Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘तिरथ मे तो सब पानी’

$
0
0

'तिरथ में तो सब पानी'

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनुष्य प्राण्याचं आयुष्य सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा गोष्टींबरोबर व्यापलेलं असतं, दोन व्यक्ती एकमेकांना भेटल्यावर कोणत्या ना कोणत्या विषयाने संवाद सुरू होतो. सामाजिक स्तरावरचा विषय केव्हा व्यक्तिगत स्तरावर येतो हे दोघांनाही समजत नाही आणि त्यातून घडत जाते नाट्य महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्यावतीने आयोजित ५८ व्या राज्य नाट्य स्पर्धेत 'तिरथ में तो सब पानी' या नाटकाचा प्रयोग संस्कृती नाशिक या संस्थेच्यावतीने रविवारी सकाळी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सादर झाला.

नाटकाची सुरुवात होते तेव्हा एक स्त्री, मिसेस साने आणि एक पुरुष, मिस्टर राजापूरकर हे रस्त्यावर उभे असतात. यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. हे दोघेही स्त्री पुरुष रात्री उशिरापर्यंत रिक्षाची वाट पहात थांबलेले असतात. खूप वेळ होऊन जातो तरीही रिक्षा मिळत नाही आणि लगेचच पाऊस सुरू होतो. त्यावेळी दोघांच्या संवादाला सुरुवात होते. स्वत:बद्दल, स्वत:च्या खासगी आयुष्याबद्दल, भूतकाळाबद्दल ते दोघेही रात्रभर बोलतात. मनुष्य प्राण्याचं आयुष्य हे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक गोष्टींबरोबर सर्वात जास्त व्यापलेले असते. एखादी स्त्री धार्मिकतेचा बाऊ करून एखाद्या महाराजांच्या सर्वात जास्त अधिन होते तेव्हा तिला भानावर आणण्यासाठी सांगावे लागते की, तिरथ में तो सब पानी हैं. तिचे महाराजांना अधिन होणे, स्वत: तिचे समाधानी असणे राजापूरकरच्या आयुष्यात असलेल्या स्त्रीबद्दल असे अनेक प्रवाह या नाटकात आहे.

नाटकाचे लेखन सुरेश राघव यांचे होते तर दिग्दर्शन व प्रकाश योजना विनोद राठोड यांची होती. निर्मिती प्रमुख शाहू खैरे, नेपथ्य गणेश सोनवणे, पार्श्वसंगीत अमोल काबरा, वेशभूषा किशोरी शेळके, रंगभूषा माणिक कानडे, मंच वस्तु वैशाली खाटिकमारे यांची होती नाटकाला विशेष सहाय्य रवींद्र कदम व सुनील ढगे यांचे होते. नाटकात प्रमुख भूमिका लक्ष्मी गाडेकर व प्रशांत हिरे यांनी साकारल्या.

---------

आजचे नाटक

विजय नाट्य मंडळ

'व्हईल ते दणक्यातच'

लेखक - नेताजी भोईर

दिग्दर्शक - नंदा रायते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समृद्ध भारतासाठी स्वच्छ भारत आवश्यक

$
0
0

स्वच्छतेतूनच घडेल समृद्ध भारत

खासदार गोडसे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्ध भारत घडविण्यासाठी स्वच्छ भारत असणे आवश्यक असून स्वच्छ भारतच समृद्ध भारत घडवू शकेल. या कार्यात सर्वसामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पुढील वर्षी २ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचे ध्येय पूर्ण करायचे आहे, यासाठी प्रचार, प्रसार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

स्वच्छ सर्वेक्षण २०१९निमित्त सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता जनजागृती मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या फील्ड आऊटरीच ब्यूरो तसेच नाशिक महानगरपालिकेच्या वतीने के. जे. मेहता हायस्कूल येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेच्या निमित्ताने एकाच दिवशी नाशिक महानगरपालिकेच्या ९० प्राथमिक आणि १३ माध्यमिक शाळांमधून द्यार्थ्यांच्या जनजागरण फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने के. जे. मेहता हायस्कूल येथे आयोजित मुख्य जनजागरण रॅलीचे उद्घाटन खासदार गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते विविध शाळांच्या रॅलींचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे संदेश देणारे फलक घेतलेले होते. वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित या रॅलींमधे स्वच्छताविषयक घोषवाक्यांनी पूर्ण शहर दुमदुमले. या वेळी बोलताना नगरसेवक संभाजी मोरूस्कर म्हणाले की पंतप्रधानांनी स्वच्छ भारताचे एक मोठे स्वप्न बघितले होते. सर्व देशवासियांच्या मदतीने हे स्वप्न निश्चितच पूर्णत्वास येईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार नीळे यांनी केले. कार्यक्रमात अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. या वेळी औरंगाबाद येथील आभा कला मंच या कला पथकाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेवर आधारित चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली. या वेळी व्यासपीठावर नगरसेवक संभाजी मोरूस्कर, मनपा शिक्षणाधिकारी उदय देवरे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे, विद्यालयाच्या प्राचार्य अलका दुनबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊबदार कपड्यांचा बाजार गरम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांना सध्या गारठ्याने गाठले असून त्यापासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. गेल्या आठवड्यापासून किमान तापमानात होत असलेली घट थंडीचे प्रमाण वाढविण्यास कारण ठरत आहे. नाशिकच्या या गुलाबी थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी फॅशनेबल स्वेटर, जॅकेट्स खरेदीकडे नाशिककरांची पावले वळू लागली आहेत.

