Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

स्त्री रुग्णालयाचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन वर्षांपासून आजी-माजी आमदारांमधील वर्चस्ववादाच्या लढाईमुळे फुटबॉल झालेल्या भाभानगरमधील प्रस्तावित शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर स्थायी समितीने शुक्रवारी रुग्णालयासाठी ३० वर्षांच्या करारास हिरवा कंदील दिला आहे. शिवसेनेचा विरोध नोंदवून घेत सभापती हिमगौरी आडके-आहेर यांनी शासनाला ३० वर्षांच्या करारावर स्त्री रुग्णालयास जागा देण्याच्या ठरावाला मंजुरी दिली. आजी-माजी आमदारांच्या लढाईत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी बाजी मारली आहे.

राज्य सरकारने नाशिकमध्ये स्त्रियांसाठी स्वतंत्र शंभर खाटांचे रुग्णालय मंजूर केले आहे. आमदार फरांदे यांनी यासाठी पाठपुरावा करीत हे रुग्णालय नाशिकसाठी मंजूर करून घेतले होते. यापूर्वी या रुग्णालयासाठी वडाळा येथील जागा निवडण्यात आली होती. मात्र, येथे विरोध झाल्यानंतर आमदार फरांदे यांनी दादासाहेब गायकवाड सभागृहाशेजारील पार्किंगच्या रिकाम्या जागेतील ९६०० चौरस मीटर जागेचा प्रस्ताव दिला होता. तो प्रस्तावही महासभेत सादर करण्यात आला होता. मात्र, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांच्याकडून या जागेला विरोध करण्यात आला. महासभेने परस्पर या जागेचा प्रस्ताव बदलून तो टाकळी रोडला करण्याचा ठराव केला होता; परंतु, त्याला आमदार फरांदे यांनी तीव्र विरोध करीत भाभानगरमध्येच हे रुग्णालय व्हावे, यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत वाद गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फरांदे यांच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे भाभानगरमध्येच रुग्णालय करण्याची तयारी सुरू असतानाच हा वाद न्यायालयात पोहचला होता. तरीही प्रशासनाने २१ सप्टेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भूमापन क्र. ५०२ मधील भूखंड २६, २७ मधील ९६०० चौरस मीटर जागा ही महिला रुग्णालयासाठी ३० वर्षांच्या कराराने देण्याचा ठराव मांडण्यात आला होता. परंतु या बैठकीत शिवसेनेच्या सभासदांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे सभापतींनी हा विषय अभ्यासाठी तहकूब केला होता.

शुक्रवारच्या स्थायीच्या बैठकीत या विषयावर पुन्हा चर्चा झाली. त्यावर शिवसेनेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेत पार्किंगची जागा देता येणार नाही, असे मत नोंदवले. भागवत आरोटे, प्रवीण तिदमे, संतोष साळवे यांनी या प्रस्तावाला विरोध करीत, तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. त्यावर दिनकर पाटील, मुशीर सैय्यद, उद्धव निमसे आणि कोमल मेहरोलिया यांनी तांत्रिक बाबी या प्रशासनाच्या असल्याचे सांगत विषयाला मंजुरी देण्याची मागणी केली. परंतु, या प्रस्तावात काही तांत्रिक बाबींची संपूर्णपणे जबाबदारी ही प्रशासनाचीच राहिल असा आक्षेप यावेळी घेण्यात आला. सभापती आडके-आहेर यांनी शिवसेनेचा विरोध नोंदवून घेत या प्रस्तावाला मंजुरी दिली. एका वर्षासाठी शंभर रुपये नाममात्र दरात शासनाशी जागा देण्याबाबतच्या कराराला त्यांनी हिरवा कंदील दर्शवला.

आमदार फरांदेंची बाजी

स्त्री रुग्णालयाचा गेल्या दोन वर्षापासून फुटबॉल सुरू होता. आमदार फरांदेंनी संदरील रुग्णालय भाभानगरमध्येच व्हावे यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. तर माजी आमदार वसंत गितेंनी सदरील रुग्णालय हे भाभानगरऐवजी टाकळी रोडवरील आरक्षित जागेवर व्हावे यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. रुग्णालयाचा वाद थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला होता. मुख्यमंत्र्यांनी फरांदेच्या बाजूने निकाल दिल्यानंतरही या रुग्णालयाची वाट अवघड होती. फरांदेच्या पक्षांतर्गत विरोधकांनी सदरील रुग्णालयाच्या उभारणीत वेळोवेळी अडथळे आणले. परंतु अखेरीस आता स्थायीने जागा उपलब्ध करून दिल्याने फरांदेंनी या पक्षांतर्गत विरोधकांवर बाजी मारल्याची चर्चा आहे.

हायकोर्टाचा अवमान

या रुग्णालयाला जागेविरोधात भाभानगर ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशिय सेवा समितीने हायकोर्टात दाद मागितली. रुग्णालयाच्या शंभर मीटर अंतरावर सायलेन्स झोन जाहीर करणे बंधनकारक आहे. परंतु, सांस्कृतिक सभागृहाच्या आवारातच रुग्णालय उभारले जात असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब न्यायालयात मांडण्यात आली. गायकवाड सभागृह व रुग्णालयाची सामायिक वाहनतळ दर्शविण्यात आल्याने येथे पार्किंगचा प्रश्‍न निर्माण होणार असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. संदीप शिंदे यांनी कोर्टात सांगितले. प्रस्तावाला मंजुरी देण्यापुर्वी या बाबी व हरकती महापालिकेकडे मांडण्याच्या सूचना हायकोर्टाने दिल्या होत्या. त्यानुसार आयुक्त व स्थायी समितीकडे सदरचे पत्र सादर करण्यात आले असतानादेखील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे न्यायालयाच्या अवमान झाल्याचा दावा करीत याविरोधात न्यायालयात पुन्हा धाव घेणार असल्याचे अॅड. शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भिडेंवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो' असे वक्तव्य करीत कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू असलेल्या शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांना नोटीस मिळाली की नाही, याबाबत संभ्रम कायम असल्याने कोर्टाने ही सुनावणी १९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. आजच्या सुनावणीसाठी भिडे किंवा त्यांचे वकील हजर नव्हते.

