Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘सुंदरनारायण’च्या कामास पुनश्च: हरिओम

$
0
0

दिवाळीनिमित्त कारागीर होते सुटीवर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना असलेल्या सुंदरनारायण मंदिराचे काम रविवार, २५ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरळीत होणार आहे. दिवाळीच्या सुट्यांमुळे मजूर आपल्या गावी गेल्याने हे काम महिनाभरापासून बंदच होते. मंदिराचे काम सुरू होऊन जवळपास वर्षभराचा कालावधी उलटून गेला; मात्र कामात अद्याप गती दिसत नसल्याने नाशिककरांचे कुतूहल वाढले आहे.

देवी लक्ष्मी आणि तुलसी यांच्यासमवेत असलेले भगवान विष्णू यांचे एकमेव सुंदर नारायण मंदिर रविवार कारंजा येथे गोदावरी नदी किनाऱ्याजवळ आहे. ऐतिहासिक कलाकुसर, रेखीव आणि आखिव अप्रतिम काम, दगडी बांधकाम आणि लाकडाचा केलेला खुबीने वापर अशी ओळख असलेल्या या मंदिराचे सौंदर्य काही औरच आहे. मुघल काळात या मंदिराचे नुकसान झाले. त्यानंतर गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पण, गेल्या काही वर्षांपासून मंदिराच्या सौंदर्याला आणि कलाकुसरीला नजर लागल्यासारखे झाले. या मंदिराच्या कळस आणि दगडी भिंतींचे मोठे नुकसान होत असतानाही राज्य सरकारने याकडे लक्ष दिलेले नाही. यासंदर्भात पुरातत्व विभागाशी अभ्यासकांचा पाठपुरावा सुरू होता. सुंदरनारायण मंदिराची पाहणी करून त्याच्या नूतनीकरणाचा अहवाल पुरातत्व विभागाने तयार केला. त्यानुसार निधी मंजूर करण्यास राज्य सरकारने तयारी दर्शविली आणि एकदाचे त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. मंदिरावरील सर्व दगड उतरवण्यात आले असून महिनाभरापासून मजूर नसल्याने कामबंद आहे. हे सर्व मजूर दक्षिणेतील असून दिवाळीच्या सुट्यांसाठी ते गावी गेल्याने काम बंद असल्याचे पुरातत्त्व विभागाचे म्हणणे आहे. रविवार, २५ नोव्हेंबरपासून पुन्हा काम सुरू करण्यात येणार आहे.

सुंदर नारायण, देवी लक्ष्मी आणि देवी तुलसी यांच्या मूर्ती तात्पुरत्या स्वरूपात मंदिराशेजारील एका खोलीत ठेवण्यात आल्या असून तेथील पूजाअर्चना अमेय पुजारी पहात आहेत. येथेही दर्शनासाठी भाविकांची उपस्थिती असते.

सुंदर नारायण मंदिरासाठी साडे बारा कोटी रुपये निधी मंजूर झाला असून त्याचा पहिला टप्पा ४ कोटी ६० लाख रुपये मिळाले आहेत. यातून कामास सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम व्हावे, अशा सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत.

- जया वाहणे, प्रादेशिक वस्तुसंग्रह अभिरक्षक

मंदिरातील मूर्ती शेजारील खोलीत ठेवण्यात आल्या असून तेथे रोजच त्यांची पूजाअर्चा होते. येथे भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. मंदिराचे काम पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागणार असे प्रथमदर्शनी वाटते.

- अमेय पुजारी, सुंदर नारायण मंदिराचे पुजारी

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनीष रेवर हत्या फोटो

पूर्ववैमनस्यातून मनीष रेवरची हत्या

$
0
0

तिघांचा सहभाग निष्पन्न; एकास अटक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मद्य प्राशन करताना झालेल्या भांडणानंतर तिघांनी मिळून मनीष प्रेमजी रेवर (२८, रा. आदर्शनगर, रामवाडी) या तरुणाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या गुन्ह्यात तिघा संशयिताचा समावेश असून, त्यापैकी एकास भद्रकाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हत्येची घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास महात्मा गांधी रोडवर घडली होती.

चेतन पोपट लेवे असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याचाच नातेवाईक असलेला आणखी एक युवकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. हा युवक अल्पवयीन आहे की नाही, याचा तपास पोलिस करीत आहे. हत्येनंतर सिद्धार्थ इस्ते हा तिसरा संशयित आरोपी फरार असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत. यातील लेवे विरुद्ध भद्रकाली, गंगापूर आणि पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. हत्या झालेला मनीष रेवरविरुद्ध सुद्धा हत्या आणि आणखी काही गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी रात्री चौघे आरोपी एम. जी. रोड परिसरात मद्यप्राशन करीत असताना त्यांच्यात वाद झाले. यानंतर तिघांनी मनीषवर चॉपरने वार केले असता त्याने तेथून पळ काढला. मात्र, संशयितांनी त्याचा डेअरी डॉनपर्यंत पाठलाग केला. या ठिकाणी अत्यंत निघुर्ण पद्धतीने रेवरच्या चेहऱ्यावर, मानेवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मनीषला सुरुवातीला खासगी आणि नंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, सरकारवाडाचे सहायक पोलिस निरीक्षक विलास शेळके आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लागलीच तपास सुरू करीत फरार होण्याच्या तयारीत असलेल्या लेवेला अटक केली. घटनेचा आधिक तपास भद्रकाली पोलिस करीत आहेत.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या एका भांडणातून हत्येची घटना झाल्याचे संशयित आरोपीने सांगितले. मात्र, सर्व आरोपींना अटक केल्यानंतर पूर्ण प्रकार समोर येईल. या गुन्ह्यातील संशयित आणि हत्या झालेला युवक यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

- मंगलसिंग सूर्यवंशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भद्रकाली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीच्या मालाची पळविलेल्या वाहनातून वाहतूक

$
0
0

दोघांना अटक; अन्य तिघांचा शोध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर एमआयडीसीतून चोरी केलेल्या पिकअपच्या मदतीने अहमदनगरसह औरंगाबाद जिल्ह्यात घरफोडी, चोऱ्या करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. चोरी केलेल्या पिकअपमध्ये इतर गुन्ह्यातील मुद्देमाल सुद्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाला. या गुन्ह्यातील आणखी तिघे फरार असून, पोलिस त्यांचा माग काढत आहेत.

