Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बोंडअळीच्या नुकसान भरपाईपोटी द्यावयाच्या मदतीचा आठ कोटी ७७ लाख रुपयांचा तिसरा हप्ता जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. दुष्काळाचा सामना करणाऱ्या येवला आणि मालेगावमधील ३८ हजार ६३ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत वर्ग करण्यात येणार आहे. दिवाळीच्या तोंडावर ही मदत आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गतवर्षी खरीपात सात तालुक्यांमध्ये कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे या तालुक्यांमधील ५३ हजार ३९३ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा पंचनामा करून त्याचा अहवाल सरकारकडे पाठविला. नुकसान भरपाईपोटी २६ कोटी ३० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानुसार एप्रिल २०१८ मध्ये पहिला तर जुलैमध्ये दुसरा हप्ता प्रशासनाला प्राप्त झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत १७ कोटी ५६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली. आता पुन्हा मालेगावसाठी पाच कोटी ३९ लाखाची तर येवल्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीन कोटी ३७ लाख रुपयांची मदत प्राप्त झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली आहे. सोमवारनंतर ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजारपेठा ओसंडल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील विविध कंपन्यांमधील कामगारांसह खासगी क्षेत्रातील नोकरदारांनी सुटीची पर्वणी साधत शनिवारी सहकुटुंब दिवाळीच्या खरेदीला पसंती दिल्याने मेनरोडसह शहर, तसेच उपनगरांतील बाजारपेठा गर्दीने ओसंडल्या होत्या.

कपडे, फराळ, पणत्या, आकाशकंदील, रोषणाई यांसह इतर वस्तूंच्या खरेदीला उधाण आले होते. मेनरोड, दहीपूल, रविवार कारंजा या मुख्य बाजारपेठेसह मॉल्स व उपनगरांतील बाजारपेठांत रात्री उशिरापर्यंत खरेदीचा उत्साह टिकून होता. ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेत दुपारी ४ नंतर मुख्य बाजारपेठेकडे जाणारे रस्ते पोलिसांनी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केले होते.

विक्रेत्यांना दिलेल्या ऑफर्सची लयलूट यावेळी ग्राहकांनी केली. पणत्या, आकाशकंदील आदींसह फराळाच्या विविध पदार्थांची मेनरोडसह इतर बाजारपेठांत चलती दिसून आली. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहन, दागिन्यांच्या बुकिंगलाही ग्राहकांची विशेष पसंती दिसली. लहानग्यांसह ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्येच दिवसभर खरेदीचा उत्साह टिकून होता.

--

\Bआजही उसळणार गर्दी\B

दिवाळीच्या अगोदरचा रविवार असल्याने आजही मुख्य बाजारपेठेत ग्राहकांची सकाळपासूनच गर्दी उसळण्याची चिन्हे आहेत. ग्राहकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी बॅरिकेडिंग करीत साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत. ग्राहकांची गर्दी वाढू लागल्यास रविवार कारंजा, शालिमार व रेड क्रॉसकडून मेनरोडकडे जाणारे सर्व रस्ते वाहनांना बंद करण्यात येतील. दुपारी ४ नंतर वाहनांना प्रवेश बंद असेल, असे नियोजन पोलिसांनी केले आहे.

--

\Bयेथे करावे पार्किंग

\Bग्राहकांना वाहनांचा त्रास होऊ नये म्हणून मेनरोड परिसरात जाणारे रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे बी. डी. भालेकर मैदानाचा वापर ग्राहक पार्किंगसाठी करू शकतात. रेड क्रॉस, शालिमार व रविवार कारंजा भागात पोलिसांच्या सांगण्यानुसार वाहने पार्किंग करू शकतात. चुकीच्या ठिकाणी वाहने पार्किंग करू नये. पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

\B--

कोंडी अन् पोलिसांची अरेरावी

\Bदिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने शालिमार, अशोक स्तंभ, रविवार कारंजा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसले. शालिमार परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेली वाहने वाहतूक पोलिसांनी टोइंग केल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागला. परिसरात राहणाऱ्या नागरिकांची वाहनेही मेनरोडकडे जाऊ देत नसल्याने पोलिस आणि रहिवाशांमध्ये वादावादी झाली. पोलिसांनी अरेरावी केल्याचा आरोप नागरिकांनी केला.

००००००००००००००००००००००००००००००

पॉइंटर्स...

--

उत्सव नात्यांचा -२

मुंढेंवर प्रश्नांची सरबत्ती -३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टात आज पुन्हा कोम्बिंग

$
0
0

कोर्टात पुन्हा कोम्बिंग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी आज, शनिवारी सकाळी जिल्हा कोर्टात कोम्बिंग ऑपरेशन राबवत ४० संशयितांना ताब्यात घेतले. या सर्वांची चौकशीनंतर त्यांना संध्याकाळी सोडून देण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्हा कोर्टात राबता असलेल्या सराईतांची चांगलीच पंचायत झाली.

