Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर भाजपनं फोडले फटाके

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या तडकाफडकी बदलीविरोधात त्यांच्या निवडक समर्थकांनी गुरुवारी राजीव गांधी भवनावर मोर्चा काढत पालकमंत्री व आमदारांविरोधात घोषणाबाजी केली. मात्र, दुसरीकडे विरोधकांनी ‘रामायण’बाहेर फटाके फोडून मुंढेच्या बदलीचा आनंदोत्सव साजरा केला.

आंदोलकांच्या थेट प्रवेशाने गोंधळ
महापालिकेत एरवी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश करण्यासाठी तीन ठिकाणी तपासून आत सोडले जाते. परंतु, गुरुवारी मुंढे समर्थकांना महापालिकेत पायघड्या घालण्यात आल्या होत्या. सुरक्षारक्षकांनी मुंढे समर्थकांपुढे लोटांगण घालत त्यांना प्रवेशद्वारावरून थेट आतमध्ये जाण्यास मदत केली. मोर्चातील चार ते पाच जणांच्या शिष्टमंडळालाच मुख्यालयात प्रवेश दिला जाणे अपेक्षित असताना २० ते २५ जणांना आश्चर्यकारकरीत्या प्रवेश दिला गेला. सुरक्षा यंत्रणेवर टीका झाल्याने अखेर या मोर्चेकऱ्यांना मुख्यालयाच्या आतील प्रवेशद्वारावच थोपवून धरण्यात आले. या ठिकाणी या मुंढे समर्थकांनी पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपचे आमदार, तसेच महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मुंढे गेले, फटाके फुटले...
मुंढे समर्थकांकडून एकीकडे महापालिकेत घोषणाबाजी सुरू असताना दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसमोर, तसेच महापौर निवासस्थान ‘रामायण’समोर जल्लोष साजरा करीत फटाक्यांची आतषबाजी केली. महापौर निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी एकच गर्दी केली होती. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, नगरसेवक उद्धव निमसे, मुकेश शहाणे आदींच्या चेहऱ्यांवर मुंढेंने बदलीचे हास्य झळकताना दिसत होते. बदलीचा जल्लोष थेट फटाके फोडून साजरा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिरावणीजवळ गाडी उलटली

0
0

उत्तर प्रदेशचे ११ भाविक जखमी

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथून दर्शन आटोपून परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या उत्तर प्रदेशातील प्रवाशांची गाडीचा संदीप फाउंडेशननजिक अपघात झाला. यात ११ भाविक जखमी झाले. यातील सात भाविकांना नाशिक जिल्हा रुग्णालयात तर इतर भाविकांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

त्र्यंबकेश्वर येथे दर्शन करून नाशिककडे येताना महिरावणी गावाजवळ संदीप फाउंडेशन कॉलेज परिसरात सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास वेगात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडीत २० भाविक होते. त्यापैकी ११ जण जखमी झाले. जखमी असलेल्या ११ पैकी चार भाविकांची प्रकृती गंभीर असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाडीचालक आसीम आयुम शेख (वय ३५) हा गंभीर जखमी आहे. आधान सिंह (वय १० महिने), निधतसिंह (वय २ महिने) दशसिंह वय (दीड वर्षे) विष्णूसिंह (६० वर्षे), लतासिंह (वय ६० वर्षे), विश्वनाथसिंह (वय ७० वर्षे), शालिनीसिंह (वय ३० वर्षे), शैलासिंह (वय ३० वर्षे), चंद्रेश कुमारी (वय ७० वर्षे), यथार्तसिंह आणि

अमितसिंह (वय ९ वर्षे) अशी जखमींची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्ट्यांचा विळखा घट्ट

0
0

अस्वच्छतेचे साम्राज्य; नगरसेवकांचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

शहराच्या विकासात मोलाचा वाटा असलेल्या इंदिरानगर परिसराचा विकास झपाट्याने होत असला तरी या भागाच्या चारही बाजूला झोपडपट्ट्यांचा विळखा वाढत आहे. तेथील कष्टकऱ्यांना घरकुले देण्याची घोषणा होऊनही प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने झोपडपट्ट्यांमुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण होऊन गुन्हेगारीही वाढत आहे. वडाळा गावाजवळ किंवा भारतनगर परिसरात घरकुल उभारणी झाली असली तरी झोपड्यांचे प्रमाण कमी होऊ शकलेले नाही.

इंदिरानगर परिसरात भारतनगर, राजीवनगर, स्प्लेंडर हॉल, पाथर्डी फाटा परिसर, वडाळागाव येथील झोपडपट्ट्या आहेत. राजीवनगर वसाहत अनेक वर्षांपासूनची असली तरी तेथील वसाहतीमुळे परिसरात अस्वच्छता वाढतच आहे. या वसाहतीच्या तीनही बाजूंना कायम कचऱ्याचे ढिग पडलेले असतात. तसेच राजीवनगर वसाहतीलगतच्या मोकळ्या भूखंडावर घाण व गवतांचे साम्राज्य आहे. नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी व सूचना मांडूल्यानंतरही या प्रश्नी लक्ष घातले जात नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या वसाहतीसमोर शंभर फुटी रस्त्यावरून कायम वाहतूक धावते. मात्र, या ठिकाणी घाणीच्या साम्राज्यामुळे अनेक नागरिक रस्त्याने जाणे सुद्धा टाळतात. हगणदारीमुक्‍त योजनेंतर्गत या ठिकाणी कायमस्वरूपी शौचालयाची व्यवस्था गरजेची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या वसाहतीत राहणाऱ्यांना घरकुल योजनेत का सामावून घेण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजीवनगर वसाहतीत यापूर्वी अनेकदा खून, हाणामाऱ्यांसारखे गुन्हे घडलेले आहेत. तसेच महामार्गाच्या समांतर रस्त्यालगत स्प्लेंडर हॉल जवळही अशाच प्रकारची वसाहत उभी राहिली आहे. त्यामुळे तेथेही घाणीच्या साम्राज्यासह कायम रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी व सांडपाणी वाहतनांना दिसत असते. विशेष म्हणजे या दोन्ही वसाहती वाहतुकीची वर्दळ असणाऱ्या रस्त्यालगत असल्याने याठिकाणाहून वाहतूक करताना ही अनेक अडचणी येत असतात.

