Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मायलेकीत असावे मैत्रीचे नाते

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किशोरवयीन अवस्थेत मुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल, तसेच रजोनिवृत्तीच्या आधी व नंतरची स्थिती हा स्त्रियांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र, याबाबत समाजात मोकळेपणाने बोलले जात नाही. किशोरवयीन मुली आणि आई या दोघींमध्ये मैत्रीचे नाते असणे आणि दोघींमध्ये या विषयावर मनमोकळी चर्चा होणे आवश्यक आहे. असे झाल्यास मुलींमध्ये न्यूनगंड निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुनंदा मुंदडा यांनी केले.

जल्लोष फाउंडेशनने 'महिला आणि स्वस्थ जीवनशैली' या विषयावर उपनगर येथे परिसंवाद झाला. जल्लोष फाउंडेशनच्या अध्यक्षा नीलम हासे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. डॉ. मुंदडा म्हणाल्या, की महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी दिवसातला किमान एक तास तरी नियमितपणे द्यावा, तसेच सात्त्विक आहार व आहारात रक्तवृद्धीकर व कॅल्शियमयुक्त घटक जास्त असलेले पदार्थ खावे. आजच्या या स्पर्धात्मक युगात स्त्रीने स्वतःला सर्वच क्षेत्रांत सिद्ध केले आहे. घरातील सर्व जबाबदाऱ्या लीलया सांभाळून स्त्रिया नोकरी-व्यवसाय करून कुटुंबाला आर्थिक हातभारदेखील लावत आहेत. मात्र, हे सर्व करीत असताना ती आणि कुटुंबातील व्यक्ती तिच्या आरोग्याबाबत तेवढे जागरूक आहेत का? स्त्री हा कुटुंबाचा कणा आहे. स्वतः निरोगी व मजबूत असेल तरच ती सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या निभावू शकते. ती जेव्हा आजारी पडते तेव्हा मात्र कुटुंबाची सर्व घडीच विस्कटते, असेही या वेळी सांगण्यात आले. या परिसंवादास उपनगर व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या शंकांचे निरसनदेखील प्रश्नोत्तराच्या माध्यमातून या वेळी करण्यात आले. नीलम हासे व पुष्पा ताजनपुरे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पालवी’च्या स्पर्धेत रसिका खुळे विजेती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पालवी फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत मराठा हायस्कूलच्या रसिका खुळे हिने विजेतेपद पटकाविले. जनता विद्यालयातील मानसी वाघने उपविजेतेपद मिळवले तर त्रिषा गुप्ताने तिसरा क्रमांक मिळविला.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालवी फाउंडेशनकडून नैसर्गिक घटकांपासून गणेशमूर्ती बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल फाउंडेशनतर्फे जाहीर करण्यात आला. फाउंडेशनच्या डॉ. सुवर्णा पवार, डॉ. राजश्री कुटे, दीपाली खेडकर, मोना गुलाटी यांनी याविषयी माहिती दिली. कापूस, फळे, डाळी, धान्य, नारळ, सुपारी अशा नैसर्गिक घटकांपासून बनविलेल्या गणेशमूर्ती बनविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पालवी फाउंडेशनतर्फे स्पर्धा घेण्यात आली. नैसर्गिक घटकांपासून बनविलेल्याच मूर्ती स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात आल्या होत्या. याशिवाय, गणेशमूर्तींचे विसर्जनही पर्यावरणपूरक असणे आवश्यक होते. रसिका खुळे, मानसी वाघ व त्रिषा गुप्ता यांनी बनविलेल्या गणेशमूर्ती स्पर्धेचे निकष पूर्ण करणारे असल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टर, क्विझ स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका, कल्पना युथ फाऊंडेशन आणि के. के. वाघ इंजिनीअरिंगच्या अॅस्ट्रोक्लब यांच्यातर्फे जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त रविवारी तारांगण येथे झालेल्या पोस्टर आणि क्विझ कॉम्पिटिशनमध्ये जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या अनेक स्पर्धकांनी भाग घेतला.

स्पर्धकांनी पोस्टर्सच्या माध्यमातून अंतराळाशी संबंधित विविध कल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. नाशिकसह बाहेरील जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांनीही यामध्ये सहभाग घेतला होता. पोस्टर स्पर्धेचे परीक्षण एचएएल ओझर येथील डिझाईन डिपार्टमेंटचे डॉ. परेश गुप्ता आणि इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलच्या मुख्याध्यापिका कुमोदिनी बंगेरा यांनी केले. धनंजय लाखे यांनी क्विझ कॉम्पिटिशनविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेसाठी कल्पना युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष जयदीप शाह, उपाध्यक्ष भूषण उगले, नासा स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी, तसेच सुशांत राजोळे, हेमंत आढाव, पवन कदम, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरिपासाठी १,६८५ कोटींचे कर्जवाटप

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अन्नधान्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी यंदा बँका सरसावल्याचे सकारात्मक चित्र जिल्ह्यात दिसू लागले आहे. चालू आर्थिक वर्षात २६२६ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले असताना एकट्या खरिपाच्या हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत १ हजार ६८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी पूर्ण वर्षभरात ९८८ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नसेल तर त्यांना कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीमधून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांना पेरणीपासून ते औषध फवारणी अन् पुढे पीक वाहतुकीपर्यंतचा खर्च भागविण्यासाठी बँकांकडून कर्ज घेण्याशिवाय गत्यंतर राहात नाही. परंतु, घेतलेल्या कर्जाची परतफेड शेतकरी करू शकेल का, याबाबत बँकांना साशंकता असल्याने त्या कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. निकषांना पात्र ठरत असूनही बँकांनी कर्ज देण्यास टाळाटाळ केली तर आमच्याकडे तक्रारी करा, असे थेट आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. त्यानुसार, प्रशासनाला तक्रारी देखील प्राप्त होऊ लागल्या.

