Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शालार्थ आयडीबाबत शिक्षक आक्रमक

0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

\Bशालार्थ आयडी क्रमांक नसल्याने वेतन थांबविण्यात आल्याने शिक्षक आक्रमक झाले आहेत. ३१ ऑक्टोबरपर्यंत शिक्षकांना शालार्थ आयडी देण्यात येतील, असे आश्वासन शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी दिले होते. परंतु, आश्वासन पाळले जाण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने येत्या २ नोव्हेंबर रोजी शिक्षण संचालनालय, पुणे येथे आंदोलन करण्याचा इशारा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

शालार्थ आयडी नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाशिक जिल्ह्याचे काम याबाबत मागे पडले आहे. राज्यभरात जवळपास दीड हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे पगार यामुळे रखडले आहेत. ही अडचण दिवाळीपूर्वीच सोडविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, अद्याप हे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याचे शिक्षकांच्या समोर आल्याने या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमधील शालार्थ आयडीविषयी माध्यमिक विभागातील अद्याप ४२ फाइल्समध्ये त्रुटी काढण्यात आल्या आहेत. या फाइल्स शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांनीच तपासून पाठविल्या असल्या तरीही त्यात शिक्षण आयुक्त, संचालक, उपसंचालक यांकडून त्रुटी काढल्या जात असल्याचे मुख्याध्यापक संघाचे म्हणणे आहे. त्यामुळे या तांत्रिक बाबी दूर करून शिक्षकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. याविषयी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याशी मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी प्रा. टी. एस. ढोली, एस. बी. देशमुख, जिभाऊ शिंदे, एस. आर. पगार, हरिभाऊ नळे, अरुण गरगटे आदी शिक्षकांनी चर्चादेखील केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थेंबभरही पाणी देणार नाही

0
0

आमदार झिरवाळ यांचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

मराठवाड्याला गरज पडेल तेव्हा रेल्वेने पाणी द्या; पण जिल्हा दुष्काळात होरपळत असताना पालखेड समूहातील एक थेंब पाणी जायकवाडीत जाऊ देणार नाही, असा इशारा आमदार नरहरी झिरवाळ व माजी आमदार दिलीप बनकर यांनी दिला आहे.

दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरण समूहातून सुमारे ६०० दलघफू पाणी जायकवाडी प्रकल्पात सोडण्याच्या हालचाली गतीमान झाल्याने शेतकऱ्यांनी रविवारी पालखेड धरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम शेटे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, 'राष्ट्रवादी'च्या कार्याध्यक्षा भारती पवार आदींच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रांताधिकारी उदय किसवे तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षभेद विसरून सर्व पक्ष व कार्यकर्त्यांनी पाणी रोखण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा देत सहभाग घेतला.

सरकारकडे नियोजन नाही. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती व टँकरने पाणीपुरवठा सुरू असताना शेतकरी, जनतेला सरकार संकटात टाकत पाणी सोडण्याचे कारस्थान रचत आहे. हीच बाब मी अवनखेड येथे पालकमंत्री व महसूल मंत्र्यांना सांगणार होतो; मात्र मला बोलू दिले नाही. पण सरकार जनतेचा आवाज दाबू शकणार नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली तर टँकर, रेल्वेने पाणी द्या. पण जनतेच्या भावनांचा विचार न करता पाणी सोडले तर तीव्र आंदोलन केले जाईल. सर्व नद्यांमध्ये शेतकरी सहकुटुंब साखळी आंदोलन करतील, असा इशारा झिरवाळ यांनी दिला.

गोदावरी व तापी खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी घाटमाथ्यावरील समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते मांजरपडा, देवसाने व विविध वळण योजनांद्वारे गोदावरी तापी खोऱ्यात टाकणे शक्य आहे; मात्र सरकारने पहिल्या टप्प्यातील योजनांचे काम सुरू केले नाही, असे मत 'कादवा'चे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी मांडले. यावेळी भारती पवार, हरिश्चंद्र भवर, सोमनाथ मोरे यांची भाषणे झाली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राष्ट्रवादीचे नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड, स्वप्नील गायकवाड, सदाशिव शेळके, बाळासाहेब जाधव, अनिल देशमुख, संजय पडोळ आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

शिवसेनाचा विरोध नाटकी

निफाड, दिंडोरी, येवला, चांदवड, नांदगावमध्ये भीषण पाणीटंचाई असताना शेतकऱ्यांना पिके कशी वाचवायची चिंता आहे. त्यासाठी मदत करणे दूरच; पाणी सोडून शेतकऱ्यांना संपविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, असा आरोप माजी आमदार दिलीप बनकर यांनी केला. सरकारमध्ये राहून शिवसेना विरोधाचे नाटक करत शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलजागृती अन् नियोजन गरजेचे

0
0

शहर परिसर

जलजागृती अन् नियोजन गरजेचे

दि. २५ ऑक्टोबरच्या 'मटा'मधील बातमी वाचली. त्यानुसार नागरिकांत जलजागृतीची गरज निर्माण झाली आहे. बऱ्याचदा पाण्याची विनाकारण नासाडी होते. यंदाच्या दिवाळीत पाण्याचा जपून वापर करण्याबाबत जलजागृती होणे, पाण्याचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे.

-पुष्पा मदागे

टिळकवाडी

प्रशासन कारवाई करेल का?

पाणीटंचाईचे संकट घोंगावत असतानाच जागोजागी पाण्याची उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र शहरात दिसून येते. टिळकवाडीत विभागीय उपायुक्तांची वाहने स्वच्छ करण्यासाठी पाण्याची अशी उधळपट्टी रोजच केली जाते. याबाबत प्रशासन कारवाई करेल का?

