Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मटा भूमिका

$
0
0

सायकल प्रकल्पापाठोपाठ होऊ घातलेला ई-टॉयलेट प्रकल्प नाशिककरांसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. शहरात सार्वजनिक शौचालयांची कमरता आणि उपलब्ध शौचालयांची दुरवस्था, तसेच त्यांच्या अस्वच्छतेमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बाहेरून येणाऱ्या लोकांची होणारी कुंचबणा थांबण्यास यामुळे मदत होणार आहे. कमीत कमी जागेत पर्यावरणपूरक सेटअप, स्वयंचलित सफाई यंत्रणा आदी वैशिष्ट्यांमुळे हा प्रकल्प शहरवासीयांच्या पसंतीस उतरेल याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. महापालिकेवर आर्थिक बोजा पडणार नसल्याने ही आणखी एक चांगली बाब. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी हातभार लावणाऱ्या अशा प्रकल्पांचे स्वागतच करायला हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खरेदीची साधणार पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बोनस आणि पगाराची रक्कम हाती पडल्याने आज दिवाळीपूर्वी येणाऱ्या रविवारी (दि. २८ ऑक्टोबर) ग्राहकांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडण्याची चिन्हे आहेत.

शहरातील बाजारपेठा दिवाळीसाठी सज्ज झाल्या असून, विविध प्रकारच्या ऑफर्स आणि सवलतींचा वर्षाव ग्राहकांवर करण्यात येत आहे. त्यामुळे आज शहरातील मुख्य बाजारपेठात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी विविध साहित्य खरेदीची उत्सुकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. त्यामुळे पणत्या, पूजा साहित्य, केरसुणी, लक्ष्मी मूर्ती, रांगोळ्या, कपडे अशी विविध प्रकारची खरेदी करण्यात कुटुंबेच्या कुटुंबे व्यस्त असल्याचे दिसून आले. शहरातील मेनरोड, शालिमार, नाशिकरोड, कॅनडा कॉर्नर अशा विविध परिसरांमध्ये दुकाने थाटण्यात आली असून, ठिकठिकाणी खरेदीसाठी गर्दी होत आहे. पुढील रविवारी वसुबारस आहे. त्यामुळे दिवाळी सुरू होण्यापूर्वीच खरेदी पूर्ण करण्याकडे अनेकांचा कल असल्याने आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. शहरातील विविध मॉल्समध्येही दिवाळीसाठी अनेकविध ऑफर्स देण्यात आल्या आहेत. कपड्यांपासून ते आकाशकंदील, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अशा सर्व वस्तूंवर या ऑफर्स मिळत असल्याने मॉल्सकडेही नाशिककरांचा मोठा कल दिसत आहे. याशिवाय खास दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनेही आयोजित करण्यात आली असून, फराळाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी येथे गर्दी होत आहे. रविवारी गर्दीच्या संख्येत प्रचंड वाढ होईल, असा विश्वास विक्रेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकांमध्ये मुंढे नकोच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासारख्या हुकूमशहा आणि द्वेषबुद्धीने कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना राज्यातील कुठल्याही महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती देवू नये, अशा मागणीचा ठराव नागपूर येथील राज्यस्तरीय महापौर परिषदेत आज संमत करण्यात आला.

मुंढेंसारखे एककल्ली अधिकारी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत न घेताच, लोकशाहीने मिळालेल्या अधिकाऱ्यांवर गदा आणतात अशी चर्चा या परिषदेत झाली. यासोबतच त्यासंदर्भातील ठराव पारित करीत, मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे. गरज पडल्यास यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचीही तयारी या परिषदेत दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या अडचणीत भर पडली आहे. दरम्यान, राज्यातील महापौरांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार असावेत, सत्तेची सर्व सूत्रे आयुक्तांच्या हाती नसावीत, अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जावे, अशा मागण्या या वेळी नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी परिषदेत मांडल्या.

नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्यासह राज्यातील १९ महापालिकांच्या महापौरांची परिषद नागपूरमध्ये सुरू असून, वनामती येथे आयोजित १८ व्या महाराष्ट्र महापौर परिषदेचे शनिवारी (दि. २७) उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या सत्रानंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली महापौरांची परिषद झाली. यात ७४ व्या घटना दुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी दिल्यानंतरही महापालिकांची अवस्था दयनीय असल्याने नगराध्यक्षांच्या धर्तीवर महापालिकांच्या महापौरांना आर्थिक अधिकार मिळावेत. लोकप्रतिनिधींचा सन्मान न राखणाऱ्या आयुक्तांविरोधात कारवाईचे अधिकार महापौरांना असावेत, यांसह विविध मागण्यांचे निवेदन महापौर भानसी यांनी परिषदेचे अध्यक्ष महाडेश्वर यांना सादर केले.

यानंतर अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी आयएएस अधिकाऱ्यांच्या वागणूकीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी मुंढे यांच्या कार्यशैलीबाबत महापौर भानसी यांनीही मत व्यक्त केले. परिषदेत नवी मुंबई, पनवेल, पुणे, पिंपरी-चिंचवडच्या महापौरांनी मुंढे यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला. त्यामुळे मुंढेंसारखे अधिकारी हे राज्यातील कोणत्याही महापालिकांमध्ये आयुक्त म्हणून पाठवू नये, असा ठराव यावेळी पारित करण्यात आला.

