Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘अद्वैत’च्या कामगिरीची ‘युथ टाइम’ने घेतली दखल

$
0
0

कचरा वेचणाऱ्या मुलांचा प्रवास पॅरिसमध्ये मांडणार

कचरा वेचणाऱ्यांचे आयुष्य

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

युथ टाइम इंटरनॅशनल मुव्हमेंट यांच्याकडून आयोजित सहाव्या युथ ग्लोबल फोरमसाठी जळगावातील कचरा वेचणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या 'आनंद घर' या संस्थेच्या अद्वैत दंडवते यांची निवड झाली आहे. पॅरिस येथे होणाऱ्या परिषदेसाठी जगभरातून १०० तर भारतातून केवळ चार जणांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातून अद्वैत हा एकमेव आहे.

युथ टाइम इंटरनॅशनल मुव्हमेंट यांच्याकडून सहा वर्षांपासून युथ ग्लोबल परिषद आयोजित करण्यात येत आहे. जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी ही फोरम होत असते. यंदा २२ ते ६ डिसेंबर दरम्यान ही परिषद पॅरिस येथे आयोजित करण्यात आली आहे. सामजिक कामात विशेष काम करणाऱ्या युवकांना यासाठी आमंत्रित करण्यात येते. यात कचरा वेचणाऱ्या मुलांसाठी काम करणाऱ्या जळगाव येथील आनंद घर संस्थेच्या अद्वैतची निवड झाली आहे. या फोरममध्ये जगभरातून १०० जणांना आमंत्रित करण्यात येत असले तरी त्यातील केवळ १० जणांनाच आपल्या कामाचे सादरीकरण करण्याची संधी मिळते. या १० जणांमध्ये देखील अद्वैतचा समावेश आहे. भारतातून केवळ ४ जणांना तर महाराष्ट्रातून केवळ अद्वैतला फोरमसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अद्वैत हा या फोरममध्ये कचरा वेचणाऱ्या मुलांना सुरक्षित व आनंददायी बालपण मिळावे तसेच महिलांना शाश्वत रोजगार मिळावा यासाठी करीत असलेल्या कामाचा अहवाल मांडणार आहे. या आधी ही फोरम दुबई, जाकार्ता येथे झाली आहे.

कचरा वेचणाऱ्या मुलांसाठी काम

अद्वैत दंडवते व त्याची पत्नी प्रणाली सिसोदीया यांनी जळगावात वर्धिष्णू सोशल रिसच अॅण्ड डेव्हलपमेंट सोसायटीची स्थापना करून त्या माध्यमातून त्यांनी अस्वच्छ काम करणाऱ्या असंघटीत कामगारांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम सुरू केले. त्यानंतर 'सक्षम' या उपक्रमाच्या माध्यमातून ते असंघटीत कामगारांच्या स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. तसेच शाळाबाह्य मुलांसाठी त्यांनी 'अपना घर' सस्थेची स्थापना केली आहे. अनेक नामांकित संस्थांनी त्यांचा वेळोवेळी सन्मान केला आहे. तसेच त्यांना 'विप्रो'ची फेलोशीप देखील मिळाली आहे.

'युथ ग्लोबल फोरम २०१८'साठी झालेली निवड ही आम्ही करीत असलेल्या कामासाठी आनंदाची बाब आहे. या फोरमच्या माध्यामातून काम मांडण्याची संधी मिळाली आहे. परिषदेनंतर देखील चार दिवस पॅरिसमध्ये थांबून काही संस्थाना भेट देवून त्यांची माहिती घेणार आहे.

- अद्वैत दंडवते,

वर्धिष्णू सोशल रिसच अॅण्ड डेव्ह. सोसा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठपासून आता सुट्टी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शालेय वयात प्रमाणापेक्षा जास्त दप्तराचे ओझे उचलावे लागत असल्याने लहान वयात विद्यार्थ्यांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी वारंवार उपाययोजना राबवूनही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केवळ तपासणीवेळी होत असल्याचे वास्तव आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने बघितले जावे. ताबडतोब या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या दृष्टीने मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून संलग्न शाळांना, राज्य सरकारला सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयाचे मुख्याध्यापक आणि पालक वर्गाने स्वागत केले आहे. \B

\B

राज्य सरकारतर्फे दिलेल्या सूचनांचे पालक आम्ही यापूर्वीच केले आहे. मुलांच्या वजनानुसार दप्तराचे ओझे असावे, याकडे लक्ष दिले आहे. या निर्णयाच्या सूचना दिल्या जात असल्या तरी त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. आम्ही शिबिरे घेऊनही प्रबोधन केले आहे.