-विजय कांदळकर

रामकुंड

'भिकारी निर्मूलन'चा बोजवारा

हे फोटो गोदाघाटावरचे आहेत. मध्यंतरी बराच गाजावाजा करीत येथील भिकारी गायब झाल्याचे म्हटले गेले. मात्र, येथील भिकाऱ्यांमुळे नाशिकचे नाव खराब होते. येथे दिखाऊ प्रोजेक्टऐवजी कायमस्वरूपी भिकारी निर्मूलनचा प्रोजेक्ट राबविण्यात यावा.

-राजेंद्र राजधर

टागोरनगर

फांद्यांनी झाकोळले पथदीप

टागोरनगरातील उत्सव चौकापासून अंबिकादर्शन (ए) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीपर्यंतचे पथदीप झाडांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्यांमुळे पूर्णपणे झाकोळून गेले आहेत. परिणामी या रस्त्यावर रात्री अंधार पसरत असल्याने महिलांसह नागरिकांची गैरसोय होत आहे.

-तानाजी वाघ

कृषिनगर

मुख्य वाहिनीतून गळती

कृषिनगर सायकल सर्कल ते मॉडेल चौक सर्कलवरील रस्त्यावर असलेल्या मुख्य जलवाहिनीतून गेल्या सात-आठ दिवसांपासून हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. कृषिनगर कॉलनीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, महापालिकेने योग्य कार्यवाही करावी.

-संजय जाधव

शरणपूररोड

अस्वच्छतेचा कळस

शरणपूर रस्त्यावर एक रिकामा प्लॉट असून, त्यात अशा प्रकारे गवत, तोडलेल्या झाडांच्या फांद्या, शिळे अन्न आणून टाकले जाते. त्यामुळे येथे कायमच अस्वच्छता, डासांचे साम्राज्य असते. याबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष होत असून, स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

-प्रथमेश पाठक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलद्वारे टिपले ‘जुने नाशिक’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातल्या कॉलेजेसमध्ये शिकणारे विद्यार्थी.. काहींच्या हातात उत्तम दर्जाचे स्मार्ट फोन, तर काहींकडे डीएसएलआर कॅमेरा.. सकाळी ७ वाजेपासून जुने नाशिकमधील गल्लीबोळांतील अनेक क्षण ते टिपत होते.. प्रत्येक फोटोच्या क्लिकमागे एक मेसेज पोहोचवण्याची त्यांची भावना.. परिसरातल्या नागरिकांनाही तरुणांच्या या फोटो क्लिकबाबत असणारे कुतूहल स्पष्ट दिसत होते.. निमित्त होते, इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून पुढे आलेल्या 'फोटोवॉक' संकल्पनेचे!

स्मार्ट फोनच्या अपडेटेड तंत्रज्ञानानुसार मोबाइलवरच अफलातून फोटो क्लिक करण्याचा ट्रेंड तरुणाईत हिट होतोय. गेल्या काही वर्षांपासून डीएसएलआर कॅमेऱ्यासोबतच मोबाइल फोटोग्राफीची क्रेझ यंगस्टर्समध्ये रुजतेय. या क्रेझची चळवळ व्हावी, नव्या फोटोग्राफर्सला एकसंघ करीत नव्या कल्पनांनीयुक्त फोटोग्राफी साकारावी, यासाठी नाशिकमध्ये गेल्या चार महिन्यांपासून 'फोटोवॉक'चे आयोजन केले जात आहे. रविवारी (दि. २८) सकाळी ७ वाजता रेड क्रॉस सिग्नल, फुलबाजार, रविवार कारंजा या परिसरात हा 'फोटोवॉक' करण्यात आला. कृपा पाटील, जयेश खैरे आणि मंगेश मोंढे यांनी इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून 'फोटोवॉक'ची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. शहरातील मोबाइल फोटोग्राफर्सला एकत्रित आणण्यासाठी सोशल मीडियावर लाइट्स विथ परस्पेक्टिव्ह ही मोहीम सुरू आहे. यामधून शहरातील सर्व तरुण फोटोग्राफर्सना एकत्रित करण्यात येत आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून एखाद्या घटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन समजतो. फोटो काढण्याचे स्किल वाढते. स्ट्रीट फोटोंच्या माध्यमातून मेसेज देणारे फोटो क्लिक करता येतात. प्रत्येक फोटोमागील कथा मांडण्याचा प्रयत्न करता येतो, असे 'फोटोवॉक'मध्ये सहभागी झालेली तरुणाई सांगते. यावेळी स्ट्रीट फोटोग्राफी करताना परिसरातील साधूंचे फोटो, फुलविक्रेते, नागरिकांची सकाळची जीवनशैली यांचे फोटो क्लिक केले गेले. 'इन्स्टाग्राम'च्या #lightswithperspective या पेजवर आतापर्यंत २४८ हून अधिक फोटो अपलोड करण्यात आले आहेत.

--

फोटोवॉकच्या माध्यमातून आम्ही सर्व तरुण फोटोग्राफर्स एकत्र येत आहोत. याअंतर्गत स्ट्रीट फोटोग्राफीतून अनेक गोष्टी नव्याने समजत आहेत. या सर्व फोटोंचे प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे.

-ध्रुव साळी, गुरू गोविंद सिंग कॉलेज

--

यंदा चौथा फोटोवॉक होता. स्ट्रीट फोटोग्राफीबाबत पहिल्यापासून कुतूहल होते. फोटो काढण्याचे कौशल्य जतन करण्यासाठी तरुणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हायला हवे.

-अथर्व देशपांडे, के. के. वाघ इंजिनीअरिंग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋतुजा घुसळे राज्यात प्रथम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलच्या परिचारिका प्रशिक्षण कॉलेजच्या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र परिचर्या परिषदेकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यात ऋतुजा घुसळे हिने वैद्य शल्य परिचर्या दोन या विषयात १०० पैकी ९४ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यानिमित्त तिचा सत्कार करण्यात आला.

परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात जनरल नर्सिंग मिडवायफरी (तीन वर्षांचा) व ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी (दोन वर्षांचा) असे दोन प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाते. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांतील विद्यार्थिनींना बारावीच्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जातो. जुलै २०१८ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. यात नर्सिंग मिडवायफरी तृतीय वर्षाचा निकाल १०० टक्के व द्वितीय वर्षाचा निकाल ८९.४७ टक्के लागला. ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी द्वितीय परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून, या कॉलेजने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. यामध्ये जीएनएम तृतीय वर्ष परीक्षेत नयना हरिणखेडे या विद्यार्थिनीने प्रथम, किरण पाटील हिने द्वितीय, तर प्रियंका चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळविला. जीएनएम द्वितीय वर्ष परीक्षेत ऋतुजा घुसळे हिने प्रथम, गायत्री सोमासे हिने द्वितीय, तर अनिल भोये याने तृतीय क्रमांक मिळविला. एनएमएम द्वितीय वर्ष परीक्षेत ज्योती मिंदे हिने प्रथम, रेखा रुपवते यांनी द्वितीय, तर वैशाली अहिरे हिने तृतीय क्रमांक मिळविला. सर्व विद्यार्थ्यांचे सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील, अधिसेविका मानिनी देशमुख, प्राचार्य राजन इनामदार यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

--

गुणवत्तेला प्राधान्य हे सर्वच बाबतींतील सूत्र असून, विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाचा, विद्यार्थ्यांसाठी सर्वांनी घेतलेल्या मेहनतीचा चांगला परिणाम निकालातून दिसून आला. दर वर्षी निकालाची चांगली परंपरा कायम असल्यानेच केंद्र सरकारने बी. एस्सी नर्सिंग कोर्ससाठी मान्यता दिली.

-डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा समाज निवडणूक आखाड्यात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठा समाजाच्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आठ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या पाडव्याला नवीन राजकीय पक्षाची स्थापन केली जाणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. भोर तालुक्यातील (जि. पुणे) रायरेश्वर मंदिरात ही घोषणा झाली असून, त्याचवेळी पक्षाचा झेंडा व उद्दिष्ट सांगण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हॉटेल प्लाझा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांना बाजूला ठेवून या पक्षाची स्थापना केली जाणार आहे, असे सांगितले. नव्या पक्षातर्फे लोकसभेच्या पाच, तर विधानसभेच्या ५० जागा लढवण्यात येणार आहेत. मराठा समाजाचा पक्ष असावा, यासाठी आम्ही कोकण, पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रात जिल्हानिहाय दौरे केले. आता उत्तर महाराष्ट्रात दौरा सुरू असून, नाशिकला प्रमुख लोकांशी चर्चा केली. मराठा आंदोलनातील १७ ते १८ संघटना आमच्या बाजूने असून, त्यांनी पक्ष स्थापनेला पाठिंबा दिला आहे, तसेच सोशल मीडियातूनही प्रतिसाद वाढत असल्याचे पाटील म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर मंदिरातच हिंदवी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली होती.

मराठा समाज हा लढवय्या म्हणून ओळखला जातो. या समाजाच्या पाठिंब्यावर राजकीय पक्ष आणि नेत्यांनी सत्ता भोगली. समाजाच्या जडणघडणीत मराठा समाजाचे विशेष योगदान आहे. मात्र, नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, या न्याय मागणीसाठी तब्बल दोन तपांहून अधिक काळ मराठा समाजाला झगडावे लागले. राजकीय पक्ष व नेते मागण्या पूर्ण करण्यासाठी अडचणी व मजबुरी नमूद करतात. त्यामुळेच राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी परेश भोसले (कोल्हापूर), रणजीत बाबर (पुणे), चंद्रकांत सावंत (मुंबई), नितीन देसले, बापू गांगुर्डे उपस्थित होते.

आघाडी-युतीवर टीका

काँग्रेस व राष्ट्रवादीने सत्तेत असतांना १५-२० वर्षे मराठा समाजाचा वापर केला. पण, समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही. त्यानंतर भाजप व शिवेसेची सत्ता आली. त्यांनीही मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे दबाव गट निर्माण करण्यासाठी पक्ष स्थापन करण्यात येणार आहे. पक्षात मुख्य संघटक, कोअर कमिटी, जिल्हानिहाय १० पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या भूमिकेला खासदार उदयनराजे यांचेही पाठबळ लाभले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुसखुशीत अंकांची ‘क्रेझ’...........

0
0

खुसखुशीत अंकांची 'क्रेझ' (प्लस पान ४, फोकस)

चोखंदळ वाचकांसाठी दिवाळी अंक म्हणजे जणू मनोरंजनाचा खुसखुशीत फराळच ठरतात. गेल्या १२५ वर्षांपासून दिवाळी अंक येतात आणि माहिती-मनोरंजनरुपी फराळाने रसिकजनांना तृप्त करून जातात. काहीशा साचेबद्ध असलेल्या काळातील दिवाळी अंक आता नवे रूप लेवून येत आहेत. दिवाळी अंकांचे हे वेगळेपण मांडणारा फोकस...

--

नाही खरेदीला तोटा! (फ्लस पान १ लीड)

आनंदाची आणि सुख-समृद्धीची उधळण करीत येणाऱ्या दिवाळीसाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. 'दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा' या उक्तीनुसार खरेदीच्या उत्साहामुळे बाजारातील मरगळ झटकली गेली असून, चैतन्याचे वारे वाहू लागले आहेत. हाती आलेला बोनस अन् रविवारची सुटी यामुळे बाजारपेठा खुलून गेल्या होत्या.

--

जलसंपदाची सज्जता (मुख्य अंक पान ३ लीड)

जायकवाडीला पाणी सोडण्याची जलसंपदा विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी सुटी असतानाही कार्यालयात दुपारपर्यंत अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी धरणांची पाहणी करण्यासाठी गेले. जलसंपदा विभागाने यासाठी तीनशेवर कर्मचारी नियुक्त केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाननंतर पाणी सोडले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर ‘तुम्हाला’ उलटे टांगू!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना धमकीवजा पत्र लिहिल्याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मनुस्मृतीची प्रत जाळली. भुजबळांच्या केसाला धक्का लावला तर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना उलटे टांगू, असा इशाराही राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रविवारी दिला.