महापौर भानसी यांच्या मागण्या

- महापौरांना राज्यमंत्री पदाचा दर्जा द्यावा

- महापौरांना आर्थिक-प्रशासकीय अधिकार प्रदान करावेत

- दोषी आयुक्तांवर कारवाईचा अधिकार महापौरांना मिळावा

- बजेटमधील मंजूर विषय महासभेवर यावेत

- महापौर परदेश दौऱ्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी

विकास आराखडा हेच महत्त्वाचे साधन

'शाश्वत विकास करताना अस्तित्वाची लढाई प्रत्येक शहराला लढायची आहे. त्यासाठी अधिकाराचा योग्य तो वापर करताना त्याचे नियोजनही महत्त्वाचे आहे. आज लोकप्रतिनिधींना उपविधीची माहितीच नाही, वा वाचलीच जात नाही. अधिकार दिले, तरी त्यावर काही अंकुश हवेत. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय हवा. विकास आराखडा मंजूर केला असताना स्वसामर्थ्यवान होण्याची महापालिकांची तयारी नाही. उत्पन्नाचे स्रोत शोधले गेले पाहिजे. परिस्थितीची गरज हेरून विकासाकडे बघण्याची गरज आहे. तरच, दिलेल्या अधिकाराचा व निधीचा योग्य तो वापर होऊ शकतो,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील महापौरांना कानपिचक्या देत सल्लाही दिला. मुख्यमंत्री म्हणाले, 'दुष्काळ व अतिवृष्टीमुळे पुढील काळात अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. विकसनशील राष्ट्रांत सर्वाधिक प्रश्न उद्भवतील. २०३०पर्यंत पंतप्रधान मोदींनी शाश्वत विकासाचे संदर्भ निवडले आहेत. वाहतूक व्यवस्था विजेवर चालणारी असली पाहिजे. द्रव व घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन व्हायला हवे. मुंबई, पुणे, नागपूर या शहरांत इंधनाच्या अनिर्बंध वापराने प्रदूषण वाढले आहे. कार्बन उत्सर्जनाने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे या शहरांनी इलेक्ट्रिक मोबिलिटीवर भर दिला पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगीचे तांडव

$
0
0

मालेगावातील गोल्डननगरात ५० झोपड्या खाक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील गोल्डननगर भागातील झोपडपट्टीत शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली. पूर्वभागातील अत्यंत चिंचोळी गल्ली असलेल्या परिसरात ही आग लागल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या आगीत सुमारे ५० झोपड्या जळून खाक झाल्या असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

शहरातील गोल्डननगर भागातील नागछाप झोपडपट्टी परिसरात ही आगीची घटना घडली. अग्निशमन दलास माहिती मिळताच अधीक्षक संजय पवार व त्यांचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र चिंचोळ्या गल्ल्या व बघ्यांची गर्दी यामुळे अग्निशमन दलास मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले. संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याने आगीची भीषणता लक्षात येत होती. आग आटोक्यात येत नसल्याने अखेर ७ बंब घटनास्थळी मागविण्यात आले. तब्बल एक तासभर हा आगीचा थरार सुरू होता. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

सिलिंडरचा स्फोट?

आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले तरी सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली असल्याचा प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली. आगीची भीषणता लक्षात घेता सटाणा, मनमाड व धुळे येथून सायंकाळी उशिरा बंब मागविण्यात आले. घटनास्थळी प्रांत अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे, अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, अजित हगवणे, पालिका उपायुक्त नितीन कापडणीस, सहाय्यक आयुक्त कमरुद्दीन शेख, विलास गोसावी आदी हजर होते. सायंकाळी अंधार पडल्याने आग विझविण्यात अडथळा निर्माण झाला होता.

दोन तासांनंत आग अटोक्यात

दाट लोकवस्ती व चिंचोळ्या गल्ल्यांमुळे आग वाढत असल्याचे लक्षात घेता प्रशासनाने परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत या आगीच्या घटनेत कोणतीही जीवित हानी नसल्याचे वृत्त होत. सुमारे दोन तासांनंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. रात्री उशिरापर्यंत पालिका, महसूल, पोलिस प्रशासन व स्थानिक नागरिकांकडून मदत कार्य सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनीचे कार्यालय फोडून चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदूस्थान लिव्हर या कंपनीच्या वितरकाचे कार्यालय फोडून चोरट्यांनी सहा लाख रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना वर्दळीच्या गंगापूररोड भागात घडली असून, या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

विशाल रमेश अग्रवाल (रा. ऋषीराज, गंगापूररोड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. अग्रवाल हे कंपनीचे मुख्य वितरक असून, त्यांचे गोडावून आणि कार्यालय निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल नजीक असलेल्या स्वस्तिक निवास येथील अग्रवाल चेंबर्समध्ये आहे. गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ऑफिसच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीचे गज कापून कार्यालयातील तिजोरीत ठेवलेली सुमारे ५ लाख ९६ हजारांची रोकड चोरून नेली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक समीर वाघ करीत आहेत.

दुचाकीस्वार ठार

भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आदळून चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात औद्योगीक वसाहतीतील ड्रिलबिट कंपनीसमोर झाला असून, या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली. राजू पांडूरंग पोटींदे (४५ रा. आर्या पॉली प्रोडक्टस, सातपूर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. गेल्या शनिवारी (दि.२०) पोटींदे आणि त्यांचा मित्र रवी वाघेरे हे दुचाकीवर (एमएच १५ ईएल ७६२२) प्रवास करीत असताना ही घटना घडली होती. सातपूरगावाकडून महेंद्रा सर्कलकचे दिशेने औद्योगीक वसाहतीतून दुचाकी जात असताना चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला. भरधाव दुचाकी ड्रिलबिट कंपनीच्या प्रवेशद्वारावर जावून आदळली. यात पोटींदे गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.

वडाळागावात महिलेची आत्महत्या

वडाळागावात राहणाऱ्या २२ वर्षांच्या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

अनितादेवी दिलीपकुमार प्रसाद (रा. वडाळागाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अनितादेवी यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. अधिक तपास हवालदार भामरे करीत आहेत.

चक्कर येवून तरुणाचा मृत्यू

चक्कर येवून पडल्याने नांदूरनाका भागातील ३२ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मालेगाव स्टॅण्ड भागात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. हरीष राजपालगिरी गोसावी (रा. जनार्दननगर, नांदूरनाका) असे या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी हरीष मालेगाव स्टॅण्ड येथील प्रवीण मशिनरी या दुकानासमोर उभा असताना अचानक चक्कर येऊन तो जमिनीवर कोसळला. यावेळी त्यास गंभीर दुखापत देखील झाली. हरीषचे मामा राजेंद्र गोसावी यांनी त्यास तत्काळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी हरीषला मृत घोषीत केले. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक थेटे करीत आहेत.

