Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

डोळ्यांसमोरून खळाळणार पाणी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने गुरुवारी नकार दिला आहे. त्यामुळे नाशिककरांच्या उरल्या सुरल्या आशाही आता संपुष्टात आल्या असून, धरणांमधून पाणी सोडण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी खळाळताना पाहणे हा एकच पर्याय आता नाशिककरांसमोर शिल्लक आहे.

जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केल्यानंतर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिकमधून ३.३४ टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयाने मोठा आगडोंब उसळला आहे. या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकजूट करीत पाणी सोडण्यास तीव्र विरोध केला असून, महामंडळाच्या या अन्यायाविरोधात थेट मुंबई उच्च न्यायायलायत भाजपच्या गोपाळ पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. पाटील यांनी मेंढेगिरी समितीच्या अहवालाला न्यायालयात आव्हान देत पाणी सोडण्याला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

शिवसेनेच्या अनिल ढिकलेंनी पाणी सोडण्यापूर्वी पाणी परिस्थितीचे पुनर्नियोजन करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल केली आहे. निफाडच्या अशोक निफाडे या बाधित शेतकऱ्यानेही पाणी सोडण्याच्या निर्णयाला आव्हान देत अर्ज सादर केला आहे.

--

तातडीने सुनावणीस नकार

न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि एम. एस. कर्णिक यांच्या पीठासमोर याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. प्रवर्तक पाठक यांनी बुधवारीच तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली. त्यावर न्यायाधीशांनी पाणी सोडण्याचे आदेश न्यायालयाचेच असल्याने त्यावर दिवाळीनंतर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, दुपारी पुन्हा अॅड. पाठक यांनी न्यायालयाला विनंती करीत संबंधित विषयाची तीव्रता पटवून दिली. त्यानंतर न्या. कर्णिक यांनी या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी सकाळी घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, गुरुवारीही न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे उरल्यासुरल्या आशाही आता मावळल्या असून, पाणी सोडण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जायकवाडी’साठी सज्जता!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात ८.९९ टीएमसी पाणी सोडण्यासाठी जलसंपदा विभागाचे नियोजन जवळपास पूर्ण झाले असून, येत्या एक-दोन दिवसांत आवर्तन सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

नाशिक जिल्ह्यातून भाम, भावली व वाकी धरणांतून दारणामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यानंतर हे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात सोडून ते जायकवाडी येथे सोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातूनही भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यानंतर हे पाणी प्रवरा नदीतून जायकवाडी धरणात जाणार आहे.

गुरुवारी नांदूरमध्यमेश्वर धरण ते जायकवाडी धरणापर्यंत असलेल्या १२ केटिवेअर बंधाऱ्यांवरील फळ्या काढण्याचे काम सुरू होते. येथे शेतकऱ्यांच्या विरोधाचाही सामना जलसंपदा विभागाला करावा लागला. ही सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांना ४८ तास अगोदर जलसंपदा विभागाला सूचना करावी लागणार आहे. त्यानंतर पोलिस बंदोबस्त दिला जाईल. जलसपंदा विभागाने पाणी सोडताना विशेष काळजी घेतली असून, त्यासाठी पाच संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या नेमणुकीमध्ये धरण समूहाप्रमाणे अधिकारी नेमण्यात आले आहेत. मुळा (मांड, ओहोळ, मुळा) पाणी समूहासाठी कार्यकारी अभियंता रावासाहेब मोरे, प्रवरा ( भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) कार्यकारी अभियंता किरण देशमुख, गंगापूर (गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी) कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) राजेंद्र शिंदे, पालखेड (करंजवण, वाघाड, पुणेगाव, ओझरखेड, तीसगाव) कार्यकारी अभियंता राघवेंद्र भाट यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांची आकडेमोड

जायकवाडी धरणात पाणी सोडावे लागणार असणार असले, तरी गुरुवारी दिवसभर अधिकाऱ्यांची आकडेमोड सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालय, जलसंपदा विभागासह अन्य संबंधित विभागांचे अधिकारी या कामात गुंतले होते. त्यामुळे नेमके काय सुरू आहे याबाबत मात्र कोणतीच माहिती देण्यात आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ठक्कर बाजार’समोर ‘नो पार्किंग झोन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या स्मार्टरोडच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या रोखण्यासाठी पोलिसांनी पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. यासाठी पोलिसांनी पंडित कॉलनीतील एकेरी वाहतूक रद्द केली असून, या मार्गावर आता दुहेरी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. ठक्कर बाजार ते मेळा स्थानक परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाका या मार्गावरील प्रायोगीत तत्त्वावर करण्यात आलेले बदलच कायम ठेवण्यात येणार आहे.

