Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने लासलगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. निफाड तहसीलदारांनी या घटनेचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. शेतकरी आत्महत्यांचे हे सत्र सुरूच असून, जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ९७ झाली आहे.

आकाश रंगनाथ चव्हाणके (वय ३५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. आकाश यांच्या नावे शेतजमीन नाही. परंतु, त्यांच्या वडिलांच्या नावे सिन्नर तालुक्यातील किर्तांगळी येथे शेतजमीन असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. आकाश यांनी २१ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु, त्याबाबतचा अहवाल २६ नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. चालू वर्षात आतापर्यंत ९७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, नोव्हेंबर महिन्यात १३ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बलात्काराचा गुन्हा दाखल झाला; पोलिसाची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे हे समजल्यावर मुंबई येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक साजन सानप यांनी पुणे येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उपनगर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई येथील आंबोली पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक साजन सानप यांच्यावर नाशिक रोड मधील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्यावर गुन्हा दाखल झाला आहे हे समजताच पोलीस उपनिरीक्षक साजन सानप यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

तक्रार दाखल करणारी महिला नाशिक रोड भागात राहणारी असून तिचे पती मुंबई येथे पोलीस सेवेमध्ये अधिकारी पदावर कार्यरत असल्याचे समजते आहे. साजन यांनी आत्महत्या केल्याचे समजताच पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. उपनगर पोलीस स्टेशन मध्ये सध्या स्मशानशांतता आहे. दरम्यान आत्महत्या केलेल्या साजन सानप यांच्या नातेवाईकांनी उपनगर पोलीस स्टेशन मध्ये गर्दी केली असून पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहे. उपनगर पोलिसांची एक तुकडी आत्महत्या केलेल्या ठिकाणी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.
उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराच्या तक्रारीसह अॅट्रोसिटीची तक्रारही पीडित महिलेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात १३० अपघातप्रवण स्थळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात जीवघेण्या अपघातांना कारणीभूत ठरणारी १३० स्थळे निश्चित करण्यात आली असून अपघात रोखण्यासाठी या स्थळांवर तात्काळ उपाययोजना करा, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी यंत्रणेला दिले.

जिल्ह्यात सातत्याने अपघातांची मालिका सुरूच असून त्यामध्ये अनेक जण जीव गमावत आहेत. गत आठवड्यात मनमाड-येवला मार्गावर अंकाई बारी येथे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांनी जीव गमावला. याखेरीज सातत्याने लहान मोठ्या अपघातांत कुणी ना कुणी जीव गमावत आहे. वाढते अपघात आणि त्यांमध्ये होणारे मृत्यू याबाबत न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी शहर आणि ग्रामीण पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. या विभागांच्या वतीने करण्यात आलेल्या संयुक्त पाहणीचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. विविध कारणांमुळे सातत्याने अपघात होत असलेल्या १३० ठिकाणांची माहिती यंत्रणांच्या वतीने या बैठकीत देण्यात आली. जिल्ह्यात अनेक अपघात असे घडले आहेत की ज्यामध्ये एका अपघातात पाच ते दहाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत किंवा जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. या अपघातप्रवण स्थळांवर करावयाच्या उपाययोजनांचा प्राधान्यक्रम ठरवून ती कामे तातडीने हाती घेतली जावीत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

नऊ कोटी रुपयांची अपेक्षा

१३० अपघातप्रवण स्थळांवर उपाययोजना करण्यासाठी ९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ६१ ठिकाणांवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असून त्यासाठी ६ कोटी ९४ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. हा निधी लवकर उपलब्ध करून दिल्यास तेथे रस्त्याच्या डागडुजीसह गतिरोधक, थर्माप्लास्ट पेंट, कॅट आईज, ब्लिंकर्स, साइन बोर्डस यासारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. नेमके कोठे काय करायचे याचा प्राधान्यक्रम ठरवा, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी यंत्रणेला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मैत्रेय’ ठेवीदारांच्या रांगा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'मैत्रेय' फसवणूक प्रकरणी माहिती देण्यासाठी ठेवीदारांची गर्दी कायम आहे. मागील २२ नोव्हेंबरपासून आतापर्यंत एक हजार १५६ ठेवीदारांनी आपली माहिती पोलिस आयुक्तालयात जमा केली आहे. मात्र, फॉर्मची उपलब्धता आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या संकलनात वेळ वाया जात असल्याने ही सुविधा ऑनलाइनसुद्धा उपलब्ध होणे आवश्यक आहे.

