Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सायकलींची शोधाशोध!

$
0
0

लोगो - मटा इम्पॅक्ट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये शेअरिंग सायकलचा पूर्णतः गोंधळ उडाला असून, शहरातील सायकल पॉइंटवर सायकल दिसत नसल्याचे वृत्त 'मटा'ने सोमवारच्या अंकात प्रकाशित केले. या वृत्तानंतर स्मार्ट सिटीअंतर्गत शेअरिंग सायकलचे मेन्टेनन्स करणारी यंत्रणा खडबडून जागी झाली. सोमवारी दिवसभर शहरातील गायब झालेल्या सायकलींचा शोध घेण्यात आला. दिवसभर शहरातील सर्व अपार्टमेंटमध्ये बेवारस सायकली ताब्यात घेण्यासाठी यंत्रणेची धावपळ सुरू असल्याचे दिसून आले.

'स्मार्ट सिटी'अंतर्गत शहरात ऑक्टोबर महिन्यात मोठ्या थाटामाटात सायकल शेअरिंग प्रकल्प सुरू करण्यात आला. हा प्रकल्प दोन महिन्यांतच खिळखिळा झाला असून, शेअरिंग सायकली असूनही दिसत नसल्याची बाब 'मटा'ने उजेडात आणली. सोमवारी, १० डिसेंबरच्या अंकात 'सायकली गेल्या कुठे' हे वृत्त 'मटा'ने प्रकाशित केले. या वृत्तानंतर सोमवारी सकाळपासूनच शेअरिंग सायकलींचा शोध घेण्यासाठी स्मार्ट सिटीची यंत्रणा कार्यान्वित झाल्याचे दिसून आले. शहरातील अपार्टमेंटमध्ये लावण्यात आलेल्या सायकलींसह बेवारस आणि तुटक्या सायकली ताब्यात घेण्यासाठी दिवसभर यंत्रणेची शोधाशोध सुरू होती. गंगापूर रोड, महात्मानगर, प्रमोद महाजन गार्डन, मॅरेथॉन चौक आणि शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणच्या सायकल पॉइंटवर एकही शेअरिंग सायकल नसल्याचे, 'मटा'च्या बातमीत नमूद केले होते. त्यानुसार सकाळपासून गंगापूर रोड, कॉलेज रोडसह इतर परिसरातील अपार्टमेंट व इतर ठिकाणी लावण्यात आलेल्या सायकली ताब्यात घेण्यात आल्या. बेवारस सायकलींसह स्कॅन चिप आणि सीट तुटलेल्या सायकलीही गोळा करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच शहरात या सायकलींचा मेन्टेनन्स पाहणाऱ्या यंत्रणेने सायकल पॉइंटवरील सायकलींची तपासणी सुरू केली असून, सर्व सायकलींची दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.

\Bयंत्रणा फिरली

\Bशेअरिंग सायकल प्रकल्पाचा उडालेला बोजवारा समोर आल्यानंतर यंत्रणा फिरली. या यंत्रणेकडून सोमवारी दिवसभर बेवारस सायकली ट्रॅकिंग सिस्टिमद्वारे शोधून गोळा करण्यात आल्या असून, रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.

मटा भूमिका

नाशिककर आणि शहराच्या तंदुरुस्तीसाठी सुरू करण्यात आलेल्या सायकल शेअरिंग प्रकल्पाची अवघ्या दोन महिन्यांत झालेली वाताहत 'मटा'ने उजेडात आणली आहे. वापरानंतर काही नागरिक या सायकली स्टॅण्डवर लावण्याऐवजी स्वत:च्या घरी घेऊन जातात. तसेच, सायकली योग्य पद्धतीने हाताळल्या जात नसल्याने त्यांची मोडतोड झाल्याची बाबही निदर्शनास आली आहे. खरे तर हा प्रकल्प आपल्यासाठीच आहे हे नागरिकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. सार्वजनिक प्रकल्प यशस्वी करायचे असतील तर

नागरिकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे किमान यापुढे तरी नाशिककर सायकली काळजीपूर्वक हाताळतील आणि संबंधित यंत्रणाही दक्ष राहील एवढीच अपेक्षा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्कॉलरशिप हडपणाऱ्यांवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शासनाच्या वतीने विविध योजनांतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्कॉलरशिप हडपणाऱ्या काही शिक्षण संस्था आणि तेथे कार्यरत असणाऱ्या दोषींवर सरकारने त्वरित कारवाई करावी, असे साकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना घालण्यात आले.

अभाविपच्या कार्यकर्त्यांनी याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन स्कॉलरशिपच्या प्रक्रियेतील अनियमितता मांडली. शिष्यवृत्ती देण्यासंदर्भात सातत्याने होणारी दिरंगाई, अनियमितता, वेबसाइट व विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या समस्या वेळोवेळी मांडूनही सरकारने याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आजवर शैक्षणिक वर्ष २०१७- १८ या शैक्षणिक वर्षात हजारो लाभार्थी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. अनेक विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप संस्थांच्या हस्तक्षेपामुळे मिळत नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. समाजकल्याण व आदिवासी विभाग मिळून २१०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर यावर चौकशी आयोग नेमून ज्या शैक्षणिक संस्था व अधिकारी यांनी मिळून हा गैरव्यवहार केला त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी असे या अहवालात म्हटले होते. मात्र, अद्याप कोणत्याही शैक्षणिक संस्थेवर कारवाई केली गेली नाही व रक्कम वसूल केली गेली नाही. दरम्यान, स्कॉलरशिपचा गैरव्यवहार करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कारवाई करावी व विद्यार्थ्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती वेळेत मिळवून द्यावी, अन्यथा अभाविप तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अभाविपचे नाशिक महानगरमंत्री प्रथमेश नाईक, जिल्हा संयोजक सागर शेलार, नाशिकरोड जिल्हा संयोजक दुर्गेश केंगे, नगरमंत्री अजय कनोजे, आदित्य आढाव, सुयश सोनी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस महासंचालक शहरात दाखल