गुन्हेगारची केंद्र

वडाळा गावालगत झोपडपट्टीचे अतिक्रमण काही दिवसांपूर्वी काढण्यात आले. येथील नागरिकांना घरकुलांत घरे मिळाली असली तरी ते झोपडपट्टीतच राहत असल्याचा आरोप केला जात आहे. वडाळागावातील या झोपट्टपट्टीतही अनेक वेळा वादविवाद, हाणामारीचे प्रकार होत असल्याने गुन्हेगारीचे केंद्रच म्हणून याकडे पाहिले जात असते. भारतनगर येथेही झोपडपट्टी असून तेथील रहिवाशांना घरकुल योजनेत सामवून घेण्यात आले. तरीसुद्धा तेथे अजूनही काही अनधिकृत झोपडपट्ट्या दिसून येतात.

परिसराचा विकास खुंटला

इंदिरानगर परिसरातलगतच्या झोपडपट्ट्यांमुळे विकासकामेही खुंटल्याचे चित्र तयार झाले आहे. तसेच झोपडीवासीय केर-कचरा रस्त्यावरच टाकत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नगरसेवक किंवा प्रशासनाकडे वारंवार प्रश्न मांडल्यानंतरही यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

लोगो : व्यथा इंदिरानगरच्या

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खिचडीवरच भागवावी लागतेय भूक

0
0

कोतवालांचे आंदोलन सरकारकडूनही बेदखल

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

चतुर्थ श्रेणी पदाचा दर्जा देऊन सहावा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेतर्फे कामबंद ठेवून येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पाच दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची सरकारने अद्यापही दखल घेतलेली नाही. त्यामळे कोतवालांनी शुक्रवारी (दि. २३) सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यभरातील कोतवालांनी कामावरही बहिष्कार टाकलेला असल्याने तलाठ्यांच्या दैनंदिन महसूल विषयीच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे.

राज्याच्या महसूल विभागाच्या कामकाजात कोतवालाची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, असे असूनही सरकारकडून राज्यातील कोतवालांची अवघी पाच हजार रुपये मानधनावर बोळवण केली जाते. याशिवाय कोतवालांच्या माथी इतरही शासकीय कामे थोपविली जातात. चतुर्थ श्रेणी दर्जाच्या पदाची सर्व कामे राज्यभरातील कोतवालांकडून करवून घेतली जात असली तरी या पदास मात्र चतुर्थ श्रेणी पदाचा दर्जा सरकारने दिलेला नाही. याच मागणीसाठी राज्यातील कोतवालांनी काम बंद ठेवून धरणे आंदोलन सुरू केले आहे. परंतु, अद्यापही या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नसल्याने या आंदोलक कोतवालांनी सरकारच्या या धोरणाचा निषेध करीत शुक्रवारी जोरदार घोषणाबाजी केली.

संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश इंगोले, नाशिक विभागाचे अध्यक्ष कैलास कोळी, औरंगाबाद विभाग उपाध्यक्ष बाळू नागरे, नागपूर विभागाचे उपाध्यक्ष रवींद्र बोदेले, अमरावती विभाग अध्यक्ष पुरुषोत्तम साखरे, उपाध्यक्ष राजेश केंडे, कोकण विभागाचे अध्यक्ष अनंत भोसले, उपाध्यक्ष दीपक आरेकर, महिला आघाडीच्या माधुरी हंकारे, माधुरी आहिरे, क्रांती जाधव आदींनी उपस्थित कोतवालांना मार्गदर्शन केले.

तुटपुंजे मानधन

धरणे आंदोलनात राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील सुमारे दीड हजार कोतवाल सहभागी झालेले आहेत. त्यांना भोजनासाठी आंदोलनस्थळीच दररोज खिचडी तयार करून त्यावर भूक भागविली जात आहे. कोतवालांना अतिशय तुटपुंजे मानधन मिळत असल्याने आवश्यक व पुरेसे अन्न मिळविणे राज्यातील कोतवालांना अशक्य होत असल्याची व्यथा याप्रसंगी शरद कडाळे, उत्तम सानप, किरण पठारे, नामदेव शिरसाठ, भाऊसाहेब आढाव आदी कोतवालांनी मांडली.

राज्यातील ढिगभर कामे करवून घेत सरकार कोतवालांच्या कायदेशीर मागण्यांकडे दुर्लक्ष करून आमची थट्टा करीत आहे. पूर्वीपासून वेतनासह इतर शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्तेही मिळत होते. परंतु, एकछत्र योजना समिती नेमून सरकारने राज्यातील कोतवालांची दिशाभूल केली आहे.

- कैलास कोळी, अध्यक्ष, नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला लवकरच पाइपलाइनद्वारे नॅस?

0
0

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या पथकाने दिली भेट

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस या कंपनीच्या पथकाने भेट देऊन नागरिकांच्या घरात पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याबाबत अनुकुलता दाखविली आहे. नाशिक येथे याच कंपनीने पाइपद्वारे गॅस पुरवठा करण्याचे काम हाती घेतले आहे. शहरात देखील अशा प्रकारे गॅस पुरवठा करणे शक्य असल्याचे महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचे जनरल मॅनेजर सुजीत रूईकर यांनी सांगितले आहे.

बलसाडपासून नाशिक येथे गॅसलाइन ञ्यंबकेश्वर शिवारातून जाणार असल्याने त्र्यंबकेश्वर येथे गॅसपुरवठा करणे सहज शक्य होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचे तंत्रज्ञ व अधिकारी यांचे दहा व्यक्तींचे पथक आले होते. नगर पालिका आरोग्य सभापती विष्णू दोबाडे, भाजप शहर सरचिटणीस संतोष भुजंग, दत्ता जोशी, हर्षल शिखरे, माजी नगराध्यक्ष प्रशांत तुंगार यांनी पथकाचे स्वागत केले. त्र्यंबकेश्वर शहराची आणि आजुबाजूच्या लोकवस्तीची माहिती दिली. शहरात नळावाटे गॅसजोडणी करण्यासाठी विनंती केली. मंदिरात हे पथक दर्शनासाठी आले देवस्थान ट्रस्टचे विशेष कार्यकारी अधिकारी राधाकृष्ण जोशी यांनी स्वागत केले. त्यांचाशी चर्चा करीत येथील कार्यपद्धती समजावून घेतली आहे. त्यानंतर नगरपालिका कार्यालयात नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांची भेट घेतली. शहरासाठी असलेल्या योजनेची माहिती दिली. चर्चेत नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी शहराची संपूर्ण माहिती दिली. नळाद्वारे गॅस कनेक्शनसाठी अनुकुलता दर्शविली आहे. नागरिकांसाठी फायद्यासाठी असलेला हा उपक्रम राबविण्यास नगर पालिकेकडून सहकार्य मिळेल असे त्यांनी सूचित केले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये गॅस कनेक्शन करिता सर्वेक्षण करण्यात येईल, असे जनरल मॅनेजर यांनी सांगितले आहे. नाशिक येथे जाणारी गॅसलाइन त्र्यंबकमार्गे जाणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा तासांत चोरटे गजाआड

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील किल्ला पोलिस ठाण्यानजीक असलेल्या ताबानी किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री चोरी करून रोकड लंपास केली होती. हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस ठाण्याजवळच चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. चोरांना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर किल्ला पोलिसांना त्या चोरट्यांना अवघ्या १२ तासांत जेरबंद केले आहे.