मैत्रेय समूहाकडून ठेवीदारांच्या आर्थिक फसवणूकीप्रकरणी राज्यात ३० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांच्या तपासामध्ये मैत्रेयच्या वित्तीय आस्थापनांच्या नोंदींद्वारे ठेवीदारांची माहिती उपलब्ध झाली असून, पुढील तपास पोलिस यंत्रणेमार्फत सुरू आहे. त्यामुळे अद्याप आपल्या ठेवींच्या रक्कमेची मागणी दाखल न केलेल्या ठेवीदारांनी मागणीबाबत विहित नमुन्यात अर्ज करून पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेत किंवा आडगाव येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आतापर्यंत ३०८ मालमत्ता जप्त करण्याबाबतचे आदेश देण्यात आले असून, या मालमत्तांच्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन कायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी सक्षम प्राधिकारी नेमण्यात आले आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळण्यासंदर्भात अन्य व्यक्ती किंवा यंत्रणेकडे संपर्क न साधता पोलिसांकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ठेवीदारांकडून माहिती संकलित करण्याचे काम शनिवारपासून सुरू झाले आहे. आतापर्यंत एक हजार १५६ ठेवीदारांनी पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेत माहिती दिली असल्याचे तपासाधिकारी डॉ. सीताराम कोल्हे यांनी सांगितले.

ऑनलाइनची आवश्यकता

ठेवीदारांकडून माहिती संकलित करून घेण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 'मैत्रेय' प्रकरणात आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील ११ हजार गुंतवणूकदारांना पैसे परत मिळाले आहेत. प्रत्यक्षात हा आकडा सव्वादोन लाखांच्या घरात आहे. म्हणजे आगामी काळात माहिती देण्यासाठी मोठी गर्दी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी ठेवीदारांसाठी असलेला फॉर्म, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे म्हणजे आधारकार्ड, असल्यास पॅनकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स तसेच 'मैत्रेय'चे प्रमाणपत्र याचा तपशील देणे आवश्यक आहे. यामुळे एकाच भागात, तालुक्यात राहणारे तक्रारदार मोठ्या संख्येने एकाचवेळी माहिती दाखल करू शकतात.

या ठिकाणी द्यावेत अर्ज

'मैत्रेय' गुन्ह्यातील मैत्रेय सर्विसेस प्रा. लि., मैत्रेय प्लॉटर्स अॅण्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि., मैत्री रियल्टर्स अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या तीन कंपन्यांचे अर्ज स्वीकारण्याठी पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखा येथे पोलिस कॉन्स्टेबल विकी विलास झाडे तसेच रूपेश नामदेव बनसोड यांची नेमणूक करण्यात आली आहे. मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा. लि. या कंपनीचे अर्ज ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा येथे द्यावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर कोतवालांची दखल

$
0
0

मागण्यांचा अहवाल सरकारकडे पाठविण्यास विभागीय आयुक्त राजी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

चतुर्थश्रेणी पदाचा दर्जा आणि सहावा वेतन आयोग मिळावा, या मागणीसाठी धरणे आंदोलन करणाऱ्या कोतवालांच्या मागण्यांची दखल अखेर विभागीय आयुक्तांनी घेतली. विभागीय आयुक्त राजाराम माने मागण्यांचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यास राजी झाले असून, महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेकडून मागण्यांचा अहवाल मंगळवारी (दि. २७) मागविला.

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने काम बंद ठेवून येथील विभागीय आयुक्तालयापुढे संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश इंगोले यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू केलेले आहे. राज्यातील कोतवालांकडून प्रत्यक्षात चतुर्थश्रेणी दर्जाच्या पदावरील कर्मचाऱ्यांपेक्षाही जास्त काम करवून घेतले जात आहे. मात्र, या कोतवालांना अवघे पाच हजार रुपयांचे मानधन सरकारकडून मिळते. कामाचे स्वरूप पाहता, कोतवालपदास चतुर्थश्रेणीचा दर्जा देऊन कोतवालांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे ही अनेक वर्षांपासूनची कोतवालांची मागणी आहे. मात्र, आजवर सरकारने कोतवालांची ही मागणी मान्य केलेली नाही. उलट कोतवाल हे अवर्गीकृत पद असल्याने या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू होत नसल्याचे सरकारने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे कोतवालांनी राज्य सरकारच्या या धोरणाचा निषेध केला आहे. राज्य संघटनेने या मागण्यांसाठी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत. गेल्या आठवड्यापासून कोतवालांचे धरणे आंदोलन सुरू असून, कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबविले जाणार नसल्याचा निर्धार या कोतवालांनी केला आहे.

विभागीय आयुक्त राजाराम माने यांची मंगळवारी कोतवाल संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश इंगोले, नितीन चंदन, बाळू झोरे, विवेक देशमुख, कैलास कोळी, विनोद कुटे, रवींद्र बोदेले, पुरुषोत्तम साखरे, राजेश केंडे, माधुरी हंकारे आदींनी भेट घेऊन आपल्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. कोतवालांच्या मागण्यांचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी कोतवाल संघटनेच्या प्रतिनिधींना दिली. राज्यभरातून आणखी काही कोतवालांनी मंगळवारी या आंदोलनास हजेरी लावल्याने आंदोलनस्थळी कोतवालांची संख्या वाढल्याचे दिसून आले.

राज्यातील कोतवालांपुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न उभा राहिलेला आहे. पूर्णवेळ नोकरी करूनही जगण्यासाठी पुरेसे वेतन उपलब्ध न होणारी कोतवाल ही एकमेव नोकरी ठरली आहे. त्यामुळे कुटुंब सांभाळणेही अवघड झाले आहे. कोतवालांच्या मागण्यांचा सरकारने सहानुभूतिपूर्वक विचार करावा.