नाशिकमधील एका कार्यक्रमादरम्यान संतती प्राप्तीबाबत बोलताना 'माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो' असे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केले होते. भिडेंच्या या वक्तव्यावर गणेश बोऱ्हाडे यांनी कुटुंबकल्याण विभागाच्या 'लेक लाडकी' या वेबसाइटवर लेखी तक्रार केली होती. त्यानुसार पुण्याच्या आरोग्य उपसंचालकांनी नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला भिडेंच्या या वक्तव्यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भिडेंवरील कारवाईचा फैसला हा नऊ सदस्यीय पीसीएनडीटी समितीवर सोपवण्यात आला होता. या समितीने भिडेंना पीसीपीएनडीटी अॅक्ट २२ मध्ये गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व लिंग निश्चित करणे यांच्याशी निगडीत जाहिरातीवरील प्रतिबंध आणि उल्लंघनाबाबत दोषी ठरवले. भिडेंच्या विरोधात थेट कोर्टात फिर्याद देण्यात आली. यावर ऑगस्ट महिन्यापासून सुनावणी सुरू झाली. कोर्टाने समन्स काढून भिडेंना हजर राहण्याचे आदेश दिले. आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आले. मात्र, हे समन्स भिडे यांना मिळाले की नाही, याची खातरजमा कोर्टात होत नाही. आजच्या सुनावणीत देखील तेच झाले. त्यामुळे कोर्टाने पुढील सुनावणीसाठी १९ ऑक्टोबर ही तारीख दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’चा विळखा

$
0
0

अवघ्या नऊ दिवसांमध्ये ३० रुग्णांचा मृत्यू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेल्या स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढतो असून, मागील अवघ्या नऊ दिवसांमध्ये तब्बल ३० जणांचा बळी गेला आहे. यातील ७ मृत्यूंची नोंद ११ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

शहरासह जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात स्वाइन फ्लूचा उद्रेक झाला. थंड हवामान आणि पावसाने दिलेली ओढ अशा वातावरणात स्वाइनने धुमाकूळ घातला. शहरी भागात या आजाराचा सर्वाधिक फटका बसला. २ ऑक्टोबरपर्यंत यामुळे ४१ जणांचा मृत्यू झाला होता. यात नाशिक जिल्ह्यातील ३६, अहमदनगर जिल्ह्यातील चार तर जळगाव जिल्ह्यातील एका रुगणांचा समावेश होता. 'ऑक्टोबर हिट'चा प्रभाव वाढून स्वाइन फ्लूचा फैलाव आटोक्यात येईल, असा प्रशासनाचा अंदाज होता. मात्र, हा अंदाज पूर्णत: चुकीचा ठरला असून, मागील ३ ते ११ ऑक्टोबर या नऊ दिवसात तब्बल ३० जणांचा बळी गेला. सरासरी दररोज तीन जण स्वाइन फ्लू आजाराचे बळी ठरले. या वर्षी ११ ऑक्टोबरपर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला असून, बदलत्या हवामानामुळे यात आणखी वाढ होण्याची भिती व्यक्त होते आहे. प्रशासनाकडे ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या नोंदीनुसार याच दिवशी सात जणांचा मृत्यू झाला. यात सिव्हिलमधील दोन तर खासगी हॉस्पिटलमधील पाच पेशंटचा समावेश होता.

खासगी हॉस्पिटल्समध्ये मृत्यू प्रमाण अधिक

शहरी भागात स्वाइन फ्लूची लागण होण्याची प्रमाण अधिक असून, शहरातील बहुतांश हॉस्पिटल्समध्ये उपचार घेणाऱ्या पेशंटच्या रांगा लागल्या आहेत. पेशंटचा ओघ मोठा असल्याने खासगी हॉस्पिटल्समध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण देखील सर्वात जास्त ठरले आहे. आतापर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २० तर खासगी हॉस्पिटल्समध्ये ४६ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

स्वाइन फ्लूमुळे पेशंट दाखल होण्याचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यापूर्वी २७ पेशंट दाखल असायचे. आता हे प्रमाण १२ इतके झाले आहे. नागरिकांनी सर्दी, घसा दुखी, ताप, तसेच शिंका सुरू होताच नागरिकांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच खासगी हॉस्पिटल्सनेही पहिल्याच दिवसापासून स्वाइन फ्लू समजून उपचार करायला हवेत.

- डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल हॉस्पिटल

स्वाइन फ्लूचा प्रकोप

वर्ष-बाधित रुग्ण- मृत्यू

२००९-१२२-२२

२०१०-२५४-३९

२०११-१६-१

२०१२-३७-२१

२०१३-३४-१९

२०१४-२२-१०

२०१५-५०८-८७

२०१६-१६-४

२०१८-३६१-६६

(२०१८ ची आकडेवारी ११ ऑक्टोबरपर्यंतची)

संस्थानिहाय आकडे

संस्था-बाधित रुग्ण- मृत्यू

सिव्हिल हॉस्पिटल-५७-२०

खासगी हॉस्पिटल (शहर) -३०४-४६

एकूण- ३६१-६६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालिमार पेन्ट्सची फिनिक्स भरारी

$
0
0

पुढील वर्षी सुरू होणार आधुनिक कारखाना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-आग्रा हायवेवर वाडीवऱ्हे जवळील शालिमार पेन्टस हा कारखाना पुन्हा कार्यन्वित होणार आहे. या कारखान्याला मोठी आग लागली होती. रंगांचे उत्पादन करणाऱ्या या कारखान्याला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले होते. मात्र, कंपनी प्रशासनाने पुन्हा हा कारखाना सुरू करण्यासाठी चंग बांधला आहे.

