Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एड्स दिनानिमित्त उद्या शहरात रॅली

$
0
0

एड्स दिनानिमित्त उद्या शहरात रॅली

नाशिक : जागतिक एड्स दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व जिल्हा रुग्णालयातर्फे शनिवारी (दि. १) सकाळी ८ वाजता जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालय येथे रॅलीचा प्रारंभ होईल. रॅलीत महाविद्यालयीन युवक, युवती सहभागी होणार असून, या वर्षाचे घोषवाक्य 'नो यूवर स्टेटस' असे आहे. जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद, गंजमाळ चौक, शालिमार चौक, जुने सीबीएस, त्र्यंबक नाकामार्गे जिल्हा रुग्णालय येथे रॅलीचा समारोप होईल.

--

गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : शरणपूररोडवरील पतंग हॉटेल भागात राहणाऱ्या ५२ वर्षांच्या व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अनिल जगन्नाथ दिवटे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. दिवटे यांनी आपल्या राहत्या घरातील सीलिंग फॅनला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब गुरुवारी सकाळी उघडकीस आली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

००००००००००००००००००००

सर्वाधिक वाचलेली बातमी

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला यश आले असून, मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रसूती विभागात प्रवेश केल्याने वाद

$
0
0

नाशिक : सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रसुती विभागात एका पुरुषाने प्रवेश केल्याच्या कारणावरून वादावादी झाली. सुरक्षारक्षकाने संबंधित व्यक्तीला विरोध केल्यानंतर हाणामारी झाली. मात्र, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. प्रसुती विभागात गेलेली व्यक्ती दुर्गम भागातील असून, या विभागात पुरुषांना जाण्यास मनाई असल्याचे माहिती नव्हती. त्यातच सुरक्षारक्षकाने इंग्रजी भाषेचा वापर केला. दिलेल्या सूचनेनंतरही ती व्यक्ती आत गेल्यानंतर येथील सुरक्षारक्षकाने त्यास पकडले. अचानक हा प्रकार घडल्याने घाबरलेल्या त्या व्यक्तीने सुरक्षारक्षकास चावा घेतला. तर, सुरक्षारक्षकाने मारलेल्या दांडक्यामुळे त्या व्यक्तीचे डोके फुटले. या व्यक्तीच्या कुटुंबातील महिला प्रसूती विभागात बाळंतपणासाठी दाखल असून, गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. त्यामुळे परस्परविरोधी अथवा त्या व्यक्तीवर थेट गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काठीपाडा पंचायतीत२४ लाखांचा अपहार, ६ जणांवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सुरगाणा

माकपची सत्ता असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत काठीपाडामध्ये सन २०११-१२ आणि २०१५- १६ या आर्थिक वर्षांत २४ लाख ४८ हजारांचा अपहार झाल्याने ग्रामपंचायतील विस्तार अधिकारी के. एम. गायकवाड यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार सुरगाणा पोलिस ठाण्यात सरपंच, ग्रामसेवक, पेसा कोषाध्यक्ष, कृषी अधिकारी (पं. स.), कृषी विस्तार अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा शाखा अभियंता या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काठीपाडा ग्रामपंचायतीमधील विकास कामांच्या नावाखाली झालेल्या सावळाची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली आणि चौकशी समिती नेमून झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला असता, तेराव्या, चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्यक्ष कामे न करता मुल्यांकनापेक्षा जादा खर्च करून, खासगी योजनेची विहीर दाखवून तिच्यासाठी दोन योजनेतून खर्च दाखविण्यात आला होता. अधिकारी वर्गाने या कामांची पाहणी न करता खोटे मुल्यांकन सादर करून व खर्च नोंदवून सुरगाणा येथील देना बँक व महाराष्ट्र बँकेच्या शाखामधून वारंवार रक्कमा काढून पेसा अबंध निधीच्या सुमारे २५ लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक अशोक पोपट फुके, सरपंच रोहिणी चंद्रकांत वाघेरे, पेसा कोषाध्यक्ष परसराम बुधा चौधरी, तत्कालीन पंचायत समिती कृषी अधिकारी कासार, तत्कालीन कृषी विस्तार अधिकारी नितीन गांगोडे, ग्रामीण पाणीपुरवठा शाखा अभियंता पी. डी. जाधव यांचे विरोधात सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,चांदवड

मुंबई-आग्रा महामार्गावर सोग्रस चौफुलीवर ट्रक व दुचाकी अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. भुत्याणे (ता. चांदवड) येथील बाळू लक्ष्मण नवले (वय ३५) हे आपले काम आटोपून चांदवड येथून दुचाकीने (एमएच १५ एफडी ७१७) नाशिककडे निघाले होते. सोग्रस गावाजवळील चौफुलीवर असलेल्या गतीरोधकावर दुचाकीला पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने (एमपी १५ एचए ४५७५)धडक दिली. धडकेमुळे नवले खाली पडले व त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नवले यांच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ, पत्नी, तीन मुलगे असा परिवार आहे. मनिषकुमार यादव (रा. ग्रामकुडारी जि. सागर मध्य प्रदेश) असे ट्रकचालकाने नाव असून, वडाळीभोई पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर रानवडसाठी निविदा निघाली!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटना यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर कर्मवीर काकासाहेब सहकारी साखर कारखाना (रानवड) भाडेतत्वावर देण्यासाठी इ निविदा काढण्यात आली आहे. मात्र या निविदेत २५ दिवसांची मुदत असल्याने कारखाना सुरू केला तरी तोपर्यंत ऊस शिल्लक राहील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. निविदा काढण्याच्या प्रक्रियेत उशीर झाला की हेतुपुरस्कर केला अशी शंका व्यक्त केली जात आहे.