तालुका पातळीवर तहसीलदारांनी या विषयात प्राधान्याने लक्ष घालावे, असे स्पष्ट निर्देश जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे यंत्रणा कामाला लागली. याबाबत तालुकास्तरावर मेळावे घेऊन त्यामध्ये बँकांनाही सहभागी करून घेण्यात आले. राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांनीही जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्ज वितरणाचा वेग वाढविला. यंदा जिल्ह्याला २६२६ कोटी रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. खरिपातच १६८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले असून उद्दिष्ट प्राप्तीसाठी रब्बीमध्येही कर्जवाटप केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतसंस्थेत ३४ लाखांचा अपहार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आडगाव येथील सर्वज्ञ श्रीदत्त नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल ३४ लाख ७७ हजार ४४० रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये १९ संशयित संचालक आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू शिवाजी लभडे, संजय नारायण माळोदे, सुरेश वाळू माळोदे, अविनाश सदाशिव माळोदे, जावेद वजीर सय्यद, प्रवीण उत्तमराव देशमुख, महेश संजय आपसुंदे, अनिल सुरेश जगताप, पुंजाराम काशिनाथ दुशिंग, सुरेश गणपत हांडारे, पोपटराव बबनराव माळोदे, भाईपूजा शंकर माळोदे, दीक्षीराम गजीराम जाधव, भाऊसाहेब खंडेराव शिंदे, नारायण गबाजी लोहकरे, सुदाद रुजाजी लभडे, निर्मला भाऊसाहेब शिंदे, अलका सदाशिव माळोदे, निर्मला चंद्रभान रहाटळ अशी या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी संजय निरुपम लोळगे (वय ५४, रा. डावखरवाडी, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडे दाखल गुन्ह्यानुसार, आडगाव येथे सुरू असलेल्या सर्वज्ञ श्रीदत्त नागरी सहकारी पतसंस्थेत २०११-२०१२ या आर्थिक वर्षात संशयितांनी संगनमताने ठेवीदारांच्या ३४ लाख ७७ हजार ४४० रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला. याबाबत लोळगे यांच्या तक्रारीनुसार, आडगाव पोलिसांनी फसवणुकीसह महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ७३ प्रमाणे गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक बीडकर तपास करीत आहेत.

कोर्टाची फसवणूक

नाशिक : सुनावणी सुरू असताना न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी मायलेकांनी मिळून संशयित हयात असताना मृत्यू दाखला सादर करीत जिल्हा कोर्टाची दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मधुकर शंकर गांगुर्डे आणि सुमन शंकर गांगुर्डे (रा. सहवासनगर, कालिका मंदिरमागे, मुंबई नाका) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

मधुकर गांगुर्डेविरुद्ध जिल्हा कोर्टात एक खटला सुरू असून, त्यात त्याचा बचाव करण्यासाठी त्याची आई सुमन यांनी बनावट दाखला व प्रतिज्ञापत्र जिल्हा कोर्टात सादर केले. कोर्टाची दिशाभूल होऊन या गुन्ह्याखाली संपरीक्षा चालू नये व संशयित मधुकरला शिक्षा होऊ नये यासाठी सुमन यांनी उमराळे बुद्रक ग्रामपंचायतीतून मधुकर मृत झाल्याची खोटी नोंद करून बनावट मृत्युपत्र प्रतिज्ञापत्रासह कोर्टात सादर केले. मात्र, ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीदरम्यान कोर्टात हा बनाव उघडकीस आला. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाने दिलीप जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सरकारवाडा पोलिसांनी संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.

मद्यावरून शस्त्राने हल्ला

मद्य पिण्यावरून झालेल्या किरकोळ वादात एकाने दुसऱ्याच्या पोटावर धारदार हत्याराने वार केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री औरंगाबाद रोडवरील मानूरगाव स्मशानभूमीजवळ घडली. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये दशरथ खानझोडे (वय ४२, रा. मु. पो. मानूरगाव, ता. नाशिक) या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्यात संकेत राजेंद्र शिंदे (वय २०, रा. संत ज्ञानेश्वरनगर, जेलरोड) गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी धनंजय इस्ते (२६, रा. अशोकनगर, पवार संकुल, सातपूर) याने फिर्याद दिली आहे. संशयित खानझोडेला आम्ही दारू दिली नाही म्हणून वाद घातला, तसेच धारदार हत्याराने संकेतच्या पोटावर वार केला. आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करीत खानझोडेला अटक केली असून, पीएसआय हर्षाराणी देवरे तपास करीत आहेत.

गर्दीतून २७ हजार लंपास

नाशिक : बसमध्ये शिरताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तरुणाकडील २७ हजार रुपयांची रोकड हातोहात लंपास केली. ही घटना सीबीएस बस स्टँड येथे घडली असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. श्यामल अशोक कुशारे (वय २७, मु. पो. काकासाहेबनगर, निफाड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. कुशारे चार ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास जुने सीबीएस येथे रेडगावच्या बसमध्ये चढत असताना हा प्रकार घडला. चोरट्यांनी कुशारे यांच्या बॅगेतील २७ हजारांची रोकड काढून पोबारा केला. हवालदार निकम तपास करीत आहेत.

