Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अंत:करणापासून होतो मनुष्यजन्म

$
0
0

स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जन्मानंतर चेतना नसेल तर बाळाचा जन्म झाला असे म्हणता येत नाही. फक्त शरीर निर्माण होणे म्हणजे जन्म नव्हे, तर शरीरात चेतना निर्माण होणे म्हणजे जन्म होय. शरीरात चेतना आणि मन निर्माण करण्याचे काम अंतःकरण करते. त्यामुळे अंतःकरणापासून प्रत्येक सजीवाचा जन्म होतो, असे प्रतिपादन श्रृतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले. शंकराचार्य न्यास व शिवशक्ती ज्ञानपीठ त्र्यंबकेश्वर यांच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.

गंगापूररोडवरील शंकराचार्य न्यास संकुलात 'मृत्यू आणि पुनर्जन्माचे रहस्य' ही व्याख्यानमाला सुरू आहे. न्यासाचे ट्रस्टी जोशी यांच्या हस्ते स्वामीजींचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानमालेचे बुधवारी तिसरे पुष्प गुंफतांना स्वामीजी म्हणाले, की शरीरात चेतना कोठून आले या संदर्भात हजारो वर्षांपूर्वी वेदांमध्ये लिहिण्यात आले आहे. वेदांमध्ये सांगितलेल्या अनेक तत्त्वांवर सध्याचे विज्ञान आधारित आहे. जिथे जिवंत व्यवहार आणि कर्मासह चेतनत्व आहे, तिथे मन आणि अंतःकरण असते. अंतःकरणाशिवाय शरीर चेतनामय होत नाही, शरिरातील चेतना संपते तेव्हा अंतःकरणही संपुष्टात येते आणि तेव्हाच सजीवाचा मृत्यू होतो. अंतःकरण हे विश्वातील सर्वात सूक्ष्म गोष्ट आहे, या पेक्षा सूक्ष्म आणखी काहीही नाही. तसेच अंतःकरणाच्या मागे असा प्रकाश आहे की, जो मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराच्याही मागे असून, अमूर्त आणि न दिसणारा आहे त्यालाच चेतनत्व असे म्हणतात. मनाला चेतना कोठून मिळाली याचा शोध सध्या पॅरासायकॉलॉजीमध्येही घेतला जात असून, मनाला चेतना अंतःकरणाच्या मागील प्रकाशातून मिळाल्याचे वेदात सांगितले आहे.

ज्ञानेद्रियांना चेतना अंत:करणातून

अंतःकरण हे अमर्याद असून, विश्वातील सर्व विषय त्याच्याशीच निगडित आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध याच्याशी निगडित सर्व विषय असून, कान, नाक, डोळे, घसा, त्वचा आणि जीभ या पाच ज्ञानेद्रीयांकडून हे विषय जाणून घेतले जातात. या ज्ञानेद्रीयांना कार्यान्वित करण्याचे काम अंतःकरण करत असून, विचार, बुद्धी, कर्म अंतःकरणाच्या सांगण्यावरून घडते. त्यामुळे जेव्हा अंतःकरणाचा लोप होतो, तेव्हा प्रत्येक सजीव मृत होतो, असे स्वामींनी सांगितले.

लोगो : सोशल कनेक्ट

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाल्कनी कव्हर

$
0
0

बाल्कनीही केली बंदिस्त

महापालिकेचे आयुक्त बदलताच दरवेळेस आयुक्तांच्या बंगल्यात अनेक बदल केले जातात. मुंढे यांच्या कार्यकाळातही बंगल्यात फर्निचर करण्याबरोबरच वास्तूमध्ये फेरबदल करण्यात आल्याचे बांधकाम विभागाचे अधिकारी खासगीत सांगतात. मिळकत सर्वेक्षणात खुली बाल्कनी बंदिस्त करून घेणाऱ्या मिळकती मुंढे यांनीच अनधिकृत ठरवल्या होत्या. आयुक्त निवासातही बाल्कनी बंदिस्त करून घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांना वेगळा न्याय आणि आयुक्त बंगल्याला वेगळा न्याय का, असा सवाल भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. नागरिकांना बांधकामात बदल केल्यास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेण्याचा आग्रह धरणारी मनपा स्वत:च्या वास्तुमध्ये बदल केल्यानंतरही पूर्णत्वाचा दाखला घेत नाही. त्यामुळे याचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्धार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोहातील आकाश शोधाची गोष्ट ‘विसर्जन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जगणं सुरू होण्याच्या उंबरठ्यावर मरण कवटाळू पहाणारा वैफल्यग्रस्त तरुण शेतकरी आनंद, लौकिकार्थान जगणं संपत आलेलं असतानाही ते सुरू होण्याची प्रदीर्घ प्रतीक्षा करीत बसलेली आजी आणि जगाला जगणं समजवून देण्याच्या गदारोळात हरवलेल्या थोरल्या भावाला अनंत काळ शोधत रहाणं, हेच अनादी जगणं घेऊन प्रवासत रहाणारा रंगा या तिघांच्या सुख दुख:चा धांडोळा घेणारे 'विसर्जन' हे नाटक बुधवारी राज्य नाट्यस्पर्धेत सादर झाले.

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचे अश्वमेध थिएटर्स आणि सपान नाशिक या संस्थेच्या वतीने प. सा. नाट्यगृहात सादरीकरण करण्यात आले.