- लक्ष्मण म्हात्रे

कोतवाल, भिवंडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समित्यांतील व्यवहार ठप्प

$
0
0

हमाल, मापारी संप

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

हमाल व मापारी यांनी पुकारलेल्या संपामुळे मनमाड व नांदगाव बाजार समितीत मंगळवारी शुकशुकाट होता. दोन्ही बाजार समित्या मंगळवारी बंद असल्याने कांदा, धान्याचे लिलाव बंद होते. मनमाड व नांदगाव बाजार समितीत मंगळवारी केवळ भाजीपाल्याचे लिलाव झाले. त्यामुळे शहर परिसरात रोजच्या बाजारावर कोणताही प्रतिकूल परिणाम झाला नाही. मात्र कांदा व इतर लिलाव बंद असल्याने त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला. समितीत आलेल्या शेतकऱ्यांना हमाल व मापारी यांच्या राष्ट्रीय संपामुळे परत फिरावे लागले. संप रात्री मिटला तर बुधवारी बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत होतील अशी समितीत चर्चा होती.

पणन अध्यादेश कायद्यात सुधारणा करण्यात येत असल्या तरी नव्या सुधारणेत हमाल व मापारी यांच्यावर अन्यायकारक अटी लादल्या जाणार आहेत. बाजार समितीबाहेर लिलाव व कोणते व्यवहार झाले तर त्याची मजुरी हमालांना मिळणार नसल्याची तरतूद आहे. त्या विरोधात हा संप पुकारला गेला आहे.

-

अॅड. गंगाधर बिडगर, सभापती, मनमाड

पणन कायद्यात सुधारणा करताना सर्वांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे होते. या सुधारणा नेमक्या काय? याबाबत स्पष्टता नाही. ज्यांच्याबाबत निर्णय घेतला

गेला त्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते.

--तेज कवडे, सभापती, नांदगाव

लासलगावातही शुकशकाट

म. टा. वृत्तसेवा, निफाड

राज्यभरात असणाऱ्या बाजार समितीमधील माथाडी कामगार मंगळवारी संपावर असल्याने लासलगाव बाजार समितीत कांदा व धान्य लिलाव बंद होते. रोज सायंकाळी भरणारा भाजीपाला लिलाव सुरू होता. लासलगाव बाजार समिती व उपबाजार आवार निफाड व विंचुरसह एकूण ५०० हमाल, मापारी आहेत. मंगळवारी पूर्वनियोजित संप असल्याने लासलगावसह विंचुर, निफाड येथील कांदा आणि धान्य लिलाव बंद ठेवण्यात आले होते. लासलगाव बाजार समितीतील भाजीपाला बाजारात शेतकऱ्यांनी भाजीपाला लिलावसाठी आणला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वरसेतू महोत्सवएक डिसेंबरला

$
0
0

नाशिक : स्वरसेतू फाउंडेशनतर्फे १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहात संगीत महोत्सव होणार आहे. महोत्सवात पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर आणि सावनी तळवळकर यांचे तबलावादन, पद्मश्री उस्ताद शाहीद परवेज खान व आदित्य कल्याणपूर यांचे सतारवादन, तसेच पंडित शौनक अभिषेकी यांचे गायन आणि शाकीर खान व तेजस उपाध्याय यांची सतार- व्हायोलिनची जुगलबंदी होणार आहे. प्रणव पुजारी यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांगीतुंगी यात्रेच्या समारोपात कुस्ती दंगलचा थरार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील श्री क्षेत्र मांगीतुंगी दिगंबर जैन तीर्थक्षेत्र येथे वार्षिक यात्रेचा समारोप राज्यभरातून आलेल्या पैलवानांच्या कुस्ती दंगलीने झाला. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास सुरू झालेली ही कुस्ती दंगल सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यंदा प्रथमच या कुस्तीदंगलीत महिला व मुलींचा समावेश झाल्याने या कुस्तीदंगलीला प्रचंड उत्साहात प्रारंभ झाला.

श्री मांगीतुंगी दिगंबर जैन तीर्थक्षेत्र येथे देवस्थानचे मुनीश्री विकसंत महाराज, आवश्यक सागर महाराज, माताजी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरात अभिषेक पूजन करून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष सुमेरमल काले, व्यवस्थापक डॉ. सुरजमल जैन, भिलवाड सरपंच बाळासाहेब पवार, उपसरपंच उखा कुवर जैन उपस्थित होते. मंगळवारी यात्रोत्सवाच्या समारोपाच्या निमित्ताने कुस्ती दंगल ठेवण्यात आली होती. या कुस्ती दंगलीत सहभाग घेण्यासाठी कोल्हापूर, नंदुरबार, नागपूर, धुळे, जळगाव येथील मल्ल मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. भिलवाड सरपंच बाळासाहेब पवार, यात्रोत्सव समिती अध्यक्ष रमेश पवार, उपसरपंच उखा कुवर, जायखेडा पोलिस ठाण्याचे स. पोलिस निरीक्षक गणेश गुरव, भाऊसाहेब गावीत, रामभाऊ पवार, यांच्या प्रमुख उपस्थिती कुस्ती दंगलीस प्रारंभ झाला. या दंगलीत प्रथमच महिला व तरुणींचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मागण्यांवर चर्चेसाठी चार डिसेंबरला बैठक

$
0
0

निदेशकांच्या समस्यांबाबत मंत्र्यांशी चर्चा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) निदेशकांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी येत्या चार डिसेंबर रोजी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सचिव, संचालक आणि संघटना यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांनी मान्य केले आहे.

महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना यांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर मंगळवारी आंदोलन झाले. आंदोलनानंतर संघटनेच्या शिष्टमंडळासोबत मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांची मंत्रालयात चर्चा झाली. याबाबत संघटनेचे अध्यक्ष महादेव माळी यांनी माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभरातील शासकीय आयटीआयमधील निदेशकांची भरती रखडलेली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी पुरेशा प्रमाणात आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. सेवाप्रवेशाचे जुनेच नियम निदेशकांच्या विभागांर्तगत प्रगतीसाठी मारक ठरत आहेत. तसेच पदोन्नती रखडलेल्या आहेत, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. चार वर्षांपूर्वी कौशल्य विकास व उद्योजकता या स्वतंत्र विभागाच्या निर्मितीमधून हे प्रश्न मार्ग लागतील, अशी अपेक्षा हाती. मात्र, प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने निदेशक संघटनेने आंदोलन केले. त्यानंतर मंत्री पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेप्रसंगी नॅशनल फेडरेशन ऑफ गर्व्हमेंट आयटीआय एम्प्लॉईज असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष भोजराज काळे, संघटनेचे अध्यक्ष महादेव माळी, उपाध्यक्ष विनोद पाटील, सरचिटणीस विनोद दुर्गपुरोहित आदी उपस्थित होते.

आमदार दराडेंची भेट

आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनप्रसंगी विधान परिषद आमदार किशोर दराडे यांनी भेट देत निदेशकांच्या मागण्यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार कल्याण काळे, आमदार बाळाराम पाटील, डॉ. सावंत यांनीही आंदोलकांची भेट घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेचा धक्का लागून वायरमनचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

क्रांतिनगर येथील गं. पा. माने शाळेजवळ असलेल्या गोदामात काम करणाऱ्या वायरमनचा एलईडी लाईटिंग माळ शोल्डर करीत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सचिन रमेश परदेशी (बेलदार) यांचे क्रांतिनगर येथे गं. पां. माने शाळेजवळ इलेक्ट्रिकल सामानाचे गोदाम आहे. परदेशी यांच्याकडे अभिषेक रतन सोनार (वय १९, उदय कॉलनी, क्रांतिनगर, मखमलाबाद रोड) हे वायरमनचे कामकाज बघत होते. अभिषेक हे मंगळवारी (दि. २७) दुपारी एक वाजता एलईडी माळ शोल्डर करत असताना विजेचा धक्का लागून पडला. तो बराच काळ बेशुद्ध अवस्थेत होता. त्याचा भाऊ रमेश गिरी सोनार याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले असता त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांने मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएसआयची रेल्वेखाली आत्महत्या

$
0
0

उपनगर पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतरची घटना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक/ म. टा. वृत्तसेवा जेलरोड

विवाहितेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबईतील अंबोली पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने पुणे येथे रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी समोर आली. या प्रकरणी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उपनगर पोलिस स्टेशनमध्ये बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्याद देणाऱ्या महिलेचा पती सुद्धा पोलिस दलात कार्यरत आहे.

साजन शंकर सानप (३७, रा. जेलरोड, सध्या, मुंबई) असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तो मूळचा संगमनेर तालुक्यातील सोनुशी गावचा असल्याचे समजते. जेलरोड येथे राहणाऱ्या विवाहितेने त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. विवाहितेच्या तक्रारीनुसार तिचा पती मुंबईत पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना साजन सानपही तेथेच रायटर म्हणून नेमणुकीस होते. महिला व सानप जेलरोडचे रहिवासी असल्याने पतीच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. एप्रिल २०१४ मध्ये घरात स्वयंपाक करताना पीडितेचा चेहरा भाजला. तेव्हा तिला पाहण्याच्या निमित्ताने सानप घरी आला. तिचा फोन नंबर घेतला. नंतर दोघांचे फोनवर बोलणे सुरू झाले.

पतीविरुद्ध काही महत्त्वाचा पुरावा देण्याच्या बहाण्याने या दोघांची जवळीक वाढली. माझ्याकडे काही फोटो असल्याची धमकी सापन याने मे २०१४ मध्ये तक्रारदार महिलेस दिली. हे फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे महिलेच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सानपने २ जून २०१४ रोजी महिलेच्या घरी मद्यपान करून तिलाही मद्य पाजले व बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास पतीस सांगण्याची तसेच आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर साडेतीन वर्षे हा प्रकार सुरू होतो, असा आरोप महिलेने केला आहे.

