Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गो. तु. पाटील निवड

$
0
0

'तावडी बोली' संमेलन

अध्यक्षपदी गो. तु. पाटील

म. टा. वृत्तसेवा, येवला

येत्या ३० नोव्हेंबर रोजी जामनेर येथे होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय 'तावडी बोली' साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मराठीचे गाढे अभ्यासक, थोर विचारवंत व साहित्यिक प्रा. गो. तु. पाटील यांना मिळणार आहे. जामनेरच्या साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आयोजकांनी जाहीर करताना संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रा. पाटील यांच्या निवड जाहीर केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर परिसरात 'तावडी बोली' ही बोलीभाषा बोलली जाते. याच तावडी बोली भाषिकांनी ३० नोव्हेंबर रोजी जामनेर येथे पहिल्या राज्यस्तरीय 'तावडी बोली' साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आहेत. उद्घाटन प्रसिद्ध कवी ना. धो. महानोर यांच्या हस्ते होणार असून, साहित्यिक तथा जेष्ठ विचारवंत प्रा. गो. तु. पाटील संमेलनाध्यक्षपदी असतील. येवल्यातील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. गो. तु. पाटील यांनी समाजमनाला दिशा देणाऱ्या अनेक विषयांसह मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. 'अनुष्ठुभ' या नियतकालीकाचे माजी संपादक प्रा. पाटील यांचे 'ओल अंतरीची' हे 'आत्मचरित्र' नुकतेच प्रकाशित झाले आहे. याशिवाय, प्रा. पाटील यांनी आजवर शालेय विद्यार्थ्यांवर १६ चरित्रपर पुस्तिका लिहिलेल्या असून, 'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकावर आधारित पुस्तकेही संपादित केलेले आहे. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना दिशादर्शनाचे कामही प्रा. पाटील यांनी केलेले आहे. 'मटा'मधील 'सगुण-निर्गुण' या सदरात त्यांनी विविध विषयांवर केलेल्या स्तंभलेखनास वाचकांसह समाजमनाची दाद मिळालेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार गोटेंना अद्वय हिरेंचा पाठिंबा

$
0
0

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या अडचणींत वाढ

म. टा. वृत्तसेवा, धुळे

भाजपाविरुद्ध बंड पुकारणाऱ्या आमदार अनिल गोटे यांच्या मदतीला भाजपचे नेते तथा नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे चेअरमन अद्वय हिरे यांनी धाव घेतली आहे. धुळ्यात हिरेंनी गुरुवारी (दि. १५) पत्रकार परिषदेत घेऊन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यावर आरोप करीत त्यांच्या कार्यशैलीवर टीका केली. आमदार गोटेंच्या नेतृत्वावर आपल्याला पूर्ण विश्‍वास असून, पक्षाने त्यांची वेळीच समजूत काढावी. तसेच आगामी निवडणुकीत आपला आमदार गोटेंना पूर्णपणे पाठींबा असेल, असेही त्यांनी जाहीर केले.

धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल गोटे यांनी नाराजी व्यक्त करीत बंडाचे निशाण उभे केले आहे. त्यात आता नाशिक जिल्ह्यातील जिल्हा बँकेचे माजी चेअरमन अद्वय हिरे यांनी उडी घेतली आहे. हिरेंनी गुरुवारी आमदार गोटे यांच्या समर्थनार्थ धुळ्यात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अद्वय हिरे म्हणाले की, धुळे शहरात भाजपचे आमदार असताना अनिल गोटे यांना व्यासपीठावर बोलू न देणे ही कृती अन्यायकारक असून, त्यासाठी भाजपचे म्हणविणारे डॉ. सुभाष भामरे हे जबाबदार आहेत. ते स्वतः पक्षाचे सदस्य नसताना केवळ लोकसभेत वरून तिकिट मिळविणे, मोदी लाटेवर निवडून येणे हीच त्यांची पुण्याई असल्याची टीकाही हिरे यांनी केली. या पत्रकार परिषदेसाठी नाशिक बाजार समितीचे माजी सभापती काशिनाथ पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ निकम, शांताराम लाठर, अशोक बच्छाव उपस्थित होते.

उपऱ्यांना संधी देण्याची भूमिका घातक
धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मंत्री म्हणून काम करणारे भामरे हे अद्यापही भाजपचे साधे सदस्य नाहीत. त्यामुळे काम करताना ते नेहमीच भाजपच्या स्थानिकांना डावलत आले आहेत, असेही हिरे म्हणाले. आजवर डॉ. भामरेंनी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून उपऱ्यांना संधी देण्याची भूमिका घेतल्यानेच त्यांना विरोध करणे गरजेचे झाले आहे. आधी सटाणा आणि आता धुळे येथील निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे हे पक्षालाच मारक भूमिका घेत असल्याने त्यांनी वेळीच सुधारणा न केल्यास भविष्यात त्यांनाही याचा फटका बसू शकतो, असे सूतोवाच वजा इशाराही अद्वय हिरे यांनी यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मोहीम