जुगाऱ्यांना अटक

निमाणी बस स्टॅण्डसमोर सूर्या आर्केड या इमारतीच्या एका खोलीत जुगार खेळणाऱ्या सात जणांना क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने छापा टाकून अटक केली. पाच ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून रोकड, तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. शशिकांत बोबाडे (वय ३९, दिंडोरी रोड), वाल्मीक विजय कांबळे (५६, रा. पाथरवटलेन), रवी प्रकाश आहुजा (२७, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा), दीपक गुप्ता (२८, रा. तालाब चौक, खरगोन, मध्य प्रदेश), रंगराव पाटील (५५, नांदूर नाका), सुनील पगारे (३४, रा. गणेशवाडी), राजेंद्र तांडेल (४४, गणेशवाडी) अशी या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध युनिट एकचे हवालदार रवींद्र काशिनाथ बागूल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार बी. व्ही. ठाकरे तपास करीत आहेत.

अल्पवयीन मुलीची आत्महत्या

नाशिक : आर्टिलरी सेंटर रोडवरील अंबिका सोसायटीतील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला. जान्हवी संदीप धनवटे (वय १५, रा. अंबिका सोसायटी, हरिओमनगर, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिकरोड) असे या मुलीचे नाव आहे. जान्हवीने शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या घरी पंख्याला गळ्यातील ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. हवालदार कुंदे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिग २१’चे आधुनिकीकरण शक्य

0
0

पान १ कंटी

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सध्या मिग २९, सुखोई ३० एमकेआय ही विमाने वापरली जात आहेत. त्यातच येत्या काळात राफेल हे अत्याधुनिक विमानेही हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. मात्र, अद्याप मिग २१ विमानांचा वापर होतोच आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिग २१ विमानांचे आधुनिकीकरण करणे शक्य आहे. देशांतर्गत संरक्षण उद्योगाचा मोठा विकास झाला आहे, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही मोठी क्रांती झाली आहे. त्यामुळे या विमानांमध्ये लक्षणीय बदल करणे शक्य असल्याचे संरक्षण क्षेत्रातून सांगितले जात आहे.

असे आहे मिग २१

रशियन बनावटीचे आणि एक इंजिन असलेले हे विमान आहे. जगातील ५०हून अधिक देशांमध्ये हे विमान वापरले जाते. हे विमान बालालैका या नावानेही ओळखले जाते. हे विमान रशियन वाद्यासारखे दिसते. ४५ मिनिटे एवढी या विमानाची उड्डाणक्षमता आहे. वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे हे विमान वेगाने हवेत झेप घेते. या विमानात सुधारणा करूनच मिग २३, मिग २७ आणि मिग २९ या विमानांची निर्मिती करण्यात आली.

क्षमता वाढेल

ओझर येथील हवाई दलाच्या देखभाल-दुरुस्ती केंद्राने मिग २९ या विमानाचे नुकतेच अपग्रेडेशन केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याची उड्डाण क्षमता दुप्पट केली आहे. तसेच, त्याच्यात अनेक बाबी समाविष्ट केल्या आहेत. याच धर्तीवर मिग २१ या विमानामध्येही बदल आणि ते आधुनिक करणे शक्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोक चव्हाण

0
0

अशोक चव्हाणांची जीभ घसरली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची जीभ घसरली. लघवी करणारा शाळेतील खोडकर मुलगा व त्याच्या वडिलांशी चव्हाण यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांची तुलना केली. या वक्तव्यानंतर चव्हाण यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

मालेगाव येथे जनसंघर्ष यात्रेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर टीका करताना एक गोष्ट सांगितली. एक खोडकर मुलगा शाळेत मास्तरांच्या टेबलवर उभा राहून लघवी करीत होता. हा प्रकार सांगण्यासाठी मास्तर त्या मुलाच्या घरी पोहोचले, तर त्या मुलाचे वडीलही छतावर उभे राहून लघवी करीत असल्याचे मास्तरांना दिसले. अशीच स्थिती देशात व राज्यात झाली आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. चव्हाण यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेस्ट कॉलेजसाठी १२ लाखांचे बक्षीस

0
0

३ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव देण्याची संधी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्नित असलेल्या बेस्ट कॉलेजला प्रत्येकी तीन लाख, असे बारा लाखांचे बक्षिस विद्यापीठातर्फे देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या फाउंडेशन डेच्या निमित्ताने या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या पुरस्कारासाठीचे प्रस्ताव पाठविण्यासाठी संधी कॉलेजांना ३ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संलग्नित शहरी व ग्रामीण भागातील कॉलेजेनी 'बेस्ट कॉलेज अॅवॉर्ड'साठी प्रस्ताव पाठवावेत, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.

गुणवत्ता सुधार योजनेच्या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये पुणे विद्यापीठाच्या वतीने 'बेस्ट अॅवॉर्ड'चे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये बेस्ट कॉलेज, बेस्ट प्राचार्य, बेस्ट प्राध्यापक यांसह नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारप्राप्त केलेल्या प्राध्यापकांचा सन्मान करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या फाउंडेशन डेच्या निमित्ताने हे सर्व पुरस्कार प्रदान करण्यात येतील. त्यासाठी इच्छुक कॉलेज, प्राचार्य व प्राध्यापकांनी ऑनलाइन स्वरुपात प्रस्ताव पाठवावेत, असे विद्यापीठाने सांगितले आहे. विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या वेबसाइटवर बीओडी लॉगिन करून 'फाउंडेशन डे अॅवॉर्ड' या ऑप्शनवर क्लिक करून प्रस्तावांची नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन प्रस्ताव नोंदविल्यानंतर त्याची छापील प्रत योग्य कागदपत्रांसह १२ नोव्हेंपर्यंत विद्यापीठाच्या नियोजन व विकास विभागामध्ये पाठविणे गरजेचे आहे. यामध्ये अर्जदाराचे पाच फोटो तसेच बेस्ट कॉलेजसाठी प्रस्ताव दिला असेल तर कॉलेजचे नाव दिसेल असे फोटो जोडणे गरजेचे आहे, असे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले आहे. पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी कॉलेजेसना विद्यापीठाशी संलग्नित होऊन किमान १० वर्षे पूर्ण झालेली हवीत. तसेच या कॉलेजेसचे नॅक मूल्यांकन झालेले आणि कॉलेजमध्ये प्राचार्यांची कायमस्वरुपी नियुक्ती झालेली असावी, अशी अट असल्याचे विद्यापीठाने सांगण्यात आले आहे.