युवकाची आत्महत्या

सचिन रविकांत दाणी (३५, रा.स्वामी विवेकानंद नगर, सिडको) या युवकाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून बेडरूममधील पंख्यास ओढणीने गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच त्यास सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस नाईक चकोर करीत आहेत.

देवळालीत आत्महत्या

रविवार बाजारातील हौसनरोड भागात राहणाऱ्या संतोष पंडीत शेळके (३५) या तरुणाने बुधवारी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. कुटुंबियांनी त्यास तत्काळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवळाली कँम्प पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस नाईक शेवाळे करीत आहेत.

पिकअप चालकावर गुन्हा

सिग्नल मोडून भरधाव वाहन चालविणाऱ्या चालकावर आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. शरद संपत पेखळे (३४, रा. रेल्वे गेट, ओढा) असे संशयित चालकाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी शरद आपल्या ताब्यातील एमएच १५ डीके ९७६ ही पिकअप पंचवटीतील अमृतधामजवळ असलेल्या हॉटेल मिरची येथे सिग्नल मोडून इतर वाहनांना क्रॉस करून धोकादायक परिस्थितीत पुढे गेला. यामुळे येथे वाहतूक कोंडी झाली. याबाबत आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस नाईक पाचरणे करीत आहेत.

जाहिरात लावणाऱ्या तिघांवर गुन्हा

शहरातील द्वारका सर्कल येथे छत्रपती करिअर अ‍ॅकेडमीचा जाहिरात बोर्ड परवानगी न घेता लावणाऱ्या तिघांविरुद्ध भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश शिंदे, शुभम् सोनवणे व शीतल (पूर्ण नावे व पत्ते माहीत नाहीत) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी द्वारका सर्कल येथे २० ऑक्टोबर रोजी नाशिक महापालिकेच्या पूर्व विभागातून जाहिरात बोर्ड लावण्याबाबत परवानगी न घेता दुभाजकाच्या जाळीला छत्रपती करिअर अ‍ॅकॅडमीचा बोर्ड लावून जाहिरात केली. याबाबत हिरामण महाले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समन्यायी’तील त्रुटींवर बोट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सन २००५ मध्ये तयार झालेल्या समन्यायी पाणीवाटप कायद्यातील त्रुटींवर बोट ठेवत या कायद्याचे फेरनियोजन करावे, मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार फेरसर्वेक्षण करण्यात यावे, जायकवाडी धरणाची साठवणक्षमता ४२ टीएमसी धरावी, या मागण्यांसाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे शुक्रवारी पिटिशन दाखल केले आहे.

जायकवाडी खोऱ्यातून अनधिकृतपणे सुरू असलेल्या पाण्याच्या उपशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही आमदार प्रा. फरांदे यांनी केली आहे. प्राधिकरणाकडे आता थेट कायदेशीर पद्धतीने त्यांनी हरकत सादर केल्याने प्राधिकरणासह महामंडळाची कोंडी झाली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सन २००५ च्या समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार नाशिक आणि नगरच्या धरणांतून जायकवाडीसाठी नऊ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश महामंडळाला दिले आहेत. या निर्णयाने नाशिकसह नगरमध्ये राजकारण पेटले आहे.

मेंढेगिरी समितीने दर पाच वर्षांनी या कायद्याचा फेरआढावा घेण्याची तरतूद केली आहे. सदरील कायदा हा २०१३ मध्ये लागू झाला आहे. त्यामुळे आता या अहवालाची मुदत संपली असल्याचे सांगत आमदार प्रा. फरांदे यांनी यापूर्वीही महामंडळाकडे तक्रार अर्ज सादर केले होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सदरील कायदा कालबाह्य झाल्याचे सांगत तुटीच्या खोऱ्यात अनधिकृतपणे उपसा होत असल्यानेच नाशिक-नगरमधून पाणी सोडावे लागत असल्याचा कायदेशीर आक्षेप त्यांनी घेतला आहे. प्राधिकरणाचे सचिव सु. आ. कुलकर्णी यांची भेट घेऊन आमदार फरांदे यांनी अॅड. प्रवर्तक पाठक यांच्यामार्फत पिटिशन दाखल केले. न्यायालयाने पाणी सोडण्याबाबत दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी प्राधिकरणाकडे कायदेशीर हरकत नोंदविली आहे. बाष्पीभवनाच्या आकडेवारीत केलेली हेराफेरी, जायकवाडी खोऱ्यातून होणारी पाणीचोरी, मेंढेंगिरी अहवालातील त्रुटी, ऊर्ध्व खोऱ्यातील धरणांचे न झालेले फेरसर्वेक्षण आणि नाशिकवर झालेल्या अन्यायाबाबत त्यांनी लेखी आक्षेप घेतले आहेत.

--

जायकवाडीच्या क्षमतेवरही आक्षेप

गंगापूर धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असतानाही त्याचा विचार सर्वेक्षण अहवालात करण्यात आलेला नाही. राज्य सरकारने सन २००२ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत जायकवाडी धरणाची क्षमता ८१ टीएमसी असल्याचा दावा केला होता. परंतु, प्रत्यक्षात सीडीओ मेरीने सन २००४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात जायकवाडी धरणाची क्षमता अवघी ४२.२० टीएमसी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भातील कागदपत्रे पाटबंधारे महामंडळ आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे उपलब्ध असल्याचे सांगत धरणाची क्षमता कमी असूनही तुटीचे खोरे दाखवून नाशिक-नगरचे पाणी पळविले जात असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदविला आहे. जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमधील चार तालुक्यांमधे असलेल्या आठ साखर कारखान्यांमध्ये ४५.३८ लक्ष मेट्रिक टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. या चार तालुक्यांमध्ये उसाच्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे धरणातून पाण्याचा उपसा केला जात असल्याचे त्यांनी पिटिशनमध्ये म्हटले आहे.