गुरुवारी सकाळी दुकान मालक मोहमद अल्ताफ हे दुकानावर आले असता हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी दुकान मालक यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . दरम्यान पोलीस ठाण्यानजीक चोरी झाल्याने किल्ला पोलिसांपुढे चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान होते. पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, उपनिरीक्षक यू. व्ही. गोपाळ, पोलिस नाईक किशोर नेरकर, गणेश कुमावत, मनोज चव्हाण आदींनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्या चोरट्यांचा छडा लावाला. मोहंमद सुफीयान अहमद (वय २३, रा. आयेशानगर), हसनैन रजा मोहमद याकुब (वय २१, हुडको कॉलनी) या दोघांना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली असून त्यांच्याकडून ३९ हजार रुपये जप्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण दुचाकीस्वार ठार

0
0

दुभाजकावर आदळून पळसे गावाजवळ अपघात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव दुचाकी रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन धडकल्याने २८ वर्षांचा तरुण ठार झाला. ही घटना पुणे-नाशिक रोडवरील पळसे गावाजवळ घडली.

अनिल प्रभाकर मोरे (रा. सिन्नर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघाताची घटना बुधवारी (दि. २१) रात्री १० वाजता झाली. मोरे हा आपल्या (एमएच १५-६३२४) दुचाकीने नाशिकहून सिन्नरच्या दिशेने जात होता. पळसे गावाजवळ असलेल्या राजयोग मंगल कार्यालयाजवळून जात असताना भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन आदळली. यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मजगर अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल हिसकावला

रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाचा दहा हजार रुपयांचा मोबाइल पल्सरवरून आलेल्या दोघांनी बळजबरीने खेचून नेला. ही घटना गुरुवारी (दि. २२) रात्री उंटवाडीरोडवर घडली.

या प्रकरणी रोशन शिवानंद कासार (रा. बजरंग चौक, सिडको) याने तक्रार दाखल केली. रोशन गुरुवारी रात्री पावणेआठ वाजता उंटवाडी रोडने कालिका पार्ककडे रस्त्याने पायी जात होता. सागर डेअरीसमोर काळ्या रंगाच्या पल्सरवरून दोघे अज्ञात संशयित आले. त्यांनी रोशनच्या हातातील दहा हजार रुपयांचा जीओनी कंपनीचा मोबाइल बळजबरीने हिसकावून पळवून नेला. या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन अल्पवयीन मुले बेपत्ता

शहर परिसरातून अल्पवयीन दोन मुलींसह एक मुलगा बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी पंचवटी, म्हसरूळ व उपनगर या पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

नाशिकरोडच्या देवळाली गावातील अल्पवयीन मुलगा शुक्रवारपासून (दि. १६) बेपत्ता आहे. दुकानात रेशन घेण्यासाठी जा, असे सांगून मी मागून येतो, असे त्याने आईला सांगितले. मात्र, अनेक तास उलटूनही तो परतला नाही. याबाबत उपनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाकले करीत आहेत.

पंचवटीतील फुलेनगर परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. तिचे आईसोबत बुधवारी (दि. २१) रात्री साडेनऊ वाजता किरकोळ भांडण झाले होते. या रागाच्या भरात ती घरातून बाहेर गेली. यानंतर कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ती आढळून आली नाही. याबाबत पंचवटी पोलिसात बेपत्ता मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक ए. व्ही. मोरे करीत आहेत. दरम्यान, म्हसरूळ येथील भाजी बाजारासमोर राहणारी एक अल्पवयीन मुलगी गुरुवारी (दि.२२) घरातून बेपत्ता झाली आहे. याबाबत तिच्या वडिलांनी म्हसरूळ पोलिसात फिर्याद दिली असून, अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विद्यार्थ्यांचे सुधारणार आरोग्य!

0
0

नाशिक विभागासाठी २६ रुग्णवाहिका सेवेत दाखल

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी आदिवासी विकास विभागाने नाशिक विभागातील आदिवासी मुलांसाठी २६ रुग्णवाहिका दिल्या आहेत.

या रुग्णवाहिकांमध्ये २४ तास तातडीची वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) सह सज्ज असणाऱ्या या रुग्णवाहिकांमध्ये दोन डॉक्टर्स व एक आरोग्य सहाय्यक उपलब्ध असतील.

संपूर्ण राज्यात ४८ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. यामध्ये नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांसाठी २६ अद्ययावत रुग्णवाहिकांचा समावेश आहे. या सर्व रुग्णवाहिका गुरुवारी सेवेत दाखल करण्यात आल्या. दुर्गम भागात असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत याचीही व्यवस्था केली आहे. प्रत्येकी चार ते सहा आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांचा एक समूह असे ४८ क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक क्लस्टरसाठी एक याप्रमाणे राज्यात ४८ सुसज्ज रुग्णवाहिका २४ तास मैदानात असतील.

या योजनेंतर्गत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाणार आहे. साथीच्या

रोगाची लक्षण आढळल्यास तातडीने उपचार करणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यक औषधे व इंजेक्शन यांचा पुरेसा साठा उपलब्ध असेल. प्रत्येक विद्यार्थ्यांचे डिजिटल हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार आहे. नियमित डॉक्टरांबरोबरच डोळे, त्चचारोग, कान, नाक, घसा या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या भागात तैनात करण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांमध्ये ईसीजी, ऑक्सिजन सिलिंडर, तसेच अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असतील. आश्रमशाळा दुर्गम भागात असल्याने सर्प, विंचू दंश यावरील उपचारासाठी लागणाऱ्या अँटी व्हेनम इंजेक्शनचा पुरेसा साठा असेल. आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत एक आरोग्य समिती नेमण्यात येणार आहे. या समितीत विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा समावेश असेल.

...

