Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

युवकाचा बुडून मृत्यू

$
0
0

नाशिकरोड : बंधाऱ्यात मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेल्या कॉलेज युवकाचा बुडून मृत्यू झाला. शिंदे गावात बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अजिंक्य नंदकिशोर जाधव (वय १८) या युवकाचे नाव आहे. अजिंक्य गावाजवळील लोहार आंबा सिमेंट केटी वेअर बंधाऱ्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. ट्यूबच्या सहाय्याने तो पोहोण्याचा प्रयत्न असताना त्याच्या हातातील ट्यूब निसटला. रात्री सात वाजेच्या दरम्यान त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या पश्चात आई व लहान भाऊ असा परिवार आहे. त्याच्या वडिलांचे काही वर्षापूर्वीच निधन झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टेबल टेनिस स्पर्धा १९ पासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा टेबल टेनिस संघटना आयोजित कै. जितमलजी छाजेड स्मृती प्रित्यर्थ नाशिक जिमखाना येथे १९ ते २१ ऑक्टोबर दरम्यान जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतून १० ते १६ नोव्हेंबर दरम्यान बालेवाडी-पुणे येथे होणाऱ्या आंतरजिल्हा व राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याच्या संघाची निवड केली जाणार आहे. तरी या स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य आहे.

पुरुष एकेरी, महिला एकेरी, युथ मुले, मुली, ज्युनिअर मुले, मुली, सब ज्युनिअर मुले, मुली, कॅडेट मुले, वेटरनं पुरुष अशा विविध बारा गटात या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे जय मोडक, अजिंक्य शिंत्रे व पुरषोत्तम आहेर यांच्याकडे १७ ऑक्टोबर पूर्वी द्यावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय स्पर्धेसाठी निवड

$
0
0

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत डे केअर सेंटर शाळेची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत ३५ शालेय संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत १४ वर्षे मुलींच्या आणि १७ वर्षे मुलांच्या गटात डे केअर सेंटर शाळा प्रथम येत दुहेरी मुकुटाचा मान पटकावला. सदर संघ पाचोरा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. क्रीडा शिक्षक बाळासाहेब रणशूर यांनी शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुपूरला विजेतेपद

$
0
0

…नाशिक : नांदेड क्लब, नांदेड आयोजित अखिल भारतीय लॉन टेनिस स्पर्धेत नाशिकच्या एस टेनिस अकॅडमीच्या नुपूर गुप्ता हिने १४ वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावले. तिने दुसऱ्या मानांकित ऋषिका डोईफोडे हिला सहजरीत्या ६-२,६-२ ने गारद करून ही स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा ६ ते ८ ऑक्टोबर रोजी झाली. नुपूर गुप्ता ही फ्रावशी अकॅडमी मध्ये नववीत शिकत असून ती एनडीटीए मध्ये एस. टेनिस अॅकेडमीचे प्रमुख व लेव्हल ३ कोच आदित्य राव यांच्याकडे नियमित सराव करते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डे स्कूल, किड्स अकादमी विजयी

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा क्रीडा अधिकारी आणि नाशिक जिल्हा सेपकटकरा असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय सेपकटकरा स्पर्धेत मुलांमध्ये नवजीवन डे स्कूलने तर मुलींमध्ये किड्स अकादमी (सिन्नर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये मुलांच्या १४ वर्षे नाशिक महानगर गटात नवजीवन डे स्कूल या संघाने प्रथम तर काकासाहेब देवधर स्कूल संघाने दुसरा क्रमांक मिळविला. नाशिक जिल्हा १४ वर्षे मुलांच्या विभागात किशोर सूर्यवंशी स्कूलने अंतिम लढतीत के. के. वाघ विद्याभवन (निफाड) संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले. १४ वर्षे मुलींमध्ये किड्स अकादमीच्या ने अंतिम लढतीत के. के. वाघ विद्याभवन शाळेचा पराभव करून विजेतेपद मिळविले. उर्वरित १७ आणि १९ वर्षे वयोगटाच्या स्पर्धा आज (११ ऑक्टोबर) रोजी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माता-बालकांची ‘झेरॉक्स’वर नोंद