$
0
0

नाशिक : महाराष्ट्र पोलिस अकादमीवर ड्रोन फिरल्याची गंभीर दखल राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी घेतली आहे. त्यामुळेच ते तातडीने सोमवारी (१० डिसेंबर) सायंकाळी शहरात दाखल झाले. पोलिस अकादमीच्या सुरक्षा व्यवस्थेबरोबरच शहर पोलिसांची कामगिरी, पोलिस अकादमीचे कामकाज, ग्रामीण पोलिसांची कामगिरी आदींचा मंगळवारी (दि.११) सकाळी ते आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर आणि ग्रामीण पोलिसांची तयारी सुरू होती.0

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३१० मतदान केंद्र निश्चित

$
0
0

नाशिकमध्ये १६२ तर जिल्ह्यात १२५ ठिकाणी व्यवस्था

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंन्ट बँकेच्या (नामको) २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३१० मतदान केंद्र निवडणक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांनी निश्चित केले आहे. नाशिक शहरात १६२, जिल्ह्यातील ग्रामीण भागात १२५ तर जिल्ह्याबाहेर २१ मतदान केंद्र असणार आहे. तसेच हैद्राबाद व सूरत येथेही प्रत्येकी १ मतदान केंद्र असेल.

निवडणुकीसाठी १ लाख ७६ हजार २६२ मतदार आहे. त्यातील ९३ टक्के मतदान हे नाशिकमध्ये आहे तर उर्वरित ७ टक्के मतदान हे जिल्ह्याबाहेर आहे. या मतदान केंद्रात सकाळी ८ ते ५ या वेळात हे मतदान करण्यासाठी वेळ निश्चित केली आहे. या मतदानासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या ओळखपत्रांपैकी फोटो असलेले ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. मतदानासाठी २२०० कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यात पुरुष पोलिस ३०० तर महिला पोलिस १०० याप्रमाणे ४०० पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्याबाहेर २६ जिल्ह्यात ११ हजार ६७२ मतदान असले तरी जास्त मतदान असलेल्या ठिकाणीच हे मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. श्रीरामपूर येथे ३ मतदान केंद्र असणार आहे. त्यानंतर पुणे, अहमदनगर, राहता, संगमनेर, येथे प्रत्येकी दोन तर धुळे, मुंबई, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, राहुरी, येथे प्रत्येकी एक मतदान केंद्र असणार आहे. उर्वरित जिल्ह्यातील मतदार मात्र त्यांना जवळ असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करू शकणार आहे.

शहरात १६२ मतदान केंद्र

नाशिकमध्ये १६२ मतदान केंद्र आहेत. यात आडगाव येथे मनपा शाळा क्रमांक ६९, मनपा शाळा क्र. १०, उन्नती विद्यालय, (पंचवटी), मनपा शाळा क्र. २९ हिरे विद्यालय (मखमलाबाद), मनपा शाळा (म्हसरुळ), बालशिक्षण मंदिर, (गोरेराम लेन) मनपा शाळा (बुधवार पेठ) सागरमल मोदी, प्राथमिक शाळा (नेहरू गार्डन) वसंतराव नाईक संस्था, (शरणपूर रोड), बी. डी. भालेकर स्कूल, रवींद्र विद्यालय, (द्वारका), सावित्रीबाई फुले विद्यालय (पखाल रोड), मनपा शाळा क्र. १७ (गांधीनगर) मनपा शाळा क्र. ४६ (उपनगर) पुरुषोत्तम इंग्लिश मीडियम स्कूल, (जेलरोड), देवळाली कॅम्प, मराठी मुलींची शाळा, नूतन शिक्षण संस्था, (भगूर) मनपा क्र. शाळा (सिडको), पेठे हायस्कूल (सिडको), मनपा शाळा क्र. ८०, ८१ (कामटवाडे), स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, (इंदिरानगर), मनपा शाळा क्र. ७२ (अंबड), मनपा शाळा (मखमलाबाद), जिल्हा परिषद शाळा, (गिरणारे) येथे मतदान केंद्र आहे.

जिल्ह्यातील मतदान केंद्र

पेठ, सटाणा, ताहाराबाद, ब्राह्मणगाव, सुरगाणा, सिन्नर, कळवण, अभोणे, देवळा, उमराणे, संगमेश्वर (मालेगाव), मालेगाव कॅम्प, मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड, वडाळीभोई, वडनेर भैरव, दिंडोरी, वणी, त्र्यंबकेश्वर, हरसूल, घोटी, इगतपुरी येथे मतदान केंद्र असणार आहेत.

निफाडला २३ मतदान केंद्र

नाशिक पाठोपाठ निफाड तालुक्यात सर्वाधिक मतदार केंद्र आहे. या तालुक्यात २३ हजार ७०७ मतदार आहे. त्यासाठी २३ मतदान केंद्रे आहेत. यात चांदोरी, खेरवाडी, चितेगाव, सायखेडा, भेंडाळी, सोनगाव, चाटोरी, बेरवाडी, पिंपळगाव निपाणी, शिंगवे, करंजगाव, म्हाळसाकोरे, लासलगाव, खेडलेझुंगे, विंचूर, देवगाव, ओझर मिग, पिपंळगाव बसवंत, नांदुर्डी, निफाड, धारणगाव वीर, कसबे सुकेणे, दावचवाडी असणार आहे.

राज्याबाहेरील मतदारांची अडचण

राज्याबाहेर या निवडणुकीत ९३२ मतदार आहेत. त्यातील गुजरातमधील ७९२ व आंध्र प्रदेशातील १२५ मतदान आहे. त्यामुळे येथे मतदान केंद्र देण्यात आले आहे. पण, उर्वरित मध्य प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, तामीळनाडू, बिहार या राज्यातील मतदारांना निश्चित केलेल्या मतदान केंद्रात मतदान करता येणार आहे. पण, त्यासाठी त्यांना अगोदर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र द्यावे लागणार आहे.

