Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

७५ लाखांच्या निधीस मंजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सिन्नर, पेठ व येवला तालुक्यासाठी ७५ लाखांचा निधी वितरणास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मंजुरी दिली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे दुष्काळी भागात टँकर व निकडीच्या पाणीपुरवठ्याच्या योजनांवर हा निधी खर्च केला जाणार आहे.

ग्रामीण भागात पाणीटंचाई निवारणार्थ घेण्यात आलेल्या उपाययोजनाकरिता 'नैसर्गिक आपत्तीत निकडीचा पाणीपुरवठा' लेखाशीर्षाखाली २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला ४ कोटी ७ लाख ५८ हजारांचा निधी प्राप्त झाला होता. यातून यापूर्वी २ कोटी ६८ लाख ९५ हजारांचा निधी वितरित करण्यात आला असून, नव्याने पेठ (३ लाख १२ हजार ५५४), सिन्नर (३२ लाख) व येवला (४० लाख) या तीन तालुक्यांसाठी ७५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीतून टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठीचा खर्च करावयाचा असून, त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर यांनी सांगितले आहे.

भेटी आणि पाहणी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी मंगळवारी कळवण तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. नांदुरी येथे भेट देऊन महाआरोग्य शिबिराच्या तयारीची माहिती घेतली. नांदुरी येथील अंगणवाडी व प्राथमिक शाळेस भेट देऊन गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या बांधकामांची माहिती घेऊन लाभार्थ्यांशी चर्चा केली. ग्रामपंचायत अभोणा येथे भेट देऊन दप्तराची तपासणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तुकोबांना शोधणारे ‘आनंद ओवरी’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तुकाराम महाराजांचा भाऊ कान्होबा हा त्यांच्यासोबत सावलीसारखा रहात होता. तुकाराम भंडारा डोंगरावर गेले म्हणजे त्यांना शोधून आणणारा, तुकाराम चार आठ दिवस कोठे गायब झाले तर त्यांचा ठाव घेऊन त्यांना पुन्हा घरी घेऊन येणाऱ्या या कान्होबाची कैफियत सादर करणारे नाटक सादर झाले.

राज्य नाट्य स्पर्धेत प. सा. नाट्यगृहात मंगळवारी सुरभी थिएटर्सचे 'आनंद ओवरी' हे नाटक सादर करण्यात आले. तुका वैकुंठासी गेला म्हणजे नक्की काय झाले, याचा शोध घेणारे हे नाटक होते. संत तुकाराम महाराज हे संत म्हणून सर्वांना परिचित होते; परंतु त्यांच्या वैयक्तिक जीवनाकडे कुणीही फार पाहिले नाही. त्यांची कौटुंबिक परिस्थिती, समस्या, तुकाराम महाराजांच्या विरक्त स्वभावामुळे त्यांच्या कुटुंबाची होणारी ससेहोलपट यावर आनंद ओवरी हे नाटक गोष्ट करते. तुकोबारायांचे बंधू कान्होबा यांच्या दृष्टीकोनातून तुकोबारांयांचे जीवनचरित्र उलगडत जाते. तुकोबा एका अर्थाने बंडखोर कवी. वेदान्त तुकोबारायांच्या अभंगवाणीतून सामान्य जणांपर्यंत प्रवाहित झाला. अभंग म्हटला की तो फक्त तुकोबारायांचा इतकी लोकप्रियता त्यांना मिळाली होती. तुकाराम हे देखील हाडामांसाचा माणूस होते. त्यांनी भयंकर दुष्काळ पाहिला, घरातल्यांचे मृत्यू डोळ्यादेखत पाहिले. अशा अनुभवांवर त्यांचे तत्त्वज्ञान निर्माण झाले होते. ही विरक्तीपेक्षा जीवनानुभूती होती. त्यामुळे तुकारामांकडे त्याच दृष्टीकोनातून बघितले गेले पाहिजे, असे या नाटकातून दाखविले आहे.

आनंद ओवरीचे लेखक दि. बा. मोकाशी असून त्याचे नाट्यरुपांतर व दिग्दर्शन सुरेखा लहामगे यांनी केले. नेपथ्य शैलेंद्र गौतम, प्रकाशयोजना रवी रहाणे, संगीत शुभम शर्मा, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा सुलभा लहामग यांची होती. या नाटकात संदीप कोते, राजेश शर्मा यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक

बें बें बकरी

संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

स्थळ : प. सा. नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ७ वाजता

लोगो : \Bराज्य नाट्य स्पर्धा \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुरगाणा येथे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या भाजपच्या तीन नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे. या सदस्यांना अपात्र करण्याबाबतची फाइल जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या टेबलवर पोहोचली असून, त्यावर बुधवारी (दि. २७) निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सुरगाणा नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या गटनेत्यांनी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचा व्हिप सदस्यांना बजावला होता. मात्र, या निवडणुकीत दोन महिला नगरसेविकांसह एका नगरसेवकाने व्हिप मोडत पक्षविरोधी काम केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाईअंतर्गत या तिन्ही सदस्यांचे पद रद्द करावे, अशी विनंती गटनेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यावर जिल्हाधिकारी बुधवारी निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट -

0
0

\Bआज सुन्नी इज्तेमा\B

नाशिक : भद्रकाली परिसरातील बागवानपुरा येथे बुधवारी (२८ नोव्हेंबर) सुन्नी इज्तेमा होणार आहे. इज्तेमामध्ये शहजाद-ए-सदरुश्शरीआ हुजूर मोहद्दीसे कबीर मुफ्ती जियाउल मुस्तफा कादरी व दामादे हुजुर मोहद्दीसे कबीर हजरत मुफ्ती शाहीद रजा अमजदी उपस्थित राहतील. ताजुश्शरिया कमिट व नौजवानाने अहले सुन्नत बागवानपुरा यांच्या वतीने इज्तेमा होणार आहे. खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन खतीब अध्यक्षस्थानी असतील. हजरत वासिक रजा कादरी आणि नाकिबे अहेले सुन्नत मोहम्मद ईरफान रजा अजहरी यांचे प्रवचन होईल.

\Bआज जलाभिषेक\B

नाशिक : अयोध्येत श्रीरामाचे मंदिर लवकरात लवकर व्हावे, यासाठी अयोध्येतील शरयू नदीच्या पाण्याने बुधवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी ८.३० वाजता जलाभिषेक होणार आहे. पंचवटीतील काळाराम मंदिरात हा जलाभिषेक होईल, अशी माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली.