- दादाजी आहिरे, मुख्याध्यापक, संत आंद्रिया हायस्कूल

दैनंदिन अभ्यासक्रमाच्या वह्यांबरोबरच गृहपाठाच्या वह्यांमुळे दप्तराचे ओझे साहजिकच वाढते. सरकारी व्यवस्थेनेच या परिस्थितीबाबत निर्णय दिल्यास त्याचा लाभ निश्चितच होऊ शकतो.

- प्रितम महाजन, पालक

दप्तर ओझ्याबाबत शाळांसह पालकांनीही दक्ष रहावे. विद्यार्थ्यांची दप्तर तपासणी केल्यास त्यात अनावश्यक साहित्य दिसून येते. या वस्तू न आणण्यासाठी पालकांनी दप्तर तपासणी करावी. ओझे कमी करण्यासाठी आम्ही एक वही अनेक विषयांसाठी वापरण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे भार कमी होण्यास मदत होते आहे. याशिवाय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही उपलब्ध करून दिल्याने पाणीबाटलीचे ओझेही कमी झाले आहे.

- नितीन पाटील, मुख्याध्यापक, सुखदेव

निर्णय कागदोपत्री न होता अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. डॉक्टरांकडून वारंवार दप्तराच्या ओझ्याने लहान वयात वाढत असलेल्या पाठीच्या दुखण्याबाबत सांगितले जाते. हे लक्षात घेऊन असे निर्णय प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी होणे गरजेचे आहे.

- योगेश पालवे, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटी संपली; शाळा भरली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या सुट्यांचा आनंद लुटल्यानंतर सोमवारपासून प्राथमिक शाळा नियमित सुरू झाल्या. मराठी माध्यमिक शाळा गुरुवारपासून (दि. २९) सुरू होणार असून इंग्रजी माध्यमाच्या बहुतांश शाळा यापूर्वीच सुरू झाल्या असून विद्यार्थीवर्गाचा द्वितीय सत्राचा अभ्यासक्रमही सुरू झाला आहे.

दिवाळीच्या सुट्या हा विद्यार्थ्यांसाठी विशेष आनंदाचा भाग असतो. फराळ, फटाके, नवीन कपडे, फिरायला जाणे, खेळणे यामुळे या सुट्यांची आतुरतेने वाट विद्यार्थ्यांकडून पाहिली जाते. या सुट्या संपल्यानंतर विद्यार्थीवर्ग तितक्याच आनंदाने द्वितीय सत्राच्या अभ्यासाठीही तयार होत शाळेत दाखल होतो. सध्या असेच चित्र शाळांमध्ये बघण्यास मिळत आहे. दिवाळीच्या सुट्टीत केलेली धमाल एकमेकांना सांगत विद्यार्थीवर्ग शाळांमध्ये पुन्हा रमले आहेत. दहावीच्या परीक्षांपूर्वी इतर इयत्तांचाही अभ्यासक्रम पूर्ण करायचा असल्याने शाळांमध्ये द्वितीय अभ्यासक्रमास लगेचच सुरुवात करण्यात आली आहे. तसेच पुढील महिन्यापासून शाळांमध्ये स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धांनाही सुरुवात होणार आहे. या सर्वांचे नियोजन करुन अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याकडे शाळांचा कल आहे. माध्यमिक शाळांना २८ नोव्हेंबरपर्यंत सुट्या असून २९ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत.

\Bसुटी संपली; शाळा भरली!

\Bदिवाळीच्या सुटीत मज्जा केल्यानंतर बच्चेकंपनीची सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू झाली. सकाळी बोचऱ्या थंडीत उबदार स्वेटर घालून चिमुकल्यांनी शाळेत आपल्या वर्ग सहकाऱ्यांसह प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रकारांचे धरणे आंदोलन

$
0
0

नाशिक : पत्रकार संरक्षण कायदा, पेन्शन योजना यांसारख्या प्रमुख मागण्यांसह पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती व नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातील ११३ पत्रकार यात सहभागी झाले. खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तातडीने निवेदन पाठवून सरकारकडे याबाबत आवाज उठविण्यात येईल, असे दोघांनी आश्वस्त केले. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन सादर करून आंदोलनाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्तदान शिबिर

$
0
0

नाशिक : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ आज क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या कार्यालयात रक्तदान शिबिर झाले. या वेळी विविध विभागातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या एकूण ४० जणांनी रक्तदान केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहेश्वरी समाजातर्फेडिसेंबरमध्ये बॉक्स क्रिकेट

$
0
0

लोगो : सोशल कनेक्ट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

--

खेळाच्या माध्यमातून युवकांचे संघटन अधिक मजबूत व्हावे, या उद्देशाने माहेश्वरी समाजाच्या वतीने १५ व १६ डिसेंबर रोजी माहेश्वरी प्रीमिअम लीग होणार आहे. बॉक्स क्रिकेटची ही लीग असून, १६ संघांत सामने रंगणार आहेत. कर्मयोगीनगर येथील रणभूमी येथे ही स्पर्धा होईल.

