Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

झणझणीत पदार्थांची मेजवानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चुलीवरील गरमागरम मांडे, ठसकेदार भरीत भाकरी अन् ठेचा, त्यासह साजूक तुपातील उकडीचे मोदक अन् विविध प्रकारचे पराठे... अशा अनेक खान्देशी खाद्यपदार्थांची चव चाखण्यात नाशिककर दंग झाले. नाशिककरांच्या खान्देश महोत्सवातील अनेक पदार्थांवर ताव मारत झणझणीत पदार्थांची मेजवानी नाशिककरांनी अनुभवली.

आमदार सीमा हिरे यांच्या संकल्पेतून ठक्कर डोम येथे आयोजित खान्देश महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. शहरातील विविध भागातून खवय्यांनी या महोत्सवासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळपासूनच महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. खान्देशातील संस्कृतीची जडणघडण अनुभवतानाच, खान्देशातील चविष्ट आणि चटपटीत खाद्यपदार्थ्यांचा नाशिककरांनी मनमुराद आस्वाद घेतला. महोत्सवात सकाळी ११ वाजता ज्येष्ठोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी खान्देशी गाणी सादर करीत उपस्थितांचे मनोरंजन केले. संध्याकाळी ६ वाजता 'न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा' या कार्यक्रम रंगला. आज सकाळी ११ वाजता आंतरशालेय नृत्य स्पर्धा घेण्यात येणार असून, संध्याकाळी ६ वाजता खान्देशरत्न पुरस्कार सोहळा होणार आहे.

\Bपालकमंत्र्यांनी घेतला आस्वाद

\Bखान्देश महोत्सवास शुक्रवारी दुपारी २ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार अनिल कदम यांनी भेट दिली. यावेळी महोत्सवातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या आग्रहास्तव पालकमंत्री महाजन, आमदार कदम यांसह आमदार सीमा हिरे, स्थायी समिती अध्यक्षा हिमगौरी आहेर-आडके आणि भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी खान्देशी पदार्थांचा आस्वाद घेतला. या सर्वांनी भरीत भाकरी, लाल मिरचीचा ठेचा, खान्देशी कारलं आणि भाजणीचा पराठा या पदार्थांची चव चाखत महोत्सवाची रंगत अनुभवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रादेशिक कर परिषदेस प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टेट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) तर्फे आयोजित प्रादेशिक कर परिषदेस प्रारंभ झाला असून, यामध्ये आर्थिक व्यवहारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात येत आहे. शहरासह राज्यभरातून दोनशेहून अधिक सीए या परिषदेत सहभागी झाले असून, क्षेत्रातील तज्ज्ञांकडून जीएसटी, इनकम टॅक्स, शेअर मार्केट यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

'आयसीएआय' नाशिक शाखा या संस्थेच्या वतीने अशोका मार्ग येथील आयसीएआय भवन येथे आयोजित दोन दिवसीय प्रादेशिक कर परिषदेला शुक्रवारी प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे सीए किशोर कारिया यांच्यासह संस्थेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलन लुणावत, उपाध्यक्ष रेखा पटवर्धन, सचिव रणधीर गुजराथी, खजिनदार हर्षल सुराणा, सदस्य रोहन आंधळे, रवी राठी, राजेंद्र शेटे यावेळी उपस्थित होते.

यावेळी सीए कारिया यांनी शेअर मार्केटमधील पेनी स्टॉकच्या व्यवहाराचे मार्गदर्शन केले. तर सीए राजेंद्र जैन यांनी इनकम टॅक्सच्या कायद्यांसंदर्भात माहिती दिली. सीए अभिजित मोदी यांनी आयकर विभागाकडून आकारण्यात येणाऱ्या विशेष करांचे उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिषदेत शनिवारी (दि. २२) जीएसटी वार्षिक रिटर्न्स, ऑडिट फॉर्म, इनपुट टॅक्स क्रेडिट आणि जीएसटी ऑडिट यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँका होणार ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बँक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केलेला संप, पाठोपाठ लागून आलेल्या सुट्या आणि मंगळवारी ख्रिसमसची सुटी यामुळे पुढील काही दिवस बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे. सोमवारी बँका सुरू राहणार असल्या तरी या दिवशी गर्दी होऊ शकते.

बँक अधिकाऱ्यांच्या ऑल इंडिया बँक ऑफिसर कॉन्फडरेशन या संघटनेने (एआयबीओसी) शुक्रवारी संप पुकारला होता. स्टेट बँकेचे अधिकारी या संपामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले. सीबीएस परिसरात संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन केले. वेतनवाढ मिळावी, बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँकेच्या विलीनीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, बँक अधिकाऱ्यांवरील हल्ले थांबावावेत, पेन्शनसंदर्भातील मागण्या मान्य कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी हा संप करण्यात आला. संपामुळे बँकांचे कामकाज ठप्प झाले. बँकांच्या विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी २६ डिसेंबर रोजी युनायटेड फोरमने संपावर जाण्याचा इशारा दिला असून, पुढील आठवड्यातही बँकिंगच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. शनिवार (दि. २२) आणि रविवारच्या (दि. २३) सुटीमुळे सलग तीन दिवस बँकांचे कामकाज ठप्प असणार आहे. सोमवारी बँका उघडतील. परंतु, मंगळवारी ख्रिसमसची सुटी असल्याने सोमवारीदेखील बँकांमध्ये अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची भिस्त एटीएमद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवरच असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोबाबत सरकारकडे मार्गदर्शन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नगररचना विभागातील ऑटो डीसीआर प्रणालीत सिडकोची नियमावली समाविष्ट नसल्याने सिडकोच्या बांधकाम परवानग्यांबाबतचा संभ्रम वाढला आहे. सिडकोची नियमावली स्वतंत्र असून, ऑटो डीसीआरमध्ये मात्र शहर विकास नियंत्रण नियमावलीनुसार परवानग्या दिल्या जातात. त्यामुळे सिडकोची नियमावली आणि शहर विकास नियंत्रण नियमावलीतील तिढा दूर करण्यासाठी सरकारकडे मार्गदर्शन मागवल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