रानवड सहकारी साखर कारखाना छत्रपती संभाजी उद्योग समूहाची मुदत संपल्याने भाडेतत्वावर देण्यात यावा यासाठी रानवड कारखाना कामगार, सभासद आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने मागणी करीत होते. त्यानुसार ही निविदा काढण्यात आली आहे. पाच वर्षांसाठी ही निविदा आहे. २३ डिसेंबरपर्यंत निविदा भरण्याची मुदत दिली असून, २६ डिसेंबर रोजी निविदा उघडली जाणार आहे.

कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी उशीर झाल्याचे कामगार संघटनेचे सभासद शिवराम रसाळ यांनी सांगितले. निविदा काढायला अगोदरच उशीर झाला आहे. तसेच ही निविदेसाठी आठ दिवसांची मुदत असायला हवी होती, ती २५ दिवसांची दिली आहे. निविदा उघडल्यानंतर कारखाना भाडेतत्वावर घेणाऱ्या संस्थेला किमान एक महिना साफसफाई व इतर तयारीसाठी लागेल. म्हणजे निविदेचे २५ दिवस अधिक एक महिना तयारी असे दोन महिने निघून जातील तोपर्यंत ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस ठेवतील का? असा प्रश्न रसाळ यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरतीला ओहोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकीकडे नोकरीच्या अपुऱ्या संधी असल्याची ओरड उच्च शिक्षितांकडून केली जात असताना, दुसरीकडे कौशल्य विकास योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या जम्बो भरतीकडे उमेदवारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. १ हजार ७६९ पदांसाठी घेण्यात आलेल्या जम्बो भरतीसाठी फक्त ९०१ उमेदवारांनी हजेरी लावली. त्यातून ४२७ उमेदवारांना नोकरी देण्यात आली आहे. सरकारी योजनेतून उमेदवारांना रोजगारप्राप्त व्हावा, यासाठी जम्बो भरती घेण्यात येत असली, तरी उच्च शिक्षितांची त्याकडे फिरणारी पाठ हे समीकरण यातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिकच्या वतीने पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळावा गुरुवारी झाला. दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत ही जम्बो भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. कंपन्यांमध्ये ट्रेनी, हाऊस कीपर, इलेक्ट्रिशिअन्स, प्लम्बर, कारपेंटर, फिटर, पेंटर, डिझायनर, ऑपरेटर, फार्मास्युटिकल, वेंडर, क्लर्क, सेल्स मार्केटिंग, एटीएम ऑपरेटर, ट्रॅव्हल कन्सल्टंट, टेली कॉलर, मॅनेजर, कॅशिअर, सेल्ममन या पदांसाठी ही जम्बो भरती राबविण्यात आली. दहावी, बारावी, आयटीआय, पदवी, इंजिनीअरिंग, फायर सेफ्टी डिल्पोमा अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार या जम्बो भरतीसाठी उपस्थित होते. उमेदवारांची चाचणी परीक्षा आणि मुलाखत घेत, लगेचच नोकरीप्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. या वेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश रेंदाळकर, कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी संदीप गायकवाड आणि शंकर जाधव यांसह जिल्हा कौशल्य विकास कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जम्बो भरतीचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनातल्या हुताम्यांना श्रद्धांजली

$
0
0

नाशिकहून क्रांती मोर्चाचे दोनशेहून अधिक कार्यकर्ते मुंबईत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सकल मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला यश मिळाले असून, हे यश आंदोलनात हुतात्म पत्करलेल्या बांधवांचे आहे, अशा भावना व्यक्त करत मराठा आरक्षण आंदोलनात जीव गमावलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठा आरक्षण विधेयक मंजूर होणार म्हणून, नाशिकहून मराठा क्रांती मोर्चाचे दोनशेहून अधिक कार्यकर्ते सकाळीच मुंबईत पोहोचले. विधेयक आरक्षण मंजूर झाल्याचे समजल्यावर जल्लोष न करता आंदोलनात जीव गमावलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहत, आंदोलनाचे यश नाशिकच्या मराठा बांधवांनी समर्पित केले.

नाशिक मराठा क्रांती मोर्चाचे दोनशेहून अधिक कार्यकर्ते गुरुवारी सकाळीच आझाद मैदानाकडे रवाना झाले. मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण मिळाले आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आले असून, राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर मराठा आरक्षण तात्काळ लागू होणार आहे. मराठा क्रांती मोर्चाची ही महत्त्वाची मागणी पूर्ण होईल, या अपेक्षेने नाशिकहून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले. मराठा आरक्षण मंजूर झाल्याचे कळाल्यावर नाशिकच्या आंदोलनकर्त्यांनी सर्वप्रथम या आंदोलनात जीव गमावलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहिली. मराठा आरक्षण हे आंदोलनात हुताम्य पत्करलेल्या बांधवांचे यश असून, जेव्हा समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण होतील, तेव्हा खरा जल्लोष होईल, असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, जिल्हा समन्वयक विलास जाधव, शरद तुंगार, उमेश शिंदे, शिवाजी मोरे, सचिन पवार, निलेश मोरे, आप्पा गाडे, ज्ञानेश्वर जाधव, अंकुश शिंदे, मदन गाडे, आकाश जगताप यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मराठा आरक्षणाच्या लढ्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या, आरक्षणाच्या आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, ज्यांनी बलिदान पत्करले त्या सर्वांचे मराठा आरक्षण मंजूर होणे, हे यश आहे.

- करण गायकर, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

आरक्षणचा विजय समाजातील ४२ हुतात्म्यांना समर्पित करीत आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी स्वत:चा जीव देऊन आपल्या संसाराची राख रांगोळी करून घेतली. त्या सर्वांचे स्मरण म्हणून २९ नोव्हेंबर हा बलिदान दिन म्हणून साजरा करायला हवा.