संघांच्या कॅप्टन व खेळाडूंची निवड २७ व ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे. १४४ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार असून, १६ संघांतील ८ संघांचे दोन गट असणार आहेत. या गटांतून उपांत्य फेरीसाठी चार व अंतिम फेरीसाठी २ संघांची निवड करण्यात येणार आहे. चेतन मणियार, आदित्य नावंदर, केतन मणियार, अंकुश सोनी, कल्पेश भुतडा, वैभव मालपाणी, गोपाल सोनी, ऋषिकेश साबू, गोविंद मुंदडा आणि सागर मुंदडा सहकार्य करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा हमीभावासाठी आज ‘रेल रोको’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कांद्याला अनुदान व हमीभाव मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि. २७) सकाळी १० वाजता निफाड रेल्वे स्टेशनवर रेलरोको आंदोलन केले जाणार आहे.

कांद्याचे भाव वाढतील या अपेक्षेने ७ ते ८ महिन्यापासून साठवणूक केलेल्या उन्हाळी कांद्याला शुक्रवारी निचांकी म्हणजे ५१ रुपये प्रति क्विंटल असा मातीमोल बाजार भाव मिळाला. उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक व मजुरी खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. दरम्यान, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी उन्हाळी कांद्याला किमान १५० रुपये सरासरी ४५१ तर कमाल ७५३ रुपये भाव मिळाले. लाल कांद्याला किमान ५५१ रुपये सरासरी ११२० रुपये व कमाल १,४२१ रुपये भाव मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिथॉन जॉब फेअरमधून दहा जणांना रोजगारसंधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कृषिक्षेत्रामध्ये नवनव्या संधी उपलब्ध होत असून कृषिथॉनमधील 'जॉब फेअर' उपक्रमातून १० जणांची तात्काळ निवड होऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. २२ नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या या प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी 'ऍग्रो करिअर जॉब फेअर' या तरुणांसाठी उपयुक्त उपक्रम झाला. यावेळी सुमारे १२ कंपन्यांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

'जॉब फेअर'मध्ये १५० उमेदवारांनी नावनोंदणी केली. त्यामध्ये विविध कृषी विद्यापीठांच्या पदवीधारक व पदविकाधारकांचा समावेश होता. अशियन ऍग्रो टेकनॉलॉजी, टफरोप्स प्रा.लिमिटेड, अग्रिफीड फेर्टीलाझर्सच इंडिया प्रा. लिमीटेड, अॅम्बी इंडस्ट्रिज, पेपटेक बायोसायन्सेस प्रा. लिमिटेड, एसएसपी फार्मटेक इंडिया प्रा. लिमिटेड, अपोलो टायर्स, देशमुख सोलर, सेजेन्टा फाउंडेशन इंडिया, महालक्ष्मी ऍग्रो सिस्टिम, कोलोजेन रिसर्च प्रा. लिमिटेड, जय किसन ऍग्रो या कंपन्या त्यामध्ये सहभागी झाल्या. सेल्स आणि मार्केटिंग, फिल्ड ऑफिसर, मायक्रोबॉयोलॉजिस्ट, विक्री अधिकारी, प्रॉडक्शन अशा विविध पदांसाठी व क्षेत्रात काम करण्यासाठी युवकांना संधी उपलब्ध झाल्या. कृषिथॉन प्रदर्शनाचा सायंकाळी समारोप झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवे आयुक्त राधाकृष्ण की, राधाकृष्णन!

$
0
0

रोज नव्या आयुक्ताच्या नावाची चर्चा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांची उचलबांगडी केली असली तरी, त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या महापालिकेच्या आयुक्तपदावर अद्याप कोणाचाही नियुक्ती केलेली नाही. विधानसभा अधिवेशन आणि निवडणूक आयोगाच्या परवानगीमुळे राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती रखडली असली तरी, आता जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यातच सोमवारी सोशल मीडियावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशींच्या नावाचीही चर्चा सुरू रंगली होती. यामुळे नवे आयुक्त कोण, याविषयी उत्सुकता वाढली आहे.

आयुक्त तुकाराम मुंढेंची मुख्यमंत्र्यांनी अवघ्या नऊ महिन्यांतच मंत्रालयात नियोजन विभागात सहसचिव पदावर बदली केली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुंढेंनंतर आयुक्तपदाची धुरा हे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे सांभाळतील, अशी माहिती दिली होती. मात्र अद्याप गमे यांची आयुक्तपदावर नियुक्ती झाल्याचा आदेश निघालेला नाही. राज्य सरकारने केवळ मुंढेंच्याच नावाचा बदली आदेश काढत पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेशित केले. त्यामुळे गमेंच्या नियुक्तीबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.

तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारीही गमेंच्या नावाचा आदेश आला नाही. यामुळे प्रभारी आयुक्त व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी आयुक्तांच्या थाटातच मुंढेस्टाईल बैठका घेऊन कामकाज केले. त्यामुळे गमेंऐवजी राधाकृष्णन बी हे नवे आयुक्त म्हणून येणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु, सायकांळपर्यंत त्यांच्याही नावाचा आदेश न आल्याने आता राधाकृष्ण की राधाकृष्णन अशी चर्चा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.

दरम्यान, गमे यांच्याकडे निवडणूक आयोगाशी संदर्भात काम असल्याने ते पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या आयुक्तपदाचा आदेश निघेल, अशी माहिती सत्ताधारी भाजपच्या आमदारांकडून दिली जात आहे.

...

भय इथले संपत नाही!

सोमवारी महापालिकेच्या आयुक्तपदी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी यांची बदली झाल्याची चर्चाही सोशल मीडियावर सुरू होती. मुख्यमंत्र्यांनी मुंढेंऐवजी आयुक्तपदी जोशी यांची नियुक्ती झाल्याची चर्चा सुरू होताच पालिकेतील लोकप्रतिनिधींमध्ये धडकी भरली होती. त्या मुंढेंपेक्षा आक्रमक व कर्तव्यकठोर असल्याने आगीतून बाहेर येऊन आता फुफाट्यात पडायचे का, असा प्रश्न नगरसेवकांमध्ये उपस्थित होऊ लागला आहे. परंतु, जोशी या सचिवपदाच्या अधिकारी असल्याने त्यांची पालिकेत नियुक्ती होणे शक्य नसल्याच्या चर्चाही दुसरीकडे सुरू होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवाद साधण्यासाठीपोलिस हेल्पलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहराचा नुकताच पदभार घेतलेले उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलाभ रोहन यांनी जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आणि अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी स्वतःचा संपर्क क्रमांक ८५३०३७५१७५ हा सर्वांसाठी एएसपी हेल्पलाइन म्हणून जाहीर केल्याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव उपविभागांतर्गत अवैध व्यावसायिक, मटका जुगार, पत्ता, चक्री, अवैध दारू, गावठी हातभट्टी, वेश्या व्यवसाय, गुटखा, अवैध गॅस वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलाभ रोहन यांनी सर्व पोलिस निरीक्षकांना सूचना दिल्या आहेत. परंतु जनता आणि पोलिसांमधील संवाद वाढवा, जनतेच्या अडचणी दूर व्हाव्यात, अवैध धंदे आणि महिला छेडखानीबाबत काहीही तक्रार असल्यास थेट संपर्क साधता येण्यासाठी एएसपी हेल्पलाइन क्रमांक जनतेकरिता सुरू करण्यात आला आहे.

नागरिकांनी यावर कोणतीही भीती न बाळगता फोन, मेसेज अथवा व्हॉटसअ‍ॅप करून कळवावी, असे आवाहन डॉ. नीलाभ रोहन यांनी केले आहे. तसेच माहिती देणाऱ्यांबाबत संपूर्ण गोपनीयता बाळगण्यात येईल हे सांगताना चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळेगावात उद्घाटन सोहळा

$
0
0

नाशिक : गोवर-रुबेला विरोधी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन मंगळवारी (दि. २७) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या हस्ते दिंडोरी तालुक्यातील तळेगाव गावातील जिल्हा परिषदेतील शाळेत केले जाणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते व आरोग्य सभापती यतींद्र पगार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दरम्यान, गोवर-रुबेला विरोधी लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्हा रुग्णालय परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय व नाशिकमध्ये विविध परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्यातर्फे जिल्हा स्तरावर जनजागृतीसाठी सोमवारी रॅली काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगलसाठी

$
0
0

बोगस डॉक्टर आढळला

नाशिकरोड : शहर पोलिस दलातील एका हवालदाराच्या आत्महत्येप्रकरणी तपास करताना नाशिकरोड पोलिसांच्या हाती एक बोगस डॉक्टर लागला आहे. या डॉक्टरची पोलिसांनी रविवारी रात्री चौकशी पूर्ण केली असून, त्याविषयी मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. या अहवालानंतरच बोगस डॉक्टरवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या आणि कोर्टात ड्युटी असलेल्या प्रमोद पाटील (रा. पोलिस लाईन, नाशिकरोड पोलिस ठाणेजवळ) यांचा काही दिवसांपूर्वीच त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालानुसार त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघड झाले. बोगस डॉक्टरकडून पाटील यांच्यावर दारुचे व्यसन सोडविण्यासाठी उपचार केले गेले असल्याची माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआय निदेशकांचे आज मुंबईत आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रिक्त निदेशकांच्या जागा भरण्यासह विविध सुविधांच्या पूर्तीच्या मागण्यांसाठी राज्यभरातील आयटीआय निदेशक मंगळवारी (दि. २७) मुंबईतील आझाद मैदानात दिवसभर आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेचे अध्यक्ष महादेव माळी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

