Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दिवाळी हास्य महोत्सवाने रंगत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड येथील आनंद हास्य योग क्लबचा दिवाळी हास्य महोत्सव उत्साहात पार पडला. आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या क्लबने यंदा दिवाळीचे पाच दिवस विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करून आगळ्यावेगळ्या ढंगात दिवाळी साजरी केली.

क्लबचे अध्यक्ष वसंतराव पेखळे, उपाध्यक्ष रमेश नवले, खजिनदार श्याम बोरकर, आशा बोराडे, जयमाला भुतडा, अनिल वंजारी, वैशाली सहस्रबुद्धे, चंद्रकला मालपाणी, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते, मतिमंद मुलांच्या शाळेच्या संचालिका सुहासिनी घोडके, चौधरी यात्रा कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी, कारडा कन्स्ट्रक्शन्सचे संचालक नरेश कारडा, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, रमेश धोंगडे, गणेश भुतडा आदींनी चर्चासत्रांत सहभाग घेतला. महोत्सवांतर्गत दिवाळीचे पाचही दिवस समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना क्लबमध्ये पाचारण करून आजच्या धावपळीच्या जीवनात आपले व समाजाचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हास्ययोग कसा उपयुक्त आहे, याविषयी चर्चा झाली. ज्येष्ठ व तरुणवर्ग यांच्यातील विचारांचे अंतर कसे कमी करता येईल, सध्याचे ज्वलंत सामजिक प्रश्न याविषयीदेखील संवाद साधण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संतांचे विचार आचरणात आणा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जगात आई हाच खरा गुरू असून, इतर नात्यांपेक्षा गुरुबंधू, गुरू-शिष्य नाते श्रेष्ठ आहे. आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक असून, त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी साऱ्यांनी संतांचे विचार आचरणात आणावेत, व्यसनमुक्तीसाठी संत जनार्दन स्वामींचे

अनुष्ठान करावे, असे प्रतिपादन महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी केले.

संत जनार्दन स्वामींच्या पुण्यस्मरणार्थ श्रीक्षेत्र वेरुळ येथे दि. १३ ते २० डिसेंबरदरम्यान जय बाबाजी धर्मसंस्कार सोहळा होणार आहे. त्याचे निमंत्रण भाविकांना देण्यासाठी महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांचे नाशिकरोडला प्रवचन झाले. निवृत्ती कांडेकर, बाळासाहेब गामणे, अशोक खालकर, मंगेश डर्ले, रवींद्र भोई, शांताराम सांगळे, सुदाम सोनवणे, बापू काशीद, अंबादास आगळे, शांताराम भागवत, केशव भोर आदी उपस्थित होते. शांतिगिरी महाराज म्हणाले, की देशभक्ती, धर्मकार्य, समाजकार्यासाठी होणाऱ्या या सोहळ्यामध्ये प्रत्येक गाव व शहरातून भक्तांनी उपस्थित राहावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहो आश्चर्यम्! लोकशाही दिनात तक्रारीच नाहीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विभागीय महसूल आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या विभागीय लोकशाही दिनात एकही तक्रार प्राप्त न झाल्याने सोमवारच्या विभागीय लोकशाहीदिनासाठी आलेले विविध विभागांचे अधिकारी उपस्थिती लावून माघारी फिरले.

विभागीय लोकशाहीदिनातील तक्रारींच्या दुष्काळामुळे कोणी तक्रार देता का तक्रार, असे म्हणण्याची नामुष्की उपस्थित अधिकाऱ्यांवर ओढवली होती. दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय स्तरावरील लोकशाहीदिनाचे आयोजन येथील विभागीय महसूल आयुक्तालयात केले जाते. यात महिला लोकशाहीदिनाचाही समावेश असतो. ज्या तक्रारदार नागरिकांना जिल्हा स्तरावरील लोकशाहीदिनात त्यांच्या तक्रारींवर दिलेला निकाल मान्य नसतो, असे नागरिक, महिला विभागीय लोकशाहीदिनात आपली तक्रार दाखल करून आपले म्हणणे मांडू शकतात. परंतु, गेल्या वर्षभरापासून विभागीय लोकशाहीदिनात तक्रार दाखल करण्याच्या प्रमाणात मोठी घट झालेली दिसून आली आहे. ऑक्टोबर महिन्यातील विभागीय लोकशाही दिनातदेखील एकही तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झाली नव्हती. त्याचीच पुनरावृत्ती नोव्हेंबर महिन्याच्या विभागीय लोकशाही दिनातही झाली. सोमवारच्या लोकशाही दिनातही एकही तक्रार प्राप्त झाली नाही. लोकशाही दिनातही तक्रारींचा दुष्काळ निर्माण झाल्यामुळे तो औटघटकेचा ठरू लागला आहे. लोकशाही दिनाव्यतिरिक्त नगर जिल्ह्यातील अजून दोन प्रकरणांवरही सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र, या सुनावणीकडेही संबंधित तक्रारदारांनी पाठ फिरविल्याने ती होऊ शकली नाही.

तक्रारदारांची प्रतीक्षा

नियोजित वेळेप्रमाणे विभागीय लोकशाहीदिनास सर्व विभागांचे प्रमुख आयुक्तालयात उपस्थित होते. परंतु, दिलेल्या वेळेत एकही तक्रार दाखल झाली नव्हती. त्यानंतरही जवळपास अर्धा तास उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी तक्रारदाराची प्रतीक्षा केली. परंतु,कोणीही तक्रारदार लोकशाहीदिनात हजर न झाल्याने शेवटी उपस्थित अधिकारी माघारी परतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोपाळनगरला हरिनाम सप्ताह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अमृतधाम परिसरातील गोपाळनगर येथे आज, मंगळवार (दि. १३)पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी त्याचा समारोप होणार आहे. आमदार बाळासाहेब सानप, नगरसेविका प्रियंका माने, रुची कुंभारकर, पूनम मोगरे, मच्छिंद्र सानप, वाळूमामा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी साडेआठला या सप्ताहाचे उद्घाटन होणार आहे.

