Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हरितविरोधात एल्गार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात हरितक्षेत्रा अंतर्गत प्रस्तावित नगरपरियोजना राबविण्याच्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कार्पोरेशन लिमीटेड कंपनीच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करत, या विरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. शेतकऱ्यांना न विचारताच परस्पर जमिनी हडपण्याचा डाव आखताच कशाला असा सवाल या शेतकऱ्यांनी केला असून बळजबरीने भूसंपादन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. 'एक इंचही जमीन देणार नाही' असे सांगत सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्याचा इशारा, महापौर, स्थायी समिती सभापती व जिल्ह्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीला जागेसाठी संघर्ष करावा लागणार आहे.

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने हरित क्षेत्र विकास कार्यक्रमा अंतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात नगरपरियोजना राबवली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महासभेच्या मंजुरीनंतरच त्याला हिरवा कंदील मिळणार असला तरी, या टीपी स्कीमला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. मखमलाबाद, हनुमानवाडी परिसरातील २९४ बाधितांपैकी २७६ शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कार्पोरेशन लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्यासह महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके-आहेर, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना निवेदन सादर करत स्मार्ट योजनेला लेखी हरकत नोंदवत त्यावर आक्षेप घेतला आहे. हरित क्षेत्र विकासांतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी भागातील ३१५ एकर क्षेत्रात नगररचना परियोजना राबविण्याच्या निर्णयाबाबत शेतकऱ्यांनी कोणतीही माहिती नाही.

स्मार्ट कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी महासभेच्या संमतीनेच ही योजना राबविली जाईल, असे सुतोवाच केला असला तरी कंपनीच्या कारभारात मात्र कुठल्याही प्रकारची पारदर्शकता दिसून येत नाही, असा आक्षेप शेतकऱ्यांनी नोंदवला आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन घेतली आहे, त्यात अनेकजण हे यापूर्वीच्या प्रकल्पांमध्येच बाधीत आहेत. त्यामुळे हरित क्षेत्र विकासासाठी ५० टक्के जमीन कोणत्याही परिस्थितीत दिली जाणार नाही, असा दावा शेतकऱ्यांनी निवेदनात केला आहे. जबरदस्तीने हे क्षेत्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर शरद कोशिरे, प्रकाश जगझाप, सुरेश पाटील, डॉ. दिनेश बच्छाव यांच्यासह २७६ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ईस्ट इंडिया कंपनी

जागा मालक शेतकरी विकासाच्या बाजुने असले तरी अगोदरच ते मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. महापालिकेने स्मार्ट सिटीच्या उभारणीवर खर्च करण्यापेक्षा नागरिकांना आधी मुलभूत सुविधा पुरवाव्यात, असे नमूद करत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी थविल यांच्या कार्यपद्धतीवरही जागा मालक शेतकऱ्यांनी टीकास्त्र डागले आहे. थविल यांची भूमिका लोकाभिमुख नाही. एकाधिकारशाहीने जागा मालक शेतकऱ्यांना ते वागणूक देत असल्याची तक्रार देखील या निवेदनाद्वारे केली आहे. कंपनीचा कारभार हा ईस्ट इंडिया सारखा सुरू असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

अहमदाबाद दौऱ्याला विरोध

हरित क्षेत्र विकासाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांच्या विरोध कमी करण्यासाठी सर्वांना अहमदाबादचा दौरा करून आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फड‌णवीस यांनी नाशिक दौऱ्यात दिले होते. त्यासाठी कंपनीतर्फे महापौरांसह शेतकऱ्यांची व नगरसेवकांची या दौऱ्यासाठी मनधरणी सुरू करण्यात आली आहे. परंतु ज्या वाटेला जायचे नाही, त्याविषयी चर्चा कशाला, अशा शब्दांत जागा मालक शेतकऱ्यांनी अहमदाबाद दौऱ्याला जाण्यास विरोध दर्शविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निमाने मांडले गाऱ्हाणे

$
0
0

निमाने मांडले गाऱ्हाणे

नाशिक : राज्य सरकारने उद्योगक्षेत्राचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ९ आमदारांची समिती गठीत केली असून, या समितीने नुकताच नाशिक येथील औद्योगिक वसाहतीचा दौरा केला. यावेळी निमाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन वसाहतीतल्या अडीअडचणी सांगितल्या. यावेळी आमदार समितीचे अध्यक्ष अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखालील समितीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन औद्योगिक क्षेत्रतील विविध घडामोडींचा आढावा घेतला.या समितीवर राज्यातील आ. माधुरी मिसाळ, आ. विजय काळे, आ. सुनिल शिंदे, आ. सुनिल केदार, आ. अमित झनक, आ. संदिप नाईक, आ. आनंदराव पाटील, आ. ॲड. हुस्नबानू खलिफे, आ. रामराव वडकुते या ९ आमदारांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांनी कानउघाडणी

$
0
0

रस्ते, पाणी, अस्वच्छतेवरून सातपूरमध्ये महापौर आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिका आयुक्तांच्या 'वॉक विथ कमिशर'ला तोड देण्यासाठी 'महापौर आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत रंजना भानसी यांनी मंगळवारी प्रभाग १० व ११ मध्ये सातपूर परिसराला भेट दिली. यावेळी स्थानिकांनी समस्यांचा पाढा वाचल्यानंतर रस्ते, पाणी, अस्वच्छता व गाजर गवताच्या समस्यांवरून महापौरांनी अधिकाऱ्यांना कानउघाडणी केली.