\Bरविवारी व्याख्यान\B

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या पुस्तकमित्र मंडळातर्फे 'हेही गांधी तेच' या विषयावर प्रसिद्ध लेखक व प्रकाशक रामदास भटकळ यांचे २ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होणार आहे. औरंगाबादकर सभागृह, सावाना आवार, टिळक पथ, नाशिक येथे हे व्याख्यान होईल. पुस्तकमित्र मंडळाचे प्रमुख रमेश कडलग, सुभाष सबनीस व सावाना कार्यकारी मंडळाने ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात ३५६ उमदेवार रिंगणात

0
0

धुळे महापालिका निवडणुकीत माघारीअंती चित्र स्पष्ट; सर्व पक्षांकडून प्रचार सुरू

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी ४६७ उमेदवारांपैकी १११ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ७३ जागांसाठी ३५६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

दरम्यान, प्रभाग १२ वगळता उर्वरित सर्वच प्रभागातील उमेदवारांना मंगळवारी (दि. २७) चिन्ह वाटप करण्यात आले, असून आज (दि. २८) पासून प्रचाराचा रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. या निवडणुकीत भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून मैदानात आहेत. माघारीमुळे निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झालेले असून बऱ्याच प्रभागांमध्ये चौरंगी, तिरंगी लढती पाहायला मिळत असून काही प्रभागांमध्ये सरळ लढती आहेत.

गेल्या दोन पंचवार्षिक पासून महापालिकेत केवळ तीन जागांवर समाधान मानणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत मात्र सर्व शक्ती पणाला लावत ७३ पैकी ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. मुस्लिमबहुल प्रभाग वगळता सर्वच जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. महापालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपकडून रणनिती आखण्यात आलेली आहे. यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक रिंगणात दाखल झाले आहेत.

‘आघाडी’ला फटका?
महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसशी हात मिळवून आघाडी स्थापन केली आहे. आघाडीच्या माध्यमातून ७३ पैकी ६९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. यामध्ये विद्यमान महापौरांसह आजी-माजी पदाधिकारी व नगरसेवकांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज पदाधिकारी भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीने आता काही नवीन उमेदवारांना संधी दिली आहे. याचा आघाडीला फटका बसण्याची शक्यताही जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.

शिवसेनेकडून तरुणांना संधी
शिवसेनेकडून महापालिकेच्या निवडणूक रिंगणात स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. त्यामध्ये ७३ पैकी ५० जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. यामध्ये दोन महानगरप्रमुखांसह आजी-माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबांतील सदस्यांनाही संधी मिळाली आहे. तसेच नवीन तरुण उमेदवारांना शिवसेनेकडून संधी मिळाली आहे.

गोटेंच्या समर्थकांना वेगवेगळे निवडणूक चिन्ह
महापालिकेच्या निवडणुकीत मंगळवारी चिन्ह वाटप करण्यात आले. या वेळी भाजप विरोध स्वाभिमानी भाजप लोकसंग्रामतर्फे निवडणूक रिंगणात सर्वच ७३ जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. परंतु, आमदार गोटे हे लोकसंग्राम पक्षाकडून ‘शिट्टी’ या चिन्हसला पसंती देतात. मात्र, आदर्श आचारसंहितेचे पालन करीत नियमानुसार लोकसंग्राम किंवा आमदार गोटे समर्थकांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एकच चिन्ह देण्यास नकार दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा आमदार गोटेंचे स्वप्न भंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत गोटेंनी प्रत्यक्ष निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली असता नियमानुसार एकच चिन्ह देता येणार नसल्याचे सांगण्यात आले यामुळे आ. गोटेंच्या समर्थकांना निरनिराळ्या निवडणूक चिन्हांवर आता प्रचार करावा लागणार आहे.

निवडणूक मैदानातील उमदेवार...
स्वाभिमानी भाजप लोकसंग्राम.......७३
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी....६९
भाजप.....................................६२
शिवसेना...................................५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फौजिया यांची उमेदवारी रद्दच; सपाच्या अन्सारी फातिमा बिनविरोध

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

धुळे महानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या फौजिया अन्सारी बानो यांचे नामांकन सोमवारी (दि. २६) खंडपीठाने बहाल केले होते. यास समाजवादी पार्टीच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अन्सारी फातीमा नुरूल अमीन यांनी आव्हान दिले होते. फौजिया यांनी आपले वय १९ वर्षे असल्याचे नामांकन अर्जात म्हटल्याची बाब खंडपीठासमोर लपविली असल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकारामुळे खंडपीठाने फौजिया बानो यांचे नामांकन रद्द ठरविले. खंडपीठाच्या निर्णयामुळे प्रतिस्पर्धी समाजवादी पार्टीच्या उमेदवार अन्सारी फातीमा यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जात प्रमाणपत्र न जोडणे, उमेदवारी अर्जावर सूचक अनुमोदकाची स्वाक्षरी नसणे, अपत्य प्रमाणपत्र न जोडणे, वैधता प्रमाणपत्र जोडणे परंतु जात प्रमाणपत्र जोडलेले नसणे, पडताळणी अर्जाच्या खाली उमेदवाराची स्वाक्षरी नसणे , तीनपेक्षा जास्त अपत्ये, मनपाचे कंत्राटदार असणे अशा स्वरूपाच्या काही किरकोळ तर काही गंभीर चुका व आक्षेप यावरून नामनिर्देशन रद्द केल्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाला २८ उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. यावर खंडपीठाचे न्या. एन. एम. जामदार यांनी सर्व याचिका फेटाळत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्णय कायम ठेवलेला आहे. धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ अ मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार फौजिया अन्सारी बानो यांचे नामांकन खंडपीठाने सोमवारी बहाल केले होते. बानो यांचे वय १९ वर्षे असून महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार नगरसेवक म्हणून निवडणूक लढविण्यासाठी २१ वर्षे वयाची अट आहे. बानो यांचे वय १९ वर्षे असल्याने त्यांचे नामांकन रद्द केल्याची बाब खंडपीठातील सुनावणी प्रसंगी लपविण्यात आली. केवळ नामांकन अर्जावर इतरत्र स्वाक्षरी असल्याने रद्द केल्याचे सांगण्यात आले होते. निवडणूक आयोग आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराने ही बाब खंडपीठात पुनर्विलोकन अर्ज सादर करून निदर्शनास आणून दिली. त्यामुळे खंडपीठाने सोमवारी दिलेला आपला निर्णय मागे घेत फौजिया बानो यांचे नामांकन रद्द केले. यामुळे आता संबंधित प्रभागात बिनविरोध निवडीची घोषणा करावी लागणार आहे. महापालिकेच्या वतीने अमोल सावंत, निवडणूक आयोगातर्फे शिवाजी टी. शेळके, याचिकाकाकर्त्या अन्सारींतर्फे पवन पवार यांनी काम पाहिले.