स्मार्टरोडचे काम सुरू असल्याने येथे सातत्याने वाहतूक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी सर्वप्रथम रविवार कारंजा महात्मागांधीरोड हा रस्ता दुतर्फा करून बघितला. मात्र, त्यास यश मिळाले नाही. स्मार्टरोडवरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत गेल्याने पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवली. यास संमिश्र प्रतिसाद मिळाला. याबाबत बोलताना वाहतूक पोलिसांनी सांगितले की, नवीन बदल लागू करण्याशिवाय पर्याय नाही. कोणताही बदल लागलीच पचनी पडत नाही. या मार्गावरील वाहनचालकांना आणखी काही पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी जुनी पंडित कॉलनी येथील एकेरी मार्ग आता दुहेरी करण्यात आला आहे. यामुळे गंगापूरोडवरील उड्डाण पूल ते टिळकवाडीरोड या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहने नेता येतील. हा मार्ग मागील वर्षी एकेरी करण्यात आला होता. याशिवाय ठक्कर बाजार ते तालुका पोलिस स्टेशन या मार्गावरील वाहतूक कोंडी पूर्णत: कमी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावर दोन्ही बाजूंनी 'नो पार्किंग झोन' घोषित करण्यात आला आहे. यातून ठक्कर बाजार इमारतीच्या अधिकृत पार्किंगचे क्षेत्र वगळण्यात आले आहे. यापूर्वी या मार्गावर एकाच बाजूने 'नो पार्किंग झोन' होते. ठक्कर बाजार बसस्थानकासह विविध खासगी कार्यालय असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ असते. वाहनधारक आस्थापनांची अधिकृत पार्किंग वगळून भररस्त्यावर आपली वाहने पार्क करीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्याचा ताण थेट सीबीएस चौकात दिसून येतो. या पार्श्वभूमीवर हा मार्ग (अधिकृत पार्किंग वगळता) दोन्ही बाजूने नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. दोन्हीही मार्गावरील वाहतूक निर्णयाची अंमलबजावणी रविवारपासून (दि. २८) होणार आहे.

'तो' बदल कायमस्वरुपी

त्र्यंबकनाका येथून अशोक स्तंभाकडे जाणाऱ्या वाहनांना नो एंटी करून तेथून पर्यायी मार्गाने पुढे जाण्याबाबतचा एक प्रयोग दोन दिवसांपूर्वी करण्यात आला. आता हा पर्याय कायमस्वरूपी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय अन्य कोणताही मार्ग उपलब्ध नाही. रस्त्याचे काम लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असणे आवश्यक असून, वाहतूक बंद झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचोरट्याकडून सहा दुचाकी हस्तगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर परिसरातून दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या २० वर्षाच्या जळगाव जिल्ह्यातील युवकास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. चोरी केलेल्या वाहनांची संशयिताने जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावली होती.

धीरज कुंदन भंगाळे (२०, मूळ रा. निंभोरा, ता. यावल, जिल्हा जळगाव, सध्या रा. आडगाव) असे या संशयिताचे नाव आहे. एक वाहनचोरटा एबीबी सर्कल येथे येणार असल्याची माहिती गंगापूर पोलिस स्टेशनचे हवालदार माणिक गायकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे व पोलिस निरीक्षक गुन्हे डी. एस. वांजळे यांना दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक समीर वाघ, हवालदार माणिक गायकर, गोपाळ पाटील, पोलिस नाईक कैलास भडिंगे, दत्तू गायकवाड, पोलिस शिपाई नितीन नेटारे, तुषार देसले, केशव ढगे, तुलसी चौधरी, दीपक जगताप आदींनी एसीबी सर्कल येथे सापळा लावला. काही वेळातच संशयित भंगाळे एका काळ्या रंगाच्या यमाहा एफझेड दुचाकीवर येथे आला. सापळा लावून बसलेल्या कर्मचाऱ्यांनी लागलीच त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याच्याकडील दुचाकीचा क्रमांक तपासला असता तो दुसऱ्याच वाहनाचा निघाला. त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणले. तेथे केलेल्या चौकशीदरम्यान त्याने इंदिरानगर भागात तीन होंडा युनिकॉर्न, एक सिल्व्हर रंगाची बुलेट, एक डिस्कव्हर आणि यामाहा एफझेड दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. भंगाळेच्या अटकेमुळे इंदिरानगर परिसरातील वाहनचोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. वाहनचोरीनंतर त्याने ही वाहने फैजपूर, निंभोरा, जळगाव आदी ठिकाणी नेली होती. ही वाहने पोलिसांनी हस्तगत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टेटे’त सुधांशू, पुनीत, सायली अजिंक्य

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सुधांशू वाणी, पुनीत देसाई व सायली बक्षी अजिंक्य ठरल्या आहेत

स्पर्धेच्या जुनिअर मुलांच्या गटात अंतिम फेरीत सुधांशू वाणीने विराज कोटेचा १०-१२, ११-६, ९-११, ९-११, ११-८ व ९-११ असा ४-२ ने पराभव केला. युथ मुलांच्या गटात सौमित देशपांडे याने अर्चित भडकमकरचा ११-१, ११-१, ११-७, ९-११, ९-११ व ११-७ असा ४-२ ने सहजरित्या पराभव करत विजेतेपद पटकावले. सब जुनिअर मुलांच्या गटात कुशल चोपडाने लोवीत चांदूरकरचा ९-११, १२-१०, ११-९, ११-६, व ११-४असा ४-१ ने पराभव केला. तर कॅडेट मुलाच्या गटात कुशल चोपडा याने आर्यन पोळ याचा ११-५, ११-५, ११-४ असा ३-० ने असा सहजरित्या पराभव करून आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. सब जुनिअर मुलीच्या एकेरीत सायली वाणी हिने तनिषा कोटेचाचा २-४ ने पराभव करत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. पुरुषांच्या एकेरीत मानांकित पुनीत देसाईने आपल्या अनुभवाच्या बळावर अर्चित भडकमकर याचा ४-१ ने सहजरित्या पराभव करत विजय संपादन केला.

कॅडेट मुलींच्या गटात सायली बक्षी हिने मिताली पुरकरचा ३-२ ने पराभव केला.