- गणेश कदम, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

मराठा आरक्षण संदर्भातील विधायक विधिमंडळात एकमताने मंजूर झाल्याने मराठा समाजाला दिलासा मिळाला आहेत. आरक्षणाच्या या लढ्यात ज्या बांधवांनी जीव गमावला, त्या सर्व बांधवांना अभिवादन करत, या लढ्याचे यश समर्पित करत आहोत.

- तुषार जगताप, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली असल्याचा आनंद आहेच. पण मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या इतर १९ मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा बांधवांचा लढा कायम सुरू असणार आहे.

- विलास जाधव, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिसेंबरमध्ये पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरातील दिव्यांग खेळाडूंना चालना मिळावी यासाठी नाशिक महापालिकेने राज्य पॅरा ऑलिम्पिक संघटनेच्या सहकार्याने ५ व ६ डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, जास्तीत जास्त शाळांनी या क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. या स्पर्धेत शहरातील ३५० शाळा सहभागी होणार आहेत. त्यात १४ विशेष शाळांचा समावेश आहे. आतापर्यंत ९५२ खेळाडूंनी या स्पर्धेत नाव नोंदणी केली आहे. स्पर्धेसाठी ११ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. धावणे, गोळाफेक, भालाफेक, बुद्धिबळ, उंच उडी, पोहणे अशा १४ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहा शाळा सुपर सिक्समध्ये

$
0
0

न्यू इरा, सेंट लॉरेन्स, किलबिल, होरायझन, सेंट फ्रान्सिस, अशोका युनिव्हर्स यांचे यश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रासबिहारी क्रिकेट करंडक २०१८-१९च्या चौथ्या दिवशी न्यू इरा इंग्लिश स्कूल, सेंट लॉरेन्स, किलबिल, होरायझन अॅकॅडमी, सेंट फ्रान्सिस आणि अशोका युनिव्हर्स, वडाळा या शाळांची सुपर सिक्स संघात गुणवत्तेनुसार निवड झाली. गोल्फ क्लब मैदान येथे हे सामने रंगले. सकाळ सत्रात अशोका यूनिव्हर्सल वडाळा आणि नवजीवन डे स्कूल या संघामध्ये सामना झाला. यात नवजीवन डे स्कूल संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशोका यूनिव्हर्सल वडाळा संघाचा १८५ धावांनी दणदणीत विजय झाला. मानव अल्थाक्कर यास या सामनावीर घोषित करण्यात आले.

सेंट लॉरेन्स हायस्कूल आणि न्यू इरा स्कूल यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात न्यू इराचा विजय झाला. न्यू इराच्या रमन गुप्ता यास सामनावीर तसेच सामन्याचा उत्तम फलंदाज म्हणून घोषित करण्यात आले. दुपार सत्रात अशोका यूनिव्हर्सल वडाळा आणि के के वाघ यांच्यात झालेल्या लढतीत वडाळा संघाने १८४ धावांनी विजय मिळविला. किलबिल स्कूल आणि होरायझन अकॅडमी यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात होरायझन अकॅडमीचा पराभव झाला

सुपर सिक्समधील आजचे सामने (३० नोव्हेंबर)

सेंट फ्रान्सिस आणि होरायझन अकॅडमी

अशोका यूनिव्हर्सल वडाळा आणि न्यू एरा इंग्लिश स्कूल

किलबिल स्कूल आणि सेंट फ़्रांसीस

अशोका यूनिव्हर्सल वडाळा आणि सेंट लॉरेन्स

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बापाची आत्महत्या, आई परागंदा आणि नऊ चिमुकली निराधार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नऊ मुलांची जबाबदारी असलेल्या कर्त्याधर्त्या पुरुषाने क्षुल्लक वादातून आत्महत्या केली. कालांतराने पत्नीनेही घर सोडले आणि एका रात्रीत नऊ चिमुकली मुले निराधार झाली. जवळ ना कोणी नातलग, ना कोणी या मुलांची जबाबदारी घेणारे! नाही म्हणायला मुंबईत एक आजी. तीही ७२ वर्षांची. म्हणजे तोही मिणमिणता सहाराच. या केविलवाण्या चिमुकल्यांना 'उद्या' माहिती नाही. मात्र, त्यांचा 'आज' पोरका करून गेला. अखेर पंचवटी पोलिसांनी पुढाकार घेत या निरागस भावंडांची वयानुरूप तीन बालगृहांत विभागणी केली आणि एका अर्थाने ती एकमेकांपासून कायमची तुटली... ही हृदय पिळ‌वटून टाकणारी कहाणी आहे हातावर पोट असणाऱ्या नाशिकमधील जडेजा कुटुंबाची.

मजल-दरमजल मोलमजुरी करणारं जडेजा कुटुंबात कमावणारा एक आणि खाणारी तोंडे दहा! हे कुटुंब पंचवटीच्या क्रांतीनगरातील झोपडपट्टीत स्थिरावलं. या कुटुंबाचा कर्ताधर्ता देवीदास दयाराम जडेजा (वय ३३) पत्नीसोबत नऊ मुलांचा संसारगाडा हाकत होता. मात्र, किरकोळ वादातून देवीदासने १७ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली आणि कुटुंबावर कुऱ्हाडच कोसळली. सर्व मुले १४ वर्षांच्या आतील. सर्वांत मोठी मुलगी १४ वर्षांची, तर सर्वांत लहान मुलगा अवघ्या नऊ महिन्यांचा. या चिमुकल्यांना सावरण्याची जबाबदारी देवीदासच्या पत्नीवर होती. मात्र, तीही घर सोडून परागंदा झाली आणि नऊ मुले रस्त्यावर आली. या कुटुंबाला जवळचे असे कोणी नाही. मुंबईतील ७२ वर्षांच्या शांताबाई रमेश चव्हाण यांचा थोडाफार सहारा. मात्र, त्यांनाही नऊ मुले सांभाळणे आवाक्याबाहेर. अखेर पंचवटी पोलिसांनी पुढाकार घेतला आणि या मुलांची रवानगी बालगृहांत झाली.