निवडणूक रंग : नामको बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक सायकलिस्टच्या एनआरएमची दुसरी वर्षपूर्ती

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा उपक्रम असलेल्या एनआरएम सायकलिंग अर्थात नाशिक रँडोनर्स मायलर्स या उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची उत्साहात सांगता झाली.

एक महिन्यात एक याप्रमाणे दोन वर्षांत २४ राईड्स पूर्ण झाल्या असून यामध्ये नाशिकला सलग १२ राईड्स पूर्ण करणारे रवींद्र चांदोरे, शिशिर आचार्य, पूर्वांश लखनानी, धर्मराज जगधाने असे ४ प्लॅटिनम रायडर्स मिळाले आहेत. तर सलग ३ राईड्स पूर्ण करणारे एकूण १८ सिल्वर रायडर्स, सलग ६ राईड पूर्ण करणारे ७ गोल्ड रायडर्स, ९ राईड्स पूर्ण करणारे ४ डायमंड रायडर्स नाशिक सायकलीस्टने मिळविली आहेत.

एनआरएमच्या दुसऱ्या पर्वाची अखेरची राईड पूर्ण झाल्यानंतर रविवारी झालेल्या समारंभात पदक वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सर्वात तरुण आशियायी महिला आयर्नगर्ल ठरलेली रविजा सिंगल, नाशिकचा पहिला आयर्नमॅन अमर मियाजी, आयर्नमॅन चेतन अग्निहोत्री, डॉ. पिंपरीकर, अल्ट्रा सायकलीस्ट डॉ. हितेंद्र महाजन, लेफ्ट. कर्नल भारत पन्नू, आयर्नमॅन मशीन मुस्तफा, अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया आणि एनसीएफ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रविजा सिंगल हिने आपले स्पर्धेतील अनुभव सांगितले. डॉ. सिंगल म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनशी जोडला गेलो आहे. इथे खूप उत्साही लोक आहेत. जसपालसिंग विर्दी यांच्या संपर्कात आल्यावर सायकलिंगला खरी सुरुवात केली. लेफ्ट. कर्नल भारत पन्नू, आयर्नमॅन चेतन अग्निहोत्री, अमर मियाजी यांनीही आपापले अनुभव मांडले. डॉ. महाजन यांनी एनआरएमचा इतिहास सांगताना जसपालच्या आठवणींना उजाळा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलित पॅँथरतर्फे घरकुलासाठी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शासकीय जागांवर वसलेल्या झोपडपट्ट्यांमधील पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा तसेच घरकुलाच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करावी, या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दलित पॅँथरच्या नेतृत्वाखाली सोमवारी झोपडपट्टीवासीयांनी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासमोर मोर्चा काढत तीव्र निदर्शने केली. शासनाच्या जागांवरील झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना घरकुलांचे लाभ दिले जावेत. पंचवटीतील प्रभाग २ मधील सावित्रीबाई फुलेनगर वसाहत येथील घरकुलापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जावा, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रायपोर्टसाठी लासलगावात चाचपणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर सरकारच्या महत्त्वाकांक्षी ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर घडामोडी सुरू आहेत. ई वाय एंटरप्रायजेसच्या प्रतिनिधींकडून सोमवारी कांद्याची जागतिक बाजारपेठ असणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पदाधिकारी व व्यापाऱ्यांकडून माहिती घेतली. जिल्ह्यात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून ड्रायपोर्ट विकसित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सोमवारी लासलगाव येथील बाजार समितीमध्ये ई वाय एंटरप्रायजेसच्या प्रज्ञा प्रियदर्शनी आणि ऐश्वर्या मुळे यांच्या शिष्टमंडळाने लासलगावमधून निर्यातीची माहिती घेऊन चाचपणी केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये नाशिक जिल्ह्यात ५०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या ड्रायपोर्टला मान्यता दिली. जेएनपीटीच्या माध्यमातून ईवाय एंटरप्रायजेसने लासलगावमध्ये सोमवारी पाहणी केली. या प्रकल्पानंतर गुंतवणुकीनुसार जेएनपीटीला प्रतिसाद कसा असेल, तो चालेल का, अशा काही मुद्द्यासाठी ही भेट होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार याबाबत माहिती घेऊन अहवाल सादर करायचा आहे.

कांद्यासाठी आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची बाजारपेठ म्हणून लासलगाव ओळखले जाते. कांद्याबरोबरच डाळिंब, टोमॅटो, द्राक्ष, भाजीपाला, मका आणि भुसार मालासाठी लासलगाव अग्रेसर आहे. कांदा, आंबा, डाळी, मसाले यासह अनेक पिकांवर विकिरण प्रक्रिया लासलगाव येथील केंद्रामध्ये केली जाते. दरवर्षी लासलगावमधून ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, गल्फ कंट्री आदी ठिकाणांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल निर्यात केला जातो. लासलगाव शहरामध्ये मध्य रेल्वेची सुविधा असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा पाठविला जातो. त्यामुळे लासलगावमध्ये जर या ड्रायपोर्टची सुविधा सुरू करण्यात आली तर त्याचा पिंपळगाव बसवंत, निफाड, चांदवड, मनमाड, उमराणे, झोडगे, धुळे येथील बाजार समितीच्या घटकांना फायदा होईल, असेही मत व्यापारी वर्गाने मांडले.

या वेळी बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती संदीप दरेकर, सचिव बी. वाय. होळकर, कांदा निर्यातदार नितीन जैन, ओमप्रकाश रांका, मनोज जैन, ऋृषभ रांका, सागर जैन, राजाराम सांगळे, संजय सांगळे, वेफकोचे अध्यक्ष संजय होळकर, दाणा व्यापारी रूपेश चोरिडया, मुख्य लेखापाल नरेंद्र वाढवणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ हजार जणांना नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मिळकत सर्वेक्षणात कर जंजाळातून दूर असलेल्या ६२ हजार मिळकतींना नोटिसा पाठवण्याच्या कारवाईला सर्वपक्षीयांचा विरोध होत असतानाच, महापालिकेच्या करविभागाने नोटिसा पाठविण्याच्या कारवाईला गती दिली आहे. चालू आठवड्यात ४२ हजार नोटिसा पाठविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यातून ज‌वळपास सव्वाशे कोटींपर्यंत उत्पन्न पालिकेला अपेक्षित आहे. मिळकतींवर कर आकारणी करताना महासभेने मंजुरी दिलेल्या अठरा टक्के वाढीसह करयोग्य मूल्य दरातील वाढ समाविष्ट करून नोटिसा बजावल्या जात असल्याने मिळकतधारकांचा गोंधळ अधिकच वाढला आहे.