महापौर आपल्या दारी या उपक्रमास सकाळी दहा वाजेता अशोकनगर पोलिस चौकी येथून सुरुवात झाली. यावेळी सभागृहनेता दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके आहेर, मनसे गटनेता सलिम शेख, सभापती योगेश शेवरे, आरपीआय गटनेत्या दिक्षा लोंढे, नगरसेवक शशिकांत जाधव, नगरसेविका माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, सीमा निगळ, विक्रम नागरे यांच्यासह सर्वच विभागातील अधिकारी उपस्थित होते. निगळ चौकात दुपारी एक वाजता दौरा आटोपला.

राधाकृष्णनगर येथील मंजूर असलेला डीपीरोडची समस्या नगरसेविका बोलकर यांनी मांडली. जलकुंभ नव्याने उभारण्यात आला असतानाही पाणी वाहून जाण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आल्या नसल्याने अशोकनगर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची समस्या नगरसेवक जाधव यांनी मांडली. जलवाहिनीचे काम मार्गी लावावे व मंजूर डीपी रस्त्याला किमान खडीकरण करण्याचे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

१५ वर्षांपासून रस्ते नाही

प्रभाग १० मध्ये पाहणी दौरा होत असताना खड्डेमय रस्त्यांवरून महापौरांना चालण्याची वेळ आली. गेल्या १५ वर्षांपासून नवीन रस्तेच तयार करण्यात आले नसल्याकडे नागरिकांनी महापौरांचे लक्ष वेधले. याप्रश्नी महापालिकेचे अधिकारी आयुक्तांकडे अहवाल सादर करीत नसल्याचा मुद्दा नगरसेविका पाटील यांनी मांडला. खड्डेमय रस्त्यांची स्थिती आयुक्तांकडे तात्काळ मांडा, असे आदेश महापौरांनी दिले.

उद्यानात कचऱ्याचे ढिग

राधाकृष्णनगर येथील उद्यानात कचऱ्याचे ढिग आणि वाढलेले गाजर गवत पाहून सर्वच नगरसेवक संतप्त झाले. उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. त्यांनी कचरा लगेच उचलतो, असे उत्तर दिले. मात्र, महापौरांनी भेट दिली नसती, तर कचरा तसाच पडून ठेवला असता का, असा सवाल सभागृहनेते पाटील यांनी केला. तसेच सर्वसामान्यांनी कचरा जाळल्यावर कारवाई केली जाते. मात्र, महापालिका कर्मचारीच उद्याना कचरा जाळतात, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा मुद्दा पाटील यांनी मांडला.

मनपा शाळा समस्येच्या गर्तेत

महापालिकेच्या विश्वासनगर येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे विद्यालयात माध्यमिक शाळेत शिक्षकच कमी असल्याची समस्या नगरसेविका बोलकर यांनी मांडली. तसेच महापालिकेने मानधन दिले गेले नसल्याने इंग्रजी माध्यमातील शाळेच्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आल्याचे नगरसेवक जाधव म्हणाले. याबाबत आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे महापौर भानसी यांनी सांगितले. सातपूर कालनीतील प्रभाग ११ मधील जिजामाता विद्यालयात चार शाळा आहेत. तेथे एकाचवेळी तीन शाळा भरतात. शौचालयाची संख्या कमी असल्याचे नगरसेविका निगळ यांनी सांगितले. शहरासोबत मनपा शाळाही स्मार्ट कराव्यात, अशी अपेक्षा नगरसेवकांनी केली.

गाळे धारकांनी रचला समस्येंचा डोंगर

प्रभाग क्रमांक ११ मधील सातपूर कॉलनीतील पडून असलेल्या खोका मार्केटमुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे मनसे गटनेते शेख यांनी सांगितले. महापालिकेने गाळे धारकांना करारनामा करण्याबाबत नोटिसा बजावल्या. नोटिसा आताच का आल्या, असा प्रश्नही शेख यांनी केला. सातपूर गावातील छत्रपती शिवाजी भाजीमंडईतील भाजी विक्रेते व व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.

गावातील अतिक्रमणे हटवा

सातपूर गावातील ग्रामस्थांनी नेहमीचा त्रास असलेला मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा, अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली. स्थानिक रहिवाशांना सायंकाळी घराकडे येताना अथवा त्र्यंबक रोडकडे जाताना रस्त्याच उपलब्ध होत नाही, असे गाऱ्हाणे ग्रामस्थांनी मांडले. यावेळी काही उत्साही तरुणांनी अतिक्रमणाच मुद्दा लावून धरल्याने महापौरांनी आवाज वाढवत एकच समस्या किती वेळा सांगणार, असा खडा सवाल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपीस पोलिस कोठडी

$
0
0

सातपूर : सातपूर कॉलनीतील श्रीकृष्णनगरमधील आठ वर्षीय मुलाच्या लैगिंक शोषण प्रकरणातील संशयित आरोपी अकिल गुलाब मनियार याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मनियार याने असे प्रकार अगोदरही केले होते का, असे न्यायालयाने याबाबत तपासी अधिकारी रेश्मा अवतारे यांना विचारले. मनियार याने असे प्रकार अगोदर केल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, त्यावेळी लैंगिक शोषण झाल्याचे पुढे न आल्याने ती बाब लपून राहिली. दरम्यान, मनियार याला त्याच्या घरच्यांनीही भेटणे टाळल्याचेही समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेस्कॉम अध्यक्षपदी केदुपंत भालेराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ नागरिक महासंघ अर्थात फेस्कॉमची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, नाशिक-नगर विभागाच्या अध्यक्षपदी केदुपंत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.