अपरिहार्य ताटातूट

आईबाबाविना निराधार झालेल्या या नऊ चिमुकल्यांमध्ये सात मुली आणि दोन बालकांचा समावेश आहे. सात मुलींचे वय अनुक्रमे १४, १२, ११, ९, ७, ६, ४ वर्षे, मुलगा दोन वर्षांचा, तर सर्वांत लहान मुलगा अवघ्या नऊ महिन्यांचा आहे. सर्वच मुले अजाणते. अखेर या मुलांच्या भविष्याचा विचार करून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी पुढाकार घेतला. झोपडपट्टी भागात आई-बापाविना ही मुले राहिली, तर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, याची जाणीव कड यांना होती. त्यामुळे त्यांनी मुलांच्या आजीच्या संमतीने सर्व मुलांना बालगृहात पाठवण्याबाबत काय करता येईल, याविषयी चाचपणी केली. पोलिस स्टेशनने तसा अर्जही महिला व बालकल्याण विभागाच्या बालकल्याण समितीला सादर केला. समितीसमोर या प्रकरणाची आज, गुरुवारी सुनावणी झाली. त्यात मुलांच्या वयानुसार तीन गटांत विभागणी करून बालगृहांत दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन मुली उंटवाडीतील बालगृहात, तीन मुली त्र्यंबकेश्वर येथील बालगृहात, तर चार मुलांची रवानगी आधाराश्रमात झाली आहे. आईवडिलांच्या अविचाराने झालेली या भावंडांची ही अपरिहार्य ताटातूट हेलावणारी आहे. मात्र, या अनोळखी विश्वात त्यांना किमान आधार मिळाला हीच काय ती दिलासा देणारी बाब आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पारध’द्वारे अनिष्ट प्रथांच्या घुसमटीचे दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्याची सत्तरी उलटली तरीही समाजातील काही घटक अद्याप अनिष्ट चालीरिती, रुढी अन् परंपरांशी दोन हात करत आहेत. हे चित्र बदलू पाहणाऱ्या क्रांतिकारी विचारांच्या माणसाच्या वाट्यालाही येणारा संघर्ष कसा अटळ असतो अन् त्यातून त्याची कशी घुसमट होते याचे वास्तव दर्शन 'पारध' या दोन अंकी नाटकाद्वारे झाले. कालिदास सभागृहात आयोजित आंतर विद्युतनिर्मिती केंद्राच्या नाट्य स्पर्धेत हे सादरीकरण करण्यात आले.

स्वातंत्र्यानंतरही आजवर समाजातील जेवढे घटक हक्क, न्याय अन् विकासापासून वंचित राहीले त्यातील एक जमात म्हणजे पारधी. या समाजातील रुढ चालीरिती, परंपरा अन् अंधश्रद्धांमुळे या पल्याड जाऊन माणूस म्हणून जगू इच्छिणाऱ्या माणसाच्या वाट्याला कसा संघर्ष येतो याचे कथानक या नाटकात रंगविण्यात आले आहे. अशा अनिष्ट चालीरितींच्या विरोधात बंड पुकारून समाजाची सकारात्मक ओळख सांगू पाहणाऱ्या झुरक्या या सुधारणावादी नायकाच्या पायातच रुढ प्रथा बेडीसारख्या पडतात आणि प्रचलित व्यवस्थेविरोधात चालू पाहणारी पावले कशी जड पाडली जातात, असा आशय पारधद्वारे व्यक्त होतो. अखेरीला ज्या यंत्रणेने या माणसांना त्यांचा हक्क प्राप्त करून द्यावा, ज्यांच्यातील माणूसपणाचे रक्षण करावे ती यंत्रणाच अखेरीला या समाजघटकांचे शोषण करताना कशी मागेपुढे बघत नाही असे दाहकही दर्शकाला अंर्तमुख करणारे आहे.

नाटकाचे लेखन अरविंद लिमये यांनी तर दिग्दर्शन मोहन जोशी यांनी केले आहे. नाटकासाठी सहभाग असलेल्या भूमिका अशा : निर्माता - रवींद्र गोहणे, सहनिर्माता - मनोहर मसराम, संघ व्यवस्थापक - संदीप पळसपगार,दिग्दर्शक - मोहन जोशी, नेपथ्य - प्रशांत इंगळे, नागसेन वानखेडे, संगीत- डॉ. राजेश तायडे, सतीश शेळके, प्रकाश योजना - सुहास वारद, अनिल कोमटवार, रंगभूषा व वेषभूषा- आदिती धाराशिवकर, मीनाक्षी जोशी तर अभिनेते म्हणून सुरज खोके, प्रणाली गोळे, संतोष चर्तुभूज, योगिता वाघ, कैलास खेडकर, नीलिमा ठोंबरे, मंगेश निचत, अनिता गायकवाड, पवन सोनुने, मयूर चौधरी

लोगो : आंतरविद्युत नाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्ध्वस्त व्यसनी जीवनावर भाष्य

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

\Bव्यसनाधिनतेमुळे चांगल्या जीवनालाही कसा सुरूंग लागतो अन् संशयाच्या भोवरा व्यसनी माणसापेक्षाही वरकडी कशी करतो या आशयावर आधारलेल्या 'गेट वेल सून' नाटकाने व्यसनाधिनतेच्या नात्यांवर पडणाऱ्या दुष्परिणामांवर जागृती केली. कालिदास कलामंदिरात आंतरविद्युत निर्मिती केंद्राद्वारे आयोजित नाट्य स्पर्धेत गुरुवारी दुपारी हे दोन अंकी नाटक सादर झाले.