महापालिकेच्या विविध कर विभागाने यंदा अडीचशे कोटी रुपये मिळकत करातून महसुलाचे उद्दीष्ट निश्‍चित केले आहे. नियमित मिळकतीतून सव्वाशे कोटी आणि मिळकत सर्वेक्षणातून आढळलेल्या ६२ हजार मिळकतींतून सव्वाशे कोटी रुपये उभे करण्याचा प्रयत्न आहे. मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या ६२ हजार मिळकतींना नोटिसा पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. यातील आतापर्यंत ३० हजार मिळकतींना लाखोंच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. चालू आठवड्यात आणखीन १२ हजार नोटिसा पाठविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नोटिसा पाठविण्यात येत असलेल्यांमध्ये बहुतांश मिळकती कपाटांच्या प्रकरणात अडकलेल्या आहेत. पंरतु, कंपाउंडिंग पॉलिसीमध्ये प्रस्ताव दाखल झाल्यानंतरही अशा इमारतींना नोटिसा पाठविल्या जात आहेत. नगररचना विभागाकडून माहिती मिळत नसल्याने नोटिसा पाठवून किमान पडताळणी करण्याचा कर विभागाचा प्रयत्न आहे. मनुष्यबळाची कमतरता व करयोग्य मूल्य दरवाढीतून निर्माण झालेल्या वादामुळे मिळकतधारकांना नोटिसा पोहोचल्या नाहीत. परंतु, आता नोटिसा पाठविण्याच्या कारवाईला गती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करवाढ मागे घेण्यासाठी भाजप-सेनेचा रेटा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने नवीन मिळकतींना लाखोंच्या घरपट्ट्या पाठविण्यास सुरुवात केल्यानंतर नागरिकांचा राजकीय पक्षांवरील दबाव वाढला आहे. त्यामुळे करयोग्य मूल्याबाबत तुकाराम मुंढे यांनी महासभेला डावलून काढलेला आदेश क्र. ५२२ रद्द करण्यासाठी नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सर्वपक्षीयांनी रेटा लावला आहे. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने, तसेच भाजपच्या आमदार सीमा हिरेंनी सोमवारी आयुक्त गमेंची भेट घेऊन अन्यायकारक करवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.

मुंढे यांनी नाशिककरांवर लादलेल्या एकतर्फी करवाढीच्या नोटिसा नागरिकांच्या हातात पडल्यानंतर नागरिक भयभीत झाले आहेत. पहिल्या टप्प्यात ६२ हजार मिळकतींना नोटिसा पाठविल्या जात आहेत. शहरातील २.६९ हजार मिळकतीही मुंढेंनी अनधिकृत ठरवल्या आहेत. त्यामुळे नाशिककर दहशतीखाली असतानाच, मुंढेंची बदली होऊन पालिकेत आता नूतन आयुक्त आले आहेत. त्यामुळे मुंढेंच्या काळात झालेल्या सर्व विषयांचा फेरआढावा घेण्याची मागणी केली जात असून, ही करवाढ मागे घेण्याबाबतही आयुक्तांना साकडे घातले जात आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर महापालिकेकडून ६२ हजार मिळकतींना बजावल्या जात असलेल्या घरपट्ट्यांच्या नोटिसा थांबविण्याची मागणी केली. आयुक्तांनी यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

आमदार हिरेंनी घेतली भेट

महापालिकेने केलेली अवाजवी करवाढ रद्द करण्यासाठी आमदार सीमा हिरे यांनीही सोमवारी आयुक्त गमेंची भेट घेतली. यावेळी नगरसेवक नीलेश ठाकरे, नगरसेविका प्रतिभा पवार, अलका अहिरे, माधुरी बोलकर, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग, पुष्पा आव्हाड, पल्लवी पाटील, दिलीप देवांग उपस्थित होते. नागरिक दडपणाखाली असून मनपा प्रशासनाकडून रोज नोटिसा काढल्या जात आहेत. कधी अतिक्रमण विभागाची धास्ती तर कधी मिळकत व विविध कर विभागाकडून मिळकतींवर अन्यायकारक कर आकारणी. सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावरील नवीन इमारतींना बांधकामासाठी कपाटांच्या तांत्रिक मुद्द्यावरुन पूर्णत्वाचा दाखला मिळाला नसल्याने त्या सर्व इमारती अनधिकृत ठरवून विविध कर विभागाने सरसकट तिप्पट दंडात्मक आकारणीच्या नोटिसा पाठवल्या. ही तिप्पट करआकारणी थांबवण्याची मागणी हिरे यांनी केली.