या सप्ताहात काकडा भजन, विष्णुसहस्रनाम, पूजा, आरती, ज्ञानेश्‍वरी पारायण, नारदभक्तीसूत्र चिंतन, सामुदायिक हरिपाठ, हरिकीर्तन व भजन होणार आहे. हरिनाम सप्ताहात दामोदर महाराज गावले यांचे सातही दिवस दुपारी ३ ते ५ या वेळेत प्रवचन होणार आहे. सोमवारी (दि. १९) दुपारी ३ वाजता परिसरातून दिंडी काढण्यात येणार आहे. सप्ताहात मंगेश महाराज बोढाई (म्हसरूळ), अशोक महाराज निकम (चांदवड), वैभव महाराज जोशी (भिगवण), महादेव महाराज राऊत (बीड), जनक महाराज सोळंकी (म्हसरूळ), परमेश्वर महाराज इंगळे (निफाड), राजेंद्र महाराज थोरात (निफाड) यांची कीर्तनसेवा होणार आहे. भागवताचार्य साहेबराव महाराज मुरकुटे यांचे मंगळवारी (दि. २०) सकाळी ९ वाजता काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वात मोठ्या लढ्याचे माधवरावांनी केले नेतृत्व

$
0
0

gautam.sancheti@timesgroup.com

नाशिक - स्वातंत्र्यानंतर तब्बल ५८ वर्षे असा प्रदीर्घ काळ चाललेला खंडकरी शेतकऱ्यांचा लढ्याचे नेतृत्व भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे नेते व माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड यांनी केले होते. महाराष्ट्रातील एकमेव हा लढा आहे. या संघर्षातून सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन २०१२ साली सरकारने परत केली.

स्वातंत्र्यपूर्व काळात कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, व नाशिक जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी या भागातील शेतजमिनी खंडाने घेऊन त्यावर ऊस उत्पादन व साखर उत्पादनाला सुरुवात केली. त्यानंतर शेतजमीन कमाल धारणा कायद्यामुळे या सर्व जमिनी कारखान्यांच्या धारणक्षेत्रात गणल्या गेल्यानंतर अतिरिक्त घोषित करण्यात आल्या. त्यामुळे अतिरिक्त क्षेत्र शासनाच्या ताब्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने १९६३ साली महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ स्थापन करून या जमिनी महामंडळाला दिल्या. त्यापैकी बहुतांश शेती ही खंडकरी शेतकऱ्यांची होती. त्याविरुदध १९५४ पासून लढा सुरू झाला व तो तब्बल ५८ वर्षे चालला. त्यानंतर २०१२ मध्ये या जमिनी शेतकऱ्यांना सरकारने परत केल्या. राज्यात असा प्रदीर्घ काळ चालणार हा लढा त्यामुळेच एकमेव ठरला. विशेष म्हणजे यातून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी कॉ. माधवराव गायकवाड व त्यांच्या बरोबर या लढ्यात संघर्ष करणाऱ्यांचा सत्कारही केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोलकरणीवर चोरीचा गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरकामासाठी येणाऱ्या मोलकरणीनेच घरातील दागिने चोरल्याची तक्रार घरमालकाने केली असून गंगापूर पोलिसांनी संशयित मोलकरणीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. १०) सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडल्याचा दावा संबंधित घरमालकाने केला आहे.

प्रसाद अरविंद चौधरी (वय ४१, रा. फ्लॅट क्र. २१, अभ्युदय कॉलनी, गंगापूर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. वैशाली मनोज दुसाने (वय ४३, रा. तुळजाभवानी मंदिराजवळ, गंगापूररोड) असे संशयित मोलकरणीचे नाव आहे. ३६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयितेला अद्याप अटक केली नसल्याची माहिती गंगापूर पोलिसांनी दिली आहे.

बसमधून दागिने लांबविले

शालिमार ते द्वारका सर्कल दरम्यान शहर बसने प्रवास करीत असलेल्या महिलेच्या पर्समधून चोरट्याने सुमारे ३९ हजार रुपयांचे दागिने लांबविले. ही घटना रविवारी (दि. ११) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

रोशनी संजय गडकर (वय ४२, रा. संभाजीनगर, लहवित) यांनी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्या शनिवारी सायंकाळी द्वारका सर्कलकडे जाण्यासाठी शालिमार येथून शहर बसमध्ये बसल्या. या प्रवासादरम्यान चोरट्याने त्यांच्या पर्समधून सव्वा तोळ्याची सोन्याची पोत, सोन्याचे तीन ग्रॅमचे कर्णफुले यासह साडे बारा हजार रुपयांची रोकड असा ३८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे गडकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

..

कारची काच फोडून सीडी प्लेअरची चोरी

महात्मानगर परिसरात उभ्या असलेल्या कारची काच फोडून चोरट्याने सीडी प्लेअर आणि दोन स्पीकर चोरून नेले. रविवारी (दि. ११) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अभय माधवराव कोडिलकर (वय ४६, रा. देवकी सोसायटी, महात्मानगर) यांनी गंगापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. घराजवळ पार्क केलेल्या कारच्या डाव्या बाजूच्या मागील दरवाजाची काच चोरट्याने फोडली. आतील सीडी प्लेअर आणि दोन स्पीकर असा पाच हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

जेलरोडला घरफोडी

जेलरोड परिसरात बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने ३० हजारांच्या रोकडसह एकूण ४० हजारांचा ऐवज चोरून नेला. भास्कर देवराम पवार (वय ४६, रा. चिन्नोर सोसायटी, शिवाजीनगर, जेलरोड) यांनी नाशिकरोड पोलिसात फिर्याद दिली आहे. पवार कुटुंबीय ९ ते ११ नोव्हेंबर या काळात बाहेरगावी गेले होते. त्यावेळी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने ३० हजारांची रोकड आणि १० हजार रुपयांची सोन्याची चेन, लक्ष्मी नारायण एजन्सीचे ४० धनादेश चोरून नेले.