महाऔष्णिक वीज केंद्र,चंद्रपूर यांनी हे नाटक सादर केले. या नाटकाचा नायक व्यसनाच्या आहारी गेला असून नायिका त्याला व्यसनापासून परावृत्त करू पाहते. दुसरीकडे आपल्यावर उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरलाच चुकीची माहिती देऊन व्यसनाधीन नायक डॉक्टरच्या कुटुंबात संशयाचे धुके निर्माण करतो अन् कुटूंबातील नाती संपुष्टात आणतो, असे वळण कथानक घेते. या नाटकात सहभागींच्या जबाबदाऱ्या अशा भूमिका : शशांक गाढवे, दिलीप मार्कंड, बद्रीनारायण कायंदे, मंजिरी कीर्तने, सायली देठे, साधना चव्हाण, अरविंद घोटकर. दिग्दर्शन - स्नेहल पाटील, प्रकाश योजना - यशवंत चव्हाण, नेपथ्य - दिगंबर इंगळे, नेपथ्य सहाय्य - सुरेश माळी, पुरुषोत्तम मसराम, संगीत - संकेत देवरे, संघ व्यवस्थापक - जयंत देठे, रंगभूषा व वेषभूषा - सुनंदा माळी, दीपाली इंगळे, त्रिवेणी कायंदे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिघडलेली नाती’मधून वर्तमान मांडण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आंतरजातीय विवाहामधून एकाच कुटुंबात निर्माण झालेली दुफळी अन् कौटुंबिक परिघातील प्रत्येकाची होणारी घालमेल राज्यनाट्य स्पर्धेतील 'बिघडलेली नाती' या नाटकातून सादर करण्यात आली.

विलास कातौरे लिखित आणि भगवान देवकर दिग्दर्शित या नाटकात बदलत्या युगाचा सांधा टिपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पारंपरिक रुढींना चिकटून बसणारे रुढीवादी कुटुंबीय अन् बदलत्या काळासोबत स्वत:ला प्रवाहित ठेवणारा तरुण लग्नासारख्या वळणावर जेव्हा प्रवाहाविरोधात निर्णय घेतो त्यावेळी नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या तणावावर या नाटकातून भाष्य करण्यात आले आहे. अर्जून नवघरे, पार्थ देवकर, बाळ शेलार, मिलिंद चिखलीकर आदींनी यात भूमिका केल्या आहेत.

लोगो : राज्य नाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपती सेनेतर्फे स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधानसभेत गुरुवारी एकमताने मंजूर झालेल्या मराठा आरक्षण विधेयकाचे स्वागत छत्रपती सेनेतर्फे ११ किलो पेढ्यांचे वाटप करून करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती सेनेच्या मुस्लिम आघाडी व छत्रपती सेना ओबीसी सेलतर्फे अस्लम लालू, मुश्ताक लालू, मुज्जू शेख, युनूस शेख, निहाल सय्यद आदींनी आनंद उत्सव साजरा केला. याप्रसंगी छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, मार्गदर्शक नीलेश शेलार, कोर टीम अध्यक्ष तुषार गवळी, सदस्य संदीप निगळ, सागर पवार, मनीष बोरस्ते, राजेश पवार अश्विन पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरार कैद्यास बेड्या

$
0
0

फरार कैद्यास बेड्या

नाशिक : जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना संचित रजा घेऊन कारागृहार पडलेल्या व तब्बल साडेतीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कैद्यास ग्रामीण पोलिसांनी औरंगाबाद शहरातून अटक केली. अमोल एकनाथ गंगावणे (२८ रा. मुसळगाव, ता.सिन्नर) असे या बंदिवानाचे नाव आहे. फरार झाल्यानंतर त्याने एका कंपनीत नोकरी सुरू केली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल तीन दिवस पाळत ठेवून त्यास अटक केली.

--

तीन नगरसेवक अपात्र

नाशिक : गटनेत्यांनी व्हीप बजावूनही पक्षादेशाचा भंग करणाऱ्या सुरगाणा नगरपालिकेतील भाजपच्या तीन नगरसेवकांना आपले पद गमवावे लागले आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी याबाबतच्या प्रस्तावावर बुधवारी स्वाक्षरी केली. त्यामुळे नगरसेवक सुरेश गवळी, योगिता पवार आणि रेश्मा चौधरी हे अपात्र ठरले आहेत.

--

लाखभर रुग्णांची तपासणी (फोटो)

नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरी येथे रविवारी (दि. २) होणाऱ्या अटल ग्रामीण आरोग्य शिबिरासाठी आतपर्यंत एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून, ३६ हजार रुग्णांना शिबिरासाठी संदर्भित करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता कोर्टातही लढा द्यावा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यमान सरकारने किमान विधेयकापर्यंत पोहचण्याचे धैर्य दाखविले ही बाबही कमी नसून यापुढच्या महत्त्वाच्या न्यायालयीन टप्प्यात मात्र आणखी ताकदीने सरकारने लढा द्यायला हवा. कोर्टातही विधेयकाच्या या मांडणीस मंजुरी मिळाली तर सरकारची पारदर्शकता दिसून येईल, अशा आशयाच्या प्रतिक्रिया विविध नेत्यांनी व्यक्त केल्या. मराठा समाजास नोकरी व शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याबाबत विधानसभेत विधेयक एकमताने मंजूर करण्यात आल्यानंतर मराठा समाजबांधवांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे.

उशिराने सुचलेले शहाणपण

मराठा आरक्षण विधेयकास मिळालेली मंजूरी म्हणजे सरकारला उशिराने सुचलेले शहाणपण आहे. आता हे आरक्षण कोर्टात टिकावे यासाठी सरकारने काळजी घ्यायला हवी. अंतिम टप्प्यांमध्ये हा निर्णय यशस्वी ठरल्यास समाजातील गरजू लाभार्थ्यांना फायदा होऊन ते विकासाच्या प्रवाहात येतील.