पंचवटीतील भेळ विक्रेता सुनील वाघ याच्या हत्येप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या खटल्याची सुनावणी सुरू असून, आज गुन्ह्यातील संशयितांना कोर्टात हजर करण्यात आले होते. दुसरीकडे धुळे येथील एका मोक्का प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम हजर होते. या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली, मुंबई नाका, गंगापूर, सरकारवाडा, पंचवटी आणि म्हसरूळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कोर्टात येणाऱ्या नागरिकांची तपासणी सुरू केली. यात ४० संशयित नागरिक पोलिसांच्या हाती लागले. हे संशयित आरोपींना मदत करण्यासाठी हजर आले होते. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. संध्याकाळी कोर्टाचे कामकाज संपल्यानंतर सर्वांना सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभवार्ता

$
0
0

स्टील फर्निचर

उद्योगाला चालना

नाशिक : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नवा अध्यादेश काढला आहे. त्याचा महाराष्ट्रातील सात शहरांना फायदा होणार आहे. नाशिकमध्ये स्टील फर्निचर उद्योगाला चालना दिली जाणार आहे. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये फार्मा, नागपूर, सांगली आणि धुळ्यात फूड प्रोसेसिंग, पुण्यात ऑटो कॉम्पोनंट आणि फार्मा, तर ठाण्यात पॉवरलूम उद्योगाला बळ दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्याच्या’ जाण्याने आम्हाला धक्काच!

$
0
0

जलतरण तलावात पोहणारे खेळाडू भावूक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'तो आमच्या सोबत अनेकदा स्विमिंग करायचा. तो उत्तम स्विमर होता. त्याची प्रकृती कायम ठणठणीत असायची. अचानक स्विमिंग करताना त्याला काय झालं हे अद्याप माहिती नाही. पण त्याच्या जाण्याने आम्हाला धक्का बसला आहे. एक उत्तम दर्जाचा स्विमर असा अचानक जाणे हे दु:ख न पेलवणारे आहे', अशी भावना देवव्रत या खेळाडूच्या जाण्याने भावूक झालेल्या खेळाडूनी व्यक्त केली.

त्र्यंबक रोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावात १८ वर्षाच्या देवव्रत गायकवाड या खेळाडूचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना घडल्यानंतर जलतरण तलावावर पोहोण्याचा सराव करणाऱ्या खेळाडूना धक्का बसला. जलतरण तलावात कायम दोन प्रशिक्षक पाण्यात तैनात असतात. कोणत्याही खेळाडूला त्रास झाल्यास त्याला तातडीने मदत केली जाते. कितीही गर्दी असली तरी प्रत्येकावर प्रशिक्षकांचे लक्ष असते, असे अंकुश जाधव या खेळाडूने सांगितले. तलावातील प्रशिक्षकांची सर्व खेळाडूवर बारिक नजर असते. दोन वर्षांपासून पाल्य आणि मी स्विमिंग करीत आहे. व्यवस्थापनाची प्रत्येकाला तातडीने मदत मिळते. एखाद्या खेळाडूचे असे अचानक जाणे दु:खद आहे, असे मनोज वैष्णव यांनी सांगितले. देवव्रत सोबत मी अनेकदा स्विमिंग केले आहे. तो अतिशय चांगला स्वीमर होता. इथले प्रशिक्षकांची त्याला कायम मदत असायची. नव खेळाडूना प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असते. देवव्रतच्या जाण्यामागे त्याच्या आरोग्याचे काय कारण आहे हे समजले नाही, असे खेळाडू राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांनी पळविले ‘एटीएम’

$
0
0

धुळ्यातील घटना; पोलिसांचा तपास सुरू

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील मालेगाव रोडलगत आस्था हॉस्पिटलसमोर असलेल्या आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशिनच अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी (दि. २) मध्यरात्री चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. ३) सकाळी उघडकीस आली. या मशिनमध्ये अंदाजित २० ते २५ लाखांची रोकड असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती जिल्हा पोलिस विभागाला समजताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. श्वानपथक, ठसे तज्ज्ञदेखील या वेळी तत्काळ दाखल झाले. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला जात असून, या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगावरोडलगत एचडीएफसी व आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहेत. यामधील आयसीआयसीआय बँकेचे दोन एटीएम ग्राहकांना रोकड काढण्यासाठी ठेवण्यात आले होते. शनिवारपासून सलग दिवाळीनिमित्त सुट्या असल्याने मशिनमध्ये कॅश मोठ्या प्रमाणावर भरणा करण्यात आल्याचा फायदा या चारेट्यांनी उचलला. दरम्यान, शुक्रवारी (दि. २) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटे पिकअप व्हॅन घेऊन एटीएम मशिनजवळ आले आणि लोखंडी दांड्याने एटीएम पिकअप वाहनात ठेवताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. पुढचे फुटेज यात नसून बँकेने एटीएममध्ये बसविलेल्या एका यंत्राच्या साहाय्याने मुख्य कार्यालय मुंबईला ही घटना समजली. एटीएम सेंटरच्या शेजारी चहाची टपरी चालविणारा शनिवारी सकाळी दुकानावर आला, त्याला एटीएम सेंटरचा दरवाजा उघडा दिसला आणि एक मशिन दिसून आले नाही. याबाबत त्याने नागरिकांना माहिती दिली असता नागरिकांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात कळविण्यात आले. यानंतर श्वानपथक व ठसे तज्ज्ञांनी एटीएम सेंटरमधील सर्व परिसरात आपली कामगिरी करीत परिसर पिंजून काढला. मात्र, चोरट्यांचा कोणताही सुगावा हाती लागला नाही. दरम्यान, मशिन असलेल्या ठिकाणावरील काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या असून पोलिसांकडून चोरट्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलिसांची रात्रीला पेट्रोलिंग असूनही शहरात हा प्रकार झालाच कसा, हा प्रश्न चर्चेला आला आहे.

