Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चोरट्यांची ‘दिवाळी’

$
0
0

मोबाइल, मंगळसूत्रसह पावणेतीन लाख लुटले

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी पाच लाखांच्या रोकडसह एक दुचाकी, मोबाइल आणि मंगळसूत्र असा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते आहे.

वडाळा गावाकडे जाणाऱ्या खोडेनगरच्या मागील आठवण हॉटेलजवळ अज्ञात दोघांनी दुचाकीस्वाराला अडवून त्यास मारहाण करीत तब्बल दोन लाख ८० हजारांची रोकड लुटून नेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये दोघां संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी योवन सविअर फर्नांडो (३९, कल्पतरूनगर, अशोका मार्ग) यांनी फिर्याद दिली. सोमवारी (दि. ५) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास योवन सविअर हे आठवण हॉटेलच्या समोरून स्कूटरवरून (एमएच १५ डीआर २३८६) जात असताना हा प्रकार घडला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी योवन यांना अडवत जबर मारहाण केली. त्यांच्या खिशातील चार हजार रुपये किंमतीचा मोबाइल, अ‍ॅक्टिव्हाच्या डिक्कीतील दोन लाख ४० हजार रुपयांची रक्कम असा दोन लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने लुटून नेला. घटनेची माहिती मुंबई नाका पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोघा संशयिताविरुद्ध गुना दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोनोने करीत आहेत.

--

डिक्कीतून अडीच लाख लंपास

नाश्त्यासाठी थांबलेल्या व्यक्तीच्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी अडीच लाखांची रोकड हातोहात लांबविल्याची घटना मार्केट यार्ड भागात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस चोरट्यांचा माग काढीत आहेत. अनंत रमेश कोरडे (४३ रा. कोठुरे ता. निफाड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. सोमवारी बँकेतून पैसे काढण्यासाठी कोरडे शहरात आले होते. सकाळच्या सुमारास एचडीएफसी बँकेतून पैसे काढून ते घराकडे निघाले असता ही घटना घडली. दुचाकीवर (एमएच १५ जीके ०९०६) निघालेले कोरडे दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारावरील पाववड्याच्या हातगाडीवर नाश्त्यासाठी थांबल्याची संधी चोरट्यांनी साधली. डिक्कीत ठेवलेली रोकड चोरटयांनी हातोहात काढून पोबारा केला. अधिक तपास हवालदार वणवे करीत आहेत.

--

मोबाइल पळविला

रस्त्याने मोबाइलवर बोलत जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाइल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना ड्रिम कॅसेल परिसरातील रामवाडी चौफुलीवर घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

नवनाथ कारभारी ठाकरे (रा. ड्रिम कॅसल, पंचवटी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. सोमवारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास ठाकरे परिसरातील रामवाडी चौफुली येथून आपल्या घराकडे पायी जात असताना ही घटना घडली. मोबाइलवर बोलत रस्त्याने पायी जाणाऱ्या ठाकरे यांच्या पाठीमागून आलेल्या पल्सर दुचाकीवरील तिघांपैकी एकाने त्यांच्या हातातील साडे दहा हजार रुपये किंमतीचा मोबाइल हिसकावून पोबारा केला. अधिक तपास हवालदार वणवे करीत आहेत.

--

गंगापूररोडवर चेन स्नॅचिंग

गंगापूर रोडवरील मधुकमलनगर परिसरातील अरिहंत हॉस्पिटलसमोरून पायी जाणाऱ्या ५२ वर्षांच्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तोडून नेले. ही घटना सोमवारी (दि. ५) रात्री घडली. याबाबत गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मंजुश्री प्रसाद जोशी (दत्तलक्ष्मी अपार्ट. अरिहंत हॉस्पिटलजवळ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. सोमवारी रात्री पावणेनऊ वाजता जेवण आटोपल्यानंतर अरिहंत हॉस्पिटलजवळून त्या पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने जोशी यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीचे ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून नेले. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजारपेठेत चैतन्याचा बहर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी नाशिकची बाजार पेठ सज्ज झाली असून शहराची प्रमुख बाजार पेठ असलेल्या रविवार पेठ भागात खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे.

लक्ष्मीपुजनाच्या खरेदीसाठी लोकांना आठ दिवसांपासून बाजारात गर्दी केली आहे मात्र आज लक्ष्मीपुजनाचा मुख्य सण असल्याने मंगळवारपासून बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले होते. अनेकांना पुजेसाठी लागणाऱ्या वस्तुंबरोबरच नेत्रदीपक आकाशकंदिल, पणत्या, पूजा साहित्य, खतावणी व रोजमेळच्या वह्या खरेदी केल्या. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. काहींनी ग्राहकांची धावपळ होऊ नये यासाठी एकाच छताखाली फराळापासून दिवाळीसाठी आवश्यक पूजा साहित्यांचे विशेष दिपावली किट उपलब्ध करून दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून चिनी मालावर बहिष्कार घालावा असे सातत्याने ग्राहकांवर बिंबवले जात होते. त्याचा परिणाम यंदाच्या बाजारपेठेवर दिसून आला. अनेक ग्राहकांनी चिनी वस्तूंची खरेदी केली नाही. पणत्यांमध्ये नेहमीच्या मातीच्या साध्या पणत्या १० ते १५ रुपये डझन आहेत. कुंदन वर्क, रंगीत, टिकली वर्क, सिरॅमिक वर्क असणाऱ्या पणत्या प्रती नग २० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत आहे. या शिवाय मेणाच्या जेल, फ्लोटिंग, सुगंधी असे विविध प्रकार ५५ रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत आकाशकंदील, पणत्यांच्या किंमतीत २० ते २५ टक्के वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. तसेच, लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक केरसुणी, लाह्या, बत्तासे हे साहित्य २० रुपयांपासून पुढे आहे. अभ्यंगस्नानासाठी आवश्यक उटणे, सुगंधी तेलाची काही खास उत्पादने बाजारात आली आहेत. दिवाळीच्या तीन ते चार दिवसांत विशेषत: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किमान नव्या वर्षांसाठी बाजारात विविध प्रकारच्या रोजनिशी या ३० रुपयांपासून दीड हजारापर्यंत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दैनंदिन कामाच्या नियोजनासाठीचे विविध प्रकारच्या प्लॅनर डायऱ्याही उपलब्ध आहे. रेडिमेड रांगोळ्यांचे स्टिकरसह बाजारात आले आहेत. त्याच प्रमाणे लक्ष्मीची पावले खरेदी करण्याला महिलांनी प्राधान्य दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाला कारची धडक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने थांब्यावर उभ्या असलेल्या रिक्षाला धडक दिल्याने अपघातात सहा विद्यार्थ्यांसह रिक्षाचालक जखमी झाले. बिटको चौकाजवळील रेजिमेंटल प्लाझासमोर मंगळवारी सकाळी सव्वा सात वाजेच्या दरम्यान अपघात झाला.