‘ती’ व्हायरल क्लिप कोणाची?
धुळे महापालिकेच्या निवडणुकीतील रणधुमाळीत आता आरोप-प्रत्यारोपांना धार चढली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून परस्परांच्या भानगडी वेशीवर टांगल्या जात असल्याने प्रचाराला वेगळेच वळण मिळू पाहत आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. २७) सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सअॅपच्या काही ग्रुप्सवर मंगळवारी (दि. २७) दोन व्यक्तींचे संभाषण व्हायरल होत आहे. त्यात आमदार गोटे यांना जीवे ठार मारण्याबाबतचे संभाषण असून, ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे संभाषण व्हायरल झाल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. या ऑडिओ क्लिपमधील बोलणारे दोन व्यक्ती कोण आहेत, ती क्लिप केव्हाची आहे यांसारखे अनेक प्रश्न या वेळी उपस्थित होत असून, पोलिसांकडून आता सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. अशा नकारात्मक गोष्टी निवडणूकीच्या कालावधीत होत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् रेल्वेस्थानकावर झाली महिलेची प्रसुती

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

लासलगाव रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर एका गरोदर महिलेने मंगळवारी सकाळी एका गोंडस मुलाला जन्म दिला. रेल्वे स्थानकावरील व्यावसायीक, अधिकाऱ्यांनी वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे संबंधित महिलेच्या चेहऱ्यावर प्रसववेदनेनंतर हास्य फुलले होते.

मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सुनीता विशाल गायकवाड व त्यांची मावशी मीरा अनिल पाथरे (देवगाव) या दोन्ही महिला लासलगाव रेल्वे स्थानकावर उभ्या होत्या. त्यांना चाळीसगाव तालुक्यातील मोहुणबारे या ठिकाणी जाण्यासाठी काशी एक्स्प्रेसची वाट पाहत होते. रेल्वेगाडी आली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे रेलरोको आंदोलन सुरू असल्यामुळे गाडीला उशिर झाला. यादरम्यान सुनीता गायकवाड या महिलेला लासलगाव रेल्वे स्थानकातच प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यांच्यासोबत असलेल्या मीरा यांना या कठिण परिस्थितीमुळे रडू आले. त्या मदतीची याचना करीत असताना याच फलाटावरील कँटीनचे संचालक नितीन शर्मा त्यांच्या मदतीला धावले. शर्मा यांनी 'कोणी डॉक्टर आहे', अशी हाक दिली. रेल्वेस्थानकाजवळ दवाखाना असलेले डॉ. विजय केंगे हे लागलीच मदतीला धावे. तोपर्यंत शर्मा यांनी स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवासी महिलेकडून साडी, शाल घेतली व अडोसा केला. त्यानंतर शर्मा यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन करून माहिती दिली. मात्र रुग्णवाहिका येण्याआधीच सुनीता यांनी एक मुलाला जन्म दिला. त्यानंतर बाळ आणि बाळंतीणीला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

सदर प्रसूत झालेली महिला सुनीता विशाल गायकवाड ही मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील आहे. त्या आपल्या आईकडे चाळीसगावला मावशीसोबत जात होत्या. नितीन शर्मा यांच्यासह लासलगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक समाधान सुरवाडे, डॉ. विजय केंगे, नितीन शर्मा व रेल्वे पोलिस कर्मचारी व महिला प्रवासी मदतीसाठी धावून गेल्या. स्थानकावर काजी सांगवी येथील बेबी वाघ या महिलेने नवजात बालकाचा सांभाळ केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्नू, वाकचौरे अमेरिकेतील ‘रॅम’मध्ये उतरणार

0
0

डेक्कन क्लिफहँगर स्पर्धेत पटकाविले विशेष प्राविण्य

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे ते गोवा या ६४६ किलोमीटर अंतराची डेक्कन क्लिफहँगर ही सायकलिंग स्पर्धा लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू यांनी २६ तास ६ मिनिटांत तर उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी २८ तास २६ मिनिटांत पूर्ण केली. या यशामुळे अमेरिकेत होणाऱ्या 'रॅम' या अतिशय महत्त्वाच्या सायकलिंग स्पर्धेसाठी हे नाशिकचे दोन सायकलिस्ट पात्र ठरले आहेत.

लेफ्टनन्ट कर्नल भरत पन्नू यांनी सलग दुसऱ्या वर्षी 'डेक्कन क्लिफहँगर' स्पर्धा पूर्ण केली आहे. 'डेक्कन क्लिफहँगर' ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी कर्नल पन्नू यांना प्रमोद तुपे यांची साथ मिळाली. तसेच उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या बाळासाहेब वाकचौरे यांनी एक वर्षापूर्वी सायकलिंगचा सराव सुरू करत डेक्कन क्लिफहँगर स्पर्धेत विशेष प्राविण्य पटकाविले आहे. या स्पर्धेत त्यांना अॅड. दत्तात्रेय चकोर यांची साथ मिळाली. हे दोघे सायलिस्ट २०१९ मध्ये अमेरिकेत होणाऱ्या 'रॅम' स्पर्धेत ते वैयक्तिक गटातून सहभागी होणार आहेत.

--

नाशिकला प्रथम व तृतीय क्रमांक

संगमनेरचे विजय काळे, नीलेश वाकचौरे, अमोल कानवडे आणि शरद काळे यांनी 'डेक्कन क्लिफहँगर' ही स्पर्धा २२ तास ४५ मिनिटांत पूर्ण केली. या चौघांनी ४० वर्षावरील पुरुष गटातून पहिल्या क्रमांक पटकविला आहे. तसेच विजय ताजने, डॉ. संजय विखे, प्रमोद देशमुख आणि विनायक पानसरे यांनी २३ तास १५मिनिटांत स्पर्धा पूर्ण करत तिसरा क्रमांक पटकाविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राथमिक शाळांतील गुरुजींचा एल्गार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सरकारी यंत्रणेकडून सोडविण्यात यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे शनिवारी (दि. १ डिसेंबर) शहरात राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. गोल्फ क्लब मैदान येथे दुपारी २ ते ५ या वेळेत हे आंदोलन होईल, असे राज्य नेते काळूजी बोरसे पाटील यांनी सांगितले.