नाशिक-पुणे रोडलगतच्या डिजीपीनगर परिसरात संघाच्या कार्यालयात फेस्कॉम कार्यकारिणीची त्रैवार्षिक सभा झाली. मावळते अध्यक्ष उत्तमराव तांबे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी २०१८-२०२१ या तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. गत कार्यकारिणीत सचिवपदाची धुरा वाहणारे केदुपंत भालेराव यांच्यावर नाशिक-नगर विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डॉ. हाजी सिकंदर शेख (उपाध्यक्ष), श्रीराम कातकाडे (सचिव), मनोहर वाघ (कोषाध्यक्ष), धनंजय चतुर (संपर्क सचिव) यांची निवड करण्यात आली आहे. उषा पवार, द्वारकाबाई धनवटे, सूर्यभान कदम, सुरेश बागड, शब्बीर पठाण यांचीही कार्यकारिणीवर निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनंत घोलप यांच्यासह कुलकर्णी आणि पाध्ये यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खो-खो स्पर्धेत संस्कृती, अलंगुण विजयी…

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने आयोजित पुरुष महिला जिल्हा आजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत मुलींच्या गटात संस्कृती व अलंगुण हे दोन्ही संघ विजयी ठरले. पुरुषांच्या गटात अलंगुण आश्रमशाळा विजयी झाली.

या स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे झाल्या. महिला गटात अंतिम सामना संस्कृती व अलंगुण आश्रम शाळा सुरगाणा व संस्कृती नाशिक यांच्यात झाला. महिलांचा सामना ४-४ असा बरोबरीत सुटल्यामुळे दोन्ही संघांना संयुक्त विजयी घोषित करण्यात आले. संस्कृतीकडून निशा वैजल, मनीषा पडेर, सोनाली पवार, वृषाली भोये तर अलंगुणकडून खेळताना हेमलता गायकवाड, कौशल्या पवार, योगीता पडेर यांनी उत्तम खेळ केला. पुरुष गटातील अंतिम सामना संस्कृती व अलंगुण यांच्यात झाला. या सामन्यात अलंगुण आश्रमशाळा विजयी ठरली. राष्ट्रीय खेळाडू गणेश राठोड, चंदू चावरे, दिलीप खांडवी, जगन फौजदार, वामन चौधरी यांनी उत्तम खेळ करीत १८-८ असा विजय मिळविला. संस्कृती संघाकडून खेळताना सशांक तरे, रतन शर्मा, दीपक चारोस्कर कौशिक झोईल यांनी संघाचा पराभव टाळू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉलीबॉल स्पर्धेत वावरे कॉलेज विजयी

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, स्थानिक क्रीडा समिती नाशिक विभाग व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे महाविद्यालय सिडको यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल मुलांच्या क्रीडा स्पर्धेत वावरे महाविद्यालयाचा संघ विजयी झाला. तर चांडक बिटको महाविद्यालय नाशिकरोडचा संघ उपविजयी ठरला. या स्पर्धेत नाशिक विभागातून एकूण ५३ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात उपांत्यपूर्व फेरीत मालेगाव सीटी कॉलेज विरुद्ध वावरे महाविद्यालय सिडको व के. के. वाघ इंजीनिअरिंगविरुद्ध चांडक बिटको महाविद्यालयात झाली. यातून उपांत्य फेरीत वावरे महाविद्यालय सिडको व चांडक बिटको महाविद्यालय यांच्यात झाला. वावरे महाविद्यालयाचा दणदणीत विजय झाला. या संघात मयूर लष्करे, अतुल कराळे, आकाश कर्पे, संदीप भामरे, विजय परदेशी, ऋषभ भोळे, राज पवार यांचा सहभाग होता. सदर क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरपीआय २०१९ मध्ये भाजपसोबतच राहणार

$
0
0

मालेगाव : २०१९ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ३०० पेक्षा अधिक जागा आम्हाला मिळतील. गेल्या चार वर्षात लोकांच्या हिताची कामे झाली आहेत. समाजातील सर्व घटकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. २०१९च्या निवडणुकीत शिवसेना जरी भाजपसोबत नसली, तरी आरपीआय मात्र भाजप सोबतच राहणार आहे, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. मंगळवारी रामदास आठवले मालेगाव दौरावर आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी पत्रकार परिषदेत अॅट्रॉसिटी कायद्याबाबत ते म्हणाले, हा कायदा सवर्णांवर अन्याय करणारा नसून, दलित आदिवासींना न्याय देणारा कायदा आहे. या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी काळजी घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. या कायद्यात बदल करा, अशी मागणी करणाऱ्यांनी आपल्या मनात बदल करावा. दलितांना आपले मित्र मानून त्यांच्या समवेत चांगले व्यवहार करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. संजय निरुपण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आठवले म्हणाले की त्यांच्या मताशी आम्ही सहमत नाही. त्यांची भूमिका मराठी माणसांचा अपमान करणारी आहे. यामुळे काँगेसला मोठे नुकसान होईल. संविधानाने देशात कुठेही राहण्याचा अधिकार आहे. सगळ्यांनी गुण्या गोविंदाने रहावे हीच आमची भूमिका आहे. पत्रकार परिषदेनंतर येथील बाजार समितीत आठवले यांची जाहीर सभा झाली. यावेळी देखील त्यांनी भाजप सेनेने एकत्रित यावे याचा पुनरुच्चार केला. जाहीर सभेत त्यांनी आपल्या मिश्कील कवितांनी उपस्थितांची मने जिंकलीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फास्ट न्यूज

$
0
0

फळबहाराचा गुरुवारी लिलाव

नाशिक : चांदवड येथील कृषि चिकित्सालय फळरोपवाटिकेतील प्रक्षेत्रावर सिताफळ, चिकू व चिंच फळबहाराचा जाहीर लिलाव ११ ऑक्टोबर रोजी होणाार आहे. प्रक्षेत्र कार्यालयात होणाऱ्या या लिलावात सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी सकाळी ११.३० वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन कृषि अधिकारी फळरोपवाटीका, चांदवड यांनी केले आहे.