रद्द कामे पुन्हा घ्या

उपमहापौर प्रथमेश गिते यांनीही सोमवारी आयुक्त गमेंची भेट घेऊन महासभा व स्थायी समितीने मंजूर केलेली परंतु, मुंढेंनी त्रिसूत्रीच्या नावाने रद्द केलेली कामे पुन्हा तातडीने सुरू करण्याची मागणी केली. शहरातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा या कामांचा पाठपुरावा करून नगरसेवकांनी ती मंजूर केली. निविदा प्रक्रियाही राबवली. परंतु, मुंढे यांनी अचानक या कामांना ब्रेक लावला. त्यामुळे रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा व उद्यानांचा प्रश्न बिकट बनला आहे. महासभा, स्थायी समितीने प्रभागातील मंजूर केलेली कामे तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...जेव्हा पंतप्रधान मनीऑर्डर नाकारतात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नैताळे येथील शेतकऱ्याने पंतप्रधानांना पाठविलेली १०६४ रुपयांची मनिऑर्डर दिल्लीतील पीएमओ कार्यालयाने परत पाठविली आहे. सोमवारी नैताळे पोस्ट ऑफिसमध्ये संबंधित शेतकऱ्याला बोलावून ही रक्कत परत देण्यात आली. कांद्याच्या लिलावातून आलेली तुटपंजी रक्कम संबंधित शेतकऱ्यांने मोदींना पाठविली होती. मात्र याबाबत दिल्ली सरकारने कोणतीही शेतकऱ्याची व्यथा समजून न घेता ही रक्कम परत पाठवून कांदा उत्पादकांची खिल्ली उडविली आहे, अशी भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

निफाड बाजार समितीत नैताळे येथील संजय साठे यांच्या कांद्याला १५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. त्यामुळे हताश झालेल्या साठे यांनी कांद्याचे १०६४ रुपये हाती पडल्यावर निफाड पोस्ट कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनिऑर्डर पाठविली होती. त्यांच्या या मनिऑर्डरची खूप चर्चा झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून साठे यांची सखोल चौकशी करण्यात आली. सोमवार (दि.१०) नैताळे पोस्ट कार्यालयात साठे यांना बोलावण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाकडून परत आलेली मनिऑर्डर त्यांना परत करण्यात आली. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून ही मनिऑर्डर न स्वीकारल्याची कोणतीही पवती दिली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरसूलमध्ये शनिवारी साहित्य संमेलन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक, कला, क्रीडा, साहित्य व संस्कृती संवर्धन मंडळ इगतपुरी तालुका व साहित्य परिषद प्रकाशन संस्था आहुर्ली, (ता. इगतपुरी) यांच्यातर्फे सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे साहित्य संमेलन नगरी, महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय हरसूल येथे यंदाचे सातवे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन शनिवारी (दि. १५) होणार आहे.

संमेलनाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरु प्रा. डॉ.एन.एस उमरानी यांच्या हस्ते तर सुप्रसिध्द दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. संमेलनाचा प्रारंभ सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित, माजी आ. काशीनाथ मेंगाळ, शिवराम झोले, जि. प. उपाध्यक्षा नयना गावित, जि. प. सदस्य रूपांजली मालेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रथम उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक हभप देवीदास वारुंगसे, सूत्रसंचलन प्रा. डॉ. पी. शेवाळे, प्रा. एस. के. सानप करणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता प्रा. डॉ.संजय लोहकरे, अमरावती यांचे 'स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान' या विषयावर व्याख्यान होईल. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती व संस्थाचा विविध आदर्श पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. साहित्य परिषद प्रकाशन यांच्या वतीने प्रसिद्ध साहित्य संमेलन विशेषांक, पुस्तक व कॅलेंडर प्रकाशन सोहळा रंगणार आहे.

दुपारी १ वाजता नाशिक येथील जे. डी. आर्ट महाविद्यालयाचे चित्रकार विद्यार्थी कलाकारांचे चित्र प्रदर्शन भरणार असून त्याचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत सावळीराम तिदमे यांच्या हस्ते होईल. या प्रदर्शनात विनोद जमधडे, सिद्धार्थ माछी, चेतन पाटील, वैभव गायकवाड, विजय देवकर आदींचा सहभाग असेल. त्यानंतर मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रम होतील. यात डॉ. देवराम गायकवाड देवगावकर यांचे भारुड, तर जादूगार रूपचंद डगले यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.

दुपारी २ वाजता कथाकथन सत्र होईल. त्यानंतर संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. जयप्रकाश घूमटकर यांची 'कोळी वाडा ते नागपाडा : एक प्रवास' या विषयावर प्रकट मुलाखत होईल. ३ ते ५ या वेळेत भव्य राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा होईल. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भास्कर म्हरसाले, सुभाष सबनीस व भीमराव कोते पाटील हे करतील. ज्येष्ठ साहित्यिक शरद पुराणिक व देवीदास खडताले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा होईल. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी अलका कोठावदे या तर प्रमुख पाहुणे म्हणून मनीषा कुलकर्णी व प्रा. डॉ. मोरे उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवास साहित्यिक साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक नवनाथ गायकर व परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

लोगो : कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेट बँकेत हॅकर्सचा डल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

भारतीय स्टेट बँकेच्या अशोकनगर व एमआयडीसी सातपूर येथील दहा ते बारा खातेदारांचे पैसे ठाणे, गया आदि ठिकाणच्या एटीएममधून काढून परस्पर काढून घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. खात्यातून इतर ठिकाणाहून पैसे काढले गेल्याचा मेसेज आल्यानंतर ग्राहकांनी बँकेत विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असल्याने ग्राहकांचा या बँकेवर विश्वास आहे. मात्र, या बँकेलाही हॅकर्सनी लक्ष्य केले असून, ग्राहकांच्या पैशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. सातपूर, अशोकनगर भागातील काही खातेदारांना मंगळवारी विविध ठिकाणच्या एटीएममधून पैसे काढण्यात आल्याचे मेसेज आले. यामुळे घाबरलेल्या खातेदारांनी बँकेत धाव घेतली. मात्र, बँकेतून त्यांच्या तक्रारीचे निरसन न करता पोलिस स्टेशनला जाण्याचा सल्ला तेथील अधिकाऱ्यांनी दिला. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे सोमवारी रात्री ८ वाजेनंतर व मंगळवारी पहाटे ६ वाजेच्या आत एका रात्रीतून काढण्यात आले आहेत.

हाफिजा पिंजारी यांचे स्टेट बँकेच्या सातपूर एमआयडीसी शाखेत खाते आहे. सोमवारी रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी त्यांच्या खात्यातून १० हजार रुपये काढले गेल्याचा मेसेज आला. पुन्हा ८ वाजून १२ मिनिटांनी त्याच एटीएममधून १० हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. याबाबत हाफिजा यांचे पती जावेद पिंजारी यांनी बँकेत धाव घेऊन याबाबत विचारणा केली.