शहरात सकाळी व रात्री गारठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. किमान तापमानातही घट झाली असून ११.४ अंश सेल्सिअसवर तापमान स्थिरावले आहे. शनिवारी दिवसभर शहरात ढगाळ वातावरण असल्याने शहरवासियांना सूर्यदर्शनही झाले नाही. यामुळे थंडीत प्रचंड वाढ झाली असून थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. विविध प्रकारचे जॅकेट्स, स्वेटर, स्वेटशर्ट, हातमोजे, पायमोजे, स्टोल्स, कानपट्टी, मफलर खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. लहान मुले व व पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी व्हरायटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बॉम्बर जॅकेट हा त्यातीलच एक प्रकार महिलावर्गाला आकर्षित करत असून, महाविद्यालयीन तरुणींची स्वेटरच्या तुलनेत या जॅकेट्सला चांगली पसंती आहे. याशिवाय, लोकरीपासून बनविलेल्या श्रग्ज खरेदीसाठीकडे महिलावर्गाचा चांगला कल आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांबरोबरच, मॉल्समध्येही या कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. विशेष म्हणजे, ब्रॅण्डेड कपड्यांवर हिवाळ्यानिमित्त ऑफर्स देण्यात आल्याने नाशिककर मॉल्समध्येही खरेदीला प्राधान्य देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राम बेळे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

$
0
0

राम बेळे यांना जीवनगौरव पुरस्कार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील असंघटित शिक्षकेतरांना एका छताखाली आणून सन १९६६-६७ च्या काळात राज्यस्तरावरील संघटना बांधण्याचे काम करणारे व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळची मुहूर्तमेढ रोवणारे राम बेळे यांना महाराष्ट्र खासगी शाळा शिक्षकेतर संघटनेच्यावतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संघटनेचे राज्य अध्यक्ष सतीश नाडगौडा या त्यांच्याच शिष्याच्या हस्ते संघटनेचा हा पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बेळे यांनी शिक्षकेतरांना पेन्शन योजना लागू करावी यासाठीही मोठा लढा उभा केला होता. पुरस्कार प्रदानाप्रसंगी नाशिक विभागीय सचिव बोराडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रभाकर कासार, संघटक सुधीर काकडे, अतुल कुलथे, विलास येवले, महेश रहाटळ आणि बेळे यांच्यासह सर्व बेळे परिवार उपस्थित होता. याप्रसंगी राम बेळे यांच्या जीवनकार्याचा परिचय व कार्यवृत्तांत सतीश नाडगौडा यांनी मांडला. बेळे परिवाराच्यावतीने संजय व विनय बेळे यांनी आभार व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक- सांस्कृतिकी

$
0
0

नाशिक- सांस्कृतिकी

सोमवार, ३ डिसेंबर

व्याख्यानमाला

कार्यक्रम : शंकराचार्य न्यास व शिवशक्ती ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमाला

स्थळ : शंकराचार्य न्यास संकुल, गंगापूररोड

दिनांक : ३ ते ९ डिसेंबर

वेळ : संध्याकाळी ६.३० वाजता

ठळक विशेष : या व्याख्यानमालेत स्वामी स्वरुपानंद सरस्वती विविध विषयांवर प्रबोधन करणार आहेत.

…------

समाधी दिन

कार्यक्रम : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळा

स्थळ : वरद गणेश मंदिरासमोरील मैदान, मेरी लिंक रोड, अमृतधाम

दिनांक : ५ डिसेंबरपर्यंत

वेळ : पहाटे ५ वाजता

ठळक विशेष : संत ज्ञानेश्वर महाराज समाधीदिनानिमित्त दिवसभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहे.

…---

राज्यनाट्य स्पर्धा

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्यावतीने आयोजित ५८ वी राज्यनाट्य स्पर्धा

दिनांक : ६ डिसेंबरपर्यंत

वेळ : सायंकाळी ७ वाजता

स्थळ : परशुराम साइखेडकर नाट्यगृह, टिळकपथ

ठळक विशेष : व्हईल ते दणक्यातच (३ डिसेंबर), अखेरचं बेट (४ डिसेंबर), विसर्जन (५ डिसेंबर), डोगरार्त (६ डिसेंबर)

…---

बुधवार, ५ डिसेंबर

कीर्तन

कार्यक्रम : प्रौढ नागरिक मित्र मंडळाच्यावतीने किर्तनाचे आयोजन

दिनांक : ५डिसेंबर

वेळ : सायंकाळी ५ वाजता

स्थळ : प्रौढ नागरिक मित्र मंडळ हॉल, डिसुझा कॉलनी

ठळक विशेष : ह. भ. प. सिन्नरकर महाराज यांचे या कार्यक्रमात कीर्तन सादर होणार आहे.

…----

सभा

कार्यक्रम : विश्व हिंदु परिषदेच्यावतीने संत सभा

दिनांक : ५ डिसेंबर

वेळ : सायंकाळी ६ वाजता

स्थळ : गाडगे महाराज पुतळा

----

शुक्रवार, ७ डिसेंबर

कथाकथन स्पर्धा

कार्यक्रम : सार्वजनिक वाचनालय, नाशिक व आचार्य अत्रे कट्टा अंतर्गत कुटुंब रंगलय काव्यात आयोजित 'आजीने सांगितलेली गोष्ट ' कथाकथन स्पर्धा

दिनांक : ७ डिसेंबर

वेळ : सायंकाळी ६ वाजता

स्थळ : औरंगाबादकर सभागृह , सावाना, टिळकपथ

ठळक विशेष : या स्पर्धेत सर्व वयोगटातील व्यक्तींना सहभाग नोंदविता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनडीए’त नाशिकचा वाढता टक्का

$
0
0

१२ विद्यार्थ्यांचे परीक्षेत यश; राज्यात अव्वल

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीच्या (एनडीए) १४२ व्या तुकडीसाठी व भारतीय नौदल अॅकॅडमीच्या १०४ व्या तुकडीच्या निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे ९ सप्टेंबर रोजी देशपातळीवर घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत नाशिकमधून १२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. ही कामगिरी राज्यात अव्वल ठरली आहे.

