Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भरतनाट्यमने फेडले डोळ्यांचे पारणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नृत्य हे संवादाचे माध्यम ठरू शकते का याचे उत्तर निश्चित हो असे येईल. केवळ संवाद नव्हे तर थेट रसिकांच्या हृदयाला भिडणारा प्रभावी संवाद नृत्य साधते याची प्रचिती नाशिककर रसिकांना रविवारी सृजनोत्सवातून आली.

सृजन नृत्य विद्यालय व साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान यांच्या वतीने परशुराम सायखेडकर नाट्यगृहात रेषा एज्युकेशन सेंटरच्या सौजन्याने सृजनोत्सव-२०१८ चे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे नववे वर्ष होते. प्रारंभी नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव, लता पाटील, हेमलता कांडेकर, स्वाती भामरे आणि पेंग्विन अॅकॅडमीच्या संचालक ज्योती कटाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सृजनोत्सवचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर भरतनाट्यमला सुरूवात झाली. सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि सृजन नृत्य विद्यालयाच्या संचालिका शिल्पा देशमुख यांच्या विद्यार्थिनींनी गणेशवंदनेने भरतनाट्यमला सुरुवात केली. अलारिपु, पुष्पांजली, माखनचोरी, सरस्वती कौतुकम, किर्तनम, पदम यांसारख्या रचनांवर नृत्य करीत विद्यार्थिनींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

त्यानंतर श्री अरविंद घोष यांच्या कवितांवर नृत्य सादर करण्यात आले. संकल्पना व नृत्य संरचना पुण्यातील अंजली बागल यांची होती. बागल यांच्या विद्यार्थिनींनी अरविंद घोष यांच्या कवितेतील एकेक ओळ नृत्याविष्काराच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविली. परंपरा व नवता यांचा सुंदर मेळ घालत नृत्य सादर करण्यात आला. रसिकांनी देखील या कलावंतांच्या कलेला हृदयापासून दाद दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अर्चना कुलकर्णी, प्रीतम नाकील आदींनी परिश्रम घेतले.

-

सभागृहासाठी पाठपुरावा करू

शहरातील कलावंतांना सराव करता यावा याकरीता कायमस्वरुपी सभागृहाची आवश्यकता आहे. हे सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडे निश्चितच पाठपुरावा करू अशी ग्वाही यावेळी नगरसेविका डॉ. भालेराव यांनी दिली. तर कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावा याकरीताच सीएम चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरासह जिल्हाभरातील कलावंतांनी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा असे आवाहन नगरसेविका भामरे यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकासकामांसाठी होणार अतिरिक्त निधी उपलब्ध

$
0
0

जिल्ह्याच्या चालू आर्थिक वर्षाचा आराखडा : ९१८ कोटी

सर्वसाधारण उपयोजनांसाठी राखीव निधी : ३३८.८० कोटी

आदिवासी उपयोजनांसाठी राखीव निधी : ४८१.५९ कोटी

अनुसूचित जाती उपयोजनांसाठी राखीव निधी : ९७.५५ कोटी

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नियोजन विभागाने २०१९-२० साठी तिन्ही उपयोजनांकरिता आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. आदिवासी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थेट करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्यामुळे पुढील वर्षीच्या आदिवासी उपयोजनांच्या प्रस्तावित आराखड्यात सुमारे ७५ कोटी रुपयांच्या निधीला कात्री लावण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत. मात्र तिन्ही योजनांच्या एकूण आराखड्यात कोणताही बदल केला जाणार नसल्याने विकासकामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होऊ शकणार आहे.

जिल्ह्याच्या चालू आर्थिक वर्षाचा आराखडा ९१८ कोटी रुपयांचा असून, सर्वसाधारण उपयोजनांसाठी यंदा ३३८.८० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. आदिवासी उपयोजनांसाठी ४८१.५९ कोटींचा, तर अनुसूचित जाती उपयोजनांसाठी ९७.५५ कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. सरकारने आदिवासी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थेट करण्याचा निर्णय घेतला असून, आराखडा तयार करतेवेळी त्यामध्ये वेतनाची रक्कम समाविष्ट करू नये, असे निर्देश जिल्हा प्रशासनांना दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या आदिवासी उपयोजनांमधील निधी सुमारे ७५ कोटी रुपयांनी घटणार आहे. परंतु, आराखड्यातील एकूण प्रस्तावित रकमेला धक्का लागणार नसल्याने जिल्ह्यातील विकासकामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिकी

$
0
0

लोगो : सांस्कृतिकी

---

सोमवार, १० डिसेंबर

नाटक

कार्यक्रम : कामगार कल्याण नाट्य स्पर्धा

स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह, टिळकपथ

वेळ : सायंकाळी ६ वाजता

ठळक विशेष : १० डिसेंबर रोजी बोला, गांधी उत्तर द्या, ११ रोजी एस फॅक्टर, १२ रोजी कळसूत्री, १३ रोजी वैराण, १४ रोजी ऋतु आठवणींचे

---

व्याख्यान

कार्यक्रम : मातोश्री सीताबाई निरगुडे स्मृती व्याख्यानमाला

स्थळ : श्री मोदकेश्वर गणपती मंदिर, मोदकेश्वर कॉलनी, इंदिरानगर

वेळ : सायंकाळी ५.३० वाजता

ठळक विशेष : श्री मोदकेश्वर सेवा ट्रस्ट यांच्या सहकार्याने निरगुडे स्मृती व्याख्यानमालेत प्रवचनकार डॉ. उल्हास रत्नपारखी यांचे व्याख्यान. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे जीवन चरित्र व कार्य हा व्याख्यानाचा विषय आहे.

---

महोत्सव

कार्यक्रम : मुक्त विद्यापीठातर्फे इंद्रधनुष्य कला महोत्सव

स्थळ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, गंगापूर गाव

वेळ : सकाळी १० वाजेपासून

ठळक विशेष : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ११ डिसेंबरपर्यंत १६ वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव 'इंद्रधनुष्य - २०१८' होणार आहे. राज्यातील २० विद्यापीठातील ८०० हून अधिक विद्यार्थी कलाकार सहभागी झालेले आहेत. यंदा या महोत्सवाचे हे १६ वे वर्ष आहे.

---

शनिवार १५, रविवार १६ डिसेंबर

चित्रप्रदर्शन

कार्यक्रम : जे. कृष्णमूर्ती यांच्या निवडक साहित्याचे प्रदर्शन

स्थळ : कुसुमाग्रज स्मारक, विद्याविकास सर्कलजवळ, गंगापूररोड

वेळ : सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते रात्री ८.३०

ठळक विशेष : प्रज्ञापुरुष, तत्त्वज्ञ, विचारवंत जे. कृष्णमूर्ती यांच्या निवडक साहित्याचे प्रदर्शन दोन दिवस आयोजित करण्यात आले आहे. जे. कृष्णमूर्तींचे निवडक मूळ साहित्य व त्याला अनुरूप असणारी छायाचित्रे प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.