शालिमार पेंट्स लिमिटेडचे उपाध्यक्ष अशोक गुप्ता यांच्या हस्ते या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. हा प्रकल्प एप्रिल २०१९ पासून सुरू होणार असून दरमहा २ हजार १८० किलोलिटर्स रंगाचे उत्पादन केले जाणार आहे. त्यामुळे याठिकाणी दोनशेहून अधिक जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. नाशिकमध्ये नवा उत्पादन प्रकल्प स्थापन केल्याने आम्हाला आमची संपूर्ण भारतभर पुरवठा साखळी मजबूत करण्यासोबतच स्थानिक बाजारपेठेला योग्य सेवा देता येईल. आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की एकदा कार्यान्वित झाल्यावर आमचा नाशिक प्रकल्प शालीमारच्या देशव्यापी उत्पादनांचा, विक्री आणि वितरण इकोसिस्टमचा महत्त्वाचा भाग बनणार आहे, असे गुप्ता यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींना बळीचा बकरा बनवताहेत

$
0
0

अॅड. प्रकाश आंबेडकरांची टीका

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी भाजप सरकारवर केलेल्या टीकेवरून भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसह संघावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. जोशींचे वक्तव्य हे हिलटरची आठवण करून देणारे आहे. हिटलरवर त्याच्या सहकाऱ्यांनीही असाच अविश्वास दाखवला होता. सन २०१९ च्या निवडणुकीत भाजपचा विजय होणार नाही याची खात्री आरएसएसला झाल्याने पतंप्रधान नरेंद्र मोदींना बळीचा बकरा बनवण्याचे काम सुरू झाल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. '

भारीप बहुजन महासंघ आणि एमआयएम यांच्या युतीनंतर अॅड. आंबेडकर यांनी राज्यात दौरा सुरू केला असून, त्या अंतर्गत आंबेडकर यांनी नाशिकमध्ये येऊन पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. राज्यातील परिस्थितीचा काँग्रेसला फायदा घेता येत नाही. शेतकरी अडचणीत आहेत. हे सरकार शेतकऱ्यांचे नाही, तर व्यापाऱ्यांचे आहे. सरकारच्या मर्जीने शेतकऱ्यांची लूट होत असून, हे दलालांचेही सरकार आहे असे सांगत त्यांनी काँग्रेसरवही टीका केली. काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी काही केले नसल्याचे सांगत यशवंतराव चव्हाणांच्या वारसांनी काँग्रेसला मातीत गाडले असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीबाबत बोलावलेल्या बैठकीवर आंबेडकर यांची टीका केली. मोदींनी बोलावलेली बैठक ही इंधन दरावर नसून, अन्य विषयावर असल्याचे सांगत आपण त्याचा पर्दाफाश करणार असल्याचा दावा त्यांनी केला.

...

मंत्रिमंडळ विस्तार हे गाजर

राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारावरही आंबेडकर यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांनी भाजप व सेनेच्या आमदारांना विस्ताराचे नुसते गाजर दाखवलेलं असल्याचा टोला लगावला. मंत्रिमंडळात एकाचाही समावेश होईल असे आपल्याला वाटत नसल्याचे सांगत, विस्ताराचे गाजर हे यापूर्वी अनेकदा दाखविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांना वेळ मारून न्यायची असल्याने अनेक वेळा विस्ताराच्या पुड्या सोडल्या जातात असे सांगत, त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

...

'मी टू'चा दुरुपयोग नको

'मी टू'मुळे महिला बोलायला लागल्या ही चांगली गोष्ट आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत महिला बोलायला लागल्याचे हे चांगले असले तरी, काही महिला त्याचा दुरूपयोगही करतात असा दावा त्यांनी केला. कायदा महिलांच्या बाजूने आहे. त्यामुळे नाहक कुणालाही बदनाम करू नये, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणासाठी संघटित व्हा

$
0
0

समाजाचे नेते डी. डी. सोनटक्के यांचे प्रतिपादन

…..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परिट-धोबी समाजाच्या प्रलंबित आरक्षणाच्या प्रश्नाकडे राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 'जागर आरक्षणाचा' हा राज्यव्यापी अभिनव उपक्रम आगामी काळात राज्यभर राबविला जाईल. समाजाने यासाठी संघटित होणे गरजेचे असल्याचे मत परिट-धोबी समाजाचे नेते डी. डी. सोनटक्के यांनी व्यक्त केले.

संत गाडगे बाबा मराठा परिट समाज सेवा मंडळांच्या वतीने शुक्रवारी नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात 'जागर आरक्षणाचा' या समाज संघटन व जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डी. डी. सोनटक्के यांनी परिट-धोबी समाजाला आरक्षणाची गरज आणि सुरू असलेला लढा याविषयी मार्गदर्शन केले. ऊर्जामंत्री चंद्रकात बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने लॉन्ड्रीधारकांना आता वीजबिलात सवलत मिळणार आहे. आरक्षणाच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक असून, समाजानेही आता संघटन मजबूत करून आरक्षणासाठी लढा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील उद्योजक रमाकांत कदम, नाशिकचे राजेंद्र आहेर, आरक्षण कृती समितीचे महासचिव अनिल शिंदे, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, अरुणा रायपुरे, ज्ञानेश्वर गवळी, लॉन्ड्री संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पवार, अध्यक्ष शशिकांत राऊत उपस्थित होते.