या कथेत असलेल्या आनंदने आई बापाचे छत्र हरवलेलं असते. त्याची आजी मात्र जिवंत असते. तिचा नवरा व आनंदचा आजोबा हा देखील वारीत परागंदा झालेला असतो. त्याची आठवण म्हणून आजीने एक मंदिर बांधलेले असते; मात्र या मंदिराचा गाभारा रिकामा ठेवलेला असतो. परागंदा झालेल्या नवऱ्याला शोधायचे आणि येताना विठ्ठलाची मूर्ती घेऊन यायची व मंदिरात स्थापना करायची अशी आजीची इच्छा असते. याच वेळी रंगा नावाचा वारकरी त्याच्या भावाचा शोध घेण्यासाठी वारीत निघालेला असतो. धावत येत तो आनंदला आजीकडे घेऊन येतो; पुन्हा आनंद जगण्याच्या लढाईत ढकलला जातो त्यानंतर रंगा निघून जातो. 'स्व' विर्सजित झाल्याशिवाय 'गाभारे' भरत नसतात कधीच, म्हणूनच ही एक आहे डोहातील आकाशशोधाची गोष्ट.

नाटकाचे लेखन दत्ता पाटील व दिग्दर्शन सचिन शिंदे यांचे होते. नेपथ्य लक्ष्मण कोकणे, शेखर सरोदे, प्रकाशयोजना राहुल गायकवाड, संगीत संयोजन रोहीत सरोदे, राजेंद्र उगले, गीत दत्ता पाटील, राजेंद्र उगले, रंगभूषा माणिक कानडे वेशभूषा चेतन बर्वे, उर्वराज गायकवाड, पार्श्व संवाद प्राजक्त देशमुख, प्रशांत साठे, निर्मिती प्रमुख विश्वास ठाकूर, सूत्रधार विनायक रानडे, सहय्य प्रणव प्रभाकर, राजेश भुसारे, हेमंत महाजन, गिरीश गर्गे यांचे होते.

नाटकात आनंद-धनंजय गोसावी, आजी-दीप्ती चंद्रात्रे, रंगा-नीलेश सूर्यवंशी, कार्तिकेय कंट्रोजवार, चेतन बर्वे, एकता आढाव, पूजा पूरकर, दामिनी जाधव, अंकीता साळूंखे, प्रतिक गोवर्धने, प्रतिक शर्मा, सुरज बोडाइ, अर्थव लाखलगावकर, प्रतिक कुलकर्णी, विनायक अमृतकर यांनी भूमिका केल्या.

गायन वादनाची साथ राजेंद्र उगले, अरुण इंगळे, दत्ता अलगट, शुभम लांडगे, अपूर्व इंगळे यांनी केली.

आजचे नाटक

डोंगरार्त

झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ

स्थळ : प. सा. नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ७ वाजता

\Bलोगो : राज्य नाट्य स्पर्धा

फोटो : पंकज चांडोले \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नगररचना’ला वाली कोण?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऑटो डीसीआर प्रणालीतल्या किचकट प्रक्रियेमुळे गेल्या तीन महिन्यांत नगररचना विभागाकडून एकही बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला गेला नसल्याचे चित्र असतानाच, आता नगररचना विभागातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे अधिकारीच रजेवर गेले आहेत. विद्यमान सहाय्यक संचालक सुरेश निकुंभे हे प्रकृतीच्या कारणास्तव तीन आठवड्यांपासून रजेवर गेले असून, त्यांचा अतिरिक्त पदभार असलेले कार्यकारी अधिकारी उदय धर्माधिकारीही खासगी कारणासाठी रजेवर गेले आहेत. त्यामुळे विभागाचा पदभार चक्क उपअभियंत्याकडे सोपविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. कम्पाउंडींग पॉलिसीची मुदत अवघे तीन आठवडे उरली असताना व बांधकाम परवानग्यांचे कामकाज ठप्प पडल्याने प्रभारी अधिकारी तरी द्या, अशी विनंती प्रशासनाने सहसंचालक प्रतिभा भदाणे यांच्याकडे केली आहे.

शहराच्या विकासाचा सुकाणू असलेल्या नगररचना विभागावरील संकटाचे शुक्लकाष्ठ संपत नसल्याचे चित्र आहे. कधी कपाट, कधी डीसीपीआर, कधी रस्ते रुंदीकरण, कधी ऑटो डीसीआर तर कधी पार्किंगसंदर्भातील किचकट नियमांमुळे गेल्या चार वर्षांपासून शहरातील बांधकाम व्यवसायाला घरघर लागली असून, गेल्या तीन महिन्यांपासून तर नगररचना विभागाचे कामकाजच ठप्प पडले आहे. ऑटो डीसीआर प्रणालीतील दोषामुळे आणि नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळे वर्षभरापासून कामकाज कासव गतीने सुरू आहे. त्याचा विपरीत परिणाम शहर विकासावर झाला आहे. त्यातच मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे अनेक अधिकारी रजेवर गेल्याचाही परिणाम विभागाच्या कामकाजावर झाला आहे. सहाय्यक संचालक आकाश बागूल यांच्या बदलीनंतर आलेल्या सुरेश निकुंभेंनीही नगररचना विभागाच्या कामकाजातून लक्ष काढून घेतले आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून निकुंभे प्रकृतीच्या कारणास्तव रजेवर गेले असून, कधी परत येतील त्यासंदर्भात विभागातच माहिती नाही. निकुंभे यांचा अतिरिक्त पदभार कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला असून, ते पंधरा दिवसांपासून हा भार सांभाळत आहेत. परंतु, कौटुंबिक कारणामुळे धर्माधिकारीही रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील कारभार उपअभियंता संजय अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. धर्माधिकारी व निकुंभे आता जानेवारीतच परत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एवढ्या कालावधीसाठी अग्रवाल यांनीही हा पदभार पुढे सांभाळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पदभार आता कोणाकडे सोपवावा, अशी चिंता प्रशासनाला सतावत आहे. नगररचना विभागातील या गोंधळामुळे विभागासह शहरातील बांधकाम व्यावसायिकांचेही कामकाज ठप्प पडले आहे.