बिट मार्शल पथके नावालाच
जिल्ह्यात प्रत्येक पोलिस ठाण्यात चार बिट मार्शल पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र, शहरासह जिल्ह्यातील हे पथके नावालाच उरले असून, काही जण तर घरी बसूनच पोलिस कंट्रोल विभागाला आपले लोकेशन देवून मोकळे होतात. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर आता नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेहमीच चोरी, खून, दरोडे अशा विविध घटना होत असतात. मात्र, खाकीचा वचक शहरात फक्त काही अंशी शिल्लक राहिला आहे, असेही नागरिकांनी या घटनास्थळी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ परीक्षा केंद्र रद्द करण्याची शिफारस

$
0
0

बीएससी पेपरफुटीबाबत चौकशी समितीची अहवाल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बीएससी कॉम्प्युटर सायन्सचे तृतीय वर्षाचे पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वी व्हॉट्सअॅपद्वारे फुटले होते, असा निष्कर्ष याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने काढताना जिल्ह्यातील चांदोरी येथील के. के. वाघ कला, वाणिज्य आणि कॉम्प्युटर सायन्सचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात यावे अशी शिफारस समितीने केली आहे. याप्रकरणी संबंधित दोषींवर संस्थेने फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशीही शिफारस करण्यात आली आहे. याबाबत संस्थेशी संपर्क साधला असता अद्याप विद्यापीठाकडून याबाबत सूचना आलेली नाही. अशी मिळताच संस्था व संबंधित महाविद्यालय याप्रश्नी योग्य ती कार्यवाही करेल, अशी माहिती संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली.

पंधरवड्यापूर्वी बीएससी कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाची परीक्षा घेण्यात आली. १७ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे पाऊण तास अगोदर परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका इतर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅपद्वारे व्हायरल झाल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे आल्या होत्या. याप्रकरणी डॉ. दिनेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा मंडळ व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी एकसदस्यीय समिती नेमली होती. या समितीची बैठक नुकतीच विद्यापीठात पार पडली. या बैठकीस परीक्षा व मुल्यमापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

चौकशी समितीच्या अहवालानुसार संबंधित परीक्षा केंद्र रद्द करणे आणि संबंधित प्रकरणातील संशयीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे अशी पावले तातडीने उचलायची आहेत. पैकी हे गुन्हे कॉलेज प्रशासनाने दाखल करायचे आहेत. या शिफारशींवर कॉलेजची बाजू समजावून घेण्यासाठी संस्थेशी संपर्क साधला असता ही माहिती माध्यमांमधूनच हाती येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, विद्यापीठाचे कुठलेही पत्र अद्यापपर्यंत संस्थेस मिळालेले नाही. विद्यापीठाच्या सूचना मिळताच संबंधित कॉलेज आणि संस्था याबाबत योग्य तो निर्णय घेतील अशी माहिती संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली.

- - -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची जनजागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या घरफोडी, चेन स्नॅचिंग याशिवाय इतर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर गंगापूर पोलिसांनी आपल्या हद्दीत नागरिकांशी संवाद साधत प्रतिबंधक उपाययोजनाबाबत माहिती दिली.

गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीत अचानक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली. त्यातच आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या गुन्ह्यांमध्ये गंगापूरच नव्हे तर शहराच्या इतर भागात सुद्धा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरटे सक्रिय होतात. याच काळात चेन स्नॅचिंगचे प्रमाण देखील वाढते. या पार्श्वभूमीवर गंगापूर पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधला. जयभवानी मंदिर, भैरवी हॉटेलच्या पाठीमागे असलेला परिसर, शिवजीनगर, कृषीका गार्डन परिसरात ही जनजागृती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुण शेतकऱ्याची कळवणमध्ये आत्महत्या