राष्ट्रीय व राज्य स्तरावर कौशल्य विकासाचे महत्त्व लक्षात घेऊन सरकारकडून कौशल्य विकास व उद्योजकता या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आली. मात्र, तरीही ५० टक्के जागा रिक्त आहेत. एकेका शिक्षकाकडे चार किंवा त्यापेक्षा अधिक वर्गांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी नवीन यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी, सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करावा तसेच अनेक वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे निवडणूक नाशिकसाठी

$
0
0

२८ उमेदवारांच्या याचिका फेटाळल्या

औरंगाबाद : धुळे महानगर पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज फेटाळणाऱ्या २८ उमेदवारांच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्या. प्रभाग १२ (अ) मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार अन्सारी फौजिया बानो यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे आदेश न्या. एन. एम. जामदार यांनी दिले. जात प्रमाणपत्र न जोडणे, उमेदवारी अर्जावर सूचना अनुमोदकाची स्वाक्षरी नसणे, अपत्य प्रमाणपत्र न जोडणे, वैधता प्रमाणपत्र जोडणे परंतु जात प्रमाणपत्र जोडलेले नसणे, पडताळणी अर्जाच्या खाली उमेदवाराची स्वाक्षरी नसणे, तीनपेक्षा जास्त अपत्ये, मनपाचे कंत्राटदार असणे अशा स्वरुपाच्या काही किरकोळ तर काही गंभीर चुका व आक्षेप होते. यावरून नामनिर्देशन रद्द केल्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाला २५ पेक्षा जास्त उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. खंडपीठाचे न्या. एन. एम. जामदार यांनी सर्व याचिका फेटाळत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्णय कायम ठेवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'विद्यार्थी वसतिगृहांसाठी जागा देऊ'म टा

$
0
0

'विद्यार्थी वसतिगृहांसाठी जागा देऊ'

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लाडशाखीय वाणी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या या वसतिगृहांसाठी सरकारतर्फे लवकरच पुणे आणि नाशिकमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले. लाडशाखीय वाणी समाजाच्या पहिल्या महाअधिवेशनाचे आयोजन मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिप येथे करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी, महाअधिवेशनाचे अध्यक्ष कैलास वाणी, श्याम शेंडे, गोपाळ केले, अभय नेरकर, अभय केले, अनिल चितोडकर, जगदीश चिंचोरे या वेळी उपस्थित होते.

फडणवीस यांनी मनोगतामध्ये वाणी समाजाच्या वतीने स्वातंत्र्यलढ्यातील योगदान तसेच व्यापाराच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला दिलेली बळकटी यासाठी समाजाचे विशेष कौतुक केले. हा समाज नोकऱ्या मागणारा नाही; तर नोकऱ्या देणारा आहे, असे सांगत या कर्मयोगी समाजाच्या पाठीशी सरकार कायमच असेल असे आवर्जून नमूद केले.

कैलास वाणी यांनी या वेळी लाडशाखीय वाणी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे आणि नाशिक शहरात वसतिगृहाची उभारणी करण्यासाठी सरकारने आम्हाला जागा द्यावी, आम्ही बांधकामाचा निधी समाजातून उपलब्ध करतो, अशी मागणी केली.

फडणवीस म्हणाले, 'अनेकदा विविध समाजाचे लोक आम्हाला जागेबरोबर निधीचीही मागणी करतात. तुम्ही मात्र फक्त जागा मागताय, हे कौतुकास्पद आहे. सरकारतर्फे लवकर जागा देण्यात येईल.'