आम्हाला अधिकारी द्या

बांधकाम परवानग्यांची नस्ती मार्गी लावण्याचे अधिकार फक्त निकुंभे आणि धर्माधिकारी यांनाच आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा नगररचना सहाय्यक संचालकांच्या रिक्त जागेचा पदभार सक्षम अधिकाऱ्याला देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत प्रशासन विभागाने नगररचना सहसंचालकांना प्रस्ताव पाठवून तात्पुरता कार्यभार कोणाकडे तरी द्या, असे आर्जव नगररचना सहसंचालकांकडे केले आहे. परंतु, या विभागाकडून अद्याप कोणाचीही नियुक्ती न झाल्याने प्रशासनाची धडधड वाढली आहे.

उरले अवघे २६ दिवस

राज्य शासनाने अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी दिलेली मुदत ३१ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे प्रस्ताव दाखल करण्यासाठी अखेरचे २६ दिवस उरले आहेत. आतापर्यंत दाखल असलेल्या २९० प्रकरणांची छाननी करावी लागणार आहे. त्यातच मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या ६२ हजार मालमत्तांचे नगररचना विभागाकडून व्हेरिफिकेशन सुरू होणार आहे. त्यामुळे बांधकाम परवानग्या, कम्पाउंडिंग पॉलिसीची प्रकरणे आणि मिळकती तपासण्याचे काम विभागाकडे असतानाही, या विभागाचे कामकाज कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे नगररचना विभागात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांची भाविकाला दमदाटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

धार्मिक तीर्थस्थानावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून रिक्षाचालक प्रवासाचे जास्तीचे भाडे वसूल करण्याचे प्रकार घडत आहे. आता तर काळाराम मंदिरासमोर भाविकांना दमदाटी करण्याचे प्रकार घडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने उघडकीस आला आहे.

'मी रिक्षाचालक नाही, गुंडा आहे', असे म्हणणाऱ्या अजय ज्ञानेश्वर खेमनार (वय २२, रा. गोपालनगर, अमृतधाम, पंचवटी) संशयित रिक्षाचालकाला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षाचालकांची वाढलेली मनमानी त्यातून भाविकांना त्रास होत असल्याचे प्रकार वाढले आहे. पंचवटीतील रामकुंड, कपालेश्वर, काळाराम मंदिर, सीतागुंफा, तपोवन या धार्मिक स्थळावर दर्शनासाठी येणाऱ्या परराज्यातील भाविकांची मोठे वाहने गोदाघाटाच्या पार्किंगच्या भागात पार्क केली जातात. तेथून भाविक रिक्षाने येथील धार्मिक स्थळावर जातात, बाहेरच्या राज्यातील भाविकांची काही रिक्षाचालकांकडून फसवणूक करण्याचे प्रकार घडत असतात. त्यातून अनेकदा वाद होतात.

रिक्षाचालक जास्तीचे प्रवाशी बसविणे, जास्तीचे भाडे वसूल करणे, बेशिस्तपणे रिक्षा चालविणे, पोलिसांनाही न जुमानने असे प्रकार रोज घडत आहे. त्यात भर म्हणून आता भाविकांना रिक्षाचालक 'मै गुंडा हूँ' असे म्हणत भाविकाला दमदाटी केली. ही दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओची पंचवटी पोलिसांनी दखल घेत संबधीत रिक्षाचालकाला बुधवारी (दि. ५) ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लसीकरणाला सुरुवात

$
0
0

सिन्नर : येथील सगुणाबाई भिकुसा प्राथमिक शाळेत मंगळवारी (दि. ४) गोवर, रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात आली. डॉ. दिपाली देसले-सावंत यांनी लसीकरणाचे महत्त्व व त्याबाबत शंका समाधान याबाबत उपस्थित विद्यार्थी, शिक्षकांना माहिती दिली. डॉ. प्रियंका पाटील तसेच परिचारिका वैशाली पा‌नसरे, आशा रामटेके, मनीषा शिंदे यांनी मोहीम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. ४७५ विद्यार्थ्यांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला. डॉ. विजयसिंग मुंडे, डॉ. प्रशांत खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४४ विषयांना मंजुरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराचा विकास करण्यासाठी नगरपालिका कटीबद्द असून, नगरपालिकेच्या इतिहासात व नाशिक जिल्ह्यात प्रथमच सटाणा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल १४५ विषयांना ठरावाद्वारे मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शहराच्या विकासाला अधिक चालना मिळणार असल्याने नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सांगितले.

सटाणा नगरपालिकेच्या सभागृहात मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत १४५ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी १४४ विषय एकमताने मंजूर करण्यात आले. पुढील काही दिवसांत लोकसभा व विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे आचारसंहिता लागणार. परिणामी विकासकामांना ब्रेक लागणार. त्यामुळे आतापासूनच सुयोग्य नियोजन करणे सुरू आहे. त्यानुसार शहरातील सर्वच प्रभाग क्रमांक १ ते १० मधील विविध विकास कामांचे १४४ विषयांना सभेत मान्यता देण्यात आली.