असे असतील पुरस्कार

बेस्ट कॉलेज (शहरी, ग्रामीण स्वतंत्र) : प्रोफेशनल कोर्स कॉलेज - ३ लाख रुपये

बेस्ट कॉलेज (शहरी, ग्रामीण स्वतंत्र) : नॉन- प्रोफेशनल कोर्स कॉलेज - ३ लाख रुपये

बेस्ट प्राचार्य (शहरी, ग्रामीण) : प्रोफेशनल, नॉन- प्रोफेशनल कॉलेज - गोल्ड मेडल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र

बेस्ट प्राध्यापक (शहरी, ग्रामीण) : प्रोफेशनल, नॉन- प्रोफेशनल कॉलेज - गोल्ड मेडल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१४८ प्रशिक्षणार्थी ‘पीएसआय’ना प्रतीक्षा

0
0

आरक्षणाच्या मुद्द्यावरून नियुक्त्या रखडल्या

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आरक्षणाच्या आधारे मिळालेल्या नोकरीत पुन्हा परीक्षा देऊन मिळणाऱ्या पदोन्नतीबाबत मॅटने दिलेल्या आदेशामुळे १४८ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. याबाबत राज्य सरकार काय आणि केव्हा निर्णय घेते, याकडे गृह विभागाचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र पोलिस अकादमीत दोन दिवसांपूर्वी ११५ व्या सत्राचा दीक्षांत सभारंभ पार पडला. या बॅचमध्ये एकूण ८१७ प्रशिक्षाणर्थी होते. नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ८१७ पैकी ६६९ उमेदवारांना गृह विभागाने नियुक्ती पत्र दिले असून, दोन दिवसात हे अधिकारी कामावर हजर होतील. या सर्व प्रक्रियेसंदर्भात सूत्रांनी सांगितले, की २०१६ मध्ये खात्यांतर्गत परीक्षा झाली. त्यावेळी आरक्षण आणि खुला अशा पद्धतीने मेरिट लावण्यात आले. अगदीच एक किंवा दोन गुणांनी मागे पडलेल्या तिघा कर्मचाऱ्यांनी याविरोधात मॅटमध्ये धाव घेतली. आरक्षणाने एकदा सेवेत दाखल झालेल्या व्यक्तीने परिक्षेच्या आधारे पदोन्नती मिळविताना पुन्हा आरक्षणाचा लाभ घेणे चुकीचे असल्याची बाजू त्यांनी मॅटकडे मांडली. यामुळे जास्त गुण मिळवूनही संधी मिळाली नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दारी

वादाबाबत दीक्षांत सभारंभाच्या एक दिवस आगोदरच मॅटमध्ये सुनावणी झाली. याबाबत सुप्रीम कोर्टाने आपले म्हणणे यापूर्वीच मांडले असून, हा विषय राज्य सरकारच्या अधिकार कक्षात येत असल्याचे मॅटने स्पष्ट केले. त्यामुळे १४८ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, हे प्रकरण आता मुख्यमंत्र्याकडे पोहचले असून, ते यात काय निर्णय घेतात याकडे गृह विभागाचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हरवलेलं पत्र’ लिहून द्या सरप्राइज!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'माझ्या मामाचं पत्र हरवलं' हा खेळ शाळेत प्रत्येकाने खेळलेला आहे. पत्राची गंमत अन् आपुलकी खेळात कित्येक दिवस टिकून राहिली. पण सध्याच्या एसएमएस, व्हॉटसअॅप अन् फेसबुकच्या जमान्यात मामाचं नव्हे तर सर्वांचंच पत्र हरवलं. खेळही फक्त आठवणीपुरता राहिला. पत्रांची ही अविस्मरणीय दुनिया अनुभवण्याची अन् जगण्याची संधी आज, 'महाराष्ट्र टाइम्स' घेऊन येत आहे. आज, जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने 'मटा'च्या वाचकांना आपल्या आप्तेष्टांना, लाडक्या व्यक्तींना पत्र लिहून सरप्राइज द्यायचे आहे. त्या काळातल्या पत्रलेखनाच्या आठवणींची अपडेट शिदोरी आज या माध्यमातून आपण गाठिशी बांधूया. त्यासाठी आज दुपारी १२ वाजता जीपीओ कार्यालयात जमायचे आहे.

गेल्या वीस-तीस वर्षांपूर्वी आपल्या आप्तेष्टांच्या, लाडक्या व्यक्तींच्या आठवणी जपण्याचे एकच साधन होते, ते म्हणजे, पत्र. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या खुशालीची माहिती फक्त पत्रातून व्हायची. पोस्टमन काका गावात कधी येणार, याकडे लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे लक्ष लागलेले असायचे. कोणी माहेरी गेलेल्या पत्नीच्या पत्राची वाट बघायचं, कुणी कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या नवऱ्याच्या पत्राची, तर कुणी मुलाकडून येणाऱ्या पत्रांची. मात्र, मोबाइलच्या युगात पत्रलेखनाची सवय प्रत्येकाची तुटली. अनेकदा पत्र फक्त चित्रात पहायला मिळते. मात्र, पत्रातून आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत संवाद साधण्याचा आनंद काही वेगळाच आहे. हाच आनंद पुन्हा जगण्यासाठी अन् आपल्या जवळच्या व्यक्तीला पुन्हा पत्र लिहित त्या दिवसांच्या आठणीत रमण्याची संधी मटाच्या वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उपक्रमात सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी ९१५८६२७५४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

आज दुपारी १२ वाजता येथे जमा!