सोडत प्रक्रिया १५ ला

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्राप्त झाले आहेत. परिपूर्ण पात्र अर्जातून बागलाण, दिंडोरी, कळवण, नाशिक, पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील नविन लाभार्थ्यांची निवड १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जिल्हा परिषद सभागृह, नाशिक येथे होणाऱ्या या सोडतीसाठी शेतकरी अर्जदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईतांची धरपकड

$
0
0

जिल्हाभरात ग्रामीण पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

..

- तीन वाहनचोर जेरबंद

- मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या ५२ सराईतांना प्रतिबंधक कारवाई

- २८३ वाहनचालकांवर कारवाई

- दारूबंदी संबंधित ३३ केसेस

- हॉटेल्स व ढाब्यांवर कारवाई

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (दि. ८) रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत आरोपींची धरपकड केली. या कारवाई तीन वाहनचोर पोलिसांच्या हाती लागले.

ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्याभरात एकाचवेळी ही कारवाई केली. नाकाबंदी, सराईत गुन्हेगारांची तपासणी, टवाळखोरांवर कारवाई असे काम यावेळी करण्यात आले. कोम्बिंग दरम्यान पोलिसांनी ढाबे व हॉटेल्सची तपासणी करीत अवैध मद्य विक्रेत्यांवर कारवाई केली. लासलगाव पोलिस स्टेशन हद्दीत विंचूर चौफुली येथे सहायक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी यांच्या पथकासह नाकाबंदी लावली होती. वाहनांची तपासणी सुरू असताना रवींद्र वसंत बेलेकर (वय २०, रा. विंचूर, ता. निफाड), गोरख पुंडलिक कदम (वय २२, रा. सोमठाणा, ता. येवला) आणि वाल्मीक भाऊसाहेब पिंपरकर (वय २८, रा. सोमठाणा, ता. येवला) असे तिघे पथकाच्या हाती लागले. या तिघांकडे विना क्रमाकांच्या हिरो आयस्मार्ट, पल्सर आणि हिरो शाईन या तीन दुचाकी सापडल्या. या तिन्ही दुचाकी संशयितांनी सटाणा, नांदगाव तसेच वैजापूर येथून चोरी केल्याची कबुली दिली. या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान मालमत्तेचे गुन्हे करणारे ५२ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या एक हजार २४७ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातील २८३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात येऊन ५४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दारूबंदी संबंधित ३३ केसेस करण्यात आल्या असून, त्यात ४८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स व ढाब्यांवर देखील कारवाई करण्यात आली. या दरम्यान कोर्टाकडून प्राप्त झालेल्या १४५ समन्स, २७ बेलेबल वॉरंट व ३७ नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली.

...

आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी अशाच पध्दतीने मिशन ऑलआउट तसेच कोम्बिंग ऑपरेशन सतत राबविण्यात येतील.

- संजय दराडे, पोलिस अधीक्षक

..

अवैध धंद्यावर छापे

ग्रामीण पोलिसांनी घोटी आणि देवळा तालुक्यातील लोहणेर शिवारात छापे टाकून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी सुमारे साडे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केले.

मंगळवारी (दि. ९) पहाटे घोटी पोलिस स्टेशन हद्दीतील खैरगाव भल्याची वाडी शिवारातील मोराचे डोंगर भागात छापे टाकून दुलाजी बुधा शिद, गोरख वाधू फोडसे व सोमनाथ अनाजी भले (रा. सर्व खैरगाव भल्याची वाडी ता. इगतपुरी) आदींच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने लोहणेर (ता. देवळा) येथील गिरणा नदीपात्र परिसरात छापे टाकत गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत उलशा रूंजा वाघ (रा. लोहणेर) हा संशयित हातभट्टीवर दारू निर्मिती करतांना सापडला. त्याच्या ताब्यातून गावठी दारू निर्मितीचे साहित्य व रसायन असा सुमारे ३३ हजार ७८० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी देवळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरात्रोत्सवासाठी एसटीच्या २२८ बसेस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिशक्तीचा उत्सव अर्थात नवरात्रोत्सवाला आज (दि.१०) पासून सुरुवात होत असून, भाविकांना देवीच्या देवस्थानापर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा नाशिक विभागही सज्ज झाला आहे. यंदा महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या आगारांमधून तब्बल २२८ बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून परिचित असलेल्या वणी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी केवळ राज्यातून नव्हे, तर देशभरातून भाविक येत असतात. नवरात्रोत्सवात वणी येथील सप्तशृंग गडावर खासगी वाहने घेऊन जाण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे गडावर जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस हा एकमेव पर्याय असतो. म्हणूनच प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता एसटी महामंडळाने एकूण २२८ बसेसची व्यवस्था केली आहे. यापैकी १०६ बसेस सीबीएस ते सप्तशृंग गड या मार्गावर धावणार आहेत. फक्त नांदुरी पायथा ते गड या मार्गावर ६० बसेस सज्ज असणार आहेत. मालेगाव येथून २५, मनमाड येथून १५, सटाणा, नाशिकरोड आणि दिंडोरी येथून प्रत्येकी पाच तर पिंपळगाव बसवंत येथून सात बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्याच्या १३ आगारांमधून एकूण २२८ बसेसची व्यवस्था केली आहे. यात्राप्रमुख म्हणून विभागीय वाहतूक अधिकारी अ. भ. सिया यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. गड आणि पायथा येथे महामंडळाच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

....