यावेळी मोरे यांच्यासह उपनगराध्यक्ष बाळू बागुल, राकेश खैरनार, महेश देवरे, नितीन सोनवणे, दिनकर सोनवणे, सुनीता मोरकर, राहुल पाटील, दीपक पाकळे आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लसीकरणासाठी पालकांचीच शाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंजेक्शनच्या सुईपासून पळ काढू पाहणारे चिमुकले... सुई टोचल्याने सुरू असलेली रडारड... गाणी, गोष्टींच्या माध्यमातून त्यांचे मन रमवू पाहणारे शिक्षक.. अन् आपल्या पाल्याची काळजी घेण्यासाठी आलेले पालक.. असे चित्र जिल्ह्यातील शाळांमध्ये सध्या दिसत आहे. जिल्हाभरातील शाळांमध्ये गोवर, रुबेला लसीकरण मोहीम सध्या सुरू आहे. लस देतेवेळी पालकांनीही उपस्थित रहावे, असे आवाहन शाळा प्रशासनांकडून केले जात असल्याने शाळांमध्ये पालकांची गर्दी होत आहे.

भारतात दरवर्षी ५० हजार बालकांचा गोवरमुळे मृत्यू होतो व ४० हजार बालकांना व्यंगत्व येते. हे दोनही आजार २०२०पर्यंत नियंत्रित करण्याच्या दृष्टीने मिझल रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. गोवर उच्चाटन व रुबेला नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत नऊ महिन्याच्या बालकांपासून १५ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींना गोवर, रुबेला लस दिली जात आहे. Ḥमात्र, लस घेतल्यानंतर रिअॅक्शन येत असल्याच्या चर्चा, उदाहरणे पुढे येत असल्याने लसीकरणावेळी पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शाळांकडून केले जात आहे. त्यामुळे ज्या दिवशी संबंधित शाळेत लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे, त्या दिवशी पालक शाळेत उपस्थित राहत आहे. शिशूवृंद, प्राथमिक विभागातील वर्गांमधील चिमुकल्यांमध्ये असलेल्या इंजेक्शनच्या भीतीमुळे गोंगाट, रडारडीचे वातावरण आहे. अशा विद्यार्थ्यांना चॉकलेट, गोळ्या देऊन, मनोरंजनात्मक कार्यक्रम, गाणी दाखवित शांत करण्याची कसरत पालक, शिक्षकांकडून केली जात आहे. लस दिल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याच्या आरोग्यावर काही परिणाम होत आहे का, रिअॅक्शन आली आहे का, हे तपासण्यासाठी साधारण अर्धा तास विद्यार्थ्यांना शांत बसवून ठेवले जात आहे. त्यांना इंजेक्शननी रिअॅक्शन आल्यास प्राथमिक उपचार केला जात आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील दोघे नोकरी करणारे असणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र लसीकरणावेळी पंचाईत होत आहे. अशा विद्यार्थ्यांना पालकांशी समन्वय साधून लस दिली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षाचालकाची मुजोरी

$
0
0

वाहतूक पोलिसांला धक्काबुक्की, शिवीगाळ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षावर कारवाई केली म्हणून रिक्षाचालकासह त्याच्या अन्य साथीदारांनी वाहतूक पोलिसास शिवीगाळ व धक्काबुक्की केली. साथीदारांपैकी एका महिलेने वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळ गोंधळ घातला. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. सरकारवाडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अक्षय कल्याण आहिरे (वय २४), ज्योती समाधान गायकर (वय ३१, दोघेही, रा. शिवाजीनगर, सातपूर) यांच्यासह योगेश मुरलीधर आहिरे (वय ३६, रा. समर्थ सोसायटी, दिघी रोड, भोसरी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करा, अशा सूचना मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वाहतूक पोलिसांना करण्यात आल्या होत्या. वाहतूक पोलिस हवालदार नामदेव कारभारी सोनवणे (वय ५१) हे कर्तव्य बजावत असताना त्यांना संशयित अक्षय आहिरे हा रिक्षाचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची रिक्षामधून वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. रिक्षावर (एमएच १५ एफक्यू ०८७८) कारवाई करीत त्यांनी ती जमा करवून घेतली. सायंकाळी सातच्या सुमारास संशयित शरणपूर रोडवरील वाहतूक शाखा कार्यालयात आले. सोनवणे तेथे नसल्याने त्यांना फोन केला. आम्हाला पावती फाडायची असून तुम्ही वाहतूक शाखेच्या कार्यालयात या असे त्यांना सांगू लागले. तुमच्या रिक्षावर कारवाई केल्याचा अहवाल कोर्टात पाठविला आहे. तुमची केस कोर्टात गेल्याने तेथेच दंड भरा. मला भेटून उपयोग नाही, असे सोनवणे यांनी त्यांना सांगितले. परंतु, तरीही ते विनंती करू लागल्याने सोनवणे वाहतूक शाखेच्या कार्यालयात आले. कारवाईचा अहवाल कोर्टात पाठविल्याचे त्यांनी अक्षय आणि त्यांच्या साथीदारांना सांगितले. मात्र, त्यावेळी संशयित ज्योती गायकर त्यांच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलू लागली. सोनवणे त्यांना कारवाईची पद्धती समजावून सांगत असताना आरडाओरडा व शिवीगाळ करू लागली. अन्य संशयित सोनवणे यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना धक्काबुक्की करू लागले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी फोन करून निर्भया व्हॅन बोलावून घेतली. तिघांना सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गमे आज घेणार पदभार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे हे आज, गुरुवारी आयुक्तपदाचा चार्ज घेणार असून, प्रशासनाकडून याबाबतीतले सोपस्कार पूर्ण करण्यात आले आहेत. गमे हे पदभार घेतल्यानंतर तातडीने सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन लागलीच कामाला सुरुवात करणार आहेत. बुधवारी प्रशासनाकडून पालिकेच्या कामकाजाचा तसेच प्रशासकीय स्थितीचा लेखाजोखा सादर करण्यासाठी घाई सुरू होती. सर्व विभागांच्या कामांचा आढावा गमेंसमोर सादर केला जाणार आहे.