या सुविधा मिळणार

- रुग्णवाहिकांच्या समन्वयासाठी इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर

- प्रतिदिन क्लस्टर शाळांमधील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी

- हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिमच्या माध्यमातून प्रकल्प स्थितीचा आढावा

- मोबाइल ॲपच्या माध्यमातून डिजिटल हेल्थ कार्ड

- वैद्यकीय विशेषज्ञांकडून उपचार सल्ला

- सोयींयुक्त डिस्पेंसरीजची स्थापना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरी बेघरांनाही मिळणार दिलासा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

ग्रामीण भागातील गावठाण व शासकीय जमिनीवरील घरांचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय शासनाने फेब्रुवारी २०१८ मध्ये घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत शहरी भागातील अतिक्रमण नियमित करण्यासंदर्भात राज्य शासनाने महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. आता शहरी भागातील नागरीकांनाही सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

ना. भुसे यांनी ग्रामिण भागातील गावठाण व शासकीय जमिनीवरील घरांचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री यांनीदेखील यासाठी भुसेंच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून याचे धोरण तयार करण्यास सांगितले होते. अखेर भुसेंच्या पाठपुराव्याने शासनाने फेब्रुवारी २०१८ ला हा निर्णय घेतला होता. ग्रामीण भागप्रमाणे शहरालगत वास्तव्य करीत असलेल्या शासकीय सरकारी जागेवरील अतिक्रमणही नियमित करावे अशी मागणी भुसेंनी केली होती.

नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत शहरी भागातील अतिक्रमण नियमित करण्यासंदर्भात राज्य शासनाने महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. सर्वांसाठी घरे या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यातील ३८२ शहरे व त्या लगतच्या क्षेत्रामध्ये या योजनेचा लाभ मिळणार आहे. महापालिका क्षेत्रातील जमिनी विभागीय आयुक्तांच्या तर नगरपालिका-नगरपरिषदांच्या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व मान्यतेने भाडेतत्वाने देणे शक्य होणार आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील जमिनीही उपलब्ध व्हाव्यात यासाठीही निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे मालेगाव महानगरपालिकेत हद्दावढीत समावेश झालेल्या सोयगाव, द्याने, सायने, भायगाव, दरेगाव व म्हाळदे या गावांतील अतिक्रमण धारक बेघर लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. या गावांमध्ये असणाऱ्या बेघर पात्र लाभार्थ्यांना शासन मालकीच्या जमिनीवर राहत असलेल्या जागेवर स्वत:ची आवास योजनेअंतर्गत घरे बांधता येणार आहेत.

- दादा भुसे, ग्रामविकास राज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कालिका’ भक्त निवास ठरतोय वरदान

0
0

परगावाहून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना साथ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात नातेवाइक असले तरी त्यांच्या घरी पाहुणे म्हणून जाणे चांगले वाटते. सोबत पेशंट असताना राहण्याची सोय स्वतःलाच करावी लागते. पेशंटच्या मोठ्या आजारावरील उपचारांचा खर्च करताना हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च परवडत नाही. आम्हा नातेवाइकांना हे भक्त निवास अगदी कमी किंमतीत उपलब्ध झाल्याने संकटाच्या काळातले हे वरदानच ठरत आहे, अशा भावना कालिका देवी मंदिराच्या भक्त निवासात राहत असलेल्या पेशंटच्या नातेवाइकांनी व्यक्त केल्या आहेत.

मुंबई नाका येथील कालिका देवी मंदिराच्या परिसरात कालिका देवी ट्रस्ट आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्यातर्फे भक्त निवास उभारण्यात आले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लोकार्पण झालेला हा भक्त निवास शहरात येणाऱ्या पेशंटच्या नातेवाइकांसाठी वरदान ठरत आहे. भक्त निवासात १० ते १२ खोल्या असून यामध्ये सर्व सोयी पेशंटच्या नातेवाइकांना उपलब्ध आहेत. पेशंटवर उपचार सुरू असलेल्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पत्रानुसार नातेवाइकांना भक्त निवासात खोली उपलब्ध करून दिली जाते. वर्षभरात शंभरहून अधिक पेशंटच्या नातेवाइकांनी या निवासाचा लाभ घेतला आहे.

कॅन्सर तसेच इतर मोठ्या आजरांवर उपचार घेण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण नाशिकमध्ये येतात. मुंबई नाका परिसरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार केले जातात. उपचाराच्या काळात रुग्णाच्या नातेवाइकांना हॉस्पिटलमध्ये रात्री झोपण्याची किंबहुना दिवसभर थांबण्याची सोय नसते. त्यामुळे जवळपास कुठेतरी आरामासाठी सोय पावी लागते. जेमतेम आर्थिक परिस्थितीत हॉस्पिटलचा खर्च भागवतांना हॉटेल किंवा गेस्ट हाउसची रक्कम देणे रुग्णाच्या नातेवाइकांना शक्य नसते. अशा परिस्थिती फक्त प्रत्येकी शंभर रुपये प्रतिदिवस भाड्याने कालिका देवी भक्त निवास येथे नातेवाइकांना राहण्याची सोय उपलब्ध होत आहे. या सोयीचा फायदा नंदुरबार, धुळे, चंद्रपूर यांसह राज्यभरातून येणाऱ्या पेशंटच्या नातेवाइकांना होत आहे.

नंदुरबार येथून कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी नाशिकमध्ये आलो आहोत. भक्त निवासामुळे राहण्याची चिंता मिटली आहे. हॉस्पिटलपासून भक्त निवास जवळ असल्याने रुग्णाची काळजी घेणे सोपे होत आहे.

- कल्पना शिंत्रे, रुग्णाचे नातेवाइक

धुळे येथून नाशिकमध्ये उपचारासाठी आलो आहोत. हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ थांबता येत नाही. कॅन्सरसारख्या आजारावरील उपचार अधिक खर्चिक आहे. त्यात राहण्याचा खर्च अधिक होईल का, याचे टेंशन होते. मात्र, कालिका देवी भक्त निवास अगदी कमी किंमती सर्व सोयींयुक्त स्वरुपात उपलब्ध आहे.

- संगीता पाटील, पेशंटची नातेवाइक

\Bशुभवार्ता \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारोदारी निधी संकलन

0
0

काँग्रेसचा उपक्रम; अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत शुभारंभ

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तब्बल ३५ हजार कोटींची तजवीज केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. भाजपच्या या इलेक्शन मनी मॅनेजमेंटला तोंड देण्यासाठी काँग्रेस पक्षही सरसावला असून, निधी संकलनासाठी थेट जनतेच्या दरबारारात उतरला आहे.

काँग्रेसने जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून भाजपची पोलखोल करण्यासह निधी संकलनाचे काम सुरू केले आहे. नाशिकमध्ये अभियानाच्या पहिल्याच दिवशी पक्षाच्या तिजोरीत १६ हजारांची भर पडली आहे.