- शैलेश कुटे, काँग्रेस नेते

सरकारने दाखवावी पारदर्शकता

मराठा आरक्षण विधेयकाचे स्वागतच आहे. पण हा उशिराने झालेला निर्णय आहे. अद्यापही वरिष्ठ सभागृह आणि कोर्टासमोर विधेयक जायचे आहे. तेथेही ते टिकाव धरायला पाहिजे. त्यावरच सरकारची पारदर्शी पारदर्शकता अवलंबून आहे. या निमित्ताने ही बाबही निदर्शनास येईल. \B

- अजय बोरस्ते , शिवसेना गटनेते

खऱ्या गरजूंना लाभ मिळावा

विधेयकाचे स्वागत आहे. पुढील कसोट्यांवरही हे विधेयक टिकायला हवे, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू ठेवावेत. मराठा समाजात अद्यापही मोठा गट हा आर्थिक मागास वर्गात मोडत असल्याने बिकट परिस्थितीला सामोरा जातो. या निर्णयाने किमान त्यांना दिलासा मिळेल. पण भविष्यात या आरक्षणाचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी सरकारने अखंड प्रयत्न करावेत. जेणेकरून समाजाचा विकास साधला जाईल. \B

- निलीमा पवार, सरचिटणीस, मविप्र

अन्य मागण्याही पूर्ण करा

आजवर कुठल्याही सरकारने जे धारिष्ट्य दाखविले नाही ते फडणवीस सरकारने दाखविले. त्याबद्दल त्यांचे, आयोगाचे आणि समितीचे अभिनंदन. पण कोर्टातही हेच आरक्षण कायम झाल्यास खरा आनंद होईल. पण अद्याप इतर मागण्याही मागे पडल्या आहेत. त्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. कोपर्डी प्रकरणातील नराधमांना निवडणुकीपूर्वी फाशी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुविधांनी सज्ज व मध्यवर्ती परिसरात मराठा वसतिगृहांची स्थापना आणि मराठा आंदोलनातील युवकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी या मुद्दयांकडे सरकारने आता लक्ष पुरवावे. \B

- दिनकर पाटील, सभागृह नेते, भाजप

सरकारने लांबविला निर्णय

मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचेच होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने यापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण दिले होते. परंतु, सध्या सत्तारूढ असलेल्या सरकारने न्यायालयात योग्य तो लढा न दिल्याने आरक्षण लांबणीवर पडले होते. राष्ट्रवादीने सातत्याने मराठा समाजाला आरक्षण द्यावी अशी मागणी विधिमंडळात व विधिमंडळाच्या बाहेर केली होती. मराठा समाजाने खऱ्या अर्थाने लढून आरक्षण मिळविले आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईत शहीद झालेल्या ४० तरुणांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- अॅड. रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

विकासात स्थान मिळेल

विधेयकाचे स्वागतच आहे. पुढील टप्प्यांमध्ये मांडणीसाठी सरकारने सकारात्मकतेने लढा द्यावा. आरक्षणासाठीच्या लढ्यात मराठा समाजातील जे युवक शहीद झाले त्यांचेही योगदान विसरता येणार नाही. समाजातील गरजवंतांना या आरक्षणाचा लाभ होऊन त्यांनाही विकास प्रक्रियेत स्थान मिळेल.

- राजाभाऊ वाजे, आमदार, शिवसेना

प्रगतीची कवाडे खुली

मराठा समाजाला जे १६ टक्के आरक्षण विधानसभेत मंजूर झाले त्याचे मन:पूर्वक स्वागत करतो. मराठा क्रांती मोर्चा ,सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. नोकरी व शिक्षण यांच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा असल्यामुळे मागे पडलेला मराठा समाज या निर्णयामुळे भविष्यात प्रगती करेल, असा मला विश्वास वाटतो.

- सचिन पिंगळे संचालक, मविप्र समाज

शब्दाला जागले सरकार

शब्दाला जागून सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली. त्याबाबतचे विधेयक दोन्ही सभागृहात चर्चेविना एकमताने मंजूर केले. सर्व समाजाचे हीत जोपासणारे आणि सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार असल्याचे या घोषणेने सिद्ध झाले आहे. न्यायालयातही हे आरक्षण निश्चितच टिकेल.

- उद्धव निमसे, भाजप नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणाचा जिल्ह्यात जल्लोष

$
0
0

भाजप-शिवसेनेकडून आतषबाजी; क्रांती मोर्चाकडून कोर्टात टिकल्यास आनंद होणार असल्याची भूमिका

टीम मटा

बहुचर्चित मराठा समाज आरक्षणाच्या विधेयकाला गुरुवारी (दि. २९) मंजुरी मिळाल्यानंतर जळगाव शहरासह जिल्ह्यात चाळीसगाव, अमळनेरला क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांकडून स्वागत करण्यात आले.

जळगाव : शहरात भाजप व शिवसेनेने गुरुवारी आतषबाजी करीत ढोलताशे वाजवून शासनाच्या या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले. मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील याबाबत समाधान व्यक्त केले. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आरक्षण कोर्टात टिकवा मग आनंद साजरा करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याचा परिणाम म्हणून गुरुवारी मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. विधेयक मंजूर झाल्याची माहिती मिळताच शहरात भाजप, शिवसेना व मराठा समाजबांधवांकडून जल्लोष करण्यात आला.