---

रविवार, १६ डिसेंबर

संगीत समारोह

कार्यक्रम : पंडित भानुदास पवार स्मृती संगीत समारोह

स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह, टिळकपथ

वेळ : सायंकाळी ६ वाजता

ठळक विशेष : एस डब्लू एस फायनान्शिअल प्रा.लि यांच्यावतीने पवार तबला अकादमी नाशिक आयोजित पंडित भानुदास पवार स्मृती संगीत समारोहात पंडित ग्यानसिंग नामधारी यांचे जोडी पखवाज वादन. सावनी तळवळकर यांचे तबलावादन. संवादिनीवर पुष्कराज भागवत व प्रशांत महाबळ.

---

तुम्हीही झळकू शकता सांस्कृतिकीमध्ये!

आठवडाभरात शहरात सांस्कृतिक क्षेत्रात कोणते कार्यक्रम आहेत यासाठी 'मटा'चा सांस्कृतिकी हा कॉलम आहे. हे कार्यक्रम पाहून वाचकांना आठवडाभराचे नियोजन करणे सहजसोपे व्हावे हा हेतू आहे. कलावंतांनो, तुमच्या कार्यक्रमाची माहिती सांस्कृतिकी या कॉलममध्ये देऊ शकता. त्यासाठी प्रशांत : ९५०३६७७७४० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपल्या कार्यक्रमाची माहिती पाठवावी अथवा कळवावी. आम्ही ती प्रसिद्ध करू.

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळेकरांचा कौल आज ठरणार

$
0
0

धुळ्यात महापालिकेसाठी सरासरी ६० टक्के मतदान; आज मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट

म. टा. वृत्तसेवा, धुळे
जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. ९) सकाळी ७.३० ते ५.३० यावेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून शहरातील ४५० मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी तुरळक दिसत होती. मात्र, दुपारनंतर हळूहळू गर्दी वाढून मतदार घराबाहेर पडलेले दिसत होते. दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले होते. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. सरासरी ६० टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांनी दिली.

धुळे महापालिकेच्या निवडणुकीत देवपूर परिसरासह शहरातील सर्व भागातील मतदार केंद्रांवर मतदारांच्या रांगा मतदानासाठी लागल्या होत्या. तर सांयकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. महापालिकेसाठी सरासरी ६० टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांच्याकडून देण्यात आली. या निवडणुकीची मतमोजणी आज (दि. १०) सकाळी दहा वाजेपासून केंद्रीय विद्यालयशेजारील शासकीय धान्य गोडावूनमध्ये होणार आहे. साधारण दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व उमेदवारांचे निकान स्पष्ट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, या निका लांवर दिग्गज मंत्र्यांसह अनेकांचे भवितव्य ठरणार आहे. महापालिकेत भाजपा विरुद्ध लोकसंग्राम, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी, शिवसेना व अपक्ष यापैकी कोणाच्या पारड्यात धुळेकरांनी कौल दिला आहे, हे आज स्पष्ट होईल.

गेल्या महिन्याभरांपासून धुळे महापालिका निवडणुकीची लगबग सुरू होती. सर्वच राजकीय पक्षांनी आपापली सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे आता आज (दि. १०) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या पूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान झाले. महापालिकेची ही चौथी निवडणूक होती. यांत १९ प्रभागांसाठी ७३ जागांसाठी ३५५ उमेदवार रिंगणात आहेत.

दिग्गजांचे भवितव्य ठरणार
रविवारी (दि. ९) सकाळी साडेसात वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी कुटुंबांसह तसेच शहराचे आमदार अनिल गोटे, माजी नगराध्यक्षा हेमा गोटे, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, माजी मंत्री शालिनीताई बोरसे, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, शिवसेनेचे हिलाल माळी, काँग्रेसचे युवराज करणकाळ अदी दिग्गजांनी सकाळच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावला. शहरातील सर्व नगरसेवक, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनीही मतदानाचा हक्क बजावला. या वेळी प्रत्येक पक्षांकडून विजयाचे दावे करण्यात आले असून, धुळेकरांचा कौल घेण्यात कोण यशस्वी ठरेल यावर अनेक दिग्गजांचे भवितव्य अवलंबून आहे. शहरातील बहुतेक प्रभागांमध्ये तिरंगी, चौरंगी लढती होत आहेत. मात्र, खरी लढत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी, भाजप व शिवसेनेत आहे. यामध्ये आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्रामसह अपक्ष उमेदवारांचे आव्हान उभे ठाकल्याने निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झालेली होती.

आमदार गोटेंच्या वाहनांवर दगडफेक
शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या (एमएच १८, एजे ३३६६) या चारचाकीवर शनिवारी (दि. ८) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास दोन अज्ञातांनी दुचाकीवरून येत दगडफेक केल्याचा प्रकार घडला. सुदैवाने यावेळी कारमध्ये कोणीही बसले नव्हते. अज्ञातांनी दगड मारल्याने कारची पुढील काच फुटली असून, घटनेनंतर गोटे आपल्या वाहनावर विरोधकांनी हल्ला केल्याचे म्हटले आहे. हा प्रकार झाल्यानंतर गोटेंना अचानक दमाचा त्रास झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पारोळ्याचे शिरोळेंची पोलिसांत तक्रार
पैसे वाटपाच्या संशयावरून पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या कारवर दगडफेक करून हल्ला केल्याप्रकरणी लोकसंग्रामच्या ६ जणांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी पारोळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तक्रार शून्य क्रमांकाने देवपूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. त्यात, दि. ६ डिसेंबर रोजी रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास शहरातील देवपूर भागात जयहिंद महाविद्यालयाजवळ ते कार (एमएच १९, सीएफ १६१६) ने जात असताना महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी येऊन पैसे वाटप करीत असल्याचा संशय घेऊन माजी उपनगराध्यक्ष दिलीप साळुंखे, भोला गोसावी, बंटी देवरे, अमोल सूर्यवंशी, आनंदा पाटील, चिलू यांनी कार अडवून दगडफेक केली. तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे कारच्या काचा फुटून नुकसान झाले, असे नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरित क्षेत्रास ग्रीनसिग्नल?

$
0
0

शेतकऱ्यांसोबत उद्या बैठक; स्मार्ट सिटीकडून टीपी स्कीमचे सादरीकरण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत मखमलाबाद आणि हनुमानवाडीच्या ७५० एकर क्षेत्रावर नगररचना परियोजना राबविण्याच्या प्रस्तावावरून स्थानिक शेतकरी व काही संचालकांच्या अहमदाबाद दौऱ्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या मनधरनीला यश येण्याची शक्यता आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली आणि अहमदाबादचा अभ्यास दौरा केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये योजने संदर्भात मतपरिवर्तन करण्याचे होत असून काही शेतकऱ्यांचा योजनेबोबतचा विरोध मावळत असल्याचे चित्र आहे.