--

नाशिकवर अन्याय

जलसंपदा विभागाने नाशिक शहराच्या पाणीवापराच्या आरक्षणाची २०४१ पर्यंतची तरतूद आपल्या अहवालात केली आहे. परंतु, मेंढेगिरी समितीच्या अहवालात कमी आणि चुकीची तरतूद दाखविण्यात आली आहे. सन २०११ पर्यंत गंगापूर आणि दारणा धरणातून ४.५ टीएमसी पाण्याची तरतूद आहे. सन २०२१ पर्यंत नाशिकसाठी ७.२० टीएमसी पाणी आरक्षित ठेवले आहे. सन २०१८ मध्ये नाशिक शहरासाठी ६.५ टीएमसी पाणीवापराची परवानगी आहे. मात्र, असे असतानाही मेंढेगिरी समितीने चुकीची आकडेवारी दाखवून नाशिकचे दोन टीएमसी पाणी कमी केल्याचा आक्षेप त्यांनी कुलकर्णी यांच्यासमोर सादर केला आहे. त्यावर सोमवारी (दि. २९) विचार करण्याचे आश्वासन कुलकर्णी यांनी दिले आहे.

--

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून नाशिकवर अन्याय करण्यात आला आहे. ऊर्ध्व खोऱ्यातील धरणांचे फेरसर्वेक्षण करण्यापूर्वीच पाणी सोडण्यााचा निर्णय चुकीचा असून, त्याला आता कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. पिटिशनवर सुनावणी झाल्याशिवाय पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

-प्रा. देवयानी फरांदे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा छळ; पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणले नाही म्हणून पतीसह सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ केला तसेच पतीने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अनैसर्गिक संभोग केल्याची फिर्याद शुक्रवारी रात्री विवाहितेने शहर पोलिस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी आंबेजोगई येथे राहणाऱ्या पतीसह सासू, सासरा, दीर यांच्या विरोधात मनमाड पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. मनमाड येथे राहणाऱ्या तरुणीचा विवाह अंबेजोगाई येथील अभिजित आडके यांच्याशी झाला होता. परंतु त्याचे बाहेर दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याने त्याने पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केला. छळ सहन न झाल्याने मनमाड येथे येऊन विवाहितेने झालेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. शुक्रवारी रात्री फिर्याद दाखल करण्यात आली. अभिजित आडके यांच्यासह तरुणीची सासू, सासरा, यांच्या विरोधात विविध गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझरचा पाणीपुरवठा तोडणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्यापोटी १ कोटी २६ लाख ८२ हजार रुपये थकवल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १ नोव्हेंबरपासून पाणीपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या ग्रामपंचायतीकडे चालू पाणीपट्टीचे ६८ लाख ८२ हजार व थकीत रक्कम ५८ लाख रुपये बाकी आहे. त्याचप्रमाणे मागील २९ कोटी ५४ लाख आहे. जीवन प्राधिकरणाने ओझर ग्रामपंचायतीला चालू बाकी १ कोटी २६ लाख ८२ हजार हे थकीत ३१ ऑक्टोंबरपर्यंत भरण्याची मुदतही दिली आहे.

ओझर, साकोरा व २ गावे असे नाव असलेल्या या योजनेतून जानोरी, मोहाडी, जऊळके या दिंडोरी तालुक्यातील गावांना पाणी दिले जाते. पाणी पुरवठा योजनेतून पालखेड डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्याचे सर्व जलव्यवस्थापन जीवन प्राधिकरणाकडे आहे. गेल्या वेळेसही मार्चमध्ये अशाच पध्दतीची नोटीस देण्यात आली होती. पण, ग्रामपंचायतीने काही पैसे भरल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत राहीला.

पाणीपुरवठ्याचे बील भरावे यासाठी जीवन प्राधिकरणाने वांरवार पत्रांद्वारे व प्रत्यक्ष भेटी देऊन बैठकाही घेतल्या. पण, थकबाकीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले. सदर योजना चालविण्यासाठी जीवन प्राधिकरणाही कोणते अनुदान व मदत मिळत नसल्याने ही योजना पाणीपट्टीवर अवलंबून आहे. ओझर ग्रामंपचायती जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असेलेली ग्रामपंचायत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या ५१ हजार २९७ आहे. एचएएलमुळे या शहराला वेगळे महत्त्व असून, त्यामुळे येथील पाणीपुरवठा योजना बंद झाल्यास पाण्याचा प्रश्न तीव्र होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रानगवा आढळल्याने पाथर्डीत खळबळ

$
0
0

सुकामेवा खाणार 'भाव' -२

कोल्हापूर दर्शनाने सुखावलो -४

--

रानगवा आढळल्याने पाथर्डीत खळबळ (फोटो)

इंदिरानगर : पाथर्डी येथे शनिवारी दुपारी रानगवा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. येथील जाचक मळा भागातील श्यामदर्शन व शिव पॅलेस परिसरात हा रानगवा नागरिकांना आढळला. नागरिकांच्या माहितीनंतर वन विभागाने येथे पाहणी केली असता हा रानगवा आढळला नाही. मात्र, त्याला पकडण्यासाठीची यंत्रणा वन विभागाने येथे उभारली आहे. परिसरात बिबट्यासह अन्य श्वापदांचाही वावर वाढल्याने याप्रश्नी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

--

'आप'ची सदस्यनोंदणी

जेलरोड : आम आदमी पक्षाची सदस्य नोंदणी आज, रविवार (दि. २८)पासून सुरू होणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भावे यांनी ही माहिती दिली. नाशिक-पुणे मार्गावरील नेहरूनगरसमोरील भावे प्लास्टो येथे इच्छुक नागरिकांना नावनोंदणी करता येईल. इच्छुकांनी सोबत फोटो आणि ओळखपत्र आणावे. त्यानंतर त्वरित ओळखपत्र दिले जाईल, असेही भावे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना फिर्यादीची प्रतिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विवाहापूर्वी असलेल्या प्रेमसंबंधाचा फायदा घेऊन बलात्कार करण्याची तक्रार देणाऱ्या कोलकाता येथील फिर्यादीची भद्रकाली पोलिसांना प्रतिक्षा आहे. या महिलेशी पोलिसांनी संपर्क साधला असून, तिने पुढील चौकशीसाठी लागलीच येण्याबाबत हतबलता दर्शवली असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. फिर्यादीची माहितीच सध्या उपलब्ध नसल्याने पोलिसांनी प्रसाद उल्हास रत्नपारखी (रा. शास्त्रीनगर) आणि नलिनी मंगत (रा. ओमनगर, दसकरोड) यांची अद्याप चौकशी केलेली नाही.