आनंदा अनिल काळे (२३), गणेश भिकनाथ तेलोरे (१९, दोन्ही रा. गणेशनगर, ता. राहता, जि. अहमदनगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील अन्य संशयित राहुल काळे, शुभम काळे, भरत काळे (रा. राजंणगाव, ता. राहता) हे मात्र अद्याप फरार आहेत. संशयित आरोपींनी काही दिवसांपूर्वी सिन्नर एमआयडीसीतून एक पिकअप व्हॅन (एमएच ४३, एफ ५४३२) चोरी केली होती. हे वाहन राहता तालुक्यातील गणेशनगर येथे असल्याची माहिती 'एलसीबी'च्या पथकास मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे, एपीआय अरुण पगारे, हवालदार संजय गोसावी, कॉन्स्टेबल मंगेश गोसावी, सुशांत मरकड, कुणाल मोरे, विशाल आव्हाड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांचे पथक तिथे पोहचले. यावेळी 'एलसीबी'चे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना संशयित आनंदा काळेची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती तपास पथकास दिल्यानंतर हे पथक लागलीच गणेशनगर सहकारी कारखाना येथे पोहचले. तिथे काळेला ताब्यत घेण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी झाली. आनंदाच्या माहितीनुसार लागलीच गणेश तेलोरेला अटक करण्यात आली.

अटक आणि फरार संशयितांनी चोरी केलेल्या वाहनाच्या मदतीने औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील ईसारवाडी फाटा येथील एक रेडिमेड कपड्याचे दुकान फोडले होते. श्रीरामपूर येथे किरणा दुकान सुद्धा फोडले. पोलिसांनी या दोन्ही घटनांमधील मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिस निरीक्षक अशोक करपे यांनी सांगितले, की ही टोळी सराईत असून, त्यांच्यावर अहमदनगर, नाशिकसह आजुबाजुच्या जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. चोरी केलेल्या वाहनाचा वापर चोरीचा मुद्देमाल वाहण्यासाठी करण्यात आला. टोळीतील फरार आरोपींचा शोध सुरू असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना अटक करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचारांशी प्रामाणिक राहणारे ‘देहासक्त’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य नाट्य स्पर्धेत शुक्रवारी देवेन कापडणीस लिखित 'देहासक्त' हे नाटक सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही स्पर्धा सुरू आहे.

मधुरा एक सिनेनटी, कामाक्षी एक बँकिंग क्षेत्रातील मोठ्या हुद्द्यावरची अधिकारी. या दोघी खरे तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. मधुरा मुक्त जीवन जगणारी तर कामाक्षी खोटे जीवन जगणारी. दोघी बालपणीच्या मैत्रिणी पण पुढे दोघींचे मार्ग भिन्न होतात. मधुरा मनमोकळे, स्वतःला हवे तसे जीवन जगत असते. ध्येय गाठण्यासाठी तिची वाट्टेल ते करण्याची तयारी असते. ब्रेक मिळण्यासाठी ती दिग्दर्शकाला शरीर देते, ते ती नाकारतही नाही. व्यवसायात या गोष्टी कराव्याच लागतात त्याशिवाय उच्च स्थानावर तुम्हाला पोहचताच येत नाही या सर्व विचारांशी ती प्रामाणिक आहे आणि ते कबुल करण्यात तिला संकोच वाटत नाही. हे वास्तव आहे मग ते का नाकारावे, असे तिचे मत असते. तर कामाक्षी सभ्यपणाचा बुरखा पांघरून खोटे जगत असते. दोघींना त्यांच्या क्षेत्रातील बहुमान एकाचवेळी मिळतो आणि त्याच दिवशी मधुरा कामाक्षीला भेटण्यासाठी तिच्या घरी येते. १७ वर्षांनी दोघी भेटत असतात. मग त्या मद्यप्राशन करतात व मधुरा कामाक्षीला डिवचते, तिला बोलते करते आणि दोघींच्या बोलण्यातून एक पट उलगडत जातो. पुढे मधुरावर सिनेमात नग्न दृश्य दिल्यामुळे संस्कृतीरक्षक हल्ला करतात व तिच्यावर अत्याचार करतात. मग मधुरा बदलते पण आता कामाक्षीही बदलली आहे. ती संस्कृती रक्षकांचा बदला घ्यायचा ठरवते; पण मधुरा तयार होत नाही. कामाक्षी आता ईरेला पेटते. पुढारी दोघींवर दबाव टाकू पहातो, पण त्या आपले स्त्री पण सोडत नाहीत आणि अखेर पुढारी कच खातो.

नाटकाचे दिग्दर्शन धनंजय वाबळे यांनी केले. निर्मिती प्रमुख रवींद्र ढवळे, सूत्रधार नंदकुमार देशपांडे, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, नेपथ्य अविनाश देशपांडे, संगीत तेजस बिल्दिकर, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकात पुनम देशमुख, श्रुती चांदोरकर, डॉ. मोहन अमेसर, केदार रत्नपारखी, आशिष दळवी यांनी भूमिका केली.

आजचे नाटक

अश्वमेध

ओम साई श्री सच्चिदानंद सामाजिक संस्था

स्थळ : पसा नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ७ वाजता

\Bलोगो : राज्य नाट्य स्पर्धा \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेकासह मातेने कवटाळले मृत्यूला

$
0
0

सप्तशृंगगडावरील शीतकड्यावरून घेतली दरीत उडी

म.\R टा.\R वृत्तसेवा, कळवण

कळवण\R तालुक्यातील\R सप्तशृंगी\R गडावर\R शिवालय\R तलाव\R लगतच्या शीतकड्यावरून उडी\R मारून\R आईसह\R मुलाने\R आत्महत्या\R केली.\R अर्चना\R शरद\R आहेर (वय ३५) आणि जय (वय १५, दोघे रा. उगाव, ता. निफाड) असे आत्महत्या करणाऱ्या मायलेकाचे नाव आहे.