या अनोख्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मटाच्या वाचकांनी आज, मंगळवारी (९ ऑक्टोबर) रोजी जिल्हा परिषद कार्यालयाजवळील नाशिक मुख्य पोस्ट कार्यालय (जीपीओ ऑफिस) येथे दुपारी १२ वाजता उपस्थित रहायचे आहे. यावेळी पोस्ट ऑफिसमधून पोस्ट कार्ड घेऊन त्यावर मनातल्या गोष्टी लिहून त्या व्यक्तीला सरप्राइज द्यायचे आहे. हरवलेल्या पत्राला पुन्हा योग्य पत्ता दाखविण्यासाठी सहभागी व्हा, या अनोख्या उपक्रमात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्गा माफीनामावर ठाम; अधिकाऱ्याला फुटला घाम!

0
0

ठिय्या मांडत व्यक्त केला संताप

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रोत्सवाला एक दिवस बाकी असतानाच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महिला सदस्यांनी स्त्री शक्तीचा जागर करीत अधिकाऱ्यांना घाम फोडला. या सभेत अधिकाऱ्यांनी महिला व बालकल्याण सभापतीचा अवमान केल्याचे सांगत सर्व महिला सदस्यांनी बैठकीत ठिय्या मांडला. अखेर अधिकाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर सभा सुरळीत सुरू झाली.

जिल्हा परिषदेला २ ऑक्टोबर रोजी दोन पुरस्कार मिळाले. त्यातील एक पुरस्कार मुंबई येथे, तर दुसरा दिल्ली येथे देण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे व झेडपीचे सीईओ हे दिल्लीत गेले. त्यानंतर मुंबईच्या पुरस्कारासाठी अध्यक्ष शीतल सांगळे यांनी महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर यांना पुरस्कार स्वीकारण्यास सांगितले. मात्र खोसकर यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंडे यांनी माहिती दिली नाही. त्याचप्रमाणे पुरस्कार सोहळ्यातही अपमान केला. म्हणून महिला सदस्यांनी आपला संताप व्यक्त करीत सभागृहातच ठिय्या मांडला. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावित यांनी खोसकर या आदिवासी व महिला असल्यामुळे त्यांना अशी वागणूक दिल्याचा आरोपही केला. या प्रकरणी मुंडे यांनी माफी मागितल्यानंतर ही सभा सुरळीत सुरू झाली.

शिक्षण व दलित वस्तीच्या निधीवरून या सभेत चांगलीच खडाजंगी झाली. या सभेत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी विविध प्रश्न विचारत आपल्या भागातील प्रश्नांकडे लक्ष वेधले. डॉ. आत्माराम कुंभार्डे, डॉ. भारती पवार, भास्कर गावित यांच्यासह अनेक सदस्यांनी प्रश्न उपस्थित करीत प्रशासनाला धारेवर धरले.

..

जिल्ह्यात ११४७ शिक्षक कमी

जिल्हा परिषदेच्या या सभेत शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे वादळी चर्चा झाली. जिल्ह्यात ११४७ शिक्षक कमी असल्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थी असून, शिक्षक नाही अशी स्थिती असल्याचे सांगण्यात आले. यावेळी येवला व नांदगावमध्ये जिल्हा परिषदेची शाळा बंद करण्याची वेळ आल्याचे संजय बनकर व महेंद्र काले यांनी सांगितले, तर नांदगावचे प्रश्न रमेश बोरसे व आहेर यांनी मांडले.

..

निधीवरून गोंधळ

दलित सुधार वस्ती निधीबाबत सदस्यांना माहिती नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांना या सभेत धारेवर धरण्यात आले. या योजनेसाठी १९५ प्रस्ताव आल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यानंतर या सभेत या निधीबाबत माहिती सदस्यांना देण्यात यावी व प्रस्ताव सादर करावा असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक ग्रामीणला जनरल चॅम्पियनशिप

0
0

पोलिस क्रीडा स्पर्धा

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

३१ व्या परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत नाशिक ग्रामीण पोलिस दलाने खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन करून 'जनरल चॅम्पियनशिप' मिळविण्याचा मान पटकाविला. धुळे जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या पोलिस परेड मैदानावर १ ऑक्टोबर पासून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेत ॲथेलॅटिक्स, फूटबॉल, कबड्डी, खो-खो, बॉक्सिंग, वेट-लिफ्टिंग, स्विमिंग, क्रॉसकंट्री, ज्युदो, कुस्ती या क्रीडा प्रकारांमध्ये अव्वल स्थान पटकावून नाशिक ग्रामीणेने १३० गुण मिळवले. नाशिक शहर पोलिस आयुक्तालयास द्वितीय, जळगाव जिल्ह्याला तृतीय क्रमांकाचे बक्षिस मिळाले. या स्पर्धेत नाशिक ग्रामीण पोलिस दलाची महिला पोलिस खेळाडू योगीता वाघ हिने बेस्ट ॲथलिटचा किताब पटकाविला. नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे राष्ट्रीय खेळाडू शिरीश चव्हाण, समाधान गवळी, संजय आहेर, पोलिस उपनिरीक्षक भरत चौधरी, पोलिस कॉन्स्टेबल सचिन पिंगळे, शरद धात्रक, बाळू भोर, विकास गिते, बापुराव पगारे, महिला पो. कॉ. पुनम घुगे, योगीता वाघ, उर्मिला बिस्ट, कोजागिरी बच्छाव यांनी वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये सुवर्ण पदकांची कामगिरी करून लक्ष वेधले. या स्पर्धेत नाशिक शहर पोलिस आयुक्तालय, नाशिक ग्रामीण, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यातील एकूण ९०० पोलिस खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ सोमवारी (८ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी पोलिस कवायत मैदान, धुळे येथे पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे व धुळ्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते. केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात पोलिस अधिकारी यांना मानवंदना दिली. त्यानंतर खेळाडूंचा प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ पार पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुल्या प्रवर्गासाठी आता परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती

0
0

- ७ विद्याशाखांमधील २० विद्यार्थ्यांना लाभ

- पीएच.डी.लाही मिळणार बूस्ट

- ऑनलाइन अर्ज सादरीकरणासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत

...

jitendra.tarte@timesgroup.com

Tweeter : @jtarteMT

..