हरित क्षेत्र विकासांतर्गत पंचवटीतील मखमलाबाद व नाशिक शिवारातील हनुमानवाडी साडेसातशे एक क्षेत्रात नगररचना परियोजना राबविण्याचा नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावांतर्गत हा परिसर स्मार्ट सिटी म्हणून विकसित केला जाणार असून जागा मालकांची भागीदारीही यात असणार आहे. मात्र, या प्रस्तावाला जागा मालक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला होता. त्यामुळे कंपनीच्या वतीने २९ व ३० नोव्हेंबर रोजी शेतकरी व संचालकांचा अहमदाबाद दौरा झाला. यावेळी राज्य सरकारची टीपी स्कीम आणि गुजरातमधील टीपी स्कीम अंमलबजावणीत त्रुटी असल्याचे समोर आले होते. गुजरातमध्ये शेतकऱ्यांना मोबदला देतांना ६०:४० चा फॉर्म्यूला वापरला जातो. त्यामुळे हाच फॉर्म्लूला नाशिकमध्येही वापरावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. अहमदाबादच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना या योजने संदर्भातील फायदे-तोटे लक्षात आले असून त्यांचे टीपी स्कीम बद्दलचे मत हळू हळू बदलत आहे.तर कंपनीकडूनही ६०:४० फॉर्म्यला देण्याची तयारी दर्शवली.

शेतकऱ्यांचा मावळता विरोध

मखमलाबाद, हनुमानवाडी शिवारातील टीपी स्कीम योजना तपोवनात पळवली जात असल्याच्या चर्चाही शेतकऱ्यांच्या लक्षात आल्या आहेत. सोमवारी या हरितक्षेत्रात बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांनी नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांचीही भेट घेतली आहे. यावेळी हरितक्षेत्रासंदर्भात त्यांचीही चर्चा झाल्याने शेतकऱ्यांचा विरोध मावळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कंपनीसोबत पुन्हा बैठक घेण्याची तयारी दर्शवली आहे.

शंकानिरसनासाठी प्रयत्न

शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रश्नांसदर्भात बुधवारी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बुधवारी दि. १२) महाकवी कालीदास कलामंदिरात बैठक होणार आहे. यात टीपी स्कीमबाबतचे सादरीकरण केले जाणार असून शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर केल्या जाणार आहेत. त्यामुळे कंपनी आणि शेतकऱ्यांमधील संवाद वाढल्याने याच भागात टीपी स्किम होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

योजनेची पळवापळवी?

सदर योजना मखमलाबाद आणि हनुमानवाडी होणार असली तरी भाजपच्याच एका गटाला ही योजना तपोवन परिसरात राबवायची आहे. त्यामुळे या गटाकडून इथे योजनेला विरोध असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना या योजनेचे फायदे-तोटे लक्षात येत असून शेतकऱ्यांचाच अधिक फायदा होणार असल्याचे कंपनीकडून पटवून दिले जात आहे. त्यामुळे ही योजना पळवण्याचा डाव उधळला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी योजनाच होऊ नये यासाठी एक गट पुन्हा जोमाने कामाला लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय पक्षांच्या अनास्थेचे दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणुकीत इव्हीएम मशिनसह व्हीव्हीपॅटचे काम नेमके चालते कसे, हे समजून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने राजकीय पक्षांना पायघड्या घातल्या असल्या तरी सर्वच 'जागरुक' राजकीय पक्षांनी त्यांच्या या निमंत्रणाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानल्याचा प्रत्यय सोमवारी पुन्हा एकदा आला. अंबड येथे ही मशिनरी मांडून चातकाप्रमाणे राजकीय पदाधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत बसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची अवस्था वाट पाहूनी जीव शिणला अशी झाली. त्यामुळे ही मशिन्स पुन्हा सुरक्षित ठिकाणी ठेऊन अधिकारी, कर्मचारी माघारी परतले.

निवडणुकीसाठी वापरलेल्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशिन्समध्ये छेडछाड झाल्याचे आरोप विविध राजकीय पक्षांकडून निकालानंतर होतात. या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या कामकाजावरच अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. निवडणूक आयोग किती पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया राबवितो हे राजकीय पक्षांसह सर्वांनाच समजावे आणि तोंडसुख घेण्यासाठी कुणाच्याही हाती आयते कोलीत मिळू नये यासाठी यंदा निवडणूक आयोगानेच अधिक दक्षता घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर अत्यंत पारदर्शी पद्धतीने प्रक्रिया राबविण्याचे निर्देश आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. इव्हीएम मशिन्ससह पूर्ण युनिटचे काम कसे चालते याचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये ७ डिसेंबरपासून ही निमंत्रणे पाठविण्यात आली. एवढ्यावरच न थांबता राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना इमेलद्वारेही हे निमंत्रण पाठविण्यात आले. विशेष म्हणजे काही राजकीय पक्षांनी त्याबाबतची पोहेचही जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेला दिली.

अशी होती सज्जता

सोमवारी, सकाळी साडेदहापासून इव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्स राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना हाताळता येणार होते. इतकेच नव्हे तर मतदान कसे होते याचे प्रात्यक्षिक करून पाहतानाच त्याबाबतच्या शंकांच्या समाधानासाठीची व्यवस्थाही तेथे करण्यात आली होती. दोन तहसीलदारांसह अधिकारी, कर्मचारी तेथे सज्ज होते. राजकीय पक्षांचे पदाधिकारी येणार म्हणून सर्व यंत्रणा तयार होती. सकाळी साडेदहापूर्वीच अंबड येथील अन्नधान्य गोदामाच्या आवारात टेबल मांडण्यात आले. त्यावर इव्हीएम मशिन्स, व्हीव्हीपॅट सज्ज ठेवण्यात आले. दुपारी साडेचारपर्यंत प्रतीक्षा करूनही एकही राजकीय पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता या प्रशिक्षणाकडे फिरकला नसल्याची माहिती निवडणूक विभागाच्या सूत्रांनी दिली. यापूर्वीही निवडणूक विभागाला अशाच राजकीय अनास्थेचे दर्शन घडले असून तोच कित्ता आताही गिरविला गेल्याने अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज प्रशिक्षण

१५ डिसेंबर ते १५ जानेवारी या महिनाभराच्या कालावधीत १५ पथकांद्वारे इव्हीएम व व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिके प्रत्येक तालुक्यात दाखविली जाणार आहेत. तत्पूर्वी प्रातांधिकारी आणि तहसीलदारांना मंगळवारी त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी या प्रशिक्षणाला उपस्थित राहणार आहेत. बुधवारी सात तर गुरूवारी आठ तालुक्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या पथकांना १४ डिसेंबर रोजी मशिनरीचे वाटप करण्यात येणार असून १५ पासून प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोरेन्सिक लॅबचे विस्तारीकरण