प्रारंभी दीपप्रज्वलन करून संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. सुप्रसिद्ध शाहीर दत्ताजी शिंदे यांनी गाडगेबाबांवर गीत सादर केले. मराठा परिट समाज सेवा मंडळाचे महासचिव यांनी प्रास्ताविक केले, तर अध्यक्ष शशिकांत राऊत यांनी स्वागत करीत मंडळाची भूमिका, जागर आरक्षणाचा उपक्रम व समाज संघटन यावर मत व्यक्त करीत संपूर्ण नाशिक जिल्हा आरक्षणाच्या लढाईत तन मन धनाने उतरेल, अशी ग्वाही दिली. आरक्षण कृती समितीचे महासचिव अनिल शिंदे यांनी आरक्षणाचा लढाईचा प्रवास, भांडे समितीचा अहवाल आणि परिट-धोबी समाजाची स्थिती यावर अभ्यासपूर्ण माहिती देत संघटन बळकट करण्याचे आवाहन केले. उद्योजक रमाकांत कदम यांनी नाशिकमधील मराठा-परिट समाज सेवा मंडळाचे कार्य कौतुकास्पद असून, हा जागर राज्यभर सुरू ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी रमाकांत कदम, राजेंद्र आहेर, डी. डी. सोनटक्के, अनिल शिंदे यांना समाजगौरव भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. समाजासाठी आयुष्यभर योगदान देणार प्रति गाडगेबाबा औरंगाबाद येथील दिवंगत खंडूजी गायकवाड व पुणे येथील दिवंगत सुनील दळवी यांच्या कुटुंबीयांना मरणोत्तर समाज गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास नाशिक शहर व जिल्हा तसेच राज्यभरातील समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. गणेश गवळी व योगेश सगर यांनी सूत्रसंचालन केले.

..

ऊजामंत्र्यांचे मार्गदर्शन

व्यासपीठावर डी. डी. सोनटक्के यांनी ऊर्जामंत्री चंद्रकात बावनकुळे यांना मोबाइलवरून नाशिक येथील जागर आरक्षणाचा या कार्यक्रमाची माहिती दिली. नामदार बावनकुळे यांनी मोबाइलवरून ध्वनिक्षेपकाव्दारे उपस्थितांशी संवाद साधत महाराष्ट्रातील परिट-धोबी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न लवकरच निकाली निघणार असून, लॉन्ड्रीधारकांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्याचा प्रश्न सोडविला. इतर मागण्यांही लवकरच मान्य केल्या जातील, असे सांगून समाज संघटन करण्याचे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वराज्य परिवारातर्फे आज पुरस्कार वितरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक जिल्ह्यात विविध स्तरावर काम करणाऱ्या पंचवटी-म्हसरूळ येथील 'स्वराज्य परिवार' च्या वतीने शनिवारी (दि. १३) दुपारी साडेचार वाजता राज्यस्तरीय विविध पुरस्कारांचे वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील राजमाता मंगल कार्यालयात कार्यक्रम होणार आहे. म्हसरूळच्या 'स्वराज्य परिवार' च्यावतीने यंदापासून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, स्वराज्य भूषण पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार असे एकूण ५१ पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षक संजय दराडे, पोलिस अधिकारी योगेश चव्हाण, मिस स्वराली देवळीकर आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक विभाग अंतिम फेरीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या १७ वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात नाशिक विभागाच्या अनुदानित आश्रमशाळा अलंगुणने गतविजेत्या कोल्हापूर विभागाचा दणदणीत पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अलंगुणची अंतिम सामन्यात आज, शनिवारी (दि. १३) पुणे विभागाविरुद्ध लढत रंगणार आहे.

प्रदीर्घ कालावधीनंतर शालेय खो-खो स्पर्धेत नाशिकच्या संघाने अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला आहे. नाशिकने हा सामना १२ विरुद्ध ११ असा एक गुण व ५ मिनिटे राखून गतविजेत्या कोल्हापूरचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आणले. उपांत्य फेरीच्या सामन्यात अनुदानित आश्रमशाळा अलंगुणने कोल्हापूर विभागावर मध्यंतराला ९ विरुद्ध ६ अशी ३ गुणांची निर्णायक आघाडी घेतली होती. नाशिकने आपल्या पहिल्या संरक्षणात ६ गडी गमावले, तर आक्रमणात कोल्हापूर विभागाचे ९ गडी बाद केले. नाशिकच्या विजयात दिलीप खांडवी याने ३ मिनिटे १० सेकंद व दुसऱ्या डावात २ मिनिटे ४५ सेकंदांचे संरक्षण करताना आक्रमणात दोन गडी टिपले. त्याला भरत पुरस्कार विजेता चंदू चावरेने १ मिनीट ४० सेकंद, २ मिनिटे ५५ सेकंद व दोन खेळाडू, वामन चौधरीने १ मिनीट ३० सेकंद व १ मिनीट २० सेकंद, जगन फौजदार १ मिनीट संरक्षण व दोन खेळाडू बाद करीत, तसेच यशवंत वाघमारे व महेश गावंडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करीत उत्तम साथ दिली.

पुणे-मुंबई सामन्यात चुरस

दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना अतिशय चुरशीचा झाला. त्यात पुणे विभागाने गत उपविजेत्या मुंबई संघाचा १५ विरुद्ध १४ असा अवघ्या १ गुणाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला दोन्ही संघ ८-८ अशा समान गुणसंख्येवर होते. सामना संपायला १० सेकंद बाकी असताना पुणे विभागाने विजयासाठी आवश्यक असलेला सातवा गडी बाद करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अशा रीतीने या स्पर्धेत गतविजेत्या व उपविजेत्या संघांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाग्येश मराठे यांचे आज शास्त्रीय गायन