भाजप एकीकडे मनी मॅनेजमेंटमुळे जनभावना विरोधात असतानाही निवडणुकांचे फड जिंकत चालला आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. सत्तेत असल्याने देणगीदारांचा जोर भाजपकडे अधिक असून, काँग्रेसच्या देणगीदारांची संख्या घटत चालली आहे. आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी व पक्षाची मॅनेजेमेंट सांभाळण्यासाठी सुद्धा पुरेसा निधी पक्षाकडे नाही. काँग्रेसकडे २७ कोटीच शिल्लक आहेत. त्यामुळे एवढ्या कमी निधीवर लोकसभा निवडणूक लढविणे शक्य नसल्याने काँग्रेस नेत्यांनी भाजपच्या मनी मॅनेजमेंटचा सामना करण्यासाठी निधी संकलनाचे काम हाती घेतले आहे.

या जनसंपर्क अभियानाची सुरुवात नांदेडपासून करण्यात आली आहे. नांदेडनंतर नाशिकची निवड करण्यात येऊन गुरुवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या प्रवक्त्या व नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये जनसपंर्क अभियनाचा शुभारंभ करण्यात आला. चव्हाण यांनी टिळकवाडीतील भुपेंद्र शहा यांच्या घरी जाऊन पत्रकाचे वाटप केले. तसेच, त्यांच्याकडून ११ हजार रुपयांची पक्षनिधी घेतला. याशिवाय सुधाकर मुळाणे यांनी पाच हजार रुपये पक्षनिधी चव्हाण यांच्याकडे जमा केला. पहिल्या दिवशी काँग्रेसने तब्बल १६ हजाराचा निधी संकलित केला. राज्यभर हा उपक्रम राबवला जाणार आहे.

...

पंधरा लाख नागरिकांचे उद्दिष्ट

नाशिक जिल्ह्यातील शहर व ग्रामीण अशा पंधरा लाख प्रचार पत्रकांच्या माध्यमातून काँग्रेसने नागरिकांपर्यंत जनसंपर्क अभियानांमार्फत पोहण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक लाख पत्रके वाटण्यात येणार आहेत. प्रत्येक नागरिकाकडून पक्षासाठी ऐपतीप्रमाणे निधी द्यावा, अशी गळ घातली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातून दोन ते तीन कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

..

असे आहे अभियान

अभियानांतर्गत केंद्र व राज्यातील सरकारने जनहित विरोधी घेतलेल्या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच कॉँग्रेस पक्षाच्या राजवटीत आजवर घेतलेल्या जनहित निर्णयाची माहिती पक्ष कार्यकर्ते घरोघरी जाऊन देणार आहेत. त्यासाठी प्रचारपत्रके प्रसिध्द केली आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान एक लाख कुटुंबांपर्यंत हे पत्रक पोहोचविण्याचे उद्दिष्ट जिल्हा कमिट्यांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राग पत्नीचा, बदडले तरुणाला

0
0

जळगावातील पोलिसांचे कृत्य, गुन्हा दाखल

म. टा.प्रतिनिधी, जळगाव

भररस्त्यावर पत्नीशी वाद घालत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीच्या संतापात एका पादचारी तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बसस्थानक परिसरात घडली. संबंधित तरुणाने याबाबत जिल्हापेठ पोलिसात तक्रार केली. मयुर संजय वाघ (वय २३, रा.चिंचोली) असे तरुणाचे नाव आहे.

तुषार वाघ या पोलिस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप मयुरने केला आहे. मुयर हा नुतन मराठा महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. महाविद्यालयातून बसने घरी जाण्यासाठी तो बसस्थानक परिसरात आला होता. याचवेळी पोलिस कर्मचारी तुषार हा भररस्त्यावर पत्नीशी वाद घालत होता. मयुर हा शेजारीच उभा असल्यामुळे क्षणार्धात तुषारने मयुरला मारहाण करण्यास सुरूवात केली. काहीही कारण नसताना त्याने मयुरला बेदम मारहाण केली. परिसरातील नागरिक, मयुरच्या मित्रांनी हा वाद मिटवून जखमी मयुरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर मयुरने मित्रांसह जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येऊन पोलिस कर्मचारी तुषारच्या विरुद्ध तक्रार दिली. तुषार हा दारुच्या नशेत असल्याचा आरोप मयुरने केला आहे.

कचरा टाकण्यावरुन शेजाऱ्यांस मारहाण

श्रद्धा सोसायटीत प्रदीप रामचंद्र कुळकर्णी यांच्या घराशेजारी जयवंत भास्कर जगताप यांचे घर आहे. घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून कुळकर्णी व जगताप कुटुंबियांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी जयवंत जगताप यांनी प्रदीप व त्यांचे भाऊ दीपक यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. या मारहाणीत प्रदीप कुळकर्णी यांच्या डोक्याला, कपाळावर व पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी प्रदीप कुळकर्णी यांच्या फिर्यादीवरून जयवंत जगताप व त्यांचा मुलगा दिनेश जगताप या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाख्ल करण्यात आला आहे

अवैध दारुच्या अड्ड्यावर छापा

हनुमाननगर परिसरात ताडपत्रीचे शेड तयार करून अवैध गुत्ता चालवला जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी रात्री मिळाली. त्यानुसार पथकाने धाड टाकली. यावेळी गुत्ताचालक रवींद्र विश्वनाथ वाघ, मोहन पाटील (वय ३३, रा.अयोध्यानगर), राजू सपकाळे (वय ४०, रा. हनुमाननगर), प्रकाश पाटील (वय ३९, रा. यमुनानगर), अजय इंगळे (वय २८, रा. रायसोनी शाळेमागे, अयोध्यानगर), हरिश्चंद्र लक्ष्मण ढाके (वय ३७, रा. अयोध्यानगर), सुनील खुडू काकुळदे (वय ३९, रा. हनुमाननगर), राजू गाढगे (वय ३०, रा.कौतीननगर) व विजय सपकाळे (वय ३९, रा. हनुमाननगर) यां नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

वृद्धाची आत्महत्त्या

शहरातील प्रबोधननगर परिसरात राहणारे ६७ वर्षीय वृद्ध आठ दिवसापासून बेपत्ता होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी निमखेडी शिवारातील पटेल फॅक्टरीलगतच्या पडीत खोल्यांमध्ये गळफास घेवून आत्महत्त्या केल्याचे निष्पन्न झाले. जळगावातील प्रबोधनगरातील रहिवासी गुलाब गोविंदा लोहार (वय ६७) यांना दारू पिण्याचे व्यसन होते. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी कुणालाही न सांगता घरातून बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्यांचा मुलगा विलास लोहार याने तालुका पोलिसात तक्रार दाखल केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राग पत्नीचा, बदडले तरुणाला

0
0

जळगावातील पोलिसांचे कृत्य, गुन्हा दाखल

म. टा.प्रतिनिधी, जळगाव

भररस्त्यावर पत्नीशी वाद घालत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीच्या संतापात एका पादचारी तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बसस्थानक परिसरात घडली. संबंधित तरुणाने याबाबत जिल्हापेठ पोलिसात तक्रार केली. मयुर संजय वाघ (वय २३, रा.चिंचोली) असे तरुणाचे नाव आहे.