$
0
0

शुभवार्ता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फोरेन्सिक लॅब) लवकरच आपले रूपडे बदलणार असून, दीड एकर जागेत सुरू असलेली ही लॅब साडेचार एकर जागेत विस्तारणार आहे. विस्तारीकरण आणि रिक्त पदे भरण्याबाबतचे प्रस्ताव सरकारदरबारी आहेत. यातच धुळे आणि नंदुरबारसाठी धुळे येथे स्वतंत्र युनिट सुरू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या न्याय आणि वैज्ञानिक विभागाचे डायरेक्टर जनरल हेमंत नागराळे यांनी आज, सोमवारी फोरेन्सिक लॅब येथे भेट देऊन याबाबतचा आढावा घेतला. आलेल्या केसचा तत्परतेने होणारा निपटारा, तसेच लॅबच्या एकूण कामकाजाबाबत नागराळे यांनी समाधान व्यक्त केले. याबाबत बोलताना लॅबचे उपसंचालक बी. पी. मोरे यांनी सांगितले, की या भेटीदरम्यान लॅबच्या विस्तारीकरणाबाबत, तसेच रिक्त पदे भरण्याबाबत आढावा घेण्यात आला. लॅबमध्ये महिन्याकाठी सरासरी दोन हजार केसेसमध्ये पाच हजार सॅम्पल येतात. या लॅबमध्ये बायोलॉजी, टॉक्सीकोलॉजी, जनरल अॅनालिटीकल, इन्स्ट्रुमेंटेशन, टेप ऑथेंटिकेशन आणि स्पीकर ऑथेंटिकेशन आदी विभागांचा समावेश होता. यापैकी एक असलेल्या डीएनए विभागासह लॅबच्या विस्तारासाठी आणखी चार एकर जागेची मागणी करण्यात आली असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. ही लॅब महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन केंद्राच्या (मेरी) दीड एकर जागेत काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. नवीन चार एकर जागासुद्धा मेरीकडून मिळणार असून, हा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

लॅबमध्ये उपसंचालक, सहाय्यक संचालक, वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अधीक्षक, लिपीक, चालक, पहारेकरी असे एकूण १२८ पदे आहेत. यापैकी ७१ पदांवर संबंधित व्यक्ती कार्यरत असून, ५७ पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरात लवकर भरली जातील, असे नागराळे यांनी आजच्या आढाव्यानंतर स्पष्ट केले. पोलिसांकडे दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये पुराव्याच्या दृष्टीने संकलित होणाऱ्या घटकांचे परीक्षण या लॅबमध्ये होते. वैज्ञानिक कसोटीवर उतरणारे हे पुरावे पुढे कोर्टात सादर केले जातात.

धुळे, नंदुरबारसाठी स्वतंत्र लॅब

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सॅम्पल याच लॅबमध्ये पाठवण्यात येतात. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांसाठी धुळे येथे एक मिनी लॅब सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. या लॅबमध्ये बायोलॉजी आणि टॉक्सीलॉजी यांचे सॅम्पल तातडीने तपासून देणे यामुळे शक्य होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणार

$
0
0

…विदित गुतराथीवरील हल्ला प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनिला (फिलिपिन्स)येथील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेला ग्रॅड मास्टर विदित गुजराथी, अभिजीत कुंटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची फिलिपिन्स सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या दोघांवर हल्ला करणाऱ्यांचा तातडीने तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.

फिलिपिन्सच्या मनिला येथील आशियाई चॅम्पियनशिप हा फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप सायकलचा एक भाग आहे. या स्पर्धेसाठी विदित गुजराथी व अभिजीत कुंटे त्या ठिकाणी गेले असताना त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना ज्या हॉटेलमध्ये उतरविण्यात आले होते तेथे इंटरनेटची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. पाणी आणण्यासाठी विदित, अभिजीत कुंटे व त्यांचा एक सहकारी बाहेर गेले असताना काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी या तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र या गुंडांनी त्यांचा पाठलाग करून दमदाटी करण्यास सुरुवात केली. या झटापटीत तीघेही त्यांच्या तावडीतून सुटले आणि हॉटेलला पोहोचले. याची माहिती आयोजकांना दिल्यानंतरही त्यांनी मात्र या प्रकाराबाबत कोणतीही दखल घेतली नाही.

संबंधित हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था देखील निकृष्ठ दर्जाची होती. त्याचप्रमाणे स्वच्छता नसल्याने खेळावर लक्ष केंद्रीत करता येत नव्हते. याबाबत विदीतचे वडील डॉ. संतोश गुजराथी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या दौऱ्याला अनंत अडचणी आल्या. मुंबईहून फिलिपिन्सला जाणारे विमान ९ तास उशिराने पोहचले. त्यामुळे स्पर्धेची तयारी करता आली नाही. सोमवारी त्यांच्या मॅचोस असल्याने बोलणे झाले नाही. रात्री उशिरा बोलणे होईल मात्र हा प्रकार खेदजनक आहे.

या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली असून अनेक खेळाडूंनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

…..

आमच्यावर हल्ला झाला त्याची आयोजकांना माहिती दिली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे येथे राहण्याची व जेवणाची अत्यंत निकृष्ठ व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाकडे लक्ष केंद्रीत करता येत नाही.

--विदित गुजराथी, ग्रॅँड मास्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाळपेराची कार्यवाही करण्याच्या सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात जूनपर्यंत पुरू शकेल एवढा चारा उपलब्ध असला तरी दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर चाराटंचाईची समस्या निर्माण होऊ नये यासाठी गाळपेराबाबतची कार्यवाही तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. या बैठकीला राज्यभरातील महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कृषी, पशुधन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील उपलब्ध चाऱ्याची माहिती सुरुवातीला घेण्यात आली. जिल्ह्यात १५ लाख मेट्रीक टन चारा उपलब्ध असून जून २०१९ पर्यंत तो पुरू शकतो. त्यामुळे जिल्ह्यात चारा छावण्या लावण्याची गरज भासणार नाही असे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. धरणांच्या गाळपेरा क्षेत्रात चाऱ्याची लागवड करण्याच्या सूचना राज्य सरकारने १५ नोव्हेंबर रोजी केल्या आहेत. त्यानुसार झालेल्या कार्यवाहीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यासाठी जिल्ह्यात १५०० हेक्टर क्षेत्र निश्चित केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. एकूण ४१ प्रकल्पांमध्ये चारा लागवड करण्यात येणार असून त्यामध्ये ११ मोठ्या, पाच मध्यम तर २५ लहान प्रकल्पांचा समावेश आहे.