चेहडीत दोन मोबाइल लंपास

दरवाजा लोटून घरात प्रवेश करीत चोरट्याने दोन मोबाइल चोरून नेले. चेहडी येथील उज्ज्वल कॉलनीमध्ये शनिवारी (दि. १०) सकाळी सात वाजता हा प्रकार घडला. तुकाराम लक्ष्मण आडके (वय ७८) यांनी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. प्रत्येकी १० हजार रुपयांचे दोन मोबाइल चोरीस गेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

..

दहशत पसरविणाऱ्यांना अटक

शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही धारदार चाकू व कुऱ्हाडीचा लाकडी दांडा हाती बाळगून राजीवनगर झोपडपट्टी परिसरात दहशत पसरविणाऱ्या दोघा भावांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे. सुनील माणिक वाघमारे (वय ३१, रा. कल्याण), अनिल माणिक वाघमारे (वय ३०, रा. इंदिरानगर) अशी दोघांची नावे आहेत. पोलिस कर्मचारी सागर अशोक कोळी (वय २४) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित रविवारी (दि. ११) दुपारी तीनच्या सुमारास राजीवनगर झोपडपट्टी परिसरात चाकू व कुऱ्हाडीचा दांडा सोबत बाळगून आरडाओरड करून दहशत पसरवित होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हा

मोबाइलवर बोलण्याच्या कारणावरून एकमेकांशी वाद घालून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या चौघांवर भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी साडे नऊच्या सुमारास जुन्या नाशकातील शिवाजी चौकातील समाज मंदीरा समोर हा प्रकार घडला.

पोलिस कर्मचारी इरफान गुलामरसुल शेख (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. हुसेन अहमद सैय्यद (५४), सलमान हुसेन सैय्यद (वय २१), अरबाज हुसेन सैय्यद (१९, तिघेही रा, नाईकवाडी) आणि जहिर शहा मेहमुद शहा (वय ४२, रा. फकीरवाडी, दरबाररोड, जुने नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

..

संशयित आरोपी वृद्धाची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अल्पवयीन गतिमंद मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल असलेल्या खंडू मुरलीधर खुऱ्हे (वय ७०, रा. दारणा संकुल, पळसे) या संशयित वृद्धाने सोमवारी दुपारी आपल्या घरात फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. खंडू खुऱ्हे याने त्याच्या शेजारी वास्तव्यास असणाऱ्या गतिमंद अल्पवयीन मुलीला स्वतःच्या घरात नेवुन तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न करून विनयभंग केला होता. या प्रकरणी त्याच्याविरोधात नाशिकरोड पोलिसात रविवारी (दि. ११) पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकारानंतर आलेल्या नैराश्यातून खुऱ्हे याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पळसेचे पोलिस पाटील सुनील गायधनी यांनी दिलेल्या माहितीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सिडकोत गळफास

नाशिक : सिडकोतील इंदिरा गांधी वसाहतीमध्ये राहणाऱ्या संजय प्रल्हाद वायदंडे (वय ४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बालभारतीमागे वसाहत क्रमांक दोनमध्ये रविवारी (दि. ११) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, असे अबंड पोलिसांकडून सांगण्यात आले.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षासह दोन दुचाकींची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून रिक्षा, पल्सर बाइकसह तीन वाहने चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मखमलाबाद नाका परिसरातून रिक्षा चोरीस गेली असून या प्रकरणी दिलीप वामन गवळी (वय ५७, रा. काकड चाळ, मखमलाबाद नाका) यांनी फिर्याद दिली आहे. अशोकस्तंभ परिसरात राहणाऱ्या राकेश जाधव यांच्या मालकीची रिक्षा (एमएच १५ एके ५६७०) गवळी चालवितात. ८ आणि ९ नोव्हेंबर या कालावधीत त्यांच्या घरासमोर रिक्षा उभी असताना चोरट्याने ती चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाहन चोरीची दुसरी घटना महात्मानगर परिसरात घडली. सागर कुशाल बेंडकुळे (वय २१) याने गंगापर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. ४ आणि ५ नोव्हेंबर या काळात त्यांची पल्सर (एमएच १५ जीडी ८८९८) चोरट्याने महात्मानगर येथील शिवशक्ती अपार्टमेंटमधून चोरून नेली. पाथर्डी गौळाणे रोड परिसरातील ईश्वरी पॅराडाईज या इमारतीच्या पार्किंगमधून चोरट्याने ६५ हजार रुपययांची अॅक्टिव्हा मोपेड (एमएच १५ जीएन ५५५७) चोरून नेली. माधुरी भाऊसाहेब पाटील (वय ३०) यांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेशन परिसरात करपलेय बालपण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

बालपणाचा आनंद अविस्मरणीय असतो. बालपण म्हणजे हसण्या बागडण्याचे दिवस. मात्र, नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात बालपण करपले गेलेल्या बाल भिकाऱ्यांची मोठी संख्या दिसून येते. आज देशभर बालकांसाठीचा साजरा होत असलेला बालदिन या बालभिकाऱ्यांच्या गावीही नसल्याचे वास्तव आहे.

देशभरात आज, बुधवारी बालदिन साजरा होत आहे. ज्या बालकांसाठी हा बालदिन साजरा केला जातो त्यातील कित्येक बालकांचे बालपणच हरवलेले असल्याचे चित्र नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर दिसून येते. या रेल्वे स्टेशनवर सुमारे ४० लहान मुले-मुली बालभिकारी म्हणून आपली गुजराण करीत आहेत. दिवसभर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांकडून मिळेल ते अन्न पोटात ढकलून आला तो दिवस काढण्यातच या बालकांचे बालपण करपले गेले आहे. रेल्वे स्टेशनवरील प्रवेशद्वार, प्लॅटफॉर्म नंबर चारवरील जिने, सिन्नर फाटा प्रवेशद्वार यासह नाशिकरोड बसस्थानक परिसरात बालभिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. यात मुली देखील आहेत. यातील बहुतेक मुला-मुलीं रात्री रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाच्या जिन्यांखालीच झोपलेले असतात. कुटुंब नावाची संस्थाच या मुला-मुलींसाठी नाही. यातील काही मुला-मुलींसोबत त्यांची आईही आहे. या बालकांना अंगभर कपडे, अंथरुण-पांघरुण, सकस आहार आणि शिक्षण अशा प्राथमिक गरजांपासूनही वंचित रहावे लागत असल्याचे चित्र आहे.