$
0
0

अंगणवाड्यांमध्ये वर्षभरापासून रजिस्टरच नाही; सभापतींच्या दौऱ्यातून स्थिती उघड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात आदिवासी भागात काम करणाऱ्या अंगणवाडी येथे विविध माहिती ठेवण्याठी असलेले रजिस्टर वर्षभरापासून उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. महिला बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर यांनी या भागाचा अचानक दौरा केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. या रजिस्टरमध्ये गर्भवती मातांसह कुपोषित बालकांची माहितीची नोंद ठेवण्यात येते. रजिस्टर संपल्याने अंगणवाडी सेविका झेरॉक्स करून माहितीची नोंद करत असल्याचे समोर आले आहे.

अंगणवाडीमध्ये १ ते ११ नमुना रजिस्टर देण्यात येते. या रजिस्टरमध्ये गर्भवती माता, कुपोषित बालक, पोषण आहार, स्तनदा माता, हजेरी पुस्तक, शेरे पुस्तक सह विविध प्रकारची माहितीची नोंद ठेवण्यासाठी रजिस्टर असते. पण, हे रजिस्टरच नसल्याने अंगणवाडी सेविकांची अडचण होत आहे. जिल्हा परिषदनेने यासाठी तरतूद केली असली तरी त्याच्या निविदा काढल्या नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नाजूक विषय असलेल्या या प्रकरणात प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचेही समोर आले आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर यांनी बुधवारी आदिवासी भागात अचानक भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर सुरगाणा तालुक्यातील जि. प. सदस्या ज्योती गणेश जाधव, सुरगाणा प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप भिंगारे, बाऱ्हे प्रकल्पचे बालविकास अधिकारी समाधान नागने उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रतापगढ, अलंगुण, घोडांबे, कोठुला येथील अंगणवाडी, उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेटी दिल्या. तसेच सुरगाणा व बाऱ्हे येथील एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्प कार्यालय भेट देत पर्यवेक्षिकांची कामकाज आढावा बैठक घेतली. पर्यवेक्षिकांनी अंगणवाडी केंद्रांना नियमित भेटी देऊन कामकाजात सुधारणा करावी; अन्यथा कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

बालकांचे वजन तपासले

भेटीत सभापती खोसकर यांनी अंगणवाडी केंद्र अलंगुण व धोडंबे येथे बालकांचे प्रत्यक्ष वजन व दंड घेर मापे घेऊन कुपोषणाबाबत खात्री केली. गर्भवती महिला व स्तनदा माता यांना अमृत आहार योजनेचा लाभ, आरोग्य सेवा दिली जाते का याची चौकशी केली. गर्भवती महिला व स्तनदा माता यांना आरोग्य विषयक स्वच्छता बाबत मार्गदर्शन केले.

स्थानिक पातळीवर खरेदी नाही

ग्रामपंचायतने मागील तीन वर्षात महिला व बालकल्याण विभागासाठी १० टक्के राखीव निधीमधून कोणत्या बाबींवर खर्च केला याबाबत सभापती खोसकर यांनी माहिती घेतली. अमृत आहार योजनेतंर्गत साहित्य स्थानिक पातळीवर खरेदी करावे असे अपेक्षित असताना तसे होताना दिसून येत नसल्याचे काही ठिकाणी आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार चषक उद्यापासून

$
0
0

नाशिक : नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने १२ ते १४ ऑक्टोबर दरम्यान स्वामी विवेकानंद मनपा शाळा क्र. १४ व ३६ च्या मैदानावर ६६ व्या वरिष्ठ गट नाशिक जिल्हास्तरीय पुरुष व महिला अजिंक्यपद व निवड चाचणी आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील पुरुषांच्या ५५ संघांनी, महिलांच्या १४ संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेसाठी चार मैदाने तयार करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापक आजपासून कामावर