भुजबळ यांना पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी देऊन महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा निषेध नोंदविण्यासाठी पंचवटी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित जमले. मनुस्मृतीची प्रत जाळत त्यांनी शिवप्रतिष्ठानला आव्हान दिले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना रोखले. आमच्यासारखे पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांचे संरक्षण कडे भुजबळ यांच्याभोवती आहे. त्यांच्या केसाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला उलटे टांगू, असा इशारा या वेळी देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवल्यात आज आंदोलनधग

0
0

शिवसेनेतर्फे 'रास्तारोको'; शेतकरी संघटनेचे धरणे

म. टा. वृत्तसेवा, येवला

दुष्काळाच्या दाहकतेमुळे सहा महिन्यांपासून गावोगावी सुरू असलेली टँकरवारी अन् जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना तालुका दुष्काळी जाहीर करण्याबाबत शासनस्तरावर कुठलीही हालचाल दिसत नसल्याने शिवसेनेच्या वतीने सोमवारी विंचूर चौफुलीवर रास्ता रोको केला जाणार आहे. तर दुसरीकडे शेतकरी संघटनेच्या वतीने येवला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी सकाळी ११ वाजता विंचूर चौफुलीवरील रास्ता रोको केला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघाचे संघटक रुपचंद भागवत यांनी दिली. शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होणार आहेत. पालखेड डावा कालव्याचे आवर्तन नियमानुसार वेळोवेळी सोडावे, पाटपाणी चारी क्रमांक ५२ पर्यंत पाणी सोडून सर्व आरक्षित बंधारे पिण्याच्या पाण्यासाठी भरून द्यावे, जायकवाडीला पाणी सोडू नये, तालुक्यातील जळालेली सर्व रोहित्र नवीन बसविण्यात यावी, सक्तीची कर्जवसुली थांबवावी, पीक विम्याची भरपाई मिळावी, इंधन दरवाढ कमी करावी या व इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे.

शेतकरी संघटनाही आक्रमक

शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतू झांबरे यांच्या अध्यक्षतेखाली येवला तहसिलसमोर विविध मागण्यांसाठी धरणे धरले जाणार आहे. तालुक्यातील तब्बल ५० पेक्षा अधिक गावे अन् वाडया-वस्त्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. मुक्या जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. पशुधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण सुरू आहे. अत्यल्प पावसाने यंदा खरिपाची वाताहत झाली आहे. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तालुका तत्काळ दुष्काळी जाहीर करावा आणि पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने दिले जावे यासाठी आंदोलन करणार असल्याचे झांबरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उशिराच्या बिलाने भुर्दंड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या अनेक महिन्यांपासून वीज देयकाची मुदत संपल्यानंतर वीजबिले घरी येतात. परिणामी वीजबिल भरताना अधिकची रक्कम भरावी लागत असल्याने नाहक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची तक्रार घनकर गल्ली परिसरातील रहिवाशांनी महावितरणकडे केली आहे.

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने वीजबिल भरण्याच्या अंतिम तारखेच्या आतच बिले द्यावीत, यासाठीची प्रक्रिया अधिक गतिमान करावी, अशी मागणीही येथील रहिवाशांनी महावितरणकडे केली आहे. घनकर गल्ली परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येक महिन्याची वीजबिले मुदतीनंतर मिळतात, अशी तक्रार येथील रहिवाशांकडून वारंवार केली जात आहे. चालू वीजबिलासाठी दि. २५ ऑक्टोबर ही अंतिम तारीख होती. मात्र, रहिवाशांना दि. २७ ऑक्टोबर रोजी वीजबिले मिळाली. बिल भरण्याची अंतिम तारीख उलटल्यानतर दोन दिवसांनी बिले मिळाल्याने ३० ऑक्टोबरपूर्वी जास्तीची रक्कम भरून रहिवाशांना बिल भरावी लागत आहेत. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून घडत आहे. प्रत्येक महिन्यात अंतिम मुदतीनंतरच बिले मिळत असल्याने येथील रहिवाशांनी शनिवारी भद्रकाली परिसरातील महावितरणच्या कार्यालयात धाव घेतली. मात्र, चौथा शनिवार असल्याने महावितरणच्या कार्यालयात कोणतेही अधिकारी भेटू शकले नाहीत. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडेच वीजबिले मिळण्यास दिरंगाई होत असल्याची तक्रार रहिवाशांनी नोंदविली. पुढील महिन्यापासून अंतिम मुदतीच्या आत वीजबिले सर्वांना मिळतील, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. यावेळी किशोर मगर, बाळकृष्ण परदेशी, विजय पवार, शेखर काळे यांच्यासह घनकर गल्लीतील अन्य रहिवासी उपस्थित होते.

--

\Bकॉन्ट्रॅक्टरकडून दिरंगाई!

\Bवीजबिले ग्राहकांना घरपोच मिळण्यात दिरंगाई होत असल्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, महावितरण विभाग वेळेत वीजबिलांची प्रत काढते. वीजबिले ग्राहकांकडे पोहोचविण्याचे कॉन्ट्र्रॅक्ट देण्यात आले आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरकडून दिरंगाई होते, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या ग्राहकांना वेळेत वीजबिले मिळत नसतील त्यांनी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा. आपला मोबाइल क्रमांक आणि ई मेल आयडी महावितरण विभागात नोंदविल्यास वीजबिलांची संपूर्ण माहिती ग्राहकांना मिळते. ग्राहकांनीही थोडे सजग व्हावे, असे सांगत दिरंगाईच्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट ३

0
0

कोट

०००

नाशिकच्या हक्काचे पाणी मिळावे ...