लोकप्रतिनिधींशी सूत न जुळल्याने तुकाराम मुंढे यांची पालिकेच्या आयुक्तपदावरून अवघ्या नऊ महिने १३ दिवसांतच उचलबांगडी करण्यात आली होती. मुंढेंच्या बदलीनंतर राधाकृष्ण गमें आयुक्त होणार ही चर्चा असली तरी, त्यांचे बदलीचे आदेश निघाले नव्हते. त्यामुळे गेल्या चौदा दिवसांपासून पालिकेचे आयुक्तपद रिक्त होते. राज्य सरकारने मंगळवारी गमे यांची पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करीत, त्यांच्या बदलीचे आदेशही काढले. त्यामुळे पालिकेला अखेर पूर्णवेळ आयुक्त मिळाला असून, ते आज आयुक्तपदाचा भार स्वीकारणार आहेत. गमेंनी बुधवारी उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदाचा चार्ज सोडला. सध्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे आहे. गमे जिल्हाधिकाऱ्यांकडून पदभार स्वीकारणार आहेत.

प्रशासनाची धावपळ

गमे हे आज पदभार घेणार असल्याने त्यांच्यासमोर पालिकेच्या कामकाजाचा लेखाजोखा सादर करण्याची धावपळ पालिकेत बुधवारी सुरू होती. सर्व विभागांचे पीपीटी तयार करण्यात आले असून, त्यांचे सादरीकरण गमेंच्या समोर केले जाणार आहे. त्यामुळे विभागाचे कामकाज, विभागप्रमुख कोण यांच्यासह पालिकेचा मंजूर आकृतीबंध, सध्या रिक्त पदांची माहिती आदींची जमवाजमव सुरू होती. सोबतच महासभा तोंडावर असल्याने महत्त्वाचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यासंदर्भातील काही प्रस्तावांचीही माहिती सादर केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेने चोरला घरातून मोबाइल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजीचा मोबाइल क्रमांक मागण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या अनोळखी महिलेने घरातून १० हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. मंगळवारी (दि. ४) दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी प्रांजल सचिन पाटील (वय १९, रा. रेखाकृती सोसायटी, महात्मानगर) यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्या घरात एकट्या असताना एका अनोळखी महिलेने घराची बेल वाजविली. प्रांजल यांनी दरवाजा उघडल्यानंतर तुमच्या आजींचा मोबाइल क्रमांक हवा होता असे त्या महिलेने सांगितले. प्रांजल यांनी तिला घरात घेतले. आजीचा मोबाइल क्रमांक दिला. तिच्याकरीता पाणी आणण्यासाठी प्रांजल स्वयंपाकघरात गेली. पाणी पिऊन ती महिला निघून गेली. त्यानंतर सोफ्यावर ठेवलेला मोबाइल घरात नसल्याचे तिच्या लक्षात आले. शोधाशोध करूनही महिलेचा थांगपत्ता न लागल्याने अखेर त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

एसटीच्या बॅटऱ्यांची चोरी

नाशिक : पंचवटीतील राज्य मार्ग परिवहन आगारात उभ्या असलेल्या एसटीच्या बॅटऱ्या चोरीस गेल्याचा प्रकार मंगळवारी (दि. ४) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला. आगार व्यवस्थापक विक्रम सोमनाथ नागरे (वय ३०, रा. पिंपळगाव बहुला) यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. चोरट्याने सोमवारी सायंकाळी सहा ते मंगळवारी सकाळी आठ या कालावधीत एसटी बसच्या (एमएच २० डी ९४०८) अॅडो कंपनीच्या बॅटऱ्या चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राम मंदिरासाठी नाशिकमध्ये संतसभा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी नाशिक जिल्हा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे येत्या शनिवारी (दि. ८) भद्रकालीतील साक्षी गणेश मंदिर परिसरात सायंकाळी सहा वाजता संत सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा यशस्वी करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी बुधवारी व्यक्त केला.

संत सभेच्या नियोजनासाठी संघ परिवारातर्फे वसंतस्मृती कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राम हा सर्वांच्या श्रद्धेचा विषय असून, राम मंदिर व्हावे ही सर्वांची इच्छा असल्याचे विहिंपचे जिल्हामंत्री गणेश सपकाळ आणि रा. स्व. संघाचे विभागीय कार्यवाह संजय कुलकर्णी यांनी सांगितले. त्याच्या जनजागृतीसाठीच संतसभा असून, ती यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी करताच संतसभा विराट होईल, असा विश्वास उपस्थित सर्वांनी व्यक्त केला. संत सभेत विहिंपचे संघटन मंत्री विनायकराव देशपांडे, ह. भ. प. माधव महाराज घुले आदी आपले विचार मांडणार आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, महानगर अध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे आदिंनीही यावेळी मार्गदर्शन करून सभेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दुर्गा वहिनीच्या सहसंयोजिका मीनल भोसले यांचेही भाषण झाले. व्यासपीठावर प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, सभागृह नेते दिनकर पाटील, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष रोहिणी नायडू आदी होते. बैठकीस नगरसेवक आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवन भगुरकर यांनी सूत्रसंचलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधनदर कपातीने दिलासा