नाशिक : गुणवत्ता असूनही केवळ खडतर आर्थिक परिस्थितीमुळे परदेशी उच्च शिक्षणाची स्वप्न गुंडाळून ठेवणाऱ्या 'स्ट्रगलर्स' विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून उच्च व तंत्र शिक्षण विभाग शिष्यवृत्ती देणार आहे. चालू शैक्षणिक वर्षात ७ विद्याशाखांमधील एकूण २० विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे जगातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना केवळ पैसा अडसर ठरणार नाही.

राज्यामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग यांव्दारे अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या धर्तीवर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योजना सुरू करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर होता. यावर निर्णय घेताना शासनाने २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी चालू आर्थिक वर्षात २० कोटी रुपयांचा निधी उच्च व तंत्रशिक्षण विभागाला दिला जाणार आहे. या योजनेसाठी टप्प्याटप्प्याने होणाऱ्या आवर्ती खर्चाचा जास्तीत जास्त ८० कोटी रुपये आर्थिक भार पेलण्यास शासनाने अनुकूलता दर्शवली आहे. ही योजना महाडीबीटी पोर्टलव्दारे राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

..

\Bअर्ज प्रक्रियेस सुरुवात \B

अर्ज प्रक्रियेस सोमवारपासून सुरुवात झाली असून, ३० ऑक्टोबरपर्यंत इच्छुकांना ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. राज्यातील खुल्या प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर, पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी किंवा २०० च्या आतील जागतिक मानांकन असणाऱ्या परदेशातील शैक्षणिक संस्थेत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतला असेल अशा २० विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शिष्यवृत्ती मंजूर होणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

...

अभ्यासक्रम आणि जागा

या अंतर्गत कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन आणि विधी या अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविकेसाठी प्रत्येकी १ आणि डॉक्टरेट अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी एक अशा एकूण १० जागा उपलब्ध आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविकेसाठी ४ आणि डॉक्टरेट अभ्यासक्रमासाठी ४ अशा एकूण ८ जागा उपलब्ध आहेत. फार्मसीसाठीही पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविकेसाठी १ आणि डॉक्टरेट अभ्यासक्रमासाठी १ अशा एकूण २ जागा उपलब्ध आहेत. पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविकेसाठी सर्व शाखामिळून १० आणि डॉक्टरेट अभ्यासक्रमासाठी सर्व शाखा मिळून १० अशा एकूण २० जागा उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…घटस्थापनेसाठी सकाळचा मुहूर्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पितृपक्ष संपल्यानंतर सुरू होणाऱ्या नवरात्री उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. घटस्थापना बुधवारी होणार असल्याने शहरातील मंदिरांमध्ये तयारी सुरू आहे. यंदा १० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी प्रतिपदा संपणार असल्याने भाविकांना त्यापूर्वीच घटस्थापना करावी लागणार आहे.

यंदा नवरात्रीचा शुभारंभ चित्रा नक्षत्रावर होणार असून प्रतिपदा आणि द्वितीया एकाच वेळी असल्याने शैलपुत्री आणि ब्रह्मचारिणी देवीची पूजा एकाच दिवशी केली जाणार आहे. ज्योतिष गणनेनुसार १० ऑक्टोबरला प्रतिपदा आणि द्वितीया एकाच दिवशी आली आहेत. पंचमीची देखील वृद्धी होणार असून १३ आणि १४ ऑक्टोबर या दोन्ही दिवशी पंचमी साजरी केली जाणार आहे. पंचमीच्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. नवरात्रीत दुर्गामाता येताना नावेतून येणार असून जाताना हत्ती वाहन असणार आहे. बंगाली लोकांच्या पंचांगानुसार देवी घोड्यावर येणार असून डोलीत बसून जाणार आहे.

असा असेल यंदाचा महूर्त

यंदा मूहुर्त अत्यंत कमी कालावधीचा आहे. प्रतिपदा मंगळवारी (दि. ९) रात्री ९ वाजता सुरू होणार असून बुधवारी (दि. १०) सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी समाप्त होणार आहे. त्यामुळे सकाळी ६.२२ ते ७.२५ याकालावधीतच पूजा करावी, असे सांगण्यात आले आहे. मुहूर्ताचा कालावधी १ तास २ मिनिटांचा आहे. हा कालावधी अतिश्रेष्ठ मानण्यात आला आहे.

……

सकाळचा मुहूर्त अतिश्रेष्ठ आहे; मात्र जे लोक ७ वाजून २५ मिनिटांपर्यंत घटस्थापना करू शकणार नाहीत, अशांना दुपारी १ वाजेपर्यंत घटस्थापना करता येणार आहे. हा दिवस घटस्थापनेचा मानला गेला आहे.

- दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅटची रथयात्रा नाशकात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशातील किरकोळ व्यापारात वॉलमार्ट व फ्लिपकार्ड यांच्या एकत्रीकरणाला सरकारने मान्यता दिल्यानंतर कान्फेडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या संस्थेने देशभर सुरू केलेली व्यापारी रथयात्रा सोमवारी नाशिकमध्ये आली. त्यावेळी या यात्रेचे चेंबर व व्यापाऱ्यांनी स्वागत केले.

केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात देशात जनजागृती करण्यासाठी ही रथयात्रा काढण्यात आली आहे. रविवार कारंजा येथे ही रथयात्रा आल्यानंतर यात्रेचे समन्वयक विजयसिंग वालिया यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, किराणा किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शेखर देशपुते, डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पटेल उपस्थित होते.

चेंबरचे अध्यक्ष मंडलेचा यांनी सांगितले की, महाराष्ट्र चेंबरने कॅटच्या या आदोलनास संपूर्ण पाठिंबा दिला असून, २८ सप्टेंबर रोजी आयोजित बंद यशस्वी केला आहे. तसेच, कॅटच्या पुढील वाटचालीत चेंबर सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. यात्रेचे समन्वयक विजयसिंग वालिया यांनी सांगितले, की सर्वांनी एकत्र येऊन संघटितपणे विरोध करून शासनाच्या भूमिकेत बदल करण्यासाठी दबाव आणला पाहिजे, अन्यथा आगामी काळात किरकोळ व्यावसायिकांचे भवितव्य चांगले असणार नाही. देशातील किरकोळ व्यापार हा वॉलमार्टसारख्या मल्टिनॅशनल कंपन्यांकडे गेलेला असेल. यावेळी भावेश माणेक, परेश बोधाणी, विजय शहा, अरुण जातेगावकर, विजय काकड, महेंद्र पटेल, एकनाथ अमृतकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जनजागृती मोहिमेला सुरुवात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील डेंग्यू आणि स्वाइन फ्लूसह साथीच्या आजारांबाबत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून सोमवारपासून शहरात स्वच्छता आणि जनजागरण व प्रतिबंधात्मक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत प्रभात फेरीसह शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. विद्यार्थांना प्रतिज्ञा, मार्गदर्शन, प्रभात फेरी, घरोघरी भेट देऊन डासांची उत्पत्ती शोधणे, स्वाइन फ्लू, रुग्णाच्या परिसरात सर्वेक्षण व स्वच्छता, तसेच नागरिकांना लाउड स्पीकर, पत्रके, स्टिकर्स, बॅनर्सद्वारे प्रबोधन आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. दरम्यान, महापौरांच्या प्रभागातून सुरू होणाऱ्या या उपक्रमाबाबत त्यांनाच माहिती नसल्याची चर्चा आहे.

आयुक्त तुकाराम मुंढेंसह स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, पंचवटी प्रभाग समिती सभापती पूनम धनगर, आरोग्य व वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल गायकवाड, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, नगरसेवक अरुण पवार, गणेश गिते उपस्थित होते. नाशिक पूर्व विभागात प्रभाग क्रं.२३ मध्ये सभापती सुमन भालेराव यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेविका मिर्झा शाहीन सलीम बेग उपस्थित होत्या. सिडको विभागात प्रभाग क्रं २५ मध्ये सभापती हर्षा बडगुजर, नगरसेवक सुधाकर बडगुजर, शामकुमार साबळे उपस्थित होते.

प्रभागात महापौरच आगंतुक

महापालिकेच्या वतीने महापौरांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असला तरी त्यांनाच या कार्यक्रमाची माहिती नव्हती अशी चर्चा आहे. वैद्यकीय विभागाकडून अचानक त्यांना त्यांच्याकडून उद्घाटन होणार असल्याचे आयत्या वेळी सांगण्यात आले. महापौर या धक्क्यातून सावरत नाही तोच आयुक्त मुंढे आणि सभापती आहेर-आडके हे दाखल झाले. त्यामुळे महापौरांनी घाईगडबडीत प्रभागातील नगरसेवकांना पाचारण करीत उदघाटनाचे सोपस्कार पार पाडले. विभागाच्या आमदारांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराटेत प्रथमेश, आर्यनला सुवर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकरोडवरील फ्रवशी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात आयोजित जिल्हास्तरीय दुसऱ्या आझाद कराटे कप स्पर्धेत प्रथमेश दातीर, आर्यन पटेल यांनी सुवर्णपदक पटकावले. तनिष्क पाटील या विद्यार्थ्याने ब्राँझ मेडल पटकावले.

या स्पर्धेत आर्यन पटेलने प्रतिस्पर्धी खेळाडूला नॉक आऊट करून सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. त्याचप्रमाणे प्रथमेश दातीरचा अंतिम सामना देखील अत्यंत चुरशीचा ठरला. तनिष्क पाटीलला मात्र ब्राँझ मेडलवरच समाधान मानावे लागले. या स्पर्धेसाठी जिल्ह्याभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना ग्लोबल व्हिजनचे क्रीडा शिक्षक आकाश दभडगे, योगेश पानपाटील यांचे मार्गदशन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिमोट सेन्सिंगद्वारे आपत्तींचे अध्ययन

0
0

डॉ. वर्गिस यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रिमोट सेन्सिंगचा वापर दुसऱ्या जागतिक युद्धापासून करण्यात येत असून कृषी पीक लागवडीपासून कृषी माल काढणीपर्यंत त्याचा वापर होऊ शकतो. तसेच याद्वारे व्यापक व दुर्गम भागाची व्यवस्थित माहिती मिळविता येते. भूकंप, ज्वालामुखी, वणवा, महापूर, वादळे आदी नैसर्गिक आपत्तींचा अभ्यासही रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून करता येतो, असे प्रतिपादन 'इस्त्रो'चे नॅशनल रिमोट सेंसिंग सेंटरचे डॉ. वर्गिस यांनी केले.