संजय रामदास शेळके (वय ४५, रा. सायट्रिक, पंचक) या जखमी रिक्षाचालकाच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिसात कारचा (एमएच १५ एफएफ ७९६५) चालक शरद पालवे (वय ३२, रा. सोयगाव, ता. येवला) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संजय शेळके जेलरोडकडून बिटको चौकाकडे प्रवाशी घेऊन येत होते. रेजिमेंटल प्लाझा समोरील थांब्यावर विद्यार्थ्यांना उतरविण्यासाठी शेळके यांनी रिक्षा उभी केली. त्याच वेळी देवळालीकडून बिटको चौकाच्या दिशेने शरद पालवे चालवित असलेल्या कारने रिक्षाला समोरासमोर धडक दिली. यात शेळके यांच्यासह रिक्षातील शुभम विलास ठाकरे (वय १६, रा. पुष्पकनगर, जेलरोड), यश नितीन राजपाल (वय १६, रा. हरीविहार, जेलरोड), ओम अरुण लोखंडे (वय १५, रा. सैलानी बाबा चौक, जेलरोड), पियुष सुरेश भालेराव (वय १६, रा. गणेश अपार्टमेंट, जेलरोड), केदार संदेश पवार (वय १६, रा. ज्ञानेश्वरनगर, जेलरोड) आणि रोहित जितेंद्र वर्मा (वय १६, रा. मिथिला निवास, जेलरोड) हे जखमी झाले.

महिला भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू

देवळाली कॅम्प : भगूर येथील मारवाडी गल्लीत राहणाऱ्या पुष्पावती जयनारायण लाहोटी यांचा देवी मंदिरातील बारवमध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी रतन कासार यांनी देवळाली कॅम्प पोलिसांमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर वसाकाचा गळीत हंगाम रोखणार

$
0
0

पंडित निकम यांचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, कळवण

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास मागील गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या उत्पादकांचे पैसे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत 'वसाका'चा चालू गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडित निकम यांनी दिला आहे. वसाकाच्या ऊस उत्पादकांच्या मागील गळीत हंगामाच्या देणीबाबत निकम यांनी देवळा येथे पत्रकार परिषद घेतली.

वसाकाच्या यंदाच्या गाळप हंगामाला साखर आयुक्तांनी परवानगी दिली नसताना नुकतेच या साखर कारखान्याचे बॉयलर पूजन करण्यात आले आहे. ऊस उत्पादक सभासदांचा दिशाभूल करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप निकम यांनी केला. कारखाना कर्जाच्या ओझ्याखाली अडकला असल्याने तो या वर्षांपासून धाराशिव साखर कारखान्याला भाडेतत्त्वावर चालवायला दिला आहे. या कारखान्याकडे उस उत्पादकांचे व कामगारांचे देणी थकली आहे. १० ऑक्टोबरपर्यंत ऊस उत्पादकांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील असे आश्वासन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिले होते. पण प्रत्यक्षात एक हजार रुपये प्रमाणेच देणी दिली. गव्हाण पूजनाच्या पूर्वी जर ऊस उत्पादकांचे ऊस बिल दिले नाही तर सुरू होणाऱ्या हंगामासाठी गव्हाण पूजन करू दिले जाणार नाही असे निकम यांनी पत्रकात नमूद केले आहे. प्राधिकृत मंडळाच्या कारकिर्दीत कामगारांचा संपूर्ण पगार बाकी ठेवला. तर १५/१६ च्या गळीत हंगामात ९२ हजार टन ऊस गाळप केला व ऊस उत्पादकांना फक्त १७४० रुपये भाव दिला. हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. मात्र इतर साखर कारखान्यांनी २१०० रुपये भाव दिला आहे. दरम्यान वसाकाने चालूगळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊस उत्पादकांचे पैसे दिले नाही तर गव्हाण पूजनाचा कार्यक्रम हाणून पाडू असा इशारा कारखान्याचे सभासद व राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष पंडितराव निकम यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपोत्सवाचा आनंद

$
0
0

\Bदीपोत्सवाचा आनंद

\Bनाशिक : गंगापूर रोड येथील वाल्मिकी टॉटस् या प्रि-प्रायमरी शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना अधिक वाव मिळावा, यासाठी रांगोळी स्पर्धा झाली. सुबक रांगोळ्या रेखाटत विद्यार्थ्यांनी दीपोत्सवाचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी यावेळी पारंपरिक वेशभूषा केली होती. शाळेच्या संचालिका सिमांतिनी कोकाटे, संस्थापिका सीमा कोकाटे, मुख्याध्यापिका मोनिका गोडबोले यांसह शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळसणावर शोककळा

$
0
0

दिंडोरी रोडवर पादचाऱ्यासह दुचाकीचालक ठार; नाशिकरोडला विद्यार्थी जखमी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऐन दिवाळीत जीवघेण्या अपघातांची मालिका सुरूच असून, दिंडोरी रोडवरील जुन्या जकात नाक्याजवळ ट्रकचालकाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर पंचवटीतील अवधूतवाडीसमोर भरधाव दुचाकीचालकाने धडक दिल्याने अज्ञात पादचाऱ्याचाही मृत्यू झाला. या प्रकरणी म्हसरूळ व पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. शनिवारपासून अपघातांमध्ये तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला.