$
0
0

भाग्येश मराठे यांचे

आज शास्त्रीय गायन

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड येथील गुरुवर्य पंडित शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे शनिवारी (दि. १३) स्वरसाधना उपक्रमांतर्गत भाग्येश मराठे यांचे शास्त्रीय गायन होणार असल्याची माहिती संयोजक सरिता वैरागकर यांनी दिली. जेलरोड येथील डी. एस. कोठारी कन्या शाळेत सायंकाळी सहा वाजता मैफिल रंगणार आहे. भाग्येश मराठे हे पंडित राम मराठे यांचे नातू तसेच पंडित केदार बोडस यांचे शिष्य आहेत. त्यांना संवादिनीवर सागर कुलकर्णी आणि तबल्यावर ओंकार वैरागकर साथ संगत करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य टेबल टेनिस स्पर्धेत जुन्नरे स्कूलचा सहभाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेअंतर्गत क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूरतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या १७ वर्षांआतील राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम हायस्कूल नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

श्रुती सुनदल्ली, श्रुती वालझाडे, दिशा बाचपई, रुद्रा जोशी, गायत्री काळंगे या संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ही स्पर्धा दि. १४ ते १७ ऑक्टोबरदरम्यान होणार असून, या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडले जाणार आहेत. जळगाव येथे झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये या शाळेच्या संघाने अंतिम सामन्यात शिरपूर, धुळे संघाचा पराभव करून राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळविले. या संघाला क्रीडाशिक्षक विलास पाटील, धनश्री माळी आणि खेळाडूंच्या पालकांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबाबात संस्था अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे ,कार्यवाह राजेंद्र निकम, मुख्याध्यापिका नंदा पेटकर, उपमुख्यध्यापिका अनिता मधुसूदन, पर्यवेक्षिका वीणा जोशी, शैला रमण व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यधुंद पोलिसाचा धिंगाणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने मद्याच्या नशेमध्ये टिळकवाडीतील सिग्नलजवळ धिंगाणा घातला. यावेळी पोलिसाने अनेक नागरिकांना शिवीगाळ देखील केली. अविनाश मोहन क्षीरसागर (४५, रा. पोलिस मुख्यालय, आडगाव) असे या संशयित पोलिसाचे नाव आहे.

अविनाश क्षीरसागर यांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास टिळकवाडी सिग्नलजवळ मद्याच्या नशेमध्ये गोंधळ घातला. पोलिस वर्दीमध्ये असताना, त्यांनी अनेकांना शिवीगाळ करीत आरडा ओरडा केला. ही माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास अटक करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठांनी दिली.

सिडकोत गांजा जप्त

सिडकोतील महाकाली चौकातील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी गांजा जप्त केला. या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली. ही कारवाई मध्यवर्ती गुन्हे शाखेने केली असून, अनिल रुपसिंग मेहंदळे (४२, रा. साईबाबानगर, महाकाली चौक, सिडको) असे संशयिताचे नाव आहे. कारवाई बुधवारी (दि. १०) रात्री करण्यात आली. पोलिसांनी छापा मारला त्यावेळी संशयिताच्या घरातून अंमलीपदार्थ सदृश्‍य ओलसर सुका गांजाच्या १२ पुड्यांसह ३८३ ग्रॅम व निव्वळ गांजा ३६० ग्रॅम असा तीन हजार ६०० रुपयांचा गांजा पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लूट

सर्व्हिस रोडवर कारमधून आलेल्या संशयितांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून पादचाऱ्याच्या हातातील घड्याळ व खिशातील रोकड असा सात हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. दीपक हरिभाऊ राऊत (रा. वासननगर, पाथर्डी फाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली. राऊत हे शनिवारी (दि. २९ सप्टेंबर) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सर्व्हिसरोडने पायी जात असताना अश्‍विन ग्रँड हॉटेलजवळ एका कारमधून चौघे आरोपी आले. त्यांनी त्र्यंबकेश्‍वरकडे जाण्यासाठी रस्ता विचारण्याचा बहाणा केला आणि त्यांच्या हातातील सात हजार रुपयांचे घड्याळ व खिशातील ९०० रुपयांची रोकड काढून घेत पोबारा केला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पाणीमीटर, कॉकची इंदिरानगरमध्ये चोरी

इंदिरानगर येथील एका अपार्टमेंटमधील पाण्याचे मीटर, पितळी कॉक व पाईप असा २५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ललित शशिकांत पाटील (रा. गणेश सिग्नेफिया अपार्टमेंट, राजसारथी सोसायटीजवळ, इंदिरानगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने गुरुवारी (दि.११) मध्यरत्रीच्या सुमारास अपार्टमेंटचे पाण्याचे चार मीटर, दोन पितळी कॉक, चार पाण्याचे पाईप असा २५ हजार १५४ रुपयांचे साहित्य चोरून नेले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती व्यवस्थापन

$
0
0

आपत्ती व्यवस्थापन सप्ताहांतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने शुक्रवारी रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातून या रॅलीचा शुभारंभ झाला. मेहेर, रेडक्रॉस, शालिमार, सीबीएसमार्गे पुन्हा ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनाला बळ देणाऱ्या वेबसाइटचे उद्या उद्घाटन

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीला बळ देणाऱ्या 'www.unravelnashik.com (अनरॅवल नाशिक डॉट कॉम) या वेबसाइटचा अनावरण सोहळा रविवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता हॉटेल गेटवे येथे होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे, पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामीण विकास मंत्री दादा भुसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या संकल्पनेतून या वेबसाइटची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील निसर्ग, अध्यात्मिक ,ऐतिहासिक व पौराणिक वारसा असलेली स्थळे, साहसी पर्यटन स्थळे, संस्कृती, वाइन, वेलनेस तसेच खाद्य संस्कृतीच्या सखोल माहितीचा समावेश आहे. पर्यटकांना घरगुती निवास पुरविणारी एअर बीएनबी, हॉटेल बुकिंग, यात्रा डॉट कॉम, तसेच कार सेवा देणारी झूम कार्स यांच्या सेवांचे नियोजनही या वेबसाइटवरून पर्यटकांना करता येणार आहे. क्रेडाई, मेट्रो, ग्रीन स्पेसेसचे संचालक तेजस चव्हाण व मुंबईच्या हायपर क्नेट कम्युनिकेशनचे किरण खडके यांनीही या वेबसाइटसाठी परिश्रम घेतले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक देवाण घेवाणीतून मारहाण