तुषार वाघ या पोलिस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप मयुरने केला आहे. मुयर हा नुतन मराठा महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. महाविद्यालयातून बसने घरी जाण्यासाठी तो बसस्थानक परिसरात आला होता. याचवेळी पोलिस कर्मचारी तुषार हा भररस्त्यावर पत्नीशी वाद घालत होता. मयुर हा शेजारीच उभा असल्यामुळे क्षणार्धात तुषारने मयुरला मारहाण करण्यास सुरूवात केली. काहीही कारण नसताना त्याने मयुरला बेदम मारहाण केली. परिसरातील नागरिक, मयुरच्या मित्रांनी हा वाद मिटवून जखमी मयुरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर मयुरने मित्रांसह जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येऊन पोलिस कर्मचारी तुषारच्या विरुद्ध तक्रार दिली. तुषार हा दारुच्या नशेत असल्याचा आरोप मयुरने केला आहे.

कचरा टाकण्यावरुन शेजाऱ्यांस मारहाण

श्रद्धा सोसायटीत प्रदीप रामचंद्र कुळकर्णी यांच्या घराशेजारी जयवंत भास्कर जगताप यांचे घर आहे. घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून कुळकर्णी व जगताप कुटुंबियांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी जयवंत जगताप यांनी प्रदीप व त्यांचे भाऊ दीपक यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. या मारहाणीत प्रदीप कुळकर्णी यांच्या डोक्याला, कपाळावर व पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी प्रदीप कुळकर्णी यांच्या फिर्यादीवरून जयवंत जगताप व त्यांचा मुलगा दिनेश जगताप या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाख्ल करण्यात आला आहे

अवैध दारुच्या अड्ड्यावर छापा

हनुमाननगर परिसरात ताडपत्रीचे शेड तयार करून अवैध गुत्ता चालवला जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी रात्री मिळाली. त्यानुसार पथकाने धाड टाकली. यावेळी गुत्ताचालक रवींद्र विश्वनाथ वाघ, मोहन पाटील (वय ३३, रा.अयोध्यानगर), राजू सपकाळे (वय ४०, रा. हनुमाननगर), प्रकाश पाटील (वय ३९, रा. यमुनानगर), अजय इंगळे (वय २८, रा. रायसोनी शाळेमागे, अयोध्यानगर), हरिश्चंद्र लक्ष्मण ढाके (वय ३७, रा. अयोध्यानगर), सुनील खुडू काकुळदे (वय ३९, रा. हनुमाननगर), राजू गाढगे (वय ३०, रा.कौतीननगर) व विजय सपकाळे (वय ३९, रा. हनुमाननगर) यां नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

वृद्धाची आत्महत्त्या

शहरातील प्रबोधननगर परिसरात राहणारे ६७ वर्षीय वृद्ध आठ दिवसापासून बेपत्ता होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी निमखेडी शिवारातील पटेल फॅक्टरीलगतच्या पडीत खोल्यांमध्ये गळफास घेवून आत्महत्त्या केल्याचे निष्पन्न झाले. जळगावातील प्रबोधनगरातील रहिवासी गुलाब गोविंदा लोहार (वय ६७) यांना दारू पिण्याचे व्यसन होते. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी कुणालाही न सांगता घरातून बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्यांचा मुलगा विलास लोहार याने तालुका पोलिसात तक्रार दाखल केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघांना फाशी

0
0

बाखराबाद हत्याकांड;

तिघांना फाशी

म. टा. वृत्तसेवा, अकोला

जमीन खरेदी-विक्री व्यवहारातून घडलेल्या बहुचर्चित बाखराबाद हत्याकांडातील तिघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा ठोठावली. आरोपींमध्ये गजानन वासुदेव माळी आणि त्यांच्या नंदेश व दीपक या दोन मुलांचाही समावेश आहे.

अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बाखराबाद येथील भगवंतराव माळी यांनी आरोपी गजानन माळी याच्याकडून दोन एकर शेती खरेदी केली होती. नंतर गजाननने व्यवहार योग्य नसल्याचे सांगून विक्रीस नकार दिला होता. त्यामुळे भगवंतराव माळी यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर शेतीचा ताबा घेण्यावरून या दोन्ही कुटुंबीयांत वाद होत होते. त्याच वादातून १४ एप्रिल २०१४ रोजी सायंकाळी विश्वनाथ माळी, वनमाला माळी, योगेश माळी व राजेश माळी चौघांचीही हत्या केली गेली. यातील योगेश व वनमाला यांची हत्या आरोपींनी शेतात जावून केली तर राजेश व विश्वनाथ माळी यांना त्यांच्या घरी जावून ठार मारण्यात आले. कुऱ्हाड व कडबा कटरचे पाते आरोपींनी हत्येसाठी वापरले होते. अतिशय क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तिघांवर भादंवि कलम ३०२, ४५२, १२० (ब) नुसार गुन्हे दाखल करू दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. आरोपींचे कृत्य भयंकर असल्याने जिल्हा व सत्र न्यायधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. सोबतच त्यांना दंडही भरावयाचा आहे. या सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. गिरीश देशपांडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम आरक्षणासाठी धरणे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'मुस्लिम आरक्षण माँग नहीं, हमारा हक है...', 'अब एक ही मिशन... मुस्लिम आरक्षण', अशी घोषणाबाजी करीत मुस्लिम बांधवांनी आरक्षणासाठी शुक्रवारी शहरात धरणे आंदोलन केले.