$
0
0

दहा दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किमतीत सुमारे ३ रुपयांनी घट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या इंधन दरवाढीने पोळलेल्या वाहनचालकांना आता दिलासा मिळाला असून, गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सुमारे ३ रुपयांनी घट झाली आहे. दहा दिवसांत पेट्रोल ३.२३ तर डिझेलचे दर ३.५० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे मागील महिन्यात इंधन दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांना डिसेंबरमहिन्याच्या प्रारंभी दिलासा मिळाला आहे. सध्या इंधनाच्या किमतीत घट होत असल्याने, वाहनचालक सुखावले असून, इंधनाच्या किमती कमीच राहाव्यात, अशी अपेक्षा वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

शहरात बुधवारी, ५ डिसेंबर रोजी पेट्रोल ७७.३६ रुपये आणि डिझेल ६८.४६ रुपये होते. मंगळवारी, ४ डिसेंबर रोजी पेट्रोलची ७७.९३, तर डिझेलची ६९.०१ रुपये किंमत होती. शहरात २५ नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्यास सुरुवात झाली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असल्याने भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दरात कपात केली असल्याचे समजते. गेल्या महिन्यात ८० रुपयांच्या घरात असलेले इंधन दर कमी होऊ लागल्याने सध्या वाहनचालक सुखावले आहेत. ऑक्टोबरमध्ये इंधन दरवाढीमुळे वाहनचालकांना जादा पैसे मोजावे लागत होते. नोव्हेंबर महिन्यात इंधराचे दर कमी होण्यास सुरुवात झाली असून, डिसेंबर महिन्यात इंधनाचे दर कमीच राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऑक्टोबरमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमती नव्वदीपर्यंत पोहोचल्याने इंधन शंभरी गाठणार अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगली होती. मात्र, सध्या इंधन दर होऊ लागल्याचा आनंद आता वाहनचालक व्यक्त करीत आहेत. इंधन दरातील ही स्वस्ताईची कायम राहावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांनी व्यक्त केली आहे.

\Bदहा दिवसातील इंधनाचे दर

\Bदिनांक........... पेट्रोल.......... डिझेल

५ डिसेंबर........ ७७.३६ ....... ६८.४६

४ डिसेंबर........ ७७.९३ ....... ६९.०१

३ डिसेंबर........ ७८.२० ....... ६९.१४

२ डिसेंबर........ ७८.८९ ....... ६९.१४

१ डिसेंबर........ ७८.४६ ....... ६९.७५

३० नोव्हेंबर...... ७८.८० ....... ७०.१३

२९ नोव्हेंबर...... ७८.८० ....... ७०.८९

२८ नोव्हेंबर...... ७९.४५ ....... ७०.८९

२७ नोव्हेंबर...... ८०.६७ ....... ७१.०५

२६ नोव्हेंबर...... ८०.५९ ....... ७१.९६

पेट्रोलचे दर कमी झाल्याने आनंद आहे. दहा दिवसांत पेट्रोल बऱ्यापैकी स्वस्त झाले आहे. आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर इंधन दरवाढ होऊ नये, ही अपेक्षा आहे.

- स्वप्नील नागरे, नागरिक

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होणारी घट कायम असावी. इंधन ऐंशी किंवा नव्वदीच्या घरात गेल्यावर आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. सध्या डिझेल आणि पेट्रोलची किंमत कमी होत असल्याने दिलासा आहे.

- आकाश सोनवणे, नागरिक

फोटो देतो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वणवे पेटविणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा चारा टंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची शक्यता असून या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेण्यास प्राधान्य दिले आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वरसह जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात वणवे पेटण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे यापुढील काळात वणवा पेटविणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिला आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारपुढे निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सध्या चाऱ्याची उपलब्धता बऱ्यापैकी असली तरी भविष्यात ही समस्या जटील रूप धारण करू शकते. म्हणूनच आहे तो चारा टिकविण्यासह नवीन चाऱ्याच्या निर्मितीसाठी धरणक्षेत्रातील उपलब्ध जमिनींवर चाऱ्याची लागवड करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. वणवे पेटविल्यास जनावरांसाठीचा खुराक असणारे गवत जळून जाते. यंदा असे प्रकार घडू नयेत यासाठी वणवा पेटविणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अनेकदा वन्यजीवांना पकडण्यासाठी वणवे पेटविले जातात. वणवा विझविल्यानंतरही होरपळलेल्या झाडांचा लिलाव होतो. यातून माफियांना बक्कळ पैसे मिळतात. वणव्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे मोठे नुकसान होते. हे प्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खास पथक तयार केले असून पोलिस प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.

चारा छावण्यांबाबत आढावा

जिल्ह्यातील चाऱ्याची सद्यस्थिती जिल्हयातील जनावरांची एकूण संख्या, चाऱ्याची उपलब्धता याबाबतचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. पशुधनाची अधिक संख्या असलेल्या ठिकाणी चारा छावण्या सुरू कराव्या लागण्याची शक्यता असून त्याबाबतचा अंदाज या आढावा बैठकीत घेण्यात आला. याबाबतचा अहवाल दुष्काळ पाहणीसाठी येणाऱ्या केंद्रीय पथकाकडे दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री आज घेणार दुष्काळाचा आढावा

$
0
0

केंद्रीय पथकासोबत ओझरला बैठक

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आज, गुरुवारी रात्री ओझर विमानतळावर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दुष्काळाच्या पाहणीसाठी जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकाशी यावेळी मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मुख्यमंत्री फडणवीस आज (दि. ६) धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. तेथून परतताना ते ओझर विमानतळावर नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी राज्यात दाखल झालेले केंद्र सरकारचे पथक गुरुवारी मालेगाव तालुक्यातील मेहुणे, जळगाव (निं.) या गावांच्या दौऱ्यावर येत आहे. पाहणी करून हे पथक ओझर विमानतळावर पोहोचेल. तेथे मुख्यमंत्री जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर आढावा बैठक घेणार असून, या बैठकीला जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसह केंद्रीय पथकाचे अधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाभाडी क्लस्टरच्या कामांना प्राधान्य द्या

$
0
0

झेडपीच्यी सीईओंचे आढावा बैठकीत निर्देश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

दाभाडी क्‍लस्टरमध्ये समाविष्ट गावांचा विकास करताना भूमिगत गटार, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यावर विशेष भर देऊन सदरची कामे पूर्ण करावीत. तसेच यासाठी ग्राम विकास आराखड्यातील घेतलेल्या कामांना प्राधान्य द्यावे असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.

