Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नदीकिनारी असलेल्या ड्रेनेजमध्ये सुधारणा

$
0
0
ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन नदीपात्रात जाणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होते. गाळ आणि रेतीमुळे ड्रेनेज चोकअप होतात आ​​णि पाणी थेट नदीपात्रात मिसळते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन या परिसरात स्वच्छता राखण्याचे आदेश महापौर अॅड. यतीन वाघ यांनी दिले आहे.

स्मशानभूमीचा निधी मुरतोय राखेमध्ये

$
0
0
कसमादे पट्टयात शासनाच्या जनसुविधा योजनेतंर्गत तसेच खासदार आणि आमदार निधीतून स्मशानभूमीची कोट्यवधी रुपयांची कामे होतात. मात्र, सुमार दर्जाच्या बांधकामांमुळे स्मशानभूमी बांधकामांची दुरवस्था झाली आहे.

‘ढसाळ सत्तेपुढे कधीच झुकले नाहीत’

$
0
0
बाबासाहेबांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले मात्र काही काळाने तरूणाई बहकू लागली. अशावेळी समाजातल्या तळागाळातील तरूणांमध्ये नामदेव ढसाळ यांनी स्फुल्लिंग पेटवले. पँथरच्या रूपाने ढसाळांनी समाजकारण करायला सुरूवात केली.

सिम बदलण्यासाठी ग्राहकांच्या रांगा

$
0
0
नाशिक, कल्याण, धुळे, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांतील बीएसएनएल मोबाइलची सेवा १८ जानेवारीपासून खंडित झाली आहे. मात्र असंख्य ग्राहक सिमकार्ड बदलण्यासाठी बीएसएनएलच्या सेवा केंद्रांमध्ये रांगा लावत असल्याचे दिसून येत आहे.

पावसाचा द्राक्षांना फटका

$
0
0
मंगळवारी दिवसभर झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसल्याची भीती व्यक्त केली जात असून यासंबंधीची माहिती कृषी विभागाकडून गोळा केली जात आहे. अवकाळी पावसाने मंगळवारी पहाटे पासून दुपारपर्यंत नाशिक शहर परिसरासह जिल्ह्याच्या काही भागात हजेरी लावली.

रेशन दुकानदार कोर्टात

$
0
0
नाशिक शहराची लोकसंख्या वाढत असल्याने शहरात २१ नवी रेशन दुकाने सुरू करण्याचा जिल्हा पुरवठा विभागाचा प्रयत्न असतानाच रेशन दुकानदार संघटनेने याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

... तेही चढले पोल‌िसांची पायरी

$
0
0
स‌िल्व्हर ओक शाळेचे प्रशासन मुजोरी करत असून त्यामुळे न‌िष्पाप व‌िद्यार्थ्यांच्या श‌िक्षणाच्या हक्कावर गदा येत असल्याचे कारण देत श‌िक्षण उपसंचालकांनी सरकारवाडा पोल‌िस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

४ लाखांचे मोबाइल चोरीस

$
0
0
कॉलेजरोड येथील ईझी डे मॉल जवळचे न्यासा शोरूम फोडण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. तेथून आयफोन आणि आयपॉड सारख्या महागड्या वस्तू चोरीस गेल्या आहेत.

भूसंपादनाचे काम कासवगतीने

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामे करण्यासाठी ४६ भूसंपादनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यातील अवघ्या ५ प्रस्तावांवर अंतिम निवाडा झाला असून उर्वरित ४१ प्रस्तावांवर संथगतीने काम सुरू आहे.

‘भंगारा’तून ४५ लाखांची लॉटरी!

$
0
0
महापालिकेच्या मालकीच्या ५९ वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नऊ वर्षे ते ३३ वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार असून यासाठी पुढील दोन महिन्यात प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे.

रेल्वे स्टेशनवर कुत्र्यांचा सुळसुळाट

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. रेल्वे स्टेशनवर असलेल्या कुत्र्यांमुळे अनेक प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर चालणे मुष्कील झाले असून कुत्र्यांच्या भितीमुळे प्रवासी जीव मुठीत धरुन गाडीत प्रवेश करत आहेत.

टेम्पो, दुचाकीच्या धडकेत दोन ठार

$
0
0
टेंम्पो व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन टेम्पोमधील दोन कामगार ठार झाल्याची घटना बुधवारी घडली.

सोन्याला कळलं वेळेचं महत्त्व!

$
0
0
लग्नसराईची धामधूम सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच एका साखरपुड्याला जाण्याचा योग आला. कार्यक्रम सिडकोतल्या एका हॉलमध्ये होता. नियोजित वधू-वराकडील मंडळी कार्यक्रमस्थळी दाखल झाली होती. गुरुजींनीही चौरंग-पाट मांडून पूजा-विधीची तयारी पूर्ण केली होती. मुलगा ग्रामीण भागातला असल्यानं धोतर-टोपीवाल्या पाहुण्यांची ब-यापैकी गर्दी होती. सारं काही तयार होतं.

अवकाळी पावसाचा द्राक्षांना फटका

$
0
0
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संबंधीची माहिती कृषी विभागाकडून गोळा केली जात आहे.

नाशकात आठ मंत्री

$
0
0
विविध बैठक व कार्यक्रमांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह विविध आठ मंत्री आज (शुक्रवार) नाशिक दौऱ्यावर आहे. अर्धा डझनहून अधिक मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासनासह पोलिस दल गुरूवारी नियोजनात व्यस्त होते.

नाशिक: नगरसेवकांवर ना'राज'

$
0
0
नाशिक महापालिकेतील निराशाजनक कारभारावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह नगरसेवकांना मुंबईत फैलावर घेतले तर त्यावेळी नाशिकमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना शहर सुधारणेसाठी आक्रमक होण्याचा सल्ला दिला.

मनसे लागली कामाला

$
0
0
राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करताच नाशिक मनसे शहर समस्यामुक्त करण्यासाठी कामाला लागली.

पोलिसांसमोर बेकायदा पार्किंग

$
0
0
नाशिकरोड परिसरात महापालिकेने पार्किंगसाठी जागा आरक्षित केली नसल्याने पुलाखालच्या बाजारात येणाऱ्या ग्राहकांनी आपली वाहने सर्रास नाशिकरोड पोलिस स्टेशनच्या आवारात लावण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे पोलिस स्टेशन आहे की वाहनतळ, असा संभ्रम निर्माण होत आहे.

पालकमंत्र्यांवर नामुष्की?

$
0
0
फाटक्या पदरामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्री छगन भुजबळ यांना नामुष्कीचे धनी व्हावे लागण्याची शक्यता आहे.

१८ अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली?

$
0
0
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १८ अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्याबाहेर बदली होण्याची शक्यता आहे. यात अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या एक, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या पाच तर तहसीलदार दर्जाच्या १२ अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images