स्पर्धेतील विजयी खेळाडूंना प्रमुख पाहुणे सर्व शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे, अशोक दुधारे व गोरखनाथ बलकवडे यांच्या हस्ते रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात वृत्त

$
0
0

एचएएल कंत्राटी

कामगारांना दिलासा

नाशिक : ओझरच्या हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना ब झोनचे किमान वेतन लागू करावे, असे आदेश सेंट्रल लेबर एन्स्कोसमेंट अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सध्या सी झोनचे किमान वेतन प्रतिदिन ३७० रुपये दिले जाते. सीटूप्रणित नाशिक वर्कर्स युनियनने यासंदर्भात ब झोनच्या किमान वेतनाची मागणी केली होती. त्यासाठी डिसेंबर २०१७ मध्ये उपनगरच्या कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. अखेर त्याची दखल घेत कामगारांना ब झोनचे किमान वेतन रुपये ४६२ प्रतिदिन देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती युनियनचे उपाध्यक्ष तुकाराम सोनजे यांनी दिली आहे. कंत्राटदारांनी वेतन न दिल्यास एचएएलने ब झोनचे किमान वेतन कामगारांना द्यावे, असेही पत्रात म्हटले असल्याचे सोनवे यांनी सांगितले आहे.

कामगारांना बोनस द्या

नाशिक : ओझर मिग येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या विविध ठेकेदारांकडील कामगारांना बोनस कायद्यानुसार बोनस किंवा सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी सीटू प्रणीत नाशिक वर्कर्स युनियनने केली आहे. तसे निवेदन कामगार उपायुक्तांना देण्यात आले आहे. तशी माहिती युनियनचे उपाध्यक्ष तुकाराम सोनजे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडथळा आणल्यास कारवाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दारणा, गोदावरी आणि कादवा नदीकाठच्या नागरिकांनी नद्यांमध्ये सोडलेल्या जलप्रवाहास अडथळा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये. पाण्याचा अधिकृत व अनधिकृत वापर केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

दारणा, गंगापूर, पालखेड धरण समूहातील धरणांतून २६ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. सोडलेले पाणी सुरळीत प्रवाहित होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे. गोदावरी नदीवरील नांदूरमध्यमेश्वर बंधारा ते प्रवरा संगमदरम्यान असलेल्या सर्व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांतील फळ्या काढून घ्याव्यात, प्रवाहास अडथळा निर्माण होऊ नये यासाठी बंधाऱ्यांत फळ्या टाकू नयेत, असेही जलसंपदा विभागाने अधोरेखित केले आहे. दारणा, गोदावरी, कादवा या नद्यांमध्ये पाणी प्रवाहित असताना सर्व ठिकाणचे गेजेस नोंदविण्यात येणार आहेत. पाणी सुरळीत प्रवाहित होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, सरकारी, निमसरकारी यंत्रणा व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही सूचित केले आहे.

प्रवाहात उतरणे टाळा

दारणा, गोदावरी, कादवा या नद्यांतील विसर्ग जादा असल्याने कुणीही प्रवाहात उतरण्याचा प्रयत्न करू नये. नद्यांमध्ये सोडलेले पाणी विनाअडथळा जास्तीत जास्त प्रमाणात जायकवाडी धरणात पोहोचेल यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता रा. शा. शिंदे आणि रा. पां. भट यांनी केले आहे. दारणा, गोदावरी, कादवा नदीतून ६ हजार ते ८ हजार क्युसेक वेगाने पाणी प्रवाहित होणार असल्याने नदीतील पाणी उपसा करण्यासाठी बसविलेल्या मोटारी व इतर सर्व प्रकारचे साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहनही जलसंपदा विभागाने केले आहे. प्रवाहामुळे साहित्याचे नुकसान झाल्यास जलसंपदा खाते जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सकाळी गारवा; दुपारी उन्हाचा कडाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वातावरणात ऑक्टोबर हीटचा कडाका काहीसा कमी झाला असून, हिवाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी गारवा आणि दुपारी कडाक्याचे ऊन असे वातावरण सध्या अनुभवायला मिळते आहे. किमान तापमानात काही दिवसांपासून सातत्याने घट होत असून, गुरुवारी १४.६ इतकी किमान तापमानाची नोंद झाली.

सकाळी आणि सायंकाळी वातावरणात आल्हाददायक थंड वातावरणात गारवा निर्माण होत असला तरीही दुपारच्या उन्हाची तीव्रता कमी झालेली नाही. दुपारी कडाक्याचे ऊन आणि संध्याकाळी गारवा अशी काहीशी परिस्थिती वातावरणात आहे. या वातावरणातील बदलांमुळे अनेक नागरिकांना घसादुखीचा त्रास सुरू झाला आहे. सकाळच्या आल्हाददायक वातावरणामुळे जॉगिंग ट्रॅकवरदेखील गर्दी वाढली असून, अनेकांनी व्यायामाला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे ठेवणीतले स्वेटर, कानटोप्या यांची शोधाशोध सुरू झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी शहरातील कमाल तापमान ३३ अंश सेल्सियस तर किमान १४.६ इतके होते. येत्या काही दिवसांत तापमानात घट होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी पावसाने ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावली.