$
0
0

आंदोलन मागे घेत असल्याची 'एमफुक्टो'ची घोषणा

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

पंधरवड्यापासून सुरू असलेले कामबंद आंदोलन मागे घेत प्राध्यापक गुरुवारपासून (दि. ११) कामावर रुजू होणार असल्याजे जाहीर करण्यात आले आहे. राज्य तक्रार निवारण समितीच्या इतिवृत्तात अपेक्षित ठिकाणी करण्यात आलेल्या सकारात्मक बदलांच्या परिणामी हे आंदोलन मागे घेत असल्याचे 'एमफुक्टो'च्या अध्यक्षा डॉ. तापती मुखोपाध्याय आणि सचिव डॉ. एस. पी. लवांदे यांनी म्हटले आहे.

इतिवृत्तात मांडण्यात आलेल्या विषयांमध्ये प्राध्यापक भरतीवरील बंदी उठविणे, ७१ दिवसांच्या संप काळातील थकीत वेतन देणे, सातव्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेस गती देणे आणि विनाअनुदानित इंजिनीअरिंग कॉलेजमधील सेवकांसाठी वेतन व्यवस्था निर्माण करावी आदी मुद्द्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे संघटनेने म्हटले आहे. प्राध्यापकांना लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनाचा अधिकार असला तरीही विद्यार्थीहिताचा विचार करता प्राध्यापकांनी हे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले होते. यानुसार या बैठकीत विद्यार्थी हित जपण्यासाठी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आंदोलनात जिल्ह्यातून हजारपेक्षा अधिक प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान संघटनेच्या निर्णयानंतर आता आंदोलनात सहभागी असलेले प्राध्यापक गुरुवारपासून (दि. ११) कामावर रुजू होतील, अशी माहिती 'पुक्टो'चे जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश ठाकरे, प्रा. राजेंद्र नवले, प्राध्यापक महासंघाचे राज्य पदाधिकारी प्रा. डॉ. नंदू पवार, प्रा. डॉ. धीरज झाल्टे, प्रा. अर्जुन नेरकर यांनी दिली.

शुक्रवारचा मोर्चा रद्द

प्राध्यापकांनी आजपासून (दि. ११) कामावर रुजू व्हावे, असे आवाहन 'एमफुक्टो'ने आंदोलनात सहभागी प्राध्यापकांना केले आहे. आंदोलनाचा भाग म्हणून शुक्रवारी (दि. १२) विद्यापीठांवर काढण्यात येणारा पूर्वनियोजित मोर्चाही रद्द करण्यात आला आहे. या मोर्चाऐवजी घटक संघटनांच्या शिष्टमंडळाने आपापल्या विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेऊन २५ सप्टेंबरच्या बैठकीचे सुधारित इतिवृत्त व प्राध्यापक महासंघाच्या कार्यकारी मंडळाने १० ऑक्टोबरच्या बैठकीत घेतलेले निर्णय लक्षात आणून द्यावे, असा निर्णय 'एमफुक्टो'च्या बैठकीत झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसाने वृक्षतोड केल्याचा आरोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

कायद्याचे रक्षण करून गुन्हेगारांवर वचक निर्माण करणाऱ्या पोलिसांकडूनच कायद्याची पायमल्ली होत असल्याचा प्रकार पाथर्डी फाटा येथील पोलिस वसाहतीत घडला आहे. या वसाहतीत राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्यानेच येथील वृक्षाची विनापरवाना तोड केल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या पोलिस वसाहतीत अनेक इमारती असून पोलिस अधिकारी व कर्मचारी येथे वास्तव्यास आहेत. येथील जी इमारतीमध्ये असणाऱ्या एका पोलिसाने एका व्यक्तीला बोलवून झाडाच्या फाद्यांची तोडणी केली. काही महिला व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी 'मी माझे काम करतो, तुम्ही तुमचे काम करा' असे सांगून या पोलिसांची बोळवण केली. विशेष म्हणजे याबाबत महापालिकेला कोणतीही माहिती न देता ही वृक्षतोड केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फांद्या तोडण्यात आलेल्या वृक्षाखाली सावलीत अनेक पोलिसांना वाहने उभी करता येत होती. त्यामुळे महापालिकेने वृक्षतोडीची चौकशी करावी आणि संबंधितावर कारवाई करावी तसेच पोलिस खात्याने या कर्मचाऱ्याला समज द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुसार

$
0
0

भुसार मालाच्या

केंद्राची सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शेतमाल विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळावा या उद्देशाने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिन्नर फाटा येथील उपबाजार समिती आवारात भुसार मालाच्या खरेदी व विक्री केंद्राची सुरुवात करण्यात आल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिली.

घटस्थापनेच्या मुहुर्तावर बुधवारी सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार समिती आवारात भुसार मालाच्या खरेदी विक्रीचा प्रारंभ चुंभळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपसभापती युवराज कोठुळे, मनपा प्रभाग सभापती पंडित आवारे, माजी उपसभापती संजय तुंगार, संचालक प्रवीण नागरे, संदीप पाटील, हेमंत खंदारे, दिलीप थेटे, रुंची कुभारकर, विमल जुंदे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजाराम धनवटे, सचिव अरुण काळे शाखा अधिकारी लालदास तुंगार,आदी उपस्थित होते.

.............

याप्रसंगी उपस्थ्ति शेतक-यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.याप्रसंगी चुंभळे म्हणाले की,बाजारसमितीत शेतक-यांनी शेतमाल विक्री केल्यास पैशांची जबाबदारी बाजार समितीचे असते.त्यामुळे शेतक-यांच्या शेतमालास या बाजार समितीत संरक्षण मिळते.जोखीम कमी होती.म्हणुन कार्यक्षेत्रातील गावांतील शेतक-यांनी आपला भुसार शेतमाल विक्रीसाठी सिन्नर फाटा येथील कृषि उपबाजार समितीत विक्री करण्यासाठी प्राधान्य द्यावे असे आवाहनही चुंभळे यांनी यावेळी केले.या ठिकाणी शेतकरी व व्यापा-यांना आवश्यक त्या मुलभुत सुविधा बाजार समितीतर्फे उपलब्ध करुन दिल्या जातील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या उपबाजार समिती आवारात लवकरच पेट्रोलपंपही सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भुसार मालाच्या खरेदी विक्री केंद्राचे उद्घाटन झाल्यावर या बाजार समितीत पहिल्याच दिवशी सोयाबीन ३२६० रूपये, मुग ५५५५ रुपये, हरभरा ५१००,रूपये, मकाची १७५१ रुपये दराने लिलाव झाला.अशोक खालकर,निवुती पवार, सोमनाथ भोर,साहेबराव पाटील, सुनील पवळे प्रकाश शेळके या शेतक-यांनी शेतमाल विक्री साठी आणला होता. भुसार शेतमालाच्या लिलावात ओमसाई टेडिंग कंपनी, योगास,टेडिंग कंपनी,मनाली,टेडिंग कंपनी समुध्दी ,टेडिंग कंपनी,भावना टेडिंग कंपनी या व्यापारी वर्गाने सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रपती दौऱ्याबाबत प्रशासनास सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बागलाण तालुक्यातील श्री क्षेत्र मांगीतुंगी येथे २१ ते २४ ऑक्टोबर या काळात शरदपौर्णिमा महोत्सव होत असून 'विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद २२ ऑक्टोबर रोजी येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (दि. १०) बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला.