मुस्लिम आरक्षणासंदर्भात सरकार गांभीर्याने भूमिका घेत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आरक्षणाअभावी शैक्षणिक क्षेत्रात मुस्लिम विद्यार्थी मागे पडत आहेत. त्यामुळे आरक्षणासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जमियत उल्मा संघटनेच्या नाशिक शाखेतर्फे दुपारी ३ ते ६ या वेळेत गोल्फ क्लब मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले. सरकारी आणि निमसरकारी सेवांमध्ये, तसेच शैक्षणिक क्षेत्रात मुस्लिम समाजातील ५० प्रवर्गांना विशेष मागास प्रवर्गांतर्गत ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेण्यात आला. परंतु, आजपर्यंत राज्य सरकारने मुस्लिम समाजाला हे आरक्षण देऊ केलेले नाही. आरक्षणाअभावी समाजबांधवांच्या प्रगतीस अडथळा निर्माण होत आहे. नोकरी व शिक्षणाच्या सोयींमध्ये ते मागे पडू लागले आहेत. त्यामुळे मुस्लिम आरक्षणासंदर्भात सरकारने त्वरित निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी जमियत उल्मा नाशिकचे अब्दुल महमूद सिद्दिकी यांनी मांडले. मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नकोच आहे. समाजातील बांधवांना नोकरी व शिक्षणात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे समाजाला मान्य करण्यात आलेले ५ टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी करण्यात आली. राज्यभरात जमियत उल्मातर्फे अनेक जिल्ह्यांत शुक्रवारी मुस्लिम आरक्षणासंदर्भात आंदोलन करण्यात आले. यावेळी मुफ्ती इकरहउद्दिन, हाफिज अहमद असलम, मुफ्ती अब्दुल्ला, मौलाना सलीम, हाफिज मुहम्मद तय्यब यांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेवटच्या दोन दिवशी उमेदवारांची होणार गर्दी

0
0

नामको बँक निवडणुकीसाठी २२७ सभासदांनी नेले अर्ज

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेच्या २१ संचालकपदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांनी अर्ज गुरुवारपर्यंत दाखल केले. त्यानंतर शुक्रवार ते रविवार या कालावधीत सुटी असल्याने आता नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी सोमवारी मोठी गर्दी होणार आहे. आतापर्यंत २२७ सभासदांनी उमेदवारीसाठी ५५८ अर्ज बँकेतून नेले आहेत.

सोमवारी संकष्ट चतुर्थी असल्यामुळे अनेकांनी हा मुहूर्त साधण्यासाठी अर्ज दाखल केले नसल्याची चर्चा आहे. मंगळवारपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. सोमवारी सत्ताधारी माजी संचालकांचे प्रगती पॅनल आपल्या समर्थकांसह पुन्हा एकत्रित सर्व अर्ज दाखल करणार आहे. विरोधी गटाचे सहकार पॅनलही सोमवारी अर्ज दाखल करणार आहे. या निवडणुकीत नम्रता पॅनलचे उमेदवार मात्र मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत.

.

बँकेला फायदा

नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवारांकडे त्याचप्रमाणे सूचक व अनुमोदकाकडे थकबाकी नसल्याचा दाखला घ्यावा लागतो. थकबाकी भरण्यासाठी गेले दोन दिवस गर्दी होती. यामुळे बँकेची थकबाकी वसूल होऊन बँकेला मोठा फायदा झाला.

..

तडजोडीसाठी प्रयत्न

नामकोच्या निवडणुकीत तीन पॅनल होणार असल्याचे निश्चित आहे. प्रगती व सहकार पॅनलचे तडजोडीसाठी अजून प्रयत्न सुरू आहेत. नम्रता पॅनलच्या प्रमुखांबरोबरही सहकारच्या नेत्यांनी चर्चा केल्याचे समजते. माघारीच्या अखेरपर्यंत हे तडजोडीचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी ऑडिटवर सखोल मार्गदर्शन

0
0

जीएसटी राष्ट्रीय परिषदेत ५०० सीएंची उपस्थिती

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दोन दिवसीय जीएसटी राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी अशोका मार्गावरील सीए शाखेच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थित झाले. यावेळी औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यातील ५०० हून अधिक सीए उपस्थित होते. पहिल्या दिवशी जीएसटी ऑडिट, आकारणी आणि जीएसटी फॉर्ममध्ये असलेल्या विविध कलमांवर मार्गदर्शन करण्यात आले.

नाशिक सीएआय शाखा व औरंगाबाद सीए शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय जीएसटी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय जीएसटी आयुक्त श्रीकांत पाटील व राज्याच्या जीएसटीचे उपायुक्त संजय पोखरकर हे यावेळी उपस्थित होते. उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी तीन सत्रात मान्यवरांनी जीएसटीबद्दल माहिती दिली.

या परिषदेच्या पहिल्य सत्रात सीए शेफाली गिरिधारीवाल यांनी जीएसटी ऑडिट कसे करायचे, त्या संबंधात असलेली ऑडिटरची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात औरंगाबाद येथील जीएसटीचे अधिकारी दीपक गुप्ता यांनी प्लेस ऑफ सप्लाय आणि त्यानुसार असलेली जीएसटी आकारणी या विषयावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात जीएसटी ऑडिट फॉर्ममध्ये असलेल्या विविध कलमांचा तपशीलवार अभ्यास आणि त्याचे सखोल मार्गदर्शन सीए आसीत शहा यांनी केले.

या परिषदेचे संयोजन नाशिक शाखेचे अध्यक्ष सीए मिलन लुणावत, व्हाईस चेअरपर्सन रेखा पटवर्धन, सेक्रेटरी रणधीर गुजराथी, हर्षल सुराणा, रोहन आंधळे, विकास हसे, रवी राठी, राजेंद्र शेटे व औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सीए सचिन लाठी यांनी केले.

..

जीएसटीच्या गोषवारासाठी परिषदेचे आयोजन

जीएसटी येऊन दीड वर्ष पूर्ण झाले असून, वेगवेगळे जीएसटी रिटर्न व्यापाऱ्यांनी भरले आहेत. आता या सर्वांचा गोषवारा जीएसटी वार्षिक रिटर्न आणि जीएसटी ऑडिटमध्ये द्यायचा आहे. ज्याची मुदत ३१ डिसेंबर २०१८ आहे. त्यामुळे जीएसटी वार्षिक रिटर्न आणि जीएसटी ऑडिट फॉर्ममध्ये द्यावयाचा तपशिलांचा सखोल अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केल्याची माहिती सीए शाखेचे अध्यक्ष मिलन लुणावत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक रुपयात एक लिटर पाणी!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुन्या सीबीएस परिसरातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या ठिकाणी शुद्ध पाणी मिळत नसल्याने अनेक प्रवाशांचे हाल होतात. उन्हाळ्यात तर ही समस्या प्रकर्षाने जाणवते. नेमकी हीच गरज ओळखून लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटतर्फे नाशिकच्या जुने सीबीएस स्थानकाच्या एक नंबर प्लॅटफॉर्मजवळ शुद्ध पाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