अनेकदा प्रत्यक्ष भेट घेऊन, निवेदन देऊन, विनंती करूनही या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने पुन्हा या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती राज्य कोशाध्यक्ष केदूजी देशमाने, राज्य उपाध्यक्ष पांडुरंग कर्डिले, राज्य सल्लागार दादाजी सावंत, राज्य संघटक नंदू आव्हाड, राज्य पदाधिकारी सुकदेव पवार, संजय शेवाळे, मोठाभाऊ हिरे, जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, सरचिटणीस प्रकाश सोनवणे आदींनी दिली आहे.

--

या आहेत प्रमुख मागण्या

दि. १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना व भविष्यनिर्वाह निधी योजना लागू करावी, दि. २३ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत असलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीपासून व वरिष्ठ श्रेणीप्राप्त शिक्षकांना निवड श्रेणीपासून वंचित ठेवणारा दि. २३ ऑक्टोबर २०१७ चा शालेय शिक्षण विभागाचा अन्यायकारक सरकारी आदेश रद्द करावा, कमी पटाच्या नावाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेची कोणतीच शाळा बंद करू नये, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये समायोजनाने नियुक्त करू नये, त्याऐवजी रिक्त जागा शिक्षणशास्त्र पदवीधारक बेरोजगारांतून भराव्यात, 'बीएलओ'सह सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामांतून शिक्षकांना मुक्त करावे, संगणकीय ऑनलाइन कामासाठी केंद्र स्तरावर आवश्यक सुविधांसह डाटा एन्ट्री ऑपरेटर द्यावा, राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शिक्षकांना रजा रोखीकरणाचा लाभ मिळावा, दि. ३१ डिसेंबर २००७पर्यंत 'एमएससीआयटी' अर्हता धारण न केलेल्या शिक्षकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लीगल एड क्लिनिक जपताहेत समाजस्वास्थ्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भावनांच्या भरात कायद्याचा दुरुपोग करून समाजघटकांनी नीतिमत्तेला धक्का देऊ नये, यासाठी शहरात विधी महाविद्यालयांच्या वतीने चालविण्यात येणारी लीगल एड क्लिनिक किंवा कायदा मार्गदर्शन केंद्र समाजस्वास्थ्य जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. मात्र, पुरेशा जागरूकतेअभावी या सुविधेस नागरिकांचा अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

नागरिकांच्या कायदेविषयक गैरसमजुतींच्या हद्दपारीसाठी आणि जागृतीकरिता विधी महाविद्यालयांचा हा लोकपोयोगी उपक्रम समाजाने सकारात्मकतेने घ्यावा, अशी अपेक्षा या केंद्रांच्या वतीने राष्ट्रीय कायदा दिनानिमित्त व्यक्त करण्यात आली आहे. शहरात गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एनबीटी लॉ कॉलेज आणि सिडकोतील नवजीवन लॉ कॉलेजच्या वतीने विधी कायदा मार्गदर्शन केंद्रे (लीगल एड क्लिनिक) चालविले जातात. या ठिकाणी कॉलेजचे आजी-माजी विद्यार्थी आणि हितचिंतक वकील व्यावसायिकांकडून येईल त्याला कायदेविषयक मोफत मार्गदर्शन केले जाते. मात्र, कायद्यासारख्या किचकट आणि खर्चिक विषयाचे मोफत मार्गदर्शन उपलब्ध करूनही जागरूकतेअभावी नागरिकांचा या केंद्रांकडे फारसा कल दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

कायदेशीर मार्गदर्शनावर भर

एनबीटी लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य यांच्याशी यासंदर्भात 'मटा'ने संपर्क साधला असता, अशा धर्तीवर कॉलेजच्या वतीने सन् २०१० पासून उपक्रम चालविला जातो. मध्यंतरीच्या काळात या केंद्राचे उपक्रम अत्यल्प झाले होते. पण, गतवर्षापासून या केंद्राचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून, महिन्याकाठी किमान पाच ते सहा नागरिक या केंद्राद्वारे कायदेशीर मार्गदर्शन घेत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय गतवर्षात या केंद्राद्वारे सुमारे शंभरावर कायदा जागृतीविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या केंद्राच्या माध्यमातून विशेषत: अवयवदान, कामगार कायदे, मूलभूत अधिकार, महिलांविषयक कायदे, ज्येष्ठ नागरिकांविषयीचे कायदे आणि मानवी हक्कविषयक कायदेशीर मार्गदर्शनावर भर दिला जातो. शुक्रवारी आणि शनिवारी दुपारी २ ते ४ या वेळेत नागरिकांना मार्गदर्शन केले जाते.

...अन् कायदाविषयक समुपदेशनही

सिडको परिसरातही नवजीवन लॉ कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य लीगल सर्व्हिस अॅथॉरिटीतर्फे लीगल एड क्लिनिक या वर्षाच्या सुरुवातीपासून चालविले जाते. आतापर्यंत या केंद्राचा सुमारे ९६ नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य के. के. देव यांनी दिली. या केंद्राद्वारे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश या पदावरून निवृत्त झालेले न्यायमूर्ती जयंत शिरसाळे यांसह नामवंत विधिज्ञ नागरिकांना पूर्णत: मोफत कायदेविषयक मार्गदर्शन करतात. लीगल एड क्लिनिकमध्ये थेटपणे कुठलेही न्यायदान होत नाही. मात्र, येथे कायदा नेमका काय आहे, तक्रार मांडणाऱ्या नागरिकाला कायद्याची मदत कशी व संभाव्य कुठवर होऊ शकते, यातून नेमके फलित हाती काय येऊ शकेल, कायद्याचा आधार घेताना कुठल्या वळणावर नेमके काय करावे, कागदपत्रे कोणती असावीत आदी प्रक्रियेसह तक्रारदाराचे कायदाविषयक समुपदेशनही करण्यात येते. आतापर्यंत या केंद्राकडे आलेल्या केसेसमध्ये कौटुंबिक वाद, स्थावर मालमत्तेचे वाद, कामगार कायदे, देणगीविषयक, बँक कर्ज प्रकरणे आदी विषयांचा समावेश आहे. यात कौटुंबिक समस्यांची संख्या जास्त आहे. याशिवाय बालहक्कांसाठीही नवजीवन संस्था कार्यरत असल्याचे प्राचार्य देव यांनी सांगितले. प्रत्येक सोमवार ते बुधवार सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नागरिकांसाठी हे केंद्र खुले असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

षडरिपूतून उमटली मानवी जीवनाची घालमेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मानवी जीवनाला मुठीत कोंडून ठेवणारे अन् षडरिपू म्हणून ओळखले जाणारे दुर्गुण हे मानवावर जशजशी सत्ता गाजवितात तसतसे मानवी जीवन अनपेक्षित वळण घेते. एका वळणावर मनुष्य आत्मविश्वास हरवून परिस्थिती शरण होतो. मात्र, परिस्थिती शरणता किंवा हतबलता हे समस्येवरील उत्तर नसून नव्या विश्वासाने जीवनाला सामोरे जाण्यातच पुरूषार्थ आहे, असाच संदेश षडरिपू या नाटकाने दिला.