दर्शनासाठी\R आलेले\R काही\R भाविक\R सायंकाळी\R सहा\R वाजेच्या सुमारास शीतकडा\R बघण्यासाठी\R गेले\R असता\R त्यांना सुमारे दोनशे फूट\R खोल\R दरीत\R महिला आणि मुलगा\R पडल्याचे\R दिसले. त्यांनी याबाबत तेथील\R ग्रामस्थांना\R शितकड्यात\R कोणीतरी\R पडल्याचे\R त्वरित\R सांगितल्याने. ग्रामस्थांनी\R शीतकड्याकडे धाव\R घेऊन\R बघितले. गडावरील\R सामाजिक\R कार्यकर्ते\R संदीप\R बेनके\R यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी\R घटनास्थळी\R त्वरित\R धाव\R घेत पाहणी\R केली. येथील\R तरुण\R ग्रामस्थ, पोलिस\R व\R पोलिस\R मित्राच्या मदतीने शुक्रवारी सकाळी\R सुमारे २०० फूट\R खोल\R दरीत\R उतरून\R दोरखंडाच्या\R सहाय्याने\R दोघांचे\R मृतदेह बाहेर काढण्यात\R आले.

दरी\R खोल\R असल्याने मदतकायार्साठी पुढे आलेल्या तरुणांसह पोलिसांचे\R खूप\R हाल\R झाले. जय\R आहेर या मुलाच्या खिशात मोबाइल सापडला. त्यावरून त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. दोघांचे मृतदेह\R रुग्णवाहिकेतून\R कळवण\R उपजिल्हा\R रुग्णालय\R येथे\R पाठवण्यात\R आले. दरम्यान, पुढील\R तपास\R कळवण\R पोलिस\R स्टेशनचे\R निरीक्षक\R सुधाकर\R मांडवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी\R सदाशिव\R वाघमारे, सहाय्यक\R पोलिस\R निरीक्षक\R एस. आय. खाडे, पोलिस कॉन्स्टेबल योगेश\R गवळी, पी. सी. शिंदे, ए. सी. आहिरे, पी. सी. घरटे\R हे\R करीत आहेत.

उगावमध्ये अंत्यसंस्कार

आत्महत्या\R केलेल्या आई अर्चना व मुलगा\R जय\R शरद\R आहेर\R हे दोघेही उगाव\R येथील रहिवाशी आहेत. अर्चना यांचे पती शरद\R आहेर\R गावातीलच\R एका\R ट्रान्सपोर्ट\R कंपनीत\R कामाला आहेत. अर्चना\R या\R मुलासह\R दिवाळीपूर्वीच\R मनमाड\R येथे\R आपल्या\R माहेरी\R गेल्या\R होत्या. त्यांच्या आत्महत्याच्या घटनेची माहिती मिळात उगावमध्ये हळहळ\R व्यक्त\R करण्यात आली. अर्चना\R व\R मुलगा\R जय\R यांच्यावर\R रात्री\R उशिरा\R उगावमध्ये अंत्यसंस्कार\R करण्यात\R आले.

तरुणाची आत्महत्या

देवळाली गावातील घोलपवाडा येथे २९ वर्षांच्या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.२१) घडली. विनोद संपत घोलप (रा. घोलप वाडा, देवळाली गाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. विनोद हा गुरुवारी साडेसहा वाजता घरी असताना त्याने व्हरांड्यातील पत्र्याच्या शेडला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, या प्रकरणी उपनगर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विवाहितेचा गळफास

देवळाली कॅम्प : येथील विजयनगर भागातील रहिवासी असलेल्या आरती नितीन पाटील (वय ३२) या विवाहितेने गुरुवारी (दि. २१) मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या नातेवाईकांनी तिला १ वाजेच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले असता डॉ. स्वाती शुक्ला यांनी तिला तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी ६५/२०१८ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरतुदी, नियमांवर मंथन

$
0
0

राष्ट्रीय जीएसटी परिषदेचा समारोप

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सीएआय शाखा व औरंगाबाद सीएआय शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय जीएसटी राष्ट्रीय परिषदेचा शनिवारी समारोप झाला. जीएसटीसंबंधीच्या तरतुदी, नियमांवी यावेळी मंथन करण्यात आले.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात सीए अविनाश पोद्दार यांनी इनपूट टॅक्स क्रेडिट या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध तरतुदी व त्याबद्दल काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात टिप्स दिल्या. दुसऱ्या सत्रात सीए गुरजीत भुल्लार यांनी आउटवर्ड सप्लायमध्ये समाविष्ट होणारे सप्लाय आणि त्या संदर्भातील तरतुदी याबद्दल मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात सीए मंदार तेलंग यांनी जीएसटी अॅन्युल रिटर्नमध्ये असलेल्या नियमांबद्दल माहिती दिली.

आतापर्यंत व्यापाऱ्यांनी भरलेल्या जीएसटी रिटर्न संबंधीचा गोषवारा जीएसटी वार्षिक रिटर्न आणि जीएसटी ऑडिटमध्ये ३१ डिसेंबर २०१८ भरण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे जीएसटी वार्षिक रिटर्न आणि जीएसटी ऑडिट फॉर्ममध्ये द्यावयाचा तपशिलांचा सखोल अभ्यास करण्यासाठी आयोजित या परिषदेला दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या परिषदेचे संयोजन नाशिक शाखेचे व्हाइस चेअरपर्सन सीए रेखा पटवर्धन, सेक्रेटरी सीए रणधीर गुजराथी, हर्षल सुराणा, रोहन आंधळे, विकास हसे, रवी राठी, राजेंद्र शेटे व औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सीए सचिन लाठी यांनी केले.

...

पहिल्या दिवशी या परिषदेत सीए शेफाली गिरिधारीवाल, जीएसटीचे अधिकारी दीपक गुप्ता, सीए आसीत शहा यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आल्यामुळे परिषदेचा उद्देश सफल झाला.

- मिलन लुणावत, अध्यक्ष, सीए संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकच वाचवू शकतात युवकांना

$
0
0

प्रा. बालकृष्ण जोशी यांचे मनमाड येथे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

कुत्तागोली सारख्या भयानक नशिल्या पदार्थांचे थैमान सध्या घोंगावत आहे. युवा पिढी बरबाद होण्याची चिन्ह आहेत. अशा स्थितीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी निश्चित स्वरुपाचे प्रयत्न करावेत. शिक्षकच युवा वर्गाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतात, असे प्रतिपादन प्रा. बालकृष्ण जोशी यांनी मनमाड येथे केले.