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना दुष्काळाची झळ बसत आहे. कळवण तालुक्यातील ओतुर गावात ऐन दिवाळीच्या तोंडावर एका तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दत्तात्रेय उर्फ बापू नारायण देशमुख (वय ३८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी साडे अकरा ते बाराच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. देशमुख यांच्या नावे ०.४७ हेक्टर स्वतंत्र क्षेत्र असून सामाईक क्षेत्र ०.९१ हेक्टर आहे. त्यांच्या नावे विविध कार्यकारी सोसायटीचे दीड लाख रुपयांचे तर अन्य एका बँकेचेही कर्ज असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. देशमुख यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. या र्दूदैवी घटनेमुळे जिल्ह्यात चालू वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ८६ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्तेच बनले वाहनतळ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या खरेदीसाठी रविवारी जणू पूर्ण शहरच रस्त्यावर उतरल्याने वाहतूक व्यवस्थेचा पुरता फज्जा उडाला. बाजारपेठांमध्ये आलेल्या नागरिकांनी दिसेल त्या मोकळ्या जागेवर वाहने उभी केल्याने रस्ते जणू वाहनतळ बनले. रविवार कारंजा, मेनरोडसारख्या वर्दळीच्या परिसरात रस्त्यांवरच वाहने उभी केल्याने चालण्यासाठीही जागा मिळणे कठीण झाले. त्यामुळे खरेदी केलेल्या सामानाच्या पिशव्या घेऊन वाट काढताना नाशिककर मेटाकुटीला आले.

मांगल्याचे दीप उजळत येणाऱ्या आणि सर्वांच्याच सुख-समृद्धीची मंगल कामना करणाऱ्या दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. धनत्रयोदशी सोमवारी होत असून, शुक्रवारपर्यंत दिवाळीचा उत्साह कायम राहणार आहे. धनत्रयोदशीची पूर्वसंध्या आणि रविवारची सुटी असा दुहेरी योग जुळून आल्याने नाशिककरांनी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये तोबा गर्दी केली. प्रत्येक रस्ता गर्दीने ओसंडून वाहू लागल्याने जणू पूर्ण शहरच खरेदीसाठी रस्त्यांवर उतरल्याचे चित्र होते. खरेदीसाठी वाहने घेऊन आलेले नागरिक कुटुंबीयांसह रस्त्यांवर उतरल्याने शहरातील वाहनतळ अपुरी ठरली. वाहने लावण्यासाठी अधिकृत वाहनतळ उपलब्ध होत नसल्याने मोकळी जागा मिळेल तेथे वाहने उभी करण्यात नागरिकांनी धन्यता मानली. रविवार कारंजा, मेनरोडसारख्या मुख्य बाजारपेठांच्या परिसरात रस्त्यांवरच वाहने उभी करून नागरिक खरेदीसाठी गेल्याने दुपारपासून हा रस्ता वाहतुकीऐवजी थबकल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठीही पुरेशी वाट मिळत नव्हती. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. खरेदी केलेल्या सामानाच्या पिशव्या घेऊन वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना नागरिकांची दमछाक झाली. परिणामी, शहराच्या मध्यवर्ती भागातील अन्य रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

रिक्षांनी अडवला रस्ता

मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रविवार कारंजा चौकात वाहतुकीचा फज्जा उडाला. प्रवासी वाहतूक करणे सोयीस्कर व्हावे यासाठी रिक्षाचालकांनी या चौकातील रस्त्यांवरच रिक्षा उभ्या केल्या. त्यामुळे अन्य वाहनधारकांना रविवार कारंजापर्यंत वाहने घेऊन येणेही कठीण झाले. दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत हेच चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडली. विशेष म्हणजे दिवाळीचा माहोल आणि रविवारची सुटी यामुळे वाहतुकीच्या नियोजनासाठी पोलिसही उपस्थित नसल्याने गोंधळाची परिस्थिती आणखी वाढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवर्धने महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

$
0
0

गोवर्धने कॉलेजात

माजी विद्यार्थी मेळावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरी येथील मविप्र समाजाचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा झाला. सरस्वती प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख अतिथीच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी सर्व माजी विद्यार्थांचे स्वागत व सत्कार केला. प्रास्ताविक संयोजक प्रा. एल. एस. कांदळकर यांनी केले.

मेळाव्याप्रसंगी मागील सभेचे इतिवृत्त वाचन सरचिटणीस माजी विद्यार्थी संघटना सागर हांडोरे यांनी केले. प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी आपल्या मनोगतात कॉलेजमध्ये येऊ घातलेल्या नॅक समितीविषयी तसेच कॉलेजचा विकास या विषयी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात प्रामुख्याने कॉलेजचा विकास, नॅक पुनर्मूल्यांकन, विविध योजना, सामाजिक बांधिलकी अशा विषयांवर चर्चा करण्यात आली. तर माजी विद्यार्थांमध्ये प्रदीपसिंग राजपूत, जयंत गोवर्धने, महेश कदम, विष्णू वारुंगसे, महेश गव्हाणे, सरिता अहिरे, गोरख वाजे, समाधान कडवे या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रा. आर. के. पाटील यांनी प्राध्यापकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात महेश श्रीश्रीमाळ यांनी कॉलेज व परिसरात असणाऱ्या विविध सोयी सुविधा तसेच सामाजिक हित जोपासणी याविषयी आपले मत मांडले. यावेळी पदवी व पदव्युत्तर झालेले विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी केले तर आभार प्रा. के. एम. वाजे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारी मांडण्याचे उद्योजकांना आवाहन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उद्योजकांना कोणत्याही शासकीय विभागाशी संबंधित तक्रारी असल्यास निर्भीडपणे पुढे येऊन लाचलुचपत विभागाला (एसीबी) संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी केले. नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) येथे झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक सप्ताहात ते बोलते होते. यावेळी मोठ्या प्रमाणात उद्योजक उपस्थित होते.