उमा शिकील सहानी (४४, रा. शिवाजीनगर, ता. दिंडोरी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. रविवार (दि. ४) रात्री साडेदहा वाजता दिंडोरी रोडवरील जुन्या जकात नाक्याजवळून दुचाकीने (एमएच १५, जीएन ६५१८) जात असताना अपघात झाला. दिंडोरीकडून नाशिककडे येत असलेल्या सहानी यांच्या दुचाकीला अज्ञात भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यामुळे रोडवर पडलेल्या सहानी यांच्या डोक्याला व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. १०८ अॅम्ब्युलन्सवरील डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सहानी यांना रात्री ११ वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना रात्री दीड वाजता सहानी यांचा मृत्यू झाला. याबाबत संजित सहानी यांनी दिलेल्या तक्रारीनुससार म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघाताची दुसरी घटना पंचवटीतील दिंडोरीरोडवर असलेल्या अवधूतवाडीसमोर घडली. यात अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू झाला. त्याला धडक देणाऱ्या स्कूटरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी घडली. तारवालानगरकडून दिंडोरी नाक्याकडे भरधाव वेगात येणाऱ्या संशयित दुचाकी (एमएच १५ जीएच ८५८७) चालकाने अनोळखी पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. त्याला पंचवटी पोलिस स्टेशनच्या गस्ती पथकाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना सोमवारी (दि. ५) त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिओ लशींचा अवैध बाजार उघड!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खुल्या बाजारात विक्रीसाठी बंदी असलेल्या पोलिओ लशीची सर्रास विक्री करणाऱ्या सहा मेडिकल व्यावसायिकांवर सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त केलेला लशींचा साठा बनावट असल्याचा अहवाल हैदराबाद येथील उत्पादक कंपनीने दिल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. या गुन्ह्याची सर्व सूत्रे अहमदाबाद येथून हलत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले असून, पोलिओ लशींचा अवैध बाजारही यामुळे उघड झाला आहे.

सय्यद मुद्दरअली हसन (रा. टाकळीमियाँ, अहमदनगर), अमजद कासम पठाण (रा. रुई छत्तिशी, अहमदनगर), ज्योत्स्ना सचिनकुमार मुगदिया (रा. जालना रोड, औरंगाबाद), संजय उदय भानुसिंग, गणेश छगनराव गुळवे (रा. गोळे कॉलनी, नाशिक), पीयूष सोळंकी व इतर (अहमदाबाद) अशी या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी नगरच्या अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक अशोक राठोड यांनी फिर्याद दिली आहे. एका मेडिकल स्टोअरमध्ये बंदी असलेल्या पोलिओ लशींची तब्बल २१०० रुपयांत विक्री होत असल्याची माहिती राठोड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अहमदनगर, औरंगाबाद आणि नाशिक येथील मेडिकल दुकानांवर छापे टाकले. त्यात हा माल अहमदाबाद येथील एमएस मेडिकेअर वर्ल्ड या ठिकाणाहून येत असल्याचे समोर आले. नाशिकमध्ये आलेल्या १०० बाटल्यांपैकी १२, तर औरंगाबाद येथील १०० बाटल्या पोलिसांच्या हाती लागल्या.

बहुतांश लशींची विक्री

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले, की हैदराबाद येथील शांथा बायोटेक्निक्स ही कंपनी लस उत्पादित करते. मात्र, उत्पादित झालेला सर्व माल सरकारच खरेदी करते. त्यामुळे ही लस बाजारात विक्री करता येत नाही. नाशिकसह अहमदनगर आणि औरंगाबाद येथे आलेला माल हा अहमदाबाद येथील असून, संशयित सोळंकी हा सप्लायर असल्याचे समोर आले आहे. पोलिस व एफडीएच्या प्राथमिक तपासात आतापर्यंत २०० बाटल्या वितरित करण्यात आल्या असून, त्यातील बऱ्याच बाटल्या ग्राहकांपर्यंत पोहोचल्या आहेत. एफडीएने जप्त केलेल्या बाटल्यांपैकी तीन बाटल्या तपासणीसाठी पाठवल्या आहेत. त्यापैकी उत्पादक कंपनीने या बाटल्या बनावट असल्याचा अहवाल दिला आहे.

मुलांच्या जिवाला धोका

एफडीए आणखी काही परीक्षण अहवालांच्या प्रतीक्षेत आहे. लशींच्या बाटल्या अहमदाबाद येथे कशा पोहचतात, हा तपासाचा भाग असल्याची प्रतिक्रिया एफडीएचे सहआयुक्त विजय जाधव यांनी दिली. यातील अहमदाबाद येथील सप्लायरने मूळ बाटल्यांवरील फक्त किमतीचे लेबल बदलले की औषध, याचाही तपास सुरू आहे. शान आयपीव्ही या नावाने ही लस बाजारात विक्री केली जात होती. चुकीच्या लसीकरणामुळे लहान मुलांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. ही लस इंजेक्शनद्वारे दिली जात असल्याने त्याद्वारे रोगाचा संसर्ग निर्माण होण्याची किंवा तो पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा ‘कुत्ता गोली’ हस्तगत

$
0
0

मालेगावात सराईत गुन्हेगाराकडे सापडला साठा

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुत्ता गोली म्हणून मालेगावात चर्चेत असलेल्या झोपेच्या गोळ्या व औषधांचा मोठा साठा ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला. रविवारी (दि. ४) रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. हा साठा सराईत गुन्हेगाराकडे सापडला असून, मालेगावमध्ये कुत्ता गोलीचे चलन अद्याप कमी झाले नसल्याचे या घटनेमुळे स्पष्ट होते.

