Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मनमाडला आढळले मृत अर्भक

0
0
येथील आंबेडकर चौक पुलाजवळ पांझण नदीपात्रात सात महिन्याचे पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आले. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात मातेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पाण्याचा प्रश्न थंडीतच ऐरणीवर

0
0
जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच सिन्नर आणि बागलाण तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. त्यामुळेच या दोन्ही तालुक्यातील अनेक गावांना २० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. येत्या काळात टँकरच्या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

गोदावरी परिक्रमेला आर्किटेक्टचा पाठिंबा

0
0
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या नाशिक शाखेने गोदावरी परिक्रमेला पाठिंबा देतानाच गरजेपेक्षा अधिक काँक्रिटीकरण करू न देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे जाहिर केले आहे. आयआयएच्या नाशिक शाखेने जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली आहे.

उत्पन्नवाढीसाठी प्रशिक्षणाचा डोस

0
0
उपलब्ध कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन त्यांच्याकडून चांगले काम करून घेणे महापालिकेसाठी अत्यावश्यक झाले आहे. कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने करून महापालिकेच्या उत्पन्नाला हातभार लावावा यासाठी प्रशासन आग्रही असून याच उपक्रमातील एक भाग म्हणून प्रशासनाने बँगलोर येथील संस्थेकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅनल रस्त्याची दुरुस्ती करा

0
0
नाशिक शहरात कॉलेजरोड नंतरचा महागडा परिसर म्हणून गंगापूररोडची ओळख आहे. परंतु, सध्या या भागांतील रस्त्यांवरून वाहन चालविणे म्हणजे कसरतच करावी लागते.

अन्यथा श‌िक्षण उपसंचालकांनी राजीनामा द्यावा

0
0
मह‌िनाभरापेक्षाही अध‌िक कालावधीपासून व‌िद्यार्थ्यांना स‌िल्व्हर ओक शाळेमधून बाहेर ठेवण्यात आले असूनही या प्रकरणी श‌िक्षण उपसंचालकांची भूमिकाच उदास‌ीन असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी श‌िक्षण बाजारीकरण व‌िरोधी मंचाने केली आहे.

संक्रातीला वेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार

0
0
ओझर तसेच शहरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला. मंगळवारी मकर संक्रांतीच्या दिवशी हे अपघात झाले. सायखेडा फाटा येथून ओझरच्या गणेश नगरकडे चालेल्या तरुणाचा एसटीच्या धडकेने मृत्यू झाला.

MIDC तील रस्त्यांवरील ​विजेचे खांब हटवा

0
0
महापालिकेच्या निमा हाउस समोर औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यांवर मधोमध असलेले विजेचे खांब हटविण्याची मागणी वाहनचालक करत आहेत. रस्त्यात असणाऱ्या या खांबांमुळे अनेकदा गंभीर अपघात घडल्यानंतरही वीज कंपनी त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

१६ प्राध्यापकांवर विद्यापीठाची कारवाई

0
0
परीक्षेच्या कामांमध्ये चालढकल केल्याप्रकरणी पुणे विद्यापीठाने १६ प्राध्यापकांवर कारवाई केल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे.

लॉच्या व‌िद्यार्थ्यांना आता दुप्पट भुर्दंड

0
0
मुकाटपणे न‌िकालाची प्रत‌ीक्षा करीत मुस्कटदाबी सहन करणाऱ्या लॉ शाखेच्या व‌िद्यार्थ्यांच्या ख‌िशाला व‌िद्यापीठाने पुन्हा कात्री लावली आहे. रिचेकींगसाठी लागणाऱ्या रकमेसोबतच उत्तर पत्र‌िकांचीही प्र‌िंट आऊट घेणे व‌िद्यार्थ्यांना सक्तीचे करण्यात आले आहे.