$
0
0

घरा-घरात पोहचविणार सुविधांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त १६ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने डोअर टू डोअर कॅम्पेन हाती घेतले आहे. याअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण झोपडपट्टी भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहचून न्यायदान आणि सर्वसामान्यांना मिळणाऱ्या मोफत सवलती याची माहिती देणार आहेत. राष्ट्रीय विधी सेवा दिन ९ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी या उपक्रमाचे उद्घाटन झाले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पॅरा लिगल स्वंयसेवक ग्रामीण व शहरी भागातील झोपडपट्टी भागात जावून प्राधिकरणामार्फत पुरविल्या जाणाऱ्या योजनांची व दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती देणार आहेत. प्राधिकरणाकडे २० ते २५ स्वयंसेवक असून, शहरात अंबड, गंजमाळ, फुलेनगर, मल्हारखान, वडाळा गाव, भारतनगर यासह इतर झोपडपट्टी भागांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. प्राधिकरणाचे सचिव सुधीरकुमार बुक्के यांनी मल्हारखान झोपडपट्टी आणि अशोक स्तंभ परिसरात स्वंयसेवकांसह सर्वसामान्यांशी संवाद साधला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मोफत विधी सहाय्य, लोकअदालत, मध्यस्थी केंद्र, व्हिक्टिम कॉम्पेनसेशन स्कीम, मनोधैर्य योजना राबविली जाते. या योजनांसह इतर माहिती या उपक्रमाद्वारे नागरिकांना दिली जाणार असल्याचे बुक्के यांनी सांगितले.

येथे साधा संपर्क

कोणतीही कायदेशीर मदत हवी असल्यास नागरिकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, वैकल्पिक वाद निवारण केंद्र इमारत, मारुती मंदिराजवळ, जिल्हा न्यायालय आवार या पत्त्यावर किंवा ०२५३-२३१४३०६ या क्रमांकावर तसेच dlsansk@gmail.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन बुक्के यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेगाब्लॉमुळे रेल्वेप्रवाशांचे हाल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

रेल्वे प्रशासनातर्फे सातत्याने घेण्यात येणारे मेगा ब्लॉक प्रवाशांसाठी विशेषतः महिला व लहान मुलांसह वृद्धांसाठी गैरसोयीचे ठरत आहेत. येत्या रविवारी कल्याण मेगा ब्लॉकमुळे मनमाड कर प्रवाशांच्या जणू जीवनदायिनी ठरलेल्या पंचवटी, गोदावरी, जनशताब्दी या एक्स्प्रेस रद्द झाल्याने प्रवासी वर्गात तीव्र नाराजी आहे. आता रविवारी नाशिक, कल्याण, मुंबईकडे जायचे तरी कसे? असा सवाल प्रवासी विचारत आहेत. दुसरीकडे रेल्वे प्रशासन सर्वदूर विकासासाठी प्रयत्नशील असून त्या कारणामुळेच मेगा ब्लॉक घेतला जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मनमाड जंक्शनमधून पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या सुटतात. केवळ मनमाडच नव्हे तर मालेगाव, धुळे, नांदगाव, चांदवड, मराठवाडा येथील प्रवाशांना नाशिक, कल्याण, ठाणे, व मुंबई येथे जाण्यास या दोन्ही गाड्या सोयीस्कर आहेत. या रेल्वे मनमाड येथून सुटत असल्याने महिला, लहान मुले, वृद्ध प्रवासी यांना जागा मिळणे शक्य होते. याउलट वाराणसी, गोरखपूर, लखनौ येथून येणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी असते. त्यात जनरलचे डबे कमी असतात. आरक्षित डब्यात सामान्य प्रवाशांना बसू दिले जातेच असे नाही. त्यामुळे रविवारी महत्त्वाच्या दोन एक्स्प्रेस रद्द असल्याने प्रवासी वर्गाचे हाल होणार आहेत. रविवारी रेल्वे रद्द असल्याने बसचा पर्याय खुला आहे. मात्र बसचे भाडे रेल्वे पेक्षा अधिक असल्यामुळे प्रवाशांना अधिक त्रासदायक व आर्थिक झळ देणारे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूळव्याधीबाबतचे गैरसमज होणार दूर

$
0
0

लोगो - कल्चर क्लब

मूळव्याधीबाबतचे गैरसमज होणार दूर

'मटा कल्चर क्लब'तर्फे मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक मूळव्याध दिनानिमित्त मंगळवारी (२० नोव्हेंबर) संध्याकाळी ५ वाजता गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुल येथे 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'च्या वतीने 'मूळव्याध आजाराचे समज आणि गैरसमज' या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. एस. आर. रायते आणि एस. एम. पाटील प्रमुख पाहुणे असणार आहेत. मूळव्याध स्पेशालिस्ट डॉ. ज्ञानेश निकम सेमिनारमध्ये आजाराच्या संदर्भात सर्व माहिती सांगणार आहेत.