श्री क्षेत्र मांगीतुंगी (ऋषभदेवपूरम) येथे होणाऱ्या या संमेलनासाठी राष्ट्रपती कोविंद यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अन्य मान्यवरही संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात अती महत्त्वाच्या व्यक्ती सहभागी होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तयारीचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, ग्रामीणचे पोलिस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा, महावितरण, आरटीओसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मांगीतुंगीला उद्या भेट

राष्ट्रपतींसह अन्य मान्यवरांची सुरक्षितता, महोत्सवाच्या ठिकाणी हेलिपॅड उभारणे, मंडप, स्टेजची उभारणी, मांगीतुंगीला जोडणारे रस्ते, वीज, पाणीपुरवठा, आपत्ती व्यवस्थापन, वाहनतळाची सुविधा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलिस अधीक्षक संजय दराडे शुक्रवारी (दि. १२) मांगीतुंगीला भेट देऊन तयारीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिकस्थळांच्या विश्वस्तांची आज बैठक

$
0
0

नाशिक : महापालिकेने ५०३ धार्मिकस्थळांना अनधिकृत ठरवून हातोडा फिरवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या कारवाईवरून महापालिका प्रशासनाला उच्च न्यायालयातूनच धडा शिकविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी स्थापन केलेल्या धार्मिकस्थळ बचाव कृती समितीचा आज, गुरुवारी गोदावरी किनारी सायंकाळी ६ वाजता धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची बैठक होत आहे. त्यात नोटीस प्राप्त शहरातील विविध धार्मिकस्थळांच्या पदाधिकारी वा विश्वस्तांनी एकत्र येवून पुरातन असल्याबाबतचे कागदपत्र गोळा केले जाणार आहेत. या बैठकीला महापौरांसह नगरसेवकांनाही निमंत्रीत केले असून, पुन्हा पालिकेच्या कारवाई विरोधात हायकोर्टात जाण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाणार आहे. सोबतच पालिका प्रशासनाकडून ऐन सणासुदीच्या काळात ही कारवाई केली जात असल्यावरून पालिकेलाच घेरण्याची तयारी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कथा बोथट कात्री अन् धारेची!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वागताला आणलेले गुलाबाचे फुल आणि फित कापण्यासाठी आणलेल्या कात्रीवरून महापालिकेतील पदाधिकारी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एकमेकांवर शेरेबाजी करीत, परस्परांना शालजोडीतले दिले. मला काट्याची फुले स्वागताला द्या, परंतु पदाधिकाऱ्यांना काटेरी फुले देऊ नका असे सांगत मुंढे यांनी पदाधिकाऱ्यांना चिमटा काढला. तर, कमी धार असलेली कात्री फित कापण्यासाठी मिळाल्याने वैतागलेल्या महापौरांसह सभागृहनेते दिनकर पाटील यांनी 'आम्हाला कात्रीसुद्धा बोथट दिली'असा टोला मुंढे यांना लगावला. त्यावर अण्णा, तुमची (भाजप) 'धार' कमी झाल्याचा चिमटा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी काढताच उपस्थितांमध्ये हास्याची फवारे उडाले. या वाक्यावर मुंढे यांनी बोरस्तेंना टाळी देत प्रतिसाद दिल्याने उपस्थितामध्ये खसखस पिकली.

स्मार्ट सिटी अंतर्गत गोल्फ क्लब मैदानावर सायकल शेअरिंग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा बुधवारी पार पडला. या सोहळ्याला मुंढेंसह महापौर, सभागृनेते, विरोधी पक्षनेते यांच्यासह संचालक उपस्थित होते. महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांचे संबंध हे सर्वश्रुत आहेत. एरवी एकमेकांवर टोलेबाजी करण्याची संधी दोघेही कुठेही सोडत नाही. त्याचा प्रत्यय या कार्यक्रमातही आला. कंपनीच्या सीईओंनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत गुलाबाचे फुले देऊन केले. त्यावर मुंढे यांनी मला काटे असलेली फुले दिली तरी चालतील, पण पदाधिकाऱ्यांना काटे असलेली फुले देऊ नका असा चिमटा काढला. त्यावर एका मुंढेसमर्थकाने दोन पावले पुढे जात साहेबांनी असे अनेकांचे काटे काढले आहेत, अशी मल्लिनाथी केली. साहेब, नुसतेच काट्याने काटे काढण्यात पटाईत आहेत, असा टोला बोरस्ते यांनी यावेळी लगावला. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये हशा पिकला. लोकार्पणावेळी लावलेल्या फित अनावरण प्रसंगी दिनकर पाटील, महापौर भानसी, मुंढे, बोरस्ते यांच्या हातात कात्री देण्यात आल्या होत्या. यावेळी पाटील, भानसी यांच्या कात्री चालल्याच नाहीत. त्यांनी कात्री लावण्यापूर्वीच मुंढे फित कापून मोकळे झाले. त्यावर पाटील यांनी, 'साहेब इथेही आम्हाला कात्री बोथट दिली' असा टोमणा मुंढेंना मारला. या हास्यवातावरणातच बोरस्तेंनी, 'अण्णा तुमची (भाजपची) धारच बोथट झाली' असा चिमटा काढला. त्यावर मुंढेंसह सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांना हसू आवरेनासे झाले.