राज्यातील परिस्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे काटकसरीने वापर करण्याचे नियोजन सर्वत्र करण्याची गरज आहे. मराठवाडा असो अथवा नाशिक, बेकायदेशीर पाणी उपशावर आळा घालणे गरजेचे आहे. जायकवाडी धरणातून होणारा बेकायदेशीर पाणी उपसा, बीअर कंपनीला पाणी देण्याची गरज नाही. नाशिक, नगर, मराठवाडा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नारपार, अंबिका, औरंगा, दमनगंगा प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. दमणगंगा खोऱ्याचे पाणी वळवल्यास मराठवाडाचा पाणीप्रश्न सुटू शकतो. नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. अनेक शेतकऱ्यांनी हजारो कोटी रुपये खर्च करून उभ्या केलेल्या फळबागांना पाणी उपलब्ध झाले नाही तर शेतकरी उद्ध्वस्त होईल. आगामी आठ महिने नाशिककरांना काटकसरीने काढायचे आहेत; त्यामुळे नाशिकच्या हक्काचे पाणी नाशिकला मिळायला हवे.

- दादा भुसे , ग्रामविकास राज्यमंत्री

पाणी सोडायला माझा पूर्ण विरोध आहे. जायकवाडीमध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे तर नाशिकचे पाणी सोडण्याची गरज काय? इकडे दुष्काळाची स्थिती गंभीर असताना प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा अट्टाहास धरण्यापेक्षा या भागातील जनतेला पिण्याचे पाणी व जनावरांना चारा कसा उपलब्ध करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.

- राजाभाऊ वाजे, आमदार, सिन्नर

कधी नव्हे इतक्या भीषण दुष्काळाला जिल्हावासीय सामोरे जात आहेत. भीषण पाणीटंचाई व सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे. आपल्याच ताटात वाढण्यासारखे काही नाही. नाशिक उपाशी आणि मराठवाडा तुपाशी अशी गत नाशिक-नगरवासीयांची होणार आहे. यामुळे कोणत्याही परिस्थिती जायकवाडीचे पाणी जाऊ देण्यास आपला विरोध आहे. सरकार केवळ आपल्या राजकीय हितासाठी सर्वसामान्य जनतेवर अन्याय करीत आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री हेच जलसंपदा विभागाचे मंत्री अहेत. नाशिकसह जिल्ह्यातील भीषणतेची जाणीव असतांना त्यांनी हे पाप करू नये.

- दीपिका चव्हाण, आमदार, बागलाण

नाशिकचे पाणी पळविण्यास आमचा तीव्र विरोध आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती विचारात घेता व भविष्याचा विचार करता हे पाणी देणे चुकीचे आहे. तसेच या विषयाचे राजकारण न करता सर्व नाशिककरांनी याला विरोध केला पाहिजे. आमचा सुद्धा या गोष्टीला विरोधच आहे यासाठी करावे लागणाऱ्या लढाईत हमी सक्रीय आहोत

- सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेड क्रॉस सिग्नलपासून दहीपुलापर्यंत वाहनबंदी करा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीत वाहनांची वर्दळ, खरेदीदारांच्या गर्दीमुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास यामुळे रेड क्रॉस सिग्नल ते दहीपूल रस्ता दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाहनांसाठी बंद करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीकर यांना दिले आहे.

या मार्गावरील गर्दीमुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. चारचाकी वाहनांच्या कर्कश हॉर्नमुळे लहान मुले घाबरतात. गर्दीमुळे अनेक चोरीच्या घटनाही घडलेल्या आहे. टवाळखोरांसाठी गर्दी ही पर्वणीच असते. त्यामुळे वाहनांना या काळात बंदी असावी. दिवाळी काही दिवसांवर आल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी सध्या नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंसह इतरही वस्तू मेनरोड परिसरात सहजतेने उपलब्ध होतात. त्यामुळे मेनरोड परिसरात अधिक गर्दी होते. मात्र, येथील रस्त्याच्या तुलनेत नागरिकांची संख्या वाढल्याने गर्दीत चालणेही अवघड होते. त्यातच खरेदीसाठी येणाऱ्या महिला व युवतींची छेडछाड केली जाते. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत रेड क्रॉस सिग्नल ते दहीपूल रस्ता दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाहनांकरिता बंद करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना अॅड. चिन्मय गाढे, नीलेश सानप, डॉ. संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, भूषण गायकवाड, मितेश राठोड, रोहित जाधव, राज रंधावा, संतोष पुंड, सचिन देशमुख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंत्रणा सज्ज; आदेशाची प्रतीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूरसह पालखेड आणि दारणा धरणातून पाणी सोडण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. २९) संबंधित यंत्रणांची समन्वयाची बैठक बोलावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता ही बैठक होणार असून, मंगळवारपासून पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तविली आहे.

गोदावरी मराठा विकास महामंडळाने जायकवाडी धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निकषानुसार नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमधून तब्बल ८.९९ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. यापैकी ३.२४ टीएमसी पाणी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा आणि पालखेड या तिन्ही धरणसमूहांमधून सोडावे लागणार आहे. मात्र, जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जात असून, अन्य तालुक्यांमध्येही पुरेशा पाण्यासाठी रहिवाशांना आतापासूनच वणवण करावी लागते आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यास तीव्र विरोध होऊ लागला आहे. पाणी सोडले जाऊ नये यासाठी अल्प कालावधीत उभारण्यात आलेला न्यायालयीन लढाही अपयशाच्या वाटेवर असून, सोमवारपासून पाणी सोडण्याचे नियोजन आहे, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. पाणी सोडण्यात आणि ते जायकवाडीमध्ये पोहोचविण्यात ज्या यंत्रणांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, अशा यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली आहे. बैठकीस शहर आणि ग्रामीण पोलिसांसह, पाटबंधारे, महावितरणचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी करावयाच्या तयारीचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे. गंगापूरसह दारणा आणि पालखेड या दोन्ही धरणसमूहांमधून मंगळवारी सकाळपासून पाणी सोडले जाण्याचे संकेत प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी प्रवाहावर औरंगाबादची ‘नजर’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार असल्याने जलसंपदा विभागाच्या नाशिक कार्यालयाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी औरंगाबादचे पथक शहरात दाखल झाले आहे. या पथकाने रविवारी धरणांमधील पाणीपातळीची प्रत्यक्ष भेट देत माहिती घेतली. हे पथक नाशिकमध्येच मुक्कामी राहणार असून पाणी सोडण्यात गडबड होऊ नये यावर त्यांचे लक्ष राहणार आहे.