बदलत्या जीवनशैलीमुळे मूळव्याधीचा (पाइल्स) आजार होण्याची शक्यता अनेकदा वर्तवली जाते. बैठेकाम आणि आहाराच्या पद्धतीमुळे मूळव्याधीचा आजार अनेकांना होताना दिसतो. असे असूनही या आजाराविषयी फारसं मोकळेपणानं बोलले जात नाही. पण या आजाराच्या बाबतीतले गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. याच हेतूने मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या आजाराबाबत जनमाणसांत असणारे समज आणि गैरसमज यांवर डॉ. निकम यांच्या मार्गदर्शनातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. या सेमिनारमध्ये नागरिकांना आपल्या शंकाचे निरसन तज्ज्ञांकडून करून घेता येणार आहे. हे सेमिनार सर्वांसाठी खुला असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ट्राय’वर तक्रारींचा पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील टेलिफोन कंपन्या फोर जी सेवा सांगून थ्री जी सेवा देतात, फोन पोर्टेबिलिटी करताना ग्राहकांची अडवणूक केली जाते. शहराच्या बहुतांश भागात नेटवर्क मिळत नाही, ग्राहकांनी तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जात नाही, अशा अनेक तक्रारींचा पाढा ग्राहकांनी शुक्रवारी वाचला. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) वतीने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष जागृती अभियानात या तक्रारी दाखल झाल्या.

'ट्राय'च्या वतीने ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी परशुराम साईखेडकर नाट्यगृहाशेजारी असलेल्या औरंगाबादकर सभागृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला होता. या वेळी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या ग्राहक संघटनांचे प्रतिनिधीदेखील सहभागी झाले होते. 'ट्राय'चे सेक्रेटरी एस. के. गुप्ता, एस. एस. गलगली, के. मुरलीधरा हे अधिकारी उपस्थित होते. या वेळी सर्वांधिक तक्रारी मोबाइल कंपन्यांविरोधात होत्या. मोबाइल वापरताना ग्राहकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. कोणत्याही कंपनीची सेवा घेतल्यास परिस्थिती सारखीच असते. कॉल ड्रॉप होणे, वापर नसताना जास्त बिल येणे, बिलाबाबत तक्रार ऐकून न घेणे, न घेतलेली सेवा बळजबरी गळ्यात मारणे, त्याचप्रमाणे केबल ऑपरेटर नको असलेले चॅनल्स घ्यायला भाग पाडतात व जे चॅनल्स हवे आहेत ते देत नाहीत, अशा तक्रारी प्रामुख्याने ग्राहकांनी मांडल्या.

ग्राहक पंचायतीचे अरुण भार्गवे म्हणाले, की मोबाइल कंपन्या ग्राहकांना लुटण्याचे काम करीत आहेत. केबलचालक नको असलेले चॅनेल दाखवतात व जे चॅनेल हवे आहे, ते दाखवले जात नाही. महाराष्ट्रात एकूण ९४.२ लाख मोबाइलधारक असून १७.९ लाख लँडलाइनधारक आहेत. महाराष्ट्रात एकूण ९ कंपन्या दूरसंचार सेवा देणाऱ्या आहेत. 'ट्राय'ने केलेले नियम बऱ्याच ग्राहकांना माहीत नसतात ते जाणून घेण्यासाठी 'ट्राय'ने विशेष मोहीम राबवावी.

तक्रारींचे निरसन होत नाही!

ग्राहक संघटनेचे विलास देवळे म्हणाले, की ट्राय फक्त नियम करण्यासाठी आहे. त्यांनी केलेल्या नियमांचे पालन कोणतीही मोबाइल कंपनी करीत नाही. बिल भरूनसुद्धा बीएसएनएल इंटरनेट कनेक्शन देत नाही. 'ट्राय'ला या कंपन्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे फक्त तक्रारी दाखल करून घेतल्या जातात. त्याचे निरसन केले जात नाही. आज केबल कंपन्या मनमानी करीत असून, केबल कंपनी निवडण्याचे ग्राहकांना स्वातंत्र्य नाही. मोबाइल आणि केबल सेवा देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व ज्या कंपन्या चांगली सेवा देणार नाहीत, अशा कंपन्यांचे लायसेन्स रद्द करावे, असे त्यांनी सांगितले.