-

मुख्यमंत्र्यांचा डोस लागू

गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तासंह पदाधिकाऱ्यांना समन्वयाने काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे या सूचनेनंतर प्रथमच बुधवारी आयुक्त व पदाधिकारी एकमेकांसमोर आले होते. मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानंतर दोघांनीही एकमेकांशी चर्चा करत आणि टोलेबोजी करत, दोघांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधी सप्ताहात १३५ जणांवर गुन्हे

$
0
0

मद्यासह तब्बल ११ लाखांचा मुद्येमाल जप्त

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महात्मा गांधी जयंतीनिमित्त १ ते ८ ऑक्टोबर या काळात झालेल्या गांधी सप्ताहात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यासह तब्बल ११ लाखाचा मुद्येमाल जप्त केला. अवैध दारू आणि ताडी विक्री, बेकायदा वाहतूक, तसेच गावठी दारू निर्मिती केंद्र, हातभट्ट्या उध्वस्त करीत १३५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

राज्य उत्पादन शुल्कचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक चरणसिंग राजपूत व उपअधीक्षक सी. पी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी सप्ताहात विशेष मोहीम राबविण्यात आली. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीला आळा घालण्यासाठी नऊ भरारी पथकांच्या मदतीने जिल्हाभर कारवाया करण्यात आल्या. मुंबई दारूबंदी कायद्यान्वये वारस गुन्ह्यात तब्बल १३५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ८८८.१८ बल्क लिटर देशी तर १३२.४८ बल्क लिटर विदेशी मद्य आणि २७.५४ बल्क लिटर बिअर जप्त करण्यात आली.

केंद्रशासित प्रदेशातून कर चुकवून येणारे मद्य सिमाभागात पकडण्यात आले. राज्य उत्पादन शुल्कने तब्बल ३८२.९ बल्क लिटर विदेशी मद्य आणि बिअरचा साठा हस्तगत केला. ग्रामीण भागात हातभट्या उद्धवस्त करून १ हजार १३४ लिटर गावठी दारू जप्त केली. तर १ हजार २६० लिटर रसायन नष्ट करण्यात आले. १८० लिटर ताडी हस्तगत करण्यात आली. या सप्ताहात वाहनांसह १० लाख ९३ हजार ५८३ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीक कापणीची ३८ गावांत पाहणी