साहेबराव कोरडे हे सीआरपीएफमधून निवृत्त झालेले असून, त्यांच्याही खात्यातून ८ डिसेंबरला सातपूरच्या स्टेट बँकेच्या खात्यातून मंगळवारी पहाटे ५ वाजता आधी २० हजार रुपये काढले गेले व नंतर पुन्हा २ हजार ५०० रुपये काढण्यात आले. सोनू पाथी यांच्या खात्यातूनही मंगळवारी पहाटे खात्यातून आधी २० हजार व नंतर ६ हजार रुपये काढण्यात आले. हे पैसे परत मिळण्यासाठी खातेदारांनी बँकेत गर्दी केली. मात्र, बँकेने त्यांना पोलिस स्टेशनमध्ये जाण्याचा सल्ला दिला. या ग्राहकांनी पोलिस स्टेशन गाठून परस्पर पैसे काढण्यात आल्याची तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर फसवणूक

$
0
0

बँकेचे कार्ड क्लोन करून परस्पर परजिल्ह्यात पैसे काढण्यात आल्याचा हा प्रकार दिसतो. याबाबत तीन ते चार तक्रारदारांनी पोलिस स्टेशनशी संपर्क साधला असून, त्यांचे अर्ज दाखल करून घेतले असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

- देवराज बोरसे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस स्टेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वच्छ’ सर्वेक्षणाची तयारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात जानेवारी २०१९ स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येणार असून, नाशिकमध्ये केंद्राचे पथक स्वच्छतेच्या पाहणीसाठी येत्या ४ ते ३१ जानेवारीदरम्यान दाखल होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. पालिकेच्या वतीने या सर्वेक्षणासंदर्भात जनजागृती सुरू करण्यात आली असून, ठिकठिकाणी फलक लावण्यात येत आहेत. गेल्या वेळी अमृत योजनेतील पाचशे शहरांमध्ये पालिकेचा ६३ वा क्रमांक लागला होता. परंतु, यंदा यंदा महापालिकेची स्पर्धा देशभरातील ४२०३ शहरांसोबत होणार असल्याने सध्याचा क्रमांक टिकवून ठेवण्याचे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष आहे. पहिल्या वर्षी देशभरातील ७३ शहरांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत नाशिकचा ३१वा क्रमांक आला होता. दुसऱ्या वर्षी ४७४ शहरांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत नाशिकची क्रमवारी १५१ व्या क्रमांकावर घसरली होती. गेल्या वर्षी नाशिकला ४१४१ शहरासोबत स्पर्धा करावी लागली होती. सोबतच केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या ५०० शहरांच्या स्वतंत्र वर्गवारीत नाशिकचा क्रमांक ६३ वर आला होता. परंतु, चार हजार शहरांमध्ये मात्र तो तळाला गेला होता. मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दहामध्ये नाशिकचा क्रमांक यावा अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतरही नाशिकचा क्रमांक घसरला होता. त्यामुळे यंदा हा क्रमांक वर येण्यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यंदा महापालिकेची स्पर्धा देशभरातील ४२०३ शहरांसोबत होणार असल्याने पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. या स्पर्धेसाठी पाच हजार गुण ठेवण्यात आले आहेत. गेल्या वेळी महापालिका जनजागृती करण्यात आणि नागरिकांच्या प्रतिसादात कमी पडली होती. त्यामुळे यंदा डिसेंबरमध्येच जनजागृतीला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत संपूर्ण महापालिका क्षेत्रात जनजागृतीपर प्रबोधनात्मक डिजिटल बॅनर्स, होर्डिंग्ज उभारले जात आहेत. सोबतच नागरिकांना हस्तपत्रके, स्टिकर्सद्वारे अभियानाची माहिती दिली जाणार आहे. कचऱ्याचे वर्गीकरण, उघड्यावर शौचास प्रतिबंध, स्वच्छ व साफ शौचालये, कचरा इतरत्र न फेकणे यासाठी प्रबोधनात्मक रथाद्वारे जनजागृती केली जाणार आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी भिंतींवर प्रबोधनात्मक रंगकाम केले जाणार आहे.पहिल्या दहा मध्ये नाशिकला आणण्यासाठी आरोग्य विभागाने जोरदार तयारी केली आहे.

असे असेल गुणांकन

महापालिकेची सेवा- १२५० गुण

कचरामुक्त शहरासाठी - १२५० गुण

केंद्राच्या पथकाहाती गुण- १२५० गुण

नागरिकांचा प्रतिसाद - १२५० गुण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीच्या चर्चेत काँग्रेसचा वरचष्मा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

काँग्रेसने तीन राज्यांमध्ये मारलेल्या मुसंडीचे महाराष्ट्राच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभा जागांबाबत सुरू असलेली बोलणी काँग्रेस नेतृत्वाने मध्येच स्थगित केली होती. ११ डिसेंबरनंतरच ही बोलणी होऊ शकतात, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते. आता तीन राज्यांमध्ये काँग्रेसची जोरदार घोडदौड पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसला हव्या त्या व हव्या तेवढ्या जागा काँग्रेसकडून सोडल्या जाण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २४-२४ किंवा २५-२३ असा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला होता. राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघांमध्ये या दोन्ही पक्षांमध्ये वाद होता. काही मतदारसंघांमध्ये अदलाबदल करण्याची मागणी काँग्रेसकडून होती तर काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत होती. राष्ट्रवादी काँग्रेसला आता हव्या त्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर मनातून राग असणरे अनेक नेते काँग्रेसमध्ये आहेत. त्यात राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. काँग्रेसचा राजकारणातील वाढलेला प्रभाव पाहता, आता या नेत्यांना बळ मिळणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांमध्ये सुरू होणाऱ्या जागावाटपाच्या चर्चांमध्ये काँग्रेसचा वरचष्मा राहणार आहे.