कुमारिका मातेची वेळ

स्टेशन व परिसरात भीक मागून पोटाची खळगी भरणाऱ्या बाल भिकाऱ्यांमध्ये काही मुलीही आहेत. यातील काही मुलींवर कुमारमाता बनविण्यात असल्याचे त्यांच्याकडील लहान बाळ बघून दिसून येते. आरोग्यविषयक कोणत्याही सुविधा या मुला-मुलींना मिळत नाही. वैयक्तिक स्वच्छताही राखली जात नसल्याने बहुतांश बाल भिकारी विविध आजारांनी त्रस्त असल्याचे दिसून येते. काही बाल भिकारी मानसिक रुग्णही झालेले असल्याचे दिसून येते. यात मुलींचे प्रमाण जास्त आहे.

(फोटो : नवनाथ वाघचौरे)

लोगो: बालदिन विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


४९ कुटुंबे मदतीस अपात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत ८९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून त्यापैकी निम्म्याहून अधिक म्हणजे ४९ शेतकरी कुटुंबे सरकारी मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहेत. उर्वरित २६ शेतकरी कुटुंबच मदतीसाठी पात्र ठरले असून १४ प्रकरणे प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. चालू वर्षातही वैफल्यग्रस्त झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी गळफास घेऊन, विषारी औषध सेवन करून किंवा लोहमार्गावर रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. १ जानेवारी ते १२ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या ८९ घटना घडल्या आहेत. कर्जबाजारीपणा, नापिकी, विविध कारणांनी होणार शेतपिकांचे नुकसान यांसारख्या विविध कारणांमुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास त्याच्या कुटुंबीयांना एक लाखाची मदत करण्याचे सरकारचे धोरण आहे. शेतकरी आत्महत्येची घटना घडल्यानंतर संबंधित तालुक्यातील महसूल, पोलिस आणि कृषी विभागाकडून अशा घटनेचा पंचनामा केला जातो. आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जातो. त्याबाबतचा अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जातो. मदतीच्या निकषांमध्ये ही कारणे बसत असतील तर अशी शेतकरी आत्महत्येची प्रकरणे मदतीस पात्र ठरविली जातात.

तीन प्रकरणांची फेरचौकशी

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत ऑगस्टपासूनची ३१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. निकषांमध्ये बसत नसल्याने १९ शेतकरी कुटुंबांना मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली आहे. नऊ शेतकरी कुटुंब मदतीसाठी पात्र ठरली आहेत तर तीन प्रकरणांच्या फेरचौकशीचा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी यंत्रणेला दिले आहेत. चालू वर्षात आतापर्यंत ४९ शेतकरी कुटुंब मदतीसाठी अपात्र ठरले आहेत. २६ कुटुंब पात्र ठरले असून शेतकरी आत्महत्यांची १४ प्रकरणे अजूनही प्रलंबित असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या नोंद

तालुका आत्महत्या

दिंडोरी १५

मालेगाव १५

बागलाण १३

निफाड १२

नांदगाव ८

सिन्नर ८

नाशिक ४

चांदवड ३

देवळा ३

इगतपुरी १

कळवण १

त्र्यंबकेश्वर ३

येवला ३

एकूण ८९

* पेठ, सुरगाणा : शून्य आत्महत्या नोंद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळूनि घाम मागूया भाकरी, नाचतो डोंबारी!

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

एकीकडे केवळ राज्य आणि केंद्र सरकार शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करीत असताना वास्तव मात्र वेगळेच आहे. देवळाली-भगूरसह नाशिक शहरात असलेल्या अनेक डोंबारी कुटुंबे दोन ते पाच वर्षांच्या कोवळ्या जीवांना जीवघेण्या कसरती करायला लावून, मिळणाऱ्या पैशांवर उदरनिर्वाह करतानाचे चित्र कायम आहे. असे किती बालदिन आले-गेले पण ही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून पतीतच राहिली.

गेली काही वर्षे सरकार मोठा गाजावाजा करून बालदिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवित आहे. अशा बालकांच्या भवितव्याचा केवळ बालदिनापुरता ऊहापोह केला जातो. नंतर त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. देवळाली कॅम्पच्या सदर बाजार भागासह जुन्या बस स्थानक परिसरात गीता कुमार नामक छत्तीसगढ येथील विलासपूर भागात राहत असलेली अवघ्या पंचविशीतील महिला आपल्या कुशीत एक लहानगं लेकरू, अडीच वर्षांची रिता अन तीन वर्षांचा राम या मुलांना घेऊन डोंबाऱ्याचा खेळ करीत होती. नागरिकही नेहमीप्रमाणे मनोरंजनासाठी जमले होते.

डोंबारी हा शारीरिक कसरतींचे खेळ करून भीक मागून जगणारा समाज आहे. या समाजातील मुलीचे लग्न हे बालवयातच केले जाते आणि तिला डोंबाऱ्याचे सगळे खेळ येणे बंधनकारक असते. खेळ न येणाऱ्या बहुतांश मुलींना लग्नास अडचणी येतात. डोंबाऱ्याच्या घरी मूल जन्मल्यानंतर त्याला लहानपणापासून खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. सहा इंचाच्या गोल रिंगमधून संपूर्ण शरीर आत टाकणे व बाहेर काढणे अशा प्रकारचा खेळ करताना त्या चिमुकल्या जिवाला असह्य वेदना होतात. त्या जाणवू नयेत म्हणून विविध प्रकारच्या नशेच्या पदार्थांचा प्रयोग केला जातो. ही चिमुकली बालकं अल्पवयातच व्यसनांच्या आहारी जातात. बदलत्या काळात हा समाज खूपच मागे राहिला. या समाजाला शासनाच्या कुठल्याही योजनेचा फायदा झाला नाही. हा समाज सुधारला पाहिजे असे म्हणणाऱ्या समाजातील काही घटकांचा आवाज सरकारपर्यंत पोहचला असला तरी खरे लाभार्थी वंचित असल्याचे दिसून येते.