कोलकात्यातील सोनारपुरा पोलिस स्टेशन हद्दीत राहणारी ही महिला सन २००० मध्ये शिक्षणासाठी नाशिकमध्ये आली होती. त्यावेळी प्रसादचे तिचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. याचदरम्यान ती गर्भवती राहिली. त्यामुळे तिला दोनदा गर्भपात करावा लागला. २००७ मध्ये तिचा दुसरीकडे विवाह झाला. मात्र, २०१० ते २०१७ या आठ वर्षांच्या कालावधीत पीडिता ज्या-ज्या वेळी माहेरी आली, त्यावेळी संशयित आरोपी प्रसादने तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार महिलेने केली आहे. महिलेचे काही फोटोग्राफ्स संशयित आरोपीकडे असल्याने ते पतीसह सर्वांना दाखवण्याची धमकी देत त्याने कोलकाता येथेही महिलेवर बलात्कार केला. याच दरम्यान संशयिताने महिलेच्या पतीकडून सात लाख रुपये देखील उकळले.

या प्रकरणी महिलेने कोलकाता येथे पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी ही फिर्याद दाखल करून तपासासाठी हा गुन्हा भद्रकाली पोलिस स्टेशनकडे वर्ग केला. याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले की, पिडीत महिलेशी संपर्क साधण्यात आला. पुढील चौकशी झाल्यानंतरच संशयित आरोपींबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

प्रसाद उल्हास रत्नपारखी

या गुन्ह्यातील संशयिताचे नाव प्रसाद उल्हास रत्नपारखी (घर क्रमांक ३३, शास्त्रीनगर, नाशिक) असे असून, २७ ऑक्टोबर रोजी प्रसिध्द झालेल्या वृत्तात हे नाव उल्हास रत्नपारखी (शास्त्रीनगर, नाशिक) असे प्रसिध्द झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडला सात लाखांचा गुटखा जप्त

$
0
0

तिघांविरोधात गुन्हा दाखल

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

येथील होलसेल किराणा दुकानात छापा टाकून सहा लाख ९२ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. मनमाडच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती रागसुधा आर. व त्याच्या पथकाने ही कारवाई केली.

चांदवड बसस्थानकासमोर असलेल्या हेमंत श्रीकिसन हेडा यांच्या होलसेल किराणा दुकानात गुटखा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मनमाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचत शुक्रवारी हेडा यांचे दुकान व घरावर धाड टाकली.

त्यात सहा लाख ९२ हजार रुपये किमतीचा गुटका हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी हेमंत श्रीकिसन हेडा, आशिष श्रीकिसन हेडा, ललित श्रीकिसन हेडा (सर्व रा. जुनी कोर्ट गल्ली, चादवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदवड शहरातील बसस्थानकासमोर राजरोसपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असताना स्थानिक पोलिस व अन्न व औषध प्रशासनाला कसे कळले नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यावर पहारा...

$
0
0

पाण्यावर पहारा (मुख्य अंक पान २ लीड)

गंगापूरसह अन्य धरणांमधून सोमवार (दि. २९)पासून केव्हाही पाणी सोडण्याची शक्यता गृहित धरून दोन दिवसांपासून सलग गंगापूर धरण परिसराची पाहणी करणाऱ्या ग्रामीण पोलिसांनी शनिवारी येथे काही कर्मचारी तैनात केले असून, आज, रविवारी (दि. २८) सायंकाळपासून येथे खडा पहारा ठेवण्याचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

--

ग्राहकांच्या तक्रारी एका क्लिकवर! (मुख्य अंक पान ५ अँकर)

एखाद्या व्यवहारात फसवणूक झाल्यास त्यासंदर्भात तक्रार कोठे करायची, कोणाचा सल्ला घ्यायचा इथपासून वकील कोणता शोधायचा आदी प्रकारच्या सर्व त्रासांपासून ग्राहकांची आता सुटका होणार असून, घरबसल्या एका क्लिकवर 'कन्झ्युमर कनेक्ट' या अॅपच्या माध्यमातून यापुढे थेट जिल्हा व राज्य न्यायालयात तक्रार नोंदविता येणार आहे.

--

फॅशनशी वयाचा काय संबंध? (प्लस पान ४ अँकर)

फॅशन करायला वयाचं कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं, मुळात फॅशनचा आणि वयाचा संबंधच काय? असं म्हणणं आहे आपल्या ग्लॅमरस लूकने चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री मलायका अरोराचं. आपल्या बिनधास्त शैलीत ती फॅशनबद्दल व्यक्त झाली. 'इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल सीझन ४'च्या निमित्तानं 'मटा'नं तिच्याशी केलेली खास बातचीत…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेम्पो-ट्रकच्या अपघातात बाप-लेक ठार

$
0
0

साक्रीरोडवरील घटना; दहा जण जखमी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मालेगाव तालुक्यातील अजंग येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांच्या टेम्पोला शनिवारी (दि. २७) दुपारी एक वाजेच्या ट्रकसोबत अपघात झाला. अपघातात मुलीसह वडील जागीच ठार झाले तर दहा जण जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांची टेम्पो दिवाळीच्या सुट्या लागल्याने साक्रीकडून दहिवेलकडे घरी परत जात होती.

साक्री तालुक्यातील छडवेल पखरून या गावाजवळ शनिवारी (दि. २७) दुपारी एक वाजेच्या सुमारास साक्रीकडून दहिवेलकडे जाणारी मॅक्स टेम्पो (क्र. एमएच १८ डब्ल्यू ६६५३) तर दहिवेलकडून येणारी ट्रक (क्र. एमएच २८ डी ७४८२) या दोन्ही वाहनांमध्ये अपघात झाला. या भीषण अपघातात दीपाली संदीप गावीत (वय १३), संदीप ब्रिजलाल गावीत हे दोन जण जागीच ठार झाले.