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या वतीने कालिदास कलामंदिरात आयोजित नाट्य स्पर्धेत सकाळच्या सत्रात हे दोन अंकी नाटक सादर झाले. नितीन गगे लिखित या नाटकाचा नायक वासू नामक तरुण मांडण्यात आला आहे. आयुष्याच्या एका वळणावर षडरिपूंच्या प्रभावाने त्याचे भरकटणे, परिस्थितीशरणता, ज्योतिष-स्वप्न आदी मार्गांद्वारे आयुष्यातील घडामोडींचा अर्थ लावण्याचे केविलवाणे प्रयत्न आदी घटना प्रसंगांच्या मांडणीने नाटकातून आशय मांडला जातो. पण विशिष्ट हतबलतेत अडकल्यानंतर माणूस अभावानेच आत्मविश्वासाच्या जोरावर नैराश्याचे कडे तोडू पाहतो. भोवतालच्या आव्हानांकडे सकारात्मकपणे बघितल्यास त्यावर मात सहजशक्य आहे, असा संदेश हे नाटक देऊन गेले. नितीन गगे यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. निर्माता म्हणून पंकज सपाटे, सहनिर्माते म्हणून मोहन आव्हाड, एन. जी. पुणेकर व नंदकिशोर देशमुख, सूत्रधार म्हणून पंकज सनेर, नाट्यसंघ व्यवस्थापक म्हणून चंद्रकांत सपकाळे यांनी जबाबदारी पाहिली. दिग्दर्शन व नेपथ्य चंद्रकांत जाडकर यांनी केले. प्रकाश योजना अतुल बऱ्हाटे यांनी केली. संगीत संतोष वारूंगसे, रोशन भगत यांनी दिले. वेषभूषा, रंगभूषा श्रद्धा कदम यांनी केली. कलाकार म्हणून नितीन देवरे, पंकज सनेर, चंद्रकांत सपकाळे, हर्षवर्धन बिलगये, श्रद्धा कदम, पंकज गायकवाड, ऐश्वर्या खोसे, सचिन शिंदे, श्यामला जाधव, चंद्रकांत जाडकर यांनी भूमिका केल्या.

..

आजचे नाटक

सकाळी १० वाजता : प्रतिबिंब

दुपारी ४ वाजता : शू ... कुठं बोलायचं नाही!

..

आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाट्य स्पर्धा \B

\B

\Bफोटो : पंकज चांडोले \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्ही फुटेज मिळाले

0
0

नाशिक पुणे रोडवरील पोलिस उपायुक्तांच्या परिमंडल दोन कार्यालयापासून काही अंतरावर हा केबल कापण्याचा प्रकार घडला आहे. त्याबाबतचा तक्रार अर्ज उपनगर पोलिस स्टेशनच्या निरीक्षकांना देण्यात आला आहे. डेन पीएमसीएन या केबल नेटवर्क कंपनीची उपनगर परिसरातील श्रद्धा कॉम्प्लेक्स, टागोरनगर, परिसरातील फायबर ऑप्टिक वायर मध्यरात्री तोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ग्राहकांना सेवा देणाऱ्या आर. जी. सिक्स वायर प्रतिस्पर्धी कंपनीच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी कापल्याचा आरोपही तक्रार अर्जात करण्यात आला आहे. या वायर तोडल्याने आठ ते दहा केबल ऑपरेटर्सद्वारे सेवा पुरविण्यात येणाऱ्या १५ ते १८ हजार ग्राहकांना फटका बसला आहे. वायर तोडण्याचा हा प्रकार काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बें बें बकरीने सादर केला भावनांचा बाजार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजातील भावनाप्रधान नागरिकांच्या भावनांचे भांडवल करून समाजकंटक कशा प्रकारे स्वार्थाची पोळी भाजून घेतात, याचा सारांश राज्य नाट्य स्पर्धेत मंगळवारी सादर झालेल्या बें बें बकरी या नाटकाद्वारे मांडला गेला. एका शेळीलाच देवत्व बहाल केल्यानंतर समाजाची कंटकांकडून कशी दिशाभूल केली जाते. भाबड्या माणसांच्या खिशावर कशा पद्धतीने कब्जा केला जातो, याचे रंजक सादरीकरण या नाटकाद्वारे करण्यात आले. ५८ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत दिलीप जगताप लिखित व रवींद्र कटारे दिग्दर्शित हे नाटक सादर झाले. संवर्धन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने हे सादरीकरण केले.

एका गावामध्ये शिरलेले दरोडोखोर तेथील भाबड्या ग्रामस्थांचे चेहरे वाचतात. या भावनाप्रधान गावास वेड्यात काढण्यात यश मिळाले तर इथून बख्खळ लूट होईल, असा अंदाज बांधून एका साध्यासुध्या शेळीला ते चक्क महात्मा गांधीजींची शेळी म्हणून सादर करतात. या शेळीला बघण्यासाठी पंचक्रोशीतून जमा होणारी गर्दी लक्षात घेता लोकवर्गणीतून आश्रमही साकारला जातो. गर्दीतून येणारी माणसे शेळीपुढे पैसे टाकण्यास सुरुवात करतात. हळूहळू गांधीजींच्या शेळी या नावे मोठ्या देणग्याही जमा होऊ लागतात, या पद्धतीने समाजाच्या भावनांची समाजकंटक कशाप्रकारे दिशाभूल करून गैरफायदा घेतात, असे कथानक या नाटकात रंगविण्यात आले आहे.

नेपथ्य : संदीप गायकवाड, संगीत : राम वाणी, प्रकाश योजना : रवी रहाणे, रंगभूषा : माणिक कानडे, वेशभूषा : सचिन चव्हाण, निर्मिती प्रमुख : दिलीप काळे, भूमिकेत अभिषेक पगार, दिलीप काळे, भूषण गायकवाड, गणेश गायकवाड, समाधान मुतर्हक, अर्चना कडाळे, विकास जुवेकर, अनुप ताकटे आदींनी जबाबदाऱ्या सांभाळल्या.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकांतर्फे शहिदांना आदरांजली

0
0

सर्वाधिक वाचलेली बातमी

--

'नाणार'विरोधी आंदोलन तूर्त मागे

कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरीविरोधात मुंबईत आझाद मैदानात सुरू असलेले आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

--------------------------

(थोडक्यात)

--

ज्येष्ठ नागरिकांतर्फे शहिदांना आदरांजली

नाशिक : जीवनज्योती ज्येठ नागरिक संघाच्या वतीने संविधानदिन साजरा करण्यात आला. यावेळी सिडको, अंबड, महाजननगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ज्येष्ठ नागरिकांतर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संघाचे अध्यक्ष मधुकर अढांगळे, संजीवन कोलते, विष्णू कुंभार, अॅड. एफ. एफ. बागूल, दत्तात्रय भामरे यांच्यासह इतर सभासद उपस्थित होते.