देशभरातून सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातून केवळ ६ हजार ९०० विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये शहरातील डिफेन्स मार्गदर्शन हर्षल आहेरराव यांच्या बारा विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर झाला. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ओंकार घोगरे, श्रीधर कठळे, प्रथम बाजड, स्वानंद कुलकर्णी, अथर्व खैरनार, हर्षद चंदरे, करण उगले, गौरव गायकवाड, आनंद यादव, अथर्व जाधव, आकाश काकड आणि समीर वाघोडे यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मार्फत घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला या मुलाखती संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी सुरू होतील. या मुलाखतीतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी वैद्यकीय चाचण्यानंतर एनडीए किंवा नौदल अॅकॅडमीच्या प्रशिक्षणासाठी दाखल होतील.

..

एकाच तुकडीत प्रथमच यश

राज्यभरात डिफेन्सचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधून इतक्या मोठ्या संख्येने एकाच तुकडीतून यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा नाशिकमधून मोठी आहे. या प्रवेश परीक्षेतील यशानंतर जानेवारी-फेब्रुवारीत होणाऱ्या मुलाखती आणि त्यानंतरच्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी घेण्यात येऊन यातील यशस्वी विद्यार्थी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तीनही दलातील अभ्यासक्रमासाठी जुलै दरम्यान दाखल होतील.

...

गेल्या दशकभराच्या तुलनेत नाशिकमधील विद्यार्थ्यांचा संरक्षण क्षेत्रातील करिअरमध्ये टक्का वाढतो आहे. या क्षेत्राकडे बघण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होत असल्याने हा बदल घडत आहे.

- हर्षल अहिरराव, डिफेन्स करिअर मार्गदर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात प्रचार शिगेला

$
0
0

भाजपसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अनुचित प्रकारांवर यंत्रणेची नजर

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. रविवारी (दि. २) सुटी असल्याने उमेदवारांनी आपापल्या प्रभागात सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात केली होती. काहीच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांनी आता प्रचाराला वेग देत प्रत्यक्ष भेटीवर भर दिला आहे. भाजपसमोर आमदार अनिल गोटे यांचे आव्हान असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडीनेही पुन्हा महापालिकेत सत्ता आणण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या रविवारी (दि. ९) महापालिकेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणेसह पोलिसही सतर्क झाले आहेत.

धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध नाट्यमय घडामोडी सुरूच आहेत. त्यामुळेच या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. भाजपचे मंत्रीविरुद्ध स्वाभिमानी भाजपचे आमदार असा सामना या ठिकाणी पाहायला मिळत असून, ही भाजपसाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी आपली सत्ता टिकवत अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. शिवसेना व अपक्षांकडून आपणच ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचा दावाही केला जात असल्याने घोडामैदानात कोण बाजी मारणार, हे तर निकालानंतरच स्पष्ट होईल.

थंडीत राजकीय वातावरण तापले
मात्र, ऐन थंडीत आलेल्या महापालिका निवडणुकीमुळे धुळ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रचारासाठी विविध परवानगी घेण्यातच प्रतिनिधी व त्यांच्या कार्यकर्त्यांचा वेळ खर्च होत आहे. त्यामुळे प्रचाराला हवा तसा वेग आलेला नव्हता. मात्र परवानगी मिळाल्यानंतर लागलीच प्रचाराला सुरुवात करण्यात येत आहे. त्यामुळे आता प्रचाराला वेग आला आहे.

पोलिसांकडून सुरक्षा यंत्रणा सज्ज
महापालिकेच्या मतदानपूर्वीच्या रात्रीतून अर्थपूर्ण घडामोडींना वेग येण्याची शक्यता लक्षात घेता अखेरचे ३६ तास डोळ्यात तेल घालून पहारा दिला जाणार आहे. त्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात अधीक्षक पांढरे म्हणाले, निवडणुकीदरम्यान होणारे अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासन अलर्ट झालेले आहे. मतदानाच्या दिवशी शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. यात ९७ पोलिस अधिकारी, १ हजार २०० कर्मचारी, राज्य राखीव पोलिस बल गटाची १ प्लाटून, ४ दंगा काबू पथके, ८०० होमगार्ड असा पोलिस बंदोबस्त असणार आहे. शिवाय, जिल्ह्यातील सर्व अधिकारी महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात राहणार आहेत. मतदारांना प्रलोभने देण्यासह दहशत निर्माण करण्याचे प्रकार रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढविली असल्याचेही ते म्हणाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा प्रचार, अप्रचार यावरही नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्यासाठी सायबर सेल कार्यतत्पर राहणार आहे, अशीही माहिती अधीक्षक पांढरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रात्यक्षिकांचा थरारनौदल सप्ताहानिमित्त कोची

$
0
0

प्रात्यक्षिकांचा थरार

नौदल सप्ताहानिमित्त कोची येथील राजेंद्र मैदान येथे नेव्हल ऑपरेशन्स प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केरळचे राज्यपाल पी. सताशिवम यांनी प्रात्यक्षिकांची मुख्य पाहुणे म्हणून पाहणी केली. यावेळी अंगावर काटा आणणाऱ्या प्रात्यक्षिकांनी नौदलाने आपले सामर्थ्य दाखविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...तर परवानाच निलंबित!ऋ

$
0
0

वाहतुकीचे पाच नियम मोडणारे रडारवर

...

हे आहेत नियम

- ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह

- मोबाइलवर बोलणे

- सिग्नलचे उल्लंघन करणे

- राँगसाईड वाहन चालविणे

- माल वाहतूक वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जीवघेण्या अपघातांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या पाच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यास वाहनचालकाचा परवाना जप्त करून त्याचा वाहन परवाना थेट निलंबित करण्यात येणार आहे. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, मोबाइलवर बोलणे, सिग्नलचे उल्लंघन, राँगसाईड, तसेच माल वाहतूक वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे अशा पाच नियमांचा यात समावेश आहे.