$
0
0

आर्थिक देवाण घेवाणीतून मारहाण

नाशिक : गरबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणास एकाने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत जखमी केल्याची घटना रामवाडी भागात घडली. प्रशांत अशोक तोडकर (रा. कुऱ्हेचाळ, आदर्शनगर) असे तरुणास जखमी करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. अजय कैलास गोडसे (रा. आदर्शनगर, रामवाडी) या युवकाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. गोडसे गुरुवारी रात्री कौशल्यानगर येथील पाण्याची टाकी भागात गरबा पाहण्यासाठी गेला असता ही घटना घडली. गर्दीत भेटलेल्या संशयिताने हातउसनवार घेतलेल्या पैशांच्या कारणातून गोडसे यास शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी जीवे ठार मारण्याची धमकी देत संशयिताने गोडसे यास दगड फेकून मारल्याने तो जखमी झाला.

अंगठी लांबविली

नाशिक : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने शेजारी बोलवून घेत पादचाऱ्याची सोन्याची अंगठी कारमधील तिघांनी लांबविल्याची घटना आशादिप मंगल कार्यालय परिसरात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर दत्तात्रेय सोनवणे (५१ रा. त्रिकोणी बंगला) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सोनवणे आशादीप मंगल कार्यालय भागात गेले होते. रस्ताने पायी जात असतांना एका कारमधील तिघांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ बोलावून घेत हे कृत्य केले.

पखालरोडला घरफोडी

नाशिक : पखालरोड भागातील हॅपीहोम कॉलनीत भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. त्यात २० हजाराची रोकड, सोन्याचांदीचे दागिणे आणि मोबाइलचा समावेश आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेशमा आयुब शेख (रा. शेरापार्क, हॅपीहोम कॉलनी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. शेख कुटुंबिय गुरुवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. सुमारे ७० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला.

जातीवाचक शिवीगाळ

नाशिक : पत्नी माहेरी गेल्याच्या कारणातून संतप्त पतीने मेव्हणी आणि तिच्या पतीस जीवे ठार मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना मखमलाबाद शिवारात घडली असून, या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सागर गजानन खिरकाडे (रा.मेहरधाम, पेठरोड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी कविता भोये (रा.गावरान हॉटेलमागे,पेठरोड) यांनी तक्रार दिली. ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान मखमलाबाद शिवारातील भोये दाम्पत्यास घरात व सोसायटी समोर संशयिताने हे कृत्य केले. कविता भोये यांची बहिण प्रतिभा हिने संशयितासमेवत प्रेमविवाह केलेला असून, दोघामध्ये वाद झाल्याने प्रतिभा आपल्या माहेरी निघून गेली. संशयिताने पत्नीबाबत विचारपूस करीत मेव्हणी आणि साडू यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक देशमुख करीत आहेत.

आर्थिक वादातून एकास मारहाण

नाशिक : आर्थिक वादातून एकास पोलिस स्टेशनमध्ये बोलविण्याचा बहाणा करून त्रिकुटाने रस्ता अडवित बेदम मारहाण केली. ही घटना नळेमळा भागात घडली असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. कादीर हमीद पठाण यांनी याप्रकरणी तक्रार दिली. अशोकामार्ग परिसरातील रहिवाशी मतीन पापामिया शेख आणि पठाण यांच्यात आरो मशिन फॅक्चरिंग व्यवसायात आर्थिक व्यवहार झाला होता. त्यावरून शुक्रवारी दुपारी संशयितांने शेख यांना इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये बोलाविले. शेख पोलिस स्टेशनकडे येत असताना संशयितासह त्याच्या दोन साथीदारांनी त्यांना नळेमळा भागातील जाखडीनगर परिसरात रस्ता अडवून शिवीगाळ केली. यावेळी शेख व त्याच्या साथीदारांनी पठाण यांना बेदम मारहाण केली. घटनेचा अधिक तपास हवालदार राणे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची संधी

$
0
0

कम्पाउंडिंग पॉलिसीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नगररचना प्रशमित संरचना धोरण २०१७ अंतर्गत ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे दंडात्मक शुल्काद्वारे नियमित करणाच्या प्रस्तावाला आता ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत बाधंकामे झालेल्या सिडकोसह अन्य नागरिकांना नगररचना विभागाकडे फाइल दाखल करण्यासाठी अजून दोन महिन्यांचा अवधी मिळाला आहे.

शहरातील कपाट कोडींमुळे जवळपास साडेसहा हजार इमारती या अनधिकृत ठरल्याने बांधकाम व्यावसायिकांची मोठी कोंडी झाली होती. बांधकाम व्यावसायिकांची झालेली कोंडी शासनाने अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी महाराष्ट्र नगररचना प्रशमित संरचना धोरण २०१७ जाहीर केल्याने सुटणार आहे. या धोरणांतर्गत सहा, साडेसहा व नऊ मीटर रस्त्यांवरील कपाटांचा प्रश्न सुटेल, अशी आशा निर्माण झाली आहे. या धोरणांतर्गत ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे ही कम्पाउंडिंग चार्जेस भरून ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत नियमित करून घेता येणार आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये कपाटामुळे अडकलेली बांधकाम व्यावसायिकांची कोंडी फुटेल असे चित्र आहे. शहरातील बिल्डरांनी कम्पाउंडिंग धोरणाला पसंती देत तब्बल तीन हजार प्रकरणे यापूर्वीच दाखल केली आहेत. परंतु, या धोरणाला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने त्यासंदर्भात महापालिकेला परवानगी दिली होती. त्यामुळे महासभेने यासाठी वर्षभर मुदतवाढ देण्याचा ठराव केला होता. परंतु, एवढी मुदतवाढ शक्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत चर्चेत आयुक्तांनी मांडले होते.