कमाल तापमान किमान तापमान

१७ ऑक्टोबर ३३.३ १८.०

१८ ऑक्टोबर ३३.९ १८.७

१९ ऑक्टोबर ३३.८ १८.६

२० ऑक्टोबर ३४.३ १९.०

२१ ऑक्टोबर ३४.३ १९.०

२२ ऑक्टोबर ३५.२ १८.३

२३ ऑक्टोबर ३४.६ १५.१

२४ ऑक्टोबर ३४.१ १४.०

२५ ऑक्टोबर ३३.० १४.६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहापूरसाठीही नाशिकचे पाणी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात नाशिक जिल्ह्यातून पाणी देण्याचा वाद पेटलेला असतानाच आता ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यासाठीही नाशिकचे पाणी पळविण्याचा प्रकार समोर आला आहे.

शहापूर तालुक्यातील ९७ टँकरग्रस्त गावे व पाड्यांना प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी भावली धरणातून १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणाला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे भावलीचे पाणीही आता पेटणार असल्याची चिन्हे आहेत. समन्यायी पाणीवाटपाचे कारण देत नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळविण्याचे उद्योग सध्या सुरू असल्याची भावना नाशिककरांमध्ये आहे. जायकवाडी धरणासाठी नाशिक आणि नगरमधून पाणी देण्याचे आदेश सध्या प्राप्त झाले आहेत. हे पाणी सोडण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातून जायकवाडीचे पाणी देण्यासाठी नियोजन सुरू आहे. त्यातच आता इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाचे पाणी शहापूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अगोदरदेखील असे पाणी आरक्षण केले असले, तरी त्यात वाढ करण्यात आल्यामुळे हे पाणी आता २०२१ पर्यंत आरक्षित होणार आहे. जिल्ह्यात अगोदरच अनेक तालुके दुष्काळग्रस्त आहे. त्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पाणी पळविले जात असून, त्यामुळे त्याला सर्व स्तरांतून विरोध होत आहे.

यापूर्वीही दिलेय आरक्षण

सरकारने या अगोदर २०१७ मध्ये भावली धरणातून ४.५५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास २०२१ पर्यंत मंजुरी दिली होती. त्यानंतर त्यात वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतल्यामुळे नाशिकचे पाणी दुसरीकडे पळविले जात असल्याची भावना बळावली असून, त्याला आता जिल्ह्यात विरोध होत आहे. राज्य सरकारने यासंदर्भात २३ ऑक्टोबर रोजी हे परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यानंतर त्याला विरोध सुरू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहापूरसाठीही नाशिकचे पाणी....

$
0
0

शहापूरसाठीही नाशिकचे पाणी! (मुख्य अंक पान १४ लीड)

जायकवाडीनंतर आता ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यासाठीही नाशिकचे पाणी पळविण्याचा प्रकार समोर आला आहे. शहापूर तालुक्यातील ९७ टँकरग्रस्त गावे व पाड्यांना प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी भावली धरणातून १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणाला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे भावलीचे पाणीही पेटण्याची चिन्हे आहेत.

--

शासनआदेश पायदळी! (मुख्य अंक पान १ अँकर)

विभागीय चौकशी सुरू असलेल्या, या चौकशीवर प्रभाव टाकण्याचा वा अडथळा आणण्याची शक्यता असलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडे अतिरिक्त पदभार देऊ नये, असे स्पष्ट शासन निर्देश आहेत. मात्र, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त पदभार सुपूर्द करताना राज्य सरकारने हा आदेश पायदळी तुडवला आहे.

--

बॉलिवूडकडून कौतुक (प्लस पान ६ मिर्च मसाला अँकर)

अभिनेत्री सई ताम्हणकरचं सध्या बॉलिवूड कलाकारांकडून कौतुक होतंय. काही दिवसांपूर्वीच आलेल्या 'लव्ह सोनिया' या सिनेमात तिनं साकारलेल्या 'अंजली' या भूमिकेची दखल रसिक आणि समीक्षक अशा दोहोंकडून घेतली गेली. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सिनेमा असल्यामुळं सईचं कामही सर्वत्र पोहोचलंय. पुढील वाटचालीस तिला शुभेच्छा देऊया!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीगळती थांबणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पाणीवितरण प्रणालीतील दोष दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महापालिकेने वितरण यंत्रणा अद्ययावत करून गळती रोखण्यासाठी ३५४ कोटींचा आराखडा तयार केला आहे. शहराची पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून ती अद्ययावत करण्यासाठी अमृत योजनेतून निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी नाशिक दौऱ्यात दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने हा ३५४ कोटींचा आराखडा तयार केला असून, शुक्रवारी (दि. २६) मुंबईत या आराखड्याचे नगरविकास विभागाकडे सादरीकरण केले जाणार आहे. अमृत योजनेतून या आराखड्याला मंजुरी मिळाल्यास शहरात २६५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकल्या जाणार असून, जलकुंभाचेही नेटवर्क सुधारणार आहे.

नाशिक शहरात पाणीपुरवठ्यासाठी टाकलेल्या जलवाहिन्या आता जीर्ण झाल्या असून, वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत. महापालिकेने दोन वर्षांपूर्वी केलेल्या वॉटर ऑडिटच्या अहवालानुसार महापालिका गंगापूर धरण आणि दारणा नदीपात्रातून उचलत असलेल्या एकूण पाण्यापैकी ४४ टक्के पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले होते. महापालिका पाणीपुरवठा यंत्रणेवर करीत असलेल्या एकूण खर्चापैकी २५ टक्के खर्चदेखील पाणीपट्टीतून वसूल होत नसल्यामुळे महापालिकेला पाणीपुरवठा व्यवस्थेतून दरवर्षी कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा यंत्रणेतील दोषांमुळे शहरात होणाऱ्या असमान पाणीपुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाशिक दौऱ्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेत सुधार करण्यासाठी अमृतमधून निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, पाणीपुरवठा यंत्रणेतील दोष दूर करून शहरात समसमान दाबाने सुरळीत पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने ३५४ कोटी रुपयांचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे. शहरातील नव्याने विकसित झालेल्या भागात २६५ किमी लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार असून, काही भागातील जुन्या जलवाहिन्यादेखील बदलण्यात येणार आहेत. वॉशआऊटमुळे वाया जाणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचा पुनर्वापर केला जाणार असल्याने लाखो लिटर पाण्याची बचत होणार आहे. हा आराखडा आज (दि.२६) सरकारला सादर केला जाणार आहे. या सादरणीकरणानंतर केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार संयुक्तपणे यातील आपला हिस्सा पालिकेला देणार आहेत.