नगररचना विभागात ऑनलाइन बांधकाम परवानग्यांबाबत कार्यरत करण्यात आलेल्या ऑटो डीसीआर प्रणालीत सन २०१७ मध्ये मंजूर झालेल्या शहर विकास नियंत्रण नियमावलीचा समावेश आहे. त्यानुसारच बांधकामांना परवानग्या दिल्या जात आहेत. सिडकोच्या बांधकामांसंदर्भातील २०१६ मध्ये मंजूर झालेली नियमावली आणि शहर विकास नियंत्रण नियमावलीत मोठा फरक आहे. त्यामुळे सिडकोचे प्रस्ताव ऑटो डीसीआर प्रणालीत सादर केल्यास ते मंजूर होत नाहीत. त्यामुळे सिडकोचे प्रस्ताव ऑनलाइन काढायचे की, ऑफलाइन याबाबतचा तिढा कायम राहिला आहे. सिडकोतील प्रस्ताव ऑफलाइन काढावेत अशी लोकप्रतिनिधींसह नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे हा वाद सोडविण्यासाठी महापालिकेने राज्याच्या नगर विकास विभागाकडे मार्गदर्शन मागवले आहे. सिडकोबाबत २०१६ मधील नियमावली लागू करायची की, शहर विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकामांना परवानगी द्यावी, याबाबत शासनाने स्पष्टता करावी असा प्रस्ताव पालिकेकडून पाठवण्यात आला आहे. सिडकोच्या बांधकामांना सिडकोच्या सन २०१६ च्या नियमावलीनुसार मंजुरी द्यावी, अशी पालिकेची भूमिका असल्याचे गमेंनी यावेळी सांगितले. आयुक्त गमे यांनी सिडकोच्या नियमावलीबाबत सॉफ्टवेअरमध्ये स्वतंत्र तरतूद करावी अशी सूचना केली. सरकारकडून मार्गदर्शन येईल तेव्हा येईल, तोपर्यंत सिडकोच्या नियमावलीचा त्यात समावेश करावा. जेणेकरून मार्गदर्शन आल्यानंतर तातडीने बांधकाम परवानग्या देता येतील अशी तरतूद करावी, अशी सूचना देण्यात आली. त्यामुळे सिडकोतील बांधकामाचा प्रश्नही लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांना कांद्याचा ‘वानोळा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमांवर मलम लावण्यासाठी प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले असले तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये त्याबाबत कमालीची नाराजी आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी शुक्रवारी थेट जिल्हाधिकाऱ्यांना कांद्याच्या गोण्या भेट देण्याचा प्रयत्न करीत नाराजी नोंदविली. जिल्हाधिकाऱ्यांनी हा कांदा स्वीकारला नसला तरी शेतकऱ्यांच्या भावना सरकारकडे पोहोचवू, अशी ग्वाही दिली.

कांद्याला भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. विविध प्रकारच्या आंदोलनांनी याबाबतची नाराजी सरकारकडे व्यक्त करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले आहे. परंतु, कांद्याचा एकूण उत्पादन खर्च विचारात घेता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी किमान ७०० रुपये क्विंटल अनुदान मिळावा, अशी मागणी करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेऊन त्यांना कांदा भेट देऊ केला. मात्र, शेतकऱ्यांनी आणलेल्या कांद्याच्या गोण्या स्वीकारण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. शेतकऱ्यांच्या भावना आपण सरकारकडे कळवू, असे आश्‍वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळातील भारत दिघोळे, अशोक बोडके, सुरेश गिते, खंडेराव दिघोळे व सोमनाथ गिते यांनी दिले.

अनुदान तुटपुंजेच

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. राज्य सरकारने कांद्यासाठी २०० रुपये क्विंटल अनुदान जाहीर केले असले तरी ते अत्यंत तुटपुंजे आहे. केंद्र व राज्य सरकारने क्विंटलसाठी किमान ७०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नव्याने बाजारात आलेल्या कांद्याला अल्पदर मिळत असून त्यास दोन हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान, कांद्याच्या गोऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर सोडून शेतकरी तेथून निघून गेले.

सरकारने २०० रुपयांचे अनुदान दिले की भीक, हेच समजत नाही. केंद्र सरकारने कांद्याचा जीवनावश्यक वस्तुंमध्ये समावेश केला असून निर्यातीचे धोरणही केंद्र सरकारच ठरविते. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य अनुदान द्यायला हवे.

- अशोक दिघोळे, अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतो. परंतु, यंदा पाण्याअभावी थोडेच उत्पादन घेऊ शकलो. पिक जगविण्यासाठी तुषार सिंचनावर २५ हजार रुपये खर्च केला आहे. परंतु, तेवढा भाव मिळत नसल्याने हताश झालो आहे.

- अशोक बोडके,

कांदा उत्पादक, जायगाव, सिन्नर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांनी’ केले मानवमन सुसंस्कृत

$
0
0

\Bपुलं, गदिमा, फडकेंबाबत \Bज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पु. ल. देशपांडे यांचे शब्द, ग. दि. माडगूळकरांचे सूर आणि सुधीर फडके यांचे शब्द आणि सूर यांनी माणसाच्या मनाला सुसंस्कृत केले. संपूर्ण महाराष्ट्र या तिघांनी समृद्ध केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी केले.

ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे, ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर व ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्कृती वैभव संस्थेच्या वतीने त्रिवेणीनगरी, गोविंदनगर येथे त्रिवेणी महोत्सवाचे शुक्रवारी राजदत्त यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी रवींद्र देवधर, दीपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे दीपक चंदे, चेतन पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय ढमाळ, दंडे ज्वेलर्सचे संचालक अनिल दंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

राजदत्त म्हणाले, की 'पुलं, गदिमा, फडके या तिघांचाही सहवास मला लाभला. त्यांच्या सावलीत वाढण्याचे भाग्य मिळाले. त्रिवेणी महोत्सवाचे उद्घाटन करताना आकाशात पाहिले असता, मला तात्यासाहेबांचा भास होतो. कला, गीत, सूर, साहित्य असा एकत्रित हा सोहळा आहे. कलेतून माणसाला विशालता, जीवनाची दिशा मिळते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असलेले तिघांचे स्मरण नवीन पिढीलाही उत्सुकता देईल. गदिमा, फडके व हसवत हसवत शिकवणारे पुलं या माणसांचा हा आयोजित उत्सव कौतुकास्पद आहे.

आज गीत रामायण

महोत्सवात शनिवारी (दि. २२) सायंकाळी ५.३० वाजता सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर यांचा अजरामर ठेवा असलेले गीत रामायणाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, उद्घाटन सत्रात राजदत्त यांच्या हस्ते त्रिवेणी महोत्सव स्मरणिकेचे प्रकाशन झाले. संस्कृती वैभवचे अध्यक्ष नंदन दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सुप्रिया देवघरे यांनी सूत्रसंचालन केले.