या अपघातातील सर्व विद्याथी साक्री तालुक्यातील असून, स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल अजंग (ता. मालेगाव) येथे शिक्षण घेत होते. शनिवारी सकाळी घरी जाण्यासाठी गावाकडील वाहनाने जात असताना विद्यार्थ्यांवर काळाने झडप घातली. जखमींमध्ये दिलवर एकनाथ चौरे (वय १०, रा. पाचमौली), करीना मनोहर कांबळे (वय १३, जामखेली), दीक्षांत भरत गावीत (वय १०, पिंजारझाडी), मृणाल कन्हैया भोये (वय १०, जामखेली), भारती भिमराव बागुल (वय १३, रा. गुलतारे), कन्हैया तुळशीराम भोये (वय ३०, जामखेली) भरत आत्माराम गावित (वय ५०, पिंजारझाडी), हिरालाल ब्रह्मा चौरे (वय ५५, पाचमौली), राजेंद्र भगवान पवार (वय ५५, मावजीपाडा), वीरेंद्र राजेंद्र पवार (वय १०, मावजीपाडा) यांचा समावेश आहे. जखमींवर साक्री ग्रामीण रुग्णालयात डॉ. बी. पी. गोयल, डॉ. श्रेणीक पंडित, डॉ. कुणाल भदाणे आदींनी उपचार करून धुळे येथे उपचारासाठी पाठविले. ग्रामीण रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते धनराज चौधरी, नागसेन शिरसाठ, जितेंद्र जगदाळे आदींनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जनतेच्या भावना समजून घ्याव्यात’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जनतेच्या भावना लक्षात घेऊन नाशिकमधील धरणांमधून मराठवाड्यास पाणी सोडू नये, अशी मागणी नाशिकरोड येथील राजमाता प्रतिष्ठानने मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री शिंदे यांना निवेदन दिले. त्यानुसार नाशिकच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाला आहे. धरणातील पाणी वर्षभर पुरेल अशी स्थिती नाही. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य स्थिती आहे. उपलब्ध पाण्यात जिल्ह्याची तहान भागवणे अवघड होणार आहे. अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मराठवाड्यास पाणी सोडण्याचा प्रश्न उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात पाठवला आहे. तरी पाणी सोडण्याचे आदेश कागदोपत्री कायम आहेत. पाणीप्रश्नावरून आंदोलने सुरू आहेत. तरी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन मराठवाड्यास पाणी सोडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर वाघ, अमोल घोडे, विजय भालेराव, राकशे भालतडक, सिंकदर धोत्रे, रमेश ताठे, लखन शिरसाठ, समाधान साबळे, राहुल वालझाडे, बाळा आहिरे, नितीन भोजने आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीझन रिपोर्टर फोटो


शहरात वादंग, सिडकोत नासाडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

एकीकडे शहरात पाणीप्रश्नी सर्व राजकीय पक्षांचे नेते एकत्र येऊन मोठे वादंग सुरू असतानाच दुसरीकडे सिडकोत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे प्रकार घडत आहेत.

सिडकोत गेल्या दोन दिवसांत पाणी वाया जाण्याची दुसरी घटना घडली असून, याप्रश्नी पाणीपुरवठा विभागावर कारवाई होणार नाही, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सिडको आणि पाणी समस्या हे सूत्र अनेक वर्षांपासून सुरू आहे. सिडकोत अत्यंत कमी दाबाने व अनियमितपणे पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी कायमच होत असतात. मात्र, आता याच सिडकोत प्रशासनाच्या चुकीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी सिंहस्थनगर भागात तब्बल पाच तास पाणीपुरवठा सुरू होता. त्यामुळे अक्षरशः रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी महापालिकेला याबाबत कळविले असता, याकडे कोणीही लक्षच दिले नसल्याचे दिसून आले. त्यानंतर रविवारी सिडकोतील प्रभाग २५ मधील पवननगर भागात सकाळी सात वाजता पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत तो सुरूच होता. अशा प्रकारे पाणीपुरवठा सुरू राहिल्याने परिसरातील रस्त्यांवर अक्षरशः पावसाळ्यात साचते त्या प्रकारे पाणी साचले होते. त्यामुळे किमान यापुढे तरी असे प्रकार होऊ नयेत याकडे पाणीपुरवठा विभागाने कटाक्षाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नियोजनाअभावीच बसतेय झळ

शहरात सध्या पाण्यावरून वादंग सुरू असतानाच असा प्रकार झाल्याने पाणी असतानाही केवळ नियोजन नसल्याने नागरिकांना कृत्रिम टंचाईची झळ सहन करावी लागत असल्याचे सिद्ध झाल्याची चर्चा परिसरात होती. सिडकोतील पाणीपुरवठा विभागाला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर येथे बिघाड झालेल्या ठिकाणी दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आली. रात्रीपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाही खरेदीला तोटा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आनंदाची आणि सुख समृद्धीची उधळण करीत येणाऱ्या दिवाळसणासाठी नाशिककरही सज्ज झाले असून, रविवारी शहरातील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने गजबजून गेल्या. खरेदीच्या उत्साहामुळे बाजारामधील मरगळ पुन्हा एकदा झटकली गेली असून, चैतन्याचे वारे वाहू लागले आहेत.

'दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा' असे म्हणतात, ते काही खोटे नाही. हा आनंद द्विगुणीत होतो तो मनसोक्त खरेदीनेच. बघता बघता दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या सणाचे हर्षोल्हासात स्वागत करण्यासाठी नाशिककरही सज्ज झाले आहेत. पणत्यांपासून आकाशकंदिलांपर्यंत आणि कपड्यांपासून मिठाईपर्यंत विविध प्रकारच्या वस्तूंनी बाजारपेठा सजू लागल्या आहेत. आठवडाभरावर दिवाळी येऊन ठेपल्याने नाशिककरांकडून खरेदीचे नियोजन सुरू झाले आहे. शनिवारपाठोपाठ रविवारदेखील नाशिककरांनी खरेदीसाठी राखून ठेवला होता. त्यामुळे शहराच्या उपनगरांमधील बजारपेठा गर्दीने फुलून गेल्या. बाजारपेठेत तयार फराळाची दुकानेदेखील सजण्यास सुरुवात झाली आहे. रसनातृप्तीचा आनंद देणारी ही दुकाने खवय्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. बाजारात शेव, चिवडा, शंकरपाळी, अनारसे, लाडू, करंजी, चकली यांसारखे फराळाचे पदार्थ तयार मिळत असले तरी अजूनही हे पदार्थ घरी बनविण्यास महिलावर्गाकडून अधिक पसंती दिली जाते. अशा पदार्थांकरीता आवश्यक जिनसा खरेदीला नाशिककर पसंती देत असल्याचे रविवारी पहावयास मिळाले. प्रामुख्याने फराळासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी किराणा दुकानांमध्ये गर्दी दिसून आली.