थेंबा-थेंबाचा हिशेब

गंगापूर आणि दारणा धरणातून उचलल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा आता महापालिकेमार्फत हिशेब ठेवला जाणार आहे. शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात चेहेडी येथील दारणा बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून पाणी उचलून सुमारे तीनशे किमी लांबीच्या मुख्य जलवाहिन्यांद्वारे सहाही जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये आणले जाते. तेथे पाण्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया होऊन ११३ जलकुंभांद्वारे १८०० किमी लांबीच्या जलवाहिन्यांतून घरोघरी पोहोचविले जाते. परंतु, या आराखड्यात जलकुंभावरूनच पाण्याचा हिशेब केला जाणार आहे. जलकुंभात येणारे पाणी आणि घरापर्यंत पोहचणारे पाणी याचा हिशेब ठेवला जाणार आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक थेंब न् थेंब पाणी आता मोजले जाणार आहे.

असा आहे आराखडा

- २६५ किमीच्या नवीन जलवाहिन्या टाकणार

- ११३ जलकुंभांचे नेटवर्क सुधारणार

- हायड्रोलिक मॉड्युलिंगनुसार सुधारणा करणार

-प्रत्येक जलकुंभासाठी बल्कमीटर, व्हॉल्व बसविणार

- जलकुंभनिहाय पाणी वितरण क्षेत्र निश्चित करणार

- सहापैकी तीन जलशुध्दीकरण केंद्रांचे आधुनिकीकरण

-वॉश आऊटद्वारे वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर

-हिशेबबाह्य पाण्याची परिगणना होणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर कलाकारांचा ‘मुसाफिर का सफरनामा’

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

एका नाशिककराच्या लेखणीतून आलेल्या हिंदी गजल, नाशिककर शास्त्रीय गायकाचे गजल गायकीत पदार्पण, त्याच गायकाच्या शिष्याचे हिंदी संगीत दिग्दर्शनात दमदार पाऊल आणि हे सुरेल काम केल्याबद्दल या शिष्याला मिळालेली गुरूंची पाठीवर शाबासकीची थाप असा भारून टाकणारा प्रवास 'मुसाफिर का सफरनामा' या गजल अल्बमच्या निमित्ताने घडून आला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण गजल अल्बम नाशिककर कलाकारांनी निर्माण केला असून गजलगायकीच्या दुनियेत हा चंचूप्रवेश मानला जात आहे.

ज्ञानेश्वर कासार हे नाशिकच्या गायकीच्या क्षेत्रातील उभरते नाव. स्वरभास्कर भीमसेन जोशी यांचे शिष्य, प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. डॉ. अविराज तायडे यांचे शिष्य असलेल्या ज्ञानेश्वरने गायनातील नवी वाट चोखाळायचे ठरवून हिंदी गजलगायकीच्या दुनियेत दमदार पदार्पण केले असून, नाशिककरांसाठी ही अभिमानाची गोष्ट ठरली आहे, त्याचे कारण म्हणजे ज्ञानेश्वरने ज्येष्ठ गायक हरिहरन, पं. सुरेश वाडकर यांच्याकडून गजल गाऊन घेतल्या असून, गेल्या सहा महिन्यांपासून तो या प्रोजेक्टवर काम करत होता. आर्या आंबेकर या आघाडीच्या गायिकेकडून पहिल्यांदा त्याने हिंदी गजल गाऊन घेतल्या, हे आणखी एक विशेष.

ज्ञानेश्वरच्या या कामावर बेहद्द खूश होऊन त्याचे दुसरे गुरू सुरेश वाडकर यांनी त्यांच्या गुरुजींच्या म्हणजेच आचार्य जियालाल वसंत यांनी लिहिलेल्या गजल त्याला दिल्या. या सर्व गजलांना संगीतबद्ध करण्याबाबत सूचना केली आहे. ज्ञानेश्वर म्हणतो, माझे गुरू पं. अविराज तायडे यांनीदेखील यातील एक गज़ल गायली आहे. त्यांचा हा पहिलाच प्रसंग होता की ते आपल्या मुख्य प्रवाहाच्या बाहेरील गज़ल हा प्रकार पहिल्यांदाच गायले. त्यांच्या गज़ल कारकिर्दीची सुरुवात या गज़लपासून झाली हे माझे भाग्य मी मानतो.

नाशिकचे गजलकार संजय पोरवाल यांनी या गजल लिहिलेल्या असून, त्याला अनिल धुमाळ यांचे संगीत संयोजन लाभले आहे. आर्या आंबेकरला प्रथमच हिंदीत गाण्याची संधी ज्ञानेश्वरने दिली असून स्वरांजय धुमाळ याने ताल संयोजन केले आहे. नाशिकचा धुमाळ व 'द आर्क स्टुडिओ' येथे याचे ध्वनिमुद्रण झाले आहे. प्रसिध्द गजलगायक संजय वत्सल यांच्यानंतर नाशिकमधून प्रथमच एका उभरत्या तरुण गायकाने हा प्रयत्न केल्याने त्याचे कौतुक सांस्कृतिक वर्तुळात होत आहे.