मालेगाव येथील पंचायत समिती कार्यालयात रुरबन मिशन अंतर्गत दाभाडी क्‍लस्टरमधील विकासकामांबाबत आढावा बैठक झाली. त्यात, दाभाडी क्‍लस्टर अंतर्गतच्या आठ गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, पथदीप, जनसुविधा अंतर्गत प्रस्तावित कामे, जलयुक्त शिवार, आरोग्य, शिक्षण कृषीविकासाच्या योजना, कौशल्य विकास, घरकुल योजनाचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील गावांच्या समुहाचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करणे आणि शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरवणे हा श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियानाचा मुख्य उद्देश आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टरमधील आठ गावांचा समावेश आहे. या अभियानातून दाभाडी, पिंपळगाव, रावळगाव, जळगाव, बेळगाव, तळवाडे, पांढरून, धवळेश्वर या आठ गावांचा विकास करण्यात येत आहे.

आढावा बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अरविंद मोरे, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्या संगिता निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी इशाधीन शेळ्कंदे, दत्तात्रय मुंडे, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी नितीन बच्छाव, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांच्यासह खातेप्रमुख, सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक संत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतात प्रत्येक प्रांतात संत होऊन गेले आहेत. परंतु, सर्वाधिक संत हे महाराष्ट्रात होऊन गेले. महाराष्ट्रात सर्व जाती, धर्मांमधील संतांचे कार्य मोठे आहे. म्हणून महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हभप श्रीकृष्ण सिन्नरकर महाराज यांनी केले.

कॉलेजरोडवरील प्रौढ नागरिक मित्रमंडळतर्फे श्रीसंत ज्ञानेश्वर समाधी सोहळानिमित्त बुधवारी सायंकाळी कीर्तन झाले. यावेळी सिन्नरकर महाराज 'श्री संत ज्ञानेश्वर यांचा संजीवन समाधी सोहळा' या विषयावर ते बोलत होते. ज्ञानेश्वरांनी समाज परिवर्तनाचे काम केले. समाजात वाद होऊ नये, या दृष्टीने त्यांनी समाजवाद दूर केला. संतांना समजून घ्यायचे असेल तर अधिकाधिक सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चंद्रकांत जामदार यांनी केले. यावेळी प्रौढ नागरिक मित्र मंडळाचे बाजीराव येवले, आप्पा मुळे, रमेश देशमुख, नंदकुमार कोळपकर, आशा चौधरी, विजया पंडित आदी उपस्थित होते.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे गुरूजींना दिलासा नाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टाने खटला दाखल करताना कोणतीही चौकशी केली नसल्याबाबत शिव प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी यांनी दाखल केलेली हरकत न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. भिडे गुरुजी यांनी मुदतीत आव्हान दिले नसल्याचे सांगत हा दावा फेटाळण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्या कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. 'माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो' असे वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याविरूध्द महापालिकेने कोर्टात खटला दाखल केला आहे. तत्पूर्वी आरोग्य विभागाच्या आदेशानुसार महापालिकेने एका तज्ज्ञ कमिटीद्वारे सर्व प्रकरणांची एकतर्फी चौकशी केली. चौकशीअंती भिडेंवर दोष ठेऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात खटला दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी सुरू होताच भिडे गुरूजींना हजर राहण्याबाबत कोर्टाने समन्स बजावले. कोर्टाच्या या निर्णयाविरूध्द भिडे यांच्यावतीने अॅड. अविनाश भिडे यांनी जिल्हा कोर्टात दाद मागितली. या प्रकरणात कोर्टाने कोणतीही प्राथमिक चौकशी केली नसल्याचा दावा करताना सुप्रीम कोर्टाच्या वेगवेगळ्या आदेशांचा दाखला देण्यात आला. खटला सुरू करण्यापूर्वी देखील पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली नसल्याचा मुद्दाही मांडण्यात आला होता. सोमवारी याबाबतचा युक्तीवाद पूर्ण झाला असला तरी बुधवारी होणाऱ्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. भिडे गुरुजी यांनी मुदतीमध्ये आव्हान दिलेले नाही असे सांगत भिडे गुरुजी यांना बजाविण्यात आलेल्या नोटिशीविरोधातील दावा न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे भिडे गुरुजी आता याबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्‍यता आहे. कनिष्ठ न्यायालयात शुक्रवारी (दि.७) होणाऱ्या सुनावणीला भिडे गुरुजी उपस्थित राहतात का, याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डॉ. पाटलांमुळे मनमाड साहित्याचे जंक्शन’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

डॉ. म. सु. पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याने मनमाड शहरात आनंद व्यक्त होत असून, मनमाड शहराचा देखील मोठा गौरव झाल्याचे सूर उमटत आहे. डॉ. पाटील यांचे मनमाड कनेक्शन हे आजही मनमाडसाठी भूषणावह आहे. तब्बल २० वर्षे 'मसु' मनमाड शहराशी निगडित होते. मनमाडमध्ये काही काळ नोकरीस असणारे देवळा येथील डॉ. एकनाथ पगार यांच्या शब्दात सांगायचे तर 'म. सु. पाटील यांच्यामुळे मनमाड शहर हे रेल्वे बरोबरच साहित्याचे व वाङमयीन जंक्शन बनले होते.'