मनमाड सिटी ऑफ लायन्स प्राईड यांच्या वतीने शिक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. तरुणांना घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये असून शिक्षकांनी निष्ठापूर्वक प्रयत्नातून उद्याचे सुदृढ व सक्षम नागरिक घडवावे असे आवाहन जोशी यांनी केले. तीन दिवसीय या शिबिराचे उद्घाटन प्रगती बँकेचे संस्थापक अध्यक्ष पन्नालालजी शिंगी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. सुनील बागरेचा, शिक्षण मंडळ समन्वयक सूर्यभान नाईकवाडे, मुख्याध्यापक सॅबी कोरिया, क्रांति कुंजरकर, फादर डायन लोगा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. लॉयन्सचे अध्यक्ष डॉ. अजय भन्साली यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय नवनिर्माण व युवा पिढी संवर्धन या साठी लॉयन्सने शिक्षकांसाठी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केल्याचे त्यानी सांगितले. यावेळी लॉयन्सचे पंकज ललवाणी, भूषण ललवाणी, कुणाल ओस्तवाल, डॉ. मोहीत लोढा, डॉ. कुशल लोढा, डॉ. शैलेश भंडारी, माजी विभागीय पदाधिकारी विवेक बरडिया, मुकेश गांधी, मंगलेश बाकलिवाल उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण करू नका

$
0
0

व्याख्याते प्रदीप सोळुंके यांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, येवला

लहानग्या शिवबाला घेऊन स्वराज्य स्थापनेचा संकल्प करणे हे जगातील सर्वात मोठे धाडस आहे. हेच धाडस राजमाता जिजाऊ यांनी दाखविल्याने सर्वांना अभिमान वाटेल अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती होवू शकली. जिजाऊ यांनी शिवबांवर संस्कार करण्यास कोणतीही कसूर ठेवली नाही. लेकरांवर संस्कार करा. मुलांना हे करू नको, ते करू नको, असे आजकाल सांगितले जाते. मुलांनी मग नेमके काय करायचे ते कुणी सांगतच नाही. आपणच आपल्या मुलांना परावलंबी बनवतो, भ्याड बनवतो. मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण करू नका, त्यांना सक्षम बनविण्यासाठीचे प्रयत्न करा, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व्याख्याते प्राध्यापक प्रदिप सोळुंके (औरंगाबाद) यांनी येवल्यात बोलताना केले.

शहरातील सेनापती तात्या टोपे व्याख्यानमाला समितीच्या वतीने आयोजित तीन दिवशीय व्याख्यान मालेतील दुसऱ्या दिवशीचे 'राजमाता जिजाऊ' या विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना प्रा. सोळुंके बोलत होते. महात्मा फुले नाट्यगृहात शहरातील मान्यवरांसह श्रोत्यांची उपस्थिती होती. इतिहासाचा चिकित्सकतेने अभ्यास केल्यास आपल्या असे लक्षात येते की, राजमाता जिजाऊ अन् छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुठल्याही कार्यासाठी कधीही मुहूर्त पाहिले नाही. चांगल्या कामासाठी उचललेलं पहिलं पाऊल हाच उत्तम मुहूर्त त्यांनी मानला याकडे लक्ष वेधत, जे प्रयत्नवादी असतात तेच यशस्वी होतात, असे प्रा. प्रदीप सोळुंके म्हणाले. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी सहकारक्षेत्रात उल्लेखनिय काम करणारे वसंतराव आहेर व निवृत्त पोलिस सहाय्यक आयुक्त बाळासाहेब भांगे या येवला तालुक्यातील दोघा भूमिपुत्रांना व्याख्यानमाला समितीच्या वतीने 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. माणिकराव शिंदे होते. महेंद्र काले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. माजी आमदार मारोतराव पवार, रायभान काळे, अशोक कुळधर, अनिरुद्ध पटेल, अॅड. बाबासाहेब देशमुख, जयंत पेटकर, नगरसेवक प्रवीण बनकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उबदार कपडे कपाटांत!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नोव्हेंबरच्या प्रारंभीच थंडीला सुरुवात झाल्यानंतर गेल्या आठवड्यात राज्यात सर्वांत कमी तापमान नाशिक व जळगाव शहरांत नोंदविले गेले होते. त्यावेळी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र, काही दिवसांतच नाशकातील थंडीचा जोर ओसरला असून, शुक्रवारी कमाल ३०.८, तर किमान १६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

थंड हवेचे ठिकाण म्हणून राज्याच्या विविध भागातून पर्यटक नाशिक शहरात येत असतात. नोव्हेंबरच्या अखेरीस थंडीने शहरात चांगला जोर धरलेला असतो. मात्र, सध्या थंडीने पोबारा केल्याचे चित्र आहे. त्यामुळे थंडी सुरू झाल्यानंतर नाशिककरांनी कपाटांतून बाहेर काढलेले उबदार कपडे थंडीचा जोर कमी होताच पुन्हा कपाटांत गेले आहेत. उबदार कपडे खरेदी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या तिबेटियन मार्केटमधील व्यवहारही थंडावले आहेत. आठवड्यापूर्वीच राज्यात सर्वांत कमी तापमान नोंदविणाऱ्या नाशिकमध्ये काही दिवसांतच उन्हाळ्याप्रमाणे कमाल तापमान नोंदविले गेले. पहाटे गारवा, दुपारी उष्मा आणि रात्री काहीशी थंडी, असे वातावरण सध्या शहरात अनुभवास येत आहे. शनिवारी सकाळी काही भागात ढगाळ हवामान होते. गज वादळाचा हा परिणाम असल्याचे वेधशाळेचे म्हणणे असून, राज्यात अनेक ठिकाणी मंगळवार (दि. २७)पर्यंत अशीच स्थिती राहण्याचे संकेत आहेत. गोव्यासह संपूर्ण राज्यात कोरडे हवामान राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

--

गत सहा दिवसांतील तापमान

--

दिनांक...कमाल....किमान

--

१८ नोव्हेंबर..३३.८..१३.६

१९ नोव्हेंबर..३३.५...१६

२० नोव्हेंबर..३३.७...१७.१

२१ नोव्हेंबर...३१.८....१७.४

२२ नोव्हेंबर...३२.२....१८.९

२३ नोव्हेंबर...३०.८....१६.८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महत्त्वाकांक्षेचे ‘अश्वमेध’

$
0
0

..