भाजप कार्यालयासमोर आतषबाजी
विधेयक मंजुरीचे वृत्त येताच जळगाव जिल्हा भाजप कार्यालय वसंतस्मृतीसमोर भाजप पदाधिकारी व कायकर्त्यांनी आतषबाजी केली. या वेळी महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, गटनेते भगत बालाणी, धीरज सोनवणे, दीपक सूर्यवंशी, सुनील माळी, सुनील खडके, चेतन सनकत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेकडून स्वागत
शिवसेना जळगाव महानगरतर्फे फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शिवसेना नेहमी अग्रेसर होती दोन दिवसांपूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंब्यासाठी विनंती केली होती. त्यावेळी ठाकरे यांनी लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे असे सांगीतले होते. त्या अनुषंगाने विधानसभेत एकमताने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर करण्यात आल्याची प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या वेळी बोलताना दिली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, युवा सेना विस्तारक किशोर भोसले, महानगर संघटक दिनेश जगताप, जि. प. सदस्य प्रताप पाटील, रवी देशमुख, माजी महापौर विष्णू भंगाळे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, अमर जैन, प्रशांत नाईक, अजय पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मराठा समाजबांधवांकडून जल्लोष
जळगांव येथिल मराठा समाजाच्या बांधवांनी महाराष्ट्राचे आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ फटाके फोडून आरक्षणाबाबत जल्लोष साजरा केला. मराठा समाजाच्या युवकांच्या आहुती व समाजाची एकजुट याचे फलित म्हणजेच सरकारने विधीमंडळात मांडलेले विधेयक होय. विधीमंडळात १६ टक्के मराठा समाजातील युवक-युवतींना नोकरी व शैक्षणिक आरक्षण देण्याचे जाहीर केलेले आहे. त्याचा खरा हा आनंदोत्सव मराठा समाजातील बांधवांनी साजरा केला. या आनंदोत्सवात प्रा. डी. डी. बच्छाव, प्रा. गोपाल दर्जी, चेतन पाटील, मधुकर पाटील, जयश्रीताई पाटील, प्रमोद पाटील, अॅड. कल्याण पाटील, अॅड. सचिन चव्हाण, अॅड. सुरेश महाजन, अॅड. यज्ञेश पाटील, अॅड. योगेश गावंडे, अॅड. अजय पाटील आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

चाळीसगावात भाजपतर्फे जल्लोष

चाळीसगाव : कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायदेशीररित्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारचे आभार मानण्यासाठी भाजपच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, तहसील कचेरी व पंचायत समिती कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पंचायत समिती कार्यालय येथे माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे, सरचिटणीस प्रा. सुनील निकम, रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार, समाधान पाटील यांनी आपल्या मनोगातून मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. या वेळी शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, जि. प. सदस्य भाऊसाहेब जाधव, अनिल नागरे, धनंजय मांडोळे, ॲड. प्रशांत पालवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

अमळनेरात भाजप, क्रांती मोर्चाकडून स्वागत
अमळनेर : शहरात तालुका मराठा समाजच्या वतीने गुरुवारी सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृहाजवळ फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. या वेळी मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत काटे, प्रा. पी. के. पाटील, माजी जिल्हा उपाध्यक्ष हरीष मराठे,अमळनेर तालुका मराठा समाज संचालक श्रावण उत्तम पाटील, जानकीराम पवार, विनोद कदम,विक्रांत पाटील, शिवाजीराव पाटील, सचिन पाटील, योगेश पाटील, डॉ. संजय पवार, गोकुळ पाटील, गौरव पाटील, नीलकंठ पाटील, डॉ. दत्ता ठाकरे, प्रल्हाद पाटील, चेतन पाटील उपस्थित होते. शहर भाजपकडूनही या वेळी जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती सभापती वजाबाई भील, श्याम अहिरे, नाटेश्वर पाटील, शहराध्यक्ष शितल देशमुख, जिजाबराव पाटील, हिरालाल पाटील, योगिराज चव्हाण, प्रल्हाद पाटील, उमेश वाल्हे, चंद्रकांत कंखरे, शरद सोनवणे, रोहन मुंदडा आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

अतिशय ऐतिहासिक निर्णय असून, अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्षाला अखेर यश आले. मात्र, अनेक मराठा समाजबांधवांनी यासाठी बलिदान दिले. त्यांना विनम्र अभिवादन करतो. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जो शब्द मराठा समाजाला दिला होता तो आज खरा ठरला आहे.
- डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री

सरकारने घोषणा केल्याप्रमाणे मागासवर्गीय आयोगाच्या अहवालासह मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात सादर करून त्याला मंजुरी मिळाली आहे. आता याची अंमलबजावणी करावी म्हणजेच क्रांती मोर्चाच्या लाखोच्या समुदायाला न्याय मिळेल. यासोबतच इतर मागण्यादेखील लवकरच मान्य कराव्यात.
- डी. डी. बच्छाव, जिल्हाप्रमुख, मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले असले तरी १६ टक्के आरक्षण कोर्टात टिकेल का, हा प्रश्न आहे. आरक्षणासाठी अनेकांनी प्राणाहुती दिली आहे. त्यामुळे ही जल्लोषाची वेळ नसून आरक्षण कोर्टात टिकवून दाखविल्यास सरकार अभिनंदनास पात्र राहील. हा २०१९ चा स्टंट ठरू नये.
- सुरेंद्र पाटील, मराठा सेवा संघ

आरक्षणाचे विधेयक मंजूर होणे ही जल्लोषाची बाब नाही. हे आरक्षण कोर्टात टिकले पाहीजे तो क्षण जल्लोषाचा असेल. त्यामुळे जल्लोषाची घाई करता कामा नये.
- विनोद देशमुख, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले. त्याचा आनंद असून, आधीच केले असते तर बळी गेले नसते. शासनाने विधेयक मंजूर केले. मात्र, आता ते कोर्टापर्यंत पोहचवावे हीच अपेक्षा.
- डॉ. राजेश पाटील, मराठा क्रांती मोर्चा

मंजूर केलेल्या विधेयकात जर आरक्षण दिले नाही तर सध्याचे सुसंवादी सार्वजनिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. सरकारची इच्छा आहे म्हणून नव्हे तर आंदोलनांना घाबरून आरक्षण दिल्याचे नमूद करणे हे घातक आहे. त्यामुळे न्यायालयात आरक्षण टिकणे अवघड दिसते.
- एस. बी. पाटील, शेतकरी कृती समिती, समन्वयक