या होत्या तक्रारी

- शहरात फोर जी सेवा सांगून थ्री जी सेवा दिली जाते

- पोर्टेबिलिटी करताना ग्राहकांची पिळवणूक केली जाते

- केबलचालकांकडून अनावश्यक चॅनेल दाखवली जातात

- मोबाइल कंपन्या ग्राहकांच्या तक्रारी दाखल करून घेत नाहीत

- मोबाइलवर अनावश्यक जाहिराती ऐकाव्या लागतात

- मूल्यवर्धित सेवेसाठी जास्त पैसे आकारले जातात

- शहराच्या अनेक भागांत नेटवर्क मिळत नाही

- बहुतांश वेळा कॉल ड्रॉपच्या समस्येला तोंड द्यावे लागते

- केबलचालकांची मक्तेदारी मोडून काढावी

- पैसे भरूनही सेवा मिळत नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता : देवराम मते

$
0
0

देवराम मते

नाशिक : आडगाव येथील रहिवाशी देवराम महादू मते (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक रोटरी तर्फे महिलांची आरोग्य तपासणी

$
0
0

तिचं विश्व-लोगो

रोटरीतर्फे महिलांची आरोग्य तपासणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक रोटरी प्रेसिडेंट एन्क्लेव्हतर्फे शहरातील विविध परिसरात महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. रोटरीच्या वतीने मेमोग्राफी ही बस शहरात अनेक ठिकाणी नेण्यात येत आहे. या बसद्वारे महिलांचे गर्भाशय आणि स्तन कर्करोगासंदर्भात तपासणी करण्यात येत आहे. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम यासाठी कार्यरत आहे. महात्मानगर येथील संत कबीर नगर, वैशंपायन हायस्कूल, सिध्दार्थ नगर तसेच अंबड परिसरातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या आरोग्याची तपासणी या अंतर्गत करण्यात आली. रोटरीच्या या मोहिमेत सुमारे साडे चारशेहून अधिक महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. ९ डिसेंबरपर्यंत रोटरीतर्फे ही मोहीम शहरातील विविध भागात राबविण्यात येणार आहे. महात्मानगर परिसरात झालेल्या शिबिराप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रंजन ठाकरे, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, मेडिकल डायरेक्टर अंजली मेहता, रोटरीचे अध्यक्ष विवेक सायखेडकर, सेक्रेटरी अनिल देशमुख, संस्थापक अध्यक्ष नरेश शहा उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरी आत्महत्यांनी जिल्ह्यात गाठली नव्वदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध समस्यांनी ग्रस्त शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. बागलाण या दुष्काळी तालुक्यातील वायगाव येथे एका शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असून, त्यामुळे जिल्ह्यात चालू वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येने नव्वदी गाठली आहे.

केशव जिभाऊ सोनवणे (वय ४५) यांनी १४ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वायगाव येथील तलाठ्याने या घटनेचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. सोनवणे यांच्या मुलाच्या नावे शेती असून, पालनकर्ता म्हणून केशव सोनवणे यांचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे सोनवणे यांच्यावर काही कर्ज होते का यासह अन्य माहिती तपासण्यात येणार आहे.

जिल्ह्यात यंदा आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. जानेवारी ते १६ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यात ९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यापैकी सर्वाधिक आत्महत्या दिंडोरी आणि मालेगाव तालुक्यात झाल्या आहेत. या दोन्ही तालुक्यांमध्ये प्रत्येकी १५ शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. बागलाण तालुक्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १४ झाली आहे. निफाड तालुक्यात १२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

...

चार तालुक्यांत सर्वाधिक आत्महत्या

- मालेगाव : १५

- दिंडोरी : १५

- बागलाण : १४

- निफाड : १२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेकॉर्डब्रेक कारवाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी वाहतूक दंड वसुलीबाबत आजवरचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करीत अवघ्या तीन तासांत दोन हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करीत तब्बल १० लाख रुपयांचा दंड वसूल केला. आज, शनिवारीदेखील कारवाई करण्यात येणार असल्याचे शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

वाहतूक नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे जीवघेण्या अपघातांची संख्या वाढली आहे. यातील बहुतांश घटनांमध्ये वाहनचालकाचा जीव वाचणे शक्य होते. मात्र, वाहन चालकांनी हेल्मेट, सीटबेल्ट या प्राथमिक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने वेळोवेळी जनजागृती मोहिमादेखील राबवल्या. वाहनचालकांकडून निबंध लेखन, गणपती आरती करून घेण्यात आली. मात्र, वाहतूक नियमांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यामुळे शहर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनचालकांवर ठोस कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत शुक्रवारी कारवाईचा श्रीगणेशा करण्यात आला. पहिल्याच दिवशी १३ पोलिस स्टेशनमध्ये प्रत्येकी दोन ठिकाणी म्हणजे शहरात तब्बल २६ ठिकाणी बॅरेकेडिंग लावून नाकाबंदी लावण्यात आली. सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांना थांबवून दंड करण्यात आला. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे यांच्यासह सर्व सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हजर होते. या कारवाईसाठी २५० पोलिस कर्मचारी, वाहतूक शाखेचे १२ अधिकारी व १५६ कर्मचरी तैनात करण्यात आले होते. यावेळी काही सामाजिक संस्था व ट्रॅफिक अॅम्बेसेडर यांनी सहभागी होऊन वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन केले. साडेदहा वाजेच्या सुमारास सुरू झालेली ही कारवाई दुपारी दीड वाजेच्या सुमारास थांबवण्यात आली. या तीन तासांत दोन हजार वाहनचालकांकडून तब्ब्बल १० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आजवरची ही विक्रमी कारवाई ठरली आहे.