मॉल्स, आऊटले्टसमध्ये ग्राहकांची मांदियाळी

शालिमार, मेनरोड, एमजी रोड, रविवार कारंजा या मुख्य बाजारपेठेसह नाशिकरोड, सातपूर, पंचवटी, सिडको, कॉलेजरोड, शरणपूररोड परिसरातील बाजारपेठांसह सिटी सेंटरसारखे मॉलही गर्दीने फुलून गेल्याचे चित्र रविवारी पहावयास मिळाले. नवीन कपड्यांचे सर्वांनाच आकर्षण असते. दिवाळी ही तर कपडे खरेदीसाठी हक्काची पर्वणी. त्यामुळे रविवारची सुटी आणि ऑफर्सचा फायदा घेत अनेकांनी कपड्यांची खरेदी आटोपण्यासदेखील पसंती दिली. विशेषत: शालिमार, मेनरोड, कॉलेजरोड येथील व्यावसायिक आस्थापनांसह मॉल्समध्ये कपडे खरेदीचा उत्साह होता. अनेक मोठ्या ब्रॅण्डसनी कपडे खरेदीवर डिस्काऊंट्स देऊ केले आहेत. विविध स्वरुपाच्या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी अशा कंपन्यांचे आऊटलेटस, मॉल्स येथेही नाशिककरांची पावले वळू लागल्याचे पहावयास मिळाले. सिटी सेंटर मॉलसह शहरातील अन्य मॉल्समध्ये ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र होते. तर नाशिकरोड, कॉलेजरोड, पंचवटी, सातपूर, सिडकोतील पवननगर, त्रिमूर्ती चौक, इंदिरानगर या परिसरातील बाजारपेठाही गर्दीने फुलून गेल्या.

वस्तुंच्या बुकिंगला पसंती

फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच वाहनांसारख्या जीवनोपयोगी वस्तू दिवाळीमध्येच घरी आणता याव्यात यासाठी नाशिककरांकडून विशेष खबरदारी घेतली जाऊ लागली आहे. या वस्तूंना मागणी अधिक असल्यास सणाच्या मुहुर्तावर त्या घरी आणता येतील की नाही याबाबत धास्ती असते. त्यामुळे अशा वस्तू सणाच्या दिवशीच घरी याव्यात आणि खऱ्या अर्थाने सणाचा आनंद द्विगुणीत व्हावा याकरीता ग्राहकांनी बुकिंगला पसंती दिल्याचे दिसून आले.

बाजारात साध्या वेशातील पोलिस

शालिमार, मेनरोड, दहीपूल, एमजी रोड, रविवार कारंजा या मुख्य बाजारपेठेच्या परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले होते. चार पोलिस अधिकारी आणि ३५ कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त या मुख्य बाजारपेठांच्या परिसरात लावण्यात आला होता. पाकिटमारी, चेन स्नॅचिंग यासह भुरट्या चोऱ्या रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस बाजारपेठांमध्ये फेरफटका मारत होते. उपनगरांतील बाजारपेठांमध्येही पोलिसांचा बंदोबस्त होता.

वाहतुकीचा फज्जा

मेनरोड परिसरात गर्दी असतानाही रिक्षाचालक या भागात सर्रास रिक्षा दामटवित असल्याचे पहावयास मिळाले. कुटुंबीयांसह मोटारसायकल्सचे जथ्थे बाजारपेठेत दाखल होत होते. वाहने उभी करण्यास जागा उपलब्ध नसल्याने रस्त्यावरच वाहने थांबवून खरेदीला पसंती दिली जात होती. काही स्वयंसेवक वाहने रस्त्यावर उभी करू नका असे आवाहन स्वयंस्फूर्तीने करीत होते. पोलिसांनी रिक्षाचालकांसह वाहनधारकांना रोखण्याचा प्रयत्नही केला. परंतु, आम्ही याच परिसरातील रहिवाशी आहोत. त्यामुळे घरी कसे जायचे असा प्रतिप्रश्न करून वाद घातले जात असल्याचेही पहावयास मिळत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरातच्या घशात ५६ टीएमसी पाणी

$
0
0

'जलचिंतन'चे राजेंद्र जाधव यांचा आरोप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राचे दमणगंगा खोऱ्यातील ५५ पैकी ३५ टीएमसी आणी नार-पार खोऱ्यातील ३७ पैकी २१ टीएमसी पाणी असे एकूण ५६ टीएमसी पाणी गुजरातला देण्याच्या हालचाली केंद्र व राज्यस्तरावर सुरू आहे. पाणी वाटपाचा सामंजस्य करार करणार असाल तरच १५ हजार कोटी महाराष्ट्राला देतो, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतल्याने त्या दबावापोटी हा करार होणार असल्याचा आरोप जलचिंतन संस्थेचे प्रमुख राजेंद्र जाधव यांनी केला आहे.