नाशिककरांचा प्रचंड विरोध असल्याने औरंगाबादच्या या पथकाने विशेष काळजी घेतली आहे. या पथकात अभियंत्ययासह कर्मचारी असून ते पाणी सोडण्याच्या वेळी ठिकाणापासून तर पाणी पोहचेपर्यंत सर्व प्रवाहाची पाहणी करणार आहेत. ठिकठिकाणी हे पथक प्रवाहाच्या ठिकाणीची पातळी तपासणार आहे. तसेच हे पथक दररोज धरणाची पातळीसुध्दा तपासणार आहेत. कोठे पाण्याची चोरी होते आहे का? तसेच इतर नोंदी व पाणी केव्हा सोडले जाणार, जायकवाडीत कधी पोचणार याची माहिती संकलित करून ती औरंगाबादला पथकामार्फत पाठविली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घटस्फोट टाळण्यासाठी सुसंवादाची गरज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पती-पत्नीच्या एकमेकांकडून वाढत चाललेल्या अपेक्षा, गैरसमज यामुळे विसंवाद निर्माण होऊन घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. हे प्रकार थोपविण्यासाठी मुला-मुलींचे विवाह जुळवितानाच वधू-वर पक्षांनी एकमेकांशी सुसंवाद साधणे गरजेचे आहे. संसार टिकविण्यासाठी तडजोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन अहिराणी साहित्याच्या अभ्यासक प्रा. डॉ. उषा सावंत यांनी रविवारी नाशिकमध्ये केले.

बापूसाहेब संतोषराव सूर्यवंशी धुळे संचलित खान्देशातील समस्त पाटील समाजाचा वधू-वर परिचय मेळावा मुंबई नाका येथील कालिका माता मंदिराच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी डॉ. सावंत बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर श्री कालिका माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशवराव पाटील, बापूसाहेब सूर्यवंशी, राजू महाले आदी उपस्थित होते. सुमारे ४०० विवाहेच्छुकांनी या परिचय मेळाव्यात नावनोंदणी केली होती. ६० हून अधिक विवाहेच्छुकांनी व्यासपीठावर आपला परिचय दिला. मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. सावंत म्हणाल्या की, घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणामुळे कुटुंबव्यवस्थेपुढे आव्हान निर्माण होत आहे. अलीकडच्या काळात हे प्रमाण वाढत असून, संसार टिकविण्यासाठी तडजोड गरजेची आहे. घटस्फोटासारखे प्रकार घडू नयेत याकरिता विवाह जुळवितानाच उभय पक्षांनी काळजी घ्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले. विवाहांमधील हुंड्याची पध्दती बंद व्हावी, विवाह जुळविताना कुंडलीला किती महत्त्व द्यायला हवे याचाही विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा बापूसाहेब सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. अमळनेर येथे २५ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा होणार असून, त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेळीच उठवावा आवाज

0
0

गुगलसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेने 'मी टू' मोहिमेत आरोप झाल्याने आपल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली हे स्वागतार्ह आहे. यामुळे पुरुषी मानसिकता समोर आली आहे. 'मी टू'चे वादळ भारतातही सुरू झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. मात्र, भारतात स्त्रियांचा सन्मान केला जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत, तरीही अन्याय झालाच तर त्याविरुद्ध त्वरित आवाज उठविला पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

--

गुगलची कारवाई अनुकरणीय

गुगलसारख्या कंपनीने लैंगिक छळाच्या आरोपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले, ही अनुकरणीय घटना आहे. 'मी टू'मुळे समाजातील अपप्रवृत्तींचा बुरखा फाडला जात आहे. विकृत पुरुषी मानसिकता 'मी टू'मुळे जगापुढे येत आहे. मात्र, या केसेस शहानिशा करून हाताळाव्यात.

-डॉ. मेघा जंगम

--

पुरुषांवर अन्यायकारक ठरू नये

गुगलने आपल्या कार्यालयातील हा प्रकार गाजावाज न करता हाताळला हे चांगले आहे. असभ्य वागणूक करणाऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. मात्र, हे तातडीने घडावे, दहा वर्षांनी येणाऱ्या तक्रारी पुरुषवर्गावर अन्यायकारकच आहेत. त्यामुळे 'मी टू' ही मोहीम पुरुषांवर अन्यायकारक ठरायला नको.

-भूषण आवारे

--

'त्यांचा'ही पूर्वेतिहास तपासावा

एखाद्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे जणू देशभरात असेच होत असल्याचे रंगवलेले चित्र देशाच्या संस्कृतीचा अपमान करणारे आहे. अन्यायग्रस्त स्त्रियांना पुरुषवर्गाने न्याय मिळवून दिल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्यामुळे अन्याय जगजाहीर करणाऱ्यांचा पूर्वेतिहासही तपासला जावा.

-सुजाता तनपुरे

--

त्वरित करावी अन्यायाची तक्रार

सोशल मीडिया, तसेच प्रसारमाध्यमांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या 'मी टू' चळवळीमुळे स्त्रियांच्या होणाऱ्या शारीरिक शोषणाच्या प्रश्नाचे गांभीर्य नव्याने समोर येत आहे. परंतु, अनुचित प्रकार घडल्यानंतर लवकरात लवकर तक्रार केली पाहिजे. त्यामुळे असे प्रकार रोखता येतील.