$
0
0

नाशिक : जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या सिन्नर, मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील ३८ गावांची निवड पीक कापणी प्रयोगासाठी करण्यात आली आहे. पीक कापणी प्रयोगाबरोबरच या गावांत टंचाई निवारणाच्या उपाययोजना करा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यात नांदगाव तालुका - कांतीनगर, वाखारी, हिरेनगर, अस्तगांव, हिसवळ बु., गोंडेगाव, कुसूमतेल, पिंप्री हवेली, अनकवाडे, अस्वलदरा. मालेगाव तालुका - सोयगांव, अजंग, आघार बु., टिंघरी, दहिदी, सौंदाने, टाकळी, अजंदे खु., जळगाव नि., मेहूणे, सायने बु., कळवाडी, गुगळवाडी, घाणेगांव, रामपूरा. सिन्नर तालुका - केदारपूर, मुसळगांव, पिंपळगाव, श्रीरामपूर, फदार्पूर, घोटेवाडी, दुशिंगवाडी, आगासखिंड, विंचुरदळवी, गोंदे, सोनेवाडी, आडवाडी, आशापूर या गावांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सफाई कर्मचाऱ्यास वाहनाची धडक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानासमोरील रस्त्यावरील दुभाजकाची स्वच्छता करताना महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला चार चाकी वाहनाने धडक दिल्याने कर्मचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. १०) घडली. दुभाजकाची स्वच्छता ही बांधकाम विभागाची जबाबदारी असताना कुठल्याही सुरक्षा साधनांविना दुभाजक स्वच्छतेचे काम सफाई कर्मचाऱ्यांच्या माथी मारण्यात आल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करत वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने अपघातस्थळी आंदोलन केले. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आयुक्त तुकाराम मुंढेंकडे निवेदनाद्वारे केली. बुधवारी सकाळी गोपाल गिलातर नावाचा सफाई कर्मचारी गंगापूररोडवरील प्रमोद महाजन उद्यानासमोर दुभाजकाची स्वच्छता करत असताना एका चार चाकी वाहनाने त्यास धडक दिली. सुदैवाने सदर कर्मचाऱ्याने वेळीच सावधगिरी बाळगल्याने केवळ किरकोळ दुखापतीवर निभावले. वास्तविक अशाप्रकारची स्वच्छता करताना रस्ता बंद करणे अथवा आवश्यक अंतरावर बॅरेकेडिंग लावणे गरजेचे असते. परंतु, अशी कुठलीही साधने महापालिकेने कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून न दिल्याने हा अपघात घडल्याचा आरोप संघटनेने आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोल्डन बाबासह चार जण गजाआड

$
0
0

गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधू महाराज असल्याचे भासवत कधी दर्शन घेण्यास सांगून तर कधी पत्ता विचारण्याचा बहाणा करीत दोघा वृद्धांच्या सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या गोल्डन बाबासह चौघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गुजरातमधून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून वॅगन आर कारही जप्त करण्यात आली आहे.

सुरेशनाथ सुरमनाथ मदारी (वय ३०), संशयित साधू राजुनाथ जोरानाथ मदारी (वय १९), राजुनाथ अर्जुननाथ मदारी (वय १९), श्रावण कमलनाथ मदारी (वय २४, सर्व रा. मदारी वास, तालुका हलोल, जिल्हा पंचमहल, गुजरात) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी नाशिकमध्ये दोन सोनसाखळ्या हिसकावल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरात दोन दिवसांपूर्वी मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून चोरट्यांनी पोबारा केल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर संशयित पसार झाले. गुन्हा शाखा युनिट एकचे सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर, हवालदार वसंत पांडव, येवाजी महाले, प्रवीण कोकाटे आदींचे पथक तपासासाठी गुजरात राज्यात गेले होते. तेथून त्यांनी संशयितांना ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवाना रद्द निर्णयाविरोधात आज व्यापारी संघटनांची बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्लास्टिक आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द करण्याचा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आदेश दिल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात हा निर्णय घेतल्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, त्यामुळे व्यापार करणे अवघड होणार असल्याचे सांगण्यात आले. या निर्णयाविरुध्द व्यापाऱ्यांनी गुरुवारी त्र्यंबक रोडवरील एका हॉटेलमध्ये सकाळी ९ वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.

राज्यात ई-कॉमर्ससाठी लागणाऱ्या पॅकेजिंग मटेरियलला तीन महिन्यांसाठी विक्री करण्यास मुभा दिली होती. ती मुदत संपल्याने आता पर्यावरणपूरक पर्यायाचा वापर व्यापाऱ्यांनी करावा यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. बहुतांश व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्यामधून सामान देणे बंद केले असून, पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. पण, या पिशव्यांवरही कारवाई केली जात आहे. त्यामुळे त्यातूनही व्यापारी व अधिकाऱ्यांचे वाद होत आहे.