\Bरसिकांना मोहिनी\B

महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर, गीतरचनांवर आधारित 'अक्षर त्रिवेणी' हा सुरेल कार्यक्रम पार पडला. निवेदिका उत्तरा मोने, अभिनेता तुषार दळवी, संजय मोने, गायक अनिरुद्ध जोशी, नचिकेत लेले, गायिका धनश्री देशपांडे, सृष्टी पगारे यांनी हा कार्यक्रम सादर केला. आयुष्याचे तत्वज्ञान सांगणारे 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे', 'तिन्ही लोक आनंदानी भरून गाऊ दे, तुझे गीत गाण्यासाठी', अशा अनेक गीतांनी रसिकांवर मोहिनी पसरवली. या सुरेल कार्यक्रमाला प्रमोद पवार, विजय जाधव, नवीन तांबट, अमित शर्मा, अनिल धुमाळ, मनोज गुरव यांनी साथसंगत केली.

लोगो : कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Amit Thackeray Wedding: अमितचं लग्न २७ जानेवारीला; राज ठाकरेंनी जाहीर केली तारीख

$
0
0

नाशिक:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा विवाह सोहळा २७ जानेवारीला पार पडणार आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत खुद्द राज ठाकरे यांनी आज ही तारीख जाहीर केली. अमितचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीनं होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या काही दिवसांपासून अमित यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. त्यांची लग्नपत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. राज यांनी काल सप्तश्रृंगी देवीच्या चरणी ही पत्रिका ठेवल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झालं. मात्र, आज खुद्द राज यांनीच लग्नाबद्दल माहिती दिली. 'लग्नाला सर्वांनी यावं असं मलाही वाटतं. मात्र, तसं आमंत्रण द्यायचं झालं तर हा आकडा सहा लाखांवर जाईल. त्यामुळं मोजक्या मंडळींनाच या लग्नाचं आमंत्रण असेल, असं ते म्हणाले.
67204088

मोदींना आमंत्रण नाही?

पंतप्रधान मोदींना अमितच्या लग्नाचं आमंत्रण देणार का, असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी राज यांना विचारला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता, 'त्यांचा लग्न वगैरे गोष्टींवर विश्वास आहे का,' असा मार्मिक टोला राज यांनी केला. त्यामुळं राज हे मोदींना आमंत्रण देणार नसल्याचीच चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Raj Thackeray: 'मोदींएवढा देश कुणीही खड्ड्यात घालू शकत नाही'

$
0
0

नाशिक:

'नरेंद्र मोदी यांनी देश जितका खड्ड्यात घातलाय, त्यापेक्षा जास्त कुणीही घालू शकत नाही. अगदी मायावतींनी ठरवलं तरी त्याही ते करू शकत नाहीत,' अशी तोफ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज डागली. 'मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांत झालेला भाजपचा पराभव हा जनतेचा मोदींवरील राग आहे. हा रागच मतांमधून बाहेर पडलाय,' असंही ते म्हणाले.

नाशिक येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज यांनी यावेळी महाराष्ट्रासह देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. 'शिवसेना-भाजपच्या सभांना होणारी गर्दी आटली आहे. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडत चालल्याचंच हे द्योतक आहे, असं सांगतानाच, 'सेना-भाजपवाले काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा बेकार निघाले,' असं ते म्हणाले. 'कांदा उत्पादकांना दिलेलं अनुदान फसवं आहे. हे खोटं सरकार आहे,' असं राज म्हणाले.

हनुमानाच्या जातीवरून राजकीय नेते करत असलेल्या अनावश्यक चर्चेचाही राज यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. 'हनुमान उडत असल्यानं वेगवेगळ्या देशात जात असणार. त्यामुळं तो सगळ्यांना आपला वाटत असणार, असा टोला त्यांनी लगावला.

'ते' गडकरींचे शत्रू असावेत!

पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याबदद्ल विचारलं असता, 'गडकरींच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा करणारे बहुधा त्यांचे शत्रू असावेत, असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं.

लोकसभा-विधानसभा एकाच वेळी अशक्य!

'लोकसभा व विधानसभा निवडणूक एकाच वेळी होण्याची शक्यता राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. 'भाजप एकाचवेळी फावडे आणि कुऱ्हाड स्वत:च्या पायावर मारून घेणार नाही. आधी फावडं मारून घेतील मग कुऱ्हाड, असं राज म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनसेची भूमिका गुलदस्त्यात

$
0
0

वेळेवरच निर्णय जाहीर करणार; फडणवीस सरकारवर टीका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मनसे लोकसभेच्या जागा लढणार का, तसेच ती काँग्रेस आघाडीत सहभागी होणार का, या प्रश्नांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या तरी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसोबत जाण्याचा सध्या विषय नसून, विमानात बसून युती आणि आघाडीच्या चर्चा होत नसल्याचा टोला त्यांनी लगावला. माझी भूमिका निवडणूक आल्यावर जाहीर करेन, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत मनसे सामील होणार का, यावर ठाकरे यांनी थेट भाष्य टाळले.

राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आताचे सरकार खोटारडे आणि बेकार आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. नाशिक जिल्ह्याच्या चार दिवसांच्या यशस्वी दौऱ्यानंतर राज यांनी शनिवारी पत्रकारपरिषद घेत भाजपवर चौफेर हल्लाबोल केला. पाच राज्यांतील निकालावरून देशातील जनतेचा मोदींवरील विश्वास उडाल्याचे स्पष्ट दिसत आहे. राज्यातील भाजपा व शिवसेना एकमेकांच्या विरोधात वाद करून बातम्यांच्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत राहतात; परंतु त्याचा आता उपयोग नाही, हे खुळ काढून टाका असे सांगत पाच राज्यातील सरकारपेक्षा महाराष्ट्रातील सरकारची दुर्दशा निवडणुकीत होईल, असा दावा त्यांनी केला.

सध्याचे सरकार हे खोराटडे असून, शिर्डी संस्थांनकडून पैसे घेणारे सरकार कुणाच्या भरवशावर कांद्याचे अनुदान देणार, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. एक लाख २० हजार सिंचन विहिरी दिल्याचा दावा सरकारने केला. मग दुष्काळ कसा पडला, असा जाब विचारत जलसंधारणाचा पैसा गेला कुठे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नोटाबंदीचा निर्णय घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेऊन स्वत:साठी खड्डा खोदल्याची माझी पहिली प्रतिक्रिया होती असे सांगत, इतका वाईट निर्णय बसपाच्या अध्यक्षा मायावती देखील घेणार नाहीत, असेही ते म्हणाले.

हनुमान उडत असेल म्हणून...