साहसी खेळांचे जन्मापासूनच प्रशिक्षण

ऑलिम्पिकमधील खेळाडूंनाही लाजवेल, अशा कसरती डोंबारी समाजातील मुली करतात. पूर्वी डोंबाऱ्याचा खेळ आला की अर्धा गाव जमा होऊन हा खेळ पहायचा. त्यात रिंगमधून शरीर बाहेर काढणे, तारेवर बांबू घेऊन चालणे, कोलांटउड्या मारणे, डोळ्यात सुई पकडणे असे नानाप्रकारचे साहसी खेळ दाखवले जायचे. खेळ झाल्यावर जमलेले बघे आठआणे, रुपया व जास्तीत-जास्त दहा रुपये द्यायचे. आताही खेळ पाहणारे खिशात हात घालून पाच, दहा, वीस रुपये काढून देतात. मात्र, त्यांना बघणारे डोळेही कमी झाले आणि देणारे हातही.

विचार करायला भाग पाडणारी अशी स्थिती आजही समाजात आहे. आपल्या कुटुंबासह वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी केल्या जाणाऱ्या पद्धतीमुळे कायद्यानेही यांना आडकाठी आणता येणे शक्य नाही.

- संतोष कटारे, नागरिक

चिमुरड्या मुलांच्या प्राथमिक गरज पूर्ण करण्यासाठी असमर्थ असलेले किंवा पारंपरिक पद्धतीने हे चालत आले म्हणून हे काम करणारा समाजदेखील मोठ्या प्रमाणावर या अशा खेळांमध्ये दिसून येतो.

- सुभाष बोराडे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर शिक्षण मंडळावर देवरेच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारीपदी अखेर उदय देवरे यांची नियुक्ती झाली आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांची राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष म्हणून पदोन्नतीवर बदली झाल्याने त्यांच्या जागी शिक्षण विभागाने उदय देवरे यांची नियुक्ती केली होती. मात्र, उदय देवरे हे द्वितीय श्रेणीचे अधिकारी असल्याने त्यांच्या नियुक्तीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आक्षेप घेतला होता. त्याच्या जागी नितीन बच्छाव यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नितीन बच्छाव यांच्याकडे कामाचा भार असल्याने त्यांनी या ठिकाणी काम करण्यास असर्मथता दर्शविली होती. उदय देवरे हे द्वितीय क्षेणीचे अधिकारी असल्याने त्यांच्या जागी प्रथम श्रेणीचे अधिकारी द्यावेत असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शिक्षण विभागाला कळविले होते. नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी हे पद हे द्वितीय श्रेणीचेच असल्याचे सांगत शिक्षण मंडळाने पुन्हा उदय देवरे यांनाच नियुक्ती दिली आहे. नितीन उपासनी हे प्रथम श्रेणीचे अधिकारी असले तरीही त्यांची नेमणूक त्यांच्या सोयीनुसार नाशिक महानगरपालिकेत करण्यात आली होती असे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले आहे. मंगळवारी शिक्षण विभागाच्या प्रशासनधिकारी पदाचा उदय देवरे यांनी पदभार स्वीकारला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखाचे दागिने बसमधून लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या बॅगेतील एक लाख पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख दहा हजार रुपये असा सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लुटल्याची घटना सिन्नर ते देवपूर दरम्यान घडली.

मूळच्या देवपूर येथील असलेल्या मंजुषा विलास उगले (वय ३२) या सध्या सिल्वासा येथे कामानिमित्ताने राहतात. त्या दिवाळीनिमित्त देवपूरला येत होत्या. सिन्नर बसस्थानकातून देवपूर येथे जाण्यासाठी ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्या बसमध्ये आपल्या मुलांना सोबत बसल्या. मात्र, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग लंपास केली. देवपूरला उतरल्यावर त्यांना आपली बॅग गायब झाल्याचे लक्षात आले. बॅगेत रोख दहा हजार रुपये आणि एक लाख पाच हजार रुपयांची सोन्याची पोत, मणीमंगळसूत्र व एक पट्ट्याची सोन्याची पोत असा एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी मुसळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हा. जी. एन. गुरूळे हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबूजींच्या कार्याची अवहेलना!

$
0
0

शासकीय इतमामात अंत्यसंस्कारात दिरंगाई; कार्यकर्ते नाराज

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

आयुष्यभर तत्वांशी बांधिलकी सांगणारे व मूल्यांशी निगडित राहणारे राजकारण करीत आपले वेगळे अस्तित्व जपणाऱ्या कॉ. माधवराव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला नाही. मुख्यमंत्री कार्यालय व जिल्हा प्रशासनाने प्रोटोकॉल न पाळता राज्य सरकारने राजकारण केले असा आरोप कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी राजू देसले व कॉ. गायकवाड यांनी मानस कन्या अॅड. साधना गायकवाड यांनी केला.

अंत्यसंस्कार सुरू असताना प्रशासनाकडून या बाबतचा फॅक्स पाठवून काही काळ थांबण्याची विनंती करण्यात आली. पण गायकवाड कुटुंबीय व बाबूजींच्या कॉम्रेड अनुयायांनी तो नाकारून साध्या पद्धतीने अंत्यसंस्कार करून नंतर राज्य सरकारला धारेवर धरले. सोमवारी सकाळी कॉ. गायकवाड यांचे निधन झाले. ते स्वातंत्र्य सैनिक होते. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढा, हैदराबाद मुक्ती संग्राम अशा