या गजल अतिशय सुंदर लिहिलेल्या आहेत. त्याचे संगीत दिग्दर्शन ज्ञानेश्वरने खूप चांगल्या प्रकारे केले आहे. त्याने स्वत:ही एक गजल गायली आहे, गाताना मजा आली.

-हरिहरन, ज्येष्ठ गायक

माझा लाडका व गुणी शिष्य ज्ञानेश्वर कासार याने सफरनामाला संगीत दिले आहे. खूप छान विचार त्याने केलेला आहे.

-पं. सुरेश वाडकर, ज्येष्ठ गायक

ज्यांची गाणी ऐकत माझे लहानपण सांगीतिकदृष्ट्या समृद्ध झाले, पुढच्या प्रवासात त्यांची गाणी, त्यांचा आवाज माझ्यासोबत कायम होता. ते दैवी आवाज माझ्यासाठी गातील हे सर्व स्वप्नवत आहे. इतक्या दिग्गज गायक मांदियाळीत थोडावेळ का होईना, पण मीही एक गायक आहे, हे विसरायला झालं होतं.

-ज्ञानेश्वर कासार, गायक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी भाजपचा आटापिटा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या निर्णयावरून भाजपच्या शहरातील आमदारांची कोंडी झाली असून, कोंडीतून मार्ग काढण्यासाठी महासभेत आता प्रशासनावर खापर फोडण्याची तयारी केली आहे. शहरासाठी पाणी आरक्षणाची मागणी नोंदविताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यानी केला असून, महासभेत नाशिकसाठी गंगापूर धरणातून अधिक पाणी मिळवण्याची मागणी केली जाणार आहे. परंतु, भाजपचा हा प्रयत्न निव्वळ फार्स ठरणार आहे.

जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय राज्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने घेतला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यातून या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. परंतु त्याला उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी रवाना होणार आहे. जिल्ह्यात दुष्काळ असतानाही, जायकवाडीसाठी पाणी जात असल्याची सल जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नाशिककरांमध्ये आहे. त्यामुळे याचा फटका आगामी निवडणुकीत भाजपला सोसावा लागणार आहे. त्यामुळे संभाव्य तोट्याची जाणीव झालेल्या भाजपने आता गंगापूरचे खापर प्रशासनावर फोडण्याची तयारी सुरू केली आहे. गुरुवारी रामायण या महापौरांच्या निवासस्थानी पालिकेच्या अधिकाऱ्यांना पाचारण करत, आमदार सानप यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. नाशिकला अधिकचे पाणी आवश्यक असताना जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी नोंदवितांना लोकप्रतिनिधींना विचारात का घेतले नाही, असा सवाल अधिकाऱ्यांना करण्यात आला. त्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या महासभेत अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार असून गंगापूरसाठी अधिक पाणी मिळावे, अशी मागणी करण्यात येणार आहे. परंतू शुक्रवारीच गंगापूरचे पाणी जायकवाडीला रवाना होणार आहे.

पाण्याबाबत विषय मांडून नाशिककरांच्या पाठीशी असल्याचा हा फक्त देखावा भाजपकडून निर्माण केला जाणार आहे. ज्यावेळी महासभेत पाण्यावरून चर्चा सुरू असेल त्याचवेळी गंगापूर धरणातून मराठवाड्याकडे पाणी जाणार असल्याने भाजपचा निव्वळ फार्स ठरणार आहे.

उशीराचा आटापिटा

नाशिक जिल्ह्यातही दुष्काळाची परिस्थिती असताना शासनाने नाशिकचा विचार न करता मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने ही बाब नाशिककरांच्या जिव्हारी लागली आहे. या निर्णयाने सर्वत्र भाजप विरोधात सूर आवळला जात असल्याने येत्या निवडणुकीत नाशिककर हिशोब चुकता करतील या भीतीने भाजप आमदार हैराण झाले आहेत. एकीकडे आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी केली आहे, तर आमदार बाळासाहेब सानप यांनी गुरुवारी भाजपच्या महासभेत प्रशासनावर खापर फोडण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भाजपचा हा उशीराचा आटपिटा निव्वळ देखावा ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगी चरणी धावपटू होणार लीन

$
0
0

रविवारी गडावर 'सप्तशृंगी हिल' हाफ मॅरेथॉन स्पर्धा

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सप्तशृंग गडावरील देवी राज्यातील लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील निसर्गरम्य परिसर आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांसाठी देखील नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. या आरोग्यदायी वातावरणाचा अनुभव सर्वांना घेता यावा या उद्देशाने शहरातील 'नाशिक रनर्स' या ग्रुपपने रविवारी २८ ऑक्टोबर रोजी 'सप्तश्रृंगी हिल मॅरेथॉन २०१८' चे आयोजन केले आहे. सप्तशृंगी हिल मॅरेथॉनचे हे दुसरे वर्ष आहे.