आपल्यामधील संबंधांची माहिती सांगितल्यास पतीची नोकरी घालविण्याची व त्याला ठार मारण्याची धमकी सानपने दिली. मात्र, महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. सानपचे फोनवर रेकॉर्ड केलेले बोलणेही ऐकविले. तेव्हा सानपने एका पोलिस अधिकाऱ्याला घेऊन महिलेचे घर गाठले व माफी मागितली. पुन्हा त्रास देणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र, सानप हा गणेश आगवणे या मित्राकरवी महिलेचा पाठलाग करुन माहिती गोळा करत राहिला. या मित्राने महिलेला ती काम करते त्या ठिकाणी जाऊन धमकी दिली. सानपने महिलेच्या मैत्रिणीला फोन करुन बदनामी केली. महिलेच्या पतीने सानपला जाब विचारला असता त्याने आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर महिलेने पतीसोबत उपनगर पोलिस ठाणे गाठून २६ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली. ही तक्रार रात्री पाऊणे बारा वाजेच्या सुमारास नोंदवण्यात आली.

सकाळी सापडला मृतदेह

सूत्रांच्या माहितीनुसार, रात्री हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सानप यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पुणे येथील संगम पुलाच्या येथे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केली. पुण्याहून शिवाजीनगरकडे जात असताना सानप अचानक रेल्वेसमोर जाऊन उभे राहिले. रेल्वे जोरदार धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

खात्यातंर्गत परीक्षा देऊन पीएसआय

पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या सानपने खात्यातंर्गत परीक्षा दिली होती. नुकतेच प्रशिक्षण घेतलेल्या सानपची पहिलीच नियुक्ती मुंबईत झाली होती. पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असताना सानप महिलेच्या पतीकडे रायटर म्हणून काम करीत होता. त्यातूनच या दोन कुटुंबाची सलगी वाढल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्यांच्या कुंचल्यांनी साकारली चित्रे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोर, पाण्याचा हंडा घेऊन जाणारी महिला, नदीच्या झुळझुळत्या पाण्यालगतची जैविक सृष्टी या आणि अशा अनेक संवेदनशील विषयांवरील चित्रप्रदर्शनाने नाशिककरांचे लक्ष वेधले आहे. शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध चित्रांचे प्रदर्शन लक्षवेधी ठरत असून, विद्यार्थ्यांच्या कलेला नाशिककरांनी उत्स्फूर्त दाद दिली आहे. पाटील लेनमधील निर्माण हाऊस चौकाजवळील हार्मनी आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन सुरू आहे.

सारा माय आर्ट स्टुडिओतर्फे स्टुडंट आर्ट लाइफ प्रदर्शन २०१८चे आयोजन करण्यात आले आहे. २०१५ पासून हे प्रदर्शन दरवर्षी भरविले जाते. यावर्षी बालचित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या सुमारे ३०० कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. सोमवारपासून सुरू झालेले हे प्रदर्शन बुधवार (२८ नोव्हेंबर)पर्यंत सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. ज्येष्ठ चित्रकार मुक्ता बालिगा, चित्रकार संजय साबळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हेमंत शेवाळे प्रदर्शनाचे संयोजक आहेत. मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि मुलांचे करिअर चांगले घडविण्याकरिता हे प्रदर्शन भरविले जात असल्याचे शेवाळे यांनी सांगितले. हे प्रदर्शन नि:शुल्क असून, सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शनाला भेट देऊन बालकलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांच्या सेवेत एसटी ‘पास’

$
0
0

चांदवड तालुक्यातील विद्यार्थ्यांनाही मिळणार मोफत पास

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

शिक्षणासाठी चांदवड-देवळा तालुक्यातून इतर तालुक्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता परिवहन महामंडळ मोफत पास देणार, असे आश्वासन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले. चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी रावते यांची भेट घेवून यासाठी पाठपुरावा केला. चांदवड तालुका दुष्काळग्रस्त असतानाही लासलगाव आणि पिंपळगाव आगाराने या तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास नाकारला होता. त्यानंतर 'महाराष्ट्र टाइम्स'ने याबाबत परखड भूमिका घेत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात चांदवडचा समावेश आहे. त्यानुसार विद्यार्थांना शिक्षणासाठी मोफत पास सुविधा मिळणार होती. मात्र विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी शेजारील लासलगाव, पिंपळगाव बसवंत येथील महाविद्यालयात महामंडळाच्या बसने दररोज प्रवास करतात. मात्र या आगाराने विद्यार्थ्यांना मोफत पासची सुविधा दिली नव्हती. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने विद्यार्थ्याच्या समस्यांना वाचा फोडत २५ नोव्हेंबरच्या अंकात 'मोफत पासला डबल बेल' या शिर्षकाखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी या वृत्ताची दखली घेत आज, मंगळवारी मुंबई येथे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली. रावते यांनी लवकरच शासन निर्णयात बदल करून या भागातील विद्यार्थ्यांनाही मोफत पासची सवलत लागू करणार असल्याची ग्वाही दिली. या निर्णयाचा चांदवड, देवळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