सरकारच्या निर्णयाबाबत व्यापाऱ्यांचा विरोध नाही. पण, सक्तीच्या कारवाईला त्यांचा विरोध आहे. प्लास्टिक आढळल्यास समज देणे त्यानंतर दंड करणे, अशी कारवाई करण्याला फारसा विरोध नाही. पण, दुकानाचे लायसन्स रद्द करणे याला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या विविध संघटना आता एकत्र येणार आहे. गुरुवारी या सर्वांची बैठक होणार आहे. त्याचप्रमाणे काही संघटना थेट सरकार बरोबर या निर्णयाविरुध्द सरकारशी चर्चा करणार आहे.

दुकानात फलक

प्लास्टिक बंदीनंतर काही दुकानदारांनी रिकाम्या पिशव्या परत घेवू त्या इतरत्र फेकू नये, असे फलकही दुकानाला लावले आहे. १० रुपये प्रती किलो दराने या पिशव्या घेण्याचे या फलकावर म्हटले आहे. व्यापाऱ्यांनी ग्राहकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी हा निर्णय घेतला आहे.

प्लास्टीक बंदीमध्ये अनेक गोष्टीच्या व्यावहारिक अडचणी आहे. त्यावर परवाना रद्द होवू शकतो का ? याचा अभ्यास सरकारने करणे गरजेचे आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहे.

- संतोष मंडलेचा, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स

प्लास्टिक दुकानात आढळल्यास थेट परवाना रद्द करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. सणाच्या दिवसात हा निर्णयामुळे व्यापाऱ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे आम्ही या विषयावर बैठक घेऊन त्यानंतर निर्णय घेवू.

प्रफुल्ल संचेती,अध्यक्ष, धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्या

$
0
0

मनमाड : जवळकी (ता. नांदगाव) येथील काशिनाथ श्रावण गायकवाड (वय ५०) यांनी मंगळवारी सायंकाळी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून विष प्राशन केले होते. मंगळवारी रात्री औरंगाबाद येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दीड ते पावणेदोन लाखांचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन जिल्हा परिषदेत आले दहशतवादी

$
0
0

अन् जिल्हा परिषदेत आले दहशतवादी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सकाळची अकरा वाजेची वेळ. जिल्हा परिषदेत नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना अचानक बंदुकीच्या फैरी झाडल्याचा आवाज झाला. कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेत आलेल्या प्रत्येकाने घाबरून विचारणा सुरू केली. ध्वनीक्षेपकावरून खुर्ची किंवा टेबलखाली बसण्याच्या सूचना दिल्या जातात. थोडा वेळ तणावात जातो; मात्र काही वेळाने हे प्रात्यक्षिक असल्याचे कळल्यावर सर्व काही पूर्ववत होते.

आपत्ती निवारण सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे हे मॉकड्रिल झाले. जिल्हा परिषद परिसरात या प्रात्यक्षिकांचे आयोजन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. जिल्हा परिषद परिसरात बॉम्ब ठेवल्याची बातमी येताच क्युआरटी आणि बॉम्ब शोधक पथक जिल्हा परिषदेत दाखल झाले. कर्मचाऱ्यांना पूर्वकल्पना दिली नसल्याने आपत्तीच्या वेळी द्यावयाच्या प्रतिसादाविषयी त्यांना यानिमित्ताने जाणून घेता आले. ध्वनीक्षेपकावरून त्यांनी सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या. बॉम्बशोधक पथकाने काही वेळानंतर बॉम्ब निकामी केला. आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने यावेळी प्रात्यक्षिकातील घटनांची नोंद घेतली. आपत्ती निवारण सप्ताहानिमित्ताने अशा प्रात्यक्षिकांचे आयोजन करून नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचे योग्यप्रकारे अंमलबजावणी हेाण्याबाबतही मार्गदर्शन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images