दुष्काळ निवारणासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावांमध्ये कामे केली जातात. सिन्नर आणि चांदवड तालुक्यातील गावे निवडून फाऊंडेशनने यापूर्वी कामे केली आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आचारसंहितेपूर्वी गावांची निवड करावी अशा सूचनाही या बैठकीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

२० पासून लागवड

चारा लागवडीसाठी किती बियाण्यांची गरज आहे, याचा अंदाज घेऊन २० डिसेंबरपासून प्रत्यक्ष लागवडीला सुरुवात व्हायला हवी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. चाऱ्याचे उत्पादन करू इच्छिणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समित्यांबाबत भाजप नमले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण समितीत नऊऐवजी १६, तर वृक्षप्राधिकरण समिती सदस्य निवडीचे नियम धुडकावणाऱ्या भाजपने अखेर प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर सदस्य संख्येचा आणि नियमांबाबतचा बालहट्ट अखेर सोडला आहे. महासभेने कायद्यातील तरतुदींशी विसंगत ठराव केल्यास तो सरकारकडे विखंडनासाठी पाठविण्यात येईल, या भूमिकेवर प्रशासन ठाम राहिल्यानंतर भाजपने अखेर शिक्षण समितीवर नऊ तर वृक्षप्राधिकरण समितीवर दोन सदस्यांच्या नियुक्तीचा ठराव प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे तब्बल दीड वर्षानंतर पालिकेत शिक्षण समिती अस्तित्वात आली असून, वृक्षप्राधिकरण समितीलाही मुहूर्त लागला आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून शिक्षण समिती की, शिक्षण मंडळ याचा वर्षभर गोंधळ सुरू राहिला. त्यानंतर पुन्हा समितीचे सदस्य ९ की १६ यावरून सहा महिने वाद सुरू होता. पालिकेत पूर्वी १६ सदस्यीय शिक्षण मंडळ अस्तित्वात होते; परंतु, शिक्षण मंडळ बरखास्तीनंतर २०१४ मध्ये महापालिकेत शिक्षण समिती गठीत करण्यात आली; परंतु शिक्षण मंडळाप्रमाणेच ती १६ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. यासंदर्भातील वाद सध्या न्यायप्रविष्ट असून, कोर्टाने त्यावर अंतिम निर्णय दिलेला नाही. पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पूर्ववत शिक्षण मंडळ स्थापन करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती; परंतु, या संदर्भातील महासभेचा ठराव सरकारने अमान्य करीत शिक्षण समिती गठीत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सरकारच्या निर्देशांनंतर नऊ सदस्यीय शिक्षण समिती तयार करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेच्या पटलावर आणला होता; परंतु, यापूर्वीची शिक्षण समिती १६ सदस्यीय होती, आता नऊ सदस्यीय समिती कशी, असा आक्षेप घेत महासभेत हा ठराव फेटाळला गेला. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा एकदा महासभेवर ९ सदस्य नियुक्तीचाच प्रस्ताव सादर केला; परंतु, या प्रस्तावालाही विरोध झाला. नियमांनुसार नऊ सदस्यीय समिती गठणच वैध असल्याचा दावा प्रशासनाकडून महासभेत केला गेला; परंतु, महासभेने तो फेटाळून लावत १६ सदस्यीय समिती घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. वृक्षप्राधिकरण समितीवर पूर्वी ७ सदस्य महासभेकडून नियुक्त केले जात होते. मात्र, उच्च न्यायालयाने शैक्षणिक अर्हतेची अट घातल्याने महासभेच्या संख्येवर मर्यादा आली. शैक्षणिक अर्हता पालिकेने फेटाळून लावली होती. परंतु, महासभेचे दोन्ही ठराव नियमांच्या विरुद्ध आले तर शासनाकडे विखंडनासाठी पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे भाजपने अखेर दोन्ही समित्यांबाबत नमते घेतले असून, शिक्षण समितीसाठी नऊ सदस्यांच्या नियुक्तीचा ठराव दिला आहे. सोबतच वृक्षप्राधिकरण समितीवर दोन अशासकीय सदस्यांची नियुक्ती प्रशासनाने केली असल्याने या समितीवर नगरसेवकांमधून दोन सदस्यांची नियुक्ती करून पाच सदस्यीय वृक्षप्राधिकरण समिती गठणाचा ठराव महापौरांनी अंतिम केला आहे.

शिक्षण समिती सदस्य

वर्षा भालेराव, दिनकर आढाव, सरिता सोनवणे, स्वाती भामरे, प्रतिभा पवार(सर्व भाजप), चंद्रकांत खाडे, संतोष गायकवाड, सुदाम डेमसे(सर्व शिवसेना), राहुल दिवे(काँग्रेस)

वृक्षप्राधिकरण समिती सदस्य

सभागृहनियुक्त - वर्षा भालेराव(भाजप), चंद्रकांत खाडे (शिवसेना). अशासकीय सदस्य- पुंडलिक गिते (विकास गंगा सामाजिक संस्था), बबन वाघ (आनंद बहुउद्देशिय सामाजिक संस्था, नाशिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यसनाधीन तरुणाईमुळे अंतर्गत सुरक्षेवर ताण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पोलिस, सैन्यदल, पॅरामिलिटरी फोर्ससहित इतर संरक्षण दलांचे जवान कार्यरत असून, डिफेन्स क्षेत्रात भारत अग्रेसर ठरू लागला आहे. सध्या भारताची ताकद अधिक असली, तरीही देशाच्या सुरक्षा दलात सहभागी होण्यासाठी सध्याची तरुणाई फारशी इच्छुक दिसत नाही. तरुणांतील व्यसनांचे वाढते प्रमाण आणि सोशल मीडियाचा प्रभाव, यामुळे डिफेन्स क्षेत्रात तरुणांची संख्या खालावली आहे. अंतर्गत सुरक्षेसाठी पुढील काळात तरुण भरती झाले नाही, तर सुरक्षा यंत्रणा खिळखिळी होऊ शकते. व्यसनांच्या आहारी तरुण अधिक जात असून, सुरक्षा यंत्रणेत सामील होण्याचे प्रमाण अल्प होत असल्याने सुरक्षा यंत्रणांवर ताण येऊ लागला आहे, असे प्रतिपादन माजी पोलिस महासंचालक डॉ. प्रवीण दीक्षित यांनी केले.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी नाशिकतर्फे स्वर्गीय धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे जयंतीनिमित्त गंगापूर रोडवरील कुर्तकोटी शंकराचार्य संकुलात व्याख्यानमाला झाली. व्याख्यानामालेचे पहिले पुष्प सोमवारी गुंफण्यात आले. या वेळी माजी पोलिस महासंचालक डॉ. दीक्षित, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष एम. जी. कुलकर्णी आणि सोसायटीचे कार्यवाह हेमंत देशपांडे व्यासपीठावर होते. माजी पोलिस महासंचालक डॉ. दीक्षित यांनी या वेळी 'अंतर्गत सुरक्षा : आव्हाने उपाययोजना आणि नागरिक म्हणून माझी भूमिका' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.