भद्रकालीत दोन गटांत हाणामारी

0
0
किरकोळ कारणावरून वाद उद्भवल्यानंतर आमनेसामने आलेल्या दोन गटांत मंगळवारी रात्री भद्रकालीत हाणामारी झाली. या घटनेदरम्यान येथील मोठा राजवाडा भागात दगडफेक करून वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या.

मनसे नगरसेवकांची मंगळवारी ‘परीक्षा’

0
0
महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून मुंबई गाठणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या मंगळवारी महापालिकेचे सर्व नगरसेवक, आमदार तसेच पदाधिकाऱ्यांना कृष्णकुंज येथे बोलवले आहे.

तक्रारदाराकडून पैसे उकळण्यास ब्रेक

0
0
तपासकार्या‌त पैशांची गरज भासल्यास पोलिसांना स्वत:च्या किंवा तक्रारदाराच्या खिशात हात घालावा लागणार नाही. त्यांना त्यासाठी स्वतंत्र इन्वेस्टिगेशन फंड (तपास निधी) मिळण्यास सुरूवात झाली आहे. नाशिक पोलिसांना पहिल्या टप्प्यात १८ लाख रुपये फंड मिळाला आहे.

युवक काँग्रेसची वेबसाईट स्लो

0
0
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावात काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी सोशल मीडियासाठी स्वंतत्र सेल उभारण्यासह पक्षाला ऑनलाइनदृष्ट्या सक्षम करत असताना पक्षाची महत्त्वपूर्ण फळी मानल्या जाणाऱ्या युवक काँग्रेसची वेबसाइट मात्र बुधवारी संथ झाली होती.

व्हॉटसअॅपने उडविली पोलिसांची धांदल

0
0
द्वारका परिसरात गोळीबार झाल्याची माहिती व्हॉटसअपवरून बुधवारी दुपारी शहरात पसरल्याने भद्रकाली पालिसांची धांदल उडाली. या माहितीची तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी स्वत: कर्मचाऱ्यांसह द्वारका परिसर ‌पिंजून काढला.

भिंत कोसळून ६ जण जखमी

0
0
कळवण येथे आठवडे बाजाराच्या दिवशी बाजार रस्त्याला लागून असलेल्या जुन्या पडीक घराची भिंत कोसळून सहा जण जखमी झाले. त्यातील ‌तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन पुरुष, तीन महिला व बालिकेचा समावेश आहे.

संभाजी चित्रपटाला विरोध

0
0
येत्या शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘संभाजी १६८९’ या चित्रपटाला छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने विरोध केला आहे. या चित्रपटात खोटा इतिहास दाखविण्याचा प्रयत्न करतानाच जातीय तेढ निर्माण होणार असल्याचा दावा करीत ब्रिगेडने विरोध केला असून यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

पुन्हा मागविले सेतूसाठी टेंडर

0
0
नाशिक शहर आणि ग्रामीण भागासाठी जिल्हा प्रशासनाने काढलेल्या टेंडरला अल्पसा प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा टेंडर काढण्यात येणार आहे. तसेच, नव्या टेंडरसाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे.

प्रशासनाकडून रजेबाबत डोळेझाक

0
0
सतत महिनाभर रजेवर जाणाऱ्या सर्वसामन्य कर्मचाऱ्यांविरोधात अहवाल तयार करून स्थायी समितीसमोर ठेवणाऱ्या प्रशासनाकडून उपायुक्त दीपक कासार यांच्या रजेबाबत मात्र डोळेझाक केली जात आहे. वर्ग दोन किंवा वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना २४० दिवसांपर्यंत अर्जित रजा घेता येते, असा दावा प्रशासनाकडून केला जातो आहे.

'वंशवेल'च्या अनुदानास विरोध

0
0
महापालिकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून छोटीछोटी कामे रखडली आहेत. अशा पार्श्वभूमीवर महापालिकेने चित्रपट निर्मात्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला तर महापालिकेविरोधात महसूल हानीचा दावा दाखल करण्यात असा इशारा सातपूर प्रभाग समितीचे सभापती विलास शिंदे यांनी दिला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images