मविप्र समाज संस्था व नॅशनल स्पेस सोसायटी (यूएसए) नाशिक इंडिया चॅप्टर नाशिक यांच्यातर्फे जागतिक अंतराळ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या पाचव्या दिवशी यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधतांना डॉ. वर्गिस बोलत होते. रिमोट सेन्सिंगद्वारे मिळणारी माहिती मानवी हस्तक्षेपाशिवाय असल्याने, पूर्वग्रहरहित व पूर्ण विश्वासार्ह असल्याने तिचे महत्त्व अधिक आहे. भूपृष्ठावरील व भूपृष्ठांतर्गत खनिजे, पाण्याचा साठा, धरणातील पाणीसाठा, धरणाची उंची, खोली व पाणी साठवण क्षमता, वन्यप्राण्यांचे सर्वेक्षण, जीवाश्म अवशेषांचा अभ्यास याबाबतही रिमोट सेन्सिंगचा वापर केला जातो, असेही ते म्हणाले.

याच कार्यक्रमात अमेरिकेतील ओक्लाहामा स्पेस अलायंसचे प्रेसिडेंट डेविड शिली यांचे 'नासा टेक्निकल रेडिनेस' या विषयावर ऑनलाइन प्रेझेंटेशन झाले. यावेळी 'मविप्र'च्या सरचिटणीस नीलिमा पवार, संचालक सचिन पिंगळे, नॅशनल स्पेस सोसायटी (युएसए) नाशिक इंडिया चॅप्टर नाशिकचे अविनाश शिरोडे, डॉ ओमप्रकाश कुलकर्णी, विजय बाविस्कर, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, डॉ. एन. एस. पाटील, प्रा. एस. के. शिंदे, सी. डी. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉयलरवर चढून शेतकऱ्यांचे आंदोलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

के. जी. एस. साखर कारखान्याला ऊस देऊनही पेमेंट मिळत नसल्याने संतापलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कादवा गोदा साखर कारखान्याच्या बॉयलरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. दुर्दैव असे की कारखाना प्रशासन आणि संचालक मंडळाने कोणतीही दखल न घेतल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे

निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर पिंपळगाव निपाणी शिवारातील कादवा गोदा साखर कारखान्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकबाकी असलेले शिंगवे येथील शेतकरी रामकृष्ण डेर्ले, किशोर मोगल, सतीश सानप यांनी सकाळी अकरा वाजता कारखान्याच्या बॉयलरवर चढून दिवसभर आंदोलन केले आहे. आंदोलनकर्त्यांशी शेतकी अधिकारी बढे आणि जनरल मॅनेजर कुरुकुलशिंग यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. आम्ही काहीही करू शकत नाही, आमच्या हातात काही नाही. कार्यकारी संचालक पुणे येथे असल्याने कोणताही निर्णय आम्ही घेऊ शकत नसल्याने आठ दिवसांत चेक देतो, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र दर महिन्याला तारीख देऊन चालढकल केली जात असल्याने आमचा विश्वास राहिलेले नाही, असे सुनावत आंदोलनकर्ते शेतकरी खाली न उतरण्यावर आंदोलनावर ठाम राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पितृपक्षा संपल्याने खरेदीचा उत्साह

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर घटस्थापनेसाठीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. शहरातील सर्व बाजारपेठेत मंगळवारी नवरात्री खरेदीसाठी महिला वर्गाची गर्दी उसळणार आहे. पितृपक्षात वस्तू खरेदी केल्या जात नाहीत. काही दिवसांपासून दुकांनांना बाजारात ग्राहकांची प्रतीक्षा होती. पितृपक्ष संपल्याने महिला वर्गामध्ये नवरात्री खरेदीला उधाण येणार आहे.

आदिमायेच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज झाले आहे. घटांची बुधवारी (दि. १०) घरोघरी स्थापना होणार आहे. शहरात सर्वत्र आदिशक्तीची आराधना केली जाणार आहे. यासाठीच शहरातील बाजारपेठांमध्ये पूजा साहित्यासह टिपऱ्या आणि फुलांची दुकाने मोठ्या संख्येने थाटण्यात आली आहेत. नवरात्रोत्सवाचे मंगलमय वातावरण शहरातील बाजारपेठांमध्ये जाणवू लागले आहे.

शहरातील देवी मंदिरांसमोर आकर्षक रोषणाईचे काम अंतिम टप्यात आले आहे. देवी मंदिरांना रंगकाम केल्यानंतर भाविकांसाठी सभामंडप घालण्यात आला आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी मंडपांननाही रंगीत विद्युत रोषणाई केली आहे. शहरात उद्यापासून नवरात्रीची धूम सर्वत्र बघायला मिळणार आहे.

सप्तधान्य, टोपली, घट, लाल कापड, हिरवा चुडा यांची किंमत १० ते २० रुपये आहे. श्रीफळाची किंमत २० ते २५ रुपये आहे. अखंड दिवा तेवत ठेवण्यासाठी लागणाऱ्या कापसाची वात २० रुपयांपासून ६० रुपयांहून अधिक किंमतीस उपलब्ध आहे. सजवलेल्या घटाची किंमत ६० ते १५० रुपये आहे. साध्या टिपऱ्या २० रुपये तर एम्ब्रॉडरी केलेल्या आणि नव्या स्टाइलच्या टिपऱ्या ४० ते २०० रुपये जोडी विक्री होत आहेत. मेनरोड, दहीपूल, रविवार कारंजा, पंचवटी यासह उपनगरातील सर्व बाजारपेठेत नवरात्र पूजा साहित्याची आणि फुले व फळांची दुकाने थाटण्यात आली आहेत.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images