दुसरीकडे या पाच राज्यांमधील निकालांकडे डोळे लावून बसलेल्या शिवसेनेकडूनही भाजपसोबत बोलणी करताना अधिक कठोर सूर लावला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत अत्यंत चांगले राजकीय संबंध ठेवले असले तरी शिवसेना येत्या लोकसभा निवडणुका व मुख्य म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभांसाठी जोरदार मोर्चेबांधणी या निकालांनंतर करणार असल्याचे शिवसेनेच्या गोटात बोलले जाते. लोकसभेला शिवसेनेसोबत युती करण्यास भाजप अत्यंत आसुसलेला आहे. मात्र लोकसभेपेक्षा विधानसभेत शिवसेनेला अधिक रस आहे. त्यामुळे लोकसभेची बोलणी यशस्वी झाल्यानंतर विधानसभेला शिवसेना फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला मान्य करेल किंवा कसे, याबाबत शिवसेना नेतृत्वाच्या मनात शंका आहेत. त्यामुळे लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका घेण्याचा आग्रह शिवसनेकडून होऊ शकतो. तसेच विधानसभेला समसमान जागा वाटप केल्याशिवाय तर लोकसभेलाही युती होऊ शकत नाही. २०१४च्या निवडणुकीत भाजपच्या १२३ जागा निवडून आल्या होत्या, तर सेनेच्या ६३ अशा वेळी समसमान म्हणजे प्रत्येकास १४४ जागांचे वाटप करायचे असल्यास भाजपला मोठा त्याग करावा लागणार आहे, तसेच इतर छोट्या मित्र पक्षांचीही नाराजी पत्करावी लागणार आहे. मात्र पाच राज्यांमधील निवडणूक निकालांमुळे शिवसेना भाजप नेतृत्वाला नाक मुठीत धरायला लावणार असल्याची चर्चा शिवसेनेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीएम चषकासाठी ३३ हजार खेळाडूंची नोंदणी…

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे आयोजित सीएम चषक क्रीडा व कला स्पर्धेस पूर्व विधानसभा मतदार संघात उदंड प्रतिसाद लाभला असून, आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आठ क्रीडा व चार कला प्रकार आहेत.

नाशिकपूर्व विधानसभा मतदारसंघात १४ डिसेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत तपोवन येथे क्रिकेट, १५ व १६ डिसेंबर दरम्यान श्रीराम विद्यालय, सेवाकुंज, पंचवटी येथे कब्बडी, खो-खो, व्हॉलीबॉल, कॅरम व कुस्ती स्पर्धा होणार आहेत. १६ डिसेंबर रोजी १०० मी व ४०० मी धावणे ही स्पर्धा स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकूल, पंचवटी येथे होतील. २२ व २३ डिसेंबर रोजी गायन व नृत्य स्पर्धा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, स्वामी नारायण नगर, औरंगाबाद नाका, पंचवटी येथे होतील. २३ डिसेंबर रोजी भाजीबाजार, पटांगण रामघाट, पंचवटी येथे व नाशिकरोड विभागासाठी शिखरेवाडी हॉल, नाशिक रोड येथे रांगोळी स्पर्धा होतील. २५ डिसेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक पंचवटी आणि नाशिकरोड भागासाठी राजराजेश्वरी मंगल कार्यालय येथे चित्रकला स्पर्धा होतील. स्पर्धेचे उद्घाटन १५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता श्रीराम विद्यालय, पंचवटी होणार आहे. महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. जास्तीत जास्त खेळाडू व विद्यार्थी महिला भगीनींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन भाजपातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहिदांच्या वारसांना एसटीत नोकरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मातृभूमीच्या संरक्षणार्थ शत्रूशी लढताना शहीद झालेल्या संरक्षण दलातील अधिकारी व जवानांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सामावून घेण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंर्तगत या घटकांना एसटी महामंडळात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहीद जवानांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विचाराधीन होते. अशा जवानांप्रतीचा आदर जपतानाच त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाने याबाबतचे आदेश जारी केले असून नाशिक विभागालाही हे आदेश प्राप्त झाले आहेत. देशाच्या सिमांवर मातृभूमीचे रक्षण करताना जवानांना शत्रूशी दोन हात करावे लागतात. यामध्ये जवानांना वीरमरण प्राप्त होते अशा शहीद झालेल्या संरक्षण दलातील अधिकारी आणि जवानांच्या वारसांना शहीद सन्मान योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अशा वारसांना सरकार मान्यतेने वर्ग तीन प्रवर्गात नेमणूक मिळू शकणार आहे. वर्ग तीनची पदे वगळता अन्य पदांसाठी शहिदांच्या वारसांना अर्ज करता येणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे.

अर्ज पाठविण्याचे आवाहन

शहीद झालेल्या जवानांच्या पाल्यांना एक वर्षांच्या कालावधीत नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. परंतु, शहिदांचे पाल्य अर्ज करण्यासाठी पात्र नसतील अथवा त्यांच्याकडे आवश्यक ती शैक्षणिक अर्हता नसेल तर अहर्ता प्राप्त केल्यापासून एक वर्षाच्या आत सुयोग्य पदासाठी अर्ज करण्याची मुभा त्यांना असणार आहे. अनुकंपा तत्वावर नोकरी देताना कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी आहे. एन. डी. पटेल रोडवरील नाशिक विभागीय कार्यालयात याबाबतची अर्जप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली असून कामकाजाच्या वेळेत आस्थापना शाखेतून अर्ज घ्यावेत, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.

महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबतचे निर्देश प्राप्त झाले आहेत. शहीद जवानांच्या वारसांनी आमच्या कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत. शैक्षणिक अहर्तेनुसार पात्र लाभार्थींना वर्ग तीन म्हणून नोकरीची संधी मिळू शकेल.