शिवसेनेला राम आठवला. आता हनुमानाच्या जातीचा वाद सुरू आहे, या विषयावर राज ठाकरे यांनी मिश्किल शब्दांत सेना-भाजपला टोला लगावला. कोणीतरी हनुमान चिनी होता असे म्हटल्याचे ऐकले आहे. हनुमान उडत असल्याने तो अनेक देशांवरून उडत गेला असेल म्हणून तो सगळ्यांना आपला वाटत असेल, अशा शब्दांत त्यांनी या विधानाची खिल्ली उडवली. हे काय राजकारण्यांचे विषय झाले का, असा सवाल करीत केवळ मूळ प्रश्न भरकटविण्यासाठीच अशा चर्चा घडवून आणल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

यापूर्वी कुठे पयार्य होता ?

आगामी निवडणुकीत मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षांकडे कोण आहे, या प्रश्नावर राज ठाकरे यांनी देशाचा इतिहास मांडून यापूर्वी तरी विरोधी पक्षांकडे पर्याय कधी होता, असा प्रतिप्रश्न केला. विरोधी पक्ष निवडणुका जिंकत नसतो तर सत्ताधारी हारत असतात, याकडे लक्ष वेधत त्यांनी आतापर्यंतच्या पंतप्रधानांना संधी कशा मिळत गेल्या हे मांडले. जो जिंकतो तो ठरवतो असे निवडणुकीचे सूत्र असते. मनमोहन सिंग यांच्या सरकारविषयी नाराजी असल्याने नरेंद्र मोदी यांना संधी मिळाली. भाजपात त्यांच्या जागी लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी वा अन्य कोणी असते तर त्यांनाही संधी मिळाली असती, असे त्यांनी सांगत लोकसभा निवडणुकीत बदल होतील, असे सूतोवाच केले.

राज ठाकरेंचा घणाघात...

- अमित ठाकरे यांच्या लग्नाचे आमंत्रण पंतप्रधान मोदी यांना देणार का, या प्रश्नावर राज म्हणाले, की मोदींचा त्यावर विश्वास आहे का?

- सध्या देशाचे वातावरण घाण झाले हे निश्चित. यापूर्वी असले प्रकार कधी देशात झाले नाहीत.

- देवांनाही जातीचे लेबल लावले जात आहे. मूळ प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु, आता लोक यांना भीक घालणार नाहीत

- गडकरींच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा करणारे बहुधा त्यांचे शत्रू असावेत

- अमित ठाकरेंचे लग्न २७ जानेवारीला अत्यंत साध्या पद्धतीनं होणार. आपल्या हौसेसाठी सर्वांची ससेहोलपट नको

फटाके फोडल्याने गुन्हा

पंचवटी : फटाके फोडण्यास न्यायालयाने वेळेची मर्यादा निश्चित केली आहे. असे असतानाही नांदूरनाका येथे शुक्रवारी (दि. २१) रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास मनसे कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी फटाके फोडण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी फटाके फोडणारा भूषण सुकदेव आहिरे याच्या विरोधात आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदूर नाका येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याहस्ते नाशिक पूर्व विभागाच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नांदूरनाका प्रेस्टिज बिल्डिंग समोरील रोडवर सार्वजनिक ठिकाणी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास भूषण आहिरे याने फटाके फोडले. त्याचप्रमाणे निमसे बंगला, औरंगाबाद रोड येथेही फटाके फोडण्यात आले. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्हईल ते दणक्यातच’ने दणाणले ‘पसा’ नाट्यगृह

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गावाकडच्या लोकांनी नटसम्राट नाटक करायला घेतले. त्यांच्याकडे शहरी लोकांसारखा कावेबाजपणा नव्हता. त्यांना अस्सल मनोरंजनच द्यायचे आहे. त्यामुळे आपापल्या परीने ते या नाटकात पात्र आणतात, गावाकडची ती सारी पात्र आपापल्या स्वभाव गुणधर्मानुसार नाटकातील कलाकारी पार पाडतात आणि त्यातून गावकऱ्यांचे मनोरंजन होतं. अशा आशयाचे अहमदनगर येथील विजय नाट्य मंडळाचे व नेताजी भोईर लिखित 'व्हईल ते दणक्यातच' हे नाटक प्रेक्षकांनाही भावलं.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६ व्या नाट्यमहोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत शनिवारी 'व्हईल ते दणक्यातच' हे नाटक सादर करण्यात आलं. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात या स्पर्धा सुरू आहेत. रंगमंचावर एकाच वेळी अनेक पात्रांचा मनोरंजनात्मक धुमाकूळ हे दादांच्या नाटकाचे वैशिष्ट्य होते ते नेहमीप्रमाणे जपण्यात आले.

खेडेगावातील मंडळी सांस्कृतिक कलेत, लोककला, लोकगीत, लोकनृत्ये, दशावतार, बोहाडा या निर्मितीत नेहमी रमलेली असतात. तमाशाबरोबर नाटकाचेही वेड त्यांच्या रोमारोमात भरलेले असते. जे करायचे ते जिद्दीने, मनापासून आणि प्रेक्षकांचे पूर्ण मनोरंजन होईल, असे, त्यात शहरी बेगडीपणा नाही याच वेडातून बऱ्याच वेळा आपल्याला न पेलणारी नाटके घेऊन आपल्या ग्रामीण प्रेक्षकांकरीता पाहिजे तसा पदरचा मालमसाला टाकून एकंदर प्रयोगाचा कसा चोथा करून बोजवारा उडवतात हे या नाटकात दाखवण्यात आले आहे. आपल्या शहरी सुसंस्कृतपणाला हे कसेतरी वाटत असले तरी त्यांच्या ग्रामीण प्रेक्षकांना मात्र तो नाट्यप्रयोग अगदी दणक्यातच झालेला वाटतो. तात्यासाहेब शिरवाडकरांचे नटसम्राट हे प्रख्यात नाटक या ग्रामीण मंडळींनी बसवायला घेतले तर काय बहार येईल, हे चित्र डोळ्यासमोर येते. नाटकात पाटलांसहीत सर्वांनी नुसती हौस भागवून घेतलेली येथे पहायला मिळते.