डॉ. दीक्षित म्हणाले, की अंतर्गत सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी असून, कायद्याच्या बंधनात राहून केलेले वर्तन अंतर्गत सुरक्षेसाठी अतिशय योग्य आहे. सध्याची तरुणाई भरकटत असून, तरुणाईत गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे. तरुणाईसह बालगुन्हेगारांची संख्याही मोठ्या शहरांत वाढू लागल्याने, अंतर्गत सुरक्षा धोक्यात आल्यासारखे वाटते. अंतर्गत सुरक्षा म्हणजे, केवळ अतिरेकी हल्ल्यांपासून देशाचे रक्षण करणे नव्हे, तर देशातील गुन्हेगारी नियंत्रित करून, देशाला विकसित करणे आहे. त्यामुळे व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणणे, हादेखील अंतर्गत सुरक्षेचा एक भाग आहे. तरुणाईतली व्यसनाधीनता अशीच वाढत राहिल्यास, तरुणांचे सुरक्षा दलात भरती होण्याचे प्रमाणही घटू लागेल. त्याचा परिणाम अंतर्गत सुरक्षेवर होईल, हे सर्वांनी लक्षात ठेवावे, असे डॉ. दीक्षित म्हणाले.

\B

आजचे व्याख्यान

\Bवक्ते : ब्रिगेडीअर हेमंत महाजन

विषय : सागरी सुरक्षा : आव्हाने आणि उपाययोजना

वेळ : सायंकाळी ५.३० वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकनृत्ये, प्रहसनांनी गाजवला चौथा दिवस

$
0
0

इंद्रधनुष्य महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आवारात सुरू असलेल्या १६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव 'इंद्रधनुष्य'च्या चौथ्या दिवशी विविध एकपात्री नकला, प्रहसने, समूह व एकल गीते, रांगोळी रेखाटने व स्पर्धास्थळ छायाचित्रण या वैविध्यपूर्ण स्पर्धांनी या महोत्सवाचा बाज टिकवून ठेवला. दुपारनंतर सादर झालेल्या विविध प्रकारच्या लोकनृत्यांनी तर या महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या गुणवत्तेचा कळस गाठला.

अंतिम टप्प्यात पोचलेल्या या १६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव 'इंद्रधनुष्य'च्या चौथ्या दिवसाची सुरुवात झाली ती कधी नर्मविनोदी, तर कधी खळखळून हसविणाऱ्या नकलांच्या कार्यक्रमाने. विद्यापीठ आवारातील दादासाहेब फाळके सभागृहात एकूण १२ विद्यापीठांनी आपला सहभाग नोंदविला. विविध प्राणी, पक्षी, चित्रपट अभिनेते यांच्या नकलांनी या कार्यक्रमात रंगत आणली. याच सभागृहात प्रहसनांचे सादरीकरण झाले. पर्यावरण, पाणीप्रश्न, देशाची सद्य:स्थिती, शिक्षण व स्त्रियांचे समस्या यावर आधारित या प्रहसनांनी विशेष दाद मिळविली. साधारण दहा मिनिटांची येथे १६ प्रहसने सादर झाली. त्यानंतर याच सभागृहात सादर झालेल्या लोकनृत्याच्या कार्यक्रमाने तर या महोत्सावातील मनोरंजनाचा कळस गाठला. विविध प्रादेशिक व लोकसंस्कृतीची ओळख या नृत्याच्या माध्यमातून झाली. अनेक जण सहकुटुंब हे कार्यक्रम बघण्यासाठी आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत दादासाहेब फाळके सभागृहात लोकनृत्याची ही स्पर्धा मोठ्या जल्लोषात सुरू होती.

विद्यापीठ प्रांगणातील ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्रात रांगोळी व स्पर्धास्थळ छायाचित्रण स्पर्धा झाली. त्यात अनुक्रमे १५ व १७ विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. रांगोळी स्पर्धा ही विषयमुक्त होती, तर स्पर्धास्थळ छायाचित्रणासाठी पडछाया व व्यक्तिचित्रण हा विषय देण्यात आला होता. रांगोळी स्पर्धेत वृक्षतोड, संस्कृती, स्त्रीमुक्ती, अंधश्रद्धा, स्वच्छ भारत अभियान हे विषय हाताळण्यात आले होते. विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात आज दिवसभर भारतीय शास्त्रीय व बिगरचित्रपट एकल व समूहगीत गायनाचा कार्यक्रम झाला. त्यात १७ विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. त्यापैकी भारूड, गोंधळ, जोगवा, कव्वालीला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यानंतर विविध प्रकारच्या भारतीय वाद्यसंगीतांचा कार्यक्रम झाला. त्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

इंद्रधनुष्य २०१८ साठी ज्ञानगंगोत्रीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो विद्यार्थी दाखल झाले होते. पाच दिवसांच्या या सांस्कृतिक महोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांना आरोग्यसेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी बीव्हीजीच्या १०८ अत्यावश्यक सेवेंतर्गत एक अम्ब्युलन्स पुरविण्यात आली आहे. साधारण तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेतला. ही आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बीव्हीजीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब कंक्राळे आणि सहाय्यक जिल्हा व्यवस्थापक गौरी साबळे यांनी विशेष सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट -

$
0
0

\Bमानसोपचार तज्ज्ञांची बैठक\B

नाशिक : स्टेट सायकॉलॉजिस्टस असोसिएशन संघटनेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील सर्व मानसोपचार तज्ज्ञांची बैठक घेण्यात आली. एचपीटी-आरवायके कॉलेजच्या मानसशास्त्र विभागात ही बैठक झाली असून, या बैठकीत मानसोपचार तज्ज्ञांची भविष्यातील वाटचाल आणि करिअरच्या संधी या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी असोसिएशनच्या सदस्य रोहिणी अचवल, मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजश्री कापुरे यांसह मानसशास्त्रज्ञ अमोल कुलकर्णी, प्रा. तन्मय जोशी, सरिता पगारे, सायली विभांडिक, अमोघ क्षीरसागर, राधिका बेलापूरकर यांसह इतर मानसोपचार तज्ज्ञ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडी होणार गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भल्या सकाळी वातावरणात गारठा जाणवत असला तरी थंडीचा जोर ओसरत चालल्याचा अनुभव शहरवासी घेत आहेत. सोमवारी नोंदविण्यात आलेले २८.२ हे कमाल तापमान येत्या दोन तीन दिवसांत ३२ अंश सेल्सियसवर पोहोचेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी किमान तापमान १० अंश सेल्सियसपर्यंत गेल्याने नाशिककर बोचऱ्या थंडीचा अनुभव घेत होते. परंतु, गेल्या आठवडाभरापासून या किमान तापमानात वाढ होत गेली. कमाल तापमानात चढ उतार होत असले तरी पुढील आठवडाभरात हे तापमान वाढतच जाईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रविवारी किमान तापमान १२.८ अंश सेल्सियस तर कमाल तापमान २८.२ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. विशेषत: सकाळी थंडीचा जोर जाणवत असला तरी वातावरणातून गारवा गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना दिवसभर येतो आहे. ११ ते १६ डिसेंबर या कालावधीत मात्र कमाल तापमान टप्प्याटप्प्याने १२.८ अंश सेल्सियवरून १४ अंशांवर तर कमाल तापमान २८.२ अंशांवरून ३२ अंशांपर्यंत पोहोचेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने नोंदविला आहे.