आजही होणार कारवाई

वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतत असून, त्यात सुधारणा होण्यासाठी दंडात्मक कारवाईची मोहीम सातत्याने घेण्यात येणार आहे. शनिवारीसुद्धा ही कारवाई सुरू राहणार असल्याने नागरिकांनी सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर, वाहतूक नियमांचे पालन करून दंडात्मक कारवाईपासून वाचावे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

महिला पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई

बहुतांश नागरिकांना या मोहिमीची माहितीच नव्हती. त्यामुळे पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईचा फटका अनेकांना बसला. यात काठेगल्ली परिसरातील त्रिकोणी गार्डन येथे तर एका महिला पोलिस अधिकाऱ्यालाही कर्मचाऱ्याने फाडलेल्या पावतीचे पैसे भरून सुटका करावी लागली. पैसे भरण्यास नकार दिल्याने जवळपास पोलिस कर्मचारी आणि महिला पोलिस अधिकाऱ्यात 'तू तू-मैं मैं' सुरू होती. यामुळे येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनादेखील या भांडणाचा शेवट काय होतो, याची प्रतीक्षा होती. शेवटी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी यात समझोता करीत महिला पोलिस अधिकाऱ्यास पैसे भरण्यास प्रवृत्त केले व हा वाद मिटवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निटातर्फे बुधवारी ‘प्रॉडक्टफेस्ट’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असोसिएशनची दुसरी परिषद 'प्रॉडक्टफेस्ट' बुधवारी (दि. २१) सायंकाळी पाच ते आठ यावेळेत नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टरच्या हॉलमध्ये होणार आहे. या परिषदेसाठी झोहो या कंपनीचे सह संस्थापक कुमार बेंबू व सिरअल उद्योजक व्हिझीबलचे संस्थापक विश्वास महाजन हे मार्गदर्शन करणार आहे.

कुमार बेंबू हे गोफ्रुगल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक व सीईओ आहेत तर महाजन हे टाय ग्लोबलचे माजी विश्वस्त, एमसीसीचे सचिव, प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे गुरू व गुंतणूकदाराही आहेत. त्यामुळे या तज्ज्ञ वक्त्यांचा या परिषदेतून मार्गदर्शन मिळणार आहे. नाशिकमधील स्टार्टअप उद्योजकांना प्रोत्साहन मिळून या क्षेत्रातील तज्ज्ञांचे आणि यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन मिळावे. तसेच नाशिकमधील स्टार्टअपला चालना मिळून येथे ही संस्कृती निर्माण व्हावी हे या परिषदेचे उद्देश आहे. या परिषदेतून विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन मिळणार आहे.

या परिषदेसाठी www.nashikkit.com. या ऑनलाइनवर नाव नोंदवता येणार आहे. या क्षेत्रातील सर्वांनी या परिषदेसाठी हजेरी लावावी, असे आवाहन 'निटा'चे अध्यक्ष अरविंद महापात्रा, उपाध्यक्ष शशांक वाघ, सर्व कार्यकारी व आयोजन समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी वाहनचालकांची दिवाळी अंधारात

$
0
0

वेतनासाठी अधिकाऱ्यांना साकडे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारी वाहनांवर कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या चालकांची आरोग्य विभागाकडून हेळसांड सुरू आहे. अशा १०२ पैकी ६५ वाहनचालकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा न केल्याने या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात गेली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याने या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य वाहन चालक कर्मचारी विभागीय संघटनेने जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. भोपाळ येथील अशकोम मेडिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे कंत्राटी वाहनाचालकांच्या मानधनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अशा एकूण ६५ वाहन चालकांचे ऑक्टोबर २०१८ चे वेतन संबंधित कंपनीने दिले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधित कंपनीशी फोनद्वारे संपर्क होत नसून कंपनीकडून वेतनाबाबत कार्यवाही होत नसल्याने कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. संबंधित कंपनीने ऑर्डरवर वेतनाबाबत कोणताही उल्लेख केला नसल्याने नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. जिल्ह्यातील वाहन चालकांना रेफरल ट्रान्सपोर्ट मार्फत एकत्रित वेतन प्रति महिना १२ हजार रुपये दिले जावे, अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सकांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

सहायक लिपिकाची मुजोरी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या वाहनचालकांना कनिष्ठ सहायक लिपिक अपमानास्पद वागणूक देतात. 'तुम्ही माझ्याकडे येऊ नका. तुमच्याशी बोलायला मला वेळ नाही. वाहन दुरुस्तीला लावल्यास माझ्याजवळ येऊन बसायचे. अन्य कुठल्याही अधिकाऱ्याकडे गेलात तर तुमचा पगार काढून देणार नाही' असे धमकावले जात असल्याची कैफियत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे. जिल्हा कंत्राटी वाहन चालक संघटनेने याबाबत निषेध नोंदविला असून संबंधित लिपिक अंबादास पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक गुन्हेविरोधात पोलिसांचे मार्गदर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

बँकांमधील ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर येथील सुसंवाद हॉल येथे पोलिस प्रशासन व शहरातील सर्व बँक शाखांचे व्यवस्थापक यांच्यात शुक्रवारी संयुक्त बैठक झाली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल, पोलिस उपअधीक्षक अजित हगवणे आदी उपस्थित होते.