राज्य नाट्य स्पर्धा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महत्त्वाकांक्षा ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. परंतु, अतिमहत्त्वाकांक्षा मात्र वाईटच हे निषाद राज्याची महाराणी नीलाक्षी हिच्या वर्तनातून सिध्द करणारी कथा नाटकातून मांडण्यात आली. राज्य नाट्य स्पर्धेत शनिवारी अश्वमेध हे नाटक सादर करण्यात आले. ओम साई श्री सच्चिदानंद सामाजिक संस्था प्रस्तूत हे नाटक होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहामध्ये ही स्पर्धा सुरू आहे.

अश्वमेध हे एक काल्पनिक ऐतिहासिक नाटक असून, निषाद राज्याची महाराणी नीलाक्षी अत्यंत महत्त्वाकांक्षी असते. निपुत्रिक असल्यामुळे राजा तिच्यावर नाराज असतो आणि दुसरा विवाह करण्याचा विचार करीत असतो. नीलाक्षी आपल्या बालपणीची मैत्रीण, अवस्थीपूर साम्राज्याची महाराणी रत्नप्रभाला भेटायला जाते. तेथील वैद्य तिला तपासून तिचा गर्भ अपत्य प्राप्तीसाठी योग्य असल्याचे सांगतात. त्यानंतर ती अधिकच महत्त्वाकांक्षी बनते. अश्वसहाय्यक अश्विनचा वापर करून ती मातृत्व प्राप्त करून घेते आणि त्याच्याचकडून महाराज कृतसेन यांचा विष देऊन खून करते. खुनाच्या आरोपाखाली अश्विनचाही बळी देते आणि निषाद साम्राज्याची महापराक्रमी साम्राज्ञी बनण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करते. अशा आशयाची ही कथा होती.

नाटकाचे निर्मितीप्रमुख रवींद्र ढवळे होते. सूत्रधार नंदकुमार देशपांडे, दिग्दर्शन अरुण भावसार यांचे होते. प्रकाशयोजना विनोद राठोड, नेपथ्य अविनाश देशपांडे, संगीत अमोल काबरा, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकात डॉ. सोनाली कुलकर्णी, आदित्य भोंबे, श्रुती कापसे, हरिकृष्ण डिडवाणी, राहुल काकड, मधुरा सोनवणे, सचिन दलाल, हरिश परदेशी, राजेश टाकेकर यांनी भूमिका केल्या.

---

आजचे नाटक

सूर्याची पिल्ले

दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग

वेळ : सकाळी ११

---

एक होता बांबू काका

आर. एम. ग्रुप

स्थळ : पसा नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐंशी नगरसेवक नापास!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील १२७ पैकी तब्बल ८० नगरसेवकांना 'आयुक्त मुंढे' यांच्या कार्यकाळात आपापल्या प्रभागांत एक रुपयाचेही विकासकाम न करता न आल्याची स्थिती उघड झाली आहे.

भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या २५७ कोटींच्या रस्तेयोजनेवर तुकाराम मुंढेंनी मारलेली फुली आणि पाठोपाठ विकासकामांसाठी लागू केलेल्या त्रिसूत्रीचा फटका महापालिकेतील या ८० नगरसेवकांना बसला आहे. महापालिकेतील पदाधिकारी, अनुभवी व बाहुबली अशा ४७ नगरसेवकांनी 'मुंढे इफेक्ट'मध्येही किरकोळ कामे मार्गी लावली असली, तरी तब्बल ८० नगरसेवकांना वर्षभरापासून आपल्या प्रभागात साधे नारळही फोडता आलेले नाही. विशेष म्हणजे मुंढेंनी मंजूर केलेला १२ लाखांच्या स्वेच्छानिधीकडेही बहुसंख्य नगरसेवकांनी नियमांच्या कात्रीमुळे पाठ फिरविली. परंतु, आता मुंढेंचीच एक्झिट झाल्याने सोमवारपासून महापालिका नगरसेवकांनी गजबजणार असल्याचे चित्र आहे.

महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळाली असली, तरी आपल्या मर्जीप्रमाणे काम करण्यास पदाधिकारी आणि नगरसेवकांना अपयश आल्याचे चित्र आहे. सिंहस्थ आणि मनसेच्या सत्ताकाळात शहरातील मुख्य रस्त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी मिटला होता. परंतु, तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी नगरसेवकांच्या मागणीनुसार प्रभागनिहाय दौरे करीत प्रभागातील कामे सुचविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नगरसेवकांनी पाणीपुरवठा, मलनिस्सारणासोबतच मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुचविली होती. प्रशासनाकडून तब्बल २५७ कोटींच्या रस्तेकामांचे प्रस्ताव मागच्या दाराने महासभेवर ठेवण्यात आले. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीनुसार प्रत्येक प्रभागात साडेसात कोटींची कामेही प्रस्तावित करण्यात आली होती. त्यासाठीचे आर्थिक नियोजनही पूर्ण केले होते. महासभेने मान्यता दिल्यानंतर या प्रस्तांवाच्या निविदाही मागविण्यात आल्या होत्या. परंतु, अचानक फेब्रुवारी महिन्यात कृष्णांची बदली होऊन आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती झाली. मुंढेंनी आल्या आल्या सत्ताधाऱ्यांच्या या ड्रीम प्रोजेक्टलाच हात घालत त्यावर फुली मारली. पूर्वीच्या आयुक्तांचे सर्व निर्णय रद्द करीत त्यांनी बजेटची पुनर्रचना करीत अनावश्यक कामांवर काट मारली. रस्ते विकासकामांना त्यांनी कात्री लावत कामाची गरज, तांत्रिक व्यवहार्यता आणि निधीची उपलब्धता अशी त्रिसूत्री लावून कामे करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला.