प्रवासभाडे

नाशिक ते सप्तशृंग गड : १०० रुपये

निमाणी ते सप्तशृंग गड : ९० रुपये

नांदुरी ते सप्तशृंग गड : १५ रुपये

मालेगाव ते सप्तशृंग गड : १२० रुपये

मनमाड ते सप्तशृंग गड : १२० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदोन्नतीबाबत मार्ग काढणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मॅटने पदोन्नतीसंदर्भात दिलेल्या आदेशाने १४८ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकासोबत चर्चा झाली असून, पदोन्नती आरक्षण कायद्यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून यातून मार्ग काढणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी यातून लवकरच तोडगा निघेल, असे सांगत दोनदा आरक्षणाचा प्रश्न कायद्यातून निकाली निघू शकतो, असा दावा केला आहे. दरम्यान, महिलांवर अत्याचार वाढल्याचे सांगत, अत्याचार करणाऱ्या सर्व गुन्हेगारांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

नाशिकमध्ये आल्यानंतर आठवले यांनी विश्रामगृहावर पत्रकांराशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना शेवटच्या क्षणी महायुतीसोबतच येईल, असा दावा करत शिवसेना महायुतीत आली नाही तर आरपीआयचा लोकसभेच्या राज्यातील चार जागावर दावा असेल, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या भेटीचा संदर्भ देत, साताऱ्याची जागा आरपीआयकडे असल्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र आणि गुजरातमधील उत्तर भारतीयांबाबत सुरू असलेल्या वादावरही आठवले यांनी भाष्य केले आहे. अत्याचार हे परप्रांतीयच करतात असे नाही, तर प्रांतीयही करतात असे सांगत, एका समुहाला टारगेट करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. अत्याचार करणाऱ्या सर्व गुन्हेगारांवर कठोर कारवाई होवून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे सांगत, सध्या महिलांवर अत्याचार वाढल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक अडचणी मांडा थेट कुलगुरुंकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यापीठस्तरीय परीक्षांची सुरुवात झाली आहे. विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांना परीक्षा व इतर शैक्षणिक कामकाजाच्या संदर्भात अनेक अडचणी संभवतात. या अडचणींवर उत्तर मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना थेट कुलगुरुंना प्रश्न विचारण्याची संधी पुन्हा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'प्रश्न तुमचे उत्तर कुलगुरुंचे' या उपक्रमात १६ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना कुलगुरुंना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत प्रश्न पाठविण्याची मुदत देण्यात आली आहे. 'PTUK 6' टाइप करून विद्यार्थ्यांना प्रश्न किंवा समस्या नावासहित ९१५८८५७०७० या क्रमांकावर व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसद्वारे पाठवायची आहे. तसेच vidyavanicr@gmail.com यावर विद्यार्थी ई-मेल करू शकतात. यानंतर विद्यावाणीतर्फे विद्यार्थ्यांना संपर्क साधून प्रश्न रेकॉर्ड केला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भित्तिचित्रांत उमटले पोलिसांचे कर्तृत्व

$
0
0

१७२ बाय ७ फूट भिंतीवर रेखाटन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोडवरील पोलिस मुख्यालयाच्या भिंतीवर रेखाटलेल्या भित्तिचित्रात नाशिक शहर पोलिसांच्या कर्तृत्वाची नोंद घेण्यात आली आहे. गेल्या महिन्यापासून हे भित्तिचित्र रेखाटण्याचे काम सुरू होते. मंगळवारी या भित्तिचित्रांचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, भित्तिचित्र साकारलेल्या भिंतीच्या कोनशिलेच्या उद्घाटनाचा मान पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पोलिस दलातील बॅण्ड मेजर संजय खैराते यांना दिला.

नागरिकांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणे आणि दंडात्मक कारवाईसह प्रबोधनपर कार्यक्रम राबविणे अशा अनेक उपक्रमांनी पोलिसांप्रती नवी प्रतिमा नाशिककरांच्या मनात निर्माण होत आहे. पोलिसांच्या याच विशेष कार्यावर आधारित भित्तिचित्र पोलिस मुख्यालयाच्या भिंतीवर रेखाटण्यात आले आहेत. पोलिसांमुळे नाशिककर सुरक्षित असून, पोलिसांची कायदा व सुव्यवस्था जतनासाठी उचलेल्या प्रत्येक कामाची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी हे भित्तिचित्र रेखाटले आहेत. १७२ बाय ७ फूट भिंतीवर खाकीच्या कर्तृत्वाची नोंद करण्यात आली आहे.

मंगळवारी सकाळी ११ वाजता पोलिस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळील भित्तिचित्रांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, सहायक आयुक्त भागवत सोनवणे, अजय देवरे, बापू बांगर, अशोक नखाते, आर्किटेक्ट शीतल सोनवणे आणि आर्ट ऑफ शीतल ग्रुपची टीम यांच्यासह गुन्हे शाखा व इतर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

...