मराठा समजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा शहिदांना प्रथम अभिवादन. ज्या आमदारांनी आरक्षणासाठी पाठिंबा दिला त्यांचेदेखील मनापासून आभारी आहोत. ठिकठिकाणी जेलभरो आंदोलन उपोषण करणाऱ्या सर्व बांधवांच्या प्रयत्नामुळे हे यश मिळाले आहे.
- मनोज मोरे, जिल्हाप्रमुख, मराठा क्रांती मोर्चा, धुळे

मराठा आरक्षणासाठी अतिशय संयमाच्या मार्गाने आंदोलन सुरू होते त्याला अखेर यश मिळाले. मराठा आरक्षणाची शासनाने नोंद घेतली आणि सर्व पाठिंबा दिला. आरक्षण टिकण्यासाठी केंद्रामधून तरतूद झाली पाहिजे. ते टिकण्यासाठी केंद्राने हे विधेयक मंजूर केले पाहिजे.
- डॉ. संजय पाटील, विभागीय अध्यक्ष सेवा संघ

मराठा आरक्षण हा मोठा संघर्ष असून, या मंजुरीने आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. अनेक मराठा समाजबांधवांना यासाठी जीव गमवावा लागला. एवढ्या मोठ्या संघर्षानंतर शासनाने मराठा समाजाला दिलासा देण्याचे काम केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मात्र, आरक्षण टिकणे महत्त्वाचे आहे.
- वैशाली शिरसाठ, कार्यकर्त्या, मराठा क्रांती मोर्चा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेविकेच्या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढून तसे तिच्या वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून सदर महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी नगरसेविका सारिका अग्रवाल यांच्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आठ वर्षापासून पीडित महिलेवर बलात्कार करण्यात येत असल्याचे पोलिसात दिलेल्या फिर्यात नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेलया माहितीनुसार शहरातील सहजीवन नगरात राहणाऱ्या पीडित महिलेने मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी प्रवीण महावीरप्रसाद अग्रवाल (रा.भाईजीनगर, धुळे) याने सन २००८ मध्ये माझ्याशी ओळख केली. महिलांना प्रचारासाठी जमिविण्याच्या बहाण्याने त्याने एमआयडीसी परिसरात माझे आक्षेपार्ह फोटो काढले. हे फोटो लोकांना दाखवून तुझी बदनामी करेन, तसेच तुझ्या वडिलांना ठार मारेल अशी धमकी देवून वेळोवेळी बलात्कार केला. तसेच शहरालगत असलेल्या मोहाडी परिसरातील तलावाजवळ, मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल कुणाल लॉजवर, शिर्डी, वणी गडावरील खोलीत बलात्कार केला. हा प्रकार २००८ ते २०१५ या कालावधीत केला, असे पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार मोहाडी पोलिस ठाण्यात प्रवीण अग्रवाल यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अग्रवाल यांच्या पत्नी महापालिकेच्या निवडणुकीत मोहाडी भागातून उमेदवारी करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोरास धुळ्यात अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

वन खात्याच्या माध्यमातून दुष्काळ निवारणासाठी खोदलेल्या विहिरीचे अनुदान देण्यासाठी लाच मागणाऱ्या सर्व्हेअरला शुक्रवारी दुपारी वनविभागाच्या कार्यालयातच रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

साक्री तालुक्यातील खुडाणे गावातील शेतकऱ्यांचे दुष्काळ निवारण कार्यक्रमांतर्गत वनखात्यामार्फत विहीर खोदली होती. या विहिरीसाठी मंजूर झालेले अनुदान मिळावे म्हणून त्याने उपवनसंरक्षक कार्यालयात संपर्क केला असता सर्व्हेअर मनोहर दौलत जाधव याने त्याच्याकडे पंधरा हजारांची लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित शेतकऱ्याने तक्रार केली असता शुक्रवारी सकाळी उपअधीक्षक सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदशनाखाली पोलिस निरीक्षक पवन देसले, महेश भोरटेकर यांच्यासह पथकातील संदीप सरग, प्रशांत चौधरी, सतीष जावरे, कृष्णकांत वाडीले, संतोष मोरे आदींनी पंधरा हजारांची लाच घेताना कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करा

$
0
0

जिल्हा परिषदेची ३ डिसेंबरला विशेष सर्वसाधारण सभा

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करा, या मागणीसाठी जिल्हा परिषदेने ३ डिसेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या सभेत प्रमुख नऊ विषयांचा समावेश असून, त्यात दुष्काळाशी संबंधित सात विषय आहेत.

राज्य शाससाने जिल्ह्यातील ८ तालुके व १७ मंडळ दुष्काळी जाहीर केले आहेत. पण, उर्वरित तालुक्यातही फारशी चांगली स्थिती नाही. त्यामुळे हे तालुके दुष्काळी जाहीर करावेत, यासाठी या जिल्हा परिषदेच्या सभेत राज्य शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रोजगारा हमी योजनेच्या कामात वाढ करणे, चारा टंचाईबाबत उपाययोजना, वीज मंडळाच्या अडचणी, जुन्या-नवीन पाणीपुरवठा योजनांचा आढावा, कृषी विभागातर्फे योजनांचा आढावा या सभेत घेतला जाणार आहे.

जिल्हा परिषदेने या अगोदर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कक्ष स्थापन करून उपायोजनेला सुरुवात केली आहे. पण, दुष्काळाच्या झळा सर्वत्र आतापासून बसत असल्यामुळे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पाणीटंचाईचाही अनेक ठिकाणी सामना नोव्हेंबरमध्येच करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी सात महिने पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिंताही वाढली आहे. त्यामुळे या सभेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रश्नही समोर येणार आहेत.

..

स्थायी समितीची आज सभा

विशेष सर्वसाधारण सभेअगोदर जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा दुपारी २.३० वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात होणार आहे. यावेळी दुष्काळासंबंधी प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images