'निमा'चे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष शशिकांत जाधव व नितीन वागस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी 'एसीबी'चे उपअधीक्षक विश्वजित जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त शांताराम पाटील, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुटे, सोमनाथ तांबे, 'निमा'चे मानद सचिव सुधाकर देशमुख, खजिनदार कैलास आहेर, एमआयडीसीचे एरिया मॅनेजर एस. एम. शेख, ईपीएफओ विभागाचे डॉ. आर. के. त्रिपाठी व एस. एस. बागूल यांची उपस्थिती होती. यावेळी 'निमा'ने १००० बॅनर्स जनजागृतीसाठी देण्यात येणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनत्रयोदशी - विक्रांत जाधव

$
0
0

धनत्रयोदशी : आरोग्याची उपासना

वैद्य विक्रांत जाधव

आश्विन कृष्ण त्रयोदशी ही धन्वंतरी जयंती म्हणून ओळखली जाती साजरी केली जाते. हिला धनत्रयोदशी म्हणतात. समुद्रमंथनातून १४ रत्न प्रगट झाली त्यातील एक रत्न भगवान धन्वंतरी. भूतलावरील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य रक्षणासाठी भगवान धन्वंतरी प्रगट झाले. धन्वंतरी हे विष्णूचे अवतार मानले जातात. दीपावलीच्या चार दिवसांचा संबंध भगवान विष्णूशी दिसून येतो हेही लक्षात येते. दीपावलीचा दुसरा दिवस हा भगवान धन्वंतरीचा.

धन म्हणजेच आरोग्य असे गेल्या तपापर्यंत विश्वात मानणारी मंडळी होती. परंतु गेल्या दशकात आरोग्य हेच धन असे बिंबले आहे. यादिवशी आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी, भूतलावरील पहिले चिकित्सक यांचा वाढदिवस आणि म्हणून धन्वंतरीची पूजा सर्व चिकित्सक वैद्यगण तर करतातच पण सामान्य कुटुंब धन्वंतरीकडे आरोग्यसंपन्न आयुष्याची प्रार्थना करतात. वैद्य त्यांना उत्तम चिकित्सा करण्यासाठी आशीर्वाद मागतात. धन्वंतरी आपल्या हातात चार आयुधे घेऊन अवतरले. एका हातात शंख आहे. त्याने आसमंतातील दुषितता शंखनादाने दूर होते, दुसऱ्या हातात सुदर्शन चक्र हे शल्य चिकित्सेचे प्रतीक आहे. तिसऱ्या हातात जालौका हा प्राणी आहे. जालौका हा प्राणी अशुद्ध रक्त शोषून घेतो व आरोग्य देतो. चौथ्या हातात अमृतकलश असून ते औषधांचे प्रतीक आहे. असे धन्वंतरी भूतलावरील सर्व व्याधींचा विनाश करून पृथ्वीला आरोग्य देण्यासाठी अवतरले तो दिवस धनत्रयोदशी.

धन म्हणजे आरोग्य हे हजारो वर्षापूर्वी सांगितले आहे म्हणून त्यांची उपासन म्हणजे शरीररुपी धनाची उपासना. धन्वंतरींना धने व लाह्या वाहतात हेही विशेष असून शरद ऋतूतील आरोग्याशी त्याचा संबंध दिसतो.

----

विशेष नैवद्य : पूजनाच्या प्रसादामध्ये दुधाचा समावेश विशेष असून शरीर व मनाच्या सात्विक गुणांची वाढ धातूंची झीज भरुन काढणाऱ्या द्रव्यांचा समावेश करून नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद म्हणून देण्याची पद्धत संपूर्ण भारतात दिसून येते.. धन्वंतरीला 'क्षीरतिलावन' या दुधाच्या प्रकारचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. खवा, साळीच्या लाह्या, बत्तासे, वेलची चारोळी, सुंठ व किंचित मिरी टाकून दूधामध्ये ते एकजीव करून मिश्रण तयार करावे व आवश्यकतेनुसार थोडावेळ गरम करावे. या खिरीतील प्रत्येक द्रव्य शरीर धातूचे वर्धन करणारे असून थंडीत वाढणारा वात कमी करून कफाचे स्थिरत्व करणारे व पित्तशमन करणारे आहे. धन्वंतरी जयंतीला अनेक ब्राह्मण कुटुंब लक्ष्मीपूजन करतात व शरीर व धन अशा दोघांचीही उपासना करण्याची प्रथा दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीनंतर बैठकांवर जोर

$
0
0

रिंगणात असणार तीन पॅनल; इच्छुकांच्या नावांची उत्सुकता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दि नाशिक मर्चंन्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या (नामको) २१ संचालकपदासाठी येत्या २३ डिसेंबर रोजी निवडणूक घोषित झाल्यानंतर पॅनल निर्मितीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहे. माजी संचालकांसह अनेक इच्छुकांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर वैयक्तिक बैठका घेऊन चर्चा केली. यावेळी पुढील रणनीतीची प्रारुप आराखडाही तयार करण्यात आला. दिवाळीनंतर सर्व पॅनलच्या प्रमुखांनी बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळेस इच्छुकांचे नाव पुढे येणार आहेत.