..

सिडकोतील नागरिकांनाही घेता येणार लाभ

प्रशासनाने शनिवारी याबाबत जाहिरात प्रसिद्ध करीत कम्पाउंडिंग पॉलिसीला ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दोन महिने अजून प्रस्ताव सादर करण्याला मिळणार असल्याने प्रस्तावांची संख्या वाढणार आहे. तसेच, सिडकोतील नागरिकांनाही त्याचा लाभ घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वारांगनांच्या तारणहार

$
0
0

हलाखीच्या परिस्थितीने, बळजबरीने देहविक्रयाच्या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या महिलांकडे समाज कुत्सित नजरेने पाहतो. सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेत असलेले अनेक जणही या महिलांविषयी पुढाकार घेण्यास तितक्या सहजपणे धजावत नाहीत. मात्र, या वंचित महिलांचे पुनर्वसन करायचे असेल, त्यांना 'एचआयव्ही'सारख्या आजारापासून दूर ठेवायचे असेल, त्यांच्या मुलांना शिक्षित करायचे असेल, तर त्यांच्यासाठी मोठे काम करण्याची गरज आहे, हे ओळखत नाशिकमधील आसावरी देशपांडे यांनी पाऊल उचलले. तळागाळात जाऊन काम करण्यास त्यांनी सुरुवात केली आणि त्यात त्या यशस्वीही ठरल्या.

देहविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, 'एचआयव्ही'बाधित यांचा स्वीकार करणे समाजाच्या मानसिकतेपलीकडचे आहे. त्यामुळेच या व्यक्तींना समाजाकडून मिळणारी वागणूक अतिशय हीन दर्जाची असते. त्यांच्या समस्या जाणून घेण्यात कोणी फारसे स्वारस्य दाखवत नाहीत व त्यांचे प्रश्न सोडविण्यासही कुणी पुढे येत नाहीत. आसावरी देशपांडे यांनी मात्र या व्यक्तींच्या आयुष्यात आशेचा किरण जागवला. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:च्या जिवाचे रान केले.

१९९७ मध्ये मानसशास्त्र विषयात बी. ए. पूर्ण केल्यानंतर 'एमएसडब्ल्यू' हा समाजसेवेबाबत असलेला अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. लग्न होऊन नाशिकला आल्यानंतर ऑगस्ट २००५ मध्ये प्रवरा मेडिकल ट्रस्टअंतर्गत देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पामध्ये समन्वयक म्हणून आसावरी यांनी जबाबदारी स्वीकारली. या कामात त्यांच्या कुटुंबाचीही त्यांना मोलाची साथ होती. 'सुशिक्षित' म्हणवल्या जाणाऱ्या समाजाच्या विचारांपलीकडील हे काम असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिवाय, देहविक्रय करणाऱ्या महिलांचाही आपल्या सुधारणेसाठी कोणी काम करीत आहे, यावर विश्वासच बसत नसल्याने या महिलाही प्रकल्पात येण्यास नापसंती दर्शवू लागल्या. प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टीने हे मोठे आव्हान आसावरी यांच्यापुढे होतं. ते स्वीकारत नाशिक, सिन्नर, मनमाड या ठिकाणी असणाऱ्या रेड लाइट एरियात जाऊन या महिलांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न त्या करू लागल्या. या कामामुळे नंतर 'त्या' महिलांचाही विश्वास वाढला आणि मग खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाला सुरुवात झाली. गुप्तरोगाची माहिती, 'एचआयव्ही' या विषयावर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. हे करीत असतानाच या महिलांच्या मुलांचा शिक्षणाचा मोठा प्रश्न समोर आला आणि ताबडतोब त्यांनी या मुलांसाठी चार तासांची शाळा सुरू केली. ज्या मुलांचे शिक्षण अर्धवट सुटले आहे, अशा मुलांना होस्टेल व शाळेत दाखला मिळवून देण्याचे कार्यही सुरू केले. हे कार्य करीत असताना अनेकांनी विरोध केला, कार्यलयातील वस्तूंची तोडफोड झाली, कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. पण, या आव्हानांना न जुमानता त्यांनी काम सुरूच ठेवले. त्याचे फळही त्यांना मिळाले. देहविक्रय करणाऱ्या महिलांमध्ये विश्वास निर्माण झाला व त्या खुलेपणाने आपले प्रश्न मांडू लागल्या. या महिलांचा जन्मदाखला, रेशन कार्ड, मतदान कार्ड, बँक खाते, पॅन कार्ड, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वेळोवेळी सरकारी पातळीवर प्रयत्न करण्यात आले. या महिलांचे पुनर्वसन हा कायम यक्षप्रश्न ठरत आला असला, तरी त्यांनी त्यासाठी उत्तर शोधत ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न नेहमीच केला. सर्व स्तरांतून या महिलांचा होणारा मानसिक छळ, त्यांच्या मुलांच्या शाळांचा प्रश्न, अल्पवयीन मुलींना या कामाची भुरळ पडू नये यासाठी त्या जनजागृती करीत आहेत. हे काम करीत असताना आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळाल्याचे त्या सांगतात. प्रत्येक वेळी मानसिक व नैतिक स्तरावर घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांची कसोटी पार करीत आजही त्या झोकून देऊन कार्यरत आहेत. त्यांच्या या कामाला अनेक नामांकित संस्थांनी गौरविले आहे. शिवाय, सध्या या महिलांना रोजगार मिळवून देण्याच्या प्रयत्नात त्या आहेत.

(शब्दांकन : अश्विनी कावळे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नजाकत’ने घेतला मनाचा ठाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तुला भेटले की बरे वाटते, मनाला किती हायसे वाटते. गायकाच्या मनातून बाहेर आलेली गझलेबद्दलची ही नजाकतच समजा ना! मनाला साद अन् हृदयाला हात घालणाऱ्या अत्यंत आशयपूर्ण गझलांनी नाशिककरांना शब्दश: मंत्रमुग्ध केले. निमित्त होते 'नजाकत' या दर्जेदार गझल मैफलीचे.