मुंढेंच्या शिस्तीमुळे एकीकडे २५७ कोटींवर काट मारली जात असताना नगरसेवकांच्या ७५ लाखांच्या नगरसेवक निधीवरही पाणी फेरले गेले. त्यामुळे नगरसेवकांना निधी मिळविण्यासाठी पहिले पाढे पंचावन्न करावे लागले. मुंढेंनी अनावश्यक कामे करण्यासह नगरसेवक महापालिकेत फिरणार नाहीत, अशी व्यवस्थाच उभी केली होती. त्यामुळे नगरसेवकांची कोंडी झाली होती. निधी मिळत नाही म्हणून नगरसेवकांनी स्वेच्छानिधीचा जीआर काढला. प्रत्येकी १२ लाख मिळणार असले, तरी मुंढेंनी या निधीतही २ लाख रुपये कामांचीच पाचर मारल्याने प्रस्तावच दाखल होऊ शकले नाहीत. त्यामुळे १२७ नगरसेवकांमधून ८० नगरसेवकांच्या प्रभागात वर्षभरापासून कवडीचेही काम झाले नाही. निधीच मिळाला नसल्याने या नगरसेवकांना वर्षभरापासून आपल्या प्रभागात एकही नारळ फोडता आला नसल्याचे चित्र आहे. एकीकडे निधी नाही, तर दुसरीकडे नागरिकांचा कामांसाठी होत असलेल्या रेट्यामुळे नगरसेवकांनी वर्षभरात महापालिकेसह प्रभागांमध्येही फिरणे बंद केल्याचे चित्र आहे. यातील अनेक नगरसेवकांनी तर राजकारणापेक्षा स्वत:च्या व्यवसायात लक्ष घातल्याचे चित्र आहे.

--

४७ नगरसेवकांना मात्र यश

जवळपास ८० नगरसेवकांना निधी मिळाला नसला, तरी महापालिकेतील बाहुबली पदाधिकारी, अनुभवी नगरसेवकांनी मात्र मुंढेंच्या कडक शिस्तीतही निधी ओढून आणला. महापालिकेच्या निधीसह आमदार निधीतून काही कामे करीत त्यांनी निधीच्या दुष्काळावरही मात केल्याचे दिसून आले. आयुक्तांनी पाणीपुरवठा व मलनिस्सारण यंत्रणांसाठी सुरू केलेली कामे आपणच केल्याचा देखावाही या नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या प्रभागात प्रशासनाने कामे केली असली, तरी ती या नगरसेवकांच्या नावावर गेल्याने त्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

-------

उद्यापासून पुन्हा गजबज

'मुंढे इफेक्ट'मुळे गेल्या वर्षभरातील कामावर पाणी फिरले असले, तरी आता मुंढेंच्या बदलीमुळे रद्द झालेली व रेंगाळलेली कामे पुन्हा मार्गी लावण्यासाठी नगरसेवक सरसावले आहेत. महापालिकेत सोमवारपासून पुन्हा नगरसेवक, ठेकेदार, पदाधिकारी यांची गजबज वाढण्याची चिन्हे असून, मुंढेंनी बंद केलेल्या फायली उघडण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. विशेष म्हणजे नऊ महिन्यांपासून महापालिकेची पायरीही न चढलेले नगरसेवक पुन्हा महापालिकेत येऊन आता तरी विकासकामांचा वनवास संपवा, असा आग्रह पदाधिकाऱ्यांकडे धरणार आहेत. त्यामुळे सोमवारपासून महापालिका मुख्यालय पुन्हा गजबजणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मैत्रेय’च्या ठेवीदारांची गर्दी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेय फसवणूक प्रकरणाला आता गती मिळत असून, कोणताही मोबादला न मिळालेल्या ठेवीदारांची माहिती संकलित करण्याचे काम पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेत जोरात सुरू आहे. शनिवारी दिवसभरात जवळपास दोनशे ते अडीचशे ठेवीदारांची माहिती संकलित करण्यात आली.

मैत्रेय समूहाकडून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी राज्यात ३० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांच्या तपासामध्ये 'मैत्रेय'च्या वित्तीय आस्थापनाच्या नोंदींद्वारे ठेवीदारांची माहिती उपलब्ध झाली असून, पुढील तपास पोलिस यंत्रणेमार्फत सुरू आहे. त्यामुळे अद्याप आपल्या ठेवींच्या रकमेची मागणी दाखल न केलेल्या ठेवीदारांनी ठेवींच्या मागणीबाबत विहित नमुन्यात अर्ज करून पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेत किंवा आडगाव येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या फसवणूक प्रकरणात दाखल गुन्ह्यांचा तपास, तसेच कार्यवाहीमध्ये समन्वयाच्या दृष्टीने पोलिस महासंचालक कार्यालयात सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ नुसार आतापर्यंत ३०८ मालमत्ता जप्त करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. या ३०८ मालमत्तांसंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता, तसेच सक्षम प्राधिकारी नेमण्यात आले आहेत.

या गुन्ह्यांचा तपास सुरू असून, निष्पन्न झालेल्या उर्वरित मालमत्ता जप्त करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत करण्यात येईल. त्यामुळे ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळण्यासंदर्भात अन्य व्यक्ती किंवा यंत्रणेकडे संपर्क न साधता पोलिसांकडे अर्ज सादर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत बोलताना तपासाधिकारी डॉ. सीताराम कोल्हे यांनी सांगितले, की या कामासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर कोर्टाच्या आदेशाने ११ हजार गुंतवणूकदारांना जवळपास नऊ कोटी रुपये परत करण्यात आले होते. नाशिक शहर आणि जिल्ह्यात जवळपास सव्वादोन लाख गुंतवणूकदार असून, उर्वरित गुंतवणूकदारांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात ठेवीदारांकडून गुंतवणूक केलेली रक्कम, त्याचा पुरावा, पॅनकार्ड, आधारकार्ड, बँकेची माहिती अशी माहिती संकलित करण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक कोल्हे यांनी सांगितले. आगामी दोन महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

--

या ठिकाणी द्यावेत अर्ज

मैत्रेय गुन्ह्यातील मैत्रेय सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, मैत्रेय प्लॅटर्सस अँड स्ट्रक्चर्स प्रा. लि., मैत्री रियल्टर्स अँड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या तीन कंपन्यांचे अर्ज स्वीकारण्याठी पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखा येथे पोलिस कॉन्स्टेबल विकी झाडे, तसेच रुपेश बनसोड यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा. लि. या कंपनीचे अर्ज ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा येथे द्यावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवेकानंद केंद्राच्या व्यक्तिमत्व शिबिराला प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या नाशिक शाखेतर्फे तीन दिवसीय निवासी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन पिंपळद, त्र्यंबकेश्वर येथील विवेकानंद केंद्र प्रशिक्षण व सेवा प्रकल्प येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व केंद्राचे सहसंचालक विश्वास देवकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. 'विवेकानंद : एक प्रेरणास्त्रोत' या विषयावर त्यांनी विचार मांडले.