निवडणुकीसाठी १९ ते २७ नोव्हेंबरदरम्यान अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे कमी वेळात संपर्क करून सर्वसमावेशक पॅनल करणे सर्वांना अवघड जाणार आहे. लक्ष्मीपूजनानंतर पॅनल निर्मितीसाठी अवघे २० दिवस मिळतील. यंदाच्या निवडणुकीत हुकुमचंद बागमार यांच्या समर्थकांचे पॅनल राहणार असून त्याचे नेतृत्व वसंत गिते व सोहनलाल भंडारी करणार असल्याची चर्चा आहे. तसेच विरोधकांनी सहकार पॅनल तयार केले जात असून त्याचे नेतृत्व भास्कर कोठावदे, गजानन शेलार, अजय ब्रह्मेचा, ललित मोदी करणार आहे. तर तिसऱ्या पॅनलची चर्चा आहे. यात अजित बागमार यांचे नाव चर्चेत आहे.

८० शाखा व १ लाख ७९ हजार सभासद असलेल्या या बँकेची कोट्यवधींची उलाढाल असल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. पाच वर्षे प्रशासकीय कारभार राहिल्यानंतर संचालक मंडळ आता निवडून येणार असल्याने सभासदांमध्ये उत्साह आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणात सभासद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणे अवघड काम इच्छुक उमेदवारांना करावे लागणार आहे. त्यासाठी अवधी कमी मिळेल, हे देखील स्पष्ट आहे.

आमची तयारी सुरू आहे. दिवाळीनंतर बैठक घेऊ, आम्ही सभासदांच्या संपर्कात आहे. प्रशासकीय कारकिर्दीवर अनेकांची नाराजी आहे. आपली बँक आपल्या ताब्यात असावी, अशी इच्छा सभासदांनी व्यक्त केली आहे.

- वसंत गिते, माजी चेअरमन

आम्ही सहकार पॅनलची निर्मिती करणार आहोत. या पॅनलचे नेतृत्व मी, गजानन शेलार, अजय ब्रह्मेचा व ललित मोदी करणार आहे. सभासदांबरोबर संपर्क सुरु आहे. दिवाळीनंतर बैठक घेऊन पॅनलची निर्मिती केली जाईल.

- भास्करराव कोठावदे, सहकार पॅनल

लोगो : नामको निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लॅप १ पाऊस

$
0
0

दिवाळीत अवकाळी

...

पावसाचा द्राक्षासह कांद्याना फटका

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये रविवारी सायंकाळी वादळवारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे द्राक्षांसह कांदा पिकावर परिणाम होणार असल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, ऐन दिवाळीच्या खरेदीवेळी पावसाने हजेरी लावल्याने शहरात विक्रेत्यांसह ग्राहकांची धांदल उडाली.

सिन्नरसह दिंडोरी, बागलाण, मालेगाव, इगतपुरी तालुक्यात रविवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. येवला, चांदवड, पेठ, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण असले तरी पाऊस झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. अवकाळी पावसाचा फटका द्राक्षबागांना बसणार असल्याने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये द्राक्षबागांची पहिली छाटणी होते. त्यानंतर तेथे पेस्ट लावली जाते; परंतु पावसामुळे ही पेस्ट धुतली गेली असून, द्राक्ष बागायतदारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. बागांवरील औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक शेतामध्येच ठेवले होते. पावसामुळे हे पीकही ओले झाले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पाऊस आणि दमट हवामान यामुळे कांदा पिकावरही रोग पडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

- सविस्तर वृत्त...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साळवे, रायतेंना उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने मराठी रंगभूमी दिनानिमित्त देण्यात येणारे यंदाचे रंगकर्मी पुरस्कार परिषदेचे रविवारी जाहीर करण्यात आले. कार्याध्यक्ष सुनील ढगे यांनी कालिदास कलामंदिरात रविवारी पत्रकार परिषदेत हे पुरस्कार जाहीर केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने स्थानिक कलाकारांच्या कार्याचा सन्मान व्हावा यासाठी नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यात दिग्दर्शन, अभिनय लेखन, प्रकाशयोजना, नेपथ्य, बालरंगभूमी, लोककलावंत व सांस्कृतिक पत्रकारिता आदी क्षेत्रांत योगदान दिलेल्या रंगकर्मींचा समावेश असतो. यंदाही हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार डिसेंबरमध्ये प्रदान करण्यात येणार असून, त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे ढगे यांनी सांगितले.