मोफत पास सुविधेबाबत त्वरित कार्यवाही करणार असल्याची मंत्री रावते यांनी दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

-डॉ. राहुल आहेर, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांसाठी२० कोटींचा निधी

$
0
0

चांदवड : चांदवड व देवळा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थ संकल्पात सार्वजनीक बांधकाम विभागाने २० कोटी ७० लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली. लासलगाव-वाकी-तळेगावरोही-वडगाव पंगु रापली मार्गे, खडकजांब ते खडकओझर, गुऱ्हाळे, देवरगाव, हिरापूर, पाटे, कोलटेक, काजीसांगवी, गंगावे, दुगाव, कोकणखेडे, निमोण, कानडगाव ते मनमाड, राहूड, कळमदरे, सुतारखेडे, हरनूल, पन्हाळे, सोनीसांगवी, रेडगाव, वाहेगावसाळ, वाकी, सोमठाणदेश या रस्त्यात सुधारणा करणे आदी कामासाठी हा निधी मिळाला असल्याचे आमदार डॉ. आहेर यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रानवड’ सुरू करण्यासाठी स्वाभीमानीचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यातील रानवड सहकारी साखर कारखाना सुरू करावा यासाठी वारंवार आंदोलन करूनही सरकार जर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत नसेल तर सरकारची 'तिरडी' काढू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी दिला आहे.

रानवड येथील के. के. वाघ सहकारी साखर कारखान्याची मुदत संपून पाच महिने उलटले. मात्र निविदा काढण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. निविदा काढली तरी ती २५ दिवसांच्या मुदतीची काढू असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा हंगाम पूर्णपणे वाया घालवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप वडघुले यांनी केला आहे. येत्या आठ दिवसांत ही प्रक्रिया पार पडली नाही तर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करून, असा इशारा वडघुले यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकप्रतिनिधी लागले कामाला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर महापालिकेतील 'प्रशासकीय' राजवट संपुष्टात आली असून, लोकप्रतिनिधी पुन्हा जोमाने पालिकेत कार्यरत झाले आहेत. महापौर रंजना भानसी आणि सभागृहनेता दिनकर पाटील यांनी मंगळवारी खातेप्रमुखांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. मुंढे यांच्या काळात लोकप्रतिनिधींना न जुमानणाऱ्या अधिकाऱ्यांना लगाम लावण्यास सुरुवात केली आहे. शहरात अस्वच्छता दिसल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याबरोबरच नगरसेवकांना विश्‍वासात घेऊन कामे न केल्यास थेट कारवाईचाच इशारा महापौरांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

तुकाराम मुंढे यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींपासून लांब ठेवत, त्यांना लोकप्रतिनिधींच्या बैठकीकडे जाण्यास मज्जाव केला होता. महापौरासंह अन्य पदाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकांना अधिकारी जात नसल्याने लोकप्रतिनिधीच अस्वस्थ झाले होते. त्यामुळे अधिकाराचा वाद सुरू होवून मुंढे आणि पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारीच भिडले होते. मुंढे यांच्याकडून नागरिकांना तक्रारी देण्यासाठी नगरसेवकांकडे न जाता थेट अॅपवर तक्रारी देण्याचे आवाहन केले जात होते. दालनात न जाण्याच्या कडक सूचना होत्या. मुंढे यांच्या वागणुकीमुळे पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकही महापालिका कार्यालयात येत नव्हते. परंतु, आता मुंढे यांच्या बदलीनंतर पदाधिकारी आणि नगरसेवक पालिकेत पुन्हा कार्यरत झाले आहेत. पदाधिकारी व नगरसेवकांची पावले पुन्हा एकदा महापालिका मुख्यालयाकडे वळली असून महापौर रंजना भानसी व सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी खातेप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शहराच्या बिघडत्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना महापौरांनी पशुसंवर्धन विभागाला दिल्या. स्वाइन-फ्लू, डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य वैद्यकीय विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देताना डास निर्मूलनासाठी प्रभागनिहाय जंतूनाशक फवारणी व धुरळणी करण्याच्या सूचना मलेरिया विभागाला देण्यात आल्या. बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेले टाकाऊ बांधकाम साहित्य त्वरित उचलावे, साईडपट्ट्यांची स्वच्छता करून तणनाशक फवारण्यात यावे. उद्यान विभागाने उद्यानांतील पालापाचोळा उचलून खेळण्यांची दुरुस्ती करावी, पाणीपुरवठा विभागाने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा. जलवाहिन्यांचे लिकेज दुरुस्त करावेत, अशा सूचना महापौरांनी दिल्या. शहर स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्याचे तसेच उपलब्ध सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहराची नियमित स्वच्छता करण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आले. विभागीय स्वच्छता निरीक्षकांनी तसेच विभागीय अधिकाऱ्यांनी शहर स्वच्छतेची दक्षता घ्यावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिला. कचरा उचलण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना हातगाड्या पुरविण्याच्या सूचना सभागृहनेते दिनकर पाटील यांनी केल्या.