बँक सुरक्षा व ऑनलाइन फसवणुकीच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. सध्या बँकांशी निगडित सायबर गुन्हे घडताना दिसून येतात. त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारांपासून ग्राहकांचे संरक्षण व्हावे यासाठी बँकांनी ग्राहकांमध्ये प्रबोधन करावे. बँकेत उचलेगिरी करणाऱ्यांमध्ये परप्रांतीय टोळी सक्रिय असून असे कोणी परप्रांतीय बँकेत आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

बँकेतील शिपाई, सुरक्षा रक्षकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात. तसेच एटीएमवर सुरक्षारक्षकांची नियुक्ती, सिक्युरिटी अलार्म अपग्रेड करणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी करणे याबाबत नीलोत्पल यांनी सूचना केल्या. यावेळी मालेगावमधील बँक व्यवस्थापकांसह पी. पी. वाडिले, किशोरकुमार परदेशी आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकसाठी

$
0
0

रुग्णवाहिकेच्या धडकेने दोन तरुण ठार

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

माहेरी गेलेल्या पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणासह त्यांच्या मित्रावर काळाने घाला घतला. दोघे तरुण दुचाकीने चिंचोली येथे जात असताना डांभुर्णीजवळील वळणावर जळगावकडून येत असलेल्या रुग्णवाहिकेने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. समाधान कोळी (वय २४), अंकुश शाम कोळी (वय २३) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

चांदसर येथील रहिवासी असलेला समाधान भाऊलाल कोळी हा पत्नीसह सुरत येथे कंपनीत कामाला होता. दिवाळीनिमित्त तो पत्नीसह गावी आला होता. शुक्रवारी दुपारी समाधान मित्र अंकुशसह दुचाकीने (एमएच ३९ बी २२९३) पत्नीला भेटण्यासाठी चिंचोली (ता. यावल) येथे जात होता. डांभुर्णीजवळील वळणावर असलेल्या माई पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या रुग्णवाहिकेने (एमएच १९ एम९२९५) त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात मार बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णवाहिका चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. तो रुग्णवाहिकेतून गर्भवती महिलेला किनगाव येथे घेऊन जात होता. घटनास्थळी जमलेल्या नारिकांनी खासगी वाहनाने महिलेला रुग्णालयात हलविले.

आठ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

समाधानचा गेल्या आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. त्याची पत्नी पाच महिन्यांची गरोदर आहे. दिवाळीनिमित्त दोघे गावी आले होते. समाधानच्या त्याच्या पश्‍चात आई, लहान भाऊ, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. अंकुशच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दीड वर्षीचा मुलगा असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरे स्मारकाकडे नाशिककरांची पाठ

$
0
0

मुंबई-पुण्याच्या पर्यटकांची गर्दी

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपला इतिहास जपता यावा, तो लोकांना कळावा, त्यांना पाहता यावा यासाठी ऐतिहासिक संग्रहालय बांधली जातात. महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शस्त्र आणि वस्तूंची अनेक संग्रहालये महाराष्ट्रात आहेत. नाशिक शहरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रयत्नातून बाळासाहेब ठाकरे संग्रहालय उभे करण्यात आले. मुंबई-पुण्याची पर्यटक मंडळी येऊन येथे शनिवार रविवार भेट देत असते मात्र या स्मारकाची महती नाशिककरांना माहीतच नाही असे निदर्शनास आले आहे.

गंगापूर रोड, नवश्या गणपती परिसर, गणपती नगर, सहदेव नगर, नाशिक येथे हे स्मारक असून सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हे स्मारक बघण्यासाठी खुले असते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शस्त्र आणि त्यासोबतच अप्रतिम अशा तैलचित्रांचे दर्शन येथे घडते. ही चित्रे वासुदेव कामत यांनी काढलेली आहेत. वस्तुसंग्रहालयातील सर्व शस्त्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या अमूल्य, ऐतिहासिक साठ्यातून दिली आहे. जानेवारी २०१७ मध्ये याचे लोकार्पण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. हे संग्रहालय आपल्या नावीन्यामुळे प्रकाशझोतात आले आहे. मात्र तेथे दिवाळीच्या काळात व इतरही दिवशी मुंबई पुण्याहून लोक येतात, नाशिककरांना या संग्रहाची कल्पनाच नाही.

..