अधिवेशनामध्ये वाणी चेंबर ऑफ कॉमर्स या समाजाच्या उद्योग व्यासपीठाची घोषणा करण्यात आली. समाजाच्या प्राचीन आणि अर्वाचीन पुराव्यांचे पुस्तक असलेल्या 'समाजमंथन' या पुस्तिकेचे फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. लाडशाखीय वाणी समाजाच्या वतीने या वेळी मुख्यमंत्री निधीसाठी ११ लाख रुपयांची मदत करण्यात आली. याबरोबरच वाणी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने २५ गावांतील तीनशे विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेणार असल्याची माहिती शैलेश वाणी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपकडून शेतकऱ्यांची फसवणूक

$
0
0

नांदेड : लोकसभा निवडणूक प्रचारात सत्तेत आल्यास पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफीचे आश्‍वासन नरेंद्र मोदी यांनी देऊन जबाबदारी घेतली होती. परंतु, सरकार स्थापन होताच दिलेले आश्‍वासन विसरुन सरसकट कर्जमाफी न करता तत्वतः व अंशतः मान्य करीत नियमांच्या जंजाळात अडकवून फसवणूक केल्याच्या आरोप खासदार राजु शेट्टी यांनी केला आहे. शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालय येथे आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत खासदार शेट्टी मार्गदर्शन करताना बोलत होते.

खासदार राजु शेट्टी यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका करीत शेतकऱ्यांना निवडणुका जिंकण्याआधी कर्जमाफी व दीडपट हमीभाव देण्याचे आश्‍वासन देणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होताच शेतकऱ्यांची नेहमी चेष्टा केल्याचा आरोप यावेळी खासदार शेट्टी यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वासनेच्या पायऱ्यांनी उतरणारे ‘नागमंडल’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाताळाच्या तळातून किंवा जखनीच्या विहिरीतून कोठून तरी एखादी वासना आपल्या कांबळ्याला येऊन चिकटली तर... या कल्पनेतून नागमंडल हे नाटक लिहिले गेले आहे. सुप्रसिध्द नाटककार गिरीश कर्नाड यांचे हे नाटक होते. राज्य नाट्य स्पर्धेत सोमवारी हे नाटक सादर झाले. प. सा. नाट्यगृहात ही स्पर्धा सुरू आहे.

राणी नावाची एक मुलगी विवाह करून नवऱ्याच्या घरी येते; पण नवरा तिच्याशी कोणतेच संबंध ठेवत नाही. म्हणून गावातल्या एका म्हातारीने दिलेली औषधी मूळी त्याला उगाळून खाऊ घालण्याचा ती प्रयत्न करते. पण काही कारणास्तव तिला ते फेकून द्यावे लागते. ते फेकलेले औषध एका नागाच्या अंगावरी पडते आणि नाग राणीच्या प्रेमात पडतो. तो मनुष्यरूप धारण करून तिच्या घरी येऊ लागतो. नागाच्या आणि तिच्या प्रेमसंबंधातून तिला दिवस जातात. ही गोष्ट जेव्हा तिच्या खऱ्या नवऱ्याला कळते तेव्हा तो तिला गावापुढे दिव्य करायला सांगतो. अशा आशयाचे हे नाटक सादर करण्यात आले या नाटकातून स्त्रीच्या भावविश्वाचे अनेक पदर उलगडत जातात.

नाटकाची प्रस्तुती एस. एम. एज्युकेशन अॅण्ड रिसर्च फाउंडेशन यांची होती. लेखन गिरीश कर्नाड यांनी केले होते. दिग्दर्शन रोहित पगारे यांचे होते. नेपथ्य नीलेश राजगुरू, प्रकाशयोजना रवींद्र रहाणे, संगीत राहुल कानडे, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकात ऋषिकेश बोडके, रिया अहिरराव, स्वानंदी इंगळे, साक्षी खताळ, वैष्णवी पाटील, भक्ती पाटील, मयुरी इंगळे, तेजस्वी देव, रोहित पगारे, यश बागुल यांनी भूमिका केली.

आजचे नाटक

आनंद ओवरी

सुरभी थिएटर

स्थळ : पसा नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ७ वाजता

\Bलोगो : राज्य नाट्य स्पर्धा \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरपकड अन् गनिमी कावा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्य सरकारला घेराव घालण्याच्या तयारीत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची नाशिकमध्येही धरपकड करण्यात आली. जिल्ह्यात काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले तर काहींना स्थानबद्ध करण्यात आले. ९० हून अधिक जणांवर अशी कारवाई झाली. तरीही जिल्ह्यातील सुमारे ४५० कार्यकर्ते गनिमी कावा पद्धतीने पोलिसांना हुलकावणी देत मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले असून मंगळवारपासून ठिय्या आंदोलन सुरू करणार आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी काही वर्षांपासून राज्यभर सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. आरक्षणासह विविध मागण्या सरकार दरबारी अजूनही प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ संवाद यात्रा काढण्यात आली आहे. मुंबईत अधिवेशन सुरू असताना ही संवाद यात्रा निघाल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची रविवारी (दि. २५) सायंकाळपासूनच पोलिसांनी धरपकड सुरू केली. खासगी वाहने घेऊन मुंबईकडे मार्गस्थ झालेल्या ९० कार्यकर्त्यांना शहर व जिल्हा पोलिसांनी ठिकठिकाणाहून ताब्यात घेतले. पंचवटी, मुंबई नाका, नाशिकरोड, उपनगर, अंबड, सातपूर, इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत या कारवाया करण्यात आल्या. शहर पोलिसांना गुंगारा देऊन मुंबई आग्रा महामार्गाद्वारे मुंबईकडे कूच करणाऱ्या काही कार्यकर्त्यांची वाहने अडवून पोलिसांनी गरवारे येथे त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांना हुलकावणी