विविध सत्रांमध्ये पवनेश कोठावदे यांनी 'वैदिक गणित' या विषयावर, माधवी संत यांनी 'प्रार्थनेचा अर्थ' या विषयावर, गणेश गायकवाड यांनी 'युवकांपुढील आव्हाने व त्यावरील प्रतिसाद' या विषयावर, शोभा श्रोत्रीय यांनी 'एकनाथजी रानडे' या विषयावर, प्रा. अमोल अहिरे यांनी 'व्यक्तिमत्व विकास' या विषयावर विचार मांडले. समारोपाच्या सत्रात रघुवीर अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय मुलांमध्ये कुतूहल, कलाकौशल्य साहसीवृत्ती, संवेदनशीलता, आत्मविश्वास, निर्णयात्मक क्षमता, आत्मनिर्भरता आदी गुणांचा विकास होण्यासाठी खेळ, घोषणा, आज्ञाअभ्यास, अभिनय गीत, गटचर्चा, योगासने, सूर्यनमस्कार, भोजनमंत्र, आकाशकंदील बनविणे कार्यशाळा, परिसर स्वच्छता, श्रमसंस्कार आदी उपक्रम आयोजित करण्यात आले. या शिबिरात शिबिर अधिकारी म्हणून नगरप्रमुख प्रा. अमोल अहिरे, शिबिरप्रमुख अंकुश आहेर, शोभा श्रोत्रीय, नयना देशमुख यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. या शिबिरात मेघालयातील सात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. शहर आणि जिल्ह्यातून युवकांचा या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धेपूर्वीच थरार...

$
0
0

\Bस्पर्धेपूर्वीच थरार...\B

देशातली सर्वांत मोठी ऑफरोड कॉम्पिटिशन असलेली नॅशनल मोटोग्रिप सुपरक्रॉस चॅम्पियनशिप आज, रविवारी (दि. २५) सकाळी १० वाजता पेठेनगर येथे रंगणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून बायकर्सकडून शनिवारी येथे सराव करण्यात आला. त्यामुळे नाशिककरांनी स्पर्धेपूर्वीच बाइक्सचा थरार अनुभवला. या स्पर्धेसाठी आर्टिफिशियल ट्रॅक तयार करण्यात आला असून, १२ डबल जम्प आणि कट टेबलटॉप अशा थराराक स्टंट्सने बाइकप्रेमींना धडकी भरवली. ऑस्ट्रेलियातील शॉन वेब आणि जॉर्डन स्प्राग या आंतरराष्ट्रीय रायडर्सचे स्टंट चर्चेचा विषय ठरले. या चॅम्पियनशिपमध्ये देश-विदेशांतील रायडर सहभागी होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार

$
0
0

लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी रोडवरील प्रभातनगर भागात राहणाऱ्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी फुलेनगर येथील २४ वर्षांच्या संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मुकेश दादाभाऊ बकुरे (रा. देवी गल्ली, फुलेनगर) असे संशयिताचे नाव आहे. पीडित युवतीने म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित मुकेश बकुरे याने बळजबरी तिच्या घरात प्रवेश करून शरीरसंबंधाची मागणी केली; मात्र लग्न केल्याशिवाय शरीरसंबंध करू देणार नाही, असे युवतीने स्पष्ट केले. मात्र संशयिताने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यानंतर, पीडितेने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने नकार दिला. दरम्यान, तिला मारहाण करून धमकी देत तिचे दागिने काढून नेले. याबाबत म्हसरूळ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भडीकर पुढील तपास करीत आहेत.

--

भिंतीवरून पडल्याने चिमुकला गतप्राण

गंजमाळ येथील सहकारनगर भागात राहणारा सहा वर्षीय चिमुकला भिंतीवरून खाली पडल्याने जबर जखमी होऊन गतप्राण झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २२) सायंकाळी ५ वाजता भीमवाडीजवळील सहकारनगर येथे घडली.

अथर्व मुकुंद खाडे (६, रा. सहकारनगर) असे या बालकाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी अर्थव घराजवळ खेळत असताना येथील भिंतीवरून खाली पडला. त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचे वडील मुकुंद खाडे यांनी शुक्रवारी (दि.२३) दुपारी त्याला आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना रात्री डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार काळोगे करीत आहेत.

--

विवाहितेची आत्महत्या

देवळाली कॅम्प येथील नवी स्टेशनवाडी येथे राहणाऱ्या २७ वर्षांच्या विवाहितेने विषारी औषध सेवन करीत आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण कळले नसून, देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कल्याणी दिनेश बस्ते (रा. नवी स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प, नाशिक) असे विवाहितेचे नाव आहे. कल्याणी हिने शुक्रवारी (दि. २३) घरी असताना रात्री काही तरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले. ही घटना लक्षात आल्यावर तिचे वडील रामू पगारे यांनी तिला तत्काळ देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले; मात्र येथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याबाबत पोलिस नाईक एस. पी. शेवाळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवसानेत रोखलाभुजबळांचा ताफा

$
0
0

लघुपाटबंधारे विभागावर व्यक्त केला संताप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सात महिन्यांपूर्वी लघुपाटबंधारे विभागाने मांजरपाडा प्रकल्पात स्थानिक शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने न पाळल्याने देवसाने येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांना चार तास मंदिरात कोंडून ठेवले होते. शनिवारी याच शेतकऱ्यांनी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा ताफा रोखला. यावेळी त्यांनी रस्त्यावर झाडाचे लाकूड टाकून रस्ताही बंद केला. अर्ध्या तासानंतर भुजबळांनी त्यांच्यासाठी विधानसभेत संघर्ष करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रस्ता मोकळा केला.

येवला व चांदवड तालुक्यासाठी मांजरपाडा प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आले असून, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा विरोधही वाढला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी भुजबळ येणार असल्याचे समजताच आंदोलनाची तयारी केली. भुजबळांनी प्रकल्पाचे काम बघितल्यानंतर या ग्रामस्थांनी भुजबळांसह त्यांच्या ताफ्यातील गाड्या अडवल्या. यावेळी स्थानिकांचा वाढता विरोध बघून भुजबळांनी गाडीतून उतरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. स्थानिकांना आधी पाणी मिळायला हवे ही माझी सुरुवातीपासून भूमिका आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी मी प्रयत्न करेल, असे अश्वान भुजबळ यांनी दिले. त्यानंतर ग्रामस्थांचे समाधान झाले.