रस्ते अपघातांचा प्रश्न गंभीर होत असून, नाशिक शहरात वर्षागणिक सरासरी दीडशे ते दोनशे आणि जिल्ह्यात सहाशे ते सातशे नागरिकांचे दरवर्षी बळी जातात. यंदा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक असून, दुचाकी चालक जास्त आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने एक विशेष अद्यादेश काढला आहे. वरील नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. याबाबत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले की, रस्ते अपघात होण्यामध्ये मद्यप्राशन, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, सिग्नल जम्पिंग करणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन राँगसाईडने पुढे नेणे तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवाशांची वाहतूक होणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. एवढे असूनही वाहनचालक सीटबेल्ट किंवा हेल्मेट सारख्या महत्त्वाच्या सुरक्षा साधनांकडे दुर्लक्ष करतात. या पार्श्वभूमीवर नवीन आदेशानुसार वाहनचालकांचे परवाने थेट निलंबित करण्यात येणार आहेत. यापूर्वी वाहन परवाना निलंबित करण्यासाठी वाहनचालक दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन करताना सापडणे आवश्यक होते. यावेळेस ही अट काढून टाकण्यात आली असून, आता पहिल्या वेळीस वाहनचालक सापडला तरी थेट कारवाई करता येणार आहे.

...

आरटीओचे काम वाढणार

वाहन परवाना देण्याचे काम प्रादेशिक परिवहन विभागामार्फत केले जाते. त्यामुळे वाहन परवाना निलंबित करण्याचे कामसुध्दा आरटीओ विभागालाच करावे लागणार आहे. या नवीन नियमानुसार वाहतूक पोलिस लवकरच कारवाई हाती घेणार असून, यामुळे आरटीओच्या कामात भर पडणार आहेत. त्यातच आरटीओने वाहन परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. पूर्ण पुराव्यानिशी आलेल्या प्रस्तावांवरच आरटीओकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. यात वाहनचालकावर झालेली कारवाई, त्याअनुषांगाने फोटोग्राफ्स, आवश्यकता असल्यास सिव्हिल हॉस्पिटलचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आलेले आहे.

..

लायसन्स निलंबित होणाऱ्या केसेसची यंदाची स्थिती

नियम - केसेस - दंड

मद्यप्राशन करून वाहन चालविणे - ४४१ - ७,६७,०००

मोबाइलवर बोलणे -२५३० - ५,०६,०००

सिग्नल जम्पिंग - ७६२७ - १५,२५,४००

राँग साईड - ३१९६ - ६,३९,२००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनोदी बाजाचे ‘व्हईल ते दणक्यातच’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गावाकडच्या लोकांनी नटसम्राट नाटक करायला घेतले. त्यांच्याकडे शहरी लोकांसारखा कावेबाजपणा नाही. त्यांना अस्सल मनोरंजनच द्यायचे आहे. त्यामुळे आपापल्या परीने ते या नाटकात पात्र आणतात. गावाकडची ती सारी पात्र आपापल्या स्वभावगुणधर्मानुसार नाटकातील कलाकार पार पाडतात आणि त्यातून गावकऱ्यांचे मनोरंजन होते. अशा आशयाचे हे नाटक होते.

राज्य नाट्य स्पर्धेत सोमवारी विजय नाट्य मंडळ प्रस्तूत, नेताजी भोईर लिखित 'व्हईल ते दणक्यातच' हे नाटक सादर करण्यात आले. रंगमंचावर एकाच वेळी अनेक पात्रांचा मनोरंजनात्मक धुमाकूळ हे दादांच्या नाटकाचे वैशिष्ट्य होते, ते नेहमीप्रमाणे जपण्यात आले. खेडेगावातील मंडळी सांस्कृतिक कलेत नेहमी रमलेली असतात. तमाशाबरोबर नाटकाचेही वेड त्यांच्या रोमारोमात भरलेले असते. जे करायचे ते जिद्दीने, मनापासून आणि प्रेक्षकांचे पूर्ण मनोरंजन होईल असे. त्यात शहरी बेगडीपणा नाही याच वेडातून बऱ्याच वेळा आपल्याला न पेलणारी नाटके घेऊन आपल्या ग्रामीण प्रेक्षकांकरिता पाहिजे तसा पदरचा मालमसाला टाकून एकंदर प्रयोगाजा कसा चोथा करून बोजवारा उडवतात हे या नाटकात दाखवण्यात आले आहे. तात्यासाहेब शिरवाडकरांचे नटसम्राट हे प्रख्यात नाटक या ग्रामीण मंडळींनी बसवायला घेतले तर काय बहार येईल हे चित्र डोळ्यासमोर येते. नाटकात पाटलांसहीत सर्वांनी नुसती हौस भागवून घेतली आहे.

दिग्दर्शन सुनंदा रायते यांचे तर नेपथ्य किरण भोईर, संगीत वरुण भोईर, प्रकाशयोजना रवी रहाणे, वेशभूषा रेखा भोईर, संजय जरीवाला, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकात राजेंद्र जव्हेरी, किरण भाईर, नामदेव ओहोळ, वरुण भोईर, अभिजीत काळे, कृष्णा रघुवंशी, पूनम भागडे यांनी भूमिका केल्या.

...