ईब्राहीम अहमद अब्दुल गणी उर्फ दुरी (रा. नूरनगर, रमजानपुरा, मालेगाव) आणि इम्तियाज अहमद मोहंमद अमिन (रा. मिल्लतनगर, मालेगाव) अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. दोन्ही संशयित मिळून गुंगी येणारी औषधे युवकांना विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल, उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जे. ए. पळे, पोलिस नाईक दिनेश पवार, सोमनाथ ह्याळीज, पोलिस कर्मचारी सुनील भामरे, भाऊसाहेब ताडीस यांच्यासह औषध निरीक्षक चंद्रकांत मोरे यांनी पाचपंचतन चौकातील सगीर मेंबरच्या चहाच्या हॉटेलजवळ छापा मारला. यावेळी संशयित आरोपी इम्तियास अमिन पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडील अल्प्रालोझम टॅब्लेट्स ०. ५ ग्रॅम वजनाच्या एक हजार ८७५ इतक्या संख्येने सापडल्या. याशिवाय कोडेन फॉस्फेट अॅण्ड क्लोरफीनिरामीन मेलेट या औषधाच्या आठ बॉटल्स सापडल्या. संशयित आरोपी हा औषध साठा संशयित गणीकडून विकत घेऊन युवकांना विक्री करतो, असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी औषध निरीक्षक चंद्रकांत मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रमजानपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अटक केलेल्या इम्तियाज हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी यासारखे गुन्हे दाखल आहेत. कोर्टाने त्यास १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

..

या गुन्ह्यात अटक केलेला संशयित सराईत गुन्हेगार असून, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर औषधसाठा सापडला. या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार सापडत असून, पोलिस सर्व शक्यतांवर काम करीत आहेत. मालेगावमध्ये येणारा साठा नक्की कोठून येतो, याचा शोध सुरू आहे.

- निलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक, मालेगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भरती बोगस, तक्रारी भरघोस!

$
0
0

फसवणूक झालेल्यांचा आकडा ३८ वर

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत ऑगस्ट महिन्यात झोपडपट्टी विभागात कार्यरत असलेल्या सचिन सूर्यवंशी या शिपायाने बोगस नोकरभरती करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी सध्या सूर्यवंशी निलंबित असला तरी, या प्रकरणात मंगळवारी आणखी तीन तक्रारदारांनी महापालिकेत येऊन सूर्यवंशी विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या प्रकरणात अधिकृतरित्या तक्ररादारांची संख्या ही १२ पर्यंत गेली असली तरी, ही संख्या ३८ वर गेल्याचे फसवणूक झालेल्यांचे म्हणणे आहे.

महापालिकेत मनुष्यबळाचा उणीव जाणवत असून, एका कर्मचाऱ्याला चार ते पाच कर्मचाऱ्यांची कामे करावी लागत असल्याने सध्या कर्मचारी आणि अधिकारी तणावाखाली आहेत. अतिकामाच्या ताणापायी संजय धारणकर यांने आत्महत्या केली होती. तसेच रवींद्र पाटील या उपअभियंत्याने आत्महत्येची चिट्ठी लिहिली होती. त्यामुळे नोकरभरतीची मागणी जोर धरू लागली होती. सध्या महापालिकेचा आकृतिबंध 'क' वर्गानुसार ७०९० पदांचा असला तरी कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजारांवर आली आहे. त्यातच 'ब' वर्गानुसार पालिकेचा आकृतिबंध हा 'ब' वर्गानुसार १४ हजार पदांवर गेला आहे. आस्थापना खर्चाचे कारण देत प्रशासनाकडून नोकरभरतीला नकार दिला जात होता. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नोकरभरतीचा खेळ रंगला असतानाच, नोकरभरतीच्या वावड्यांचा फायदा महापालिकेतील एका शिपायाने घेतला होता. झोपडपट्टी विभागात कार्यरत असलेल्या सचिन सूर्यवंशी शिपायाने पालिकेतील कनिष्ठ अभियंता, लेखापाल, लिपिक, शिपाई अशा विविध पदांवर २५ जणांची बोगस नियुक्तीपत्र देऊन नोकरभरती केली होती.

...

पाच ते सह लाख रुपये घेऊन भरती

तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णाच्या नावाने सह्या करून ही भरती केली होती. ऑगस्टमध्ये जवळपास २५ जणांकडून पाच ते सहा लाख रुपये घेऊन त्यांना बोगस नियुक्तीपत्रे दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या प्रकरणी पालिकेने चौकशी करीत सूर्यवंशीला निलंबित केले होते. मंगळवारी पुन्हा या प्रकरणातील तीन फसवणूक झालेल्यांना पालिकेत येऊन आयुक्तांकडे तक्रार केली. सूर्यवंशी यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे प्रशासनाची पुन्हा डोकेदु:खी वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन दिवाळीत रेल्वेच्या महसुलात घट

$
0
0

इगतपुरी ब्लाकमुळे गाड्या रद्दचा फटका; प्रवाशांचेही हाल

...

डॉ. बाळकृष्ण शेलार, जेलरोड

इगतपुरी रेल्वेस्थानकात महिनाभर सुरू असलेल्या कामांमुळे नाशिकमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर काहींचे मार्ग बदलण्यात आले. त्याचा फटका प्रवाशांसह रेल्वेलाही बसला आहे. यंदाच्या दिवाळीत नाशिकरोड रेल्वेस्टेशनच्या तिकीट विक्रीतील महसुलात उणे ८ ते १२ टक्क्यांनी घट झाली आहे. दरम्यान, लक्ष्मी पूजनानंतर होणारी गर्दी लक्षात घेऊन ही तूट भरून काढण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे.