नाटकाचे दिग्दर्शन सुनंदा रायते यांचे तर नेपथ्य किरण भोईर, संगीत वरूण भोईर, प्रकाशयोजना रवी रहाणे, वेशभूषा रेखा भोईर, संजय जरीवाला, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकात राजेंद्र जव्हेरी, किरण भाईर, नामदेव ओहोळ, वरूण भोईर, अभिजित काळे, कृष्णा रघुवंशी, पूनम भागडे यांनी भूमिका केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रॉपर्टी एक्स्पोत बजेट होमला मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू असलेल्या 'क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०१८'मध्ये दुसऱ्या दिवशी ग्राहकांनी बजेट होमला पसंती दर्शविली. २० ते ३० लाखांच्या फ्लॅट, रो हाऊसला मोठी मागणी असल्याचे दिसून आले. आजचा प्रदर्शनातील नागरिकांचा प्रतिसाद बघता घरखरेदीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे अधोरेखित झाले असल्याचे क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी सांगितले.

भारतातील बांधकाम व्यावसायिकांची सर्वोच्च संस्था असलेल्या क्रेडाईचे सदस्य गेल्या तीन दशकापासून पारदर्शकता, विश्वासार्हता व गुणवत्ता या त्रिसूत्रीच्या आधारावर काम करत आहे. तीन दिवसीय या प्रदर्शनाच्या निमित्ताने आज सकाळपासूनच नागरिकांनी विविध स्टॉल्सला भेटी दिल्या. अधिकांश नागरिक घरकुल हे आयुष्यात एकदाच खरेदी करतात त्यामुळे स्टॉल्सला भेट दिल्यानंतर सहकुटुंब साईट व्हिजीटसाठी ते रवाना झाले. शनिवारी दुसऱ्या दिवशी नाशिककरांसहीत खान्देश व मुंबईच्या नागरिकांनी गृहखरेदीच्या संधीची पर्वणी साधली. समन्वयक अनिल आहेर म्हणाले, 'या प्रदर्शनाच्या निमित्ताने बांधकाम व्यावसायिक व अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांनी अनेक ग्राहकाभिमुख योजना जसे नो जीएसटी, स्टँप ड्यूटी, नोंदणी शुल्क वर सुट, स्क्रॅच कूपन, लकी ड्रॉ, सोन्याचे नाणे भेट, आकर्षक व्याज दर, लोन ट्रान्स्फर इत्यादी प्रदर्शन कालावधीमध्ये लागू केल्या असून, अशा योजनांनी ग्राहकांना बराच फायदा होणार असल्याने अनेक ग्राहकांनी स्पॉट बुकिंगही केले आहे. तर, प्रदर्शनाला भेट देणाऱ्या अनेकांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, यामुळे त्यांना कोणतेही प्रवेश शुल्क लागत नाही, असे सहसमन्वयक ऋषीकेश कोते यांनी सांगितले. प्रदर्शन यशस्वीतेसाठी क्रेडाईचे कृणाल पाटील, रवी महाजन, हितेश पोतदार, सचिन बागड, समीर सोनावणे, मनोज खिवंसरा, विशाल शहा, सुशील बागड आदी परिश्रम घेत आहेत.

आज समारोप

प्रदर्शनाचा रविवारी (२३ डिसेंबर) संध्याकाळी ६ वाजता समारोप होणार आहे. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेकांचे गृहस्वप्न पूर्ण होत आहे. ही खऱ्या अर्थाने ख्रिसमस आणि न्यू ईअर गिफ्ट आहे. नाशिककरांचा हा प्रतिसाद लक्षात घेऊन यापुढील काळातही क्रेडाईच्यावतीने अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील.

- उमेश वानखेडे, अध्यक्ष, क्रेडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसतर्फे ३ जानेवारीला संविधान बचाव मेळावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे येत्या ३ जानेवारी रोजी नाशिकमध्ये 'देश बचाव संविधान बचाव' मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस प्रवक्ता डॉ. राजू वाघमारे उपस्थइत राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी दिली आहे.

काँग्रेसकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्याच्या तयारी संदर्भात शुक्रवारी काँग्रेस कार्यालयात काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला सुरेश मारू, रमेश साळ‌वे, शाम खणपटे, अशोक शेंडगे, मिलिंद हांडोरे, विजय अंबोरे, सुनील भारमाल, निवृत्ती गायकवाड, राजेश लोखंडे, सुनील जगताप, विलास बागूल, हर्षवर्धन भवर उपस्थित होते. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून समजात तेड निर्माण करून सामाजिक वातावरण दूषित करण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. संविधानाचा अनादर केला जात असून, संविधानाच्या विरोधी भूमिका भाजपकडून घेतली जात आहे. त्यामुळे या हिटलरशाही कारभारा विरोधात अनुसूचित जाती विभागातर्फे प्रदेश पदाधिकाऱ्यांनी या जनजागृती मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे ज्ञानेश्वर काळे यांनी सांगितले. या बैठकीत मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यात काँग्रेसच्या विजयाबद्दल अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. तसेच अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेशपातळीवर निवड झाल्याबद्दल राहुल दिवे, सुरेश मारू, रमेश साळवे यांचेही अभिनंदन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसीलदार देवरेंकडे खंडणीची मागणी

$
0
0

निवृत्त अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप; पोलिसात तक्रार

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे एका निवृत्त उपजिल्हाधिकाऱ्याच मुलाने १५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासकीय कामातील अनियमिततेप्रश्नी मंत्रालयासमोर उपोषण करून चौकशीचे शुक्लकाष्ट मागे लावण्याची धमकी देत राहुल शिंदे (रा. नाशिक) याने खंडणी मागितल्याची तक्रार तहसीलदार ज्योती देवरे यांनी पिंपळगाव बसंवत शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

२३ ऑक्टोबर २०१८ रोजी तहसीलदार देवरे यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाले होते. या पत्रात राहुल शिंदे (रा. नाशिक) यांनी कामकाजातील अनियमिततेबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्याचे कळविण्यात आले होते. त्यातील निर्देशानुसार तहसीलदार देवरे यांनी आवश्यक कागदपत्रांसह अपर जिल्हाधिकारी यांना प्रशासकीय खुलासा केला. त्यानंतर ही शिंदे याने उपोषणाचा इशारा दिल्याने त्या संबधी निवासी जिल्हाधिकारी यांचे पत्र तहसीलदार देवरे यांना मिळाले. या पत्रात निवासी जिल्हाधिकारी यांनी शिंदे यांना उपोषणापासून परावृत्त करण्याची सूचनावजा विनंती केली होती.