--

महात्मा फुलेंना वंदन (फोटो)

नाशिक : महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप कार्यालयात स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर-आडके आणि मध्य-पश्चिम मंडळाचे अध्यक्ष देवदत्त जोशी यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुजाता करजगीकर, भारती बागूल, नंदकुमार देसाई, माणिकराव देशमुख, गणेश कांबळे, अरुण शेंदुर्णीकर, शैलेश जुन्नरे, धनंजय पुजारी, राजू मोरे, सोनल दगडे, अशोक गालफाडे, रवींद्र भालेराव, सुकदवे ढिकले, देवेंद्र चुंभळे, विजय कुलकर्णी, नितीन कार्ले, यश जंगम यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

--

भाजपतर्फे संविधानदिन

नाशिक : भाजप कायदा आघाडीच्या वतीने दुर्गानगर येथील भाजपच्या संपर्क कार्यालयात संविधानदिन साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. माजी नगरसेविका उज्ज्वला हिरे, आघाडीचे शहराध्यक्ष अॅड. सुनील दराडे, अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष नामदेव हिरे, नगरसेवक सुरेश खेताडे, भाजप पंचवटी मंडळ सरचिटणीस सुनील फरताळे यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

--

आर्थिक साक्षरता अभियान

नाशिक : गोसावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शहरात डिजिटल व आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. इंटरनेटच्या आधारे विविध आर्थिक कामकाज करण्याची प्रणाली या अभियानांतर्गत शिकविण्यात येत आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांना खासकरून यासंदर्भातले प्रशिक्षण देण्यात येत असून, येत्या आठवड्यात शहरातील विविध भागांत हे अभियान राबविण्यात येणार आहे. संस्थेच्या अध्यक्षा सुनीता गोसावी, समन्वयक शरद गोसावी, प्रशांत देशपांडे, संजीव गिरी, विलास गोसावी, तुषार धुमाळ हे या अभियानाचे संयोजन करीत आहेत.

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माध्यमिक शिक्षकांचे समायोजन पूर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे शंभर टक्के समायोजन झाले आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली.

सन २०१७-१८ च्या संच मान्यतेनुसार नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक विभागाकडील शाळांतील रिक्त, अतिरिक्त शिक्षक समायोजनासाठी गंगापूररोड येथील सीएमसीएस कॉलेज येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माध्यमिक जिल्हा शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. समायोजनाच्या प्रतीक्षेत असलेल्या अल्पसंख्याक शाळांमधील सात व बिगर अल्पसंख्याक शाळांमधील सहा अशा एकूण तेरा शिक्षकांचे समायोजन या शिबिरात करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील रिक्त जागांच्या तुलनेत अतिरिक्त शिक्षकांची संख्या कमी असल्याने सर्व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण होऊ शकल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील चौदा शिक्षकांपैकी तेरा शिक्षकांचे समायोजन या प्रक्रियेत पूर्ण झाले असले, तरी आर. पी. विद्यालय या गुजराती माध्यमाच्या शाळेतील एका शिक्षिकेचे समायोजन बाकी आहे. गुजराती माध्यमाच्या शाळांची संख्या कमी असल्याने समायोजनास अडचण येत असल्याने समायोजनाचे हे प्रकरण शिक्षण उपसंचालक यांच्या पातळीवर माध्यमिक विभागाकडून सोपविण्यात आले आहे. विभागस्तरावरील शाळांमध्ये हे समायोजन करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावेळी उपशिक्षणाधिकारी आर. पी. पाटील, अनिल शहारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ भरतीविषयी मागविले मार्गदर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये नेमण्यासाठी वैद्यकीय अधिकारीपदाची थेट मुलाखत प्रक्रियेने भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, विविध तांत्रिक बाबींमुळे ही भरतीप्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी रद्द केली आहे. याबाबत आता सरकारला कळविण्यात आले असून, नवीन भरतीबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

प्रवर्गावर व समांतर आरक्षणानुसार पदसंख्या निश्चित करून मिळाल्यामुळे रिक्त पद भरताना संभ्रम निर्माण झाला असून, तालुकावार आरक्षणामुळे व अर्ज करण्याचा पद्धतीमुळे निवड करताना सदरची प्रक्रिया क्लिष्ट असल्याने, तसेच उमेदवारांना निवडप्रक्रियेचे पूर्णतः ज्ञान नसल्याने भरतीबाबत संभाव्य तक्रारी उद्धभवण्याची शक्यता असल्याने सदरची भरतीप्रक्रिया रद्द करण्याची विनंती जिल्हा परिषदेने सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर नवीन भरती करण्याची अनुमती सरकारकडून मागण्यात आली असून, त्यासाठी शिफारशी करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने पद भरती करताना शासननिर्णयानुसार जिल्हा स्तरावरून आरक्षण देण्यात यावे, उमेदवारांची निवड गुणानुक्रमे करण्यात यावी, उमेदवारांचे अर्ज तालुका पसंतीनुसार न मागता एकत्रित मागवून गुणवत्तेनुसार व आरक्षणानुसार निवड करून समुपदेशन पद्धतीने पद स्थापना द्यावी, तसेच तालुक्याचा रहिवासी म्हणून देण्यात येणारे २० गुण रद्द करावेत, अशा शिफारशी करण्यात आल्या आहेत.