मी सत्तेत नाही..

देवसाने ग्रामस्थांनी गाड्या अडवल्यानंतर छगन भुजबळ ग्रामस्थांना सामोरे केले. यावेळी त्यांनी 'आता मी सत्तेत नाही. त्यामुळे तुमचे प्रश्न सत्ताधाऱ्यांनी सोडायला हवे होते. तरीदेखील मी त्यासाठी विधानसभेत संघर्ष करून हे प्रश्न सोडवेल असेही भुजबळ म्हणााले. गेली तीन वर्षे मी तुरुंगात होतो. त्यामुळे तुमचे प्रश्न सुटले नसले तरी आता ते सोडवू असेही त्यांनी सांगितले.

दोन लघुपाटबंधारे हवे

देवसाने ग्रामस्थांनी दोन लघुपाटबंधारे हवे अशी यावेळी केली. त्यावेळी दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी एक मंजूर झाला असल्याचे सांगितले. मात्र ग्रामस्थांनी त्यांना फार बोलू दिले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरातील मुख्य ठिकाणी व संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची व पोलिस गस्त वाढविण्याची मागणी नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे.

सरकारवाडा पोलिस स्टेशनचे निरीक्षक व्ही. ए. शेळके यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाजीराव मते, जिल्हाध्यक्ष अरुण दातीर, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सौरभ सोनवणे, योगेश भोसले, संदीप पैठणपगार, किरण बेलेकर, सुयश मंत्री, रोहन जगताप, पंकज बच्छाव, वैभव रौंदळ, सागर चौघुले, विजय धनवटे, अनिकेत कोठुळे आदी उपस्थित होते. एम. जी.रोड येथे वर्दळीच्या वेळी झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन सादर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरातला जाणारे पाणी थांबवा

$
0
0

नितीन भोसलेंचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना साकडे

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये झालेल्या पाणीकरारावर लक्ष देण्यासह पाणीप्रश्नावरून मराठवाडा विरुद्ध नाशिक-अहमदनगरमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला कायमस्वरुपी पूर्णविराम देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी गळ मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना घातली आहे. महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण लक्ष घालू, असे आश्वासन देत चव्हाण यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील पाणीकरारात तरतुदी बाजूला ठेवून निर्णय घेतला जात असल्याचा आरोप केला.

महाराष्ट्राचे हक्काचे पाणी राज्यात वळवले तर मराठवाडा, नगर-नाशिकचा पाणीप्रश्न सुटणार असल्याचा दावा भोसले यांनी केला आहे. त्या संदर्भात भोसले यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. आघाडीच्या काळात महाराष्ट्र, गुजरात आणि केंद्र सरकारमध्ये त्रिपक्षीय पाणीवाटप करार झाला होता. या कराराच्या कलम ५ मध्ये राज्याचा जलआराखडा केल्यानंतरच दोन्ही राज्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा उल्लेख आहे. परंतु, हा जलआराखडा राज्य सरकारऐवजी गुजरातच्या कंपनीकडून करून घेण्यात आल्याने राज्यावर अन्याय झाला आहे. या कंपनीच्या चुकीच्या आकडेवारीवरून महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळवण्यात आले आहे. केंद्राच्या मदतीने महाराष्ट्राचा जल आराखडा तयार होण्यापूर्वीच पाणी पळविण्यात आले, अशी माहिती भोसलेंनी चव्हाण यांना दिली.

...

समितीवर दबाब

डॉ. माधवराव चितळे समितीच्या अहवालानुसार दमनगंगा, पिंजाळ व नारपार या नद्यांचे समुद्राला मिळणारे १५७ टीएमसी पाणी अडवून गोदावरी व गिरणा खोऱ्यात टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. हे पाणी या दोन खोऱ्यात आले, तर पाण्याचा प्रश्न मिटेल. परंतु, केंद्र व गुजरात सरकारने सत्ताबदलचा फायदा घेत यातील अवघे २० टीएमसी पाणीच महाराष्ट्राला देण्याचा घाट घातला जात आहे. या संदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असली या संदर्भातील समितीवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे आपण यात लक्ष घालून सदरचे पाणी महाराष्टाकडे वळवा, अशी विनती भोसले यांनी चव्हाण यांच्याकडे केली. चव्हाण यांनीही यात लक्ष घालून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवू, असे आश्वासन भोसले यांना दिले आहे. यावेळी मनसेच्या नगरसेविका वैशाली भोसले उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा धडाका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा ग्रामीण पोलिस दलाने जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविली. यामध्ये आतापर्यंत १४५ जणांवर कारवाई करण्यात आली असून, ३६ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यात सुमारे १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या मोहिमेसाठी ग्रामीण पोलिस प्रशासानाने उपविभागीय स्तर, तसेच पोलिस स्टेशननिहाय पथके तयार केली आहेत. जिल्हास्तरावर स्थानिक गुन्हे शाखा आणि या विषेश पथकांद्वारे कारवाई करण्यात येत आहेत. गेल्या आठवडाभरापासुन जिल्ह्यातील पोलिस स्टेशननिहाय अवैध धंद्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत अवैध मद्यविक्री व वाहतूक करणारे, तसेच हातभट्टीची गावठी दारू तयार करणाऱ्यांविरोधात १४० गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण १४५ संशयितांवर दारुबंदी कायदयान्वये कारवाई करण्यात आली. त्यात सुमारे १५ लाख ९ हजार ६८८ रूपयांचा अवैध मद्यासाठा, हातभट्टीची गावठी दारू व साहित्य साधने जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग घोटी, इगतपुरी, वाडीवऱ्हे, त्र्यंबकेश्वर, कळवण, अभोणा, हरसूल, देवळा व मालेगाव तालुक्यासह इतर ठिकाणी गावठी दारू, हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. मुंबई जुगारबंदी कायद्यानुसार २० गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात ३६ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. या कारवाईत जुगाराचे साहित्य साधने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख ४९ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिस अधीक्षक संजय दराडे, मालेगावचे अपर अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे, सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यात सहभागी झाले आहेत.

--

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे आढळून आल्यास जिल्हा पोलिस दलाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर अथवा ९१६८५५११००, नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२५३-२३०९७१५ यावर किंवा स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयाच्या ०२५३-२३०९७१० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामीण जिल्हा पोलिस दलाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images