स्वरसाक्षी निर्मित आणि नितीन कानेटकर प्रस्तूत नजाकत या गझल मैफलचे शनिवारी कुसुमाग्रज स्मारकामध्ये आयोजन केले होते. गायिका वैशाली कुर्तडकर आणि गायक अतुल दिवे यांनी आपल्या मखमली आवाजाचा साज चढवित ही मैफल श्रीमंत केली. प्रतिष्ठा, प्रसिध्दी, अलंकार दे सुनीती, सुविद्या सदाचार दे या गझलेतून परमेश्वराला साकडे घालत वैशाली कुर्तडकर यांनी या गीतमैफलीचा शुभारंभ केला. त्यानंतर ऐकून गीत माझे म्हणतील लोक सारे, ऐकायला गझल जमतील लोक सारे या गझलची पेशकश करीत दिवे यांनी आपल्या रियाजपूर्ण गायकीची चुणूक दाखवून दिली. यानंतर सुरू झालेला मराठी आणि हिंदीमधील अत्यंत आशयपूर्ण गझलांचा सिलसिला ही मैफल श्रीमंत करीत गेला. जिल्हाधिकारी अन् उत्तम गझलकार असलेल्या दिलीप पांढरपट्टे यांच्या मेघ सावळे जणू तुझे अन डोळ्यांमधून झरला पाऊस, येता येता गेला पाऊस असा कसा हा वेडा पाऊस या कुर्तडीकर यांनी सादर केलेल्या गझलने रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. ठेऊन माझे गाव कोरडे कुण्या दिशेला वळला पाऊस यासारख्या ओळींमधून जणू नाशिककरांची मनातील भावनाच गझलकार अन गायिकेने शब्दबध्द केल्याची प्रचिती आली. त्यानंतर दिवे यांनी हसत नाहीत आता माणसे जगत नाहीत आता माणसे या गझलेतून माणसाच्या एकूणच कोरड्या जगण्याबाबतची खदखद व्यक्त केली. त्यानंतर जब छायी घटा या गझलेपर्यंत या मैफलीचा प्रवास येऊन पोहोचला. नीलेश पांडे यांनी प्रदीप निफाडकर, बशीर मुजावर यांसारख्या सुप्रसिध्द गझलकारांच्या गझलांमधील शेर सादर करीत ही मैफल अधिक समृद्ध केली. जगदीश व्यवहारे यांचा तबला, दिवे यांची संवादिनी अन् अन्य वादकांनी त्यांना दिलेली सुरेल साथ यामुळे ही मैफल अविस्मरणीय झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी येथे शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे पुरुषोत्तम विजय गांगोडे (वय २७) या तरुण शेतकऱ्याने शुक्रवारी (दि. १२) आत्महत्या केली. आतापर्यंत ७९ जणांनी जीवनयात्रा संपविली असून, या घटनांची आढावा बैठक सोमवारी (दि. ५) दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आली आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी, बँकांचा तगादा यासह अन्य अनेक कारणांस्तव शेतकरी मृत्यूला कवटाळतात. अशा घटनांत सरकारी मदतीसाठी पात्र आणि अपात्र लाभार्थी ठरविण्यासाठी सोमवारी बैठक होणार आहे. बैठकीत ३० प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ८७ हजार अंडीवाटप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जागतिक अंडी दिनानिमित्त जिल्हा परिषदेने जिल्ह्यात ८७ हजार अंडी वाटप केले. जिल्ह्यातील २४३ पशुवैद्यकीय संस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्या, आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, रुग्णालये येथे हे वाटप केले. यावेळी विविध कार्यक्रमाद्वारे अंड्यांचे महत्त्वही सांगण्यात आले. जिल्ह्यात १ लक्ष अंडी वाटपाचे लक्ष पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली.

ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा 'जागतिक अंडी दिन' म्हणून जगभरात साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अंड्यांचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी दररोज अंडी खावीत, असे सांगत अंडी हे पौष्टिक अन्न असून त्यामधून प्रथिने, कॅलरीज उपलब्ध असल्याने ती खाण्याकडे विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण व्हावी, यासाठी या 'जागतिक अंडी दिन साजरा करीत असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित, जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. महेश ठाकूर, डॉ. कविता पाटील, डॉ. आनंदा कुटे, डॉ. विजय पाटील, डॉ. भगवानराव पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेणुका देवीचरणी सायकलवारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नाशिक जिल्ह्यात आरोग्यासह पर्यावरणाचा जागर करण्यासाठी सायकलवारीची संकल्पना सुरू करण्यात आली असून, सायकल वापराबाबतचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने नवरात्री सायकल राइडचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या समन्वयक डॉ. मनीषा रौंदळ यांनी केले.

शहरातील गोल्फ क्लब मैदानापासून सलग सातव्या वर्षी सायकलवारीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ६ वाजता देवळालीच्या रेस्ट कॅम्परोडवर भगूरची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री रेणुकामाता मंदिराकडे सुमारे ५० सायकलस्वारांनी कूच करीत 'जय माता दी'चा जयघोष करीत देवीचे दर्शन घेतले. या सायकलवारीत पर्यावरण जागृती, स्वच्छतेचा संदेश, तसेच प्लास्टिकमुक्तीचा संदेश दिला. यावेळी सायकल फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांच्या हस्ते मंदिरात आरती करण्यात आली. डॉ. राजेंद्र वानखेडे, ज्ञानेश्वर गायकवाड, नाना फड, उमेश भदाणे, शैलजा जैन, काशीनाथ देसाई आदींसह नाशिक सायकल फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते. जितेंद्र सिंगदेव यांनी या सायकलवारीचे स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images