आजचे नाटक

अखेरचं बेट

विजय शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्था

स्थळ : प. सा. नाट्यस्पर्धा

वेळ : सायंकाळी ७ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमपीए, लष्करी हद्दीत महापालिकेला ‘नो-एंट्री’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील वृक्षांची संख्या कळावी यासाठी वृक्षगणना हाती घेतली असली, तरी सुरक्षेचे कारण देत या वृक्षगणनेसाठी महाराष्ट्र पोलिस अकादमी (एमपीए) आणि देवळातील लष्करी हद्दीत महापालिकेला या यंत्रणांनी नकार कळवला आहे. आता या क्षेत्रातील वृक्षांच्या जिओ टॅगिंगवर फुली मारावी लागली आहे. आर्टिलरी सेंटर व 'एमपीए'मधील किमान वृक्षसंख्या तरी कळवा, असे आर्जव महापालिकेला करावे लागले आहे.

महापालिकेच्या वतीने दीड-दोन वर्षांपासून वृक्षगणनेचे काम सुरू आहे. या वृक्षगणनेसाठी टेरेकॉन इकोटेक प्रा. लि. मुंबई या मक्तेदार कंपनीला काम देण्यात आले असून, २१ नोव्हेंबर २०१६ पासून या वृक्षगणनेच्या कामाला सुरुवात केली होती. महापालिकेने २००५-०६ मध्ये केलेल्या वृक्षगणनेत शहरात १५ लाख वृक्ष असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे नव्या वृक्षगणनेत २५ लाख पेक्षा अधिक वृक्ष आढळतील, असा महापालिका प्रशासनाचा अंदाज होता. महापालिकेने वृक्षगणनेसाठी सव्वा दोन कोटींचा खर्च मंजूर केला आहे.

दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या सर्वेक्षणाता आथापर्यंत शहरात पालिकेच्या अंदाजापेक्षा दुपटीने वृक्ष आढळले आहे. सद्यस्थितीत शहरातील वृक्षगणना ४८ लाखांवर पोहचली आहे. मात्र, अद्यापही आर्टिलरी सेंटर-तोफखाना केंद्र, तसेच 'एमपीए'च्या हद्दीतील वृक्षगणना झालेली नाही. या क्षेत्रात वृक्षगणनेसाठी महापालिकेने अनेक वेळा केंद्रीय संरक्षण खाते, तसेच 'एमपीए'ला पत्र पाठविले आहे. परंतु, सुरक्षेचे कारण देत महापालिकेची वृक्षगणनेची मागणी या दोन्ही विभागांकडून फेटाळण्यात आली आहे. महापालिकेचे उपायुक्त (उद्यान) शिवाजी आमले यांनी स्वत: या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना वृक्षगणनेसाठी परवानगी देण्याची विनंती केली; परंतु तीदेखील फेटाळण्यात आली. त्यामुळे महाापालिकेची वृक्षगणाच अडचणीत सापडली आहे.

निदान वृक्षसंख्या तरी कळवा

महापालिकेच्या वृक्षगणनेत प्रत्येक वृक्षाचे जिओ टॅगिंग केले जाते. मनपाच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध करून दिली जाते. त्याद्वारे वृक्षाचे प्रत्यक्ष ठिकाण कळते. यामुळे 'एमपीए' आणि आर्टिलरी सेंटरच्या सुरक्षेचा मुद्दा उभा राहू शकतो. त्यामुळे या यंत्रणांनी महापालिकेच्या पथकाला नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेने आता जिओ टॅंगिंगचा नाद सोडला असून केवळ वृक्षगणना करण्याची तयारी सुरू केली आहे. यास्तव या दोन्ही यंत्रणाकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वृक्षगणनेसाठी प्रवेश दिला जात नसेल तर संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांनाच वृक्षगणनेचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत वृक्षगणनेचे काम पूर्ण करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या उद्यान विभागाने संबंधित विभागांना सादर करण्याची तयारी केली होती; परंतु तो देखील फेटाळल्याने निदान तुम्हीच वृक्षांची संख्या कळवा, अशी मागणी महापालिकेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवस्थापिकाविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा

$
0
0

सिन्नर नगरपालिकेतील प्रकार

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वीजपुरवठ्यासाठी ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात चार हजार २०० रुपयांची लाच मागणाऱ्या सिन्नर नगरपालिकेच्या सहाय्यक मिळकत व्यवस्थापकाविरुद्ध अॅण्टी करप्शन ब्यूरोने गुन्हा दाखल केला. ३० ऑक्टोबर रोजी याबाबत पडताळणी करण्यात आली होती. संशयिताविरुद्ध सिन्नर पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. नीलेश मोतीराम बाविस्कर, असे संशयित सहाय्यक मिळकत व्यवस्थापकाचे नाव आहे.

सिन्नर येथील मंडप आणि लाइट डेकोरेशन व्यावसायिकाने याबाबत एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराने फटाके स्टॉलसाठी तात्पुरत्या बांधलेल्या ४२ गाळ्यांना वीजपुरवठा करण्याकामी नगरपालिकेकडे ना हरकत दाखल्याची मागणी केली होती. या अर्जाचा लवकर निपटारा लावण्यासाठी तक्रारदाराने नगरपालिकेत जाऊन बाविस्करची भेट घेतली. मात्र, त्याने ना हरकत दाखल्याच्या मोबदल्यात शंभर रुपये प्रतिगाळा याप्रमाणे चार हजार २०० रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. सापळ्याची चाहूल लागल्याने एसीबीने लावलेला सापळा अयशस्वी झाला. मात्र ३० ऑक्टोबर रोजी सापळापूर्व पडताळणीत बाविस्कर दोषी आढळून आला होता. त्यानुसार, त्याच्याविरुद्ध सोमवारी (दि.३) सिन्नर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी-कर्मचारी अथवा खासगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएसएनएलचा संप पुढे ढकलला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीएसएनएल कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन करार त्वरित लागू करावा, फोर-जी स्पेक्ट्रमचे वाटप करावे, पेन्शन रिव्हिजन, पेन्शन अंशदान मूळ वेतनावर व्हावे, आदी मागण्यांसाठी 'ऑल युनियन अॅँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल'तर्फे सोमवारपासून (दि. ३) देशव्यापी बेमुदत संप करण्यात येणार होता. मात्र, प्रशासनाने संघटनेशी चर्चा करण्याची तयारी दाखवल्याने हा संप तूर्त मागे घेण्यात असल्याचे युनियनच्या वतीने सांगण्यात आले.

'ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल' ने केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा न झाल्यास १० डिसेंबरपासून पुन्हा संप पुकारण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे. संघटनेने पुकारलेल्या संपाबाबत दूरसंचार विभागाचे सचिव आणि 'ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल' यांच्यात दिनांक २ रोजी बैठक झाली. सरकारी नियमानुसार फोर-जी स्पेक्ट्रमचे वाटप, पेन्शन रिव्हिजन, बीएसएनएलद्वारे पेन्शन अंशदान देण्याच्या मुद्द्यामध्ये सुधारणा करण्यार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तरीही तृतीय वेतन पुनरावृतीच्या प्रकरणात बोलणी आडली आहे. या विषयाच्या स्थितीवर दूरसंचार सचिवाने दिलेल्या उत्तराने 'ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल' चे समाधान झाले नाही. या मागण्यांबाबत संचार राज्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी 'ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल' संघटनेने एक आठवड्यासाठी संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. संचार राज्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. योग्य समाधान न झाल्यास १० डिसेंबरपासून अनिश्चितकालीन संप सुरू होईल, अशी माहिती अनिल पाटील, शशिकांत भदाणे व दिलीप गोडसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता पाणीपट्टीचा शॉक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या ६२ हजार नवीन मिळकतींना एकीकडे सहापट दंडात्मक घरपट्टी वसुलीच्या नोटिसा पाठविल्या जात असतानाच, आता या मिळकतींना पाणीपट्टीचा नवा शॉक बसणार आहे. या मिळकतधारकांना ज्या पद्धतीने पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टी आकारणी केली जाणार आहे, त्याच पद्धतीने व्यावसायिक दराने पाणीपट्टीची आकारणी करण्यात येणार असून, निवासी मिळकतींना व्यावसायिक पाणीपट्टी दराने बिले पाठवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आधीच लाखोंच्या घरपट्ट्या हातात पडलेल्या मिळकतधारकांना व्यावसायिक पाणीपट्टीची बिले प्राप्त होण्यास सुरुवात झाल्याने ते हवालदिल झाले आहेत.

महापालिकेच्या मिळकत सर्वेक्षणात नव्याने सापडलेल्या ६२ हजार मिळकतींपैकी ३२ हजार मिळकतींची पडताळणी पूर्ण झाली असून, या मिळकतींना विभागीय अधिकाऱ्यांमार्फत नोटिसा बजावण्यास आल्या आहेत. उर्वरित पडताळणी होत असलेल्या ३० हजार मिळकतींनाही नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहे. या मिळकतींकडून सहा वर्षांच्या पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टी वसूल केली जात असून, तशा नोटिसाच मिळकतधारकांना पाठवण्यात आल्या आहेत. मिळकतधारकांच्या हातात लाखोंच्या घरपट्ट्या पडल्या असतानाच, ज्या मिळकतींना पूर्णत्वाचा दाखला नाही, परंतु त्यांचा वापर सुरू आहे अशा मिळकतींना आता पाणीपट्टीच्या नोटिसा दिल्या जाणार आहेत. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसलेल्या इमारतींनाही घरपट्टीप्रमाणेच पूर्वलक्षी प्रभावाने पाणीट्टीची देयके दिली जात आहेत. विशेष म्हणजे या इमारती पालिकेच्या दफ्तरी अनधिकृत असल्याने या निवासी मिळकतींना आता व्यावसायिक दराने पाणीपट्टीची बिले दिली जात आहेत. महापालिकेच्या दफ्तरी सद्य:स्थितीत एक लाख ९८ हजार पाणीपट्टीची कनेक्शन आहेत. त्यात मिळकत सर्वेक्षणात नवीन आढळलेल्या मिळकतींचा यात समावेश नाही. त्यामुळे नव्याने मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या मिळकतींना थेट व्यावसायिक दराने पाणीपट्टीची देयके पाठवली जात असल्याने नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. घरपट्टीची बिले लाखात असताना, पाणीपट्टीचीही बिले हजारोत आल्याने हा दुष्काळात तेरावा महिना ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रासबिहारी करंडक सेंट लॉरेन्स स्कूलकडे

$
0
0

न्यू इराचा अवघ्या तीन धावांनी पराभव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित 'रासबिहारी क्रिकेट करंडक २०१८-१९' सेंट लॉरेन्स स्कूल संघाने जिंकला. न्यू एरा स्कूलला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

करंडकाच्या अंतिम फेरीत सेंट लॉरेंन्स स्कूल आणि न्यू एरा स्कूल यांत झालेल्या ४० षटकाच्या अंतिम सामन्यात न्यू एरा स्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सेंट लॉरेन्स स्कूल संघाने प्रथम फलंदाजी करीत २८ षटकांतच सर्व गडी बाद करून फक्त ७४ धावांचे लक्ष्य प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवले. चुरशीच्या सामन्यात न्यू इरा स्कूल संघाला हे आव्हान पेलवता आले नाही आणि अवघा संघ ३४.३ षटकांत बाद झाला. सेंट लॉरेंन्स संघाचा मास्टर दुर्गेश येवलेकर यास सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने उत्तम गोलंदाजी करीत ७.३ षटकात केवळ १५ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. सेंट लॉरेन्स संघाने ३ धावांनी विजय मिळवून रासबिहारी क्रिकेट करंडक पाटकविला.

