगारक योग आला होता. शहरात मंगळवारी सकाळी ९ वाजेदरम्यान चंद्रोदय असल्याने या वेळेत श्रींना मोदकांचा नैवेद्य दाखवून व चंद्रपूजन करून भाविकांनी उपवासाचे व्रत पूर्ण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट रोडसाठी ३१ मार्चची डेडलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेल्या नाशिक शहरात अशोकस्तंभ ते सीबीएस या स्मार्ट रोडचे काम प्रगतीपथावर असून महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी या कामाची पाहणी केली. स्मार्टरोडचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा, अशा सूचना संबंधित यंत्रणेला करण्यात आल्या आहेत.

नाशिकचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला असून, शहराला स्मार्ट लूक देण्यासाठी विविध प्रकारची विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. अशोकस्तंभ ते सीबीएस आणि सीबीएस ते त्र्यंबक नाका या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत प्राधान्याने सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागतो आहे. महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या गमे यांनी मंगळवारी स्मार्ट रोडसह विविध विकास कामांची पाहणी केली. सकाळी साडे अकराच्या सुमारास ते यंत्रणेसह अशोकस्तंभ ते मेहेर सिग्नल या रस्त्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले. या मार्गाचे काम जूनपर्यंत पूर्ण करण्याचा यंत्रणेचा प्रयत्न आहे. परंतु या परिसरातील वर्दळ आणि नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीचा विचार करता हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. या स्मार्ट रोडचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी ३१ मार्चची डेडलाइनही निर्धारीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गमे यांनी कालिदास कलामंदीर, महात्मा फुले कलादालन, नेहरू उद्यानाला देखील भेट दिली. बी. डी. भालेकर मैदानावर सुरू असलेल्या वाहनतळाच्या कामाचीदेखील त्यांनी माहिती घेतली. अमरधाममधील विद्युत दाहिनी, शहरात सुरू करण्यात आलेल्या सायकल शेअरिंग प्रकल्पाची देखील आयुक्तांनी पाहणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंदवलीमध्ये पादुकांची मिरवणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिककरांचे आराध्य दैवत असलेल्या गंगापूर रोडवरील नवश्या गणपती मंदिर ट्रस्टतर्फे आनंदवली गावातील हनुमान मंदिरापासून नवश्या गणपतीच्या पादुकांची सकाळी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला भजनी मंडळांचाही सहभाग होता. याप्रसंगी शिवसेना गटनेते विलास शिंदे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, संतोष गायकवाड, नगरसेविका सीमा निगळ, नयना गांगुर्डे आदींच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली.

नवश्या गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव व सविता जाधव यांच्या हस्ते महापूजा झाली. यानंतर गणेश अभिषेकानंतर भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या. समारे अर्धा किलोमीटरपर्यंत भाविकांची लांब रांग लागली होती. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी गंगापूर पोलिसांचा चोख पोलिस बंदोबस्त होता. ट्रस्टने गर्दीच्या वेळी किमान गणपतीच्या मुखदर्शनाची तरी व्यवस्था करावी, अशी मागणी महिला भक्तांनी केली.

साबुदाणा खिचडीचा प्रसाद

गंगापूर रोड : मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. ठेवण्यात आला होता. दुपारी दोन वाजेपर्यंत तब्बल दोन हजार किलोच्या साबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांची गर्दी वाढल्याने दुपारनंतर खिचडी बनविण्यात अडचण आली. दरम्यान, भाविकांना रक्तदानाचे आवाहन अर्पण व जलकल्याण रक्तपेढीकडून करण्यात आले. अनेक भाविकांनी त्यास प्रतिसाद देत रक्तदान केले.

देवळालीत जयघोष

देवळाली कॅम्प : देवळालीतील विविध गणेश मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची सकाळपासून गर्दी दिसून आली. यावेळी भाविकांनी गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष केला.

लामरोडवर सिवानंदा कंपनीच्या प्रांगणात महाराजकृष्ण बिरमानी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती झाली. भाविकांना सायंकाळी दूध व प्रसादाचे वाटप करण्यात आली. गुरुद्वारा रोडवर असलेल्या इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे पांडुरंग झोंबाड यांच्या हस्ते महाभिषेक तर मंदिराचे विश्वस्त शामराव कदम यांच्या हस्ते महाआरती झाली. त्यानंतर सर्व गणेशभक्तांना खिचडी वाटप, मोदक, लाडूसह दुधाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गिरिश गायकवाड, मनोज मेन्द्रे, गणेश यादव, राहुल शिरसाठ, रवी झनकर, अनिल परदेशी, कैलास परदेशी, दशरथ कासार, कमलेश खरोटे उपस्थित होते.

गवळीवाडा येथे असणाऱ्या सिद्धिविनायक गणेश मंदिरात सकाळी महाभिषेक व सांयकाळी गवळीवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश कदम, उपाध्यक्षा सुनंदा कदम यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला. याप्रसंगी दीपक बुंदेले, कचरू गोडसे, रमेश शिरसाठ, दिलीप पगारे आदींच्या उपस्थितीत खिचडी व प्रसादाचे वाटप झाले. विठ्ठलवाडी परिसरात असलेल्या विघ्नहर्ता गणेश मंदिरात स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिरणाकाठी बाप्पाचा जयघोष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

अंगारिका चतुर्थीच्या निमित्ताने ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धीविनायक गणेश मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी गणेशभक्तांनी भल्या पहाटे पासूनच मोठी गर्दी केली होती. यानिमित्ताने भाविकांसाठी मंदिर पहाटे चार वाजता दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. पहाटे तीन वाजता मंदिरात अभिषेक व महापूजा करण्यात आली. यावर्षीची ही अखेरची अंगरिका चतृर्थी असल्याने हजारो भाविकांनी विनायकाचे दर्शन घेतले.

मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. ट्रस्टच्यावतीने भविकांसाठी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. मंदिर परिसरात पेढे, फुले, दुर्वा, खेळणी, नारळ, फराळाची लहान-मोठी दुकाने लावण्यात आल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. श्रींच्या मंदिरासमोरच महामार्ग असल्याने या महामार्गावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी करण्यात आल्याने वाहतुकीस वेळोवेळी अडथळे निर्माण झाले. दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आल्याने वाहनांच्या दुतर्फा मोठ्या रांगा लागल्या होत्या. भाविक पहाटे पायी चालत येऊन दर्शनासाठी उभे होते. यात महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. फेब्रुवारी महिन्यात सिद्धीविनायक मंदिरात रामकथेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सिद्धी विनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅपी स्ट्रीटची धम्माल पुन्हा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुठे बॉलिवूड हिट्सच्या तालावर थिरकरणारी तरुणाई... कुठे वादनावर ठेका धरलेले आबालवृद्ध... कुठे रंगलेला बुद्धिबळाचा खेळ... तर कुठे मुले रोबो बनविण्यात दंग. काही ठिकाणी रंगलेली रस्सीखेच तर कोणी दोरीवरच्या उड्यांमध्ये मग्न. अशा धम्माल वातावरणात नाशिककरांना हॅपी स्ट्रीटचा आनंद पुन्हा लुटता येणार आहे. येत्या शनिवारी कॉलेजरोडवर ही धमाल होणार असून, त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

ज्या रस्त्यावरून आपण नेहमी जीव मुठीत घेऊन चालत जातो किंवा वाहने चालवितो, त्या रस्त्यावर जर तुम्हाला दोरीच्या उड्या खेळायला मिळाल्या, सुबक रांगोळी रेखाटण्यास मिळाली, भर रस्त्यात बॅडमिंटन-व्हॉलिबॉल आदी खेळ खेळण्यास मिळाले, वाद्य वाजविण्यास, गाणी म्हणण्यास किंवा नृत्याची संधी मिळाल्यास आनंदच होईल ना. तर मग ही तुम्ही नक्की तयार व्हा, कारण आगळे-वेगळे उपक्रम आणणाऱ्या 'महाराष्ट्र टाइम्स' ने ही संधी येत्या शनिवारी (दि. २९) हॅपी स्ट्रीटच्या रुपाने आणली आहे. शनिवारी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कॉलेजरोडवर नाशिककरांच्या वर्षाअखेरीच्या सेलिब्रेशनमध्ये हॅपी स्ट्रीटही आनंदाची भर घालणार आहे.

नाशिक महापालिका आणि नाशिक पोलिस यांच्या सहकार्याने सायंकाळचा हा हॅपी स्ट्रीट नाशिककरांना आनंदाची वेगळी अनूभूती देणार आहे. गेल्या वर्षीच्या हॅपी स्ट्रीटला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. नागरिकांची मागणी विचारात घेऊन वर्ष अखेरचे निमित्त साधत 'महाराष्ट्र टाइम्स'ने ही भेट पुन्हा आणली आहे. कॉलेजरोडचा सेलिब्रेशनचा माहोल, या वर्षातल्या अखेरच्या शनिवारची निवांत संध्याकाळ आणि तरुणाईच्या उत्साहाला मिळणारे व्यासपीठ यामुळे नागरिकांचा आनंद द्विगुणित होणार आहे. यंदाच्या हॅपी स्ट्रीटमध्येही नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग, विविध स्पोर्ट गेम्स, म्युझिकल आणि इन्स्ट्रूमेंटल सादरीकरण, रांगोळी रेखाटन, डान्स परफॉर्मन्स आदी उपक्रम होणार आहेत.

कलाकारांना संधी

यंदाच्या हॅपी स्ट्रीटमध्ये कला सादर करण्यास इच्छुक ग्रुपसाठी नोंदणी बंधनकारक आहे. मर्यादीत कलाकारांना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी ९४२२५१३५६९ या क्रमांकावर दुपारी १२ ते ४ या वेळेत संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनर करणार ‘आक्रोश’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पेन्शन वाढीबाबतच्या उच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी १५ जानेवारीपर्यंत न केल्यास आक्रोश आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नाशिक जिल्हा पेन्शन फेडरेशनने दिला आहे.

पेन्शनधारकांना दरमहा नऊ हजार रुपये पेन्शनवाढ व महागाई भत्ता लागू करावा, कोशियारी समितीच्या शिफारशीनुसार तीन हजार रुपये आणि महागाई भत्ता सर्वप्रथम दिला जावा, ईएसआय लागू करावा, दर पाच वर्षांनी पेन्शन सर्वेक्षण करून त्यामध्ये वाढ करावी, पेन्शनधारकांना ४ लाख रुपयांच्या मेडिक्लेमसह आरोग्यासाठी लाभदायी योजना लागू कराव्यात आदी मागण्या ऑल इंडिया ईपीएफ ९५ पेन्शनर्स फेडरेशनने सरकारकडे केल्या आहेत. याबाबत स्थानिक पातळीपासून दिल्लीपर्यंत विविध प्रकारची आंदोलनेदेखील करण्यात आली आहेत. फेडरेशनच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मकता दर्शविली असली तरी अद्याप अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. १५ जानेवारीपर्यंत अंमलबजावणी न झाल्यास देशभर 'करो या मरो' स्वरुपाचे आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images