-अॅड. रुपाली पगार

--

प्रवृत्ती अनेक ठिकाणी सारखीच

स्त्रियांच्या बाबतीत कायद्यातील तरतुदींचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे. परंतु, अनेक कार्यालये अथवा संस्थांत तसे होत नाही. 'मी टू'चे वादळ हे गुगलसारख्या हायप्रोफाइल आस्थापनेतही घोंगावले, यातून विकृत प्रवृत्ती अनेक ठिकाणी सारखीच असल्याचे समोर आले आहे.

-अॅड. विकास दाते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्ध बारामतीला दुष्काळाचा शाप

0
0

\Bछटा दुष्काळाच्या

'मटा' विशेष\B

म. टा. वृत्तसेवा, बारामती

एकाबाजूला विकासाची पंढरी अशी ओळख आणि दुसऱ्याबाजूला तालुक्याच्या चाळीस टक्के भागाला भेडसावणारी पाणी समस्या, अशी स्थिती बारामती तालुक्याची आहे. येथील लोकप्रतिनिधींकडून नेहमी चकाचक बारामतीचाच उदोउदो होत असला तरी जिरायती भागाला लागलेला दुष्काळाचा शाप कधी संपणार असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. सध्या तालुक्यातील सहा गावे व ३५ वाड्यावस्त्यांमधील १२ हजार एकशे ८४ नागरिकांना सहा सरकारी टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दुष्काळी परिसरात आतापर्यंत २४ कोटी रुपये खर्चून ७१ पाणीपुरवठा योजना उभारल्या. मात्र, तांत्रिकदृष्ट्या या योजना असंक्षम असल्याने यातील अनेक योजना सध्या गंजलेल्या अवस्थेत आहेत.

तालुक्यातील तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, मूर्टी, सोनवडी सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काऱ्हाटीसह या बावीस गावांसह ३५ वाड्यावस्त्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. बारामती तालुक्याचा पश्चिम भाग सोडून इतर सर्व तालुका नीरा डावा कालव्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुजलाम-सुफलाम झाला. शहरात कृषी संशोधनासाठी जागतिक पातळीवरील कृषी विज्ञान केंद्राची निर्मितीही करण्यात आली. अनेक संस्था, संघटना, दूध संघांचे जाळे उभे राहिले. मात्र, एका बाजूला सर्व काही अनुकूल परिस्थिती असतानाही दुसऱ्या बाजूला साठ वर्षांनंतरही तालुक्याच्या पश्चिम भागात कायम दुष्काळी परिस्थिती असते. लोकप्रतिनिधींकडून दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते. हा सर्व भाग जिरायत समजला जातो. याठिकाणी नापिकी, जनावरांना चारा नसणे आणि पिण्यासाठी पाण्याचा अभाव असे एकत्रित संकट नेहमीच उभे असते. येथील नागरिकांना सिंचनासाठी नव्हे तर पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. गेल्या तीन वर्षांत तालुक्यातील पावसाचे प्रमाणही कमी झालेले दिसत आहे.

'सध्या बारामती तालुक्यातील अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला आहे. तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, मूर्टी, सोनवडी सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काऱ्हाटीसह ३५ वाड्यावस्त्यांना सहा सरकारी टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील जनावरांचा चारा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच नियोजन करण्यात येणार आहे,' असे तहसील प्रशासनाने 'मटा'ला सांगितले.

\Bशेतकरी, ग्रामस्थ आक्रमक\B

बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी आणि ग्रामस्थ सततच्या दुष्काळामुळे आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून बारा डिसेंबर २०१३ मध्ये पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी मोठे जनआंदोलान केले होते. काही गावांत घरांवर काळे ध्वज लावून व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. यानंतरही प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणुकांवेळी या भागातून मोठा विरोध केला जातो.

---------

\Bबारामती तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान

\Bसन सरासरी पर्जन्यमान

२०१६ ४५० मिमी ४४४.७५ मिमी

२०१७ ४५० मिमी ५४८.३७ मिमी

२०१८ ४५० मिमी २२८.०० मिमी

--------

\Bसंभाव्य पाणीटंचाई असणारी गावे\B

\Bमहिना गावांची संख्या\B

नोव्हेंबर २०१८ ०५

डिसेंबर २०१८ ०९

जानेवारी २०१९ ११

फेब्रुवारी २०१९ ११

मार्च २०१९ १५

एप्रिल २०१९ ०५

मे २०१९ ०५

एकूण ६६

(यासाठी नियोजन म्हणून ९ बोअर आणि सात विहिरींचे प्रशासनाकडून अधिग्रहण करण्यात येणार आहे.)

---------

\B२४ कोटी खर्चूनही ७१ पाणीपुरवठा बंद

\Bतालुक्यात आतापर्यंत ७१ पाणीपुरवठा योजना उभारल्या. तांत्रिकदृष्ट्या या योजना असंक्षम असल्याने २४ कोटी रुपये खर्चूनही त्या सद्यस्थितीत गंजलेल्या अवस्थेत आहेत. पश्चिम भागातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक गावात अंदाजे दोन किंवा चार पाणीयोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. तालुक्यात २००४ ते २०१५ या कालावधीत पाणी प्रश्न निकाली काढण्याच्या उद्देशाने तब्बल ७१ योजना राबविण्यात आल्या आहे. यामध्ये स्वजलधारा ८, वर्धित वेग कार्यक्रमांतर्गत २७, भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत १०, बिगर आदिवासी २६ अशा एकूण ७१ योजनांचा समावेश आहे. यासाठी २४ कोटी ८६ लाख ४३ हजार ६०३ रुपये खर्च करण्यात आला. 'संबंधित विभागाने या भागांत योजना सुरू करताना पाणीपुरवठ्याचे जीआयएस मॅपिंग व ग्रामीण पाणीपुरवठ्याचा 'हायड्रॉलिक वॉटर सिम्युलेशन'ने अभ्यास केला नसल्याने पुढील दोडशे वर्षे अशा योजना राबविल्या तरी वाड्या-वस्त्यांवर टँकर सुरूच राहतील,' अशी माहिती एका सेवानिवृत्त अभियंत्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर 'मटा'ला दिली.