पुरुष अभिनयासाठी स्वर्गीय दत्ता भट स्मृती पुरस्कार : विजय साळवे

स्त्री अभिनयासाठी स्वर्गीय शांता जोग स्मृती पुरस्कार : नंदा रायते

दिग्दर्शनासाठी स्वर्गीय प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार : सुनील देशपांडे

बाल रंगभूमीसाठी स्वर्गीय वा. श्री. पुरोहित स्मृती पुरस्कार : सुनंदा शुक्ल

सांस्कृतिक पत्रकारितेसाठी जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार : सुनील भास्कर

लोककलावंतांना दिला जाणारा स्वर्गीय रामदास बरकले स्मृती पुरस्कार : प्रकाश नन्नावरे

लेखनासाठी दिला जाणारा स्वर्गीय नेताजी भोईर स्मृती पुरस्कार : मनोहर शहाणे

प्रकाशयोजनेसाठी गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार : मुरलीधर तांबट

नेपथ्यासाठी स्वर्गीय रावसाहेब अंधारे पुरस्कार : आनंद बापट

विशेष योगदान पुरस्कार

डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी

डॉ. अविनाश आंधळे

डॉ. राजेश आहेर

डॉ. राजीव पाठक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्लिल चाळे; संशयिताविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशक

घरामध्ये नग्नावस्थेत फिरून रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांचे लक्ष आपल्याकडे वेधणाऱ्या एका विकृत संशयिताविरुद्ध अंबड पोलिस स्टेशनमध्ये विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

संतोष पाटील (४०, रा. स्वामी समर्थनगर, अंबड) असे या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपीने मागील काही वर्षांपासून स्वत:च्या घरात कधी अर्धनग्न तर कधी नग्न अवस्थेत फिरतो. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना त्याचा त्रास होत होता. त्यातच शनिवारी (दि. ३) सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास पीडित हिला रस्त्याने जात असताना संशयित आरोपीने नग्नावस्थेत आवाज देऊन लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पीएसआय घाडगे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकल रॅलीद्वारे प्रदूषणमुक्तीचा संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे रविवारी (ता. ४) प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी प्रबोधन सायकल रॅली काढण्यात आली. या वर्षीची दिवाळी आपण पर्यावरणप्रेमी या नात्याने फटाके न वाजवता दिवे लावून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन नाशिककरांना रॅलीमार्फत करण्यात आले.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथून सकाळी साडेसहा वाजता रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. पुढे सीबीएस- अशोकस्तंभ- रविवार कारंजा- पंचवटी कारंजा- दिंडोरी नाका- तारवाला सिग्नल- डावीकडे वळण- पेठरोड सिग्नल- आरटीओ ऑफिस- चामरलेणी पायथ्याशी ते न्यू ग्रेस अॅकॅडमी स्कूल येथे रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीमध्ये विविध फलक लावून फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुटपुंज्या अनुदानाचा नाटकांना फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारकडून राज्य नाट्य स्पर्धेसाठी संस्थांना मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानात नाटक होऊ शकत नसल्याने यंदा नाटकांची संख्या कमी झाली असून, अनेक संस्थांनी आपली नाटके रद्द केली आहेत.

राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे हौशी रंगकर्मींसाठी पर्वणीच असते. अनेकदा वर्गणी काढून नाटके सादर केली जातात. या स्पर्धांमधून महाराष्ट्रात अनेक दिग्गज नट उदयाला आले आहेत. पूर्वी नाटक कमी खर्चात होत असे. मात्र, आता सर्वच बाबींची दरवाढ झाल्याने नाटक करणे परवडेनासे झाले आहे. नाटक सादर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने एका संस्थेला तीन हजार रुपये अनुदान मिळते. मात्र, नाटक करण्यासाठी कमीत कमी ५० हजार ते एक लाखापर्यंत खर्च येतो. नाटकात जास्त कलाकार असतील तर या खर्चाचे प्रमाण जास्त होते. नाटकात काम करणारी नटमंडळी जर कमावती असतील तर येणारा खर्च आपापसांत विभागून केला जातो. मात्र, महाविद्यालयीन तरुण असतील तर पैशांअभावी नाटक करणे सोडून द्यावे लागते. आज अनेक संस्थांनी केवळ खर्च जास्त होत असल्याने स्पर्धेत भाग घेणे सोडून दिले आहे. गेल्या वर्षीपासून अंतिम स्पर्धेत नंबरात आलेल्या नाटकांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्यात आली. नाटक उभारणीसाठी जर रक्कम जास्त मिळाली तर सध्या ज्या प्रमाणात नाटके सादर होतात, त्या पेक्षा जास्त नाटके स्पर्धेत सादर होऊ शकतील. आपल्याकडे खेळाडूंना त्याने पदक मिळवल्यानंतर सर्व सोयी-सुविधा मिळवून दिल्या जातात. याच सोयी त्याच्या उभरतीच्या काळात मिळाल्यास त्याला जास्त मदत होईल. याच पार्श्वभूमीवर कलावंतांना नाटक उभे करण्यासाठी जास्त रक्कम दिल्यास त्यातून दर्जेदार नाटकांची निर्मिती होण्यास हातभार लागेल.