बहुतेक नाशिककरांना बाळासाहेब ठाकरे संग्रहालय माहीत नाही याची खूप खंत वाटते. मुंबई तसेच पुण्याहून येथे पर्यटक येतात, शंका समाधान करून घेतात. त्यांना माहिती देताना आनंद होतो.

- रूपाली धात्रक, मार्गदर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिकअपची धडक; तरुण जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे बस स्टॉप येथे महामार्ग ओलांडणाऱ्या देविदास दत्तू गायधनी (वय ३८) यांना नाशिकरोडकडून सिन्नरच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप गाडीने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पिकअपचालक वाहनासह फरार झाला. जखमी देविदास गायधनी यांचा एक हात व एक पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर नाशिकरोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता : देवराम मते

$
0
0

देवराम मते

नाशिक : आडगाव येथील रहिवाशी देवराम महादू मते (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता एसएमएसद्वारे पोर्टेबिलिटी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोबाइलधारकाला पोर्टेबिलिटी करताना कोणतीही कंपनी अडवू शकणार नाही. येत्या जानेवारीपासून एका एसएमएसवर पोट्रेबिलिटी करता येणार असून, ग्राहकांना डीटीएच सेवेची ही पोट्रेबिलिटी करता येणार असल्याची माहिती 'ट्राय'चे सेक्रेटरी एस. के. गुप्ता यांनी दिली.

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे शुक्रवारी औरंगाबादकर सभागृहात झालेल्या ग्राहक जागरूकता अभियानात गुप्ता बोलत होते. या वेळी त्यांनी ट्राय राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. गुप्ता म्हणाले, की १९९७ पासून ट्राय काम करीत आहे. ग्राहकांना पोर्टेबिलिटी करताना अनेकदा फेऱ्या माराव्या लागतात. कंपन्या त्यांची अडवणूक करते. आता या अडवणुकीला आळा बसणार आहे. ग्राहकाने एसएमएस केल्यानंतर कंपनीला लगेचच पोर्टेबिलिटी करून द्यावी लागणार आहे. ज्या ग्राहकांचे बिल बाकी असेल अशा ग्राहकाचे बिल पोर्टेबिलिटीनंतर वसूल करावे, असे निर्देश देण्यात आले आहे. माय स्पीड नावाचे अॅप विकसित केले असून, ज्या शहरात, ज्या कंपनीचा सर्वांत चांगला स्पीड आहे, अशा कंपनीला ग्रीन मार्क दिला जातो. त्या खालोखाल जी कंपनी सर्व्हिस देत असेल, अशा कंपनीला पिवळा मार्क दिला जातो. त्यानंतरच्या कंपन्यांना पांढरा व लाल मार्क दिला जातो. त्यामुळे ग्राहकांना कोणती कंपनी निवडायची, याचे मार्गदर्शन या अॅपच्या माध्यमातून मिळते. या अॅपमुळे कंपन्यांनाही आपली सेवा चांगली कशी राहील, याकडे लक्ष देता येणार आहे. फोन सेवेचा वापर न करणाऱ्या ग्राहकांची सेवा बंद करण्याबाबत काही नियम केले आहेत. त्याचीही माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, की ग्राहकांच्या फोन खात्यात कमीत कमी २० रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा असल्यास कंपनीला अशा ग्राहकांची सेवा बंद करता येणार नाही. त्याचप्रमाणे मोबाइल डिस्कनेक्ट झाल्यावर पुन्हा सेवा सुरू करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. दूरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आपला दर हा सहा महिन्यांत बदलू शकत नाही. प्रत्येक कंपनीने त्यांचे दर हे सहा महिन्यांनी इंग्रजी भाषेत व क्षेत्रीय भाषेत प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. या वेळी त्यांनी कमर्शिअल कॉल, त्याचप्रमाणे कॉलच्या माध्यमातून होणारी ग्राहकांची फसवणूक यांची माहिती दिली. कोणत्याही ग्राहकाने आलेल्या कॉलवरून पर्सनल माहिती देऊ नये, असे त्यांनी सांगितले.

काय आहेत नियम?

- 'माय स्पीड' अॅपवरून ठरवा कोणत्या कंपनीची चांगली सेवा

- ग्राहकाच्या फोन खात्यात कमीत कमी २० रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा असल्यास कंपनीला अशा ग्राहकांची सेवा बंद करता येणार नाही

- दूरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्या सहा महिन्याच्या आत दर बदलू शकत नाही.

- बिल बाकी असले तरी पोर्टेबिलिटी करता येईल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅव्हल्स बसची तीन वाहनांना धडक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इनोव्हा कारला धडक दिल्याने इनोव्हा कारची पुढे उभ्या असलेल्या अन्य दोन पिकअपला धडक बसल्याची घटना जेलरोडवरील भीमनगर येथे गुरुवारी (दि. १५) सायंकाळी घडली.