--------

दुष्काळ आमच्या पाचवीलाच आहे. आम्हांला शेतीसाठी पाणी नाही दिले तरी चालेल. मात्र, पिण्यासाठीतरी पाणी द्या. नेहमीच या भागाकडे दुर्लक्ष करण्यात येत असते.

- ज्ञानेश भापकर

----------

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विंधन विहिरी, विहीर खोदाई, पाणीउपसा बंदी करावी लागणार आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपलब्ध असणारे पाण्याचे स्रोत्र आरक्षित करण्यात येणार आहेत. प्रत्येक नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे.

- हनुमंत पाटील, तहसीलदार, बारामती

--------

\Bमूर्टी\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्तीच्या अर्जांची मान्यताप्रक्रिया आजपासून

0
0

नाशिक जिल्ह्यासाठी बीवायके कॉलेजचे केंद्र

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उच्च शिक्षण संचालनालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तींसाठी आता नव्याने तयार करण्यात आलेले महाडीबीटी पोर्टल हे कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोर्टलवर छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून रविवारी सायंकाळपर्यंत ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले आहेत. दरम्यान, या शिष्यवृत्तीसह विविध प्रकारच्या शिष्यवृत्तींसाठी करण्यात आलेल्या अर्जांना मान्यता देण्याची प्रक्रिया आजपासून (दि. २९) सुरू करण्यात येणार आहे.

सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित कॉलेजांच्या इन्स्टिट्यूट प्रोफाईलला महाडीबीटी पोर्टलव्दारे ही मान्यता देण्यात येत आहे. यासाठी आता २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत प्रक्रिया राबविली जाणार आहे. याशिवाय ज्या कॉलेजांच्या इन्स्टिट्यूट प्रोफाईलला मान्यता दिली नसेल, त्यांनाही येथे मान्यता देण्यात येणार आहे.

नाशिक शहर व जिल्ह्यातील कॉलेजांसाठी ही प्रक्रिया बीवायके कॉमर्स कॉलेजमध्ये राबविण्यात येईल. २९ ते ३१ ऑक्टोबर या तीनही दिवशी सकाळी १०.३० वाजेपासून कामकाज सुरू होणार आहे. आज, सोमवारी पहिल्या टप्प्यात नाशिक शहरासह निफाड, मालेगाव या तालुक्यांमधील सर्व कला-वाणिज्य व विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र कॉलेजेसमधील प्रकरणांना मान्यता देण्यात येईल. उद्या (दि. ३०) इगतपुरी, कळवण, चांदवड, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, देवळा या तालुक्यांमधील तर ३१ ऑक्टोबर रोजी नांदगाव, पेठ, बागलाण, येवला, सिन्नर, सुरगाणा या तालुक्यांमधील कॉलेजच्या प्रकरणांना मान्यता देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूतिगरणी कामगारांवा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गेल्या २४ वर्षांपासून ठेंगोडा सूतगिरणी कामगारांची थकीत रक्कम मिळत नसल्याने तत्कालीन संचालक, अवसायक व अधिकारी यांचा निषेध म्हणून यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय कामगार संघटनेचे नेते आण्णा सोणवने यांच्या वतीने जाहीर करण्यात आला.

सूतगिरणी कामगारांचे थकीत पगार, बोनस, ग्रॅज्युटी इत्यादी रक्कमेच्या प्रतिक्षेत २४ वर्षांपासून गिरणी कामगार आहेत. सन १९९४ पासून गिरणी अवसायनात निघाली व अवसायकांच्या ताब्यात आली. आजवर अनेक अवसायक बदलून गेले त्यांच्याकडे वारंवार थकीत रकमेची मागणी कामगारांच्या वतीने करण्यात आली. परंतु कामगारांच्या मागणीकडे कुणीही लक्ष दिले नाही. कोणतीही संस्था अवसायनात निघाल्यास तिची समापण मर्यादा असते. परंतु स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्याने कामगारांची एक पिढी सरकारी यत्रणेची शिकार झाली कामगारांची हक्काची रक्कम त्यांना अद्याप मिळाली नाही. गिरणी कामगारांनी वयाची ६५ ओलांडली. आपले प्रश्न कुणीतरी सोडेल या अपेक्षेने कामगार जगत आहेत. लवकर न्याय मिळावा, अशी मागणी अण्णा सोणवने, यशवंत पाटील, आर. के. आहीरे, कारभारी पगार, निंबा धोंडगे, त्र्यंबक जगताप यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयएमए नाशिक टीम विजेती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत नाशिकच्या संघाने औरंगाबाद संघाला अंतिम सामन्यात पराभूत करीत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. डॉ अनिरुद्ध भांडारकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. कपिल पाळेकर यांच्या कुशल नेतृत्वामुळे ही विजयश्रीची माळ नाशिकच्या गळ्यात पडली. विजयी संघात दिनेश ठाकूर, मिलिंद गांगुर्डे, नितीन चिताळकर, विशाल गुंजाळ, सचिन अहेर, सुशील अंतुरलीकर, भूषण नेमाडे, मुकेश खैरनार, गणेश सांगळे, सुहास कोटक, लखुजी चौधरी यांचा समावेश होता. अंतिम सामन्यात औरंगाबाद संघाने १२ षटकात ९५ धावा केल्या. नाशिक संघाने धावांचा पाठलाग करताना अवघ्या ११ षटकात १०० धावा करीत विजय प्राप्त केला सामन्याचे मानकरी डॉ दिनेश ठाकूर ठरले त्यांनी अवघ्या २२ चेंडूच्या ४७ धावा ठोकत सामना जिंकून दिला, नाशिकच्या विजयाबद्दल आय एम ए नाशिक चे अध्यक्ष डॉ आवेश पलोड यांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images