नाशिक शहरात अनेक चांगल्या संस्था आहेत. मात्र नाटकाच्या निर्मितीचा खर्च वाढल्याने व सरकारी अनुदानात या नाटकाच्या खर्चाची मिळवणी होत नसल्याने नाटक करणे अवघड झाले आहे. सरकारने याबाबत विचार करायला हवा.

- मुकुंद कुलकर्णी, दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगभूमीच्या पदार्पणासाठी कॉलेजच अडसर!

$
0
0

लोगो : जागतिक रंगभूमी दिन विशेष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मल्टिप्लेक्सच्या जमान्यात मनोरंजनाची अनेक माध्यमे उपलब्ध असूनही नाट्यकलेवरील रसिकांचे प्रेम तसुभरही कमी झालेले नाही. खास बाब म्हणजे, तरुण पिढीदेखील नव्या उत्साहाने आता रंगभूमीकडे वळू लागली आहे. तरुणाईने साकारलेल्या एकांकिकांना रसिकांची दाद मिळत आहे. एकांकिका स्पर्धांबाहेर हाऊसफुल्लच्या पाट्या लागलेल्या दिसून येतात. रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी युवा नाट्य कलाकार अभिनयाची कला अधिकाधिक खुलवताना दिसताहेत. मात्र, युवा कलाकारांच्या रंगभूमीच्या पदार्पणात कॉलेजच अडसर ठरत असल्याची खंत युवा कलाकार व्यक्त करीत आहेत.

काही वर्षांपूर्वी एकांकिका स्पर्धा जिंकून आणलेला चषक मिरविण्याची लढत कॉलेजांमध्ये असायची. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांत एकांकिका स्पर्धांची ही रणधुमाळी कमी होताना दिसत आहे. नाट्यक्षेत्राच्या जडणघडणीला खऱ्या अर्थाने जेथून सुरुवात होते. तिथेच म्हणजेच, कॉलेजांमध्ये रंगभूमीवर पदार्पण करू इच्छिणाऱ्या कलाकारांना सहकार्य मिळत नसल्याचे वास्तव आहे. एकांकिका स्पर्धांच्या सरावासाठी हॉल नसणे, आर्थिक तरतूद नसणे, नाट्य स्पर्धा, तसेच स्नेहसंमेलनातही नाट्य कलाकारांना योग्य संधी न मिळणे यामुळे रंगभूमीच्या पदार्पणासाठी कॉलेजांऐवजी नाट्यसंस्थांचा आधार घ्यावा लागत आहे. कॉलेजांमध्ये असणारी कला मंडळे यामुळे नाममात्र उरल्याचे मत युवा कलाकार व्यक्त करीत आहेत. कॉलेजांच्या अनेक अडसरीच्या जंत्रीतून मार्ग काढण्यासाठी नाट्यकलेची ओढच आमच्या कामी येत असल्याचे युवा कलाकार सांगताहेत. यंदा तर यूथ फेस्टिवलमध्येही विद्यापीठाने रंगभूमीचा 'बे'रंग केल्याने रंगभूमीच्या पदार्पणासाठी कॉलेजांचे भविष्यात सहकार्य असेल का, याची चिंता कलाकारांना लागली आहे.

कॉलेज प्रशासन एकांकिका स्पर्धांसाठी प्रोत्साहित करते; पण त्यासाठी खर्चाच्या अटीसहित इतर नियमांची जंत्री लागू करण्यात येते. त्यामुळे अनेकदा स्पर्धांसाठी किंवा नाट्यप्रयोगासाठी काटकसर करावी लागते. रंगभूमीच्या प्रेमासाठी ती काटकसर आम्ही सहन करतो. कॉलेजांनी रंगभूमीसाठी विद्यार्थी कलाकारांना सहकार्य केल्यास करिअरची वाट अधिक चांगली होईल.

- प्रिया जैन, युवा नाट्यलेखिका

एकांकिका स्पर्धांसाठी कॉलेज आर्थिक सहाय्य देण्यास टाळाटाळ करते. एकाच स्पर्धेसाठी संघ पाठवा, अशी अट कॉलेजांची असते. त्यामुळे कला सादरीकरणावर बंधने येतात. रंगभूमीच्या करिअरसाठी कॉलेज प्रशासनाकडून कोणतेही ऐच्छिक सहकार्य मिळत नाही. त्यामुळे नाट्यसंस्थांच्या माध्यमातून करिअरची वाट शोधावी लागते. कॉलेजांनीदेखील रंगभूमीसाठी पुढाकार घ्यायला हवा.

- अपूर्व इंगळे, युवा नाट्य कलाकार

थिएटरमध्ये करिअर करण्यासाठी कॉलेजचा हवा तसा सपोर्ट नसतो. एकांकिकेच्या सरावासाठी कॉलेज हॉल उपलब्ध करून देत नाही. त्या तुलनेत नाट्य संस्थांतून करिअरची स्वप्ने पूर्णत्वास नेण्यास फायदाच होतो. कॉलेजमध्ये कार्यरत कला मंडळांच्या माध्यमातूनही नाट्य कलाकारांकडे कायम दुर्लक्ष केले जाते.

- प्राजक्ता गोडसे, युवा नाट्य कलाकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images