त्यानुसार देवरे यांनी सामाजिक कार्यकर्ते दीपक पवार यांच्यामार्फत राहुल शिंदेबाबत चौकशी केली. पवार यांचा शिंदेंशी परिचय असल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क केला. यावेळी राहुल शिंदेने तहसीलदारांशी समक्ष भेट झाल्यास प्रकरण मिटविण्यासाठी भाषा केली. १५ लाख दिल्यास तक्रार मागे घेण्याचाही प्रस्तावही ठेवला. दरम्यान, तहसीलदार ज्योती देवरे १७ डिसेंबर रोजी गौणखनिज कारवाईसाठी तालुक्यातील सौंदाणे येथे गेल्या असता एका खासगी हॉटेलात राहुल शिंदे, दीपक वापर व तहसीलदार देवरे यांची भेट झाली. या भेटीत आपण निवृत्त उपजिल्हाधिकारी भीमराव शिंदे यांचा मुलगा असल्याचे सांगून राहुल शिंदेने देवरेंवर गौणखनिजातून १ कोटी ५ लाख कमविल्याचा आरोप केला. याप्रकरणी मंत्रालयासमोर उपोषण करून नोकरी घालविण्याची धमकीही त्याने देवरे यांना दिली. प्रकरण मिटविण्यासाठी १५ लाख द्या, अशी मागणी केल्याची फिर्याद तहसीलदार देवरे यांनी दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनगर समाजाच्या आरक्षणास ‘एकलव्य’चा विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

आदिवासींची संस्कृती परंपरा, रितीरिवाज अन् भाषा याबाबतच्या कुठल्याही निकषास धनगर समाज बसत नाही. धनगर समाजाचा आदिवासी समाजाशी कोणताही संबंध नाही. धनगर समाजाचा संशोधकांनी कुठेही 'आदिवासी' म्हणून उल्लेख केलेला नाही. त्यामुळे धनगर समाजास अनुसुचित जमातीतून आरक्षण देऊ नये, अशी मागणी एकलव्य भिल्ल समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.

अनुसुचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजास आरक्षण देण्यात यावे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या सध्याच्या आरक्षणातून धनगर समाजास आरक्षण दिले गेल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एकलव्य भिल्ल समाज संघटनेने दिला आहे. याबततचे निवेदन येवला तहसीलदारांना देण्यात आले आहे.

धनगर समाजाकडून सध्या अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. धनगर समाज हा मुळातच पशूपालक समाज असून त्यांच्या आणि आदिवासींच्या जीवनमानात कमालीचा फरक आहे. धनगर समाज हा कष्टकरी असला, तरी तो आदिवासी नाही, याकडे लक्ष वेधत एकलव्य भिल्ल समाज संघटनेने धनगर समाजास 'अनुसुचित जमातीमधून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. निवेदन देतेवेळी एकलव्य संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष किशोर पवार, गंगाधर मोरे, किरण माळी, योगेश मोरे, जालिंदर मोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडळाने केली रस्त्याची डागडूजी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने महाराणी येसूबाई संभाजीराजे भोसले यांच्या स्मरणार्थ उमराणे गाव ते खारीपाडा रस्त्यावरील खड्डे मुरुमाने बुजवून रस्ता दुरुस्तीचे करण्यात आले. या कामामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

येथील जाणता राजा मित्र मंडळाच्या माध्यमातून २४ वर्षांपासून उमराणे मावळ खोऱ्यात विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. सद्यस्थितीत उमराणे गाव शिवश्री शहाजीराजे भोसले चौकापासून ते खारीफाटा रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. कांदा व्यापारीबाजार पेठ असल्यामुळे दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून उमराणे बाजारपेठेत येतात. त्यामुळे वाहनांना रात्री-अपरात्री अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे महत्वाचे होते. ही बाब लक्षात घेऊन उमराणे येथील जाणता राजा मित्र मंडळाने हे काम हाती घेऊन पूर्ण केले. शासकीय अंदाज पत्रकानुसार ३ लाख रुपये खर्चाचे काम मंडळाने सामाजिक बांधिलकीतून पूर्ण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रविवार लेख- कारवासाचा आदेश कारणी लागावा!

$
0
0

कारावासाचा आदेश कारणी लागावा!

अरविंद जाधव,

arvind.jadhav@timesgroup.com

नियम पायदळी तुडविल्याने काही फरक पडत नाही, अशा धारणेला जिल्हा कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे छेद देण्याचे काम केले. लायसन्स नसताना वाहन ताब्यात दिले या एवढ्या एका कारणामुळे कोर्टाने युवकाच्या वडिलांना सुद्धा कारावासाची शिक्षा ठोठावली. कोर्टाचा हा कारावासाचा आदेश कारणी लागला म्हणजे मिळवले.

---

भरधाव स्कोडा कारने दिलेल्या धडकेत तीन महिला मृत्यूमुखी पडल्याप्रकरणी कोर्टाने शेख फैज फारूख, फारूख हबीब शेख या दोघा पिता-पुत्रांना दोषी ठरवित सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावली. २६ मे २०१७ रोजी मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला होता. विनापरवाना स्कोडा सुपर्ब ही कार भरधाव चालवित त्यांनी हर्षद श्यामकुमार पाटील यांच्या स्विफ्ट डिझायर कारला धडक दिली होती. या अपघातात सरिता भामरे, रेखा पाटील व योगिनी भामरे या महिलांचा मृत्यू झाला होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. के. आर. टंडन यांनी शेख फैज फारूख याला दोन वर्षे सश्रम कारावास आणि २७ हजार ६०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर फारूख हबीब शेख याला तीन महिने सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यातील फारूख हबीब शेख यांचा दोष हा होता की त्यांनी मुलाकडे लायसन्स नसताना त्यास वाहन चालविण्यास दिले. याबाबत साधारणत: दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने कायदा केला होता. मुलाकडे लायसन्स नसताना त्यास वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकांवर यामुळे कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला. याच कायद्याच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात नव्हे तर विभागात या प्रकारचा हा पहिला निर्णय झाला असावा.

खरंतर कोर्टाकडून शिक्षा होणे आणि समाजाने त्यातून बोध घेणे, हेच सार्वभौम प्रजासत्ताक देशाला अपेक्षीत आहे. पण दुर्दैवाने तसे होत नाही. समाजातील २० टक्के गुन्हेगार विरूध्द ८० टक्के समाज असे चित्र हळुहळू पालटत असून, व्हाईट कॉलर क्राईममुळे ही टक्केवारी अगदीच उलट दिशेने प्रवास करू लागली आहे. वाहतूक नियमांबाबत उलट स्थिती असून, ८० टक्के समाज नियमांकडे दुर्लक्ष करण्याकडे तर २० टक्के समाज नियमांचे पालन करण्याकडे लक्ष देतो.