- नितीन मैंद, विभाग नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढेंच्या बदलीमुळे वाहतुकीचे प्रश्न मार्गी?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ट्रॅफिक सिग्नल्स, प्रमुख चौकांचे सुशोभिकरण, धोकादायक स्पीड ब्रेकरऐवजी आधुनिक रॅम्बलर टाकणे अशा विविध वाहतुकीसंबंधी रखडलेच्या कामांच्या प्रस्तावास चालना देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या महत्त्वाच्या कामांना कात्री लावत नागरिकांनाच शिस्त पाळण्याचे आवाहन केले होते.

शहरात वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियोजन करतात. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून दंडात्मक स्वरूपात मिळालेले पैसे शासनदरबारी जमा करण्यात येतात. वाहतुकीबाबत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम पोलिसांकडे नाही. हे काम स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिका करीत असते. वाहतूक पोलिस वेळोवेळी सर्व्हे करून कोणत्या चौकात सिग्नल्सची, स्पीड ब्रेकरची अथवा इतर पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे याची नोंद करतात. यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून महापालिकेला सादर केला जातो. या प्रस्तावावर पुढे महापालिका प्रशासन काम करते. याच माध्यमातून शहर पोलिसांनी शरणपूररोड सिग्नल सुशोभिकरणाचे काम हाती घेतले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढे शहरातील किमान १७ चौक या पद्धतीने तयार करण्यात येणार होते.

शहरातील गंगापूररोड, महात्मानगर अशा काही रस्त्यांवर बिल्कर्स बसविण्यात आले. धोकादायक स्पीड ब्रेकरला रम्बलर हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. पोलिस आणि महापालिका प्रशासन परस्पर सामज्यातून ही कामे पूर्णत्वास नेत होती. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत होती. तसेच वाहनचालकांनाही नियमांची जाणीव होत होती. मात्र, मुंढे यांनी या कामांना खीळ घातली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने हे सर्व प्रस्ताव बासनात गुंडाळले. काही दिवसांपूर्वी सरकारने मुंढेंची बदली केली. नवीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पदभार स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने रखडलेल्या प्रस्तावांना गती देण्यासाठी चाचपणी सुरू आहे. यावेळी नूतन महापालिका आयुक्त पोलिसांबरोबर हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार काय, याची उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राजक्ता बियाणी नेट जेआरएफ उत्तीर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील आरवायके कॉलेजची माजी विद्यार्थिनी प्राजक्ता प्रमोद बियाणी हिने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणाऱ्या सीएसआयआर नेट परीक्षेत यश मिळविले आहे.

जून २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या या राष्ट्रीय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 'लाईफ सायन्स' या विषयात प्राजक्ताला ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळाली असून त्यासाठी अखिल भारतीय स्तरावर तीला ६८ वे मानांकन मिळाले आहे. प्राजक्ता सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) भोपाळ या संस्थेत एम. एस्सी. च्या अंतिम वर्षात शिकते आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक सेवा विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रमोद बियाणी यांची ती कनिष्ठ कन्या आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसकडून विजयाचा जल्लोष

$
0
0

राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राजस्थान, छत्तीसगड व मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने घवघवीत यश संपादन केल्यानंतर काँग्रेसचा विजयोत्सव शहर काँग्रेसमध्येही जल्लोषात साजरा करण्यात आला. शहर काँग्रेस, युवक काँग्रेससह ग्रामीण काँग्रेसने फटाके फोडून तीन राज्यातील विजयाचा आंनद साजरा केला. यावेळी राहुल गांधींच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. एकमेकांना पेढे वाटून काँग्रेसने हा आनंद साजरा करण्यात आला आहे. आता भाजपचे बुरे दिन सुरू झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

अनेक निवडणूकांपासून सपाटून मार खात असलेल्या काँग्रेसला राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाच्या निवडणूक निकालाने मोठा आधार मिळाला आहे. लोकसभेची सेमिफायनल म्हणून बघितल्या जाणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली असून पक्षाला २०१४ नंतर प्रथमच एवढे यश प्राप्त झाले आहे. निवडणुकांच्या निकालात काँग्रेसने आघाडी घेतल्यानंतर शहर काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. ढोल-ताशांच्या गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. शहराध्यक्ष शरद आहेर, गटनेते शाहू खैरे, तालुकाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, वत्सला खैरे, राजेंद्र बागूल यांच्यासह नेते उपस्थित होते.

'एनएसयूआय'च्या वतीने अॅड. आकाश छाजेड यांच्या नेतृत्त्वाखाली आनंदोस्तव साजरा करण्यात आला. लोकसभा निवडणुकीनंतर तसेच देशातील अन्य राज्यांमधील विधानसभा निवडणुकीनंतर उसळलेली मोदी लाट ओसरून संपूर्ण देशात परिवर्तनाची लाट आली असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मत माजी आमदार, महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी व्यक्त केले आहे.

भाजपचे 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून जनतेची दिशाभूल केली आहे. शेतकरी, गोरगरिबांना साडेचार वर्षात कोणताच लाभ मिळाला नाही. परंतु, भाजपने आकड्यांचा जुमला केला आहे. भाजपने घोर फसवणूक केल्याने आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळागाळात काम केल्याने काँग्रेसचा हा विजय झाला आहे.

- शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

काँग्रेसची ही अस्तित्वाची लढाई होती. सद्यस्थितीत देशात निर्माण झालेले असहिष्णू वातावरण दूर करून धर्मनिरपेक्षता, संविधानाचा आदर करणारे शासन व विकास यांची सांगड घालण्यात राहुल गांधी यशस्वी झाले आहेत. मोदी लाट ओसरली असून संपूर्ण देशभरात आता परिवर्तनाची लाट येणार आहे.

- अॅड. जयप्रकाश छाजेड, माजी आमदार

नोटबंदी, जीएसटी, गगनाला भिडलेली महागाई, शेतमालाचे कोसळले भाव त्यामुळे देशातील जनता त्रस्त झाली असून त्याचाच परिणाम आज पाच राज्यांच्या निवडणुकीत दिसून आला आहे. जनतेला दाखवलेली खोटी स्वप्ने आणि आश्वासनांची पूर्तता करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.

- छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images