साहित्य अकादमीच्या पुरस्कारावर आपल्या नावाची मोहोर उमटवीणारे डॉ. पाटील हे महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित मनमाड कला आणि वाणिज्य तसेच विज्ञान महाविद्यालयात स्थापनेपासून प्राचार्य होते. मराठीवर जीवापाड प्रेम करणारे डॉ. पाटील यांची मनमाड महाविद्यालयात शिस्तबद्ध अशी कारकीर्द होती. सन १९६९ ते १९८९ या काळात मनमाड महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करताना त्यांनी अनेकांना घडविले. कला शाखेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, मराठी हा विषय विशेष विषय म्हणून निवडावा, असा त्यांचा आग्रह असे.

महाविद्यालयासमोरील बंगल्यात ते राहत. त्यांचा बंगला म्हणजे नामवंत साहित्यिक व साहित्याची आवड असणारे रसिक यांच्यासाठी एक चालतेबोलते सांस्कृतिक केंद्रच असायचे. डॉ. पाटील यांच्याबद्दल विद्यार्थ्यांत आदरयुक्त भीती असे २४ तास महाविद्यालयीन आवारात असल्याने त्यांचे तासनतास

महाविद्यालयीन व साहित्यिक कामकाज तेथे सुरू असे. डॉ पाटील यांनी अनेक विद्यार्थ्यांत साहित्याविषयी आवड पेरली, त्यांना लिहिते केले. त्यांना इतरांचं लिखाण वाचण्याची गोडी लावली, त्यांच्यामुळे बा. भ. बोरकर, कवी कुसुमाग्रज, व्यंकटेश माडगूळकर, डॉ नरहर कुरुंदकर, करंदीकर, पाडगावकर असे अनेक साहित्यातील दिग्गज मनमाडला येऊन गेले. अनुष्टुभ या साहित्य क्षेत्राच्या प्रांतातील दर्जेदार द्वई मासिकाची सुरुवात मनमाड येथून डॉ. पाटील यांच्यामुळे झाल्याचे सांगितले जाते. डॉ रमेश वरखेडे, डॉ. प्रभाकर बागले, प्रा. विजय काचरे, डॉ. एकनाथ पगार, डॉ. गो. तू. पाटील यांच्यासह त्यांनी अनुष्टुभचे काम नेटाने पुढे नेले. 'मसु' हे मनमाड येथे बाबा म्हणून परिचित होते.

00000000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रेस्ट कॅन्सरशी लढा होणार सुकर

$
0
0

\Bशुभवार्ता

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॅन्सरग्रस्त नागरिकांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालायच्यावतीने नाशिक जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीयस्तरावरील जपाइगो ही स्वयंसेवी संस्था ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भातील पायलट प्रोजेक्ट जिल्ह्यात राबविणार आहे. पुढील आठवड्यापासून या पायलट प्रोजेक्टला सुरुवात होणार असून, जिल्ह्यातील ४० लाख नागरिकांची स्क्रीनिंग टेस्ट या प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जपाइगो ही स्वयंसेवी संस्था अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाशी संलग्नित असून, गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारसोबत या संस्थेने देशभरात विविध सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. देशातील विविध राज्यात कुटूंब नियोजन आणि महिला प्रसूती यांसह सुरक्षा सेवेच्या संदर्भात या संस्थेने उपक्रम राबविले आहेत. आता राज्य सरकारबरोबर ही संस्था नाशिकमध्ये ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भात पायलट प्रोजेक्ट राबविणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांची मोफत स्क्रीनिंग टेस्ट करण्यात येणार असून, ब्रेस्ट कॅन्सरचे निदान होणाऱ्यांना मोफत कॅन्सर उपचार या संस्थेतर्फे पुरविण्यात येणार आहेत. या उपक्रमाला पुढील आठवड्यात प्रारंभ होणार असून, उपक्रमाच्या उद्घाटनासाठी आरोग्य मंत्रालयाचे आणि संस्थेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमांतर्गत खास करून ग्रामीण भागातील नागरिकांची स्क्रीनिंग टेस्ट करण्यावर भर देण्यात येणार असून, ब्रेस्ट कॅन्सरच्या जनजागृतीसह उपचारपद्धती उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

\Bआदिवासी भागातही तपासणी

\Bनाशिक जिल्ह्यात असणाऱ्या १५ तालुक्यांपैकी ८ तालुके आदिवासी आहेत. या तालुक्यांमध्ये आरोग्याच्या समस्या अधिक असल्याने या ठिकाणीदेखील संस्थेतर्फे ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात जनजागृती आणि मोफत स्क्रीनिंग टेस्ट केली जाणार आहे. या प्रोजेक्टसाठी उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा आणि उपचार पद्धतीचा वापर केला जाणार असल्याने, ग्रामीण भागात असलेल्या कॅन्सर रुग्णांवर उपचार करणे सोपे होणार आहे.

ब्रेस्ट कॅन्सरवर आधारित पायलट प्रोजेक्ट जपाइगो संस्था आणि राज्य सरकारतर्फे जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. यामाध्यमातून कॅन्सरचे निदान करणे सोपे जाणार आहे. पुढील आठवड्यात या प्रकल्पास सुरुवात होणार आहे. या उपक्रमातून कॅन्सर उपचाराची अपडेटेड तंत्रज्ञान जिल्ह्यात उपलब्ध होईल.

- डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images