आता हयगय नको

दिनकर पाटील यांनी नेहमीच्या शैलीत यावेळी अधिकाऱ्यांना उद्देशून आता हयगय चालणार नाही, अशा इशारा दिला. मुंढे गेल्याने पालिकेचे कामकाज थांबले असे वाटू देऊ नका. ते नसले तरी कामकाज थांबले नाही पाहिजे, असे सांगत तुमच्या काही अडचणी असतील तर त्याही सांगा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. स्वच्छतेसाठी हातगाड्या वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. प्रत्येक अधिकाऱ्याने आपापली जबाबदारी पार पाडावी असे सांगत, हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

शाळांना पाणी द्या, स्वच्छता करा!

महापौरांनी गेल्या महिन्यात केलेल्या प्रभागनिहाय दौऱ्यात सिन्नरफाटा भागातील शाळेच्या स्वच्छतागृहात विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याचे आढळून आले होते. याचा संदर्भ देत महापालिकेच्या सर्व शाळांमधल्या पाणीपुरवठा व शौचालयांच्या स्थितीबाबत ताडडीने दौरा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या आवाहनानंतर आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी उदय देवरे यांना दिले.

मोर्चा की इव्हेंट?

पालिकेच्या आयुक्तपदावरून मुंढेंची बदली झाली असली तरी काही मुंढेसमर्थकांकडून त्यांना परत आणण्यासाठी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी येत्या २९ नोव्हेंबरला समर्थकांकडून मुंढेंना परत आयुक्तपदावर आणण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची इव्हेंटप्रमाणेच तयारी सुरू आहे. नागरिकांना सोशल मीडियावर समर्थनासाठी येण्याचे आवाहन करण्यासोबतच विशेष ऑडिओ क्लिप तयार करण्यात आल्या असून, त्यांचा नागरिकांमध्ये प्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे हा मोर्चा की इव्हेंट, अशी चर्चा पालिका वर्तुळात नगरसेवकांमध्ये होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविनाश शिरोडे स्पेस अॅम्बॅसेडर

$
0
0

अमेरिकेच्या नॅशनल स्पेस सोसायटीतर्फे निवड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पेस टेक्नॉलॉजीत अधिकाधिक संशोधन व्हावे, विद्यार्थ्यांना स्पेस एज्युकेशनच्या प्रवाहात आणावे, स्पेस टेक्नॉलॉजीच्या संदर्भात असणाऱ्या स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, यासाठी खगोलशास्त्रात संशोधनकार्य करणारे आणि नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सचे माजी अध्यक्ष अविनाश शिरोडे आता स्पेस अॅम्बॅसेडर बनले आहेत. अमेरिकेच्या नॅशनल स्पेस सोसायटीकडून तीन वर्षांसाठी (२०१८ ते २०२१) शिरोडे यांची स्पेस अॅम्बॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

नासा, इस्त्रो, युरोप आणि फ्रेंच स्पेस एजन्सीमध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, तसेच कमी खर्चात यशस्वी अवकाशयान बवनिण्याच्या तंत्राचे विद्यार्थ्यांना धडे देणे, या विशेष उल्लेखनीय कामागिरीबद्दल शिरोडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून एरोनॉटिक्स विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. वाऱ्यावर गाडी चालविणे यासह इतरही संशोधनाचे पेटंट शिरोडे यांच्या नावावर असून, गेल्या कित्येक वर्षांपासून खगोलशास्त्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे. अर्ज नोंदणी, खगोलशास्त्रात केलेल्या कार्याचा संपूर्ण अहवाल आणि त्याचे लाइव्ह प्रेझेंटेशन याद्वारे शिरोडेंची निवड करण्यात आली असून, पुढील तीन वर्षांत विद्यार्थ्यांना स्पेस एज्युकेशनकडे वळविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ग्लोबल वॉर्मिंग व इतर समस्यांमुळे पृथ्वी धोक्यात येऊ लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पेस एज्युकेशनकडे वळविणे गरजेचे झाले आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीने खगोलशास्त्रात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात. येत्या काही वर्षांत मंगळावर आणि चंद्रावर जीवसृष्टी साकारण्यासाठी स्पेस टेक्नॉलॉजीत विद्यार्थ्यांचे संशोधन आवश्यक असून, सौरऊर्जेसाठी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पुढील तीन वर्षे कार्य करणार आहे

- अविनाश शिरोडे, इंजिनीअर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटल अभियानाला मुख्यमंत्री येणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कळवणसह पाच आदिवासी तालुक्यांमधील रहिवाशांसाठी आयोजित अटल आरोग्य अभियानाच्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनही सतर्क झाले असून, मंगळवारी नांदुरी येथे भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अभियानाच्या तयारीचा आढावा घेतला.

आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या तक्रारींचे निदान होऊन त्यांच्यावर उपचार करता यावेत, यासाठी कळवण तालुक्यातील नांदुरी येथे अटल आरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. कळवणसह देवळा, बागलाण, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांमधील रहिवाशांना या अभियानाचा लाभ दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस अधीक्षक संजय दराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, कळवण कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, तहसीलदार कैलास चावडे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, संदीप जाधव आदींनी नांदुरी येथे भेट देऊन अटल आरोग्य शिबिराच्या जागेची पाहणी केली. वाहनतळ, भोजनव्यवस्था, रुग्ण तपासणी कक्ष, मुख्य मंडप, नियंत्रण कक्ष आदी व्यवस्थांबाबत राधाकृष्णन यांनी माहिती घेतली. रुग्णाच्या नोंदणीपासून तो परत जाईपर्यंत त्यास कोणतीही अडचण येणार नाही या दृष्टीने कक्षांची व्यवस्था करा अशा सूचना यंत्रणेला करण्यात आल्या. या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शिबिरस्थळी पोहोचणार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हेलिपॅडच्या जागेचीही पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोंडी, वाहनांची कमी; रहिवाशांची जास्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट रोडवर सोमवारच्या तुलनेत मंगळवारी वाहतूक कोंडीची समस्या कमी जाणवली. वाहने स्मार्टरोडच्या दिशेने जाणार नाहीत, याची काळजी घेतल्याने हे झाले. दुसरीकडे अशोक स्तंभाजवळ प्रशासनाने तातडीने काही ठिकाणी पंक्चर सुरू करून परिसरातील नागरिकांना व व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

शहर वाहतूक शाखेने सोमवारी उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अशोक स्तंभाकडून मेहेरकडे व वकीलवाडीकडे जाणारी वाहतूक रोखली. अशोकस्तंभाकडे येणाऱ्या वाहनांना रविवार कारंजामार्गे पुढे काढण्यात आले. एमजीरोडकडून येणाऱ्या वाहनांना जिल्हा कोर्टाच्या दिशेने पुढे जाऊ देण्यात आले नाही. परिणामी त्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना दुतर्फा वाहनांना समोरे जावे लागले. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी येथील वाहतुकीत बराच फरक होता. अशोक स्तंभ ते एमजीरोड या भागात मोठी बाजारपेठ आणि रहिवाशी परिसर असून, आज त्यांची मात्र कोंडी झाल्याचे चित्र दिसले. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी व महिलांनी आंदोलन छेडून वापरण्यासाठी रस्ता देण्याची मागणी केली. त्यामुळे प्रशासनाने लागलीच सर्कल टॉकीज समोर आणि कृष्णा सिल्क साडी सेंटर दुकानासमोर रस्त्यास पंक्चर करण्याचे काम हाती घेतले. यामुळे नागरिकांचा त्रास कमी होऊ शकतो. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पार्किंग व्यवस्था हवी

अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या रस्त्यावर अनेक हॉस्पिटल्स, क्लासेस, व्यावसायिक अस्थापने, बँका असून, येथे येाऱ्या नागरिकांच्या अडचणीत भर पडते आहे. अशोक स्तंभाकडून मेहेर चौकात वाहने येऊ नये म्हणून अशोक स्तंभाजवळ बॅरकेडिंग लावण्यात आले आहे. आतील भागात जाणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने या बॅरकेडिंगजवळ लावली. मात्र, काहीच वेळेत आलेल्या टोइंग व्हॅनने येथील वाहने नेली. रस्त्याचे काम होईपर्यंत आतील भागात कामानिमित्त येणाऱ्या वाहनचालकांसाठी घारपुरे घाटाकडे पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरीत ४२ लाखांचा गुटखा पकडला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बंदी असलेला तब्बल ४२ लाख रुपयांचा गुटखा ग्रामीण पोलिसांच्या हाती लागला आहे. नाशिक वणी मार्गावरून गुटख्याची बेकायदा वाहतूक होणार असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी पाठलाग करून ही कारवाई केली. या प्रकरणी कर्नाटक राज्यातील चालकास अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून गुटख्यासह आयशर ट्रक असा सुमारे ५३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

उद्धव रामराव राठोड (२३ रा. बिदर, कर्नाटक, हल्ली, पिंपरी चिंचवड) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सोमवारी दिंडोरी ते कळवण दरम्यान गस्त घालीत असताना त्यांना ही टीप मिळाली. वणीकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या आयशरमध्ये गुटख्याचा साठा असल्याचे कळताच पथकाने करंजखेड फाटा परिसरात सापळा लावला. यावेळी आयशर (एमएच १४ ईएम ३४९७) पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र भरधाव वेगात आलेल्या ट्रक चालकाने हुलकावणी दिल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. अर्धा किलोमीटरअंतरावर पोलिसांनी ट्रकला अडविले. या ट्रकमध्ये ४२ लाख ८ हजार ६०० रुपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधी सुपारी मिळून आली. हा सर्व साठा गोण्यांमध्ये भरलेला होता. अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. वणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images