निफाडला पारा नीचांकी

निफाड येथे सोमवारी या हंगामातील नीचांकी ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येथील गहू संशोधन केंद्रात ही नोंद करण्यात आली. निफाड, उगाव, कोठुरे आणि गोदाकाठ भागात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने थंडीचे प्रमाण वाढले आहे.

दिनांक-कमाल तापमान-किमान तापमान

४ डिसेंबर २८.९ १४.६

५ डिसेंबर ३०.५ १४.६

६ डिसेंबर ३१.४ १२.६

७ डिसेंबर ३१.५ १३.४

९ डिसेंबर ३१.० ११.३

१० डिसेंबर २८.२ १२.८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्होकेशनल कर्मचाऱ्यांचे सोमवारी आंदोलन

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक \B

येथील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाच्या सहसंचालकांकडून होणाऱ्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य एसएससी व्होकेशनल व अशासकीय तांत्रिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. १७) आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात आमदार बच्चू कडू आणि आमदार किशोर दराडे यांचा सह भाग राहणार आहे.

अशासकीय आस्थापनांमधील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना सलग १२ वर्षांच्या सेवेनंतर कालबद्ध पदोन्नती योजनेत २४०० रुपये ग्रेड पे दिला जातो. राज्यात मुंबई, नागपूर, अमरावती, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक या सहा प्रशासकीय विभागांमध्ये नाशिक वगळता इतर विभागांना सलग बारा वर्षांच्या सेवेनंतर २४०० रुपये ग्रेड पे संबंधित विभागातील सहसंचालकांनी लागू केला आहे. नाशिक विभागाचे सहसंचालक जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांची अडवणूक करीत असल्याचा संघटनेचा आरोप आहे.

याप्रश्नी संघटनेचे पदाधिकारी संवाद साधण्यास गेल्यास त्यांना हेतूपुरस्सर भेट दिली जात नाही. दिवस-दिवसभर केबिनबाहेर प्रतीक्षेत ठेवून पर्यायी अधिकऱ्यांशी औपचारिक भेट घालून दुर्लक्षित केले जाते. ग्रेड पे बाबत कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाची कोंडी फोडण्यासाठी सोमवारी (दि. १७) नियोजित आंदोलनास एचएससी व्होकेशनल विभागातील सर्व लिपिक कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे राज्य सचिव अरुण कांगणे, उपाध्यक्ष रमेश सावकारे, सदस्य संजय सानप, नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, धुळे जिल्हाध्यक्ष प्रदीप माणके, जळगाव व नगर जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाहेरच्यांनी पक्षशिस्त शिकवू नये

$
0
0

हिमगौरी आहेर-आडके यांचा दिनकर पाटील यांना टोला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळील सर्वे नं. ७०५ च्या २१ कोटींच्या रोखीच्या मोबदल्यावरून स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्यावर आरोप करणाऱ्या सभागृहनेते दिनकर पाटील यांना आहेर-आडके यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. पक्षातच जन्मलेल्यांना बाहेरून आलेल्यांनी पक्ष शिस्त शिकवू नये, असा टोला लगावत आपल्यावरील वैयक्तिक टिकेला कायदेशीर सल्ल्यानुसार उत्तर देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सभागृहनेते दिनकर पाटील यांनी सर्वे. नं. ७०५ च्या २१ कोटींच्या मोबदल्यावरून आहेर-आडके यांच्यावर आरोप केले. तसेच आहेर-आडके यांनी पक्षशिस्त मोडल्याचा आरोप करत, त्यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली. त्यामुळे पाटील यांच्या आरोपांना आहेर-आडके यांनी सोमवारी उत्तर दिले. आहेर कुटुंबीय हे पक्षाच्या स्थापनेपासूनच भाजपमध्ये आहे. त्यामुळे पक्षशिस्त काय आहे, याचे बाळकडू घरातच मिळाल्याने बाहेरून आलेल्यांनी आम्हाला पक्षशिस्त शिकवू नये, असा उपरोधिक सल्ला सभापती आहेर यांनी दिला. मुंढे यांच्यावरील अविश्‍वास ठरावावेळी पक्षशिस्त कोणी पाळली? कोणाच्या दुकानदाऱ्या बंद झाल्या? हे सुज्ञ नाशिककरांना माहित आहे. आहेर कुटुंबीयांचे नाशिकच्या विकासात कायम योगदान राहिले आहे. आम्ही वैयक्तिक फायद्यासाठी कधीही पदाचा वापर केला नाही. मात्र, पदावर असूनही कुणाच्या दुकानदारी बंद झाली, दम देण्याची भाषा कोण करते, हे नाशिककरांना माहित आहे. त्यामुळे आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आहेर कुटुंबाचे नाव आणि पक्षशिस्तीमुळे मी आतापर्यंत सहन केले. परंतु, आता सहन करणार नसल्याचा इशारा सभापती आहेर यांनी दिला. आपल्यावर वैयक्तिक टीका केल्याबद्दल कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर देणार असल्याचा दमही त्यांनी भरला आहे. त्यामुळे पालिकेत आता सभागृहनेते विरुद्ध स्थायी समिती सभापती असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

न्यायालयीन आदेशाने मोबदला

न्यायालयाने २०१६ मध्ये ५६ कोटी रुपयांचा मोबदला देण्याचे आदेश दिले. त्यापूर्वी संबंधित जागामालकाला काही प्रमाणात टीडीआर दिला गेला. उर्वरित मोबदला रोख घ्यायचा की टीडीआर स्वरुपात हा ऐच्छिक विषय आहे. त्यानुसार जागामालकाने रोखीची मागणी केली. पालिकेच्या नगरररचना विभागाने देखील पाच वेळा टीडीआर स्वरुपात मोबदल्यासाठी प्रयत्न केले. मात्र, जागामालक रोखीवरच अडून बसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार रोख रक्कम अदा करण्यात आली. परंतु, या तांत्रिक बाबींचा विचार न करता बेछूट आरोप करण्यात आले. मोबदला देण्याची बाब ही पूर्णता प्रशासकीय आहे. त्याच्याशी आपला कोणताही संबध नाही, असा दावाही आहेर-आडके यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संदर्भ’ला मिळणार लिफ्ट

$
0
0

शुभवार्ता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये लवकरच दोन नव्या लिफ्ट सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे टेंडर सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले असून, हे काम आगामी तीन महिन्यांत पूर्ण होऊ शकते. आजमितीस हॉस्पिटलमधील एक लिफ्ट बंद पडली असून, दुसरी लिफ्ट चार महिन्यांपूर्वीच दुरुस्त करण्यात आली.