तिन्ही लढ्यात त्यांचे योगदान होते. तसेच ते विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्ष नेते होते. असे असताना या झुंजार, लढवय्या नेत्याचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार तसेच मानवंदना देण्यासंबंधी जिल्हा प्रशासन व मुख्यमंत्री कार्यालय यांना माहिती देण्यात आली होती. राज्य मंत्री दादा भुसे यांनी देखील या बाबत पाठपुरावा केला. मात्र त्यांच्या निधनाला २४ तास उलटूनही याबाबत कोणताही निर्णय घेतला गेला नाही. पार्थिव अंत्यविधी ठिकाणी पोहचत असताना शासकीय इतमामात अंत्यविधी होईल, थोडे थांबा, अधिकारी व यंत्रणा तासाभरात पोहचतील असा निरोप आल्याचे राजू देसले यांनी सांगितले. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने उशिरा निर्णय घेतला, बाबूजींचा अवमान केला अशी भावना उपस्थित कॉम्रेड मंडळीत उमटली. गायकवाड कुटुंबीय देखील नाराज झाले. त्यामुळे शासनाच्या गौरवाची वाट न पाहता अंत्यविधी करण्यात आल्याचे साधना गायकवाड यांनी सांगितले. यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ

कॉ माधवराव गायकवाड यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी दिग्गज नेत्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. बाबूजींच्या अंत्यसंस्कार प्रसंगी राष्ट्रवादी नेते शरद पवार, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. पालकमंत्री गिरीश महाजन सोमवारी रात्री किंवा मंगळवारी पहाटे अंत्यदर्शन घेण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र प्रत्यक्षात कोणीही मनमाड मध्ये आले नाही. खासदार हरिश्चंद्र चव्हाण, तालुक्याचे आमदार पंकज भुजबळ हे देखील अंत्यदर्शन व अंत्यविधीसाठी न आल्याने बाबूजी समर्थकांत नाराजी पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाल कांद्याची एंट्री ‘दमदार’

$
0
0

उमराण्यात २६०० रुपये क्विंटर दर; उन्हाळ कांदा पडला मागे

म. टा. वृत्तसेवा, निफाड

दीपावलीच्या सुटीनंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यामधील व्यवहार सुरू झाले आहेत. या हंगामातील लाल कांद्याची बाजार समितीत आवक वाढत असून, उमराणा बाजार समितीत लाल कांद्याला जास्तीत जास्त २६०० रुपये भाव मिळाला. इतर बाजार समित्यांतही दोन हजार रुपयांच्या पुढे लाल कांद्याला भाव मिळत आहे. लाल कांदा बाजारात आल्यामुळे उन्हाळ कांद्याच्या दरात दीडशे रुपयांनी घसरण झाली आहे.

दिवाळीपूर्वी लाल कांद्याचे दर आणि आजचे दर यात १०० ते १५० रुपयांचा फरक पडल्याचे दिसत आहे. मंगळवारी पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी १२०० रुपये भाव होता. मंगळवारी ४७३५ क्विंटल आवक होती. तर लाल कांद्याची ३०७० क्विंटल इतकी आवक होती. जास्तीत जास्त २३०० तर १७०० रु सरासरी भाव होता. लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांदा ६४५३ क्विंटल आवक होती. सरासरी १२०० रु भाव होता. लाल कांद्याची आवक फक्त ६९३ क्विंटल होती. जास्तीत जास्त २०५२ तर १९०० रुपये भाव होता. लाल कांद्याची सर्वाधिक आवक उमराणा बाजार समितीत होती. तेथे तब्बल सहा हजार क्विंटल इतकी आवक होती. जास्तीत जास्त २६०० व सरासरी १८०० रुपये भाव होता.

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक सुरू झाल्यामुळे शिल्लक असलेला उन्हाळ कांदा प्रतवारीत टिकत नाही. त्यामुळे उन्हाळ कांद्याचे बाजारभाव दीडशे रुपयांची खाली आले आहेत. शिवाय आखाती देशांमध्ये कांद्याला आजच्या परिस्थितीत भाव कमी असून, उन्हाळ कांद्याला मागणी नाही. कर्नाटकमध्ये लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने नाशिकच्या कांद्याच्या मागणीवर त्याचा परिणाम होत असल्याचे कांदा व्यापारी मनोज जैन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ॐ सूर्य देवं नमस्ते स्तु गृहाणं करूणा करं

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पाण्यात उभे केलेले उसाचे तोरण, जवळ मांडण्यात आलेला घट, पणत्या, मोसमी फळे, मिठाई, कच्ची हळद, शिंगाडा, श्रीफळ आदींसह पूजा मांडून सूर्याची उपासना करण्यासाठी उत्तर भारतीय बांधव छठपूजेसाठी रामकुंड परिसरात जमले. कुटुंबात सुख-समृद्धी लाभावी, आरोग्य चांगले रहावे यासाठी सूर्याची पूजा करण्यासाठी जमलेल्या भाविकांच्या गर्दीने मंगळवारी (दि. १३) गोदाकाठ फुलून गेला.

नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या हजारो उतर भारतीयांनी पूजा-अर्चा करून सायंकाळी सूर्य देवाला अर्घ्य दिले. यावेळी सुरेल मैफिलीसह फटाक्यांची आतषबाजीदेखील करण्यात आली. उत्तर भारतीयांचा हा छठ पूजा उत्सव चार दिवस साजरा केला जातो. वर्षातून दोनदा होणाऱ्या या पूजेत कार्तिक महिन्यातील पूजेला महत्त्व आहे. त्यात रविवारी (दि. ११) पहिल्या दिवशी स्नान, भोजन करून पूजा करण्यात आली. त्याला 'नहाय-खाय' म्हटले जाते. सोमवारी (दि. १२) निर्जल व्रत करण्यात आले. मंगळवारी (दि. १३) सूर्योपासनेसाठी रामकुंड येथे सूर्यास्ताच्या दोन तास आधी उत्तर भारतीय बांधव जमा झाले. या भागातील पूजेसाठी त्यांनी सकाळपासूनच जागा आरक्षित करून ठेवल्या होत्या. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर काही परतीच्या मार्गाला लागले तर काही गोदाकाठी थांबून होते. बुधवारी (दि. १४) सूर्योदयाला पूजा करून या उत्सवाचा समारोप होईल.

गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व श्री संत गाडगे महाराज कनौजिया धोबी समाज संस्थेच्या वतीने याठिकाणी आलेल्या सर्व भाविकांना मोफत चहा वाटप करण्यात आले. या दोन्ही संस्थांच्या वतीने मनोरंजनासाठी गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक गुरमीतसिंग बग्गा, गारगोटीचे संचालक के. सी. पांडे आदी उपस्थित होते.