सध्या व्यायामाप्रती जनसामान्यांत अधिकाधिक जागरूकता निर्माण होत असून धावण्याकडे जनतेचा कल वाढत चालला आहे. हे एक चांगले लक्षण आहे. या मॅरेथॉनच्या निमित्ताने आरोग्यविषयक जागरूकता अधोरेखित करण्याचा नाशिक रनर्स ग्रुपचा प्रामाणिक प्रयत्न आहे. शिवाय ही मॅरेथॉन ग्रामीण भागात भरवली जाणार असल्याने या निमित्ताने ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंनाही आपले कौशल्य दाखविण्याची संधी देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. तसेच शहर पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल हेदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सप्तश्रृंगी हिल मॅरेथॉन ही एक आगळीवेगळी मॅरेथॉन असून जास्तीतजास्त संख्येने लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक रनर्सचे अध्यक्ष एन. टी. वाघ यांनी केले आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरू झाली असून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.

आधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९८२३०३२५२३ किंवा ९८२२२७४८९९ या क्रमांकावर संपर्क साधावा. या मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने नांदुरी ते सप्तश्रृंगी गड ही वाहतूक सेवा सकाळी ६ ते ९:३० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील, याची नोंद भाविकांनी, पर्यटकांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

असे असेल 'सप्तशृंगी हिल'

गडाचा पायथा नांदुरीगाव येथून स्पर्धेला सुरुवात

नांदुरीगाव ते सप्तशृंगी देवी मंदिर आणि पुन्हा नांदुरीगाव असा मार्ग

स्पर्धेचे अंतर २१ किमी

हौशी धावपटूंसाठी तीन पाच आणि दहा किमी अंतराचे डिव्हाइन रन

शर्यतप्रसंगी गडावर जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद

धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी आदिवासी लोकनृत्ये आणि नाशिक ढोलचे आयोजन

स्पर्धकांची आरोग्यविषयक सुरक्षा म्हणून जागोजागी रुग्णवाहिकांसह डॉक्टरांची टीम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृहात प्रवेश मिळाला नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी आदिवासी आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. वसतिगृहातील प्रवेशासह पेठरोडवरील वसतिगृह पुन्हा सुरू करावे, विद्यार्थ्यांचा अपघाती विमा काढावा आदी मागण्या यावेळी केल्या असून, रात्री उशीरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी बैठक बोलविण्यात आली आहे.

महाविद्यालयीन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शहर व परिसरातील शासकीय आदिवासी वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना डीबीटी योजनेचाही लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहिलेल्या जळगाव आणि नाशिकमधील विद्यार्थ्यांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन सुरू केला आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन रात्री उशीरापर्यंत सुरू होते. विभागाकडून पेठ रोड परिसरात असलेले आणि बंद करण्यात आलेले मुला-मुलींचे २५० क्षमता असलेले वसतिगृह पुन्हा सुरू करण्यात यावे, वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा अपघाती जीवन विमा काढण्यात यावा, नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींची डीबीटी अद्यापही खात्यावर जमा न झाल्याने ती तत्काळ जमा करावा, या मागण्याही निवेदनाद्वारे आदिवासी आयुक्तांकडे केल्या आहेत. या समस्या तत्काळ सोडविण्यात याव्यात अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जाधव यांनी दिला.

या वेळी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ गवळी, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दौलत मेमाणे, जळगाव जिल्हाध्यक्ष दारासिंग पावरा, दिंडोरी युवा तालुकाध्यक्ष गोकुळ टोंगारे, युवा संघटक मोहन बेंडकोळी, दिंडोरी-पेठ विभागप्रमुख रोहित कुवर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाच मागितल्याने फौजदाराविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुन्ह्यात अटक केलेल्या महिलेला कायद्याच्या मदतीने सोडून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

राजेंद्र अर्जुन दुनबळे असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. अॅण्टी करप्शन ब्युरोकडे (एसीबी) तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या बहिणीस नाशिकरोड पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. त्यावेळी संशयित दुनबळे सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग चार यांच्या कार्यालयात कार्यरत होते. या महिलेला सीआरपीसी कलम १६९ प्रमाणे गुन्ह्यातून सोडून देण्यासाठी सहायक पोलिस आयुक्तांची परवानगी मिळवून देण्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून दोन हजार रुपयांची लाच मागितली. त्यावरून तक्रारदाराने १० सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार केली. सापळापूर्व पडताळणीदरम्यान दुनबळे यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. एसीबीने यानंतर अनेकदा दुनबळेला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा लावला. मात्र त्यास यश मिळाले नाही. कायद्यानुसार लाच मागणे हासुद्धा गुन्हा असल्याने एसीबीने अखेर नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दिली. दुनबळे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सरकारी विभागातील अधिकारी वा कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी ०२५३-२५७५६२८, २५७८२३० किंवा १०६४ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बदलती जीवनशैली अनेक रोगांच्या मुळाशी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'बदलती जीवनशैली ही अनेक रोगांच्या मुळाशी असून, आपला आहार विहार योग्य ठेवल्यास मधुमेहाला केवळ लांबच ठेवता येत नाही तर घालवतादेखील येते,' असा विश्वास मविप्र सीचिटणीस नीलिमा पवार यांनी व्यक्त केला.