खुनासारख्या गुन्ह्यात जन्मठेप आणि फाशीची शिक्षा होऊ शकते, हे माहिती असूनही खून होणे बंद झालेले नाही. हत्या सारख्या प्रकारात एकतर अती राग किंवा सूड हे मानवी घटक महत्त्वाचे असतात. ते व्यक्तीनिहाय आणि घटनेनुसार बदलू शकतात. त्याचमुळे शिक्षेचा इतिहास माहिती असूनही नाशिकसारख्या शहरात दरवर्षी जवळपास ४० जणांची हत्या होते. लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण कमी वाटू शकते. प्रत्येक गुन्ह्याची व्याप्ती, त्यातील मानवी संबंध, इर्षा, इतिहास हा वेगवेगळाच असतो. पण, शेख पिता पुत्राबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टंडन यांनी दिलेल्या निकालाबाबत तसे म्हणता येणार नाही. शहरात दरवर्षी लाखो वाहनचालकांवर कारवाई होते.

शहरातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अगदीच कमकुवत असून, त्याचा ताण वाढलेल्या वाहनांच्या संख्येतून दिसून येतो. अगदी दहावी पास झालेल्या मुलास लागलीच ट्युशन, कॉलेज आणि इतर क्लासेससाठी किमान दुचाकी घेऊन द्यावी लागते. पालकांना आपल्याच चिंता मोठ्या वाटत असल्याने किंबहुना त्यातून बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नसल्याने लायसन्स, वाहन शिकवणे याबाबी गौण ठरतात. युवकांना नैसर्गिकरित्या येणारी उर्मी योग्य मार्गावर खर्ची घालविण्यासाठी योग्य तो पर्याय मिळाला नाही की त्यांना वाहनांचे आकर्षण स्वस्थ बसू देत नाही. आज इयत्ता पाचवी किंवा सातवीतील मुलांना अद्ययावत वाहनांबाबत जितकी माहिती आहे तितकी त्यांच्या पालकांना असणे दुर्मिळ म्हणावे लागेल. त्याचमुळे जिल्हा कोर्टाचा आदेश याच सुशिक्षीत समजल्या जाणाऱ्या ८० टक्के जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.

अलीकडच्या काळात रस्ते अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. नाशिक शहरात डिसेंबर महिन्याअखेरीस १९० जणांचा बळी गेला आहे. यामध्ये 'हिट ऍण्ड रन' अर्थात बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. या अपघातांचा विचार करता याशी निगडीत कायदेशीर आणि सामाजिक संदर्भांचा अभ्यास करणे गरजेचे ठरते. अपघाताच्या घटनांबाबत आपण कायद्यावर खूप अवलंबून राहातो. त्यानंतर आपण रस्त्यांना, तसेच वाढती वाहतूक आणि मद्यपान यांसारख्या गोष्टींनाही दोष देत असतो. सध्याची रस्त्यांची परिस्थिती, लोकांनी दारू पिऊन गाडी चालवणे, वाहतुकीचे नियम न पाळले जाणे इत्यादी कारणांबाबत खूप चर्चा होते. त्याबाबत कायदा करा, कडक कारवाई करा असेही सातत्याने म्हटले जाते. पण कडक शिक्षा करून प्रश्न सुटणार नाहीत. अर्थात कुठलीही घटना असो, दोषी व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे. पण अशा घटना घडण्यामागची जी मूलभूत कारणे आहेत, ती आपण समजून घेतली पाहिजेत. या सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे, आपण स्वीकारलेली दळणवळण यंत्रणेची पद्धती. माझ्याजवळ कार आहे का? ती कोणत्या प्रकारची आहे, किती मोठी आहे, एकूण किती कार माझ्याकडे आहेत? गरज एकाची आहे तरी मी दोन-तीन घेऊ शकतो का? या संदर्भातच आपल्या विकासाच्या भ्रामक कल्पना बनलेल्या आहेत आणि त्याकडेच आपण सर्व वळलो आहोत.

जगाच्या पाठीवर जी मोठी शहरे आहेत, तिथे सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यात आलेली आहे. तिथे अपघाताचे प्रमाण कमी आहे आणि लोक त्या ठिकाणी सगळीकडे व्यवस्थित पोहोचू शकतात. हा साधा मुद्दा कोणीच कधी लक्षात घेत नाही. मुंबई, पुणे आणि नाशिक सारख्या मोठ्या शहरांमध्ये अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये पायी चालणाऱ्यांचे प्रमाण मोठे दिसते. म्हणजे रस्ते हे केवळ वाहनांसाठीच आहेत, माणसे त्यावरून जाऊच शकत नाहीत इतक्या वाईट पद्धतीने आपण शहराचा विकासाच्या नियोजन भकास केले आहे. अपघातांच्या प्रत्येक प्रकाराबाबत सविस्तर विश्लेषण करता येणे शक्य आहे. वाहतूक, अपघाताच्या घटना या वैयक्तिक स्वरूपाच्या नसून, त्या सामाजिक असल्याचे भान केव्हाच हरपले आहे. त्याचाच परिपाक आपल्याला वाढत्या अपघातांच्या संख्येवरून येऊ शकतो. दुर्दैवाने त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या सिस्टिम वेगवेगळ्या असून, त्यांना आपल्या कागदापलिकडे दिसत नाही.

वाहनाचे रजिस्ट्रेशन प्रादेशिक परिवहन विभागात होते. लायसन्स देण्यासाठी हाच विभाग महत्त्वाचा असतो. या विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांच्याकडे येणारे काम, त्यातील एजंट, त्यासाठी उभी करण्यात येणारी यंत्रणा यात सुरक्षितता हरविली जाते. यानंतर, वाहनांसाठी लागणारे रस्ते, वाहतुकीचे पायाभूत घटक उभारण्याचे काम महापालिककडे आहे. इथे ट्रॅफिक इंजिनीअर नाही की, दळणवळणाबाबत आस्था! रस्ता झाला की मग कोठे स्पीड ब्रेकर, तर कोठे बॅरकेडिंग करून वाहतुकीला अडथळा घालण्याची चढाओढ सुरू होते. वाहतूक पोलिस, रस्ता सुरक्षा समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग असे एक ना अनेक घटक यात सहभागी असून, प्रत्येकाची आपली वेगळी कैफियत आहे. राज्य सरकारने नुकतेच जिल्ह्यातील ४७ ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी साडेसहा कोटी रूपयांचा निधी दिला. अगदी चकाचक असलेल्या रस्त्यांवर होणारा हा पुनर्खर्च कमी करण्याचा विचार सुरूवातीलाच होत नाही, यातच सर्व आले. शेख पिता पुत्राला दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी होईल, किंवा हे कुटुंब याविरोधात वरिष्ट कोर्टाकडे दाद मागेल. हा न्यायालयीन मार्ग खूप प्रशस्त आहे. त्यासाठी पैसे असले की वेळेचे बंधन महत्वाचे ठरू शकत नाही. पण, सर्वांनाच हा मार्ग सहज ठरेल, असे नाही. तेंव्हा यापासून दूर राहण्यासाठी सावधानता महत्त्वाची असून, प्रत्येकाने याकडे लक्ष द्यायलाच हवे!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान्देश महोत्सवात नृत्याविष्कारांची बहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पारंपरिक वेशभूषेत आपली कला सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असलेली प्रचंड चुरस, मराठी गाण्यांवर सादर होणारे एकाहून एक बहारदार नृत्याविष्कार अन् प्रत्येक सादरीकरणाला रसिकांची मिळणारी उत्स्फूर्त दाद, अशा जल्लोषमय वातावरणात खान्देश महोत्सवाची रंगत अधिक वाढली. निमित्त होते आंतरशालेय नृत्य स्पर्धेचे.