\Bवालदेवीतिरी उत्तर भारतीयांची मांदियाळी\B

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

उत्तर भारतीय परंपरेनुसार वालदेवी तीरावर वास्तव्यास असलेल्या उत्तर भारतीय बांधवांनी सहकुटूंब हजेरी लावत नदीला दुग्धाभिषेक अर्पण करून सूर्याला अर्घ्य देऊन विधिवत छठपूजा केली. यावेळी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीयांना सणानिमित्त शुभेच्छा दिल्या.

वडनेर दुमाला येथील वालदेवी तीरावर नगरसेवक केशव पोरजे यांच्या वतीने स्थानिक उत्तर भारतीयांसाठी गेल्या चार वर्षांपासून छठपूजेचे आयोजन केले जाते. पहिल्या वर्षी २५ जणांनी नोंदविलेला सहभाग आज दीड हजारांवर पोहोचला असून, या भागातील उत्तर भारतीयांना नाशिक येथे पूजेसाठी जाण्यासाठी गरज राहिली नाही. उत्तर भारतीय हिंदी भाषिक बांधव ३६ तासांचा निर्जळी उपवास करतात. काल सायंकाळी ५ वाजता वडनेर गावातून वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. वालदेवी तीरावर परिसरातील सर्व उत्तर भारतीय नागरिकांनी हजेरी लावत छठपूजेचा विधी पूर्ण केला. ऊसाच्या बांड्यांची मोळी बांधून ती नदीपात्रात उभी करत दीपप्रज्वलीत करून सूर्याला दूध व पाण्याचे अर्घ्य देत दांपत्यांनी विधिवत पूजा केली. यावेळी आमदार योगेश घोलप यांनी उत्तर भारतीयांना या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नथू यादव, शिवनाथ यादव, शिवप्रताप यादव, शिवप्रसाद, भरत सिंह, सुबेदार जेपीएन पाठक, विनय यादव, आदींनी प्रयत्न केले.

घाट उभारणीसाठी निधीची अडचण

लष्करी विभागातील जवानांच्या कुटुंबीयांसह वडनेर येथे उत्तर भारतीय अधिक प्रमाणात स्थायिक झाले असून, येथे छठपूजेसह धार्मिक विधींसाठी घाटाचेही सौंदर्यीकरण करण्यासाठी मनपाने गेल्या वर्षी येथील वालदेवी तीरावर घाट उभारणीस ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, काही कारणात्सव हा निधी अद्याप उपलब्ध न झाल्याने उत्तर भारतीयांसह स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे.

सोमेश्वर परिसरात पूजा

आनंदवली गाव, सोमेश्वर महादेव मंदिर व सोमेश्वर धबधबा येथील गोदावरी किनारी उत्तर भारतीयांनी छठपूजेसाठी गर्दी केली होती. शिवाजीनगर पाझर तलाव व

सातपूर अंबड लिंकरोडवरील नंदिनी नदीकिनारीही उत्तर भारतीय महिलांनी मनोभावे पूजा केली. छठपूजेनंतर पुरुषांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रसाद पवार यांचे चीनमध्ये प्रदर्शन सुरू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लिंगयिन मोनॅस्ट्री अॅण्ड हँग्झोऊ बुद्धिस्ट अकॅडमी टिचिंग इन्स्टिट्यूट आणि प्रसाद पवार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार प्रसाद पवार यांचे 'अजिंठा' या विषयावर पहिले आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर प्रेझेंटेशन व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. चीनमध्ये बुद्धिस्ट आर्ट इन्स्टिट्यूट येथे भरलेले हे प्रदर्शन १६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

दोन हजार वर्षांपूर्वीची भारतीय परंपरा, चालीरीती, समाज जीवन या विषयावरील संशोधनाचे दृकश्राव्य माध्यमातून प्रेझेंटेशन, तसेच निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन होत आहे. ‎ सांस्कृतिक विषयावरील अनेक संशोधक व बुद्ध तत्त्वज्ञान या विषयावरील अभ्यासक तसेच विविध युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थी चित्रकार, शिल्पकार, ग्राफिक डिझायनर, कॅलिग्राफर, संगीत, नाट्य अशा अनेक विषयातील मान्यवर अजिंठा प्रदर्शन व रिसर्च पेपर प्रेझेंटेशनचा लाभ घेणार आहेत.

अजिंठ्यातील चित्रांचे संवर्धन करण्यासाठी प्रसाद पवार गेल्या २७ वर्षांपासून कार्यरत आहेत. अत्यल्प नैसर्गिक प्रकाशात अजिंठा छायाचित्रीत करून त्या चित्रांचे डिजिटल रेस्टोरेशनचे काम त्यांनी केले आहे. आजपर्यंत केलेले काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी दिल्ली, नाशिक, मुंबई, पुणे, सिन्नर आदी ठिकाणी प्रदर्शने भरविली असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

अजिंठा या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची तयारी मार्च महिन्यापासून सुरू होती. भारतीय सीमा ओलांडून जात आहोत, तो आनंदाचा क्षण आला आहे. 'अजिंठा'ची कला आता वैश्विक पातळीवर पोहचविता येणे हे मोठे भाग्य आहे.

- प्रसाद पवार, छायाचित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आदिवासी विकास’ला आंदोलकांनी ठोकले टाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शैक्षणिक वर्ष मध्यावर येऊनही बहुसंख्य आदिवासी विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयालाच टाळे ठोकले. परिषदेने सोमवारी (दि. १२) सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच होते.