----------------------------

एकूण ६४ पदांसाठी राबविण्यात आलेल्या या भरतीप्रक्रियेत २२१ उमेदवार उपस्थित राहिले व त्यांनी आपला अर्ज व कागदपत्रे सादर केली होती. सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्या आधिपत्याखाली राबविण्यात आली होती. याबाबत आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडे पाठविलेल्या पत्रात उमेदवारांनी कोणत्या तालुक्यासाठी अर्ज सादर केले याचा उल्लेख केलेला नसल्याने, तसेच रिक्त पद असलेल्या उमेदवार स्थानिक रहिवासी नसल्याने सदरचे उमेदवार गुणांकनानुसार पात्र असूनही त्यांची निवड कशी व कोणत्या तालुक्यासाठी करावी याबाबत सरकारकडे मार्गदर्शन मागविले आहे. अन्यथा गुणांकनानुसार उच्च गुणवत्ताधारक पात्र उमेदवार डावलले जाण्याची शक्यता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त विकल्प दिल्याने त्यांची प्राधान्यता निश्चित करण्यास अडचणी येत आहेत. आरक्षण तालुक्यानुसार असल्यानेही संवर्गाबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेक उमेदवार इतर जिल्ह्यांतील असल्याने त्यांना गुणांकनानुसार कोणत्या तालुक्यात निवड द्यावी याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. स्थानिक उमेदवाराला देण्यात येणाऱ्या २० गुणांबाबतचा निकष काढून टाकण्याबाबतही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किलोसाठी रुपयाचा भाव!

0
0

किलोसाठी रुपयाचा भाव!

देवळा बाजार समितीत बुधवारी उन्हाळी कांद्याला केवळ एक रुपये पाच पैसे प्रतिकिलो म्हणजेच प्रति क्विंटल एकशे पाच रुपये दर मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास देवळा येथील पाच कंदील परिसरात विंचूर-प्रकाशा महामार्गावर आपला दोन ट्रॉली कांदा फेकत सरकारचा निषेध केला. सरस्वतीवाडी (ता. देवळा) येथील पंढरीनाथ तुकाराम मेधने या शेतकऱ्याने उत्कृष्ट प्रतीचा दोन ट्रॉली कांदा देवळा बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. त्यांच्या उन्हाळ कांद्याला एकशे पाच रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. कांदा ट्रॉली भरणे, वाहतूक हमाली याचाही खर्च यातून निघणार नसल्याने संतप्त झालेल्या मेधने यांनी आपला कांदा रस्त्यात ओतून दिला. चौकात सर्वत्र कांद्याचे ढिग पडल्याने वाहतूक ठप्प झाली. कांद्याच्या ढिगातून मार्ग काढताना आठ ते दहा दुचाकीस्वार घसरून पडल्याने अपघात झाले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गप्पांचा फड अन् आठवणींना उजाळा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळा सोडून थोडीथिडकी नव्हे तर तब्बल ३० वर्षे झाली. त्यामुळे वर्गातील मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटतील असा विचार कुणी स्वप्नातही केला नव्हता. परंतु ही भेट घडून आली. ती देखील त्याच शाळेत आणि संस्कार घडविणाऱ्या त्याच शिक्षकांच्या साक्षीने. सिन्नर तालुक्यातील दापूर येथे 'आम्ही वर्ग मित्र' ही संकल्पना प्रत्यक्षात आली अन जुन्या सवंगड्यांबरोबर गप्पांचा फड रंगला.

'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' असा वसा जपत अनेक संस्कारी पिढ्या घडविणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे प्रांगण वेगळ्याच स्पर्शाने मोहरून गेले. हा स्पर्श होता याच प्रांगणात तब्बल ३० वर्षांपूर्वी बागडलेल्या बच्चे मंडळींचा. ही बच्चे मंडळी आता वेगवेगळ्या हुद्द्यावर पोहोचून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित आहे. कुणी पोलिस दलात कार्यरत आहे तर कुणी शिक्षक. कुणी प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनीयर, वकील आहे तर कुणी व्यावसायिक. कुणी अजूनही मातीतून सोने पिकविणारा प्रगतशील शेतकरी. आपापल्या क्षेत्रात कुणी काहीही असले तरी शाळेच्या प्रांगणात दाखल झाल्यानंतर ते सर्वजण होते १९८८ च्या बॅचचे माजी विद्यार्थी.

अनेक वर्षांनी शाळेच्या प्रांगणात भेटण्याचा दुर्मिळ योग जुळून आल्याने सर्वांमध्येच कमालीची उत्सुकता होती. या बॅचचे माजी विद्यार्थी चंद्रकांत आव्हाड, सोमनाथ शिंदे यांनी ही संकल्पना पुढे आणत ती प्रत्यक्षात राबविण्यासाठी पुढाकार घेतला. संजय काळे, राजू सोमाणी, नंदू आव्हाड, माधव कुरे, संजय बोडके, इंदू घुगे, रखमा कांगणे, अनिता निर्गुडे यांसारख्या अनेकांनी प्रतिसाद देत या आम्ही वर्ग मित्र या उपक्रमात आवर्जून सहभाग नोंदविला. सोहळ्याच्या आठवणी जपल्या जाव्यात याकरीता त्यांना आकर्षक स्मृतीचिन्ह भेट देण्यात आले. या सोहळ्यामुळे बालपणीच्या मैत्रीची वीण अधिक घट्ट झाल्याची भावना या माजी विद्यार्थ्यांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली.

शिक्षकांप्रती कृतज्ञता

इतकेच नव्हे तर एस. जी. खैरनार, के. के पाटील, वाय. के. निकम, पी. डी. सोनवणे, डी. व्ही. कापडणीस, व्ही. एस. कवडे, एल. बी. सांगळे, जी. एस. धारणकर, डी. बी परदेशी आणि शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक जी. एम. साबळे आदी या स्नेहमेळाव्याला आवर्जुन उपस्थित होते. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी स्वत:चा परिचय करून देत शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राईम डायरी

0
0

परतावा न देणाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ठेवी स्वीकारूनही त्यावर आकर्षक परतावा आणि व्याज न दिल्याने संबंधितांवर भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्पना सुनील तायडे (वय ३८, रा. गगनदीप सोसायटी, जेलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्याम निवृत्ती चव्हाण (रा. हरेकृष्ण अपार्टमेंट, इंदिरानगर), ज्योती संजय जुन्नरे (रा. त्रिमूर्ती निवास, उपनगर) आणि वाल्मिक कचरू भालेराव (फ्लॅट क्र. १४, पाथर्डी) अशी संशयितांची नावे आहेत. १ जानेवारी २०१४ ते २७ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित चव्हाण आणि जुन्नरे हे परीसस्पर्श लँड डेव्हलपर्सचे चेअरमन असून भालेराव संचालक आहेत. त्यांनी तायडे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांकडून वेळोवेळी २ लाख २५ हजार ६४० रुपये घेतले. कंपनीच्या योजनेप्रमाणे ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर निश्चित परतावा व त्यावर आजपर्यंत झालेले व्याज देणे अपेक्षित असताना ते दिले गेले नाही. ठेवीदारांच्या रकमा कंपनीच्या व्यवसायासाठी न वापरता त्या स्वत:च्या फायद्याकरीता वापरून या रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बालिकेस पळवून नेण्याचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंगणात खेळत असलेल्या चार वर्षीय बालिकेस पळवून नेण्याचा प्रयत्न या बालिकेच्या पालकांनी हाणून पाडला. नाशिकरोड परिसरातील सिध्दार्थनगरमध्ये सोमवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. शीतल सुशांत पगारे (वय २७, रा. मालधक्कारोड) यांनी फिर्याद दिली आहे. सचिन मदन इंगळे (वय २०, रा. मालधक्का रोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालिकेला आमिष दाखवून तो पळवून नेत असताना पगारे दांपत्याने त्याला हटकले. त्यावेळी मुलीला खाली संशयित पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबलवॉरची नांदी