गुजरातला पाणी देण्याच्या विरोधात 'जलचिंतन'ने चार वेळा उपोषण केले तर छगन भुजबळ यांनी विधानसभेत आंदोलन केले. त्यानंतर महाराष्ट्राचे एक थेंब पाणी गुजरातला देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवाणीस यांनी विधीमंडळाला दिले आहे. त्यानंतरही पाणी पळवण्याचे कारस्थान सुरू आहे. महाराष्टाच्या पाण्यावरच गुजरातमध्ये समुद्रात खंबाटचे धरण, कच्छ-सौराष्ट्राचे सिंचन व मुंबईपेक्षा मोठी अशी धोलेरा नावाची मेगासिटी उभारण्यात येत आहे. याच अनुषंगाने १५ दिवसात महाराष्ट्राने गुजरात बरोबर सामजस्य करारावर स्वाक्षरी करावा, आम्ही नदीजोडचे भूमिपूजन करतो, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक येथे केल्याचे म्हटल्याचे जाधव यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात १५००० कोटीच्या आर्थिक मदतीच्या बदल्यात महाराष्ट्राचे ५६ टीएमसीचे पाणी-हक्क कायम स्वरूपी गुजरातला देण्याचे षडयंत्र रचले जात आहे. महाराष्ट्रासह दुष्काळी भागात पाणी वळविणाऱ्या कोणत्याही नदी-जोड प्रकल्पाला आर्थिक मदत करणे हे केंद्राचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

केंद्राची अशी खेळी

दमणगंगा-पिंजाळ आणी नार-पार प्रकल्पाला १५००० कोटी देतो; त्याबदल्यात महाराष्ट्राच्या हक्काच्या ९२ पैकी ५६ टीएमसी पाणी गुजरातला देण्याचा करार करा, अशी खेळी केंद्र-गुजरातमार्फत खेळली जात आहे. त्याला जलसंपदा विभागातील काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा सुप्त पाठिंबा असल्याचाही आरोप जाधव यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोकनगर परिसरात डीपीरोडअभावी कोंडी

$
0
0

अशोकनगर परिसरात डीपीरोडअभावी कोंडी (फोटो)

सातपूर : सातपूर येथील अशोकनगर परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. महापालिकेने आरक्षित केलेला डीपीरोड केल्यास अशोकनगरच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे. आरक्षित असलेल्या रस्त्यासाठी शेतकरी जागा देत असतानाही महापालिकेचा बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याची स्थिती आहे. याप्रश्नी आयुक्तांनीच लक्ष घालण्याची मागणी परिसरातून होत आहे.

--

प्रकाश कवडेंना श्रद्धांजली

नाशिक : महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड सीड्‌स डीलर असोसिएशन, पुणे (माफदा)चे, तसेच कीटकनाशके लायसन्स बचाव मोहिमेचे जनक प्रकाश कवडे यांचे नुकतेच निधन झाले. नाशिक अॅग्रो डीलर्स असोसिएशनतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी काही काळ व्यवहार बंद ठेवले. 'नाडा'चे अध्यक्ष विजूनाना पाटील, उपाध्यक्ष भगवान खैरनार, सरचिटणीस अरुण मुळाणे, मंगेश तांबट, चंद्रकांत ठक्कर आदी उपस्थित होते.

--

उपाध्यक्षपदी अॅड. बागमार (फोटो)

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य नामको चॅरिटेबल ट्रस्ट (कॅन्सर हॉस्पिटल)च्या उपाध्यक्षपदी अॅड. आनंद बागमार यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष सोहनलाल भंडारी, सेक्रेटरी अरुण मुनोत उपस्थित होते. सामाजिक आणि सहकारविषयक अनेक खटल्यांच्या केस त्यांनी न्यायालयात लढल्या आहेत. त्यांचा सामाजिक आणि सहकार विषयाचा अभ्यास लक्षात घेत त्यांची निवड करण्यात आली. माजी आमदार वसंत गिते यांच्यासह हेमंत धात्रक, विजय साने, अविनाश गोठी आदींनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठक्कर बसस्थानकात ‘नो पार्किंग’

$
0
0

दोन्ही बाजूंना नो पार्किंग क्षेत्र जाहीर

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसागणिक गहन होत चालला आहे. आता ठक्कर बाजार समोरून शरणपूररोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने नो पार्किंग क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे. हा नियम मोडल्यास वाहन लागलीच टोईंग होते. त्यामुळे ठक्कर बाजार येथे नातलगांना सोडताना वाहनचालकांना दुरूनच बाय बाय करावा लागणार आहे.

ठक्कर बाजार बसस्थानकात बसेस उभ्या करण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या खासगी वाहनांना आत समावून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ठक्कर बाजार इमारतीला लागून असलेल्या पार्किंगच्या जागेचा वापर येथील व्यावसायिक करतात. थोड्याफार प्रमाणात नातलगांना सोडण्यासाठी येणारे दुचाकीचालक आणि दररोजचे अप-डाऊन करणाऱ्यांनी येथील पार्किंगची जागा नेहमीच भरलेली असते. स्मार्ट सिटीरोडचे काम सुरू झाल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांची चाचपणी सुरू केली आहे. त्यात मेळा बसस्थानकाकडून त्र्यंबकरोडकडे जाणाऱ्या मार्गाचाही वापर करण्यात येणार आहे. या मार्गावर पूर्वी एका बाजूने नो पार्किंग क्षेत्र घोषित करण्यात आले होते. मात्र, वाहने पार्क करण्यासाठी जागाच नसल्याने येथे येणारे वाहनचालक जागा मिळेल तिथे वाहने उभी करतात. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने ठक्कर बाजारची अधिकृत पार्किंग सोडून रस्त्याच्या दोन्ही बाजूने नो पार्किंग क्षेत्र घोषित केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे. याबाबत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या मेळा बसस्थानकाचे काम सुरू असून, ठक्कर बाजार येथे येणाऱ्या बसेसची संख्या मोठी असते. बसेसच्या टर्निंग रेडियसचा विचार करता आतील जागासुध्दा कमी पडते. अशा स्थितीत बाहेरून वाहने आत आल्यास अपघात होण्याची शक्यता असते. या प्रकरणात आमच्याकडे करण्यासारखे काहीही नसून, आमच्याच बसेस महामार्ग बसस्थानक किंवा इतरत्र पार्किंगसाठी पाठवाव्या लागतात. पोलिस आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पार्किंगबाबत हात वर केल्याने नातलंगाना सोडण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना ठक्कर बाजाराला दुरूनच निरोप द्यावा लागणार आहे.

...

वाहतूककोंडी टाळण्यासाठी घेतला निर्णय

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन नियमांची अंमलबजावणी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्मार्टरोडवरील वाहतूक वळविण्याशिवाय पर्याय नाही. हे काम पूर्ण होईपर्यंत ठक्कर बाजार परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता अधिक असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने नो पार्किंग क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images