मुंबईत पोहोचण्याच्या निर्धारानेच घराबाहेर पडलेल्या मराठा क्रांती मार्चाच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गनिमी कावा पद्धतीने पोलिसांना हुलकावणी दिली. एकाचवेळी आणि एकाच मार्गाने जाण्याऐवजी कार्यकर्ते पांगले. वेगवेगळ्या मार्गांनी ते मुंबईकडे मार्गस्थ झाले. जव्हार, मोखाडा, पालघर यामार्गे सुमारे ४५० ते ५०० कार्यकर्ते मुंबईत अंधेरीपर्यंत पोहाचले. मुंबईत सरकारी हॉस्पिटल्सच्या आवारात खासगी वाहने उभी करून ते टॅक्सी आणि ऑटोच्या मदतीने आझाद मैदानापर्यंत पोहोचले.

पाच हजार कार्यकर्त्यांची कूच

पोलिसांकडून धरपकड होऊ नये, यासाठी कोठे केव्हा भेटायचे हे निश्चित करण्यात आले. कार्यकर्त्यांनी आपले मोबाइलही बंद करून ठेवले. आझाद मैदान येथे पोहोचल्यानंतर हे मोबाइल सुरू करण्यात आले. आझाद मैदानावर मंगळवारपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. नाशिकमधून ३० तारखेपर्यंत सुमारे पाच हजार आंदोलक आझाद मैदानावर पोहाचतील, असे नियोजन मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे.

मनमाडमध्ये निषेध

मनमाड : मराठा समाजाचे समन्वयक भास्कर झाल्टे, भिमराज लोखंडे, विष्णू चव्हाण, विठ्ठल नलावडे, कांतीलाल चौभे, नाना शिंदे, योगेश पाटील व नाना घुमरे यांना मनमाड पोलिसांनी रविवारी (दि. २५) रात्री ताब्यात घेऊन मुंबईला जाण्यापासून रोखले. वरिष्ठांचे आदेश आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या कारवाईचा सकल मराठा समाज शहर शाखेतर्फे पत्रकाद्वारे निषेध करण्यात आला.

मोबाइलही ताब्यात

पंचवटी : मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांचे मोबाइल फोनही ताब्यात घेऊन त्यांचा संपर्क बंद करण्यात आला. सकल मराठा समाजातर्फे काढण्यात आलेल्या संवाद यात्रेचे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत झाले. संवाद यात्रा घोटी येथून मुंबईकडे रवाना झाली. यात पुढाकार घेणाऱ्या उमेश शिंदे, संतोष माळोदे आदींना आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचे मोबाइल फोन सकाळी परत देण्यात आले. मात्र, सायंकाळपर्यंत सोडण्यात येणार नाही, तसे आदेश वरिष्ठ सूत्रांनी दिल्याचे त्यांना सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुबेला-गोवर विरोधात आजपासून मोहीम

$
0
0

मनपा क्षेत्रातील ४.९० लाख बालकांना लस देणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारच्या निर्देशांनुसार महापालिकेच्या माध्यमातून मंगळवारपासून (दि. २७) शहरात गोवर उच्चाटन व रुबेला नियंत्रण मोहीम राबविली जाणार आहे. या अंतर्गत महापालिका क्षेत्रातील नऊ महिने ते १५ वर्षां दरम्यानच्या तब्बल ४ लाख ९० हजार २१८ बालकांना इंजेक्शनद्वारे लस दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य-वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी दिली.