'सेफ नाशिक'

सिंहस्थ कुंभमेळा, नाशिक पोलिस मॅरेथॉन, वाहतूक सुरक्षा उपक्रम, हेल्मेट जनजागृती, महिला सुरक्षा, पोलिस मित्र अॅप, सायबर क्राइम सुरक्षा सेल, पोलिस बंदोबस्त, नाकाबंदी, नो हॉर्न ऑल डे, बालमजुरी, रिमांड होम, ज्येष्ठ नागरिक संघ यावर आधारित नाशिक पोलिसांच्या उपक्रमांचे प्रातिनिधिक चित्र या भिंतीवर रेखाटले आहे. खास बाब अशी, की चित्राच्या सुरुवातीला हाताच्या ओंजळीत सर्व नाशिककर 'सेफ नाशिक' म्हणत असल्याचे चित्र आहे. त्यांच्यासमोर पोलिस अधिकारी उभे असल्याचे चित्र रेखाटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवड्यात ४४ जणांना डेंग्यूची लागण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मागील आठ दिवसांत शहरात डेंग्यूचा कहर वाढला असून, या कालावधीत डेंग्यूची लागण झालेल्या पेशंटची संख्या ४४ झाली आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहराची स्थिती गंभीर दिसते.

शहरात स्वाईन फ्लू आणि डेंग्यू या आजारांनी थैमान घातले आहे. बहुतांश हॉस्पिटल्समध्ये याच आजारांचे पेशंट दाखल असून, दिवसेंदिवस हा आकडा वाढतो आहे. नाशिक शहरात मागील अवघ्या आठ दिवसात ४४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. ग्रामीणमध्ये हे प्रमाण १८ इतके राहिले. शहरात १ जानेवारी ते ८ ऑक्टोबर या दरम्यान शहरात ५७७ नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद आहे. जवळपास दोन हजार ३३ संशयित पेशंट्सवर उपचार झाले. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले की, डेंग्यूची लागण झाल्याचे निश्चित करण्यासाठी एंझाइम लिंक्ड इम्युनोसॉरबेंट परीक्षण अर्थात एलिसा ही चाचणी महत्त्वाची असते. या चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यास डेंग्यूची लागण झाल्याचे निश्चित होते. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात डेंग्यूचा फैलाव तुलनेत कमी आहे. मागील आठवड्यात संशयित आणि लागण झालेल्या पेशंटच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, नागरिक आणि प्रशासनाने पुढाकार घेतल्याशिवाय डेंग्यूला आळा घालणे शक्य नसल्याचे संबंधीत डॉक्टरांनी स्पष्ट केले.

पाणी साठवावे की डेंग्यू रोखावा?

या आठवड्यात समोर आलेल्या १८ पैकी बहुतांश केसेस मनमाड येथील आहेत. याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, मनमाडसारख्या शहरात पाणीपुरवठा खूपच विलंबाने होतो. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा मोठा साठा करावा लागतो. अनेक दिवस पिण्यायोग्य गोड पाणी साठवून राहिल्यास त्यात डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या डासांची निर्मिती होते, असे संबंधितांनी स्पष्ट केले. त्यामुळे मनमाडकरांना पाणी साठवावे की डेंग्यू रोखावा, असा प्रश्न सतावत असून, याच प्रश्नाचे उत्तर प्रशासनालाही ठोसपणे देता येत नाही.

क्षेत्र- संशयित पेशंट- लागण झालेले पेशंट

नाशिक ग्रामीण- ३३०-८२

नाशिक शहर-२०३३-५७७

मालेगाव महापालिका- ६४-२१

एकूण-२४२७-६८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काश्मीर ते कन्याकुमारी अंतर १२ दिवसात!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककर सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन एका विश्वविक्रमाला गवसणी घालण्याच्या तयारीत असून, काश्मीर ते कन्याकुमारी हे ४ हजार किलोमीटरचे अंतर केवळ १२ दिवसात पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. वेगवान सायकलिंगचा विक्रम करण्यासाठीच्या या मोहिमेस 'के टू के सायकलिंग चॅलेंज' असे नाव देण्यात आले आहे.

या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड, यूएमसीए रेकॉर्ड्समध्ये याची नोंद घेण्यात येणार आहे. या मोहिमेत 'खेलो इंडिया' आणि 'तंबाखू बंद' या उपक्रमांना समर्थन करण्यात येणार आहे.

केवळ अभ्यास करूनच करिअर बनवता येते हा समज काढून पालकांनी आपल्या पाल्यांना खेळामध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असा संदेश या मोहिमेदरम्यान देण्यात येणार आहे. तर केवळ आरोग्य विषयी जागरूक लोकच मजबूत राष्ट्र निर्माण करू शकतात, या उक्तीप्रमाणे तंबाखू बंद या अभियानाला समर्थन करणार असल्याची माहिती डॉ. महेंद्र महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. हितेंद्र महाजन, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया, ज्येष्ठ सायकलिस्ट मोहिंदर सिंग भराज आदी उपस्थित होते.

दोन नोव्हेंबर रोजी लाल चौक, श्रीनगर येथून ही मोहीम सुरू होणार असून, पुढे श्रीनगर, उधमपूर, पठाणकोट, दशुआ, होशियारपूर, अंबाला, दिल्ली बायपास (पूर्व परिधीय महामार्ग), आग्रा, ग्वाल्हेर, झाशी, सागर, छिंदवाड, नागपूर, आदिलाबाद, कामारेड्डी, हैदराबाद, कुर्नूल, अनंतपुर, बंगळूरू, कृष्णागिरी, सेलम मदुराई, तिरुनेलवेली मार्गे कन्याकुमारी समुद्रकिनारा (विवेकानंद स्मारक) येथे मोहिमेचा समारोप होणार आहे.