एक रुपयाचे नाणे टाकल्यानंतर एक लिटर पाणी मिळणार असल्याने सीबीएस स्थानकावरून बाहेरगावी प्रवास करणाऱ्यांची सोय झाली आहे. लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २३) या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. २ हजार लिटर पिण्याचे पाणी उपलब्ध राहण्याची या प्रकल्पाची क्षमता असून, यातील ५०० लिटर पाणी थंड राहणार आहे. त्यामुळे एक रुपया टाकून मिळणारे पाणी हे थंड असेल. हा एक कायमस्वरूपी प्रकल्प असून याची रोजची निगा लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटतर्फे राखण्यात येणार आहे. लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटतर्फे येणाऱ्या काळात शहरात विविध ठिकाणी अशाच पद्धतीचे पाण्याचे एटीएम्स बसविण्यात येणार आहेत. जुने बस स्थानक परिसरात पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने त्र्यंबकेश्वर, सिन्नर, कळवण, सटाणा, नंदुरबार आदी ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुविधा झाली आहे.

जुने बसस्थानकावर राज्य परिवहन मंडळाचे आगार व्यवस्थापकांनी लायन्स क्लबचे आभार मानले असूनस प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पाण्याची सुविधा आहे अशी उद्घोषणा करण्यात येऊन प्रवाशांमध्ये या सुविधेचा जागृती करण्यात करण्यात येणार आहे. स्थानकावर विविध ठिकाणी पाण्याच्या एटीएमकडे येण्यासाठी दिशादर्शक लावण्यात येतील, असे आश्वासन राज्य परिवहन मंडळ नाशिक आगाराचे सहायक वाहतूक अधीक्षक केशव सांगळे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवकांसह चौघांना कारावास

0
0

आपत्याच्या जन्मनोंदीमधील खाडाखोड भोवली

१४ वर्षांनी येवला न्यायालयाचा निकाल

म. टा. वृत्तसेवा, येवला

तीन अपत्य असल्याने नगरसेवकपद वाचविण्यासाठी स्वतःच्या मुलाच्या शासकीय अभिलेखातील जन्मनोंदीत खाडाखोड करण्याचा प्रकार येवला नगरपालिकेच्या शहरातील एका माजी नगरसेवकासह त्याच्या कुटुंबियांना चांगलाच भोवला आहे.

येवला नगरपालिकेच्या सन २००१ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तिसरे आपत्य असून देखील प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी या माजी नगरसेवकासह त्याची पत्नी व इतर दोघे अशा एकूण चार जणांना येवला न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावासाची, तसेच २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. बिलाल बाबुभाई शेख असे या माजी नगरसेवकाचे नाव असून येवला न्यायालयात सुमारे १४ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका खटल्यात न्यायालयाने नुकताच हा निकाल दिला आहे.

येवला नगरपालिकेच्या २००१ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरातील प्रभाग क्रमांक-१ मधून नगरसेवकपदी निवडून आलेले बिलाल बाबुभाई शेख यांनी तिसरे आपत्य असून देखील निवडणूक लढविली होती. मात्र, निवडणूक निकालानंतर पुढे शहरातील तक्रारदार नागरिक योगेश जग्गनाथ सोनावणे यांनी याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी महेश झगडे यांच्याकडे चौकशीकामी अर्ज दाखल केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीअंती बिलाल शेख यांना नगरसेवकपदी राहण्यास अपात्र ठरवले होते. या निकालाविरोधात बिलाल शेख यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील करताना तिथे त्यांचे अपील फेटाळले गेले होते. पुढे हे प्रकरण येवला न्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वी शासकीय अभिलेखामध्ये खाडाखोड केल्याप्रकरणी येवला नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी जुगनसिंह ढाकरे यांनी १ मार्च २००४ रोजी येवला शहर पोलिसांत तक्रार दिली होती. येवला शहर पोलिसांनी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शेख बिलाल बाबुभाई, यांच्यासह शेख नसरीन बिलाल,तसेच नसीम शेख मुजीब,मुमताज शेख समसु,येवला नगरपालिका रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. एल. जाधव, कर्मचारी दिलीप नानासाहेब आमले आणि परिचारिका सरस्वती हिरामण तुंबारे, अशा एकूण ७ संशयित आरोपींविरोधात तेंव्हा गुन्हा नोंदवला होता. मात्र, पुढे डॉ. एल. एल. जाधव यांच्याबाबत कार्यवाही करताना पोलिसांनी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याकडे लक्ष वेधत डॉ. जाधव यांना 'दोषमुक्त' करण्यात आले होते.तर, इतर ६ आरोपींविरोधात येवला न्यायालयात खटला उभा राहिला होता.

येवला न्यायालयात जवळपास गेल्या तब्बल १४ वर्षांपासून सुरु असलेल्या खटल्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. एकूण सहा आरोपींपैकी मुख्य आरोपी शेख बिलाल बाबुभाई, शेख नसरीन बिलाल,शेख नसीम मुजीब,मुमताज शेख समसू या चौघांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने निकाल देताना या चौघांना २ वर्ष सश्रम कारावासाच्या शिक्षेसह २० हजारांचा दंड देखील ठोठावला आहे. संशियत आरोपी असलेले तत्कालीन पालिका रुग्णालयातील कर्मचारी दिलीप आमले व परिचारिका सरस्वती तुंबारे यांची मात्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा पुन्हा घरसला

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

दोन दिवसांच्या सुटीनंतर शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमाल भाव ७५२ रु प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने मंगळवारच्या तुलनेत २५० रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याच्या बाजार भावातील उतरती कळा अद्याप थांबलेली नाही. लासलगाव बाजार समितीत गेल्या एक महिन्यांपासून कांद्याचे बाजारभावात घसरण होत आहे. बाजारभावात वाढ होईल या अपेक्षेने उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा साठवून ठेवला आहे. कांद्याची आवक कमी तर बाजारभाव जास्त हे समीकरण ओळखले जात असले तरी आवक कमी असतानाही बाजारभाव कमी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याची साठवणूक क्षमता संपली असून, कांद्याला आता कोंब येत असल्याने कांद्याची प्रत खराब होत आहे. इतर राज्यातून सुद्धा कांदा मोठ्या प्रमाणावर येत आहे. शुक्रवारी उन्हाळ कांद्याला कमीत कमी दीडशे , जास्तीत जास्त ७७२ तर सरासरी ४०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. तसेच लाल कांद्याला कमीत कमी ५००, जास्तीत जास्त १३३१ तर सरासरी एक हजार रुपये भाव मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images