सेंट लॉरेन्स संघाला क्रिकेट प्रशिक्षक सर्वेश देशमुख आणि न्यू इरा स्कूल संघाला रानडे यांचे मार्गदर्शन लाभले. महात्मानगर मैदानावर झालेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांचे हस्ते झाला. याप्रसंगी क्रिकेट असोसिएशन सेक्रेटरी समीर रकटे आणि सदस्य रतन कुयटे तसेच रासबिहारी शाळेच्या मुख्याध्यापिका बिंदू विजयकुमार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शिल्पा आहिरे आणि व्यवस्थापक निवेदिता कमोद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया देशपांडे आणि साक्षी निकम यांनी केले. साक्षी हिने रासबिहारी शाळेची आणि क्रिकेट करंडकाची माहिती दिली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दामदुपटीपोटी १८ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हात उसने घेतलेले पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून आपल्याच परिचितांकडून पैसे उकळणाऱ्या दोघांना क्राइम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. या दोघांनी एका वृद्धाकडून तब्बल १८ लाख १० हजार रुपये उकळले असून, या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी गुन्ह्याचा तपास क्राइम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला.

शेखर माणिक क्षत्रिय (३३, रा. देवळाली गाव, नाशिकरोड) आणि जयराम होलाराम नागदेव (४८, रा. देवळाली कॅम्प) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी गंगाधर पोपट ठाकरे (६१, रा. फर्नांडिसवाडी, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली. संशयितांनी दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून परिसरातील अनेकांकडून लाखो रुपयांची रक्कम उकळली. हा प्रकार जोरात सुरू असताना २०१६ पासून आजपपर्यंत दोघा संशयितांनी ठाकरे यांना पैसे दामदुप्पट करून देतो, असे आमिष दाखविले. मागील अडीच ते तीन वर्षांपासून ठाकरे यांनी संशयितांवर विश्‍वास ठेवत १८ लाख १० हजार रुपये दिले; मात्र, त्यांना या रकमेबाबत कोणताही परतावा मिळाला नाही. पैशांचा तगादा केला असता त्यालाही संशयित उडवाउडवीची उत्तर देऊ लागली. त्यामुळे त्यांनी उपनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. ठाकरे यांच्या फिर्यादीनुसार दोघा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपासासाठी हा गुन्हा लागलीच क्राइम ब्रँचच्या युनिट दोनकडे सोपविण्यात आला.

संशयितांना कोठडी

क्राइम ब्रँचच्या पथकाने दोघा संशयितांना अटक केली. या दोघांनी उकळलेल्या पैशांचे काय केले याचा तपास करण्यात येत असल्याचे युनिट दोनचे सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले. ठाकरे यांच्या फिर्यादीनंतर आणखी तीन ते चार तक्रारदार समोर आले आहेत. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती आणि फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता सोनवणे यांनी व्यक्त केली. संशयित आरोपींनी फसवणूक केलेली असल्यास नागरिकांनी लागलीच संपर्क साधावा, असे आवाहन देखील सोनवणे यांनी केले. दरम्यान, संशयितांना सोमवारी कोर्टात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रौढ दिव्यांगांना पेन्शन

$
0
0

महापौरांच्या हस्ते दहा लाभार्थींना धनादेशाचे वाटप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने दिव्यांगासाठी योजनांचा पेटारा खुला केला असून अपंग दिनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून शहरातील दहा प्रौढ दिव्यांगाना पेन्शन योजनेचा लाभ देत योजनेस प्रारंभ करण्यात आला.

जागतिक अंपग दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रौढ बेरोजगारांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, सभागृहनेता दिनकर पाटील यांच्या हस्ते प्राधिनिधिक स्वरुपात दहा दिव्यांगांना दरमहा दोन हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच दोन संस्थांना किबो स्कॅनिंग, रिडींग ॲण्ड लर्निंग मशिनचे वाटप झाले. मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन येथे महापौरांच्या हस्ते योजनेस प्रारंभ झाला.

दिव्यांगांना सरकारच्या योजनेचा अधिकाधिक लाभ देण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात तसेच दिव्यांगांना अनुषंगिक दाखले देण्याच्यासाठी नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय व डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये मनपातर्फे नियमित दाखले देण्याचे उपाययोजना करण्याच्या सूचना महापौर भानसी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी दिनकर पाटील म्हणाले, की दिव्यांगांना दाखले देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासन निर्देशांप्रमाणे दिव्यांगांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच नगरसेवकांनी सर्व दिव्यांगांना रहिवासी दाखले देण्याचे सहकार्य करावे. या योजनेच्या माध्यमातून शहरातील सर्व दिव्यांगांना महापालिका न्याय देण्याचा प्रयत्न करेल. स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी सांगितले, की शहरातील दिव्यागांना अधिकाधिक न्याय देण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जाईल. या योजना दिव्यागांपर्यंत पोहचविल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला.

आठ दिवसात द्या अंपग प्रमाणपत्र

शहरात दहा हजारांहून अधिक दिव्यांग असताना महापालिकेच्या सदरी केवळ साडेसहा हजार दिव्यांगांचीच नोंद आहे. सध्या तीन हजार जणांकडेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र असल्याने हजारो लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा दावा प्रहार संघटनेचे अध्यक्ष सचिन पानमंद यांनी केला. शासन निर्देशांनुसार डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातही अपंगत्व प्रमाणपत्र देण्यासाठी महापालिकेने व्यवस्था केली. परंतु, आठवड्यातून केवळ एक दिवसच अधिकारी उपलब्ध होत असल्याने अपंगांना खेट्या माराव्या लागल्याची खंत दिव्यांगांनी व्यक्त केली. यावर अधिकाधिक दिव्यांगांना योजनेचे लाभ मिळण्यासाठी अपंगत्व प्रमाणपत्र देण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आठवडाभर मोहीम राबविण्याच्या सूचना सभागृहनेते दिनकर पाटील यांनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्यूचा स्विकार ही आनंदाची गुरुकिल्ली

$
0
0

'मृत्यूचा स्वीकार ही आनंदाची गुरुकिल्ली'

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मृत्यू हा अटळ असून प्रत्येकाला सामोरे जावेच लागणार आहे. मात्र त्याला सामोरे जाण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असून आनंदाने त्याचा स्वीकार केल्यास आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माणूस आनंदी होईल. जो मृत्यूला घाबरतो तो आनंदी होऊच शकत नाही. मृत्यूचा स्वीकार ही आनंदाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन श्रृतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले. शंकराचार्य न्यास व शिवशक्ती ज्ञानपीठ त्र्यंबकेश्वर यांच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.