१२ राज्यातून प्रवास

वेगवान सायकल प्रवासात भारताच्या जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या १२ राज्यातून प्रवास होणार आहे. या मोहिमेदरम्यान झेलम, चेनाब, तावी, बीस, सतलज, यमुना, चंबळ, नर्मदा, पेनगंगा, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्या पार कराव्या लागणार आहेत. तर हिमालय, विंध्याचल, चंबळ, सातपुडा या महत्त्वाच्या भारतीय पर्वत रंगातून हा रोमहर्षक वेगवान सायकल प्रवास घडणार आहे.

रोज ४०० किलोमीटर सराव

ही मोहीम पूर्ण करताना डॉ. महाजन रोज ३५० ते ४०० किमी सायकल चालविणार आहेत. मोहिमेच्या तयारी विषयी बोलताना डॉ. महाजन म्हणाले, 'गेल्या वर्षभरापासून ही मोहीम करण्याचे ठरवले होते. त्यानुसार तयारी सुरु असून, दर रविवारी कसारा घाट चढण्याचा सराव करत आहे. तसेच गेल्या तीन महिन्यापासून आपले क्लिनिक सांभाळत आठवड्यातील सहा दिवस किमान ५० ते १०० किमी सायकल चालवत आहेत. रोज जिममध्ये पाठीचे विशेष व्यायाम करत आहे.' प्रशिक्षक मितेन ठक्कर यांचे मार्गदर्शन डॉ. महाजन यांना लाभत आहे. या संपूर्ण मोहिमेदरम्यान २ वाहने कायम उपलब्ध राहणार असून, किशोर काळे, कबीर राचुरे, दत्ता चकोर, विजय काळे, राहुल ओढेकर आणि इतर एक असे एकूण सहा सदस्य क्रू मेम्बर्स म्हणून मोहिमेत सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल ग्रुपचा अवैध व्यवसाय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील इंद्रकुंडावर असलेल्या सिद्धी टॉवरमधील सोशल ग्रुपच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकून २२ संशयित जुगाऱ्यांना अटक केली. रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मद्य आणि वाहने असा दोन लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा ग्रुप राहुल बागमार नावाचा तथाकथित पत्रकार चालवत असून, त्यालाही पोलिसांनी अटक केली.

छापा मारला त्यावेळी सर्व संशयित जुगार खेळताना सापडले. पोलिसांनी येथून जुगाराचे साहित्य, दुचाकी वाहने, रोख रक्कम, देशी-विदेशी मद्य, मोबाइल फोन व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर बॉक्स असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये संशयितांविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम ४ व ५ सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--

या संशयितांना अटक

राहुल बागमार (गोरेराम लेन), अमोल कृष्णा चिचे (वय ४२, रा. क्रांतीनगर), लक्ष्मण काशीनाथ बेंडकुळे (वय ३९, रा. भक्तिधामसमोर), नीलेश राजनारायण शहा (वय २३, रा. वाघाडी), सचिन दिलीप बिरादर (वय ३५, रा. मखमलाबाद नाका), रमेश मोतीराम केदारे (रा. रेल्वे कॉलनी, नाशिकरोड), सोमनाथ तुळशीराम खंडारे (वय २१, रा. वाघाडी), मनोज डिलो पंडित (वय ३४, रा. क्रांतीनगर), वासू मोहन नाईक (वय ४५, रा. खडकाळी), मनोज लक्ष्मीचंद्र खिंवसरा (वय ४४, रा. रविवार पेठ), विनय राज गोगालिया (वय ३९, रा. महालक्ष्मी चाळ, जुने नाशिक), आरिफ युसूफ शेख (वय ४२, रा. मालधक्का रोड), प्रीतम भरतसिंग पवार (वय २८, रा. निमाणीजवळ), नीलेश संजय ठाकरे (वय २५, रा. संजयनगर, पंचवटी), कृष्णा भागवत वानखेडे (वय ५६, रा. वाघाडी), कैलास बबन वाघ (वय ४५, वाल्मीकनगर), हसीन मुश्ताक खाटीक (वय २८, रा. संजयनगर), शौकत वजीर खान (वय ३८, रा. खडकाळी), भरत शिवराम अहिरे (वय ३९, रा. क्रांतीनगर), रफिक रहिम पठाण (वय ४८, रा. पखाल रोड), अदिल अब्दुल शेख (वय ४५, रा. भद्रकाली)

--

२० ठिकाणांची तपासणी

परिमंडळ एकमधील गंगापूर, सरकारवाडा, मुंबईनाका, पंचवटी, भद्रकाली तसेच आडगाव या पोलिस स्टेशन हद्दीतील २० हॉटेल्स, बार, स्पा सेंट्रर्स यासह संशयित ठिकाणी पोलिसांनी तपासणी मोहीम राबविली. यावेळी पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह संबंधित पोलिस स्टेशनचे सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी हजर होते. हुक्का, बेकायदा मद्य, वेश्या व्यवसाय, जुगार यांची तपासणी करण्यात आली. अवैध धंद्याविरोधात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात एकविरा आईचा जागर!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देशकुलस्वामिनी आदिशक्ती एकविरा देवी मंदिरात नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ झाला असून, यानिमित्त एकविरादेवी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून, भाविकांसाठी दि. १० ते २४ ऑक्टोबरदरम्यान मंदिर चोवीस तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसरात यात्रेसाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली.