आमदार सीमा हिरे यांच्या संकल्पेतून ठक्कर डोम येथे आयोजित खान्देश महोत्सवात तिसऱ्या दिवशी आंतरशालेय नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शहारातील सुमारे ३२ शाळांच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत नृत्याविष्कार सादर केला. 'आई मला खेळायला जायचंय', 'जाऊ दे ना वं....','उगवली शुक्राची चांदणी...,' 'पिंगा गं पोरी पिंगा...' यासह इतर मराठी गाण्यांवर शालेय विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारांचे बहारदार सादरीकरण केले. दुपारी १२ ते २ या वेळात ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. खान्देश महोत्सवातील ठसकेदार पदार्थांची चव चाखण्यात दंग असलेल्या खवय्यांचे, अफलातून नृत्याविष्कारांनी लक्ष वेधून घेतले.

\Bवाहतूक सुरक्षेची जनजागृती\B

वाहतूक पोलिस युनिट क्रमांक २ च्या वतीने खान्देश महोत्सवात वाहतूक सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. हेल्मेट आणि सिट बेल्टचा वापर करण्यासोबतच वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. यात 'मी हेल्मेट वापरतो', असा सेल्फी पॉइंट तयार केला असून, नाशिककर या ठिकाणी सेल्फी आणि फोटो काढताना दिसून येत आहेत.

\Bमहोत्सवात आज

\Bसकाळी ११ वाजता महिलांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, संध्याकाळी ७ वाजता 'संगीत रजनी' हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, यासाठी प्रसिध्द मराठी अभिनेता भाऊ कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला पोलिसास दमबाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेहर सिग्नल येथील वन वे नियमांकडे दुर्लक्ष करून पुढे जाणाऱ्या वाहनचालकास थांबविणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याबरोबर दुचाकीचालकाने हुज्जत घालून दमबाजी केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करीत सरकारवाडा पोलिसांनी दुचाकीस्वारास अटक केली.

सनी पंढरीनाथ धात्रक (३० रा. क्रांतीनगर, मखमलाबादरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचारी थोरात यांनी तक्रार दिली. शुक्रवारी सकाळी थोरात मेहर सिग्नल भागात सेवा बजावत असताना ही घटना घडली. स्मार्ट सिटी रस्त्याच्या कामांमुळे मेहर ते अशोक स्तंभ आणि सीबीएस दरम्यान एकेरी वाहतूक सुरू आहे. संशयित दुचाकीस्वाराने या एकेरी मार्गात शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या थोरात यांनी त्यास मज्जाव केला. मात्र संशयितांनी थोरात यांच्याशी हुज्जत घालत त्यांना हात धरून लोटून दिले. आजुबाजुच्या नागरिकांनी पुढे येऊन धात्रकला पकडले. या प्रकरणी थोरात यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितास अटक करण्यात आली असून, अधिक तपास उपनिरीक्षक बागुल करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेवारसांच्या चेहऱ्यावर खुलले ‘स्माइल’

$
0
0

पुण्याच्या संस्थेले दिला मनमाडच्या मनोरुग्णांना आधार

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

आपल्या घरापासून, जवळच्या माणसांपासून हजारो मैल दूर आलेल्या आणि बेवारस जीवन जगणाऱ्या पाच उपेक्षित जीवांना पुणे येथील स्माइल प्लस संस्थेच्या सेवाभावी पदाधिकाऱ्यांनी मनमाड येथे येऊन आपल्या मायेच्या उबदार घरट्यात नेले. कडाक्याच्या थंडीत माणुसकीची ऊब मिळाल्याने भारावलेले हे अनाथ आता पुण्यात गेले आहेत.

दोन दिवसांपूर्वी मनमाड रेल्वे स्थानक परिसरात 'स्माइल प्लस'चे हे 'मिशन धीरज आधार' चर्चेचा विषय ठरले. या बेवारस व मानसिक स्थिती बिघडलेल्या पाच जणांवर वैद्यकीय उपचार करून त्यांना त्यांच्या घरी पोहचविण्याचा किंवा त्यांच्यासाठी मायेचे छत्र उभे करून त्यांना सांभाळण्याचा

निर्धार यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश मालखरे यांनी व्यक्त केला.

पुणे येथून स्माईल प्लस सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून योगेश मालखरे यांच्यासह एकूण दहा जणांची टीम मनमाड स्थानकात आली. मनमाड येथील टायगर ग्रुपचे चेतन बोडके, प्रतीक पगारे, तुषार ढोके व अक्षय पाटील यांनी त्यांचे कार्य पाहून त्यांना मनमाड परिसरातील मनोरुग्ण, बेवारस यांच्यासाठी काही करावे, अशी गळ घातली होती. त्यानुसार या टीमने मनमाड स्थानक परिसरातील पाच बेवारस व्यक्तींना त्यांनी आपल्या सोबत नेले. त्यात दोन पुरुष व तील स्त्रियांचा समावेश आहे.

या बेवारस लोकांना मायेची ऊब देऊ, आधार देऊ. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करून त्यांना त्यांच्या घरी पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यात बेवारस कुत्र्यांसाठी रुग्णवाहिका मिळते पण मनोरुग्ण, बेवारसांसाठी मिळत नाही ही शोकांतिका आहे.

--योगेश मालखरे, स्माइल प्लस, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरट्याला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

शहरात सुरू असलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलिसांच्या गस्ती पथकाने एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. बापू रमेश सोलंकी (रा. शिंदे) असे संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून तीन मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित सोलंकी याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images