नुकसानग्रस्त इनोव्हा कारचा (एमएच १५ इएक्स ४३३४) चालक अभिजित मोतीलाल महाना (वय ३२, रा. ओझरमिग) याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिजित त्याच्या कारने देवळाली कॅम्प येथून नांदूर नाक्याकडे जात होता. भीमनगर येथे अमूल पार्लरपुढे त्याने इनोव्हा कार उभी केली. बिटकोकडून भरधाव आलेल्या ट्रॅव्हल्स बसचा (एमएच १५ एके १३०९) चालक हनिफ इस्माईल खान (वय ५३, रा. श्रीनाथ ट्रॅव्हल्स, द्वारका) याने कारला मागून धडक दिली. त्यामुळे कारची धडक पुढे असलेल्या चालक मयूर जयराम डावखर (वय २५, रा. शिरसाणे, ता. चांदवड) याच्या महिंद्रा पिक अपला (एमएच १५ एफव्ही ५५२८) बसली. तसेच या पिकअपनेही त्यापुढे उभ्या असलेल्या अन्य दुसऱ्या पिकअपला धडक दिली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात बसचालक हनिफ इस्माईल खान याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विद्यापीठ बॅकफूटवर

$
0
0

\Bड्रेसकोडचा आग्रह सोडला; \Bपारंपरिक, सांस्कृतिक पोशाखाही संमती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अद्यावत तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत परिक्षार्थींनी वैद्यकीय ज्ञानशाखेच्या परिक्षेत कॉपी करू नये, यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नुकताच परीक्षार्थींना ड्रेसकोड लागू करण्याबाबत निर्णय जाहीर केला होता. कुठल्याही धर्म आणि संप्रदायाच्या विद्यार्थ्यांना यातून सूट नसेल असाही उल्लेख संबंधित परिपत्रकात होता. या नियमात थोडीशी शिथिलता आणत विद्यापीठ बॅकफूटवर आले आहे.

सुधारित नियमानुसार आता पारंपरिक आणि सांस्कृतिक पोशाखही परीक्षा केंद्रावर चालेल. मात्र, हा पोशाख परिधान करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रावर १ तास अगोदर पोशाख तपासणीसाठी उपस्थित रहावे लागेल, अशा सुधारित सूचनांचा समावेश असलेले नवे आदेश परीक्षा विभागाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत.

महाराष्ट्र टाइम्सने याबाबत १२ नोव्हेंबर रोजी 'बूट नको, चप्पलच हवी !' अशा शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षांना २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. यामध्ये विद्यार्थी गैरप्रकार करत असल्याची बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आली. ड्रेसकोडसारख्या कडक नियमावलीचा अभाव असण्याच्या परिस्थितीचा गैरफायदा काही विद्यार्थी घ्यायचे. या प्रकारांना चाप बसविण्यासाठी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने ठराव मांडत 'नीट' परीक्षेच्या धर्तीवर परीक्षार्थींना ड्रेसकोड लागू केला. या कडक नियमावलीतून अल्पसंख्यांक दर्जा असलेल्या मेडिकल कॉलेजच्या परीक्षा केंद्रांनाही पोशाखांबाबत सूट देण्यात आली नव्हती. हिवाळी सत्राच्या परीक्षा २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील ५० हजार विद्यार्थ्यांना यंदापासून ड्रेसकोडच्या नियमाला सामोरे जावे लागणार आहे. उन्हाळी सत्र २०१९ च्या परीक्षांसाठी सुधारित नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने परीक्षा केंद्रांना पाठविलेल्या सुधारीत अध्यादेशात म्हटले आहे.

\Bअसे असतील निकष\B

वैद्यकीय शाखेतील प्रवेशासाठी केंद्रीय स्तरावर पार पडणाऱ्या 'नीट' परीक्षेच्या धर्तीवर हे निकष बनविण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना अर्ध्या बाहीचे शर्ट, टी-शर्ट, फिकट रंगाचा शर्ट किंवा फुल पँट परिधान करावे लागतील. शर्टला असणारे बटन हे छोटे असावे व नक्षीदार बटन नसावे, अंगठी, गळ्यातील साखळी यांसह अन्य कुठल्याही प्रकारचे दागिने घालून परीक्षा देता येणार नाही. घड्याळ, मोबाइल किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरता येणार नाही. अॅप्रन, टोपी, गॉगल, मनी पर्स, वॉलेटही वापरता येणार नाही. पायात शूज ऐवजी चप्पल किंवा स्लीपर वापरावी लागेल. हे सर्व नियम विद्यार्थिनींनाही लागू असतील याशिवाय त्यांना बांगड्या, पीन, चेन, हार, हँड बॅग वापरता येणार नाही, त्यांना साडी किंवा सलवार कमीज चालू शकेल. सुधारित नियमानुसार पारंपरिक व सांस्कृतिक पोशाख परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेआधी तासभर परीक्षा केंद्रांवर पोशाखांच्या तपासणीसाठी पोहचावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images