यंदाही घटस्थापनेपासून विजया दशमीपर्यंत खान्देश कुलस्वामिनी एकविरामाता व रेणुकामातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाला आज (दि. १०) प्रारंभ होणार आहे. एकविरा देवी मंदिरात आज पहाटे पाच वाजता ट्रस्टींच्या विश्वस्तांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे. नऊ दिवसांत आई एकविरेला विविध रंगांच्या साड्या परिधान करून सजविण्यात येते. एकविरेच्या दर्शनासाठी धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, मुंबई, पुणेसह परराज्यातून भाविक दर्शनासाठी दाखल होतात. त्यामुळे आलेल्या भाविकांच्या निवासासाठी भक्तनिवासदेखील सुरू करण्यात आले आहेत.

रावेरलाही तयारी जोरात
रावेर : शहरात आज नवरात्रोत्सवाच्या सरुवातीस ६१ दुर्गा देवींची स्थापना करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी पूजा व इतर साहित्य खरेदीसाठी भाविक येथे आल्यामुळे बाजारपेठ गजबजली आहे. येथील भाविकांचे आराध्य दैवत महालक्ष्मी मंदिर, उंटखेडा रोडवरील सप्तशृंगी देवी मंदिर, सावदा रोडवरील बिजासनी व ललिता अंबिका देवी मंदिर, गांधी चौकातील दुर्गा देवी मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे. शहरांमध्ये सोळा सार्वजनिक व सात खासगी तर ग्रामीण भागात पंचवीस सार्वजनिक तेरा खासगी दुर्गा देवींची स्थापना मंडळांकडून करण्यात येणार आहे. रावेर पोलिस ठाण्यांतर्गत ८४ जणांवर प्रतिबंधात्मक तर ४४ जणांना नोटीस असे एकूण १२८ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लायन्स’तर्फे कपड्यांचे वाटप

$
0
0

नाशिक : लायन्स क्लब ऑफ सुप्रीमतर्फे नुकतेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड या गावी कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच यादव सहारे व ग्रामसेवक सानप यांच्या उपस्थितीत आदिवासी मुलांना ५० नवीन ड्रेस देण्यात आले. तसेच ५० आदिवासी स्त्रीयांना जुन्या साड्या, १५० ड्रेसचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सहारे म्हणाले,'अशा प्रकारचा कार्यक्रम आदिवासी गावांमध्ये होणे गरजेचे आहे.' सुप्रीमतर्फे अध्यक्ष लायन्स बाजीराव पाटील खजिनदार प्रभाकर पाटील व त्र्यंबकराव देशमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राईम डायरी

$
0
0

टीव्ही, दागिन्यांची खिडकीतून चोरी!

रविशंकर मार्गावरील ६२ हजारांचा ऐवज लंपास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खिडकीमार्गाने घरामध्ये प्रवेश करून टीव्ही आणि सोन्याच्या दागिन्यांसह ६२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. नाशिक-पुणे रोड लगतच्या श्री श्री रविशंकर मार्ग परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी सुनील सूर्यकांत गांगुर्डे (वय ५८, रा. विधातेनगर) यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीची फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. ८) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास चोरट्याने घराच्या वरच्या मजल्यावरील खिडकीमार्गे आत प्रवेश केला. तेथील टीव्ही, सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोत हिसकावून पोबारा

कल्पतरुनगर परिसरातून पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील पावणे दोन तोळे वजनाची पोत हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला. मंगळवारी (दि. ९) रात्री पावणे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. पुष्पांजली आनंद पाडवी (रा. कोरीट, जि. नंदुरबार) यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीची फिर्याद दिली आहे. पाडवी त्यांच्या बहिणीसमवेत पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील संशयितांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची पोत हिसकावून पोबारा केला.

तरुणावर प्राणघातक हल्ला

शेड भाड्याने का दिले, अशी विचारणा करीत वाद घालून दोघांनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये हा प्रकार घडला. रियाज इलाहीन मळानदार (वय ३४, रा. पाथर्डी फाटा) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी (दि. ८) सायंकाळी साडेसहाच्या संशयित संजय उर्फ नाथा माधव सदावर्ते (वय ४२, रा. रमाबाई आंबेडकरनगर, अंबड) आणि विजय सदावर्ते यांनी रियाज याच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित संजय यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

..

सर्पदंशाने बालिका ठार

सापाने चावा घेतल्याने चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. अंबड लिंकरोडवरील संजीवनगरमध्ये सोमवारी (दि. ८) दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. गुलाबशाहा खातून असलम असे या चिमुकलीचे नाव आहे. घराजवळ खेळत असताना तिच्या डाव्या पायास सापाने दंश केला. कुटुंबीयांनी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान मंगळवारी (दि. ९) पहाटे तिचा मृत्यू झाला. अंबड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

महिलेचा अपघाती मृत्यू

नाशिकहून तळेगावकडे जाताना दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. सरला केशव कांगणे (वय ४३, रा. तळेगाव, ता. दिंडोरी) असे महिलेचे नाव आहे. रविवारी (दि.७) दुपारी चारच्या सुमारास त्या बळी मंदिरासमोर दुचाकीवरून खाली पडल्या. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. पंचवटी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images