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोडला टीव्ही केबल व्यावसायिकांची हातघाईची लढाई सुरू झाली आहे. या व्यवसायात नवीन व्यावसायिक किंवा कंपन्या येऊच नयेत यासाठी मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. तरीही ऐकले नाही तर पिस्तूल दाखवून दहशत निर्माण केली जात आहे. आता तर केबल तोडण्यापर्यंत मजल गेली असून, दोन दिवसांत सुमारे १७ हजार केबल बेकायदेशीररित्या तोडण्यात आल्याचा दावाही केला जात आहे. अशा प्रकारांना राजकीय नेते आणि गुंडांचा आश्रय असल्याने केबल वॉर भडकण्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे हे प्रकार रोखून संबंधितांच्या मुस्क्या आवळण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

या प्रकारांनी गंभीर वळण घेतले असून, खूनसत्र सुरू झाल्यास कोणाला जबाबदार धरावे, कायदा सुव्यवस्थेचे काय, पोलिस काय भूमिका घेणार, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. नाशिकरोडला सुमारे ३० ते ४० केबल व्यावसायिक आहेत. पंधरा दिवसांपूर्वी उपनगरच्या नवोदित केबल व्यावसायिकाने एका बड्या केबल व्यावसायिकाच्या हद्दीत टीव्ही केबल टाकण्यासाठी प्रवेश केला तेव्हा त्याला प्रस्थापित व्यावसायिकाने हस्तकांकरवी पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. या व्यावसायिकाने उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला.

'भाई' लोकांचा प्रवेश

टीव्ही केबल टाकणे, ती चालवणे, ग्राहकांकडून महिन्याला भाडे वसूल करणे हे एक दिव्यच झाले आहे. सामान्य आणि प्रामाणिक व्यावसायिक हा व्यवसाय करूच शकत नाही, अशी परिस्थिती आहे. केला तरी त्याला परिसरातील 'भाई' लोकांची मदत घ्यावी लागत आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे हस्तक व्यावसायिकाला मदत करतात. त्याला त्रास होत असेल तर ते सक्रिय होतात. त्या बदल्यात व्यावसायिक त्यांना महिन्याला ठराविक हप्ता देतात.

अर्थकारण कारणीभूत

आता सेट टॉप बॉक्ससह खासगी कंपन्यांच्या डीश घरोघर लावल्या जात आहेत. रिलायन्स, टाटासारख्या कंपन्या या क्षेत्रात उतरून दर्जेदार सेवा देत असल्याने ग्राहकांचा ओढा अशा खासगी डीटीएचकडे वाढला आहे. मात्र, त्यांचे दर जास्त असल्याने असंख्य ग्राहक अजूनही केबल टीव्हीचा आधार घेत आहेत. एकट्या जेलरोड भागातच २२ हजार कनेक्शन्स आहेत. २५० पासून ४०० रुपयापर्यंत भाडे आहे. त्यात सेट टॉप बॉक्सचे हजार ते बाराशे शुल्क आहे. या व्यवसायातून महिन्याला मुबलक पैसे मिळत असल्याने नेते, गुंड आणि केबल व्यावसायिक यांचे साटेलोटे झाले आहे.

हे आहे वादाचे कारण!

नवीन केबल व्यावसायिकांना एक हजार कनेक्शनमागे केबल, सेट टॉप बॉक्ससह सात ते आठ लाख रुपयांचा खर्च येतो. जुनी लाइन विकत घेतली तर प्रत्येक पॉइंटमागे दीड हजार रुपये मोजावे लागतात. चारशे ते तीन हजारांपर्यंत केबल पॉइंट असतात. लहान केबल व्यावसायिकाकडे तीनशे तर मोठ्या व्यावसायिकांकडे तीन ते सात हजारांपर्यंत कनेक्शन्स आहेत. जुन्या केबलचालकांचे बस्तान बसले आहे. नव्या केबलवाल्यांकडे लायन्सस आहे, परंतु, आपला धंदा बसेल म्हणून ते नवीन व्यावसायिकांना प्रवेश करू देत नाहीत. जुने केबलचालक नव्या कंपन्यांनाही येऊ देत नाहीत. हॅथवे, इन, एबीएस आदी कंपन्यांना याचा त्रास होत आहे. नवीन कंपन्या 'एम्पक्ट फोर' हे व्हर्जन वापरतात तर जुन्या कंपन्या 'एम्पक्ट टू' व्हर्जन वापरतात. नवीन कंपन्या मोफत सेट टॉप बॉक्स देतात. नवीन ग्राहकांना कमी किमतीत चांगली सेवा देतात. त्यामुळे जुन्या व्यावसायिकांना फटका बसत आहे. तसेच ते नवीन तंत्रज्ञान वापरत नाहीत. मानसिकता बदलत नाही. इच्छा असली तरी भांडवल नसते. वित्तीय संस्था कर्ज देत नाहीत. या वादातूनच केबल तोडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. जेव्हा नवीन तंत्रज्ञान येते तेव्हा जुना-नवा वाद सुरू होतो. अनेक वर्षांपासून त्यांचा हाच व्यवसाय आहे. उपजीविकेचे साधन नाही, असे सांगून ते नवीन व्यावसायिकांना प्रवेश नाकारतात. प्रसंगी मारहाण करतात. संघटनेच्या जोरावर त्रास दिला जातो.

पोलिसांची भूमिका

जुन्या केबल व्यावसायिकांनी नव्यांना धमक्या देऊ नये, व्यवसाय करू द्यावा, अशी पोलिसांची सूचना आहे. नाशिकरोड व उपनगर पोलिसांनी याबाबत इशारा दिला आहे. ज्यांच्याकडे परवाना आहे, त्यांनी कायदेशीर मार्गाने व्यवसाय करू द्यावा, खुली स्पर्धा करावी, कोणी आडकाठी आणली तर कठोर कारवाई केली जाईल. प्रत्यक्षात कारवाई केली जात नसल्याने केबल वॉर गंभीर ‌वळण घेऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images