विद्यार्थ्यांच्या वसतिगृहविषयक समस्यांच्या सोबतच एकात्मिक आदिवासी विभागाकडून जाणवणाऱ्या समस्या व आदी प्रश्नांसाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याची माहिती परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकी जाधव यांनी दिली. वसतिगृहातील विद्यार्थी प्रवेश व विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन वर्षांसाठी नवीन प्रकल्प अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. विद्यार्थ्यांच्या समस्या त्वरित सोडविल्या जाव्यात; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष लकी जाधव यांनी दिला. यावेळी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष गणेश गवळी, दिंडोरी युवा तालुकाध्यक्ष गोकुळ टोंगारे, आदिवासी गायक संदीप गवारी, कन्हैय्या मुंडा, बाळाभाऊ डहाळे, अनिल फसाळे, राहुल गावित, गौरव गावित, अजिंक्य दळवी, राष्ट्रीय रिपब्लिक पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील पगारे उपस्थित आहेत.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष प्रचारकांसाठी शिवसेनेकडून स्पर्धा

$
0
0

भाजपला शह देण्याची नवी योजना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बोलघेवड्या भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने वक्त्यांचा शोध घेण्यासाठी थेट वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले. पण, स्पर्धकांचा फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही स्पर्धा फारशी चर्चेला आली आहे. विभागीय स्तरावर घेतलेल्या या स्पर्धेत अवघे ४२ स्पर्धक आले. यातील निवडलेले स्पर्धक आता लोकसभेच्या निवडणुकीचे फड रंगवणार आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वक्तृत्व स्पर्धा या नावाने ही स्पर्धा मु. श. औरंगाबादकर सभागृहात झाली. त्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. नितीन बानगुडे-पाटील उपस्थित होते. पण, या स्पर्धेचा फारसा प्रचार न केल्याने शिवसेनेच्या या नव्या वक्तांचे ऐकण्यासाठी अवघे ८० प्रेक्षक होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बेधडक वक्तृत्व शैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या प्रेमात पडला. त्यांचे समर्थकच नाही तर विरोधकही त्यांच्या वक्तृत्वाचे कौतुक करत. अशा शिवसेनेच्या मुशीत वक्तांची कमी पडणे ही गोष्ट तशी न उलगडणारी. पण, भाजपच्या प्रचारकांना शह देण्यासाठी हे नवे वक्ते मात्र काय कमाल करतात, हे निवडणुकीनंतर समोर येणार आहे. या स्पर्धकांना प्रा. बानगुडे-पाटील यांनी टिप्सही दिल्या. त्यामुळे स्पर्धकांनाही हायसे वाटले.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदलालित्याने घातली मोहिनी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'जय जयती गजवदन' या गणेशवंदनेने आवर्तन संगीत समारोहाची सुरुवात झाली. समारोहाचे मंगळवारी दुसरे पुष्प होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही नृत्यमैफल झाली.

यावेळी सुप्रसिद्ध नृत्यांगना कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी 'दश-धा' ही नृत्यप्रस्तुती सादर केली. 'दश-धा' म्हणजे नवविधा भक्तीत प्रेमभक्ती सह भक्तीचे दहा मार्ग सांगितले आहेत तेच दश-धा. दशकपूर्तीनिमित्त दहा आकडा हे सूत्र धरून दहा मात्रांचा झपताल सादर करण्यात आला. त्यानंतर तालअंगात थाट, उठान, आमद, परणजुडी आमद, तोडे, परण, चक्रदार परण, ततकार हा कथकचा पारंपरिक वस्तूक्रम सादर केला. यात त्रिपल्ली, गिणतीची तिहाई हे रसिकांना विशेष भावले. सवाल-जवाब या प्रकारालाही रसिकांची विशेष दाद मिळाली. कथकची विशेषता असलेला गतनिकास विद्यार्थिनींनी नजाकतीने प्रस्तूत केला. अभिनय पक्षात 'दशावतार' सादर केले. विष्णूचे दहा अवतार 'जय जगदीश हरे' या 'संगीत जयदेव' नाटकातील पं. गोविंदराव टेंभे यांच्या रचनेतून साकार करण्यात आले. एक एक अवतार प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आला. या प्रस्तुतीने प्रेक्षक भारावून गेले. संपूर्ण कार्यक्रमाला तबल्यावर कल्याण पांडे व वैष्णवी भडकमकर, हार्मोनियम व गायनासाठी पुष्कराज भागवत आणि सिंथेसायजरवर अनिल धुमाळ यांनी साथसंगत केली.

प्रथम सत्रात नृत्यांगण कथक नृत्य संस्थेच्या दशकपूर्तीनिमित्त कृतज्ञता सोहळा झाला. यात नृत्यांगणच्या दहा वर्षांच्या प्रवासात ज्यांची मोलाची साथ लाभली त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेच्या निहारिका देशपांडे, गंधाली खेडलेकर आणि सावनी बंकापुरे यांनी यशस्वीरित्या 'विशारद पूर्ण' ही पदवी मिळवल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. त्यानंतर दहा वर्षातल्या कीर्ती भवाळकर यांनी नृत्यदिग्दर्शित केलेल्या नृत्यसंरचनांचा आढावा घेण्यात आला. सूत्रसंचालन किशोरी किणीकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ पोलिस पाटलावर गुन्हा नोंदवा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या एका महिलेची सचिन कासार (रा. वासाळी, ता. नाशिक) या पोलिस पाटलाने ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. ऑगस्ट २०११ मध्ये मल्टिमार्केटिंग व्यवसायअंतर्गत कासार व फिर्यादी महिला यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार सुरू होते. हे व्यवहार संपल्यानंतर फिर्यादी महिलेचा चेक कासार यांच्याकडे राहिला. त्यावर ३० ऑगस्ट २०११ अशी तारीख लिहिण्यात आली होती. मात्र, कासार याने ३० ऑगस्ट २०१७ अशी तारखेची नोंद चेकवर स्वतः करून घेतली. त्यानंतर हा चेक वटविण्यासाठी बँकेत देण्यात आला. अचानक बँक खात्यातून पैसे गेल्याने यासंदर्भात सातपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी सदर महिला गेली. मात्र, पोलिस पाटलाच्या विरोधात तक्रारीची नोंद करण्यात आली नाही. त्यानंतर महिलेने थेट नाशिक न्यायालयात वैयक्तिकरीत्या खटला दाखल केला. कोर्टाने मंगळवारी कासार याच्या विरोधात भारतीय दंड विधेयक कलम ४२०, ४०६, ४६२, ४६७, ४७१ व ५११ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images