गंगापूररोडवरील शंकराचार्य न्यास संकुलात ही व्याख्यानमाला सुरू आहे. 'मृत्यू आणि पुर्नजन्माचे रहस्य' हा व्याख्यानमालेचा विषय असून ९ डिसेंबरपर्यंत ही व्याख्यानमाला सुरू राहणार आहे. यावेळी स्वरुपानंद सरस्वती म्हणाले की, मृत्यू आला की हे शरीर सोडावे लागते हे सत्य आहे ते नाकारुन चालणार नाही, मरण हे कुणालाही चुकलेले नाही. सगळ्यांना जगण्याची इच्छा असते मात्र मरणाचे नाव काढले की अंगाचा थरकाप होतो. भीती निर्माण होते. मरण हे कुणाला अद्याप थांबवता आलेले नाही किंवा दुर ही ठेवता आले नाही. जो मृत्यूला घाबरतो तो आनंदी होऊ शकत नाही. जो केव्हाही मृत्यूला तयार आहे, तो नेहमी आंनदीच असतो. माणसाला जर मृत्यूचे रहस्य समजले तर तो निर्भय होईल ही अवस्था तुकाराम महाराजांची होती असे ते म्हणाले. व्याख्यानमालेची सुरुवात न्यासाचे अध्यक्ष राजाभाऊ मोगल यांच्या हस्ते स्वामीजींच्या सत्काराने झाली. स्वामीजींचा परिचय अॅड. मनीष चिंधडे यांनी करुन दिला. व्याख्यानाला मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढत्या गारव्यामुळे आरोग्याच्या तक्रारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिवाळा हा मनाला उत्साह देणारा, तब्येत कमावण्यासाठी अत्यंत योग्य ऋतू मानला जात असला तरी या ऋतूत सर्दी, खोकल्याचे आजारही बळावतात. नाशिकमधील कडाक्याची थंडी हा तर कायम चर्चेचा विषय ठरत असतो. या थंडीपासून बचाव करून स्वत:ला आरोग्याच्या तक्रारीपासून वाचविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, बालकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या थंडीमुळे खोकला, सांधेदुखीच्या तक्रारी वाढत आहेत. या ऋतूत व्यायाम करणे गरजेचे असून व्यायामातून प्रतिकारशक्ती वाढेल, असे मत फॅमिली फिजिशियन डॉ. स्मिता कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

००००००००००००००००

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नाशिकमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. हवेतील गारवा जसजसा वाढतो, तसतसे सर्दी, खोकला, दमा, सांधेदुखीचा त्रास होण्यास सुरुवात होते. असेच चित्र सध्या शहरात आहे. वातावरणात वाढलेला गारवा व कमकुवत प्रतिकारशक्ती या आजारांमागील कारण ठरत आहे.

- -

\Bहे करा\B

- ताजे अन्न खा.

- व्यायाम करा.

- उबदार कपडे वापरा

- या ऋतुतील फळे खा.

- -

वातावरण बदलामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. या तक्रारी उद्भवू नये यासाठी व्यायाम करणे, योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. प्रतिकारशक्ती चांगली असेल तर व्हायरल इंन्फेशन होत नाहीत. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी आजारांना दूर ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

\Bडॉ. स्मिता कांबळे, जनरल फिजिशियन

\B- - - - - - - - - - -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाचे आमिष दाखवणारे भामटे गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एक टक्का व्याजाने ५० हजार रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवत बचतगटातील महिलांकडून लाखो रुपये उकळून पसार झालेल्या दोघा संशयित आरोपींना मुंबई नाका पोलिसांनी इंदूर येथून अटक केली. संशयित आरोपी सराईत असून, त्यांनी यापूर्वी याच पध्दतीने परराज्यात गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे.

विजयकुमार लक्ष्मणराव सोनोने (रा. रुक्मिणीनगर, इंदूर) आणि कमलेश हरभजनसिंग सहानी (रा. अंबिकापुरी, इंदूर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या दोघांनी मुंबई नाका परिसरातील सुचेतानगर येथील सावरिया मायक्रो फायनान्स कंपनी थाटून बचतगटातील अनेक महिलांशी संपर्क साधला. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस अवघ्या एक टक्का व्याजाने ५० हजार रुपयांचे कर्ज प्रत्येक महिलेला वाटप करण्याचे दोघांनी भासवले. यानंतर महिलांकडून दीडशे रुपये फॉर्म फी आणि विमा, एक हप्ता आणि फाइल चार्ज या नावाखाली दोन हजार रुपये घेतले. मात्र, कोणतेही कर्ज दिले नाही. हजारो महिलांनी पैसे भरले. लाखो रुपये जमा होताच संशयितांनी नाशिक सोडले. मुंबई नाका पोलिसांकडे तक्रारदार गेल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी इंदूर येथे पळून गेलेल्या दोघा संशयितांना शिताफीने पकडून आणले. आरोपींनी इंदूर, गुजरात व अहमदनगर येथेही अशाच प्रकारे महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images