मुंबई ते भुसावळ दरम्यान तिसरा रेल्वेमार्ग तयार केला जात आहे. मुंबई ते कल्याण आणि जळगाव ते भुसावळपर्यंत हे काम झाले आहे. इगतपुरी ते भुसावळ दरम्यान ते बाकी आहे. त्यासाठी इगतपुरी स्थानकात रूट रिले इंटरलॉकिंग पॅनल आणि यार्ड रिमॉडलिंग संबंधित कामामुळे महिनाभरापासून ब्लाक घेतला जात आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, प्रवासीवर्ग एसटी आणि खासगी ट्रॅव्हलकडे वळाला आहे. यामुळे ऐन दिवाळीत आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

...

शिफ्टमध्ये वाढ

दिवाळीची गर्दी होऊ लागल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या तिकीट बुकिंग कार्यालयात कर्मचारी संख्या आणि कामाच्या शिफ्ट वाढविण्यात आल्या आहेत. येथे २८ कर्मचारी आहेत. त्यांची संख्या ३१ वर नेण्यात आली असून, शिफ्टची संख्याही वाढली आहे. गेला महिनाभर झालेला तोटा भरून काढण्यासाठी कर्मचारी सज्ज झाले आहेत. १ ते १० नोव्हेंबर दरम्यान गर्दी होणार आहे. १२ नोव्हेंबरपासून परतीची गर्दी होणार आहे. हे लक्षात घेऊन तोटा भरून काढण्यासाठी रेल्वेने नियोजन केले आहे.

..

महत्त्वाच्या गाड्या रद्द

नाशिकरोड रेल्वेस्थानकाला महत्त्वाचा बिझनेस मिळतो तो पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी, गोदावरी, तपोवन, भुसावळ-पुणे या गाड्यांद्वारे. इगतपुरी-भुसावळ शटल आणि मुंबई-भुसावळ पॅसेंजरचेही योगदान मोठे आहे. यापैकी पंचवटी एक्स्प्रेस सर्वात जास्त महसूल देते. नेमक्या याच गाड्यांची वाहतूक महिनाभरापासून विस्कळीत झाली आहे. त्याचा फटका नाशिकरोड रेल्वेस्थानकाला बसत आहे.

...

अशी झाली घट

विषय - ऑक्टोबर २०१७ - ऑक्टोबर २०१८ - घट टक्के

तिकीट विक्री - ३,१२,५९० - २,८६,४८८ - उणे ८

प्रवासी संख्या - ५,१९,५४० - ४,७६,६९८ - उणे ८

महसूल रक्कम - ३ कोटी ८३ लाख ७,१२० - ३ कोटी ५५ लाख १,५२५ - उणे १२

..

वर्षाला ९० कोटी

नाशिकरोड स्थानकातून दररोज सरासरी १६ हजार प्रवाशी प्रवास करतात. दिवाळीत हाच आकडा वीस हजारापर्यंत जातो. दररोजचा महसूल ११ लाखांपर्यंत असतो. दिवाळीत तो दिवसाला २० लाखापर्यंत वाढतो. नाशिकरोड स्थानकाला महिन्याला सात ते नऊ कोटी आणि वर्षाला ९० ते शंभर कोटीचा महसूल तिकीट विक्रीतून मिळतो.

..

शिस्त हवी

रेल्वेगाड्या महिनाभरापासून रद्द होत आहेत. तसेच नेहमीच्या पंचवटी, राज्यराणी, गोदावरीसारख्या महत्त्वाच्या गाड्यांना विलंब होत आहे. काही दिवसांपासून त्या रद्द केल्या जात आहेत. इगतपुरी भुसावळ शटल महिनाभर बंद होती. गोदावरी १५ दिवस विश्रांती घेऊन नुकतीच सेवेत दाखल झाली. मुंबई-भुसावळ पॅसेंजरही अनेक दिवस बंद होती. पुण्याला पहाटे जाणारी भुसावळ-पुणे पॅसेंजरही इगतपुरीतील ब्लाक आणि कसारा जवळील अपघातांच्या घटनांमुळे अनेकदा दौंडमार्गे नेण्यात आली. त्यांचेही वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फलकाचे अनावरण

$
0
0

फलकाचे अनावरण

सातपूर : राज्य कर्मचारी वसाहतीत असलेल्या सिद्ध हनुमान परिसरात संत जनार्दन स्वामी चौकात फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक रहिवाशांनी २४ वर्षांपूर्वी संत जनार्दन स्वामी चौक असे नामकरण केले होते. परंतु, रस्त्याच्या रुंदीकरणात फलक हटविण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर स्थानिक रहिवाशांनी स्वःखर्चाने नवीन फलक उभारला. त्याचे अनावरण नगरसेवक शशिकांत जाधव, राजू चौघुले, नाना वाघचौरे, शिवाजी पाटील, सुरेश भामरे यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी स्थानिक भाऊसाहेब दिंडोरे, राजेंद्र शेटे, रमेश बोरसे, ज्ञानेश्वर मोरे,

देविदास सोनवणे, हिरामण शिंदे, मधुकर रकिबे, शांताराम साळुंखे, मुरलीधर पाटील, संतोष शेळके यांसह महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतीवीर सेनेचे महसूलवर उपोषण

$
0
0

क्रांतीवीर सेनेचे महसूलवर उपोषण \B

\B

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

क्रांतीवीर सेनेतर्फे प्रदेश कार्याध्यक्ष विश्‍वनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड महसूल आयुक्त कार्यालयावर उपोषण करण्यात आले. गणेश कदम, किरण डोखे, मीरा दुसाने, किरण बोरसे, राजाराम शिंदे, मयुरी पिंगळे, संजय हजारे, विलास पाटणे, दत्ता कुमावत, विजय खर्जुल आदींनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. मागण्यांच्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, महसूल मंत्री आदींना देण्यात आली. नगर जिल्ह्यातील राहुल त्रिवेदी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल व कोपरगाव येथील तहसीलदार किशोर कदम यांची पाठराखण केल्याने या दोघांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी हे उपोषण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीची प्रवांशासाठी बससज्जता