सार्वजनिक वाचनालयाच्या पुस्तक मित्र मंडळातर्फे डॉ. प्रमोद त्रिपाठी लिखित 'मधुमेहापासून मुक्ती' या विषयावरील पुस्तकावर मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होत्या. यावेळी 'सावाना'चे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, प्र. द. कुलकर्णी, मिलिंद चिंधडे, वसंत खैरनार, धर्माजी बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाल्या, आजच्या धावपळीच्या युगात कळत नकळत आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे सेवन करत असतो. आरामदायी जीवन आणि कमी होत असलेल्या शारीरिक हालचालींमुळे लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. महिलांमध्ये याचे जास्त प्रमाण आढळते. मधुमेहाचे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने लठ्ठपणाची समस्या अधिक जाणवू लागली आहे. मधुमेहींनी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असून, लठ्ठपणा, ह्दयविकार होण्याचा धोका अधिक असतो. मधुमेहापासून मुक्ती मिळवण्यासाठी संतुलित आहार तसेच आहारातील पथ्थे पाळणे आवश्यक आहे. वनस्पती जन्य पदार्थ्यांचे सेवन, पालेभाज्यांचे सेवन, हरित द्रव्यांचा वापर केल्यास मधुमेहापासून मुक्ती मिळू शकेल. सूत्रसंचालन प्र. द. कुलकर्णी यांनी केले. परिचय अॅड. मिलिंद चिंधडे यांनी करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिसादाअभावी ८४ फटाका स्टॉल्सचे लिलाव तहकूब

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

परवानगीची क्लिष्ट प्रक्रिया आणि अतिरीक्त कराची वसुली यामुळे यंदा महापालिकेच्या फटाका विक्री स्टॉल्सच्या लिलावाकडे फटाके विक्रेत्यांचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे. नाशिक पूर्व, पश्चिम आणि पंचवटीतील १५० स्टॉल्सपैकी गुरुवारी जेमतेम ६६ स्टॉल्सचाच लिलाव होऊ शकला. तब्बल ८४ स्टॉल्सचे लिलाव प्रतिसादा अभावी तहकूब करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे.

नाशिक पूर्वमधील २२, नाशिक पश्चिम मधील ६० तर पंचवटी विभागातील ६८ अशा एकूण १५० स्टॉल्सच्या लिलावाची प्रक्रिया महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात आयोजित करण्यात आली होती. परंतू नाशिक पूर्व विभागातील जेमतेम १०, नाशिक पश्चिम विभागातील ३०, पंचवटी विभागातील २६ स्टॉल्सकरीता लिलावात बोली लागू शकली. नाशिक पश्चिम विभागातील ईदगाह मैदानावर ५० तर संदीप हॉटेल समोरील मनपाच्या मोकळ्या जागेवर १० स्टॉल्सच्या उभारणीसाठी लिलाव बोलविण्यात आले होते. त्यापैकी ईदगाह मैदानावरील २९ तर संदीप हॉटेल समोरील अवघ्या एका स्टॉल करीत बोली बोलली गेली. गुरुवारच्या लिलाव प्रक्रियेतून पालिकेला अवघे ११ लाख रुपये मिळाले असून, सर्वाधिक बोली ३७ हजाराची लागली आहे. उद्या(दि. २६) नाशिकरोड, सातपूर व नवीन नाशिक या तीन विभागातील ३२० स्टॉल्स करीत लिलावाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुखोई ३० चे आज हस्तांतरण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथील हवाई दलाच्या केंद्रात देखभाल आणि दुरुस्ती केलेले सुखोई ३० (एमकेआय) हे लढाऊ विमान हवाई दलाकडे सुपूर्द केले जाणार आहे. त्याचा सोहळा ओझर येथील केंद्रात शुक्रवारी (२६ ऑक्टोबर) होणार आहे. याप्रसंगी हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

ओझर येथील हवाई दलाचे केंद्र हे देखभाल आणि दुरुस्तीचे आहे. सुखोई ३० (एमकेआय) या विमानाची निर्मिती ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये केली जाते. तसेच, त्याची देखभाल आणि दुरुस्तीही एचएएलकडेच होते. मात्र, ओझर येथील हवाई दलाच्या केंद्रात प्रथमच सुखोई विमानाची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याचे काम या केंद्रात सुरू होते. अखेर या विमानाचे काम पूर्ण झाले. त्याची पहिली हवाई चाचणी गेल्या २४ एप्रिल रोजी घेण्यात आली आहे. ती यशस्वी झाल्याचे ओझर हवाई दल केंद्राचे एअर कमोडोर समीर बोराडे (विशिष्ट सेवा मेडल) यांनी दिली आहे. शुक्रवारी हे विमान हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहे. त्याचा हस्तांतर सोहळा शुक्रवारी ओझरच्या केंद्रात होणार आहे. याप्रसंगी हवाई दलाच्या मेन्टेनन्स कमांडचे प्रमुख, हवाई दलाच्या पश्चिम आणि दक्षिण विभागाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री शिंदेंकडून आज पाहणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मृदा व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे आज, शुक्रवारी (दि. २६) जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते सिन्नर, इगतपुरी व नाशिक तालुक्यातील गावांना भेटी देऊन तेथील आढावा घेणार आहेत.

सिन्नर तालुक्यातील वावी येथे सकाळी भेट देऊन तेथील टंचाईसदृश परिसराची प्रत्यक्ष पाहणी ते करतील. त्यानंतर मुसळगाव येथे पाहणी करून सकाळी ९.३० वाजता सिन्नर पंचायत समिती कार्यालयालयात टंचाई आढावा बैठकी घेतील. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील शेणित व शेनवडे येथे टंचाईसदृश परिसराची प्रत्यक्ष पाहणी करतील. नंतर नाशिक तालुक्यातील पिंपळद, तिरडशेत या गावांतील टंचाईसदृश भागाची प्रत्यक्ष पाहणी करून नाशिक पंचायत समितीत ते आढावा बैठक घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images