लहान मुलांमध्ये गोवर-रुबेला या आजाराचे जास्त प्रमाण असून जगात या आजारांचे सर्वात जास्त रुग्ण भारतात आढळले आहेत. गोवरमुळे देशात दरवर्षी सुमारे ४९ हजार बालकांचा मृत्यू होतो. तसेच रुबेलामुळे ६० हजार बालके व्यंग जन्माला येतात. या आजरामुळे बालकांवर अंधत्व, पंगत्व, डायरिया, न्युमोनिया असे परिणाम होऊ शकतात. रुबेलाचा संसर्ग गर्भवती मातेस झाल्यास अर्भक मृत्यू किंवा जन्मजात दोष बालकास होऊ शकतो. त्यामुळे, शासन व जागतिक आरोग्य संघटनेने याची गांभीर्याने दखल घेवून २०२० पर्यंत 'गोवर उच्चाटन व रुबेला नियंत्रण' करण्याचे उद्दिष्ट्य निश्चित केले आहे. याअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून पुढील पाच आठवडे मोहीम राबविली जाणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील ३० शहरी आरोग्य केंद्र व ४ रुग्णालयांमार्फत तसेच महापालिका शाळा, खासगी शाळा, मनपा अंगणवाडी, आश्रमशाळा, मदरसा व आयसीडीएस यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. महापालिकेतील आरोग्य पथक या सर्व ठिकाणी जाऊन ९ महिने ते १५ वर्षे वयोगटापर्यंतच्या सर्व बालकांना लस देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगभूमी घडविते कलाकार

$
0
0

अभिनेत्री मृणाल दुसानिस यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बारा तासाच्या नोकरीचे शिवधनुष्य रोजच पेलणारे कामगार एखाद्या नाटकात काम करतात तेव्हा त्यांची प्रतीभा उमलून येते. त्यातूनच अनेक दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ रंगभूमीवर उदयाला येत आहेत. महानिर्मितीच्या वतीने नकळतपणे कलाकारांना घडविण्याचे काम होत आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री मृणाल दुसानिस यांनी केले.

कालिदास कलामंदिर येथे सोमवारपासून महानिर्मितीच्या नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातर्फे सुरू झालेल्या आंतरविद्युत केंद्र नाट्य स्पर्धेचे उद्घाटन मृणाल यांच्या हस्ते झाल. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता एन. एम. शिंदे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, अनिल मुसळे, उपमुख्य अभियंता सुनील इंगळे, देवेंद्र माशाळकर उपस्थित होते. यावेळी निखारे यांनी छोटेखानी मनोगत व्यक्त केले. अनिल मुसळे यांनी प्रास्ताविक केले. जयश्री गोरे यांनी सूत्रसंचालन केले. निवृत्ती कोंडावले यांनी आभार मानले.

मन हेलावून टाकणाऱ्या घटनांचे 'चौकशी'

रश्मी काळोखे लिखित 'चौकशी' या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण झाले. नाटकात मुख्य पात्र साकारणाऱ्या पारीला आयुष्यात वारंवार चौकशीला सामोरे जावे लागते. या चौकशीच्या माध्यमातून शासकीय कार्यप्रणालीतील त्रुटी, त्यावरील सामाजिक घटकांचा परिणाम, काही मूठभर लोकांच्या हितासाठी आणल्या जाणाऱ्या तसेच दप्तरजमा केल्या जाणाया चौकशीच्या घटना, सामाजिक वर्तनातील काही अलिखित बंधनाचे जनमाणसावर असलेले गारुड, महिलेची कौटुंबिक छळवणूक, समाजातील बुरसटलेल्या रुढींमुळे, अंधश्रद्धामुळे घडणाऱ्या आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटना अशा कित्येक नाटकातून भाष्य केले जाते. या बाबींमुळे पारीच्या आयुष्यात वारंवार येणारी चौकशी आणि अज्ञानाच्या पायावर आधारित अमानुष घटना यामुळे प्रेक्षक वारंवार अस्वस्थ होत रहातो. नाटकात शिवानी पाबळे हिने भूमिका केली. दिग्दर्शन व प्रकाशयोजना विजय रावळ, नेपथ्य गुलाब पवार, रंगभूषा व वेशभूषा ज्योती चंद्रमोरे यांची होती.

मनाच्या सकारात्मक प्रगतीचे 'चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी'

विजय तेंडुलकर लिखित चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी हे नाटक सादर झाले. विज्ञान नवनविन शिखरे पादाक्रांत करत असताना, स्पर्धात्मक युगात अग्रणी रहाण्यासाठी जीवतोड प्रयत्न करत असताना मानवी मनाची सकारात्मक प्रगती होते का? अजूनही तो अश्मयुगातच आहे हा विचार प्रेक्षकांना भंडावून सोडतो, अशा आशयाची मांडणी नाटकात करण्यात आली आहे. नाटकाचे दिग्दर्शन अनिल जोशी यांनी केले होते. अनिता जोशी, अनिल जोशी, संजय सातफळे, जयंत भातकुलकर, बी. के. कुलकर्णी, कुलकर्णी यांनी भूमिका साकारल्या.

आजची नाटके

- सकाळी १० वाजता ४७ एके ४७

- सायंकाळी ४ वाजता दी गेम ऑफ डेस्टीनी

स्थळ : महाकवी कालिदास कलामंदिर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images