$
0
0

दिवाळीत जादा बसेसचे नियोजन

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जीवलगांसह दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी चाकरमान्यांना गावाकडे जाण्याचे वेध लागले आहेत. या प्रवासी वर्गाची गैरसोय टाळण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कंबर कसली असून, जादा बसेसचे नियोजन केले आहे. धुळे, नंदुरबार आणि पुणे या तीन मार्गांवर प्रवाशांची अधिक गर्दी असून, बलिप्रतिपदेपासून या मार्गांवर जादा बसेस सोडण्यासाठी महामंडळ सज्ज झाले आहे.

दिवाळीनिमित्त ठक्कर, सीबीएस आणि महामार्ग बसस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी पहावयास मिळते आहे. विशेषत: लक्ष्मीपूजनानंतर गावी जाण्याकरिता तिकीट आरक्षणाला पसंती दिली जात आहे. प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेऊन बुधवार (दि. ७) पासूनच अतिरिक्त बसेसचे नियोजन केल्याची माहिती महामंडळाच्या डेपो एकचे प्रमुख किशोर पाटील यांनी दिली. धुळे, नंदुरबारकडे जाण्यासाठी प्रवाशांची अधिक गर्दी असल्याने या मार्गावर अधिकाधिक बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांची अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी झाल्यास अतिरिक्त बसेस सोडण्याची तयारीदेखील महामंडळाने केली आहे. जिल्ह्यांतर्गत कळवण, मालेगाव आणि सटाणा या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांची अधिक संख्या लक्षात घेऊन या भागातही लक्ष्मीपूजन ते भाऊबीज आणि पुढे सोमवारपर्यंत अधिकाधिक बसेस सोडण्याची तयारी महामंडळाने केली आहे. दिवाळीत प्रवाशी वाहतुकीवर प्रचंड ताण असतो. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीचे चालक, वाहकांसह अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

..

करंट बुकिंगची सुविधा

यंदा प्रथमच दिवाळीचे औचित्य साधून राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाही बसेससाठी नाशिक-पुणे आणि नाशिक-धुळे मार्गावर करंट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नाशिक-पुणे मार्गावर द्वारका आणि बिटको येथे तर धुळे मार्गावर द्वारका आणि जत्रा हॉटेल चौक येथेही प्रवाशांना चढ-उतर करता येणार आहे.

-

प्रवाशांची पळवापळवी

प्रवाशांची वाढती गर्दी खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या पथ्यावर पडली आहे. धुळे आणि पुणे मार्गावरील प्रवासासाठी ठक्कर बसस्थानकात तिकीट बुकिंगला अधिक गर्दी आहे. पुणे शिवशाहीकरिता ४५० रुपये, तर धुळ्यासाठी ३४० रुपये मोजावे लागत आहेत. धुळ्याला जाण्याकरिता साध्या बसेस २२५ रुपये भाडे आकारत आहेत. खासगी वाहतूकदारांनी देखील प्रवासी सेवेसाठी ठक्कर बाजारबाहेर तळ ठोकला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानधनावर उद्यान निरीक्षकांची भरती

$
0
0

- पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले

- १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

- २२ नोव्हेंबरला मुलाखती

- पाच पदे भरणार

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उद्यान आणि आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे महापालिकेचे स्वच्छतेचे रँकिंग घसरल्यानंतर पालिकेने 'स्वच्छ नाशिक, हरित नाशिक' ही प्रतिमा जपण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आरोग्य विभागासाठी आऊटसोर्सिंगद्वारे सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली असतानाच आता उद्यान निरीक्षकांची मानधनावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यान निरीक्षकांच्या पाच रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत असून, २२ नोव्हेंबरला मुलाखती होणार आहेत.

महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी ४७३ लहान मोठ्या उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे उद्यानांचे शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या महापालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे उद्याने ओसाड, भकास बनली आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची रिक्त पदे उद्यानांच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरत आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे सुमारे २७६ उद्याने देखभाल दुरुस्तीसाठी खासगी ठेकेदाराला देण्यात आली आहेत. परंतु, काही वर्षांपासून उद्यान अधीक्षक पदावर जबाबदार अधिकारी नव्हता. उद्यान निरीक्षकांच्या सहा पदांपैकी केवळ एकच उद्यान निरीक्षक कार्यरत असल्याने नियंत्रणाअभावी देखभालीसाठी दिलेल्या उद्यानांची अवस्थादेखील दयनीय झाली आहे. परसेवेतून उद्यान अधीक्षकांचे पद भरल्यानंतर आता उद्यान निरीक्षकांची भरती मानधनावर करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच पदांसाठी मानधनावर ही भरती केली जाणार आहे.

...

अर्ज करण्यासाठी अर्हता

या पदासाठी बीएस्सी (कृषी) अथवा बीएस्सी (उद्यानविद्या) अथवा बीएस्सी (फॉरेस्ट्री) शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. महापालिका मुख्यालय, राजीव गांधी भवनातील उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागात १७ नोव्हेंबर २०१८ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यानंतर २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदारांची ‘बिल’कोंडी

$
0
0

लेखाधिकारी सुटीवर गेल्याने देयके रखडले

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या घंटागाडी ठेकेदारांच्या बिलासह एका टीडीआर प्रकरणात २१ कोटींची देयके अदा करण्याची घाई करणाऱ्या पालिकेने मात्र अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या लहान ठेकेदारांच्या बिलांकडे दुर्लक्ष केले आहे. ऐन दिवाळीत महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी रजेवर गेल्याने आणि प्रभारी अधिकाऱ्याने अधिकार नसल्याचे कारण देत देयकांवर सह्या करण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. सुमारे दहा कोटींची बिले या ठेकेदारांची अडकले असल्याची चर्चा असून, या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. त्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांचे अधिकार वाढवून देयके मंजुरीचे प्रयत्न सुरू आहेत.