शालिमार येथे असलेल्या संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये हार्ट, किडनी अशा महागड्या आजारांवर मोफत उपचार केले जातात. हॉस्पिटलमध्ये नाशिकसह विभागातील अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदूरबारसह औरंगाबाद विभागातील अनेक जिल्ह्यातील पेशंट मोठ्या संख्येने दाखल होत असतात. हॉस्पिटलमध्ये दोन लिफ्ट असून, पेशंटसाठी त्या उपयोगी ठरतात. हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर आणि अतिदक्षता विभाग हे वरच्या मजल्यावर आहे. त्यामुळे लिफ्ट बंद पडली की पेशंटला आल्या पावली माघारी फिरण्याची वेळ येते. दुसरा कोणताही पर्याय यासाठी उपलब्ध नाही. सध्या कार्यरत असलेल्या लिफ्ट १० वर्षांपेक्षा अधिक जुन्या झाल्या असून, सातत्याने बंद पडतात. जानेवारी २०१८ मध्ये या दोन्ही लिफ्ट बंद पडल्या होत्या. जवळपास तीन ते चार महिने हीच परिस्थिती होती. यानंतर दोनपैकी एक लिफ्ट सुरू करण्यात आली. याच दरम्यान, संदर्भ सेवा हॉस्पिटल प्रशासनाने याबाबतच प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. सरकारने त्यास मंजुरी देत ४० ते ४५ लाखांचा निधी या कामासाठी उपलब्ध करून दिला. निधी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने आता टेंडर नोटीस प्रसिद्ध केली असून, आगामी तीन महिन्यांत हे काम पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. हॉस्पिटलमध्ये लिफ्ट सुरू राहणे हे पेशंटसाठी अत्यावश्यक आहे. लिफ्ट बंद असताना गंभीर अवस्थेत येणाऱ्या पेशंटला दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर घेऊन जाणे अशक्य होते. त्यामुळे देखभाल दुरुस्तीची योग्य ती काळजी वेळेवर होणे आवश्यक असल्याचा मुद्दा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’तर्फे आज रास्तो रोको

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजप-शिवसेना युती सरकारने तातडीने कांद्याला हमीभाव जाहीर करून दिलासा द्यावा या मागणीसाठी मंगळवारी (दि. ११) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सकाळी १० वाजता मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा, या मागणीसाठी माजी खासदार समीर भुजबळ व जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्या उपस्थितीत मंगळवारी चांदवड चौफुली येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती 'राष्ट्रवादी'चे चांदवड तालुकाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड यांनी दिली. या आंदोलनात नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएम क्रीडा स्पर्धेचा उत्साहात समारोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मध्य मतदार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सीएम चषक क्रीडा स्पर्धेचा रविवारी रात्री समारोप झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कब्बडी, खो-खो, व्हॉलीबॉल, कुस्ती आणि कॅरम या खेळांच्या विजेत्या संघाना पारितोषिक देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जितेंद्र ठक्कर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे चिटणीस संतोष मंडलेचा, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते, प्रा. सुहास फरांदे, क्रेडाईचे तुषार चव्हाण यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धेत २३ हजार ७५० खेळाडूंनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिल्याबद्द्ल त्यांनी खेळाडूंची आभार मानले. या महोत्सवामध्ये अंतर्भाव असलेल्या क्रिकेट स्पर्धेलाही नाशिककरांनी भरघोस प्रतिसाद दिला असून, यामध्ये १३७ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे १६ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत.

स्पर्धेचे निकाल

कबड्डी

पुरुष

क्रीडा प्रबोधीनी - प्रथम क्रमांक

महाराष्ट्र पोलीस संघ - दुसरा क्रमांक

द्रोणाचार्य क्लब - तिसरा क्रमांक

महिला

नाशिक क्लब - प्रथम

रमाबाई आंबेडकर - दुसरा क्रमांक

रचना क्लब - तिसरा क्रमांक

कबड्डी शालेय गट

मुले

गुलालवाडी संघ - प्रथम

नवरचना क्लब - दुसरा क्रमांक

वाघ गुरुजी संघ - तिसरा क्रमांक

मुली

सारडा कन्या शाळा - प्रथम

वाघ गुरुजी संघ - दुसरा क्रमांक

खो-खो

पुरुष

समर्पण क्लब - प्रथम

एकलव्य रेसिडेन्सी दुसरा क्रमांक

केटीएचएम - तिसरा क्रमांक

महिला

केटीएचएम- प्रथम

रमाबाई आंबेडकर - दुसरा क्रमांक

व्ही. एन. नाईक- तृती क्रमांक

हॉलीबॉल - पुरुष

मित्र विहार - प्रथम

यशवंत व्यायाम शाळा - दुसरा क्रमांक

वीरेंद्र क्रीडा मंडळ - तिसरा क्रमांक

महिला

वीरेंद्र क्रीडा मंडळ 'अ'- प्रथम

वीरेंद्र क्रीडा मंडळ 'ब ' - दुसरा क्रमांक

महाराष्ट्र पोलिस संघ - तिसरा क्रमांक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेळगाव ढग्यातील खुनाचेधागेदोरे पोलिसांच्या हाती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

बेळगाव ढगा शिवारात १७ वर्षीय मुलाच्या खूनप्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून, लवकरच मुख्य संशयितास ताब्यात घेतले जाणार असल्याचे सातपूर पोलिसांनी सांगितले. हा खून मांडूळ सापाच्या तस्करीतून झाला असावा, अशी चर्चा परिसरात आहे.

संतोष श्यामराव आगम घरी न परतल्याने त्याच्या भावाने रविवारी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मात्र, त्याचवेळी बेळगाव ढगा शिवारातील खदानीच्या रस्त्यावर संतोषचा मृतदेह आढळला. संतोषवर धारधार शस्त्राने १२ ते १३ वार केल्याचे आढळले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. संतोषसोबत राहणाऱ्या १५ ते २० जणांची चौकशी रविवारी रात्रीपासूनच पोलिसांनी सुरू केली होती. अखेर संतोष आगम खुनाचा गुन्हा सातपूर पोलिसांना उलगडला आहे. पोलिस मुख्य संशयिताच्या मागावर रात्री उशिरापर्यंत होते. लवकरच त्याच्यासह इतरांना ताब्यात घेण्यात येईल, असे सातपूर पोलिसांनी सांगितले. दरम्यान, संतोषच्या खुनामागे नेमके कारण काय, याचा उलगडा संशयित ताब्यात आल्यावरच होणार आहे. सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images