महापालिकेत दिवाळीची धामधूम सुरू असतानाच पालिकेचे मुख्याधिकारी सुहास शिंदे हे सुटीवर गेल्याने ठेकेदारांची मोठी कोंडी झाली आहे. शिंदे यांनी सुटीवर जाण्यापूर्वी पालिकेतील घंटागाडी ठेकेदारांचे देयके अदा केली. परंतु, अन्य ठेकेदारांच्या देयकाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. शिंदे पालिकेत रुजू झाल्यापासून सुटीवर गेले नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी त्यांच्या रजा मंजूर केल्या. परंतु, लेखाधिकी सुटीवर गेल्याने लहान ठेकेदारांची दिवाळी मात्र कोरडी गेली आहे. शिंदे यांनी कनिष्ठाकडे प्रभारही दिला आहे. परंतु, त्यांना दीड लाखाच्या वरची देयके अदा करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे दीड लाखाच्या पुढची देयके अदा करताना अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ठेकेदारांनी प्रशासनाकडेही धाव घेतली. तसेच, पालिकेतील सभागृहनेते दिनकर पाटील यांच्याकडे धाव घेतली. पाटील यांनी याबाबत प्रशासन उपायुक्त महेश बच्छाव यांच्याकडे धाव घेत ठेकेदारांची कैफीयत मांडली.

...

प्रभारीकडे अधिकार?

पालिकेत ४० ते ४५ ठेकेदारांचे जवळपास १० कोटींपेक्षा अधिक देयके अडकल्याची चर्चा आहे. या ठेकेदारांकडे कार्यरत असलेल्या कामगारांवरही त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी धावाधाव सुरू झाली असून, आता प्रभारी अधिकाऱ्यांचे अधिकार वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्पोर्ट दोन बातम्या

$
0
0

क्रिकेट स्पर्धेत 'बीवायके' विजयी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या 'बीवायके' कॉलेजच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत आपले वर्चस्व राखत या वर्षीही विजेतेपद पटकावले.

'बीवायके'च्या संघाकडून सोहम गज्जरने पाच सामन्यात १० बळी मिळवून मोलाचा वाटा उचलला. प्रणव पवारने प्रत्येक सामन्यात आक्रमक फलंदाजी करून आपल्या संघाच्या पाच सामन्यात एकूण १२० धावांचे योगदान दिले. तर मधल्या फळीतील खेळाडू आनंद विश्वकर्माने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत पाच सामन्यात तब्बल १८५ धावा तडकावल्या. 'बीवायके'ने अंतिम फेरीत पंचवटी महाविद्यालयाचा २३ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. 'बीवायके'च्या या कामगिरीमुळे त्यांच्या पाच खेळाडूंची नाशिक विभागाच्या संघात निवड करण्यात आली आहे. यामध्ये सोहम गज्जर, अमित मैंद, प्रणव पवार, आनंद विश्वकर्मा आणि प्रदुन्म राखे यांचा समावेश आहे. पुणे विभागाच्या अंतर विभागीय स्पर्धा सिंहगड इन्स्टिट्यूट, लोणावळा येथे होणार आहे. हे खेळाडू या स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधीत्व करतील. आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या २७ वर्षाच्या स्पर्धेच्या निकालावर नजर टाकल्यास 'बीवायके'ने २३ वेळा या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

0000

वाजे विद्यालयाला कास्यपदक

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

मविप्र संचलित लो. शं. बा. वाजे विद्यालयातील बॉल बॅडमिंटन संघाला राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. संघाने कास्यपदक पटकावून शाळेच्या नावलौकीक वाढविला. १ ते ३ नोव्हेंबरदरम्यान क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रायगड द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा नेहुली (अलिबाग) येथे पार पडल्या. राज्यस्तरीय स्पर्धेत वाजे विद्यालयाचा १७ वर्षांखालील मुलींचा बॉल बॅडमिंटन संघाने विजय मिळवत कास्यपदक पटकावले. या विजयासह 'वाजे'चा संघाने राज्यात तृत्तीय क्रमांकाचे चषक पटकाविले.

स्पर्धेमध्ये वाजे विद्यालयातील खेळाडूंनी यशश्री खेचून आणली. स्पर्धेत तेजश्री गमे, तृप्ती कासार, गायत्री माळी, गायत्री पोटे, हर्षदा लांडगे, सिद्धी सोनवणे, साक्षी सोनवणे, भक्ती गाडे खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत राज्यात शाळेचे नाव उंच शिखरावर नेले. विजयी संघाचे अभिनंदन संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, संचालक हेमंत नाना वाजे, सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष कृष्णाजी भगत गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ, नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ आदींनी अभिनंदन केले. खेळाडूंना क्रीडाशिक्षक हेमलता वाघ, ज्ञानेश्‍वर नवले, वसंत शिंदे आदींचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यालये सुटीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीनिमित्त बुधवार (दि.७) पासून सरकारी कार्यालयांना सुटी असून, मंगळवारी दुपारनंतरच अनेक कार्यालयांमध्ये शुकशुकाट पहावयास मिळाला. सोमवारी (दि.१२) ही कार्यालये गजबजणार असून, तोपर्यंत कार्यालयांमधील कामकाज ठप्प होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीलाही सुटी असल्याने तेथील व्यवहारही ठप्प झाले आहेत.

दिवाळी सणाला सुरुवात झाली असून, लक्ष्मीपूजन हा सणाचा मुख्य दिवस आहे. त्यामुळे बुधवारपासूनच सरकारी कार्यालयांना सुटी आहे. भाऊबीजेपर्यंत ही सुटी असून, त्या पाठोपाठ महिन्याचा दुसरा शनिवार आणि रविवारची सुटी आल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी अधिक गोड ठरली आहे. उद्यापासून सुटी असली तरी मंगळवारी दुपारनंतरच महसूल आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह अनेक सरकारी कार्यालयांमधून कर्मचारी बाहेर पडू लागल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे दुपारनंतरच या कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला. परिणामी कामे घेऊन आलेल्या नागरिकांनाही माघारी परतावे लागले. सरकारी कार्यालयांमध्ये कामांचा वेग मंदावला असून, आठवडाभरानंतरच ही कामे वेग घेणार आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांची सुटी सुरू झाली असून, त्यामुळे तेथेही शुकशुकाट पहावयास मिळला. दिवाळीमुळे बाजारसमिती बंद राहणार असल्याने भाजीपाल्याची आवकही मंदावण्यास सुरुवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधनपुष्पाबाई लाहोटीजेलरोड : भगूर येथील

$
0
0

निधन

पुष्पाबाई लाहोटी

जेलरोड : भगूर येथील पुष्पाबाई जयनारायण लाहोटी (वय ७२) या सोमवारी रात्री निधन झाले. रेणुका माता मंदिरासमोरील बारवामध्ये हातपाय धुण्यास गेल्या असता पाय घसरुन पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सुना असा परिवार आहे. व्यापारी नंदकिशोर लाहोटी यांच्या त्या काकू होत.

00

शेवंताबाई कदम

देवळाली कॅम्प : येथील संसरी लेनमधीज शेवंताबाई परशराम कदम (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्च्यात दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गवळीवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश कदम व व्यावसायिक शामराव कदम यांच्या त्या मातोश्री होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल ठेवा रिचेबल!

$
0
0

अत्यावश्यक सेवाविभागांना सतर्कतेचे आयुक्त मुंढे यांचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या काळात सुटीवर जाण्याच्या तयारीत असणाऱ्या महापालिकेतील अधिकाऱ्यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. दिवाळीत नागरिकांना त्रास होऊ नये, मूलभूत सुविधांविषयक तक्रारींचे तात्काळ निराकरण व्हावे, यासाठी अत्यावश्यक सेवा विभागांना मुंढे यांनी दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. सुटीच्या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मुंढे यांनी खातेप्रमुखांची बैठक घेतली. विविध विभागांच्या कामकाजाचा तसेच एनएमसी ई-कनेक्ट ॲपवर प्राप्त झालेल्या विविध विभागांशी संबंधित तक्रारी व त्यांच्या निराकरणाविषयीचा आढावा त्यांनी घेतला. दिवाळीनिमित्त्त महापालिकेला ७ ते ११ नोव्हेंबर या दरम्यान सुटी असणार आहे. सुटीच्या कालावधीतही महापालिकेच्या सेवा खंडित होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. मूलभूत सुविधांविषयक नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण व्हावे, या दृष्टीने सज्ज राहण्याच्या सूचना आयुक्तांनी खातेप्रमुखांना दिल्या.

... तर कारवाई अटळ!

प्रामुख्याने पाणीपुरवठा, विद्युत, वैद्यकीय, आरोग्य, अग्निशमन, या अत्यावश्यक सेवांविषयक विभागांनी या कालावधीत अलर्ट राहावे. सुटी असली तरी अधिकाऱ्यांनी आपापले मोबाइल फोन बंद ठेवू नयेत. फोनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारी वा सूचनांच्या दृष्टीने वेळीच पावले उचलली जावीत, असे सांगत, याकडे दुर्लक्ष व हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशासकीय सदस्य निवडीवरून वाद

$
0
0

महासभेवरील प्रस्तावाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या महासभेत वृक्षप्राधिकरण समितीच्या सदस्य निवडीचा वाद ताजा असतानाच आता अशासकीय सदस्यांच्या निवडीचा वाद उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. माजी वृक्षप्राधिकरण सदस्य आणि मनसेच्या कामगार सेनेचे प्रमुख संदीप भवर यांनी महासभेवर ठेवण्यात आलेला दोन अशासकीय सदस्य नियुक्तीचा प्रस्ताव हा सदोष असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी याबाबत लेखी आक्षेप घेत यात सुधारणा न झाल्यास उच्च न्यायालयातील सुनावणी सुरू असलेल्या याचिकेत आयुक्त, महापौर व नगरसचिवांना प्रतिवादी करण्याचा इशारा दिला आहे.

भवर यांनी याबाबत आयुक्तांकडे लेखी हरकत नोंदवत, संपूर्ण प्रक्रियेवरच आक्षेप नोंदवला आहे. वृक्ष प्राधीकरण समितीवर अशासकीय नियुक्तीबाबत उच्च न्यायालयाने २००६ व २००९ मधील याचिकेत सदस्य निवडीसाठी स्पष्टपणे आचारसंहिता घालून दिली आहे. त्यानुसार सदस्य सामाजिक वनीकरण विभागाकडे नोंदणीकृत सदस्य असावा व त्या संस्थेची पाच वर्षांचा समृद्ध अनुभव असावा तसेच त्याकडे बीएएस्सी अॅग्री क्लचर डिप्लोमा किंवा डिग्री असावी असा उल्लेख आहे. यापद्धतीने अर्हता असलेले किती अर्ज प्रशासनाकडे आले, हे प्राप्त अर्ज महापालिकेने गठीत केलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीवर ठेवून त्यातील निर्णय घेण्याची मुभाही त्यांनाच असल्याचा दावा भवर यांनी केला आहे. अशासकीय सदस्य निवडीचा कोणताही अधिकार महासभेला नसून सदरील प्रस्ताव सदोष असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे समितीचा वाद आणखीनच वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images